Home Blog Page 1930

शिवप्रेमींनी थाटात साजरा केला सिंहगडावर शिवराज्याभिषेक सोहळा

0

विराट दुचाकी रॅलीचे आयोजन : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीदिन साजरा

पुणे : हर हर महादेव… छत्रपती शिवाजी महाराज की जय…धर्मवीर संभाजी महाराज की जय… च्या घोषणांनी पुन्हा एकदा किल्ले सिंहगड दुमदुमून गेला. भारतीय इतिहासातील सुवर्णक्षण म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा. शिवराज्याभिषेकाचा हा उत्सव यंदा देखील सिंहगडावर उत्साहात साजरा झाला. फुलांनी सजविलेल्या पालखीतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे स्वागत पुणे दरवाजा येथे शिवप्रेमींनी पुष्पवृष्टीने केले. तर, शंखांचा निनाद आणि हलगी वादनाने संपूर्ण सिंहगडाच्या परिसरातील वातावरण शिवमय झाल्याचा भास होत होता.

विश्व हिंदू परिषद, पुणे श्री शिवराज्याभिषेक अभिवादन समिती (किल्ले सिंहगड) च्या वतीने तिथीनुसार श्री शिवराज्याभिषेक दिन व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त किल्ले सिंहगड येथे भव्य अभिवादन सोहळ््याचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ त्रयोदशीला दुपारी १२ वाजता पालखी सोहळ्याचे सिंहगडावर आगमन झाले. तत्पूर्वी छत्रपती राजाराम पूलाजवळील वीर बाजी पासलकर स्मारकपासून आयोजित विराट दुचाकी रॅलीत तब्बल २ हजार शिवभक्त भगवे झेंडे हातात घेऊन सहभागी झाले होते. विराट दुचाकी रॅलीचे स्वागत नागरिकांनी विठ्ठलवाडी, हिंगणे, माणिकबाग, धायरी फाटा, किरकटवाडी, खडकवासला, डोणजे, सिंहगड पायथा अशा विविध ठिकाणी उत्साहाने केले. सोहळ्याचे यंदा पाचवे वर्ष आहे. प्रवेशद्वार व बुरुज फुलांनी सजविण्यात आले होते. तर, ठिकठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या.

पालखी सोहळ्याला सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज सुरेशदादा मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय संयुक्त मंत्री व सहसत्संग प्रमुख दादा वेदक, पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष पांडुरंग राऊत, प्रांत मंत्री संजय मुरदाळे, समितीचे अध्यक्ष किशोर चव्हाण, शरद जगताप, श्रीकांत चिल्लाळ, केतन घोडके, श्रीपाद रामदासी, समीर रुपदे, संपत चरवड, साईनाथ कदम, धनंजय गायकवाड यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.

सिंहगडावरील वाहनतळापासून नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधी व कार्यक्रम मैदानापर्यंत पालखी मिरवणूक काढण्यात आली. पालखी मिरवणुकीत हलगी पथक, शंखनाद पथक यांसह पारंपरिक वेशातील महिला सहभागी झाल्या होत्या. यावेळी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज सुरेशदादा मोहिते यांच्या हस्ते महाराजांच्या मूर्तीस अभिषेक झाला. तसेच नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीचे पूजन देखील करण्यात आले. तसेच सिंहगडावरील मंदिरे व ऐतिहासिक ठिकाणांचे पूजन देखील यावेळी झाले.

किशोर चव्हाण म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी व सरदार, मावळ्यांनी गाजविलेल्या पराक्रमाची आठवण प्रत्येकाने ठेवायला हवी. ज्याप्रमाणे रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा होतो, त्याप्रमाणे तो प्रत्येक गड-किल्ल्यावर व्हायला हवा. त्यामुळे आम्ही सिंहगडापासून या सोहळ्याची सुरुवात केली. शिवप्रेमींनी विविध गड-किल्ल्यावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करुन शिवरायांचा पराक्रम व विचार सामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ जून रोजी पुणे-मुंबई दौऱ्यावर

0

पंतप्रधान देहू, पुणे इथल्या जगतगुरु श्रीसंत तुकाराम महाराज मंदिराचं उद्घाटन करणार

पंतप्रधान मुंबई समाचारच्या द्विशताब्दी महोत्सवात देखील सहभागी होणार

पुणे/ मुंबई -पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 जून रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. दुपारी 1:45 च्या सुमाराला पंतप्रधान देहू, पुणे येथील जगतगुरु श्रीसंत तुकाराम महाराज मंदिराचं उद्घाटन करतील. संध्याकाळी 4:45 च्या सुमाराला पंतप्रधान मुंबई मधील जल भूषण इमारत आणि राज भवन येथील क्रांतिकारक गॅलरीचं उद्घाटन करतील. त्यानंतर संध्याकाळी 6 च्या सुमाराला पंतप्रधान मुंबईतल्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे मुंबई समाचारच्या द्विशताब्दी महोत्सवात सहभागी होतील.

पंतप्रधान पुणे येथे

पंतप्रधान देहू, पुणे इथल्या जगतगुरु श्रीसंत तुकाराम महाराज मंदिराचं उद्घाटन करतील. संत तुकाराम हे वारकरी संप्रदायाचे संत आणि कवी होते, जे त्यांचे अभंग आणि अध्यात्मिक कीर्तनाच्या माध्यमातून केलेल्या समाजाभिमुख पूजनासाठी ओळखले जातात. ते देहू इथे रहायचे. त्यांच्या निधनानंतर एक शिला मंदिर बांधण्यात आलं, पण त्याची औपचारिक रचना देऊळ म्हणून करण्यात आली नव्हती. या मंदिराची 36 शिखरांसह दगडी पुनर्बांधणी करण्यात आली असून त्यामध्ये संत तुकाराम महाराजांची मूर्ती देखील आहे.

पंतप्रधान मुंबई येथे

पंतप्रधान मुंबईमधील जल भूषण इमारत आणि राजभवन येथील क्रांतिकारक गॅलरीचं उद्घाटन करतील. जल भूषण इमारत हे 1885  सालापासून महाराष्ट्राच्या राज्यपालांचे अधिकृत निवासस्थान आहे. या इमारतीचे आयुर्मान संपल्यामुळे ती पाडण्यात आली होती आणि त्या जागी नव्या इमारतीच्या बांधकामाची मंजुरी देण्यात आली होती. भारताच्या माननीय राष्ट्रपतींच्या हस्ते ऑगस्ट 2019 मध्ये नव्या इमारतीची पायाभरणी करण्यात आली होती. जुन्या इमारतीची सर्व वैशिष्ट्ये नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीत जतन करण्यात आली आहेत.

सन 2016 मध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल विद्यासागर राव यांना राज भवनामध्ये एक भुयार सापडले होते. शस्त्रास्त्र ठेवण्यासाठी गुप्त ठिकाण म्हणून पूर्वी ब्रिटीश या भुयाराचा उपयोग करत होते. 2019 साली या भुयाराचे नुतनीकरण करण्यात आले. या भुयारात बनवण्यात आलेली गॅलरी महाराष्ट्रातील स्वातंत्र्य सैनिक आणि क्रांतिकारकांच्या स्मरणार्थ बनवण्यात आलेले अशा स्वरूपाचे एकमेव संग्रहालय आहे. हे संग्रहालय वासुदेव बळवंत फडके, चाफेकर बंधू, सावरकर बंधू, मॅडम भिकाजी कामा, व्ही. बी. गोगटे, 1946 मधील नौदल क्रांती आणि अन्य क्रांतीकारकांना श्रद्धांजली अर्पण करते.

पंतप्रधान मुंबईत वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे मुंबई समाचारच्या द्विशताब्दी महोत्सवात देखील सहभागी होतील. 1 जुलै,1822 रोजी फरदुनजी मर्झबानजी यांच्या हस्ते मुंबई समाचारची एक साप्ताहिक म्हणून छपाई सुरु झाली. त्यानंतर 1832  साली ते दैनिक झाले. हे वृत्तपत्र गेली 200 वर्ष सातत्त्याने प्रकाशित होत आहे. या दुर्मिळ विक्रमाचे स्मरण म्हणून या प्रसंगी एक टपाल तिकीट देखील प्रकाशित केले जाईल. 

भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून देहूतील कामाचा आढावा

0

पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ जून रोजी श्री क्षेत्र देहू येथे येणार असून, त्यांच्या हस्ते जगद्गुरु तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण होणार आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी सध्या देहू नगरीत सुरू आहे. या कामाचा आढावा आज भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी घेतला. तसेच, पाटील यांनी यावेळी जगद्गुरु तुकाराम महाराज मंदिरात जाऊन, महाराजांचे दर्शन घेतले. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना यावेळी आ. पाटील यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिल्या.

या कार्यक्रमास मोठ्या संख्येने वारकरी बांधव येणार असून, नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी प्रदेश महामंत्री श्रीकांत भारतीय, महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमाताई खापरे, ओबीसी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले, आ. राहुल कुल, माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे, हर्षवर्धन पाटील, पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे, आशाताई बुचके, यांच्या सह भाजपाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

आर्चरीमध्ये आदितीचा सुवर्णवेध,पार्थ कोरडेला रौप्यपदक

0

खेलो इंडिया यूथ गेम्स

चंदीगड, १२ –
पंजाब युनिर्व्हिसिटीच्या मैदानावर झालेल्या आर्चरीमध्ये साताऱ्याच्या आदिती स्वामीने सुवर्णवेध घेतला. कम्पाउंड राऊंडमध्ये तिने हे यश मिळवले. अहमदनगरच्या पार्थ कोरडे याचे सुवर्णपदक थोडक्यात हुकले. त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
आदितीने पंजाबच्या अवनित कौर हिचा पराभव केला. आदितीचा स्कोर १४४ होता तर अवनित १३७ गुणांवर होती. आदितीने घेतलेल्या आघाडीमुळे महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळाले. ती साताऱ्याच्या दृष्टी अकादमीत सराव करते. प्रवीण सावंत हे तिचे मार्गदर्शक आहेत.
दुसरे पदक अहमदनगरच्या पार्थने मिळवून दिले. पार्थ आणि आंध्र प्रदेशच्या व्यंकीसोबत अंतिम सामना झाला. पार्थची सुरूवात खराब झाली. त्यामुळे तो काहीसा पिछाडीवर पडला. शेवटी पार्थ स्कोर होता १४४ तर आंध्रप्रदेशच्या व्यंकी अवघा एका गुणाने (१४५) पुढे राहिला. त्यामुळे त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तो अहमदनरमधील अभिजीत दळवी यांच्या अकादमीचा खेळाडू आहे. इतर स्पर्धकांना पदकापर्यंत पोचता आले नाही. नीतू इंगोले (अमरावती) या आर्चरी संघाच्या प्रशिक्षक होत्या.

सायंकाळी टेबल टेनिस, बॉक्सिंग, जलतरण आणि खो-खोचे सामने होणार आहेत.

बॉक्सिंगमध्ये मुलांची फाईट
बॉक्सिंगमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी चांगलीच लढत दिली. तब्बल नऊ खेळाडूंनी सेमीफायनल गाठली. सिमरन वर्मा, रिशिका होले, साई डावखर, आदित्य गौंड, माणिक सिंग, कुणाल घोरपडे, सुरेश विश्वनाथ, विजयसिंग, व्हिक्टर सिंग यांनी विविध गटांतील सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. त्यातील व्हिक्टर सिंगने सकाळी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. उर्वरित सामने होत आहेत. त्यांना प्रशिक्षक सतीश भट, विजय डोबाळे, सागर जगताप यांचे मार्गदर्शन मिळाले.

युरोप – भारत शैक्षणिक व सांस्कृतिक संबंध वृद्धिंगत व्हावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

0

मुंबई, दि. 12 : युरोप भारताचा महत्त्वाचा भागीदार असून भारत आणि युरोपीय देशांमध्ये पर्यावरण, संरक्षण व स्वच्छ ऊर्जा या क्षेत्रात मोठे सहकार्य सुरू आहे. युरोप जगातील सर्वात मोठी व्यापारी पेठ असून भारताला देखील युरोपशी व्यापाराचा मोठा इतिहास आहे. भारत व युरोपीय देशांमधील संबंध केवळ व्यापार व गुंतवणूक या विषयांपुरते मर्यादित न राहता उभयपक्षी शैक्षणिक व सांस्कृतिक संबंध देखील वृद्धिंगत व्हावे, अशी अपेक्षा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी येथे आज व्यक्त केली.

भारत आणि युरोपीय समुदायांमधील संबंध स्थापन होण्याला ६० वर्षे पूर्ण होत असल्याचे निमित्त साधून कौन्सिल ऑफ युरोपियन युनिअन चेंबर्स ऑफ कॉमर्स इन इंडिया या संस्थेतर्फे शुक्रवारी मुंबईत ‘युरोप दिन 2022’ साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाला युरोपिअन युनिअनच्या भारतातील व्यापार व आर्थिक शिष्टमंडळाच्या प्रमुख रेनिता भास्कर, युरोपिअन युनिअन चेम्बर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष मनीष भटनागर, फ्रान्सचे मुंबईतील वाणिज्यदूत जॉन मार्क सेर शर्ले, चेंबरच्या संचालक श्रीमती डॉ. रेणू शोम तसेच विविध देशांचे मुंबईतील वाणिज्यदूत व उद्योग-व्यापार प्रतिनिधी उपस्थित होते.

महाराष्ट्रातील विद्यापीठांचा कुलपती या नात्याने युरोपमधील विद्यापीठे तसेच महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्था व विद्यापीठांमध्ये सहकार्य अधिक वाढावे अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली. आपल्या भाषणात राज्यपालांनी युरोपिअन युनिअन चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या कार्याचे कौतुक केले.

युरोपीय समुदाय भारताचा सर्वात मोठा व्यापार भागीदार असल्याचे सांगून फ्रांस व भारत राजनैतीक सहकार्याची 75 वर्षे साजरी करीत असतानाच युरोपिअन युनिअन व भारत आपल्या सहकार्याची 60 वर्षे साजरी करीत आहे हा चांगला योगायोग आहे, असे फ्रान्सचे वाणिज्यदूत जॉन मार्क सेर शर्ले म्हणाले.

भारत व युरोपीय देशांचा व्यापार 100 अब्ज डॉलर इतका असून हे संबंध अधिक दृढ करण्यासाठी योग्य संधी आताच असल्याचे युरोपियन युनियनच्या व्यापार व आर्थिक शिष्टमंडळाच्या प्रमुख रेनिता भास्कर यांनी यावेळी सांगितले.  डॉ रेणू शोम यांनी आभार प्रदर्शन केले.

प्रत्येकाच्या रक्ताचा रंग एकच…

0

रक्तसंक्रमणासाठी सुरक्षित रक्त आणि रक्त उत्पादनाच्या गरजेबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी जागतिक रक्तदाता दिन साजरा करण्यात येतो. राष्ट्रीय आरोग्य व्यवस्थेत ऐच्छिक आणि कोणताही मोबदला न घेता रक्तदान करणाऱ्यांचे महत्व यानिमित्ताने अधोरेखित करण्यात येते. राष्ट्रीय रक्तसंक्रमण सेवा, रक्तदानाच्या क्षेत्रात कार्यरत संस्था आणि स्थानिक उपक्रमांना प्रोत्साहीत करताना ऐच्छिक रक्तदानाच्या चळवळीला गती देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करयात येतो. यवर्षी ‘रक्तदान हे ऐक्याचे कार्य : सहभागी व्हा आणि जीव वाचवा’ ही संकल्पना घेऊन जागतिक पातळीवर विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

कोरोना कालावधीत रक्तदानाचे महत्व लक्षात आले आहे. रक्तदानाद्वारे आपल्याला एखाद्याचे प्राण वाचविता येतात. रुग्णाला गरजेच्यावेळी विशिष्ट गटाचे रक्त मिळणे त्याचा जीव वाचविण्यासाठी महत्वाचे असते. अशावेळी रक्तपेढीत विविध गटाचे रक्त उपलब्ध असल्यास त्याला तात्काळ मदत करता येते. ऐच्छिक रक्तदाऱ्यांनी केलेल्या रक्तदानातून रक्ताचा साठा रक्तपेढीत तयार होत असतो. त्यामुळे रक्तदानासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.

एखाद्याचे प्राण वाचविण्यासाठी रक्ताची आवश्यकता असते. प्रसवकाळात रक्तस्त्रावाने पीडित महिलांच्या आरोग्य व्यवस्थापनासाठी रक्त आणि रक्ताचे घटक आवश्यक असतात. मलेरिया आणि कुपोषाणामुळे अशक्त मुले, रक्त विकार असणारे रुग्ण, हिमोग्लोबिनची कमतरता आणि रोगप्रतिकारशक्ती कमी असणाऱ्या व्यक्ती, अपघात आणि वैद्यकीय शस्त्रक्रीयेच्यावेळी रक्ताची गरज भासते.  रक्ताची गरज सार्वत्रिक असताना उपलब्धता मात्र मर्यादीत आहे. त्यामुळे रक्तदाऱ्यांना रक्तदानासाठी प्रोत्साहीत करणे गरजेचे आहे.

रक्ताची गरज असलेल्यांना रक्तपुरवठा करण्यासाठी नियमित रक्तदान करणारे ऐच्छिक रक्तदाते प्रत्येक देशासाठी महत्वाचे आहेत. कोणतेही संकट नसताना रक्तदानाद्वारे रक्तसाठा उपलब्ध झाल्यास आपत्तीच्यावेळी रक्ताची मागणी वाढल्यास त्याचा योग्य उपयोग करणे शक्य होते. शिवाय रक्तदानाच्या माध्यमातून एकप्रकारचे सामाजिक संबध आणि जाणिव निर्माण होत असल्याने समाजाच्या ऐक्यासाठीदेखील ते महत्वाचे ठरते.

जागतिक रक्तदाता दिनाच्या निमित्ताने रक्तदात्यांप्रति कृतज्ञता व्यक्त करताना अशा रक्तदानाच्या चळवळीला गती देण्याचे प्रयत्न अपेक्षित आहेत. ऐच्छिक रक्तदानाबद्दल व्यापक जागृती निर्माण झाल्यास आणि विशेषत: तरुण वर्गात या विषयाचे महत्व पोहोचविल्यास त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील. रक्तदानाचे उपक्रम वर्षभर सुरू रहावेत यासाठी रक्तदात्यांना प्रोत्साहित करणे  अत्यंत महत्वाचे आहे. असे केल्यास रक्तसंकलनाचे प्रमाण वाढून गरजेप्रमाणे रक्त उपलब्ध होऊ शकेल.

जागतिक रक्तदाता दिनाच्या निमित्ताने आपणही आपल्यापरिने योगदान देऊ शकतो. शासकीय रुग्णालयात रक्तदान करणे, परिसरात ऐच्छिक रक्तदात्यांना रक्तदानासाठी प्रोत्साहीत करणे, रक्तदान करू इच्छिणाऱ्यांची यादी तयार करणे, रुग्णालयाशी समन्वय साधून त्यांना रक्तदात्यांची माहिती पुरविणे आदी माध्यमातून हा दिवस साजरा करता येईल. विशेषत: सामाजिक संस्थांनी रक्तदान हा आपल्या नेहमीच्या उपक्रमाचा भाग केल्यास रक्तदानाच्या चळवळीसाठी मोठे योगदान लाभेल. हा दिवस अशाच प्रकारचे ऐक्य दाखविण्यासाठी आहे. कारण, शेवटी प्रत्येकाच्या रक्ताचा रंग एकच….

जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार जगातील  ७९ देशातील रक्तपुरवठ्यापैकी ९० टक्के रक्तपुरवठा ऐच्छिक रक्तदात्यांकडून होतो. तर ५४ देशात हे प्रमाण ५० टक्के आहे. इतर रक्तपुरवठा कुटुंबातील व्यक्ती किंवा पैसे मोजून इतर व्यक्तींकडून रक्ताची गरज भागवली जाते. जगातील एकूण रक्तदात्यांपैकी ३३ टक्के महिला आहेत. एकूण रक्त संकलनापैकी ४० टक्के श्रीमंत राष्ट्रात संकलीत केले जाते.

मागील तीन महिन्यापासून रक्तदान न केलेले १८ ते ६५ वयोगटातील कोणीही रक्तदान करू शकते. रक्तदान करणाऱ्याचे वजन साधारण ४८ किलोपेक्षा अधिक असायला हवे. प्रसुतीनंतर ६ महिन्यांनी स्त्रीया रक्तदान करू शकतात. क्षयरोग, हिपाटायटीस, मधुमेह, मलेरियासारखे आजाराने पीडित नसणाऱ्या व्यक्ती रक्तदान करू शकतात. दररोज आपल्या शरीरात नवे रक्त तयार होत असते. रक्तदानासाठी एकावेळी ३५० मिली रक्तच घेतले जाते. परवाना असलेली रक्तपेढी किंवा शासकीय रुग्णालयात रक्तदान करता येते. रक्तदान केल्यानंतर १२ महिन्यापर्यंत रक्तदाता किंवा त्याच्या कुटुंबियातील व्यक्तीस रक्ताची गरज असल्यास रक्तपेढीतर्फे एक युनिट रक्त देण्यात येते.

-जिल्हा माहिती कार्यालय, पुणे

सोनिया गांधींची प्रकृती बिघडली:दिल्लीच्या गंगाराम हॉस्पिटलमध्ये दाखल

0

नवी दिल्ली-काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, त्याचा अहवाल अद्याप निगेटीव्ह आला नाही. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी त्यांना दिल्लीच्या गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगितले. उल्लेखनीय बाब म्हणजे ED ने 23 जून रोजी नॅश्नल हेराल्ड प्रकरणी सोनिया व त्यांचे सुपुत्र राहुल गांधी यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे. यापूर्वी 9 जून रोजी त्यांना इडी कार्यालयात हजर व्हावयाचे होते. पण, कोरोनाच्या संसर्गामुळे त्यांना वाढीव मुदत देण्यात आली आहे.

75 वर्षीय सोनिया गांधी यांना गत 2 जून रोजी कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत होती. पण, अचानक त्यांची प्रकृती बिघडली. सुरजेवाला यांनी सांगितले की, “सोनिया गांधींना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर हळूहळू त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत होती. पण, प्रकृती खालावल्याने त्यांना आज सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले.”

नॅश्नल हेराल्ड प्रकरणी ईडी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची 13 जून रोजी चौकशी करणार आहे. ईडीने यापूर्वी त्यांना 2 जून रोजी हजर राहण्याचा समंस बजावला होता. पण, त्यावेळी ते भारतात नव्हते. त्यानंतर तपास यंत्रणेने त्यांना उद्या चौकशीसाठी बोलावले आहे. दरम्यान, काँग्रेस रविवारी या प्रकरणी देशभर निदर्शने व पत्रकार परिषदा घेत आहे.

‘संजय राऊतांना सत्तेचा माज आलाय, त्यांनी अपक्ष आमदारांची बदनामी करण्याचा गाढवपणा केला’- अनिल बोंडे

0

नागपूर -संजय राऊत यांच्याकडेही यंत्रणा आहे. संजय राऊत बदलेच्या भावनेने प्रत्येक वेळेस चूका करतात. राऊत द्वेषाने पेटलेले आहेत. सत्ता लोकांसाठी असते. लोकांच्या भल्यासाठी असते. मात्र, संजय राऊत यांना सत्तेचा माज आला असल्याची टीका भाजपा नेते अनिल बोंडे यांनी केली आहे. संजय राऊत आणि शिवसेनेने अपक्ष आमदारांचाही अपमान केला आहे. म्हणजे अपक्ष आमदार घोडेबाजारामध्ये खपले, किंमत घेतली असा आरोप करून बदनामी करण्याचा गाढवपणा संजय राऊत यांनी केला असल्याचेही बोंडे म्हणाले.

“महाराष्ट्रातील जनता महाविकास आघाडीला वैतागली आहे. एवढचं नाही तर महाविकास आघाडीतील आणि अपक्ष आमदारही वैतागले” असल्याचा आरोप अनिल बोंडे यांनी केला आहे. संजय राऊत यांना सत्तेचा माज आला असून त्यांनी अपक्ष आमदारांची बदनामी करण्याचा गाढवपणा केल्याची टीका बोंडे यांनी केली आहे. राज्यसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर बोंडे नागपूरात दाखल झाले आहेत. नागपूर विमानतळावर त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

महाविकास आघाडीतल्या आमदारांकडून त्यांचे मंत्री कमिशन घेतात तर सामान्य जनतेचे काय हाल होत असतील? असा सवालही बोंडे यांनी केला. आघाडीतील आमदारांनाच त्यांचे मंत्री, मुख्यमंत्री भेटत नाहीत तर जनतेला केव्हा भेटणार. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता वैतागली आहे. आणि यांच्या सावळ्या गोंधळामुळे महाराष्ट्राचे वाट्टोळे होत असल्याचा आरोपही बोंडे यांनी केला आहे. सगळ्यांना देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्री काळाचीच आठवण येत आहे. त्यामुळे जनतेची देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री बनावेत अशी इच्छा असल्याचा दावा बोंडे यांनी केला आहे.

सरकार अल्पमतात, मुख्यमंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यावा; नारायण राणेंची मागणी

0

सिंधुदुर्ग : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी भाजप आणि महाविकास आघाडीने जोरदार ताकद लावल्याने ही निवडणुकीत प्रतिष्ठेची झाली होती. अटीतटीच्या लढतीत भाजपच्या धनंजय महाडिक यांनी बाजी मारत शिवसेनेच्या संजय पवार यांना पराभवाची धूळ चारली. या पार्श्वभूमीवर भाजपचा आत्मविश्वास दुणावला असून भाजप नेत्यांकडून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीला लक्ष्य करण्यात येत आहे. अशातच भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी तर थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

‘शिवसेनेची स्वत:ची मते त्यांच्या उमेदवाराला मिळालेली नाहीत, तर संजय राऊत फक्त एका मताने पराभूत होण्यापासून वाचले. महाविकास आघाडीचे आठ ते नऊ आमदार फुटले आहेत. याचाच अर्थ सरकार अल्पमतात आले आहे. बहुमतासाठी १४५ आमदारांचं पाठबळ लागतं, तुमच्याकडे तेही नाही. तुम्ही महाराष्ट्राला १० वर्ष मागे नेलं आहे. उद्धव ठाकरे यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, अशी टीका करत नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.लोकांची जमावजमव करण्यात त्यांना यश आलं, असं म्हणत राज्यसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं होतं. यावरून राणे यांनी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना टोला लगावला आहे. ‘मी संजय राऊत यांना काहीही किंमत देत नाही, त्यांनी शरद पवारांकडून काहीतरी शिकावं,’ असा नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

पांडुरंगाहूनी मोठ्ठा मोदींचा फोटो …

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष तथा प्रदेश प्रवक्ता रविकांत वर्पे यांनी घेतली हरकत

पुणे -पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 14 जून रोजी प्रथमच देहू नगरीत येणार आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते संतश्रेष्ठ तुकाराम महाराज मूर्ती, शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर देहू संस्थान प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे. भाजपनेदेखील पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठीची जय्यत तयारी केली आहे. मात्र, भाजपकडून मोदींच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवरुन आता नवीन वादाला सुरुवात झाली आहे.दरम्यान मोदींच्या दौऱ्यामुळे देहूतील जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचं मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.सुरक्षेच्या दृष्टीने उद्या सकाळी ८ ते १४ जून सायंकाळी ५ वाजेपर्यंत मंदिर बंद असणार आहे, अशी माहिती देवस्थानचे विश्वस्त माणिक महाराज मोरे यांनी दिली आहे.

मोदींच्या स्वागतासाठी भाजपकडून लावण्यात आलेल्या पोस्टरवर विठ्ठलाच्या फोटोपेक्षा मोदींचा फोटो मोठा लावण्यात आला आहे.या संदर्भात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष तथा प्रदेश प्रवक्ता रविकांत वरपे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, “संत ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचून संत तुकाराम महाराजांनी यावर कळस चढविला.पिं-चिंचवड येथे भाजपाने जाणीवपूर्वक मोदींचा फोटो पांडुरंगापेक्षा मोठा दाखवून संप्रदायाचा अवमान केला आहे.”

भाजपने लावलेले हे पोस्टर काढून टाकावे आणि विटेवरी उभा विठ्ठलापेक्षा मोठा कोणी नाही. पिंपरी चिंचवड शहर भाजपाने मोदींना विठ्ठलापेक्षाही मोठे दाखवण्याचे पाप केले आहे. वारकरी संप्रदायाची बदनामी वारकरी संप्रदाय खपवून घेणार नाही. भाजपाने वारकरी संप्रदायाची माफी मागावी अशी मागणी देखील वारकरी संप्रदायाने केली आहे.

दोन दिवसांपूर्वी डीजी रजनीश सेठ यांनी पोलीस पथकासह देहूतील शिळा मंदिर, मुख्य मंदिर परिसराला सुरक्षेच्या कारणास्तव भेट दिली होती. त्याठिकाणची पाहणी करण्यात आली. देहूतील शिळा मंदिर, मूर्तीचा लोकार्पण होताच देहूपासून काही अंतरावर असलेल्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वारकऱ्यांना संबोधित करणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दिंडी, वारकरी, नागरिक उपस्थित राहणार आहेत.

नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जगद्गुरू संत तुकाराम महाराज मूर्ती, शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. यावेळी पंतप्रधानांचे तुकाराम पगडी आणि अभंग लिहिलेल्या उपरण्याने स्वागत केलं जाणार आहे. देहू संस्थांनच्या विश्वस्तांच्या विनंतीनुसार पुण्यातील सुप्रसिद्ध मुरूडकर झेंडेवाले यांनी ही तुकाराम डिझायनर पगडी साकारली आहे.

या पगडीबाबत गिरीश मुरुडकर म्हणाले की, आजवर आमच्यामार्फत अनेक राजकीय, सामाजिक, क्रीडा आणि कला क्षेत्रातील मान्यवर मंडळीकरीता पगडी, फेटे तयार करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ जूला देहू दौऱ्यावर येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर देहू संस्थानकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकरिता पगडी आणि उपरणे तयार करण्यात यावे, असे सांगण्यात आले आहे. त्यानुसार आम्ही मागील तीन चार दिवसापासून पगडी आणि उपरणे तयार करीत आहोत. पुढील काही तासात ते काम पूर्ण होईल. या पगडीचे आणि उपरण याच वैशिष्ट म्हणजे याला वेगळे कापड वापरले गेले आहे. पगडीच्यावरील बाजूस तुळशीची माळ, चिपळी, टाळ आणि पगडीच्या एका बाजूला जगद्गुरू संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांची छोटीशी प्रतिमा लावली आहे.

जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर इथे विकासाची कवाडे खुली झालीत: रामदास आठवले

0

जम्मू -केंद्र सरकारला शांततामय आणि विकसित जम्मू काश्मीर हवे असून, सर्वच आघाड्यांवर जम्मू काश्मीरचा सर्वांगीण विकास करण्यास सरकार कटिबद्ध आहे, अशी माहिती, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री, रामदास आठवले यांनी आज दिली. जम्मूच्या संमेलन केंद्रात आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

2019 साली केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर, या भागात विकासाची कवाडे खुली झाली आहेत. याचा प्रत्यय आपल्याला यातूनच येतो की आता इथे केंद्राच्या सर्व योजना, जसे की प्रधानमंत्री आवास योजना, जन धन योजना, मुद्रा योजना, उज्ज्वला योजना, शिष्यवृत्ती योजना,अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीयांसाठी असलेल्या सर्व कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे सुरु झाली आहे.

अनेक केंद्रीय योजनांची इथे 100 टक्के अंमलबजावणी सुरु आहे. जम्मू काश्मीरमधल्या लोकांना, सर्व आघाड्यांवर मग ते स्वतःचे घरकूल असो, उपजीविका असो, या सगळ्या सुखसुविधा देण्यास सरकार पूर्ण कटिबद्ध असल्याचाच हा पुरावा आहे. सरकारला इथे सामाजिक स्थैर्य निर्माण करायचे आहे.

या दौऱ्यात रामदास आठवले यांनी जम्मू आणि काश्मीरमधील समाज कल्याण विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसह, समाज कल्याण योजनांच्या अंमलबजावणीशी संबंधित आढावा बैठक घेतली. या बैठकीला, समाज कल्याण विभाग, जम्मू आणि काश्मीरचे महासंचालक विवेक शर्मा आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जम्मू येथील हरी निवास पॅलेस येथे होणाऱ्या नेल्सन मंडेला नोबल शांतता पुरस्कार सोहळ्यातही आठवले सहभागी होणार आहेत.

बुद्धपौर्णिमा उत्सवानिमित्त भगवान बुद्ध यांचे पवित्र अवशेष भारतातून मंगोलिया  इथे 11 दिवसांच्या प्रदर्शनासाठी नेले जाणार

0

नवी दिल्ली-मंगोलियाच्या नागरिकांसाठी एक विशेष मैत्रीभाव म्हणून, येत्या 14 जून, 2022 रोजी असणाऱ्या मंगोलियन बुद्धपौर्णिमेच्या उत्सवकाळात 11 दिवस चालणाऱ्या प्रदर्शनात ठेवण्यासाठी, भगवान बुद्ध यांचे चार पवित्र अवशेष, भारतातून मंगोलिया इथे नेले जाणार आहेत. केंद्रीय विधी आणि न्याय मंत्री किरेन रिजिजू यांच्या नेतृत्वाखालील 25 सदस्यीय प्रतिनिधीमंडळ हे अवशेष घेऊन  मंगोलिया दौऱ्यावर जाणार आहे. तिथल्या गंदान बुद्धविहाराच्या परिसरात असलेल्या बातसागन मंदिरांत हे अवशेष ठेवले जातील. बिहारमधील ‘कपिलवस्तू’ ह्या प्राचीन शहरात, 1898 साली पहिल्यांदा आढळलेले भगवान बुद्धांचे हे अवशेष  कपिलवस्तू अवशेष म्हणून ओळखले जात असून, ते सध्या राष्ट्रीय वस्तू संग्रहालयात ठेवले आहेत. 

यासंदर्भात आज नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलतांना किरेन रिजिजू म्हणाले, की  भारत- मंगोलिया यांच्यातील संबंधाचा हा नवा ऐतिहासिक टप्पा आहे. यामुळे, दोन्ही देशातील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक संबंध अधिक दृढ होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015 साली, मंगोलियाला भेट दिली होती, याचे स्मरण करत किरेन रिजिजू म्हणाले की, नरेंद्र मोदी हे , मंगोलियाचा दौरा करणारे पहिलेच भारतीय पंतप्रधान होते. आता भगवान बुद्धांचे पवित्र अवशेष मंगोलियाला नेणे हा, दोन्ही देशांमधील प्राचीन सांस्कृतिक आणि आध्यात्मिक संबंध पुरुज्जीवित करण्याच्या पंतप्रधान मोदी यांच्या दूरदृष्टीनुसार आखलेला कार्यक्रम आहे, असेही ते म्हणाले.

भारत आणि मंगोलियामधील सामाईक इतिहास-संस्कृतीमध्ये हे दोन्ही देश एकमेकांकडे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक शेजारी म्हणून बघतात, असे सांगत, भारत आणि मंगोलिया यांच्यात सामाईक सीमा नसल्या तरी मंगोलियाला आपण ‘दूरस्थ शेजारी’ असे म्हणू शकतो, असेही ते म्हणाले.

या अवशेषांना राष्ट्रीय अतिथी असा दर्जा दिला जाईल आणि सध्या राष्ट्रीय संग्रहालयात ते ज्या तापमानात ठेवलेले असतात, त्याच नियंत्रित तापमानात तिथेही ठेवले जातील. हे पवित्र अवशेष वाहून नेण्यासाठी  भारतीय हवाईदलाने विशेष विमान C-17 ग्लोब मास्टर उपलब्ध करून दिले आहे.

मंगोलियाचे सांस्कृतिक कार्यमंत्री मंगोलियाच्या वतीने ह्या अवशेषांचे स्वागत करतील; मंगोलियाच्या राष्ट्रपतींचे सल्लागार आणि इतर मान्यवरांसह मोठ्या संख्येने भिक्षू यावेळी उपस्थित राहतील. भारतातील अवशेषांसह मंगोलियामध्ये उपलब्ध भगवान बुद्धांचे अवशेष देखील ह्या प्रदर्शनात ठेवले जातील. दोन्ही अवशेषांसाठी दोन बुलेट प्रूफ केसिंग तसेच दोन पेट्या भारतीय शिष्टमंडळ घेऊन जाणार आहेत.

अजितदादा सांगतील तिथे मतदान , म्हणणाऱ्या आमदारांनी भाजपला मते दिली की काय ?

0

मुंबई, 11 जून : . राज्य सभेत सेनेच्या संजय पवार यांच्या पराभवानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत ज्या अपक्ष आमदार आणि लहान पक्षांच्या आमदारांनी आपल्याला दगा देत भाजपला मतदान केलं त्यांची नावे जाहीर केली आहेत. संजय राऊत  यांनी आमदारांची नावे जाहीर केल्याने एकच खळबळ उडाली आहे. कारण राऊत यांनी जाहिर केलेली नावे अजितदादा यांचा शब्द मानणारी असल्याचा सुत्रां चा दावा आहे .

शिवसेनेचे नेते संजय राऊत म्हणाले, मी 42 मतांवर लढलो आणि त्यातही एक मत बाद झालं. काही लोक माझ्या मतांवर डोळा ठेवून होते आणि ती मते बाद करण्याच्या प्रयत्नात होती. आमच्या लोकांनी तो प्रयत्न हाणून पाडला. संजय पवार हे सुद्धा उत्तम प्रकारे लढले.संजय पवार यांच्या पराभवाने उद्धव ठाकरे सुद्धा व्यथित झाले आहेत.

आम्हाला असं वाटलं की, काही लोकांनी आम्हाला शब्द दिले होते ते पाळले नाहीत. विशेषत: वसई-विरारचे हितेंद्र ठाकूर आणि त्यांची तीन मते आम्हाला मिळाली नाहीत. करमाळ्याचे संजय मामा शिंदे, अमरावतीचे आमदार देवेंद्र भुयार, श्यामसुंदर शिंदे यांची मते आम्हाला मिळाली नाहीत असं म्हणत संजय राऊत यांनी थेट आमदारांची नावेच जाहीर केली आहेत.

  अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी निवडणुकीपूर्वी म्हटलं होतं, सरकार स्थापन होण्यापूर्वीपासून मी अजितदादांसोबत आहे.मतदारसंघातील कुठलेही प्रश्न असले तरी अजित पवारांकडे गेलो तर काम होतं. अजितदादांनी महाविकास आघाडीला मतदान करण्याचं म्हटलं. संविधानामुळे मिळालेला अधिकार मतदारसंघासाठी कसा करता येईल? हे मी पाहिलं.

मुख्यमंत्र्यांचा, शिवसेनेचा कुणाचाही माझ्यासोबत संपर्क नाही. त्यांनी संपर्क केला नाही तरी फरक पडत नाही. अजित पवारांनी सांगितलं तिथे मतदान करणार. भाजपला माहिती आहे की, देवेंद्र भुयार अजित पवारांचा पक्का आहे आणि त्यामुळे ते मला संपर्कच करत नाही.तर मतदानापूर्वी आमदार संजयमामा शिंदे यांनीही आपण महाविकास आघाडीसोबत असल्याचंच म्हटलं होतं. संजयमामा शिंदे यांनी सुद्धा महाविकास आघाडीसोबतच असल्याचं म्हटलं होतं. अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी म्हटलं होतं की, अजितदादा सांगतील तिथे मतदान करणार आणि आता त्याच आमदारांवर संजय राऊत यांनी आरोप केला आहे. हे आमदार अजित पवार यांच्या जवळचे मानले जातात.

त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चाना उधाण आले आहे. मात्र या सर्व शंका,कुशंका आहेत.कुठेही त्यास भक्कम आधार नसल्याचे स्पष्ट आहे . त्यामुळे कदाचित अजीतदादा यांच्या विषयी संशयात्मक वातावरण करण्याचा हेतू ही या मागे असन्याची शक्यता नाकरता येणारी नाही.

संजय राऊतांच्या आरोपांवर अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं, संजय राऊत   हे काय ब्रह्मदेव आहेत का? मतदान हे गोपनीय राहतं. आम्ही दिलं की नाही दिलं हे यांना कसं माहिती.काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत मी पूर्वीपासून आहे. शिवसेना नंतर आली. मी महाविकास आघाडीसोबत आहे. मी कुठलाही दगाफटका केला नाही.

‘त्यांच्या’ साठी हा एकच धडा नसून, येथून पुढे सारेच धडे सुरु होतील – अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया

0

पुणे-राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर टीका करताना म्हटले होते की, कधीकधी अमिताभ बच्चनचे चित्रपट प्लॉप जावू शकतात. मात्र, बच्चन हा बच्चन असतो असे म्हटले होते. त्यावर बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या की, विधान परिषदेचा निकाल देखील समोर दिसत आहे. राज्यसभा भाजपची झाली आहे तर विधान परिषदेसाठी काहीच दुमत नाही.आणि त्यांच्यासाठी हा धडा नसून, त्यांच्यासाठी येथून पुढे धडे सुरू होणार आहेत. भाजपला स्वत:च्या कर्तृत्वार विश्वास आहे. त्यावरूनच विजय मिळत आहे. राज्यात रडीचा डाव खेळण्यासाठी भाजप नसून महाविकास आघाडी आहे.रडी …महाविकास आघाडी … भाजप कर्तृत्वाचे डाव खेळते.त्या आज पुण्यात पत्रकारांशी बोलत होत्या.

राज्यसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी असेही म्हटले आहे, “अब देवेंद्र अकेला नही है, सारी कायनात उनके साथ है. सध्या आपला जो राजा आहे, तो प्रजेसाठी ठिक नाही” असे म्हणत अमृता फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

राज्यसभा निवडणुकीत भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले आहे. त्यावर बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या की, हा सत्याचा विजय आहे. सत्याच्या बाजूने सर्वजण भाजपच्या पाठिशी उभे आहेत याचा मला आनंद आहे. पुढे पत्रकारांशी संवाद साधताना अमृता फडणवीस म्हणाल्या की, देवेंद्र अकेला नही है, ना कभी था उनके साथ पुरी कायनात है… प्रगतीचे राजकारणच पुढे येईल. एकमेकांवर खोचक टीका करणाऱ्याचे राजकारण कधीच पुढे येणार नाही.

बच्चन हा बच्चनच असतो; सुप्रिया सुळेंचा भाजपला टोला

0

पुणे-एखादा चित्रपट चालला नाही तरी बच्चन हा बच्चनच असतो, असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी भाजपला टोला दिला. राज्यसभा निवडणुकीच्या विजय – पराजयावरून महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांमध्ये जोरदार जुंपल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, निवडणुकीत काही वेळ जिंकणे असते, तर काही वेळा हरणे असते. ज्या वेळेस एखादा उमेदवार विजयी होतो. त्यावेळेस तोच फॉर्म्युला योग्य असे सर्वांना वाटते आणि जेव्हा अपयश येते त्यावेळेस लोकांना यांचे काहीतरी नियोजन चुकले असे वाटते. मात्र, प्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चनचे चित्रपट ही कधी कधी अपयशी ठरतात. मात्र, त्यानंतरही ही अमिताभ बच्चन हा बच्चनच असतो असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.

सुळे म्हणाल्या, आमच्या पक्षाचे नेते शरद पवार हे 55 वर्ष महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात काम करत आहेत. त्यातील 50 टक्के वर्ष ही विरोधात व 50 टक्के सत्तेत गेली. महाविकास आघाडीच्या वतीने शरद पवार म्हणाले की ,राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या माध्यमातून उमेदवार उभा करून आम्ही एक रिस्क घेतली होती, पण त्यात यशस्वी ठरलो नाही. महाविकास आघाडीचे सर्व आमदार हे एकत्रित असून त्यांनी जबाबदारीने या निवडणुकीत मतदान केले आहे. त्यामुळे त्यांचे एक ही मत कुठेही हलले नाही. आमच्या दोन मतदारांना मतदान करता आले नाही तर एक मत बाद ठरले. त्यामुळे आगामी काळात या निवडणुकीबाबत अधिक अभ्यास करू तसेच निवडणूक निकालाचे विश्लेषण करू, असे सूतोवाचही त्यांनी केले.