Home Blog Page 1915

वेळीच सावध व्हा…..शिवसेनेचा ‘सामना’तून बंडखोरांना सल्ला

0

एकनाथ शिंदे यांचा एक मोठा गट भाजप शासित प्रदेश आसामच्या गुवाहटीत असून, दोन दिवसांपासून ते ‘रेडीसन ब्ल्यू’ या ठिकाणी तळ ठोकून आहेत. बुधवारी संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाबाबत केलेल्या भाष्याबद्दल राज्याच्या राजकारणाला एक वेगळे वळण मिळत आहे. दरम्यान, शिवसेनेने आपला मुखपत्र सामनातून भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. यासोबत एकनाथ शिंदे गटाला वेळीच सावध होण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे.सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे की,

वेळीच सावध व्हा

राज्यसभा , विधान परिषद निवडणुकीतील ‘जादा’ विजय कोणामुळे मिळाला हे आता उघड झाले. आता तर आमदारांना डांबून ठेवले आहे. दहशतीच्या तलवारीखाली ठेवले आहे हे परत आलेल्या नितीन देशमुखांनी स्पष्ट केले.

शिवसेनेने असे अनेक प्रसंग पचवले आहेत, अशा संकटांच्या छातीवर पाय ठेवून शिवसेना उभी राहिली. सत्ता असली काय आणि गेली काय, शिवसेनेसारख्या संघटनेला फरक पडत नाही. फरक पडणार आहे तो भाजपच्या प्रलोभनांना व दबावास बळी पडलेल्या आमदारांना. शिवसैनिकांनी ठरवले तर हे सगळेच लोक कायमचे ‘माजी’ होऊ शकतील. यापूर्वीचा बंडाचा इतिहास तेच सांगतो. वेळीच सावध व्हा, शहाणे व्हा!

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा अंत काय होणार, हे कोणीच सांगू शकत नाही. त्यात आपले महामहिम राज्यपाल श्रीमान कोश्यारी यांना कोरोनाने ग्रासले. त्यामुळे राज्यातील विरोधी पक्षांची राजभवनातील लगबगही थोडी थांबली. राज्य सरकारचे नक्की काय होणार? यावर पैजा लागल्या आहेत. शिवसेनेत उभी फूट पडली, सरकार संकटात आले, आता काय होणार? यावर चर्चा झडत आहेत. राजकारणात सगळेच अस्थिर असते आणि बहुमत त्याहून चंचल असते. शिवसेनेच्या तिकिटांवर, पैशांवर, मेहनतीवर निवडून आलेले आमदार भाजपच्या पकडीत फसले. ते आधी सुरतला व नंतर विशेष विमानाने आसामला गेले. या आमदारांची इतकी पळापळ का सुरू आहे? शिवसेनाअंतर्गत ज्या घडामोडी सुरू आहेत. त्याच्याशी आपला संबंध नाही वगैरे मखलाशी भाजपने तरी करू नये. सुरतमध्ये ज्या हॉटेलात हे ‘महामंडळ’ होते, तेथे महाराष्ट्रातील भाजपचे लोक उपस्थित होते. पुन्हा सुरतवरून हे लोक आसामला जाताच गुवाहाटी विमानतळावर आसामचे मंत्री स्वागतास हजर होते. यामागचे पेच-डावपेच न समजण्याइतकी राज्याची जनता खुळी नाही. हॉटेल्स, विमान, गाडय़ा, घोडे, विशेष सुरक्षा व्यवस्था ही भाजप सरकारचीच कृपा नाही काय? आम्हाला तर भारतीय जनता पक्षाच्या नैतिक अधिष्ठानाचे कौतुकच वाटते. कालपर्यंत भ्रष्टाचार, आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप असलेल्या शिवसेना आमदारांवर हल्ले करणारे, त्यांना

ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्सचा धाक दाखवून, ”आता तुमची जागा तुरुंगात” असे बोलणाऱ्या किरीट सोमय्यांचे यापुढे कसे होणार? हे सर्व आमदार कालपासून भाजपच्या गोटात शिरले आहेत व दिल्लीतील राजकीय गागाभट्टांनी त्यांना पवित्र, शुद्ध करून घेतले आहे. आता किरीट सोमय्यांना या सर्व शिवसेना आमदारांची पाद्यपूजा करावी लागेल असे दिसते. नितीन देशमुख हे अकोल्याचे आमदार सुरतवरून मुंबईस परतले व त्यांनी जे घडले, त्याबाबत धक्कादायक असे सत्यकथन केले. भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी गुप्त बैठका सुरू केल्या आहेत. मुंबईतील ‘सागर’ बंगल्यावर उत्साहाच्या लाटा उसळल्या असून लाटेचा फेस अनेकांच्या नाकातोंडात गेला आहे, पण भाजप कोणाच्या बळावर सरकार स्थापन करू इच्छिते? नगरविकास मंत्री शिंदे व त्यांच्या सोबत असलेल्या आमदारांना आधी मुंबईत यावे लागेल. विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी महाराष्ट्रीय जनतेच्या नजरेस नजर भिडवून विधान भवनाची पायरी चढावी लागेल. शिवसेनेने उमेदवारी देऊन मेहनतीने निवडून आणले व आता शिवसेनेशी बेइमानी का करीत आहात? या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल. विधिमंडळात काय व्हायचे ते होईल, पण मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता शिखरावर आहे. लोकमानसात उद्धव ठाकरे प्रिय आहेत. शिवसेनेचे संघटन मजबूत आहे. त्याचमुळे ‘वेगळा गट’ करून

आसामात गेलेल्या

लोकांना आमदार-नामदार होता आले. हे सर्व आमदार पुन्हा निवडणुकीला सामोरे गेले तर जनता त्यांना पराभूत केल्याशिवाय राहणार नाही. याचे भान या मंडळींना नसेलच असे नाही. त्यामुळे हे शिवसेनेचे आमदार व नामदार पुन्हा स्वगृही परत येतील. प्रवाहात सामील होतील. आज जे भाजपवाले त्यांना तळहातावरील फोडाप्रमाणे जपत आहेत ते गरज संपताच पुन्हा कचऱ्यातच फेकून देतील. भाजपची परंपरा तर हीच आहे. त्यामुळे कोणी कितीही जोरबैठका मारत असले तरी वादळ सरेल व आकाश स्वच्छ होईल. महाराष्ट्रात नवे सरकार स्थापन करण्याचे स्वप्न कुणाला पडलेच असेल तर तो त्यांचा स्वप्नदोष. राज्यसभा, विधान परिषद निवडणुकीतील ‘जादा’ विजय कोणामुळे मिळाला हे आता उघड झाले. आता तर आमदारांना डांबून ठेवले आहे. दहशतीच्या तलवारीखाली ठेवले आहे हे परत आलेल्या नितीन देशमुखांनी स्पष्ट केले. शिवसेनेने असे अनेक प्रसंग पचवले आहेत, अशा संकटांच्या छातीवर पाय ठेवून शिवसेना उभी राहिली. जय-पराजय पचवले. सत्ता असली काय आणि गेली काय, शिवसेनेसारख्या संघटनेला फरक पडत नाही. फरक पडणार आहे तो भाजपच्या प्रलोभनांना व दबावास बळी पडलेल्या आमदारांना. शिवसैनिकांनी ठरवले तर हे सगळेच लोक कायमचे ‘माजी’ होऊ शकतील. यापूर्वीचा बंडाचा इतिहास तेच सांगतो. वेळीच सावध व्हा, शहाणे व्हा!

संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालख्यांचे पुण्यात भक्तिभावाने स्वागत

0

महापालिका आयुक्तांच्या स्वागताचा उत्साही विक्रमाने भरले भक्तीरंग…

पुणे: श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या १९२ व्या आषाढी पायीवारी पालखी सोहळ्याचे बुधवारी लाखो वैष्णवांसह पुण्यात आगमन झाले. आळंदीतील अजोळघरातून पंढरीचा मार्ग धरला आहे.संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी संचेती हॉस्पिटलवरून फर्ग्युसन रस्त्याने भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात विसावली आहे. उद्या पूर्ण दिवस पालखी पुण्यात मुक्कामी असेल. त्यानिमित्त्ताने दर्शनासाठी पुणेकरांमध्ये उत्साहाचे वातावरणही दिसून येत आहे

संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दुपारी दीड वाजता कळस (नगर रस्ता) मध्ये पोहचली. महापालिका आयुक्त विक्रमकुमार तसेच अतिरिक्त आयुक्त विलास कानडे यांनी पालखीचे स्वागत केले. संत तुकाराम महाराजांची पालखीही दुपारी पावणे दोन वाजता बोपोडीतील हॅरिस पूलाजवळ पोहचली. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, सहआयुक्त रविंद्र बिनवडे यांनी पालखीचे स्वागत केले.

या दोन्ही पालखी रात्री उशिरा मुक्कामाच्या ठिकाणी विसावल्या. संत तुकाराम महाराजांची पालखी सुमारे एक तास तर, संत ज्ञानेश्‍वर महाराजांची पालखी सुमारे दोन तासांच्या विलंबानंतर पुणे येथील आपापल्या विसाव्याच्या ठिकाणी पोचली.

संत तुकाराम महाराजांची पालखी रात्री ८ वाजून २० मिनिटांच्या सुमारास पुण्यातील टिळक चौकात (अलका टॉकीज चौक), तर संत ज्ञानेश्‍वर महाराजांची पालखी रात्री ९ वाजून १७ मिनिटांच्या सुमारास टिळक चौकात पोचली. या चौकातून लक्ष्मी रस्त्याने या पालख्या आपापल्या विसाव्याच्या ठिकाणाकडे मार्गस्थ झाले. भाविकांची अलोट गर्दी, ज्ञानोबा-तुकारामांचा जयघोष करत आणि टाळ-मृदंगाच्या निनादात या पालख्या मार्गस्थ होत होत्या. पुणेकरांनी ठिकठिकाणी विशेषतः चौका-चौकांत या पालख्यांचे स्वागत केले.

तुकाराम, माऊलींच्या गजराने वयोवृद्ध बाल वारकरी यांच्या चेहऱ्यावर उत्साह संचारला होता. महिला वारकऱ्यांच्या डोक्यावरील तुळशीवृंदावन आकाशाकडे झेप घेतल्याचे दिसून येत होते. टाळ-मृदंग भजनाने वारकरी तल्लीन होऊन, हारी नामाचा गजर करीत होते. पालखीच्या स्वागतासाठी रस्ते स्वच्छ करून जागोजागी रांगोळी काढण्यात आली होती. सामाजिक संस्था, राजकीय कार्यकर्त्यांनी जणू वारकऱ्यांच्या सेवेचा ध्यासच घेतला होता. ठीक – ठिकाणी अन्नदान , पाणी वाटप करण्यात आघाडीवर होते. वारकऱ्यांना वैद्यकीय सेवा देण्यासाठी आरोग्य सेवक मनापासून झटत होते. भगवी पताका वारकऱ्यांच्या हाती शोभून दिसत होती. शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी पालख्या व वारकऱ्यां सोबत फोटो काढण्यात मग्न होते.

पालिकेच्या ११ शाळा पिण्याच्या पाण्यासाठी अकरा टँकर, स्वच्छतेसाठी शंभर अधिकारी आणि ६०० कर्मचारी २४ बाय ७ कार्यरत झाले आहेत. २५० पोर्टेबल टॉयलेट, वीजपुरवठा, पंचेचाळीस अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरे, औषध फवारणी, तसेच २४ तास दवाखान्यांमध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ महिला डॉक्टर कार्यरत झाले आहेत. कोविड-१९ लस आणि मास्क वाटपाबरोबर स्वतःबरोबर इतरांच्या सुरक्षेसाठी मास्क वापरा असा संदेशही दिला जात आहे.

निवडुंगा विठोबा मंदिर ट्रस्टच्या वतीने संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोबत येणाऱ्या तीन हजार वारकरी व दिंडी व्यवस्थापन, पोलीस सहकारी यांना अन्नदानाचे व्यवस्था करण्यात आली आहे. 

कोरोना संसर्गामुळे मागील दोन वर्षांपासून पालखी सोहळा झाला नव्हता. परंतु त्याआधीच्या वर्षापर्यंत या दोन्ही पालख्या रात्री ७.३० वाजताच्या सुमारास टिळक चौकातून आपापल्या विसाव्याच्या ठिकाणांकडे मार्गस्थ होत असत. संत तुकाराम महाराजांची पालखी नाना पेठेतील निवडुंग्या विठोबा मंदिरात तर, संत ज्ञानेश्‍वर महाराजांची पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात मुक्कामाला आहे. या दोन्ही पालख्यांचा पुण्यात दोन रात्र मुक्काम असणार आहे. या पालख्या येत्या शुक्रवारी पहाटे पंढरपूरच्या दिशेने रवाना होणार आहेत.

जगद््गुरु तुकाराम महाराज व ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीवर दगडूशेठ गणपती मंदिरासमोर पुष्पवृष्टी

0

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजन

पुणे : माऊली…माऊली च्या जयघोषात पुण्यामध्ये लाखो वारक-यांसोबत आलेल्या जगद््गुरु तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी रथावर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासमोर पुष्पवृष्टी करण्यात आली. ज्ञानोबा…माऊली… तुकाराम च्या जयघोषासोबतच गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. यावेळी वारक-यांनी आरोग्यदायी, निर्मल आणि हरित महाराष्ट्रासाठी गणराया चरणी साकडे घातले.

 
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे जगद््गुरु तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा व विश्वस्तांचे स्वागत मोठया उत्साहात करण्यात आले. यावेळी दगडूशेठ गणपती ट्रस्टचे विश्वस्त, पदाधिकारी, मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

 
वारीची शेकडो वर्षांची परंपरा असून दरवर्षी दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासमोर पालखीचे उत्साहात स्वागत केले जाते. यंदा ट्रस्टच्या १३० व्या वर्षानिमित्त वारीसोहळ्यातील राबविण्यात येणा-या उपक्रमांची सुरुवात झाली असून हरित वारी- वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, रुग्णवाहिका सेवा, आरोग्य तपासणी आणि वारक-यांकरीता नानाविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. वारक-यांनी देखील या उपक्रमांमध्ये सहभागी होत, सोयी-सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

फुगेवाडी मेट्रो स्टेशन येथे आयोजित योग विषयक प्रदर्शनाला नागरिकांचा प्रतिसाद

0

केंद्रीय संचार ब्युरो, प्रादेशिक कार्यालयाच्यावतीने आयोजन

उद्या दि. 23 जून पर्यंत प्रदर्शन खुले राहणार

पुणे दिनांक : २२जुन२०२२
यंदा २१ जून रोजी आठवा आंतरराष्ट्रीय योग्य दिन साजरा करण्यात आला. यावर्षी आपण भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देखील साजरा करत आहोत, यानिमित्ताने भारत सरकारने देशातील ७५ ऐतिहासिक विशेष ठिकाणी योगोत्सवाचे आयोजन केले होते.
पुण्यामध्ये आगाखान पॅलेस या ऐतिहासिक स्थळी तर, पुण्यात नव्याने सुरु झालेल्या मेट्रो स्थानकावर योगोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. काही महिन्यांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यात प्रथमच सुरु झालेल्या दोन मेट्रो मार्गांचे व मेट्रो सेवेचे उदघाटन केले होते. यापैकी पिंपरी-चिंचवड परिसरातील फुगेवाडी मेट्रो स्थानकामध्ये भारत सरकारच्या काही विभागांनी योग दिन साजरा केला.
सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालय, मुंबई; राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था, आयुष मंत्रालय, पुणे व केंद्रीय संचार ब्युरो, माहिती व प्रसारण मंत्रालय या केंद्र सरकारी विभागांसह पुणे मेट्रो या उत्सवात सहभागी झाले होते.
केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते केंद्रीय संचार ब्युरो प्रादेशिक कार्यालय, पुणे यांनी मांडलेल्या चित्र प्रदर्शनाचे देखिल उदघाटन झाले. योगावर माहिती देणारे हे प्रदर्शन फुगेवाडी मेट्रो स्थानकामध्ये मांडण्यात आले आहे. २१ जून ते २३ जून २०२२ या तीन दिवसाच्या कालावधीसाठी हे प्रदर्शन सर्व नागरिकांना पाहण्यास उपलब्ध करून दिले आहे. हे प्रदर्शन विनामूल्य आहे.
योग हे भारताला मिळालेले एक वरदान आहे. जे भारत संपूर्ण जगाला देऊ पाहत आहे. देशातील नागरिकांनी देखील योग समजून घ्यावा, असा या प्रदर्शनामागील उद्देश आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग दिनाला केलेल्या आपल्या भाषणातून सांगितल्याप्रमाणे योग आपल्या जीवनाचा भाग आहेच, पण तो आपल्या जीवनाचा मार्ग व्हायला हवा. याची सुरुवात योगशी परिचय करून घेण्यापासून होते. योगाबद्दल माहिती घ्यावी, त्याचा अवलंब करावा, तो अविभाज्य दिनक्रम व्हावा आणि काल उदघाटनाच्या भाषणात केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले त्याप्रमाणे, आत्मनिर्भर भारत होत असताना त्याचा प्रत्येक नागरिक निरोगी असावा, म्हणून योगदिनाचे औचित्य साधून माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरोच्या पुण्यातील प्रादेशिक कार्यालयाने हे प्रदर्शन सर्वसामान्य नागरिकांसाठी उभारले आहे.
या प्रदर्शनामध्ये जो एक सामान्य योग अभ्यासक्रम आयुष मंत्रालयाने डिझाईन केला आहे, त्यातील आसनांची माहिती समाविष्ट आहे. यातील आसने जरी, नियमित केली तरी, उत्तम आरोग्य लाभू व टिकू शकते. पवनमुक्तासन,उत्तानपादासन, भुजंगासन, मद्रासन, अर्धचक्रासन, ताडासन अशी सोपी परंतु अत्यंत लाभदायी आसने यामध्ये येतात.
यासोबतच योग व त्याचे महत्त्व जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणाऱ्या भारतीय योग गुरूची माहिती या प्रदर्शनात आहे. तिरुमलाई कृष्णपार्थ, स्वामी शिवानंद. के. पट्टाभी जॉईस, जग्गी वासुदेव, योगगुरू भारत भूषण, विक्रम चौधरी तसेच महान योग गुरु बी के एस. आयंगार, जे पुण्यामधूनच आपले कार्य करत होते, यासर्वांचा उल्लेख इथे करण्यात आला आहे.
‘योग ‘चे महत्त्व योग करण्यास प्रेरणा देणारी घोषवाक्ये इलेस्ट्रेशनच्या आकर्षक चित्रांमधून येथे योगविषयक माहिती दिली गेली आहे.
केंद्रीय संचार ब्युरो, प्रादेशिक कार्यालय, पुणे अंतर्गत महाराष्ट्र व गोवा मिळून ११ क्षेत्रीय कार्यालयाचे काम करतात. या कार्यलयांनी राज्याच्या विविध भागात १३ मे २०२२ रोजी घेतलेल्या योग कार्यक्रमांची माहिती व फोटो देखील या प्रदर्शनात देण्यात आले आहेत. असे माहितीपूर्ण प्रदर्शन पाहण्याची संधी पुणेकरांनी चुकवू नये.


उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ ला दिला निरोप

0

हारी बाजी को जीत लिया..हजारो चाहत्यांच्या प्रेमाने भारावले ठाकरे कुटुंब

मुंबई – शिवसैनिक आणि चाहते नागरीक यांच्या अलोट प्रेमाचे दर्शन घेत आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शासकीय निवास्थान वर्षा सोडलं आहे. संध्याकाळी फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधतांना ठाकरेंनी आपण वर्षा बंगल्यातून आज बाहेर पडणार असून, येथून मातोश्री येथे जाणार असल्याचे सांगितले होते.

वर्षा बंगला सोडताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह वरूण सरदेसाई हेदेखील उपस्थित होते. यावेळी वरूण यांची देहबोली ही भावनिक असल्याची दिसून येत होती.

काही वेळापूर्वी संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राजीनामा देणार नाहीत, आम्ही लढत राहू असे सांगितले होते. तसेच मुख्यमंत्री वर्षा बंगल्याहून मातोश्रीवर राहण्यासाठी निघाले आहेत. मोह माया सत्ता याचा आम्हाला अजिबात लोभ नाही आम्ही लढणारे लोक आहोत, लढत राहू. अखेर सत्याचा विजय होईल असे विधान संजय राऊत यांनी केलं होतं

असंख्य कार्यकर्त्यांनी वर्षा बंगल्यासमोर गर्दी केली होती. त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या शिवसैनिकांनी त्यांच्यावर पुष्पवर्षाव केला. तसंच मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यातही हे प्रेम पाहुन अश्रू दाटून आले होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे हेदेखील होते. कार्यकर्त्यांमधून वाट करत ते मातोश्रीच्या दिशेने निधून गेले.

महाविकास आघाडीत शिवसैनिक भरडला गेला – एकनाथ शिंदेंचे ट्वीट

0

कॉंग्रेस -राष्ट्रवादी टार्गेट करत भाजपशी घरोबा करण्याचा शिंदेंचा प्रयत्न जारीच

मुंबई-उद्धव ठाकरे यांच्या फेसबुक लाइव्ह वरून जनतेशी साधलेल्या संवादानंतर सुमारे अडीच तासांनी एकनाथ शिंदे यांनी ट्वीट केले असून गेल्या अडिच वर्षात महाविकास आघाडी सरकार मधील घातक पक्षांना फक्त फायदा झाला आणि शिव्सानिक मात्र भरडला गेल्याचे म्हटले आहे . या शिवाय घातक पक्ष मजबूत होत असताना शिवसेनेचे मात्र पद्धतशीर पणे खच्चीकरण होत आहे असेही म्हटले आहे

खरे तर हि भावना अगदी तळागाळातील शिवसैनिकांमध्ये अडीच वर्षात पसरलेली आहे अगदी त्याचाच उल्लेख करत शिंदे यांनी शिवसैनिकांच्या वर्मावर बोट ठेवणारे हे ट्वीट केले आहे . मात्र ते स्वतः शिवसेनेतील आणि सरकारमधील मंत्री आणि गटनेते होते त्यांनी असे म्हणणे राजकीय वर्तुळात कितपत रुचणार आहे हे मात्र पाहावे लागणार आहे.

एकीकडे वर्ष बंगला सोडून मातोश्री वर जाण्याची तयारी उद्धव ठाकरे यांनी सुरु केली असताना दुसरीकडे त्यांच्या समर्थनासाठी शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या समर्थनाच्या घोषणा देत रस्त्यावर दिसू लागलेला असताना हे ट्वीट करत एकनाथ शिंदे नी शिवसैनिकांना आणखी भावनिक साद घालत ठाकरेंपासून दूर खेचण्याचा तर प्रयत्न केला नाही न ? असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

एवढेच नव्हे तर शिंदे यांनी पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे आवश्यक आहे म्हणत महारष्ट्र हितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे आहे असे आवाहन ठाकरे यांचे नाव न घेता केले आहे.

उद्धव ठाकरेंबद्दलचा आदर वाढला-इम्तियाज जलील यांनी केले जाहीरपणे कौतुक

0

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचे जाहीरपणे कौतुक केले आहे. आपण उद्धव ठाकरे यांचे भाषण ऐकले असे म्हणत त्यांनी ट्विट केले आहे. तुमच्या सत्यतेचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. आमचे राजकीय/वैचारिक मतभेद असू शकतात पण आज उद्धव ठाकरे यांना ऐकल्यानंतर माझ्या मनात त्यांच्याबद्दलचा आदर वाढला आहे. तुमच्या विनयशीलतेने तुमच्या पक्षातील सर्व नाराजांना जोरदार चपराक दिली, असे ट्विट इम्तियाज जलील यांनी केले आहे.

ज्या विनयशिलतेने त्यांनी बंडखोर मंत्री, आमदारांना उद्देशून आपली भूमिका अगदी स्पष्टपणे मांडली त्याने विरोधकांना चपराक तर बसलीच. पण माझ्या मनात तुमच्या बद्दल असलेला आदर आणखी वाढला, अशा शब्दात ट्विट करत त्यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले.

कोंकण विभागातील ७ सरपंच, १ उपसरपंच, १ सदस्यावर अपात्र कारवाई – विभागीय आयुक्त श्री. विलास पाटील यांचे आदेश

0

नवी मुंबई दि. 22 :- कोकण विभागातील एकूण 7 सरपंच, 1 उपसरपंच व 1 सदस्यावर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 कलम 39  नुसार अधिकार व सदस्य पदावरून काढून टाकण्याची कार्यवाही विभागीय आयुक्त श्री.विलास पाटील यांनी  केली आहे. कोंकण विभागांतर्गत ग्रामपंचायतींवर झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी दुसरी कार्यवाही आहे.

कोकण विभागांतर्गत येणाऱ्या जिल्ह्यांमधील ग्रामपंचायतींमध्ये सरपंच, उपसरपंच, सदस्यांमार्फत होणारे गैरवर्तन, गैरव्यवहारांबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदेने सादर केलेल्या अहवालानुसार ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर व सिंधुदूर्ग या जिल्हयांमधील एकूण 35 सरपंच,उपसरपंच व सदस्यांवर  महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 मधील तरतूदीनूसार आयुक्त श्री. विलास पाटील यांनी दि. 15 फेब्रूवारी 2022 रोजी  सुनावण्या घेतल्या होत्या.  यापैकी 16 ेप्रकरणांवर निर्णय घेण्यात आले होते. उर्वरित 10 प्रकरणांचा फेरअहवाल सादर झाल्यानंतर या 10 प्रकरणांमध्ये महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (1959 चा मुंबई अधिनियम क्र.3) कलम 39 (1) नुसार सिंधुदुर्ग जिल्हयातील ग्रा.पं. पेंडूर- वेंगुर्ला, रायगड जिल्हयातील ग्रा.पं. रासळ-सुधागड पाली, ग्रा.पं. वावंढळ खालापूर, ग्रा.पं. तळवली तर्फे अष्टमी-रोहा येथील सरपंच यांना त्यांच्या सरपंच तसेच सदस्य पदावरुनही दूर करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्हयातील ग्रा.पं. उसप- दोडामार्ग, ग्रा.पं. कळसुली-कणकवली व ठाणे जिल्हयातील ग्रा.पं.नांदप-कल्याण येथील सरपंचांना त्यांचे सरपंच पदावरुन दुर करण्यात आलेले असून त्यांचे सदस्यत्व पद कायम ठेवणेत आले आहे. सिंधुदुर्ग जिल्हयातील ग्रा.पं. कडावल- कुडाळ येथील उपसरपंच यांना त्यांच्या पदावरुन दुर करुन त्यांचे सदस्य पद कायम ठेवलेले आहे. तसेच ठाणे जिल्हयातील ग्रा.पं. रहाटोली अंबरनाथ येथील सदस्य यांना त्यांच्या सदस्य पदावरुन काढून टाकलेले आहे. रायगड जिल्हयातील ग्रा.पं. वेळास्ते-मुरुड येथील सरपंच यांचे विरुध्द महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (1959 चा मुंबई अधिनियम क्र. 3) कलम 39(1) अन्वये दाखल केलेला अर्ज फेटाळण्यात आला आहे.

ग्रामपंचायतींमध्ये अशा प्रकारचा गैरव्यवहार होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. संबधित गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी ग्रामपंचायतीना भेटी देतात किंवा नाही याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. जेणेकरून अशा प्रकारच्या अनियमिततेची प्रकरणे भविष्यात घडणार नाही. अशा सुचनाही विभागीय आयुक्त श्री. विलास पाटील यांनी यावेळी दिल्या आहेत.

राजकीय, सामाजिक आंदोलनातील खटले मागे घेण्यास मान्यता

0

मुंबई-राज्यात राजकीय व सामाजिक आंदोलनातील ज्या गुन्ह्यांमध्ये 31 डिसेंबर 2021 पर्यंत दोषारोपपत्र दाखल झाले आहेत असे खटले मागे घेण्याची कार्यवाही करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.
राजकीय व सामाजिक आंदोलनातील खटल्याबाबत कार्यवाही करण्यासाठी पोलीस आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली क्षेत्रिय समिती गठीत करण्यास व समितीने त्यावर प्रकरणपरत्वे निर्णय घेण्यास मान्यता देण्यात आली. राजकीय व सामाजिक आंदोलनामुळे उद्भवलेल्या गुन्ह्यांशी संबंधित खटले मागे घेण्यासाठी अशा घटनेत जिवीत हानी झालेली नसावी, अशा घटनेत खाजगी व सार्वजनिक मालमत्तेचे 5 लाख रुपयांपेक्षा जास्त नुकसान झालेले नसावे. या अटी कायम ठेवण्यास मान्यता देण्यात आली.
ही कार्यवाही करताना सर्वोच्च न्यायालयाने रिट याचिका (दिवाणी क्र.699/2016-अश्विनीकुमार उपाध्याय विरुद्ध युनियन ऑफ इंडिया व इतर) मध्ये दिलेल्या निर्देशानुसार ज्या खटल्यांमध्ये विद्यमान व माजी खासदार व आमदार यांचा समावेश आहे असे खटले मा. उच्च न्यायालयाच्या संमतीशिवाय मागे घेता येणार नाहीत.

वाढत्या कोविड संसर्गामुळे काळजी घेण्याची गरज – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

मुंबई-राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असून सध्या दिवसाला ४ हजार रुग्ण आढळत आहेत.  त्यामुळे मास्क घालणे, आरोग्याचे नियम पाळणे आवश्यक आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.  राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोविडविषयक सादरीकरण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

काही दिवसांपूर्वी राज्यात दर दिवशी २०० ते ३०० रुग्ण आढळत होते.  आता दररोज ४ हजार रुग्ण आढळत असून रुग्ण संख्येत ३६ टक्के वाढ झाली आहे.  यापैकी ९० टक्के रुग्ण मुंबई, पुणे, ठाणे, रायगड, पालघर या जिल्ह्यातील आहेत.  सध्या २५ हजार सक्रिय रुग्ण असून १ टक्का रुग्ण ऑक्सिजनवर आहेत तर २२ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी दिली.  रुग्णालयात ४.६४ टक्के रुग्ण आहेत.  मुंबईत सध्या जवळपास ३० टक्के पॉझिटीव्हीटी असल्याची शक्यता देखील त्यांनी वर्तवली.  देशामध्ये आज ८१ हजार सक्रिय रुग्ण असून त्यातील २५ हजार एकट्या महाराष्ट्रातील आहेत.

जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांची नियंत्रण कक्षास भेट

0

पुणे दि.२२: आषाढी पालखी सोहळ्यातील सेवेसाठी तातडीने संदेश देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात उभारण्यात आलेल्या नियंत्रण कक्षास आज जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी भेट देवून बिनतारी यंत्रणेची पाहणी केली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षाचा आढावाही त्यांनी घेतला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे उपस्थित होते.

डॉ.देशमुख यांनी नियंत्रण कक्षातून पालखी तळ सासवड आणि सासवड तहसील कार्यालय येथील कक्षाशी संपर्क साधला. आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्यावतीने संत तुकाराम महाराज पालखी मार्गासाठी २५, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गासाठी २५, जिल्हा नियंत्रण कक्ष, तहसील कार्यालय, सासवड, पालखी तळ सासवड, जेजूरी मंदीर व वाल्हे येथे बेसस्टेशन देण्यात आले आहे. दिवेघाट, भुलेश्वर व जेजुरी येथे रिपीटर बसविण्यात आले आहे तर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, तहसीलदार हवेली, तहसीलदार पुरंदर, तहसीलदार बारामती व तहसीलदार दौंड यांना गाडीमध्ये मोबाईल व्हॅन सेट देण्यात आले आहेत. यामुळे आवश्यक नियोजनासाठी संवाद सुलभ होणार आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे व खाजगी कंपनीचे व्यवस्थापक नितीन आयनापुरे यांनी आषाढी पालखी सोहळ्यासाठी असलेल्या बिनतारी यंत्रणेबाबत माहिती दिली.

विद्यार्थी, तरुणांची अडचण लक्षात घेऊन कोरोनाविषयक खटले मागे घेण्याचा निर्णय

0

मुंबई-कोरोना काळातील प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन केल्यामुळे दाखल केलेले खटले मागे घेण्यासाठी क्षेत्रिय समित्यांना कार्यवाही करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

राज्यात कोरोना काळात  21 मार्च 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीत भादंवि कलम 188 अन्वये, भादंवि कलम 188 सह साथरोग प्रतिबंध / आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये, भादंवि कलम 188 सह 269 किंवा 270 किंवा 271 सह साथरोग प्रतिबंध/ आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये, भादंवि कलम 188 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम, कलम 37 सह 135 अशा कलमान्वये विद्यार्थी, सुशिक्षित बेरोजगार तरुणांवर खटले  दाखल झाले आहेत. त्यामुळे त्यांना नोकरीच्या ठिकाणी, पासपोर्ट व इतर ठिकाणी चारित्र्य पडताळणीच्या वेळेस अनेक अडचणी येत आहेत. याचा विचार करून हे खटले मागे घेण्यासाठी शासनाने राजकीय व सामाजिक आंदोलनातील खटले मागे घेण्याकरिता जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली गठित केलेल्या क्षेत्रिय समितीला कार्यवाही करण्यास मान्यता देण्यात आली.

तथापि, ही कार्यवाही करताना ज्यामध्ये सरकारी नोकर व फ्रंट लाईन वर्कर यांच्यावर हल्ले झालेले नसावेत आणि ज्यामध्ये खाजगी व सार्वजनिक मालमत्तेचे 50 हजार रुपयांपेक्षा जास्त नुकसान झालेले नसावे. या अटी विचारात घेतल्या जाव्यात अशीही मान्यता देण्यात आली

मुख्यमंत्री ठाकरेंच्या भेटीला शरद पवार, सुप्रिया सुळे वर्षावर- ठाकरेंचे ट्वीट -मुंबईत या ,राजीनामा घेऊन राजभवनावर जा

0

मुंबई-मी मुख्यमंत्रीपद आणि शिवसेना पक्षप्रमुखपद सोडायला तयार आहे. मात्र, समोर येऊन सांगा, अशी साद उद्धव ठाकरे यांनी बुधवारी बंडखोरांना घातली. त्यांच्या या भावनिक फेसबुक लाइव्हनंतर उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे वर्षा निवासस्थानावर दाखल झालेत. दुसरीकडे सायंकाळी सात वाजता एकनाथ शिंदे गुवाहटीत पत्रकार परिषद घेणार आहेत. आता ते काय बोलतात, याची उत्सुकता आहे.शिवसेनेने व्हीप जारी करून आपल्या आमदारांना संध्याकाळी मुख्यमंत्री निवासस्थानी पोहोचण्याचे आदेश दिले आणि अनुपस्थित राहिल्यास कारवाईचा इशारा दिला. यानंतर काही वेळातच एकनाथ शिंदे यांच्या ट्विटने खळबळ उडवून दिली. त्यात ते म्हणाले, हा व्हीप बेकायदेशीर आहे. याशिवाय त्यांनी सुनील प्रभू यांच्या जागी भरत गोगावले यांची मुख्य व्हीप म्हणून नियुक्ती केली. म्हणजेच आता शिंदे यांनी थेट शिवसेना पक्षावरच दावा ठोकला आहे. यासोबतच त्यांनी 34 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपाल आणि उपसभापतींना दिले आहे.

दरम्यान उद्धव ठाकरे यांनी ट्वीट करून बंडखोरांना निरोप दिला आहे, माझ्या राजीनाम्याचे पत्र तयार ठेवले आहे मुंबईत या राजीनाम्याचे पत्र घेऊन जा असे त्यांनी म्हटले आहे.

खुर्चीचा मोह नाही, मी नको असेल तर समोर येऊन सांगा, राजीनामा देतो -उद्धव ठाकरे (कुऱ्हाडीचा दांडा,गोतास काळ)

0

मुंबई : बंडखोरांपैकी एकानेही मला समोर येऊन सांगावं, मी मुख्यमंत्रिपदी नको त्याक्षणी मी राजीनामा द्यायला तयार आहे. फक्त ज्यांना मी नकोय, त्यांनी मला सांगावं. मी राजीनाम्याचं पत्र तयार करुन ठेवलंय. मला कोणताही मोह नाही, असा निरोपच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर एकनाथ शिंदे यांनी दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर प्रथमच आपली भूमिका मांडली. यावेळी भाजपसोबत जाण्याचा कोणताच विचार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी नि:क्षून सांगितलं.मी मुख्यमंत्री पद सोडल्यानंतर दुसरा कोणी शिवसैनिक मुख्यमंत्री होणार असेल तर मला आनंदाने मान्य आहे . हेही लक्षात घ्या असेही ते म्हणाले . या शिवाय शिवसेना प्रमुख पदाचा राजीनामा हवा असेल तर तोही देतो असेही ते म्हणाले .

मी मुख्यमंत्रीपदाच्या लायक नसल्याचे समोर येऊन सांगा. राजीनामा तयार आहे, असे म्हणत बुधवारी मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी बंडखोरांना साद घातली. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर त्यांनी आपली भूमिका फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून विशद केली. आता यावर एकनाथ शिंदे काय बोलतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. शिंदे सायंकाळी सात वाजता गुवाहटीत पत्रकार परिषद घेणार आहेत.

शिवसेना हिंदुत्वापासून आणि हिंदुंत्व शिवसेनेपासून दूर होऊ शकत नाही. विधान भवनात हिंदुत्वाबाबत बोलणारा मी पहिला मुख्यमंत्री आहे. ही शिवसेना बाळासाहेबांची नाही असे भासवण्याचा प्रयत्न चुकीचा आहे. बाळासाहेबांच्या नंतरच्या शिवसेनेनी तुम्हाला खूप काही गेले हे लक्षात ठेवा असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

शस्त्रक्रियेमुळे भेटू शकत नव्हतो. शिवसेना आणि हिंदुत्व एकमेकांशी जोडलेले शब्द. हो दोन्ही शब्द कदापिही एकमेकांपासून वेगळे होऊ शकत नाहीत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपूर्वी आदित्य, एकनाथ शिंदे सारे अयोध्येला गेले. हिंदुत्वावार बोलण्याची ही वेळ नाही. मग नेमके झाले काय, ही शिवसेना कोणाची. काही जण ही बाळासाहेबांची शिवसेना राहिलेली नाही म्हणतात. ठीक आहे. असं मी काय केलंय. त्यावेळेला जे विचार होते, तेच मी पुढे नेतोय. 2014 साली प्रतिकूल परिस्थितीत 63 आमदार निवडून आणले. पहिल्या प्रथम शिवसेना कोणाची, हिंदुत्व सोडले का, मधल्या काळात जे काही दिले, ते बाळासाहेबानंतर शिवसेनेने दिले.

सध्या राज्यात काय चाललंय. काही सूरतला गेले. त्यानंतर गुवाहटीला गेले. काल परवा विधान परिषदेची निवडणूक झाली. या निवडणुकीच्या अधल्या दिवशी सगळे आमदार हॉटेलमध्ये होते. मी तिकडे गेलो. ज्यांना आपले मानतो. आपली माणसं यांना एकत्र ठेवावे लागते. शंका ठीक आणि लघुशंकेला गेले तर शंका. ही कसली लोकशाही.

साधा महापालिकेत उभा न राहिलेला माणूस मुख्यमंत्री कसा होणार हा प्रश्न मी पवारांना विचारला. पण त्यांनी आग्रह केला. मग म्हटलं, ठीक आहे होऊयात. राजकारण हे राजकारण असलं पाहिजे. वळणदार राजकारण रडकुंडीच्या घाटासारखं असू नये. प्रशासनाने मला सांभाळून घेतलं. मला धक्का कशाचा बसला आहे? तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने म्हटले की, आम्हाला मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे नकोयत, तर एक वेळ ठीक आहे. आज कमलनाथ यांनी स्वत: फोन करून म्हटले की, उद्धवजी आम्ही तुमच्यासोबत आहोत. पण माझ्याच लोकांना मी नको आहे, त्याला काय म्हणावं?

आजही या लोकांपैकी एकानेही सांगितले की, उद्धवजी आम्हाला तुम्ही मुख्यमंत्री म्हणून नको आहात, तर मी आजच वर्षा सोडून मातोश्रीवर जायला तयार आहे. त्यांनी हे समोर येऊन बोलावे, उगाचं शिवसेनेला आम्ही सोडणार नाही, हिंदुत्वाचा मुद्दा असे याच्या त्याच्या पाशी सांगू नये. मी सत्तेला चिकटून बसणारा माणूस नाही. मी शिवसेना प्रमुखांचा पुत्र आहे. मला सत्तेचा मोह नाही. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ अशी एक म्हण आहे, तशीच परिस्थिती आता आली आहे.

ठाकरेंना न विचारता मुख्य प्रतोदपदी परस्पर केली गोगावलेंची नियुक्ती

0

मुंबई- सेनेतील बंडखोर आमदार एकनाथ शिंदेंनी आपल्या अधिकारात परस्पर शिवसेनेचे प्रतोद म्हणून भरत गोगावले यांची नियुक्ती करत एक प्रकारे सेनाप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आव्हानच दिले आहे. यानंतर मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेएकनाथ शिंदेंकडून विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना पत्र लिहले असल्याची माहिती समोर आली आहे. यात शिवसेनेच्या 34 आमदारांच्या स्वाक्षरी सहित हे पत्र पाठवण्यात आली आहे.