Home Blog Page 1615

विद्यापीठांमधील विद्यार्थी निवडणुका सुरू व्हाव्यात -केंद्रीय कायदा व न्यायमंत्री प्रा. एस.पी.सिंग बघेल

0

बाराव्या छात्र संसदेचे दिमाखदार उद्घाटन एमआयटी डब्ल्यूपीयूत
– भावी युवा राजकीय नेतृत्व घडवण्यात छात्र संसदेची महत्त्वपूर्ण भूमिका

पुणे, दि. १५ सप्टेंबर: विद्यापीठे आणि शिक्षण संस्थांमधील स्थगित असलेल्या विद्यार्थी निवडणुका पुन्हा सुरू झाल्या पाहिजेत. देशातील सद्यकालीन राजकीय प्रवाह एका स्थित्यंतरातून जात आहे. अशा परिस्थितीत राजकीय पटलावरील भावी युवा नेतृत्व घडवण्यासाठी भारतीय छात्र संसद महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकेल, अशी अपेक्षा भारत सरकारचे कायदा आणि न्याय राज्यमंत्री प्रा. एस. पी. सिंह बघेल यांनी गुरुवारी येथे व्यक्त केली. प्रा. बघेल यांच्या या वक्तव्याला उपस्थित हजारो विद्यार्थ्यांनी जोरदार टाळ्यांनी प्रतिसाद देत त्यांच्या विधानाचे स्वागत केले.

भारतीय छात्र  संसद फाऊंडेशन, एमआयटी स्कूल आफ गव्हर्नमेंट आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आयोजित बाराव्या छात्र संसदेच्या उद्घाटनप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

इस्त्रोचे माजी अध्यक्ष डॉ. कैलासवादिवू सिवन,  पर्यावरण अभ्यासक पद्मभूषण डॉ. अनिल प्रकाश जोशी, जे.के. उद्योग समूहाचे सीईओ अनंत सिंघानिया व प्रसिद्ध शास्त्रीय गायिका श्रीमती कौशिकी चक्रवर्ती हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच,एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड, कार्याध्यक्ष व मिटसॉगचे संस्थापक राहुल विश्‍वनाथ कराड, कुलगुरू डॉ. आर.एम. चिटणीस,  एमआयटी शिक्षण संस्था समुहाचे अधिष्ठाता प्रा.शरद्चंद्र दराडे-पाटील, पंडित वसंतराव गाडगीळ व मिटसॉगचे संचालक डॉ. के. गिरीसन  हे उपस्थित होते.

श्री बघेल पुढे म्हणाले, रामराज्य हे आदर्श प्रशासनाचे उदाहरण होते, हे आपण आजही मान्य करतो. एमआयटी विद्यापीठासारख्या शिक्षणसंस्था यापुढे देशाला विश्‍वाच्या पटलावर विश्‍वगुरू ही संज्ञा प्राप्त करून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलतील, यात शंका नाही.

के. सिवन म्हणाले, अंतराळ संशोधन आणि विज्ञान तंत्रज्ञान हे फक्त राकेट, क्षेपणास्त्रे, उपग्रह प्रक्षेपकांच्या निर्मितीपुरते मर्यादित नाही. या ज्ञानाचा, संशोधनाचा उपयोग ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला होणे गरजेचे आणि महत्त्वाचे आहे. त्याच्या वापरातून ग्रामीण जनतेच्या कष्टमय आयुष्यात बदल घडले पाहिजेत. अंतराळ संशोधनातील नव्या शोधांमुळे आता आपल्याला वादळे, नैसर्गिक आपत्ती यांची पूर्वसूचना देणे शक्य होत आहे, ज्यामुळे मनुष्य आणि वित्तहानी टाळता येणे शक्य झाले आहे. तसेच मच्छिमार आणि शेतकर्‍यांच्या हिताचे निर्णय घेणे शक्य झाले आहे.

अनंत सिंघानिया म्हणाले, आगामी काळात मी केवळ आत्मनिर्भर भारताचे स्वप्न न पाहता, सारे जग आपल्यावर अवलंबून असल्याचे चित्र पाहात आहे. आगामी काळात लवकरच कल्पनातीत अशी तंत्रज्ञानक्रांती घडून येणार आहे. अशा काळात विद्यार्थ्यांनी नवे मार्ग, नव्या वाटा, नव्या दिशांचा ध्यास घेतला पाहिजे. प्रगती, यश यांच्या नव्या व्याख्या समजून घेतल्या पाहिजेत.

डॉ. अनिल प्रकाश जोशी, म्हणाले, दिल्ली आपली राजकीय राजधानी आहे, मुंबई आपली आर्थिक राजधानी आणि तसाच हिमालय म्हणजे पर्यावरण राजधानी आहे. काही काळापूर्वी आपण आर्थिक संकटातून जात होतो. आज आपण पर्यावरणीय संकटातून जात आहोत. पर्यावरणाचे संवेदनशील मुद्दे अधोरेखित करण्यासाठी आम्ही मुंबई ते उत्तराखंड अशी सायकल रॅली काढत आहोत. समाजमनात पर्यावरणाविषयी जाणीवजागृत निर्माण करण्याचा उद्देश यामागे आहे.

कौशिकी चक्रवर्ती यांनी छोटेखानी मनोगतात संगीताच्या माध्यमातून जीवन समजून घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. गुरूमंत्र, समाजकल्याण, विश्‍वकल्याण आणि स्वतःचा शोध यांचे वर्णन करणार्या पारंपरिक रचना गाऊन कौशिकी यांनी संगीत हा शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांच्या जीवनाता अविभाज्य भाग बनावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड  म्हणाले, स्वधर्म, स्वाभिमान आणि स्वत्व, या त्रिसूत्रीचा विद्यार्थ्यांनी स्वीकार करावा आणि आपल्या परंपरेने दिलेले तत्त्वज्ञानाचे, अध्यात्माचे संचित डोळसपणे अभ्यासावे. आपल्या विद्यार्थ्यांनी संतपरंपरेतील ज्ञानेश्‍वर महाराज, तुकाराम महाराज यांचे साहित्यविचार जाणून घेतले पाहिजेत. त्यातून त्यांना आपल्या समृद्ध सांस्कृतिक संचिताचे भान येईल आणि मानवी जीवनाचा खरा हेतू जाणण्यासाठी त्याची मदत होईल.

राहुल विश्‍वनाथ कराड म्हणाले, राजकारण ही कोणत्याही प्रकारे त्याज्य अथवा नकारात्मक गोष्ट नाही. उलट आपल्या जगण्याचा तो अविभाज्य घटक आहे. आपण राजकारणाची सकारात्मक बाजू समाजासमोर आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विद्यार्थ्यांनी सजग नागरिकत्वाचे आदर्श निर्माण केले पाहिजेत. ज्यातून समाजाला राजकीय घडामोडी आणि राजकारण याविषयी सकारात्मक संदेश मिळतील. भारतीय छात्र संसदेच्या माध्यमातून असे शेकडो युवा विद्यार्थी घडवण्याचे आमचे ध्येय आहे. आपल्या देशाचा उल्लेख इंडिया ऐवजी भारत असा करावा, तसेच इंडिपेन्डन्स डे ऐवजी राष्ट्रीय दिवस असा उल्लेख करावा, यासाठी व्यापक अभियान सुरू करावे.

जम्मूकाश्मिरची विद्यार्थिनी नंदिता जामवाल आणि पंजाबचा विद्यार्थी धीरेंद्र सिंह यांनी विद्यार्थ्यांच्या वतीने मनोगत मांडले. प्रा.डॉ. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले आणि डॉ.के. गिरीसन यांनी आभार मानले.

राज्यातील २२ जिल्ह्यातील बाधित गाव परिसरात सात लाख जनावरांचे लसीकरण पूर्ण – पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह

0

मुंबई, दि. 14 : राज्यातील २२ जिल्ह्यांमध्ये १४ सप्टेंबर २०२२ अखेर एकूण ४७० गावांमध्ये लम्पी आजाराचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. लंपी नियंत्रणासाठी राज्यातील 22 जिल्ह्यातील बाधित गावांच्या परिसरातील 2 हजार 535 गावांमध्ये 7 लाख जनावरांचे लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली.

श्री.सिंह म्हणाले, जळगाव २४, अहमदनगर १७, धुळे १, अकोला ५, पुणे ८, सातारा २, बुलडाणा ३, अमरावती ३ व वाशिम १ अशा ६४ बाधित जनावरे यामुळे दगावली.

१७५६ पशुधन उपचाराने बरे झाले

पशुसंवर्धन विभागाकडून याबाबत सुरूवातीपासूनच आवश्यक ती खबरदारी घेतल्यामुळे महाराष्ट्रातील लम्पी रोगामुळे मृत्यूदराचे प्रमाण कमी राखण्यामध्ये आतापर्यंत यश आले आहे. बाधित क्षेत्राच्या ५ किमी परिघातील २५३५ गावातील एकूण ६,९७,९४९ पशुधनास लसीकरण करण्यात आले आहे व पुढील लसीकरण सुरू आहे. बाधित गावांतील एकूण ३५१९ बाधित पशुधनापैकी एकूण १७५६ पशुधन उपचाराने बरे झालेले आहे. उर्वरीत बाधित पशुधनावर उपचार सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली.

लसमात्रा मोठ्या प्रमाणात उपलब्धबाधित गावांच्या ५ किमी क्षेत्रात लसीकरण

लंपी आजाराच्या नियंत्रणासाठी १६.४९ लाख लसमात्रा राज्यात उपलब्ध आहेत. १४ सप्टेंबर रोजी अतिरिक्त ५ लाख लसमात्रा राज्यासाठी प्राप्त झाल्या आहेत. आणखी ५० लाख लसमात्रा आठवडा भरात प्राप्त होत आहेत. त्यानुसार अभियान स्वरुपात बाधित गावांच्या ५ किमी क्षेत्रात लसीकरण करण्यात येत आहे. त्यानंतर प्राधान्याने गोशाळा व मोठ्या गोठ्यांमध्ये किंवा जास्त संख्येने पशुधन असलेल्या ठिकाणी लसीकरण करण्यात येणार असल्याचे श्री. सिंह यांनी यावेळी सांगितले.

नवी मुंबईत खारघर येथे सीजीएसटीच्या अधिकाऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्या निवासी संकुलाचे उद्‌घाटन

0

मुंबईत वडाळा येथे लवकरच 40 एकर क्षेत्रावर 4000 निवासस्थाने आणि कार्यालयीन वापराच्या तीन इमारती यांचा समावेश असलेला सीबीआयसीचा आगामी निवासी प्रकल्प उभारण्यात येणार – केंद्रीय महसूल सचिव

मुंबई, 14 सप्टेंबर 2022

केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सीबीआयसी अर्थात केंद्रीय अप्रत्यक्ष कर तसेच सीमाशुल्क मंडळाच्या अखत्यारीतील मुंबई प्रदेश केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विभागात कार्यरत अधिकारी आणि इतर कर्मचारी वर्गासाठी  नवी मुंबईत खारघर येथे उभारण्यात आलेल्या ‘केंद्रीय जीएसटी परिसर’ या निवासी प्रकल्पाचे उद्घाटन केले. या वेळी केंद्रीय अर्थमंत्र्यांनी या प्रकल्पात राहायला येणाऱ्या सीबीआयसीच्या विविध श्रेणीतील पहिल्या पाच घरांचे मालक असलेल्या अधिकाऱ्यांना समारंभपूर्वक घरांच्या चाव्या सुपूर्द केल्या. केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. केंद्रीय महसूल विभागाचे सचिव तरुण बजाज, सीबीआयसीचे अध्यक्ष विवेक जोहरी, सीबीआयसीच्या प्रशासकीय सदस्य संगीता शर्मा, सीजीएसटीचे मुंबई प्रदेश  प्रधान  मुख्य आयुक्त अशोक कुमार मेहता, सीबीआयसीचे वरिष्ठ अधिकारी तसेच  सीजीएसटीच्या मुंबई प्रदेश  विभागातील कर्मचारीवर्ग देखील या कार्यक्रमाला उपस्थित होता.

केंद्रीय जीएसटी परिसर हा विचारपूर्वक आराखड्यासह उभारण्यात आलेला आणि नवी मुंबई परिसरातील अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेला एक विस्तीर्ण निवासी प्रकल्प आहे. या प्रकल्पाजवळून मुंबई तसेच पुणे या दोन्ही महत्त्वाच्या ठिकाणांना जोडणारे रस्ते जातात तसेच येथून रुग्णालये आणि शैक्षणिक संस्थांपर्यंत पोहोचण्यासाठीच्या सुविधा सुलभतेने उपलब्ध आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना, अमृत काळात या प्रकल्पाचे झालेले उद्घाटन, नव्या भारताचे सामर्थ्य दर्शविते.

या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी हा प्रकल्प हाती घेऊन, त्यासंबंधी परवानग्या मिळवून उत्तम पद्धतीने हे कार्य पूर्ण केल्याबद्दल सीबीआयसीचे माजी अध्यक्ष आणि त्यांच्या सहकारी वर्गाचे विशेष कौतुक केले. देशात ज्या ज्या ठिकाणी केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या कक्षेत कार्यरत असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गाच्या कल्याणासाठी असे प्रकल्प हाती घेऊन ते  पूर्णत्वाला नेले जात आहेत अशा ठिकाणी उपस्थित राहून मनाला अत्यंत समाधान वाटते अशा शब्दात केंद्रीय अर्थमंत्र्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. एनबीसीसी या सार्वजनिक क्षेत्रातील संस्थेने, महामारीच्या काळात देखील, खारघर येथील हा प्रकल्प विक्रमी वेळेत आणि अंदाजापेक्षा कमी खर्चात पूर्ण करण्यात आला आहे याची नोंद घेऊन सीतारामन म्हणाल्या, “हे काम अत्यंत अनुकरणीय आहे आणि सरकारी संस्था देखील अत्यंत उत्तम पद्धतीने काम करू शकतात आणि खासगी क्षेत्राशी असलेल्या स्पर्धेत उत्तम कामगिरी देखील करू शकतात हेच अशा प्रकारच्या कार्यातून सिध्द होते.” याच संदर्भात त्या पुढे म्हणाल्या की काही काळापूर्वी, सरकारी तसेच निम-सरकारी संस्थांकडे अविश्वासाच्या भावनेने बघितले जात होते. “दर्जाशी कोणतीही तडजोड न करता तसेच भविष्यकाळाचा विचार मनात ठेऊन विहित वेळेपूर्वी आणि अंदाजित खर्चापेक्षा कमी खर्चात प्रकल्पाचे काम पूर्ण होण्याचा आज दुर्मिळ प्रसंग आहे,”

सीबीआयसीच्या कामगिरीबद्दल बोलताना, केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या, “तुम्ही सर्व असेच उत्तम काम यापुढेही करत रहा, महसूल निर्माण होईल याकडे लक्ष द्या, तुमच्या या कामाची नक्कीच दखल घेतली जात आहे, पंतप्रधानांनी नुकताच जीएसटी महसुलाचे प्रमाण वाढत असल्याचा विशेष कौतुकास्पद उल्लेख केला.” यावेळी बोलताना केंद्रीय अर्थमंत्र्यांनी कर चुकवेगिरीसारख्या फसवणुकीच्या घटनांचा शोध घेण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा ॲनालिटीक्स, आयओटी तसेच अशा  इतर तंत्रज्ञानांचा अधिक चांगल्या प्रकारे वापर करून घेण्याच्या दृष्टीने  आपल्या अधिकाऱ्यांना अधिक उत्तम रीतीने प्रशिक्षित करण्याची गरज देखील व्यक्त केली. 

या प्रकल्पासाठी मंजूर करण्यात आलेल्या 110 कोटी रुपयांऐवजी हा प्रकल्प 100 कोटी रुपयांमध्ये हा प्रकल्प पूर्ण करणाऱ्या पथकाच्या कार्याचे केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी यावेळी बोलताना कौतुक केले.

केंद्रीय महसूल सचिव तरुण बजाज म्हणाले की , कर अधिकाऱ्यांकडून  चांगली कामगिरी अपेक्षित असेल तर त्यांची विशेषत: त्यांच्या निवासाच्या बाबतीत, काळजी घेणे खूप  महत्वाचे आहे. गेल्या दीड वर्षापासून  या संदर्भातील  असे सर्व प्रकल्प मार्गी लावण्यावर भर देण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले. मुंबईतील वडाळा येथे सीबीआयसीचा आणखी एक गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यात येत असून  40 एकर भूखंडावरील हा मोठा प्रकल्प आहे . या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात 770-780 सदनिका  आणि  कार्यालयांसाठी एक  टॉवर बांधण्यात येणार आहे. यानंतर पुढील टप्प्यात दोन कार्यालयीन टॉवरसह सुमारे 4000 निवासी सदनिका  बांधण्यात येणार असल्याची माहिती महसूल सचिवांनी दिली.

सीजीएसटीचे  मुंबई क्षेत्र प्रधान मुख्य आयुक्त अशोक कुमार मेहता यांनी माहिती दिली की, गेल्या आर्थिक वर्षात 1,18,000 कोटी रुपयांहून  अधिक महसूल संकलित करून सीजीएसटी  मुंबई क्षेत्र हे  देशातील सर्वाधिक महसूल संकलित करणारे क्षेत्र आहे. गेल्या 12 महिन्यांत मुंबई क्षेत्राने  11,000 कोटीं रुपयांची  करचोरी शोधून काढल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्रीय जीएसटी परिसर

गेल्या काळात आलेल्या कोविड-19 च्या दोन लाटांमुळे प्रकल्पाचे बांधकाम प्रभावित झालेले असताना देखील हा प्रकल्प करारात निर्दिष्ट केलेल्या कालमर्यादेत आणि 14 महिन्यांच्या विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आला आहे. या प्रकल्पातील इमारती आधुनिक संरचनेच्या, पर्यावरण स्नेही तसेच शाश्वत बांधणीच्या असून त्या जीआरआयएचए3 मधील सर्व विहित मानकांची पूर्तता करणाऱ्या आहेत.  या प्रकल्पातील घरे प्रशस्त, हवेशीर असून त्यात प्रकाश व्यवस्था तसेच इतर सुविधांसाठी उत्तम प्रतीचे साहित्य वापरण्यात आले आहे. विभागात कार्यरत सर्व श्रेणीतील अधिकारी आणि कर्मचारी वर्गासाठी या प्रकल्पात सहा विविध प्रकारची 187 घरे बांधण्यात आली आहेत.

परवडणारी घरे

 किफायतशीर दरातील घरे उपलब्ध होणे ही मुंबईतील सर्वात महत्वाची समस्या आहे. जनरल पूल निवासी योजना केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी घरे उपलब्ध करून देत असते मात्र कर्मचारी वर्गात सतत होणाऱ्या नव्या नियुक्त्या आणि त्यात समाविष्ट असणारे संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले उमेदवार यामुळे घरांची टंचाई निर्माण होऊन प्रतीक्षा यादी लांबत जाते. त्या दृष्टीकोनातून, सदर प्रकल्प म्हणजे अशा सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानविषयक समस्या सोडविण्याच्या दिशेने उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे.

जिथे सरकारी निवासस्थानांची टंचाई निर्माण होते तिथे  संपूर्ण देशातील अधिकारी तसेच कर्मचारी वर्ग यांच्या कल्याणासाठी  गृह प्रकल्प उभारण्याच्या दिशेने सीबीआयसी महत्वाची पावले उचलते.

‘लोकसेवा’तर्फे 25 हजार झाडांची वृक्षारोपण मोहिम

0

साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांच्या हस्ते वृक्षारोपण मोहिमेस प्रारंभ

पुणे | लोकसेवा प्रतिष्ठान च्या वतीने 25 हजार झाडांची वृक्षारोपण मोहिम सुरू करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांच्या हस्ते फुलगाव येथील लोकसेवा शैक्षणिक संकुलात वृक्षारोपण करून या मोहिमेस मंगळवारी प्रारंभ झाला. पर्यावरणाचे संतुलन केवळ झाडांमुळेच राखले जावू शकते. भविष्य ज्यांच्या हातात आहे त्या विद्यार्थ्यांच्या मार्फत ही 25 हजार झाडांची वृक्षारोपण मोहिम राबविण्यात येत आहे.

लोकसेवा प्रतिष्ठान संचलित नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे यांच्या संकल्पनेतून या पर्यावरणपूरक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी उदगीर येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे सपत्नीक उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

भारत सासणे यांना नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेच्या विद्यार्थ्यांनी सैनिकी मानवंदना दिली. त्यानंतर ढोल- ताशांच्या गजरात वृक्षारोपण अभियानाची सुरुवात झाली. शाळेतील कलाशिक्षक शंकर साळुंके यांनी रेखाटलेले सासणे यांचे रेखाचित्र त्यांना भेट देण्यात आले.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सासणे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी सत्याची कास धरावी. भावी आयुष्यात त्यांना हा मूलमंत्र उपयोगी पडेल. पुस्तक वाचनातून प्रगती करता येते. विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार पुस्तके उपलब्ध करून देण्यात यावीत अशी सूचना त्यांनी शाळेला दिली. वर्षभर विविध प्रतिभासंपन्न साहित्यिकांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना घडावे व विद्यार्थ्यांमध्ये साहित्याची आवड निर्माण करावी.

साहित्य क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्त्वाला पाहून व ऐकून विद्यार्थी भारावून गेले होते. त्यांच्यामध्ये चैतन्याचे वातावरण पसरले होते. यावेळी शिक्षण तज्ज्ञ डॉ. अ. ल. देशमुख यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, पुस्तक वाचल्याने मन प्रसन्न होते, पुस्तकातील ओळी थेट हृदयापर्यंत पोहचतात. म्हणून आपल्याला आवडतात ती पुस्तके वाचावीत.

हरी उद्धव धोत्रे विद्यालयाचे मुख्याध्यापक लोंढे, धर्मवीर संभाजी राजे माध्यमिक विद्यालय तुळापूरचे मुख्याध्यापक ए. बी. जाधव, नवीन माध्यमिक विद्यालय मरकळच्या मुख्याध्यापिका लाटे, लोणीकंद प्राथमिक शाळेचे लंघे, लोकसेवा परिवारातील लेखक तानाजी गोरे, युवा स्पंदनचे चेतन धोत्रे, लोकसेवा फार्मसी कॉलेजचे प्राचार्य नरहरी पाटील, पांडुरंग जगताप, भारत पवार, तुषार वाघमारे, ईश्वर पाटील यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल भारत सासणे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्तविक लोकसेवा प्रतिष्ठानचे संचालक व लोकसेवा कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य नरहरी पाटील यांनी केले. तर, पांडुरंग जगताप यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे संयोजन अर्जुन शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभाग प्रमुख साधना शिंदे यांनी केले. यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेचे प्राचार्य अमर क्षीरसागर, लोकसेवा इंग्लिश मिडियम स्कूलचे प्राचार्य डेनसिंग, टेन टी इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य पी. शोफीमॉन, लोकसेवा मुलींची सैनिकी शाळेच्या प्राचार्या लक्ष्मी कुलकर्णी, विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ऑटो रिक्षा, टॅक्सी संघटनेच्या राष्ट्रीय फेडरेशन राष्ट्रीयअध्यक्षपदी बाबा कांबळे यांची नियुक्ती

0

दिल्ली येथे भारतातील रिक्षा टॅक्सी चालकांची राष्ट्रीय परिषद उत्साहात

दिल्ली-देशभरातील रिक्षा चालक, टॅक्सीचालकांचे प्रश्न एकच आहेत. त्यांच्या प्रश्नांना शासनस्तरावर न्याय दिला जात नाही. त्यासाठी देशभरातील संघटनांनी एकत्र येऊन संघर्षाला तयार झाले पाहिजे. सर्व संघटनांच्या प्रतिनिधींच्या एकजुटीने रिक्षा चालक, टॅक्सी चालकांच्या प्रश्नांना वाचा फोडून न्याय देऊ, असे प्रतिपादन महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केले.

दिल्ली येथे देशभरातील रिक्षा टॅक्सी, ड्रायव्हर व वाहतूदार संघटनेचे अध्यक्ष, सचिव, पदाधिकारी, नेते प्रतिनिधी, यांची राष्ट्रीय परिषद दिल्ली येथील महात्मा गांधी स्मृती सभागृह,दर्शन स्मृती ट्रस्ट राजघाट येथे 12 सप्टेंबर रोजी उत्साहात पार पडली. या परिषदेत राष्ट्रीय अध्यक्षपदी बाबा कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली. या वेळी सत्काराला उत्तर देताना बाबा कांबळे बोलत होते. राजेंद्र सोनी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला.

या वेळी बाबा कांबळे म्हणाले की, जॉर्ज फर्नांडिस नंतर स्वर्गीय शरद राव यांनी देशभरामध्ये रिक्षा चालकांचे संघटन करण्याचे स्वप्न पाहिले. परंतु आकस्मित झालेल्या मृत्यूमुळे त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. यांचे अपूर्ण स्वप्न आम्ही सर्व मिळून पूर्ण करू, असे बाबा कांबळे म्हणाले. मला देशाच्या राजधानी मध्ये अत्यंत महत्वाचे पद आपण दिले,प्रेम दिले आहे, त्याची परतफेड देशातील रिक्षा टॅक्सी संघटनांचे प्रश्न सोडवून करिल, सर्व संघटनांनी दिलेल्या जबाबदारी बद्धल मी ऋणी असल्याचे बाबा कांबळे यांनी सांगितले.

दिल्ली येथील रिक्षा टॅक्सी चालकांचे नेते राजेंद्र सोनी यांची राष्ट्रीय नेतेपदी नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रीय सल्लागारपदी शब्बीर अहमद विद्रोही, व पी. रविशंकर, (हैदराबाद तेलंगणा,) राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नरेंद्र गायकवाड (नांदेड,) महसचिव आनंद भाऊ चवरे (नागपूर)व रुपेश सोनार (गुजरात) महाराष्ट्र अध्यक्षपदी गफार नदाफ (कराड) महाराष्ट्र सचिवपदी, नाना सातव, (बारामती) उत्तर प्रदेश अध्यक्षपदी कल्लू भाई यादव,(उत्तर प्रदेश) कर्नाटक अध्यक्षपदी गजानन खापे,(कर्नाटक) यांची नियुक्ती करण्यात आली.या वेळी, कासम मुलानी (नवी मुंबई) जावेदभाई देऊळकर (मुंबई)योगेश शर्मा (हरियाणा) जिशिपल जी (लुधियाना)मंसुरिजी (गुडगाव) राकेश वर्मा म्होमाड आरिफ (दिल्ली) सनी हमने (चंद्रपूर)तानाजी मासालकर, सिद्धाराम चोपडे (सोलापूर)बाळा जगदाळे (पनवेल) आशिष देशपांडे (अंबरनाथ ठाणे)आधी उपस्थित होते

दिल्ली येथील रिक्षा टॅक्सी चालकांचे नेते किशन वर्मा यांनी बाबा कांबळे यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाबाबतचा प्रस्ताव मांडला. त्याला राजेंद्र सोनी, नरेंद्र गायकवाड सह सर्व राज्यातील पदाधिकाऱ्यांनी अनुमोदन दिले. आणि बाबा कांबळे यांची बिनविरोध राष्ट्रीय अध्यक्ष पदी निवड करण्यात आली,
या बरोबरच या परिषदेत १३ ठराव मंजूर करण्यात आले. यामध्ये ओला, CNG मध्ये होणारे स्वतःची दरवाढ यावर चिंता व्यक्त करत सरकारने स्थानिक स्वराज्य संस्था व मेट्रोच्या धर्तीवर रिक्षाला मदत करावी अनुदान द्यावे,उबेरची बेकायदेशीर दुचाकी प्रवासावर बंदी आणून केंद्र आणि राज्य सरकारने टॅक्सीला प्रथम प्राधान्य द्यावे. रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी महामंडळाची स्थापना करण्यात यावी. या मंडळामार्फत निवृत्तीनंतर पेन्शनची सुविधा, आजारपणात रुग्णालयातील खर्च. औषधांच्या खचांत संविधा. पाल्यांच्या शिक्षणाच्या खर्चाची तरतूद असावी. औषधांच्या खर्चात सुविधा, पाल्यांच्या शिक्षणाच्या खर्चाची तरतूद असावी. ईएसआय, पीएफची सुविधा द्यावी. इलेक्ट्रीक रिक्षासाठी केंद्र व राज्य सरकारकडून प्रत्येकी २५ असे एकूण ५० टक्के अनुदान मिळावे. रिक्षा, टॅक्सीचालकांच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सारथी आयोगाची स्थापना करावी. अल्प दरात घरांची सुविधा मिळण्यासाठी आवास योजना राबविण्यात यावी. रिक्षा, टॅक्सी चालकांचे प्रश्न सोडविण्यासाठी संघटनेच्या प्रतिनिधीसह शासकीय समितीची स्थापना करावी. रिक्षा, टॅक्सीचालकांचे प्रश्न संसदेत मांडण्यासाठी राज्यसभेत प्रतिनिधी नियुक्त करावेत. सीएनजीसाठी अनुदान द्यावेत. मेट्रो, बीआरटीप्रमाणे रिक्षा, टॅक्सीलाही सार्वजनिक सेवेचा दर्जा द्यावा. ऑनलाईन दंडस्वरूपात आकारण्यात येणारे चलन बंद करावे, आदीसह विविध ठराव संमत करण्यात आल्याचे बाबा कांबळे यांनी सांगितले.

नारी शक्ती पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

0

मुंबई, दि. १४ : सामाजिक क्षेत्रात ज्या महिला किंवा व्यक्तींनी मौलिक कार्य केले आहे, अशा महिला किंवा व्यक्ती यांच्या सन्मानार्थ केंद्र शासनामार्फत ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन “नारी शक्ती पुरस्कार” देण्यात येतो. या पुरस्कारासाठी ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन मुंबई उपनगरचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी  केले आहे.

हा पुरस्कार वैयक्तिक स्वरूपाचा असून अर्जदारास या पूर्वी हा पुरस्कार मिळालेला नसावा (या पूर्वी मंत्रालयाने प्रदान केलेला स्त्री शक्ती पुरस्कारांसह) अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय दि. 1 जुलै 2022 रोजी 25 वर्ष पूर्ण असावे. (दिव्यांग व्यक्तीचे वय दि. 8 मार्च 2022 रोजी 25 वर्ष पूर्ण असावे)

नारी शक्ती पुरस्कार उत्कृष्ट कार्यासाठी शक्यतो अपवादात्मक परिस्थितीत, महिलांचे आर्थिक आणि सामाजिक सबलीकरण किंवा या विषयाशी संबंधित किंवा अनुषंगिक क्षेत्रातील व्यक्तींना प्रदान केला जाऊ शकतो. ज्यांनी महिलांना निर्णय घेण्याच्या भूमिकेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले, पारंपरीक आणि अपारंपरिक क्षेत्रात महिलांच्या कौशल्य विकासाला प्रोत्साहन दिले, ग्रामीण महिलांसाठी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या, महिलांना गैर-परंपरिक क्षेत्र जसे की विज्ञान आणि तंत्रज्ञान, क्रीडा, कला, संस्कृती, सुरक्षितता, आरोग्य आणि निरोगीपणा, शिक्षण, कौशल्य विकास, जीवन कौशल्य, महिलांचा आदर आणि प्रतिष्ठा इत्यादींच्या दिशेने ठोस आणि लक्षणीयरीत्या प्रोत्साहन दिले अशा व्यक्तींना नारी शक्ती पुरस्कार दिला जाऊ शकतो. एखाद्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाला देखील हा पुरस्कार दिला जाऊ शकतो. ज्याने बाल लिंग गुणोत्तर (CSR) मध्ये लक्षणीय सुधारणा केली आहे. मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर केल्यावर मृत्यू झाल्याची प्रकरणे वगळता सामान्यतः पुरस्कार मरणोत्तर प्रदान केला जाणार नाही. वरील प्रमाणे कार्य केलेल्या व्यक्ती, राज्य व केंद्रशासित प्रदेश यांनी नारी शक्ती पुरस्कारासाठी केंद्र शासनाच्या www.wcd.nic.in या संकेतस्थळावर दि. ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यत प्रस्ताव सादर करावेत. सदरचे प्रस्ताव हे फक्त ऑनलाईनद्वारेच स्वीकारले जातील. असे मुंबई उपनगर जिल्ह्याचे  महिला व बालविकास अधिकारी शरद कुऱ्हाडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व्यक्ती नव्हे तर विद्यापीठ – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

मॉस्को, दि. 14 : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या आयुष्यात इतके मोठे संस्थात्मक काम केले. त्यामुळे ते केवळ एक व्यक्ती नव्हे, तर विद्यापीठ होते, असे गौरवोद्गार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

रशियातील मॉस्को येथे आज सकाळी मार्गारिटा रुडामिनो ऑल रशिया स्टेट लायब्ररी फॉर फॉरेन लिटरेचरच्या आवारात लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, आमदार सुनील कांबळे, प्रा. संजय देशपांडे, माजी आमदार सुधाकर भालेराव, अमित गोरखे या कार्यक्रमाला उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रासाठी, मराठी अस्मितेसाठी आजचा क्षण अतिशय गौरवाचा, अभिमानाचा आहे. वंचित, श्रमिकांचा आवाज आज रशियात बुलंद झाला. साहित्यभूषण, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळ्याचे आज मॉस्कोमध्ये लोकार्पण व्हावे आणि ती संधी मला मिळावी, हा माझ्या आयुष्यातील संस्मरणीय क्षण आहे. लोकशाहीर साहित्यभूषण अण्णाभाऊ साठे यांनी वंचितांसाठी, समाजातील दुर्लक्षितांसाठी मोठे कार्य आपल्या आयुष्यात केले. वंचितांचा आवाज बनून त्यांनी काम केले. सामाजिक परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही. पण, तरीही इतके मोठे कार्य त्यांनी उभे केले. एकही दिवस शाळेत न गेलेल्या या व्यक्तिमत्त्वावर, त्यांच्या साहित्यावर आज लाखो विद्यार्थी पीएचडी करतात.

मॉस्को स्टेट लायब्ररीने हा उपक्रम हाती घेतला, मुंबई विद्यापीठाने सुद्धा यात सहभाग घेतला, याबद्दल मी त्यांचे मन:पूर्वक आभार मानतो. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातून सामान्य माणसाला प्रेरणा मिळायची आणि आजही त्यांचे साहित्य हे सामान्यांना जगण्याची ताकद देते. ‘फकिरा’तून अनेक कथा त्यांनी समाजापुढे आणल्या. अनेक संघर्षशील व्यक्तिमत्त्व त्यांनी जगापुढे आणले. रशियाचा दौरा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी केला, त्यावेळी त्यांनी रशिया-भारत संबंध अधिक बळकट करण्याचा प्रयत्न केला. रशियातील क्रांतीतून त्यांना प्रेरणा मिळाली. पृथ्वी ही शेषनागावर नाही, तर श्रमिकांच्या डोक्यावर उभी आहे, हे सातत्याने ते सांगत. आज याठिकाणी त्यांच्या स्मृती उभ्या राहत आहेत, हा त्यांचा आणि त्यांच्या कार्याचा मोठा गौरव आहे. प्रत्येक मराठीजनाचा, महाराष्ट्रीयन माणसाचा सुद्धा हा गौरव आहे, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

भारतीय नागरिकांशी संवाद

दरम्यान, काल रात्री झालेल्या एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर यांनी रशियातील भारतीय नागरिकांशी संवाद साधला. रशियन उद्योग जगत आणि भारतीय दुतावासातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. रशिया हा नेहमीच भारताचा चांगला मित्र राहिला आहे. व्यापार असो की संस्कृती सर्वच क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये आणि नागरिकांमध्ये अतिशय चांगले संबंध आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात भारत उत्तम प्रगती करतो आहे. जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्याची झेप घेतो आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. युवा, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, भारत-रशिया संबंधांचाही अमृत महोत्सव, निर्यात धोरण, बंदरविकास, पर्यटन अशा विविध विषयांवर प्रश्नोत्तराचेही एक सत्र झाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनमोकळी उत्तरे दिली.

मिळकत करामध्ये ४० टक्के सवलतीबाबत मुख्यमंत्री शिंदे यांच्या समवेत होणार बैठक

0
  • पालिकेने सद्यस्थितीत वाढीव रक्कम घेऊ नये, बैठकीत सूचना
  • उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली बैठक

पुणे, १४ सप्टेंबर –
मिळकत करामध्ये ४० टक्के सवलत देण्याबाबत आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेणार आहेत. या विषयाबाबत मुख्यमंत्र्यांकडे बैठक लावली जाणार असून तोपर्यंत महानगरपालिकेने नागरिकांकडून कोणताही वाढीव मिळकत कर वसूल करू नये, अशा सूचना बुधवारी मुंबई येथे झालेल्या बैठकीत देण्यात आल्या.
पुणे महानगरपालिकेच्या वतीने मिळकत करामध्ये दिली जाणारी ४० टक्के सवलत पुन्हा लागू करावी तसेच नागरिकांकडून घेतली जाणारी ही फरकाची रक्कम वसूल करू नये, अशी मागणी पुणेकर नागरिक आणि सामाजिक संघटनांकडून केली जात आहे. यावर चर्चा करून पुणेकरांना दिलासा देण्यासाठी कोथरूड विधानसभा मतदार संघाचे आमदार आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी मुंबई येथे बैठक घेतली. त्यामध्ये पुणे महानगपालिकेतील मिळकत कर विभागाचे अधिकारी, नगर विकास विभाग २ चे अधिकारी उपस्थित होते. पालिकेतील माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांनी अशी बैठक घेऊन निर्णय घ्यावा, अशी विनंती पाटील यांना केली होती. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली. माजी सभागृह नेते बिडकर, भाजपचे शहर प्रवक्ते संदिप खर्डेकर, नगर विकास विभागाच्या उपसचिव छापवाले मॅडम, मिळकत कर विभागाचे प्रमुख अजित देशमुख, विधी सल्लागार निशा चव्हाण, यावेळी उपस्थित होते.
शहरातील मिळकत धारकांना दिली जाणारी ४० टक्के सवलत रद्द करण्यात येत असून पालिकेने यापुढील काळात ही सवलत देऊ नये, असे राज्य सरकारने यापूर्वीच पालिकेला कळविले आहे. त्यानुसार पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी ४० टक्के सवलत रद्द केली आहे. तसेच गेल्या तीन वर्षापासून ही सवलत रद्द झाल्याने नागरिकांकडून फरकाची रक्कम वसूल करण्याच्या सूचना केलेल्या आहेत. यामुळे वाढीव कराचा बोजा नागरिकांवर पडणार आहे. ही फरकाची रक्कम तातडीने भरण्याबाबतचे एसएमएस देखील पालिका प्रशासनाने पाठविल्याने नागरिकांमध्ये असंतोष आहे. यावर तोडगा काढण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री पाटील यांनी बुधवारी ही बैठक घेतली. यामध्ये सर्व अधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बैठक घेऊन या विषयावर तोडगा काढण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री शिंदे यांच्याबरोबर बैठक होऊन जोपर्यंत कोणताही निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत महापालिकेने नागरिकांकडे ही रक्कम भरण्याचा तगादा लावू नये, अशा स्पष्ट सूचना यावेळी देण्यात आल्या.

बंद असलेली दस्तनोंदणी लवकरच सुरु होईल असा मंत्र्यांनी दिला विश्वास

0

पुणे-गुंठेवारीतील जाचक अटी दूर होईपर्यंत दस्तनोंदणी त्वरित सुरु करून सर्वसामान्यांना न्याय देण्याचा निर्धार असून त्याबाबतचा प्रस्ताव त्वरित सादर करावा असे आदेश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले.पुण्यातीलच नव्हे तर राज्यभरात तुकडेबंदी व ग्राम पंचायत हद्दीतील सदनिकांची दस्तनोंदणी बंद असून त्यामुळे सर्वसामान्य सदनिकाधारक त्रस्त झाला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर सातत्याने पाठपुरावा करत होते. त्यास सकारात्मक प्रतिसाद देऊन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज मंत्रालयात उच्च स्तरीय बैठकीचे आयोजन केले होते. सदर बैठकीला चंद्रकांतदादा पाटील, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पमहसूल सचिव नितीन करीर,नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांच्यासह भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर, माजी सभागृह नेते गणेश बिडकर, सरपंच सुभाषशेठ नाणेकर, व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष सारंग राडकर, ऍड. नितीन दसवडकर, दत्ताशेठ मारणे, सुभाष शिंदे सरकार,अभिजित कोंडे, मंगेश माळी, गुणवंत वागलगावे यांच्यासह महसूल व नोंदणी खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी चंद्रकांतदादा पाटील यांनी सदनिकाधारकांची बाजू मांडताना महाराष्ट्र नोंदणी नियम 1961 मधील कलम 44/1 (i) याला उच्च न्यायालयाने कोणत्याही प्रकारची स्थगिती दिली नसल्याचे महसूल मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अप्पर सचिव नितीन करीर यांना त्याबाबत चा प्रस्ताव तत्काळ सादर करण्याचे आदेश दिले असून त्यामुळे लवकरच दस्तनोंदणी सुरु होईल असा विश्वास दोन्ही मंत्र्यांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर सर्वसामान्यांना कायम स्वरूपी दिलासा मिळावा यासाठी येत्या अधिवेशनात कायद्यात बदल करण्याचे मंत्री महोदयांनी सूचित केले. तसेच 2001 च्या गुंठेवारी कायद्याला मुदतवाढ देताना त्यात अनेक जाचक अटी घालण्यात आल्या व दंडाची रक्कम ही अवाच्यासवा आकरण्यात येत असल्यामुळे मनपा किंवा पी एम आर डी ए हद्दीत गुंठेवारीची अत्यल्प प्रकरणे दाखल झाली आहेत.त्यामुळे यात ही सुधारणा करून सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न शासन करेल असे चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केले.

विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनांचा वापर नव संशोधनासाठी करावा….. डॉ.नितीन करमळकर

0

     पुणे- इंडियन कॉन्क्रीट इन्स्टिटय़ूट पुणे सेंटर  व तंत्र शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद नवी दिल्ली, जे कुमार इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट ली.  आणि   अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च पर्वती पुणे महाविद्यालय यांच्या संयुक्त  कॉन्क्रीटडे  निमित्त  कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन डॉ.नितीन करमळकर माजी कुलगुरू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,श्री युसुफ इनामदार चेअरमन इंडियन कॉन्क्रीट इन्स्टिटय़ूट पुणे सेंटर, श्री उमेश मगर, प्राचार्य डॉ. सुनिल ठाकरे यांचे शुभ हस्ते झाले. या प्रसंगी बोलताना डॉ.करमळकर यांनी काँक्रीटचे विविध प्रकार, क्युअरिंगच्या विविध पद्धती, काँक्रीटची गुणवत्ता तपासणे, काँक्रीट मिश्रण,प्रीकास्ट, क्रीट स्ट्रक्चर्सचे वॉटरप्रूफिंग, इंडस्ट्रियल फ्लोअरिंग, काँक्रीट टिकाऊपणा आणि डिझाइन चे प्रकार, नाविन्यपूर्ण बांधकाम पद्धती,  नवीन काँक्रीट साहित्य आणि काँक्रीटचा मोठ्या प्रमाणात वापर यासारख्या काही विषयांवर विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करून सिमेंट शिवाय ड्युरेबल साहित्य निर्मितीसाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करून देशाच्या प्रगतीस हातभार लावण्यासाठी आपल्या कल्पनांचा वापर नवसंशोधनासाठी करण्याचे आवाहन या प्रसंगी केले. महाविद्यालयाने या प्रसंगी विद्यार्थ्यांना आपल्या कल्पना सत्यात उतरविण्यासाठी हे एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी  प्रकल्प स्पर्धा, पेपर प्रेझेटेशन, पोस्टर प्रेझेटेशन ,ग्रीन कॉन्क्रीट,  क्यूब  कॉम्पीटीशन, आय स्टिक ब्रिज कॉम्पीटीशन , इनोव्हेटी आयडीया कॉम्पीटीशन अशा विविध स्पर्धांचे आयोजन  करण्यात आले.या स्पर्धांसाठी  एकूण ५००००० /- रक्कमेची रोख पारितोषिके  आहेत. या  विविध स्पर्धांसाठी महाराष्ट्रातून २०० हून अधिक तंत्रनिकेतन, अभियांत्रिकी व आर्किटेक्चर महाविद्यालयाच्या १०००पेक्षा ज्यास्त  विद्यार्थ्यांनी  उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.

               या कार्यक्रमासाठी डॉ. नितीन करमळकर, श्री, युसुफ इनामदार, सुचेता कलावार,  उमेश मगर,  रमेश कुलकर्णी,  दिपक मोडक, समीर बापट, प्रतिक मगर, शशिकांत किल्लेदार पाटील, प्राचार्य डॉ.सुनिल ठाकरे कार्यक्रमाचे समन्वयक डॉ.अभय शेलार सर्व विभाग प्रमुख प्राध्यापक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.स्नेहा साळवेकर व प्रा. नेहा देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन सुचेता कलावार सेक्रेटरी इंडियन कॉन्क्रीट इन्स्टिटय़ूट पुणे सेंटर यांनी केले. हा कार्यक्रम महाविद्यालयाने आयोजित केल्याबद्दल अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या सरचिटणीस सौ. प्रमिला गायकवाड यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

आमदार बच्चू कडूंना न्यायालयीन कोठडी

0

मुंबई-आमदार बच्चू कडू यांना गिरगाव कोर्टाकडून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात राजकीय आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. बच्चू यांनी जामिनासाठी गिरगाव कोर्टात धाव घेतली होती. मात्र, कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. तसेच त्यांना ताब्यात घेण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहे.

राजकीय आंदोलनातील एका प्रकरणामध्ये बच्चू कडू हे आरोपी होते. त्यांच्याविरोधात गिरगाव कोर्टाने अजामीन वारंट काढले होते. त्यानुसार बच्चू कडू हे गिरगाव कोर्टात हजर झाले होते. त्यावेळी बच्चू कडूंनी जामिनासाठी अर्ज देखील केला होता. मात्र, न्यायालयाने त्यांना जामीन अर्ज फेटाळला असून, त्यांना ताब्यात घेण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.

पोलिसांनी कडू यांना ताब्यात घेतले असून, त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाल्याची माहिती मिळत आहे. न्यायालयीन कोठडी ही 14 दिवसांची असते. त्यामुळे यादरम्यान बच्चू कडू पुन्हा जामिनासाठी अर्ज करतात का? हे पाहणे महत्वाचे आहे.

राज्यस्तरीय परिषदेत तृतीयपंथीयांचे शिक्षण व रोजगारावर चर्चा

0

तृतीयपंथीयांना समाजात सन्मान मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्नशील

पुणे दि.१४- ‘तृतीयपंथीयांचा लोकशाहीतील सहभाग’ या विषयावर आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय परिषदेच्या तिसऱ्या सत्रात प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहभागी होत ‘तृतीयपंथीयांचे शिक्षण व रोजगार’ या विषयावर चर्चा करण्यात आली. तृतीयपंथीयांना समाजात सन्मान मिळवून देण्यासाठी शासन आणि प्रशासनातर्फे शिक्षण, आरोग्य, घरकूल आणि रोजगारासाठी प्रयत्न करण्यात येत आहे असा सूर या चर्चेत उमटला.

चर्चेत सहभाग घेताना एमटीडीसीचे संचालक राजेश पाटील म्हणाले, पिंपरी चिंचवड महापालिकेने वंचित घटकांसाठी योजना राबविताना यावर्षापासून धोरणात अनुकूल बदल केले. तृतीयपंथीयांसाठी ३ हजार रुपये मासिक भत्ता सुरू केला. सुरक्षा रक्षक म्हणून २० तृतीयपंथीयांना प्रशिक्षण देऊन नेमण्यात आले. त्यामुळे त्यांची ओळख निर्माण होण्यास मदत झाली. या समूहाच्या कल्याणासाठी हा महत्वाचा निर्णय ठरला. तृतीयपंथीयांचे बचत गटांना उद्यानाच्या देखभालीचे काम, ग्रीन मार्शल पथकात नेमणूक, करवसुली अशी कामे प्रशिक्षण देऊन त्यांच्यावर सोपविण्यात आली आहेत. अशा उपक्रमांमुळे जनतेशी संवाद वाढून त्यांच्या मनात आत्मविश्वास तयार होईल.

समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे म्हणाले, समाज कल्याण विभागाने ट्रान्सजेंडर पोर्टल तयार करून १ हजार ३५० तृतीयपंथीयांची नोंदणी करण्यात आली. हे प्रमाण वाढविण्यासाठी २ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. स्वयंघोषणापत्राच्या आधारे ही नोंदणी करता येते. प्रधानमंत्री आवास योजना आणि समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून तृतीयपंथीयांना घरे देण्याचा प्रयत्न आहे. या समूहाच्या शिक्षण आणि रोजगारासाठी प्रशिक्षण व मार्गदर्शनावर भर देण्यात येत आहे. आरोग्य वाहिनी, विभागीय स्तरावर आधार आश्रम आणि बीज भांडवल योजनाही प्रस्तावीत करण्यात आली आहे. समुदायातील पात्रताधारक सदस्यांना स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण देण्याबाबतही विचार करण्यात येईल.

राष्ट्रीय उच्च शिक्षण अभियानाचे संचालक डॉ. निपूण विनायक म्हणाले, शिक्षणामुळे समाजात सन्मान मिळतो आणि परस्पर संवाद साधता येतो. शिक्षणाचा अधिकार तृतीयपंथींयासाठीदेखील तितकाच समान आहे. याबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील. शिक्षण सर्वांसाठी आहे ही भावना सर्वांमध्ये निर्माण होणे महत्वाचे आहे. राज्यातील महाविद्यालयांपर्यंत तृतीयपंथीयांबाबत माहिती देण्यासाठी स्वतंत्र प्रशिक्षणाची रचना करण्यात येईल.

कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ.अपूर्वा पालकर म्हणाल्या, पारंपरिक कौशल्याचा विचार न करता महत्वाकांक्षा बाळगून नव्या क्षेत्राचा विचार करणे गरजेचे आहे. परिषदेच्या माध्यमातून असे क्षेत्र सुचविल्यास त्या विषयांवर आधारीत अल्प कालावधीच्या पदविका अभ्यासक्रमाची रचना करण्यात येईल. शासन स्तरावर कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी निधीची उपलब्धता आहे. समूह उद्योजकतेकडे वळणेही गरजचे आहे, असे त्यांनी सांगितले. 

सामाजिक कार्यकर्त्या ॲड.आशिष शिगवण म्हणाले, समाजात आपल्या हक्कासाठी खूप मोठा कालावधी लागला. समाजात कायद्याविषयी जागरुकता निर्माण केल्यास विविध योजनांचा लाभ घेता येईल. समुदायातील सदस्यांना आर्थिक स्थैर्याचा दृष्टीकोन ठेवून कौशल्याचे प्रशिक्षण देण्यात यावे.

कार्यक्रमाला राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन सामाजिक कार्यकर्त्या शमिभा पाटील यांनी केले.

एमआयटीची १२वी ‘भारतीय छात्र संसद’दि.१५ ते १७ सप्टेंबर दरम्यान पुण्यात

0

पुणे , दि. १४ सप्टेंबर: भारतीय छात्र संसद फाऊंडेशन, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय १२व्या भारतीय छात्र संसदेचे दि.१५ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर २०२२ दरम्यान स्वामी विवेकानंद सभामंडप, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, कोथरूड, पुणे येथे आयोजन केले आहे. सन २०११ पासून दरवर्षी या छात्र संसदेचे आयोजन करण्यात येत असून, छात्र संसदेचे हे बारावे वर्ष आहे.
 महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय, तसेच, क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय आणि मानवाधिकार, लोकशाही, शांतता आणि सहिष्णुतासाठीचे युनेस्को अध्यासन यांच्या सहकार्याने ही छात्र संसद होत आहे. अनेक राष्ट्रीय संस्थांनीही या संसदेला पाठिंबा दिला आहे.
बाराव्या भारतीय छात्र संसदेचा उद्घाटन समारंभ गुरुवार, दि.१५ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता होणार आहे. या समारंभासाठी भारत सरकारच्या कायदा आणि न्याय राज्यमंत्री एस.पी. सिंह बघेल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
बिहारचे विरोधी पक्ष नेते व माजी सभापती विजय कुमार सिन्हा, इस्त्रोचे माजी अध्यक्ष डॉ. कैलासवादिवू सिवन,  हरित कार्यकर्ता आणि हिमालयन पर्यावरण अभ्यासक आणि संवर्धन संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. अनिल प्रकाश जोशी, जे.के. उद्योग समूहाचे सीईओ आणि आयएमसी चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीचे अध्यक्ष अनंत सिंघानिया व प्रसिद्ध शास्त्रीय गायिका श्रीमती कौशिकी चक्रवर्ती हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
शनिवार, दि.१७ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी ३.०० वाजता या संसदेचा समारोप होणार आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. लोकसभेच्या माजी अध्यक्ष डॉ. मिरा कुमार या अध्यक्षिय भाषण देणार आहेत. तसेच लोकसभेच्या माजी सभापती पद्मभूषण श्रीमती सुमित्रा महाजन सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
तसेच, जगविख्यात शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. आर.ए. माशेलकर, नालंदा विद्यापीठाचे कुलपती पद्मभूषण डॉ. विजय भटकर, इतिहासकार, लेखक, आर्थिक विश्लेषक डॉ. विक्रम संपत , एमआयटी डब्ल्यूपीयूचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड आणि एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, हे उपस्थित राहणार आहेत.
छात्र संसदेच्या उद्घाटन व समारोप समारंभा खेरीज या छात्र संसदेमध्ये ६ सत्रे आयोजित केली आहे.
पहिले सत्र गुरुवार दि. १५ सप्टेंबर रोजी दुपारी ३.०० वाजता सुरू होणार आहे. भाषण स्वातंत्र्य-लक्ष्मण रेषा कोठे? या विषयावर राष्ट्रीय कॉग्रेस कमिटीचे सहसचिव अ‍ॅड. कृष्णा अलवारू व सिबीआयचे माजी संचालक डी.आर. कार्तिकेयन हे आपले विचार मांडतील. उत्तर प्रदेश विधानसभेचे सभापती सतिश महाना हे अध्यक्षपदी असतील.
यावेळी ओडिसाचे गृहराज्यमंत्री तुषार कांती बेहरा, हिमाचल प्रदेशचे आमदार श्रीमती रेना कश्यप यांना आदर्श युवा विधायक पुरस्काराने तसेच, आध्यात्मिक गुरू पूज्य श्री. इंद्रेश उपाध्याय यांना युवा अध्यात्मिक गुरू पुरस्काराने गौरविण्यात येईल.
भारताचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचे आर्थिक दृष्या भारत जगाचे नेतृत्व करेल. याविषयावर विशेष भाषण होईल.
दुसरे सत्र शुक्रवार दि.१६ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वा.सुरू होणार आहे. घराणेशाही- प्रत्येक राजकीय पक्षाचे कटू सत्य ?  या विषयावर राज्यसभेचे खासदार राघव चड्डा, भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते श्रीमती भारतीय घोष आणि सुप्रसिद्ध पत्रकार रशिद किडवाई हे विचार मांडतील. लोकसभेचे माजी अध्यक्ष डॉ. मिरा कुमार या अध्यक्षस्थानी असतील. तसेच लोकसभेचे माजी अध्यक्ष शिवराज पाटील यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
राजस्थान विधानसभेचे सभापती डॉ. सी.पी.जोशी यांना आदर्श विधानसभा सभापती पुरस्काराने गौरविण्यात येईल.
तिसरे सत्र शुक्रवार दि.१६ सप्टेंबर रोजी सकाळी ११.४५ वा. सुरू होणार आहे. लोकशाही आणि कॉर्पोरेटशाही- सत्ता कोणाकडेे? या विषयावर राज्यसभेचे खासदार संजय सिंग, सोशल आणि डिजिटल मिडियाच्या प्रमुख सुप्रिया श्रीनाथे, प्रसिद्ध पत्रकार, लेखक परंजॉय गुहा ठाकुर्ता, राष्ट्रीय संस्कृती विद्यापीठाचे कुलपती पद्मभूषण एन.गोपाला स्वामी हे विचार मांडतील. हरियाणा विधानसभेचे सभापती ज्ञानचॉद गुप्ता हे अध्यक्षस्थानी असतील. तसेच उत्तरप्रदेशचे वैद्यकीय शिक्षण मंत्री सुरेश कुमार खन्ना हे उद्घाटनपर भाषण करतील.
यावेळी मध्यप्रदेश आमदार डॉ. हिरालाला अलावा, पॉडिचेरीचे आमदार रायचंद जोहन कुमार आणि उत्तरप्रदेशचे आमदार डॉ. रागिनी सोनकर यांना आदर्श युवा विधायक पुरस्काराने गौरविण्यात येईल.
त्याच प्रमाणे गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड येथील कोटी गावाच्या सरपंच कु. भाग्यश्री लेकामी, पंजाब मधील जालंधर येथील बोलनिया गावाचे सरपंच कुलविंदर भागा आणि  जम्मू कश्मिर येथील माणाकोट्टेचे सरपंच समरिन खान यांना  उच्च शिक्षित आदर्श युवा सरपंच सन्मानाने गौरविण्यात येणार आहे.
चौथे सत्र शुक्रवार दि.१६ सप्टेंबर रोजी दुपारी ३.०० वा. सुरू होणार आहे. कमी भारतीय अधिक पाश्चत्याः भारतीय चित्रपटाचा बदलते स्वरूप या विषयावर लोकसभेचे खासदार अनुभव मोहंती, अ‍ॅड गुरू व डायरेक्टर प्रल्हाद कक्कड आणि सुप्रद्धि फिल्म दिग्दर्शक रवि रॉय हे आपले विचार मांडतील. या सत्राचे अध्यक्ष  झारखंड विधानसभेचे माजी सभापती प्रा. दिनेश ओरन हे असतील.
राजस्थानचे आमदार कु. दिव्या महिपाल मादेरना आणि मध्यप्रदेशेचे आमदार प्रविण पाठक यांना आदर्श युवा विधायक पुरस्कारानेे गोरविण्यात येईल.
तसेच पंजाब येथील माणकखाना गावाचे सरपंच शेषानदीप कौर सिद्दू, तेलंगणाच्या मदनपुरम गावाच्या सरपंच अखिला यादव आणि हरागावचे सरपंच पल्लवी ठाकूर यांना उच्च शिक्षित आदर्श युवा सरपंच सन्मानाने गौरविण्यात येणार आहे.
पाचवे सत्र शनिवार दि. १७ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वा. सुरू होणार आहे.  भारतीय माध्यमांवर गोगाट्याचे की कायद्याचे राज्य? या विषयावर पंजाबचे शिक्षण मंत्री अ‍ॅड. हरज्योत सिंग बायन्स, खासदार मनिष तिवारी, आयर्न लेडी युरोम शर्मिला, लँडटॉक आणि इंडिया टुडे हिंदीचे संस्थापक आणि प्रसिद्ध पत्रकार आशितोष, को चे मुख्य कार्यकारी अधिकारी व सहसंस्थापक अप्रामिया राधाकृष्ण आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय गायक व सामजिक कार्यकर्त्या हेमा सरदेसाई हे आपले विचार मांडतील. अध्यक्षस्थानी बिहार विधानसभेचे अध्यक्ष देवेशचंद्र ठाकुर हे असतील.
राजस्थानचे आमदार राजकुमार रोत यांना आदर्श युवा विधायक पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
सहावे सत्र शनिवार दि. १७ सप्टेंबर रोजी सकाळी ११.४५ वा. सुरू होणार आहे.  समान नागरी संहितेची वेळ आली आहे का ? या विषयावर गोव्याचे पर्यावरण कायदा व न्याय मंत्री निलेश काबरल, सुप्रिम कोर्टाचे वरिष्ठ वकिल अ‍ॅड. मनिलक्ष्मी पवानी आणि द जिनियसचे अध्यक्ष प्रद्यूत भिकाराम माणकिया डेब ब्रह्मा हे विचार व्यक्त करतील. अध्यक्षस्थानी उत्तराखंड विधानसभेचे सभापती श्रीमती रीतू खंडारू भूषण हे असतील.
उत्तर प्रदेशचे आमदार अमितसिंग चव्हाण यांना आदर्श युवा विधायक पुरस्कार  आणि साध्वी डॉ. विश्वेश्वरया देवी यांना युवा अध्यात्मिक गुरू पुरस्काराने गौरविण्यात येईल.

भारतीय छात्र संसदेविषयी :
    तरुण पिढीच्या मानसिकतेत क्रांतीकारक बदल घडवून आणणे, राष्ट्र व समाज निर्मितीच्या कार्यासाठी सार्वजनिक कार्यात सहभागी होण्यास प्रेरणा देणे, या हेतूने २०११ मध्ये भारतीय छात्र संसदेचा प्रारंभ झाला. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष आणि भारतीय छात्र संसदेचे संस्थापक प्रा. राहुल विश्वनाथ कराड हे या छात्र संसदेचे संकल्पक व समन्वयक आहेत. तसेच एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड हे या छात्र संसदेचे मार्गदर्शक आहेत. छात्र संसद हा अ-राजकीय उपक्रम असून, त्याचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही.छात्र संसद हा भविष्यातील राजकीय नेते घडविणारा देशातील एकमेव व विशाल प्रशिक्षण वर्ग आहे. या संसदेच्या माध्यमातून राजकारण, राजकीय नेते, लोकशाही याकडे बघण्याचा युवकांचा दृष्टिकोन बदलत आहे. या नवव्या छात्र संसदेत देशभरातील वेगवेगळ्या महाविद्यालयांतून १० हजारांहून अधिक उत्साही विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

भारतीय छात्र संसदेची प्रमुख वैशिष्टये :

-२९ राज्यांतील ४५० विद्यापीठांतील ३० हजार महाविद्यालयातून राजकीय व सामाजिक क्षेत्रात क्रियाशील विद्यार्थ्यांचा थेट सहभाग. महाविद्यालयांच्या पातळीवर विद्यार्थ्यांची चाचणी होऊन त्यापैकी १० ते १२ हजार विद्यार्थ्यांना या छात्र संसदेत प्रत्यक्ष सहभागी करुन घेतले जाते.
-२०० विद्यापीठातील ९० हजार विद्यार्थ्यांचा वेबकास्टिंगद्वारे सहभाग.
– भारतातील ६ राज्यातील विधानसभांच्या सभापतींचा सहभाग.
– भारतातील ६ राज्यातील संसदीय कार्यमंत्र्यांचा सहभाग.
– भारतातील ६ विविध विद्यापीठातील कुलगुरूंचा सहभाग
– निरनिराळ्या राज्यातील आणि विविध पक्षातील तरुण आमदारांचा सत्कार.
– आदर्श मुख्यमंत्री पुरस्कार व आदर्श युवा विधायक पुरस्कार देण्यात येणार आहे.
– आदर्श उच्च शिक्षित युवा सरपंच सन्मान व आदर्श युवा आध्यात्मिक गुरू सन्मान सुध्दा देण्यात येणार आहेत.
    अशी माहिती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, कुलगुरू डॉ. रवी. चिटणीस, प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, प्र कुलगुरू डॉ. तपन पांडे, कुलसचिव डॉ. प्रशांत दवे, डॉ. प्रसाद खांडेकर, मिटसॉगचे संचालक डॉ. के. गिरीसन व प्रा. सुधाकर परिमल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

200 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ घेऊन जाणारी पाकिस्तानी बोट पकडली -भारतीय तटरक्षक दल आणि गुजरातच्या एटीएसची पाचवी कारवाई

0

नवी दिल्ली, 14 सप्टेंबर 2022

भारतीय तटरक्षक दल (आयसीजी) आणि गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) संयुक्तपणे कारवाई करत सुमारे 200 कोटी रुपये किमतीचे सुमारे 40 किलोग्रॅम अंमली पदार्थ नेणारी,  सहा जण असलेली  एक पाकिस्तानी बोट  भारतीय जलहद्दीतून  ताब्यात घेतली. 13-14 सप्टेंबर 2022 च्या मध्यरात्री भारतीय तटरक्षक दलाने  गुजरात एटीएसकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, आंतरराष्ट्रीय सागरी सीमा रेषा (आयएमबीएल) क्षेत्राच्या जवळच्या भागात गस्त घालण्यासाठी दोन वेगवान आंतररोधी  श्रेणीतील  – C-408 आणि C-454 – जहाजांना तैनात केले होते. या जहाजांना आयएमबीएलच्या आत पाच नॉटिकल मैल आणि जखाऊपासून 40 नॉटिकल मैल भारतीय जलहद्दीत एक पाकिस्तानी बोट संशयास्पदरीत्या फिरताना दिसली. खवळलेल्या समुद्राचा सामना करत तटरक्षक दलाच्या  जहाजांनी बोट अडवली आणि तिला ताब्यात घेतले.

पुढील संयुक्त तपासासाठी बोट जखाऊ येथे आणण्यात येत आहे. गेल्या एका वर्षात भारतीय तटरक्षक दल  आणि एटीएस, गुजरात यांनी केलेली ही पाचवी संयुक्त कारवाई आहे. किनाऱ्यावरचे सुरक्षा जाळे मजबूत असून त्याच्याशी संबधित यंत्रणांमध्ये असलेल्या प्रभावी समन्वयाचे महत्त्व या कारवाईमुळे अधोरेखित होते.

ATS Gujarat along with Indian Coast Guard jointly apprehended a Pakistani Boat with 6 crew & seized 40 kg of heroin worth Rs 200 Cr. Two residents of Delhi who came to take the delivery have also been arrested. Eight people incl 6 Pak nationals arrested: Gujarat DGP Ashish Bhatia

ईडीकडून मुंबईतल्या झवेरी बाजारात छापे; 92 किलो सोन्यासह तब्बल 330 किलो चांदी जप्त

0

मुंबई-अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मुंबईतील झवेरी बाजारातचार छापे टाकले. यात सराफा व्यापाऱ्याकडून 92 किलो सोने आणि 330 किलो चांदी जप्त केली. ही कारवाई आज करण्यात आली, अशी माहिती इडीकडून देण्यात आली आहे.

मेसर्स रक्षा बुलियन आणि मेसर्स क्लासिक मार्बल्सशी संबंधित ही छापेमारी होती. यावेळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी सर्च ऑपरेशन राबवले्. मेसर्स पारेख अल्युमिनेक्स लिमिटेडच्या प्रकरणातील मनी लाँड्रिंग चौकशीचा या कारवाईचा संबंध आहे. यापूर्वी अंमलबजावणी संचालनालयाने मनी लाँड्रिंगप्रकरणी गुन्हा नोंदवला होता.

8 मार्च 2018 रोजी मेसर्स पारेख अल्युमिनेक्स लिमिटेड कंपनीने बँकांना फसवून 2296.58 कोटी रुपयांचे कर्ज घेतले. त्यानंतर विविध कंपन्यांच्या माध्यमातून लेअरिंग करून पैसे पाठवले होते. असुरक्षित कर्ज आणि गुंतवणूक प्रदान करण्याच्या, कर्ज घेण्यासंदर्भात कोणतेही करार झालेले नाहीत. यापूर्वी ईडीने 46.97 कोटी आणि 158.26 कोटी रुपये संलग्न केले आहेत.

या आढळल्या त्रुटी

झडतीदरम्यान परिसरात खासगी लॉकरच्या चाव्या सापडल्या. मेसर्स रक्षा बुलियनच्या खाजगी लॉकर्सची झडती आज घेतली गेली. ईडीच्या छापेमारीत योग्य नियमांचे पालन न करता व्यवहार केले जात होते. केवायसीचे पालन केले गेले नाही, आवारात सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आला नव्हता. आत आणि बाहेर कोणतेही रजिस्टर नव्हते असे दिसून आले.

एवढा ऐवज जप्त

लॉकर परिसराची झडती घेतली असता 761 लॉकर्स असल्याचे समोर आले आहेत. मेसर्स रक्षा बुलियन. लॉकरमध्ये 91.5 किलो सोने आणि 152 किलो चांदी सापडली. 2 लॉकरही ताब्यात घेण्यात आले असून यात अतिरिक्त 188 किलो चांदी जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या वस्तूंची एकूण किंमत 47.76 कोटी आहे. ईडीकडून पुढील तपास सुरू आहे.