Home Blog Page 1580

महापालिकेत दहशतीखाली फटाका स्टॉल भाड्याने देण्यासाठी झाला लिलाव ?

पुणे – पुणे महापालिकेतर्फे महापालिकेची जागा फटाका स्टॉलसाठी भाड्याने देण्यासाठी लिलाव करण्यात आला. मात्र,या लिलावात काही जणांनी दादागिरी करून काहींना बोली लावू न देण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला.आणि दहशतीच्या खाली प्रशासनाने हा लिलाव केल्याचा आरोप होऊ लागला आहे. त्या स्कार्न्ही तसेच घडले आहे,कारण बोली लावताना व्यावसायिकांची महापालिकेत व्यावसायिकांमध्ये जोरदार वादावादी झाली.यापूर्वी लोकप्रतिनिधी असताना काही टेंडर साठी असे प्रकार झाल्याचे वेळोवेळी दिसून आलेले आहे पण ज्ञानेश्वर मोळक यांची अधिकार्यांना चांगली साथ होती आणि त्यांच्या सहाय्याने सर्व प्रशासन एकत्र येऊन अशा बाबींचा प्रखर सामना करत.परंतु आता कंत्राटावर घेतलेल्या अवघ्या ८/९ हजार रुपये पगारावरील तात्पुरत्या सुरक्षा रक्षकांच्या जीवावर प्रशासकीय काळात महापालिकेतील कर्मचारी आणि अधिकारी यांना थेट दादागिरी सहन करावी लागत असल्याने या वातावरणातच लीलाव झाल्याचे बोलले जाते आहे.दरम्यान मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त राजेंद्र मुठे म्हणाले, ‘३५ स्टॉलसाठी ६६ जणांनी अर्ज केले होते. या लिलावातून महापालिकेला १४ लाख ६० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यामध्ये एका स्टॉलसाठी सर्वाधिक १ लाख १० हजार रुपयांची बोली लागली आहे. दरम्यान व्यावसायिकांमधील वाद सभागृहाच्या बाहेर झाला आहे,आतमध्ये झालेला नाही.

दिवाळीच्या निमित्ताने फटाके विक्रीसाठी पुणे महापालिकेतर्फे व्यावसायिकांनी दुकान लावण्यासाठी जागा भाड्याने दिली जाते. गेल्या काही वर्षापासून शनिवार पेठेतील वर्तक बागेच्या शेजारी नदी काठच्या रस्त्यावर स्टॉल लावले जातात.यंदा ३५ स्टॉल भाड्याने देण्यासाठी मालमत्ता व्यवस्थापन विभागाने अर्ज मागविले होते. त्यासाठी ६६ जणांनी जागेसाठी अर्ज केले होते.आज महापालिकेतील वडके हॉलमध्ये लिलाव आयोजित करण्यात आला होता. प्रत्येक स्टॉलसाठी २३ हजार ५९५ इतके मुळ भाडे निश्‍चीत केले होते.लिलाव लावताना त्यामध्ये जो जास्त पैसे देईल त्यास स्टॉल मिळणार होता. त्यामुळे व्यावसायिकांकडून बोली लावण्यास सुरवात झाल्यानंतर काही मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी दादागिरी करत बोली लावण्यापासून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला.यावरून सभागृहाच्या बाहेर व्यावसायिकांमध्ये जोरदार वादावादी झाली. आरोग्य विभागात अधिकार,महिला कर्मचारी काम करत असताना अर्वाच्य शिवीगाळ सुरू होती.त्यामुळे येथील वातावरण तापले होते.अखेर काही जणांनी हस्तक्षेप करून हा वाद संपविण्याचा प्रयत्न केला.

आरोग्य व पर्यावरण जनजागृतीसाठी रविवारी सायकल रॅलीचे आयोजन

पुणे : आरोग्य व पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृतीसाठी रविवारी (ता. ९) सकाळी ७ ते ९ या वेळेत सायकल रॅलीचे आयोजन केले आहे. लायन्स क्लब ऑफ इको फ्रेंड्सच्या पुढाकाराने आयोजित ऑक्टोबर सेवा सप्ताहांतर्गत ही सायकल रॅली काढण्यात येत आहे. सारसबाग, टिळक रोड, डेक्कन, फर्ग्युसन रस्ता, संभाजी उद्यान असा या रॅलीचा मार्ग आहे, अशी माहिती समन्वयक अनिल मंद्रुपकर यांनी दिली. या सप्ताहात ‘लायन्स’च्या ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी, पुना वेस्ट, फ्युचर, विधिज्ञ, मुकुंदनगर, शिवाजीनगर, सुप्रिम, पुणे रिव्हर साईड, मैत्री या क्लबने सहभाग घेतला आहे, असेही मंद्रुपकर यांनी सांगितले.
कार्बन उत्सर्जन रोखणे, निसर्गाचे संवर्धन, प्रदूषण कमी करणे, स्वच्छ आणि निरोगी जीवन याबाबत जागृती केली जाणार आहे. ‘जॉईन ग्रीन रिव्होल्यूशन स्टॉप पोल्युशन’ हा नारा देत ही सायकल रॅली शहराच्या मध्यवर्ती भागात फिरणार आहे. अधिकाधिक पुणेकरांनी या रॅलीत सहभागी व्हावे. तसेच अधिक माहितीसाठी अनिल मंद्रुपकर (९८८११२८३०३), मयूर बागुल (९०९६२१०६६९) किंवा के. के. गुजराती (९८२३१४९२२१) यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

मंत्रालयात सांबर, चितळ, भेकर, साळींदरचा मुक्त संचार !

मुंबई दि.०६ : शिंदे सरकार सत्तेत आल्यापासून मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी लोकांची प्रचंड गर्दी असते. मात्र, या गर्दीत गुरुवारपासून सांबर, चितळ, भेकर, साळींदर असे हिंसक वन्यजीव प्राणी मुक्त संचार करताना दिसून येत आहेत. वन्यजीव सप्ताहनिमित्त शासनाने हे प्राणी मंत्रालय त्रिमूर्ती प्रांगणात आणले आहेत. विशेष म्हणजे भर गर्दीत या प्राण्यांकडून कोणालाही काहीही त्रास नसून त्यांच्या समवेत स्लेफी फोटो सुद्धा काढता येत आहे. कारण हे सर्व प्राणी जरी जिवंत भासत असले तरी त्याच्या या प्रतिकृती आहेत.

मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगण हे सर्वानाच भुरळ घालत असते. येथील त्रिमूर्ती तसेच वेगवेगळ्या विभागाकडून भरवले जाणारे संबंधित विभागाचे स्टॉल हे मंत्रालयात येणाऱ्या
सर्वानाच आकर्षित करीत असतात. सुधीर मुनगंटीवार हे वनमंत्री असताना त्यांनी याच त्रिमूर्ती प्रांगणात ताडोबा मधील वाघांची प्रतिकृती असलेले वाघ आणले होते. आजही त्यातील एक वाघ येथे आहे. तो नेहमीच येथे येणाऱ्या लोकांना भुरळ घालत असतो.

आता याच वाघासोबत गुरुवारपासून सांबर, चितळ, भेकर, साळींदर, उदमांजर, पिसोरी असे हिंसक वन्यजीव प्राणी मुक्त संचार करताना दिसून येत आहेत. भर गर्दीत एक भले मोठे सांबर आणि चितळ पाहुन अनेकांना आनंद होत आहे. त्यामुळे आपली रखडलेली कामे जरी पूर्ण झाली नाहीत किंवा मंत्र्यांची भेट जरी झाली नाही तरी या वन्यजीव प्राण्यांना पाहून त्याचा काहीसा संताप कमी होत आहे.
त्याच्या सोबत सेल्फी फोटो घेण्यात अनेक जण दिसून येत आहे. भर गर्दीत हे उठून दिसणारे प्राणी जरी हिंसक असले तरी ते त्या प्राणांची प्रतिकृती आहेत. त्यामुळे भर गर्दीत या वन प्राण्यांचा कोणाला काही त्रास नसल्याचे दिसून येत आहे.

मला मारण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी छोटा राजन आणि छोटा शकीलला सुपारी दिली होती -केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा आरोप

मुंबई- यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ठाकरेंच्या एकेरी भाषेत उल्लेख करुन भाजपवर केलेल्या टीकेचा वचपा काढला आहे. पत्रकार परिषदेमध्ये राणे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. “म्हणले उद्धव ठाकरे यांनीच सदा सरवणकर यांना मनोहर जोशी यांच्या घरावर हल्ला करायला सांगितलं होतं” आणि मला मारण्यासाठी देखील उद्धव ठाकरे यांनी छोटा राजन आणि छोटा शकील यांना सुपारी दिली होती, परंतू मी त्यांना पुरून उरेलो.मी आजही जिवंत आहे. मला कोणीही मारू शकलं नाही, असा घणाघात नारायण राणे यांनी केला आहे. 2019 च्या निवडणूकीत उद्धव ठाकरे यांनी मोदी यांचे नाव आणि फोटो लावून निवडणूक लढली. ती जिंकली. आणि आता मोदींवर टीका सुरु केली आहे असं देखील राणे म्हणाले.

“मला मारण्यासाठी ठाकरेंनी छोटा राजन, शकीलला माझी सुपारी दिली होती. पण नारायण राणे संपला नाही, संपणारही नाही. उद्धव ठाकरे एक नंबरचा खोटा आणि लबाड माणूस आहे. त्यांना फक्त त्यांचं कुटुंब प्रिय आहे. शिवसैनिकासाठी कधी काही केल्याचं माझ्या ऐकिवात नाही. काम करणं येत नाही, फक्त दुसऱ्यावर टीका करणं त्यांना चांगलं जमतं. अडीच वर्षात अडीच तास मंत्रालयात गेलेला माणूस काय टीका करतो. कालच्या दसरा मेळाव्यात शिवसैनिकांना विचारधन देण्याऐवजी त्यांनी भाजप-संघाला शिव्या घातल्या. मी त्यांना सांगू इच्छितो आता जर तोंड बंद केलं नाही तर कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली तर त्याची जबाबदारी सर्वस्वी त्यांची असेल”, असं राणे संतापून म्हणाले.

“ज्यांनी शिवसेना वाढीसाठी प्रयत्न केले, त्यांना ठाकरे आत्ता गद्दार म्हणतात. पण शिवसेना वाढीसाठी उद्धव ठाकरे यांचं योगदान काय? कधी मातोश्री सोडून गेले काय ते? कधी विरोधकांच्या कानफाडीत तरी मारली काय? १९९२ च्या दंगलीत अमुक तमुक केलं असा डंका पिटतो, अरे बाबा पण तू काय केलं… नुसता बढाया मारतो…,”असे एकेरी हल्ले राणेंनी चढवले.

अखेरीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट पक्षप्रमुख पदावरदेखील केलाच दावा

0

शिवसेना पक्षात झालेल्या बंडानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनाच नव्हे तर पक्षप्रमुख पदावर देखील दावेदारी सांगितली आहे. या संदर्भात शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाला प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे. या प्रतिज्ञापत्रात शिवसेना पक्षअध्यक्ष पदाचा उल्लेख करण्यात आला आहे.

निवडणूक आयोगाने शिंदे आणि ठाकरे दोन्ही गटाला आपापले शपथपत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शिंदे गटाच्या वतीने 40 आमदार आणि 12 खासदारांसह लाखो प्राथमिक सदस्यांचा उल्लेख करत निवडणूक आयोगाला प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. या पत्रामध्ये शिवसेनेच्या पक्षअध्यक्ष पदावर शिंदे यांच्या वतीने दावा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पक्षाबरोबरच पक्षअध्यक्ष पदही शिंदे ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात दिसून येत आहे. आता निवडणूक आयोग शिवसेना कोणाची याचा निर्णय लवकर घेण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.

आगामी काळात होणाऱ्या पोटनिवडणुकीत पक्ष नेमका कोणता यावर निर्णय होणे अपेक्षित आहे. विधिमंडळात असलेल्या एकूण सदस्यांपैकी दोन तृतीयांश सदस्य आपल्या सोबत असल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे. त्यामुळे निवडणूक चिन्ह आपल्यालाच मिळावे, असा अर्ज शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे केला होता. निवडणूक आयोगाच्या वतीने या संदर्भात दोन्ही पक्षाला आप-आपले प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर सुनावणीला सुरुवात
शिंदे गटाच्या बंडानंतर शिवसेनेच्या वतीने निलंबित करण्यात आलेल्या आमदार आणि पक्षासाठी निवडणूक आयोगाकडे केलेला दाव्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात आली होती. यावर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापिठासमोर झालेल्या सुनावणीनंतर घटनापीठाने निवडणूक आयोगाला या संदर्भात सुनावणी आणि निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आता निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे.

ठाकरे गटाकडून दोनदा मागितली गेली वेळ

निवडणूक आयोग सुनावणी सुरू झाल्यानंतर शपथपत्र दाखल करण्यासाठी ठाकरे गटाकडून आतापर्यंत दोन वेळा वेळ वाढवून मागण्यात आली आहे. त्याचप्रमाणे शिंदे गटाने सादर केलेल्या कागदपत्रांची प्रतिलिपी देखील ठाकरे गटाने मागितली होती. त्यानुसार निवडणूक आयोगाने ही प्रतिलिपी ठाकरे गटाला देण्यात देण्याचे निर्देश दिले होते.

सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी वह्यांची पाने जोडलेली पुस्तके आवश्यक-दीपक केसरकर

पुणे दि.७-सर्वसामान्य शेतकरी किंवा कष्टकरी माणसाला मुलांसाठी वही घेणेही कठीण असते. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी पुस्तकासोबत वह्यांची पाने जोडण्याबाबत तज्ज्ञांनी विचार करावा आणि त्यादृष्टीने सूचना कराव्यात, असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले. महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्राला दिशा देणारा उपक्रम म्हणून शिक्षकांनी या उपक्रमकडे पाहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची पाने टाकण्याबाबत बालभारती येथे विषय तज्ज्ञ आणि अधिकाऱ्यांसोबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील, माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी, शिक्षण संचालक महेश पालकर आदी उपस्थित होते.

श्री.केसरकर म्हणाले, शिक्षकांनी पुस्तकातील विषयावर दिलेली टिपणे विद्यार्थ्याने या पानांवर लिहावे अशी अपेक्षा आहे. त्यावरून शिक्षकांनी वर्गात घेतलेला अभ्यासही लक्षात येईल. गरीबतल्या गरीब मुलालाही वह्यांची पाने असलेली पुस्तके उपयुक्त ठरली पाहिजेत. प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम राबविण्यात येईल आणि पालक-शिक्षकांकडून येणाऱ्या सूचनांच्या आधारे अंतिम निर्णय घेण्यात येईल. विद्यार्थी किती पानांचा लिखाणासाठी उपयोग करतात याचाही अभ्यास करण्यात यावा. यासाठी तज्ज्ञ शिक्षकांची एक समिती नेमण्यात येणार असून समिती सदस्य या उपक्रमाबाबत शिक्षकांना माहिती देण्यासोबत अभ्यासही करेल.

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि त्याचे व्यक्तिमत्व घडविणे हे अंतिम उद्दिष्ट आहे. शैक्षणिक क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविताना अनुभवाने त्यात बदलही करता येईल. शालेय शिक्षणाची गुणवत्ता उत्तम राहावी यासाठी आवश्यक उपक्रम राबविताना मुलांवर अभ्यासाचा बोजा पडणार नाही याचीही दक्षता घ्यावी.

शालेय स्तरावर तीन महिन्यांनी परीक्षा घेण्याचा विचार व्हावा. तिमाहीत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांवर अधिक लक्ष देऊन त्यांना सहामाही परीक्षेत उत्तीर्ण होण्याच्यादृष्टीने तयारी करून घेता येईल. सहावीपासून राज्यात एकाचवेळी कलचाचणी घेण्यासाठी सॉफ्टवेअर तयार करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना आवडीनुसार व्यावसायिक अभ्यासक्रम शिकविता येईल. मुलांना पोषण आहारातून अधिक पौष्टिक तत्व मिळावे यदृष्टीनेही अनुकूल बदल करावे लागतील, असेही मंत्री केसरकर यांनी सांगितले.

वी’ने महाराष्ट्र व गोव्यातील ग्राहकांसाठी ४जी नेटवर्क कव्हरेज वाढवले, 

·         ६४३० साईट्सवर एल९०० आणि १६४५० साईट्सवर एल१८०० तैनात करण्यात आल्यामुळेवी ४जी नेटवर्कवर इमारतींच्या आत देखील मिळणार अधिक वेगवान ४जी वेग आणि अधिक सुस्पष्ट आवाज. 

·         एफडीडी आणि टीडीडी साईट्सच्या सक्षम एकत्रीकरणामुळे वीला नेटवर्क स्पीड आणि क्षमता अनेक पटींनी वाढवता येत आहे.

·         दोन राज्यांमध्ये सर्वाधिक स्पेक्ट्रम होल्डिंग हा सर्वोत्तम नेटवर्क अनुभवाचा कणा बनला आहे.

·         महाराष्ट्र आणि गोव्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये जवळपास ७.९१ कोटी मोबाईल फोन युजर्स वी ४जी नेटवर्कचा लाभ घेत आहेत.

·         दोन राज्यांमध्ये वोल्ट क्षमता दुपटीने वाढवण्यात आल्यामुळे ग्राहकांना मिळत आहे व्हॉइस कॉलिंगचा सुधारित अनुभव.

·         टीआरएआय मायकॉल डेटानुसार भारतातील टेलिकॉम कंपन्यांमध्ये वीला बेस्ट व्हॉइस कॉल एक्स्पीरियंस‘ चे रेटिंग सातत्याने मिळत आहे.

आघाडीचा टेलिकॉम ब्रँड वी ने महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये आपल्या ४जी अनुभवांमध्ये सुधारणा करून आपल्या ग्राहकांना नेटवर्कचा अधिक चांगला अनुभव व अधिक वेगवान स्पीड्स मिळवण्यासाठी सक्षम केले आहे.  आजवर वी ने ६४३० पेक्षा जास्त साईट्सवर अतिशय सक्षम ९०० एमएचझेड स्पेक्ट्रम व १६४५० पेक्षा जास्त साईट्सवर १८०० एमएचझेड बँड तैनात केला आहे ज्यामुळे या दोन राज्यांमधील ७८% लोकांना इमारतीघरांच्या आत कामअभ्याससोशलाईज करतानामनोरंजनाचा आनंद घेत असतानाईकॉमर्स आणि इतर डिजिटल सेवांचा वापर करताना अधिक मजबूत नेटवर्कचा अनुभव घेता येत आहे. याखेरीज पुणेनागपूरनाशिकऔरंगाबादकोल्हापूरसोलापूरगोवा आणि इतर महत्त्वाच्या शहरांमधील व्यापारी व निवासी भागांमधील वी ग्राहक इमारतीघरांच्या आत असताना देखील अधिक सुधारित आवाज व डेटाचा अनुभव घेऊ शकत आहेत.

१९०० पेक्षा जास्त टीडीडी साईट्स वाढवल्या गेल्यामुळे मार्च २०१९ पासून ऑगस्ट २०२२ पर्यंत डेटा क्षमता २.८ पटींनी वाढली आहे. महाराष्ट्र आणि गोव्यातील ग्राहकांना सर्वोत्तम सेवा अनुभव प्रदान करण्यासाठी वचनबद्ध असलेल्या वीने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत:

वी – विश्वसनीय नेटवर्क

·         ९०० एमएचझेड१८०० एमएचझेड२१०० एमएचझेड२३०० एमएचझेड२५०० एमएचझेड या सर्व बँड्सवर १२२.८ एमएचझेड स्पेक्ट्रम असल्यामुळे महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये ही सर्वात मोठी टेलिकॉम सेवा प्रदान करणारी कंपनी बनली आहे. वी कडे या सर्कलमधील सर्वात मोठे ३६.७% ४जी स्पेक्ट्रम होल्डिंग आहे.

·         अधिक चांगला सुस्पष्ट आवाज आणि इमारतींच्या आत असताना देखील अधिक चांगला अनुभव यासाठी वी ने दोन राज्यांमध्ये ४जीवर ९०० एमएचझेड स्पेक्ट्रम सर्वात जास्त तैनात केले आहे. याशिवाय या राज्यामध्ये ४जी क्षमता बँड २५०० एमएचझेड असलेले हे एकमेव टेलिकॉम नेटवर्क आहे.

·         या दोन्ही राज्यांमध्ये वोल्ट क्षमता दुपटीने वाढवण्यात आली आहे. या नेटवर्क उपक्रमामुळे अधिक जास्त वी ग्राहकांना वोल्ट वापरून कॉल्स करता येणार आणि सुपरफास्ट कॉल कनेक्टसह एचडी क्वालिटी क्रिस्टल क्लियर अर्थात अतिशय सुस्पष्ट आवाजाचा आनंद घेता येणार.

·         वी सर्व ३जी ग्राहकांना ४जीमध्ये अपग्रेड करत आहे आणि दोन राज्यांमधील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये स्पेक्ट्रम रीफ्रेम करून ४जी क्षमतेत सुधारणा करत आहे.

वोडाफोन आयडियाचे महाराष्ट्र व गोव्याचे क्लस्टर बिझनेस हेड श्री. रोहित टंडन यांनी सांगितलेवी नेटवर्कवर सर्वोत्कृष्ट आणि अपग्रेडेड ४जी अनुभवाचा आनंद घेण्यासाठी मी सर्व प्रीपेड व पोस्टपेड मोबाईल फोन युजर्सना आमंत्रित करू इच्छितो. सर्कलमध्ये आमच्या ४जी कव्हरेजचा विस्तार करण्यासाठी आणि सर्व शहरांमध्ये इनडोर नेटवर्क कव्हरेज मजबूत करण्यासाठी आम्ही गेल्या वर्षभरात अनेक वेगवेगळे उपक्रम घेतले आहेत. कुटुंबातील प्रत्येक सदस्याला वीच्या ४जी नेटवर्कचा अधिकाधिक लाभ घेता यावा यासाठी वी ग्राहक आपल्या सोयीचे प्लॅन्स निवडू शकतात. ५जी साठी सुसज्ज राहण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरूच आहेतसर्वोत्तम तंत्रज्ञानउत्पादने आणि सेवा उपलब्ध करवून देऊन जीवनात पुढे जाण्यासाठी ग्राहकांना सक्षम बनवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.”

महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये सादर करण्यात आलेली नाविन्यपूर्ण उत्पादने:

वी कॉलर ट्यून्स

तब्बल ७० पेक्षा जास्त भाषांमधील आणि १० पेक्षा जास्त शैलींमधील आवडीच्या गाण्यांमधून वी युजर्स आपल्या कॉलर्सचे स्वागत करू शकतात. रोमान्सभक्तीमेलडीरिजनलक्लासिकल या आणि अशा अनेक शैलींमधील गाणी यामध्ये आहेत. वी ग्राहक त्यांच्या हॅलो ट्यून देखील सेट करू शकतातअनलिमिटेड गाणी डाउनलोड करण्याचा आनंद मिळवू शकतात. यासाठीच्या मासिक प्लॅनची किंमत फक्त ४९ रुपयेतीन महिन्यांच्या प्लॅनची किंमत फक्त ९९ रुपये आणि वार्षिक प्लॅनची किंमत फक्त २४९ रुपये आहे.

खिशात वायफाय – वी मायफाय

आम्ही नुकतेच वी मायफाय लॉन्च केले आहेज्यामध्ये एकावेळी १० डिव्हायसेस कनेक्ट होऊ शकतात आणि १५० एमबीपीएसपर्यंत डेटा स्पीड मिळतो. या नव्या उत्पादनामुळे वी ग्राहक प्रवासात असताना देखील हेवी वायफाय स्पीडचा आनंद घेऊ शकतात. पुणेनागपूरनाशिकऔरंगाबादकोल्हापूरसोलापूरगोवा (शहरांची नावे) या शहरांमध्ये निवडक स्टोर्समध्ये वी मायफाय उपलब्ध आहे.

प्रीपेड ग्राहकांसाठी हिरो अनलिमिटेड प्लॅन

डेटा कोटा अचानक संपून जाईल अशी चिंता आता अजिबात नको कारण हिरो अनलिमिटेड प्लॅनसोबत मिळत आहेत ३ अनोखे लाभ: अनलिमिटेड हाय स्पीड डेटा फ्रॉम १२ एएम – ६ एएमवीकएंड डेटा रोलओव्हर आणि डेटा डिलाईट.  यामध्ये दैनंदिन कोटाच्या व्यतिरिक्त दर महिन्याला २जीबीपर्यंत अतिरिक्त डेटा अनलॉक केला जातो आणि त्यासाठी कोणतेही शुल्क घेतले जात नाही. याशिवाय हिरो अनलिमिटेड पोर्टफोलिओ मजबूत करण्यासाठी वी ने २९९ आणि त्यापेक्षा जास्त किमतीचे अजून जास्त डेली डेटा अनलिमिटेड रिचार्ज पॅक देखील सादर केले आहेत.

आपल्या युजर्सना सतत पुढे जाता यायला हवेनवनवीन अनुभव घेता यावेत यासाठी वी आपल्या अनोख्या डिजिटल सुविधांमध्ये सातत्याने वाढ करत आहे. हंगामा म्युझिकसोबत वी ऍपची भागीदारी आहे२० भाषांमधील गाण्यांची प्रचंड मोठी लायब्ररी वी ऍपवर उपलब्ध आहे. वी ऍपवर वी गेम्समध्ये ऍक्शनऍडव्हेंचरआर्केडकॅज्युअलएज्युकेशनफनपझलरेसिंगस्पोर्ट्स आणि स्ट्रॅटेजी अशा १० लोकप्रिय शैलींमधील १२०० पेक्षा जास्त अँड्रॉइड आणि एचटीएमएल५ बेस्ड मोबाईल गेम्सचा इमर्सिव्ह गेमिंग अनुभव घेता येतो.  वी गेम्समध्ये नुकताच वी ने मल्टी प्लेयर आणि कॉम्पिटिटिव्ह गेमिंग कन्टेन्ट लॉन्च केला आहे. वी ऍपवरील वी जॉब्स अँड एज्युकेशन विभागात भारतातील सर्वात मोठा जॉब सर्च प्लॅटफॉर्म अपनाइंग्रजी शिकण्याचा आघाडीचा प्लॅटफॉर्म एनगुरूसरकारी नोकरी परीक्षांच्या तयारीसाठी परीक्षा यांचा समावेश आहे. नोकरी शोधणेइंग्रजी संभाषण कौशल्ये वाढवणेसरकारी नोकरी परीक्षांमध्ये चांगली कामगिरी बजावणे आणि करियरचे स्वप्न पूर्ण करणे या सर्वांसाठी हा उपक्रम म्हणजे वन-स्टॉप-सोल्युशन आहे.

कौशल्य विकासासाठी आवश्यक सुविधा देणार- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर


पुणे, दि. 7 – येत्या दहा वर्षांत भारत जगातला सर्वांत तरुण देश म्हणून ओळखला जाणार आहे. त्याचे नेतृत्व आजचे विद्यार्थी करणार आहेत. त्यासाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्याच्या उद्देशाने आधुनिक शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यास शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभात केसरकर विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते. डीईएसच्या नियामक मंडळ आणि परिषदेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे अध्यक्षस्थानी होते. उपाध्यक्ष महेश आठवले, कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी, शाला समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. अशोक पलांडे, प्रा. स्वाती जोगळेकर, शाला प्रमुख सुनील शिवले यांची प्रमुख उपस्थिती होती.
केसरकर म्हणाले, “विद्यार्थ्यांचा शारीरिक आणि मानसिक विकास महत्त्वाचा आहे. त्यासाठी शारीरिक शिक्षण या विषयासाठी सुरुवातीच्या काळात चार ते पाच शाळांमध्ये किमान एक शिक्षक देणे शासनाच्या विचाराधीन आहे. विद्यार्थ्यांना मानसिक स्वास्थ्याबरोबर एकाग्रता साधता यावी यासाठी योगाचे विविध प्रकार शिकविण्याची योजना आहे. तसेच आधुनिक तंत्रशिक्षणाबरोबर संगीत, गायन याचे शिक्षण देण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी या क्षेत्रांतील नामवंतांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळणार आहे.”
केसरकर पुढे म्हणाले, “नवीन शैक्षणिक धोरण राबविण्यासाठी आवश्यक साधने पुढील शैक्षणिक वर्षापर्यंत शाळांमध्ये उपलब्ध होतील. इयत्ता तिसरीपासून परीक्षा घेता येईल का? याबाबत तज्ज्ञांशी चर्चा सुरू आहे. गृहपाठ स्वयंस्फूर्तिने करायचा अभ्यास आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गृहपाठाची किंवा खासगी क्लासची गरज भासू नये असे शिक्षण द्यावे. ई-लर्निंग सुविधा राज्यभर पुरविण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. यासाठी वापरण्यास सुलभ सॉफ्टवेअर विकसित करण्यात येत आहे. भविष्यकाळात शालेय स्तरावर शिक्षण आणि क्रीडा हे दोन्ही विषय सोबत असतील.”
डॉ. के. एच. संचेती, डॉ. प्रमोद चौधरी यांच्यासह विविध क्षेत्रांतील नामवंत माजी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. ‘अमृत कलश’ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच नव्याने सुरू करण्यात आलेल्या नाट्यछंद वर्गाचे उद्घाटन करण्यात आले. सुनील शिवले यांनी शाळेची माहिती दिली. प्रा. धनंजय कुलकर्णी यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. मोहन शेटे यांनी परियच करून दिला. अ‍ॅड. अशोक पलांडे यांनी आभार मानले. 

पर्यावरण संवर्धनाचा संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यात शिक्षकांची भूमिका महत्वाची-रवींद्र धारिया 

पुणे : “पर्यावरण संवर्धनाचा संस्कार विद्यार्थ्यांमध्ये शालेय वयापासूनच रुजायला हवा. यामध्ये पालकांसह शिक्षकांची भूमिका अतिशय महत्वाची आहे. शालेय शिक्षणाबरोबरच शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्व पटवून द्यायला हवे,” असे मत ‘वनराई’चे अध्यक्ष रवींद्र धारिया यांनी व्यक्त केले.

ऑक्टोबर सेवा सप्ताहांतर्गत ‘वनराई’च्या पर्यावरण वाहिनी व लायन्स क्लब इको फ्रेंड्सच्या पुढाकाराने शिक्षकांसाठी आयोजित कार्यशाळेत धारिया मार्गदर्शन करत होते. प्रसंगी ‘वनराई’चे सचिव अमित वाडेकर, वाहिनीचे प्रकल्प संचालक भारत साबळे, लायन्स क्लब ऑफ इको फ्रेंड्सचे अनिल मंद्रुपकर, किशोर मोहोळकर, प्रतिभा खंडागळे, शमा गोयल, मेघा आंबवले आदी उपस्थित होते. या सप्ताहात ‘लायन्स’च्या ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी, पुना वेस्ट, फ्युचर, विधिज्ञ, मुकुंदनगर, शिवाजीनगर, सुप्रिम, पुणे रिव्हर साईड, मैत्री या क्लबने सहभाग घेतला. आभार तृप्ती व्हावळ यांनी मानले.

किशोर मोहोळकर यांनी पर्यावरण आणि आपण या विषयावर मार्गदर्शन केले. वृक्षारोपण, संवर्धन, स्वच्छता, प्लास्टिक मुक्ती, कचरा संकलन, त्याचे वर्गीकरण, कचऱ्यातून अर्थार्जन अशा विविध मुद्यांवर त्यांनी विचार मांडले. अनिल मंद्रुपकर यांनी इको फ्रेंड्सच्या माध्यमातून सुरु असलेल्या पर्यावरण संवर्धनाच्या कार्याचा आढावा घेतला. कार्यशाळेच्या शेवटी सहभागी शिक्षकांना आयुष मंत्रालय व औषधी वनस्पती सुविधा केंद्राचे डॉ. दिगंबर मोकाट यांच्या सहयोगातून औषधी वनस्पतींचे वाटप करण्यात आले.

मुख्याध्यापक, शिक्षक व विदयार्थी यांच्या सहकार्यातून पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत ग्रामीण विकासाचा कार्यविस्तार पुढच्या पिढ्यांपर्यंत नेण्यासाठी वनराईची पर्यावरण वाहिनी काम करत असून राज्यातील ४०० शाळांतील विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे शिक्षण देण्यात येत आहे. लहान मुलांमध्ये पर्यावरण संवर्धनाचे बीजे रोवणे, त्यांना पर्यावरणाप्रती संवेदनशील आणि कृतीशील बनविण्यासाठी वनराई शिक्षकांसाठी  अशा कार्यशाळा घेत असल्याचे साबळे यांनी सांगितले.

हॉस्पिटलचे बिल माफ कसे करावे? या पुस्तकाचा वैद्यकीय अभ्यासक्रमात समावेश व्हायला पाहिजे – डॉ. अमोल देवळेकर

मुंबई- वैद्यकीय क्षेत्रामध्ये विविध प्रकारच्या पॅथीमधील स्वतंत्र अभ्यासक्रम आहेत. रुग्णाचे रोगनिदान कसे करायचे? त्यावर कोणते औषध उपचार करायचे? रुग्ण दीर्घायुषी कसा होईल? या बाबी शिकविल्या जातात. विद्यार्थ्यांना सुद्धा प्रथितयश, नामांकित डॉक्टर कसे व्हावे? यापेक्षा वेगळा विचार मनात येत नाही, मात्र रुग्णाच्या खिशात पैसेच नसतील तर त्याच्यावर उपचार कसे करावेत? ही बाब वैद्यकीय अभ्यासक्रमातल्या कोणत्याही पॅथीमध्ये शिकविली जात नाही. डॉक्टरांनी आपला व्यवसाय उत्तमरीतीने कसा करावा? या विषयाकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून उलटपक्षी डॉक्टरांनी तोटा सहन करून पुन्हा डॉक्टरांनीच कसे नीतीमान असले पाहिजे? याविषयीची चर्चा समाजात घडत असताना, उमेश चव्हाण यांनी लिहिलेले हॉस्पिटलचे बिल माफ कसे करावे? हे पुस्तक रुग्णांनी तर आपल्याजवळ ठेवलेच पाहिजे त्याचबरोबर कोणाकडे पैसे नसतील तर त्याच्यावर मोफत उपचार देताना आपला व्यवसाय बुडणार नाही. हॉस्पिटलला पैसे मिळाले पाहिजेत आणि रुग्णाचेही बिल माफ झाले पाहिजे, विषयी अत्यंत सुंदर, मार्मिक, अचूक आणि व्यापक विश्लेषण या पुस्तकांमध्ये फार सुंदर रीतीने उमेश चव्हाण यांनी केले आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमामध्ये या पुस्तकाचा समावेश होणे फार गरजेचे आहे, असे मत प्रसिद्ध विचारवंत आणि वैद्यकीय तज्ञ डॉ. अमोल देवळेकर यांनी मुंबईत बोलताना व्यक्त केले.
रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण लिखित हॉस्पिटलचे बिल माफ कसे करावे? या पुस्तकाचे मुंबई मराठी पत्रकार संघ, लोकमान्य सभागृहामध्ये डॉ. अमोल देवळेकर यांच्या हस्ते प्रकाशन संपन्न झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर लेखक उमेश चव्हाण, डॉ. अमोल देवळेकर, प्रसिद्ध चित्रपट निर्माते निलेश नवलाखा, कवी लेखक वैभव छाया, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धनंजय टिंगरे आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल हातागळे यावेळी उपस्थित होते.
उमेश चव्हाण म्हणाले की, सर्वच शासकीय योजना मोठ्या हॉस्पिटलमध्ये मिळतात. बहुसंख्येने लहान हॉस्पिटलमध्ये जाणाऱ्या गरीब रुग्णावर उपचार करणाऱ्या दवाखान्यांना शासनाने अनुक्रमे दहा लाख आणि वीस लाखाचे वार्षिक पॅकेज जाहीर केले, तर गोरगरीब रुग्णांवर लहान हॉस्पिटलमध्ये सुद्धा मोफत उपचार करणे शक्य होईल. हॉस्पिटलचे बिल माफ कसे करावे? या पुस्तकामध्ये डॉक्टरांचे संरक्षण करण्याबद्दल स्वतंत्र प्रकरण आहे, केवळ पुस्तकाच्या नावामुळे डॉक्टर बांधव दुखावले जाणे अयोग्य आहे.
राज्यात सर्वत्र हे पुस्तक उपलब्ध केले असून, सर्वत्र ऑनलाईन देण्याची ही प्रकाशकांनी व्यवस्था केली आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अनिल हातागळे, धनंजय टिंगरे, निलेश नवलाखा आणि वैभव छाया यांचीही भाषणे झाली. सूत्रसंचालन शशिकांत लिंबारे यांनी केले तर आभार अपर्णा साठ्ये यांनी मानले.

पुस्तकाचे नाव – हॉस्पिटलचे बिल माफ कसे करावे? लेखक – उमेश चव्हाण, प्रकाशन संस्था – रिषिभ हेमराज पत्रिका मीडिया अँड प्रोडक्शन्स प्रा. लि., पाने – 312, किंमत- 595/-

हॉस्पिटलचे बिल माफ कसे करावे? हे पुस्तक मिळवण्यासाठी पुढील क्रमांकावर 8805020059 संपर्क करा.

शिक्षण विकासातून सशक्त समाजनिर्मितीमध्ये योगदान देणाऱ्या संस्थांना सहकार्य-उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे, दि.६: शैक्षणिक विकासाच्या माध्यमातून व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासोबतच चांगल्या समाजाची निर्मिती होत असते; त्यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये योगदान देत सशक्त समाजनिर्मितीसाठी कार्य करणाऱ्या संस्थांना शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास रस्तोगी, महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. निपुण विनायक, तंत्र शिक्षण संचालक अभय वाघ आदी उपस्थित होते. मंत्री श्री. पाटील यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था आणि विविध विद्यापीठे, राष्ट्रीय, राज्यपातळीवरील शिक्षण संस्था तसेच शिक्षण क्षेत्रात कार्यरत संस्थासोबत सामजस्य करार करण्यात आले.

सामंजस्य करारांवरील स्वाक्षऱ्यांनंतर संस्थाचे अभिनंदन करुन श्री. पाटील म्हणाले, जागतिक पातळीवर देशाची प्रतिमा उंचावत आहे. शैक्षणिक क्षेत्रातही देशपातळीवर चांगले काम होत आहे. चांगले काम करणाऱ्या संस्थेच्या पाठीमागे राज्य शासन भक्कमपणे उभे आहे. आपण शिक्षण क्षेत्रात बदल घडविण्याचे आवानात्मक काम स्वीकारले असून त्यातून व्यक्तीमत्व विकासाचे काम होणार आहे.

नवीन शैक्षणिक धोरणाशी सुसंगत प्रशिक्षण शिक्षकांना देण्यात येणार आहे. त्यामुळे शैक्षणिक धोरणातील संकल्पना समजून समाजापर्यंत पोहचिण्याचे कार्य शिक्षकांच्या हातून होणार आहे. प्रत्येक बाबींचे विश्लेषणात्मक सखोल मार्गदर्शन प्रशिक्षणातून मिळणार आहे. प्रशिक्षणामुळे आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेच्या कार्यपद्धती शिक्षकांना दिशादर्शक आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यात प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्याचा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

डॉ. विनायक यांनी संस्थेच्या कार्यपद्धतीची माहिती दिली. विविध क्षेत्रातील संस्थेसोबत सामंजस्य करार करण्यात आले असून कराराप्रमाणे अंमलबजावणी करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

यावेळी आयसर, कवी कुलगुरु संस्कृत विद्यापीठ, जेजे ग्रुप संस्था, फ्लेम विद्यापीठ, आयआयटी बॉम्बे, ललीत कला केंद्र, सिम्बॉयसिस विद्यापीठ, श्रीमती नाथबाई दामोधर ठाकरसी महिला विद्यापीठ, परिवर्तन ट्रस्ट, महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, एक्सआरसीव्हीसी, मनोपचार आरोग्य संस्था, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ, इनोव्हेटिव्ह ऑफ चेंज, गोंडवाना, हाय प्लेस, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, आयुका, टाटा इन्स्टियूट सोशल सायन्स, फोटोग्राफी प्रमोशन ट्रस्ट, रोटरी, विश्वकर्मा विद्यापीठ, इन्स्टियूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी, आरआयआयडीएल, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, समीर आयआयटी गांधीनगर, डॉ. होमी भाभा स्टेट विद्यापीठ, एनएफबी खालसा कॉलेज, जीआयईईई सोबत सामंजस्य करार करण्यात आला.

श्रीमती नाथबाई दामोधर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. उज्वला चक्रदेव, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. मृणालीनी फडणवीस, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.प्रशांत भोकरे, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिलीप मालखेडे, डॉ. होमी भाभा स्टेट विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. रजनीश कामत, रुसाचे सल्लागार विजय जोशी तसेच विविध संस्थांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

सप्तशृंगी मातेची प्रतिमा आणि साडेतीन शक्ती पीठाचा प्रसाद देऊन उध्दव ठाकरेंना डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या घवघवीत यशासाठी शुभेच्छा

मुंबई, : नवरात्रीच्या निमित्ताने शिवसेना उपनेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या संकल्पनेतून ”साडेतीन शक्तीपीठाच्या दर्शनानिमित्त बये दार उघड” मोहिम आयोजित केली होती. यात दिनांक २७ आणि २८ सप्टेंबर रोजी नाशिक जिल्ह्यातील चांदवड, सप्तशृंगी माता येथे दर्शन घेऊन ज्योती प्रज्वलित करण्यात आली.
यानंतर २९ सप्टेंबर रोजी कोल्हापूरची अंबाबाई, ३० सप्टेंबर रोजी तुळजापूरची तुळजाभवानी आणि २ ऑक्टोबरला माहूरची रेणुका या साडेतीन शक्तीपीठाच्या ठिकाणी दर्शन आणि आरती शिवसेना महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली.

या सर्व ठिकाणाहून आलेल्या ज्योतीचे दर्शन श्री. ठाकरे यांनी दसरा मेळाव्यास संबोधन करण्यापूर्वी घेतले. या शक्तीपीठाचा प्रसाद यावेळी शिवसेना उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी श्री. ठाकरे यांना दिला. तसेच मेळावा सुरू होण्यापूर्वी श्री. सप्तश्रृंगी देवीची प्रतिमा भेट देण्यात आली.यावेळी शिवसेना नेते आदित्य ठाकरे, शिवसेना नेते सुभाष देसाई उपस्थित होते.

धरणात पाणी मावेना अन पुणेकरांना मात्र ते देता येईना -प्रशासनाच्या हलगर्जी कारभारावर नितीन कदम बरसले

पुणे-धरणे वारंवार भरताहेत ,नदीत पाणी सोडले जातेय ,ऑक्टोबर मध्येही पाऊस थांबायचे नाव घेईना , धरणात पाणी मावेना पण ते पुणेकरांना देता येईना .. असा गलथान कारभार पुणे महापालिका प्रशासनाचा सुरु असल्याने राष्ट्रवादीचे अर्बन सेल चे अध्यक्ष नितीन कदम यांनी महापालिका प्रशासनावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

ते म्हणाले,प्रशासनावर अंकुश राहिलेला नाही ,मनमानी कारभार सुरु आहे,आज पाणी येणार नाही याची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्याची योग्यती खबरदारी पुणे मनपाने घेतली नसल्यामुळे पुणेकरांना कोणतीच पूर्वतयारी करता आली नाही.त्यामुळे आज पाणी नसल्यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप व हाल सोसण्याची वेळ आली..याबाबत पुणे मनपा नेहमीच्या पद्धतीने प्रेस नोट काढून वृत्तपत्राद्वारे आधीच नागरिकांना कल्पना देते.दुर्दैवाने “दैनिक सकाळ”(बंदच्याआदल्या दिवशी 5 ऑक्टोबरला) व्यतिरिक्त कोणत्याच वृत्तपत्रांनी ही बातमी दिली नसल्यामुळे आजचा पाणीपुरवठा बंद हा नागरिकांसाठी “गुपित” च राहिला. त्यात ज्या भागाचा पाणीपुरवठा बंद असणार आहे ती माहिती सुद्धा अर्धवटच छापण्यात आली होती.

धरणात एवढे पाणी असताना पुणेकरांना पाण्यासाठी वण-वण का! हाच प्रश्न नागरिकांना कडून विचारला जात आहे..पुणे मनपाच्या पाणीपुरवठा विभागाच्या या गचाळ कारभारामुळे पुन्हा एकदा नागरिकांना मनस्ताप व हाल सोसण्याची वेळ आलेली आहे. याबाबत आपण त्वरित चौकशी होऊन दोषींवर कारवाई व्हायला हवी अशी मागणी देखील राष्ट्रवादी अर्बन सेल पुणे शहर मागणी करीत आहे.असे नितीन कदम यांनी सांगितले .

अवधूत गांधी साकारणार संत नामदेव. 

 सोनी मराठी वाहिनीवरील ‘ज्ञानेश्वर माउली’ या मालिकेने प्रेक्षकांना संतांची परंपरा उलगडवत भक्तिरसात तल्लीन केले आहे. माउली आणि त्यांची भावंडं यांचे चमत्कार, रेड्यामुखी वेद, सार्थ श्रीज्ञानेश्वरी, विश्वरूप दर्शन, पसायदान हे सारं काही प्रेक्षकांना विशेष भावलं.  प्रेक्षक हरिभक्तीच्या या अलौकिक प्रवासाचे साक्षीदार झाले आहेत. मालिकेतल्या प्रत्येक व्यक्तिरेखेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं आहे. पण आता मालिकेत विविध संतांची मांदियाळी अनुभवायला मिळत असताना यात आणखी एका  संताचा प्रवेश होणार आहे.

    संतांच्या या प्रवासाची सुरुवात संत कान्होपात्रा यांच्या येण्याने झाली. संत चोखामेळा यांची कथाही प्रेक्षकांना पाहायला मिळाली आणि प्रेक्षकांना ती भावली आहे. आता मालिकेत संत नामदेव यांचा प्रवेश होणार आहे. माउली आणि नामदेव यांची भेट कशा प्रकारे होणार, हे पाहणं रंजक ठरणार आहे. संत नामदेव यांची भूमिका सलाम पुणे पुरस्काराचे मानकरी असलेले  अवधूत गांधी साकारणार आहेत. अवधूत गांधी हे वारकरी संप्रदायातलं नावाजलेलं व्यक्तिमत्त्व. ते ज्ञानेश्वर माउली मालिकेचा  सुरुवातीपासूनच भाग आहेत. याविषयी  त्यांचा अभ्यास फार महत्त्वाचा  आहे. त्यांच्या या  वेशाची/पेहेरावाची प्रेक्षकांमध्ये  चर्चा होईल, यात शंकाच नाही. त्यांच्या या आध्यात्मिक भूमिकेसाठी त्यांनी विशेष मेहनत घेतली आहे. संत नामदेव आणि ज्ञानेश्वर माउली यांची भेट कशी होते, हे पाहणे प्रेक्षकांसाठी  उत्कंठा वाढवणारे असेल.

एमआयटीचा ४था दीक्षांत समारंभ:४५७६ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार

पुणे, ६ ऑक्टोबर: एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचा चौथा दीक्षांत समारंभ शनिवार, दि. ८ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी १०.०० वाजता, विश्व सभामंडप, विश्वराजबाग, लोणीकाळभोर, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे.
या समारंभासाठी भारत सरकारचे परराष्ट्र व्यवहार व शिक्षण राज्यमंत्री डॉ. राजकुमार रंजन सिंग हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. इस्त्रोचे माजी अध्यक्ष व राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० चे अध्यक्ष पद्मविभूषण डॉ. के. कस्तुरीरंगन, जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर व नालंदा विद्यापीठाचे कुलपती व जगविख्यात संगणक तज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेेत. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे असतील. तसेच, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड व कुलगुरु  डॉ. आर.एम. चिटणीस उपस्थित राहणार आहेत.या दीक्षांत समारंभरात बीटेक मधील केवल पद्मवार याला फाउंडर प्रेसिडेंट मेडल व बॅचलर ऑफ एज्युकेशनचे मिनू कलिता यांचा एक्जीकेटीव्ह प्रेसिडेंट मेडलने गौरव करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक, रौप्य आणि कास्य पदक देण्यात येणार आहे. अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, व्यवस्थापन (यूजी व पीजी), लिबरल ऑर्टस , बीएड, फाइन ऑर्टस, मिडिया अ‍ॅण्ड पत्रकारिता, वाणिज्य, अर्थशास्त्र, विज्ञान,फॉर्मसी, सस्टेनेबल स्टडीज, डिझाइन, गर्व्हनन्स इ. शाखेत मिळून एकूण ४५७६ विद्यार्थ्यांना पदवी देण्यात येणार आहे.
अशी माहिती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलसचिव डॉ. प्रशांत दवे आणि परिक्षा नियंत्रक प्रा. गणेश पोकळे यांनी दिली.