Home Blog Page 1565

दीड महिन्यात १ कोटीहून अधिक ज्येष्ठ नागरिकांचा मोफत एसटी प्रवास

मुंबई, दि. १८ : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरील नागरिकांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवासाच्या निर्णयामुळे अवघ्या ५२ दिवसांमध्ये १ कोटी ४ लाख ८६ हजार ज्येष्ठांनी याचा लाभ घेतला आहे. ‘अमृत ज्येष्ठ नागरिक’ योजनेला भरभरून प्रतिसाद मिळाल्याने १ कोटी ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद राज्य शासनाला मिळाल्याची भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या सर्व सेवांमधून मोफत प्रवासाच्या योजनेची घोषणा केली होती. त्यानंतर अधिवेशन कालावधीत २५ ऑगस्ट, २०२२ रोजी ज्येष्ठांना  मोफत प्रवास योजनेसाठी प्रमाणपत्राचे वितरण करून योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला.

राज्यात २६ ऑगस्ट ते २६ सप्टेंबर २०२२ या महिन्याभराच्या कालावधीत राज्यभरातून ५४ लाख ५८ हजारांहून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी एसटीतून मोफत प्रवासाचा लाभ घेतला होता. आता १६ ऑक्टोबरपर्यंत योजनेंतर्गत मोफत प्रवास केलेल्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या १ कोटी ४ लाख ८६ हजार ८०९ एवढी झाली आहे. ज्येष्ठांना मोफत प्रवास योजनेमुळे जिल्ह्याच्या तसेच मोठ्या शहरांमध्ये वैद्यकीय उपचारासाठी जाणे शक्य होत आहे.

योजनेद्वारे राज्यभरातून दिवसाला सरासरी २ लाख ज्येष्ठ नागरिक एसटीतून मोफत प्रवासाचा लाभ घेतला आहे. प्रवासादरम्यान आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहन परवाना, पारपत्र, निवडणूक ओळखपत्र तसेच केंद्र आणि राज्य शासनातर्फे निर्गमित केलेले ओळखपत्र यापैकी कुठलेही एक ओळखपत्र वाहकाला दाखविल्यास ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास करता येत आहे.

साखर निर्यातीसाठी कोटा पद्धतीऐवजी खुले धोरणच सुरु ठेवावे : मुख्यमंत्र्यांची पत्राद्धारे प्रधानमंत्र्यांना विनंती

मुंबई, दि. १८ : साखरेच्या बाबतीत सध्याचे खुले निर्यात धोरणच सुरु ठेवावे.  कोटा पद्धतीने साखर निर्यात करण्यास महाराष्ट्रातील साखर कारखानदारांचा विरोध असून यामुळे कारखान्यांना मर्यादा येतील, यासंदर्भात आपण हस्तक्षेप करून वाणिज्य तसेच ग्राहक संरक्षण आणि अन्न व सार्वजनिक मंत्रालयाला योग्य तो निर्णय घेण्याची विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांना केली आहे.

आपल्या पत्रात मुख्यमंत्री म्हणतात की, २०२१-२२ मध्ये साखर निर्यातीच्या बाबतीत केंद्र सरकारने खुले धोरण स्वीकारल्याने जगात साखर निर्यातीत भारत मोठा निर्यातदार ठरला. यामुळे साखर कारखान्यांना आर्थिक स्थैर्य मिळाले आणि परकीय चलन सुद्धा वाढले.

यंदापासून साखर निर्यातीसाठी कोटा पद्धत लागू करण्यात येणार आहे असे कळते.  मात्र, ही पद्धत आपल्या कारखानदारांना तोट्याचीच आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणतात की, मार्चपर्यंत देशातला गळीताचा हंगाम संपतो.  १ एप्रिलपासून ब्राझील मधील हंगाम सुरु होतो आणि स्पर्धा निर्माण होऊन इतर साखर निर्यातदार देशांना त्याचा फायदा होतो. शासनाला साखर निर्यातीसाठी कोणतेही अर्थसहाय करावे लागत नाही. कोटा पद्धतीमुळे ज्या कारखान्यांना निर्यातीत रुची नाही ते देखील प्रत्यक्ष निर्यात न करता पैसा कमविण्यासाठी त्यांचा कोटा इतरांना हस्तांतरित करू शकतात. कोटा पद्धतीमुळे अनावश्यकरित्या प्रशासकीय अडथळे निर्माण होईल तसेच पारदर्शकता राहणार नाही. तसेच निकोप व्यवसायाची संधी राहणार नाही.

२०२१-२२ मध्ये कच्च्या तेलाच्या किंमती जास्त असल्याने ब्राझीलसाठी साखरेपेक्षा इथेनॉल उत्पादनावर लक्ष केंद्रीत करणे फायदेशीर ठरत आहे.  पुढील काळात मात्र कच्च्या तेलाच्या किंमती घसरण्याची शक्यता असल्याने ब्राझील देखील इथेनॉलपेक्षा साखर उत्पादनावर भर देण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे सुद्धा भारताला तोटा होऊ शकतो. राज्य सहकारी साखर कारखाना फेडरेशन तसेच राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना फेडरेशन त्याचप्रमाणे महाराष्ट्रामधील खासगी क्षेत्रातील कारखाने या सर्वांची मागणी खुल्या साखर निर्यात धोरणाचीच अंमलबजावणी करण्याचीच आहे. त्यामुळे या प्रकरणी संबंधित मंत्रालयाला योग्य तो निर्णय घेण्याचे निर्देश आपल्या स्तरावरुन द्यावेत, असे देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

कंत्राटी कामगारांनाही बोनस व इतर लाभ मिळावा-राष्ट्रीय मजदूर संघाचे पालिकेच्या दारात आंदोलन

पुणे:- महानगरपालिकेतील कंत्राटी कामगार व राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुणे महानगरपालिकेच्या गेटवर निदर्शने आंदोलन केले. या आंदोलनाला पुणे महानगरपालिकेतील सुरक्षा रक्षक, पाणीपुरवठा विभाग,आरोग्य खाते, स्मशानभूमी कर्मचारी, कचरा वाहतूक चालक,पाणीपुरवठा व इतर अनेक विभागातील कंत्राटी कामगार मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. त्यावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या. यावेळी बोलताना कामगार नेते सुनील शिंदे म्हणाले, पुणे महानगरपालिकेतील कायम कामगारांना 8.33% बोनस व 19 हजार रुपये सानुगृह अनुदान त्याच बरोबर वीस हजार रुपये अग्रीम रक्कम देण्याचा निर्णय पुणे महानगर पालिकेने घेतला आहे. परंतु त्याच बरोबर कायम कामगारांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे कंत्राटी कामगार यांना मात्र काहीच देण्यात आलेले नाही. हा मनपा मधील कांत्राटी कामगारांवर खूप मोठा अन्याय आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व कंत्राटी कामगारांनाही बोनस व इतर लाभ मिळवून देण्यासाठी आज हे आंदोलन करण्यात आले.

त्याचबरोबर या कंत्राटी कामगारांचे इतर अनेक प्रश्न आहेत तेही यावेळी उपस्थित करण्यात आले. मागण्यांचे निवेदन महापालिकेचे कामगार सल्लागार शिवाजी दौंडकर यांना देण्यात आले. यावेळी झालेल्या चर्चा मध्ये श्री शिवाजी दौंडकर यांनी कामगारांचा उर्वरित पगार दिवाळीपूर्वी करण्याचा इरादा जाहीर केला. त्याचबरोबर कंत्राटी कामगारांना बोनस देण्याबाबत माननीय आयुक्त यांच्यासोबत दोन दिवसांमध्ये बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन यावेळी दिले. यावेळी राष्ट्रीय मजदूर संघाचे उपाध्यक्ष सिताराम चव्हाण, सुरक्षा रक्षक प्रतिनिधी, विजय पांडव, जानवी दिघे, वेहिकल डेपोचे संदीप पाटोळे  पाणीपुरवठा विभागाचे योगेश मोरे सोमनाथ  चव्हाण व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

अनन्या, अदिती, श्रेया यांची विजयी सलामी-व्ही. व्ही. नातू स्मृती अखिल भारतीय बॅडमिंटन स्पर्धा

पुणे : महाराष्ट्राच्या अनन्या गाडगीळ, अदिती गावडे,  सानिका पाटणकर, श्रेया मेहता, अनन्या अगरवाल, ओजल राजक यांनी पुणे जिल्हा आणि मेट्रोपोलिटन बॅडमिंटन संघटनेच्या (पीडीएमबीए) वतीने आयोजित व्ही. व्ही. नातू स्मृती अखिल भारतीय मानांकन बॅडमिंटन स्पर्धेच्या पात्रता फेरीत महिला गटात विजयी सलामी दिली.

शिवाजीनगर येथील पीडीएमबीएच्या मॉडर्न स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, पीवायसी, लक्ष्मी क्रीडा मंदिर आणि सीओईपी इंजिनीअरिंग कॉलेजच्या कोर्टवर या स्पर्धेच्या पात्रता फेरीचे सामने सुरू आहेत.

महिला एकेरीच्या पात्रतेच्या सलामीच्या लढतीत अनन्या गाडगीळने महाराष्ट्राच्याच सोफिया सिमनवर १५-१२, १५-३ असा, तर अदिती गावडेने कर्नाटकाच्या अखिला आनंदवर १५-५, १५-१२ असा आणि अस्मिता शेडगेने दिल्लीच्या मीरा मढवालवर २०-१८, १५-७ असा विजय मिळवला. सानिका पाटणकरने कर्नाटकाच्या आंचल जैनला १५-११, १५-१० असे नमविले. श्रेया मेहताने पंजाबच्या टिया महाजनला १५-१, १५-९ असे, तर अनन्या अगरवालने उत्तर प्रदेशच्या गरिमा रावतला १५-४, १५-२ असे आणि ओजल राजकने हरियाणाच्या क्रितिका मित्तलला १५-९, १५-८ असे नमविले. मयेकरची आगेकूच अनिरुद्ध मयेकरने आपली आगेकूच कायम राखली. त्याने पुरुष एकेरीच्या तिसऱया फेरीत आपलाच राज्य सहकारी अनिरुद्ध नायरला १५-७, १५-८ असे नमविले. बाराव्या मानांकित पश्चिम बंगालच्या अस्मित अगरवालने महाराष्ट्राच्या कीर्तेश चौधरीवर १५-६, १५-१० असा विजय मिळवला.

पात्रता फेरीचे निकाल – पुरुष एकेरी – तिसरी फेरी – चरण नाईक केलावतू (आंध्र प्रदेश) वि. वि. आयूष राज गुप्ता (उत्तर प्रदेश) १५-८, ११-१५, १५-९, यश कुलते (मध्य प्रदेश) वि. वि. श्रीकांत रामकृष्ण (तेलंगण) ११-१५, १५-५, १५-१२, शांतनू शर्मा (उत्तर प्रदेश) वि. वि. शिशिर द्विवेदी (मध्य प्रदेश) १५-१३, १५-१२, अजय नायर (केरळ) वि. वि. नेगी रेड्डी (आंध्र प्रदेश) १५-३, १५-८, सात्विक प्रशर (दिल्ली) वि. वि. पुष्कराज कुंभार (महाराष्ट्र) १५-१, १५-८, अंकित मोंडल (पश्चिम बंगाल) वि. वि. दिनेशकुमार जुज्जुरी (तेलंगण) १५-२, १५-१, आदित्य गुप्ता (तेलंगण) वि. वि. पल्लव जोशी (उत्तराखंड) १५-९, १५-१३, वेदांत शर्मा (राजस्थान) वि. वि. अंकित देशमुख (कर्नाटक) १५-१०, १५-४.

महिला एकेरी –  पहिली फेरी – योशिता माथूर (राजस्थान) वि. वि. स्मिता चौधरी (महाराष्ट्र) १५-२, १५-३, अमोलिका सिंग वि. वि. सान्वी मुकादम (महाराष्ट्र) १५-१२, ७-१५, १५-८, आनंदिता तामरा (राजस्थान) वि. वि. श्रुती फणसे (महाराष्ट्र) १५-१०, १०-१५, १५-९. विद्या टी. वि. वि. सोनिया राजपूत १५-६, १५-६, अद्या पारशर वि. वि. ममैक्या लंका १५-९, १५-१०, पवित्रा नवीन वि. वि. फनी वेन्नेला मुदुनुरी १५-५, ११-१५, १५-७, योशिता माथूर वि. वि. स्मिता चौधरी १५-२, १५-३, आराध्या कुश्वाहा वि. वि. सिमरन चौधरी १५-७, १३-१५, १५-७, अमोलिका सिंग वि. वि. सान्वी मुकादम १५-१२, ७-१५, १५-८, निधी देसाई वि. वि. निथीशा राजेश १५-१०, ६-१५, १५-९.

ग्रामीण उद्योजकांच्या वस्तूंची विक्री मंत्रालयाच्या प्रांगणात

मुंबई, दि. 18 : महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून खादी व ग्रामोद्योग वस्तूंच्या प्रदर्शन व विक्रीचे आयोजन त्रिमूर्ती प्रांगण, मंत्रालय येथे आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनातील दालनांना उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांनी भेट दिली.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने, महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग विभागाच्यावतीने दि. 18 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबरपर्यंत प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. राज्यातील अमरावती, जळगाव, सांगली, सातारा, वर्धा, रायगड, पालघर, या शिवाय इतर जिल्ह्यातील ग्रामीण उद्योजक या प्रदर्शनात सहभागी झाले आहेत. महाबळेश्वर येथील मध व वर्धा येथील सेवाग्रामची खादी तसेच लाकडी वस्तू, मसाले, देशी गाईचे तूप, तांब्यावरील नक्षीकाम केलेली भांडी, दिवाळीसाठी लागणाऱ्या शोभेच्या वस्तू, साबण व इतर गृहोपयोगी वस्तू या प्रदर्शनात विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

उद्योग विभागाचे मंत्री उदय सामंत, प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, यांच्या मार्गदर्शनात तर महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंशू सिन्हा यांच्या नेतृत्वात हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

विलंबाने जीएसटी भरणाऱ्या करदात्यांवर कठोर कारवाई महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाची माहिती

मुंबई, दि. 18 : वस्तू आणि सेवा कर कायदा, 2017 अंतर्गत नोंदणीकृत करदात्याने जीएसटी विवरणपत्राद्वारे सरकारी तिजोरीत जमा करणे अनिवार्य असताना अनेक करदाते विलंबाने जीएसटी भरतात. यामुळे करचोरी व गैरमार्गांना वाव मिळत असल्याने अशा करदात्यांवर कार्यवाही केली जाणार असल्याचे महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

जीएसटी विवरणपत्र भरण्याची प्रक्रीया सोपी असून देखील अनेक करदाते वेळेवर जीएसटी विवरणपत्र भरत नाहीत. नमुना जीएसटीआर-3 बीइ हा दर महिन्याला / तिमाहीत दाखल केल्या जाणाऱ्या विवरण पत्राद्वारे विक्रीचे आकडे, इनपुट टॅक्स क्रेडिटचे दावे आणि देय निव्वळ कर नोंदवले जातात. निव्वळ कर दायित्व रोख किंवा उपलब्ध इनपुट टॅक्स क्रेडिटद्वारे प्रदान केले जाते. जीएसटी कायद्यातील तरतुदींनुसार, जीएसटी विवरणपत्र न भरल्यास विलंब शुल्क आणि व्याज आकारले जाते. पुढे करकसूरदारांना नमुना जीएसटीआर – 3 ए मध्ये नोटीसा बजावल्या जातात. नियमांचे पालन न झाल्यास अशा थकबाकीदारांचे एकतर्फी कर निर्धारण करण्याची तरतूद आहे. सतत सहा महिन्यांपर्यंत जीएसटी विवरणपत्र न भरल्यास अधिकाऱ्याकडून नोंदणी रद्द करण्याची कारवाई देखील होत असते.

बहुतेक कसुरदार वारंवार जीएसटी विवरणपत्र उशिरा भरतात. एकाच वेळी सर्व प्रलंबित विवरणपत्रानंतर अल्प विलंब शुल्कासह सर्व कालावधीचे विवरणपत्र एकत्र दाखल करतात. परिणामी, व्यवहारपुस्तकांमध्ये फेरफार / बनावट कागदपत्रे तयार करण्यास वाव मिळतो, जीएसटी विवरणपत्र भरण्यास पुरेसा वेळ मिळतो. यामुळे करचोरीची शक्यता वाढून सरकारचे आर्थिक नुकसान होते, असे जीएसटी विवरणपत्राच्या विश्लेषणातून विभागाच्या लक्षात आले आहे.

विभागाने अशा कसुरदारांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. जाणीवपूर्वक असा प्रकार करणाऱ्या कसुरदार करदात्यांचे प्रकरण आता जीएसटी लेखापरीक्षणाच्या अधीन केले जाणार आहे. हे लेखा परीक्षण व्यवसायाच्या ठिकाणी केले जाईल. जीएसटी अधिकारी थकबाकीदार करदात्याच्या व्यवसायाच्या ठिकाणी भेट देऊन तेथे छाननी आणि पडताळणी करतील. जीएसटी लेखा परीक्षणादरम्यान, सर्व हिशोब पुस्तके, कच्चा माल, तयार माल आदींची छाननी आणि पडताळणी होईल व त्यानंतर जीएसटी कायद्यातील तरतुदींनुसार कारवाई सुरु केली जाणार आहे.

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन

मुंबई, दि. 18 : येत्या 22 तारखेपासून दिवाळी सुरू होत असून सणासाठी म्हणून राज्य शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन आणि निवृत्ती वेतन देण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे.

एरव्ही ऑक्टोबरचे वेतन नोव्हेंबरमध्ये होत असते. मात्र दिवाळी 22 ऑक्टोबरपासून असल्यामुळे सणानिमित्त खरेदी व इतर कारणांसाठी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन मिळावे म्हणून हा निर्णय घेण्यात आला.

या निर्णयाचा लाभ जिल्हा परिषद मान्यताप्राप्त व अनुदानित शैक्षणिक संस्था कृषी विद्यापीठे व अकृषी विद्यापीठे यातील कर्मचाऱ्यांना होईल.

वेतन देयके त्वरित कोषागार कार्यालयात दाखल करण्यासंदर्भात देखील सूचना देण्यात आल्या आहेत.

राष्ट्रवादी  काँग्रेस-काँग्रेसच्या  गैरकारभाराची  पुणेकरांना शिक्षा – भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांचा आरोप

पुणे- मुळा-मुठा नद्यांना 58 वेगवेगळ्या भागांत मिळणार्‍या ओढे-नाल्यांपैकी 32 ठिकाणच्या ओढे-नाल्यांचे प्रवाह राष्ट्रवादी काँग्रेस आणि  काँग्रेसच्या पन्नास वर्षांच्या सत्ताकाळात बुजविण्यात आले. त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले. राष्ट्रवादी  काँग्रेस आणि काँग्रेसच्या  या गैरकारभाराची शिक्षा पुणेकरांना भोगावी लागत असून, शहरात पावसाच्या अतिवृष्टीमुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होत आहे, असा आरोप भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केला. 

काल झालेल्या अतिवृष्टीमुळे शहराच्या विविध भागांतील रस्त्यांना ओढ्या-नाल्यांचे स्वरूप आले होते, वाहतुकीची कोंडी होऊन वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. घरांमध्ये आणि मोठमोठ्या इमारतींमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची गैरसोय झाली. याबाबत चर्चा करण्यासाठी मुळीक यांच्या नेतृत्वाखाली शहर भाजपच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेतली. त्यानंतर मुळीक पत्रकारांशी बोलत होते. सरचिटणीस गणेश घोष, राजेश येनपुरे, दीपक पोटे, योगेश मुळीक, धनंजय जाधव, रवी साळेगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. 
मुळीक म्हणाले, “14 मार्च 2022 रोजी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने महापालिकेत प्रशासक म्हणून आयुक्तांची नियुक्ती केली. महापालिकेत सत्तेत असलेल्या भाजपला बदनाम करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने प्रशासकावर दबाव आणून पावसाळापूर्व कामे रोखून धरली. ही कामे वेळेत पूर्ण करावीत यासाठी भाजपच्या शिष्टमंडळाने वारंवार आयुक्तांच्या भेटी घेतल्या आणि सूचना केल्या. परंतु महाविकास आघाडी सरकारने केलेल्या राजकारणामुळे पुणेकरांना पूरसदृश्य परिस्थितीमुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे.”

मुळीक म्हणाले, “मेट्रो, स्मार्ट सिटी, समान पाणीपुरवठा अशी विविध विकासकामे शहरात सुरू आहेत. या कामांमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे का? त्याची माहिती घेण्यासाठी स्वतंत्र संस्थेची नियुक्ती करावी. आपत्कालीन कक्षामधील कर्मचार्‍यांची संख्या वाढवावी, या कक्षासाठी पूर्णवेळ अधिकारी उपलब्ध करून द्यावा, अशा मागण्या करण्यात आल्या होत्या. त्याला मान्यता देऊन तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश आयुक्तांनी प्रशासनाला दिल

कोंढवा, एनआयबीएम, कात्रज परिसरातील विस्कळीत वीजपुरवठा सुरळीत

पुणे -: पुणे शहर व परिसरात सोमवारी (दि. १७) रात्री नऊच्या सुमारास ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस झाला. काही वेळातच सखल भागामध्ये पाणी साचले. घरांमध्ये तसेच सोसायट्यांमध्ये पाणी शिरले. परिणामी महावितरणच्या वीजयंत्रणेला तडाखा बसला. यामध्ये प्रामुख्याने रास्तापेठ व पद्मावतीसह पर्वती, बंडगार्डन विभागामधील २२ केव्ही क्षमतेच्या ११ वाहिन्यांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. महावितरणचे अभियंते व कर्मचाऱ्यांना रात्रभर पावसात दुरुस्ती कामाला वेग देत पहाटेपर्यंत टप्प्याटप्प्याने सर्वच ११ वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा सुरु केला. तसेच सकाळी १० वाजेपर्यंत जलमय परिसरातील ९९ टक्के ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. दुपारी ४ वाजेपर्यंत उर्वरित ग्राहकांकडील वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात येत आहे.

दरम्यान, पावसाचा कहर आणखी दोन दिवस राहणार असल्याची शक्यता असल्याने महावितरणचे पुणे परिमंडलातील अभियंते व कर्मचाऱ्यांना सुरळीत वीजपुरवठा तसेच वीज सुरक्षेबाबत उपाययोजना करण्यासाठी सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सोमवारी रात्रीच्या मुसळधार पावसाच्या तडाख्यामुळे रास्तापेठ विभागातील एनआयबीएम परिसर, सह्याद्री पार्क, साळुंखे विहार, कोंढवा, जेके पार्क, कुमार पृथ्वी, काकडेवस्ती, नंदादीप सोसायटी, कौसरबाग, टिळेकरनगरचा काही परिसर, सेरेना सोसायटी, दगडेवस्ती, धर्मावत पेट्रोल पंप परिसर, सांकला सोसायटी, शांतीबन, साईबाबानगर आदी परिसर तसेच पद्मावती विभागातील गंगाधाम, भिलारेवाडी, कात्रज, इस्कॉन मंदिर परिसर, सहकारनगर, वाळवेकरनगर आदी परिसरातील वीजयंत्रणेजवळ पाणी साचल्यामुळे वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. या भागात पावसाचे पाणी साचले होते. रस्त्याच्या कडेला असलेल्या फिडर पिलर, रिंगमेन युनिटमध्ये तसेच अनेक सोसायट्यांच्या मीटरबॉक्समध्ये व घरांमध्ये पाणी शिरले. काही ठिकाणी वीजयंत्रणेवर झाडाच्या मोठ्या फांद्या पडल्या. तसेच महावितरणकडून सुरक्षिततेचा उपाय म्हणून वीजपुरवठा बंद ठेवल्यामुळे रास्तापेठ व पद्मावतीसह पर्वती, बंडगार्डन विभागातील एकूण १८४ रोहित्रांवरील सुमारे ७७ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. मात्र महावितरणचे अभियंते व कर्मचाऱ्यांनी रात्रभर भर पावसात काम करून सकाळी आठ वाजेपर्यंत १६२ रोहित्रांवरील सुमारे ७० हजार ५०० ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत केला. उर्वरित २२ रोहित्रांवरील सुमारे ६५०० ग्राहकांचा वीजपुरवठा दुपारी ४ वाजेपर्यंत पूर्ववत करण्यात येत आहे. मात्र सखल भागात साचलेल्या पाण्याचा निचरा होत नसल्याने वीजपुरवठा सुरळीत करण्यास उशिर होत होता. तसेच काल रात्री झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे शहराच्या इतर काही भागात विस्कळीत झालेला वीजपुरवठा देखील सुरळीत करण्यात आला आहे.

पर्यावरणीय बदलांमुळे दुष्काळी भागात पूरस्थिती – कौस्तुभ दिवेगावकर..हरितदृष्टी पुस्तकाचे प्रकाशन

पुणे : पर्यावरण बदलाचा परिणाम सर्वत्र दिसत आहे. दुष्काळी भाग जिथे सलग तीन दिवस पाऊस पडत नसे. तिथे आता पूर येऊ लागला आहे. उस्मानाबादमधील दुष्काळी भाग भूम-परंडा-वाशी इथे गेल्या दोन वर्षांत पूर आला. त्यातून १,२०० लोकांना वाचविले. हा बदलाचा धोका आहे. पावसाने काळी माती वाहून जाते. मग त्या शेतकऱ्याने करायचे काय? काळी माती पुन्हा टाकण्यासाठी पाच लाखांचा खर्च येतो. मुलीचे लग्न करायचे की शेती पाहायची? या जगण्याच्या द्वंदात शेतकरी अडकला आहे, अशी खंत बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामविकास प्रकल्पाचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर यांनी व्यक्त केली. हे बदल थांबवायचे असतील, तर प्रत्येकात हरितदृष्टी असायला हवी, अशी अपेक्षाही व्यक्त केली.

वनराई व हरिती प्रकाशनातर्फे प्रकाशित हरितदॄष्टी जैवविविधता आणि शाश्वत विकासाचे शिक्षण या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारीया, विश्वस्त धन्यकुमार चोरडीया, सचिव अमित वाडेकर, टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे सहयोगी प्राध्यापक डॉ. संजीव चांदोरकर, लेखक बसवंत विठाबाई बाबाराव, दीपक कसाळे उपस्थित होते. सूत्रसंचालन अनिल जायभाये यांनी केले.

चांदोरकर म्हणाले, पर्यावरण बदलामुळे पाकिस्तानात पूर आला. परदेशात वणवे पेटत आहेत. शहरे पाण्याखाली येत आहेत. पर्यावरणाला आता गंभीरपणे घ्यायला हवे. न जन्मलेल्या भावी पिढीला आपण कोणती पृथ्वी देणार आहोत? पृथ्वी, पर्यावरण हे विकत घेता येत नाही. हा प्रश्न सामुदायिकपणे सोडविण्याचा

आहे. एकट्याने सुटणार नाही. त्यासाठी खरं म्हणजे, राजकीय सत्तेने पुढाकार घ्यायला हवा. त्यासाठी नागरिकांनी राजकीय सत्तेवर चर्चा करायला हवी. वंचितांचे प्रमाण जास्त आर्थिक विकास व पर्यावरण यात वाद आहे. पर्यावरणवाद्यांना विकास-विरोधी ठरवतात. एकच लेबल लावले जाते. जगातील ८०० कोटी लोकांपैकी ६०० कोटी अजूनही चांगल्या जगण्यापासून वंचित आहेत. पर्यावरणावरील समस्या सोडविण्यासाठी संशोधनच केले जात नाही. त्यावर खर्च होत नाही. कार्पोरेट हा मदमस्त बैल आहे. स्वतःच्या मनाने तो मदमस्त बैल पर्यावरण नष्ट करू पाहत आहे. कार्पोरेटच्या नाकात वेसण घालण्याचे काम राजकीय शक्ती करू शकते. राजकारण म्हणजे उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे नव्हे. राजकारण म्हणजे पॉलिसी बनविणं, कायदा बनविणं आहे. त्यासाठी आपण बोलले पाहिजे.

रवींद्र धारिया म्हणाले की, पर्यावरणीय प्रश्नांवर काम करणारे बसवंत सारखे तरुण, पुढच्या पिढ्यांसाठी पथदर्शी काम करत आहेत. हे खूप आश्वासक आहे. त्यांचे दैनंदिन जीवनतील अनुभव इतरांना पर्यावरणाच्या प्रश्नाकडे डोळसपणे पाहण्यासाठी उपयुक्त ठरतील.

पर्यावरणीय प्रश्नांकडे संवेदनशील पाहणे गरजेचे – बसवंत बाबाराव

आपल्या भोवती असलेल्या पर्यावरणाची माहिती करुन घेणे व त्याचा मानवाशी असलेला संबंध जाणून घेणे महत्वाचे आहे. आपले अस्तित्व आपल्या भोवती असलेल्या भौतिक व जिवित पर्यावरणाच्या प्रकृती व सुस्थितीवर अवलंबून आहे. आपली प्रत्येक कृती व्यक्तिगत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे पर्यावरणावर काहीना काही परिणाम करत असते. त्यामुळे पर्यावरणीय प्रश्नांकडे संवेदनशील पाहणे गरजेचे असल्याचे लेखक बसवंत बाबाराव म्हणाले.

क्रोमाचे फेस्टिवल ऑफ ड्रीम्स कॅम्पेन तुमची दिवाळी स्वप्नपूर्तीच्यारंगांनी उजळवेल

  • टीव्ही, वॉशिंग मशिन्स, लॅपटॉप्स, स्मार्टफोन्स आणि इतर अनेक उत्पादनांवर मिळवा आकर्षक डील्स!

भारतीयांचा सर्वात आवडता आणि वर्षातील सर्वात मोठा सण दिवाळीचे स्वागत करण्यासाठी अवघा देश सज्ज होत असतानाभारतातील पहिले आणि सर्वात विश्वासाचे ओम्नी-चॅनेल इलेक्ट्रॉनिक्स रिटेलर व टाटा समूहातील एक ब्रँड क्रोमाने आपल्या फेस्टिवल ऑफ ड्रीम्स कॅम्पेनमध्ये अशा काही अभूतपूर्व ऑफर्स सादर केल्या आहेत ज्या तुमचा आनंद द्विगुणित करतील. ३० ऑक्टोबर २०२२पर्यंत क्रोमामध्ये केलेल्या खरेदीवर ग्राहकांना सर्वोत्तम डील्स आणि डिस्काऊंट्स मिळवता येतील.

दुर्लक्ष करताच येणार नाही अशा डील्सचा लाभ घ्या आणि परिपूर्ण दिवाळी साजरी करा. कमी किंमतींची पुरेपूर हमी आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांची सर्वात विशाल श्रेणी देणारे क्रोमा परफेक्ट दिवाळी गिफ्ट खरेदीसाठी सर्वोत्तम फेस्टिवल डेस्टिनेशन आहे. विविध बँकांच्या कार्डांवर १०% इन्स्टंट डिस्काऊंट्स देखील ग्राहकांना याठिकाणी मिळवता येतील.

थ्री-स्टार फ्रॉस्ट-फ्री इन्व्हर्टर कन्व्हर्टिबल रेफ्रिजरेटर्सच्या किमती २३,९९० रुपयांपासून पुढे आहेत. ऑक्टोबर हीट सुरु होत आहेव्होल्टास आणि सॅमसंगचे कन्व्हर्टिबल एसी सर्व स्टोर्समध्ये तसेच ऑनलाईन दर महिन्याला २,९९९ रुपयांपासून पुढील किमतीला विकत घेता येतील. ६ किलो क्षमतेच्या फुली ऑटोमॅटिक फ्रंट लोड वॉशिंग मशिन्सच्या किमती २०,९९० रुपयांपासून पुढे आहेतसॅमसंगच्या ८ किलो क्षमतेच्या फुली ऑटोमॅटिक वॉशिंग मशिन्स दर महिन्याला फक्त ३,३३३ रुपयांपासून पुढे ईएमआय भरून विकत घेता येतील.

सॅमसंगरियलमी आणि वनप्लस यासारख्या ब्रँड्सचे श्रेणीतील सर्वोत्तम ५जी स्मार्टफोन १३,९९९ रुपयांपासून पुढील किमतींना उपलब्ध आहेत. इतकेच नव्हे तरस्मार्टफोन्सच्या खरेदीवर ग्राहकांना ४,९९९ रुपयांचे स्मार्टवॉच मोफत भेट म्हणून मिळत आहे.

यंदाच्या फेस्टिव्ह सीझनमध्ये लॅपटॉप अपग्रेड करा आणि स्वतःचे स्वप्न पूर्ण करा कारण क्रोमामध्ये ११ जेन इंटेल कोर आय३ लॅपटॉप्सच्या किमती ३१,९९० रुपयांपासून पुढे आहेत तर रायझेन ३ एएमडी लॅपटॉप्सच्या किमती २६,९९० रुपयांपासून पुढे आहेत.

गेल्या दशकभरापासून सणासुदीच्या काळात स्मार्टफोन्स आणि टीव्हीने बेस्टसेलरचा खिताब कायम राखला आहे. या उत्पादन विभागांमध्ये तंत्रज्ञान वेगाने सुधारत आहेएलईडीओएलईडी स्क्रीन्ससारखे नवनवीन तंत्रज्ञान घेऊन आपल्या स्क्रीन्स अपग्रेड करण्यासाठीअधिक चांगले सॉफ्टवेयर इंटिग्रेशन मिळवण्यासाठीरेजोल्यूशन वाढवण्यासाठी ग्राहक उत्सुक आहेत. वेब-बेस्ड कन्टेन्ट पाहण्यासाठी उत्सुक ग्राहकांची संख्या वाढत असल्याने मागणीत होत असलेली वाढ लक्षात घेऊन सॅमसंग क्यूएलईडी टीव्ही दर महिन्याला फक्त १,९९० रुपयांना विकत घेता येणार आहे. याशिवाय एलईडी टीव्हींवर क्रोमा ५ वर्षांपर्यंतची वॉरंटी देखील देत आहे.

ग्राहकांच्या होम थिएटर अनुभवात वाढ करण्यासाठी साउंडबारच्या किमती फक्त २,७९९ रुपयांपासून पुढे ठेवण्यात आल्या आहेत तर ब्ल्यूटूथ स्पीकर्सच्या किमती ४९९ रुपयांपासून पुढे व पार्टी स्पीकर्सच्या किमती २,१९९ रुपयांपासून पुढे आहेत.

क्रोमाने स्वतःच्या ब्रँड उत्पादनांवर देखील विविध विभागांमध्ये अनेक आकर्षक फेस्टिव्ह डिस्काऊंट्स देऊ केले आहेत. क्रोमा ३०७लिटर थ्री-स्टार फ्रॉस्ट फ्री इन्व्हर्टर रेफ्रिजरेटर फक्त २६,९९० रुपयांपासून पुढील किमतीला उपलब्ध आहे. क्रोमा फायर टीव्हीची किंमत फक्त १०,९९० रुपयांपासून पुढे आहे.

क्रोमा-इन्फिनिटी रिटेल लिमिटेडचे एमडी आणि सीईओ श्री. अविजीत मित्रा यांनी सांगितले, “क्रोमामध्ये आम्ही फेस्टिव्ह सीझनसाठी अतिशय उत्सुक आहोत आणि स्वातंत्र्यदिन व ओणम सेलमध्ये देशभरातून मिळालेल्या प्रचंड प्रतिसादाला अनुसरून याही वेळी दोन अंकी वृद्धी नोंदवली जाईल अशी आमची अपेक्षा आहे. देशभरातील आमच्या स्टोर्समध्ये गॅजेट अपग्रेडेशनसाठी उत्सुक ग्राहकांचा आनंद पाहायला मिळत आहे. आम्ही त्यांच्यासाठी अभूतपूर्व ऑफर्स व आकर्षक गॅजेट्स सज्ज ठेवली आहेत.  यंदाच्या फेस्टिव्ह सेलमध्ये आमच्या ग्राहकांना आनंददायी अनुभव मिळवून देण्याचा आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू.”

पावसाने वित्तहानी झालेल्या पुण्यातील व्यावसायिकांना भरपाई मिळावी- विशाल धनवडे

पुणे – काल झालेल्या पावसामुळे पुराचे पाणी आणी मोठया प्रमाणात नागरिकांच्या घरात घाण पाणी गेल्याने खूप मोठे नुकसान झाले आहे तसेच बऱ्याच व्यवसायिकाच्या दुकानात पाणी गेल्याने मालाचे नुकसान झाले आहे. नागरिकांची दिवाळी खराब झाली आहे प्रशासन हतबल झाले आहे. आपत्ती व्यवस्थापन फक्त कागदावर आहे. सरकारला विनंती आहे सदर ठिकाणी पाहणी करून नागरिकांना नुकसान भरपाई म्हणुन मदत करावी. अशी मागणी शिवसेनेचे माजी नगरसेवक विशाल धनवडे यांनी केली आहे.

दरम्यान त्यांनी सांगितले की,काल झालेल्या अतिवृष्टी मुळे झालेल्या भागाची पाहणी करण्याकरिता महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी भेट दिली वपाहणी करून कायम स्वरूपी असलेल्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासित केले आहे. नाल्याचे रुंदीकरण तसेच कलव्हर्टचे काम करून पुलाची उंची वाढवून देण्याचे तसेच लक्ष्मी रोड वरील ड्रेनेज लाईन मोठ्या व्यासाची करण्यासाठी आदेश दिले आहेत तसेच जिल्हाधिकारी यांच्यासोबत बोलून पंचनामे करण्यासाठी आदेश दिले आहेत.

ग्रामपंचायत निवडणूकीत कोकणात भाजपच नंबर १ चा पक्ष -सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री रविंद्र चव्हाण



मुंबई, दि. १८- महाराष्ट्रात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजपाला दमदार यश मिळाले असून कोकणातील सर्व जिल्ह्यांच्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्येही भाजप पुन्हा एकदा नंबर वन चा पक्ष ठरला आहे. गेली अनेक वर्षे कोकण हा आमचाच बालेकिल्ला असल्याचा सातत्याने दावा करणा-या शिवसेनेला या निकालामुळे चोख प्रत्युत्तर मिळाले असल्याची प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालक मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली.
प्रसिध्दी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना मंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले की, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या पाच ग्रामपंचायमधील ५७४ जागांपैकी भाजपाने १९० जागांवर विजयी मिळवित आपले निर्विवाद वर्चस्व निर्माण केले आहे. पंचायत ते पार्लमेंट पर्यंतच्या सर्व निवडणुकांमध्ये यापुढेही भाजप विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करीत राहिल. तसेच कोकणामध्ये भाजपा आता अतिशय प्रभावीपणे संघटनात्मक व राजकीयदृष्टया पुढे जाण्यास सुरुवात झाली आहे असेही मंत्री रविंद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले.
ग्रामपंचयातीच्या निवडणुकांमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनामुळे हे दमदार यश प्राप्त झाले आहे, असेही रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.

हर्षल दाणी, पुष्कराज, अनिरुद्ध, ओंकार तिसऱ्या फेरीत

व्ही. व्ही. नातू स्मृती अखिल भारतीय बॅडमिंटन स्पर्धा

पुणे: महाराष्ट्राच्या हर्षल दाणी, पुष्कराज कुंभार, अनिरुद्ध मयेकर, ओंकार पालकर यांनी पुणे जिल्हा आणि मेट्रोपोलिटन बॅडमिंटन संघटनेच्या (पीडीएमबीए) वतीने आयोजित व्ही. व्ही. नातू स्मृती वरिष्ठ गटाची अखिल भारतीय मानांकन बॅडमिंटन स्पर्धेच्या पात्रता फेरीत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून आगेकूच केली.

शिवाजीनगर येथील पीडीएमबीएच्या मॉडर्न स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, पीवायसी, लक्ष्मी क्रीडा मंदिर आणि सीओईपी इंजिनीअरिंग कॉलेजच्या कोर्टवर या स्पर्धेच्या पात्रता फेरीचे सामने सुरू आहेत.

पहिल्या फेरीत अग्रमानांकित हर्षल दाणीला पुढे चाल मिळाली होती. यानंतर त्याने दुसऱ्या फेरीत राजस्थानच्या शुभम पटेलला १५-६, ५-१५, १५-८ असे नमविले. पुष्कराजलाही पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली होती. त्याने  दुसऱ्या फेरीत दिल्लीच्या हर्ष राणाला ९-१५, १५-१२, १५-१३ असे नमविले. यानंतर अनिरुद्ध मयेकरने पहिल्या फेरीत महाराष्ट्राच्याच प्रणव कांबळेला १५-११, १५-९ असे पराभूत केले, तर  दुसऱ्या  फेरीत प्रांशू शर्मावर १५-८, १५-५ असा विजय मिळवला. यानंतर ओंकार पालकरने सचिन रावतवर १५-११, १०-१५, १५-१३ असा विजय मिळवला. पहिल्या फेरीत ओंकारला पुढे चाल मिळाली होती. वसीम शेखने दारस लिबर्टीवर १५-७, १५-५ असा विजय मिळवून आगेकूच केली.

पात्रता फेरीचे काही निकाल : पुरुष एकेरी : दुसरी फेरी – वेदांत शर्मा वि. वि. वेदांत सरदेशपांडे १५-५, १५-८, आयूष बम्मू वि. वि. प्रणव लोखंडे १५-५, १५-८, सात्विक प्रशार वि. वि. सिद्धेश पालवे १५-४, १५-१२, अंकित मोंडल वि. वि. पार्थ भूसार १५-६, १५-५, नवनीत मनकेनपल्ली वि. वि. कृष्णा जसूजा १५-१३, १०-१५, १६-१४, सनतकुमार पटवर्धन वि. वि. दिनेश बडिगेर १५-८, १५-८, मानव चौधरी वि. वि. ऋतुराज घोरपडे १५-६, १५-४, हृतिक सी. वेदांत कोळवणकर १५-११, १५-१०, सलमान महंमद वि. वि. समरजित पांडे १५-१२, ११-१५, १६-१४, अनिरुद्ध नायर वि. वि. रजत भारद्वाज १५-७, १५-११, रोहन गुरबानी वि. वि. लकी बाडलिया १५-४, १५-७.

पुरुष एकेरी : पहिली फेरी – शुभम पटेल वि. वि. नितीन मेहरा १५-९, १५-८, आयूष बाम्मू १५-५, १५-२, यश कुलथे वि. वि. अतीक्ष जाठर १५-१३, १५-१७, १५-११, साहिल ठाकूर वि. वि. सिद्धार्थ देशपांडे १५-११, १५-११, यश पवार वि. वि. राहुल डी. १५-८, १५-६, प्रभू के. वि. वि. आदित्य त्रिपाठी १५-११, १५-१३, विनयकुमार रेड्डी वि. वि. अंश मेहता १५-९, १७-१९, १५-१३, पार्थ भूसार वि. वि. प्रमोद १५-११, १५-९, श्री गुणा श्रीकर वि. वि. आर्यवीर देशमुख १५-८, १५-३, कृष्णा जसुजा वि. वि. आकाशसिंग राजपूत १५-११, १५-९, शशांक शेखर सिंग वि. वि. आदित्य पिंपळनेरकर १५-१०, १५-९, ऋतुराज घोरपडे वि. वि. ब्रिजेंद्र परिहार १५-८, १५-९, समरजित पांडे वि. वि. उज्ज्वल नारद १५-१३, १५-११, अनिरुद्ध नायर वि. वि. अंकुश जोशी १५-६, १५-८, सिद्धार्थ दास वि. वि. निहाल पाटील १५-८, १२-१५, १५-१३, हर्ष शर्मा वि. वि. अहान पाठक १५-९, १५-६.

1 हजार तलाठी भरती प्रक्रियेला गती देण्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे निर्देश

मुंबई, दि. 17 : महसूल विभागाअंतर्गत तलाठी भरती प्रक्रिया करण्यात येणार आहे. प्रथम टप्प्यात तलाठी संवर्गातील भरण्यात येणाऱ्या 1 हजार पदांच्या भरती प्रक्रियेला गती देण्यात यावी असे निर्देश महसूलमंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांनी आज दिले.

महसूल मंत्री श्री. विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव असिम गुप्ता, महसूल विभागाचे सहसचिव श्रीराम यादव, सहसचिव संजय बनकर यांच्यासह महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

श्री. विखे-पाटील म्हणाले की, गावात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा तलाठी यांच्याशी संबंध येत असतो. सातबारा, दाखले यासाठी नियमितपणे तलाठी यांच्या संपर्कात राहावे लागते. सध्या तलाठ्याकडे 3 ते 4 गावांचा पदभार असल्याने गावोगावी जावे लागते. गावोगावच्या कार्यालयीन कामकाजाचे नियोजन करताना वार ठरवून घेण्याबरोबरच वेळही ठरवून घेणे आवश्यक आहे. शेतकरी वर्ग सकाळच्या वेळातच महसूल किंवा तहसील कार्यालयात येत असल्याने तलाठी वर्गाने सकाळच्या वेळेत लवकर कामांचे नियोजन करणे आवश्यक आहे. तलाठी भरतीमुळे सध्या कार्यरत असलेल्या तलाठी वर्गाचा भार कमी होण्यास मदत होणार असून यामुळे भरती प्रक्रियेला गती देण्यात येईल.

तलाठी/ पटवारी आणि मंडळ अधिकारी यांना प्रवास भत्त्यात वाढ देणे, कार्यालयीन भाडे देणे तसेच लॅपटॉप आणि प्रिंटर देण्याबाबत विभागाने कार्यवाही करावी. याशिवाय महसूल विभागाअंतर्गत नायब तहसीलदार परीक्षा आणि पदोन्नतीबाबतचे निकष तपासून याबाबत बैठकीचे नियोजन करण्यात येईल, असेही मंत्री श्री. विखे-पाटील यावेळी म्हणाले.