Home Blog Page 1562

सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडेंचा भाजपकडून अपमान ?

मुंबई-सत्ता आल्यावर भाजपचा उदोउदो करणाऱ्या बॉलीवूड मधील जैकी श्रॉफच्या मुलासाठी सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांचा भाजपने अपमान केला आहे, असा आरोप शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते सचिन अहीर यांनी केला आहे.भाजपने वरळी येथे आयोजित केलेल्या दीपोत्सवाच्या कार्यक्रमात हा प्रकार घडला. विशेष म्हणजे या कार्यक्रमाचा हा प्रसंग सांगणारा व्हिडीओही तितकाच बोलका आहे.

भाजपच्या वतीने वरळीतल्या जांबोरी मैदानावर दीपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांचे गाणे ठेवण्यात आले होते. कार्यक्रम सुरू झाला. मात्र, तितक्यात प्रसिद्ध अभिनेता टायगर श्रॉफ आला. यावेळी त्याचा सत्कार करण्यात आला. आता त्यावरून ठाकरे शिवसेनेने भाजपला लक्ष्य केले आहे.टायगर श्रॉफ कार्यक्रमात आला. व्हिडीओमध्ये तो भाजप नेत्यांसोबत स्टेजवर आलेला दिसतो. यावेळी राहुल देशपांडे यांचे गाणे थांबलेले असते. ते म्हणतात, तुम्ही वीस मिनिटे थांबा. त्यानंतर सत्कार करा. हे बोलून मिनिटही झालेला नसतो. मात्र, तितक्यात स्टेजवरच्या दुसऱ्या बाजूला टायगर श्रॉफचा सत्कार करण्यात येतो.

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते सचिन अहीर यांनी या साऱ्या प्रकरणारवर व्हिडीओ पोस्ट करून एक ट्विट केले आहे. त्यात ते म्हणतात की, हाच का मराठी कलाकारांचा सन्मान….!!!! भाजपने आयोजित केलेल्या वरळीतल्या जांबोरी मैदानावरी दीपोत्सवात मराठी कलाकारांची चेष्टा केली, असा उल्लेख त्यांनी केला आहे.

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी वैश्विक ओळखपत्राचे (युडीआयडी कार्ड) वितरण

मुंबई, दि. 20 : मुंबई उपनगरातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी वैश्विक ओळखपत्राचे (UDID CARD) वितरण सुरु झाले आहे. दिव्यांगानी वैश्विक ओळखपत्र चेंबूर, कलेक्टर कॉलनी येथील रोचीराम टी थडानी स्कूल फॉर हिअरिंग हॅन्डीकॅप येथून या ओळखपत्राचे  वितरण सुरु असल्याची माहिती मुंबई उपनगरच्या समाजकल्याण सहायक आयुक्त यांनी दिली.

वैश्विक ओळखपत्राद्वारे केंद्राच्या व राज्य सरकारच्या विविध योजना व सवलतींचा लाभ दिव्यांगांना घेता येतो. मुंबई उपनगरातील दिव्यांगांनी सोमवार ते शुक्रवार या दिवशी कार्यालयीन वेळेत आपले आधार कार्ड घेऊन वैश्विक ओळखपत्र (UDID CARD) प्राप्त करून घ्यावे, असे अवाहनही त्यांनी केले.

एकल वापर प्लास्टिकबंदीची कडक अंमलबजावणी करणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

मुंबई, दि. 20 : राज्यात एकल वापर प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली असून या निर्णयाची कडक अंमलबजावणी करण्यात येईल, अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दिली. शालेय विद्यार्थ्यांसह मंत्रालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ दिली, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

वातावरणीय बदलांचे दुष्परिणाम सर्वत्र जाणवत आहेत. यामुळे पर्यावरण रक्षणाची आवश्यकता लक्षात घेऊन प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रदूषण मुक्त दिवाळी संकल्प अभियान 2022 अंतर्गत प्रदूषणमुक्त दिवाळीची शपथ दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, सहकार मंत्री अतुल सावे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, मुख्य सचिव मनुकमार श्रीवास्तव, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे सचिव प्रवीण दराडे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आबासाहेब जऱ्हाड यांच्यासह मुंबई महानगरपालिकेच्या घाटकोपर आणि कुलाबा येथील शाळेतील तसेच कमला मेहता अंध विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थी यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात उपस्थित होते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि शासनाचा पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, “कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे असलेले निर्बंध संपून आता सर्व सण उत्साहात साजरे केले जात आहेत. दिवाळी सण देखील उत्साहात साजरा करताना पर्यावरणाचा समतोल राखणे गरजेचे आहे”. मागील काही वर्षे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. परिणामी ध्वनी आणि हवेतील प्रदूषणाचे प्रमाण कमी होत असल्याबद्दल त्यांनी मंडळाचे कौतुक केले.

विद्यार्थ्यांच्या माध्यमातून घरोघरी संदेश पोहोचतो त्‍यामुळे दरवर्षी प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्तीची शपथ देण्याचा उपक्रम राबविण्यात येतो. त्याचप्रमाणे वर्षभर जनजागृती करण्यात येत असल्याची पर्यावरण विभागाचे सचिव प्रवीण दराडे यांनी सांगितले.

कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सिद्धी निकम या दिव्यांग विद्यार्थीनीने आपण वसुंधरेचे रक्षक बनून पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अंगिकार करूयात, असे आवाहन यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह उपस्थित सर्वांना केले. शासनाने एकल वापराच्या प्लास्टिक वापरावर पूर्ण बंदी आणावी तर, दैनंदिन वापरात नागरिकांनी प्लास्टिकचा वापर टाळावा, अशी विनंतीही तिने केली.

शालेय विद्यार्थ्यांसाठी पर्यावरण रक्षणाची शपथ

‘भारतीय परंपरेतील सर्व सण आणि उत्सव यांचं निसर्गाशी अतूट नातं आहे. आपण साजरे करत असलेल्या उत्सवातून पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ व पर्यावरणाचा समतोल राखू.

आम्ही सर्वजण असाही संकल्प करतो की, दैनंदिन जीवनात ज्या सिंगल युज प्लास्टिकमुळे प्रदूषण होते त्याचा वापर करणे आम्ही टाळू.

आम्ही असाही संकल्प करतो की, समृद्ध पर्यावरणाच्या रक्षणाकरीता आमच्या वाढदिवसाला किमान एक झाड लाऊ व त्याचे नित्यनियमाने संगोपन करू.

दिवाळी म्हणजे लक्ष लक्ष दिव्यांचा तेजोमय प्रकाश, या दिवाळीत फटाक्यांमुळे हवेचे प्रदूषण होणार नाही याकरीता फटाके न वाजवता प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्याचा आम्ही संकल्प करीत आहोत.

आम्ही भारताचे भविष्यातील समर्थ नागरिक म्हणून सर्व विद्यार्थी शपथ घेतो की, वर्षभरातील सर्व सण व उत्सव प्रदूषण मुक्त साजरे करण्यासाठी कटीबद्ध राहू, अशी शपथ यावेळी घेण्यात आली.

००००

जागतिक नेमबाज स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणाऱ्या रुद्रांक्ष पाटील यांना २ कोटी रुपये

राज्य मंत्रिमंडळाने केले अभिनंदन

मुंबई, दि. २० – जागतिक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक पटकविणाऱ्या रुद्रांक्ष बाळासाहेब पाटील यांना रोख २ कोटी रुपये देण्याचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.

आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुद्रांक्षचे अभिनंदन केले असून राज्य मंत्रिमंडळानेही त्याच्या अभिनंदनाचा ठराव केला.

कैरो येथे झालेल्या जागतिक नेमबाजी स्पर्धेतील दहा मीटर रायफल्स स्पर्धेत भारताचा नेमबाज रुद्रांक्ष बाळासाहेब पाटील यांनी वैयक्तिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं. त्याबद्द्ल
आज बैठकीच्या सुरुवातीला मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी रुद्रांक्ष पाटीलने केलेल्या कामगिरीची माहिती दिली. २०२४ ला फ्रान्समध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेचा पहिला कोटा त्याला मिळाला आहे. रुद्रांक्ष पाटील याच्या या कामगिरीमुळे त्याचं कौतुक केलं जात आहे. वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी त्याने ही कामगिरी केली आहे.

महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यास देशाच्या संपत्तीत वाढ होईल – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पुणे, दि. १९: देशाची अर्धी लोकसंख्या असलेल्या महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यास देशाच्या संपत्तीत भरीव वाढ होईल, असे मत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

पुण्यश्री महिला बचत गटाची उत्पादने व किराणा मालाचे दुकान याजनेंतर्गत मावळ तालुक्यातील वडेश्वर येथील संतोषी माता महिला स्वयंसहायता गटाच्या दुकानाच्या उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री श्री. पाटील बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, माजी आमदार दिगंबर भेगडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक श्रीकांत कारगावकर, मावळ तहसीलदार मधुसूदन बर्गे, गटविकास अधिकारी सुधीर भागवत आदी उपस्थित होते.

पालकमंत्री यावेळी म्हणाले, पूर्वी पुरुषांच्या बरोबरीने महिला शिक्षण घ्यायच्या. मात्र इ.स. १२०० नंतर विविध परकीय आक्रमकांमुळे महिलांना कुटुंबात बंद केले गेले. शेती, युद्धात, पुरुषांच्या बरोबरीने काम करणारी महिला घरात अडकून राहिली. स्वातंत्र्यानंतर शिक्षणात महिलांचे प्रमाण वाढले परंतु अर्थार्जनात त्यांचा टक्का अजूनही कमीच आहे. त्यामुळे देशाची संपत्ती वाढण्यात महिलांचे प्रमाण कमी राहिले आहे. आता केंद्र शासन महिलांना पुरुषांच्या बरोबरीने सर्वच क्षेत्रात संधी देण्यासाठी धोरणे आणि योजना राबवत असल्यामुळे देशाची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आली आहे.

श्री. पाटील पुढे म्हणाले, देशाच्या आर्थिक विकासात महिलांचा वाटा असावा असा प्रयत्न असून त्यासाठी महिलांची बुद्धिमत्ता कामी आली पाहिजे. महिलांनी कोणताही व्यवसाय हौस म्हणून नव्हे तर उत्पन्न मिळवणे हा उद्देश ठेवून करावा.
महिलेचा केवळ गृहिणी हा परिचय असू नये तर घरात बसूनही काहीतरी उत्पादन करते आणि त्यातून पैसा कमावते ही स्थिती झाली पाहिजे.

बचत गटाच्या महिला पापड, लोणची अशा पारंपरिक उत्पादनातून सुरुवात करत आता अनेक नावीन्यपूर्ण उत्पादने तयार करत असून त्यांना विक्रीची व्यवस्था करून देण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेने पुढाकार घेतल्याबद्दल श्री. पाटील यांनी जिल्हा परिषदेचे कौतुक केले.

टाकवे ते खांडी रस्ता दुरुस्ती करण्यात येईल असे घोषित करून तात्काळ याचे अंदाजपत्रक करून पुढील प्रक्रिया करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.

यावेळी संतोषी माता बचत गटास २ लाख अनुदानाचे पत्र श्री. पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. गटाच्या एका महिलेस २० हजार याप्रमाणे १० महिलांच्या गटास २ लाख रुपये अनुदान आणि ५ लाख रुपये बँक कर्ज असे ७ लाख रुपयांतून बचत गटाने हे दुकान सुरू केले आहे.

मंत्री श्री. पाटील यांनी बचत गटाच्या १ हजार रुपयांच्या उत्पादनांची खरेदी केली. बचत गटांच्या उत्पादनांची खरेदी करून महिलांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन त्यांनी केले.

आयुष प्रसाद म्हणाले, आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत उपलब्ध करून देऊन लोकांच्या जीवनात बदल घडवण्याला प्राधान्य देण्याची पुणे जिल्हा परिषदेची भूमिका राहिली आहे. त्याच भूमिकेतून पुण्यश्री योजना राबवण्यात येत असून पुणे जिल्हा परिषदेच्या स्थापनेला ६० वर्षे होत असल्यामुळे या योजनेंतर्गत जिल्ह्यात ६० ठिकाणी दुकाने सुरू करण्यात येणार आहेत. यामुळे महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यात २ लाख ५० हजार बचत गट स्थापन झालेले आहेत. बचत गटांना गेल्यावर्षी २०२ कोटी रुपये तर यावर्षी आतापर्यंत १४० कोटी रुपये कर्ज वितरित करण्यात आले आहे.

अंगणवाड्यांच्या बांधकामासाठी १६ कोटी अनुदान देण्यात आले असून २१५ अंगणवाड्या बांधून झाल्या आहेत. त्यातील एका अंगणवाडीचे उद्घाटन पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते होत असल्याचे श्री. प्रसाद यांनी सांगितले.

यावेळी पुण्यश्री योजनेच्या बोधचिन्हाचे उद्घाटनही मंत्री पाटील यांच्या हस्ते.

कार्यक्रमास महिला व बालविकास अधिकारी विशाल कोतागडे, वडेश्वर- माऊ ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंच छाया हेमाडे, ग्रामपंचायत सदस्य, बचत गटाच्या महिला आदी उपस्थित होते.

यावेळी मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते मोरमारेवाडी अंगणवाडी केंद्राच्या नवीन इमारतीचेही उद्घाटन करण्यात आले.

पुण्याची तुंबापुरी:मंत्री चंद्रकांत पाटलांची दिलगिरी,चौकशी अन उपाय योजनेसाठी विरोधकांना बरोबर घेणार

पुणे-परवा झालेल्या तुफानी पावसाने पुण्याच्या प्रत्येकाची पाचावर धारण बसवल्यानंतर राजकीय पक्षांच्या काही जणांकडून एकमेकांवर अस्त्रे डागण्याचे प्रकार सुरु झालेले असताना पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी प्रत्यक्षात पुणेकरांची माफी मागितली आहे. पाउस जोरदार होता , ढग फुटीसारखा होता,आम्ही राज्यात सरकार मध्ये असल्याने आमची जबाबदारी निश्चित आहे, पण पी हळद आणि हो गोरी असे होत नाही त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते अजितदादा यांना मी आव्हान करतो , एकमेकांवर शेरेबाजी करण्यापेक्षा एकत्र बसून मार्ग काढू , नाले कसे रुंद करता येतील ,आणखी काय उपाय योजना करता येतील , महापालिका आणि राज्य सरकार या दोहोंकडून निधी मिळवून या समस्येवर मात करणारे काम कसे करता येईल हे प्रथम पाहू ,त्याच बरोबर यापूर्वी नाले सफाई झाली काय ? त्यात काही दोष होते काय याबाबत देखील चौकशी करू असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

 सुमारे तीन लाख रुपये किमतीचे भेसळयुक्त तूप जप्त

मुंबई, दि. 19 : दिवाळीच्या तोंडावर अन्न व औषध प्रशासन बृहन्मुंबई कार्यालयाने अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या तुप विक्रेत्यावर कारवाई केली आहे. दि. 18/10/2022 रोजी मुंबईतील प्रशासनाच्या दक्षता विभागास प्राप्त माहितीच्या अनुषंगाने मस्जिद बंदर मधील .मे. ऋषभ शुद्ध घी भांडार गोडाऊन, पहिला मजला, 15, श्रीनाथजी बिल्डिंग, केशवजी नाईक रोड, चिंचबंदर, मुंबई-9, येथील तीन तुपाचे अन्न नमुने विश्लेषनासाठी घेऊन उर्वरित 400 किलो, किंमत रु. 2,99,090/- किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे.

हे अन्न नमुने विश्लेषणासाठी पाठविण्यात आले असून, विश्लेषण अहवालाच्या अनुषंगाने पुढील आवश्यक कारवाई केली जाईल. दिवाळीसारख्या सणाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना सुरक्षित, आरोग्यदायी व सकस अन्न पदार्थ उपलब्ध व्हावेत याकरिता प्रशासनाने अन्न आस्थापनाच्या तपासण्या व अन्न नमुने तपासणीसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी दिले आहेत.

पुणे कसे तुंबले ? ५ वर्षाच्या कामांची चौकशी करा – आदित्य ठाकरे

मुंबई- पावसात तुंबली की, शिवसेनेचे सत्ता असल्याचे सांगितले जाते.आता याच वर्षी पुणे कसे तुंबले ? गेल्या पाच वर्षांत पुण्यात जे कामे झाली कि नुसतीच झाल्याचे दाखविले? त्याची चौकशी व्हावी. दोष देण्यासाठी नव्हे पण हे का झाले कसे झाले ते समजायला हवेच ना. असा हल्लाबोल करत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी भास्कर जाधवांच्या घरावर झालेल्या हल्ल्याचा समाचार देखील घेतला आहे.

भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ला झाला. काल रात्री अकरा वाजेच्या आसपास त्यांची स्थानिक सुरक्षा काढण्यात आली. त्यानंतर दोन तासांनी त्यांच्या घरावर हल्ला झाला. हा भ्याड हल्ला आहे. यामागे राजकीय पाठबळ आहे का? यामागे यंत्रणा आहे का? याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली आहे.सरकार घटनाबाह्य असून यंत्रणेचा दुरुपयोग केला जात असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

आदित्य ठाकरे म्हणाले, घरावर हल्ले होणे ही चुकीची गोष्ट आहे. राजकीय जीवनात आरोप प्रत्त्यारोप, टीका टीप्पणी होत असतात. पण घरावर आणि व्यक्तीशः हल्ले करणे योग्य नाही. पोलिस संरक्षण काढून घेणे म्हणजे कुठेतरी यंत्रणेचा गैरफायदा आणि दुरुपयोग करणे असा त्याचा अर्थ आहे.आदित्य म्हणाले, वेदांता फाॅक्सकाॅनबाबत मी बोललो तर चौकशी लावू असे सांगितले गेले. म्हणजे महाराष्ट्रावर आणि सामान्य माणसांवर जो बोलतोय, महागाईवर प्रश्न विचारणाऱ्यांना दरडवण्याचा आणि त्यांच्यावर कारवाई करण्याचा, धाक दाखवण्याचा प्रकार राज्यात सुरू आहे.

आदित्य म्हणाले, मिरवणुकीत गोळीबार होते, लोकप्रतिनिधींचे कार्यालय तोडले जाते, पण ते तोडणाऱ्या आमदारांवर गद्दारांवर कारवाई होत नाही. या राज्याचे राजकारण एवढ्या खालच्या पातळीवर कधीही गेले नव्हते. पण सध्या घटनाबाह्य सरकार असल्यामुळे हे सर्व होत आहे. राज्य सरकारकडून आम्हाला अपेक्षा नाही. ते घोषणा सरकार झाले आहे. रिकामटेकड्या होर्डिंग आणि बॅनरवर खर्च केला जात आहे, पण शेतकऱ्यांना फारशी मदत केली जात नाही.

ठाकरे शिवसेनेचे नेते भास्कर जाधवांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न

रत्नागिरी- उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांच्या रत्नागिरीतील चिपळून येथील घरावर मध्यरात्री हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे. भास्कर जाधव यांच्या घराच्या आवारात दगड, पेट्रोलच्या बाटल्या व स्टम्प आढळले आहेत.सुरक्षेची खबरदारी म्हणून पोलिसांनी भास्कर जाधव यांच्या घराचा बंदोबस्त वाढवला आहे. दरम्यान, भास्कर जाधव हे सध्या मुंबईत असून लवकरच याप्रकरणी गुन्हा नोंदवला जाणार असल्याची माहिती आहे.

खासदार विनायक राऊत म्हणाले की, भास्कर जाधव किंवा शिवसेनेच्या कोणत्याही नेत्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्यास शिवसेना शांत बसणार नाही. जशास तसे प्रत्युत्तर दिले जाईल. ज्यांनी कुणी हल्ल्याचा प्रयत्न केला, त्याला आयुष्यभराचा धडा शिकवला जाईल.एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर भास्कर जाधव सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर तसेच नारायण राणेंवर सडकून टीका करत आहेत. काल सिंधुदूर्ग येथे झालेल्या जाहीर सभेतही भास्कर जाधवांनी नारायण राणे यांचा उल्लेख कोंबडी चोर असा करत त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. या राजकीय वादाची पार्श्वभूमी या हल्ल्यामागे तर नाही ना? अशीही शंका व्यक्त केली जात आहे. नारायण राणे यांचे सुपूत्र नितशे राणे यांनी याबाबत सूचक वक्तव्य केले आहे.

नितेश राणे म्हणाले की, भास्कर जाधव हे सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच नारायण राणे यांच्यावर पातळी सोडून टीका करत आहे. नारायण राणे यांना मानणारा मोठा वर्ग राज्यात आहे. त्यामुळे राणेंवर अशी टीका झाल्यास कार्यकर्ते गप्प कसे बसणार?

ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्यापासून आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा सर्वत्र दणदणीत विजय झाल्याने, गेल्या दोन दिवसांपासून राणे विरुद्ध जाधव असा संघर्ष निर्माण झालेला असतानाच आता आमदार भास्कर जाधव यांच्या घराच्या आवारात दगड बाटल्या, स्टंम्प व अन्य वस्तू सापडल्याने पुन्हा एकदा या दोन नेत्यांमध्ये प्रत्यक्षात राडा होणार का असा सवाल उपस्थित होत आहे.

एसटी महामंडळाकडून कर्मचाऱ्यांना सरसकट ५ हजारांची दिवाळी भेट

मुंबई,  दि. १९ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एसटीच्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला सरसकट ५ हजार रुपये इतकी रक्कम दिवाळीची भेट म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी राज्य सरकारने ४५ कोटी रुपयांची आर्थिक मदत केली आहे, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली.

या निर्णयाचा फायदा सुमारे ८७ हजारांहून अधिक अधिकारी – कर्मचारी वर्गाला होणार आहे. दरवर्षी अधिकारी व कर्मचाऱ्यांना आर्थिक स्वरूपात दिवाळीची भेट दिली जाते. गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारीमुळे प्रवासी संख्या घटल्याने एसटीला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीतही महामंडळाकडून यंदा सरसकट अधिकारी व कर्मचारी वर्गाला  दिवाळी भेट म्हणून ५ हजार रुपये देण्याचा  निर्णय घेतला आहे. ही रक्कम लवकरच त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल, असेही श्री. चन्ने यांनी सांगितले.

महापालिका निवडणुकींच्या बाबतीत शिंदे – फडणवीस सरकारचा पळपुटेपणा पुन्हा एकदा उघड….

दिल्ली/ पुणे-महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टातली सुनावणी सलग तिसऱ्यांदा लांबणीवर पडली असून, त्याला केवळ महाराष्ट्रातील शिंदे- फडणवीस सरकारचा पळपुटेपणा जबाबदार असल्याचे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी म्हटले आहे.

जगताप यांनी असे सांगितले कि,’ राज्यातील १४ महानगरपालिका, २७ जिल्हापरिषद,३५०नगरपालिकांच्या निवडणुका गेल्या सहा महिन्यांपासून स्थगित असून या निवडणुका तत्काळ घेण्यात येऊन राज्यातील सुमारे ११कोटी जनतेला हक्काचे लोकप्रतिनिधी मिळावे, यासाठी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसह विविध याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. या याचिकांवर सुनावणी घेण्यासाठी कामकाजाला सुरुवात झाली असता राज्य शासनाच्या वकिलांनी मुदतवाढ मागितल्याने पहिल्यांदा ५ आठवड्याची स्थगिती, त्यानंतर आज पुन्हा राज्य शासनाच्या वकिलांनी याबाबत मुदतवाढ मागितल्याने सुनावणी न होता हा निकाल सुमारे २ आठवडे लांबणीवर पडला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्याने सुमारे ६ महिनांपासून या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रशासक नियुक्त आहेत.या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये केवळ १ प्रशासक सर्व लोकप्रतिनिधींच्या जागी कारभार पाहत असल्याने नागरिकांच्या स्वच्छ्ता,आरोग्य, शिक्षण व इतर मूलभूत सुविधांसाठी हक्काचे लोकप्रतिनिधीच नाहीत. राज्यातील सुमारे ११ कोटी जनतेला त्यांच्या हक्काचे लोकप्रतिनिधी निवडता यावे, यासाठी निवडणुका घेण्याबाबत इतक्या महत्त्वपूर्ण विषयावर असलेल्या या सुनावणीसाठी राज्य सरकार वकिलांद्वारे आपली भूमिका मांडू शकत नसतील तर शिंदे- फडणवीस सरकार लोकशाही मूल्य जपण्याबाबत किती गंभीर आहे हे यावरून स्पष्ट होते. तसेच या निवडणुका घेण्याबाबत शिंदे – फडणवीस सरकारच्या मनामध्ये जी भीती आहे ती भीती यातून स्पष्ट जाणवते.

राज्यात विश्वासघात करत, आमदार विकत घेऊन स्थापन झालेल्या शिंदे- फडणवीस सरकारला जनता येत्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत नाकारणार ही भीती स्पष्ट जाणवत असल्यानेच शिंदे- फडणवीस सरकार अश्या प्रकारे वेळकाढूपणा करत आहे.असा आरोपही त्यांनी केला.

आमचा न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास असून पुढच्या सुनावणीच्या वेळी राज्यातील ११ कोटी जनतेला हक्काचे लोकप्रतिनिधी निवडून देण्याचाबाबतचा महत्त्वपूर्ण निकाल येईल व राज्यातील प्रशासकराज संपेल अशी आम्हाला खात्री असल्याचे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी म्हटले आहे.

शेफलर इंडियाचा प्रो कबड्डी लीगच्‍या ९व्‍या सीझनसाठी पुणेरी पलटनला पाठिंबा

पुणे-शेफलर इंडियाने प्रो कबड्डी लीग संघ पुणेरी पलटण सोबत प्रायोजकत्व करारावर स्वाक्षरी केली आहे. या करारासह कंपनी सीझन ९ साठी संघाची सहयोगी प्रायोजक बनली आहे. सलग दुसऱ्या वर्षी कंपनीने या संघासोबत करार केला आहे. या प्रायोजकत्वाअंतर्गत, शेफलर विविध व्‍यासपीठांवर पुणेरी पलटण संघासाठी “पॉवर्ड बाय” भागीदार म्हणून दिसेल आणि कंपनीचा लोगो संघाच्या अधिकृत जर्सीच्या मागील बाजूस दिसेल.

या सहयोगाबाबत बोलताना शेफलर इंडियाचे भारतातील मुख्‍य कार्यकारी अधिकारी व अध्‍यक्ष (इंडस्‍ट्रीयल बिझनेस) श्री. हर्षा कदम म्‍हणाले, ‘’पुणेरी पलटन संघासोबत सलग दुसऱ्या वर्षी आमचा हा सहयोग आहे. अनेक आव्हानांना न जुमानता या संघाने अथक चपळतेसह गेल्या हंगामात त्यांची क्षमता दाखवून दिली आहे, जे शेफलरशी देखील संलग्‍न आहे. पुणेरी पलटण संघामध्‍ये तरुण व अनुभवी टॅलेण्‍ट्सचे उत्तम संतुलन आहे आणि या संघाचे अनेक चाहते आहेत. आम्ही पुन्हा एकदा त्यांच्यासोबत भागीदारी करण्यास उत्सुक आहोत आणि आम्ही आणखी एका उत्‍साहवर्धक सीझनची वाट पाहत आहोत.” 

शेफलर इंडियाच्‍या ऑटोमोटिव्‍ह आफ्टरमार्केटचे अध्‍यक्ष श्री. देबाशिष सतपती म्‍हणाले, “आम्‍हाला प्रो कबड्डी लीगच्‍या ९व्‍या सीझनसाठी पुणेरी पलटन संघाला पाठिंबा देण्‍याचा आनंद होत आहे. मागील सीझनमध्‍ये आमच्या भागीदारीमुळे आम्ही आमच्या लक्ष्यित प्रेक्षकांसह उच्च ब्रॅण्‍ड प्रतिसाद पाहिला आणि यावर्षी तो आणखी वाढवण्याचे आमचे ध्येय आहे. या सीझनमध्‍ये प्रेक्षक प्रत्‍यक्ष स्‍टेडियममध्‍ये खेळ पाहण्‍याचा आनंद घेण्‍यासाठी येणार असल्‍यामुळे आम्‍हाला मागील सीझनच्‍या तुलनेत अधिक उत्तम प्रतिसाद मिळण्‍याची अपेक्षा आहे.’’ 

पुणेरी पलटनचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. कैलाश कांडपाल म्‍हणाले, “मला शेफलरने पुणेरी पलटनसोबत पुन्‍हा सहयोग केल्‍याचा आनंद होत आहे. अद्ययावत तंत्रज्ञानामधील जागतिक अग्रगण्‍य कंपनी स्‍वदेशी खेळावर विश्‍वास दाखवते तेव्‍हा त्‍याचा अर्थ असा होतो की, खेळाडूंवर उच्‍च दर्जाची कामगिरी करण्‍याची आणि खेळाला नव्‍या उंचीवर घेऊन जाण्‍याची अतिरिक्‍त जबाबदारी वाढते. प्रेक्षकांच्‍या रेटिंग्‍जमधून प्रो कबड्डी लीग ही भारतातील दुसरी सर्वाधिक पाहिली जाणारी लीग असल्‍याचे दिसून येते. मला विश्‍वास आहे की, पुणेरी पलटन संघ शेफलरला देशभरातील ग्राहकांशी संलग्‍न होण्‍यास मदत करेल आणि ब्रॅण्‍डला या सहयोगाला फायदा होईल.’’ 

सणासुदीचा काळ सुरू असताना चाहत्‍यांसाठी अनेक सहभागात्‍मक उपक्रम, डिजिटल मोहिमा व स्‍पर्धांचे आयोजन करण्‍यात आले आहे, जेथे ब्रॅण्‍ड विविध उत्‍पादनांचे प्रमोशन करेल आणि ऑन-ग्राऊण्‍ड उपक्रम व डिलर टच पॉइण्‍ट्सच्‍या माध्‍यमातून हा सहयोग पुढे घेऊन जाईल. पुणेरी पलटन व शेफलर इंडियाचा या सहयोगाचा लाभ घेण्‍याचा आणि चाहते, ग्राहक, कर्मचारी व डिलर्सना गुंतवून ठेवण्‍यासोबत त्‍यांचे मनोरंजन करत नवीन उंची गाठण्‍याचा मनसुबा आहे.

पुणेरी पलटनने यंदा पीकेएल २०२२ ऑक्‍शनदरम्‍यान अनेक सर्वोत्तम खेळाडूंची निवड केली आहे. यामध्‍ये स्‍टार खेळाडू फजल अत्राचली, मोहम्मद इस्‍माइल नाबिबाख्‍श आणि इतर सर्वोत्तम खेळाडूंचा समावेश आहे, ज्‍यामुळे संघाची ताकद निश्चितच वाढली आहे. प्रो कबड्डी लीग २०२२ साठी संघामध्‍ये एकूण १८ खेळाडू आहेत.    

टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनच्या सदस्यांना ठाण्यातील सदनिका नियमानुसार वितरित करण्यात येणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 19 : ठाणे येथील वर्तकनगर सर्व्हे क्र. २१० येथील अल्प उत्पन्न गटातील ६७ सदनिका टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनसाठी राखीव ठेवण्याकरीता सकारात्मक विचार करुन नियमानुसार सदनिका वितरित करण्यात येणार असल्याचे उप मुख्यमंत्री व गृहनिर्माण मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

सह्याद्री अतिथीगृहात उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेली बैठक टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन सदस्यांच्या समस्यांबाबत आयोजित बैठकीत उपमुख्यमंत्री बोलत होते. यावेळी गृहनिर्माण विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर, उपमुख्यमंत्री यांचे सचिव श्रीकर परदेशी, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल दिघीकर, कोकण बोर्डचे मुख्याधिकारी यांच्यासह टीव्हीवर जर्नालिस्ट असोसिएशनचे विनोद जगदाळे, राजेश भाळकर,संतोष पालवणकर यांची उपस्थिती होती.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शासनाच्या धोरणानुसार टीव्ही जर्नालिस्ट संघटनेच्या ज्या सभासदांनी  यापूर्वी शासनाच्या कोणत्याही गृहनिर्माण योजनेचा लाभ घेतलेला नाही व ज्या सभासदांचे ठाणे महापालिकेच्या हद्दीत स्वतःचे घर नाही अशा सभासदांकरीता म्हाडाने त्वरीत सोडत काढण्याची कार्यवाही करावी व त्यांना घराचा ताबा देण्यात यावा असे निर्देश त्यांनी दिले.

ओढे ,नाले कोणी बळकावले त्यांची नावे जाहीर करा :संगीता तिवारींनी भाजपाला दिले खुले आव्हान,म्हणाल्या, बनविले यांनी…उभ्या भारता शरम वाटे,असे खड्डे अन पाण्यातील पुणे.

पुणे- पुण्यातील रस्ता रुंदीच्या जागा ,ओढे , नाले , ड्रेनेज यावर कोणी अतिक्रमणे केली , कोणी ती बळकावली हे नावानिशी जाहीर करावे असे खुले आव्हान भाजपाला करत नंतर पुणे कॉंग्रेस -राष्ट्रवादीच्या कारभाराने तुंबले असा आरोप कर्नर म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा असल्याचे कॉंग्रेसच्या ज्येष्ठ महिला नेत्या संगीता तिवारी यांनी म्हटले आहे.

भाजपा ने अशी अवस्था केली आहे की,विद्या उद्यम कला संस्कृती इथे सगळेच उणे,उभ्या भारता शरम वाटे, असे खड्डे अन पाण्यातील पुणे.

अशी उपमा देत तिवारी यांनी भाजपचे पदाधिकारी यांनी केलेय आरोपांवर प्रतिहल्ला चढविला आहे,त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि,’ खूप मोठा पाऊस झाला आणि पुण्या च्या सर्व रस्त्यांचे रूपांतर नदयां मध्ये झाले . पुणेकर नागरिक त्रस्त झाले. रस्त्याने लोकांच्या दुचाकी, चारचाकी वाहून गेल्या. भर दिवाळी मध्ये रस्त्यावरील गरीब फेरीवाल्यां च्या व्यवसायाचे नुकसान झाले. ही परिस्थिती फक्त आणि फक्त भाजपा मुळे झाली . ह्यांचा १ खासदार, ६ आमदार , आणि १०० नगरसेवक काय झोपा काढत होते का ?  भाजपा पुणे शहर अध्यक्ष मुळीक आणि माजी महापौर मुरली मोहोळ सरळ प्रेस घेवून काँग्रेस आणि राष्ट्रवादी ला जबाबदार पकडतात, हे म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबा आहेत . भाजपा वाले इतके वर्ष महापालिकेत सत्तेत होते , मग काय करत होते हे,  पुण्याचा विकास का पुण्याचा ऱ्हास, पुण्यात यापूर्वीही ही खूप प्रचंड पाऊस झाला होता, २/३ दिवस पाउस सतत जोरदार बरसत होता , पण अशी अवस्था कधीच नव्हती झाली. ह्यांनी स्मार्ट सिटीची स्वप्ने दाखवली आणि ठेकेदारा कडून स्मार्ट पाकिटे घेतली का मग?मी खुला चॅलेंज देते मा मुळीक आणि मोहोळ यांना; ते प्रेस मध्ये म्हणतात ना काँग्रेस आणि राष्ट्रवादी वाल्यांनी ओढे नाल्या च्या जागा ताब्यात घेतल्या .खोटे बोल पण रेटून बोल ही यांची संस्कृती. अहो द्या की आम्हला नावा सकट यादी. किती खोटे बोलावे आणि पुणेकरांची दिशाभूल करावी. महापालिकेतील बरेच ठेकेदार काळ्या  यादीत टाकले आहेत परंतु हे भाजपाचे नेते मग त्यात पालकमंत्री असोत , मुळीक असोत,  मोहोळ असोत …हे महापालिका आयुक्त यांना कारवाई करू देत नाहीयेत. विचारा की यांना हे कशासाठी चालू आहे. पुण्याचा विकास काळ्या यादि तले ठेकेदार करणार का आता? का पाकिटा चा आणि हितसंबंधांचा विषय आहे ? करा खुलासा.   पुणे पूर्ण पाण्यात गेले, पुणे तुंबले तुमच्या मुळे. सगळ्यात जुना जंगली महाराज रोड ही तुम्ही तुंबवला .. सगळीकडे सिमेंटच्या रस्त्याची टेंडर काढून. चांगले रस्ते खोदून काढले टक्केवारीच्या साठी… ठेकेदाराची आणि स्वतः ची घरे भरली. पुणे गेले पाण्यात , जनता गेली खड्यात. आणि वर बेशरम पणे काँग्रेस आणि राष्च्याट्रवादीच्या नावाने खडे फोडत आहेत. महापालिकेतील काळ्या यादीतील ठेकेदारांची नावे प्रसिद्ध करा की . का आयुक्त यांच्यावर थेट मुख्यमंत्री  आणि पालक मंत्री यांच्या कडून प्रेशर आणत आहेत. कुठे तरी पाणी मुरतंय हे न समजायला पुणेकर काही वेडे नाहीत. तेव्हा उगाच काँग्रेस वर खोटे आरोप करू नका, आपले शब्द मागे घ्या नाहीतर नावे प्रसिद्ध करा. पुण्याचे रस्ते  पाहून नागरिक आता तुम्हाला रस्त्यावर आणतील. पुण्यातील  रस्त्यावरील खड्डे पाहून पुणेकर आता तुम्हाला त्याच खड्ड्यात टाकतील. आणि हो पुण्याचे जे रस्ते तुम्ही तुंबवले ना त्याच  तुंबवणी मध्ये तुम्हाला बसवतील हे लक्षात घ्या. सामान्य माणसाच्या सहनशक्तीचा अंत बघू नका? एक लक्षात घ्या सामान्य माणसा कडे गमवायला काही नसते परंतु तुम्ही खूप काही गमवून बसाल.तेव्हा मी एक काँग्रेस ची कार्यकर्ती म्हणून तुम्हाला आव्हान करते पुराव्या शिवाय आरोप करून काँग्रेस ला बदनाम करायचा अजिबात प्रयत्न करू नका. आपले पाप दुसऱ्याच्या माथी मारू नका. पुण्याचे वाटोळे हे भाजपा च्या नेत्यांनी च केले आहे हे पुणेकरांना कळले आहे.असे संगीता तिवारी यांनी म्हटले आहे.

अतिवृष्टीग्रस्त भागातील पंचनामे युद्धपातळीवर करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रशासनाला निर्देश

मुंबई, दि.१९: राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान आले आहे. जिल्हा प्रशासनाने युद्ध पातळीवर नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले.

यासंदर्भात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले की, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय यापूर्वीच राज्य सरकारने घेतला आहे. गेल्या काही दिवसात राज्यात परतीच्या पावसाचा फटका पुन्हा एकदा शेतकऱ्यांना बसला आहे. नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे करावे. जिल्हाधिकाऱ्यांनी याकामी विशेष लक्ष घालावे. पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत देवून त्यांना दिलासा द्यावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.