लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी 23 आणि 24 ऑक्टोबर रोजी उत्तर बंगाल आणि सिक्किमच्या सीमेवरील लष्करी तळांना भेट दिली. त्यांनी सर्व रँकना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि सिक्किमच्या उत्तर सीमांसह सर्व ठिकाणच्या संरक्षण व्यवस्थेचा आढावा घेतला. कर्तव्य बजावताना उच्च दर्जाची कार्यक्षमता आणि मनोबल राखल्याबद्द्ल लष्करप्रमुखांनी लष्करी तुकड्यांची प्रशंसा केली.
सीमाभागांमधील पायाभूत सुविधांच्या विकासाच्या गतीबद्दल लष्करप्रमुखांनी संतोष व्यक्त केला. पूर्व मुख्यालयाचे आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल आर पी कालिता, त्रिशक्ती कॉर्प्सचे GOC लेफ्टनंट जनरल तरुण कुमार ऐच हे यावेळी त्यांच्यासोबत होते.
23 ऑक्टोबरला सुकना लष्करी तळावर आगमन झाल्यावर लष्करप्रमुखांनी दिवाळीच्या पूर्वसंध्येला भारतातील सांस्कृतिक परंपरा आणि विविधतेतील एकता प्रदर्शित करणाऱ्या कार्यक्रमातील चमूसोबत संवाद साधला. समर्पण भावनेबद्दल त्यानी लष्करी तुकड्यांची प्रशंसा केली आणि त्यांना व त्यांच्या कुटुंबियांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्य़ा. माउंट जोनसेंग आणि माउंट डोमखेंग या शिखरारोहणाबद्दल त्यांनी गिर्यारोहक चमूचे तसेच नुकत्याच महू इथे झालेल्या लष्कराच्या कौशल्य स्पर्धेत प्रथम आल्याबद्दल त्रिशक्ती कॉर्पचे अभिनंदन केले.
24 ऑक्टोबरला लष्करप्रमुखांनी आर्मी कमांडर आणि जीओसी यांच्यासह उत्तर आणि पूर्व सीमांवरील पुढील विभागांना भेट दिली. तेथील कार्य आणि तळावरील सिक्कीम सीमा भागातील उत्तर सीमांवर तैनात चमूच्या तयारीची आढावा घेतला. जवानांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांना मिठाई वाटली. व्यावसायिकता आणि कर्तव्याप्रती समर्पण भाव असल्याबद्दल सैनिकांचे त्यांनी कौतुक केले.
पुणे-भू-विकास बँकेचे कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना ९६४ कोटी रुपयांची कर्जमाफी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. तसेच, भू-विकास बँकेकडून सरकारला येणे असलेल्या रकमेमध्ये समायोजित करण्यास सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली होती. त्यावरून आता भू-विकास बँकेच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी शिंदे-भाजपा सरकारची पोलखोल केली आहे.तसेच, राज्यात अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. त्यावर बोलताना “अतिवृष्टीने शेतकऱ्यांच नुकसान झालं आहे. त्या नुकसानीची भरपाई केंद्र आणि राज्य सरकारने करावी म्हणून आम्ही सगळे मिळून प्रयत्न करू. यासाठी संघर्ष करावा लगाला तर चालेल,” असेही शरद पवारांनी सांगितलं.
शरद पवारांनी पुरंदर येथे शेतकऱ्यांनी संवाद साधला. त्यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं की, “राज्य सरकारने भू-विकास बँकेचे कर्ज माफ केल्याचं जाहीर केलं. गेल्या दहा वर्षात भू-विकास बँकेचे कर्ज एकाला तरी मिळालं का? भूविकास बँक अस्तित्वात आहे का? भूविकास बँक होती का? याची माहिती नाही. २५ ते ३० वर्षे झाली बँकेची कोणी कर्ज वसुली केली नाही. राहिलेली वसुली होणार नाही हे कळल्यावर, कर्ज माफी देण्यात आली. ‘लबाडाच्या घरचं आवताण जरी असलं तरी जेवल्याशिवाय खरं नसतं’ असं भाजपावल्याचं काम आहे,” अशी अशी टीका शरद पवारांनी केली आहे.
पुणे : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते शरद पवार आज पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुका दौऱ्यावर आहेत. पुरंदरमधील परींचे गावात शेतकरी सन्मान मेळाव्यात एका कार्यकर्त्यांनी साहेब आपले वय झाले एका जागेवर बसून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आदेश द्या.
गावोगावी फिरू नका ,अशी विनंती केली होती. त्यावर शरद पवारांनी त्या कार्यकर्त्याचीच फिरकी घेत तुम्हाला कुणी सांगितलं मी म्हातारा झालोय. तुम्ही काय बघितलंअसं म्हणतात. सभेत एकच हशा पिकला.
अतिवृष्टी झाल्यानंतर राज्य सरकार योग्य उपाययोजना करताना करायला पाहिजे ती उपाययोजना करताना सरकार दिसत नाही. ज्यांच्या हातात केंद्राची सूत्रे आहेत. ते ग्रामीण भागातील लोकांसाठी काहीतरी ठोस भूमिका घेताना दिसत नाहीत. जेव्हा माझ्याकडे केंद्राची सूत्र आली तेव्हा शेतकऱ्यांची 72 हजार कोटींची कर्ज माफी आम्ही केली. जेव्हा अधिवेशन असेल तेव्हा तुमचे जे प्रश्न आहेत ते मांडण्यासाठी उपयुक्त ठरतील म्हणून मी इथे शेतकऱ्यांसोबत संवाद करण्यासाठी आलो आहे.’असे शरद पवार म्हणाले.
शरद पवार म्हणाले, पुरंदरमधील लोकांनी मला खूप प्रेम दिलं. पुरंदरचे लोक आधी गिरणी कामगार म्हणून जायचे. आता तशी परिस्थिती नाहीय. शेतीचे प्रश्न सुटले नव्हते म्हणून सन्मानाने जगण्यासाठी पुरंदरमधील लोकांनी विविध व्यवसाय केले. आता इथे लोक शेती करू लागले आहेत. व्यवसाय करू लागले आहेत. आधी लोकांना भेटायचं म्हटलं तर रोजगार हमीची काम सुरू करा अशी मागणी व्हायची. आता कारखान्याची मागणी करीत आहेत. असे शरद पवार म्हणाले. महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झालं आहे. यातून शेतकऱ्याला बाहेर काढण्यासाठी आवश्यक धोरण स्वीकारले जात नाही. राज्यातील नुकसानीबाबत केंद्र आणि राज्य सरकारला माहिती देणार. पुरंदर तालुक्याचं चित्र बदलत आहे. निवडणुकीच्या निमित्ताने मी आलो तुम्ही कधी मला मोकळ्या हाताने पाठवलं नाही. तुमची साथ प्रत्येक निवडणुकीत लाभली. असं शरद पवार म्हणाले.
पंतप्रधानांनी सशस्त्र दलांसोबत कारगिलमध्ये साजरी केली दिवाळी
नवी दिल्ली, 24 ऑक्टोबर 2022-
सशस्त्र दलांसोबत दिवाळी साजरी करण्याण्याची परंपरा कायम ठेवत, पंतप्रधानांनी ही दिवाळीसुध्दा कारगिलमध्ये सैन्यदलासोबत साजरी केली.
शूर जवानांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, कारगिलच्या भूमीवरची श्रद्धा नेहमीच त्यांना सशस्त्र दलातील शूर पुत्रांचे आणि कन्यांचे स्मरण देत आकर्षित करून घेते.
“गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही माझ्या कुटुंबाचा एक भाग आहात, असे पंतप्रधान म्हणाले. जवानांच्या उपस्थितीत दिवाळीचा गोडी वाढते आणि त्यांच्यामध्ये असणाऱ्या दिवाळीच्या तेजाचा प्रकाश आमच्या आत्म्याला उत्साहीत करतो, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.“एकीकडे राष्ट्राच्या सार्वभौम सीमा आहेत तर दुसरीकडे त्यांचे संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध असलेले सैनिक, एकीकडे मातृभूमीवरचे प्रेम आहे तर दुसरीकडे निधड्या छातीचे शूर वीर जवान. एवढा प्रचंड आनंद देणाऱ्या दिवाळीची अपेक्षा मी इतरत्र कुठेही करू शकणार नाही.” शौर्य आणि धाडस या आपल्या परंपरा आणि संस्कृती असून त्यांच्या गाथा संपूर्ण भारत आनंदाने साजऱ्या करतो, असे पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले. “आज, कारगिलच्या या पराक्रमी भूमीवरून, मी भारतातील आणि जगातील सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले,
पाकिस्तानविरुद्ध झालेल्या प्रत्येक युद्धात, भारताने विजय मिळवत, कारगिलमध्ये तिरंगा झेंडा फडकवला आहे, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. आजच्या भू-राजकीय परिदृश्यात दिव्यांच्या या उत्सवाने शांतता आणि समृद्धीचा मार्ग प्रकाशित करावा अशी इच्छा आजच्या जगातील भारताच्या उत्कट भूमिकेवर भाष्य करताना, पंतप्रधानांनी व्यक्त केली. दिवाळीचे महत्त्व स्पष्ट करताना पंतप्रधान म्हणाले, “हा दहशतवाद संपवण्याचा सण आहे.” कारगिलच्या युध्दाशी दिवाळीचे साधर्म्य साधत पंतप्रधानांनी अभिमानास्पद टिप्पणी केली,की कारगिलमध्ये नेमके हेच साध्य केले गेले होते आणि हा विजयाचा उत्सव आजही सर्वांच्या लक्षात आहे.
आपणही कारगील युद्धाचे एक साक्षीदार होतो आणि ते युद्ध जवळून पाहिले आहे, याची आठवण यावेळी पंतप्रधान मोदी यांनी सांगितली. युद्धकाळात जेव्हा भारतीय जवान शत्रूसैनिकांना चोख उत्तर देत होते, तेव्हा पंतप्रधान तेथे त्यांच्या समवेत काही काळ घालवण्यासाठी आले होते. तेव्हाची म्हणजे 23 वर्षांपूर्वीची मोदी यांची छायाचित्रे जपून ठेवून ती दाखवल्याबद्दल मोदी यांनी जवानांप्रति कृतज्ञता व्यक्त केली. सामान्य नागरिक म्हणून असलेल्या माझ्या कर्तव्यपथाने मला युद्धक्षेत्रावर आणले होते, असे पंतप्रधान म्हणाले. देशवासियांनी सैनिकांसाठी जमा केलेले विविध प्रकारचे साहित्य युद्धभूमीवर पोहचवण्यासाठी आपण येथे आलो होतो आणि माझ्यासाठी तो पूजेचा क्षण होता, अशी आठवण यावेळी पंतप्रधानांनी सांगितली. त्यावेळच्या वातावरणाविषयी बोलताना पंतप्रधान म्हणाले, त्यावेळी देशातला प्रत्येक नागरिक, त्याच्या तन-मन आणि आत्म्यातून देश सुरक्षित राहण्यासाठी, युद्ध जिंकण्यासाठी साद घालत होता. त्यानंतर युद्धाच्या विजयाचा आनंद देशाच्या हवेत मिसळून गेला होता.
ज्या भारताचा आम्ही आदर करतो, पूजा करतो, तो केवळ एक भौगौलिक भाग नाही तर ती एक जिवंत चैतन्य, एक शाश्वत चेतना आणि चिरंतनअस्तित्व आहे, असे वर्णन पंतप्रधानांनी केळे. जेव्हा आम्ही भारताविषयी चर्चा करतो, तेव्हा भारताच्या संस्कृतीचे अविनाशी चित्र समोर येते, परंपरेचे वर्तुळ स्वतःच तयार होते आणि भारताच्या सामर्थ्याचे मॉडेल विकसित होण्यास सुरूवात होते, असे पंतप्रधान पुढे म्हणाले. त्यांनी पुढे असे सांगितले की, भारत हा अशा अस्त्र आणि शस्त्रांचा प्रवाह आहे की ज्याची सुरूवात एका टोकाला आकाशभेदी हिमालयाने होते तर दुसरीकडे भारतीय महासागरांना तो कवेत घेतो. इतिहासात अनेक भरभराटीला आलेल्या संस्कृती वाळूच्या कण होऊन नष्ट होऊन गेल्या, पण भारतीय संस्कृतीचा प्रवाह तसाच अबाधित राहिला, याचे स्मरण पंतप्रधानांनी केले. जेव्हा एखाद्या भूमीचे शूर पुत्र आणि कन्या आपले सामर्थ्य आणि संसाधनशक्तीवर संपूर्ण विश्वास ठेवून कार्य करतात, तेव्हाच, एखादे राष्ट्र अमरत्व पावते असे पंतप्रधान म्हणाले.
कारगीलची युद्धभूमी ही भारतीय सैन्याच्या साहसाचा झगमगता प्रज्वलित पुरावा आहे. द्रास, बटालिक आणि टायगर हिल ही क्षेत्रे म्हणजे भारतीय सशस्त्र दलाचे धैर्य आणि शौर्यापुढे पर्वतांवर ठाणे देऊन बसलेला शत्रु किती खुजा ठरला, याचा पुरावा आहे, असे उद्गार मोदींनी काढले. भारतीय सीमांवर पहारे देणारे सैनिक म्हणजे भारताच्या सुरक्षा व्यवस्थेचे संवेदनक्षम स्तंभ आहेत. त्यांनी पुढे सांगितले की, एखादा देश तेव्हाच सुरक्षित असतो जेव्हा त्याच्या सीमा सुरक्षित असतात, त्याची अर्थव्यवस्था मजबूत असते आणि समाज आत्मविश्वासाने ठासून भरलेला असतो. देशाच्या ताकदीबाबत आम्ही जेव्हा ऐकतो तेव्हा संपूर्ण देशाचे नीतीधैर्य ओसंडून वाहू लागते, असेही पंतप्रधान म्हणाले. देशवासियांमध्ये असलेल्या दृढ ऐक्याच्या भावनेबाबत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान आणि वीज तसेच पाण्याची सुविधा असलेल्या पक्क्या घरांचे जवानांच्या कुटुंबांना योग्य वेळेत केलेले वितरण ही उदाहरणे दिली. प्रत्येक जवानाला त्याबद्दल अभिमान वाटतो, असेही ते म्हणाले. जेव्हा अगदी दूरवर असलेल्या जवानांच्या घरांमध्ये या सेवा पोहचतात, तेव्हा त्यांना आगळे समाधान लाभते, असे पंतप्रधानांनी सांगितले.
जेव्हा उत्तम कनेक्टिव्हिटी असते तेव्हा लष्करातील जवानाला त्याच्या घरी फोन करणे सहज शक्य असते. एवढेच नाही तर सुट्टीच्या काळात त्याला सहज घरीही जाता येते, असे त्यांनी पुढे नमूद केले. सात आठ वर्षांपूर्वी अर्थव्यवस्थेच्या बाबतीत जगात दहाव्या स्थानावर असलेला भारत आता पाचव्या स्थानावरची मोठी अर्थव्यवस्था म्हणून विकास पावत आहे हे त्यांनी अधोरेखित केले. संशोधनाचे चक्र चालू ठेवण्यासाठी कार्यरत असलेल्या ऐशी हजारहून अधिक स्टार्टप्सचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला. दोन दिवसांपूर्वी इस्रोने ब्रॉडबँडच्या विस्तारासाठी एकाच वेळी 36 उपग्रह अवकाशात सोडून नवीन विक्रम केल्याचेही त्यांनी सांगितले, पंतप्रधानांनी युक्रेन युद्धाचा उल्लेख करत तिथे भारतीयांसाठी तिरंगा हा संरक्षक कवच ठरल्याचा उल्लेख केला. भारताने अंतर्गत आणि बाह्य अशा दोन्ही शत्रूंशी यशस्वीपणे दोन हात केल्याचा हा परिणाम आहे असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.
“तुम्ही सीमेवर चिलखत बनून उभे आहात त्याचवेळी देशाच्या अंतर्गत शत्रूंवरही कडक कारवाई केली जात आहे. देशाने दहशतवाद, नक्षलवाद आणि कट्टरतावाद उखडण्याचा यशस्वी प्रयत्न केला.” ते त्यांनी सांगितले. एकेकाळी देशाच्या मोठ्या भूभागावर पसरलेल्या नक्षलवादाबद्दल बोलताना ते म्हणाले की नक्षलवाद्यांनी बऱ्याच मोठ्या भूभागाला विळखा घातला होता, मात्र त्यांचा प्रभाव आता सातत्याने कमी होताना दिसत आहे असे ते म्हणाले.
भ्रष्टाचारावर बोलताना भारत याविरुद्ध निर्णायक लढाई लढत आहे असे विधान पंतप्रधानांनी केले. भ्रष्टाचारी कितीही प्रभावी असो तो कायद्याच्या कचाट्यातून सुटू शकत नाही असे सांगून त्यांनी म्हटले वाईट दर्जाच्या व्यवस्थापनामुळे देशाच्या क्षमतांना मर्यादा येतात. मग त्यासाठी विकासाच्या कामात अडथळे निर्माण केले जातात. ‘सबका साथ सबका विकास सबका विश्वास आणि सबका आशीर्वाद’ या मंत्राचा उल्लेख त्यांनी केला. या सर्व जुन्या अडचणींवर मात करण्यासाठी आम्ही काम करत आहोत असे ते म्हणाले. आधुनिक युद्धशास्त्रात अंतर्भूत असणारी तंत्रज्ञानाची प्रगती यावरही त्यांनी प्रकाश टाकल. पंतप्रधान म्हणाले की भविष्यातले युद्धांचे स्वरूप बदलणार आहे आणि या नवीन युगात, आपण नवीन आव्हाने , नवीन पद्धती आणि देशाच्या संरक्षण विषयक बदलत्या गरजांच्या अनुषंगाने देशाची लष्करी ताकद वाढवली आहे.
लष्करात गेल्या कित्येक दशकांपासून आवश्यक असणाऱ्या प्रमुख बदलांविषयी बोलताना पंतप्रधानांनी आपल्या लष्कराला कोणत्याही आव्हानांना त्वरित तोंड देण्यासाठी लष्करी दलांमध्ये उत्तम समन्वय निर्माण होणे आवश्यक आहे त्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जात आहेत असा विश्वास पंतप्रधानांनी दिला.
यासाठी सीडीएस सारख्या संस्थांची स्थापना केली आहे तसेच आधुनिक पायाभूत सुविधांचे जाळे सीमेवर निर्माण केले जात आहे ज्यामुळे जवानांना अधिक आरामशीरपणे आपले कर्तव्य बजावता येऊ शकेल, असे पंतप्रधान म्हणाले.
देशात अनेक सैनिकी शाळा उघडल्याचे त्यांनी पुढे नमूद केले.भारतीय लष्करात आधुनिक स्वदेशी शस्त्रास्त्रे आहेत ही देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाची बाब असल्याचे आत्मनिर्भर भारत या संकल्पनेवर प्रकाश टाकताना पंतप्रधानांनी सांगितले.
संरक्षण दलातील तिन्ही विभागांनी परकीय शस्त्रे आणि यंत्रणांवरील आपले अवलंबित्व कमी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि आत्मनिर्भर होण्याचे वचन दिले आहे, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. “मी आमच्या तिन्ही सैन्य दलांचे कौतुक करतो, ज्यांनी ठरवले आहे की 400 पेक्षा जास्त संरक्षण उपकरणे यापुढे परदेशातून विकत घेतली जाणार नाहीत आणि आता ती भारतातच बनवली जातील”, असेही ते म्हणाले. स्वदेशी शस्त्रे वापरण्याचे फायदे सांगून पंतप्रधान म्हणाले की, जेव्हा भारताचे जवान देशात बनवलेल्या शस्त्रास्त्रांनी लढतात तेव्हा त्यांचा आत्मविश्वास वेगळ्याच उंचीवर असतो आणि त्यांचे हल्ले शत्रूचे मनोबल चिरडताना शत्रूपक्षाला आश्चर्यकारक धक्के देऊन जातील. पंतप्रधानांनी यावेळी प्रचंड या – हलक्या लढावू हेलिकप्टर (लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर), तेजस फायटर जेट्स आणि अवाढव्य अशा विमानवाहू युद्धनौका विक्रांत यांची उदाहरणे दिली आणि त्याचबरोबर अरिहंत, पृथ्वी, आकाश, त्रिशूल, पिनाक आणि अर्जुन यासारख्या भारताच्या क्षेपणास्त्र सामर्थ्यावर त्यांनी प्रकाश टाकला. ते पुढे म्हणाले की, आज भारत आपली क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणा मजबूत करत असताना संरक्षण उपकरणांचा निर्यातदार देखील बनला आहे, तसेच ड्रोनसारख्या आधुनिक आणि प्रभावी तंत्रज्ञानावरही वेगाने काम करत आहे.
“आम्ही अशा परंपरेचे पाईक आहोत, जिथे युध्दाला शेवटचा पर्याय मानला जातो”, असेही मोदी यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, भारत नेहमीच जागतिक शांततेसाठी सकारात्मक आहे. “आम्ही युद्धाच्या विरोधात आहोत, पण सामर्थ्याशिवाय शांतता शक्य नाही” असा इशाराही मोदी यांनी यावेळी दिला. ते पुढे म्हणाले की, आमच्या सैन्यात क्षमता आणि रणनीती आहे आणि जर कोणी आमच्याकडे वाकड्या नजरेने पाहिलं तर आमच्या सैन्याला देखील त्यांच्या भाषेत शत्रूला चोख प्रत्युत्तर कसे द्यायचे हे माहित आहे. गुलामगिरीची मानसिकता नष्ट करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांवर बोलताना पंतप्रधानांनी नव्याने उद्घाटन केलेल्या कर्तव्यपथाचे उदाहरण दिले आणि ते म्हणाले की, यामुळे नव्या भारताच्या नव्या विश्वासाला चालना मिळणार आहे “राष्ट्रीय युद्ध स्मारक असो किंवा राष्ट्रीय पोलीस स्मारक असो, ते नवीन भारताची नवीन ओळख निर्माण करतात” असेही ते म्हणाले. पंतप्रधानांनी भारतीय नौदलाच्या नव्या ध्वजाचेही स्मरण केले आणि ते म्हणाले की, “आता नौदलाच्या ध्वजात शिवरायांच्या शौर्याची प्रेरणा जोडली गेली आहे.”
आज संपूर्ण जगाच्या नजरा भारतावर आणि त्याच्या विकासाच्या क्षमतेकडे लागल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, स्वातंत्र्याचा अमृतकाळ हा भारताच्या या सामर्थ्याचा प्रत्यक्ष साक्षीदार ठरणार आहे. “यात तुमची भूमिका खूप मोठी आहे कारण तुम्ही भारताची शान आहात,” असे गौरवोद्गारही पंतप्रधानांनी यावेळी काढले. भारतीय सशस्त्र दलाच्या जवानांना समर्पित कविता वाचून त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.
पुणे : प्रसिद्ध ज्योतिष अभ्यासक चंद्रकांत शेवाळे संपादित ‘ग्रहांकित’ या दिवाळी अंकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन रविवारी उत्साहात झाले.माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या पुणे विभागाचे उपसंचालक डॉ. पुरुषोत्तम पाटोदकर, फलज्योतिष अभ्यास मंडळाचे संवर्धक पं. विजय जकातदार,म.सा.प. चे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे,संपादक चंद्रकांत शेवाळे,दिवाळी अंकाचे वितरक वीर न्यूज एजन्सीचे बंडू वीर , उद्योजक नंदकुमार शेवाळे यावेळी उपस्थित होते. ४५ वर्षात १९ वेळा दुसऱ्या आवृत्तीचा विक्रम या दिवाळी अंकाने केला आहे.प्रास्ताविक, स्वागत चंद्रकांत शेवाळे यांनी केले. सुत्रसंचालन डॉ. सौ. जयश्री बेलसरे यांनी केले. सौ. गौरी केंजळे यांनी आभार मानले. ‘केवळ दोन दिवसातच ग्रहांकित – दिवाळी अंकाचे दुसऱ्यांदा प्रकाशन होत आहे. याचाच अर्थ ग्रहांकित सर्व सामान्यांच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त असल्याचा पुरावा होय ! गेल्या ४५ वर्षांच्या वाटचालीत ग्रहांकितने हा विक्रम १९ वेळा केला आहे. काही वर्षी ८ पेक्षाही जास्त आवृत्त्या निघाल्या असल्याने दिवाळी अंकाच्या विश्वात ग्रहांकित एक मानाचा अंक मानला जातो. ग्रहांकित बाजारात आल्याशिवाय दिवाळी अंकाचा उत्सव भरल्यासारखा वाटत नाही असे अनेक वितरक म्हणतात. त्याची सत्यता पटते’, असे उद्गार माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या पुणे विभागाचे उपसंचालक डॉ. पुरुषोत्तम पाटोदकर यांनी दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन करताना काढले. यावेळी बोलताना पाटोदकर पुढे म्हणाले, “सर्वजण दिवाळी सण मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरा करतात. दिवाळी अंकाचे वाचन हा एक त्या आनंदाचा भाग असतो. विविध विषयावरील अंकाचा आस्वाद वाचक घेत असतात. एक प्रकारे वाचन संस्कृतीचे जतनच म्हणावे लागेल. “ भालचंद्र ज्योतिर्विद्यालय येथे संपन्न झालेल्या प्रकाशन समयी अध्यक्षस्थानी फलज्योतिष अभ्यास मंडळाचे संवर्धक-पंडीत विजय श्रीकृष्ण जकातदार उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून म.सा.पा. चे प्रमुख कार्यवाह श्री. प्रकाश पायगुडे उपस्थित होते.
प्रकाश पायगुडे यांनी दिवाळी अंकाच्या संपादकांच्या कष्टाची व कल्पकतेची स्तुती केली. या अंकांना शासकीय जाहिरातीबरोबरच मराठी उद्योजकांनी जाहिरात देवून प्रोत्साहन दिले पाहिजे, असे मत व्यक्त केले. ‘ग्रहांकित’ हे मासिक अथवा दिवाळी अंक नसून ते पुस्तकाप्रमाणे वाचक जपून ठेवतात, हे ‘ग्रहांकित’चे वैशिष्ट्य म्हणावे लागेल असे विचार अध्यक्ष पं. विजय जकातदार यांनी व्यक्त केले.
महसूल गुप्तचर संचालनालयाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय कुरियर सेवेद्वारे काही अंमली पदार्थांची भारतात तस्करी होत आहे, अशी टीप मिळाल्याच्या आधारावर, मुंबई शाखेच्या अधिकाऱ्यांनी गेल्या बुधवारी (20 ऑक्टोबर 2022), मुंबईतल्या एअर कार्गो संकुलातून, अमली पदार्थांचं एक पार्सल जप्त केलं. पॅरिसहून आलेलं हे पार्सल, नालासोपाऱ्याला पोहोचवलं जाणार होतं. या पार्सलची सखोल तपासणी केल्यानंतर, त्यातून, 1.9 किलो ऍम्फेटामाइन प्रकारातील पदार्थ (ऍम्फेटामाइन टाईप सबस्टन्स-एटीएस)च्या गोळ्या आढळल्या. या गोळ्यांची आंतरराष्ट्रीय तस्करी बाजारात, 15 कोटी रुपये इतकी किंमत आहे. या गोळ्या कोरुगेटेड(वळया असलेल्या) पॅकेजिंग सामग्रीच्या आत एका पॉलिथीन पिशवीत लपवून आणल्या गेल्या होत्या.
संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक आणि नियोजनबद्ध आखणी करत, हे पार्सल एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे कसे गुप्तपणे पोहचवले गेले, याचा छडा लावला. जेव्हा हे पार्सल संबंधित व्यक्तिपर्यंत पोहोचवले जाणार होते, त्यावेळी, या व्यक्तीला अटक करण्यात आली. त्याच्या मार्फत, या तस्करीत सामील असलेल्या दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचता आलं. या दुसऱ्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, हे पार्सल एका नायजेरियन व्यक्तीला दिलं जाणार होतं. ही माहिती मिळाल्यावर अधिकाऱ्यांनी सापळा रचून, पार्सल घेण्यासाठी आलेल्या नायजेरियन व्यक्तीलाही ताब्यात घेतलं, अशाप्रकारे, या तस्करीप्रकरणी, पोलिसांनी आतापर्यंत तीन व्यक्तींना अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.
पुणे – दारूचे अड्डे ,गैर धंदे ,दादागिरी ,तोतयेगिरी ने ग्रस्त झालेल्या कात्रज परिसरात गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विराेधी पथक दाेन यांनी छापा टाकून अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या इसमाकडून दहा लाख 21 हजार रुपये किंमतीचे एक किलाे 21 ग्रॅम चरस हा अंमली पदार्थ जप्त केल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांनी येथे दिली .सर्फराज मुजफ्फर खान (वय ३५, रा. मांगडेवाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
त्यांनी सांगितले कि,’ अंमली पदार्थ विराेधी पथकाचे पोलिस अधिकारी व अंमलदार यांचे पथक 23 ऑक्टाेबर राेजी परिमंडळ पाच मधील पोलिस ठाण्याच्या परिसरात पेट्राेलिंग करत हाेते. त्यावेळी पोलिस अंमलदार यांना मिळालेल्या माहितीनुसार एक इसम मांगडेवाडी-कात्रज, पुणे येथे चरस हा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचला असता, जाधवनगर, मांगडवेडी, कात्रज,पुणे येथे सार्वजनिक रस्त्यावर एक इसम संशयितरित्या थांबलेला दिसला. त्याच्या पाठीवर एक राखाडी व लाल रंगाची सॅक बॅग हाेती. त्यामुळे पोलिसांना त्याच्यावर संशय आल्याने त्यांनी आराेपी सर्फराज खान यास ताब्यात घेऊन त्याची अंगझडती व सॅकबॅगची झडती घेतली. त्यावेळी त्याच्या ताब्यात दहा लाख 21 हजार रुपये किंमतीचा एक किलाे 21 ग्रॅम चरस हा अंमली पदार्थ, दहा हजार रुपये किंमतीचा एक माेबाईल असा दहा लाख 31 हजार रुपयांचा ऐवज अनाधिकाराने, बेकायदेशीरित्या विक्रीकरिता जवळ बाळगताना मिळून आला आहे. याप्रकरणी आराेपीवर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात एनडीपीसी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्हयाचा पुढील तपास अंमली पदार्थ विराेधी पथक दाेनचे पोलिस उपनरीक्षक एस.नरके हे करत आहे.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलिस आयुक्त संदीप कर्णीक, अपर पोलिस आयुक्त रामनाथ पाेकळे, पोलिस उपआयुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे, सहा.पोलिस आयुक्त नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विराेधी पथक दाेनचे पोलिस निरीक्षक सुनील थाेपटे, पीएसआय एस.नरके, पोलिस अंमलदार संताेष देशपांडे, संदीप जाधव, प्रशांत बाेमादंडी, आप्पा राेकडे, साहिल शेख, नितीन जगदाळे, याेगेश मांढरे, आझीम शेख, युवराज कांबळे व महिला पोलिस अंमलदार दिशा खेवलकर यांनी केली आहे.
पुणे : मॉडर्न एज्यकुेशन सोसायटीच्या कुसरो वाडिया पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये या शक्षैणिक वर्षापासून (२०२२-२३) सुरु झालेल्या कम्प्युटर अँड इंटरनेट ऑफ थिंग्स इंजिनिअरिंग (सगंणक आणि इंटरनेट ऑफ थिंग्स अभियांत्रिकी) या तीन वर्षाच्या पदविका अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रात केवळ ‘कुसरो’मध्येच हा नाविन्यपर्णू अभ्यासक्रम उपलब्ध आहे. तंत्रशिक्षण क्षेत्रामध्ये आठ दशकांपेक्षा अधिक काळ रोजगाराभिमुख आणि दर्जेदार शिक्षणाची परंपरा जोपासणाऱ्या कुसरो वाडिया इन्स्टिटयटू ऑफ टेक्नॉलॉजी या नामांकित तंत्रनिकेतनामध्ये यावर्षीही १०० टक्के प्रवेश झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. ए. एस. चांडक यांनी दिली. डॉ. ए. एस. चांडक म्हणाले, “कम्प्युटर अँड इंटरनेट ऑफ थिंग्स इंजिनिअरिंग या अभ्यासक्रमाला अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) नवी दिल्ली, तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ यांच्याकडून मान्यता प्राप्त झालेली आहे. संगणक युगातील आवश्यक त्या सर्व गरजांचा विचार करून विद्यार्थ्यांना भविष्यात रोजगाराच्या अधिकाधिक संधी मिळण्याच्या उद्देशाने हा अभ्यासक्रम सुरु केला आहे.” नुकतेच महाविद्यालयातील सर्व अभ्यासक्रमांना राष्ट्रीय मान्यता मडंळाकडून (एनबीए) २०२५ पर्यंत मान्यता प्राप्त झाली आहे. संस्थेने स्थापनेपासून जपलेली शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने राबविण्यात येणारे विविध उपक्रम आणि सर्व विभागप्रमुख, अनभुवी प्राध्यापक व कर्मचारी यांचे प्रामाणिक प्रयत्न याचे हे यश असल्याचे डॉ. ए. एस. चांडक यांनी नमदू केले.
डायाॅसिस ऑफ पुणे, स्वच्छंद पुणे, मुस्लिम सत्यशोधक मंडळ यांच्यावतीने दिवाळीनिमित्त सर्वधर्मीय स्नेहमेळावा पुणे : समतेची आणि मानवतेची मशाल घेऊन आपण अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करायला हवी. कारण समता आणि मानवता या संदेशाचा वाहक प्रचारक हा माणूस आहे. भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाली. भारताच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलिदान दिले. त्यामुळे या स्वातंत्र्याचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे. यासाठी खरी राष्ट्रनिष्ठा असणाऱ्यांची गरज आहे. देशात मुस्लिमांविषयी अनेक गैरसमज आहेत. परंतु खरी राष्ट्रनिष्ठा असणारे मुस्लिम बांधव हे राष्ट्रासाठी संपत्ती आहेत, असे मत पुणे धर्मप्रांताचे डॉ. बिशप थॉमस डाबरे यांनी व्यक्त केले. डायाॅसिस ऑफ पुणे, स्वच्छंद पुणे, मुस्लिम सत्यशोधक मंडळ यांच्यावतीने दिवाळीनिमित्त सर्वधर्मीय स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. रेसकोर्स जवळील बिशप हाऊस येथे हा स्नेह मेळावा झाला. यावेळी मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे डॉ. शमसुद्दीन तांबोळी, पुणे शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रशांत जगताप, आझम कॅम्पसचे डॉ. पी. ए. इनामदार, सिस्टर लुईसा, फादर डेनिस, फादर राजेश बनसोडे, ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. ए.पी. कुलकर्णी, प्रा.रवींद्र शाळू उपस्थित होते. डॉ. बिशप थॉमस डाबरे यांचा वाढदिवस देखील यावेळी साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे संयोजन मोहन जवळकर, रॉकी गोम्स व नोएला डेव्हिड यांनी केले. डॉ. बिशप थॉमस डाबरे म्हणाले, सर्व धर्मांचे सण आपण एकत्रित साजरे करायला पाहिजेत. दिवाळी, रमजान, ख्रिसमस हे सण फक्त एका धर्मापुरते मर्यादित राहू नयेत. समाजामध्ये आनंद निर्माण करणारे हे सण प्रत्येक धर्मातील व्यक्तीने एकत्र येत साजरे करायला पाहिजे.
डाॅ. शमसुद्दीन तांबोळी म्हणाले, आपण सर्व भारतीय एकत्र नांदतोय याला संविधान कारणीभूत आहे. वैयक्तिक पातळीवर कोणत्याही धर्माचे पालन आपण करू शकतो. परंतु सामाजिक जीवनात वावरताना आपण सर्वजण भारतीय आहोत अशी भावना प्रत्येकाने ठेवायला हवी. डॉ. अनिल कुलकर्णी म्हणाले, देशाच्या एकजुटीसाठी संविधान फार महत्त्वाचे आहे. देशातील सर्व धर्म मोठे आहेत. बंधूभावाने वागा हाच संदेश प्रत्येक धर्माने दिला आहे.
कलाकार कट्टा चळवळीसाठी ? कलेसाठी ? कि गोंधळ घालण्यासाठी ? पोलिस संभ्रमात ?
पुणे -शेवटच्या तीन ओव्हरमध्ये भारतीयांच्या हृदयाचे ठोके वाढत होते. सामन्यात एक ना एक चेंडू महत्वाचा होता. विराटच्या सुसाट बॅटने विजयाला भारताकडे ओढवून आणले. अखेर भारताने पाकिस्तानवर मात करून विजयाची पताका भारतीयांच्या मनात रोवली. त्यानंतर देशात सर्वत्र जलोष सुरु झाला. पुण्यातल्या गुडलक चौकात तरुणाईने भारत मात कि जय, वंदे मातरम चा जयघोष करत विजयी जल्लोष साजरा केला.आनंदोत्सव म्हणा किंवा विजयोत्सव साजरा होताना दिसत आहे. पुण्यातील एफसी रोडवर प्रारंभीच असलेल्या गुडलक चौकात कलाकार कट्टा साकारण्यात आला आहे. नावावरून तो कलाकारांसाठी त्यांच्या कलेच्या सादरीकरणासाठी किंवा कलाकार जिथून उपलब्ध होऊ शकत असतो अशा स्वरूपाचा कलाकार कट्टा असेल, किंवा सामाजिक चळवळीचे स्थान असू शकेल अशी भावना झाली असेलही पण नंतर हा कट्टा राजकीय आंदोलनाचे आणि शक्ती स्थळाचे स्थान बनू लागला कि काय ? असे वाटू लागले आता तर भारताने पाकला हरविल्यावर आनंदोत्सव करण्यासाठी तो एक चांगले स्थळ बनल्याचे दिसले . आनंदोत्सव मात्र जेव्हा वाहतूक कोंडीचा आणि गर्दी गोंधळाचा जल्लोष म्हणता म्हणता उन्माद बनू पाहील तेव्हा मात्र कठीण होईल अशी काळजी आज पोलिसांना हुलकावणी देऊन गेली .
भारतीय संघाच्या विजयाचा आनंद व्यक्त करण्यासाठी मोठी गर्दी येथे ए कवटल्याचे दिसून आले.एफसी रोडवर मोठ्या प्रमाणात तरुणाईचा जल्लोष दिसून आला. यामध्ये गुडलक चौकात तर भारत माता की जय, जय भवानी जय शिवाजी अशा घोषणांनी आसमंत दुमदुमन निघाल्याचे दिसून आले आहे. बराचवेळ एफसी रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्याचे पाहवयास मिळाले. अखेरीस पोलिसांना हा आनंदोत्सव हस्तक्षेप करून थांबवावा लागला.
पुणे:दिवाळीनिमित्त काल राज्याभरातील नागरिकांनी गावी जाण्यासाठी एसटी स्टॅंडसह रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी केली होती. याच गर्दीमुळे पुण्यातील रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरीत गाडीमध्ये चढणाऱ्या साजन बलदेवन या प्रवाशाचा मृत्यू झाल्याची बातमी काल समोर आली होती.याप्रकरणी एवढी गर्दी झालीच कशी ? किती तिकिटे विकली याचे रेल्वे प्रशासनाला भान नव्हते काय ? किती लोक येतील याची जाणीव झाली नाही काय ? जबाबदार आणि बेफिकीर राहिलेल्या सर्व रेल्वे अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे आणि येथून पुढे याबाबत दक्षता घेतली पाहिजे अशी जोरदार मागणी कॉंग्रेसचे नेत्या संगीता तिवारी यांनी विभागीय व्यवस्थापिका रेणू शर्मा यांच्याकडे केली आहे तर साजन बलदेवन याचा मृत्यू चेंगराचेंगरीत मृत्यु झाला नसून, दम्याच्या आजारामुळे सदर प्रवाशाचा मृत्यू झाला असल्याचा दावा पुणे रेल्वे विभागाने केला आहे.यामुळे याप्रकार्नाला कलाटणी दिली जाते कि काय अशी शंका निर्माण होते आहे.
साजन बलदेवन हा काल पुणे दानापूर एक्सप्रेसने प्लॅटफॉर्म नंबर एक वरून बिहारला जाणार होता. बिहारला जात असताना त्याची प्रकृती रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरच अतिशय खालावली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला असल्याचा दावा पुणे रेल्वे विभागाने केला आहे. साजन बलदेवन सोबत असलेल्या त्याच्या इतर सहकारी मित्रांनी देखील त्याला दम्याचा आजार असल्यास पोलीस पुणे रेल्वे पोलीस विभागाला कळवल आहे.
दीपावलीनिमित्त गावी जाण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकावर आज मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या आसपास एक नंबरच्या प्लॅटफॉर्मवर पुण्याहून दानापूरच्या दिशेने जाणारी गाडी आली.गाडी येताच स्थानकावरील प्रवाशांनी गाडीत चढण्यासाठी एकच गर्दी केली. त्यातच एक प्रवाशी खाली पडला. परंतु, खाली पडलेल्या प्रवाशाला उचलण्याऐवजी लोक त्याला चेंगरून रेल्वेत चढले. यात त्या प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला अशी बातमी काल प्रसारित झाली होती
हा प्रवाशी मूळचा बिहार येथील पाटणा जिल्ह्यातील रहिवाशी असल्याचे सांगण्यात आले.. तो शनिवारी पुणे-दानापूर एक्सप्रेसने घरी जण्यासाठी निघाला होता. पुणे स्थानकावर सध्या दिवाळीच्या हंगामुळे मोठी गर्दी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या दिवाळीचा हंगाम असल्याने पुणे रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी आहे. अनेक नागरिक आपल्या घरी जाण्यासाठी रेल्वे स्थानकावर गर्दी करत आहेत. पुणे-दानापूर एक्सप्रेसमध्ये चढण्यासाठी रात्री ९ च्या सुमारास प्रवाशांनी गर्दी केली. या गर्दीत गाडीत चढण्याचा प्रयत्न करत असताना हा खाली पडला. दरम्यान, अनेक प्रवाशी हे त्यांच्या अंगावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
पुणे, दि. २३: जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या निर्देशानुसार सिंहगड भागातील कातकरी वस्ती येथील आदिवासी बांधवांना अन्नधान्य वितरण अधिकारी श्रीमंत पाटोळे यांच्या उपस्थितीत नवीन शिधापत्रिका व ‘आनंदाचा शिधा’ दिवाळी किट वाटप करण्यात आले.
नवीन शिधापत्रिका व दिवाळी किट मिळाल्याने आदिवासी बांधवांसाठी दिवाळीचा सण विशेष ठरला. या सर्व नागरिकांनी प्रशासनाला धन्यवाद दिले.
यावेळी परिमंडळ-म विभागाचे पुरवठा निरीक्षक चांगदेव नागरगोजे, डोणजे गावचे पाटील दिलीप पायगुडे, रास्तभाव दुकानदार नंदू जावळकर उपस्थित होते.
पुणे, दि.२३: आयुष मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ससून सर्वोपचार रुग्णालय येथे राष्ट्रीय आयुर्वेद दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारती दासवानी, आयुर्वेद विभागाचे विभाग प्रमुख वैद्य व्यंकट धर्माधिकारी आदी उपस्थित होते.
आज आयुर्वेद शास्त्र अतिशय जोमाने पुढे येत असल्याचे नमूद करून आयुर्वेदिक उपचारांचा लाभ अधिकाधिक नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन अधिष्ठाता डॉ. काळे यांनी केले.
वैद्यकीय अधीक्षक डॉ. दासवानी म्हणाल्या, विविध औषधी वनस्पतींचा वापर आयुर्वेदाप्रमाणेच आधुनिक शास्त्रातदेखील होत आहे .
आयुर्वेद विभागप्रमुख वैद्य धर्माधिकारी म्हणाले, ससून रुग्णालयात अनेक दुर्धर व्याधींवर आयुर्वेदीय विभागातर्फे उपचार करण्यात येतात. गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असणाऱ्या आयुर्वेद विभागाकडून रुग्णांना पंचकर्म व आयुर्वेदीय औषधी चिकित्सा देण्यात येते.
या वर्षी आयुष मंत्रालयाच्या ‘प्रत्येक दिवस प्रत्येक घरी आयुर्वेद’ या संकल्पनेअंतर्गत ससून रुग्णालयातील आयुर्वेद विभागातर्फे विविध माहितीपर सत्राचे आयोजन गेल्या आठवड्यात करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय आयुर्वेद दिनाच्या निमित्ताने आयुर्वेद विभागातर्फे केल्या जाणाऱ्या कार्याचे सादरीकरण या कार्यक्रमात करण्यात आले.
मुंबई, दि. २३ ऑक्टोबर – महाराष्ट्रातील प्राधान्य कुटूंब व अंत्योदय अन्न योजनेतील पात्र सुमारे १ कोटी ६२ लाख शिधावाटप पत्रिका लाभार्थींमधील सुमारे ७ कोटी नागरिकांना दिवाळीनिमित्त वाटप करण्यात येणा-या आनंदाचा शिधा या शिधासंचाचे वितरण आजपासून ऑफलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे आता १ किलो साखर, १ किलो रवा, १ किलो चणाडाळ व १ लिटर पामतेल या चार वस्तू लवकरात लवकर मिळू शकतील अशी माहिती राज्याचे अन्न, नागरी व पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज दिली. दिवाळीचा शिधा ऑनलाईन पद्धतीने म्हणजेच पॉझ मशीनच्या माध्यमातून वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ही व्यवस्था इंटरनेटच्या माध्यमातून सुरु होती. परंतु इंटरनेटच्या माध्यमातून सुरु असलेली ही व्यवस्था थोड्या संथगतीने सुरु असल्यामुळे आनंदाचा शिधा या शिधासंचाचे वाटप आता ऑफलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. त्यानुसार अन्न,नागरी व पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण सचिव यांच्या प्रमुख उपस्थितीत Controller Rationing, मुंबई आणि सगळ्या DCS यांच्यासोबत तातडीची बैठक झाली. दिवाळीच्या निमित्ताने शिधा जिन्नस उपलब्ध करणे ही प्राधान्याची बाब असल्याने लवकरात लवकर जास्तीत जास्त पात्र शिधापत्रिकाधारकांपर्यंत आनंदाचा शिधा पोहचविण्याच्या सचूना मंत्री रविंद्र चव्हाण यांनी यावेळी दिल्या आहेत. तसेच सर्व लाभार्थी शिधापत्रिकाधारकांनी या ऑफलाईन वितरणाचा लाभ आपापल्या जवळच्या रेशनिंग दुकानात जाऊन घ्यावा असे आवाहनही मंत्री रविंद्र चव्हाण यांनी केले आले. विभागाच्या बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती देताना मंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले की, ज्या ठिकाणी ऑनलाईन सुविधा सुरळीत सुरु आहे त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने वाटप करावे. तसेच ज्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीमुळे वेळ लागत आहे असे निदर्शनास येते तेथे आजपासून आनंदाची शिधा ही दिवाळी भेट ऑफलाईन पद्धतीने सुरु करण्यात येणार आहे. ऑफलाईन पध्दतीने केलेल्या शिधा जिन्नस वाटपाची माहिती सेल रजिस्टरमध्ये प्रत्येक रास्त भाव दुकानदाराने नोंदवायची आहे. तसेच नोंद घेतांना लाभधारकाचे नाव, शिधापत्रिकेचे शेवटचे चार अंक, मोबाईल क्रमांक, दिलेल्या शिधा जीन्नासचा तपशील, प्राप्त रक्कम (१०० रुपये) आणि लाभधाराकाची सही ह्या बाबी नमूद करावयाच्या आहेत. काही जिल्ह्यात सगळे शिधाजिन्नस पुरवठाधारकाकडून उपलब्ध झाले नसल्याचे निदर्शनास आले. मात्र काही जिन्नस लाभधारकाला दुकानात उपलब्ध आहे असे दिसून आल्यावर जे उपलब्ध जिन्नस आहेत ते देण्यात यावे अशी मागणी होत आहे. या परिस्थितीत उपलब्ध जिन्नस लाभधारकाला देता येणार आहे. मात्र पुरवठादाराकडून सगळेच जिन्नस त्वरेने प्राप्त करवून घ्यावे अशा सूचनाही मंत्री चव्हाण यांनी दिल्या आहेत. ऑफलाईन पद्धतीचा वापर होत असल्याने लाभधारकास त्याचे जोडुन दिलेल्या दुकानातूनच शिधा जिन्नस वितरित करणे गरजेचे आहे. जिन्नस वाटप हा दुकानदाराकडून त्याच्या नेहमीच्या ओळख असणाऱ्या शिधाधारकाला होणार आहे. त्यामुळे लाभधारकाकडून मिळणारी रु. १०० ही सवलत रक्कम प्रथम टप्प्यात जमा करवून घ्यावी कि संपूर्ण जिन्नस दिल्यावर, याबाबत दुकानस्तरावर निर्णय घेण्यात येईल. या वितरणाचा लेखाजोखा व्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी दुकानदाराची असेल. तसेच उर्वरित जिन्नस प्राप्त झाल्यावर त्याची लाभधारकाकडून पोच घेण्याची जबाबदारी दुकानदाराची असेल या अटीवर उपलब्ध जिन्नस वितरीत करता येतील. ऑफलाईन पद्धत केवळ दिवाळी भेट शिधाजिन्नस वाटपासाठी लागू आहे. NFSA आणि PMGKAY योजनेसाठी ऑनलाईने पद्धतच वापरण्यात यावी.तसेच दिवाळी भेट वाटपासाठी Offline पद्धत अस्तित्वात असली तरी गोदामात येणारी जिन्नस आवक तसेच रास्त भाव दुकानात पाठवण्यात येणारे जिन्नस यांची नोंद ऑनलाईन पद्धतीनेच ठेवणे आवश्यक आहे. त्याबाबत दक्षता घेण्याच्या व कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिले.
पुण्यातील रविवार पेठेतील प्रल्हाद गवळी व सहकाऱ्यांचा पुढाकार : दिवाळी फराळ, कपडे व साहित्याचे वाटपपुणेः पुणे-दिवाळी हा प्रत्येकाने एकत्रीत येवून साजरा करण्याचा सण असतो. म्हणून घरच्यांपासून दुरावलेल्या आजी-आजोबांबरोबर दिवाळीचा पहिला दिवस साजरा करण्यासाठी पुण्यातील काही तरुणांनी पुढाकार घेत दिवाळी साजरी केली. आयुष्याच्या संध्याकाळी थरथरत्या हाताने आशेचा दिप लावत आजी-आजोबांनी देखील दिवाळीचा पहिला दिवस उत्साहात साजरा केला. नवे कपडे, फटाके उडवताना काही आजी आजोबा तर आपल्या बालपणात हरवले होते.
प्रल्हाद गवळी व सहकाऱ्यांनी पावटेआळी येथे आजी- आजोबांसोबत दिवाळीचा पहिला दिवस साजरा केला. यावेळी फरासखाना पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, रविवार पेठ पोलीस चौकीच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रतीक्षा शेंडगे, शरदकाका गंजीवाले, शिरीष लोखंडे, नरेंद्र तांबोळी, गणेश भोकरे, संदीप ढवळे साईनाथ चकोर कैलास देवळे विक्रम लगड पवन कुलट नरेश देवकर अक्षय शेलार गौरव गवळी विकास गवळी उपस्थित होते. प्रल्हाद गवळी व सहकारी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. यावेळी आजी आजोबांना नवीन कपडे, दिवाळीचा फराळ, आकाश कंदील, सुगंधी तेल, उटणे, साबण, अगरबत्ती, पणत्या या साहित्याचे वाटप करण्यात आले.
प्रतीक्षा शेंडगे म्हणाल्या, उतारवयात वयस्कर व्यक्तींना प्रेमाची व आपुलकीची गरज असते. आपल्या घरातल्यांबरोबर समाजातील इतर जेष्ठांची काळजी घेणे आपले कर्तव्य समजले पाहिजे.
प्रल्हाद गवळी म्हणाले, ज्या जेष्ठ व्यक्तींना कोणी सांभाळणारे नसते. जवळच्या नातेवाईकांनी साथ सोडलेली असते. अशा आजी-आजोबां बरोबर दिवाळी साजरा करण्याचा उपक्रम आम्ही राबवला आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून दरवर्षी असा उपक्रम राबविण्याचा संकल्प केला आहे.