पुणे- पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्कांतर्गत सुरु केलेल्या मोहिमेत आता कोथरूड येथील सागर येनपुरे ऊर्फ मांडी व त्याच्या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यांचा कार्यकाळातील मोक्का अंतर्गत करण्यात आलेली ही 104 वी कारवाई आहे.
पोलिसांनी सांगितले कि, सागर येनपुरे ऊर्फ मांडी व त्याच्या साथीदारांनी कोथरूड परिसरात मोठ्या प्रमाणात दहशत माजवली होती. हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याने त्याच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी आयुक्त अमिताभ गुप्ता यांना करण्यात अलायी होती. तयानुसार सागर ऊर्फ मांडी तानाजी येनपुरे (रा. केळेवाडी, कोथरूड पुणे, टोळीप्रमुख) व त्याचे साथीदार साहिल विनायक जगताप, अक्षय दामु वाळुंज, सुरेश कालीदास वाजे, वैभव ऊर्फ भो-या प्रदिप जगताप, यांच्यावर खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, मृत्यु किंवा जबर दुखापत घडवून आणण्याची धमकी देणे, गैरकायद्याची मंडळी जमवणे, इच्छापुर्वक जबर दुखापत करणे असे अनेक गुन्हे दाखल आहेत.
या आरोपींवर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करुन देखील त्यांची गुन्हेगारी प्रवृत्ती कमी होत नसल्याने त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्या द्वारे कारवाई करण्यासाठी कोथरूड पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी परीमंडळ ०३ च्या पोलीस उप आयुक्त पौर्णिमा गायकवाड यांच्या मार्फत पोलिस आयुक्त यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार आयुक्तांचा आदेशानुसार अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिलेली आहे.
मुंबई : राज्यात नवीन सरकार आल्यानंतर एकही प्रकल्प बाहेर गेलेला नाही. उलट राज्यात नवीन सरकार आल्यानंतर 25 हजार कोटींच्या गुंतवणूक प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. राज्यात उद्योगवाढीसाठी, रोजगारनिर्मितीसाठी नवे सरकार पूर्ण प्रयत्न करत असून राज्याला उद्योगात क्रमांक 1 चे राज्य बनवण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, उद्योग राज्यात येण्यासाठी कसे वातावरण हवे हे संपूर्ण देशाला माहिती आहे. एअरबससंदर्भात आपण कंपनीशी संपर्क केला. एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून पाठपुरावा केला.
प्रत्येक प्रकल्पनिहाय तारखा आणि त्या-त्यावेळी प्रकाशित विविध वृत्तही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी पुराव्यानिशी सादर केले. फॉक्सकॉनसंदर्भात ते म्हणाले की, 7 जानेवारी 2020 रोजीच तत्कालीन उद्योगमंत्री यांनी फॉक्सकॉन महाराष्ट्रात येणार नाही, हे स्पष्ट केले होते. डिसेंबर 2021 मध्येच एअरबससाठी गुजरातची जागा निश्चित झाली होती. मार्च 2022 मध्ये टाटा अॅडव्हान्स सिस्टीम्स लि.ने (टीएसीएल) गुजरात अॅथॉरिटी फॉर अॅडव्हान्स रुलिंग (जीएएआर) यांच्याकडे एक पत्र दिले आणि त्यात गुजरातमधील 4 जागा निश्चित करण्यात आल्याचे सांगितले, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
सॅफ्रनच्या बाबतीत तर ‘फेक नॅरेटिव्ह’चा कहरच झाला. फ्रान्सच्या भारतातील राजदूतांनी सॅफ्रनच्या हैदराबाद फॅक्टरीतील त्यांचे छायाचित्र 2 मार्च 2021 रोजी ट्विट केले आहे. 7 जुलै 2022 रोजी हा प्रकल्प सुरू झाल्याचे छायाचित्रासह वृत्त अनेक ठिकाणी प्रकाशित झाले आहे. काल-परवा हा प्रकल्प गेल्याचे वृत्त खोडसाळपणाचे असल्याचेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.
मुंबई :- “नद्यांचे प्रदूषण कमी केले पाहिजे. त्यांचे संवर्धन करणे गरजेचे असून गोदावरी या मराठी चित्रपटातून नदीसोबतचे आपले नाते पुनरूज्जीवित करता येईल”, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केले.
यशवंतराव चव्हाण सभागृहात ‘गोदावरी’ चित्रपटाच्या ट्रेलरचे अनावरण उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिओ स्टुडिओचे कन्टेन्ट हेड निखिल साने, अभिनेता जितेंद्र जोशी , दिग्दर्शक निखिल महाजन, गायक राहुल देशपांडे यांच्यासह चित्रपटातील कलाकार, तंत्रज्ञ, संबंधित मान्यवर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, ‘गोदावरी ही आपल्या करिता जीवनदायिनी आहे. या नदीशी नातं सांगणारी गोष्ट गोदावरी चित्रपटात आहे. सभ्यता, संस्कृती यांच्यासोबत नदीचा थेट संबंध आहे. आपल्या वेदांमध्ये, संस्कृतीतही नद्यांचे महात्म्य सांगितलेले आहे. पण कालौघात औद्योगिक विकास प्रक्रियेत नद्यांची शुद्धता धोक्यात आली आहे. ती शुद्धता जपण्यासाठी नद्यांचे संवर्धन करणे आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नदी शुद्धीकरणासाठी अमृत योजना सुरू केली आहे. त्यामध्ये गोदावरी नदीचा समावेश असल्याचे सांगून श्री. फडणवीस म्हणाले की, गोदावरीचे आपल्या सर्वांच्या दृष्टीने महत्त्वाचे स्थान असून या चित्रपटात गोदावरी या नदीभोवतीच्या एका व्यक्तीची कथा सादर केली आहे. मराठी चित्रपटांना आशयघन परंपरा आहे. ती कायम ठेवत या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा, सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकावलेला आहे’. प्रेक्षकांना ही गोष्ट आपली वाटेल. हा चित्रपट वेगळा ठसा उमटवेल असे सांगून श्री. फडणवीस यांनी पुरस्कारांबद्दल कलाकारांचे अभिनंदन केले.
‘टीटीए’ व ‘आयईआय’तर्फे ‘आईन्स्टाईनच्या मेंदूचा प्रवास’वर व्याख्यान पुणे : “अल्बर्ट आईन्स्टाईन लहानपणासून अंतर्मुख स्वभावाचे, सतत नाविन्यपूर्ण गोष्टी करून पाहणारे प्रयोगशील व जिज्ञासू व्यक्तिमत्व होते. कुतूहल व उत्सुकतेपोटी प्रत्येक विषयाचा सखोल व निर्णायक अभ्यास करण्याची त्यांची वृत्ती होती. त्यामुळेच ते जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ झाले आणि त्यांनी अनेक सिद्धांत जगाला दिले,” असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. मुकुंद मोहरीर यांनी केले. टेक्नॉलॉजी ट्रान्सफर असोसिएशन (टीटीए) व इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स इंडिया पुणे स्थानिक केंद्र यांच्यातर्फे ‘आईन्स्टाईनच्या मेंदूचा प्रवास’ या विषयावर डॉ. मुकुंद मोहरीर यांचे व्याख्यान झाले. इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्सच्या फिरोदिया सभागृहात झालेल्या व्याख्यानावेळी ‘टीटीए’चे अध्यक्ष यशवंत घारपुरे, खजिनदार वसंत शिंदे, इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स पुणेचे ज्येष्ठ आर्किटेक्ट दिलीप पाटील, विज्ञान प्रसारक दीपाली अकोलकर आदी उपस्थित होते. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून पदवीधर आणि एअरोस्पेसमध्ये पीएचडी असलेले डॉ. मोहरीर नासामधून शास्त्रज्ञ म्हणून निवृत्त झालेले आहेत. रॉकेट्स, स्पेस शटल्स, क्रूज मिसाईल्स, स्पेस प्लॅन, एअर वेहिकल्स, स्पेस लॅब आदी प्रकल्पांवर काम केले आहे. या प्रवासाविषयी देखील यावेळी माहिती देण्यात आली. आईनस्टाईन यांच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांताचा व ‘उर्जा-वस्तुमान समीकरण’ याचा खास उल्लेख करून मोहरीर यांनी त्या काळातील ‘विज्ञानविश्वात’ झालेल्या चिकित्सक चर्चांचे सुरेख वर्णन सादर केले. डॉ. मुकुंद मोहरीर यांनी आईन्स्टाईनच्या विविध शोधांचा, त्यांच्या संशोधक वृत्तीचा आढावा घेतला. डॉ. मोहरीर म्हणाले, “आईन्स्टाईनचा जन्म १८७९ मध्ये झाला. वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी मॅग्नेटिक एरिया म्हणजे काय हे शोधून काढले. वयाच्या १४ व्या वर्षी त्यांनी बीजगणितात लक्ष घालत मेडिकल सायन्सचे गणित सोडवले होते. त्यासोबतच तत्वज्ञानाचा अभ्यास सुरु केला. आईनस्टाईन यांनी भगवान श्रीकृष्ण आणि वेदांचाही अभ्यास केला.” “पुढे त्यांनी एकामागून एक शोध लावले. प्रत्येक गोष्टीत हे असे का? यावर ते विचार करत. वेग आणि काळ याचा संबंध त्यांनी अभ्यासला. कृष्णविवर, देवकण याबाबत ते ठाम होते. आयुष्यभर गूढ उलगडण्याचा प्रयत्न करणाऱ्या आईन्स्टाईन यांना १९२१ मध्ये नोबेल पारितोषिकाने गौरविण्यात आले,” असे डॉ. मोहरीर यांनी नमूद केले.
पुणे:कात्रज येथील ओंकार सोसायटीमध्ये उच्चदाबाच्या उपरी वीजवाहिनीचा धक्का लागून जखमी झालेल्या ऋषिकेश मंजूनाथ पुजारी या १४ वर्षीय बालकाचा उपचार सुरु असताना दुर्दैवी मृत्यू झाला. या विद्युत अपघातप्रकरणी राज्य शासनाच्या जिल्हा विद्युत निरीक्षक कार्यालयाकडून चौकशी सुरु आहे. त्यांचा तांत्रिक निरीक्षण अहवाल प्राप्त झाल्यानंतर महावितरणकडून दोषींविरुद्ध नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल. तसेच मृताच्या कुटुंबियास आर्थिक मदत करण्यात येत आहे.
ओंकार सोसायटीच्या रस्त्याच्या कडेने उच्चदाबाची २२ केव्ही कात्रज-कोंढवा वीजवाहिनी गेली आहे. गेल्या रविवारी (दि. २३) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास या उपरी वाहिनीच्या संपर्कात आल्याने विजेच्या धक्क्याने ऋषिकेश जखमी झाला होता. याबाबत महावितरणच्या पद्मावती विभाग कार्यालयाकडून राज्य शासनाच्या विद्युत निरीक्षक कार्यालयास कळविण्यात आले होते. त्याप्रमाणे विद्युत निरीक्षकांनी या जागेची पाहणी केली आहे. त्यांच्याकडून तांत्रिक निरीक्षण अहवाल लवकरच प्राप्त होईल. दरम्यान, महावितरणच्या संबंधित अभियंत्यांनी या जागेची पाहणी केली आहे. यामध्ये उपरी तारमार्ग स्वरुपाची असलेल्या वीजवाहिनीचे रस्त्याच्या बाजूच्या जमिनीपासूनचे अंतर योग्य असल्याचे दिसून आले. वीजवाहिनी असलेल्या ठिकाणच्या रस्त्यालगत १० ते १२ फूट उंच भिंत बांधण्यात आली आहे. भिंतीच्या आतील बाजूस भराव टाकल्यामुळे वीजवाहिनीचे जमिनीपासूनचे अंतर कमी झाल्याचे निदर्शनास आले. भिंतीच्या आतील परिसर वापरात नसल्याने तेथे झाडेझुडपे वाढलेली आहे. सोसायटीच्या आतील बाजूने ऋषिकेश भिंतीवर गेला असावा व उपरी वाहिनीच्या संपर्कात आल्याने विजेचा धक्का बसला असे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.
पुणे – ‘गुजरात मॅाडेल’चा प्रचार व प्रसार करून २०१४ मध्ये केंद्रात आलेल्या मोदी-शहांच्या गुजरातला अखेर केंद्रातील सत्तेच्या दहशतीवर महाराष्ट्रातील प्रकल्प पळवण्याची वेळ येणे हीच गुजरात विकास मॅाडेलची पोलखोल असून, भाजपचा खोटारडेपणा ऊघडा झाल्याची घणाघाती टिका काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी राज्यातील प्रकल्प गुजरातला जाण्याच्या पार्श्वभुमिवर केली.
ते म्हणाले,’ वास्तविक भाजपने २०१४ च्या लेकसभा निवडणूकीत तत्कालीन गुजरात मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदाचे ऊमेदवार जाहीर केले त्याची पार्श्वभुमीच मुळात ‘कथित विकासाचे गुजरात मॅाडेल’ हे होते. मात्र तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्याचवेळी कथित गुजरात मॅाडेलचा पर्दाफाश करून त्यावेळी देखील विकासाच्या व रोजगारीच्या मुद्दयांवर गुजरात पेक्षा महाराष्ट्रच् १ नं वर (पुढे) असल्याचे जाहीर केले होते. व या विषयी खुल्या चर्चेचे आव्हान देखील तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना लेकसभा निवडणुक काळातच वारंवार दिले होते याचे स्मरण देखील काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केले.मोदी – शहांच्या भाजपला अधिक काळ देशातील जनतेची दिशाभूल करता येणार नाही अखेर वास्तवता ही समोर येतेच असेही गोपाळ तिवारी यांनी सांगीतले. केंद्रातील सत्तेच्या आधारे राजकीय नेत्यांना नामोहरम करून वा प्रचंड अमिषे देवून विविध राज्यातील सरकारे पाडापाडी करण्याचा व ती अस्थिर करण्याचा संविधान विरोधी खेळ फार काळ चालणारा नाही याचे ऊचीत भान भाजप नेत्यांनी ठेवावे असे ही सांगितले. कारण असल्या खेळांमुळे राज्याच्या प्रगतीवर, स्थिरतेवर परीणाम होत असून राज्यांच्या अर्थव्यवस्थेवर व पर्यायाने जनतेवरच् याचा अनिष्ट परीणाम होत असल्याचा गंभीर इशारा देखील काँग्रेस प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी दिला..मोदी-शहांचे मित्र व गुजरातचे भांडवलदार उद्योजक यांचा लोकसभा निवडणुकीत भाजपला आर्थिक दृष्ट्या पाठींबा असल्याची चर्चा देखील भाजप च्या गोवा अधिवेशनात खुप रंगली असल्याचे वृत्त देखील पुढे आले होते व त्यामुळेच भाजप ने इतर नेत्यांना सोडून नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदाचे ऊमेदवार केले हे देखील सर्वश्रुत होते.. अशी टिपणी ही गोपाळ तिवारी यांनी केली.
मुंबई–: लंडनमधील प्रतिष्ठित सोशल कॅलेंडरचा एक भाग मानले जाणारे आणि आजवरच्या पंतप्रधानांची उपस्थिती ज्याला लाभली आहे असे हिंदुजा दिवाळी रिसेप्शन काल संपन्न झाले. गेली तीन वर्षे महामारीमुळे हा समारंभ होऊ शकला नव्हता. या समारंभाची आमंत्रणे आधीच दिली गेली होती, पण युकेमध्ये झालेल्या राजकीय घडामोडींमुळे या समारंभाचा देखील एक नवा शुभारंभ झाला.
दिवाळीच्या आधी श्री ऋषी सूनक हे युनायटेड किंग्डमचे पहिले ब्रिटिश एशियन हिंदू पंतप्रधान बनले. लंडन हेरिटेज होम, द कार्लटन हाऊस टेरेस येथे आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी रिसेप्शनमध्ये मित्रमंडळी, खासदार, राजदूत आणि परराष्ट्र अधिकारी, उद्योगक्षेत्रातील दिग्गज आणि पत्रकार अशा ३०० पेक्षा जास्त पाहुण्यांनी हिंदुजा परिवाराच्या आतिथ्यशीलतेचा लाभ घेतला. कोविड-१९ महामारी सुरु झाल्यापासून या परिवाराने आयोजित केलेला हा पहिलाच दिवाळी समारोह होता.
हिज मॅजेस्टी किंग चार्ल्स III यांचे प्रिन्सिपल प्रायव्हेट सेक्रेटरी सर क्लाइव्ह एल्डेर्टन यांनी किंग चार्ल्स हे सर्व श्रद्धा व समुदायांप्रती वचनबद्ध असल्याचे अधोरेखित करत त्यांच्या विशेष दिवाळी शुभेच्छा दिल्या आणि समारंभाला सुरुवात झाली.
हिंदुजा ग्रुपचे सह-अध्यक्ष श्री. गोपीचंद हिंदुजा यांनी त्यांचे बंधू श्री. प्रकाश व श्री. अशोक हिंदुजा यांनी पाहुण्यांचे स्वागत केले, तसेच दिवाळीचे महत्त्व, देवी लक्ष्मी यांच्याबद्दल माहिती सांगितली. त्याग व दानातून मिळणारे आशीर्वाद व समाधान यामध्ये खरी संपत्ती कशी सामावलेली आहे याबाबत देखील ते याप्रसंगी बोलले. श्री. जीपी हिंदुजा यांनी आपले मोठे बंधू श्री. एसपी हिंदुजा यांची खूप आठवण येत असल्याचा देखील उल्लेख केला, श्री एसपी हिंदुजा हे तब्येत ठीक नसल्यामुळे या समारंभाला येऊ शकले नाहीत.
या उत्सवात सामील झालेल्या कंझर्व्हेटिव्ह, लेबर आणि लिबरल डेमोक्रॅट पक्षांच्या प्रतिनिधींमध्ये नवीन कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे अध्यक्ष, श्री नदिम झहावी एमपी, कोविड १९ साथीच्या काळातील माजी आरोग्य सचिव, श्री मॅट हॅनकॉक एमपी, परराष्ट्र कार्यालय मंत्री विम्बल्डनचे लॉर्ड अहमद आणि जागतिक कीर्तीचे लंडनचे महापौर श्री सादिक खान या मान्यवरांचा समावेश होता. या समारंभाच्या निमित्ताने सर्व धर्म, समुदायांच्या आणि राजकीय लोकांना एकत्र आणल्याबद्दल त्यांनी हिंदुजा कुटुंबाचे आभार मानले. श्रीमती कमल प्रकाश हिंदुजा, व सौ.हर्षा अशोक हिंदुजा यांनी देवी लक्ष्मीची मूर्ती मान्यवरांना भेट म्हणून दिली.
बॉलिवूडमधून अर्जुन रामपाल व गॅब्रिएला आणि पार्श्वगायिका कनिका कपूर हे उपस्थित होते. आर्सेलरचे एलएन मित्तल सध्या प्रवासात आहेत पण त्यांच्या पत्नी श्रीमती उषा मित्तल तसेच हिंदुजा ग्रुप ज्या-ज्या ठिकाणी कार्यरत आहे अशा ३८ देशांमधील २२ हाय कमिशनर्स देखील या समारंभाला उपस्थित होते.
युनायटेड किंगडमच्या नवीन पंतप्रधानांच्या यशासाठी देवी लक्ष्मी आणि श्री गणेश यांचे आशीर्वाद लाभावेत असे आवाहन करून, श्री ऋषी सुनक, श्री गोपीचंद हिंदुजा, महापौर श्री सादिक खान आणि लॉर्ड तारिक अहमद यांनी युनायटेड किंगडममधील विविधतेच्या समृद्धीचा उल्लेख केला. ख्रिश्चन सम्राट, हिंदू पंतप्रधान आणि लंडनच्या मुस्लिम महापौरांनी प्रसिद्ध हिंदी चित्रपट ‘अमर अकबर अँथनी‘चा संदर्भ दिला आणि योगायोग म्हणजे या चित्रपटाला हिंदुजा कुटुंबाने वित्तपुरवठा केला होता. लंडनमधील अर्धा दशलक्ष हिंदू समुदायाचे कौतुक करताना महापौर श्री सादिक खान म्हणाले, “लंडन हे जगातील सर्वात मोठे शहर आहे आणि हिंदू धर्माच्या लंडनवासीयांनी दिलेले मोठे योगदान हे यामागील एक कारण आहे”.
दिवाळीच्या परंपरेला आणि हिंदुजा कुटुंबाच्या आचारसंहितेला अनुसरून पाहुण्यांसाठी निवडक शाकाहारी भारतीय खाद्यपदार्थांची स्वादिष्ट मेजवानी आयोजित करण्यात आली होती.
जिनियस बुक ऑफ रेकॉर्ड्स,वंडर बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंद पुणे : भारतरत्न लता मंगेशकर दीदींच्या स्वराने अजरामर झालेली, ५१ संगीतकारांनी संगीत दिलेली, ५१ अभिनेत्रीवर चित्रीत झालेली ,५१ चित्रपटातील ५१ गाणी सलग एकाच कार्यक्रमात सादर करण्याचा विक्रम पुण्यातील गायिका आरती दीक्षित यांनी केला आहे . ‘वंडर बुक ऑफ रेकॉर्ड’आणि ‘जिनियस बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये हा विक्रम नोंदविला गेला आहे.प्रसाद मंगल कार्यालय येथे झालेल्या या विक्रमी कार्यक्रमात वंडर बुक ऑफ रेकॉर्ड्स चे परीक्षक आमी छेडा,पंकज चंद्रात्रे, तसेच देवदत्त जोशी ,भाग्यश्री जोशी हे मान्यवर उपस्थित होते.यावेळी प्रमाणपत्र,सन्मानचिन्ह देऊन आरती दीक्षित यांना गौरविण्यात आले. आरती दीक्षित या ‘निसर्गराजा’, ‘बिनाका गीतमाला’, अशा विविध संकल्पनांवर आधारीत कार्यक्रम सादर करतात. गायन क्षेत्रात त्या २० वर्षे कार्यरत आहेत. अमीन सयानी यांच्यासमवेत देखील त्यांनी कार्यक्रम केले आहेत.
‘ऋत्विक फाउंडेशन’तर्फे ‘ख्याल विमर्श’ कार्यक्रम उत्साहात पुणे : “भारतीय शास्त्रीय संगीतातील ख्याल गायकी हा लोकप्रिय प्रकार असला, तरी कलाकारांसाठी तो साधनेचा विषय आहे. विलंबित (मोठा ख्याल) व द्रुत (छोटा ख्याल) अशा दोन प्रकारातील ख्याल गायकी उत्स्फूर्त बांधणी व नवनिर्मितीला वाव देते. तालक्रियेतील दोन भाग आणि बारा स्वरांच्या पलीकडे जाऊन लागणाऱ्या श्रुती यामुळे गायकाला अभिव्यक्त होता येते,” असे प्रतिपादन ज्येष्ठ गायक, संगीतज्ञ आणि लेखक पं. सत्यशील देशपांडे यांनी केले.
तरुणांमध्ये शास्त्रीय संगीताची गोडी वाढावी यासाठी कार्यरत ‘ऋत्विक फाउंडेशन’च्या वतीने आयोजित ‘ख्याल विमर्श’ या विशेष कार्यक्रमात पं. देशपांडे बोलत होते. कोथरूडमधील ऋत्विक फाउंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्ट्सच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात विविध मुखड्यांचे सादरीकरण करत त्यातील बारकावे, तुकडे, आवर्तन, ताल, राग, बोल असे अनेक प्रकार समजावून सांगितले. फाउंडेशनचे प्रवीण कडले, चेतना कडले उपस्थित होते. ‘आधा है चंद्रमा, रात है आधी’, ‘कजरा रे कजरा रे’ अशा लोकप्रिय गाण्यांचे मुखडे अनुक्रमे एकताल व तीन ताल या शास्त्रीय तालांमध्ये आणून नवनिर्मितीला व वैयक्तिक अभिव्यक्तीला कसा वाव मिळतो हे सप्रयोग दाखवले व याच मुखड्यांच्या वैविध्यपूर्ण सादरीकरणाने उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. सृजन देशपांडे यांनी सह गायन, तर विभाव खंडोलकर यांनी तबल्यावर साथ संगत केली.
पं. सत्यशील देशपांडे म्हणाले, “अभिजात शास्त्रीय संगीताची मोठी परंपरा आहे. आपल्याकडे त्याच गवयाचा तोच राग ऐकायला श्रोते पुन्हा येतात, हे आपल्या संगीताचे वैशिष्ट्य आहे. यामध्ये आपली कला दाखवायला कसा वाव असतो, तो जगातील इतर संगीतापेक्षा कसा वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे, हे विषद करून सांगितले. विशेषतः पाश्चात्य कला-संगीत, कसे समूह संगीत आहे, आणि त्यात पूर्वनियोजितपणावर किती भर असतो ते सांगितले. बंदिशीबद्दलचे त्यांचे विचार, तिचे तीन घटक, आणि बंदिश कसे राग दर्शवतो, पण बंदिश म्हणजे पूर्ण राग कसा नाही हे सप्रयोग दाखवले.
ब्राह्मण समाज हा कर्तृत्वान लोकांची परंपरा असलेला समाज –मेधा कुलकर्णी
संदीप खरे, इंद्रनील चितळे यांना यंदाचा युवा कलाकार व युवा उद्योजक पुरस्कार प्रदान याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियान (युवा) १५ वा वर्धापन दिन सोहळा पुणे : स्वातंत्र्याच्या ७५ वर्षाच्या काळात संस्कृतच्या अभ्यासाकडे आपले दुर्लक्ष झाले आणि त्याचे केंद्र भारताबाहेर अमेरिकेसारख्या देशात झाले. त्यामुळे संस्कृतचे विकृत अर्थ आपल्याला आणि जगाला देखील ते सांगत आहेत. संस्कृतचा वारसा, त्यावरचा ताबा पुन्हा मिळवायला पाहिजे. संस्कृत हा केवळ भारताचा नाही तर जगाचा वारसा आहे. ती जगातील सर्वश्रेष्ठ भाषा आहे. संस्कृतचा अभ्यास सुरू केला तर संस्कृतला नवा आकार येईल, असे मत माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केले.
शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळाचा उपक्रम असलेल्या याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियान (युवा) च्या १५ व्या वर्धापनदिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन टिळक स्मारक मंदिर येथे करण्यात आले होते. सोहळ्यांतर्गत सृजन युवा कलाकार व युवा उद्योजक पुरस्कार लोकप्रिय युवा कवी संदीप खरे आणि चितळे बंधू मिठाईवालेचे इंद्रनील चितळे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी माजी आमदार मेधा कुलकर्णी, संस्थेचे कार्याध्यक्ष विश्राम कुलकर्णी, श्रीकांत जोशी, अजय कुलकर्णी, स्वाती कुलकर्णी, अभिजित देशपांडे, मंदार महाजन, निकिता संत, मिलिंद दारव्हेकर, मंजुषा वैद्य आदी उपस्थित होते.
युवा उपक्रमांतर्गत सृजन आर्ट गॅलरी पुरस्कृत सृजन युवा कलाकार पुरस्कार आणि स्व. चंद्रकांत जोशी स्मृतिप्रित्यर्थ युवा उद्योजक पुरस्कार दिला जातो. सन्मानचिन्ह, मानपत्र, पुषपगुच्छ असे पुरस्काराचे स्वरुप होते. यावेळी संदीप खरे व इंद्रनील चितळे यांच्या यशस्वी प्रवासाबद्दलची मुलाखत घेण्यात आली.
अविनाश धर्माधिकारी म्हणाले, शिक्षणाच्या केंद्रात तपश्चर्या करायची असते ही भावना आताच्या रूढ शिक्षणपद्धतीत राहिली आहे का याचा विचार करायला पाहिजे. संस्कृतचा अभ्यास, वेदविद्येला पुन्हा चालना आणि ती करताना उद्योजक विकास या दिशेने वाटचाल झाली तर आपलाच नाही तर भारताचा आणि जगाचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे.
मेधा कुलकर्णी म्हणाल्या, ब्राह्मण समाजातील सर्वांनी एकमेकांना आधार आणि प्रोत्साहन द्या. देश म्हणून एकत्र येत संघटित व्हा. आर्थिक गोष्टीसाठी एकत्र येणे ही एक बाब झाली, परंतु आपल्या अस्मितेसाठी देखील एकत्र या. ब्राह्मण समाज हा कर्तृत्वान लोकांची परंपरा असलेला समाज आहे, असेही त्यांना सांगितले.
इंद्रनील चितळे म्हणाले, व्यावसायिकाच्या संघर्षाच्या काळात तो एकटा असतो. त्यामुळे असे पुरस्कार मिळणे हे त्याच्यासाठी प्रोत्साहन असते.
संदीप खरे म्हणाले, कोणताही कलाकार निर्मितीच्या प्रवासात एकटाच असतो. या प्रवासातील त्याच्या कथा-व्यथा त्या कलाकाराला एकटे करून सोडतात. अशावेळी मिळणारे पुरस्कार हे विश्रांती, सावली देणाऱ्या झाडासारखे असतात.
मंदार महाजन यांनी सूत्रसंचालन केले. विश्राम कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. प्रशांत देशपांडे यांनी आभार मानले.
‘नाम रंगी रंगुनी’ भक्तीगीतांचा कार्यक्रम : आरव पुणे निर्मित आणि हटके म्युझिक ग्रुप यांच्या वतीने आयोजन पुणे : तू माझा देवा प्रेमळू…खुले देवघर दरवळावे पहाटे…प्रेम से बोलो बस एक नाम,जय जय राम जय जय राम…बाई मी विकत घेतला शाम..विठू माऊली तू माऊली जगाची…पीठ शेल्याला लागले झाला राउळी गोंधळ कुण्या घरचे दळण आला दळूनी विठ्ठल अशा भगवंताची आळवणी करणाऱ्या आणि भक्तीचे गोडवे गाणाऱ्या भक्तीगीतांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
आरव पुणे निर्मित आणि हटके म्युझिक ग्रुप यांच्या वतीने ‘नाम रंगी रंगुनी’ या भक्तीसंगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन नवी पेठेतील पत्रकार भवन येथे करण्यात आले होते.
संगीतकार सुधीर फडके, लक्ष्मीकांत प्यारेलाल, पांडुरंग दिक्षीत,अनिल-अरुण, संत पुरंदरदास यांच्या रचानांसोबत गायक संगीतकार निखिल महामुनी यांच्या रचना कार्यक्रमात सादर झाल्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मी गातो माझे गाणे हे गीत सुरवातीला निखिल महामुनी यांनी सादर केले – त्यात शिरीष कुलकर्णी यांनी एक अनोख्या पद्धतीने शिळे ने साथ दिली .. त्यानंतर सुबह सुबह जब आँखें खोलो, दीपावली मनाये सुहानी… सत्यम शिवम सुंदरम…या गीतांना श्रोत्यांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली. नाम जपन क्यूं छोड दिया…शंभो शंकरा करुणाकरा…तुम से क्या मांगू मेरे साई…नाम रंगी रंगले या गीतांच्या सादरीकरणाने वातावरण प्रसन्न केले. हार्मोनिका किंवा माऊथऑर्गन (मराठीत बाजा) या पाश्चिमात्य वाद्यावर “विठू माउली तू” हा अभंग वाजवण्याचे अनोखा प्रयत्न झाला
कुमारी ऋचा निखिल महामुनी आणि कु.श्रिया निखिल महामुनी यांच्या गीत सादरीकरणाला रसिकांनी उभ राहून प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटामध्ये कौतुक करून खूप मोठी दाद मिळाली
डॉ. अनुराधा गोगटे, अपर्णा काळे, अश्विनी आगाशे, डॉ.विजया पुराणीक, ऋचा महामुनी श्रीया महामुनी यांनी सहगायन केले. शिरीष कुलकर्णी यांनी निवेदन केले. श्री शैलेंद्र गोस्वामी यांचे विशेष मार्गदर्शन या कार्यक्रमाला मिळाले होते.
अबालवृद्धांनी लुटला ‘दिवाळी संध्या’चा आनंद ‘सुर तेच छेडिता’,’लतायुग’ ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे सूर तेच छेडीता … आम्ही ठाकर … ठाकर, अश्विनी ये ना…,वल्हव रे नाखवा हो, सैराट झालं जी, जांभूळ पिकल्या झाडाखाली,मनाच्या धुंदीत उधळीत ये ना, शारद सुंदर चंदेरी राती, या जुन्या आणि नव्या मराठी गीतांचा मनमुराद आनंद लुटताना नागरिकांनी निःसंकोचपणे गाण्यांच्या तालावर ठेका धरत दिवाळीनंतरच्या सांगीतिक दिवाळीचा खऱ्या अर्थाने आनंद लुटला. निमित्त होते, आधार सेवा फाऊंडेशनतर्फे सहकारनगरमधील तुळशीबागवाले कॉलनी मैदानात आर्किटेक्ट हेमंत बागुल यांनी आयोजित केलेल्या दिवाळी संध्या संगीत महोत्सवाचे .दोन दिवस रंगलेल्या या दिवाळी संध्याचा शुभारंभ ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत उल्हास पवार, दत्तवाडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अभय महाजन, माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून झाला. यावेळी पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्रीताई आबा बागुल, आयोजक हेमंत बागुल, श्रुतिका बागुल ,घनःश्याम सावंत ,नंदकुमार बानगुडे आदींसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी जितेंन्द्र भुरूक प्रस्तुत ‘सुर तेच छेडिता’ या जुन्या- नव्या मराठी गीतांच्या कार्यक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कसदार गायन आणि दमदार वाद्यवृन्दाला दाद देताना रसिकांनी अनेक गाण्यांवर ठेकाही धरत ‘वन्समोअर’ चा आग्रहही केला.
‘लतायुग’मधून स्वरसम्राज्ञी लतादीदींना अभिवादन
चित्रपट सृष्टीत अनेक चेहरे बदलत गेले मात्र गानसम्राज्ञी भारतरत्न स्व. लता मंगेशकर यांचा आवाज कायम राहिला. अशा या लतादीदींना दिवाळी संध्याच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या ‘लतायुग’ या विशेष कार्यक्रमातून त्यांच्या लोकप्रिय गीतांद्वारे अभिवादन करण्यात आले. संदीप पंचवाटकर निर्मित या कार्यक्रमात अजीब दास्ताँ है ये.. कहा खतम कहा शुरु, सोला बरस की बाली उमर को सलाम, मेघा रे मेघा मत परदेसी जा ,रात का समा झुमे चंद्रमा,फुल तुम्हे भेजा हैं खत में,तुझसे नाराज नहीं जिंदगी,तुझे देखा तो ये जाना सनम,बाहो में चले आओ…हम से सनम क्या परदा,यारा सिली सिली यासह अनेक गीते रेशमी मुखर्जी, गफार मोमीन, राजेश्वरी पवार,विवेक पांडे , कल्याणी देशपांडे यासह अन्य गायकांनी सादर केली. यावेळी स्व. लतादीदी यांच्या प्रत्येक शो मध्ये ३४ वर्षे साथ संगत करणाऱ्या विवेक परांजपे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तर एअर ब्रश स्प्रे पेंटींगद्वारे लतादीदींचे चित्र साकारणारे चित्रकार मिलिंद शिंपी यांचाही विशेष गौरव करण्यात आला.
पुणे- महापालिकेत प्रशासक राज असल्याने आता कोणत्या समितीची बैठक कधी कुठे कशी होते ते नागरिकांनाच काय ? पण असंख्य आजी माजी नगरसेवक ,ज्येष्ठ माध्यम प्रतिनिधी यांनाही समजू दिली जात नाही .त्यात स्थायी समिती आणि सुरक्षा रक्षकाच्या भरतीचे टेंडर … नेहमीप्रमाणे मर्जीतील लोकांना बैठक झाल्यावर माहिती देऊन , बैठकीला कोणते कसे विषय कधी आले ? काय प्रस्ताव आहेत हे सारे गोपनीय ठेऊन गोपनीय पद्धतीने प्रशासकांनी हे टेंडर मंजूर केल्याची माहिती आहे. .सध्या सुरक्षा रक्षक पुरविण्याचे काम भाजपच्या एका बड्या नेत्याच्या कंपनीकडे आहे. मात्र, या कंपनीने सुरक्षारक्षकांचे वेतन वारंवार वेळेवर दिले नसल्याच्या तक्रारी सातत्याने करण्यात आल्या होत्या.आता हेही राहणार आहेत कि नाही हे स्पष्ट न करता नवी २ टेंडर्स मंजूर करण्यात आली आहेत .अर्थात ती कोणाची आहेत हेही गुपितच आहे.
महापालिकेच्या विविध वास्तुंच्या संरक्षणासाठी कंत्राटी सुरक्षा रक्षक नेमण्यात येणार आहेत. त्यासाठीच्या दोन कंपन्यांच्या निविदांना महापालिकेने मंजुरी दिली आहे.महापालिकेच्या मुख्य इमारतीसह, क्षेत्रीय कार्यालये, आरोग्य केंद्र, दवाखाने, जलकेंद्रे, सांस्कृतिक केंद्रे, क्रीडांगणे, स्मशानभूमी, मंडई, माध्यमिक शाळा, कचरा हस्तांतरण केंद्र, मैलापाणी प्रक्रिया प्रकल्प, उद्याने, वसतिगृह आदींसह विविध वास्तूंच्या ठिकाणी सुरक्षा पुरवण्यासाठी खासगी ठेकेदाराच्या माध्यमातून १ हजार ६४० सुरक्षारक्षक नेमण्यात येणार आहेत.महापालिका सेवेतील कायमस्वरूपी सुरक्षारक्षक यांच्या ५० टक्के जागा रिक्त आहेत.सध्या महापालिकेच्या सुरक्षा यंत्रणेत केवळ ३५० कायमस्वरूपी सुरक्षारक्षक कार्यरत आहेत. सुरक्षा विभागाकडे एकूण ६५० सुरक्षा रक्षकांच्या जागा मान्य असून, यापैकी ३०० जागा रिक्त आहेत.
दरम्यान महापालिका प्रशासनाकडून कंत्राटी पद्धतीने सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. यामध्ये दोन कंपन्या पात्र ठरल्या त्यानुसार ४४ कोटी ९७ लाख ७१ हजार रुपयांच्या निविदा स्थायी समितीने मंजुर केल्या आहेत.महापालिका कंत्राटी पध्दतीने सुरक्षारक्षक नेमत असताना, काही वर्षांपासून थेट भरती न करणे, कायम नौकरीत न घेणे या सर्व बाबींना फाटा दिला जातो आहे. तो देण्याचे काम्प्रशास्क राजवटीत देखील जोमाने सुरु आहे.
पुणे | लोकसेवा प्रतिष्ठान तर्फे आयोजित करण्यात आलेल्या हिंदुस्थानातील पाहिल्या शिवचरित्र सामुदायिक पारायाणाचा उद्या (सोमवार, 31 ऑक्टोबर) समारोप होत आहे. यानिमित्त प्रसिद्ध शिव व्याख्याते प्रा नितीन बानगुडे पाटील यांचे शिवचरित्रावर व्याख्यान होणार आहे. तर, ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांचा इतिहासातील संशोधनाच्या कार्यासाठी जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.
लोकसेवा प्रतिष्ठान संचलित फुलगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेत सोमवारी (31 ऑक्टोबर) सायंकाळी 5 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. नारायणपूरचे नारायण महाराज यांची या समारोप कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती असून त्यांच्या हस्ते पांडुरंग बलकवडे यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे यांनी दिली.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची माहिती आजच्या पिढीला व्हावी आणि त्यातून प्रेरणा मिळावी या उद्देशाने लोकसेवा प्रतिष्ठान तर्फे या शिवचरित्र सामुदायिक पारायाणाचे आयोजन 27 ऑक्टोबर रोजी केले होते. त्याचा समारोप सोमवारी होत आहे.
या शिवचरित्र सामुदायिक पारायाणात छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती, दुर्गनीती, आरमारनीती, अर्थानिती समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. महाराजांचे कार्य, त्यांचा दैदिप्यमान इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न यामध्यामातून झाला.
मोरबीमधील दुर्घटनेतील पीडितांसाठी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून सानुग्रह मदत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली आहे.
पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले;
”पंतप्रधान @narendramodi यांनी मोरबी येथील दुर्घटनेत मृत्यू झालेल्या प्रत्येकाच्या वारसाला पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून 2 लाख रुपयांची तर जखमींना 50,000 रुपयांची सानुग्रह मदत जाहीर केली आहे.”
PM @narendramodi has announced an ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF for the next of kin of each of those who lost their lives in the mishap in Morbi. The injured would be given Rs. 50,000.
मोरबी इथे झालेल्या दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. अपघातस्थळी बचाव कार्य लवकरात लवकर सुरु करण्यासाठी त्वरित पथकांची व्यवस्था करावी, असे निर्देश पंतप्रधानांनी यावेळी दिले.
पंतप्रधान कार्यालयाने यासंदर्भात ट्वीट केले आहे:
“पंतप्रधान @narendramodi यांनी गुजरातचे मुख्यमंत्री @Bhupendrapbjp आणि इतर अधिकाऱ्यांशी मोरबी इथे झालेल्या अपघाताबद्दल चर्चा केली. घटनास्थळी त्वरीत बचावकार्य सुरु करण्यासाठी पथके पाठवली जावेत, असे निर्देश त्यांनी दिले. बचावकार्य आणि इतर परिस्थितीवर बारीक देखरेख ठेवावी तसेच, पीडितांना सर्वतोपरी मदत करावी, असेही पंतप्रधानांनी सांगितले.”
PM @narendramodi spoke to Gujarat CM @Bhupendrapbjp and other officials regarding the mishap in Morbi. He has sought urgent mobilisation of teams for rescue ops. He has asked that the situation be closely and continuously monitored, and extend all possible help to those affected.