Home Blog Page 1543

राजस्थानमध्ये आणि पंजाबमध्ये शेतातील कचरा जाळण्याच्या घटनांमध्ये वाढ त्यामुळे दिल्ली प्रदूषित -केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह 

नवी दिल्ली- दिल्लीतील हवेची गुणवत्ता सलग पाचव्या दिवशी ‘अतिशय वाईट ‘ श्रेणीत राहिल्यामुळे प्राथमिक शाळा सक्तीने बंद ठेवायला लागल्या आहेत,याबद्दल गंभीर चिंता व्यक्त करत,केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) विज्ञान आणि तंत्रज्ञान;  पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ जितेंद्र सिंह यांनी सावध केले आहे की वायू प्रदूषणाशी संबंधित शेतातील कचरा जाळण्याच्या घटनांमध्ये राजस्थानमध्ये 160% आणि पंजाबमध्ये 20% वाढ झाली आहे. ते पुढे म्हणाले, याचा अर्थ असा होतो की दोन्ही राज्यांतील सरकार अशा प्रकारचा कचरा जाळणे थांबविण्यासाठी पुरेसे प्रयत्न करत नाहीत आणि त्यामुळे दिल्ली एनसीआरमधील हवेची गुणवत्ता सतत ढासळत आहे.

भू- विज्ञान मंत्रालयाच्या  भारतीय हवामान विभागाचेही डॉ जितेंद्र सिंह प्रभारी आहेत, ते यासंदर्भात म्हणाले की, दुसरीकडे, हरियाणा आणि उत्तर प्रदेश सारख्या राज्यांत अशा प्रकारच्या  घटनांमध्ये लक्षणीय  घट नोंदविण्यात आली  आहे.

2018-19 पासून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार, केंद्र सरकारने 3,138 कोटी रुपये राज्यांना शेतातील कचरा व्यवस्थापनासाठी दिले आहेत, त्यापैकी जवळपास 1,500 कोटी रुपये केवळ पंजाबला देण्यात आले आहेत,असे डॉ जितेंद्र सिंह यांनी निदर्शनास आणून दिले.

दिल्लीत या वर्षी ऑक्टोबरमध्ये “अतिशय खराब” हवेची गुणवत्ता सतत 7 दिवस नोंदवली गेली आहे, याउलट  ऑक्टोबर 2021 मध्ये असे एकही प्रकरण आढळले नाही, असा इशाराही त्यांनी  दिला.

गायी, म्हशीचे दुध वाढविण्यासाठी’ऑक्सिटॉसिन’बेकायदा पदार्थाची निर्मिती,साठा आणि विक्री वितरण :टोळी पकडली

गाई, म्हशीचे गोठा मालक यांना विक्री – औषधाने मिळणारे दुध हे मानवी आरोग्यास हानीकारक
पुणे-ऑक्सीटोसीन या औषधाची अवैद्यपणे निर्मिती, साठवणुक करुन त्याचा गैरवापर जनावरांचे दुध पाणविण्यासाठी विक्री व वितरण करणा-या परराज्यातील टोळी जेरबंद करुन ५३लाख ५२हजार ५२० रुपये किंमतीचा ऑक्सिटॉसिन साठा अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा पुणे शहर यांनी जप्त केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि,’ दिनांक ०५/११/२०२२ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक-१, गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार यांना त्यांचे खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, स.नं.२५९, गट नं. १९/२/१ कलवड वस्ती, बौध्द विहार रोड, लोहगांव, पुणे याठिकाणीअसणारे पत्र्याचे शेड मध्ये जनावरांना दुध पाणवण्यासाठी देण्यात येणा-या कुपीचा, इंजेक्शनचा बेकायदेशीर साठा केला आहे
सदर बातमीचे अनुशंगाने पोलीस अंमलदार यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, अंमली पदार्थ विरोधी
पथक-१ गुन्हे शाखा पुणे शहर यांनी त्याबाबत अन्न व औषध प्रशासन पुणे येथील अधिकारी यांना कळविले व कारवाईकरीता
मिळालेले बातमीचे ठिकाणी जावुन छापा कारवाई केली असता सदर ठिकाणी असणारे जागेत एका पत्र्याचे शेड मध्ये वेग-
वेगळ्या पुढयाचे बॉक्स मध्ये वेगवेगळया प्रमाणात ऑक्सिटोसिन या द्रावणाचा साठा करुन ते विक्री करीता पॅकिंग करुन
ठेवलेले दिसले.तसेच त्याठिकाणी इसम १ ) समीर कुरेशी मुळ, रा. उत्तर प्रदेश हा त्याचे पश्चिम बंगाल येथील साथीदार यांचे मदतीने( २ ) विश्वजीत जाना ३ ) मंगल गिरी ४) सत्यजीत मोन्डल ५) श्रीमंता. हल्दर ऑक्सिटॉसिन औषधाचे उत्पादन करुन ते औषध कुपी व इंजक्शन मध्ये भरत असताना दिसुन आले. त्याबाबत त्यांचेकडे केलेल्या अधिक चौकशीत त्याचा एक साथीदार सदरचेद्रावण तयार करून देत असल्याचे व ते मुख्य आरोपी समीर कुरेशी पुणे शहर व जिल्हयातील जनावरांचे गोठयाचे मालक
यांना बेकायदेशिररित्या पुरवित असल्याचे माहिती प्राप्त झाली.
त्यानंतर सोबतचे अन्न व औषध प्रशासन विभागकडील अधिकारी दिनेश माणकचंद खिवसरा, सहा आयुक्त अन्न
औषध प्रशासन, पुणे, आतिष सरकाळे, सुहास सावंत, औषध निरीक्षक पुणे यांचे मदतीने त्याठिकाणी असणारे सर्व
साज्यांची सहा पो निरीक्षक, लक्ष्मण ढेंगळे यांनी पाहणी करून छापा कारवाई करुन इसम नामे १) समीर अन्वर कुरेशी, वय २९
वर्षे, रा. स. नं. २९, गट नं. १ ए/२/१, कलवड वस्ती लोहगांव बुध्द विहार रोड, पुणे, मुळगांव- रा.जि.मेरठ, राज्य उत्तर प्रदेश २ )
बिश्वजीत सुधांशु जाना, वय ४४ वर्षे, रा. पुरबा बार, इलासपुर, पुरबा मदीनीपुर पश्चिम बंगाल ३) मंगल कनललाल गिरी, वय
२७ वर्षे, रा. तिराईपुर विलास पुर इस्ट मदिनपुर, पश्चिम बंगाल ४ ) सत्यजीत महेशचंद्र मोन्डल, वय २२ वर्षे, रा. नबासन
कुस्तीया पंचायत, साऊत २४ परगना, पश्चिम बंगाल ५) श्रीमंता मनोरंजन हल्दर, वय ३२ वर्षे रा. नलपुरकुर, मंडाल परा
गिलरचंट साऊत, २४ परगना, पश्चिम बंगाल यांना ताब्यात घेवुन सदर ठिकाणी एकुण ५३,५२,५२०/- रुकिचा ऑक्सिटॉसिन
साठी लागणारा तयार माल, कच्चा माल पॅकींग मटेरीयल, आरोपी यांचे मोबाइल फोन असा साठा निळुन आल्याने जप्त
करण्यात आला आहे
नमुद ऑक्सिटोसिन औषध हे आरोपी समीर कुरेशी हा गाई, म्हशीचे गोठा मालक यांना विक्री केल्यानंतर ते औषध
गाई म्हशी यांना त्याचे दुध पाणविण्यासाठी दिलेनंतर गायी म्हशी पासुन मिळणारे दुध हे मानवी आरोग्यास हानीकारक होतअसून, त्याचे सेवन केल्याने आरोग्यावर विषारी परिणाम होतात, जसे श्रवण कमजोरी, दृष्टीहिनता, पोटाचे आजार, नवजात बाळाची कावीळ, गरोदर स्त्रीचा रक्तस्त्राव व अनैसर्गिक गर्भपात, श्वसनाचे व त्वचेचे आजार इत्यादी गंभीर रोग होण्याची शक्यता आहे. सदरचे ऑक्सीटॉसिन हे हार्मोन असून त्याचा वापर प्रसुती सुरळीत करण्यासाठी होत असल्याचे श्री. सुहास सावंत, औषध निरीक्षक, पुणे यांनी सांगुन नमुद आरोपीविरुध्द त्यांनी विमानतळ पो स्टे येथे भादविकलम ३२८, ४२०, १७५,२७२,२७४,३४ व प्राण्यांना क्रुरतेणे वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १९६० अंतर्गत कलम ११ (ग) व कलम १२
अन्वये गुन्हा दाखल केला आहे.सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त अनिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक,अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त, श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे-१,
गजानन टोम्पे यांचे मार्गदर्शननुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक,. विनायक गायकवाड, सहा.पो.निरीक्षक, लक्ष्मण ढेंगळे,
पोलीस अंमलदार, पांडुरंग पवार, प्रविण उत्तेकर, विशाल दळवी, मनोजकुमार साळुंके, राहुल जोशी, संदिप शिर्के, सचिन
माळवे, विशाल शिंदे, संदेश काकडे, योगेश मोहिते यांनी केली आहे.

याद राखा, गाठ माझ्याशी आहे, संभाजीराजेंचा मराठी दिग्दर्शक-निर्मात्यांना जाहीर इशारा

पुणे-सिनेमॅटिक लिबर्टी च्या नावाखाली इतिहासाचे विकृतीकरण कराल तर खबरदार … गाठ माझ्याशी आहे … छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चित्रपटाला हे चालू शकत नाही. हर हर महादेव या चित्रपटात इतिहासाची मोडतोड आणि विपर्यास झाला. महाराजांकडे आपण अस्मिता आणि प्रेरणा म्हणून बघतो. सिनेमॅटिक लिबर्टी म्हणून काहीही इतिहास दाखवायचा का? असा प्रश्न युवराज संभाजी राजे छत्रपती यांनी उपस्थित केला.आणि लक्षात ठेवा ..गाठ माझ्याशी .. मी चालवून घेणार नाही असा स्पष्ट इशारा हरहर महादेव आणि दिग्दर्शित ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ च्या लेखक,वेशभूषाकार ,निर्माते आणि दिग्दर्शकांना दिला .

छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित चित्रपटांमध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात येत असल्याचा आरोप संभाजीराजे छत्रपती यांनी केला आहे. यावेळी त्यांनी अभिनेता सुबोध भावेची मुख्य भूमिका असलेला ‘हर हर महादेव’ आणि महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वेडात वीर दौडले सात’ या चित्रपटांचा उल्लेख केला. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना संभाजीराजेंनी मराठी निर्माते, दिग्दर्शकांना जाहीर इशाराही दिला.

चित्रपट बनवता ही चांगली गोष्ट आहेत. पेंढारकर यांनी काय छान चित्रपट बनवले होते. मात्र आता लोकांना आवडतं म्हणून काही चित्रपट बनवायचे का? “वेडात मराठे वीर दौडले सात” काय तो पोशाख हे काय मावळे आहेत का? असा प्रश्न संभाजी राजे यांनी महेश मांजरेकर यांचे पुत्र सत्या मांजरेकर याचा फोटो दाखवून उपस्थित केला. या चित्रपटात कुठल्या दृष्टीने हा मावळा वाटतो, असंही संभाजीराजे यांनी विचारलं.

“इतिहासावर आधारित चित्रपट काढले जातात ही चांगली गोष्ट आहे. पण लोकांना आवडतात म्हणून विपर्यास करुन असले चित्रपट काढत आहात,” असा संताप संभाजीराजेंनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटातील मावळ्यांच्या पोषाखावरही भाष्य केलं. चित्रपटाचं पोस्टर दाखवत ‘हे मावळे वाटतात का?’ अशी विचारणा त्यांनी केली.

“मी सर्व निर्माते आणि दिग्दर्शकांना सांगू इच्छितो की, जर असेच चित्रपट काढले तर गाठ माझ्याशी आहे. चित्रपट काढून तर दाखवा, मी आडवा नाही आलो तर बघा. मीच आडवा येणार, अन्यथा या घराण्यात जन्म होऊन काय फायदा आहे. वेळप्रसंगी मला काही झालं तरी चालेल, पण महाराजांचा असा चुकीचा इतिहास समोर आणत असाल तर याद राखा,” असा जाहीर इशारा यावेळी त्यांनी दिला. जरा भालजी पेंढारकर यांचा आदर्श घ्या असा सल्लाही त्यांनी दिला.

आम्हाला हे ईडी सरकार पाडायची गरज नाही,त्यांची अवस्था बिकटच …

काँग्रेस व मित्रपक्ष महाराष्ट्रातील आगामी निवडणुकीतही भाजपाला धूळ चारतील.

मुंबई, दि. ६ नोव्हेंबर-‘अलिबाबा आणि ४० चोर ‘असे संबोधत आम्हाला हे सरकार पाडायची गरज नाही ,त्यांची अवस्था बिकट झाली आहे, सरकारमधील मंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून अपमानास्पद वागणूक सहन करत आहेत असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी TV 9 शी बोलताना म्हटले आहे.

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा दणदणीत विजय हा ईडी सरकारवर जनतेचा विश्वास नसल्याचे स्पष्ट करणारा आहे. या मतदारसंघात भाजपा व शिंदे गटाची ताकद नसतानाही निवडणुक लढवण्याचा अट्टाहास केला होता. आपला दारूण पराभव होत असल्याची चाहूल लागल्यानेच भाजपाला निवडणुकीतून पळ काढावा लागला. महाविकास आघाडीवर विश्वास व्यक्त करत अंधेरीच्या जनतेने भाजपा व शिंदे गटाच्या तोडफोडीच्या राजकारणाला मोठी चपराक लगावली आहे, असे पाटोळे यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, शिवसेनेचे रमेश लटके यांच्या आकस्मिक निधनाने अंधेरी पूर्व मध्ये पोटनिवडणुक झाली. या निवडणुकीत आघाडीचा धर्म पाळत काँग्रेस पक्षाने शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता. एखाद्या सदस्याचे निधन झाल्यास ती जागा बिनविरोध व्हावी अशी महाराष्ट्राची राजकीय परंपरा आहे परंतु भारतीय जनता पक्षाने या परंपरेला तिलांजली देत उमेदवारी अर्ज दाखल केला पण या मतदारसंघात आपला निभाव लागणार नाही याची त्यांना जाणीव होताच परंपरेचा दाखला देत उमेदवारी अर्ज मागे घेतला. वास्तविक पाहता भारतीय जनता पक्षाने अशी परंपरा कधीही पाळलेली नाही. कोल्हापूर, देगलूर, पंढरपूर या मतदारसंघात मागील दोन तीन वर्षात झालेल्या पोटनिवडणुकीतही भाजपाने उमेदवार दिले होते, त्यामुळे त्यांचा परंपरा राखल्याचा दावा खोटा आहे.

शिंदे गटानेही या निवडणुकीत शिवसेनेची कोंडी करण्यासाठी केंद्र सरकारला हाताशी धरून शिवसेना पक्षाचे नाव व चिन्ह गोठवण्याचे पाप केले. शिंदे गट व भाजपाची ही कटकारस्थाने जनतेला आवडली नाहीत म्हणूनच त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. अंधेरीतील विजय हा शिंदे गट व भाजपासाठी मोठा धडा शिकवणारा असून महाराष्ट्रातील आगामी सर्व निवडणुकीत त्यांचा पराभव निश्चित करणारा आहे, असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केला.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले अमेरिका दौऱ्यावर

मुंबई दि. 6 – रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले 6 दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आज पहाटे  नवी दिल्ली विमानतळावरून रवाना  झाले असून आज सकाळी अमेरिकेच्या जॉन केनेडी विमानतळ न्यूयॉर्क येथे  पोहोचले आहेत. अमेरिका दौऱ्यात ना.रामदास आठवले हे न्यूयॉर्क ;न्यूजर्सी आणि ह्युस्टन  या शहरांना भेट देणार आहेत. 

केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले  अमेरिका दौऱ्यात  अमेरीकेतील भारतीय दूतावास येथे भेट देणार आहेत. भारतीय दुतावासातील अधिकाऱ्यांची ते भेट घेणार आहेत.तसेच अमेरीकेतील  भारतीय नागरिकांशी भारतीय दुतावस  येथे संवाद साधणार आहेत.

न्यूयॉर्क येथे इंडो अमेरिकन असोसिएशन फॉर सोशल डेव्हलपमेंट  च्या परिषदेत ना.रामदास आठवले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अमेरिका दौऱ्या दरम्यान अमेरिकीतील विविध शहरांत वास्तव्यास असणाऱ्या भरतीयांशी ते संवाद साधणार आहेत. येत्या दि.12 नोव्हेंबर रोजी अमेरिका दौरा पूर्ण करून ना.रामदास आठवले भारतात परतणार आहेत.

तब्बल 67 हजार विद्यार्थ्यांनी घेतला “सुचवा तुमच्या आवडीचे कौशल्य अभ्यासक्रम” स्पर्धेत सहभाग

कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती

अजूनही १५ नोव्हेंबरपर्यंत स्पर्धेत सहभागाची संधी

मुंबई, दि. 6 नोव्हेंबर 2022 : आयटीआयच्या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने हाती घेण्यात आलेल्या ‘सुचवा तुमच्या आवडीचे कौशल्य अभ्यासक्रम’ या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे. कालपर्यंत तब्बल ६७ हजार ९९० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे, अशी माहिती राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

मागील काही वर्षांपासून आयटीआयच्या विविध अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत असून अधिकाधिक विद्यार्थी कौशल्याधारित प्रशिक्षण घेऊन रोजगार किंवा स्वयंरोजगार करीत आहेत. आता उद्योगांमधील बदलते नवनवे तंत्रज्ञान आणि त्याअनुषंगाने आयटीआयच्या अभ्यासक्रमांमध्ये आवश्यक बदल करण्यासाठी विभागाने पुढाकार घेतला असून यासाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून १५ नोव्हेबरपर्यत ही राज्यस्तरीय स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. याअंतर्गत वेगळ्या हटके संकल्पना सुचविणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात येणार आहेत. औद्योगिक व सामाजिक क्षेत्रात वेगाने बदल होत असल्याच्या काळात विद्यार्थ्यांना नवनवी कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे बनले आहे. हे लक्षात घेऊन आयटीआयमध्ये शॉर्ट टर्म सर्टिफिकेट कोर्सेस सुरु करण्याचा निर्णय विभागाने घेतला असून स्वत: अभ्यासक्रम निवडण्याची संधी विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे, असे मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले.

या स्पर्धेअंतर्गत सर्वाधिक २० हजार ७६० इतक्या विद्यार्थ्यांनी स्वयंरोजगाराशी संबंधित अभ्यासक्रम सुचविण्यासाठी सहभाग घेतला आहे. त्या खालोखाल २० हजार ३६४ विद्यार्थी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रम सुचविण्यासाठी स्पर्धेत सहभागी झाले आहेत. कृषी क्षेत्रातील अभ्यासक्रम सुचविण्यासाठी १७ हजार ४४५ विद्यार्थी स्पर्धेत सहभागी झाले आहेत तर ४ हजार २५५ विद्यार्थी महिला रोजगाराशी संबंधित अभ्यासक्रम सुचविणार आहेत. ५ हजार १६६ विद्यार्थ्यांनी अतिशय उपयुक्त अभ्यासक्रम सुचविण्यासाठी स्पर्धेत नोंदणी केली आहे. स्पर्धेत सुमारे ५६ हजार २०७ इतक्या मुलांनी तर ११ हजार ७०५ इतक्या मुलींनी सहभाग घेतला आहे. यातील सुमारे 61 टक्के विद्यार्थी हे आयटीआयच्या प्रथम वर्षातील तर 27 टक्के विद्यार्थी हे द्वितीय वर्षात शिकणारे आहेत.

कशी असणार स्पर्धा ?

अधिक माहितीसाठी आणि स्पर्धेत सहभागासाठी विद्यार्थ्यांनी स्थानिक आयटीआयमध्ये संपर्क साधावा. स्पर्धेत विद्यार्थ्यांना शेती, स्वयंरोजगार, महिलांचे रोजगार, आधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत अभ्यासक्रम व अन्य उपयुक्त अभ्यासक्रम सुचवता येणार आहेत. ते विषय कसे उपयुक्त आहे हेदेखील सांगायचे आहे. सुचविलेले अभ्यासक्रम एनएसक्यूएफशी संलग्न असावेत. सर्वोत्कृष्ट विषयानुसार विद्यार्थ्याची निवड केली जाईल. त्यासाठी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली निवड समिती नियुक्त केली आहे. सर्वोत्कृष्ट संकल्पना सुचविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येक जिल्ह्यात ५ हजार, ३ हजार व २ हजार रुपयांची बक्षिसे दिली जाणार असून त्यांनी सुचविलेल्या अभ्यासक्रमांचा विचार केला जाणार आहे.

येत्या मंगळवारी, 08 नोव्हेंबर 2022 रोजी (कार्तिक 17, शके 1944) खग्रास चंद्रग्रहण

येत्या मंगळवारी, 8 नोव्हेंबर 2022 (कार्तिक 17, शके 1944) रोजी खग्रास चंद्रग्रहण लागणार आहे. चंद्रोदयाच्या वेळी हे ग्रहण भारतातील सर्व ठिकाणाहून दिसेल. मात्र, ग्रहणाच्या आंशिक आणि खग्रास टप्प्यांची सुरुवात भारतात कुठूनही दिसणार नाही,  कारण चंद्रोदयाच्या आधीच ग्रहणकाळ सुरू होणार आहे.

खग्रास आणि आंशिक अशा दोन्ही टप्प्यांवर अखेरीचा चंद्र  देशाच्या पूर्वेकडील भागांतून दिसू शकेल. देशाच्या उर्वरित भागातून केवळ आंशिक टप्प्याचा शेवट दिसणार आहे.

भारतीय प्रमाण वेळेनुसार ग्रहण दुपारी 2 वाजून 39 मिनिटांनी सुरू होईल.  खग्रास चंद्रग्रहण 3 वाजून 46 मिनिटांनी सुरू होईल. खग्रास टप्पा सायंकाळी 5  वाजून 12 मिनिटांनी तर आंशिक टप्पा 6 वाजून 19 मिनिटांनी समाप्त होईल.

दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि बेंगळुरू सारख्या इतर शहरांचा विचार करता, चंद्रोदयाच्या वेळी, खग्रास समाप्तीनंतरचे आंशिक ग्रहण चालू असेल आणि वरील शहरांमध्‍ये , चंद्रोदयाच्या वेळेपासून अनुक्रमे 50 मिनिटे , 18 मिनिटे , 40 मिनिटे,  आणि 29 मिनिटे,  काळांसाठी आंशिक ग्रहण संपेपर्यंत ते दिसू शकेल.  

भारतातील काही ठिकाणच्या स्थानिक परिस्थितीशी संबंधित तक्ता, संदर्भासाठी स्वतंत्रपणे जोडला आहे.  (स्रोत: पोझिशनल अॅस्ट्रॉनॉमी सेंटर, कोलकाता; भारतीय हवामान विभाग

PlacesMoonrise Time(IST)Umbral phasebegins at14h 39m (IST)Totalitybegins at15 h 46m (IST)TotalityEnds at17h 12m (IST)Umbral phaseEnds at18 h 19m( IST)Duration of eclipse (from Moonrise time upto the end of umbral phase)
      h     mh       mh        mh        mh        mh        m
Agartala16   38 Beginning of partial phase is not visible as the phenomenon will be in progress before moonrise of anyplace in India Beginning of totality phase is not visible as the phenomenon will be in progress before moonrise of anyplace in IndiaVisibleVisible1       41
Ahmadabad17   56*Visible0       23
Aijawl16   32VisibleVisible1       47
Ajmer17   43*Visible0       36
Allahabad17   15*Visible1       04
Amritsar17   33*Visible0       46
Bangalore17   50*Visible0       29
Bhagalpur16   54VisibleVisible1       25
Bhopal17   36*Visible0       43
Bhubaneswar17   06VisibleVisible1       13
Cannanore18   01*Visible0       18
Chandigarh17   23*Visible0       56
Chennai17   39*Visible0       40
Cochin17   59*Visible0       20
Cooch Behar16   42VisibleVisible1       37
Cuttack17   05VisibleVisible1       14
Darjeeling16   46VisibleVisible1       33
Dehradun17   22*Visible0       57
Delhi17   29*Visible0       50
Dibrugarh16   17VisibleVisible2       02
Dwarka18   12*Visible0       07
Gandhinagar17   55*Visible0       24
Gangtok16   44VisibleVisible1       35
Guwahati16   34VisibleVisible1       45
Gaya17   03VisibleVisible1       16
Haridwar17   21*Visible0       58
Hazaribagh17   02VisibleVisible1       17
Hubli17   55*Visible0       24
Hyderabad17   40*Visible0       39
Imphal16   26VisibleVisible1       53
Itanagar16   24VisibleVisible1       55
Jaipur17   37*Visible0       42
Jalandhar17   28*Visible0       51
Jammu17   31*Visible0       48
Kanyakumari17   57*Visible0       22
Kavalur17   42*Visible0       37
Kavaratti18   11*Visible0       08
Kohima16   24VisibleVisible1       55
Kolhapur17   59*Visible0       20
Kolkata16   52VisibleVisible1       27
Koraput17   21*Visible0       58
Kozikode17   59*Visible0       20

60 लाख मेट्रिक  टनापर्यंत साखर निर्यात करण्यास परवानगी

मुंबई – देशातील साखरेची किंमत स्थिर ठेवणे आणि साखर कारखान्यांची आर्थिक स्थिती यांचा समतोल राखण्यासाठी, ऊस उत्पादनाच्या सुरुवातीच्या अंदाजांवर आधारित, 2022-23 च्या साखर हंगामात 60 लाख मेट्रिक  टनापर्यंत साखर निर्यात करण्यास सरकारने परवानगी दिली आहे.  डीजीएफटी म्हणजेच विदेशी व्यापार संचालनालयाने  31 ऑक्टोबर 2023 पर्यंत ‘प्रतिबंधित’ श्रेणीत असलेल्या साखर निर्यातीचा समावेश वाढवण्यासंबंधीची अधिसूचना याआधीच जारी केली आहे.

केंद्र सरकारने 30.09.2023 पर्यंत घरगुती वापरासाठी सुमारे 275 लाख मेट्रिक टन (एमएलटी) साखर, इथेनॉल उत्पादनाकडे वळवण्यासाठी सुमारे 50 एमएलटी साखर आणि 30.09.2023 पर्यंत जवळपास 60 एमएलटी साखर उपलब्ध असली पाहिजे, याला प्राधान्य दिले आहे.  देशातील साखर कारखान्यांनी उत्पादित केलेल्यापैकी शिल्लक साखरेला निर्यातीसाठी परवानगी दिली जाईल.

साखर हंगाम 2022-23 च्या सुरूवातीला ऊस उत्पादनाचे प्राथमिक अंदाज उपलब्ध असल्याने 60 एलएमटी साखर निर्यात करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशातील ऊस उत्पादनाचा वेळोवेळी आढावा घेतला जाईल आणि ताज्या उपलब्ध अंदाजांच्या आधारे, साखर निर्यातीच्या प्रमाणाचा पुनर्विचार केला जाऊ शकतो.

भारताने, साखर हंगाम 2021-22 दरम्यान, 110 एलएमटी साखर निर्यात केली आणि जगातील दुसरा सर्वात मोठा साखर निर्यातदार देश बनला. देशाने  साखर निर्यात करून  सुमारे 40,000 कोटी रुपयांचे परकीय चलनही कमावले. साखर कारखान्यांना या साखर निर्यातीतून फायदा झाला. त्‍यांना  वेळेवर पैसे देता आले  आणि वाहतूक खर्च कमी  झाल्यामुळे शेतकऱ्यांना  उसाची थकबाकी लवकर चुकती करता आली.  31.10.2022 पर्यंत, 1.18 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त उसाची विक्रमी खरेदी करूनही साखर हंगाम 2021-22 साठी शेतकर्‍यांची 96% पेक्षा जास्त उसाची देणी आधीच दिली आहेत.

सरकारने, साखर हंगाम 2022-23 च्या साखर निर्यात धोरणामध्ये, देशातील सर्व साखर कारखान्यांसाठी गेल्या तीन वर्षांतील सरासरी उत्पादन आणि गेल्या तीन वर्षांतील सरासरी साखर उत्पादनावर आधारित वस्तुनिष्ठ प्रणालीसह साखर कारखानानिहाय निर्यात कोटा जाहीर केला आहे. 

देशांतर्गत ग्राहकांच्या हितासाठी साखरेच्या  किंमती  स्थिर रहाणे  सुनिश्चित करण्यावर लक्ष केंद्रित करण्‍यावर भर दिला आहे. हे या साखर निर्यात धोरणावरून दिसून येत आहे.  इंधन आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि हरित ऊर्जेकडे वाटचाल करण्यासाठी देशातील इथेनॉलचे उत्पादन हे दुसरे लक्ष्यित क्षेत्र आहे. 

इथेनॉलच्या वाढलेल्या किमतींमुळे मद्यनिर्मिती करणा-या कारखान्यांना आधीच इथेनॉलनिर्मितीसाठी  साखर जास्‍त प्रमाणावर  वळवण्यास उत्पादकांना प्रोत्साहन दिले आहे.

साखर निर्यात धोरण म्हणजे  इथेनॉल उत्पादनासाठी पुरेसा ऊस/साखर/मळीची उपलब्धता सुनिश्चित करणारी दुसरी यंत्रणा आहे.  ईएसवाय 2022-23 दरम्यान इथेनॉल उत्पादनाकडे  45-50 एमएलटी साखर वळवली जाणे अपेक्षित आहे.

सरकारने, साखर निर्यातीला परवानगी देऊन, ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखानदारांच्या हिताचे रक्षण केले आहे. यामुळे कारखान्यांना साखरेच्या आंतरराष्ट्रीय किंमतीच्या अनुकूल परिस्थितीचा लाभ घेता येईल.

संशोधन समर्पित शैक्षणिक परिसर उभारल्यास सहकार्य- उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत दादा पाटील

पुणे: पुण्यात संशोधनाला समर्पित शैक्षणिक परिसर उभारल्यास शासनातर्फे आर्थिक सहकार्य करण्यात येईल; शैक्षणिक संस्थांनी संशोधनासाठी स्वतंत्र यंत्रणा विकसीत करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले.

पुणे एज्युकेशन फोरमतर्फे ‘उच्च शिक्षणातील बदलते प्रवाह-संधी आणि आव्हाने’ या विषयावर पोचा हॉल येथे आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. कार्यक्रमाला पद्म विभूषण डॉ.रघुनाथ माशेलकर, आमदार राहुल कुल, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे, डॉ.अनिरुद्ध देशपांडे आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले, राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांनी संशोधन आणि नावीन्यतेला चालना देणारे अभ्यासक्रम राबविणे गरजेचे आहे. संशोधन आणि नावीन्यतेमुळे संपत्ती निर्माण होते आणि पर्यायाने देशाचा विकास होतो. परदेशातून आयात होणारे तंत्रज्ञान आणि साधने आपल्या देशात तयार होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने व्यवसायाभिमुख, कौशल्य विकासावर आधारित आणि नवकल्पनांना चालना देणारे अभ्यासक्रम राबवावे लागतील.

शैक्षणिक संस्थांमधील ७० टक्के अभ्यासक्रम रोजगार आधारित आणि ३० टक्के विद्यार्थ्याला आवडीच्या विषयातील आनंद देणारे असावेत. पुणे विद्यापीठाने येत्या जूनपर्यंत विद्यार्थ्यांना विविध विषयाचे ज्ञान एकाचवेळी देणारे अभ्यासक्रम सुरू करावेत. यापुढील काळात बहुशाखीय आणि वैशिष्ठ्यपूर्ण अभ्यासक्रम राबविणाऱ्या महाविद्यालयांना शासनातर्फे सर्व सहकार्य करण्यात येईल.

इंग्रजी जगातली प्रमुख संवादभाषा असल्याने एक विषय म्हणून तिचा अभ्यास आवश्यक आहे, मात्र इतर विषयांचे ज्ञान मातृभाषेतून देणे गरजेचे आहे. अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षणाची पुस्तके मराठीतून उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. मातृभाषेतून शिक्षण दिल्यास विद्यार्थाला त्याचा आनंद घेता येईल आणि विषय जाणून घेता येईल, असे त्यांनी सांगितले. नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी नेमण्यात आलेल्या चार समित्यांचे अहवाल प्राप्त झाले असून लवकरच त्याबाबतच्या अंमलबजावणीकडे शासन लक्ष देणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

डॉ.माशेलकर म्हणाले, शिक्षण आणि संधी देशाचे भविष्य घडविण्यासाठी महत्वाचे आहे. शिक्षणाच्या अधिकारासोबत योग्य शिक्षण आणि शिक्षणाची योग्य पद्धत महत्वाची आहे. ज्ञान आणि कौशल्य देण्यासोबत समावेशनाचा ध्यास महत्वाचा आहे. संशोधनाने नवे ज्ञान निर्माण होते आणि नावीन्यतेने आर्थिक सुबत्ता साधता येत असल्याने नव्या शैक्षणिक धोरणात यावर भर देण्यात आला आहे. नव्या पिढीचा बौद्धिक स्तर लक्षात घेऊन शिक्षक घडवावा लागणार आहे. शैक्षणिक क्षेत्रात जागतिक स्तरावर अग्रेसर होण्याचे उद्दिष्ट समोर ठेऊन सर्वांनी कार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.

डॉ.देशपांडे म्हणाले, नवे शैक्षणिक धोरण विद्यार्थी केंद्रित आहे. ज्ञानवान विद्यार्थी घडविताना शिक्षकाच्या ज्ञानाला वाटा उपलब्ध करून देणे, त्याच्या क्षमतेचा ज्ञानाधारीत व्यवस्थेसाठी उपयोग करणेही महत्वाचे आहे. शाळा आणि महाविद्यालयात नवे संशोधन होईल याचे नियोजन करावे लागेल आणि संशोधनाच्या उपयोगीतेवर भर द्यावा लागेल. याचे नियोजन करण्यासाठी विद्यापीठ स्तरावर स्वतंत्र समिती तयार करावी लागेल. शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करावी लागणार आहे असे त्यांनी सांगितले.

कुलगुरू डॉ.काळे म्हणाले, विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि समाजाने ठरविल्यास नवे शैक्षणिक धोरण प्रभावीपणे अंमलात आणता येईल. यात शैक्षणिक संस्था आणि शिक्षकांना विशेष प्रयत्न करावे लागतील. अभ्यासक्रमातील नवे बदल वेगाने करायचे असल्याने बहुशाखीय दृष्टिकोनावर विशेष भर द्यावा लागेल. समाज आणि देश घडविण्यासाठी नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीवर सर्वांनी भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

प्रास्ताविकात राजेश पांडे यांनी चर्चासत्राच्या आयोजनाबाबत माहिती दिली. नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात सर्वांनी योगदान दिल्यास शासनाला धोरण चांगल्यारीतीने राबविता येईल, असे त्यांनी सांगितले.

चर्चासत्रात उपस्थित प्रतिनिधींनी नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्यादृष्टीने विविध मुद्दे मांडले. प्राध्यापकांचे प्रशिक्षण, गुणवत्तापूर्ण शिक्षण, शैक्षणिक सुविधा, नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम, नॅक मूल्यांकन आदी विविध विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली.

प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाला नॅक मूल्यांकनात ‘ए++’ श्रेणी मिळाल्याबद्दल संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

चर्चासत्रात डॉ. गजानन एकबोटे, डॉ.राजेंद्र विखे पाटील, ॲड.एस.के.जैन, ॲड. नितीन ठाकरे, हेमंत धात्रक,पी.डी. पाटील, डॉ.अपूर्व हिरे, डॉ. सुधाकर जाधवर, विद्यापीठांचे माजी कुलगुरू, पुणे विद्यापीठ क्षेत्रातील विविध शिक्षणसंस्थांचे प्रतिनिधी, महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षणतज्ज्ञ उपस्थित होते.

शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके विजयी

मुंबई-महाराष्ट्र विधानसभेच्या ‘166 – अंधेरी पूर्व’ या मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीची मतमोजणी आज रविवार, दिनांक 6 नोव्हेंबर 2022 रोजी पार पडली. सकाळी 8 वाजेपासून सुरू झालेल्या या मतमोजणी प्रक्रियेत एकूण 66,530 मतांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या श्रीमती ऋतुजा रमेश लटके  विजयी झाल्या आहेत अशी घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी श्री.प्रशांत पाटील केली. यावेळी केंद्रीय निवडणूक निरीक्षक देवेश देवल उपस्थित होते. त्यानंतर श्री. पाटील यांनी विजयी उमेदवार श्रीमती ऋतुजा लटके यांना पोटनिवडणुकीत विजयी झाल्याचे प्रमाणपत्र प्रदान केले.

अंधेरी पूर्व’ या विधानसभा मतदारसंघाच्या सर्व 256 केंद्रांवर दिनांक 3 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. या मतदान प्रक्रियेत एकूण 31.75 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. आज या मतदानाच्या मतमोजणीस सकाळी 8 वाजता सुरुवात झाली. प्रारंभी टपाली मतमोजणी करण्यात आली. त्यानंतर एकूण 19 फेऱ्यांमध्ये ई.व्ही.एम. द्वारे मतमोजणी करण्यात आली. मतमोजणी केंद्राच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.  माध्यमांना मतमोजणी प्रक्रियेची तात्काळ माहिती मिळण्याच्या दृष्टीने माध्यम कक्षही स्थापन करण्यात आला होता.

महाराष्ट्र विधानसभेच्या ‘166 – अंधेरी पूर्व’ या मुंबई उपनगर जिल्ह्याच्या विधानसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीत शेवटच्या १९ व्या फेरी अखेर अणि टपाली मतदानातून  उमेदवारांना मिळालेली एकूण मते याची आकडेवारी खालील प्रमाणे आहे:

१) श्रीमती ऋतुजा रमेश लटके (पक्ष – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) : ६६,५३० विजयी

२) श्री. बाला व्यंकटेश नाडार (पक्ष – आपकी अपनी पार्टी ) : 1,515

३) श्री.मनोज श्रावण नायक (पक्ष – राईट टू रिकॉल पार्टी) : 900

४) श्रीमती नीना खेडेकर (अपक्ष ) : 1,531

५) श्रीमती फरहाना सिराज सय्यद (अपक्ष ) : 1,093

६) श्री.मिलिंद कांबळे (अपक्ष ) : 624

७) श्री.राजेश त्रिपाठी (अपक्ष ) : 1,571

(नोटा : 12,806, अवैध मते 22)

एकूण मते : 86,570

पॅडीला झालीय लगीनघाई!

लग्न हा भारतीय संस्कृतीत एक पवित्र सोहळा मानला जातो. ते केवळ दोन जीवांचे मिलन नसते, तर त्यांच्या अवतीभवती असलेल्या नातेवाईकांच्या ऋणानुबंधांचेही मिलन असते. मात्र लग्न सोहळा म्हटलं की मानापमान, रुसवे फुगवेही आलेच. लग्नात कोण, केव्हा आणि कश्यावरुन गोंधळ घालेल याचा काहीही नेम नसतो. त्यामुळे एकमेकांवर जीवापाड प्रेम करण्याऱ्या प्रेमी जीवांच्या मनात त्यांचे लग्न लागेपर्यंत सतत धाकधूक लागलेली असते. अशीच काहीशी धाकधूक आपल्या सर्वांचा लाडका अभिनेता पॅडी कांबळेला लागल्याने तो लगीनघाई  करताना दिसतोय. त्याला त्याच्या नव्या लग्नाची जॅम चिंता आहे. नातेवाईकांच्या गोंधळाला आणि त्यांच्या रुसव्या फुगव्यांना तो पुरता घाबरून गेलाय. त्याला त्याच्या लग्नाची फार चिंता वाटू लागली आहे. या भीतीपोटी त्याने थेट पुढचं पाऊल उचललं असून लोकप्रिय अभिनेता व समाजसेवक मकरंद अनासपुरे आणि प्रख्यात विनोदी अभिनेते दिग्दर्शक विजय पाटकर यांच्या मदतीने ‘वऱ्हाडी वाजंत्री’ घेऊन ११ नोव्हेंबरला बोहल्यावर चढण्याचा निर्णय घेतला आहे. ११ नोव्हेंबर हा दिवस कधी उजाडतोय आणि चिं. सौ. का. परी सोबत त्याचं लग्न कधी लागतंय असं त्याला झालंय. ‘वऱ्हाडी वाजंत्र्यां’च्या मानधनासह या लग्नाचा सर्व आर्थिक बोजा ‘स्वराज फिल्म प्रॉडक्शनतर्फे कॅप्टन कल्पेश रविंद्र मगर यांसह अतुल राजारामशेठ ओहळ यांनी स्व:खुशीने उचलला आहे.

आपल्या विनोदी अभिनयाने रसिकांना पोट धरून हसवणाऱ्या विजय पाटकर यांनी त्यांच्या नव्या ‘वऱ्हाडी वाजंत्री’ या चित्रपटातही रसिकप्रेक्षकांना पोटधरून हसविण्याचेच काम केले  आहे. विजय पाटकरांच्या या चित्रपटात पॅडीच्या अभिनयानं सजलेला युवराज पहायला मिळणार आहे. आणि या युवराजचेच हे लग्न असून ‘परी’ म्हणजेच आपल्या सर्वांना हसविणाऱ्या हेमांगी कवी सोबत त्याची केमिस्ट्री जमली आहे. दोघांचं विनोदी गाणं सध्या विविध चॅनेल्सवर प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहे. ‘वऱ्हाडी वाजंत्री’  या चित्रपटात मकरंद अनासपुरे, मोहन जोशी, रिमा लागू, पंढरीनाथ कांबळे, हेमांगी कवी, विजय कदम, प्रिया बेर्डे, जयवंत वाडकर, आनंदा कारेकर, सुनील गोडबोले, पूर्णिमा अहिरे, गणेश रेवडेकर, प्रभाकर मोरे, प्रशांत तपस्वी, राजेश चिटणीस, जयवंत भालेकर, विनीत बोंडे, शिवाजी रेडकर, आशुतोष वाडेकर, शीतल कलाहपुरे, साक्षी परांजपे आदी कलाकारांच्याही भूमिका आहेत.

‘त्या’चित्त्यांच्या वास्तव्यक्षेत्रात आणखी वाढ

कुनोच्या अधिवासातील, अनिवार्य विलगीकरणानंतर वातावरणात आणखी रुळण्यासाठी 2 चित्त्यांना एका मोठ्या बंद परिसरात सोडल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिली.

पंतप्रधान मोदी यांनी  ट्विटमध्‍ये  म्हटले आहे की;  

“आनंदाची बातमी! कुनोच्या अधिवासातील, अनिवार्य विलगीकरणानंतर वातावरणात आणखी रुळण्यासाठी 2 चित्त्यांना एका मोठ्या बंद परिसरात सोडले आहे. इतरांना लवकरच सोडले जाईल. सर्व चित्ते निरोगी, सक्रिय आणि वातावरणाशी व्यवस्थित जुळवून घेत आहेत हे जाणून देखील मला आनंद झाला.  “

विज्ञानाने कालच्या परी-कथांचे आजच्या वास्तवात रुपांतर केले आहे- केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह

डेहराडून -विज्ञानाने कालच्या परी-कथांचे आजच्या वास्तवात रुपांतर केले आहे आणि म्हणूनच पारंपरिक ज्ञानाचा आधुनिक संशोधनाबरोबरचा संयोग अपेक्षेपलीकडील परिणाम देऊ शकतो असे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान (स्वतंत्र प्रभार), भूविज्ञान (स्वतंत्र प्रभार), पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्ती वेतन, अणुऊर्जा आणि अवकाश राज्य मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज सांगितले.

डेहराडून इथल्या उत्तरांचल विद्यापीठाच्या परिसरात आयोजित आकाश तत्त्व- “जीवनासाठी आकाश”, या विषयावरील 4-दिवसीय राष्ट्रीय परिषदेमध्ये बीजभाषण देताना डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, भारत आज नवोदित देशांना नॅनोसॅटेलाइटसह उपग्रह निर्मितीमध्ये आणि क्षमता विकासात मदत करत आहे. म्हणून संपूर्ण जग भारताकडे एक प्रेरणा स्थान म्हणून पाहत आहे, ते म्हणाले. डॉ जितेंद्र सिंह  म्हणाले की, जागतिक राष्ट्रसंघामध्ये भारताचं स्थान उंचावत असून, अंतराळ संशोधनाच्या मदतीने ते शक्य होईल. अंतराळ क्षेत्रात आज 102 पेक्षा जास्त स्टार्टअप्स कार्यरत आहेत. त्याशिवाय, भू-स्थानिक मार्गदर्शक सूचनांनी 6 लाखापेक्षा जास्त भारतीय गावांचे सर्वेक्षण करण्यासाठी स्वामित्व (SVAMITVA) सारख्या योजनांना बळ दिले आहे,  असे ते  म्हणाले. 

डॉ जितेंद्र सिंह  म्हणाले, भारताच्या अंतराळ क्षेत्राबाबतच्या आकांक्षा चंद्र आणि मंगळावरील मोहिमांमधून प्रतिबिंबित होत असल्या, तरी गगनयान ही देशाची पहिली मानवी अंतराळ मोहीम, भारताच्या अवकाशातील साहसी मोहिमांमधील एक महत्त्वाचा टप्पा असेल. मानवरहित गगनयान उड्डाण 2023 च्या अखेरीला होणार आहे. मानवरहित दुसरे उड्डाण 2024 च्या मध्याला होईल, तर मानवासह होणारे उड्डाण 2024 पर्यंत नियोजित आहे, असे ते  म्हणाले. 

डॉ जितेंद्र सिंह  म्हणाले की, या तीन दिवसांच्या परिषदेत सुमारे 35 नामवंत वक्ते त्यांचे दृष्टिकोन मांडणार आहेत, म्हणून डेहराडून परिषदेमधून ते आकाश तत्वाच्या विविध आयामांवर नवीन विचारांची अपेक्षा करत आहेत. भारतातील तरुणांना आधुनिक वैज्ञानिक प्रगतीसह प्राचीन विज्ञानामधील ज्ञानाची ओळख करून देणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे.

इफ्फी कधी सुरु होणार?

0

इफ्फी ?कधी ? तुम्ही आमच्यासारखे उत्सुक नसल्यास, तुम्ही विचाराल की हे इफ्फी नेमके काय आहे? तुम्हाला हा प्रश्न पडत असेल तर प्रिय वाचकांनो, तुम्हाला कळवण्यास अत्यानंद होत आहे की इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव.

#इफ्फी कधी आहे? सर्वात महत्त्वाचे, #इफ्फी का?

1952 मध्ये सुरु झालेला इफ्फी हा आशियातील सर्वात महत्त्वाचा चित्रपट महोत्सव आहे. दरवर्षी आयोजित होणारा हा महोत्सव सध्या गोवा या पर्यटन राज्यामध्ये होतो. चित्रपट, त्यातील कथा आणि त्यामागील लोकांच्या कलाकृतींना मानवंदना देणे, ही भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची संकल्पना आहे.  याद्वारे, चित्रपटांबद्दल उत्कट प्रेम, त्याबद्दलचे मनापासून कौतुक अगदी व्यापक आणि खोलवर वाढवण्याचा, प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न आम्ही करतो;  लोकांमध्ये प्रेम, समंजसपणा आणि बंधुभावाचे पूल बांधण्यासाठी;  तसेच वैयक्तिक आणि सामूहिक उत्कृष्टतेची नवीन शिखरे गाठण्यासाठी त्यांना प्रेरणा देणे हा उद्देश आहे.

जगभरातील चित्रपटसृष्टीला एक समान व्यासपीठ उपलब्ध करून देऊन, त्यांना चित्रपट कलेतील सर्वोत्तम सादर करण्यास सक्षम करून हा महोत्सव संबंधित उद्दिष्टांचा पाठपुरावा करतो;  अशा प्रकारे विविध राष्ट्रांच्या चित्रपट संस्कृतींना त्यांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्ये समजून घेण्यास आणि त्यांचे कौतुक करण्यास हातभार लावतो; तसेच त्याद्वारे जगातील लोकांमध्ये मैत्री आणि सहकार्य वाढवतो.

आणि हो, हा उत्सव सरकारद्वारे आयोजित केला जातो याची नोंद घेणे महत्त्वाचे आहे.  केन्द्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयातर्फे दरवर्षी एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा, यजमान राज्य अर्थात गोवा सरकार यांच्या सहकार्याने हे आयोजन केले जाते. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीतील चित्रपट महोत्सव संचालनालय (डीएफएफ) सामान्यत: महोत्सवाची धुरा सांभाळते, मात्र राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळात (एनएफडीसी) चित्रपट माध्यम विभागाचे विलीनीकरण झाल्यामुळे, एनएफडीसीने महोत्सवाचे आयोजन केले आहे. 

2004 मध्ये प्रथमच गोव्यात आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाला किनारपट्टीवरील या राज्यात चांगला प्रतिसाद मिळत असून, दर वर्षी हा महोत्सव इथे आयोजित करणात येतो. आणि 2014 मध्ये इफ्फीच्या (IFFI) आयोजनासाठी गोवा हेच कायम स्वरूपी ठिकाण म्हणून घोषित करण्यात आले.

#इफ्फी कधी?

ठीक आहे, ठीक आहे; आपण जिथे सुरुवात केली होती तिथे परत येऊया; तर, तुम्हाला इफ्फी बद्दल आधीच माहिती होती, किंवा निदान आता तुम्हाला याबद्दल समजले असेल . तर, तुम्ही म्हणाल, काय हे, आम्ही या महोत्सवाचे आयोजकच मूलभूत असा हा प्रश्न का विचारत आहोत? खरे आहे ,दरवर्षी 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान इफ्फी आयोजित केला जातो. आम्हाला हे माहीत नाही का? हे सर्वांना माहीत नाही का? मग हा प्रश्न का,आणि  तो ही महोत्सवाच्या आयोजकांकडून?

तर, प्रिय चित्रपट प्रेमी, चित्रपट रसिक, कलेचे जाणकार आणि जीवनाचा आनंद साजरा करणाऱ्यांनो, सर्वात मूलभूत प्रश्न हे अधिक उत्सुकता वाढवणारे आणि त्याबरोबरच महत्वाचे नसतात का?  एवढंच नाही, तर विशेषतः कलेचा एवढा मोठा उत्सव आयोजित करण्याची जबाबदारी सोपवलेले लोकसेवक म्हणून, आमचा विश्वास आहे की केवळ योग्य उत्तरे मिळणं महत्वाचं नसतं; तर चांगली आणि अधिक चांगली उत्तरं मिळणे अधिक उपयुक्त ठरेल, याच्याशी तुम्ही सहमत व्हाल. योग्य उत्तर सापडेल, हा विश्वास, आपल्याला ते आणखी शोधण्यापासून परावृत्त करेल, जे अधिक चांगल्या, कदाचित अधिक बरोबर, उत्तरं आणि अधिक चांगल्या प्रश्नांच्या मार्गात अडथळा ठरू शकेल, तुम्हाला काय वाटतं?

चला तुमच्याकडून ऐकूया ! सर्वोत्तम उत्तराला मिळेल  मुंबई-गोवा-मुंबई क्रूझ सफर …आम्ही जो प्रश्न विचारत आहोत  #WhenIsIFFI? त्यावरील सार्वजनिक प्रतिसादांचे आम्ही स्वागत करू. तुम्ही तुमची उत्तरे आम्हाला iffi-pib[at]nic[dot]in  या संकेतस्थळावर पाठवू शकता तसेच उत्तरे ट्विट करून शेअर करू शकता. (#WhenIsIFFI ) हा हॅशटॅग वापरण्याचे लक्षात ठेवा, जेणेकरून आम्हाला तुमचे उत्तर मिळेल).

आम्ही तुम्हाला जे सांगितले आहे ते लक्षात ठेवा, आम्ही फक्त योग्य उत्तरे नव्हे तर चांगली आणि अधिक चांगली उत्तरे शोधत आहोत. आम्ही ईमेलद्वारे आणि ट्विटरवर मिळालेली उत्तरे पाहू आणि सर्वोत्तम एक उत्तर निवडू; आणि ज्या व्यक्तीने हे उत्तर पाठवले त्याला आमच्याकडून एक आकर्षक बक्षीस मिळेल. तसेच , जर तुम्ही इफ्फी मध्ये सहभागी होण्यासाठी गोव्यात येत असाल,  तर तुम्ही आमच्याकडून व्यक्तिशः  हे पारितोषिक मिळवू शकता.

आणि हो, अनेक ऑफर्सप्रमाणे ही मर्यादित कालावधीची ऑफर आहे, 13 नोव्हेंबर 2022 रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 11.59.59 पर्यंत या ऑफरची मुदत आहे.

आणि हो, तुम्ही पाठवलेल्या सर्वोत्तम उत्तरांसह, आम्ही तुम्हाला हा सर्वात मूलभूत प्रश्न विचारण्यास कशामुळे प्रेरित झालो: #WhenIsIFFI? याचे उत्तरही देऊ.

[गोव्यातील ५३व्या इफ्फीचे सर्व संबंधित अपडेट्स फेस्टिव्हलच्या www.iffigoa.org  वेबसाइटवर, PIB वेबसाइटवर (pib.gov.in), ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरील इफ्फीचे सोशल मीडिया अकाउंट्स आणि पीआयबीच्या सोशल मीडिया हँडलवरही मिळू शकतात.]

या चित्रपट महोत्सवाचा भरपूर आनंद ल़ुटुया आणि आनंद शेअरही करूया.

ॲथलिटला प्रतिबंधित स्टिरॉइडचे इंजेक्शन देणाऱ्या प्रशिक्षकावर नाडा या राष्ट्रीय डोपिंगविरोधी संस्थेने घातली चार वर्षांची बंदी 

0

नवी दिल्ली- डोपिंगविरोधी नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल मुंबईस्थित अॅथलेटिक्स प्रशिक्षक मिकी मेंझेस यांच्यावर राष्ट्रीय अँटी-डोपिंग शिस्तपालन समितीने (एडीडीपी) नुकतीच चार वर्षांची बंदी घातली आणि त्यांना ५०,००० रुपयांचा दंड ठोठावला. त्याने दोन वर्षांच्या बंदीची शिक्षा भोगत असलेली त्याची प्रशिक्षणार्थी कीर्ती भोईटे हिला ड्रोस्टॅनोलोन या प्रतिबंधित पदार्थाचे इंजेक्शन दिले होते.

2020 मध्ये, कीर्ती भोईटेची अॅनाबॉलिक-अँड्रोजेनिक स्टिरॉइड, ड्रोस्टॅनोलोनसाठीची (प्रतिबंधित पदार्थांच्या जागतिक डोपिंग विरोधी एजन्सीच्या यादीत याचा समावेश आहे.) चाचणी घेण्यात आली. ही चाचणी पॉझिटिव्ह आली. तिला एडीडीपीने 29 जून 2021 रोजी चार वर्षांसाठी अपात्र ठरवले. तिने अपील दाखल केले आणि या वर्षी 18 एप्रिल रोजी डोपिंग विरोधी अपील पॅनेल (एडीएपी) ने तिची बंदी दोन वर्षांपर्यंत कमी केली.

एडीएपी च्या सुनावणीदरम्यान, कीर्तीने निदर्शनास आणले की तिच्या प्रशिक्षकाने तिला आणि आणखी एका ॲथलीटला सप्लिमेंट्स व्यतिरिक्त हे इंजेक्शन दिले होते. तिच्या तक्रारीवरून महाराष्ट्र अॅथलेटिक्स असोसिएशनने प्रशिक्षकाची चौकशी करून त्याच्यावर चार वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याचेही तिने उघड केले.

या माहितीनुसार कारवाई करत, नाडा ने यावर्षी 12 मे रोजी प्रशिक्षक मिकी मिनेझिस यांच्यावर डोपिंग विरोधी नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप लावला. अॅथलीटला दिलेले इंजेक्शन प्रतिबंधित पदार्थापासून मुक्त आहे असे पुरवठादाराने आपल्याला सांगून आपली दिशाभूल केली असे म्हणत प्रशिक्षकाने स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला.

30 सप्टेंबर रोजी, एका एडीएपी ने प्रशिक्षकाला कीर्ती भोईटेला इंजेक्शनद्वारे स्टिरॉइड दिल्याबद्दल आणि तिच्या कामगिरीचा अवाजवी फायदा मिळवण्यासाठी डोपिंगमध्ये त्याच्या सहभागाबद्दल दोषी धरले.

डोपिंगविरोधी नियमांचे संभाव्य उल्लंघन नोंदवण्यासाठी नाडा प्रोत्साहित करते. डोपिंगविरोधी नियमांच्या विरोधात जाऊ शकणार्‍या कृतींची तक्रार करण्यासाठी वेबसाइटवर एक सुरक्षित लिंक आहे नाडाशी शेअर केलेली प्रत्येक गोष्ट काटेकोरपणे गोपनीय राहते. संभाव्य उल्लंघनाची तक्रार करण्यासाठी ही लिंक आहे:

https://www.nadaindia.org/speakup-form