Home Blog Page 1521

व्हिस्कीमध्ये 20 कोटींचे कोकेन… विमानतळावर जप्त,नवी शक्कल झाली उघड ..

मुंबई, 24 नोव्हेंबर 2022

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय )मुंबई विभागीय  युनिटने एका प्रवाशाकडून सुमारे 20 कोटी रुपयांचे कोकेन जप्त केले आहे.24 नोव्हेंबर 2022 रोजी लागोसहून अदिस अबाबा मार्गे मुंबईला येणारा एक प्रवासी भारतात काही अंमली पदार्थाची तस्करी करणार असल्याची माहिती मुंबईच्या महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली होती, त्याआधारे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर डीआरआय अधिकाऱ्यांच्या पथकाकडून  पाळत ठेवली गेली.

विमानतळावर संशयित प्रवाशाला  डीआरआय अधिकाऱ्यांच्या पथकाने ओळखले आणि त्याला अडवले. त्याच्या सामानाची कसून झडती घेण्यात आली आणि  व्हिस्कीच्या 2 बाटल्या (प्रत्येकी 1 लिटर) जप्त करण्यात आल्या. अंमली पदार्थ शोध  किटद्वारे बाटल्यांमधील व्हिस्कीची चाचणी केली असता त्यात  कोकेनचा अंश  असल्याचे निदर्शनास आले.  लिक्विड कोकेनसह 2 बाटल्यांचे एकूण वजन अंदाजे 3.56 किलो एवढे आहे.

या बाटल्यांमध्ये असलेल्या द्रवामध्ये कोकेन अगदी कल्पकतेने  विरघळवले होते आणि  ते शोधणे अत्यंत कठीण होते.

ही एक अनोखी कार्यपद्धती डीआरआयने उघडकीस आणली आहे . डीआरआयच्या अधिकाऱ्यांना नियमितपणे देशात येणाऱ्या अंमली पदार्थांचा ओघ तपासण्यासाठी किती कठीण आव्हानांना सामोरे जावे लागते हे यावरून दिसून येते.

अवैध रित्या वाहतूक करण्यात आलेल्या या कोकेनचे आंतरराष्ट्रीय बाजार मूल्य 20 कोटी (अंदाजे) रुपयांपेक्षा जास्त आहे. यामागील आंतरराष्ट्रीय ड्रग स्मगलिंग जाळे उध्वस्त आणि प्रभावहीन करण्यासाठी या  प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.

आई आणि मुलातील भावनिक बंधाचे चित्रपट,’लोटस ब्लूम्स’ मैथिली भाषेतील चित्रपट

गोवा/मुंबई, 24 नोव्‍हेंबर 2022

53 व्या इफ्फीमध्ये पत्रसूचना कार्यालयाने आयोजित केलेल्या ‘टेबल टॉक्स’ या चर्चात्मक कार्यक्रमाचा भाग म्हणून ‘लोटस ब्लूम्स’ चित्रपटाचा कलाकार वर्ग आणि इतर तंत्रज्ञांनी पत्रकार परिषदेत उपस्थितांशी संवाद साधला.

दिग्दर्शक प्रतिक शर्मा त्यांच्या ‘लोटस ब्लूम्स’ या मैथिली फिचर फिल्म मागील प्रेरणेबद्दल सांगताना म्हणाले की निसर्ग आणि लोकांच्या साक्षीने एका व्यक्तीचा भावनिक प्रवास चितारणे हा या चित्रपट निर्मितीच्या मागचा विचार होता. पण त्यांना हा विचार रंजक पद्धतीने मांडायचा होता. आपल्या सृष्टीने एखाद्यासाठी जे योजलेले असते ते नेहमीच घडते, कधी कधी ते अनपेक्षित पद्धतीने घडते आणि अशा वेळी मानवी योजना अपयशी देखील ठरतात अशा शब्दांत पटकथाकार अस्मिता शर्मा यांनी ‘लोटस ब्लूम्स’ची मध्यवर्ती कल्पना स्पष्ट केली. “कधीकधी आयुष्याचा प्रवास बिकट होऊन जातो, पण जेव्हा तुम्ही स्वतःला निसर्गाच्या आणि परमेश्वराच्या पायाशी लीन करता तेव्हा आश्चर्यकारकरित्या अडचणी दूर होतात,” त्या पुढे म्हणाल्या. 


 

53व्या इफ्फीमध्ये रेड कार्पेटवर ‘लोटस ब्लूम्स’ चित्रपटाचे पथक

इफ्फीमध्ये 23 नोव्हेंबर 2022 रोजी ‘लोटस ब्लूम्स’ चित्रपटाचे दिग्दर्शक प्रतिक शर्मा, निर्माता आणि पटकथाकार अस्मिता शर्मा, अभिनेता अखिलेंद्र छत्रपती मिश्रा आणि चित्रपटाचे कलाकार आणि तंत्रज्ञ यांचा सत्कार करण्यात आला.

पत्रकार परिषदेत अभिनेता अखिलेंद्र छत्रपती मिश्रा आणि दिग्दर्शक प्रतिक शर्मा

चित्रपट सारांश 

53व्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भारतीय पॅनोरमा विभागात मैथिली भाषेतील ‘लोटस ब्लूम्स’ हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटात संदेश देण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रतीकांचा वापर करून एक आई आणि मुलातील भावनिक बंधाचे चित्रण करण्यात आले आहे. या चित्रपटात फार कमी संवाद आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण बिहारच्या अंतर्गत भागांमध्ये करण्यात आले आहे.

दूरसंचार लेखा नियंत्रक (महाराष्ट्र आणि गोवा) यांनी पुण्यामध्ये आयोजित केला परवाना धारक आणि निवृत्ती वेतन धारकांपर्यंत पोहोचण्यासाठीचा कार्यक्रम

पुणे, 24 नोव्हेंबर 2022

दूरसंचार खात्याने तयार केलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने, भारत सरकारच्या दूरसंचार  मंत्रालयाच्या महाराष्ट्र आणि गोवा विभागाच्या दूरसंचार लेखा नियंत्रकांनी (सीसीए) 24 नोव्हेंबर 2022 रोजी पुण्यामध्ये बीएसएनएल पीजीएमटी येथील कॉन्फरन्स हॉल मध्ये परवानाधारक आणि निवृत्ती वेतन धारकांपर्यंत पोहोचण्यासाठी  कार्यक्रम आयोजित केला होता.

नवी दिल्लीमधील दूरसंचार विभागात कम्युनिकेशन्स कमिशन विभागाचे सल्लागार (वित्त) एस.के. मिश्रा, हे प्रमुख पाहुणे होते. विभा गोविल मिश्रा, सीसीए (महाराष्ट्र आणि गोवा) तसेच ओ/ओ सीसीए (महाराष्ट्र आणि गोवा) चे इतर वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

परवानाधारक आउटरीच कार्यक्रमात, परवानाधारकांना परवान्याच्या मूलभूत अटींबाबत मार्गदर्शन करण्यात आले आणि त्याबाबत विभागाने  नुकत्याच जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्यांना महसूल व्यवस्थापन प्रणाली– सरस ( एसएआरएएस) च्या कार्यपद्धतीबद्दल मार्गदर्शन/प्रात्यक्षिक देखील देण्यात आले; जे रक्कम भरणे (पेमेंट) आणि कागदपत्रे सादर करण्यासह परवान्याच्या सर्व क्रियाकलापांसाठीचे एकच व्यासपीठ आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या  दूरसंचार सुधारणा 2021 च्या निर्णयाच्या अनुषंगाने बँक हमींचे तर्कसंगतीकरण करण्याबाबत यावेळी चर्चाही करण्यात आली.

सुमारे 250 परवानाधारकांनी या कार्यशाळेला हजेरी लावली आणि त्यांनी सरस (एसएआरएएस) ची ओळख करून घेतली, ज्यामुळे भविष्यात कागदपत्रे अपलोड करणे, वेळेवर पेमेंट करणे इत्यादीसाठी त्यांना मदत होईल. परवानाधारकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देखील देण्यात आली. यामुळे सीसीए कार्यालयाला परवानाधारकांच्या संपर्कात राहायला मदत होईल आणि कागदपत्रे/देयके वेळेवर न मिळण्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात सोडवल्या जातील, तसेच यामुळे महसूल मूल्यांकन आणि संकलनाची संपूर्ण प्रक्रिया सुव्यवस्थित होईल.

ओ/ओ सीसीए (महाराष्ट्र आणि गोवा) च्या अधिकारी/कर्मचाऱ्यांनी निवृत्ती वेतन धारकांच्या तक्रारींचे समाधानकारक पद्धतीने निराकरण केले. सुमारे 500   निवृत्तीवेतन धारकांना  त्यांच्या तपशीलांसह (उदा. डीओबी, यापूर्वी काढलेले वेतन इ.) निवृत्तीवेतन धारक ओळखपत्रांचे वितरण करण्यात आले. निवृत्तीवेतन धारकांना  त्यांचे वार्षिक जीवन प्रमाणपत्र सहज आणि त्वरीत सादर करायला मदत व्हावी, यासाठी डिजिटल जीवन प्रमाणपत्र  सुविधा देखील उपलब्ध करण्यात आली होती.

हा निवृत्तीवेतन धारक आउटरीच कार्यक्रम सीसीए कार्यालयांना निवृत्तीवेतन धारकांच्या फायद्यासाठी सरकारने उचललेल्या विविध पावलांचा प्रचार करण्यासाठी/याबाबत शिक्षित करण्यासाठी मदत करतो.

निवृत्तीवेतन धारकांनी ओ/ओ सीसीए (महाराष्ट्र आणि गोवा) यांनी केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली आणि ओळखपत्रे मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

ओळखपत्राचा पुरावा म्हणून आधार स्वीकारण्यापूर्वी त्याची पडताळणी करा: युआयडीएआय

0

नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर 2022

एखाद्या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी प्रत्यक्ष किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात आधार स्वीकारण्यापूर्वी, संस्थांनी आधारची पडताळणी करणे आवश्यक आहे.

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) ने नमूद केले आहे की आधार धारकाच्या संमतीनंतर आधार क्रमांकाची पडताळणी करणे हे एखाद्या व्यक्तीने सादर केलेल्या कोणत्याही प्रकारच्या  आधार (आधार पत्र, ई-आधार, आधार पीव्हीसी कार्ड, आणि एम-आधार) खरेपणा तपासण्यासाठी योग्य पाऊल आहे.

यामुळे अप्रामाणिक आणि असामाजिक घटक कोणत्याही संभाव्य गैरवापरात सहभागी होण्याला आळा बसतो. हे  कोणताही 12-अंकी क्रमांक आधार नाही या युआयडीएआयच्या भूमिकेचे समर्थन करते. आधार दस्तावेजांची छेडछाड झाली असल्यास ऑफलाइन पडताळणीद्वारे त्याचा शोध घेता येऊ शकतो.  छेडछाड हा दंडनीय गुन्हा असून  आधार कायद्याच्या कलम 35 अंतर्गत दंडास पात्र आहे.

युआयडीएआय ने वापरापूर्वी आधार पडताळणीच्या आवश्यकतेवर  भर देण्याची  राज्य सरकारांना विनंती केली आहे आणि राज्यांना आवश्यक निर्देश देण्याचे आवाहन केले आहे जेणेकरून जेव्हा ओळखपत्राचा पुरावा म्हणून  आधार  सादर केले जाईल – तेव्हा आधार वापरून संबंधित संस्थेद्वारे रहिवाशाचे प्रमाणीकरण/पडताळणी  केली  जाईल.

युआयडीएआयने  संस्थाना  प्रमाणीकरण/पडताळणीसाठी  विनंती केली असून तसे अधिकार देणारी परिपत्रके देखील जारी केली आहेत ज्यात पडताळणीच्या आवश्यकतेवर भर आणि  प्रोटोकॉलचे पालन करण्यास सांगितले आहे.

mAadhaar App, किंवा Aadhaar QR कोड स्कॅनर वापरून सर्व प्रकारच्या आधार (आधार पत्र , ई-आधार, आधार पीव्हीसी  कार्ड आणि m-Aadhaar) वर उपलब्ध QR कोड वापरून कोणत्याही  आधारची पडताळणी केली जाऊ शकते.  QR कोड स्कॅनर Android आणि iOS आधारित मोबाइल फोन तसेच विंडो-आधारित ऍप्लिकेशनसाठी विनामूल्य उपलब्ध आहे.

रहिवासी स्वेच्छेने त्यांचे आधार कागद किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात सादर करून त्यांची ओळख पटवण्यासाठी  आधार क्रमांक वापरू शकतात. युआयडीएआयने यापूर्वीच रहिवाशांसाठी काय करावे आणि काय करू नये याबद्दल माहिती प्रसिद्ध केली असून रहिवासी आत्मविश्वासाने त्यांचे आधार वापरू शकतात.

ऐरोली येथे मराठी भाषा उपकेंद्राचे लवकरच भूमिपूजन – उद्योगमंत्री उदय सामंत

0

मुंबई दि. 24 : चर्नी रोड येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सहकार्याने उभारण्यात येणाऱ्या मराठी भाषा भवनाचे काम तातडीने सुरु करण्याचे निर्देश विभागाला दिले असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची वेळ घेऊन ऐरोली येथील उपकेंद्राचे भूमिपूजनही लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. मराठी भाषा भवन उभारणीसंदर्भात माहिती देण्यासाठी मंत्रालयात आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते.

श्री. सामंत पुढे म्हणाले की, मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्यासोबत चर्चा करुन या मराठी भाषा भवनाच्या उभारणीत उद्योग विभागाने तत्परता दाखवावी. तसेच उपकेंद्राच्या भूमिपूजनासाठी राज्यातील मान्यवर आणि मराठीतील  जेष्ठ साहित्यिकांना आमंत्रित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नवी मुंबईत उभारण्यात येत असलेल्या ऐरोली येथील उपकेंद्रासाठी मराठी भाषा विभागाने आवश्यक निधी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे सुपूर्द केला आहे, तर मराठी भाषाभवन साठी लागणाऱ्या निधीची तरतूद झालेली आहे तसेच आवश्यक त्या सर्व परवानग्या प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी तत्काळ बांधकाम सुरू करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे श्री. सामंत यांनी सांगितले.

दरम्यान, आज उद्योगमंत्री सामंत यांनी ऐरोली येथील मराठी भाषा भवन उपकेंद्राच्या जागेची पाहणी केली. तसेच पुढील 15 दिवसांत काम सुरू करण्याची सूचना केली.

मराठी भाषा भवन मुख्य केंद्र गिरगाव, जवाहर बाल भवन, चर्नीरोड, मुंबई येथील भूखंडावरील शालेय शिक्षण विभागाचे बांधकाम वगळता रिक्त भूखंडावर उभे राहणार आहे. तर, उपकेंद्र एरोली नवी मुंबई येथे बांधण्यात येणार आहे. मराठी भाषा भवन व मराठी भाषा उपकेंद्रांचे बांधकाम महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून होणार आहे, या दोन्ही ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली असून लवकरच  कामाला सुरुवात होईल, अशी माहिती श्री. सामंत यांनी दिली.

भाजपा सरकारचा हा आगाऊपणा महाराष्ट्र खपवून घेणार नाही-सोलापूर, अक्कलकोट व जत तालुक्यातील गावांवर कर्नाटकने हक्क सांगावा, हे हास्यास्पद : नाना पटोले

मुंबई- महाराष्ट्रातील सोलापूर, अक्कलकोट व जत तालुक्यातील गावांवर कर्नाटकने हक्क सांगावा, हे हास्यास्पद असून कर्नाटकच्या भाजपा सरकारचा हा आगाऊपणा महाराष्ट्र खपवून घेणार नाही. कर्नाटक सीमावाद अद्याप न्यायप्रविष्ट असताना अशा पद्धतीने महाराष्ट्राच्या गावांवर हक्क सांगणे चुकीचे आहे. शिंदे-फडणवीस सरकारने आधी राज्यातील महत्त्वाचे प्रकल्प भाजपाशासित गुजरात व मध्य प्रदेशच्या घशात घातले व आता कर्नाटकने महाराष्ट्राच्या गावांवर हक्क सांगणे हे महाराष्ट्राची चोहोबाजूनी गळचेपी करणारे आहे. शिंदे-फडणवीस सरकारने महाराष्ट्राचे तुकडे करण्याची सुपारी घेतली आहे का? असा संतप्त प्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या विधानाचा समाचार घेत नाना पटोले यांनी राज्यातील शिंदे फडणवीस सरकारवर तोफ डागली. बेळगाव, कारवार, निपाणीचा प्रश्न अजून सुटलेला नसताना सोलापूर, अक्कलकोटसह जत तालुक्यातील ४० गावांवर हक्क सांगून कर्नाटकने कुरापत काढली आहे. सीमावादाचा मुद्दा सुप्रीम कोर्टात असताना भाजपाच्या मुख्यमंत्र्यांनी अशा पद्धतीने वक्तव्य करणे अत्यंत चुकीचे आहे. महाराष्ट्रात पाच महिन्यापूर्वी आलेले शिंदे-फडणवीस सरकार महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीत मोठा अडथळा आणणारे आहे. राज्यात गुंतवणूक होत असलेले मोठे प्रकल्प गुजरात व मध्य प्रदेश या भाजपाशासित राज्यांना आंदण दिले, तर राज्यातील पाणीही गुजरातला दिले. महत्त्वाची कार्यालयेही गुजरातला हलवण्यात आली. आता कर्नाटक महाराष्ट्राच्या गावांवर हक्क सांगू लागला आहे, हे राज्यातील सरकार कमजोर असल्यानेच होत आहे. दिल्लीच्या इशाऱ्यावर काम करणाऱ्या शिंदे-फडणवीसांना सरकार चालवता येत नसून त्यांच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्राचे नुकसान होत आहे, असेही ते म्हणाले.

१२ हजार ५०० पणत्यांनी देवदिवाळीनिमित्त उजळले ‘लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई’ दत्तमंदिर 

मंदिराचे १२५ वे वर्ष
पुणे :  गोलाकार फिरणारे तेलाचे दिवे, रंगीबेरंगी फुलांची आकर्षक रंगावली आणि हजारो पणत्यांच्या प्रकाशात लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिराचा परिसर उजळून निघाला. संपूर्ण मंदिरावर तेलाच्या १२ हजार ५०० दिव्यांची आकर्षक आरास हे यंदा मंदिराच्या १२५ व्या वर्षी साज-या झालेल्या दीपोत्सवाचे वैशिष्टय होते. पारंपरिक पद्धतीने करण्यात आलेला या दीपोत्सवाने पुणेकरांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. 


बुधवार पेठेतील कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात देवदिवाळीनिमित्त तेलाच्या १२ हजार ५०० सप्तरंगी फिरत्या दिव्यांची रोषणाई करण्यात आली. तसेच आकर्षक पुष्परचना साकारुन पारंपरिक पद्धतीने दीपोत्सव करण्यात आला. सुभाष सरपाले व सहका-यांनी ही सजावट केली. 
यावेळी दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रताप परदेशी, कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार, खजिनदार महेंद्र पिसाळ, उत्सवप्रमुख अ‍ॅड.रजनी उकरंडे, उत्सव उपप्रमुख युवराज गाडवे, विश्वस्त सुनील रुकारी, डॉ.पराग काळकर, राजू बलकवडे, अक्षय हलवाई आदी यांसह पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 
अ‍ॅड.प्रताप परदेशी म्हणाले, दरवर्षीप्रमाणे यंदाही देवदिवाळीनिमित्त मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आला. मंदिराचे प्रवेशद्वार व गाभारा फुलांच्या माळांनी तसेच रांगोळीने सजविण्यात आले. तसेच कळसावर संपूर्णपणे रंगीबेरंगी दिव्यांची आकर्षक सजावट करण्यात आली. कळसावर ओम, श्री व स्वस्तिक च्या शुभचिन्हांची सजावट देखील पणत्यांच्या माध्यमातून करण्यात आली. मंदिरात अनेक प्रकारच्या समई व दिवे पाहण्यासोबतच दत्तमंदिरातील दीपोत्सवाचे मोबाईलमध्ये दृश्य कैद करण्याकरीता व मार्गशीर्ष गुरुवार मुळे भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

राज्यपालांना हटवलं नाही तर या महाराष्ट्रद्रोह्यांना…..उद्धव ठाकरेंनी दिला इशारा,केले आवाहन .

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ‘जर या राज्यपालांना हटवलं गेलं नाही तर पक्षभेद बाजूला ठेवून आपण सर्व महाराष्ट्रप्रेमी नागरिकांनी एकत्र येऊन विरोध केला पाहिजे. त्यामुळे मी सर्व नागरिकांना आवाहन करत आहे की, आपण जर शांत बसलो तर आपल्या शूर-वीर म्हणवल्या जाणाऱ्या राज्याच्या अब्रुची लक्तरे या लोकांकडून वेशीवर टांगली जातील. त्यामुळे येते दोन-चार दिवस आपण वाट पाहू आणि राज्यपालांना हटवलं नाही तर या महाराष्ट्रद्रोह्यांना एक खणखणीत इंगा दाखवलाच पाहिजे. मग त्यासाठी महाराष्ट्र बंद करायचा की मोर्चा काढायचा हे आपण ठरवू,’ असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्याचा उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला. ही शक्कल एकट्या राज्यपालांच्या काळ्या टोपीतून आलेली नाही. त्यांच्या सडक्या मेंदूच्या मागील मेंदू कोण आहे, हे शोधण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्रातील आदर्शांचा हळुवारपणे अपमान केला जात आहे. मागे भगतसिंह कोश्यारी सावित्रीबाई फुले यांच्याविषयी बोलले होते. सातत्याने अपमान करून महाराष्ट्राच्या रक्तात भिनलेले आदर्श नष्ट करायचे. मग भाजपच्या काही भाकड नेत्याची नवे आदर्श म्हणून जनतेच्या मनात प्रतिमा बिंबवण्याची चाल खेळली जात आहे. त्याला विरोध झाला पाहिजे, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले. कर्नाटकचे मुख्यंत्री महाराष्ट्रातील गावांवर दावा सांगतात. महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि दैवतांचा अपमान होत आहे. पण मुख्यमंत्र्यांना त्याची कोणतीही खंत किंवा चिंता नाही. काहीतरी गोलमाल उत्तर देऊन ते वेळ मारून नेतात. या राज्याला मुख्यमंत्री आहे का तेच कळत नाही. ते कधीही बोलतच नाहीत. महाराष्ट्रातील ४० गावं कर्नाटकमध्ये जात असतीत तर मुख्यमंत्री नेहमीच्या शैलीत उत्तर देतील. ते म्हणतील, काळजी करु नका. मी पंतप्रधानांना फोन केला होता. त्यांनी सांगितलं आहे की, कर्नाटकने महाराष्ट्रातील ४० गावं घेतली तर घेऊ दे. आपण पाकव्याप्त काश्मीर जिंकल्यावर १०० गावं महाराष्ट्राला देऊ, असं कदाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगतील. त्यांच्याकडून कोणतीही अपेक्षाच नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील सारवासारव करत आहेत. सांगण्याचा मुद्दा हा आहे की, भाजपच्या अखत्यारितील राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्या वरिष्ठांच्या मर्जीशिवाय काही बोलू शकतात का? मग तसं नसेल तर कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई हे त्यांच्या वरिष्ठांच्या परवानगीशिवाय बोलले आहेत का? महाराष्ट्राच्या अस्मितेवर हल्ला करण्याचा हा भाजपचा राष्ट्रीय कार्यक्रम आहे का? तसे असेल तर सर्व महाराष्ट्रप्रेमींनी एकत्र येऊन याला विरोध केला पाहिजे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

‘महाराष्ट्र छत्रपती शिवरायांना मानतो. मात्र त्यांचा अपमान झाल्यावर भाजपच्या लोकांकडून गुळमुळीत प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. केंद्रात ज्यांचं सरकार असतं त्यांच्या विचारांची माणसं राज्यपाल म्हणून नेमली जातात. मात्र या माणसांची कुवत काय असते, या माणसांची पात्रता काय असते? ज्या माणसांना वृद्धाश्रमातही जागा मिळत नाही, त्यांना राज्यपाल म्हणून नेमलं जातं का? राज्यपाल नियुक्तीचेही निकष ठरवण्यात आले पाहिजेत. आपल्या राज्यपालांना राज्यपाल म्हणणंच मी सोडून दिलं आहे. राज्यपालपदाची झूल पांघरली म्हणून त्यांनी काहीही बोलावं, हे सहन केलं जाणार नाही. कोश्यारींनी याआधीही मराठी माणसांचा अपमान केला होता. या सडक्या मेंदूच्या मागील मेंदू कोण आहे, याचा शोध घेण्याची वेळ आली आहे,’ असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भगतसिंह कोश्यारी यांच्यासह केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली आहे.

वीज कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या आरोपीस तीन वर्षे सश्रम कारावास

0

मुंबई,दि.२४ नोव्हेंबर २०२२; वीजबिल वसुलीसाठी गेलेले महावितरणच्या कर्मचाऱ्याना मारहाण करून शिवीगाळ केल्या प्रकरणातील आरोपीला दोषी ठरवत अमरावती जिल्हा व सत्र न्यायालयाने दंड व तीन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.अमरावती येथील विश्वनाथ कॉलनीमध्ये राहणारे गणेश बळीराम तळोकार (५२) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे  नाव असुन ही घटना ऑक्टोबर २०१८ मध्ये अमरावतीतील फरशी स्टॉपस्थित टांक बाजार परिसरात घडली होती. दि.१० ऑक्टोबर २०१८ रोजी राजापेठस्थित वीज वितरण कंपनीच्या कार्यालयातील वरिष्ठ तंत्रज्ञ गोपाल काशीराम माहुलकर हे थकीत वीजबिल वसुलीचे काम करत होते. दरम्यान, ते टांक बाजार येथे प्रकाश बळीराम तळोकार यांच्या दुकानात वीजबिल थकल्याने वसुलीकरिता गेले असता, तेथे उपस्थित प्रकाश तळोकार यांचा भाऊ आरोपी गणेश तळोकार यांना तुम्ही वीजबिल भरले नाही तर तुमचे वीज कनेक्शन बंद करण्यात येईल असे म्हटले. त्यावेळी गणेश तळोकार यांनी वाद घालून गोपाल माहुलकर यांना अश्लील शिवीगाळ केली आणि लोखंडी पाईपने मारण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यानंतर त्याने माहुलकर यांना थापड मारून त्यांची कॉलर पकडली. घटनेनंतर माहुलकर हे जखमी झाले आणि घटनेची तक्रार राजापेठ पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी आरोपी विरुद्ध कलम ३५३,३३२,,५०४ आणि १८६ भां.द.वि.नुसार गुन्ह्याची नोंद केली होती.

        तपासाअंति तपास अधिकारी पोलिस निरिक्षक दत्ता नरवाडे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील रंजीत ना.भेटाळू यांनी युक्तिवाद करत न्यायालयात एकूण सात साक्षीदार तपासले. दोन्ही पक्षाच्या युक्तीवादानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक ३ मा. रवींद्र व्ही. ताम्हाणेकर यांच्या न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत  भां.द.वि.च्या कलम ३५३ नुसार दोन वर्षे सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावास,तसेच कलम ३३२ भां.द.वि. नुसार ३ वर्ष सश्रम कारावास व ३ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिने अतिरिक्त कारावास व कलम १८६ भां.द.वि. नुसार ३ महिने सश्रम कारावास व ५०० रुपये दंड व दंड न भरल्यास सात दिवस अतिरिक्त कारावासाची शिक्षा ठोठावली.

       सदर प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून पोलीस मुख्य हवालदार बाबाराव मेश्राम व एनपीसी अरुण  हटवार , सतीश चौधरी यांनी पोलीस विभागाकडून काम पाहिले.

पीएमपीएमएल च्या कात्रज आगारातील श्रीमंत सेवा प्रतिष्ठान यांच्या वतीने”आसरा” या संस्थेला पिठाची गिरणी भेट

पुणे-पीएमपीएमएलच्या कात्रज आगारातील श्रीमंत सेवा प्रतिष्ठान यांच्या वतीने हेल्पिंग हँड सोशल फाउंडेशन संचलित
“आसरा” या संस्थेला पिठाची गिरणी भेट म्हणून देण्यात आली. पीएमपीएमएलच्या सहव्यवस्थापकीय संचालक प्रज्ञा
पोतदार-पवार यांच्या हस्ते आसरा संस्थेच्या संचालिका सौ. स्वाती डिंबळे यांना पिठाची गिरणी सुपूर्द करण्यात आली.
याप्रसंगी पुणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका मा. स्मिताताई कोंढरे, पीएमपीएमएलचे कामगार व जनता
संपर्क अधिकारी श्री. सतिश गाटे, कात्रज आगार व्यवस्थापक श्री. गोविंद हांडे, रामराज्य बँकेचे संस्थापक श्री. विजय
मोहिते, उद्योजक श्री. नितीन दळवी, श्रीमंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. भरत गिरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्रीमंत सेवा प्रतिष्ठानच्या वतीने देव दिवाळी निमित्त फराळाचे वाटप देखील करण्यात आले. गेली १० वर्षे श्रीमंत
सेवा प्रतिष्ठानच्या वतीने पंढरपूर वारीतील वारकऱ्यांना अन्नदान केले जाते. तसेच गेली ३ वर्षे सैनिकांसाठी रक्तदान
शिबीर घेऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे. श्रीमंत सेवा प्रतिष्ठानचे श्री. सुभाष जगताप यांनी सूत्रसंचालन केले तरश्री. निलेश जगताप यांनी आभार मानले.

“आसरा संस्थेच्या माध्यमातून स्वाती डिंबळे यांनी शब्दाला कृतीची जोड दिली आहे. ज्यांना कुणीच नाही अशा
लोकांसाठी ही संस्था खरोखर मोठा आधार आहे. उत्तरदायित्वाची भावना कृत्रिम नसते तर ती अंगी असावी लागते.
निराधारांना गरजेच्या वस्तू भेट म्हणून देण्याचा श्रीमंत सेवा प्रतिष्ठानचा उपक्रम स्तुत्य आहे.”

– प्रज्ञा पोतदार-पवार,सहव्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल.

“एखादी व्यक्ती एखादे काम सुरू शकते. परंतु त्याला साथ मिळाल्याशिवाय ते काम पुढे जाऊ शकत नाही. आत्तापर्यंत ३५
निराधार लोकांना “आसरा” च्या माध्यमातून आधार व उपचार मिळाले आहेत. ३५ पैकी १० लोकांना त्यांच्या
कुटुंबियांपर्यंत सुखरूप पोहोचवले आहे. श्रीमंत सेवा प्रतिष्ठानने दिलेली पिठाची गिरणी आमच्यासाठी नक्कीच उपयुक्त
भेटवस्तू आहे.” – सौ. स्वाती डिंबळे, संचालिका, आसरा.

महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहाल तर याद राखा:कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना इशारा

अजित पवार म्हटले अंगात काही संचारलंय काय?लोकांचे लक्ष महागाई आणि बेरोजगारीवरुन हटवण्यासाठी अशी वक्तव्यं

मुंबई-कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगलीतील जत तालुक्यासह सोलापूरमधील काही गावांवर दावा केला आहे. त्यावर मविआ नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. खासदार संजय राऊत यांनी तर थेट महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहाल तर याद राखा, असा इशाराच कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना दिला आहे.विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही बोम्मई यांच्या अंगात काही संचारले आहे का? काल सांगलीतील काही गाव, आज सोलापूरातील काही गाव मागताय. उद्या पूर्ण महाराष्ट्र मागायला कमी करणार नाहीत, अशा शब्दांत बोम्मई यांची खिल्ली उडवली आहे.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आज पत्रकार परिषदेत म्हणाले की, मी कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना इशारा देत नाही. धमकी देतोय. तुमची बकबक बंद करा. हे घेऊ, ते घेऊ हे थांबवा. आजही आम्ही शांत आणि संयमी आहोत. शिंदे सरकार गुडघ्यावर बसले असले तरी शिवसेना स्वाभिमानाने उभी आहे.संजय राऊत म्हणाले, शिंदे गटातील 40 आमदार आपण स्वाभिमानासाठी शिवसेनेतून बाहेर पडत आहोत, असे म्हणाले होते. आता कुठे आहे तुमचा स्वाभिमान? कुठं शेण खातोय तुमचा स्वाभिमान? एक मुख्यमंत्री गाव घेत आहे. एक उद्योग घेतो आहे अन् षंढासारखे बसला आहात तुम्ही?संजय राऊत म्हणाले, मी वारंवार सीमाभागात गेलो होतो. शिंदे सरकारमधील किती मंत्री बेळगाव, निपाणी आणि कारवार, खानापूर, भालकीला गेले? मंत्री चंद्रकांत पाटील जातात आणि कन्नड राष्ट्रगीत म्हणतात. आमच्या जखमेवर मीठ चोळतात. पण आम्ही लढू. राज्यात कुणाचे सरकार आहे हे महत्त्वाचे नाही. आमचे सरकार असते तरी आम्ही आवाज उठवला असता.

संजय राऊत म्हणाले, शिंदे केवळ महाराष्ट्रातून एकही गाव जाणार नाही, असे म्हणत आहेत. केवळ असे बोलून चालणार नाही. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या वर्मावर घाव घातला आहे. आतापर्यंत कोणत्याही मुख्यमंत्र्यांची अशी हिंमत झाली नव्हती. महाराष्ट्रातील सरकार मिंधे असेल पण आम्ही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रावर आलेलं संकट परतवून लावू.

राष्ट्रवादी काँग्रेसची आज प्रदेश कार्यालयात शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक होत असून या बैठकीला आले असता अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र असा- तसा वाटला का? तुम्ही महाराष्ट्र मागायला निघालात का? असा रोखठोक आणि संतप्त सवाल अजित पवार यांनी केला.अजित पवार म्हणाले, सांगली जिल्हयातील जत तालुक्यातील गावांवर दावा केल्यानंतर आता अक्कलकोटवरही कर्नाटक मुख्यमंत्र्यांनी दावा केला आहे. कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी अशी वक्तव्य करणे ताबडतोब थांबवावे. त्यांचे हे वक्तव्य निंदनीय असून त्याचा कठोर शब्दांत निषेध केला पाहीजे.केंद्राने यामध्ये तात्काळ हस्तक्षेप करावा. महाराष्ट्र अशी वक्तव्ये कदापि खपवून घेणार नाही, असा इशाराही अजित पवार यांनी दिला. प्रत्येक राज्याचा अस्मितेचा प्रश्न असतो. अनेक मुख्यमंत्र्यांनी राज्याला एकसंघ ठेवण्याचा काम केले आहे. आता काहीही कारण नसताना कर्नाटकचे मुख्यमंत्री बोलले आहेत त्यामुळे महाराष्ट्र सरकारने आपली भूमिका मांडली पाहिजे, असेही अजित पवार म्हणाले.अजित पवार म्हणाले की, लोकांचे लक्ष महागाई आणि बेरोजगारीवरुन हटवण्यासाठी अशी वक्तव्य केली जात आहेत. सध्या कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांच्या अंगात काय संचारले आहे काय माहित. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी कडक शब्दात त्यांना सुनावले पाहिजे. आता फक्त मुंबई मागणे बाकी ठेवले आहे, असा उपरोधिक टोलाही अजित पवार यांनी लगावला.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी अक्कल गहाण ठेवली आहे काय ?केंद्राने चाप लावावा अन्यथा… : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे-महाराष्ट्रातील कन्नड भाषा बोलणाऱ्या अक्कलकोट, सोलापूर ही शहरे महाराष्ट्रातील गावांचा समावेश कर्नाटक मध्ये करण्याची मागणी आज कर्नाटकचे मुख्यमंत्री यांनी केली आहे. या त्यांच्या विधानाचा समाचार घेत , यांनी यांची अक्कल गहाण ठेवली आहे काय ? समाजामध्ये हा तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न नाही काय ? असे सवाल करत महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी निषेध व्यक्त केला आहे.केंद्राने वेळीच कर्नाटकला चाप लावण्यासाठी पावले उचलण्याची तयारी दाखवावी. तसे होणार नसेल तर महाराष्ट्र देखील याबाबत प्रत्युत्तर देण्यास समर्थ आहे.असाही इशारा नीलम गोऱ्हे यांनी दिला आहे.

महाराष्ट्रात अक्कलकोट, सोलापूर सारख्या शहरांमध्ये गेल्या शेकडो वर्षांपासून कानडी भाषिक स्थलांतरीत नागरिक राहत आहेत आणि आता हे महाराष्ट्राचे अविभाज्य भाग बनले आहेत.न्यायालयात या प्रश्नावर सुरू असलेली चौकशी आता ऐरणीवर आली असताना स्वतकडील लंगडी बाजू लपविण्यासाठी कर्नाटकने अशा प्रकारे विधाने करण्यास सुरुवात केली आहे. अशी उलट सुलट विधाने करून जनतेची दिशाभूल करणे, अशा प्रकारे केंद्र सरकारच्या कामाची पद्धत असल्याचे दिसून येत आहे.

यामुळे समाजात तेढ वाढवण्याचा प्रयत्न कर्नाटक सरकार करीत आहे. पाकिस्तान देखील अशा प्रकारे काम करताना दिसत आहे. दररोज एक चौकी काबीज करून हा पाकिस्तानचा भाग आहे, असे म्हणण्यासारखे वक्तव्य हे कर्नाटक सरकार करीत आहे.याकरिता केंद्राने वेळीच कर्नाटकला चाप लावण्यासाठी पावले उचलण्याची तयारी दाखवावी. तसे होणार नसेल तर महाराष्ट्र देखील याबाबत प्रत्युत्तर देण्यास समर्थ आहे.

या प्रश्नावर केंद्र सरकार दोन्ही हातात लोण्याचा गोळा ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. एका बाजूला कर्नाटक सरकारमधील जनतेची मते मिळवायची आणि दुसरीकडे महाराष्ट्रातील जनतेला देखील बेळगाव तुम्हाला देण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत असे सांगून काहीतरी आश्वासने द्यायची, केंद्राची ही राजनीती सुरू आहे.

एक कोटी रूपयांचा गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ जप्त – अन्न व औषध प्रशासन विभागाची मोठी कारवाई

0

मुंबई: अन्न व औषध प्रशासनाने भिवंडीत सुमारे 1 कोटी 8 लाख 97 हजार 520 रूपयांचा गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला आहे.

अन्न व औषध प्रशासनाच्या ठाणे कार्यालयास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे 22 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5.45 च्या सुमारास आंबाडी -भिवंडी रोडवर नारायण फार्मच्या बाजूला, मडक्याचा पाडा, कवाड, तालुका भिवंडी येथे टाटा आयशर (MH०४-HD-३०२८) टेम्पोची पाहणी केली. टेम्पोमध्ये प्रतिबंधित अन्नपदार्थ विमल पानमसाला, शुद्ध प्लस पानमसाला, व्ही -1 तंबाखू, नावी तंबाखू असा सुमारे 1 कोटी 8 लाख 97 हजार 520 रूपयांचा साठा आणि वाहन (किंमत अंदाजे आठ लाख रुपये) ताब्यात घेऊन भिवंडी तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रतिबंधित अन्नपदार्थ मुंबईकडे विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे आढळून आल्याने टेम्पोचा चालक परमेश्वर संपत ढाकरगे, वाहनाचे मालक राजेश राजू शेटीया, राजकुमार सपाटे, शौकत अली पठाण आणि राजेश गुप्ता यांच्याविरूद्ध भारतीय दंड कलम 188, 272, 273, 328 तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा, 2006 चे कलम 59 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्रतिबंधित अन्नपदार्थाची वाहतूक केल्याप्रकरणी वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र, वाहनचालकाचा वाहन परवाना रद्द करण्याबाबत प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार करून त्याचा पाठपुरावा करण्यात येणार आहे.

ही कारवाई अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांच्या आदेशानुसार आणि अन्न व औषध आयुक्त अभिमन्यू काळे यांच्या सूचनेनुसार, सहआयुक्त सुरेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

अन्न व औषध प्रशासनाने 1 एप्रिल ते 21 नोव्हेंबर 2022 अखेरपर्यंत कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यातील 173 आस्थापनांची तपासणी केली असता 142 ठिकाणी प्रतिबंधित अन्नपदार्थांचा एक कोटी 72 लाख 7 हजार 486 रुपयांचा प्रतिबंधित साठा ताब्यात घेण्यात आला. संबंधित कार्यक्षेत्राच्या पोलीस स्टेशनमध्ये सर्व संबंधितांविरुद्ध 58 गुन्हे (एफ आय आर) नोंदवण्यात आलेले आहेत तर 129 आस्थापना सील करून दोन वाहने ताब्यात घेण्यात आलेली आहेत.

तसेच 1 एप्रिल ते 31 मार्च 2021 या कालावधीत कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यातील एकूण 105 आस्थापनांची तपासणी केली असता 99 ठिकाणी 4 कोटी 53 लाख 14 हजार 618 रुपये एवढ्या किमतीचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा ताब्यात घेतला. याप्रकरणी संबंधित कार्यक्षेत्राच्या पोलीस स्टेशनमध्ये 52 गुन्हे नोंदवण्यात आलेले आहेत. तर 86 आस्थापना सील करून 20 वाहने ताब्यात घेण्यात आलेली आहेत. सदर प्रकरणी एकूण 31 खटले न्यायालयात दाखल करण्यात आलेले आहेत.

कोणत्याही कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी जनतेचा सक्रिय सहभाग आवश्यक व गरजेचा असल्याने प्रतिबंधित अन्नपदार्थाचे उत्पादन, साठवणूक, वितरण, वाहतूक किंवा विक्री होत असल्यास त्याबाबत सविस्तर माहिती प्रशासनाच्या 1800-222-365 या टोल फ्री क्रमांकावर नोंदवावी. यासह प्रतिबंधित अन्नपदार्थाचे मानवी शरीरावर होणारे अत्यंत घातक परिणाम/ दुष्परिणाम विचारात घेता या अन्नपदार्थांचे सेवन न करण्याबाबत तसेच अन्नपदार्थाच्या सेवनाच्या व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन ठाण्याचे सह आयुक्त (अन्न) सुरेश देशमुख यांनी नागरिकांना केले आहे.

००००

दिव्यांग सक्षमीकरणात राज्याला सात राष्ट्रीय पुरस्कार

0

मुंबई, दि. 24 : दिव्यांग सक्षमीकरणात महाराष्ट्र राज्याने तब्बल सात पुरस्कार पटकावले आहेत. ‘सुगम्य भारत अभियान’ ची अंमलबजावणी करणारे सर्वश्रेष्ठ राज्य हा पुरस्कार दिव्यांग कल्याण आयुक्तालय, पुणे यांना घोषित झाला आहे. सन 2021 व 2022 या दोन वर्षांचे हे पुरस्कार असून केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय अंतर्गत दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाच्या वतीने ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागविले होते.

सन 2021 मध्ये श्री. अशोक तुकाराम भोईर, ठाणे (सर्वश्रेष्ठ दिव्यांग व्यक्ती), श्रीमती विमल पोपट गव्हाणे, पुणे (श्रेष्ठ दिव्यांग व्यक्ती), डॉ. शुभम रामनारायण धूत, पुणे (श्रेष्ठ दिव्यांग व्यक्ती), जिल्हा परिषद, अकोला (दिव्यांग अधिकार कायदा/ वैश्विक ओळखपत्र प्रणाली तथा दिव्यांग व्यक्तींसाठीच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणारा जिल्हा) तसेच सन 2022 मध्ये श्री. जयसिंग कृष्णाराव चव्हाण, नागपूर (सर्वश्रेष्ठ दिव्यांग व्यक्ती) महात्मा गांधी सेवा संघ, औरंगाबाद (दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत सर्वश्रेष्ठ संस्था), दिव्यांग कल्याण आयुक्तालय, पुणे (सुगम्य भारत अभियानाची अंमलबजावणी करणारे सर्वश्रेष्ठ राज्य) यांना हे राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले आहेत.

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मूर्मू यांच्या हस्ते दि. 03 डिसेंबर,2022 रोजी नवी दिल्ली येथे या पुरस्कारांचे वितरण होणार आहे, अशी माहिती दिव्यांग आयुक्तालय पुणे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सर्व मर्यादा सोडल्या,त्यांच्या वक्तव्याने समाजात वारंवार गैरसमज-शरद पवार

मुंबई-राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सर्व मर्यादा सोडल्याचे दिसत आहे. महापुरुषांबद्दल वारंवार वादग्रस्त वक्तव्य करून समाजात गैरसमज निर्माण करणे, हेच त्यांचे मिशन आहे की काय, अशी शंका येते, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली.

आज पत्रकार परिषदेत शरद पवारांनी अनेक विषयांवर आपली भूमिका स्पष्ट केली. शरद पवार म्हणाले, राज्यपाल कोश्यारींचे एक वैशिष्ट्य मी काही वर्षांपासून पाहत आहे. सातत्याने वादग्रस्त, चुकीचे विधान करण्याचा त्यांचा लौकीक आहे. आपल्या विधानातून समाजात गैरसमज कसे निर्माण होतील, याची खबरदारी ते घेतात की काय, अशी शंका येते.

शरद पवार म्हणाले, राज्यपाल कोश्यारींनी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एकदा नव्हे तर दोनदा वादग्रस्त वक्तव्य केले. राज्यपाल हे एक जबाबदारीचे पद आहे, याचे यत्किंचितही स्मरण नसलेली व्यक्ती, केंद्राने महाराष्ट्रात पाठवली आहे. राज्यपाल ही एक व्यक्ती नव्हे तर एक संस्था असते. त्यामुळे या पदाची प्रतिष्ठा ठेवायची म्हणून राज्यपालांवर टीका केली नाही. मात्र, आता शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य करून त्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत.शरद पवार म्हणाले, कोश्यारींसारख्या व्यक्तींवर राज्यपाल पदाची जबाबदारी असणे योग्य नाही. त्यांच्या वादग्रस्त वक्त्वयाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले आहेत. त्यानंतर त्यांना दिल्लीत बोलावण्यात आले आहे. हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे. राष्ट्रपती, पंतप्रधानांनी त्यांना पदावरून हटवण्याचा निर्णय घ्यावा.

…तर सीमावादावर चर्चा शक्य

दरम्यान, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सांगली व सोलापुरातील काही गावांवर दावा केला आहे. त्यावर शरद पवार म्हणाले की, आम्हीदेखील बेळगाव, कारवार, निपाणी या गावांवर दावा केला आहे. कर्नाटक सरकारने आधी या गावांवरील आपला दावा सोडावा. त्यानंतर त्यांच्याशी चर्चा करण्यास हरकत नाही. मात्र, तुम्ही बेळगाव, कारवार, निपाणी या गावांवरील दावाही सोडणार नसाल आणि वर इतर गावांविषयी दावा करत असाल तर ते महाराष्ट्राला मान्य होण्यासारखे नाही.