Home Blog Page 1504

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांना दिल्ली हायकोर्टाकडून जामीन मंजूर

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांना दिल्ली उच्च न्यायालयाने नॅशनल स्टॉक एक्सचेंज कर्मचाऱ्यांच्या कथित बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणी जामीन मंजूर केला आहे. हा पांडे यांच्यासाठी मोठा दिलासा मानला जातोय. ईडीने त्यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटक केली होती. मुंबई शेअर मार्केटमध्ये कर्मचाऱ्यांचे फोन टॅप केल्याचाआरोप यांच्या वरती करण्यात आलेला होता.

संजय पांडे यांना ईडीने 19 जुलै रोजी अटक केली होती आणि त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडीत रवाना करण्यात आले होते. ऑगस्टमध्ये ट्रायल कोर्टाने या प्रकरणात पांडेचा जामीन फेटाळला होता आणि सांगितले होते की, उपलब्ध सामग्रीवरून असे दिसून आले आहे की, ते NSE मधील कॉल रेकॉर्डिंग आणि मॉनिटरिंगच्या अंमलबजावणीमध्ये सहभागी होते, आणि त्यांचा थेट कार्यालयीन कर्मचाऱ्यांशी संवाद होत होता.

धर्मवीर संभाजी महाराज प्राथमिक शाळेने रीड टू मी या उपक्रमात जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावला

पुणे -महानगरपालिकेची धर्मवीर संभाजी महाराज प्राथमिक शाळेने रीड टू मी या उपक्रमात जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे.

या प्रशालेत इंग्रजी अध्ययन अध्यापनात ‘ रीड टू मी ‘ सॉफ्टवेअर व अँड्रॉइड ॲपच्या प्रभावी वापर केल्याने शाळेचा पुणे जिल्ह्यात द्वितीय क्रमांक आला आहे. महाराष्ट्र शासन व इंग्लिश हेल्प संस्थेच्या वतीने शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या जगताप यांचा स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला तसेच शाळेतील शिक्षकांना प्रमाणपत्र व बक्षीस देऊन गौरविण्यात आले या शाळेतील शिक्षिका सावंत यांनी इंग्रजी अध्यापनात रेड तुम्ही चा अधिकधिक वापर केल्याने विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाची आवड निर्माण झालीआहे.पुणे जिल्ह्यात त्यांचा द्वितीय क्रमांक आला आहे. आणि त्यांचे प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या अधिकाऱखाते व इंग्रजी विभागाच्या प्रमुख सुवर्ण तोरणे , पर्यवेक्षक शरद मेमाणे , रीड टू मी चे समन्वयक संदीप मंडलिक उपस्थित होते. यांच्या हस्ते मुख्याध्यापक व शिक्षकांचा गौरव करण्यात आला विद्यार्थी व शिक्षकांच्या शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. राज्यातील एकूण 90 हजार शाळांमध्ये या ॲपच्या वापर सुरू आहे विद्यार्थी व शिक्षकांना हे ॲप अतिशय उपयुक्त आहे इंग्रजी भाषा अवगत करणे मुलांना सोपे वाटत आहे.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण पुणे संस्थेच्या प्राचार्य डॉ शोभा खंदारे , डॉ शिरसागर , पुणे मनपा प्राथमिक विभागाच्या प्रशासकीय डॉ मीनाक्षी राऊत , सहाय्यक प्रशासकीय अधिकारी डॉक्टर मनोरमा आवरे , पर्यवेक्षक शरद मेमाने यांच्या मार्गदर्शनाखाली या रेड टू मी ॲप वापर प्रभावी अंमलबजावणी करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक विद्या जगताप यांनी केले. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या आधीन्याख्याता व इंग्रजी विभागाच्या प्रमुख सुवर्णा तोरणे यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले इंग्रजी हेल्पर संस्थेच्या जिल्हा सहमन्वयक संदीप मंडलिकयांनी चा वापर करण्याबाबत विद्यार्थ्यांना आवाहन केले.

वारज्यात दत्तजयंतीचा मोठा सोहळा संपन्न

पुणे-चिदानंद प्रतिष्ठान वारजे ,माजी नगरसेविका वृषाली चौधरी आयोजित भव्य दत्त जयंती सोहळा 2022 मोठ्या उत्साहात पार पडला.या किर्तन सोहळ्यात हभप ज्ञानेश्वर महाराज पाटील यांचे किर्तन , प्रा. नितीन बानगुडे पाटील यांचे छत्रपती शिवाजी महाराज विषयावर व्याख्यान, हभप निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे कीर्तन, तसेच दत्तजन्माचे कीर्तन हभप बाळकृष्ण दादा वसंतगडकर यांचे झाले.


चिदानंद प्रतिष्ठानचा पुणे शहरात सर्वात भव्य दिव्य सोहळा अशी ओळख असून, प्रतिष्ठानचे हे 29 वे वर्षी असून यावर्षी प्रतिष्ठानच्या माध्यमातून मंदिराचा नव्याने जिर्णोद्धार करण्यात आलेला आहे.काळ्या दगडामध्ये मंदिराची नव्याने स्थापना करण्यात आली आहे.श्री दत्तजयंती निमित्ताने सकाळी श्री दत्त याग, सायंकाळी 6 वा दत्त जन्माचा पाळण्याचा कार्यक्रम झाला, त्यानंतर 7 ते 9 किर्तन झाले. नऊ ते बारा यावेळी सुमारे 10,000 भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला . या कीर्तन सोहळ्यासाठी 4 दिवसांत सुमारे 18000 ते 20000 नागरिकांचा महापूर भक्तीरसात न्हाऊन गेला होता.
आपली संस्कृती, धर्म , वारकरी परंपरा टिकली पाहिजे, समाजामध्ये साधू संतांचे विचार रुजले पाहिजेत, नवी पिढी आधुनिकतेकडे जात असतानाच धर्म, संस्कृती, साधुसंत त्यांचे विचार हे ज्ञात असले पाहिजे. समाजामध्ये वाढत चाललेली व्यसनीता आपलेपणाचा अभाव हा दूर झाला पाहिजे. या हेतूने दरवर्षी चिदानंद प्रतिष्ठान समाज प्रबोधन जागृतीसाठी कीर्तन , प्रवचन, व्याख्यानाचे आयोजन करत असते.


या किर्तन सोहळ्यासाठी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार भीमराव तापकीर, दौंडचे आमदार राहुल कुल, सुशील मेंगडे , दिलीप बराटे , सचिन दोडके, संदीप जर्हाड , उज्वल केसकर, सचिन मोरे, बाबा धुमाळ, विकास दांगट, अमोल नलावडे, मदन शेलार , प्रदिप कंद, तुषार पाटील, बाळासाहेब मोकाशी, माणिक मोकाशी, बापू मेंगडे , विठ्ठल बराटे,पोपट बराटे, स्वानंद महाराज वनवे, हभप चंद्रकांत महाराज वांजळे, मंगला मंत्री, दिपाली धुमाळ, अल्पना वरपे ,राणी भोसले, रूपाली धाडवे ,राजश्री नवले, माधुरी सहस्त्रबुद्धे मंजुश्री खर्डेकर, हर्षाली माथवड , वासंती जाधव, छाया मारणे, सायली वांजळे, स्वाती मोहोळ आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन नगरसेविका सौ. वृषाली दत्तात्रय चौधरी , चंद्रकांत चौधरी यांनी केले होते . सूत्रसंचालन बाळकृष्ण नेहरकर, चंद्रकांत पंडित यांनी केले.

अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या क्रीडा स्पर्धांमध्ये पुणे विभागाला सर्वसाधारण विजेतेपद

पुणे: अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या राज्यस्तरावरील क्रीडा स्पर्धेमध्ये पुणे विभागाने १३ सुवर्णपदकांसह एकूण २६ पदके मिळवून सर्वसाधारण विजेतेपद पटकावले.

नियोजन विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा यांच्या हस्ते अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्यावतीने शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे-बालेवाडी येथे ३ व ४ डिसेंबर रोजी आयोजित स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे विभागाचे अपर आयुक्त महसूल डॉ. अनिल रामोड, अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचे संचालक डॉ. विजय आहेर, नियोजन विभागाचे उपायुक्त संजय कोलगणे आदी उपस्थित होते.

मुंबई, नागपूर, पुणे, कोकण, औरंगाबाद, अमरावती, नाशिक विभागातील २७५ पुरूष खेळाडू आणि १४७ महिला अशा एकूण ४२२ खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेतला. स्पर्धेत विविध क्रीडा व सांस्कृतिक प्रकारात ३९ सुवर्ण, ३९ रौप्य आणि २३ कास्य पदके वितरीत करण्यात आली.

पुणे विभागाने १३ सुवर्ण, ८ रौप्य आणि ५ कास्य पदकासह एकूण २६ पदके मिळवून सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. कोकण विभागाने १० सुवर्ण, १३ रौप्य आणि 3 कास्य पदकासह एकूण २६ पदके मिळवून दुसरे स्थान तर नागपूर विभागाने ५ सुवर्ण, ४ रौप्य आणि २ कास्य पदकासह एकूण ११ पदके मिळवून सर्वसाधारण तिसरे स्थान मिळवले.

स्पर्धेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या. यावेळी भिमराव आसवले यांनी खेळाडूंना शपथ दिली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करण्यात आली.

सकारात्मक कामगिरीसाठी चांगले आरोग्य आवश्यक-राजगोपाल देवरा
उद्घानप्रसंगी बोलतांना प्रधान सचिव श्री. देवरा म्हणाले, अर्थ व सांख्यिकी विभागाच्यावतीने राज्यातील माहिती एकत्रित करुन वस्तुनिष्ठ माहिती नागरिकांना उपलब्ध व्हावी यासाठी विश्लेषणात्मक स्वरुपात मांडणी करण्यात येते. स्पर्धेच्या युगात आपले काम गुणवत्तापूर्वक करण्यसाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आरोग्य चांगले राखण्यासाठी मदत होते. आरोग्य चांगले असले तर कार्यालयीन कामकाजात सकारात्मक परिणाम दिसू लागतात. त्यामुळे सर्वांनी आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची तपासणी करण्याकरीता शासनाने ५ हजार रुपये देण्याची योजना आणलेली आहे. त्यांचा लाभ सर्व पात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घ्यावा. आगामी स्पर्धेत विभागातील शंभर टक्के अधिकारी व कर्मचारी सहभागी होण्यासाठी प्रयत्न करावे, असेही ते म्हणाले. अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील अधिकारी व कर्मचाऱ्याला येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करण्यात येतील असेही श्री.देवरा यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, अर्थ व सांख्यिकी संचालनालयामार्फत अतिशय क्लिष्ट स्परुपाचे आकडेमोडीची कामे करण्यात येतात. त्यामुळे अशा कामाचा ताण कमी करण्यासाठी क्रीडा स्पर्धा उपयुक्त ठरतात. स्पर्धेमुळे खेळाडूवृत्ती, सांघिक भावना विकसित होण्यास मदत होऊन चांगल्या विचाराची, उपक्रमाची देवाणघेवाण होते. कर्मचाऱ्यांना आपल्या कार्यालयीन तसेच वैयक्तिक जीवनात खेळाचा निश्चित उपयोग होईल, असे त्यांनी सांगितले.

संचालक श्री. आहेर म्हणाले, अर्थ व सांख्यिकी संचालनालयामार्फत राज्याच्या स्थापनेपासून आर्थिक पाहणीचे पुस्तक दरवर्षी होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात माडंण्यात येते. त्यामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती राज्यासह देशाला कळते. महाराष्ट्राच्या प्रत्येक विकासाच्या अंगामध्ये संचालनालयाचा सहभाग आहे. स्पर्धेत कार्यरत कर्मचाऱ्यापैंकी बहुतांशी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

ब्राह्मो समाजाच्या श्रद्धेचा पाया वैदिक एकेश्वरवादाशी जोडलेला- वेद अभ्यासक बंदा रविशंकर यांचे मत

पुणे प्रार्थना समाज आणि भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या वतीने व्याख्यान
पुणे : ब्राह्मसमाजाच्या श्रद्धेचा पाया वैदिक एकेश्वरवादाशी जोडलेला आहे. ब्राम्हो समाज एकमेव अशा ब्रह्मस्वरूप परमेश्वरावर म्हणजेच देवावर विश्वास ठेवतो. वेद हे बहुदेववादी आहेत असा समज आहे. परंतु मूळ वेदांमधे एकाच ब्रह्मस्वरूप देवाचे वर्णन अनेक नावांनी केलेले आहे. त्या नावांना अर्थ आहे व तो निरुक्तात स्पष्ट केलेला आहे.ही नावे एकमेव अशा परमेश्वराचे गुण दर्शविणारी आहेत.उदाहरण म्हणून बंदा रविशंकर यांनी “शंकर “-शं म्हणजे ज्ञान व शंकर म्हणजे ज्ञान देणारा-असे स्पष्ट केले.गुणदर्शक नावांना पुढील काळात व्यक्तीस्वरूप दिले गेले व
त्याभोवती अनेक कथा निर्माण करण्यात आल्या,असे मत वेद अभ्यासक बंदा रविशंकर यांनी व्यक्त केले. 

पुणे प्रार्थना समाजाच्या स्थापनेस १५२ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त पुणे प्रार्थना समाज आणि भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या वतीने वेदांचा  प्रसार करणारे हैद्राबादचे बंदा रविशंकर यांचे “वेदातील एकेश्वरवाद :ब्राह्मो समाजाचा पाया” या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या नवलमल फिरोदिया सभागृहात हे व्याख्यान झाले.

बंदा रविशंकर म्हणाले, वेदांममधूनच तुमचा जीवनाचा उद्देश तुम्हाला जाणून घ्यायचा आहे, तुम्हाला कोणी निर्माण केले आहे, तुमच्या सभोवतालचा निसर्ग आणि निर्माणकर्त्याला जाणून घेण्यासाठी वेदांचा अभ्यास करा. विद्या म्हणजे शाळेत जाणे आणि शालेय शिक्षण घेणे, परंतु वैदिक भाषेत विद्या म्हणजे आध्यात्मिक ज्ञान, ईश्वराच्या संकल्पनेचे ज्ञान, परमात्म्याशी असलेल्या आपल्या नातेसंबंधाचे ज्ञान होय,तर जीवनाशी संबंधित इतर सर्व विषयांचे,पदार्थांचे ज्ञान म्हणजे अविद्या होय.

आदि शंकराचार्यांनी ब्रह्मसूत्र लिहिले असा एक गैरसमज आहे. वेद मंत्र शिकण्याची परंपरा म्हणून ब्रह्मसूत्रे आहेत. आदि शंकराचार्यांनी ब्रह्मसूत्रावर टिपण्णी लिहिली. त्यांनी ब्रह्मसूत्रावरील  समालोचन सुंदर आणि शास्त्रीय पद्धतीने लिहिले आहे, असेही त्यांनी सांगितले.

9 व्या जागतिक आयुर्वेद परिषद आणि आरोग्य प्रदर्शन 2022 चे गोव्यात उद्‌घाटन

पणजी, 8 डिसेंबर 2022

केंद्रीय पर्यटन आणि नौवहन , बंदरे आणि जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा यांच्या उपस्थितीत आज 9व्या जागतिक आयुर्वेद परिषदेचे गोव्यातील पणजी  येथे उद्घाटन करण्यात आले.  जागतिक स्तरावर आयुष औषध प्रणालीची परिणामकारकता आणि सामर्थ्य यांचे दर्शन घडवणे हा 9व्या जागतिक आयुर्वेद परिषदेचा उद्देश आहे.

यावेळी केंद्रीय पर्यटन आणि  नौवहन , बंदरे आणि जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक म्हणाले  की,2014 मध्ये भारत सरकारने स्वतंत्र आयुष मंत्रालय स्थापन केल्यामुळे आयुर्वेदाचा जागतिक स्तरावर विस्तार  झाला आहे.   आज आयुष ज्या वेगाने प्रगती करत आहे ते पाहता, या विकासाचे बीज त्या निर्णयात दडलेले आहे हे ध्यानात  घेतले पाहिजे.   “आपल्या पूर्वजांनी आयुर्वेदाची जगाला ओळख करून दिली.  ‘वसुधैव कुटुंबकम’ ही पहिल्यापासून भारताची भावना आहे. असे ते म्हणाले.  2015 मध्ये , संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला.  जगभरातील नागरिकांना आता त्याचा फायदा होत आहे. संपूर्ण जगभरात अशा प्रकारच्या उपचार आणि निरामय आरोग्याच्या पारंपारिक प्रणालींचा प्रचार  आयुर्वेद परिषदेचे उपक्रम   करतात.”असे नाईक म्हणाले.

गोव्यात जागतिक आयुर्वेद परिषद आणि आरोग्य विषयक प्रदर्शनाचे  यंदा आयोजन करण्याची संधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केंद्र सरकारचे आभार मानले. डॉ.सावंत म्हणाले की, आयुष उपचारासाठी आयुष व्हिसा सुरु  करणे हा ऐतिहासिक निर्णय आहे. गोव्यातील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेचे आगामी उपग्रह केंद्र राज्यातील आयुर्वेदिक पर्यटनाला चालना देईल, असे ते म्हणाले. गोव्यातील विद्यार्थ्यांना या संस्थेतील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशात 50 टक्के आरक्षण मिळेल, अशी माहिती त्यांनी दिली.

आयुष मंत्रालयाचे सचिव  वैद्य राजेश कोटेचा यांनी नमूद केले की गेल्या आठ वर्षांमध्ये आयुष क्षेत्राने प्रचंड वाढ नोंदवली आहे. ते म्हणाले की 2022 च्या अखेरपर्यंत आयुष क्षेत्र 10 अब्ज डॉलर्सवर पोहोचेल. ते पुढे म्हणाले की कोविड-19 महामारीच्या व्यवस्थापनामध्ये आयुषचे फार मोठे योगदान राहिले आहे. त्यांनी नमूद केले की आयुष मंत्रालयाने प्रभाव मूल्यांकन अभ्यास केला आणि त्यामध्ये असे दिसून आले की 89.9% भारतीय लोकसंख्या कोविड-19 चा प्रतिबंध आणि उपचारांसाठी काही प्रमाणात आयुषवर अवलंबून राहिले.

यावेळी ‘आयुष्मान’ कॉमिक बुक मालिकेतील तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशनही करण्यात आले.भारतीय पारंपरिक वैद्यकीय प्रणालीमधील प्रगत अभ्यासाला सहाय्य करण्यासाठी, अखिल भारतीय आयुर्वेद संस्था (एआयआयए) आणि जर्मनीच्या रोझेंबर्ग  युरोपियन अकादमी ऑफ आयुर्वेद यांच्यात एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. 

गोव्यामध्ये 8 ते 11 डिसेंबर दरम्यान 9व्या जागतिक आयुर्वेद परिषद  आणि आरोग्य प्रदर्शन  2022 चे आयोजन करण्यात आले आहे. आयुर्वेद क्षेत्राला बळकटी देण्यासाठी, त्याच्या भविष्याचा वेध घेण्यासाठी आणि आयुर्वेद व्यापाराला चालना देण्यासाठी व्यावसायिक आणि ग्राहक यांच्यात संवाद, संपर्क आणि बौद्धिक आदानप्रदान  घडवून आणण्यासाठी उद्योजक, चिकित्सक, पारंपरिक उपचार करणारे, शिक्षणतज्ज्ञ, विद्यार्थी, औषध उत्पादक, औषधी वनस्पतींचे उत्पादक आणि विपणन धोरणकार यांच्यासह सर्व भागधारकांना जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या मागचा उद्देश आहे.  

देशातील आयुष (आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी) क्षेत्राचा बाजारातील वाटा 2014 मधील 3 अब्ज अमेरिकी डॉलर्स वरून आता 18 अब्ज अमेरिकी डॉलर्सपेक्षा जास्त झाला असून, यात सहा पट इतकी अभूतपूर्व वृद्धी झाली आहे. 2014 ते 2020 या काळात आयुष उद्योगाची वर्षागणिक वृद्धी 17 टक्के इतकी होती तर 2021 ते 2026 या काळात आयुषचा व्यापार15 टक्के सीएजीआरने वाढेल असा अंदाज आहे.    

9व्या जागतिक आयुर्वेद परिषद  आणि आरोग्य प्रदर्शनामध्ये  53 देशांतील 400 परदेशी प्रतिनिधींसह   4500 हून अधिक व्यक्ती  सहभागी होणार  आहेत. आरोग्य प्रदर्शनात   215 हून अधिक कंपन्या, आघाडीचे आयुर्वेद ब्रँड्स, औषध उत्पादक आणि आयुर्वेदाशी संबंधित शैक्षणिक आणि संशोधन आणि विकास संस्था सहभागी होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 डिसेंबर रोजी समारोप जागतिक आयुर्वेद परिषदेच्या समारोप  समारंभाला उपस्थित राहणार आहेत.

कल्याणकारी मंडळासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर रिक्षा चालक आंदोलन करणार : बाबा कांबळे 

  • १९ डिसेंबर पुणे विधान भवन येथे पुणे पिंपरी चिंचवड शहरात रिक्षा चालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन  

पुणे(प्रतिनिधी)-बेकायदेशीर टू व्हीलर टॅक्सी परवानगी नसताना महाराष्ट्र सह देशभरामध्ये बिंदासपणे सुरू आहे यामध्ये या भांडवलदार कंपन्यांच्या वतीने हे बेकायदेशीर सेवा दिली जात आहे, यामुळे रिक्षा टॅक्सी व टुरिस्ट सेवा देणाऱ्या व्यवसायावरती मोठा परिणाम झाला आहे, रिक्षावर टॅक्सी चालकांचे तर जगणं मुश्किल झाले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे, या प्रश्नांसाठी महाराष्ट्र रिक्षा पंचायतने पुणे येथे 28 नोव्हेंबर रोजी बंद पुकारला, परंतु काही बोगस संघटनाने या बंदला हिंसक वळण लावण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे आंदोलन फसले, आता या बोगस संघटना 12 तारखेला आंदोलन करण्याचं बोलत आहेत परंतु रिक्षा चालकांचा त्यांनी विश्वास गमावला असल्यामुळे प्रमाणिकपणे आणि सचोटीने व्यवसाय करणारे रिक्षा चालक यांना प्रतिसाद देणार नाही, जन्मदिवसाच्या त्यांना मोबाईल असावी व टू व्हीलर रॅपिडो ओला उबर वरती कारवाई करण्यात यावी यासाठी आज, ऑटो रिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समिती सलग्न रिक्षा संघटना आणि पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, यांची भेट घेऊन चर्चा केली,

शिष्टमंडळात, महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे, पुणे रिक्षा फेडरेशनचे अध्यक्ष अनंत तांबे, भाजप वाहतूक आघाडीचे अध्यक्ष अंकुश नवले, जय महाराष्ट्र रिक्षा संघटनेचे अध्यक्ष गुलाब सय्यद, राष्ट्रवादी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष विजय रवळे, सावकाश रिक्षा संघटना अध्यक्ष प्रदीप भालेराव, छावा रिक्षा संघटनेचे अध्यक्ष पिंटू पांचाळ, वाहन चालक मालक सामाजिक संघ अध्यक्ष अफजल पठाण, समर्थ सेवा रिक्षा प्रतिष्ठानचे रुपेश भोसले, महाराष्ट्र वाहतूक पंचायत चे प्रकाश यशवंते, कृती समिती पुणे जिल्हा समन्वयक आप्पा हिरेमठ,महाराष्ट्र रिक्षा पंचायत पुणे शहर नेते, विलास केमसे पाटील, मोहम्मद शेख, मुराद, काजी, सह एकूण 17 संघटनेचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते,

बोगस रिक्षा संघटना आणि बोगस रिक्षाचालक गुंडगिरी करून रिक्षाचालकांची प्रतिमा खराब करत आहे यावर पोलिसांनी कारवाई करावी

काही बोगस रिक्षा संघटनांनी व त्यांच्या बोगस रिक्षा चालकांनी, प्रवाशांना लुटने, भाडे नाकारणारे, लायसन्स बॅच नासताना बेकायदेशीरपणे रिक्षा व्यवसाय करने, प्रायव्हेट रिक्षा मधून व्यवसाय करणे, अशा बोगस रिक्षा चालकांची गुंडांची फौज तयार करून, समाजामध्ये अशांतता पसरण्याचा प्रयत्न करत आहेत अशा बोगस व्यक्तींच्या विरोधात विरोधात आवाज उठवल्यामुळे बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत, प्रामाणिकपणे व सचोटीने व्यवसाय करणाऱ्या रिक्षा चालकांना देखील हे बदनाम करत आहेत, असे जे बोगस संघटना व बोगस रिक्षा चालक आहेत त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे, पोलीस प्रशासनाने अशा संघटना व बोगसिक रिक्षा चालकांवर कारवाई करून खऱ्या व प्रमाण दिवसालाकांना न्याय द्यावा, अशी मागणी आम्ही पुणे पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त यांच्याकडे लेखी स्वरुपात केली आहे, अशी माहिती देखील बाबा कांबळे यांनी दिली आहे,

वीस वर्षापासून कल्याणकारी मंडळाचे प्रश्न प्रलंबित

रिक्षा चालकांच्या कल्याणासाठी महामंडळ होणे गरजेचे आहे. त्याबाबत देशात, महाराष्ट्रात वारंवार आंदोलन करून मागणी लावून धरली आहे. मात्र केंद्रात व राज्यात असणाऱ्या कोणत्याही सरकारला रिक्षा चालक-मालकांचे देणे घेणे नाही. त्यामुळे अद्याप रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी महामंडळ अस्तित्वात आलेले नाही. हे महामंडळ अस्तित्वात यावे, या प्रमुख मागण्यांसह अन्य मागणीसाठी पुणे विभागीय कार्यालयावर बेमुदत आंदोलन सुरु करणार असल्याची माहिती महाराष्ट्र ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. या वेळी महाराष्ट्रसह देशभर एकाच वेळी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर ,आंदोलन होतील, असेही बाबा कांबळे म्हणाले.    

बाबा कांबळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हणाले की, १९ तारखेला हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. केंद्र सरकारचे संसदेचे अधिवेशन सुरू आहे. या दरम्यान पुणे विभागीय आयुक्त कार्यावर आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच देशभरामध्ये सर्व जिल्हाधिकारी कार्यालय, महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालय, या ठिकाणी एकाच वेळी आंदोलन होणार आहे. या आंदोलनातून केंद्र सरकारचे प्रश्नांकडे लक्ष जाईल असा हेतू आहे.  या आंदोलनाच्या लढ्याला आता देशव्यापी स्वरूप प्राप्त झाले असल्याचे बाबा कांबळे यांनी सांगितले.  काही बोगस रिक्षा संघटना १२ डिसेंबर रोजी बंद पुकारणार आहेत. या बंद मध्ये आमच्या संयुक्त कृती समितीचा, महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचा सहभाग नसणार आहे. ज्या संघटनांचे कायदेशीर  रजिस्ट्रेशन झाले नाही, त्यांनी पहिले रजिस्ट्रेशन करून घ्यावे. रिक्षा चालकांची फसवणूक करू नये, अशी टीका बाबा कांबळे यांनी केली. स्वतःच्या चुका झाकण्याचे प्रयत्न बोगस रिक्षा संघटना सातत्याने करत आहेत. त्यांच्या फसव्या नेतृत्वाला रिक्षा चालकांनी बळी पडू नये, असेही आवाहन बाबा कांबळे यांनी या मार्फत केले. 

रब्बी हंगामातील सुरळीत वीजपुरवठ्यासाठी तीन दिवसांच्या कालावधीत १६६ रोहित्र बदलले

पुणे परिमंडलाची कामगिरी; नादुरुस्त रोहित्रांची माहिती देण्याचे आवाहन

पुणे, दि. ८ डिसेंबर २०२२: शेतीच्या रब्बी हंगामात सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरणची पुणे परिमंडलातील यंत्रणा सज्ज झाली आहे. कृषिपंपांना वीजपुरवठा करणाऱ्या कृषी वाहिन्यांवरील नादुरुस्त तसेच जळालेले रोहित्र तातडीने बदलण्यासोबतच वीजयंत्रणेची तात्काळ दुरुस्ती करण्यासाठी सर्व कार्यालयांना सूचना देण्यात आल्या आहेत. या नियोजनानुसार केवळ तीन दिवसांच्या कालावधीत नादुरुस्त तसेच जळालेले कृषिपंपांचे एकूण १६६ रोहित्र युद्धपातळीवर बदलून देण्यात आले आहेत.

दरम्यान पुणे परिमंडल अंतर्गत ज्या ठिकाणी रोहित्र नादुरुस्त झाले असेल त्यासंबंधीची माहिती ग्राहकांनी संबंधित कार्यालयात किंवा विभागाचे कार्यकारी अभियंता यांना द्यावी असे आवाहन पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी केले आहे. तसेच पुणे परिमंडल अंतर्गत आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी, वेल्हे व हवेली तालुक्यामधील नादुरुस्त रोहित्रांची केवळ ‘एसएमएस’ किंवा ‘व्हॉटस् ॲप’द्वारे माहिती देण्यासाठी दैनंदिन नियंत्रण कक्षाचा ७८७५७६७१२३ हा मोबाईल क्रमांक उपलब्ध आहे.

वीज वितरण यंत्रणेत रोहित्राचे अत्यंत महत्वाचे  स्थान आहे. या यंत्रणेचा रोहित्र हा आत्मा आहे. सध्या शेतीचा रब्बी हंगाम सुरु आहे. त्यामुळे कृषिपंपांना सुरळीत वीजपुरवठा करण्याचे नियोजन महावितरणच्या मुख्यालयाकडून करण्यात आले आहे. त्याची अंमलबजावणी पुणे परिमंडलामध्ये युद्धपातळीवर सुरु आहे. पुणे परिमंडल अंतर्गत असलेल्या आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी, वेल्हे व हवेली तालुक्यामध्ये कृषिपंपांना वीजपुरवठा करणारे ८७ कृषी रोहित्रे २९ नोव्हेंबरपर्यंत नादुरुस्त झाले होते. हे सर्वच रोहित्र केवळ तीन दिवसांत बदलण्यात आले आहेत. तर २९ नोव्हेंबर ते मंगळवारपर्यंत (दि. ६) जळालेले व नादुरुस्त झालेले १६६ रोहित्र बुधवारपर्यंत (दि. ७) केवळ तीन दिवसांच्या कालावधीत बदलण्यात आले आहेत.

पुणे परिमंडल अंतर्गत तीन फेजचा वीजपुरवठा करणारे अकृषक व कृषक असे एकूण ३६ हजार ७८७ रोहित्र आहेत. परंतु, रोहित्र नादुरुस्त किंवा जळण्याचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे. सद्यस्थितीत पुणे परिमंडलात १२८ रोहित्र अतिरिक्त स्वरुपात उपलब्ध असून सर्व कार्यालयांना ऑईलचा मुबलक पुरवठा करण्यात आला आहे. सोबतच नादुरुस्त झालेले रोहित्र तात्काळ दुरुस्तीसाठी पाठविण्यात येत आहेत.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या 82 व्या वाढदिवसानिमित्त पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने तीन दिवसीय शरदोत्सवाचे आयोजन

दिनांक 10 ते 12 डिसेंबर दरम्यान आयोजनः विविध कार्यक्रमांतून उलगडणार शरद पवार यांचे व्यक्तिमत्व
पुणेः- ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 82 व्या वाढदिवसानिमित्त
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बालगंर्धव रंगमंदिर आणि बालगंधर्व कलादालनात शनिवार दिनांक 10 डिसेंबर ते सोमवार दिनांक 12 डिसेंबर 2022 असा तीन दिवसीय शरदोत्सव आयोजीत करण्यात आला असून या महोत्सवाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विविध क्षेत्रात दिलेले योगदान आणि त्यांचे व्यक्तिमत्व परिसंवाद, छायाचित्र प्रदर्शन, शिल्पकला प्रात्यक्षिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून उलगडले जाणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते अंकुश काकडे आणि माजी महापाैर दीपक मानकर यांनी आज आयोजीत पत्रकार परिषदेत दिली .संवाद पुणे चे सुनील महाजन यांची ही मूळ संकल्पना आहे .
शनिवार दिनांक 10 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 11.00 (अकरा) वाजता बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात शरद पवार यांच्या विविध 82 भावमुद्रांच्या चित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी चित्रकार विशाल केदारी उपस्थित राहणार आहेत. याच दिवशी सायंकाळी 5.00 (पाच) वाजता ‘लोकजीवनाशी एकरुप शरद पवार’ या विषयावर ज्येष्ठ संपादक मधुकर भावे यांचे विशेष व्याख्यान होणार आहे. तर सायंकाळी 6.00 (सहा) वाजता ‘मैत्र जीवांचे’ या अनोख्या कार्यक्रमाच्या माध्यमातून माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, प्रसिद्ध उद्योगपती विठ्ठलशेठ मणियार, संभाजी पाटील ( कर्नल ) आणि बारामतीचे जवाहर वाघोळीकर आदी मान्यवर शरद पवार यांच्याबरोबरच्या अतूट मैत्रीचे अनोखे किस्से सांगणार आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलान सचिन ईटकर करणार आहेत.  रविवार दिनांक 11 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 12.00 (बारा) वाजता बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात ‘शेती-मातीशी जोडलेले व्यक्तिमत्त्वः शरद पवार’ या विषयावर पत्रकार सुधीर भोंगळे यांचे व्याख्यान होणार आहे. सायंकाळी 5.30 (साडेपाच) वाजता ‘शरद पवार यांचे राजकारण काल, आज, उद्या’ या विषयावर परिसंवाद होणार असून वात्रटिकाकार रामदास फुटाणे, भाजपा प्रवक्ते माधव भांडारी, ज्येष्ठ काँग्रेस नेते उल्हास पवार, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे, पत्रकार मृणालिनी नानिवडेकर आणि राष्ट्रावादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते अंकुश काकडे या परिसंवादात सहभागी होणार आहेत. 
सोमवार दिनांक 12 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 11.00 (अकरा) वाजता बालगंधर्व रंगमंदिर कलादालनात शरद पवार यांचे शिल्प प्रसिद्ध शिल्पकार सुरेश राऊत साकारणार आहेत. सायंकाळी 5.00 (पाच) वाजता बालगंधर्व रंगमंदिरात ‘शरदाचे चांदणे’ हा मराठी-हिंदी गाण्यांचा कार्यक्रम पार्श्वगायिका मनीषा निश्र्चल सादर करणार आहेत. या संगीतमय कार्यक्रमानंतर प्रसिद्ध सितार वादक उस्मान खाँ, प्रसिद्ध सतारमेकर मजिदभाई, प्रसिद्ध धृपद गायक पंडित उदय भवाळकर आणि प्रसिद्ध ढोलकी वादक पांडुरंग घोटकर  या संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्राप्त विजेत्यांचा सत्कार सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां.ब. मुजुमदार यांच्या अध्यक्षतेखाली आणि उद्योगपती अभय फिरोदिया यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. 
रसिकांनी या तीन दिवसीय शरदोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते अंकुश काकडे आणि माजी महापाैर दीपक मानकर यांनी केले आहे.

संसदेत छत्रपती शिवरायांवर बोलायला उभे राहिलेल्या डॉ . कोल्हेंचा माईकच बंद केला !

संसेदत गळचेपी… अमोल कोल्हे संतापले!

नवी दिल्ली :छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल भाजप नेत्यांकडून सातत्याने वादग्रस्त वक्तव्ये होत असताना यासंदर्भात संसदेने खास कायदा करावा, अशी मागणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे लोकसभेत बोलायला उभे राहिले. पण त्यांच्या ३ वाक्यानंतरच त्यांचा माईक बंद करुन पीठासीन अधिकारी राजेंद्र अग्रवाल यांनी त्यांचा आवाज दाबला. छत्रपती शिवराय देव नाहीत पण देवापेक्षा आम्हाला कमी नाहीत. त्यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्ये करण्याची कुणाची हिम्मत होता कामा नये, असे अमोल कोल्हे सांगत असतानाच पीठासीन अधिकारी राजेंद्र अग्रवाल यांनी “हो गया हो गया…” म्हणत विषय पूर्ण करण्याची सूचना केली. त्यानंतर पुढच्याच सेकंदाला अमोल कोल्हे यांचा माईक बंद करण्यात आला. संसदेत घडलेल्या प्रकारानंतर अमोल कोल्हे यांनी संताप व्यक्त केला.

“मी जो विषय मांडणार होतो, त्या विषयाला शून्य प्रहारामध्ये वेळ देण्यात आला होता. पण वेळ देऊनही मला बोलू दिलं नाही. माझा आवाज दाबला गेला. माझं बोलणं सुरु झाल्यावर अवघ्या दोन ते तीन वाक्यानंतर मला खाली बसण्याची सूचना केली.. हो गया हो गया म्हणत माझा माईक बंद केला.. माझा आवाद दाबला असेल पण शिवभक्तांच्या आवाजाने तुमच्या कानठळ्या बसल्याशिवाय राहणार नाहीत”, असा इशारा देत अमोल कोल्हेंनी संसेदत घडलेल्या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केल

छत्रपती शिवाजी महाराज फक्त महाराष्ट्राचं नाही तर उभ्या हिंदुस्थानाचं दैवत आहेत. अनेक सरसेनापतींनी, राजा-महाराजांनी छत्रपती शिवरायांकडून प्रेरणा घेतली. आम्हा शिवभक्तांसाठी छत्रपती शिवराय देव नाहीयेत. पण देवापेक्षा कमीही नाहीयेत. असं असताना महाराष्ट्रात सातत्याने छत्रपती शिवरायांबद्दल अवमानकारक वक्तव्ये केली जात आहेत, असं आक्रमकपणे आणि पोटतिडकीने अमोल कोल्हे बोलत होते. तेवढ्यात पीठासीन अधिकारी राजेंद्र अग्रवाल यांनी ‘हो गया.. हो गया..’ म्हणत अमोल कोल्हेंना खाली बसण्याची सूचना केली. त्यानंतर अमोल कोल्हेंचा जरासा पारा चढला. “हमें बोलने दिजीए…” म्हणत त्यांनी आपलं म्हणणं अधिक त्वेषाने मांडण्याचा प्रयत्न केला. पण अमोल कोल्हेंचा आक्रमक पवित्रा पाहून त्यांचा माईकच बंद करण्यात आला.

दोन राज्यांच्या वादात केंद्र फक्त बघ्याची भूमिका घेणार?

मुंबईसीमा प्रश्नावरुन केंद्र सरकारने लक्ष्य दिलेले नाही, सु्प्रिया सुळे यांनी हा प्रश्न काढला तेव्हा सभापती यांनी हा दोन राज्यांचा प्रश्न आहे, इथे बोलायचे काही कारण नाही. मात्र दोन राज्याच्या भांडणात जर केंद्र सरकार बोलणार नाही तर कोण लक्ष घालणार, यावेळी कुणी कायदा हातात घेतला तर याची जबाबदारी कुणाची असा सवालही शरद पवारांनी उपस्थित केला आहे.

केवळ बेळगाव पुरता हा प्रश्न होता, मात्र आता राज्यातील अनेक भागातून गुजरात, तामिळनाडूत जाण्याची मागणी होत आहे. हे असे कधीच झाले नाही, सगळ्या भाषेचे लोक महाराष्ट्रात गुन्या गोविंदाने राहतात मात्र कर्नाटकचे मुख्यमंत्री जतमधील 40 गावांवर हक्क सांगतात याचा अर्थ काय. सांगली जिल्ह्याचा नाव सांगतात याचेकाय संबंध असा सवाल पवारांनी उपस्थित केला आहे. तर दुसरीकडे नाशिक जिल्ह्यातील लोकांनी गुजरातमध्ये जाण्याचा निर्णय घेतला यावर बोलताना पवार म्हणाले की, सुदैवाने त्यांनी आपले धोरण बदलले. मात्र हा ठराव आणणारे कोण होते राष्ट्रवादी काँग्रसचे तालुकाध्यक्ष त्यांनी पक्षाचा आमदार असताना सहकारी अशी भूमिका घेत असतील काय संदेश जाईल, राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या ऐक्यासाठी प्रयत्नशील राहायला हवे असेही पवारांनी सांगताना पदाधिकाऱ्यांचेही कान टोचले असून ‘चुकीच्या भूमिका घेऊ नका असे सांगितले आहे.

सीमा प्रश्न हा खूप जुना प्रश्न आहे, अनेक निवडणुकीत हा निर्णय लोकांचा आहे हे आपण देशासमोर सिद्ध केले आहे. तरीही काही होत नाही म्हटले की लोक नाउमेद होतात असेच काहीसे सीमा भागातील लोकांसोबत झाले आहे, असेही शरद पवारांनी म्हटले आहे. ज्यांच्या हातात सत्ता आहे, ते इथले मराठी बाहुल्य कमी कसे होईल यासाठी योजना करत प्रयत्न केले, असा आरोपही पवारांनी केला आहे. अनेक सरकारी ऑफीस तिथे आणले, त्यांचे लोक तिथे वसवण्याचा प्रयत्न करण्यात आला, कानडी आणि मराठी असा वाद आपला नाहीच. कानडीही ही सुद्धा त्यांची प्रादेशिक भाषा आहे.

तिथल्या मराठी भाषिकांना न्याय मिळाला पाहिजे, ते लोकशाही मार्गाने लोकांनी सिद्ध केले आहे. पण दुर्देवाने तिथल्या सरकारने तो प्रश्न वेगळ्या प्रकारे हाताळला. तिथे विधानसभेचे अधिवेशन घेता येईल कर्नाटकचे होणारे अधिवेशन बेळगावमध्ये होणार आहे. महाराष्ट्राचा किंवा मराठी भाषिकांचा काही संबंध नाही हे दाखविण्याचा प्रयत्न कर्नाटक कडून होणार आहे. मराठी न शिकता कानडी शिकले पाहिजे असा तिथल्या सरकारचा आग्रह आहे. मातृभाषा ही प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे, आणि तो देशाने आणि महाराष्ट्राने मान्य केला आहे. हे सूत्र कर्नाटकाने मान्य करावे ही मागणी आहे, आणि साधे हे देखील होत नाही, तर सत्तेचा गैरवापरकरुन त्या लोकांना किंवा विचारांना मोडून काढण्याचे काम कुणी केले.

केंद्र सरकारकडून एकाच राज्याच्या हिताचे निर्णय घेतनले गेले, अनेक प्रकल्प त्या राज्यात कसे येतील यासाठी सरकारने प्रयत्न केले, त्यांचा निवडणुकीत प्रभाव दिसतो आहे अशी टीका शरद पवार यांनी केला आहे. गुजरातचा निकाल लागला याचा अर्थ देशातील जनतेचा प्रवाह एका बाजूने दाखवितो असे नाही, कारण दिल्लीमध्ये मनपाची सत्ता भाजपच्या हातून गेली आहे. तर हिमाचल प्रदेशमध्ये देखील काँग्रेसचा विजय झाला दिल्ली, हिमाचलमध्ये त्यांची सत्ता गेली, म्हणजे आता बदल होत आहे. महाराष्ट्रामध्ये जी पोकळी निर्माण झाली आहे, तरी भरुण काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी काम करायला हवे.

बाणेर-बालेवाडी-सुस-म्हाळुंगेला सुरळीतपणे पाणीपुरवठ्याचे प्रशासकांनी दिले आश्वासन

बाणेर-बालेवाडी-सुस-म्हाळुंगे गावच्या पाणी प्रश्नावर महापालिका आयुक्तांनी केली बालेवाडी येथे प्रत्यक्ष पाहणी व नागरीकांशी चर्चा..!
पुणे- आज महापालिका आयुक्तांनी बाणेर-बालेवाडी-सुस-म्हाळुंगे येथील कृत्रिम पाणी टंचाईवर तोडगा काढण्यासाठी व समस्या जाणुन घेण्यासाठी बालेवाडी येथे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी आंदोलन केल्याने त्यांच्या मागणी नुसार प्रत्यक्ष पाहणी करुन नागरीकांशी व महापालिका पाणी पुरवठा अधिकार्यांशी चर्चा केली.यावेळी महापालिका आयुक्तांनी अत्यंत गंभिर असलेल्या पाणी प्रश्नावर चर्चा केली. यावेळी नागरीकांनी चार चार दिवस मनपा कडुन कोणत्याच प्रकारचा पाणी पुरवठा बाणेर-बालेवाडी भागाला होत नसल्याने धरणात मुबलक प्रमाणात पाणी साठा असुन देखिल येथील नागरीकांना पाण्यापासुन वंचित रहावे लागत आहे असे आयुक्तांच्या निदर्शनास आणुन दिले. यावर तातडीने उपाय योजना करुन वारजे येथुन पाणी पुरवठा वाढविण्याचे तसेच बाणेर व बालेवाडी येथे तातडीने वाढीव पंप बसविण्याचे आदेश पाणी पुरवठा विभागाच्या अधिकार्यांना दिले. तसेच बालेवाडी येथील अंडर ग्राऊंड टाकीमध्ये पंप बसवुन बालेवाडी भागाला सुरळीत पाणी पुरवठा करण्याचे आदेश दिले.

तसेच २४x७ समान पाणी पुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात असुन येत्या १५ फेब्रुवारी २०२३ पर्यंत उर्वरीत पाईप लाईनचे काम पुर्ण करणे, नविन टाक्यांना पंप बसवुन टाक्या कार्यरत कराव्या व त्यातुन या भागाला पाणी पुरवठा करण्याचे आदेश देखिल आयुक्तांनी अधिकार्यांना दिले.
यावेळी “बाणेर-बालेवाडी-सुस-म्हाळुंगे भागाला त्यांच्या हक्काचा मुबलक पाणी पुरवठा करुन येथील नागरीकांना व माता-भगिनींना लवकरात लवकर या कृत्रिम टंचाईतुन मुक्तता करावी” अशी मागणी मा.नगरसेवक अमोल बालवडकर यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली. तसेच या भागातील सर्व वॅाल्व्हची पुन्हा एकदा तपासणी करुन त्यांना योग्यरित्या हताळण्याची आवश्यकता असल्याचे देखिल सांगितले.यावेळी “या भागाला निर्माण झालेली पाणी समस्या हि पुर्णपणे कृत्रिम असुन या भागातील सर्व वॅाल्वमन ला सक्तिची ताकिद देवुन सर्व वॅाल्व पुर्ववत करत या भागाला लवकरात लवकर पुन्हा एकदा सुरळित पाणी पुरवठा करण्याची मागणी” यावेळी गणेश कळमकर यांनी केली.

यावेळी अमोल बालवडकर, ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, युवा नेते गणेश कळमकर, युवा नेते लहु बालवडकर, भाजपा नेते प्रकाशतात्या बालवडकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष प्रकाशतात्या बालवडकर, शशिकांत बालवडकर, संदिप बालवडकर, अस्मिता करंदिकर व परिसरातील सोसायटींचे नागरीक, ग्रामस्थ व पुणे मनपा पाणी पुरवठ्याचे सर्व अधिकारी उपस्थित होते.

पुण्याच्या लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयात पदवीदान समारंभ संपन्न

पुणे, 7 डिसेंबर 2022

पुणे येथील कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग(लष्करी अभियांत्रिकी) महाविद्यालयाच्या सर्वत्र हॉलमध्ये आज शानदार पदवी प्रदान (स्क्रोल प्रेझेंटेशन) समारंभ पार पडला. अभियांत्रिकी अधिकारी पदवी अभ्यासक्रम (ईओडीई) आणि तांत्रिक प्रवेश योजना अभ्यासक्रमांसाठी (टीईएस) प्रवेश घेतलेले 42 भारतीय लष्करातील अधिकारी तर भूतान, श्रीलंका आणि मालदीवच्या सहा लष्करी अधिकाऱ्याना अभियांत्रिकीमधील पदव्या प्रदान करण्यात आल्या. एकूण 35 अधिकारी स्थापत्य अभियांत्रिकीमधून पदवीधर झाले तर चार विद्युत अभियांत्रिकी आणि नऊ अधिकारी यांत्रिकी अभियांत्रिकीमधून पदवीधर झाले आहेत. लेफ्टनंट जनरल हरपाल सिंग, पीव्हीएसएमस एव्हीएसएम, व्हीएसएम , एडीसी, मुख्य अभियंता हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्याच हस्ते अधिकाऱ्याना पदवी आणि पुरस्कार प्रदान करण्यात आले. आपल्या भाषणात ले. जन.  हरपाल सिंग यांनी पायाभूत सुविधा उभारणीच्या कामात शाश्वत आणि हरित निकष स्वीकारून अभियांत्रिकी क्षेत्रातील ताज्या आणि नवनवीन तंत्रज्ञानाबाबत स्वतःला अद्ययावत ठेवण्याच्या महत्वावर जोर दिला.

लेफ्टनंट जनरल अरविदं वालिया, कमांडंट, लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय यांनी आपल्या स्वागताच्या भाषणात पदवीधर अधिकाऱ्याना आपले सर्व ज्ञान व्यावहारिक आणि नाविन्यपूर्ण रित्या वापरात आणण्याचे आवाहन केले.

स्थापत्य अभियांत्रिकीमधील प्रतिष्ठेचे समजले जाणारे सुवर्णपदक ईओडीई 124  अभ्यासक्रमाचे कॅप्टन ऐश्वर्य कुमार चौहान यांना आणि टीईएस 38 अभ्यासक्रमासाठी लेफ्टनंट वैभव भोसले यांना प्रदान करण्यात आले. त्याचप्रमाणे, विद्युत अभियांत्रिकीमधील सुवर्णपदक ईओडीई 124  अभ्यासक्रमाचे कॅप्टन मृणाल यादव आणि टीईएस 38 अभ्यासक्रमासाठी लेफ्टनंट अंकित कुमार यांना प्रदान करण्यात आले.

पदवीधर झाल्यानंतर, या अधिकाऱ्यांना  लढाऊ अभियांत्रिकी कामगिरी, सशस्त्र दलातर्फे चालवले जाणारे बांधकाम प्रकल्प, सीमावर्ती भागातील रस्ते प्रकल्प आणि सरकारने सोपवलेल्या राष्ट्रउभारणीच्या प्रकल्पांत नेमणूक करण्यात येणार आहे.  

महाराष्ट्र लोकसेवा आयोग : थेट मुलाखतीद्वारे होणाऱ्या भरतीचे निकाल जाहीर

मुंबई, दि. 7 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने विविध पदांच्या थेट मुलाखतीद्वारे नियुक्त करण्यात येणाऱ्या पदांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. या थेट भरतीचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

दिनांक 14 नोव्हेंबर 2022 रोजी मुलाखती घेण्यात आलेल्या वैद्यकीय अधिकारी, नेत्ररुग्णालय, बृहन्मुंबई महानगरपालिका गट अ, दि. 19 ऑक्टोबर 2022 रोजी मुलाखती घेण्यात आलेल्या वैज्ञानिक अधिकारी, अन्न व औषध प्रशासन गट ब, दि. 12 आणि 13 ऑक्टोबर 2022, रोजी मुलाखती घेण्यात आलेल्या सहायक आरोग्य अधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका गट अ तसेच दि.14 ऑक्टोबर 2022 रोजी मुलाखती घेण्यात आलेल्या वैद्यकीय अधिकारी, क्षय रोग चिकित्सा गट अ, सार्वजनिक आरोग्य विभाग या विविध पदांचा निकाल जाहीर करण्यात आला असल्याचे आयोगाने कळविले आहे.

५० लाख युनिटची वीज चोरी उघडकीस

वीजचोरी रोखण्याच्या महावितरणच्या प्रयत्नांना यश,

मुंबई दि. ७ डिसेंबर २०२२:- वीजचोरी रोखण्याच्या महावितरणच्या मोहिमेचा भाग म्हणून राज्याच्या प्रत्येक झोनमध्ये सर्वाधिक वीज गळती असलेले २३० फीडर निश्चित करून केलेली कारवाई यशस्वी झाली आहे. केवळ तीन महिन्यात ५० लाख युनिटची वीजचोरी उघडकीस आली असून या यशाबद्दल महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
महावितरणच्या प्रत्येक फीडरवर अनेक ग्राहक जोडलेले असतात. फीडरवरून दिली गेलेली वीज आणि
संबंधित ग्राहकांच्या मीटरवर नोंद झालेला विजेचा वापर यांची पडताळणी करून वीजगळती निश्चित केली जाते. मुख्यतः वीजचोरीमुळे तूट वाढते. महावितरणने माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून प्रत्येक झोनमधील सर्वाधिक वीजगळती असलेले फीडर्स निश्चित केले. त्यानंतर त्यांच्याशी जोडलेल्या घरगुती आणि औद्योगिक
ग्राहकांच्या वीजवापरावर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रित केले.
संबंधित ग्राहकांच्या मीटरमध्ये अचूक रिडिंग येत आहे का, मीटरमध्ये फेरफार केला आहे का, कोठे
आकडा टाकून वीजचोरी होत आहे का याची माहिती महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी काढली व कारवाई केली.
परिणामी त्या त्या भागातील वीजचोरीला आळा बसला असून ५ दशलक्ष युनिटची वीजचोरी रोखली गेली
आहे. महावितरणच्या घरगुती ग्राहकांपैकी बहुतांश ग्राहक हे शंभर युनिट वीज वापरणारे असून अशा पन्नास हजार ग्राहकांच्या एक महिन्याच्या वीजवापराएवढी ही वीज आहे.
महावितरणने वीजगळती रोखण्यासाठी आक्रमकपणे काम सुरू केले आहे. त्याचा भाग म्हणून
फीडर्सपैकी वीज गळतीच्या बाबतीत टॉपर्स निश्चित करून कारवाई करण्याची रणनिती आखली. त्या त्या झोनमध्ये कार्यकारी अभियंता आणि उपविभागीय अधिकाऱ्यांना निश्चित केलेल्या फीडर्सची जबाबदारी देण्यात आली. काही ठिकाणी पन्नास ते सत्तर टक्क्यांपर्यंत गळती होती. ती वीस टक्क्यांवर आणण्याचे उद्दीष्ट देण्यात आले. तर तीस टक्के ते पन्नास टक्के गळती असलेल्या फीडर्सची गळती पंधरा टक्क्यांवर आणण्याचे उद्दीष्ट देण्यात आले. पहिल्या तीन महिन्यात मिळालेल्या यशामुळे अधिकारी उत्साहित झाले असून ही मोहीम उद्दीष्ट गाठेपर्यंत पुढे चालू ठेवण्यात येईल.
महावितरणतर्फे सध्या थकित वीजबिलांच्या वसुलीबरोबरच वीजचोरी रोखण्यावर भर देण्यात आहे.
त्या दृष्टीने विविध प्रकारचे प्रयत्न चालू आहेत. अधिक वीजगळती असलेले फीडर्स शोधून त्याबाबतीत कारवाई करण्याचा उपाय त्याचा भाग आहे.