Home Blog Page 1500

नवी मुंबई डाक विभागात ग्रामीण डाक सेवकांच्या रिक्त पदांची भरती

मुंबई,: भारतीय डाक विभागाने ग्रामीण डाक सेवक पदासाठी जाहिरात प्रसिद्ध केली असून त्याअंतर्गत नवी मुंबईच्या अधीक्षक डाकघर यांच्या कार्यक्षेत्रातील ४ रिक्त पदे भरली जाणार आहेत. पात्र व इच्छुक उमेदवारांनी ११ जूनपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

इच्छुक उमेदवारांनी भारतीय डाक विभागाच्या https://indiapostgdsonline.gov.in/ संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरावेत. अर्ज भरण्याची शेवटची तारीख ११ जून २०२३ असून इतर कोणत्याही माध्यमाद्वारे आलेले अर्ज व व्यक्तिशः आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. या भरतीबाबतच्या अधिसूचनेतील सूचनांनुसार शुल्क भरावे लागणार आहे.

पोस्ट विभाग उमेदवारांना कोणताही फोन कॉल करत नाही. संबंधित प्राधिकरणाद्वारेच उमेदवारांशी पत्रव्यवहार केला जातो. उमेदवारांनी त्यांची वैयक्तिक माहिती,नोंदणी क्रमांक, मोबाईल क्रमांक, ईमेल पत्ता इतरांसमोर उघड करू नयेत आणि कोणत्याही बनावट फोन कॉल्सपासून सावध राहावे. अधिक माहितीसाठी https://indiapostgdsonline.gov.in/ संकेतस्थळास भेट द्यावी, असे आवाहन वाशी डाक कार्यालयाचे वरिष्ठ अधीक्षक डाकघर यांनी केले आहे.

वी मुळे वारकऱ्यांना पुणे ते पंढरपूर २५० किलोमीटरच्या २१ दिवसांच्या वारीमध्ये आपल्या प्रियजनांसोबत कनेक्टेड राहता येणार

·         संपूर्ण वारीमध्ये वी मल्टी युटिलिटी मोबाईल व्हॅन्स वारकऱ्यांच्या सोबत राहणार

·         वारकऱ्यांना मिळणार मोबाईल फोन चार्जिंगची सुविधानिःशुल्क कॉलिंग आणि रिचार्ज सेवा

·         वी ऍपवरील भक्तिसंगीत व सिनेमांच्या कलेक्शनचा लाईव्ह डेमो दाखवला जाणार.

सफेद गांधी टोप्यारंगीबेरंगी साड्यांची जणू एक विशाल नदीविठूनामाचा अखंड गजर करतघाटखडबडीत रस्ते आणि हवामानाच्या अडीअडचणींवर मात करत पंढरपूरच्या दिशेने धाव घेत असते. अवघ्या महाराष्ट्राचे लाडके दैवत विठुरायाच्या भक्तीचा आगळावेगळा सोहळा म्हणजेच पंढरपूरची वारी संपूर्ण जगातील सर्वात प्राचीन आणि सर्वात प्रभावी भक्तियात्रांपैकी एक आहे. तब्बल तीन आठवडे पायी चालतएकतारीढोलकी आणि टाळ चिपळ्यांच्या तालात तल्लीन होऊनपांडुरंगाचे नामस्मरण करत वारकरी पंढरपूरला जाऊन देवाचे दर्शन घेऊन धन्य होतात.

वारकऱ्यांच्या आध्यात्मिक अनुभवात वृद्धी व्हावीत्यांना वारीच्या संपूर्ण काळात आपल्या प्रियजनांसोबत कनेक्टेड राहता यावे यासाठी भारतातील आघाडीची टेलिकॉम सेवा पुरवठादार वी ने दोन मल्टी-युटिलिटी मोबाईल व्हॅन्स तैनात केल्या आहेत. पुणे ते पंढरपूर२५० किलोमीटरच्या २१ दिवसांच्या प्रवासात या व्हॅन्स वारकऱ्यांसोबत राहतील. त्यानंतर या व्हॅन्स आषाढी एकादशीच्या काळात ३ दिवस पंढरपूर शहरात राहतील.

अखंडित कनेक्टिविटीची सुविधा वारकऱ्यांना सतत मिळत राहावी यासाठी या मोबाईल व्हॅन्समध्ये १०० पेक्षा जास्त मोबाईल फोन चार्जिंग पॉईंट्सनिःशुल्क कॉलिंग सुविधा आणि रिचार्ज सेवा असणार आहेत. वारकऱ्यांना संपूर्ण दिवसभर या सुविधांचा उपयोग करून घेता येईल. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी मार्गावर वारकऱ्यांसोबत या व्हॅन्स देखील चालत राहतील.

वोडाफोन आयडियाचे महाराष्ट्र आणि गोव्याचे क्लस्टर बिझनेस हेड श्री. रोहित टंडन यांच्या उपस्थितीत संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज पालखींच्या विश्वस्तांनी आज पुण्यामध्ये वी मोबाईल मल्टी युटिलिटी व्हॅन्सचे उदघाटन केले.

वोडाफोन आयडियाचे महाराष्ट्र आणि गोव्याचे क्लस्टर बिझनेस हेड श्री. रोहित टंडन यांनी यावेळी सांगितलेमहाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा दर्शवणाऱ्या पंढरपूर वारीमध्ये यंदा वी देखील प्रत्यक्ष सहभागी होणार याचा आम्हाला खूप आनंद होत आहे. दरवर्षीच्या वारीमध्ये राज्यभरातील अनेक शहरे आणि गावे श्री पांडुरंगाच्या भक्तीमध्ये एकत्र येतात. वारकऱ्यांना त्यांच्या संपूर्ण प्रवासात अखंडित वी नेटवर्कचा अनुभव घेता यावा यासाठी दोन्ही पालखी मार्गांवर आम्ही अतिरिक्त क्षमता तैनात केल्या आहेत आणि आमचे नेटवर्क ऑप्टिमाइज केले आहे. आमच्या वी मोबाईल व्हॅन्समध्ये मोबाईल चार्जिंग सुविधानिःशुल्क कॉलिंग उपलब्ध करवून दिले जाईल.  वी ऍपमधील पांडुरंगाचे अभंगआरत्याकीर्तनांच्या विशाल कलेक्शनचा लाईव्ह डेमो दाखवला जाईल.” 

विठुरायाचे २४० पेक्षा जास्त अभंगआरत्या आणि कीर्तने वी ऍपवर उपलब्ध आहेतभाविक त्यांचा लाभ कधीहीकुठेही घेऊ शकतात.     

शिवसेना अमित शहांनी फोडली; आता हळूहळू शिंदे गटालाही संपवण्याची सुरुवात झाली आहे- संजय राऊत

भाजप शिंदे गटाला एका-एका जागेसाठी रडवेलठाकरेंनी काय भोगले, हे आता शिंदेंना कळेल, एकनाथ शिंदेंना देखील ईडीची भीती होती

मुंबई – शिवसेना एकनाथ शिंदेंनी नव्हे तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी फोडली. भविष्यात ते शिंदे गटालाही नष्ट केल्याशिवाय राहणार नाही. अमित शहांचे हेच राजकारण आहे, अशी टीका ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली.भाजपच्या नेत्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या पुत्राच्या कल्याण लोकसभा मतदारसंघात शिंदे पिता-पुत्रावर बहिष्कार घातला आहे. त्यामुळे कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी खासदारकीचा राजीनामा देण्याचीही तयारी दाखवली. त्यामुळे प्रथमच भाजप आणि शिंदे शिवसेना यांच्यात मोठा दुरावा निर्माण झाला आहे. त्याचा संदर्भ देत आज पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, अमित शहा, भाजपचे हेच राजकारण आहे. उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत युती का तोडली?, हे शिंदे गटाला आता कळेल. भाजपसोबत सत्तेत असताना उद्धव ठाकरेंनी काय भोगले, याचा अनुभव आता शिंदे गटाला घेऊ द्या. कल्याण लोकसभेची जागा पूर्वी भाजपकडेच होती. मात्र, आनंद दिघे व बाळासाहेब ठाकरे यांनी ही जागा शिवसेनेकडे खेचून आणली. मात्र, आता शिवसेना फोडल्यानंतर भाजपला ही जागा हवी आहे.

संजय राऊत म्हणाले, कल्याणमधून लोकसभेवर पूर्वी निष्ठावान शिवसैनिक खासदार म्हणून निवडून येत होते. मात्र, एकनाथ शिंदेंनी ती जागा आपले पुत्र श्रीकांत शिंदे यांच्यासाठी मागितली. उद्धव ठाकरे यांनी औदार्य दाखवत श्रीकांत शिंदेंना दोनदा तेथून खासदार म्हणून निवडून आणले. पण, उद्धव ठाकरेंनी शिंदे पुत्राचे फाजिल लाड केले, हे नंतर कळाले. केवळ कल्याणच्या जागेसाठी नव्हे तर भाजप एका-एका जागेसाठी शिंदे गटाला असाच रडवेल व हळूहळू नष्ट करून टाकेल. त्याची सुरूवात आता झाली आहे.संजय राऊत म्हणाले, शिवसेनेची मुंबई, महाराष्ट्रावरील पकड कमी करणे हे भाजपचे स्वप्न होते. त्यासाठी त्यांना शिवसेना फोडायचीच होती. एकनाथ शिंदे यांची ताकद 4, 5 आमदारांच्या पलीकडे नाही. अमित शहांच्या माध्यमातूनच शिवसेना फोडली. त्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर, पैसा, दहशत अशी सर्व हत्यारे अमित शहांनी वापरली. शिवसेना फोडून महाराष्ट्र कमजोर करण्यात आला. एकनाथ शिंदेंना देखील ईडीची भीती होती. ते आदित्य ठाकरेंसमोर रडले होते. त्यांनी मन खंबीर ठेवावे, असे आमचे म्हणणे होते. मात्र, ते दबावाला बळी पडले.

आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात आपण लवकरच क्रांतिकारी निर्णय घेऊ, असे वक्तव्य विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केले आहे. त्यावर संजय राऊत म्हणाले, राहुल नार्वेकरांना खरे तर क्रांतिकारी निर्णय घेण्याची आवश्यकता नाही. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार, नियमांनुसार निर्णय घेतला तरी पुरेसे आहे. त्यांनी तसे केले तर आम्ही नार्वेकरांचा शिवतीर्थावर जाहीर सत्कार करू.अमित शहांची आज नांदेडमध्ये सभा आहे. त्यावर टीका करताना संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रातील भाजप नेते कमजोर पडल्यामुळेच दिल्लीतील नेत्यांना वारंवार महाराष्ट्रात यावे लागत आहे.

शिंदेसेनेच्या पाच मंत्र्यांना ‘नारळ’ देऊन त्या जागी नवीन मंत्री नेमा,भाजप हायकमांडच्या आदेशाने शिंदेंची गोची

तानाजी सावंत ,गुलाबराव पाटील ,संजय राठोड ,अब्दुल सत्तार ,संदिपान भुमरे हि त्या ५ मंत्र्यांची नावे …

बंडात साथ देणाऱ्या या मंत्र्यांना काढावे कसे : मुख्यमंत्र्यांसमोर धर्मसंकट

शिंदेसेनेच्या पाच मंत्र्यांना ‘नारळ’ देऊन त्या जागी नवीन मंत्री नेमा, असे आदेश भाजपच्या हायकमांडने दिले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गोची झाली आहे. बंडात साथ देणाऱ्यांना हटवायचे कसे, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. सर्व मंत्र्यांच्या कामगिरीवर नजर ठेवण्यासाठी भाजपची स्वतंत्र यंत्रणा आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत या मंत्र्यांचा कितपत उपयोग होईल, याचा अहवाल यंत्रणेने हायकमांडला दिला आहे. त्यात शिंदेसेनेचे ५ मंत्री ब्लॅकलिस्टमध्ये आले आहेत, असा दावा सूत्रांनी केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागताच शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार होईल, अशी आशा दोन्ही गटांतील इच्छुक आमदारांना होती. तसे दावेही मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांनी वारंवार केले. पण खांदेपालटात समाधानकारक काम न केलेल्या शिंदेंच्या गटातील ५ मंत्र्यांना नारळ द्यायचे आदेश दिले गेल्याने बंडात साथ देणाऱ्यांना काढावे कसे ? असे धर्मसंकट आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापुढे उभे राहिले आहे असे सूत्रांचे म्हणणे आहे.

तानाजी सावंत :भाजपाला का नको ?

प्रत्येक जिल्ह्यात स्वत:चे ‘खासगी सचिव’ नेमले
सार्वजनिक आरोग्य सुधारणेत कोणतीही महत्त्वाची कामगिरी बजावली नाही. शिवाय प्रत्येक जिल्ह्यात व्यवहारासाठी स्वत:चे ‘खासगी सचिव’ही नेमले.
शिंदेंना का हवे : प. महाराष्ट्रात मोठे आर्थिक बळाचे प्रस्थ

अब्दुल सत्तार : भाजपाला का नको ?

कृषी योजनांचा लाभ नाही
केंद्राच्या योजनांचा लाभ कृषिमंत्री सत्तार खालपर्यंत प्रभावीपणे पोहोचवू शकलेले नाहीत. त्यामुळे राज्यातील शेतकरी नाराज आहेत.
शिंदेंना का हवे : एकमेव मुस्लिम मंत्री. वेळोवेळी अनेक ‘अर्था’ने मदत. स्वबळावर विजयाची क्षमता.

गुलाबराव पाटील : भाजपाला का नको ?

अपेक्षित कामे नाहीत
ग्रामीण, शहरी भागातील पाणीपुरवठ्याची कामे अपेक्षेनुसार झाली नाहीत. त्यामुळे ग्रामीण मतदारांत सरकारविषयी नाराजी.
शिंदेंना का हवे : उद्धवसेनेकडून होणाऱ्या हल्ल्यांना आक्रमक उत्तर देणारे. उत्तर महाराष्ट्रात ताकदवान.

संजय राठोड : भाजपाला का नको ?

औषधी विक्रेत्यांच्या तक्रारी
भाजप समर्थक असलेल्या औषधी विक्रेत्यांच्या तक्रारी. एका युवतीच्या आत्महत्या प्रकरणाने समाजात प्रतिमा मलिन.
शिंदेंना का हवे : विदर्भात मोठ्या संख्येने असलेल्या बंजारा समाजाची मते मिळवण्यात उपयोगी ठरतील.

संदिपान भुमरे : भाजपाला का नको ?

बदल्यांमध्ये गुंतले
रोहयो, फलोत्पादन योजना प्रभावीपणे अमलात आणल्या नाहीत. अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये हस्तक्षेपाचा आरोप.
शिंदेंना का हवे : बंडासाठी सर्वात अग्रेसर. बंडखोरांना एकत्र करण्यात महत्त्वाची भूमिका. मराठा चेहरा.

लांबलेला मंत्रिमंडळ विस्तार, अधिकारी बदल्या, शिवसेनेच्या मतदारसंघांत भाजपचा हस्तक्षेप, कल्याणमध्ये पुत्र श्रीकांत शिंदेंना भाजपमधून तीव्र विरोध या कारणांमुळे मुख्यमंत्री शिंदे भाजपवर नाराज आहेत. त्यामुळे बुधवारी रात्रीपासून ते मुंबईतच पण अज्ञातवासात राहतील ,खासगी व धार्मिक कामात व्यग्र असल्याचे सांगितले जाईल असाही दावा केला जातोय .

भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत का रे .. दुरावा..

ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या, भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा नोंदल्याचे निमित्त

आगामी लोकसभा व विधानसभा युती एकत्र लढवणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली असली तरी भाजपने विधानसभेच्या २८८ आणि लोकसभेच्या ४८ मतदारसंघात स्वबळावर लढायची तयारी चालवल्याचे शिंदेसेनेकडून मानले जाते आहे.ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या, कल्याण लोकसभा मतदारसंघातील भाजप पदाधिकाऱ्यावर नाेंदलेला गुन्हा आणि मतदारसंघप्रमुखांची नेमणूक अशा कार्नानावरून आणि भाजपा नेते फडणवीस यांच्या सर्वोच्च मी या आतील स्वभावातून राज्यातील सत्ताधारी युतीचे घटक पक्ष भाजप आणि शिंदे शिवसेना यांच्यात मोठा दुरावा निर्माण झाल्याचे वृत्त आहे. त्यात भाजपच्या नेत्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या पुत्राच्या कल्याण लोकसभा मतदारसंघात शिंदे पिता-पुत्रावर बहिष्कार घातल्याच्या बातमीने या अंतर्गत धुसफुसीला दुजोरा मिळतो आहे.

मागच्या आठवड्यात राज्यातील २५ ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. त्या करताना मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यात एकमत झाले नाही. परिणामी शिंदेंनी आपल्या मर्जीप्रमाणे काही बदल्या केल्या.तरीही महसूल आणि नगरविकासच्या बदल्यांमध्ये फडणवीसांनी हस्तक्षेप करत आपल्या मर्जीचे अधिकारी आणले. एमएमआरडीए आयुक्त नेमण्यावरून दोघांमध्ये तणाव निर्माण झाला. त्यात कल्याण लोकसभा मतदारसंघातील प्रकरणाची भर पडली आहे.

कल्याण या ठाणे जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत खासदार आहेत. तेथील भाजपचे डोंबिवली पूर्व विभागाचे अध्यक्ष नंदू जोशी यांच्यावर विनयभंगप्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे. हा गुन्हा मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांकडून आलेल्या दबावामुळे झाल्याचा भाजप पदाधिकाऱ्यांचा दावा आहे. गुन्हा नोंदवणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांचे निलंबन करेपर्यंत कल्याणमध्ये सेनेच्या सर्व कार्यक्रमांवर बहिष्कार घालायचा असा निर्णय भाजप पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे.

प्रदेश भाजपने नुकतेच विधानसभेच्या २८८ आणि लोकसभेच्या ४८ मतदारसंघात निवडणूकप्रमुख नेमले आहेत. त्यात मागच्या वेळी पराभूत झालेल्या उमेदवारांना नेमण्याची खबरदारी घेतली आहे. म्हणून आगामी निवडणुकांमध्ये शिंदेसेनेच्या मतदारसंघात मोठा पेच निर्माण होणार आहे. शिंदेसेनेच्या वाट्यास येणाऱ्या मतदारसंघात भाजप व सेनेत संघर्ष उद्भवण्याची शक्यता आहे.

ठाणे आणि कल्याण कळीचा मुद्दा

ठाणे मतदारसंंघ शिंदेसेनेने घ्यावा आणि कल्याण आपल्याला मिळावे अशी भाजपची इच्छा आहे. कल्याण मतदारसंघात रा. स्व. संघाचे प्राबल्य आहे. हा मतदारसंघ भाजपच्या राम कापसे यांचा. मात्र आनंद दिघे यांच्या दांडगाईने तो मतदारसंघ प्रमोद महाजन यांनी तत्कालीन शिवसेनेला दिला.ठाणे आणि कल्याण दोन्ही आमच्याच आहेत, असा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा आहे. या दोन्ही जागा आम्ही सोडणार नाही, अशी शिंदे यांची भूमिका आहे. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटातील तणावाचा हा कळीचा मुद्दा ठरला आहे.ठाणे मतदारसंघ शिवसेनेने घ्यावा अशी भाजपची इच्छा आहे. येथे सध्या ठाकरे यांच्या शिवसेनेचे राजन विचारे खासदार आहेत, तर कल्याणमधून खासदार असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत यांनी ठाण्यातून लढावे असा भाजपचा पर्याय आहे.

भारत सरकाच्या वतीने संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू श्री तुकाराम महाराज पालखी साहळ्या निमित्त केंद्र सरकारचे ९ वर्षातील कार्य व प्रमूख योजनांवर अधारित फिरत्या मल्टिमिडीया वाहन प्रदर्शनाचे आयोजन

पुणे, 9 जून 2023

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू श्री तुकाराम महाराज पायी वारी पालखी सोहळ्या निमित्त केंद्र सरकाच्या, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पुणे येथील केंद्रीय संचार ब्यूरो, प्रादेशिक कार्यालयच्या  वतीने केंद्र सरकाचे ९ वर्षातील कार्य व प्रमूख योजनांची माहिती देण्यासाठी   फिरत्या मल्टिमिडीया वाहन प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. 

या मल्टिमिडीया वाहन प्रदर्शनाचे उद्घाटन, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते दिनांक ११ जून २०२३ रोजी सकाळी १० वाजता पुणे शहरातील विभागीय आयूक्त कार्यालय(विधानभवन) येथे होणार असून यावेळी सौरभ राव, विभागीय आयूक्त पुणे, राजेश देशमुख,जिल्हाधिकारी, पुणे, निखिल देशमुख उपसंचालक  केंद्रीय संचार ब्यूरो पुणे व  डॉ. जितेंद्र पानपाटील, व्यवस्थापक, केंद्रीय संचार ब्यूरो, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पायी वारीसाठी संपूर्ण देशाभरातून येणारे वारकरी व भक्तांसाठी केंद्र सरकारच्या विविध विकासात्मक उपक्रमांची माहिती देण्याच्या मल्टिमिडिया प्रदर्शच्या माध्यमातून तसेच सांसकृतिक कलापथकांद्वारे मनोरंजन व अभंगाच्या माध्यमातून उद्बोधन व प्रबोधन करण्यात येणार आहे.

विश्वशांतीसाठी सर्वधर्मसमभाव आणि सहचर्याची भावना आवश्यक-राज्यपाल रमेश बैस

पुणे,दि.९: जगात शांतता आणि समृद्धीचे वातावरण निर्माण करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सर्वधर्मसमभाव आणि सर्वांशी मिळून मिसळून वागण्याची, सहचर्याची भावना बाळगणे गरजेचे आहे; त्यासाठी मुलांना शालेय जीवनापासूनच सर्व धर्मांचा सन्मान करण्याची शिकवण दिली जावी, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

एमआयटी कोथरूड येथे आयोजित पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी एमआयटी विश्व शांति केंद्राचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया पुरस्काराने सन्मानित डॉ. विजय जोशी, एमआयटी विश्व शांती विश्वविद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. राहुल कराड, एमआयटी आर्ट डिझाईन टेक्नोलॉजी युनिवर्सिटीचे कुलगुरु डॉ.मंगेश कराड, टाइम्स ग्रुपच्या सह उपाध्यक्षा भावना रॉय आदी उपस्थित होते.

राज्यपाल श्री.बैस म्हणाले, गरीब आणि कष्टकऱ्यांप्रती संवेदना बाळगूनच शांतता प्रस्थापित करता येऊ शकते. एक जग समृद्ध होत असताना दुसऱ्या जगात दारिद्र्य पहायला मिळते. हा असमतोल दूर करून जगात शांतता आणि समृद्धीचे राज्य आणता येईल. भारतीय संस्कृतीने ‘वसुधैव कुटुंबकम्’ चा विचार जगाला दिला आहे. याच विचाराच्या आधारे जगात शांतता नांदू शकेल.

जगातील अनेक देश प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या युद्धाने प्रभावित आहेत. युद्ध आणि अशांततेच्या बातम्या दररोज समोर येत असताना शांततेचा विचार आज अधिक प्रासंगिक आहे. भगद्गीता आणि त्यावर आधारीत ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथातून मांडलेला विचार आपल्यात शांतता आणि सद्भावना निर्माण करण्याचा मार्ग प्रशस्त करणारा आहे. या विचाराद्वारे जगातही शांतता प्रस्थापित करता येते.

विरोधी विचाराला बळाने नव्हे तर आत्मिक बळाने जिंकता येते हा महात्मा गांधींचा विचार मार्गदर्शक आहे. भगवान गौतम बुद्धांनी अहिंसा आणि करुणेच्या संदेशाचा प्रसार केला. सम्राट अशोकने युद्धापासून दूर राहण्यासाठी बुद्धविचार अनुसारला. भगवान महावीर आणि येशू ख्रिस्तानेही क्षमा आणि शांतीचा संदेश दिला. आपल्या भारतीय संस्कृतीची श्रेष्ठता जगाने मान्य केली आहे, जग आज भारताकडे आकर्षित होत आहे. आपणही आपल्या देशाचे सांस्कृतिक मूल्य जाणून घेणे आवश्यक आहे.

यावेळी डॉ.विश्वनाथ कराड यांनीही विचार व्यक्त केले. प्रा.मंगेश कराड यांनी प्रास्ताविकात एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सीटीच्या उपक्रमांविषयी माहिती दिली.

एमाआयटी विश्व शांति केंद्राचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रा.विश्वनाथ कराड लिखीत ‘पाथवे टू वर्ल्ड पीस’ (विश्व शांतीचा मार्ग) या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल महोदयांच्या हस्ते करण्यात आले.
0000

विविधतेत एकता या देशाचे सांस्कृतिक सामर्थ्य– मिलिंद जोशी

पुणे : स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सर्वांनी जात धर्म पंथ भाषा विसरून लढले आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या सर्व निकषांवर जात, भाषा, धर्मावर भांडत बसलो तर आपल्या सर्व समावेशक संस्कृतीला मानवणार नाही. विविधतेत एकता या देशाचे सांस्कृतिक सामर्थ्य आहे. संतांनी जाती भेदाच्या भिंती नष्ट करून अध्यात्माचे लोकशाहीकरण केले, संत साहित्यातुन सकारात्मकतेचा संदेश दिला आहे. असे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी यांनी आज काढले.  मराठी भाषा संवर्धन समिती आणि कोहिनूर ग्रुप तर्फे बिशप थॉमस डाबरे यांना ‘कोहिनूर – मराठी रत्न’ पुरस्कार महाराष्ट्र साहित्य परिषद येथे देऊन गौरवण्यात आले त्यावेळी ते अध्यक्ष पदावरून बोलत होते. आकरा हजार रुपये, पुणेरी पगडी, सन्मान चिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी  मंचावर बिशप थॉमस डाबरे यांसह वेदभवनचे वेदमूर्ती मोरेश्वर घैसास गुरुजी, पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, विशानेमा ज्ञाती समाजाचे बिपीन मोदी, संयोजक मराठी भाषा संवर्धन समितीचे अध्यक्ष प्रवीण प्र. वाळिंबे उपस्थित होते.  

प्रारंभी युवा कीर्तनकार तन्मयी मेहेंदळे यांनी भूप रागावर आधारित तुकाराम महाराज यांच्यी रचना सादर केली. समितीचे अध्यक्ष व संयोजक प्रवीण प्र. वाळिंबे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. ते म्हणाले, गेली १४ वर्षे बिशप थॉमस डाबरे यांनी पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर पासून कर्नाटकातील होटगी येथ पर्यंतच्या त्यांच्या कार्यक्षेत्रात बिशप म्हणून केलेले कार्य आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज त्यांच्यावर केलेली पीएचडी यानिमित्त आज ‘कोहिनूर – मराठी रत्न’ पुरस्कार देऊन त्यांना गौरवले गेले आहे. यावेळी विशानेमा ज्ञाती समाजाचे बिपीन मोदी यांनी गुजराथी वैष्णव समाजातर्फे शाल व पुष्पगुच्छ देऊन बिशप यांचा गौरव केला.  तसेच विविध संस्थांनी बिशप थॉमस डाबरे यांचा सत्कार केला.

मिलिंद जोशी पुढे म्हणाले की, धर्मामुळे भावना भडकणार नाहीत याची जबाबदारी सर्वच धर्मधुरीणांनी घेतली पाहिजे आणि धर्माचे खरं तत्वज्ञान सर्वांना समजावून सांगितले पाहिजे, धर्माचे खरे काम माणसांना जोडण्याचे असून तोडण्याचे नाही असे मत त्यांनी व्यक्त केले.

सत्काराला उत्तर देताना बिशप थॉमस डाबरे म्हणाले की, आपण प्रत्येकाने सर्वच धर्मांचा वस्तुनिष्ठ पद्धतीने अभ्यास केला पाहिजे त्यामुळे सर्वच धर्मांबद्दल आपल्या मनात आदर वाढतच राहील आणि पूर्वग्रह, दुराग्रह दूर होतील. असे सांगून ते म्हणाले की, धर्माधर्मांमध्ये सलोखा वाढवण्यासाठी मी माझी सारी हयात घालवली आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्यावर मी पीएचडी केली त्यानिमित्त महाराष्ट्र सरकारने संत तुकाराम महाराज यांचा विषयक समितीवर माझी नेमणूक केली होती हा मी माझा मोठा बहुमान मानतो. आज सगळीकडेच स्थानिक संस्कृतीवर गंडांतर आले आहे. सांस्कृतिक साम्राज्यवाद फोफावत आहे. पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधानुकरण होत आहे. आपल्याकडे ही पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधानुकरण होत आहे. या पार्श्वभूमीवर आपली भारतीय संस्कृती आणि मराठी संस्कृती कशी वृद्धिंगत होत राहील यासाठी प्रयत्न केला पाहिजे असे ते म्हणाले.

याप्रसंगी पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल म्हणाले की, बिशप थॉमस डाबरे हे खऱ्या अर्थाने ‘कोहिनूर’ आहे. सर्वधर्म समभावची संस्कृती या बरोबरच शिक्षण आणि आरोग्य यावर त्यांनी केलेले काम कौतुकास्पद आहे.

प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना वेदभवनाचे वेदमूर्ती मोरेश्वर घैसास गुरुजी म्हणाले की, या सत्कार समारंभात धर्माच्या भिंती नाहीत. त्यांनी केलेले सेवा कार्य आणि धार्मिक सलोख्याचे कार्य याचा हा सत्कार आहे.   

याप्रसंगी विशानेमा ज्ञाती समाजचे बिपीन मोदी यांनी बिशप थॉमस डाबरे यांच्या गौरव म्हणजे सेवा आणि सलोखा या मूल्यांचे गौरव आहे असे ते म्हणाले.

कलकत्त्याचे फिलीप यांनी देखील भाषणातून त्यांना शुभेच्छा दिला.

नीलिमा बोरवणकर यांनी सूत्रसंचालन केले. समारंभास मोठी गर्दी होती. श्रुती तिवारी यांनी आभार प्रदर्शन केले.

मुंबईच्या डबेवाले कामगारांच्या घरकुलांसाठी धोरण लवकरच – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई दि 9:- मुंबई डबेवाले कामगार यांच्यासाठी घरकुले उपलब्ध करून देण्यासंदर्भात लवकरच धोरण निश्चित करण्यात येईल असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मेघदूत निवासस्थान येथे मुंबई डबेवाले कामगार यांच्या विविध मागण्यांच्या अनुषंगाने बैठक झाली. यावेळी आमदार श्रीकांत भारतीय, गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंह, ‘म्हाडा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, नूतन मुंबई टिफीन बाॅक्स सप्लायर्स चॅरीटी ट्रस्टचे प्रतिनिधी हे उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबई डबेवाले कामगार यांना घरकुले उपलब्ध करून देण्यासंदर्भात लवकरच धोरण निश्चित करण्यात येईल. तसेच
प्रधान मंत्री आवास योजनेच्या धर्तीवर राज्यस्तरीय योजना करण्यासंदर्भातही अभ्यास करण्यात येईल. यामुळे यांसारख्या अन्य इतर घटकांनाही लाभ मिळू शकेल. शहरे विकसित करताना विविध प्रकल्पांच्या उभारणीत गृहनिर्माणाचा साकल्याने विचार करण्यात येत असल्याचेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

मुंबईतील डबेवाले चाकरमान्यांची निस्वार्थपणे सेवा करीत आहेत. मुंबई हेच त्यांचे कार्यक्षेत्र असल्याने मुंबई व नजिकच्या परिसरात त्यांच्यासाठी घरकुले उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे मत आमदार श्रीकांत भारतीय यांनी यावेळी मांडले.

पालखीच्या आनंद व‌ आरोग्याच्या वारी सोबत यंदा एकपात्री अभिनयातून संत तुकाराम दर्शन घडणार – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

पंधरा नाट्यप्रयोग सादर होणार

पुणे:जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या जीवनाचे दर्शन वारी मार्गावर नाटयरूपाने सर्वांना पाहता येणार असून सॄजनात्मक आनंद लुटण्याबरोबरच आरोग्य तपासणी ही अभिनव संकल्पनाही प्रथमच भक्तांना शासनाकडून मिळणार असल्याची माहिती पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आज येथे दिली.
संवाद,पुणे व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या जीवनाचे दर्शन घडविणारा एकपात्री नाट्यप्रयोगाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.

प्रसिद्ध अभिनेते योगेश सोमण यांनी सादर केलेल्या ‘आनंदडोह’ या कार्यक्रमाचे देहूगाव येथील अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये आज आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत साहित्याचे अभ्यासक, माजी संमेलनाध्यक्ष डॉ सदानंद मोरे होते. माजी आमदार बाळा भेगडे,देहूच्या नगराध्यक्षा स्मिता चव्हाण,देहू संस्थानचे पुरूषोत्तम महाराज मोरे, माणिक महाराज मोरे, शिवाजी महाराज मोरे, राष्ट्रीय सेवा योजना समितीचे राजेश पांडे, अंजली ताई पाटील,संवादचे सुनील महाजन,संयोजक हरी चिकणे , निकिता मोघे आदी यावेळी उपस्थित होते.
पालकमंत्री पाटील पुढे म्हणाले,पालखी मार्गावर भारत सरकारने ११ हजार कोटी रुपयांची कामे केली असून हा सुंदर प्रवासाबरोबरच हा आनंद सोहळा आता नाटयरूपाने सर्वांना द्विगुणित करणारा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. डॉ सदानंद मोरे,बाळा भेगडे, राजेश पांडे यांचीही यावेळी भाषणे झाली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील महाजन यांनी तर विकास कंद यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. डॉ कविता अय्यर यांनी सूत्रसंचालन तर मंदार चिकणे यांनी आभार मानले.

ऋषी सुनक:वाचकांचा उदंड प्रतिसाद;आता पाच भाषेत येणार

पुणे:
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यावर पुण्यातील पत्रकार दिगंबर दराडे यांनी लिहिलेलं पुस्तक बेस्ट सेलर ठरत आहे. अवघ्या एका महिन्यांमध्ये तब्बल पाच आवृत्या निघाल्या आहेत. हे पुस्तक हिंदी, इंग्लिश, कन्नड, गुजराथी सह जर्मन भाषेतही काढण्यात येणार आहे.
लंडन येथे जाऊन दराडे यांनी आपल्या पुस्तकामध्ये सुनक यांच्या व्यक्तीमत्वाच् विविध पैलू उलगडले आहेत. युवक युवतींकडून मोठा प्रतिसाद असलेयाचे दिगंबर दराडे यांनी सांगितले. ते म्हणाले, युवक आणि युवतीकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. लंडनमध्ये राहत असलेल्या आणि तिकडे शिक्षण पूर्ण करून आलेल्या तरूणांच्याकडून या पुस्तकाचे विशेष कौतुक होत आहे.

लेखक:पत्रकार दिगंबर दराडे


इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती व सुधा मूर्ती यांचे ते जावई आहेत. ज्या देशाने आपल्यावर दीडशे वर्ष राज्य केले त्या देशाचा पंतप्रधान एक भारतीय वंशाचा आणि हिंदू आहे. या अभूतपूर्व घटनेने भारतीय म्हणून आपली छाती नक्कीच फुलून येत आहे.
एक स्थितप्रज्ञ, हिंदू संस्कृतीचा अभिमान बाळगणारे, मंदिरात जाऊन पूजा करणारे गोपूजा करणारे, गीतेवर हात ठेवून खासदारकीची शपथ घेणारे ब्रिटनचे पंतप्रधान पाहून भारतीयाला त्यांचा अभिमान वाटतो आहे. आपले कर्तव्य हाच आपला धर्म आहे हा विचार पक्का करून ते जोमाने कामाला लागले आहेत दिवस-रात्र मेहनत करत आहेत.
माय मिररचे मनोज अंबिके म्हणाले, ऋषी यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आम्ही एक महिन्यामध्ये पाच आवृत्त्या काढलेल्या आहेत. तरूणांची माागणी या पुस्ताला दिवसेंदिवस वाढत आहे. ऋषी सुनक यांच्या बद्दलचे मराठीतील हे पहिले असल्याने विशेष आकर्षण ठरत आहे. ऋषी आणि अक्षता मुर्तींची लव्हस्टोरी, मुर्ती कुंटुबियांचा साधेपणा लोकांना अधिकचा भावत आहे. याच बरोबर दराडे यांनी अतिशय साध्या सोप्या भाषेत लेखन केले आहें. म्हणून आम्ही हे पुस्तक विविध भाषांमध्ये आणण्याच काम सुरू केले असल्याचे त्यांनी सांगितले.राजकीय नेत्यांच्या सोशल मिडियावर ऋषी
कमी वयात यशस्वी झालेल्या ऋषी सुनक यांचा प्रवास अनेकांना प्रेरणा देणारा आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पासून ते पंकजा, धनंजय मुंडे, उदयनराजे भोसले, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, रोहित पवार यांच्या सोशल मिडियावर ही या पुस्तकाची पोस्ट पहायला मिळाली.

साखर, मीठ, तेलाचे डबे खरेदी करून पावणेपाच कोटींची फसवणूक

पुणे : मार्केट यार्डातील भुसार बाजारातील एका व्यापाऱ्याकडून खरेदी केलेल्या भुसार मालाचे पैसे न देता चार कोटी ७२ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी एका व्यापाऱ्याविरुद्ध मार्केट यार्ड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी शमीत शशिकांत बंब (वय ३५, रा. मार्केट यार्ड) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका व्यापाऱ्याने मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार व्यापाऱ्याची भुसार बाजारात पेढी आहे.

बंब याने व्यापाऱ्याकडून साखर, मीठ, तेल डबे असा माल खरेदी केला होता. बंब याने भुसार व्यापाऱ्याला रोख, ऑनलाइन स्वरुपात रक्कम दिली होती. उर्वरित चार कोटी ४२ लाख पाच हजार ५७८ रुपये दिले नव्हते. भुसार व्यापाऱ्याकडून खरेदी केलेल्या मालाची विक्री अन्य व्यापाऱ्यांना करुन बंब याने रक्कम परत केली नाही. भुसार व्यापाऱ्याने रक्कम परत करण्याबाबत बंबकडे विचारणा केली. तेव्हा त्याने उर्वरित रक्कम देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर व्यापाऱ्याने पोलिसांकडे तक्रार दिली. फसवणूक, अपहार केल्याप्रकरणी बंबविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे तपास करत आहेत.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश प्रक्रियेस १२ जूनपासून सुरवात

मुंबई, दि. ९ : औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश प्रक्रिया सोमवार १२ जून २०२३ पासून सुरू करण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दि. अं. दळवी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश प्रक्रियेसंबंधीची व प्रमाणित कार्यपद्धतीची माहिती पुस्तिका ऑनलाइन स्वरूपात https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्ज स्वीकृती, विकल्प सादर करणे व प्रवेश प्रक्रियेचे विविध टप्पे आदी प्रक्रियेबाबत समुपदेशन सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये रोज आयोजित करण्यात येणार आहेत.

माहिती पुस्तिकेत नमूद असलेल्या टप्प्याप्रमाणेच प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार असून त्यासंदर्भातील वेळापत्रक तसेच राज्यातील शासकीय व अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये उपलब्ध असलेल्या व्यवसाय अभ्यासक्रमांची माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संकेतस्थळ www.dvet.gov.in व https://admission.dvet.gov.in यासह प्रादेशिक कार्यालय, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांचे कार्यालय, सर्व शासकीय, खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.

0000

पवारांना धमकी देणारा भाजप कार्यकर्ता,बावनकुळेजी हे रक्त नेमकं कुणाचं,अमोल मिटकरींचा सवाल

शरद पवारांना ‘तुमचा देखील दाभोलकर करू’ अशी धमकी देणारा सौरभ पिंपळकर भाजपचा कार्यकर्ता असल्याचे समोर येते आहे. त्याचे भाजप नेत्यांसोबतचे फोटोही समोर येत आहेत . यातला एक फोटो पोस्ट करून बावनकुळेजी हे रक्त नेमकं कुणाचं? असा सवाल करत आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपवर वार केला आहे.भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘धमकी देणे हे आमच्या रक्तात नाही,’ असे म्हणत सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आरोप खोडून काढले होते. हाच धागा पकडून अमोल मिटकरी यांनी हा सवाल केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ट्विटरवरून ‘तुमचा देखील दाभोलकर करू’ अशी धमकी मिळाली. या प्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबईच्या पोलिस आयुक्तांची भेट घेत तक्रार दिली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तपास करून कारवाईच्या सूचना पोलिसांना दिल्या. तर ‘मी धमकीची मी चिंता करीत नाही. कायदा आणि सुव्यवस्था सांभाळायची जबाबदारी सरकारची आहे. ज्यांच्या हातात सूत्र त्यांना जबाबदारी टाळता येणार नाही. त्यांनी यासंबंधी जबाबदारी घ्यावी,’ असे म्हणत सुरक्षेचा चेंडू शरद पवारांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात टाकला आहे.

शरद पवारांच्या धमकी प्रकरणावरून राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये कलगीतुरा रंगला. चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘धमकी देणे हे आमच्या रक्तात नाही. ज्याने कोणी धमकी दिली असेल, त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. तो राष्ट्रवादीचा असो, भाजपचा असो किंवा काँग्रेसचा असो, त्याच्यावर कारवाई व्हायला हवी,’ अशी मागणी केली. मात्र, हा धमकी देणारा सौरभ पिंपळकर भाजपचा कार्यकर्ता असल्याचे समोर आले आहे. तो अमरावतीचा राहणार असल्याचे समजते.

दुसरीकडे शरद पवारांना धमकी देणाऱ्या सौरभ पिंपळकरच्या ट्विटर हॅंडलवर मी भाजपचा कार्यकर्ता आहे. मी धर्मनिरपक्षतेचा तिरस्कार करतो, असा उल्लेख असल्याचे समोर आले आहे. तसेच त्याचे भाजप नेत्यांसोबतचे फोटो समोर आलेत. त्यात एका फोटोत तो केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासोबत तर दुसऱ्या फोटोमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत तो दिसतो आहे. हाच फोटो पोस्ट करून मिटकरींनी चंद्रशेखर बावनकुळे यांना जोरदार उत्तर दिले आहे.

अमोल मिटकरी आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, हे आमच्या रक्तात नाही म्हणणारे बावनकुळेजी हे रक्त नेमकं कुणाचं आहे? पवार साहेबांना धमकी देणारा पिंपळकर तुमच्या बाजूला केक कापतोय , ‘राजकारण महाराष्ट्राचे’ ‘नर्मदाबाई पटवर्धन’ सौरभ पिंपळकर हे ट्विटर अकाउंट कुणाच्या रक्ताचे? असा सवाल त्यांनी केला असून, करारा जवाब मिलेगा, असे उत्तरही दिले आहे.

मास्टरमाईंड शोधा- डॉ. दाभोळकरांची हत्या करणाऱ्या शक्ती राज्यात पुन्हा सक्रिय झाल्या आहेत, ही बाब अधिक चिंताजनक

अजित पवार यांनीही एक पोस्ट केली आहे. त्यात ते म्हणतात की, पवार साहेबांना सोशल मीडियावर ‘तुमचा लवकरंच दाभोळकर होणार…’ अशी देण्यात आलेली धमकी, हे गंभीर प्रकरण आहे. केंद्र आणि राज्य सरकारने या धमकीची गांभीर्यानं दखल घेऊन आरोपींना तातडीने गजाआड करावे. धमकी मागचा खरा मास्टरमाईंड शोधावा. अशा विचारांच्या समाजविघातक शक्तींना वेळीच रोखावे, हेच राज्याच्या हिताचे असेल.अजित पवार पुढे म्हणतात की, पवार साहेबांचे संरक्षण करण्यास महाराष्ट्रातील जनता समर्थ आहे. परंतु डॉ. दाभोळकरांची हत्या करणाऱ्या शक्ती राज्यात पुन्हा सक्रिय झाल्या आहेत, ही बाब अधिक चिंताजनक आहे. निवडणुका जवळ येऊ लागल्यानं यापुढे जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषावादाचे असे मुद्दे उपस्थित करुन समाजात द्वेष निर्माण करण्याचे, दुही माजवण्याचे, मतांच्या ध्रुवीकरणाचे प्रयत्न होतील. ते हाणून पाडले जातील. देशातील जनता आता सावध आहे. समाजात द्वेष निर्माण करणाऱ्यांच्या भूलथापांना भुलणार नाही. कुणाच्याही कटकारस्थानांना बळी पडणार नाही.

पुणे शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासंदर्भात शहर काँग्रेसच्या वतीनेपुणे पोलीस आयुक्त यांना निवेदन सादर.

पुणे – पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असून शांतता, सुव्यवस्था व सुरक्षा या शहरामध्ये उत्तमपणे गेली कित्येक वर्षे पाहावयास मिळते. गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील नगर, औरंगाबाद, कोल्हापूर, संगमनेर आदी शहरांमध्ये काही अनुचीत प्रकार घडलेले आहेत. या प्रकारांचे पर्यावसण सांप्रदायिक वाद – विवाद व दंगलीमध्ये होत असल्याचे चित्र आहे. एखाद्या चूकीच्या प्रकाराबद्दल मोर्चे काढणे व त्यास जातीयवादी रंग देणे व शहराची शांतता आणि सुव्यवस्था बिघडविणे असे प्रकार आपल्याला पहावयास मिळाले आहेत.

     पुण शहरामध्ये असे कोणतेही प्रकार घडू नयेत या दृष्टीने शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंध करणारे उपाय तातडीने पोलीसांनी अमंलात आणावेत. जी मंडळी अशा प्रकारचे उद्योग करतात त्यांच्यावर लक्ष ठेवावे या संदर्भात आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस आयुक्त मा. रितेश कुमारजी साहेब यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पोलीस सह आयुक्त मा. संदिप कर्णिक साहेब उपस्थित होते.

     यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे, प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, माजी महापौर कमल व्‍यवहारे, प्रदेश महिला उपाध्यक्षा संगीता तिवारी, अजित दरेकर, मुनाफ शेख, सनी रणदिवे, रघुराज दरेकर आदी उपस्थित होते.