Home Blog Page 1489

भाजप आमदार मुक्ता टिळक यांचं निधन

पुणे-भाजपच्या आमदार आणि पुणे शहराच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांचं दीर्घ आजारानं गुरुवारी निधन झालं. गेल्याकाही महिन्यांपासून त्या कर्करोगाशी झुंज देत होत्या, अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. पुण्यातील गॅलेक्सी केअर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते, याच ठिकाणी त्यांनी दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला.मुक्ता टिळक या लोकमान्य टिळक यांचे पणतू शैलेश टिळक यांच्या पत्नी आहेत.

मुक्ता टिळक या आमदार होण्यापूर्वी पुण्याच्या सन 2017 ते 19 या दरम्यान महापौर होत्या. कसबा विधानसभा मतदारसंघाचे अनेक वर्ष आमदार राहिलेले पुण्याचे विद्यमान खासदार गिरीश बापट यांच्या रिक्त जागेवर मुक्ता टिळक यांची वर्णी लागली होती. त्यानंतर बापट यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांनी टिळक यांना कसबा विधानसभा मतदारसंघातून निवडून आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले होते. मागील दीड ते दोन वर्षांपासून टिळक या कॅन्सरच्या आजाराने ग्रस्त होत्या. याबाबत त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. पुण्यातील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच गुरुवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली आहे. उद्या सकाळी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनसाठी 9 ते 11 केसरीवाडा येथील राहत्या घरी ठेवण्यात येईल.अंत्यविधी वैकुंठ स्मशामभुमी येथे 11 वाजता होणार आहे.

पुण्यातील भावे स्कूलमधून शालेय शिक्षण घेतलेल्या मुक्ता टिळकांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून पुढील शिक्षण घेतले होते. पुणे विद्यापीठातून त्यांनी जर्मन भाषाही शिकलीय. मार्केटिंग विषयात त्यांनी एमबीएची पदवी मिळवलीय. तसेच मुक्ता टिळकांनी पत्रकारितेचं शिक्षणही घेतले आहे. सुरुवातीच्या काळात त्यांनी हिंदुस्थान पेट्रोलियम, आरबीआय, किर्लोस्कर ऑईल इंजिन्स, थरमॅक्स, प्रवीण मसाले आदी कंपन्यांमध्ये काम केले. मुक्ता टिळक यांच्या माहेरी राजकीय पार्श्वभूमी नव्हती. मात्र, त्यांच्यावर संघाचे संस्कार होते. टिळक घराण्यात आल्यावरच आपसूकच त्यांना राजकीय वारसा मिळाला. त्यांच्या राजकारणाची सुरुवात ही समाजकारणातून झाली.

राज्यसभेसाठी रुग्णवाहिकेतून मतदानासाठी पोहचल्या

राज्यसभा निवडणुकीत एकही आमदार रणांगणाबाहेर राहू नये यासाठी भाजपकडून खबरदारी घेण्यात आली होती. मुक्ता टिळक अॅम्ब्युलन्समधून विधानभवनात पोहोचल्या होत्या. मुक्ता टिळक कर्करोगाशी झुंज देत होत्या. तब्येत खालावलेली असतानाही मुक्ता टिळक राज्यसभेच्या मतदानासाठी आल्या होत्या. मतदानाच्या दिवशी त्यांना अॅम्ब्युलन्समधून विधानभवनात आणले होते.

जयंत पाटलांनी थेट अध्यक्षांनाच सुनावलं,त्यामुळे त्यांच्यावर झाली निलंबनाची कारवाई

0

अधिवेशन संपेपर्यंत निलंबनाची कारवाई!

नागपूर -अपशब्द वापरल्या प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना आज निलंबित करण्यात आले आहे. निलंबनाचा ठराव विधानसभेत मंजूर करण्यात आला. अधिवेशन संपेपर्यंत जयंत पाटील यांचे निलंबन झाले आहे. यावेळी विरोधापक्षनेते अजित पवार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली आणि विरोधी पक्षाच्या सर्व आमदारांनी सभात्याग केला .

सत्ताधाऱ्यांनीच सभागृहात गोंधळ घालायचा …संपलेल्या प्रकरणाचे खुसपट काढायचे अजित पवारांनी सुनावले

नागपूर – दिशा सालियन मृत्यूप्रकरणाची SIT मार्फत राज्य सरकारने चौकशी करावी, या मागणीसाठी आज सत्ताधाऱ्यांनीच विधानसभा सभागृहात गोंधळ घातला. यामुळे सभागृह तब्बल तीनदा तहकूब करावे लागले.यावर सत्ताधाऱ्यांनीच सभागृहात गोंधळ घालायचा नसतो, असे खडेबोल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सुनावले. तर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अखत्यारित असणाऱ्या सीबीआयनेच दिशा सालियनने आत्महत्या केल्याचे स्पष्ट केले आहे. अशात राज्यातील शिंदे गट व भाजप नेत्यांचा अमित शहांवर विश्वास राहिला नाही का?, असा सवाल ठाकरे गटाचे नेते, आमदार भास्कर जाधव यांनी केला आहे. संपलेल्या प्रकरणाचे खुसपट विधिमंडळाबाहेर मविआ नेत्यांनी पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांच्या या वर्तवणुकीचा तीव्र शब्दांत निषेध केला.

अजित पवार म्हणाले, दिशा सालियनचा मृत्यू झाला तेव्हा राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. तेव्हा आमच्या सरकारवर विश्वास नाही म्हणून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. नंतर सीबीआयने या प्रकरणाचा तपास करत दिशा सालियानने आत्महत्या केल्याचे स्पष्ट केले व न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दाखल केला. त्यामुळे हे सगळ प्रकरण संपलेले असताना सत्ताधाऱ्यांकडून उगीचच या प्रकरणाचे खुसपट बाहेर काढले जात आहे. सत्ताधाऱ्यांनी गोंधळ घालायचा नसतो अजित पवार म्हणाले, आज आम्हाला सभागृहात अतिशय महत्त्वाचे मुद्दे मांडायचे होते. मात्र, विनाकारण दिशा सालियानच्या मृत्यू प्रकरणावरून गोंधळ करत सत्ताधारी सभागृहाचा वेळ वाया घालवत आहेत. मुळात सत्ताधारी पक्षाने सभागृहात गोंधळ घालायचा नसतो. सत्ताधारी पक्षाने सभागृहात शांतता ठेवायची असते. विरोधकांनी आपल्या मागण्यांसाठी गोंधळ केल्यास सत्ताधाऱ्यांनी यातून मार्ग काढायचा असतो. मात्र, राज्यात उलटेच घडत आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्ष व उपाध्यही यावर तोडगा काढत नाही, अशी नाराजी अजित पवारांनी व्यक्त केली. शहांच्या शब्दाला कवडीची किंमत नाही ठाकरे गटाचे नेते भास्करराव जाधव म्हणाले की, सभागृहात सत्ताधाऱ्यांचे वर्तन हे बेजबाबदार व नियमबाह्य आहे. भाजपचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दबंग नेते म्हणून ओळखले जातात. मात्र, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई त्यांच्या शब्दाला कवडीची किंमत देत नाही, हे त्यांच्या वारंवार केल्या जाणाऱ्या वादग्रस्त वक्तव्यावरून स्पष्ट झाले आहे. त्याचप्रमाणे आता अमित शहांच्याच अखत्यारित असलेल्या सीबीआयचा तपास शिंदे गट व भाजप नाकारत आहे. बसवराज बोम्मईंप्रमाणेच भाजप व शिंदे गटातील नेत्यांचाही अमित शहांवर विश्वास नाही का?, असा सवाल भास्करराव जाधवांनी केला.

विधानसभेत सत्ताधाऱ्यांचा गोंधळ:दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची चौकशी करा; नीतेश राणे, भरत गोगावले यांची मागणी

नागपूर -दिशा सालियान च्या संशयास्पद मृत्यूची पुन्हा चौकशी करावी, अशी मागणी आमदार नीतेश राणे आणि भरत गोगावले यांनी केली.या प्रकरणावरून आज विधानसभेत जोरदार गोंधळ झाला. सत्ताधाऱ्यांनीच हा प्रश्न उपस्थित करून आज गुरुवारी सभागृहात जोरदार गदारोळ केला. त्यामुळे विधानसभेचे कामकाज दोनदा तहकूब करावे लागले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूखंड वाटपाचा मुद्दा महाविकास आघाडीने काढला. त्यानंतर आता शिंदे गट आणि भाजपने सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण आणि दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केलाय. आमदार नीतेश राणे यांनी आज सकाळी सभागृहाबाहेर या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली.सुशांतसिंह प्रकरणी आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करावी. सुशातसिंह आत्महत्येची फाइल पुन्हा ओपन करावी. या प्रकरणी 8 जून रोजी काय झाले? या प्रकरणाचा तपास अधिकारी दोनवेळा का बदलला? सीसीटीव्ही का गायब झाले? व्हिजिटर बुकचे त्या दोन दिवसांची पाने का फाडली? या प्रश्नांची उत्तरे समोर येण्याची गरज राणे यांनी व्यक्त केली.

विधानसभेतही आमदार नीतेश राणे आणि भरत गोगावले यांनी सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण आणि दिशा सालियान मृत्यू प्रकरणावर प्रश्न उपस्थित केले. दिशा सालियानची केस मुंबई पोलिसांकडे आहे. आता मुख्यमंत्र्यांनी ती फाइल पुन्हा ओपन करावी. त्या रात्री नेमके काय घडले. तिथे कोण मंत्री उपस्थित होता. या प्रकरणात तपास अधिकारी का बदलला. या मृत्यू प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी केली.

दिशा सालियानचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट समोर न येणे हे प्रकरण गंभीर आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांनी करावी, अशी मागणी गोगावले आणि नीतेश राणे यांनी केली. दिशा सालियानाचा मृत्यू झाला त्या रात्री तिथे कोणता मंत्री उपस्थित होता, याची चौकशी करावी, अशी मागणी भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांनी विधानसभेत केली. याप्रकरणावरून विधानसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले.

वीस किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा विचार नाही – मंत्री दीपक केसरकर

0

नागपूर, दि. २२ : राज्यातील २० किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा कोणताही निर्णय शासनस्तरावर घेण्यात आलेला नाही, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. तसेच, लवकरच शिक्षक आणि शिक्षकेतर पद भरतीची प्रक्रिया वित्त विभागाच्या मान्यतेनंतर सुरू करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

विधानसभा सदस्य अमित देशमुख यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मंत्री श्री. केसरकर बोलत होते.

मंत्री श्री. केसरकर म्हणाले की, एक किलोमीटरच्या आत विद्यार्थ्यांसाठी शाळेची व्यवस्था असावी, तेथे दर्जेदार शिक्षण मिळावे, शिक्षणाचा अधिकार कायद्यांतर्गत आवश्यक सोयीसुविधा निश्चितपणे दिल्या जाव्यात यासाठी शासन प्रयत्नशील आहे. तसेच वीस किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेली कोणतीही शाळा बंद करण्याचा कोणताही विचार नाही, असे मंत्री श्री. केसरकर यांनी सांगितले.

इगतपुरी तालुक्यातील मौजे काळुस्ते गावानजीक भाम धरणामुळे दरेवाडीचे विस्थापन धरणापासून २.५ कि.मी. अंतरावर करण्यात आले आहे. या ठिकाणी सुसज्ज शाळा इमारत, संरक्षक भिंत, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व अन्य भौतिक सुविधा तसेच निकषानुसार तीन शिक्षक उपलब्ध आहेत. दरेवाडीतील अंदाजे ३५ कुटुंब हे भाम धरणालगत तात्पुरत्या दरेवाडी निवारा शेडमध्ये आश्रयाला होती. भाम धरणालगतच्या ३५ कुटुंबांचे घरांचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये या हेतूने तालुका प्रशासनाने वस्तीनजीकच निवारा शेडमध्ये विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची तात्पुरती सोय केली. त्यामध्ये एकूण ४३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी केलेली तात्पुरती व्यवस्था कायम ठेवण्यात येईल. याबाबत स्थानिक ग्रामस्थांशी विचारविनिमय करून त्यांना विश्वासात घेतले जाईल, असे मंत्री श्री. केसरकर यांनी सांगितले.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, २००९ मधील तरतुदींनुसार या निवारा शेडमध्ये तात्पुरत्या स्वरुपात सुरु असलेल्या शाळेच्या एक कि.मी. च्या परिसरात जिल्हा परिषदेच्या एकूण चार प्राथमिक शाळा उपलब्ध आहेत, अशी माहितीही मंत्री श्री. केसरकर यांनी दिली.

या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेत विधानसभा सदस्य बाळासाहेब थोरात, शेखर निकम यांनी सहभाग घेतला.

पदभरती प्रक्रिया लवकरच

शिक्षक आणि शिक्षकेतर पदभरतीच्या अनुषंगाने कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. सध्या एकूण रिक्त पदांच्या पन्नास टक्के पदभरती करण्याबाबत वित्त विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. याशिवाय, शाळेतील विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड लिंकिंगचे काम सध्या सरल प्रणाली अंतर्गत सुरू आहे. त्यामुळे एकूण विद्यार्थी संख्या निश्चितपणे कळेल. त्यानंतर एकूण आवश्यक शिक्षक संख्येची गरज लक्षात येऊन संपूर्ण पदभरती केली जाईल, अशी माहिती मंत्री श्री.केसरकर यांनी दिली.

००००

अनुसूचित जमाती प्रवर्गाची भरती प्रक्रिया कालबद्ध पद्धतीने राबविणार – मंत्री दीपक केसरकर यांची विधानपरिषदेत माहिती

0

नागपूर, दि.22: अनुसूचित जमातीच्या आरक्षणाच्या आधारे शासकीय सेवेत दाखल झालेल्या आणि त्यानंतर जातीचे प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या उमेदवारांना अधिसंख्य पदावर  कायम ठेवले आहे. यामध्ये आदिवासी उमेदवारावर कोणताही अन्याय होणार नाही याची खबरदारी घेऊन त्यांना त्वरित न्याय मिळावा म्हणून रिक्तपदे भरतीसाठी कालबद्ध पद्धतीने भरतीप्रक्रिया तातडीने राबवणार असल्याची माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत दिली.

अनुसूचित जमाती प्रवर्गातील जात प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या उमेदवारांना अधिसंख्य पदावर घेतल्याबाबत सदस्य आमश्या पाडवी यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती, लक्षवेधीला उत्तर देताना श्री. केसरकर बोलत होते.

मंत्री श्री.केसरकर यांनी सांगितले की, जात पडताळणीत अवैध ठरलेल्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील 3 हजार 898 उमेदवारांना राज्य शासनाने अधिसंख्य पदावर घेतले आहे. त्यांना पदोन्नती देण्यात येत नसल्याने बिंदूनामावलीत त्यांचा समावेश करता येत नाही. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सेवा अधिसंख्य पदावर वर्ग केल्याने रिक्त होणाऱ्या पदांसाठी विशेष भरती मोहीम राबविण्यात येणार आहे. ही अनुसूचित जमाती प्रवर्गाची  भरती प्रक्रिया कालबद्ध कार्यक्रम आखून सेवा प्रवेश नियमानुसार राबविण्यात येणार आहे.

राज्य शासनाने 75 हजार पदभरतीची कार्यवाही सुरू केली असून यामध्येही अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना सामावून घेतले जाणार आहे. यामुळे आदिवासी समाजातील उमेदवारांची मोठ्या प्रमाणात संधी मिळणार आहे.सध्या रिक्त असलेल्या पदांमधील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अखत्यारीतल पदे भरण्याची कार्यवाही 31 डिसेंबर 2023 पर्यंत आणि गट क व गट ड मधील पदे भरण्याची प्रक्रिया 31 जुलै 2023 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. या भरतीमध्ये आदिवासी समाजावर अन्याय होणार नाही याची ग्वाही श्री. केसरकर यांनी यावेळी दिली.

अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे ज्या शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांना अधिसंख्य पदावर वर्ग केले आहे अशा अधिकारी व कर्मचारी यांना सेवाविषयक तसेच सेवा निवृत्तीचे लाभ देण्याचाही निर्णय घेतला आहे. यामध्ये पदोन्नती व अनुकंपा धोरण याचा त्यांना लाभ मिळणार नाही. तसेच, अधिसंख्य पदावर कार्यरत शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना मानवतावादी दृष्टीकोनातून व त्यांनी केलेल्या सेवेचा विचार करुन एक दिवसाचा तांत्रिक खंड देऊन पुन्हा 11 महिन्यांच्या कालावधीसाठी त्यांच्या सेवा निवृत्तीपर्यंत सुरु ठेवण्यात येणार असल्याची माहिती श्री केसरकर यांनी दिली.

जात पडताळणी कुटुंबातील एकाची किंवा वडिलांची असेल तर कुटुंबातील इतर सदस्यांना जात पडताळणीबाबत योग्य निर्णय घेतला जाईल, असे एका उपप्रश्नाला उत्तर देताना श्री केसरकर यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत सर्वश्री सदस्य सचिन अहिर, महादेव जानकर, रमेश पाटील, जयंत पाटील, गोपीचंद पडळकर, अभिजित वंजारी, प्रवीण दटके यांनी सहभाग घेतला.

अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी मोफत सायबर सुरक्षा आणि डेटाबेस रिकव्हरी प्रशिक्षण

पुणे, दि. २१ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र पुणे यांच्यावतीने अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी दोन महिने कालावधीचे ‘सायबर सुरक्षा आणि डेटाबेस रिकव्हरी’ या विषयावरील मोफत प्रशिक्षणाचे आयोजन २६ डिसेंबर पासून करण्यात येणार आहे.

हे प्रशिक्षण अनिवासी हायटेक तांत्रिक उद्योजकता विकास कार्यक्रमाअंतर्गत होणार असून या प्रशिक्षणासाठी उमेदवार हा संगणक विज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकमुनिकेशन पदवीधारक असावा अथवा उमेदवाराने समतुल्य संगणकाचे शिक्षण पूर्ण केलेले असावे. प्रशिक्षणात संबंधित विषयाची तांत्रिक माहिती, उद्योजकता विकासाचा अभ्यासक्रम, उद्योग सुरु करण्याबाबतची माहिती, कर्ज प्रकरण, शासकीय अनुदान, प्रकल्प अहवाल, उद्योजकीय प्रेरणा प्रशिक्षण, बाजारपेठ इत्यादी माहिती दिली जाणार आहे.

प्रशिक्षणासाठी इच्छुक व पात्र लाभार्थ्यांनी २४ डिसेंबर पर्यंत ९८२२०६८१६५ किंवा ९४०३०७८७६५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे विभागीय अधिकारी मदन कुमार शेळके यांनी केले आहे.

माध्यमांनी दिलेली प्रसिद्धी आणि सोशल मीडियाचे लाईक्स यामुळे हे सगळे शेफारले-हे मी खपवून घेणार नाही:राज ठाकरेंनी ठणकावलं

पुणे-पुण्याच्या मनसे मध्ये रुपाली पाटलांच्या नंतर देखील मनसेला फुटीचे ,दुहीचे ग्रहण लागलेले असल्याचे वारंवार म्हटले जाते.मनसेच्या स्थानिक नेत्यांमध्ये असलेल्या मतभेदाने अधिक गडद होत चालल्याच्या बातम्याही अधूनमधून येत असतात.याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील प्रत्येकाने पक्षशिस्त पाळायलाच हवी ! या शीर्षकाखाली ट्विटर वर एक पत्र शेअर केले आहे.

या पत्रानंतर आता ते कोणाकोणाला लागू होतेय ? याबाबत चर्चा तर उसळली आहेच पण ज्यांना लागू होईल ते आता कोणता मार्ग निवडतात हे पाहणे म्हत्वाचे ठरणार आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर जाऊन गरळ ओकायची असेल तर आधी राजीनामा द्या आणि नंतर काय घाण करायची ती करा अशा शब्दांत मनसैनिकांना सुनावलं आहे. इतकंच नाही तर त्यांनी पक्षातून हकालपट्टी केली जाईल अशा इशाराही दिला आहे. राज ठाकरेंनी मनसैनिकांना पत्र लिहिलं असून सोशल मीडियावर शेअर केलं आहे. ही अंतिम ताकीद आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.

पत्रात काय लिहिलं आहे –

“सध्या माध्यमांसमोर किंवा सोशल मीडियावर जाऊन वाटेल ते बोलायचं, प्रसिद्धी मिळवायची असं करणाऱ्या उथळवीरांची भरती सगळ्याच पक्षात दिसून येत आहे. माध्यमांनी दिलेली प्रसिद्धी आणि सोशल मीडियाचे लाईक्स यामुळे हे सगळे शेफारले आहेत. इतर पक्षांनी अशा लोकांचं काय करावं हे त्यांनी ठरवावं. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत हे मी खपवून घेणार नाही,” असं राज ठाकरेंनी ठणकावलं आहे.

पुढे ते म्हणालेत की “माझ्या पक्षातल्या कोणालाही पक्षांतर्गत बाबींवर काही म्हणणं मांडायचं असेल तर संबंधित नेत्याशी बोला, माझ्याशी बोला. पण हे सोडून जर थेट माध्यमांशी बोलायचं असेल किंवा सोशल मीडियावर जाऊन गरळ ओकायची असेल तर आधी राजीनामा द्या. मग त्यानंतर काय घाण करायची असेल ती करा”.

“पक्षात राहून असे प्रकार केलेत, तर हकालपट्टी अटळ आहे हे लक्षात ठेवा,” असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे. ही समज नाही, तर अंतिम ताकीद आहे याची नोंद घ्या असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

देशभरातील रिक्षा टॅक्सी व टुरिस्ट परवानाधारक, टू व्हीलर टॅक्सी मुळे अडचणीत -: बाबा कांबळे

  • विभागीय आयुक्त सौरभ राव यांचे रिक्षा संघटनांसोबत बैठक

पुणे-टू व्हीलर रॅपिडो बाबत गुंतागुंतीचा प्रश्न निर्माण झाला असून या प्रश्नावर ठोस कारवाई होताना दिसत नाही. परिवहन विभागाने महाराष्ट्र शासनाला पत्र दिले आहे. ॲप तातडीने काढण्यासंदर्भात मागणी केली आहे. पुणे आरटीओने गुगल वितरण पत्र दिले आहेत. प्रशासकीय पातळीवरती आम्ही पूर्ण प्रयत्न करत असून मी लवकरच पुणे पोलीस आयुक्त यांच्याशी चर्चा करून या संदर्भामध्ये तातडीने निर्णय घेण्याचे आदेश देणार असल्याचे पुणे विभागीय आयुक्त म्हणाले. याबरोबरच राज्य सरकारच्या पातळीवरील प्रश्न सोडवले जातील. लवकरच संयुक्तपणे परिवहन आयुक्तांसोबत बैठक घेण्यात येईल. स्थानिक आरटीओच्या प्रश्नांसंदर्भात मीटर कॅरीबॅशनची मुदत तातडीने वाढविण्याचे आदेश मी आता लगेच देतो, असे आश्वासन विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिले.

रिक्षा चालकांच्या विविध प्रश्नांसाठी महाराष्ट्र रिक्षा पंचायत, राष्ट्रीय ऑटो टॅक्सी बस ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पुणे विधान भवन येथे आंदोलन करण्यात आले होते. मात्र वरील मागण्या संदर्भात ठोस कृती न झाल्यामुळे बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ विभागीय आयुक्तांना भेटून चर्चा केली.

या वेळी पुणे रिक्षा फेडरेशनचे अध्यक्ष आनंद तांबे, जय महाराष्ट्र रिक्षा संघटनेचे गुलाब सय्यद, ड्रायव्हर चालक-मालक संघटनेचे शिवा देशमुख, आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

या वेळी बाबा कांबळे म्हणाले की, आम्ही सातत्याने आंदोलन, मोर्चा करत आहोत. 19 डिसेंबर रोजी रिक्षा चालकांनी आंदोलन केल्याने गुन्हे दाखल झाले होते. तरीही रिक्षा चालक मोठ्या संख्येने आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. अनेक लोकांनी त्यांना सहभागी होऊ नका, असे सांगितले. तर काही लोकांनी सहभागी झाला तर पोलीस अटक करतील असेही सांगितले. तरी देखील रिक्षा चालक आपल्या आर्थिक परिस्थितीला कंटाळून आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत. त्यांना त्यांच्या कुटुंबाची परिवाराची काळजी आहे. अशा परिस्थितीमध्ये प्रशासनात देखील कायदेशीर बाजू लावून धरली पाहिजे. बेकायदेशीर टॅक्सी तातडीने बंद करून मोबाईल ऍप्लिकेशन मधून हटवल्या पाहिजे ही मागणी अत्यंत रास्त आहे. कल्याणकारी मंडळाचा मुद्दा अत्यंत रस्ता आहे. या सर्व मागण्या का मान्य होत नाही, हा प्रश्न आता रिक्षा चालकांना मोठ्या प्रमाणे भेडसावत असून या प्रश्नांवरती रिक्षा चालकांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे, असे बाबा कांबळे म्हणाले.
19 डिसेंबर रोजी आम्ही इशारा आंदोलन केला आहे. सरकारने आम्हाला हलक्यात घेऊ नये. अन्यथा दिल्ली, गुजरात, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, बिहारसह देशभरामध्ये एकाच वेळी चक्काजाम आंदोलन करू, असा इशारा देखील यावेळी बाबा कांबळे यांनी दिला.

पुणे पिंपरी चिंचवड शहरात गेल्या अनेक दिवसापासून आंदोलन सुरू आहे परंतु स्थानिक पातळीवरती हा प्रश्न सुटत नाहीये यामुळे केंद्र सरकारने कायदे केले व राज्य सरकारने याबद्दल योग्य भूमिका घेतली नाही यामुळे केंद्र आणि राज्य अशा दोन्ही पातळीवरती आपल्याला लढावे लागणार आहे हे रिक्षा चालकांनी समजून घ्यावे आता हा लढा आपल्याला देशव्यापी करावा लागणार आहे पुढचा आंदोलन दिल्ली आणि मुंबई येथेच केले पाहिजे असे बाबा कांबळे यावेळी म्हणाले.

या वेळी संघटनेने पुढील मागण्या मांडल्या –

१) रॅपिड मोबाईल आपलिकेशन मधून टू व्हीलर ची सुविधा हटवा.

२) रॅपिडो ओला उबेर कंपनीवर जनतेचे फसवणूक केली म्हणून फसवणुकीचा गुन्हा दाखल करा.

३) मान्यता नसताना टू व्हीलर टॅक्सी व्यवसाय करत असेल तर ही सेवा बेकायदेशीर म्हणून घोषित करा.

४) रिक्षा चालक मालकांसाठी प्रलंबित असलेले कल्याणकारी महामंडळ तातडीने घोषित करा.

५) मुक्त रिक्षा परवाना बंद करा ई रिक्षाला परवाना सक्तीचा करा.

६) पिंपरी चिंचवड पुणे येथे मीटर कॅरीबॅॅशनची मुदत 30 जानेवारीपर्यंत वाढवा.

गोळवलकर गुरुजी विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

पुणे-

डीईएस मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त भगवान श्रीकृष्णाच्या जीवनातील महत्त्वाच्या प्रसंगांचे ‘कृष्णायन’ या नृत्य, नाट्यप्रवेशाच्या माध्यमातून सादरीकरण करण्यात आले. गीताधर्म मंडळाचे अध्यक्ष डॉ. मुकुंद दातार, कीर्तनकार चारूदत्त आफळे, सारिका वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती. डीईएसचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे अध्यक्षस्थानी होते. 
दातार म्हणाले, ‘केवळ वैयक्तिक विचार न करता समाज म्हणून विचार करावा हे श्रीकृष्णाचे तत्त्वज्ञान आचरणात आणण्याची आवश्यकता आहे. राष्ट्र म्हणून पिढी घडविण्यासाठी हे तत्त्वज्ञान उपयुक्त ठरेल.’
शाला समितीचे अध्यक्ष मिलींद कांबळे, मुख्याध्यापिका मंजुषा खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रज्ञा पोतदार, वरदा पटवर्धन, प्रसाद लागू, अपर्णा माने, पल्लवी पवार, स्मिता नाईक, विकास दिग्रसकर यांनी संयोजन केले.

रानडे बालक मंदिर शाळेत स्नेहसंमेलन
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यायमूर्ती रानडे बालक मंदिर शाळेत ‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’ या संकल्पनेवर वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. माँ तुझे सलाम, हर घर तिरंग, मम देशो भारत, ए वतन मेरे वतन आदी देशभक्तिपर गाण्यांवर नृत्य सादर करण्यात आली. विविध राज्यांच्या पारंपरिक वेशभूषा करून विविधतेतून एकात्मतेचे दर्शन घडविले.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे अध्यक्षस्थानी होते. डॉ. अनंत निमकर, चारूदत्त निमकर, शाला समिती अध्यक्षा राजश्री ठाकर मुख्याध्यापिका अमिता दाते यांच्या मार्गदर्शनाखाली हर्षाली अवसरे, श्रद्धा खोले यांनी संयोजन केले.

महिंद्रा तर्फे आपल्या पहिल्या ई-एसयूव्ही XUV400 साठी मेटाव्हर्स प्लॅटफॉर्म XUV400 व्हर्स सादर

सखोल ब्रँड अनुभव प्रदान करण्यासाठी मिलेनियल आणि जेन-झेड ग्राहकांपर्यंत पोहोच मजबूत करण्याचे उद्दिष्ट

मुंबई, २१ डिसेंबर २०२२: भारतातील आघाडीची SUV उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्राने आज Metadome.ai द्वारे समर्थित आभासी जगात महिंद्राच्या ऑल-इलेक्ट्रिक XUV400 साठी मेटाव्हर्स प्लॅटफॉर्म XUV400verse चे अनावरण केले. फोटोरिअलिस्टिक ग्राफिक्सने परिपूर्ण अद्वितीय ग्राहक अनुभव प्रदान करण्यासाठी ब्रँडच्या व्हर्च्युअल स्पेसना एकत्रित करून प्लॅटफॉर्म एक युनिव्हर्स म्हणून काम करेल. XUV400verse महिंद्राच्या उत्साही ग्राहकांना गुंतवून ठेवण्यास, सहयोग करण्यास, एकत्र येण्यास सक्षम करेल आणि सखोल उत्पादन चर्चा होऊ शकेल.

महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या ऑटोमोटिव्ह सेक्टरचे अध्यक्ष विजय नाकरा म्हणाले,  “XUV400verse आम्हाला उत्कृष्ट ग्राहक अनुभव निर्माण करण्यास सक्षम करेल. आम्ही आमच्या तरुण SUV खरेदीदारांच्या समुदायाला आणि उत्साही व्यक्तींना त्यांच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत त्यांच्या घरच्या आरामदायी वातावरणातून या अनुभवासाठी आमंत्रित करतो. आम्ही नाविन्यपूर्ण आणि सखोल अनुभव देत आमच्या तंत्रज्ञान-जाणकार ग्राहकांच्या पुढच्या पिढीला सुसंगत वातावरण प्रदान करत आहोत.”

XUV400verse मध्ये ग्राहकांना त्यांची सर्जनशीलता जोखण्यासाठी ब्रँड अद्वितीय अनुभव प्रदान करेल जसे की:

·         व्हर्च्युअल ब्रँड शोरूम: सखोल व्हर्च्युअल शोरूमचे महिंद्राच्या ओळखीशी मजबूत साम्य आहे. शोरूममध्ये गाइडेड आणि फ्री-रोम प्रवास,  ध्वनी परस्परसंवादी अवतारांसह एलईडी वॉल शोकेसिंग (लाइव्ह आणि नॉन-प्लेअर कॅरेक्टर्स एनपीसी) आणि ब्रँड-लेड मर्चेंडाईज आणि अॅक्सेसरीजसह भविष्यकालीन डिझाइन आहे.

·         तुमचा स्वतःचा अवतार सानुकूलित करा: XUV400verse मधील अभ्यागत त्यांचे स्वतःचे अवतार तयार करू शकतात आणि त्यात सामील होऊ शकतात आणि त्यांच्या मित्रांना आणि कुटुंबियांना सामायिक अनुभवासाठी आमंत्रित देखील करू शकतात.

·         हायपर-रिअलिस्टिक ३ डी कार कॉन्फिगरेटर: वापरकर्ते हायपर-रिअलिस्टिक ३ डी कार कॉन्फिग्युरेटरसह सहभागी होऊ शकतात, जे रिअल-टाइम कस्टमायझेशन सक्षम करते, रंग बदलू शकतात आणि SUV वैशिटयांचा इमर्सिव्ह फॉरमॅटमध्ये मागोवा घेऊ शकतात.

व्हर्च्युअल टेस्ट-ड्राइव्ह: XUV400verse मल्टिपल मोड्स आणि कॅमेरा व्ह्यूजसह अशा प्रकारची पहिलीच व्हर्च्युअल टेस्ट ड्राइव्ह देखील होस्ट करते जिथे वापरकर्ता गेमिफाइड पद्धतीने SUV च्या ठळक वैशिष्ट्यांबद्दल जाणून घेऊ शकतो. तसेच ब्रँड बिलबोर्ड आणि मोहक सिनेमॅटिक्ससह वातावरण निर्मिती देखील करता येते.

हा प्लॅटफॉर्म उत्कृष्ट उत्पादन परस्परसंवाद प्रस्थापित करतो आणि ग्राहक-प्रथम दृष्टिकोनासाठी महिंद्राची वचनबद्धता प्रतिबिंबित करतो.

आता एकाच वेळी सहा विद्यापीठांची पदवी आपण घेऊ शकतो – चंद्रकांत पाटील यांची सभागृहात माहिती

0

नागपूर -आज हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नवीन शैक्षणिक धोरणाविषयी माहिती दिली. देशात स्वायत्त महाविद्यालये आणि स्वायत्त विद्यापीठ तयार व्हावेत, हा आग्रह पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी धरला होता. यापूर्वी एकावेळी एकाच विद्यापीठाची पदवी आपण घेऊ शकत होतो, मात्र आता एकाच वेळी सहा विद्यापीठांची पदवी आपण घेऊ शकतो, अशी माहिती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सभागृहात दिली. 

चंद्रकांत पाटील यांनी यावेळी म्हटले कि, महाराष्ट्रामध्ये नवीन शैक्षणिक धोरणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो आग्रह धरला कि, हळूहळू स्वायत्त महाविद्यालय आणि स्वायत्त विद्यापीठ तयार व्हावीत कि ज्यामुळे अभ्यासक्रमातील म्हणजे एकच अभ्यासक्रम वर्षांनुवर्षे शिकवले जातात हा जो भाग आहे त्यामध्ये प्रयोगांना परवानगी देण्यात आली.  ज्यामध्ये आता १२ वी नंतर  तीन वर्षाची डिग्री आता चार वर्षांची करण्यात आली आहे. ज्यामध्ये मल्टी एंन्ट्री आणि मल्टी एक्सिट ठेवली आहे. यामध्ये दोन वर्ष तुम्ही अभ्यासक्रम थांबवून काही वर्षांच्या गॅप नंतर पुन्हा अभ्यासक्रम जॉईन  करू शकता. दोन वर्षांमध्ये तुम्ही जो कोर्स पूर्ण केला त्याचे क्रेडिट तुमच्या डिजिटल लॉकरमध्ये जमा होतात. आता जगातल्या सगळ्या विद्यापीठांचा एमओयू पूर्ण होत आला. ज्याच्या आधारावर आपल्या देशात दोन वर्ष पूर्ण केलेले क्रेडिट घेऊन  परदेशातल्या विद्यापीठामध्ये प्रवेश घेऊ शकता. तुम्ही तिथे पुढचं शिक्षण घेऊ शकता, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. 

एका वेळेला आपण एकाच विद्यापीठाची पदवी घेऊ शकत होतो, आता एका वेळेला तुम्ही सहा सहा विद्यापीठांच्या पदव्या घेऊ शकता. आता ग्रॅज्युएशन नंतर पण पीएचडी करू शकता अशी शिक्षणामध्ये एका अर्थाने सुकरता आणण्याचा जो प्रयत्न सुरु आहे त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जवजवळ १४० कॉलेजेसना स्वायत्त महाविद्यालय म्हणून आपण परवानगी दिली आहे, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

हिवाळी अधिवेशनासाठी ‘महा असेंब्ली’ ॲप; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ॲपचा प्रारंभ

0

नागपूर, दि. २१ : अधिवेशन काळात मंत्री व आमदारांना एका क्लिकवर अधिवेशनासंबंधी सर्व माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या ‘महा असेंब्ली’ या मोबाईल ॲपचा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विधान भवन येथे हा कार्यक्रम झाला.

विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी व जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली या विशेष ॲपची निर्मिती करण्यात आली आहे. अॅपच्या निर्मितीसाठी जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयातर्फे विशेष सहाय्य करण्यात आले आहे. या अॅपचे आज लोकार्पण करण्यात  आले. सध्या प्रायोगिक तत्वावर गुगल प्ले स्टोअरवर अॅप उपलब्ध असून मंत्री, आमदार आणि सचिवांसाठी ते उपलब्ध होऊ शकेल. येणाऱ्या काळात या ॲपमध्ये अधिक सुधारणा आणि माहिती समाविष्ट करण्यात येणार आहे.

याप्रसंगी विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत, नागपूरचे जिल्हाधिकारी विपीन इटनकर, नागपूर जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, ॲपची निर्मिती करणाऱ्या सेटट्राईबचे संचालक सारंग प्रदीप वाकोडीकर आदी मान्यवर उपस्थित होते.

‘महा असेंब्ली’ अॅपद्वारे अधिवेशन दैनंदिनी, अधिवेशन काळात आयोजित विविध बैठकांचा तपशील, महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक असणारी निर्देशिका, निवास व्यवस्थेबद्दल परिपूर्ण माहिती एका क्लिकवर अधिवेशन काळात उपलब्ध होऊ शकणार आहे. या अधिवेशन काळात प्रायोगिक तत्वावर वापर केला जाणार असून पुढील काळात नवनवीन सुविधायुक्त असे ॲप उपलब्ध होणार आहे.

अॅपचे सादरीकरण राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्या उपस्थितीत करण्यात आले असून त्यांनी या संकल्पनेचे व अॅपचे कौतुक केले आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या अॅपचा आढावा घेऊन हे अॅप महत्त्वपूर्ण ठरेल, अशी भावना व्यक्त केली.

अॅपची निर्मिती नांदेड जिल्ह्यातील किनवट या आदिवासीबहुल तालुक्यात कार्यरत सेटट्राईब या आयटी कंपनीच्या ग्रामीण विद्यार्थ्यांनी केली आहे. सेटट्राईबचे संचालक सारंग प्रदीप वाकोडीकर यांना स्टार्टअप यात्रा या उपक्रमात ई-प्रशासन प्रकारामध्ये राज्यस्तरीय विजेता म्हणून नुकताच पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे ग्लोबल क्वालिटी स्किल या अॅपच्या निमित्ताने जगासमोर आले आहे.

अथक परिश्रम घेऊन सेटट्राईबच्या विद्यार्थ्यांनी केवळ चार दिवसात परिपूर्ण असे अॅप तयार करून ते कार्यान्वित केले असून त्यांना महाराष्ट्र इनोव्हेशन सोसायटीचे विशेष मार्गदर्शन लाभले असल्याचे श्री.वाकोडीकर म्हणाले.

मदर सपोर्ट ग्रुपची पुण्यात स्थापना:मातांसाठी शनिवारी पुण्यात होणार कार्यशाळा

  • उमरजी मदर अँड चाईल्ड केअर हॉस्पिटलचा पुढाकार

पुणे, 20 डिसेंबर-
वंध्यत्वावरील उपचारानंतर प्रसूती, प्रसूती नैसर्गिक की सिझेरियन, बाळाला दूध पाजताना येणाऱ्या अडचणी आणि डिलिव्हरीनंतर येणारे नैराश्य यासारख्या विविध प्रश्नांबाबत मातांना मार्गदर्शन करण्यासाठी उमरजी मदर अँड चाईल्ड केअर हॉस्पिटलच्या पुढाकाराने मदर सपोर्ट ग्रुप स्थापन करण्यात आला आहे.
येत्या शनिवारी (दि.२४ डिसेंबर) पुण्यातील बोट क्लब येथे सकाळी दहा ते दुपारी एक वाजेदरम्यान या सपोर्ट ग्रुपची कार्यशाळा आयोजित केली आहे. यामध्ये विविध वर्गातील मातांना प्रसूती पूर्व आणि प्रसूतीनंतर नेमकी कोणती काळजी घ्यावी यासाठी मातांचा सपोर्ट ग्रुप तसेच स्त्री रोग तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
उमरजी मदर अँड चाईल्ड केअर हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. चिन्मय उमरजी यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, ‘वंध्यत्वावरील उपचारानंतर त्यांची प्रसूती कशा पद्धतीने असते. त्यांची काही आव्हाने आहेत का? त्यांना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी लागते यासंदर्भात २३ डिसेंबरला स्त्री रोग तज्ज्ञांशी चर्चा केली जाणार आहे. त्याशिवाय २४ डिसेंबरला (शनिवारी) विविध समस्यांना सामोरे गेलेल्या मातांचा सपोर्ट ग्रुप आहेत. त्या चार प्रकारच्या मदर सपोर्ट ग्रुपची कार्यशाळा आयोजित केली आहे. त्यामध्ये सुमारे ५० महिला सहभागी होणार आहेत. नवी दिल्लीचे ज्येष्ठ रेडिओलॉजिस्ट डॉ. अशोक खुराना आणि ज्येष्ठ स्त्री रोग तज्ज्ञ आणि हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. मुक्ता उमरजी यावेळी मातांना मार्गदर्शन करणार आहेत.’
डॉ. उमरजी म्हणाले, ‘सध्या चार प्रकारच्या मदर्सचा सपोर्ट ग्रुप आहे. त्यामध्ये आई आणि बाळामध्ये काही दोष असल्यास त्यांच्या आजाराचे निदान करण्याचे मोठे आव्हान होते. आता उपचारानंतर आई आणि बाळ सुखरुप आहेत. त्या दोघांचे ही सुरळीत सुरु आहे अशा मातांचा पहिला ग्रुप. दुसऱ्या गटात डिलिव्हरीनंतर बाळासह आईची कोणती काळजी घेतली पाहिजे. कोणत्या गोष्टी करायच्या तसेच डिलिव्हरीनंतर नैराश्य येते किंवा बाळाला दूध पाजताना काही अडचणी येतात अशा महिलांचा समावेश आहे. या समस्यांना तोंड दिलेल्या महिला दुसऱ्या मातांना मार्गदर्शन करणार आहेत. ‘बस्टिंग द मिथ्य्स’ म्हणजे प्रसूतीबाबत काही गैरसमज आहेत. त्यात नाळ असेल किंवा बाळाने पोटात शी केली तर सिझर करायला हवे, छोटे बाळ आहे तर सिझर करावे लागेल किंवा बाळाच्या हृदयात जन्मजात दोष आहे तर ते टर्मिनेट करायला हवे अशा प्रकारच्या छोट्या छोट्या गोष्टींबाबत गैरसमज आहेत. त्यांचा एक सपोर्ट ग्रुप आहे. त्याशिवाय नैसर्गिक जन्म सहज शक्य असतो. अशा वर्गातील महिलांना गर्भधारणेसाठी फारसे काही उपचार करावे लागत नाही अशा चार प्रकारच्या मातांचा सपोर्ट ग्रुप आहे. त्याशिवाय या कार्यशाळेत जुळ्या बाळांच्या जन्माबाबत काही गुंतागुंत निर्माण होते. त्या गुंतागुंतीनंतर काय काळजी घ्यावी याबाबतही या कार्यशाळेत मार्गदर्शन केले जाणार आहे.
सर्व वर्गातील महिला आपला आलेला अनुभव शेअर करणार आहेत. तसेच सध्या समस्यांना तोंड देणाऱ्या महिला रुग्णांना मार्गदर्शन करणार आहेत, असेही डॉ. उमरजी यांनी सांगितले.

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त प्रदर्शनाचे आयोजन

पुणे, दि. २१: राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त २३ डिसेंबर रोजी विविध शासकीय कार्यालयाद्वारे राबविण्यात येणाऱ्या योजना व तक्रार निवारण प्रणालीबाबत माहिती देणारे प्रदर्शन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आयोजित करण्यात येणार आहे.

या प्रदर्शनात वस्तू व सेवा खरेदी करताना दर्जा तसेच वजन मापामध्ये होणाऱ्या फसवणुकीपासून सावधानता बाळगणे, ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण व संवर्धन, ग्राहकांच्या जबाबदाऱ्या, कर्तव्य आदीबाबत जागरूकता येण्याच्यादृष्टीने संदेश देणारे विविध शासकीय कार्यालयाचे स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. नागरिकांनी प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने यांनी केले आहे.