Home Blog Page 1487

भारतीय रेल्वेद्वारे सिमेन्स इंडिया कंपनीला 9000 एचपी इलेक्ट्रिक मालवाहू लोकोमोटीव्ह (इंजिन) तयार करण्याचे कंत्राट

भारतीय रेल्वेनं सिमेन्स इंडियाला, 9000 एचपी इलेक्ट्रिक मालवाहू लोकोमोटीव्ह म्हणजे इंजिन तयार करण्यासाठीचे कंत्राट दिले आहे. दाहोदच्या रेल्वेच्या कारखान्यात 1200 उच्च अश्वशक्तिची (9000 एचपी) ही इलेक्ट्रिक रेल्वे इंजिन  पुढच्या 11 वर्षांसाठी तयार केले जातील.

या अंतर्गत 1200 लोकोमोटिव्हचे उत्पादन आणि पुढची 35 वर्षे या लोकोमोटिव्हची देखभाल केली जाणार आहे. कर आणि किमतीतील फरक वगळता या कंत्राटाचे अंदाजे मूल्य 26000 कोटी (सुमारे 3.2 अब्ज डॉलर्स) इतके आहे.

ह्या कंत्राटाचे पत्र जारी झाल्यानंतर 30 दिवसांत,  सिमेन्स इंडिया सोबत, एका करारावर स्वाक्षऱ्या केल्या जातील. येत्या दोन वर्षात, नमूना इंजिन तयार करून दिले जातील. तसेच, या लोकोमोटीव्हचे उत्पादन करण्यासाठी, दोन वर्षात दाहोदचा कारखाना पूर्णपणे तयार केला जाईल. त्यासाठी, तंत्रज्ञान भागीदार म्हणून निवड करण्यात आलेली सिमेन्स कंपनी, दाहोद इथे, ही इंजिने तयार करेल आणि विशाखापट्टणम, रायपूर, खरगपूर आणि पुणे या चार ठिकाणी असलेल्या देखभाल आणि दुरुस्ती डेपो मध्ये पुढची 35 वर्षे त्यांची देखभाल करण्याचे कामही हीच कंपनी करेल, त्यासाठी रेल्वेचे मनुष्यबळ वापरले जाईल.

या उत्पादनाचे संपूर्ण स्वदेशीकरण सुनिश्चित झाल्यावर इथल्या सहाय्यक/पूरक उत्पादन युनिट्सचा विकास होईल आणि तो खऱ्या अर्थाने ‘मेक इन इंडिया’ चा उपक्रम ठरेल. या प्रकल्पामुळे दाहोद क्षेत्राचा विकास होऊन रोजगार निर्मिती होईल.

हे उच्च अश्वशक्तिचे इंजिन्स (9000 HP) भारतीय रेल्वेवरील मालवाहतुकीसाठी भविष्यातील कार्यशक्ती ठरतील. हे इंजिन प्रामुख्याने 4500 टन कंटेनर मालवाहू गाड्या 75 किमी प्रतितास या 200 ग्रेडियंटमध्ये एक मध्ये दुहेरी स्टॅक कॉन्फिगरेशनमध्ये नेण्यासाठी वापरण्यासाठी उपयुक्त ठरतील. या इंजिनामुळे अशा मालवाहू गाड्यांची सरासरी गती, विद्यमान 20-25 किमी प्रतितासांपासून  सुमारे 50-60 किमी प्रतितास पर्यंत वाढणे अपेक्षित आहे.

मालवाहू रेल्वेच्या कार्यान्वयानात झालेली ही लक्षणीय सुधारणा, उत्पादकता आणि रेल्वेलाइन क्षमता देखील वाढवेल. अत्याधुनिक IGBT आधारित प्रोपल्शन तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेले हे इंजिन पुनर्जीवन ब्रेकिंग तंत्रज्ञानामुळे ऊर्जावापरात बचत करणारेही ठरतील.

प्रांजल, पूर्वा, अनुश्री तिसऱ्या फेरीत

अमनोरा-पीवायसी एचटीबीए कप बॅडमिंटन स्पर्धा ; हवेली तालुका बॅडमिंटन संघटना आणि पीवायसी  हिंदू जिमखाना क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
पुणे: हवेली तालुका बॅडमिंटन संघटना (एचटीबीए) आणि पीवायसी हिंदू जिमखाना क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अमनोरा-पीवायसी एचटीबीए बॅडमिंटन कप अजिंक्यपद स्पर्धेत प्रांजल सातपुते, अनुश्री वैरागडे, पूर्वा मुंडाळे यांनी १५ वर्षांखालील मुलींच्या एकेरीतून तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.
पीवायसी हिंदू जिमखान्याच्या बॅडमिंटन कोर्टवर ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील १५ वर्षांखालील मुलींच्या एकेरीच्या दुसऱ्या फेरीत पूर्वा मुंडाळेने जेनिशा नागवाणीवर १५-६, १५-४ असा, तर अनुश्री वैरागडेने प्रणाली डोईफोडेवर १०-१५, १५-६, १५-१३ असा, तर प्रांजल सातपुतेने ईरा कुलकर्णीवर १५-७, १५-६ असा विजय मिळवला. प्राजक्ता गायकवाडने आरोही जोगळेकरला १५-९, १५-११ असे, तर राधा गाडगीळने चौथ्या मानांकित जुई जाधवला १५-११, १५-१३ असा धक्का दिला. पूर्वा वाडेकरने अंजली कुलकर्णीला १५-१३, १५-६ असे, शर्वरी सुरवसेने अलिशा आव्हाडला १५-१३, १५-१३ असे नमविले.

श्रेयस, सार्थकची आगेकूच
स्पर्धेतील १५ वर्षांखालील मुलांच्या एकेरीच्या तिसऱ्या फेरीत दुसऱ्या मानांकित सार्थक पाटणकरने वेद घारडेवर १५-४, १५-४ असा, ईशान आगाशेने प्रतिबिंब जैनवर १५-१३, १५-१० असा, तर अर्जुन देशपांडेने शर्वील जुमदेवर १५-१, १५-६ असा विजय मिळवला. मिहीर जोशीने वीनित खाडिलकरला १५-१०, १५-१० असे, ओम दरेकरने ऋग्वेद भोसलेला १५-११, १५-९ असे, ऋषभ दुबेने वरद लांडगेला १७-१५, ७-१५, १५-७ असे नमविले. अरविंद हजारेने तेजस खरेवर १५-११, १५-१० अशी, श्रेयस लागूने माहिराज राणावर १५-१२, १२-१५, १५-७ अशी, आदित्य शिंदेने अद्वैत अभ्यंकरवर १५-५, १५-५ अशी मात करून चौथ्या फेरीत प्रवेश केला.

निकाल :
पुरुष एकेरी – दुसरी फेरी –
 विनीत कांबळे वि. वि. सौरव ठाकूर १५-३, १५-९; जयंत कुलकर्णी वि. वि. हृषीकेश खाडिलकर १९-१७, १५-१२; अथर्व चव्हाण वि. वि. नितिश जाधव १५-८, १५-५; विपूल अन्वेकर वि. वि. किरण पाटील १५-७, १५-६; ओंकार साळकर वि. वि. प्रथमेश बेलदरे १५-१०, १४-१६, १५-९; वेंकटेश अगरवाल वि. वि. मिमांशू गोगोई १५-९, १५-११; जयेश महाजन वि. वि. ऋत्विक वाळिंबे १५-५, १५-५; शौनक कुलकर्णी वि. वि. सुशांत पाटील १५-८, १५-९; अभिजित कदम वि. वि. आनंद साबू १५-६, १५-४; चिराग भगत वि. वि. हर्षल जानेराव १५-९, १५-१०; प्रतीक धर्माधिकारी वि. वि. गणेश जाधव १५-३, १५-३.
११ वर्षांखालील मुले – दुसरी फेरी – मिहीर इंगळे वि. वि. अनिर्वान भुतळा १५-६, १५-८; अनय इंगळहळीकर वि. वि. वेद अकोलकर १५-७, १२-१५, १५-११; अन्वय उरुणकर वि. वि. सिद्धान्त बराटे १५-१०, १४-१२; शर्मन सपकाळ वि. वि. समर आगाशे १५-९, १५-८; दियान पारेख वि. वि. सुधान्व कुलकर्णी १५-६, १५-३; अनुज भोसले वि. वि. पार्थ पाटील १५-१२, १५-३; अन्वय समग वि. वि. कबिर तांबे १५-३, १५-६; शौर्य खरात वि. वि. आरव मारणे १५-४, १५-५.
१३ वर्षांखालील मुले – दुसरी फेरी – मिहीर कोकीळ वि. वि. अथर्व गवळी १५-२, १५-४; समर जोशी वि. वि. सहर्ष आंबेकर १५-१२, ९-१५, १५-१२; ध्रुव भोळे वि. वि. अयांश यारगट्टी १५-६, १५-१२; अधिराज गांगुर्डे वि. वि. रेयश चौधरी १५-९, १५-९; आरुष अरोरा वि. वि. अर्जुन श्रीगडिवार १५-८, १५-११; ध्रुव बर्वे १५-६, १५-११; ईशान राजे वि. वि. रियान करंदीकर १५-५, १५-१२.
१३ वर्षांखालील मुली – दुसरी फेरी – सोयरा शेलार वि. वि. पार्थी कुमावत १५-१, १५-२; मुद्रा मोहिते वि. वि. रेवा सुभेदार १५-४, १५-२; सानिका देशपांडे वि. वि. उत्कर्षा शर्मा १५-६, १५-५; सानिका बागले वि. वि. वीरा पानसे १५-११, १५-११; आयुषी मुंडे वि. वि. रिधिमा जोशी १५-९, १५-९; स्वरा शाळिग्राम वि. वि. मिहिका पाठक १५-७, १५-९; आराध्या ढेरे वि. वि. रिया डिचोळकर १५-११, १५-८; अनुशा सुजान वि. वि. चारुता गोडबोले १५-२, १५-६.

पुण्याच्या विपणन आणि निरीक्षण संचालनालय कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा

पुणे-केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अखत्यारीतील, विपणन आणि निरीक्षण संचालनालयाने आज राष्ट्रीय सेवा योजना (NSS), कृषी महाविद्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. शिरनामे सभागृह, कृषी महाविद्यालय, शिवाजी नगर, पुणे येथे राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा केला.

यानिमित्त, तूप, तेल, मध, दळलेले  मसाले इत्यादी अॅगमार्क(Agmark) प्रमाणित उत्पादनांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. अॅगमार्क हे कृषी उत्पादन (ग्रेडिंग आणि मार्किंग) कायदा, 1937 अंतर्गत विपणन आणि निरीक्षण  संचालनालयाद्वारे लागू करण्यात आलेले  गुणवत्ता प्रमाणन चिन्ह आहे.

पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष उमेश विठ्ठलराव जावळीकर यांच्या हस्ते, या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. विपणन व निरीक्षण संचालनालयाचे सहाय्यक कृषी पणन सल्लागार संजय मेहरा यांनी प्रमुख पाहुणे आणि इतर मान्यवरांचे स्वागत केले.

या प्रदर्शनात, 20 अॅगमार्क पॅकर्स/उत्पादकांनी त्यांची उत्पादने प्रदर्शित केली आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विपणन व निरीक्षण संचालनालयाचे उप कृषी विपणन सल्लागार बी.के. जोशी होते. तर पुण्याच्या कृषी महाविद्यालयांचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनील मासळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

या प्रदर्शनाला सुमारे 300 पर्यटकांनी भेट दिली. प्रमुख पाहुण्यांनी दरवर्षी 24 डिसेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय ग्राहक दिनाचे  महत्त्व विशद केले.

जी 20 साठी भाजपची प्रदेश समिती: ‘प्रदेश संयोजक’ म्हणून राजेश पांडे यांची नियुक्ती

पुणे-जी 20 परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात होणाऱ्या भाजपच्या कार्यक्रमांचे ‘प्रदेश संयोजक’ म्हणून राजेश पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नियुक्तीचे पत्र दिले.

वसुधैव कुटुम्बकम् : ‘एक वसुंधरा, एक कुटुंब आणि एक भविष्य’ या संकल्पनेवर आधारित असलेल्या G 20 शिखर परिषदेचे अध्यक्षपद यंदा भारत देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मिळाले आहे. या विषयी जनजागृती करणे आणि लोकसहभागाची प्रदेश भाजपच्या वतीने विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येत आहे. त्याच्या आयोजनासाठी पांडे यांची प्रदेश संयोजक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीत आमदार राणा जगजीतसिंह पाटील, आमदार अमरीशभाई पटेल, आमदार निरंजन डावखरे, शायना एन सी, खासदार डॉ. अनिल बोंडे, डॉ.अजित गोपछडे, प्रदीप पेशकर, श्वेता शालिनी, दयाशंकर तिवारी या सदस्यांचा समावेश आहे.

शर्तीचे प्रयत्न करेल-राजेश पांडे
नवीन जबाबदारी स्वीकारताना आतापर्यंतच्या माझ्या ४० वर्षाच्या संघटन कौशल्याचा उपयोग करून राज्यभरात होणारे G-२० परिषदेचे सर्व कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता नक्कीच शर्तीचे प्रयत्न करेल. G20 यशस्वी करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाची मदत लागणार आहे. प्रत्येक भारतीयाने जी-२० च्या निमित्ताने राजकारण, पक्षभेद बाजूला ठेवून यात सहभागी व्हावे. उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष . चंद्रशेखर बावनकुळे आणि पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी माझ्यावर ही मोठ मोठी जबाबदारी सोपविली, त्यांच्या प्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो.

..अन्यथा फडणवीस उपमुख्यमंत्रीपदीही राहणार नाहीत-भाजपानेते सुब्रमण्यम स्वामींचा थेट इशारा

शिंदे-फडणवीस सरकार अनैतिक

पंढरपूर -कोणत्याही स्थितीत पंढरपूर कॉरिडोर होऊ देणार नाही, असा इशाराच भाजप नेते व माजी केंद्रीय मंत्री सुब्रमण्यम स्वामी यांनी आज राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला दिला.तसेच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्यावर आव्हान देऊ नये. अन्यथा देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्रीही राहणार नाहीत, असा घरचा आहेर सुब्रमण्यम स्वामी यांनी दिला.पंढरपूर कॉरिडॉरला विरोध करण्यासाठी सुब्रमण्यम स्वामी आज पंढरपुरात दाखल झाले आहेत. आज पंढरपुरात सुब्रमण्यम स्वामी यांनी नागरिकांची भेट घेत पंढरपूर कॉरिडॉरला नागरिकांचा नेमका विरोध का आहे? हे समजून घेतले. यावेळी पत्रकारांशी बोलताना सुब्रमण्यम स्वामी म्हणाले, पंढरपुरात सर्व देशवासियांचे श्रद्धास्थान असलेले विठ्ठल मंदिर आहे. कॉरिडॉरऐवजी येथील पायाभूत सुविधांचा आधी सरकराने विकास करायला हवा.

सुब्रमण्यम स्वामी म्हणाले, पंढरपुरात विमानतळ होणे गरजेचे आहे. कारण देशभरातून लाखो भाविक पंढरपुरात येत असतात. येथील चंद्रभागा नदी अतिशय प्रदुषित झाली आहे. आधी तिची स्वच्छता होणे गरजेचे आहे. मात्र, या सर्वांकडे दुर्लक्ष करत देवेंद्र फडणवीसांचे सरकार स्थानिकांवर कॉरिडॉर लादत आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच पंढरपूर कॉरिडॉर होणार, असे वक्तव्य केले आहे. याचा समाचार घेताना सुब्रमण्यम स्वामी म्हणाले, प्रकल्पाबाबत सध्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. तरीही स्थानिकांवर हा प्रकल्प लादल्यास देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीही राहणार नाहीत. या सरकारने अहंकारात काहीही करू नये. त्याऐवजी पंढरपूर सुंदर करण्यावर त्यांनी भर द्यावाराज्यातील शिंदे-फडणवीस सरकारबाबत सुब्रमण्यम स्वामी म्हणाले, राज्यात एक पक्ष मोडून-तोडून शिंदे-फडणवीस सरकार बनवण्यात आलेले आहे. हे अनैतिक आहे.

2023 च्‍या हंगामासाठी खोबऱ्याच्या किमान आधारभूत किमतींना मंत्रिमंडळाची मंजुरी

0

नवी दिल्ली, 23 डिसेंबर 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या अध्‍यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीची झालेल्या बैठकीत 2023 च्‍या हंगामासाठी खोबऱ्याच्या किमान आधारभूत किमतींना मान्यता देण्‍यात आली. कृषी खर्च आणि किंमती  आयोगाने केलेल्या  शिफारसी तसेच  नारळ उत्पादक प्रमुख राज्यांनी व्यक्त केलेल्या   मतांवर आधारित ही  मान्यता देण्यात आली आहे.

सरासरी चांगल्या गुणवत्तेच्या सत्त्व काढण्यासाठीच्या खोबऱ्यासाठी किमान आधारभूत किंमत 10860/- रुपये प्रति क्विंटल निश्चित करण्यात आली आहे आणि गोटा खोब-यासाठी  2023 च्या हंगामासाठी 11750/- रूपये प्रति क्विंटल निश्चित करण्यात आली  आहे. यंदा सत्‍व काढण्यासाठीच्या   नारळाच्या  दरामध्‍ये 270/- प्रति क्विंटल वाढ केली आहे. तर  मागील हंगामापेक्षा गोटा खोबऱ्याच्या दरामध्‍ये  750/- प्रति क्विंटल वाढ केली आहे.  हे अखिल भारतीय भारित सरासरी उत्पादन खर्चापेक्षा सत्‍व काढण्‍याच्‍या खोबऱ्यासाठी 51.82 टक्के आणि गोटा  खोबऱ्यासाठी 64.26 टक्के नफा  सुनिश्चित करेल. 2023 हंगामासाठी खोबऱ्याचे घोषित किमान आधारभूत मूल्य  हे सरकारने 2018-19 च्या अर्थसंकल्पात घोषित केल्यानुसार अखिल भारतीय भारित सरासरी उत्पादन खर्चाच्या किमान 1.5 पट पातळीवर एमएसपी  निश्चित करण्याच्या तत्त्वाशी सुसंगत आहे.

नारळ उत्पादकांना चांगला मोबदला मिळवा  आणि त्यांच्या उत्‍पन्नामध्‍ये  भरीव सुधारणा करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे आणि प्रगतीशील पाऊल आहे.

नॅशनल ॲग्रिकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (नाफेड) आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (एनसीसीएफ ) मूल्य समर्थन योजना (पीएसएस) अंतर्गत खोबरे  आणि शेंड्या काढून- सोललेल्‍या नारळाच्या खरेदीसाठी केंद्रीय नोडल एजन्सी (सीएनएएस) म्हणून काम करीत  आहे.

सशस्त्र दलातील निवृत्तीवेतनात सुधारणा करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी ,1 जुलै 2019 पासून लागू होणार

0

नवी दिल्ली, 23 डिसेंबर 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने समान पद समान निवृत्तीवेतन  (OROP) अंतर्गत सशस्त्र दलातील निवृत्ती वेतनधारक/कौटुंबिक निवृत्ती वेतनधारकांच्या निवृत्तीवेतनात सुधारणा करायला  मंजुरी दिली आहे. 1 जुलै 2019 पासून सुधारित निवृत्तीवेतन लागू होईल. जुन्या निवृत्तीवेतनधारकांचे निवृत्ती वेतन कॅलेंडर वर्ष 2018 मध्ये सेवानिवृत्त झालेल्या आणि  त्याच श्रेणीतील समान सेवा कालावधी असलेल्या संरक्षण दलातील कर्मचाऱ्यांच्या किमान आणि कमाल निवृत्तीवेतनाच्या सरासरीच्या आधारे  नव्याने निश्चित केले जाईल.

लाभार्थी

30 जून 2019 पर्यंत निवृत्त झालेल्या  सशस्त्र दलातील कर्मचाऱ्यांना {1,जुलै  2014 पासून प्री-मॅच्युअर (PMR) निवृत्त  झालेले  वगळून } या सुधारित निवृत्तीवेतन श्रेणीचा लाभ मिळेल. सशस्त्र दलातील 25.13 लाखांहून अधिक (4.52 लाखांहून अधिक नवीन लाभार्थ्यांसह) निवृत्तीवेतनधारक/कौटुंबिक निवृत्ती वेतनधारकांना लाभ मिळेल. सरासरीपेक्षा जास्त निवृत्तीवेतन असलेल्यांना संरक्षण मिळेल. युद्धातील शहीदांच्या वीर पत्नी आणि दिव्यांग निवृत्तीवेतनधारकांसह कौटुंबिक निवृत्तीवेतनधारकांना देखील लाभ दिला जाईल.

चार सहामाही हप्त्यांमध्ये थकबाकी दिली जाईल. मात्र , विशेष/उदारीकृत कौटुंबिक निवृत्तीवेतन आणि शौर्य पुरस्कार विजेत्यांसह सर्व कौटुंबिक निवृत्ती वेतनधारकांना एकरकमी थकबाकी दिली जाईल.

खर्च

सुधारित निवृत्तिवेतनाच्या  अंमलबजावणीसाठी अंदाजे वार्षिक खर्च @ 31% महागाई दिलासा प्रमाणे 8,450 कोटी रुपये आहे.  थकबाकीची रक्कम 1 जुलै 2019 ते 31 डिसेंबर 2021 या कालावधीसाठी 19,316 कोटी रुपयेआहे.   1 जुलै 2019 ते 30 जून 2021 या कालावधीसाठी @ 17% प्रमाणे आहे आणि 01 जुलै 2019 ते 31 डिसेंबर 2021 या कालावधीसाठी @ 31% आहे. 1 जुलै 2019 ते 30 जून 2022 पासून लागू थकीत रक्कम लागू असलेल्या महागाई दिलासा नुसार  23,638 कोटी रुपये आहे.  हा खर्च ओआरओपी च्या सध्याच्या खर्चापेक्षा जास्त आहे.

Rank wise likely estimated increase (in rupees) in service pension under OROP w.e.f. July 01, 2019:

RankPension as on 01.01.2016Revised pension w.e.f. 01.07.2019Revised pension w.e.f. 01.07.2021Likely arrears from 01.07.2019 to 30.06.2022
Sepoy17,69919,72620,39487,000
Naik18,42721,10121,9301,14,000
Havildar20,06621,78222,29470,000
Nb Subedar24,23226,80027,5971,08,000
Sub Major33,52637,60038,8631,75,000
Major61,20568,55070,8273,05,000
Lt. Colonel84,33095,40098,8324,55,000
Colonel92,8551,03,7001,07,0624,42,000
Brigadier96,5551,08,8001,12,5965,05,000
Maj. Gen.99,6211,09,1001,12,0393,90,000
Lt. Gen.1,01,5151,12,0501,15,3164,32,000

पार्श्वभूमी

संरक्षण दलातील कर्मचारी/कौटुंबिक निवृत्ती वेतनधारकांसाठी समान पद समान निवृत्तीवेतन लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय सरकारने घेतला आणि 1 जुलै, 2014 पासून सुधारित निवृत्तीवेतनासाठी 7 नोव्हेंबर 2015 रोजी धोरणात्मक पत्र जारी केले.  सदर  पत्रात, भविष्यात, दर 5 वर्षांनी निवृत्ती वेतन पुन्हा नव्याने निश्चित के ले जाईल असे नमूद केले होते. ओआरओपी च्या  अंमलबजावणीसाठी मागील आठ वर्षांत दरवर्षी  @ 7,123 कोटी रुपये प्रमाणे 57,000 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

कामगारांसाठी सुधारित वेतनदर जाहीर

मुंबई, दि. 23 : किमान वेतन अधिनियम, १९४८ अंतर्गत २१ नोव्हेंबर २०२२ रोजी  ‘औषधी द्रव्ये व औषध बनविणारा उद्योग’ व ‘अभियांत्रिकी उद्योग’ या उद्योगांच्या मूळ किमान वेतन दराचे पुनर्निर्धारण झाल्याने अधिसूचनेतील तरतुदीनुसार २१ नोव्हेंबर २०२२ ते 31 डिसेंबर २०२२ या कालावधीकरिता तसेच २३ नोव्हेंबर २०२२ रोजी ‘मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायवादीच्या आस्थापनातील अधिवक्ते किंवा न्यायवादी यांचा अधिसंघ संस्था व विधी व्यवसायाच्या संबंधित आस्थापनेतील कामधंदा’ या उद्योगाच्या मूळ किमान वेतन दराचे पुनर्निर्धारण झाल्याने अधिसूचनेतील तरतुदीनुसार २३ नोव्हेंबर २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीकरिता ९ डिसेंबर २०२२ रोजी विशेष भत्ता दरपत्रक जाहीर करण्यात आले आहे, असे कामगार उपायुक्त यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायवादीच्या आस्थापनातील अधिवक्ते किंवा न्यायवादी यांचा अधिसंघ संस्था व विधी व्यवसायाच्या संबंधित आस्थापनेतील कामधंदा” या अनुसूचित उद्योगाच्या मूळ किमान वेतन दराचे पुनर्निर्धारण झाल्याने या अधिसूचनेतील तरतुदीनुसार विशेष भत्त्याची रक्कम सर्व परिमंडळाकरिता पुढीलप्रमाणे आहे.

परिमंडळ १ करिता :  किमान मूळ वेतन दर + विशेष भत्ता (प्रती महिना) रक्कम = एकूण किमान वेतन रक्कम
१) कुशल कामगार : १६,६२०/- + ८५८/- = १७,४७८/-

२) अर्ध कुशल कामगार : १५,१५०/- + ८५८/- = १६,००८/-

३) अकुशल कामगार : १४,०९५/- + ८५८/- = १४,९५३/-

परिमंडळ २ करिता :  किमान मूळ वेतन दर + विशेष भत्ता रक्कम(प्रती महिना) = एकूण किमान वेतन रक्कम

१) कुशल कामगार : १५,७८०/- + ८५८/- = १६,६३८/-

२) अर्ध कुशल कामगार : १४,३१०/- + ८५८/- = १५,१६८/-

३) अकुशल कामगार : १३,२५५/- + ८५८/- = १४,११३/-

औषधी द्रव्य व औषध बनविणारा उद्योग’ या अनुसूचित उद्योगाच्या मूळ किमान वेतन दराचे पुनर्निर्धारण झाल्याने या अधिसूचनेतील तरतुदीनुसार विशेष भत्त्याची रक्कम सर्व परिमंडळाकरता पुढीलप्रमाणे आहे.

परिमंडळ १ करिता :  किमान मूळ वेतन दर + विशेष भत्ता (प्रती महिना) रक्कम = एकूण किमान वेतन रक्कम
१) कुशल कामगार : १६,६०५/- + ३७२/- = १६,९७७/-

२) अर्ध कुशल कामगार : १५,१८५/- + ३७२/- = १५,५५७/-

३) अकुशल कामगार : १४,१७०/- + ३७२/- = १४,५४२/-

परिमंडळ २ करिता :  किमान मूळ वेतन दर + विशेष भत्ता रक्कम(प्रती महिना) = एकूण किमान वेतन रक्कम

१) कुशल कामगार : १६,०००/- + ३७२/- = १६,३७२/-

२) अर्ध कुशल कामगार : १४,५८०/- + ३७२/- = १४,९५२/-

३) अकुशल कामगार : १३,५६५/- + ३७२/- = १३,९३७/-

परिमंडळ ३ करिता :  किमान मूळ वेतन दर + विशेष भत्ता रक्कम (प्रती महिना) = एकूण किमान वेतन रक्कम

१) कुशल कामगार : १५,५९०/- + ३७२/- = १५,९६२/-

२) अर्ध कुशल कामगार : १४,१७०/- + ३७२/- = १४,५४२/-

३) अकुशल कामगार : १३,१५५/- + ३७२/- = १३,५२७/-

अभियांत्रिकी उद्योग’ या अनुसूचित उद्योगाच्या मूळ किमान वेतन दराचे पुनर्निर्धारण झाल्याने याअधिसूचनेतील तरतुदीनुसार विशेष भत्त्याची रक्कम सर्व परिमंडळाकरिता पुढीलप्रमाणे आहे.

परिमंडळ १ करिता :  किमान मूळ वेतन दर + विशेष भत्ता (प्रती महिना) रक्कम = एकूण किमान वेतन रक्कम

१) कुशल कामगार : १६,४५०/- + ३७२/- = १६,८२२/-

२) अर्ध कुशल कामगार : १५,०२५/- + ३७२/- = १५,३९७/-

३) अकुशल कामगार : १४,०१०/- + ३७२/- = १४,३८२/-

परिमंडळ २ करिता :  किमान मूळ वेतन दर + विशेष भत्ता रक्कम (प्रती महिना)= एकूण किमान वेतन रक्कम

१) कुशल कामगार : १६,०४५/- + ३७२/- = १६,४१७/-

२) अर्ध कुशल कामगार : १४,६२०/- + ३७२/- = १४,९९२/-

३) अकुशल कामगार : १३,६०५/- + ३७२/- = १३,९७७/-

परिमंडळ ३ करिता :  किमान मूळ वेतन दर + विशेष भत्ता रक्कम = एकूण किमान वेतन रक्कम
१) कुशल कामगार : १५,२२५/- + ३७२/- = १५,५९७/-

२) अर्ध कुशल कामगार : १३,८०५/- + ३७२/- = १४,१७७/-

३) अकुशल कामगार : १२,७९५/- + ३७२/- = १३,१६७/-

कोविड- 19: केंद्राचा राज्यांना देखरेख यंत्रणा मजबूत करण्याचा सल्ला; चाचण्या वाढवा आणि रुग्णालयाच्या पायाभूत सुविधांची सज्जता ठेवा

0

नवी दिल्ली, 23 डिसेंबर 2022

“केंद्र आणि राज्यांनी कोविड19 प्रतिबंध आणि व्यवस्थापनासाठी आधीप्रमाणे एकत्रितपणे आणि सहयोगी भावनेने काम करणे आवश्यक आहे”,असे आवाहन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी आज केले. राज्यांचे आरोग्य मंत्री , प्रधान सचिव/अतिरिक्त मुख्य सचिव आणि माहिती आयुक्त यांच्याशी संवाद साधताना ते बोलत होते. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार आणि नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य)  डॉ व्ही के पॉल यांच्या उपस्थितीत ही आभासी बैठक झाली. चीन, जपान, ब्राझील आणि अमेरिका यांसारख्या काही देशांमध्ये अलीकडेच वाढलेल्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कोविड-19 चे नियंत्रण आणि व्यवस्थापनासाठी सार्वजनिक आरोग्य सज्जता आणि राष्ट्रीय कोविड-19 लसीकरण मोहीम प्रगतीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक घेण्यात आली.

पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री एन रंगास्वामी, त्रिपुराचे मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री  डॉ माणिक साहा,  जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, राजस्थानचे  आरोग्य मंत्री परसादी लाल मीणा , उत्तराखंडचे आरोग्य मंत्री धन सिंह रावत, आसामचे आरोग्य मंत्री केशब महंता, कर्नाटकचे आरोग्य मंत्री डॉ के सुधाकर, झारखंडचे आरोग्य मंत्री बन्ना गुप्ता , मध्य प्रदेशचे आरोग्य मंत्री प्रभुराम चौधरी, पंजाबचे आरोग्य मंत्री एस चेतन सिंह जौरामाजरा, छत्तीसगडचे आरोग्य मंत्री टी एस सिंग देव, मणिपूरचे आरोग्य मंत्री सपम रंजन सिंग, हरियाणाचे आरोग्य मंत्री अनिल विज, तामिळनाडूचे आरोग्य मंत्री थिरू मा सुब्रमण्यम, आंध्र प्रदेशच्या आरोग्य मंत्री विदादला रजनी, केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज, पश्चिम बंगालच्या आरोग्य मंत्री चंद्रिमा भट्टाचार्य आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया या उच्चस्तरीय आढावा बैठकीत सहभागी  झाले.

काल झालेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत पंतप्रधानांनी राज्यांना दिलेला सतर्क राहण्याचा आणि कोविड19च्या व्यवस्थापनासाठी सर्व तयारी ठेवण्याचा दिलेल्या सल्ल्याचा संदर्भ मांडवीय यांनी दिला. राज्यांना खबरदारीचा  आणि सक्रिय दृष्टीकोन ठेवण्याची विनंती त्यांनी केली. देशात एखाद्या नवीन व्हेरियंटचा शिरकाव झाला तर त्याबाबत वेळीच कळावे यासाठी  भारतीय SARS-CoV-2 Genomics Consortium (INSACOG) नेटवर्कद्वारे  पॉझिटिव्ह रूग्णांच्या नमुन्यांचा संपूर्ण जीनोम अनुक्रमासाठी देखरेख प्रणाली बळकट  करण्याचे त्यांनी राज्यांना आवाहन केले. आरोग्य सुविधा आधारित सेंटायल सर्वेलन्स(रोग असल्याच्या निर्देशांकांवर देखरेख ) पॅन-रेस्पीरेटरी व्हायरस देखरेख, समुदाय-आधारित देखरेख सांडपाणी देखरेख यावर भर दिला जाईल, असे त्यांनी सांगितले. सामुहिकपणे प्रणालीला पुनरुज्जीवित करण्याच्या तसेच आत्मसंतुष्टता आणि कमकुवता  दूर करण्याच्या गरजेवर त्यांनी प्रकाश टाकला.

कोविड व्हेरियंट नवा असला तरी कोविड व्यवस्थापनासाठी चाचणी-माग -उपचार-लसीकरण आणि कोविड प्रतिबंधासाठी आवश्यक योग्य वर्तनाचे पालन करणे ही  कसोटीवर उतरलेली रणनीती कायम ठेवणार असल्याचे डॉ. मांडवीया यांनी सांगितले. यामुळे योग्य सार्वजनिक उपाययोजना हाती घेणे शक्य होईल.  22 डिसेंबर 2022 रोजी संपलेल्या आठवड्यात प्रति दशलक्ष 79 इतक्या कोविड चाचण्यांच्या सध्याच्या दरावरून, चाचण्यांचा दर त्वरेने वाढवण्याची विनंती राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना करण्यात आली. या चाचण्यांमध्ये आरटी- पीसीआर(RT-PCR) चाचण्यांची संख्या वाढवण्याचा सल्लाही देण्यात आला होता.

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना सर्व पात्र लोकसंख्येचे, विशेषत: वृद्ध आणि असुरक्षित लोकसंख्येचे लसीकरण वाढवण्याचा सल्ला दिला. वस्तुस्थितीनुसार योग्य माहितीचा प्रसार सुनिश्चित करून, चुकीची माहिती पसरू नये यासाठी दक्ष राहण्यास सांगितले. आगामी सणासुदीच्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर, त्यांनी कोविड प्रतिबंधासाठी  सुयोग्य वर्तनाचे पालन करण्याबाबत जनजागृती करण्याच्या मोहिमांवर भर दिला.डॉ. मांडविया यांनी सर्व राज्याच्या आरोग्यमंत्र्यांना वैयक्तिकपणे सर्व पायाभूत सुविधांच्या तयारीचे निरीक्षण आणि पुनरावलोकन करण्याची विनंती केली आहे आणि आवश्यक औषधांचा पुरेसा साठा असल्याची खात्री करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना जागतिक कोविड -19 परिस्थिती आणि देशांतर्गत परिस्थितीबद्दल माहिती देण्यात आली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जून 2022 मध्ये “कोविड-19 च्या संदर्भात “काटेकोरपणे  लक्ष ठेवण्याच्या कार्यवाहीची  मार्गदर्शक तत्त्वे” जारी केली आहेत; ज्यात नवीन सार्स-कोव्ह-2,(SARS-CoV-2) प्रकारातील संशयित आणि संसर्ग झालेल्या रुग्णांचा लवकर शोध घेणे,विलगीकरण, चाचण्या आणि वेळेवर व्यवस्थापन करणे आवश्यक आहे,हे सांगितले होते याचे स्मरण करून देण्यात आले.  केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांना त्याची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्याची विनंती केली.रुग्णालयांच्या पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्यासह कोविड व्यवस्थापनाच्या विविध पैलूंवर व्यापक आणि तपशीलवार चर्चा झाली; 

माननीय पंतप्रधान,केंद्रीय आरोग्य मंत्री आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सल्लागार यांच्या अध्यक्षतेखाली सुयोग्य वेळेवर झालेल्या  आढावा बैठकीबद्दल  सर्व राज्यांनी समाधान व्यक्त केले.   कोविड-19 च्या प्रभावी प्रतिबंध आणि व्यवस्थापनासाठी ते केंद्रासोबत काम करतील, असे आश्वासन त्यांनी दिले. ते दक्ष आहेतच आणि सद्यस्थितीचा आढावा घेत आहेत अशी माहिती त्यांनी दिली.काही  राज्यांनी 27 डिसेंबर 2022 रोजी रुग्णालयाच्या पायाभूत सुविधांच्या तयारीसाठी दक्षतेची तालीम (मॉक ड्रिल) आयोजित करण्याचे आश्वासनही  दिले.

या बैठकीला डॉ. मनोहर अग्नानी, अतिरिक्त सचिव  (आरोग्य मंत्रालय),  लव अग्रवाल, अतिरिक्त सचिव  (आरोग्य मंत्रालय),  मनदीप भंडारी, संयुक्त सचिव (आरोग्य मंत्रालय), डॉ. अतुल गोयल, डीजीएचएस आणि मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी हे देखील उपस्थित होते.

राज्यस्तरीय शालेय जिम्नॅस्टिक्स क्रीडा स्पर्धांचे आयोजन

पुणे, दि.२३- जिल्हा क्रीडा परिषदेच्यावतीने २४ ते २७ डिसेंबर २०२२ या कालावधीत म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलातील जिम्नॅस्टिक्स हॉलमध्ये येथे राज्यस्तरीय शालेय जिम्नॅस्टिक्स क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे क्रीडा व युवक सेवा आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांच्या हस्ते २४ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य हौशी जिम्नॅस्टिक्स संघटनेचे संजय शेटे, स्पर्धा संचालक योगेश शिर्के उपस्थितीत राहणार आहेत.

या स्पर्धांमध्ये अमरावती, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, लातूर, मुंबई, पुणे, कोल्हापूर व शिवछत्रपती क्रीडापीठ असे एकूण ९ विभागातून सुमारे ६५० खेळाडू, संघव्यवस्थापक, तांत्रिक अधिकारी सहभागी होणार आहेत. मुंबई विभागातून आर्यन दवंडे, मानस मानकवळे, पुणे विभागातून सिद्धांत कोंडे, रिया केळकर, रितिषा ईनामदार, श्रावणी पाठक, शिवछत्रपती क्रीडाविद्यापिठाचे आर्या परब, याशिका पुजारी हे आंतरराष्ट्रीय खेळाडू सहभागी होणार आहेत. जिल्ह्यातील उदयोन्मुख खेळाडुंना राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंची कौशल्ये जवळून पहाण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

स्पर्धेच्या निमित्ताने संकुलातील जिम्नॅस्टिक्स हॉल सज्ज करण्यात आलेला असून सहभागी खेळाडूंची निवास व्यवस्था संकुलातील वसतिगृहामध्ये करण्यात आलेली आहे. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा क्रीडा परिषदचे अध्यक्ष डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन समिती स्थापन करण्यात आलेली आहे.

क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्यावतीने दरवर्षी राज्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी सुमारे ९३ खेळांचे, १४, १७ व १९ वर्षाखालील मुले व मुलींसाठी तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तर या क्रमाने या स्पर्धचे आयोजन करण्यात येते. सन २०२२-२३ या वर्षीच्या राज्यस्तरीय शालेय जिम्नॅस्टिक्स खेळाच्या स्पर्धांचे आयोजन करण्याची संधी पुणे जिल्ह्यास मिळालेली आहे. पुणे शहरातील नागरिक, क्रीडाप्रेमीनी राज्याच्या विविध विभागातून आलेल्या खेळाडूंचे स्वागत करावे. जिल्ह्यातील उदयोन्मुख खेळाडू, नागरिकांनी खेळाडूंना प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी केले आहे.

लोकसभा अध्‍यक्ष ओम बिर्ला 24 डिसेंबर रोजी, पुणे दौऱ्यावर; विविध कार्यक्रमांमध्‍ये होणार सहभागी


नवी दिल्ली/पुणे, 23 डिसेंबर 2022

लोकसभा अध्‍यक्ष ओम बिर्ला शनिवार, दि. 24 डिसेंबर रोजी पुण्याच्या एकदिवसीय दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी आयोजित करण्‍यात आलेल्‍या विविध कार्यक्रमांना ओम बिर्ला उपस्थित राहणार आहेत.

लोकसभा अध्‍यक्ष बिर्ला सकाळी  8.10 मिनिटांनी पुणे येथे पोहोचतील. सकाळी 9.40 ते 10.20 वाजेपर्यंत ते राजभवनामध्ये मान्यवरांची भेट घेतील. सकाळी 10.35 ते 10.55 पर्यंत ते येरवडा येथील अग्रवाल प्रशालेमध्‍ये जाणार आहेत. सकाळी 11.00 ते 12.30 पर्यंत अध्‍यक्ष बिर्ला येरवडा येथील   डेक्‍कन मैदानावर भरणा-या अग्रवाल समाजाच्‍या संमेलनामध्‍ये सहभागी होतील.

यानंतर दुपारी 1.30 पासून ओम बिर्ला एमआयटी विद्यापीठामध्‍ये विद्यार्थ्‍यांबरोबर ‘नेतृत्व, लोकशाही, सुशासन आणि शांती’’ या विषयावर संवाद साधणार आहेत. त्‍यानंतर ते राजभवनामध्‍ये मान्‍यवरांची भेट घेतील.

लोकसभा अध्‍यक्ष ओम बिर्ला सायंकाळी 6.50 मिनिटांनी नवी दिल्‍लीला रवाना होतील.

वर्षभरात साडेपाच कोटीचे ड्रग्ज पुण्यात पोलिसांनी पकडले, ९२ जणांना ठोकल्या बेड्या ….

पुणेविमानगर परिसरात कोकेनची तस्करी करण्याच्या प्रयत्नातील आरोपीला अमली पदार्थ विरोधी पथक दोनने अटक केली. त्याच्याकडून 10 लाख 42 हजारांचे कोकेन , दोन मोबाइल, मोटार असा ऐवज जप्त करण्यात आला आहे. अशी माहिती शुक्रवारी देण्यात आली. दरम्यान पोलिसांनी सांगितले कि , जानेवारी २०२२ पासून ते आजपर्यंत सुमारे साडेपाच कोटीचे अंमली पदार्थ पुणे पोलिसांनी पकडले आणि ९२ जणांना या प्रकरणी गजाआड केले .

पोलिसांनी सांगितले कि,अख्तर नुरलहोदा शेख, वय-३४ वर्षे, रा. स. नं. २६१, कलवड वस्ती धानोरी जकात नाका, पुणे मुळगांव-मुजफ्फरपुर,कांटीगाव, बिहार राज्य यास अटक करण्यात आली असून त्याच्याकडून 10 लाख 42 हजारांचे ५२ ग्रॅम १२० मिलीग्रॅम कोकेन हा अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आला आहे. अंमली पदार्थ विरोधी पथक-०१ कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विनायक गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक, लक्ष्गण ढेंगळे, शैलजा जानकर व स्टाफ अरों दिनांक २२/१२/२०२२ रोजी विमानतळ पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहिती मिळाली की,एक इसम विमानगर परिसरा मध्ये स्विफ्ट गाडी क्रमांक एमएच / १२ / केजे/२९३४ यामधुन कोकेन या अंमली
पदार्थाची विक्री करीत आहे. मिळालेल्या बातमीच्या अनुशंगाने विमाननगर येथील स.नं. २१० / २ विमाननगर, कोनार्कनगर
सोसायटी समोरील, वाघेश्वर वॉशिंग सेंटर समोर, सार्वजनिक रोडवर सापळा रचला असता,
मिळालेल्या बातमीतील एक इसम हा स्विफ्ट गाडी क्रमांक एमएच / १२ / केजे/२९३४ या गाडीस टेकुन
संशयितरीत्या उभा असलेला दिसल्याने, अंमली पदार्थ विरोधी पथकातील स्टाफने इसम नामे अख्तर
नुरलहोदा शेख, वय-३४ वर्षे, रा. स. नं. २६१, कलवड वस्ती धानोरी जकात नाका, पुणे मुळगांव-मुजफ्फरपुर,
कांटीगाव, बिहार राज्य यांस ताब्यात घेवुन, त्याची झडती घेतली असता,५२ ग्रॅम १२० मिलीग्रॅम कोकेन हा अंमली पदार्थ मिळुन
आले आहे. त्याचेविरुध्द विमानतळ पोलीस स्टेशन येथे एन. डी. पी. एस. अॅक्ट कलम ८ ( क ),२१(ब), प्रमाणे
गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई ही पोलीस आयुक्त, पुणे शहररितेश कुमार, पोलीस सह आयुक्त,
संदिप कर्णिक,अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, अमोल झेंडे,
सहा पो आयुक्त,गुन्हे – १, गजानन टोम्पे यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक-१ गुन्हे
शाखा, पुणे शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विनायक गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक, लक्ष्मण ढेंगळे,
शैलजा जानकर, पोलीस अंमलदार, विशाल शिंदे, योगेश मोहिते, मारुती पारधी, प्रविण उत्तेकर, पांडुरंग
पवार, विशाल दळवी, संदिप शिर्के, सुजित वाडेकर, राहुल जोशी, सचिन माळवे, संदेश काकडे, नितेश
जाधव, रेहाना शेख यांनी केली आहे.
जानेवारी २०२२ पासुन ते डिसेंबर २०२२ पर्यंत अंमली पदार्थ विरोधी पथक-१ यांचेकडुन
५,३६,१३,२५०/- रुकिचा (पाच कोटी छत्तीस लाख तेरा हजार दोनशे पन्नास रुपये) अंमली पदार्थ जप्त
करण्यात आले आहेत. त्यामध्ये ७०,०१,०२० /- किमतीचा गांजा व ९,९१,२९०/- रु किंमतीचे अफिम १,८४,५४,६००/-
किंमती चा मेफेड्रॉन (एम.डी.) २,६४,९६,६५०/- रु. किमतीचे कोकेन ५८,३५०/- रु किं चे ब्राऊन शुगर १,१०,०००/-
रुकिचा एम. डी. एम. ए. १,८१,७२० /- रूकिचा चरस हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. त्यामध्ये
एकुण ९२ आरोपींना अटक करण्यात आले आहे.


पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत पहाटे अडीच वाजण्याच्या चितेजवळ जादूटोणा:दोघांना अटक

पुणे- येथील वैकुंठ स्मशानभूमीत पहाटेअडीच वाजण्याच्या सुमारास दोन तृतीय तृतीयपंथीयानी चितेजवळ जादू टोना अघोरी कृती करताना आढळून आल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून लक्ष्मी निबाजी शिंदे (वय ३१ रा. मुंबई) आणि मनोज अशोक धुमाळ (वय २२ रा.कोथरूड पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैकुंठ स्मशानभूमीत आज (शुक्रवारी) रात्री १ वाजण्याच्या सुमारास एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर काही तासाने लक्ष्मी निबाजी शिंदे आणि मनोज अशोक धुमाळ हे चितेजवळ आले. त्यानंतर दोघांनी त्यांच्यासोबत आणलेले काळ्या रंगाच्या बाहुल्या, काही लोकांचे फोटो, लिंबू, सूया आणि हळदी कुंकू हे साहित्य घेऊन काही तरी कृती करीत होते. त्याचवेळी स्मशानभूमीमधील एक कर्मचारी आतमध्ये फेरी असताना त्याच्या निदर्शनास या गोष्टी पडल्या. त्याने काही अंतरावर जाऊन पाहिल असता आरोपी जादूटोना सारखं काही तरी करत असल्याचे त्याला दिसून आले.

त्या प्रकाराबाबत माहिती मिळताच, पोलिसांनी दोघांना रंगेहाथ पकडले. आरोपींजवळ काही व्यक्तीचे फोटो जळालेल्या अवस्थेत आढळून आले आहेत. त्यामुळे कोणाबद्दल जादूटोना करीत होते. त्याबाबत दोघांकडे चौकशी सुरू आहे. तसेच या प्रकरणी दोन्ही आरोपींविरोधात नरबळी व इतर अमानुष अघोरी, दुष्कर्मी प्रथा आणि काळा जादू अधिनियम २०१३ कलम ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याचे विश्रामबाग पोलिसांनी सांगितले.

अनुराग, पार्थ, अवधूतची विजयी सलामी

अमनोरा-पीवायसी एचटीबीए बॅडमिंटन स्पर्धा ;  हवेली तालुका बॅडमिंटन संघटना आणि पीवायसी  हिंदू जिमखाना क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
पुणे : अनुराग साठे, पार्थ फिर्के, रुहान परब, कविन पटेल, व्यास खोंडे, अवधूत कदम यांनी  हवेली तालुका बॅडमिंटन संघटना (एचटीबीए) आणि पीवायसी हिंदू जिमखाना क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अमनोरा-पीवायसी एचटीबीए बॅडमिंटन कप अजिंक्यपद स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलांच्या गटात आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून विजयी सलामी दिली. कॉर्पोरेट अॅथलीट आणि योनेक्स सनराईज हे या स्पर्धेचे सह प्रायोजक आहेत.
पीवायसी हिंदू जिमखान्याच्या बॅडमिंटन कोर्टवर शुक्रवारपासून या स्पर्धेला सुरुवात झाली. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी पीवायसी हिंदू जिमखाना क्लबचे अध्यक्ष कुमार ताम्हाणे, सचिव सारंग लागू, तन्मय आगाशे उपस्थित होते.
या स्पर्धेतील १७ वर्षांखालील मुलांच्या एकेरीच्या सलामीच्या लढतीत अनुराग साठेने यश पाटीलवर १५-५, १५-८ असा, पार्थ फिर्केने अथर्व अभांगवर १५-४, १५-२ असा, रुहान परबने आदित्य पार्वतीवर १३-१५, १७-१५, १५-१० असा विजय मिळवला. कविन पटेलने विनायक साहूला १५-१, १५-० असे, जोसेफ जितूने ईशान मुदगलला १५-११, १५-३ असे, रिशान शेम्बेकरने निनाद लेलेला १५-१०, १५-३ असे नमविले. व्यास खोंडेने तनीष दरपेवर १५-८, १५-११ अशी, श्रेयस पवारने अवनिश खरातवर १५-५, १५-१२ अशी, तर अवधूत कदमने साकेत वैद्यवर १५-४, १५-८ अशी मात केली.

कोणार्क तिसऱ्या फेरीत

स्पर्धेतील १५ वर्षांखालील मुलांच्या एकेरीतील दुसऱ्या फेरीत अग्रमानांकित कोणार्क इंचेकरने अर्णव देशपांडेला १५-२, १५-२ असे सहज नमविले. अवनीश बांगरने अर्णव शिंदेवर १५-१०, १५-९ असा विजय मिळवला. स्वरित सातपुतेने निशाद निजासुरेला १५-६, १५-१२ असे नमविले. वत्सल तिवारीने श्राव्य पाटणकरवर १५-१३, १५-१३ असा विजय मिळवला. रेयश चौधरीने निनाद बोरुडेला १५-३, १५-८ असे, तर ईशान लागूने विराज सराफला १५-१३, १५-८ असे नमविले.

पहिल्या फेरीचे निकाल : ११ वर्षांखालील मुले 
– अनिश आहेर वि. वि. आरोह गोगाटे १५-९, १५-११; अवधूत कुंभार वि. वि. रितेश वेंकट सवरला १५-२, १५-४; अदित कानेटकर वि. वि. अनय पाटील १५-५, १५-२; ईशान रॉय वि. वि. नवीन सिन्हा १५-५, १५-१२; विवान सरना वि. वि. अर्णव गद्रे १७-१५, १५-११; यश मोरे वि. वि. विस्मय म्हस्के १५-१०, १०-१५, १५-१२; अनुज भोसले वि. वि. लक्ष सिन्हा १५-५, १५-११; दियान पारेख वि. वि. श्रीयश सोनावणे १५-४, १५-६.
१३ वर्षांखालील मुले – ओजस खाडिलकर वि. वि. अर्चित धुल्ला २०-२१, १५-७, १५-१२; मिहीर कोकील वि. वि. नचिकेत गोखले १५-६, १५-१२; सहर्ष आंबेकर वि. वि. अंशुम गुप्ते ८-१५, १९-१७, १५-१३; अयांश यरगट्टी वि. वि. अथर्व वेदपाठक १५-७, १५-७; ध्रुव भोळे वि. वि. हृधान पुंगलिया १५-९, १५-२; अधिराज गांगुर्डे वि. वि. अक्षर झोपे १५-१२, १५-१२; वरुण हवालदार वि. वि. श्रेयांक कविमंदन १२-१५, १५-९, १५-९; रियान करंदीकर वि. वि. रणवीर तावरे १५-२, १५-१.
१३ वर्षांखालील मुली –
 शुभ्रा वैष्पांयन वि. वि. अनिशा रांजेकर १५-५, १५-८; ईशिता वडगावकर वि. वि. केतकी भिडे ६-१५, १५-१०, १५-७; शर्वरी सुरवसे वि. वि. हिरण्मयी परांजपे १५-५, १५-९; अनया माळुंजकर वि. वि. क्षीती चोरमाले १५-५, १५-६; ईशा कर्वे वि. वि. रिधिमा पवार १५-६, १५-१३; सई कदम वि. वि. ईशा सराफ १५-८, १५-६; संजना कुलकर्णी वि. वि. अन्वयी पाटील १५-१०, १५-७.
१५ वर्षांखालील मुली – सान्वी डाखणे वि. वि. अन्वी बेहेडे १५-५, १३-१५, १५-७; अद्विका जोशी वि. वि. अदिती परांजपे १५-२, १५-०; रिधिमा जोशी ववि. वि. सारा मेंगळे १५-४, १५-२; स्वामिनी तिकोणे वि. वि. निराली साहू १५-०, १५-०; आरोही जोगळेकर वि. वि. प्राची पटवर्धन १५-१३, १२-१५, १५-७; राधा गाडगीळ वि. वि. जनिशा असिजा १६-१४, १५-१३; पूर्वा वाडेकर वि. वि. सानिका देशपांडे १५-८, १५-१२.

सुधीर मुनगंटीवारांच्या प्रयत्नांमुळे अखेर महाराष्ट्राचा चित्ररथ दिल्लीच्या परेडमध्ये सामिल

0

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांचे मानले आभार

नागपूर : मनापासून इच्छा असेल आणि प्रामाणिक प्रयत्न केले तर कोणतीही बाब अशक्य नाही; त्यातल्या त्यात राज्याचा सर्वांगीण विकासाचा ध्यास घेणाऱ्या लोकनेत्याला अगदी छोटीशी नकारात्मक बाबही अस्वस्थ करुन जाते ! मग त्यात सुधीर मुनगंटीवार यांच्यासारखे संवेदनशील नेते असतील तर ते स्वस्थ कसे बसणार ?
त्याचे असे झाले की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी पर्वावर दिल्लीत संपन्न होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ समाविष्ट नाही ही बाब राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या निदर्शनास आली. आपले खाते आणि पर्यायाने राज्य कुठेच मागे असू नये यासाठी सतत आग्रही असलेले ना. सुधीर मुनगंटीवार यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तातडीने आढावा घेतला; कारणे जाणून घेतली. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता केंद्रीय संरक्षण मंत्री श्री राजनाथसिंह यांना फोनवरून संपर्क साधला.
दोन्ही नेत्यांमधील संवाद सुरू झाला..अत्यंत पोटतिडकीने सुधीरभाऊ महाराष्ट्राची बाजू मांडत होते…
प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीच्या राजपथवर परेडमध्ये माझा महाराष्ट्र दिसला पाहिजे अशी विनंती त्यांनी केली.

एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र सांस्कृतिक क्षेत्रात आघाडी घेत आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सर्वत्र साजरा होत असून मराठवाडा मुक्ती संग्रामाचेही हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. त्यामुळे सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न असलेल्या महाराष्ट्राचा चित्ररथ दिल्ली येथील राजपथावरील परडमध्ये समाविष्ट असावा, अशी विनंती ना. श्री मुनगंटीवार संरक्षण मंत्र्यांना केली. ना. मुनगंटीवार यांच्या विनंतीमागील भाव, आणि आर्तता याची दखल श्री राजनाथ सिंह यांनी घेतली. दिल्ली येथील परेडमध्ये आता २६ जानेवारी ला महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार आहे. शुक्रवारी 23 डिसेंबर 2022 रोजी या संदर्भातील पत्र केंद्र सरकारने महाराष्ट्र शासनाला पाठवले आहे.
महाराष्ट्राचा चित्ररथ समाविष्ट करून घेतल्याबद्दल ना. मुनगंटीवार यांनी केंद्र सरकारचे व केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचे आभार मानले आहेत.