Home Blog Page 1485

रविकिरणच्या बालनाट्य स्पर्धेत “ध्येय्यधुंद” सर्वोत्कृष्ट

नुकतीच रविकिरण संस्थेची ३६वी बालनाट्य स्पर्धा रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे पार पडली. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेला या वर्षी प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. वेळेअभावी उशिरा आलेल्या काही प्रवेशिका नाईलाजाने नाकाराव्या लागल्या. या स्पर्धेचे उद्घाटन पु. ल. अकादमीचे डायरेक्टर, श्री. संतोष रोकडे यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी पारितोषिक वितरण समारंभाला ज्येष्ठ नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री नागेश नामदेव वांद्रे यांनी केले. श्री वांद्रे यांनी आपल्या प्रास्ताविकात यावर्षीची स्पर्धा डॉ. के. एम. एस. शिरोडकर हायस्कुलचे शिक्षक स्मृतिगत ज्योतीराम कदम सर यांच्या नावे घेतल्याचे सांगताना अशा प्रकारची स्पर्धा रविकिरण मंडळाने घ्यावी असे १९८४ साली  कदमसरांनीच सुचविल्याचे सांगितले. या स्पर्धेच्या निमित्ताने ज्योतीराम कदम सरांनी लिहिलेल्या बालनाट्यांची पुस्तके मंडळातर्फे प्रत्येक शाळा/संस्था प्रतिनिधींना मोफत वाटण्यात आली. रवींद्र नाट्य मंदिराचे लाईट्मन, गेटकिपर, नेपथ्य व्यवस्थापक यांच्या हस्ते या पुस्तकांच्या संचाचे वाटप करण्यात आले

या स्पर्धेच्या निमित्ताने अशा निवृत्त शिक्षकांच्या कार्याची नोंद घेतली जाते. आपल्या सेवेमध्ये असताना जे शिक्षकांनी बालनाट्याचे लेखन/दिग्दर्शन करून स्पर्धेमध्ये सहभागी होतात त्यांचा यथोचित सन्मान करण्याची रविकिरणची परंपराआहे. या वर्षी नॅशनल एज्युकेशन सोसायटीचे मुख्याध्यापक श्री दीपक कुलकर्णी यांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्या कारकिर्दीत आगळीवेगळी म्हणजेच विज्ञाननिष्ठ बालनाटिका रविकिरणच्या रंगमंचावरती सादर करण्यात आली होती. सत्काराला उत्तर देताना श्री दीपक कुलकर्णी म्हणाले एवढं मोठं व्यासपीठ मुलांना उपलब्ध करून देणारी संस्था फक्त रविकिरणच. तसंच साडेतीन दशकं हा उपक्रम चालू ठेवणं आणि तितक्याच उत्साहाने तो साजरा करणं हे केवळ कलाकार निर्मिती नसून या मागे एक सुसंस्कारी समाज आणि सुजाण प्रेक्षक निर्माण करण्याचा यज्ञच रविकिरणने सूरु केला असे ते म्हणाले.

या स्पर्धेच्या निमित्ताने उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे विलास भिकाजी येरम यांचा व मंडळाचे सभासद प्रमोद राणे यांची बेस्ट कामगार को. ऑप. सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तसेच संस्थेचे सभासद श्री महेंद्र पवार यांची भारत सरकारच्या भारतीय संस्कृतीक परिषदेच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल मानपत्र-शाल-श्रीफळ देऊन प्रदीप मुळ्ये व स्पर्धेचे प्रायोजक एसबीआय लाईफच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना प्रातिनिधिक म्हणूनबोलताना महेंद्र पवार म्हणाले हे मानपत्र नव्हे तर ऋणपत्र आहे. आजवरच्या कारकिर्दीला केवळ रविकिरण परिवाराचा पाठिंबा असल्यामुळे आम्ही घडू शकलो आहोत.

या स्पर्धेच्या निम्मिताने प्रकाशित होणाऱ्या “स्मृतिपर्ण” या स्मरणिकेचे प्रकाशन प्रमुख पाहुणे श्री प्रदीप मुळ्ये  यांच्या हस्ते केले गेले. या स्मरणिकेत ज्येष्ठ नाट्य-समीक्षक श्री कमलाकर नाडकर्णी व मंडळाचे कार्यकारी सदस्य श्री महेंद्र पवार ज्योतीराम कदम सरांच्या बालनाट्य क्षेत्रातील कर्तृत्वाचा आढावा घेणाऱ्या लेखांचा समावेश करण्यात आला आहे.

जेष्ठअभिनेत्री विमल म्हात्रे, डॉ. माधुरी विनायक गवांदे, धनंजय सरदेशपांडे यांनी या स्पर्धेच्या परीक्षणाचे काम पहिले. या कार्यक्रमाला माजीमहापौर किशोरीताई पेडणेकर उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि मानपत्राचे वाचन अशोक परब, नितीन नगरकर व कु. सोहम पवार यांनी केले. खजिनदार गजानन राणे यांनी सगळ्यांचे आभार मानले.

तृतीयपंथीयांसाठी विशेष शिबिराचे आयोजन

पुणे, दि.२६: समाज कल्याण विभाग पुणे व जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे जिल्ह्यातील तृतीयपंथीयांना विविध योजनांचा लाभ एकाच छताखाली मिळावा यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले.

भवानी पेठ येथील संत ज्ञानेश्वर समाज मंदिर येथे आयोजित या शिबिर कार्यक्रमास समाज कल्याण सहाय्यक आयुक्त संगिता डावखर, मनपा क्षेत्रिय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त अस्मिता तांबे, समाज कल्याण निरीक्षक नेत्राली येवले, तालुका समन्व्यक मंगेश गाडीवान, सोस्वा ट्रेनिंग इन्स्टिट्युट व तृतीया फाऊंडेशन पुणेचे सदस्य, मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्ट पुणेच्या प्रेरणा वाघेला, आशिका पुणेकर, कादंबरी, मित्र क्लिनिकचे मधु गुरु आदी उपस्थित होते.

यावेळी सहाय्यक आयुक्त संगिता डावखर म्हणाल्या, तृतीयपंथीयांना ओळखपत्र वाटप करण्यामध्ये राज्यात पुणे जिल्हा प्रथम क्रमांकावर असून जिल्ह्यात आतापर्यंत ३४३ तृतीयपंथीयांना ओळखपत्र वाटप करण्यात आले आहे.

तृतीयपंथीयांना मतदानाचा हक्क व त्याचे महत्व सांगून जास्तीत जास्त तृतीयपंथीयांनी मतदार नोंदणी करावी. तसेच https://transgender.dosje.gov या पोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

याप्रसंगी तृतीयपंथी ओळखपत्रासाठी ४२, मतदार ओळखपत्रांसाठी ३५, संजय गांधी निराधार योजनेसाठी ७७ आणि आधार कार्डसाठी १८ तृतीयपंथीयांनी नोंदणी करून योजनांचा लाभ घेतला.

कै. अंकुशराव लांडगे शैक्षणिक सामाजिक ट्रस्ट भोसरीचे प्रतिनिधी, संजयगांधी निराधार योजना, मतदार नोंदणी व आधार कार्ड नोंदणी विभागाचे कर्मचारी व तृतीयपंथी उपस्थित होते.
००००

PMPML कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन – नाना भानगिरे

पुणे : PMPML चे कर्मचाऱ्यांना अखेर सातवा वेतन आयोगानुसार वेतन मिळणार आहे. महापालिकेच्या धर्तीवर सातव्या वेतन आयोगानुसार डिसेंबर महिन्याच्या वेतनात आयोगाच्या फरकानुसार वाढणाऱ्या वेतनाची 50 टक्के रक्कम जमा केली जाणार आहे.

पीएमपी कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाबाबत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता.

आज PMPML मध्ये या मागणीबाबत बैठक घेण्यात आली त्यात हा निर्णय घेण्यात आल्याचे नाना भानगिरे यांनी सांगितले पीएमपीएमएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया यांनी ही बैठक घेतली,डिसेंबर महिन्याच्या वेतनापासूनच सातव्या वेतन आयोगाच्या फरकानुसारची 50 टक्के वेतनवाढ दिली जाणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे, सुमारे 11 हजार कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे,त्याबाबत उद्या ( मंगळवारी) अधिकृत आदेश काढला जाणार आहे

तर जानेवारी 2023 मध्ये आयोगा बाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही महापालिका आयुक्तांची संयुक्त बैठक घेऊन सातवा वेतन आयोग लागू केल्यानंतर उर्वरीत 50 टक्केवाढीनुसार, वेतन देण्यास सुरूवात केली जाणार आहे.

नाना बनगिरे यांनी ओमप्रकाश बकोरिया यांना निवेदन केले की कर्मचाऱ्यांना हक्काचे घर मिळावे यासाठी जागा निश्‍चित करणे , वैद्यकीय बिलांसाठी तातडीनं निधी उपलब्ध करून तसेच डेपोच्या परिसरात महिला व पुरूषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह उभारणे , कर्मचाऱ्यांसाठी कॅन्टीन सुरू करण्यात यावे,PMPML चे अध्यक्ष यांनी सर्व मागण्या लवकरात लवकर निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे असे आश्वासन दिले .

नाना भानगिरे यांच्यासह कामगार प्रतिनिधी नरेंद्र आवारे, श्रवण तौर, उमेश पांढरे यावेळी उपस्थित होते.

फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम देण्याचं आमिष :बिकनीवर ऑडिशन:१३ वर्षीय मुलीवर अत्याचार

पुणे- सिनेमात काम देतो सांगून अनेकांची फसवणूक सातत्याने सुरूच असताना आणखी एक भयंक ,संताप जनक घटना घडल्याचे निदर्शनास आले आहे. यामध्ये अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस उघडीस येऊ लागल्या आहेत. अशीच एक घटना पुण्यातून समोर आली आहे. चाकण येथील औद्योगिक क्षेत्रातील एका नामांकित उद्योजकाने ऑडिशन घेण्याच्या बहाण्याने १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला आहे.या प्रकरणी पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केलाआहे. गुन्हा दाखल होताच आरोपी उद्योजक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. राजेंद्र दगडू गायकवाड असे या उद्योजकाचे नाव आहे.पीडित मुलीच्या आईने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी उद्योजक राजेंद्र गायकवाड हा पीडितेच्या घरी आला होता. यावेळी त्याने पीडित मुलीला फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम देण्याचं आमिष दाखवलं. त्यानंतर आरोपीने ऑडिशन घेण्याच्या कारण सांगून पीडितेच्या आई-वडीलांना घरातून बाहेर पाठवलं आणि आरोपीने ऑडिशन घेण्याच्या बहाण्याने पीडित मुलीला कपडे उतरवायला लावले. पीडित मुलीने कपडे उतरवताच आरोपीने तिच्या अज्ञानपणाचा फायदा घेत तिच्यावर बलात्कार केला. याबाबत कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देखील दिली.पीडित मुलीला धमकी देऊन राजेंद्र गायकवाड हा तिथून पसार झाला. या सर्व घटनेनंतर पीडित मुलगी घाबरली. तिने हा सर्व प्रकार आई-वडीलांना सांगितला. मुलीवर अत्याचार झाल्याचं लक्षात येताच, पीडितेच्या आई-वडिलांनी तातडीने पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दाखल केली.या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी आरोपी राजेंद्र दगडू गायकवाड याच्यावर पोस्को कायद्याअंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच आरोपी राजेंद्र हा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मुंबईतील अतिधोकादायक इमारतींना  स्वयंपुनर्विकास करण्याची परवानगी देणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

नागपूर दि. २६ : मुंबईतील अतिधोकादायक इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी विकासकांना कालमर्यादा देण्यात येईल. मात्र दिलेल्या कालमर्यादेत काम पूर्ण न झाल्यास इमारतींचा स्वयंपुनर्विकास करण्याची परवानगी देण्यात येईल अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

मुंबईतील अतिधोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाबाबत सदस्य सर्वश्री अमिन पटेल, योगेश सागर, अतुल भातखळकर, पराग अळवणी,  सदा सरवणकर, श्रीमती यामिनी जाधव यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

श्री. फडणवीस पुढे म्हणाले की,  मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळाने उपकरप्राप्त इमारतींच्या सन २०२२ च्या पावसाळ्यापूर्वी केलेल्या सर्वेक्षणामध्ये २१ इमारती अतिधोकादायक घोषित केल्या असून यापैकी ८ इमारतींची दुरूस्ती प्रगती पथावर आहे. उर्वरित १३ इमारतींची दुरूस्ती करता येणे शक्य नसल्याने या इमारती रिक्त करणे, रहिवाशांना संक्रमण शिबिरात हलविणे, रिक्त इमारतींचे पाडकाम करणे आदी कार्य सुरू केले आहे. काही प्रकल्प न्यायप्रविष्ट असल्याने विलंब होत असल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले.

मुंबई शहर भागात पुनर्विकास करताना संक्रमण रहिवास उपलब्ध होत नाही, ज्यांना संक्रमण शिबिरात जागा दिली जाते, ते प्रकल्प पूर्ण झाला तरी जागा रिकामी करत नाहीत, यासारख्या अडचणी पुनर्विकास करताना येतात, असे श्री. फडणवीस यांनी एका उपप्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

संरक्षण दल, नौदल तसेच सीआरझेड यांची परवानगी घेताना त्यात सुसूत्रता यावी यासाठी केंद्रासोबत चर्चा करावी, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष ॲड. राहूल नार्वेकर यांनी प्रश्नावर होत असलेल्या चर्चेदरम्यान शासनाला दिले.

संरक्षण दलाची दोनशे मीटरची मर्यादा शिथील करावी ,झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांना सीआरझेड मधून वगळावे अशी विनंती केंद्राला करणार असून मुंबईतील अतिधोकादायक इमारतींचा पुनर्विकास जलद गतीने व्हावा, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्रश्नासंदर्भात नागपूर अधिवेशन संपल्यावर महिन्याभरात बैठक- देवेंद्र फडणवीस

मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांच्या प्रश्नांच्या अनुषंगाने मुंबईतील लोकप्रतिनिधी आणि संबंधित यंत्रणांची नागपूर विधिमंडळ अधिवेशन संपल्यानंतर एका महिन्याच्या आत बैठक घेतली जाईल तसेच केंद्र शासनाच्या अखत्यारीतील मुंबईतील इतर काही क्षेत्रावर झोपडपट्टया वसलेल्या आहेत. अशा झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनासाठी राज्य शासनाकडून केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली.

विधानसभा सदस्य कॅप्टन आर. सेल्वन यांनी, मुंबईतील सायन-कोळीवाडा भागातील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प रखडल्याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना उप मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

ते म्हणाले की, झोपडपट्टी पुनर्वसनाच्या मोठ्या प्रकल्पात विकासक काम करत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्वरित अशा विकासकांवर कारवाई करण्यात येईल. अशा प्रकल्पात नवीन विकासक नेमण्याची परवानगी देण्यात येईल. एखाद्या ठिकाणी पुनर्वसन प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुन्हा तिथे झोपडपट्टी निर्माण होऊ नये यासाठी धोरण तयार करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती श्री. फडणवीस यांनी दिली.

बृहन्मुंबईमधील एफ/उत्तर प्रभागामध्ये झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या एकूण १०५ योजना आहेत. रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना तसेच ज्या योजनांमधील झोपडीधारकांचे भाडे विकासकाने वेळेवर अदा केलेले नाहीत, अशा विकासकाविरुद्ध कारवाई करण्यात आली असून सदर योजनेतील झोपडीधारकांना नवीन विकासक नेमण्याची मुभा देण्यात आलेली आहे. तर तीन योजनांमधील विकासकांना विक्री घटकातील इमारतीचे बांधकाम थांबविण्याचे आदेश दिलेले आहेत. तर पाच विकासकांनी भाडे अंशत: अदा केले असून उर्वरित भाडे कालबद्ध पद्धतीने अदा करण्याचे मान्य केले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिली.

झोपडीधारक लाभार्थ्यास प्राप्त झालेली विनामूल्य सदनिका कोणत्याही प्रकारे हस्तांतरित करण्यास दहा वर्षे कालावधी पर्यंत मनाई असून दहा वर्षानंतर देखील प्राधिकरणाच्या पूर्व परवानगीनेच अशा प्रकारचा विक्री/हस्तांतरण व्यवहार करण्याचे बंधन आहे. झोपडीधारक लाभार्थ्याने पुनर्वसन प्रक्रियेमध्ये अवाजवी फायदा घेऊ नये, लाभार्थ्यांवर विक्री/हस्तांतरण व्यवहार करण्याची जबरदस्ती होऊ नये, म्हणून सदर अधिनियमात तरतूद असणे आवश्यक असले तरी प्रचलित तरतूद झोपडपट्टीधारक लाभार्थी कुटुंबावर मोठ्या कालावधीसाठी बंधन घालणारी आहे, असे लक्षात आले. पुनर्वसन सदनिकाधारक लाभार्थ्यांना उद्भवणाऱ्या समस्यांमुळे सुस्पष्ट धोरण ठरविण्याबाबत लोकप्रतिनिर्धीकडून नियमितपणे पाठपुरावा होत आहे. या पार्श्वभूमीवर पुनर्वसन सदनिका विक्रीची १० वर्षाची कालमर्यादा कमी करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

सायन कोळीवाड्यामधील वन क्षेत्र आणि मिठागराच्या जमिनींना केंद्र शासनाचे कायदे लागू होतात. तसेच केंद्र शासनाच्या अखत्यारीतील मुंबईतील इतर काही क्षेत्रावर झोपडपट्टया वसलेल्या आहेत, अशा झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनासाठी राज्य शासनाकडून केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

लक्षवेधी सूचनेवरील या चर्चेत सदस्य अस्लम शेख यांनी सहभाग घेतला.

000

हिवाळी अधिवेशन देते महिलांना रोजगाराची संधी!

राज्यातील महिला आज आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होत आहेत. कमी शिकलेल्या, पण वेगवेगळ्या प्रकारची कौशल्ये असलेल्या महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी बचतगटांचा मोठा हातभार लागत आहे. महिलांची संघटित ताकद व पारदर्शक सहकाराची प्रक्रिया  एकत्र येऊन विविध प्रकारची उद्योजकता निर्माण होत आहे, आणि समाजाच्या प्रगतीला हातभार लावत आहे. या चळवळीतून अनेक प्रकारचे उद्योग जन्माला आले आहेत.

सध्या नागपूर येथे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. विधानभवन, परिसरात महिला बचतगटांना उपहारगृह चालविण्यास अनुमती देण्यात आली आहे. विधानसभा परिसरात ज्यूस, उपाहार, जेवणाचे असे  एकूण आठ स्टॉल विविध महिला बचत गटांकडून लावण्यात आले

यंदाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशन कालावधीत विधिमंडळ सदस्य व अधिकारी/कर्मचारी यांना विधान भवन परिसरात खाद्यपदार्थ उपलब्ध व्हावे याकरिता  (१) बहुजन महिला स्वयंसहायक बचत गट (२) आधार महिला बचत गट, (३) सभ्य महिला बचत गट, (४) तथागत महिला बचत गट, (५) सक्षम महिला बचत गट (६) साक्षी महिला बचत गट (७) सोनाली महिला बचत गट (8) गजानन महिला बचत गट यांना  खाद्यपदार्थ पुरविण्यास मा. पीठासीन अधिकारी यांनी अनुमती दिली आहे

सोनाली महिला बचत गट ,नागपूर या बचतगटाच्या श्रीमती भारती वानखेडे यांच्याशी चर्चा करताना त्या म्हणाल्या, आमचा बचतगट गेल्या 15 वर्षांपासून नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात स्टॉल लावत आहे. शासनाकडून आम्हाला स्टॉल, खुर्च्या, टेबल, पाणी आणि लाईट मोफत देण्यात आले आहे. आमच्याकडील शेंगदाणे आणि तिळाचे लाडू अतिशय प्रसिद्ध आहेत. नेहमी अधिवेशनासाठी येणारे अधिकारी कर्मचारी आणि कार्यकर्ते आवर्जून लाडू खाण्यासाठी येतात. गावी घेऊन जाण्यासाठी खरेदी करतात. आम्हाला जी ऑर्डर मिळते ती पूर्ण करण्यासाठीही वेळ अपुरा पडतो. नाश्ता, वैदर्भीय पद्धतीचा चविष्ट शाकाहारी आणि मांसाहारी जेवण आमच्या स्टॉलवर असते, त्यामुळे अनेक आमदार आमच्या स्टॉलवर एकदातरी भेट देऊन जेवणाचा आस्वाद घेतात. आमदार रोहित पवार यांनी आमच्या सोनाली महिला बचत गटाच्या जेवणाविषयी ट्विट करून कौतुक केल्याने आमचा उत्साह वाढला आहे आणि आमच्याकडे जेवणासाठी येणाऱ्यांची संख्याही.

बहुजन महिला बचत गटाच्या श्रीमती वंदना लांजेवार यांनी सांगितले. विधानभवन परिसरात  शासनाकडून देण्यात आलेल्या या स्टॉलमुळे आमच्या गटातील महिलांना काही दिवस तरी रोजगार उपलब्ध झाला आहे. गाळा उपलब्ध करून देण्यात आला आहे. सर्व मोफत सेवा देण्यात आली असल्याने आम्ही बचत गटाच्या माध्यमातून लागणारे साहित्य आणून गरम जेवण तयार करून देतो. हिवाळी अधिवेशनात आम्हाला स्टॉल उपलब्ध करून दिला त्याबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त करते. नवीन बचतगटांना स्टॉल देताना बचतगटांना मेनू ठरवून दिल्यास सर्वांचा व्यवसाय चांगला होवू शकेल, अशी सूचना त्यांनी केली.

सभ्य महिला बचत गटाच्या ममता गेडाम यांनी सांगितले, आमच्या बचतगटांच्या महिलांना अधिवेशन काळात  रोजगार उपलब्ध झाला आहे. आम्ही तयार केलेल्या विविध प्रकारच्या स्वादिष्ट खाद्यपदार्थांचा ग्राहक आनंदाने आस्वाद घेतात, याचा आम्हा महिलांना आनंद वाटतो.

संत गजानन महिला बचत गटाच्या श्रीमती विद्या सेलूकर म्हणाल्या, आम्ही शुद्ध शाकाहारी जेवण ग्राहकांना देतो.सर्वात महत्त्वाचे आम्ही स्वच्छतेकडे अधिक लक्ष देतो. त्यामुळे  अनेक ग्राहक आनंदाने जेवणाचा आनंद घेतात. अधिवेशनाच्या निमित्ताने आम्हा महिलांना विधानभवनात प्रवेश मिळतो.आमदारांना भेटण्याची संधी मिळते, राज्यातील सर्व विभागांतून आलेल्या अधिकारी कर्मचारी यांच्याशी संवाद साधता येतो. विचारांची देवाण घेवाण होते. मार्गदर्शन मिळते, ते पुढे उपयुक्त ठरते.

अशाच प्रकारे साक्षी, तथागत, सक्षम महिला बचत गटांच्या महिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. बचत गट हा एक सामाजिक-आर्थिक उपक्रम आहे. ही प्रक्रिया संघटितपणे एकमेकांना समजून घेत आर्थिक उन्नतीकडे नेणारी असल्याने  या रचनेला स्वयंसहाय्यता गट हे नाव सार्थ ठरते.

बचत गटामुळे महिलांना स्वयंरोजगार मिळत आहे. महिलांचे उद्योगातील धाडस व कार्यक्षमता वाढत आहे. त्यांना व्यवसायातील भाग भांडवल उपलब्ध होत आहे. राष्ट्रीयकृत बॅंकींग क्षेत्रातील व्यवहाराची माहिती त्यांना मिळत आहे. बचत गटातील महिलांची आर्थिक, कौटुंबिक, वैचारिक प्रगती होत आहे. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन राज्यातील विविध समस्यांवर उपाय शोधणारे आहेच, त्याचबरोबर  बचतगटांच्या माध्यमातून महिलांना रोजगाराची संधी देणारेही  ठरते.

राजू धोत्रे,

सहायक संचालक,

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय,

मंत्रालय, मुंबई

राष्ट्रीय रस्ता सुरक्षा परिषद पुण्यात संपन्न

पुणे-

राष्ट्रीय रस्ता सुरक्षा परिषद कार्यक्रमाचे आयोजन मोटर ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स महाराष्ट्र राज्य यांचे वतीने क्रिएटीसिटी मॉल अर्बन बँक्वेट हॉल येरवडा येथे आयोजित करण्यातआले होते , या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा परिषदेचे उद्घाटन माजी प्रिन्सिपल सेक्रेटरी महेश झगडेव माजी परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य व परिवहन आयुक्त कार्यालय महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा विभागाचे प्रमुख व उप परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य भरत कळसकर यांच्या हस्ते फुगे सोडून करण्यात आले.माजी परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य महेश कुमार सरतापे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महाराष्ट्र पोलीस गुप्तचर अकॅडमी पुणे बल मलकित सिंग कार्यकारी समिती ऑल इंडिया मोटर काँग्रेस नवी दिल्ली अमृतलाल मदन अध्यक्ष ऑल इंडिया मोटर काँग्रेस नवी दिल्ली प्रेरणा सिंग रस्ता सुरक्षा जागतिक कीर्तीच्या अभ्यासक या मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले या राष्ट्रीय परिषदेमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रात रस्ता सुरक्षा चे काम करणाऱ्या मान्यवरांना रस्ता सुरक्षा विशेष योगदान दिल्याबद्दल गौरवण्यात आले . देशात अशा प्रकारचा उपक्रम पहिल्यांदाच होत आहे.
उद्घाटन समारंभात मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या वेबसाईटचे उद्घाटन महेश झगडे भरत कळसकर संजीव भोर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे बल मलकित सिंग अमृतलाल मदन महेश कुमार सरतापे प्रेरणा सिंग या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले असोसिएशनच्या कार्याबद्दल व आत्तापर्यंतच्या उपक्रमाबद्दल माहिती मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजू घाटोळे यांनी दिली. प्रास्ताविक सुनिता चौ हान कार्याध्यक्ष यांनी केले मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य वेबसाईट बाबत व संकल्पनेबाबत संपूर्ण माहिती असोसिएशनचे राज्य प्रवक्ता विवेक खाडे यांनी दिली. संकल्पना प्रशांत पांडे मुंबई यांची होती. सदर कार्यक्रमाला 250 सरकारमान्य मोटर ड्रायव्हिंग स्कूल संचालक व विविध क्षेत्रातील अधिकारी परिवहन क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. आभार प्रदर्शन शिवाजी काकडे सचिव मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत काकडे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनिता चौहा न राजेश कोटगिरे उपाध्यक्ष महेश चव्हाण उपाध्यक्ष प्रवीण महाकाळ उपाध्यक्ष सहदेव वंजारे महेंद्र सोनवणे सचिव सुनील मोरे उपाध्यक्ष सोमनाथ गायकवाड अनुज शिंदे टेक्निकल टीम महाराष्ट्र अनिल अडागळे आशिष पवार गणेश बाजारे प्रशांत बिराजदार दत्ता वाळुंज ठेंग बाळासाहेब धारमाळकर राजेश माळवतकर अर्चना इरकल राधिका पोटे सर्व कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिले.

ओजल, सानिका, आंचल उपांत्यपूर्व फेरीत

अमनोरा-पीवायसी एचटीबीए कप बॅडमिंटन स्पर्धा ; हवेली तालुका बॅडमिंटन संघटना आणि पीवायसी  हिंदू जिमखाना क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

पुणे : हवेली तालुका बॅडमिंटन संघटना (एचटीबीए) आणि पीवायसी हिंदू जिमखाना क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अमनोरा-पीवायसी एचटीबीए बॅडमिंटन कप अजिंक्यपद स्पर्धेत आंचल जैन, अस्मिता शेडगे, ओजल रजक, सानिका पाटणकर यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
पीवायसी हिंदू जिमखान्याच्या बॅडमिंटन कोर्टवर ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील १९ वर्षांखालील मुलींच्या दुसऱ्या फेरीत आंचल जैनने संयुक्ता मानेला १५-१, १५-४ असे, तर अग्रमानांकित अनन्या गाडगीळने श्रेया गुरवला १५-२, १५-१ असे सहज नमविले. अस्मिता शेडगेने खुशी सिंगवर १५-१२, १३-१५, १५-१३ असा, तर अनन्या देशपांडेने अपूर्वा घावतेवर १५-८, १५-६ असा, श्रेया शेलारने जिज्ञासा चौधरीवर १५-७, १५-९ असा विजय मिळवला. ओजल रजकने अनाहिता शर्माचे आव्हान १५-८, १५-१२ असे परतवून लावले. ओजलची आता उपांत्यपूर्व फेरीत दुसऱ्या मानांकित सानिका पाटणकरविरुद्ध लढत होईल. सानिकाने श्रेया भोसलेवर ८-१५, १५-१०, १८-१६ असा संघर्षपूर्ण विजय मिळवला.

विनीत, जयेशची आगेकूच
पुरुष एकेरीच्या चौथ्या फेरीत अग्रमानांकित विनीत कांबळेने अथर्व चव्हाणला १५-४, १५-१० असे नमवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. यानंतर जयेश महाजनने वेंकटेश अगरवालला १५-१३, १७-१५ असे, प्रणव गावडेने अभिजित कदमला १७-१५, १६-१४ असे, ईशान मेहेंदळेने ऋतुराज नाईकला १५-११, १३-१५, १५-९ असे नमविले. दुसऱ्या मानांकित चिराग भगतने विवेक मिसाळला १५-८, १५-५ असे पराभूत करून आगेकूच कायम राखली.

निकाल : १९ वर्षांखालील मुले – तिसरी फेरी – वर्धन डोंगरे वि. वि. अनय चौधरी १५-१३, १५-६; सर्वेश हाउजी वि. वि. पार्थ फिर्के १५-३, १५-७; ईशान देशपांडे अश्वजित सोनावणे १५-८, ९-१५, १५-१३; कृष्णा जसुजा वि. वि. अर्णव लुणावत १५-११, १५-११; वेदांत सरदेशपांडे वि. वि. मिमांशू गोगोई १५-१२, ११-१५, १५-१२; चैतन्य खरात वि. वि. जयंत कुलकर्णी १५-७, १५-५; सुजल लखारी वि. वि. वात्सल्य गर्ग १५-५, १५-१२; लौकिक ताथेड वि. वि. प्रणव गावडे १५-१३, ११-१५, १५-८.

११ वर्षांखालील मुले – चौथी फेरी – 
मिहिर इंगळे वि. वि. शरमन सपकाळ १५-४, १५-६; मीर अली वि. वि. अनुज भोसले १५-४, १५-५; यश मोरे वि. वि. अन्वय समग १५-६, ११-१५, १५-११; शरव जाधव वि. वि. पार्थ शिंदे १५-११, १५-१२; जतिन सराफ वि. वि. अर्जुन श्रीगडीवार १५-१३, १५-९.
११ वर्षांखालील मुली – तिसरी फेरी – ध्रुवी कुंबेफाळकर वि. वि. रिधिमा पवार १५-१२, १५-१३; गार्गी कामठेकर वि. वि. आद्या गाडगीळ १५-५, १५-९; समन्वया धनंजय वि. वि. क्रिशांगी असिजा १५-६, १५-७; जॅस्नम चहल वि. वि. स्वास्ती रूगे १५-८, १५-१०; उत्कर्षा शर्मा वि. वि. रिषिका रसाळ १५-११, १५-१०; ख्याती कत्रे वि. वि. दिविशा मान १५-३, १५-४.

१३ वर्षांखालील मुले – चौथी फेरी – 
राघवेंद्र यादव वि. वि. अभिक शर्मा १५-७, १५-१२; विराज सराफ वि. वि. जतिन सराफ १५-८, १५-५; कपिल जगदाळे वि. वि. सिद्धार्थ पनिस्कर १५-८, १५-१३; तनिष्क आडे वि. वि. सयाजी शेलार १५-८, १५-११; स्वरित सातपुते वि. वि. आर्यन निबे १५-२, १५-४; ध्रुव बर्वे वि. वि. आरुष अरोरा १५-१०, १५-९.

१३ वर्षांखालील मुली – चौथी फेरी – सोयरा शेलार वि. वि. सानिका बागळे १५-४, १५-७; आयुषी मुंडे वि. वि. अभिज्ञा ठोंबरे १५-१३, १५-९; अनुशा सुजान वि. वि. अनुष्का रुपडे १५-८, १५-३; सई आगवणे वि. वि. जनिशा असिजा १५-९, १६-१४; आर्या कुलकर्णी वि. वि. प्राजक्ता गायकवाड १५-११, १०-१५, १५-१२.

१५ वर्षांखालील मुले – पाचवी फेरी – सार्थक पाटणकर वि. वि. विहान मुर्ती १५-१२, १५-५; अर्जुन देशपांडे वि. वि. ओजस सोरटे १५-०, १५-५; निक्षेप कात्रे वि. वि. श्रेयस एम. १५-७, १५-१०; चैतन्य परंडेकर वि. वि. ऋषभ दुबे १५-११, १५-८.

सावधान : वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून वीज खंडित करण्याबाबतच्या बनावट संदेशांमध्ये वाढ

नागरिकांनी वैयक्तिक क्रमांकाच्या संदेशाला प्रतिसाद देऊ नयेमहावितरण

पुणे, दि. २६ डिसेंबर २०२२: वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून नागरिकांना ‘एसएमएस’, ‘व्हॉटस् ॲप’द्वारे बनावट संदेश पाठवण्याच्या प्रकारात गेल्या काही दिवसांपासून मोठी वाढ झाली आहे. नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत वैयक्तिक क्रमांकावरून आलेल्या बनावट संदेश किंवा कॉलवर विश्वास ठेऊ नये. तसेच वैयक्तिक क्रमांकावरून रक्कम भरण्यासाठी पाठविण्यात आलेली कोणतीही ऑनलाइन लिंक ओपन किंवा कोणतेही सॉफ्टवेअर डाऊनलोड करू नये असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. वीजबिलांचा सुरक्षित भरणा करण्यासाठी ग्राहकांसाठी महावितरणचे मोबाईल ॲप व www.mahadiscom.in ही वेबसाईट उपलब्ध आहे.

गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून ‘एसएमएस’, ‘व्हॉटस् ॲप’द्वारे बनावट संदेश व थेट कॉल येण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. कल्याणीनगर, धानोरी, विश्रांतवाडी, नगररोड आदी भागात अनेक नागरिकांना बनावट संदेश प्राप्त झाले आहेत. ‘मागील महिन्याचे वीजबिल अपडेट नसल्याच्या कारणावरून आज रात्री ९.३० वाजता वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. करिता ताबडतोब सोबत दिलेल्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा’, असा बनावट ‘एसएमएस’ किंवा ‘व्हॉटस् ॲप’ संदेश पाठविण्यात येत आहेत. मोबाईल कॉल देखील करण्यात येत आहेत.

विशेष म्हणजे ज्यांचा वीजबिलांशी काहीही संबंध नाही अशा नागरिकांना किंवा वीजबिल पूर्वीच भरलेले आहे अशा वीजग्राहकांना देखील हा बनावट संदेश पाठविण्यात येत आहे. सावधगिरी न बाळगता नागरिकांनी या बनावट संदेशांना किंवा कॉलला प्रतिसाद दिल्यानंतर फक्त ‘ऑनलाइन’द्वारेच वीजबिल भरण्यास सांगणे, त्यासाठी वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून ऑनलाईन पेमेंटची लिंक पाठविणे किंवा सॉफ्टवेअर (जे मोबाईल किंवा संगणक हॅक करतात) डाऊनलोड करण्यास सांगितले जात आहे. नागरिकांनी या बनावट संदेशांना प्रतिसाद दिल्यास मोबाईल किंवा संगणक हॅक करून संबंधित बॅक खात्यातील शिल्लक रक्कम लंपास करण्यात येत आहे.

महावितरणकडून कोणत्याही वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून अशा प्रकारचे ‘एसएमएस’ व ‘व्हॉटस् ॲप’ मेसेज पाठविण्यात येत नाही. तर ज्या ग्राहकांनी ग्राहक क्रमांकासोबत त्यांच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी केली आहे केवळ त्याच वीजग्राहकांना संगणकीय प्रणालीद्वारे ‘एसएमएस’ पाठविण्यात येतात. या संदेशाचे सेंडर आयडी (Sender ID) हे VM-MSEDCL, VK-MSEDCL, AM-MSEDCL, JM-MSEDCL असे आहेत. तसेच या अधिकृत संदेशाद्वारे वीजग्राहकांना कोणत्याही वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याबाबत कळविले जात नाही. बँकेचा ओटीपी शेअर करण्याबाबत किंवा कोणत्याही प्रकारचे सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यास सांगितले जात नाही. सोबतच वैयक्तिक क्रमांकावरून ‘व्हॉटस् ॲप’ संदेश पाठविले जात नाही असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

महावितरणकडून अधिकृत सेंडर आयडीद्वारे फक्त ‘एसएमएस’ पाठविले जातात. यामध्ये पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्तीतांत्रिक किंवा अन्य कारणांमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास तो पूर्ववत होण्यास लागणारा संभाव्य कालावधी तसेच दरमहा वीजबिलांची रक्कमस्वत:हून मीटर रिडींग पाठविण्याचे ग्राहकांना आवाहनमीटर रिडींग घेतल्याची तारीख व वापर केलेली एकूण युनिट संख्यावीजबिलाची रक्कमदेय दिनांक, वीजपुरवठा खंडित करण्याची रीतसर नोटीस आदींची माहिती पाठविण्यात येते.

परंतु, सध्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून नागरिकांना पाठविण्यात येणारे ‘एसएमएस’, ‘व्हॉटस् ॲप’ संदेश तसेच मोबाईल कॉल बनावट आहेत. त्यास कोणताही प्रतिसाद देऊ नये. बिलाच्या पेमेंटसाठी लिंक ओपन किंवा कोणतेही सॉफ्टवेअर डाऊनलोड करू नये. बनावट संदेशामध्ये नमूद केलेल्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधू नये. काही शंका व तक्रारी असल्यास वीजग्राहकांनी चोवीस तास सुरु असलेल्या १९१२, १८००२१२३४३५ किंवा १८००२३३३४३५ या टोल फ्री क्रमांक किंवा नजीकच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

दलित पॅंथर महिला अध्यक्षा उषा राजगुरूंचा कॉंग्रेस पक्षात प्रवेश

पुणे- कॉंग्रेस पक्षाच्या सर्वधर्मसमभाव या धोरणानेच एक संघ भारत सुरळीत पणे प्रगतीच्या दिशेने मार्गक्रमण करू शकतो या विचाराच्या प्रभावाने आज दलित पॅंथरच्या महिला अध्यक्षा उषा राजगुरू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कॉंग्रेस भवन येथे जाऊन कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला . यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे ,माजी मंत्री रमेश बागवे , दीप्ती चौधरी, कमल व्यवहारे, अभय छाजेड, अजित दरेकर यांनी या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत केले . आणि पक्षाची स्वातंत्र्य चळवळी पासून असलेली ध्येये धोरणे यावर माहिती देत कॉंग्रेसला आपल्या सहकार्यांने निश्चित शहरातले मार्गक्रमण सोपे होईल अशी आशा व्यक्त केली .

अब्दुल सत्तार यांची हकालपट्टी करा:महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक

0

नागपूर -कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची हकालपट्टी करा, अशी मागणी महाविकास आघाडीच्या आमदारांनी करत सोमवारी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली.विधिमंडळ अधिवेशनात सोमवारी विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार आणिअब्दुल सत्तार यांनी केलेल्या घोटाळ्याची २८९ अन्वये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषद आमदार एकनाथ खडसे यांनी सभागृहात पोलखोल केली. भव्य कृषी-क्रीडा-सांस्कृतिक महोत्सवात सरकारी अधिकाऱ्यांना पैसे गोळा करण्याचे टार्गेट दिल्याचा दावा खडसे यांनी केला.यासाठी वृत्तपत्रात आलेल्या बातमीचा दाखला त्यांनी दिला. एकंदरीत १५ कोटी रुपयांची उलाढाल या प्रकरणात होण्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले. एका बाजूला गायरान जमीन देण्याचा राज्य मंत्र्यांना अधिकार नसतानाही गायरान जमीनीचे वाटप करणे तसेच अधिकाऱ्यांना वेठीस धरून पैसे गोळा करण्याचे प्रयत्न करणे हे नीतीमत्तेत बसते का असा सवाल खडसे यांनी सत्ताधाऱ्यांना केला.अशाप्रकारचा भ्रष्टाचार जबाबदार व्यक्तीकडून होत असेल तर या संपूर्ण घटनेची चौकशी करून हा पैसा नेमका जातो कुठे, त्याचे नियम काय,राज्यात सर्वत्र ही वसुली सुरू असल्याने घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी एकनाथ खडसे यांनी सभागृहात केली.

मंत्री अब्दुल सत्तार यांचायविरोधात महाविकास आघाडीच्या आमदारांनी आक्रमक भूमिका घेत वेलमध्ये उतरत जोरदार घोषणाबाजी केली. राजीनामा द्या, राजीनामा द्या, अब्दुल सत्तार राजीनामा द्या… अब्दुल सत्तार यांची हकालपट्टी झाली पाहिजे… गायरान बेचनेवालों को जुते मारो सालों को… 50 खोके एकदम ओके… सत्ताराने घेतले खोके, सरकार म्हणतेय एकदम ओके… वसुली सरकार हाय हाय… श्रीखंड घ्या कुणी, कुणी भूखंड घ्या…अशा घोषणा यावेळी दिल्या. माजी मंत्री आणि आमदार दिलीप वळसे पाटील आणि माजी मुख्यमंत्री व आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनीही अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली.बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे… महाराष्ट्राची पिळवणूक, गुजरातमध्ये गुंतवणूक… राजीनामा द्या राजीनामा द्या , मुख्यमंत्री राजीनामा द्या… द्या खोके, भूखंड ओके… घेतले खोके माजलेत बोके… कर्नाटक सरकार हाय हाय… मिंधे सरकार हाय हाय… निर्लज्ज सरकार हाय हाय… राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव… गली गली मे शोर है खोके सरकार चोर है… संत्र्याला भाव मिळालाच पाहिजे… धानाला भाव मिळालाच पाहिजे… अशा गगनभेदी घोषणा देत आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत जोरदार घोषणाबाजी केली.

नेमके प्रकरण काय?

सर्वोच्च न्यायालयाचे आदेश डावलून अब्दुल सत्तार यांनी मौजे गोडबाभूळ (ता. जि. वाशीम) येथील गट नंबर 44 मधील 37 एकर 19 गुंठे सरकारी गायरान जमिनीचे एका व्यक्तीला वाटप केले. या जमिनीची किमंत साधरणतः दीडशे कोटी रुपये आहे. जिल्हाधिकाऱ्यांनीही हा निर्णय अवैध पत्र 5 जुलै 2022 ला महसूलच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना लिहिले. सर्वोच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानेही याप्रकरणी ताशेरे ओढलेत. त्यामुळे अब्दुल सत्तार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विधानसभेत अजित पवार आणि विधान परिषदेत एकनाथ खडसे आणि अनिल परब यांनी केली.

.

अब्दुल सत्तारांसमवेत विरोधी पक्षनेत्यांच्या प्रकरणांचीही माहीती घेऊ- मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पलटवार

आम्हाला सीमावासीयांबाबत शिकवण्याची गरज नाही:उद्या ठराव आणू

नवी दिल्ली-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, अब्दुल सत्तार यांच्यावर गायरान जमीन भुखंड प्रकरणात आरोप होत आहे. त्यांच्या प्रकरणाची माहीती घेऊ. त्यासोबतच विरोधी पक्षनेत्यांच्या प्रकरणांचीही माहीती घेऊ. विरोधकांचीही माहीती घेऊ आणि सत्ताधारी लोकांचीही माहीती घेऊ.महाराष्ट्र, कर्नाटक सीमाआंदोलनात मी स्वतः जेल भोगली. त्यामुळे इतर लोकांनी आम्हाला याबाबत शिकवण्याची गरज नाही. आम्ही सरकार म्हणून पूर्णपणे सीमावासीयांच्या पाठीशी खंबीर आहोत. सीमावासीयांबाबतचा ठराव उद्या विधीमंडळात घेणार आहोत अशी स्पष्टोक्ती देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले.

उद्धव ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पलटवार केला. ते नवी दिल्लीत आज बोलत होते. सध्या ते लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. त्यांचा ताफा बिर्ला यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी पोहचले आहेत.

मला केंद्राचे निमंत्रण होते

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आज दिल्लीत वीर बालदिवस होता. गुरु गोविंदसिंग यांची दोन मुलांनी सहा आणि नऊ वर्षांच्या वयात बलीदान दिले. गुरुगोविंदसिंग यांचे महाराष्ट्र व पंजाबचे नाते आहे. त्यामुळेच मला केंद्र सरकारच्या कार्यक्रमाला मला निमंत्रण होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, बोलणाऱ्यांना माहीती घ्यायला हवी होती की, कुठल्या कार्यक्रमासाठी मी दिल्लीत आलो,. स्वतःच्या प्राणांचे बलीदान दिले, पण त्या मुलांनी स्वाभीमान जाऊ दिला नाही. शौर्याची गाथा व एक आदर्श पुढच्या पिढीला या मुलांनी घालुन दिला. ओम बिर्ला यांची सदिच्छा भेट घेतली. त्यांनी मला घरी बोलावले होते.

साठ वर्षे जूना विषय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, सीमावादाचे प्रकरण सुप्रीम कोर्टात न्यायप्रविष्ठ आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पहिल्यांदाच हस्तक्षेप केला व दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना बोलावले. सुप्रीम कोर्टात प्रकरण असताना कुठलीही कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होऊ नये याबाबत त्यांनी सूचना दिल्या. हा विषय साठ वर्षे जूना आहे.

मी स्वतः जेल भोगली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयात प्रकरण असताना प्रकरणावर व निकालावर कुठलाही परिणाम घडू नये. कर्नाटक असो की, महाराष्ट्र सर्वांनी याची काळजी घ्यायला हवी. जे बोलत आहे त्यांनी योजना बंद केला. आम्ही सर्व योजना सुरू केल्या. सीमाआंदोलनात मी स्वतः जेल भोगली. त्यामुळे इतर लोकांनी आम्हाला शिकवण्याची गरज नाही. आम्ही पूर्णपणे सीमावासीयांच्या पाठीशी सरकार म्हणून खंबीर आहे. त्याबाबतचा ठराव उद्या विधीमंडळात करणार आहोत.

गिरीश बापटांच्या भेटीला शरद पवार हॉस्पिटलमध्ये…

पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदार गिरीश बापट रुग्णालयात दाखल आहेत. श्वसनाचा त्रास होत असल्याने गेल्या २० ते २५ दिवसांपासून गिरीश बापट यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्या प्रकृती बाबत सर्व क्षेत्रातील लोकांना ,मान्यवरांना चिंता व्यक्त होते आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दीनानाथ रुग्णालयात जाऊन खासदार गिरीश बापट यांच्या प्रकृतीची विचारणा केली. त्यांनी गिरीश बापट यांच्यासोबत संवाद देखील साधला. यावेळी बापट यांनी, मी आता बरा आहे, लवकरच परत येईन, असा शब्द शरद पवारांना दिला.

गिरीश बापट यांचा स्वभाव आणि पुण्यामध्ये भाजपसाठी त्यांनी केलेल्या कामाची नेहमीच प्रशंसा होते. पुण्यामध्ये राजकीय संस्कृती जोपासणारे बापट पहिले असल्याचंही बोललं जातं. म्हणून राजकीय नेत्यांची मैत्री किंवा आधाराचं नातं पाहायला मिळतं.शरद पवार भेटण्यासाठी आले असता, तुम्ही जास्त बोलू नका, आराम करा, असा सल्ला पवारांनी दिला. बापट यांना श्वसनाचा त्रास असल्या कारणाने, तुम्हाला जास्त बोलत येत नाही, किती महिन्यांपासून हा आजार सुरू आहे? अशी एकूण प्रकृती बाबत विचारणार करणारे प्रश्न शरद पवार यांनी विचारले.मी गेल्या दोन महिन्यांपूर्वी एका कार्यक्रमात गेलो होतो, तेव्हापासून मला आजार सुरू झाला, असं गिरीश बापट म्हणाले.

ललित प्रभाकर  प्रथमच  दिसणार टेरर अंदाजात

तरुण रक्तात नेहमीच एक चैतन्य सळसळत असतं. काहीतरी करून दाखविण्याची धमक या वयात नसानसांमध्ये भिनलेली असते. आयुष्यातला असा काळ ज्यात  प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याची प्रबळ इच्छा असते. चुकीचं घडताना त्याच्याविरुद्ध आवाज उठवण्याची ताकद असते. हाच अंदाज आपल्याला अभिनेता ललित प्रभाकरच्या रूपाने आगामी टर्री या मराठी चित्रपटातून पहायला मिळणार आहे.

टर्री’ हा शब्द पाळणारा, खरी मैत्री जोपासणारा..कोणतीही जबाबदारी स्वीकारणारा पण गरम रक्ताच्या टर्री मध्ये हळवेपणा आहे. अस्सल ग्रामीण बाज घेऊन रांगड्या अंदाजात टर्री प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे. ललित प्रभाकर प्रथमच अशा ‘टेरर स्वॅग’ मध्ये मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहे.

त्याची नजर टर्रीत्याचा जिगर टर्री..!

त्याला नडणाऱ्यांची टर्रर्रर्रकन फाडायला येतोयटर्री!!!

असा जबरदस्त स्वॅग घेऊन टर्री चित्रपटाचं बेधडक रांगडं पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. येत्या १७ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘ऑन युव्हर स्पॉट आणि फॅन्टासमागोरिया फिल्म्स यांच्या सहयोगाने टर्री‘ चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून प्रतीक चव्हाण, अक्षय आढळराव पाटील या चित्रपटाचे निर्माते आहेत. सहनिर्माते महेश सहानी आणि सुबूर खान आहेत.  राष्ट्रीय पारितोषिक  विजेते  महेश रावसाहेब काळे यांनी चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन केले आहे.

टर्री‘ चित्रपटात ललित सोबत गौरी नलावडे दिसणार असून शशांक शेंडे, अनिल नगरकर आदि कलाकारांच्या भूमिका आहेत. चित्रपटाचे छायांकन अमोल गोळे यांनी केले असून संकलन प्रवीण जहागीरदार, श्रीराम बडवे यांचे आहे. संगीतकार प्रफुल्ल कार्लेकर-स्वप्नील गोडबोले आहेत. गायक अवधूत गुप्ते, रोहित राऊत, शरयू दाते यांच्या आवाजात चित्रपटातील गाणी स्वरबध्द करण्यात आली आहेत. एजाज गुलाब हे या चित्रपटाचे अॅक्शन डिरेक्टर आहेत. 

अतिशय सुंदर आशय, विषय चित्रपटामधील उत्तम संवाद, त्याला अॅक्शनची जोड असलेल्या या कलाकृतीचं  व्हिजन पसंत पडल्याने टर्री चित्रपटाची निर्मिती केल्याचे निर्माते प्रतीक चव्हाण यांनी सांगितले. तर ग्रामीण भागातील आजची ‘टेरर’होऊ पाहणारी तरुणाई आणि त्यातून कळत नकळत उद्भवणारे धोके, प्रत्येक तरुणाला हवाहवासा वाटणारा प्रसंगी आत्मचिंतन आणि विचारमंथन करण्यास भाग पडणारा अगदी सोप्या भाषेत चित्रपटातून मांडलेला सामाजिक आशय, मनाला भिडल्याने या चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतल्याचे निर्माते अक्षय आढळराव पाटील यांनी सांगितले.  

टर्री चित्रपटाच्या निमित्ताने आजवर केलेल्या भूमिकांपेक्षा अगदी वेगळी भूमिका करायला मिळाल्याचं ललित आवर्जून सांगतो. वर्षभर या भूमिकेसाठी मी मेहनत घेतली असून चित्रपटातील माझा अंदाज प्रेक्षकांना नक्कीच आवडेल असा विश्वास अभिनेता ललित प्रभाकर ने व्यक्त केला.

येत्या १७ फेब्रुवारीला टर्री‘ चित्रपट प्रदर्शित होणार असून चित्रपटाचे वितरण पॅनोरमा स्टुडिओ करणार आहे.  

काँग्रेस भवन येथे शालेय विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धा संपन्न.

पुणे- येत्या २८ डिसेंबर रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा १३७ वा वर्धापन दिन संपन्न होणार आहे. या दिनाचे औचित्य साधून पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पुणे शहरातील शालेय विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा ह्या हेतूने मराठी,हिंदी व इंग्रजी या भाषांमध्ये वत्कृत्व स्पर्धेचे आयोजन शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या संकल्पनेतून नुकतेच काँग्रेस भवन, शिवाजीनगर पुणे येथे करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन पुण्याच्या पहिल्या महिला महापौर कमल व्यवहारे यांच्या हस्ते झाले.

सदर स्पर्धेमध्ये इ. ८ वी ते इ. १० वी व इ. ११ वी ते इ. १२ वी ह्या वर्गातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. वत्कृत्व स्पर्धेमध्ये महात्मा गांधी एक वैचारिक नेतृत्व, भारतीय संगणक क्रांतीचे जनक, भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्षे हे विषय देण्यात आले होते. तसेच ५ क्रमांकाना आकर्षक बक्षीसे (एज्युकेशनल टॅब, सायकल, स्मॉट वॉच, हेड फोन इ.) देण्यात आली. शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. इ. ८ वी ते इ. १० वी मध्ये साफिया शेख हिस प्रथम क्रमांक, श्रावणी संकपाल हिस द्वितीय क्रमांक, मारियम पटेल हिस तृतीय क्रमांक, सृष्टी पांड्ये हिस चतुर्थ क्रमांक, पराग ओक याचा पाचवा क्रमांक आला तर स्नेहा ओंबासे, उत्कर्षा रणपिसे, आदिराज सोनवणे यांनी उत्तेजनार्थ पारितोषिके पटकाविले.

इ. ११ वी ते इ. १२ वी या गटामध्ये रणवीर डोंगरे याने प्रथम क्रमांक, श्रावणी नेटके हिने द्वितीय क्रमांक तर अर्णव पाटोळे याने उत्तेजनार्थ पारितोषिके पटकाविले.कार्यक्रमाचे संयोजन माजी नगरसेविका नीता रजपूत यांनी केले होते.यावेळी रफिक शेख, सुनील शिंदे, अजित दरेकर, फैय्याज शेख, द. स. पोळेकर, मेहबूब नदाफ, सीमा सावंत, सचिन आडेकर, राजेंद्र भुतडा, गुलाम खान, विक्की खन्ना, सौरभ अमराळे, सुजित यादव, दिपक निनारिया, संतोष पाटोळे, लतेंद्र भिंगारे आदी उपस्थित होते.