Home Blog Page 1463

अरारा,G20 झाली की,दुरुस्ती: गुरुवारी पाणी नाही…

पुणे; पर्वती जलशुद्धीकरण केंद्र, लष्कर जलकेंद्र, नवीन आणि जुने होळकर जलकेंद्र, भामा-आसखेड जलकेंद्र, वारजे, एसएनडीटी, चतु:श्रृंगी, वडगांव जलकेंद्र, कोंढवे-धावडे जलकेंद्र येथे पुणे महानगरपालिकेच्या वतीने देखभाल दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. त्यामुळे येत्या गुरुवारी (दि.19) संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शुक्रवारी (दि.20) सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता पाणीपुरवठा विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

पाणी पुरवठा बंद असणारा भाग
पर्वती MLR टाकी परिसर – गुरुवार पेठ, बुधवार पेठ, काशेवाडी, क्वार्टर गेट परिसर, गंजपेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहिया नगर, सोमवार पेठ, अरुण वैद्य स्टेडीएयम परिसर, घोरपडे पेठ इ.

पर्वती HLR टाकी परिसर – सहकार नगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर काही भाग, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणीनगर 1 आणि 2, लेक टाऊन परिसर, शिवतेजनगर, अप्पर इंदिरानगर, लोअर इंदिरानगर, शेळके वस्ती महेश सोसायटी, बिबवेवाडी गावठाण, प्रेमनगर, डायस प्लॉट, ढोले मळा, सॅलेसबरी पार्क, गिरीधर भवन चौक परिसर, ठाकरे वसाहत, पर्वती गावठाण, मीठानगर, शिवनेरी नगर, भाग्योदय नगर, कोंढवा खुर्द, पर्वती दर्शन, तळजाई, कात्रज, धनकवडी परिसर,

पर्वती LLR परिसर – शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, रोहन कृतिका व लगतचा परिसर, राजेंद्र नगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजी नगर परिसर, स्वारगेट परिसर

लष्कर जलकेंद्र अंतर्गत येणारा भाग – संपूर्ण हडपसर, सातववाडी, गोंधळेनगर, ससाणे नगर, काळे पडळ, बी.टी. कवडे रस्ता, भीमनगर, कोरेगाव पार्क, रामटेकडी, औद्योगिक परिसर, वानवडी, जगताप चौक, जांभूळकर मळा, काळेपडळ, हांडेवाडी रोड, महमदवाडी गाव, कोंढवा खुर्द, कोंढवा गावठाण, मिठानगर, भाग्योदय नगर, लुल्लानगर, संपूर्ण पुणे कॅन्टोन्मेंट परिसर, केशवनगर, साडेसतरा नळी, फुरसुंगी, उरूळी देवाची, मांजरी बुद्रुक, शेवाळवाडी, खराडी, वडगांवशेरी, ताडीवाला रस्ता, मंगळवार पेठ, मालधक्का, येरवडा गाव, एनआयबीएम रोड, रेसकोर्स इ.

नवीन व जुने होळकर जलकेंद्र अंतर्गत येणारा भाग – मुळा रस्ता, खडकी कॅन्टोन्मेंट संपूर्ण परिसर, MES, HE Factory, हरीगंगा सोसायटी इ.

भामा आसखेड जलकेंद्र परिसर – लोहगांव, विमाननगर, वडगांवशेरी, कल्याणीनगर, विश्रांतवाडी, फुलेनगर, येरवडा,

कळस, धानोरी इ.

वारजे जलकेंद्र अखत्यारीतील चांदणी चौक टाकी परिसर – पाषाण, भूगाव रस्ता, कोकाटे वस्ती, सेंटीन हिल सोसायटी, मधुवन सोसायटी, संपूर्ण बावधन, उजवी आणि डावी भुसारी कॉलनी, चिंतामणी सोसायटी, गुरूगणेश नगर, सुरज नगर, सागर कॉलनी, भारती नगर, बावधन परिसर, सारथी शिल्प सोसायटी, पूजा पार्क, शांतीबन सोसायटी, डुक्कर खिंड परिसर, शास्त्रीनगर, न्यू लक्ष्मीनगर, परमंहस नगर, पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, निम्हणमळा, लम्हाणतांडा, मोहन नगर, सूस रस्ता इ.

गांधी भवन टाकी परिसर – कुंभारवाडी टाकी परिसर, काकडे सिटी, होम कॉलनी, सिप्ला फाउंडेशन, रेणूकानगर, हिल व्यू गार्डन सिटी, पॉप्युलर कॉलनी, वारजे माळवाडी, गोकुळ नगर, अतुलनगर, बी.एस.यु.पी स्कीम, महात्मा सोसायटी, भुजबळ टाऊनशिप, एकलव्य कॉलेज परिसर, कुमार परिसर, धनंजय सोसायटी, रोहन गार्डन परिसर, कोथरूड क्षेत्रीय कार्यालय परिसर, अर्थव वेद, स्नेहल अमित पार्क, कांचन गंगा, अलक नंदा, शिवप्रभा मंत्री पार्क -1, आरोह सोसायटी, श्रावण धारा झोपडपट्टी, सहजानंद, शांतीवन गांधी स्मारक, किर्लोसकर डीझेल कंपनी, लक्ष्मीनगर झोपडपट्टी, मृणमयी प्रीमारोज,

आर्चिड लेन 7 व 9, मुंबई-पुणे बायपास रोड दोन्ही बाजू, शेरावती सोसायटी, सिद्धकला सोसायटी, श्रीराम सोसायटी, गिरीष सोसायटी, तिरुपती नगर, कुलकर्णी हॉस्पिटल परिसर, हिंगणे होम कॉलनी, मिलेनियम स्कूल, कर्वेनगर गावठाण, तपोधान परिसर, रामनगर, गोसावी वस्ती, कालवा रस्ता इ.

पॅनकार्ड क्लब GSR टाकी परिसर – बाणेर, बालेवाडी, बाणेर गावठाण, चाकणकर मळा, पॅनकार्ड क्लब रस्ता,
पल्लोड फार्म, शिंदे पारखे वस्ती, विधाते वस्ती, मेडिपॉईंट रोड, विजयनगर, आंबेडकरनगर, दत्त नगर इ.

वार्जे जलकेंद्र लगत GSR टाकी परिसर – कर्वेनगर, तपोधाम सोसायटी, शाहू कॉलनी गल्ली क्र. 1 ते 11,
इंगळे नगर, वारजे जकात नाका परिसर, कर्वेनगर गल्ली क्रमांक 1 ते 10

एस.एन.डी.टी. (M.L.R.) व चतु:श्रृंगी टाकी परिसर – गोखलेनगर, औंध, बोपोडी, पुणे विद्यापीठ परिसर,
लॉ कॉलेज रोड, बीएमसीसी, आयसीएस कॉलनी, भोसलेनगर, सेनापती बापट रस्ता, भांडारकर रस्ता, प्रभात रस्ता,
चतु:श्रृंगी टाकीवरुन होणारा पाणीपुरवठा भाग, पौड रोड, शीला विहार कॉलनी, अद्वैत सोसा.भीमनगर, वेदांतनगरी,

कुलश्री कॉलनी, विठ्ठल मंदिर परिसर, दशभूजा गणपती परिसर, नळस्टॉप, सहकारनगर वसाहत म्हात्रे पुलापर्यंत एच.ए. कॉलनी टिळेकर प्लॉट,
भारतनगर, अर्चनानागर, भरतकुंज, स्वप्नमंदीर, सुनिता, युको बँक कॉलनी, टँकर पॉईंट डि.पी. रस्ता मंगेशकर हॉस्पिटल, हिमाली सोसायटी, वकिलनगर इ. करिष्मा सोसायटी इ.

एस.एन.डी.टी. (H.L.R.) टाकी परिसर – गोखले नगर, शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी परिसर, रेव्हेन्हू कॉलनी,
कोथरूड, वडारवाडी, श्रमिक वसाहत, डहाणूकर कॉलनी, सुतारदरा, किष्किंदा नगर, जयभवानी नगर,
केळेवाडी, आयडीयल कॉलनी, जनवाडी, वैदूवाडी, संगमवाडी इ.

कोंढवे-धावडे जलकेंद्र – वारजे हाय-वे परिसर, रामनगर, उत्तम नगर, शिवणे, कोंढवे धावडे, न्यु कोपरे

वडगाव जलकेंद्र परिसर- हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी,
कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, येवलेवाडी,सहकारनगर भाग-2 वरील भाग, आंबेडकर नगर, टिळकनगर, दाते बस स्टॉप परिसर इत्यादी.

जी २० परिषदेचा केंद्रबिंदू मानवी विकास हवा

माणसा इथे मी तुझे गीत गावे..
असे गीत गावे तुझे हित व्हावे…

कवी वामनदादा कर्डक यांनी आपल्या कवितेतून माणसांच्या हितासाठी लिहिलेले हे शब्द आजच्या जागतिकिकरणाच्या, धावत्या युगात अतिशय महत्त्वाचे ठरणारे आहे. वेगाने विकसीत होणाऱ्या या जगात माणसाच्या हितांचा विचार केला जात आहे का ? विकासाचा केंद्रबिंदू माणूस आहे का ? या प्रश्‍नांचे उत्तरे शोधणे गरजेचे बनले आहे.

भारत हा शेतीप्रधान देश आहे. अनेक जण शेतीला व्यवसाय म्हणून बघत होते. मात्र सध्या शेतीला बुरे दिन आल्याचे चित्र आहे. जग वेगाने विकसीत होत असताना शेती करण्याच्या अडचणींमध्ये वाढ होत असल्याचे दिसते. रासायनिक खते, बि-बियाणे यांच्या वाढत्या किंमती, पाऊसाचा लहरीपणा, शेतमालाला योग्य भाव न मिळणे यासह असंख्य प्रश्‍नांनी बळीराजा त्रस्त झाला आहे. त्यामुळे व्यवसाय म्हणून शेतीकडे बघण्याचा कल बदलला आणि शेतीतून धान्याची निर्मिती करणारे पाऊले रोजगारासाठी शहराच्या दिशेने पडू लागली.

राष्ट्रपिता महात्मा गांधींनी गावाच्या विकासाचे स्वप्न पाहिले. सातत्याने त्यांनी त्याची मांडणी देखील केली. मात्र महात्मा गांधींच्या या स्वप्नांना प्रत्यक्ष अंमलबजावणीचा आयाम मिळाला नाही. केंद्रात व राज्यात अनेक वर्षांपासून सत्तेवर असणाऱ्या युपीए सरकारने शहरांच्या विकासावर भर दिला. त्या प्रमाणे धोरणे आखली जाऊ लागली. त्यामुळे शहरे अधिक प्रगत होत गेली. त्यामानाने खेड्यांचा विकास खुंटला गेला. वाढत्या औद्योगिकरणामुळे शहरांच्या विकासात भर पडली. रोजगार, आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा आदीसह अनेक विकासाच्या मुद्‌द्‌यांच्या चर्चा रंगू लागल्या. शहरी विकासाचा आराखडा मांडून त्यासाठी निधी उपलब्ध करून देणाऱ्या जागतिक पातळीवर संस्थांची देखील निर्मिती करण्यात आली. या संस्था शहराच्या पायाभूत सुविधांसाठी पैसा खर्च करू लागली आहेत. यामध्ये स्वच्छ, चकाचक आणि प्रशस्त रस्ते, पंचतारांकित हॉटेल, हॉस्पीटल, विमानसेवा आदींसह अनेक गोष्टींचा समावेश करण्यात आला. देशभरात अनेक शहरे उभी देखील राहिली. मात्र शहराची उभारणी करताना, पायाभूत सुविधांची निर्मिती करताना येथे खस्ता खाणारा, घाम गाळणारा, अंगमेहनतीची कामे करणारा कष्टकरी वर्ग मात्र या शहरी विकासाच्या चौकटीतून बाहेर फेकला गेला, ही वस्तूस्थिती आहे. शहरी गरिब म्हणून गणलेल्या वर्गाला याच शहरात अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य या मूलभूत गरजांसाठी रोजचा संघर्ष करावा लागत आहे.

ज्ञानाचे माहेरघर अशी ख्याती असणाऱ्या पुणे शहरात सध्या जी 20 ही परिषद भरली आहे. जागतिक स्तरावरील विद्वान या परिषदेत सहभागी झाले आहेत. ज्या पुण्यात ही परिषद होत आहे, त्या पुणे शहरात शहरी गरिब लोकांचे स्थान नेमके काय आहे, याचा विचार केल्यास विकासाच्या अंतर्गत पोकळीचा अंदाज येईल.

पायाभूत सुविधांचा अभाव
पुणे शहरातील शहरी गरीब वर्गातील नागरिकांना पायाभूत सुविधांचा अभाव आहे. कामाची सुरक्षा नाही. आरोग्य, शिक्षण दर्जेदार मिळत नाही. शहरात असणाऱ्या झोपडपट्ट्यांमध्ये पिण्यायोग्य पाणी नाही. सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था आहे. ड्रेनेजच्या समस्यांनी नागरिक त्रस्त आहेत. कचऱ्याची विल्हेवाट होत नाही.

शैक्षणिक
पुणे शहरात 10 हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिल्याचे विदारक वास्तव आहे. पुणे महापालिकेच्या शाळेत एक लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थी अनुपस्थित राहण्याचे प्रमाण मोठे आहे. शाळा गळतीचे प्रमाण प्राथमिक विभागात 40 टक्‍के, माध्यमिक विभागात 30 टक्‍क्‍यांचे आहे. 20 टक्‍केच विद्यार्थी उच्च शिक्षणाकडे जात आहेत. तर पदवीधर होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण एक टक्‍काच असल्याचा शैक्षणिक अहवाल सांगत आहे. प्राथमिक विभागातील 269 शाळांपैकी दहावीपर्यंतच्या केवळ 17 शाळा आहेत. तर 12 वी पर्यंतच्या शाळांची संख्या केवळ चार आहे.

झोनिपुचा असफल उद्देश
शहरी गरिब वर्गासाठी 1995 मध्ये झोपडपट्टी निर्मूलन पुनर्विकास योजना सुरू करण्यात आली. 2005 पासून योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली. मात्र ही योजना कागदावरच राहिली असल्याचे चित्र आहे. शहराच्या चार टक्‍के जमिनीवर 42 टक्‍के झोपडपट्ट्यांचा भार आहे. शहरात 17 वर्षात 1 लाख 3 हजार झोपडपट्टीधारकांपैकी केवळ 7 हजार 500 घरे या योजनेअंतर्गत पुर्णत्त्वाला आली आहेत. या गतीने झोपडपट्टी निर्मूलन पुनर्विकास होत राहिला तर शहरी गरिबी हटणार कशी, असा प्रश्‍न आहे.

आरोग्य सुविधाच सलाईनवर
पुणे महापालिकाअंतर्गत अनेक रुग्णालयांची निर्मिती करण्यात आलेली आहे. या रुग्णालयांमध्ये एकही रुग्णालय सुसज्ज आयसीयु बेडने सज्ज नाही. जीवनावश्‍यक औषधांचा पुरवठा होत नाही. 1 लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणारी 20 हजार शहरी गरिबांची लोकसंख्या आहे. मात्र चांगल्या आरोग्य सुविधाच त्यांना मिळत नाहीत.

विद्यार्थ्यांची गैरसोय
पुणे शहर एज्युकेशन हब म्हणून पुढे येत आहे. जगभरातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी शहरात दाखल होत आहेत. या विद्यार्थ्यांसाठी राहण्याच्या सुविधाच नाहीत. मागासवर्गीय आणि इतर गरिब विद्यार्थ्यांची राहण्यासाठी सोय करताना ससेहोलपट होत आहे. जीडीपी रेटमध्ये विकासाच्या टप्प्यावर आठवा क्रमांक लागणाऱ्या शहरात विकासासाठी निधी मात्र अपुराच मिळत आहे.

समाविष्ट गावे आणि बेकायदेशीर बांधकामे
पुणे महापालिकेमध्ये 1990 पासून शेजारील गावे समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू झाली. ही गावे समाविष्ट होत असताना मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर बांधकामे करण्यात आली. जेथे हा राहणारा वर्ग सध्या कायद्याने सुरक्षित नाही. त्यामुळे ही बांधकामे पाडण्याच्या कारवाईला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. परिणामी अनेक नागरिकांवर बेघर होण्याची वेळ आली आहे.

सार्वजनिक वाहतूकीबाबत निराशाच
पुण्यातील सार्वजनिक वाहतूकीबाबत सर्वसामान्यांच्या हातात निराशाच पडत असल्याचे दिसते. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्याऐवजी ती मोडकळीस कशी येईल याचे प्रयत्न शासनाच्या धोरणातून होत आहे. शहरात पीएमपीएमएलने दररोज साडे बारा लाख प्रवासी 1 हजार 700 बसेसमधून प्रवास करतात. प्रवास करणाऱ्यांमध्ये दिव्यांग बांधव, महिला, कामगार, विद्यार्थी आणि ज्यांच्याकडे स्वतःचे वाहन नाही त्यांचा समावेश होतो. एवढी मोठी संख्या असताना काही लोकप्रतिनिधी बीआरटी बंद करण्याची मागणी करत आहेत, ही शोकांतिका आहे. सर्वसामान्य लोकांच्या प्रवास करणाऱ्यांची संख्या पाहता काही लोकप्रतिनिधींची ही मागणी अयोग्य ठरत आहे. शहराचा विकास होत असताना सध्या आपण मेट्रो ट्रेन पर्यंत येऊन पोचलो आहे. शहराची लोकसंख्या जितकी आहे, त्या पेक्षा अधिक वाहनांची नोंदणी पुणे आरटीओ कार्यालयाकडे होत आहे. खाजगी वाहनांमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्‍न निर्माण झाला असून कामावर वेळेत जाण्याला उशिर होत आहे. परिणामी त्याचा परिणाम कामावर होत आहे.

नदी प्रदुषणात वाढ
वाढत्या औद्योगिकरणात पर्यावरणाच्या रक्षणाकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. अनेक कंपन्या आपले रसायनमिश्रित पाणी नदीमध्ये सोडत आहेत. त्यामुळे नदी प्रदूषणात वाढ होत आहे. पर्यावरणाचा ऱ्हास झाल्याने निसर्गचक्रात बदल झाले. पाऊसाचे प्रमाण ठराविक ठिकाणीच वाढले. त्यामुळे पूरांचा सामना करण्याची वेळ झोपडपट्टठीधारकांच्याच वाट्याला आली. भविष्यातील संभाव्य धोके टाळण्यासाठी उपाययोजना हव्यात.

या सर्व बाबींचा विचार करता जी – 20 परिषदेतील प्रतिनिधींनी याकडे गांभिर्याने पाहणे गरजेचे आहे. परिषद होण्याला विरोध नाही. मात्र भौतिक सुविधांचा विचार करताना मानवी विकासाचा केंद्रबिंदु मानून त्यावर जी-20 मधील प्रतिनिधींनी काम करणे गरजेचे आहे.

लोकशाहिर अण्णा भाऊ साठे म्हणतात त्या प्रमाणे ही ‘पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून, ती कष्टकरी वर्गाच्या तळहातावर उभारलेली आहे’. जी-20 परिषदेच्या प्रतिनिधींनी या कष्टकरी वर्गाचा विचार करून जागतिक स्तरावर उपाययोजना कराव्यात या उद्देशा पोटीच लेखी स्वरूपात लिहिण्याचा केलेला हा खटाटोप आहे.

डॉ. सिद्धार्थ धेंडे,

माजी उपमहापौर,

पुणे महापालिका

मो. नं – ९६८९९३४२८४

आठवणीत राहील अशी ‘संध्याकाळ’परदेशी पाहुण्यांनी धरला ढोल-लेझीमवर ठेका

पुणे, दि.१६: ‘जी-२०’ बैठकीच्या निमित्ताने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे सर्व जी-२० प्रतिनिधींसाठीं सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सादरीकरणाच्या अंतिम टप्प्यावर ढोल-लेझीमच्या तालावर परदेशी पाहुण्यांनी ठेका धरला. ढोल, लेझीम, टाळ हाती घेत महाराष्ट्राच्या संस्कृतीला दाद दिली.

यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या आर्थिक घडामोडी या विभागाचे संयुक्त सचिव सॉलोमन अरोकिराज, विभागीय आयुक्त सौरभ राव, कुलगुरू डॉ. कारभारी काळे, पुणे महानरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पोलीस आयुक्त रितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आदी उपस्थित होते.

यावेळी भैरी भवानी परफॉर्मिंग आर्ट्सच्या कलाकारांनी ‘सागा ऑफ मराठा एम्पायर’ या संकल्पनेवर आधारित महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे विविधांगी दर्शन घडविणाऱ्या कलांचे सादरीकरण केले. प्रारंभी शिववंदना, मर्दानी खेळ, पोतराज, वाघ्या-मुरळी, गोंधळ, छक्कड, संकेतभाषा कला असलेली करपल्लवी यासोबतच तान्हाजी मालुसरे यांना समर्पित सादरीकरण करण्यात आले. शिवराज्याभिषेक गीताने कार्यक्रमात परमोच्च बिंदू गाठला. त्यानंतर अखेरीस ढोल, लेझीम ताशाचे जोरदार सादरीकरण झाले आणि परदेशी पाहुण्यांना यात सामील होण्याचा मोह अवरला नाही. त्यांनीदेखील सर्व कलाकारांना दाद देत ढोल ताशाच्या गजरावर ठेका धरला. तर काहींनी टाळ वाजवून आनंद व्यक्त केला.

पालकमंत्र्यांनी केले प्रतिनिधींचे स्वागत
जी-२० बैठकीसाठी आलेल्या प्रतिनिधींचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी स्वागत केले. पालकमंत्र्यांनी काही प्रतिनिधींशी संवाददेखील साधला. पुणे शहराने पाहुण्यांच्या स्वागतासाठी चांगली तयारी केली आहे. पाहुण्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाच्यावेळी व्यक्त केलेला आनंद लक्षात घेता पुणेकरांचे प्रयत्न सफल झाले असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्राची सांस्कृतिक लोकधारा सर्वांनाच आपलेसे करणारी असल्याचेही ते म्हणाले.
00

दीपक मानकरांच्या नेतृत्वाखालील स्वामी समर्थ पॅनेल विजयी

श्री गणेश सहकारी बँकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर

पुणे -महानगरपालिका कर्मचार्‍यांच्या श्री गणेश सहकारी बँक लि. च्या पहिल्यांदाच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत श्री स्वामी समर्थ पॅनेल मोठ्या बहुमताने विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपमहापौर दीपक मानकर यांचे नेतृत्व श्री स्वामी समर्थ पॅनेलला लाभले. तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी उपमहापौर आबा बागुल यांचे मार्गदर्शन या पॅनेलला लाभले. बँकेचे 1600 हून अधिक सभासद असून पुणे महानगरपालिका कर्मचार्‍यांच्या या बँकेत गेल्या 70 वर्षांत निवडणुक झाली नव्हती. यंदा श्री स्वामी समर्थ पॅनेल हे तरुण कार्यकर्त्यांचे पॅनेल विजयी झाले असून. बँकेचे संचालक म्हणून निवडून आलेल्यांची नावे पुढिलप्रमाणे
सर्वसाधारण गट – रमेश भंडारी, विजय बानगुडे, राहुल परदेशी, राजू कोळपे, सुनील भोसले, विनायक भिसे, रत्नकांत लोणारे, प्रमोद चव्हाण
इतर मागासवर्गीय – रघुनाथ कुंभार
अनुसूचित जाती जमाती – धनराज वैराट
महिला राखीव जागा –  सौ. वैशाली इंगळे, सौ. उज्वला काळोखे

पुण्यात धर्मांतरासाठी पैशांचे आमिष:१४ जणांवर गुन्हा दाखल

पुणे-पुणे जिल्ह्यातील आळंदी परीसरात जबरदस्तीने धर्मांतर करण्याचा आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. धर्मांतरासाठी पैशांचे आमिष दाखवण्यात आले आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार आल्यानंतर पोलिसांनी तब्बल 14 जणांवर गुन्हा दाखल केला आहे .

याबाबत पोलिसांनी सांगितले कि,’ प्रसाद भाऊसाहेब साळुंखे (वय 25 रा. मरकळ,पुणे) यांनी आळंदी पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार प्रदीप मधुकर वाघमारे (चऱ्होली), प्रशांत मधुकर वाघमारे (वय 30), रोनक शैलेश शिंदे (वय 18 रा.भोसरी), अशोक मुकेश पांढरे (वय 19 भोसरी), मुकेश जयकुमार विश्वकर्मा (वय 25 रा.भोसरी), लक्ष्मण श्रीरंग नायडू (वय 35 रा.भोसरी), म्यूंगी व्युयुंग वुन (वय 38 रा. भोसरी), ज्युईल वोमन युन (वय 36), ईशा भाऊसाहेब साळवे (वय 19) या तीन महिला व एक अल्पवयीन मुलगी अशा एकूण 14 जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार ,दहा दिवसांपूर्वी दिघी आणि आळंदी परिसरात येशूचे रक्त म्हणून द्राक्षाचं लाल सरबत पाजून धर्मांतराचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. त्यानंतर आता सक्तीच्या धर्मांतरासाठी पैसे देऊन तक्रारदार यांना ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास भाग पाडत असल्याचा प्रकार रविवारी आळंदी जवळील मरकळ गावात उघडकीस आला आहे.

दरम्यान, धर्मांतरबंदी कायद्यासाठी नुकतेच 15 जानेवारी रोजी आळंदीत जाहीर मोर्चा देखील काढण्यात आला होता. यानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी सदर भागात धर्मांतराची घटना पुढे आल्याने खळबळ उडाली आहे. आरोपी हे फिर्यादी यांच्या गावातील लोकांच्या घरासमोर जाऊन ‘तुम्ही बायबल वाचता का, चर्चमध्ये या, आम्ही तुम्हाला धंद्याला आर्थिक मदत करू असे आमिष दाखवून दोन धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. याबाबत पुढील तपास आळंदी पोलिस करत आहे.

पाकिस्तान आणि चीनच्या कुरापती बंद होणार नाहीत पण भारत त्यांच्या कुरापतींना सडेतोड उत्तर देण्यास सक्षम -निवृत्त लेफ्टनंट जर्नल संजय कुलकर्णी

डोबिंवलीमध्ये आगळावेगळा आर्मी डे शानदारपणे साजर
मुंबई, दि. १६ जानेवारी- पाकिस्तान हा देश कधीही सुधारणा नाही. भारताला कसे पाण्यात बघायचे आणि देशाचे तुकडे कसे करायचे यासाठीच त्यांचे नेहमीच प्रयत्न सुरु असतात. पाकिस्तान आणि चीन हे दोन्ही देश एकमेकांना मिळालेले आहेत त्यांच्या कारवाया कधीही बंद होणार नाहीत. त्यामुळे भारताला आत्मनिर्भर आणि एकजूट कायम राहावे लागेल व भारत या देशांच्या कुरापतींना सडेतोड प्रत्युत्तर देईल असे प्रतिपादन निवृत्त लेफ्टनंट जर्नल संजय कुलकर्णी यांनी केले.
देशात ७५ वा इंडियन आर्मी डे साजरा करण्यात आला. या निमित्ताने डोंबिवलीमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने आर्मी डे शानदारपणे साजरा करण्यात आला. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. श्री गणेश मंदिर संस्थान येथे भारतीय सैन्याचे गौरवक्षण आणि उल्लेखनीय कामगिरी करणारे भारतीय सैनिक या विषयावर छायाचित्र प्रदर्शन भरवण्यात आलं. त्यानंतर घरडा सर्कल वरून सैनिकांना अभिवादन करण्यासाठी बाईक रॅली काढण्यात आली. मदन ठाकरे चौक येथे कल्याण डोंबिवलीतल्या होतकरू NCC कॅडेट्सची परेड झाली. त्यानंतर फडके रोड येथे निवृत्त लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णी यांनी ‘सियाचेन : काल, आज आणि उद्या’ या विषयावर उपस्थितांशी संवाद साधला. डोंबिवलीकर – एक सांस्कृतिक परिवार, विविसु डेहरा, के. वि. पेंढारकर कॉलेज, भगिनी निवेदिता इंग्लिश स्कुल, ओमकार एज्युकेशनल ट्रस्ट यांच्या संयुक्त सहकार्याने हा सोहळा संपन्न झाला. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना लेफ्टनंट जनरल कुलकर्णी यांनी सांगितले की, अग्निपथ योजना ही देशाच्या भवितव्यासाठी उत्तम आहे, त्यामुळे याकडे सकारात्मकदृष्टीने पाहणे गरजेचे आहे. देशातील अनेक तरुण – तरुणींना यामध्ये संधी मिळेल, तसेच या योजनेमुळे भारताच्या आर्मीचे वय देखील तरुण राहिल. या सर्व तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी आमच्यासारखे निवृत्त अधिकारी आहेत. त्यामुळे आपण मेहनत करू आणि यातून देश घडवू असे त्यांनी सांगितले.
देशातील आर्मी ही पाकिस्तान आणि चीन पेक्षाही खंबीर आहे. आपल्याला कोणत्याही सरकारचा दबाव नाही. बाकीच्या देशात राजकीय पक्ष आर्मीमध्ये अधिक हस्तक्षेप करतात, पण आपल्याकडे तसे नाही. त्यामुळे आपला देश आर्मीच्या बाबतीत अधिक सक्षम आहे. इतकेच नव्हे तर माझ्या 40 वर्षाच्या नोकरीच्या काळात आणि त्यानंतरही मी अशा पद्धतीचा अनोखा कार्यक्रम पाहिला नाही असेही त्यांनी सांगितले.
देशातील प्रत्येक जण शांततेत झोपतो याचे कारण सैनिक आहेत. 1947 ला स्वतंत्र मिळालं. मात्र इंग्रजांनी सैन्य सुपूर्त केले नाही. हे दोन वर्षाने फ्रान्सिस बुचर यांनी सुपूर्त केले. देशात पहिल्यांदा हा आर्मी दिवस इतक्या मोठ्या प्रमाणात डोंबिवली शहरात साजरा केला जात आहे. हा कार्यक्रम देशाच्या प्रत्येक नागरिकांच्या अस्तित्वाचा कार्यक्रम आहे. डोंबिवली शहराचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे. जगाच्या पाठीवर शहराची सांस्कृतिक नगरी म्हणून ओळख आहे. आता ही ओळख देशप्रेमी डोंबिवलीकर अशी देखील होणे गरजेचे आहे. भारत माते बद्दलचा अभिमान आपल्याला प्रत्येकामध्ये प्रेरित करायचा आहे. आपण घेत असलेला श्वास सैनिकांमुळे घेत आहोत याची जाणीव प्रत्येकाला करून द्यायची आहे. सैनिकांची आठवण ठेवून अभिवादन करण्याची प्रथा संपूर्ण देशात डोंबिवलीकरानी प्रथम सुरू केल्याचा मला अभिमान आहे असे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.
डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार, पेंढारकर महाविद्यालय, सिस्टर निवेदिता आणि ओमकार इंटरनॅशनल शाळा या सगळ्या संस्थांच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला. नवी पेंढारकर महाविद्यालय, ओमकार इंटरनॅशनल शाळा आणि सिस्टर निवेदिता शाळेतील विद्यार्थ्यांनी परेड सादर केली तर गाडा सर्कल येथे असणाऱ्या शहीद विनय कुमार सच्चान यांच्या स्मारकाला आदरांजली वाहण्यात आली त्यानंतर लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णी यांना पेंढारकर महाविद्यालयाकडून गार्ड ऑफ ऑनर हा पुरस्कार देण्यात आला. तर फडके रस्त्यावर देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आयोजित केला होता.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने स्वराजरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा ३४२ वा राज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात संपन्न

पुणे-छत्रपती संभाजी महाराजांचा आज राज्याभिषेक दिवस. पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने या राज्याभिषेकदिनाचे औचित्य साधत डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास तब्बल ३० फुटी पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवर छत्रपती स्वराज्यरक्षक संभाजी महाराज यांना अभिवादन करणारे फलक लावण्यात आले होते. ज्यामुळे डेक्कन परिसरातील संपूर्ण वातावरण शंभूमय झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खासदार तथा “स्वराज्यरक्षक संभाजी” या मालिकेमध्ये छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे अभिनेते डॉ.अमोल कोल्हे व शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी महाराजांना वंदन केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी “स्वराज्यरक्षक” संभाजी महाराजांच्या जयघोषानांनी जयघोष करत संपूर्ण डेक्कन परिसर दणाणून सोडला होता.

यावेळी बोलताना डॉ.अमोल कोल्हे म्हणाले की,” सन १६८१ साली, मराठा साम्राज्याचे तेजस्वी महानायक छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला होता. आज आपल्याकडून छत्रपतींच्या विचाराचे वारसदार म्हणून महाराजांचा खरा इतिहास जगासमोर मांडणे एवढी एकच माफक अपेक्षा आहे. छत्रपतींच्या विषयांमध्ये कोणीही राजकारण आणण्याचा प्रयत्न करू नये”

तर शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की, “स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या बाबत आमचे नेते अजितदादा पवार यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पदाधिकारी म्हणूनच नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्यभूमी असणाऱ्या महाराष्ट्राचा एक नागरिक म्हणून मी माझ्या राजाला कुठल्यातरी एका धर्मापुरते मर्यादित ठेवू इच्छित नाही. स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज हे १८ पगड जातीधर्मियांच्या रयतेचे राजे होते, त्यांना आम्ही स्वराज्यरक्षक म्हणूनच संबोधनार. त्यांना केवळ एका धर्माच्या चौकटीत बसवण्याचे काम हे समाजातील कोत्या प्रवृत्तीचे लोक करत आहेत, त्याला आमचा ठाम विरोध आहे” .

याप्रसंगी प्रवक्ते प्रदीप देशमुख,भगवान साळुंखे,संदीप बालवडकर,मृणालिनी वाणी,विजय ढाकले,काका चव्हाण, संगीता बराटे , महेश हांडे,रोहन पायगुडे, दिपक कामठे,अर्चना चंदनशिवे , शरद दबडे , , आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

‘जी-२०’राष्ट्रांच्या अतिथी प्रतिनिधींच्या हस्ते वृक्षारोपण

पुणे दि.१६- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानामध्ये जी-२० राष्ट्रांच्या परिषदेच्या निमित्ताने पुण्यात आलेल्या विविध देशांच्या प्रतिनिधींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या आर्थिक घडामोडी या विभागाचे संयुक्त सचिव सॉलोमन अरोकिराज, विभागीय आयुक्त सौरभ राव, कुलगुरू डॉ. कारभारी काळे, महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, उपायुक्त श्रीमती वर्षा लढ्ढा आदी उपस्थित होते.

‘जी-२०’ राष्ट्रांच्या प्रतिनिधींच्या ‘इन्फ्रास्ट्रक्चर वर्किंग ग्रुप’ची दोन दिवसीय बैठक पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून विद्यापीठ परिसरात चर्चासत्राच्या निमित्ताने विविध राष्ट्रांचे प्रतिनिधी आले असता सुरुवातीला त्यांच्या हस्ते, विद्यापीठात वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये कडुनिंब, सोनचाफा, ताम्हण, बकुळ, सप्तपर्णी, मुचकुंद आदी वृक्षांचा समावेश आहे. वृक्षारोपण प्रसंगी काही राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी वृक्षांची माहिती औत्सुक्याने जाणून घेतली.

अतिथी प्रतिनिधींचे मराठमोळ्या पारंपरिक पद्धतीने स्वागत

विद्यापीठामध्ये वृक्षारोपणाच्या कार्यक्रमानंतर अतिथी प्रतिनिधींचे चर्चासत्राच्या मुख्य कार्यक्रमासाठी मुख्य इमारत परिसरात आगमन होताच मराठमोळे ढोल- ताशे, तुतारी, लेझीम वाद्याच्या गजरात जोरदार स्वागत करण्यात आले. या सुंदर अशा स्वागताने अतिथी भारावून गेले. त्यांनी उपस्थित सर्व कलाकारांचे अभिनंदन केले व काही कलाकारांशी मनमोकळा संवाद साधला. याप्रसंगी कलाकारांचा उत्साह ओसंडून वाहत होता. काही प्रतिनिधींनी जागीच फेटा बांधून घेतला व अवघ्या काही क्षणात फेटा बांधणाऱ्यांचेही कौतुक केले. काहींनी आपल्या मोबाईलमध्येही महाराष्ट्राची सांस्कृतिक छबी उत्साहाने टिपली.

महाबळेश्वरमध्ये टोळधाडांच्या गैरकारभाराने पर्यटकात संताप ..पुन्हा नकोरे बाबा महाबळेश्वर …

पुणे – फास्ट टॅग नाही चालणार , डेबिट, क्रेडीट कार्ड नाही चालणार ..डिजिटल इंडिया असू देत रे .. इथे नाही चालत ते .. ऑनलाईन .फॉनलाईन अशा निर्बंधांनी पर्यटकांना त्रस्त करत आणि प्रसंगी दादागिरी करत महाबळेश्वर मध्ये तीन, तीन वेळा टोळधाड पडत असल्याने पर्यटकांच्या वाहनांच्या रांगाच रांगा तास तास भर हलत नसल्याने मुंबई पुण्यासह अनेक ठिकाणाहून येणारे पर्यटक वैतागले आहेत साहजिकच आता यामुळे महाबळेश्वरच्या हॉटेल व्यवसायावर याचा मोठा परिणाम होत आहे .एकीकडे पर्यटकांची गर्दी असूनही येथील व्यावसायिकांना मात्र सिझन मध्ये देखील ग्राहकांची प्रतीक्षाच यामुळे करावी लागण्याची चिन्हे आहेत .

याबाबत अधिक माहिती घेतली असता , महाबळेश्वर मध्ये वन विभाग ,नगर पालिका आणि ग्रामपंचायती हे तिघेही आपापल्या स्तरावर तोल ची आकारणी करत आहेत . टोल घेणाऱ्या कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालणे म्हणजे सरकारी कामात अडथळा आणणे असे नियम लागू करून ग्राहकांची गळचेपी सरकारनेच करून ठेवल्याने सर्व टोल वसुली साठी नेमलेले कर्मचारी बेफाम सुटले आहेत . आणि रोखीने टोल वसुलीसाठी आता जोर देऊ लागले आहेत . टोल ची संगणकीय नोंद सुद्धा अनेक ठिकाणी होताच नसल्याने पावत्या जपून ठेवणे क्रमप्राप्त होत आले आहे, अन्यथा पुढे अचानक होणार्या चौकशीच्या भरारीत पर्यटकांना डबल डबल टोलचा भुर्दंड पडतो आहे. टोल च्या वारंवार च्या आणि ठिकठीकाणी होणारी अडवणूक पर्यटकांच्या आनंदावर विरजण पाडत आहे . आणि आता पुढच्या वेळी महाबळेश्वर नकोच .. दुसरीकडे जाऊ असे म्हणून येथून निघात्ना दिसत आहेत .

पोस्ट ऑफीस उघडं आहे’ मालिकेत गुरुशिष्याची जोडी मकरंद अनासपुरे आणि दिलीप घारे

 ‘पोस्ट ऑफीस उघडं आहे…’,  ही मालिका ५ जानेवारीपासून गुरुवार ते शनिवार रात्री 9 वा. सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी दाखल झाली आहे. वेगळ्या विषयांच्या आणि धाटणीच्या मालिका आपल्याला सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळतात. ‘पोस्ट ऑफीस उघडं आहे…’ या मालिकेबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातले विनोदी अभिनेते या मालिकेत पाहायला मिळणार आहेत.  मकरंद अनासपुरेही या मालिकेतून आपल्याला पाहायला मिळणार आहेत.

                     मालिकेत एक विशिष्ट जोडी पाहायला मिळणार आहे. मकरंद अनासपुरे आणि दिलीप घारे ही गुरुशिष्यांची जोडी ह्या मालिकेत पाहायला मिळणार आहे. हे दोघेही दिग्गज अभिनेते आहेत. ‘पोस्ट ऑफिस उघडं आहे…’ या मालिकेत दिलीप घारे हे मकरंद अनासपुरे यांच्या वडिलांचा भूमिकेत आपल्याला दिसणार आहेत. दिलीप घारे हे माझे अभिनयातले गुरू आहेत, असं मकरंद अनासपुरे यांनी सांगितलं.  अभिनय कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात दिलीप घरे यांनी मकरंद अनासपुरे यांना अभिनय शिकवला आणि आता हे दोघे दिग्गज आपल्याला एकाच मालिकेत दिसणार आहेत. त्यांची जुगलबंदी पाहण्यासारखी आहे. वडील आणि मुलगा यांची ही मराठवाड्यातली सुंदर जोडी आपल्याला पाहता येणार आहे. याबद्दल मकरंद अनासपुरेही  उत्सुक आहेत.

मुलांनी खेळाकडे करियर म्हणून पाहावे -उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

सातारा दि. १६ – केंद्र व राज्य शासनाने खेळांना महत्त्व दिले असून विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते. त्याचा चांगला परिणाम जागतिक स्पर्धांमध्ये दिसत आहेत. जागतिक स्तरावर पदक मिळवणाऱ्या खेळाडूला राज्य शासन नोकरी देत आहे. तरी मुला मुलींनी खेळाकडे खेळ म्हणून न पाहता करियर म्हणून पाहावे, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

तंत्रशिक्षण पुणे विभागीय क्रीडा स्पर्धांचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय क्रीडांगण, कराड येथे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांचे उद्घाटन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयाची सहसंचालक दत्तात्रेय जाधव यांच्यासह शासकीय तंत्र महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

खेळामुळे मानसिक, बौद्धिक, शारीरिक वाढ होण्यास मदत होते, असे सांगून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. पाटील म्हणाले, कोविड मुळे विस्कळीत झालेले जनजीवन सुरळीत करण्याचे काम सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज तंत्रशिक्षण विभागाच्या क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. देशातील तंत्रशिक्षण विभाग विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे कौशल्य शिक्षण देत आहे. यातून नवनवीन संशोधक निर्माण होत आहेत. याचा लाभ देशाच्या आर्थिक सुधारणेला होत आहे.

खेळाडू सतत सराव करीत असतात, त्यामुळे त्यांना १० वी व १२ वी मध्ये ग्रेस गुण दिली जातात. कुस्तीचा सराव करणारे मल्ल व स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या मल्लांच्या मानधनात वाढ करण्यात येणार आहे. तसेच मल्लांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ ही देण्यात येणार आहे.

तंत्रशिक्षण विभाग चांगले संशोधक निर्माण करत आहे. या विभागातील अडचणींबाबत लवकरच चर्चा करून त्या सोडवल्या जातील. तंत्रशिक्षण विभागाच्या आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धा चांगल्या वातावरणात पार पाडा, असेही उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री पाटील यांनी शेवटी सांगितले.

‘सीओईपी’कडून मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांचा सत्कार

पुणे, दि. १६ जानेवारी २०२३:सीओईपी टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या वतीने कुलगुरू प्रा. मुकुल सुतावणे यांच्याहस्ते या विद्यापीठाचे माजी विद्यार्थी व महावितरणच्या पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांचा विद्यापीठाच्या सभागृहात नुकताच सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर अधीक्षक अभियंता श्री. प्रकाश राऊत व श्री. सतीश राजदीप यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी तत्कालीन कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, पुणे या शासकीय महाविद्यालयातून १९८८ मध्ये विद्युत अभियांत्रिकी पदवी विशेष प्राविण्यासह प्राप्त केली. त्यानंतर श्री. पवार महावितरणच्या सेवेत दाखल झाले. श्री. राजेंद्र पवार यांची नुकतीच मुख्य अभियंतापदी पदोन्नती झाली. त्यानिमित्त सीओईपी टेक्नॉलॉजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. मुकुल सुतावणे यांच्याहस्ते श्री. पवार यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी कुलगुरू प्रा. सुतावणे म्हणाले की, सामाजिक बांधिलकी जपणारे श्री. पवार यांचा शैक्षणिक प्रवास हा उत्कृष्ट राहिला आहे. तसेच वीज व सेवा क्षेत्रातील ३३ वर्षांच्या अनुभवामुळे श्री. पवार यांच्या नेतृत्त्वात पुणे परिमंडलातील महावितरणच्या विविध सेवा अधिकाधिक ग्राहकाभिमुख होतील व ग्राहकांना उत्कृष्ट सेवा मिळेल. सोबतच सीओईपी विद्यापीठ व महावितरणच्या संयुक्त सहकार्याने वीज क्षेत्रातील विविध आधुनिक अभ्यासक्रमांना चालना दिली जाईल असे कुलगुरू प्रा. सुतावणे यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संतोष पटनी यांनी केले.

महिला अग्निवीरांना देशाच्या तिन्ही सेना दलांमध्ये कार्यरत झालेले पाहण्याची अपेक्षा पंतप्रधानांकडून व्यक्त

अग्नीपथ योजना महिलांचे सक्षमीकरण कशा प्रकारे करेल याविषयी पंतप्रधानांनी केली चर्चा

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज,16 जानेवारी 2023 रोजी, तिन्ही सेना दलांतील प्राथमिक प्रशिक्षण सुरु केलेल्या अग्नीवीरांच्या पहिल्या तुकडीला दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले. पथदर्शी अशा अग्निवीर योजनेचे आघाडीचे शिलेदार झाल्याबद्दल पंतप्रधानांनी या अग्निवीरांचे अभिनंदन केले आहे.

अग्नीपथ योजना कशा प्रकारे महिलांचे आणखी सक्षमीकरण करेल याविषयी पंतप्रधानांनी चर्चा केली.  महिला अग्नीवीर आपल्या कामगिरीने ज्या प्रकारे देशाच्या नौदलाची शान वाढवत आहेत, त्याबद्दल आनंद व्यक्त करून पंतप्रधान म्हणाले की, महिला अग्निवीरांना देशाच्या तिन्ही सेना दलांमध्ये कार्यरत झालेले पाहण्यासाठी आपण उत्सुक आहोत. सियाचीनमध्ये तैनात असलेल्या महिला सैनिक आणि आधुनिक लढाऊ विमाने चालवणाऱ्या महिलांची उदाहरणे देऊन महिला विविध आघाड्यांवर सशस्त्र दलांचे समर्थपणे नेतृत्व करत आहेत याची आठवण पंतप्रधानांनी करून दिली.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी स्वागतपर संबोधनात पंतप्रधानांच्या ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेची प्रशंसा केली. ते म्हणाले की या संकल्पने अंतर्गत सर्वच क्षेत्रांमध्ये नवी ध्येये निश्चित केली जात असून त्यांच्या पूर्ततेसाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरु आहेत.आपल्या देशाला सक्षम करण्यासाठी केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने अनेक निर्णय घेतले असून, अग्निवीर योजनेची अंमलबजावणी ही त्यातील सर्वात महत्त्वाची आणि अभूतपूर्व सुधारणा आहे असे ते म्हणाले.

सतत बदलते जागतिक पटलावरील चित्र आणि भौगोलिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर आपल्या देशातील संरक्षण दलांना सशक्त करण्याला सरकारने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. अशा परिस्थितीत, अग्निपथ योजनेमुळे सशस्त्र दलांचा चेहेरा अधिक तरुण आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत जाणकार होईल असे त्यांनी सांगितले.

या योजनेला देशभरातून अत्यंत उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला आणि यातील भर्तीसाठी मोठ्या संख्येने अर्ज पाठविण्यात आले या गोष्टीची केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी प्रशंसा केली. यावेळी पुरुष सहकाऱ्यांच्या बरोबरीने प्रशिक्षण घेत असलेल्या महिला अग्निवीरांचा त्यांनी विशेष उल्लेख केला.

संरक्षणमंत्री म्हणाले की केंद्रीय संरक्षण मंत्रालयासह अनेक मंत्रालये या अग्निवीरांच्या कल्याणासाठी पुढाकार घेत आहेत. “संरक्षण मंत्रालयाचे विविध विभाग, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल तसेच रेल्वे मंत्रालयातील अनेक पदांच्या भर्तीप्रक्रियेत, अग्निवीरांसाठी आरक्षण सुनिश्चित केले जात आहे. अग्निवीरांना योग्य शिक्षण मिळेल याची खात्री करून घेण्यासाठी केंद्रीय संरक्षण मंत्रालय तसेच केंद्रीय शिक्षण मंत्रालय संयुक्तपणे व्यवस्था करत आहेत. सैन्यातील सेवेनंतर स्वयंरोजगार किंवा एखादा व्यवसाय सुरु करण्याची इच्छा असलेल्या अग्निवीरांना केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या सहकार्याने किफायतशीर दरात कर्ज उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था होत आहे. अग्निवीर हे सुरक्षावीर राहण्याबरोबरच समृद्धीवीरही  होतील,” संरक्षणमंत्री म्हणाले.

देशातील सर्व अग्निवीर प्रशिक्षण केंद्रांमध्ये पंतप्रधानांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले.

बिबवेवाडीतील टोळी प्रमुखासह चौघांवर मोका

पुणे – बिबवेवाडीतील सराईत गुन्हेगार योगेश रमेश जगधने (वय २६ , रा. शेंडकर चाळ, गणपतनगर, पापळ वस्ती, बिबवेवाडी) याच्यासह त्याच्या तीन साथीदारांवर पोलिसांनी मोका कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.

योगेश जगधने हा टोळी प्रमुख असून, त्याच्या इतर साथीदारांमध्ये उमेश रमेश जगधने (वय ३१, रा. शेंडकर चाळ, पापळ वस्ती, बिबवेवाडी), विकास ऊर्फ सोन्या गंगाराम राठोड, (वय २३, रा. प्रसाद बिबवेनगर, बिबवेवाडी) आणि अन्य एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.त्यांच्यावर लोकांमध्ये दहशत परसवणे, खुनाचा प्रयत्न, हत्याराचा धाक दाखवून दरोडा घालणे, दरोड्याची पूर्वतयारी, गंभीर दुखापत करणे, शस्त्राचा धाक दाखवून जबरी चोरी, जीवे ठार मारण्याची धमकी देणे अशा स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.या आरोपींविरुद्ध बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संगीता जाधव यांनी आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमानुसार पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख यांच्यामार्फत अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्याकडे मोकाचा प्रस्ताव सादर केला होता.या प्रकरणाची छाननी करून त्यांनी आरोपींविरुद्ध मोका कायद्यांतर्गत कारवाई करण्यास मान्यता दिली आहे.

G20 ‘अमीरोंकी शाम गरीबोंके नाम’ ..? ७० टक्के गरीब जनतेचे प्रतिनिधित्वच नाही – डॉ. धेंडेंचा स्पष्ट आरोप तर राष्ट्रवादीची देखील नाराजी

पुणे-पुण्यात रंग रंगोटी चा उत्सव एकीकडे सुरु असताना एकाच कुटुंबातील चौघांच्या आत्महत्येकडे माध्यमांनी दुर्लक्ष केल्याचा समाज माध्यामांवरून आरोप होत असताना , पंचतारांकित हॉटेलांतून होणारी हि परिषद म्हणजे अमीरोंकी शाम गरीबोंके नाम’ असा ही सूर उमटत असताना, सत्तेत सहभागी असलेल्या रिपब्लिकन पक्षाचे स्थानिक नेते ,माजी उपमहापौर सिद्धार्थ धेंडे यांनी हि परिषद नेमकी कुणासाठी आहे? टाय आणि सुट घालून येणारे लोक शहराचा विकास करणार असतील पण शहरात ७० टक्के जे गरीब लोक आहेत त्यांचे प्रतिनिधित्व येथे कुठे आहे ? असा जळजळीत सवाल केला आहे तर आज राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण आणि शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी जी-२० परिषदेसाठी शहरातील लोकप्रतिनिधींना डावलण्यात आले आहे असे सांगत त्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

जी -२० परिषद पुण्यात होत आहे, ही नक्कीच अभिमानाची बाब आहे. मात्र, या परिषदेसाठी आजी- माजी खासदार, आमदार, माजी महापौरांना परिषदेतील चर्चा ऐकण्यासाठी निमंत्रित करणे आवश्यक होते. शहराच्या विद्यमान खासदार गिरीश बापट यांनाही परिषदेचे निमंत्रण नाही, हे खेदजनक आहे, असे वंदना चव्हाण यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

वंदना चव्हाण म्हणाल्या की, जी-२० परिषदेसाठी शहर सुशोभीकरण केले जात आहे. मात्र, नागरिकांच्या करातून जमा झालेल्या निधीचा अपव्यय महापालिका प्रशासनाकडून केला जात आहे. त्यासंदर्भात महापालिका आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली. मात्र त्याची दखल घेतली गेली नाही.

जी- २० परिषदेसाठी पुण्याला संधी मिळणे ही अभिमानाची बाब आहे. परिषदेच्या निमित्ताने विविध विषयांवर चर्चा होणार आहे. जी-२० परिषदेसाठीचे विषयही महत्त्वाचे आहेत. संसदेत यापूर्वी झालेल्या चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका मांडण्यात आली होती. मात्र पुण्यात होत असलेल्या परिषदेसाठी आजी-माजी खासदार, आमदार, माजी महापौर यांना डालवणे योग्य नाही. परिषदेसाठी व्यासपीठावर निमंत्रित करावे, अशी मागणी नाही. मात्र चर्चा ऐकण्याची संधी मिळण्यास काेणती अडचण होती, अशी विचारणा वंदना चव्हाण यांनी केली. पुण्याचे महापौर असताना महापालिकेच्या कार्यक्रमासाठी तेव्हा शहरातील सर्व क्षेत्रातील तज्ज्ञांना निमंत्रित करून सातत्याने बैठका घेतल्या होत्या, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

मनपा आयुक्त हे भाजपाचे अपयश झाकत आहेत – जगताप

जगताप म्हणाले, जी -20 च्या निमित्ताने पुणे शहरात विविध देशाचे प्रतिनीधी येत आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर जी विकास कामे सुरू त्याबाबत आमचा आक्षेप नाही. परंतु मागील सहा वर्षापूर्वी पासून भाजपला शहरात मतदारानी बहुमत दिले. मात्र , शहराच्या रंगरांगोटी करीता 50 कोटी रुपये दिले आहे. मात्र पुणे मनपाचे बजेट हे पाच वर्षाचे 40 हजार कोटी रुपये आहे. उद्यापासून आम्ही शहरात महिनाभर प्रतक्ष्य विविध ठिकाणी जाऊन चुकीच्या कामाची पोलखोल करणार आहे.

नादुरस्त ठिकाणी पडदे टाकून अपयश झाकण्यात आले आहे. मनपा आयुक्त हे भाजपाचे अपयश झाकत असून मागील महिन्याभरात युद्ध पातळीवर प्रयत्न करणे गरजेचे आहे. पुणे शहर हे आशिया मधील वेगाने विकसित होणारे शहर असून भाजपने 150 ते 200 कोटी रुपये वेगवेगळे टेंडर काढून शहर यानिमित्ताने सुशोभिकरण करण्यात आले आहे. पुणे विमानतळ परिसरात ही पाहुण्यांचे स्वागत करताना बेकार कामावर पांढरे पडदे टाकण्याची नामुष्की आलेली आहे. शहर विकसित करण्यात अपयश आल्याची ही कबुली आहे. शासनचा पैसा परिषदसाठी वापरला जात असून भाजपने त्यांची पक्षाची स्वतःची समिती चुकीच्या पद्धतीने केलेली आहे.