आयशा श्रॉफ आणि कृष्णा श्रॉफ यांनी मॅट्रिक्स फाईट नाईटच्या १२व्या आवृत्तीने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. ही एक अभूतपूर्व संध्याकाळ जी सगळ्यांच्या कायमस्वरूपी मनात राहणार आहे. या विलक्षण कार्यक्रमाने सगळ्यांची मन जिंकली आहेत आणि.देशाला मोहित केले आणि चाहत्यांना आश्चर्यचकित केले.
मॅट्रिक्स फाईट नाईटच्या 12 व्या आवृत्तीने एक विस्मयकारक देखावा दाखवला कारण तब्बल 9000 उपस्थितांनी 5 तासांच्या उत्साही शोसाठी स्थळ भरल असून या स्मरणीय कार्यक्रमाने आजपर्यंतचे सर्वात मोठे मॅट्रिक्स फाईट नाईट स्थळ म्हणून ओळखलं गेलं आहे. ज्यामध्ये संपूर्ण निःसंशयपणे हा एक ऐतिहासिक प्रसंग होता. भारतीय MMA देशाच्या समृद्ध इतिहासातील सर्वात भव्य आणि प्रभावशाली MMA कार्यक्रम म्हणून ओळखला जातो.
कृष्णा श्रॉफ उत्साहाने म्हणते “एवढ्या मोठ्या प्रमाणावर या आवृत्तीचे अतुलनीय यश पाहणे खरोखरच अविश्वसनीय आहे. संपूर्ण देश या मागे उभा राहिला लढवय्ये आणि प्रेक्षक या दोघांनीही आपले सर्वस्व दिले. कोणीतरी सहभागी होताना हा कार्यक्रम आयोजित करताना आणि फाईट कार्डवर मॅचअप बनवताना मी जास्त उत्साही होते आणि कृतज्ञ आहे.
कृतज्ञता व्यक्त करताना आयेशा श्रॉफ तिचे आश्चर्य व्यक्त करते “हा अनुभव पूर्णपणे अविश्वसनीय आहे. लढाईच्या रात्रीमुळे निर्माण होणारा निखळ उत्साह हा शब्दांच्या पलीकडे आहे.पुढच्या आवृत्तीसाठी मी माझा उत्साह रोखू शकत नाही.”
मॅट्रिक्स फाईट नाईटने जागतिक दर्जाचा दर्जा मिळवण्यासाठी झपाट्याने स्थान मिळवले आहे आणि या प्रदेशातून उदयास येणारी प्रीमियर प्रमोशन म्हणून स्वतःला स्थान दिले आहे.
मॅट्रिक्स फाईट नाईट आयशा श्रॉफ आणि कृष्णा श्रॉफ यांनी आयोजित केलेली १२ वी आवृत्ती ठरली हीट !
नाईट मॅनेजर २ मध्ये अनिल कपूरच्या टूर डी फोर्स परफॉर्मन्स ची चर्चा !
हेरगिरी थ्रिलर्सच्या अनोख्या जगात जिथे प्रत्येक ट्विस्ट मध्ये अभिनयाची अनोखी जादू बघायला मिळते असा अभिनेता म्हणजे अनिल कपूर ! 29 जून रोजी द नाईट मॅनेजरचा बहुचर्चित दुसरा भाग येताच अनिल कपूरने पुन्हा एकदा सिद्ध केले की तो अभिनयाच्या क्षेत्रात वेगळ्या उंचीवर आहे. द नाईट मॅनेजरच्या पहिल्या सीझनमध्ये त्याची कामगिरी अगदीच कमाल होती आणि दुसऱ्या सीझनमध्ये तो पुन्हा एकदा चमकला.
द नाईट मॅनेजर 2 च्या भागाच्या पहिल्याच फ्रेमपासून अनिल कपूर ने रहस्यमय शेली रुंगटाचे ची भूमिका इतकी उत्तम साकारली आहे यात वाद नाही. दर्शकांना त्याच्या अष्टपैलुत्वाने अभिनयाने तो मंत्रमुग्ध करून सोडतो.
समीक्षक आणि चाहत्यांनी अनिल कपूरच्या शेली रुंगटाच्या अभिनयाचं खूप कौतुक केलं. एक टूर डी फोर्स जो अभिनेता म्हणून त्याची कुशलता दाखवतो.
द नाईट मॅनेजर 2 सोबत अनिल कपूरने लवकरच मोठ्या प्रोजेक्ट मध्ये दिसणार आहे.
अवघ्या दहा दिवसात महावितरणकडून एक लाख घरगुती वीज कनेक्शन
मुंबई, दि. ०४ जुलै २०२३: उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज ग्राहकांना दर्जेदार, गुणवत्तापूर्ण व ग्राहकाभिमूख सेवा देण्याची सूचना केली आहे. त्यानुसार महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वीज ग्राहकांचे कनेक्शनचे अर्ज झटपट निकाली काढण्याचा आदेश दिल्यानंतर कंपनीच्या संपूर्ण यंत्रणेने युद्ध पातळीवर काम करून अवघ्या दहा दिवसात एक लाख चार हजार घरगुती ग्राहकांना वीज कनेक्शन देण्याची विक्रमी कामगिरी केली आहे.
लोकेश चंद्र यांनी महावितरणच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर दि. २० जून रोजी राज्यभरातील मुख्य अभियंत्यांच्या बैठकीत वीज कनेक्शनसाठी प्रलंबित अर्जांचा आढावा घेतला. त्यावेळी १,१७,५२२ घरगुती वीज ग्राहकांचे जोडण्यांचे अर्ज प्रलंबित असल्याचे आढळले. मा. लोकेश चंद्र यांनी या प्रलंबित अर्जांच्या संख्येची गंभीर दखल घेतली व हे अर्ज झटपट निकाली काढण्याचे आदेश दिले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी महावितरणची यंत्रणा अधिक वेगाने कामाला लागली व केवळ दहा दिवसात १,०४,३९१ नवीन घरगुती वीज कनेक्शन देण्यात आली.
महावितरणचे संचालक संजय ताकसांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार दि. २० जून रोजी प्रलंबित १,१७,५२२ घरगुती कनेक्शन अर्जांपैकी ८३,८३० घरगुती ग्राहकांना म्हणजेच ७१ टक्के ग्राहकांना दहा दिवसात नवीन वीज कनेक्शन देण्यात आली. या खेरीज राज्यात २० जूननंतर नव्या घरगुती वीज कनेक्शनसाठी ५९,९१८ अर्ज आले व त्यापैकी २०,५६१ ग्राहकांनाही दहा दिवसात कनेक्शन देण्यात आली. अशा रितीने एकूण १,०४,३९१ नवीन घरगुती वीज कनेक्शन दहा दिवसात देण्यात आली.
अध्यक्षांनी ग्राहकाभिमूख सेवेवर भर दिला आहे. नव्या वीज कनेक्शनसाठीचे अर्ज प्रलंबित राहता कामा नयेत अशा स्पष्ट सूचना त्यांनी केल्या आहेत. त्यानुसार महावितरणने प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासोबत नवीन आलेल्या अर्जानुसार लवकरात लवकर कनेक्शन देण्यावर भर दिला आहे. दि. २० जून रोजी प्रलंबित असलेल्या अर्जांपैकी उरलेले अर्जही तातडीने निकाली काढण्यात येतील, असे ताकसांडे म्हणाले.
घरगुती ग्राहकांचे नव्या वीज कनेक्शनसाठीचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्यामध्ये कल्याण झोनने आघाडी घेतली असून या झोनमध्ये १३,३११ नवी कनेक्शन देण्यात आली. त्या खालोखाल पुणे झोनमध्ये १२,२९६ नवीन कनेक्शन देण्यात आली. तिसऱ्या क्रमांकावर कनेक्शन दिलेल्या ८९१५ अर्जांसह बारामती झोन आहे.
अध्यक्षांच्या सूचनेनुसार महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नवीन वीज कनेक्शन देण्यासाठी व्यापक काम सुरू केले आहे. यासाठी कंपनीच्या मुख्यालयात स्वतंत्रपणे देखरेख ठेवण्यात येत आहे व स्वतः अध्यक्ष कामाच्या प्रगतीचा वैयक्तिक आढावा घेत आहेत.
पर्वती जलकेंद्राचा वीजपुरवठा दीड तास नव्हे, केवळ २१ मिनिटे बंद
पुणे, दि. ४ जुलै २०२३: पर्वती जलकेंद्राचा वीजपुरवठा सोमवारी (दि. ३) सकाळी दीड तास नव्हे तर पक्षी वीजतारेला चिटकून मृत झाल्यामुळे केवळ २१ मिनिटे बंद राहिला असे स्पष्टीकरण महावितरणकडून देण्यात आले आहे.
पर्वती जलकेंद्राचा वीजपुरवठा दीड तास बंद असल्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागात पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यासंदर्भात महावितरणकडून खंडन करण्यात आले आहे. पर्वती जलकेंद्राला २२ केव्ही एक्सप्रेस वाहिनीद्वारे वीजपुरवठा केला जातो. सोमवारी जलकेंद्राच्या प्रांगणातील उपरी वीजवाहिनीच्या तारांना एक पक्षी चिटकून मृत झाल्याने सकाळी ८.०४ वाजता वीजपुरवठा बंद पडला. त्यानंतर ताबडतोब बिघाड शोधून सकाळी ८.२५ वाजता वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.
जलकेंद्राच्या प्रांगणात उपरी वीजवाहिन्यांजवळ झाडांच्या मोठ्या फांद्या आहेत. त्यावर विविध पक्ष्यांचा मोठा संचार आहे. या झाडांच्या काही फांद्याची छटाई आवश्यक असल्याचे यापूर्वीच महावितरणकडून जलकेंद्राला कळविण्यात आले आहे.
‘प्रतापगडा’वरुन अजित पवार गटाची सर्व सूत्र हलणार…
मंत्रालयासमोरील ‘प्रतापगड’ हेच ‘राष्ट्रवादी’चे अधिकृत मुख्यालय
मुंबई, दि. 4 : मंत्रालयासमोरील ‘प्रतापगड’ अ-5 हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत मुख्यालय करण्यात आले असून या ‘प्रतापगड’वरुन यापुढे ‘राष्ट्रवादी’ची सर्व सूत्र हलणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्तवाखाली राज्यातील सत्तेत सहभागी झाल्यावर राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या सोईसाठी तसेच पक्षाच्या कार्यालयीन कामकाजासाठी हे उपयुक्त ठरणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने देण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सत्तेत सहभागी झाल्यानंतर राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्यायल मंत्रालयाच्या जवळपास असणे आवश्यक होते. राज्याभरातून विविध कामासाठी तसेच पक्षाच्या कामासाठी मुंबईत येणाऱ्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सोईचे व्हावे तसेच पक्षाचे दैनंदिन कार्यालयीन कामकाज सुरळीत व योग्य प्रकारे व्हावे यासाठी मंत्रालयासमोरील ‘प्रतापगड’ 5-अ याठिकाणी हे पक्षाचे कार्यालय सुरु करण्यात आले आहे. तरी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी याची नोंद घेण्याचे आवाहन राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.
अमेरिकेत शूटिंगदरम्यान शाहरुख खान जखमी,
शाहरुख खान गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेत त्याच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग करत होता. शूटिंगदरम्यान झालेल्या अपघातामुळे शाहरुख खान जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. त्याच्या नाकावर व चेहऱ्यावर खोल जखमा झाल्या आहेत. प्राथमिक उपचारानंतर त्याला मुंबईत आणण्यात आले आहे. मात्र त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.
31 वर्षांच्या या प्रदीर्घ करिअरमध्ये शाहरुख खान शूटिंगदरम्यान अनेकदा जखमी झाला आहे. 2017 मध्ये रईसच्या शूटिंगदरम्यान त्याच्या गुडघ्याला आणि चेहऱ्याला दुखापत झाली होती, त्यानंतर त्याच्यावर छोटी शस्त्रक्रिया करावी लागली होती. 2013 मध्ये चेन्नई एक्सप्रेस चित्रपटाचे शूटिंग संपल्यानंतर त्याच्यावर 8 शस्त्रक्रिया झाल्या होत्या. 2009 मध्येही दुखापतीनंतर त्याच्या डाव्या खांद्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
अजित पवार यांनी सत्तेत अन अवघ्या ४८ तासातच आठ महत्त्वाचे निर्णय
मुंबई : अजित पवार यांनी सत्तेत सहभाग घेत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर अवघ्या ४८ तासातच राज्यमंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली. यावेळी कॅबिनेट आठ महत्त्वाचे निर्णय घेतले. राज्याचे ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. तर मराठा, कुणबी विद्यार्थ्यांना परदेशी उच्च शिक्षणासाठी सयाजीराव गायकवाड – सारथी शिष्यवृत्ती योजना जाहीर करण्यात आली.राज्य शासनाला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने वर्षभरातील महत्त्वाच्या निर्णयांचा आढावा घेणाऱ्या पहिले वर्ष सुराज्याचे या पुस्तिकेचे आणि लोकराज्य मासिकाच्या विशेषांकाचे आज प्रकाशन करण्यात आले. मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते हे प्रकाशन झाले. यावेळी मंत्रिमंडळातील सर्व सदस्य उपस्थित होते.
मंगळवार ०४ जुलै २०२३ रोजी मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त)
- राज्याचे ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर. देशातील महाराष्ट्र हे पहिले राज्य. नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांना मोठे प्रोत्साहन
( ऊर्जा विभाग)
- मराठा, कुणबी विद्यार्थ्यांना परदेशी उच्च शिक्षणासाठी सयाजीराव गायकवाड – सारथी शिष्यवृत्ती योजना. ७५ विद्यार्थ्यांना दरवर्षी शिष्यवृत्ती
(नियोजन विभाग)
• दिंडोरी तालुक्यातील चिमणपाडा आणि त्र्यंबक तालुक्यातील कळमुस्ते येथील प्रवाही वळण योजनांना मान्यता
(जलसंपदा विभाग)
• नागपूर येथील मे.शिवराज फाईन आर्ट लिथो वर्क्सच्या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेणार
(उद्योग विभाग)
• सेवानिवृत्त मुख्य न्यायमूर्ती, न्यायमूर्ती किंवा त्यांचे पती, पत्नी यांना सेवानिवृत्तीनंतरचे लाभ
(विधि व न्याय विभाग)
• सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली, गेळे आणि चौकुळ येथील कबूलायतदार गावकर जमिनीबाबत निर्णय.
(महसूल विभाग)
• नागपूर कृषि महाविद्यालय येथे आंतरराष्ट्रीय कृषि सुविधा केंद्र
(कृषि विभाग)
• मत्स्यबीज उत्पादन आणि मत्स्यबीज संवर्धन केंद्रांचा भाडेपट्टी कालावधी वाढवून आता २५ वर्षे
(पदुम विभाग)
“भाजपा म्हणजे राजकारणातले सीरियल रेपिस्ट आणि सीरियल किलर” संजय राऊत यांची घणाघाती टीका
ठाकरे नंतर आता पवार ..मोडस ऑपरेंडी तीच..उद्दिष्ट्य महाराष्ट्रावर गुजरातचे प्रभुत्व लादण्याचे …
भाजपाचं देशात वस्त्रहरण झालं आहे आणि त्यांची वैचारिक सुंता झाली आहे
मुंबई-एकनाथ शिंदे आणि त्यांच्या फुटलेल्या गटाला शिवसेना या पक्षावर आणि चिन्हावर दावा करायला लावला. पक्ष आणि चिन्हावर दावा करण्याचा दावा फुटलेल्या लोकांच्या डोक्यात नव्हता. हे डोकं दिल्लीच्या भाजपावाल्याचं आहे. महाराष्ट्रातून त्यांना शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांचं नाव मिटवायचं आहे. तीच पद्धत राष्ट्रवादीच्या बाबतीत त्यांनी अवलंबली असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.राष्ट्रवादी फुटली, पण त्याचवेळी त्यांनी प्रमुख लोकांना हाताशी धरून आम्हीच राष्ट्रवादी आहोत हा दावा करायला लावला. एखादा सीरियल किलर असतो त्याची मोडस ऑपरेंडी असते. सीरियल रेपिस्ट असतात. तसे भाजपा म्हणजे राजकारणातले सीरियल रेपिस्ट आणि सीरियल किलर आहेत. पक्ष एका विशिष्ट आकड्यांमध्ये फोडायचा आणि फुटलेल्या गटाला पक्षावर आणि चिन्हावर दावा करायला लावायचा हे यांचं धोरण आहे. महाराष्ट्रातून बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना हे नष्ट करायचं. त्यानंतर शरद पवारांचं नाव नष्ट करायचं. स्वतः काहीच करायचं नाही. जे स्वतः काही करत नाहीत ते अशा गोष्टी करतात असाही आरोप संजय राऊत यांनी केला.
इतर राज्यांमध्ये भाजपाचे हेच प्रयत्न सुरु आहेत. कितीही प्रयत्न केले तरी महाराष्ट्रातून इतिहास पुसला जाणार नाही. कायदेशीर लढाईचा विचार केला तर शिवसेनेने कायदेशीर लढाई जिंकली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार महाराष्ट्रातल्या फुटलेल्या आमदारांना अपात्र ठरवलं जाईल. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही आहेत. तोच निकाल राष्ट्रवादीच्या फुटलेल्या गटालाही लागू पडू शकतो याची मला १०० टक्के खात्री आहे. विधीमंडळ पक्षातली फूट ही पक्षातली फूट नाही. हे धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने स्पष्ट केलं आहे.कुणीही काहीही राजकारण केलं तरी राष्ट्रवादी तिच्या जागेवर आणि शिवसेना तिच्या जागेवर जाईल. ऑपरेशन लोटस वगैरे काही नाही मला तर वाटतंय की भाजपाचंच ऑपरेशन झालं आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये फूट पाडल्याने भाजपाचं देशात वस्त्रहरण झालं आहे आणि त्यांची वैचारिक सुंता झाली आहे हे दिसतं आहे. अशीही टीका संजय राऊत यांनी केली.
एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 7 रुपयांची वाढ
नवी दिल्ली- तेल विपणन कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 7 रुपयांची वाढ केली आहे. ANIने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत त्याची किरकोळ किंमत १७७३ रुपयांवरून १७८० रुपयांपर्यंत वाढली आहे. त्याचबरोबर घरगुती एलपीजीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. विशेष म्हणजे सलग तीन वेळा किमतीत कपात केल्यानंतर व्यावसायिक एलपीजीच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. एप्रिल, मे आणि जूनमध्ये त्याच्या किमती कमी झाल्या. मार्चमध्ये व्यावसायिक एलपीजीच्या किमतीत मोठी वाढ झाली
Oil marketing companies have increased the prices of commercial LPG gas cylinders by Rs 7/cylinder. Delhi retail sales price of 19kg commercial LPG cylinder increased from Rs 1,773 to Rs 1,780 per cylinder. No change in the prices of domestic LPG cylinders.
— ANI (@ANI) July 4, 2023
घरगुती वापरासाठीच्या १४.२ किलो सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. त्याच्या किमतीतील शेवटचा बदल १ मार्च २०२३ रोजी झाला होता. त्यानंतर तो ५० रुपयांनी स्वस्त करण्यात आला. दिल्लीत घरगुती एलपीजीची किंमत ११०३ रुपये आहे. तसेच कोलकातामध्ये ११२९ रुपये, चेन्नईमध्ये १११८.५० रुपये आणि मुंबईमध्ये १११२.५० रुपये प्रति सिलिंडर उपलब्ध आहे.
पक्ष तोच ,राष्ट्रीय अध्यक्ष तेच तरीही आता अजित पवार करणार राष्ट्रवादीच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन
मुंबई-महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार लवकरच मुंबईतील मंत्रालयाजवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन करणार आहेत.जर पक्ष तोच , चिन्ह तेच आणि राष्ट्रीय अध्यक्ष तेच आहेत तर राष्ट्रवादीच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन राष्ट्रीय अध्यक्षांना टाळून , त्यांच्या संमतीविना कसे होणार ? असा प्रश्न उपस्थित होतो आहे .
#WATCH | Maharashtra Deputy CM Ajit Pawar will shortly inaugurate a new NCP party office near Mantralaya in Mumbai. pic.twitter.com/isH38t5R9d
— ANI (@ANI) July 4, 2023
महिलेने गुप्तांगात लपविले २० लाखांचे सोने; केंद्रीय सीमाशुल्क विभागाने पुणे विमानतळावर पकडले
पुणे : गुप्तांगात सोने लपवून तस्करी करणाऱ्या महिलेला केंद्रीय सीमाशुल्क विभागाने (कस्टम) पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर पकडले. तिच्याकडून २० लाख ३० हजार रुपयांचे सोने जप्त करण्यात आले आहे. महिलेने सोन्याची भुकटी कॅप्सुलमध्ये भरुन गुप्तांगात लपविल्याचे उघडकीस आले आहे. सीमाशुक्ल विभागाने एका ४१ वर्षीय महिलेस अटक केली असून, तिच्याविरुद्ध सीमाशुल्क कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर दुबईहून आलेल्या विमानातून महिला उतरली.
महिला गडबडीत विमानतळावरुन बाहेर पडण्याच्या प्रयत्नात होती. त्या वेळी कस्टमच्या पथकाला संशय आला. कस्टमच्या पथकाने तिची चौकशी सुरु केली. कस्टमच्या महिला अधिकाऱ्यांनी तपासणी केली. तेव्हा महिलेने गुप्तांगात सोन्याची भुकटी भरलेल्या कॅप्सुल लपविल्याचे उघडकीस आले. त्यानंतर महिलेला रुग्णालयात नेण्यात आले. महिलेची क्ष-किरण यंत्रणेद्वारे तपासणी करण्यात आली. महिलेकडून २० लाख ३० हजार रुपयांचे ४२३ ग्रॅम ४१ मिलिग्रॅम सोन्याची भुकटी जप्त करण्यात आली आहे.
पुण्यातील तीन कंपन्यांनी टॅली एमएसएमई ऑनर्स २०२३ मध्ये मोठा विजय मिळवला
पुणे: सॉफ्टवेअर उत्पादनांच्या उद्योगक्षेत्रातील अग्रणी कंपनी टॅली सोल्यूशन्सने आज पश्चिम विभागासाठी ‘एमएसएमई ऑनर्स’च्या तिसऱ्या पुष्पाच्या विजेत्यांची घोषणा केली. पुण्यातील मेराकी आयटिनरीज, प्लॅनेज कन्सल्टन्सी आणि कृष्ण पॅकेजिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांनी ५००० जागतिक नामांकनांमधून बाजी मारली.
टॅली एमएसएमई ऑनर्स हा देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये विशेष योगदान देणाऱ्या व्यवसाय आणि उद्योजकांना ओळखून त्यांचा सन्मान करणारा वार्षिक उपक्रम आहे. हा उपक्रम एमएसएमईजनी त्यांच्या सर्वोत्तकृष्ट कार्यपद्धतींद्वारे तळागाळामध्ये केलेला सकारात्मक प्रभाव आणि विविधतेला जाणून त्यांचा सन्मान करतो. हे या उपक्रमाला एक सर्वसमावेशक पुरस्कार बनवते; जे १,२ आणि ३ टीअर अशा सर्व प्रकारच्या शहरांमधील, सर्व विभागांमधील, देशाच्या प्रगतीमध्ये प्रभाव टाकणाऱ्या व देशाच्या अर्थव्यवस्थेला पुढे नेणाऱ्या मात्र कौतुक व सन्मान न मिळालेल्या खऱ्या नायकांचा सन्मान करते. हे सन्मान वर्षातून एकदा आंतरराष्ट्रीय एमएसएमई दिनानिमित्ताने दिले जातात आणि २५० कोटींपेक्षा कमी उलाढाल असलेल्या आणि वैध जीएसटीआयएन (GSTIN) असलेल्या सर्व प्रकारच्या व्यवसायांना लागू होतात.
मेराकी आयटिनरीजमधील शमीका जोशी यांना गोल्ड स्टँडर्ड ट्रॅव्हल पॅकेजेस तयार करण्यासोबतच प्रशिक्षण आणि उच्च कौशल्ये वाढवण्यास प्राधान्य देणारी ट्रॅव्हल आणि टुरिझम कंपनी चालू केल्याबद्दल ‘वंडर वुमन’ श्रेणीमध्ये सन्मानित करण्यात आले. कंपनी ट्रॅव्हल आणि टुरिझम विषयातील पायाभूत प्रशिक्षण देखील प्रदान करीत असल्यामुळे अनेक लोकांना प्रमाणित प्रशिक्षण मिळवून देण्यात व नोकऱ्या निर्माण करण्यात मदत झाली आहे.
प्लॅनेज कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेडमधील नेहा लद्दड आणि कृष्ण पॅकेजिंग प्रायव्हेट लिमिटेडमधील श्याम भूतडा या दोघांनाही ‘टेक ट्रान्सफॉर्मर’ श्रेणीत पुरस्कार देण्यात आला. नेहा लद्दड आणि प्लॅनेज कन्सल्टन्सी यांना बीआयएम आणि ड्रोन सर्वेक्षणाचा वापर करून ग्राहकांना त्यांच्या प्रकल्पांची प्रगती दुरस्थपणे पाहता यावी यासाठी मदत करण्याच्या त्यांच्या कार्यासाठी त्यांना हा सन्मान दिला गेला. श्याम भूतडा आणि कृष्ण पॅकेजिंग यांना कामकाज आणि प्रशासकीय प्रक्रियांमध्ये प्रभाव निर्माण करण्यासाठी त्यांच्या नावीन्यपूर्ण व कल्पक डिजिटल ऑटोमेशनच्या वापरासाठी हा सन्मान दिला गेला. तंत्रज्ञानाच्या अवलंबामुळे त्यांना त्यांच्या सेवांमध्ये गती, सुलभता आणि व्हॉल्यूम प्राप्त करण्यास मदत झाली आहे.
या तिसऱ्या पुष्पामध्ये ‘टॅली एमएसएमई ऑनर्स’ने प्राधान्यकृत बँकिंग भागीदार डीबीएस बँक (DBS Bank) आणि सहाय्यक भागीदार यूनिकॉमर्स (Unicommerce) व बाइटएज (byteEDGE) यांच्या सहभागीदारीने पुण्यातील तीन एमएसएमई (MSME) आणि भारतातील १०० तीन एमएसएमई (MSME) चा सन्मान केला.
देशाच्या चार ही विभागांमध्ये (पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण) साजरा करण्यात आलेल्या या उपक्रमामध्ये ५ श्रेणींमध्ये सन्मान देण्यात आले:
· वंडर वुमन: अशा महिला उद्योजिकांना पुढे आणणे ज्यांनी त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करत आपल्या व्यवसायाची आज नव्याने व्याख्या केली आहे.
· बिझनेस मेस्ट्रो: काळाच्या कसोटीवर टिकून राहिलेल्या आणि वाढत गेलेया समृद्ध झालेल्या दिग्गजांचा हा सन्मान आहे.
· न्यूजेन आयकॉन: ज्यांनी मार्केट गॅप ओळखून नावीन्यपूर्ण व कल्पक उपाय सादर केले आहेत अशा स्टार्टअप्ससाठी हा मान आहे.
· टेक ट्रान्सफॉर्मर: आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून चांगले परिणाम देणाऱ्या व्यवसायांसाठी हा पुरस्कार.
· चॅम्पियन ऑफ कॉज: जागतिक कल्याणाच्या दृष्टीने चांगल्या उद्देशासाठी योगदान देणाऱ्या व्यवसायांसाठी सन्मान.
रंगावलीतून साकारली चापेकर पर्वाची रोमहर्षक कहाणी
श्री लकडी पूल विठ्ठल मंदिर ट्रस्ट, राष्ट्रीय कला अकादमी न्यास पुणे व इतिहास प्रेमी मंडळ यांच्या वतीने चापेकर बंधूंनी केलेला रॅंडचा खून या प्रसंगाला १२६ वर्ष पूर्ण झाले त्या निमित्ताने विशेष कार्यक्रमाचे आयोजन
पुणे : चापेकर बंधूंनी ब्रिटीश अधिकारी रॅंड याचा खून करुन स्वातंत्र्यसंग्रामात नवे चैतन्य निर्माण केले. अवघ्या विशी-पंचवीशीतील चापेकर बंधूंचा त्याग व शौर्य पाहून असे क्रांतिकारक पुण्यात झाले याचा अभिमान वाटतो. त्यांनी केलेले कार्य ऐतिहासिक ठरले. देशासाठी तीन भावांनी दिलेले हे बलिदान एकमेवद्वितीय आहे, त्यांच्या या शौर्याला वंदन करीत चापेकर पर्वाची रोमहर्षक कहाणी रंगावलीतून साकारण्यात आली.
श्री लकडी पूल विठ्ठल मंदिर ट्रस्ट, राष्ट्रीय कला अकादमी न्यास पुणे व इतिहास प्रेमी मंडळ यांच्या विद्यमाने चापेकर बंधूंनी केलेला रॅंडचा खून या प्रसंगाला १२६ वर्ष पूर्ण झाले त्या निमित्ताने टिळक चौकातील लकडी पूल विठ्ठल मंदिर येथे भव्य रांगोळी काढण्यात आली. यावेळी श्री लकडी पूल विठ्ठल मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष दिपक थोरात, बाळासाहेब ताटे लेखक प्र.के. घाणेकर, इतिहास अभ्यासक मोहन शेटे, शिरीष मोहिते, विश्वास भोर,रविद्र फटाळे, राष्ट्रीय कला अकादमीचे अमर लांडे, रोमा लांडे उपस्थित होते.
दीपक थोरात म्हणाले, ब्रिटीश अधिकारी रॅंड याला मारण्याचे आदेश लोकमान्य टिळकांनी १२६ वर्षापूर्वी चापेकर बंधू यांना दिले होते. लकडी पूल विठ्ठल मंदिर आज ज्या ठिकाणी आहे तिथेच लोकमान्य टिळकांनी हा आदेश दिला. यानिमित्त याच ठिकाणी त्या स्मृती पुन्हा जागविण्यात आल्या
तब्बल ६५ टक्के वीजग्राहक ‘ऑनलाइन’
मुंबई: आधुनिक जीवनशैलीशी सुसंगत एका क्लिकवर ग्राहकसेवा देणाऱ्या महावितरणच्या ऑनलाइन वीजबिल भरण्यास तब्बल ६५ टक्के ग्राहकांनी पसंती दिली आहे. उल्लेखनीय म्हणजे गेल्या तीन वर्षांमध्ये ऑनलाइन वीजबिल भरण्यात ३५ टक्के ग्राहकांची भर पडली आहे.सद्यस्थितीत दरमहा सरासरी १ कोटी १० लाख वीजग्राहक ५ हजार ७५० कोटी रुपयांच्या वीजबिलांचा घरबसल्या व सुरक्षित भरणा करीत आहेत.
महावितरणकडून प्रामुख्याने बिल भरणा केंद्राच्या रांगेत उभे राहण्याऐवजी किंवा कार्यालयीन वेळेतच वीजबिल भरण्याऐवजी ‘ऑनलाइन’द्वारे घरबसल्या व २४ तास वीजबिल भरण्याची सोय उपलब्ध आहे. यासाठी महावितरणच्या सर्व ग्राहकांना www.mahadiscom.in ही वेबसाईट व “महावितरण मोबाईल ॲप उपलब्ध आहे. त्यामुळे एकाच नोंदणीकृत खात्यातून pस्वतःच्या एकापेक्षा अधिक कुठल्याही वीजजोडण्यांचे बिल ‘ऑनलाइन’ भरणे तसेच सर्व वीजजोडण्यांच्या वर्षभरातील मासिक बिलांचा तपशील व रक्कम भरल्याची पावती संगणकात किंवा मोबाईलमध्ये जतन करण्याची सोय उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त रु. ५००० पेक्षा जास्त वीजबिल असणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी महावितरणने RTGS /NEFT द्वारे वीजबिल भरणा करण्यासाठीची देखील सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यासाठी आवश्यक असलेला ग्राहकनिहाय बँकेच्या माहितीचा तपशील वीज बिलावर छापण्यात आलेला आहे.
महावितरणचे उच्चदाब वर्गवारीतील सर्व वीजग्राहक दरमहा ऑनलाइनद्वारे वीजबिलांचा भरणा करीत असून महावितरणच्या उच्चदाब व लघुदाबाच्या १ कोटी १० लाख ग्राहकांनी एकूण वसुलीच्या रकमेपैकी तब्बल ५ हजार ७५० कोटी रकमेचा ऑनलाइनद्वारे भरणा केला आहे. यामध्ये पुणे परिमंडलातील २२ लाख ८३ हजार ग्राहकांनी सर्वाधिक १२०२ कोटी ७६ लाखांचा वीजबिलांचा भरणा केला आहे. त्यानंतर कल्याण परिमंडलातील १९ लाख ७ हजार ग्राहकांनी ७२५.७९ कोटी तर भांडूप परिमंडलामध्ये १७ लाख ३१ हजार ग्राहकांनी १००५ कोटी ४१ लाखांच्या बिलांचा ऑनलाइन भरणा केला आहे. बारामती– १० लाख ६८ हजार ग्राहकांनी ५१९.३५ कोटी तर नाशिक – १० लाख ५३ हजार ग्राहकांनी ४६९.६४ कोटी रुपयांच्या वीजबिलांचा ऑनलाइन भरणा केला आहे.
‘ऑनलाइन’ वीजबिल भरल्यास दरमहा ५०० रुपयांच्या मर्यादेत प्रत्येक महिन्याच्या वीजबिलामध्ये ०.२५ टक्के तर वीजबिलाचे प्रॉम्ट पेमेन्ट केल्यास १ टक्का असे एकूण १.२५ टक्के सूट वीजग्राहकांना देण्यात येत आहे. विशेष म्हणजे क्रेडिट कार्ड वगळता उर्वरित सर्व पर्यांयाद्वारे ‘ऑनलाइन’द्वारे होणारा वीजबिल भरणा नि:शुल्क आहे. लघुदाब ग्राहकांसाठी घरबसल्या एका क्लिकवरवीजबिल भरण्याची सुरक्षित व सोयीची ऑनलाइन सेवा उपलब्ध आहे. ऑनलाइनद्वारे वीजबिलांचा भरणा करणे अत्यंत सुरक्षित असून या पध्दतीस आरबीआय बँकेच्या पेमेंट व सेटलमेंट कायदा-२००७ च्या तरतुदी लागू आहेत. तरी जास्तीतजास्त ग्राहकांनी ऑनलाइन वीजबिलांचा भरणा करण्याचा पर्याय स्वीकारावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.
पुण्यात दोन्ही डगरींवर हाथ ..अनेकांचा गोंधळ,कधी तळ्यात तर कधी मळ्यात
पुणे : अजित पवार यांच्या बंडामुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यात गोंधळ उडाला आहे, उपनगरांतील बांधकामे करणाऱ्यांच्यात सहभाग असलेले अनेकजण अजित पवारांच्या पाठीशी उभे राहताना दिसत आहेत .जुने ज्येष्ठ पण ज्यांचा बांधकाम या विषयाशी संबध नाही अशी मंडळी बहुधा शरद पवारांच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट झाले आहेच . पण यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकी आहे . बहुसंख्य कार्यकर्त्यांत , नेत्यांत , पदाधिकाऱ्यांत गोंधळ उडाला आहे . निर्णय काय घ्यावा त्यांना समजेनासे झाले आहे. शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह दीपक मानकर, बाबा धुमाळ,प्रकाश कदम,नितीन कदम ,सुभाष जगताप, बाबुराव चांदेरे, योगेश ससाणे, महेंद्र पठारे, नीलेश निकम, दिलीप बराटे, कुमार गोसावी, श्रीकांत पाटील, विशाल तांबे,दत्ता धनकवडे आदींची भूमिका नेमकी आणि नक्की ,ठाम अशी काय असेल याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि एकूणच राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
या पार्श्वभूमीवर अंदाज घेण्यासाठी शहर राष्ट्रवादी काँग्रेसने घोले रस्ता येथे मंगळवारी दुपारी बैठकीचे आयोजन केले आहे. आजी-माजी आमदार, खासदार, नगरसेवक, पदाधिकारी तसेच प्रमुख कार्यकर्त्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. ही बैठक घोले रस्त्यावरील नेहरू सांस्कृतिक भवन येथे आयोजित करण्यात आली आहे. पक्षाच्या कार्यकारिणीतील सर्व पदाधिकाऱ्यांना या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले आहे. अजित पवार गटाकडून पक्षाचा दावा करण्यात आल्याने शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून प्रतिज्ञापत्र भरून घेतले जाणार आहे. अजित पवार गटाकडून ‘राष्ट्रवादी’च्या प्रदेशाध्यक्षपदी सुनील तटकरे यांची नियुक्ती केल्याने त्यांच्याकडून स्वतंत्र कार्यकारिणी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. शिंदे-ठाकरे गटाप्रमाणे ‘राष्ट्रवादी’चेही दोन शहराध्यक्ष, दोन कार्यालये; तसेच पदाधिकाऱ्यांची नियुक्ती होणार काय ते आता समजू शकणार आहे.आदी स्थानिक नेत्यांकडून मंगळवारच्या बैठकीबाबत काय भूमिका घेतली जाते, याबाबत उलटसुलट चर्चा आहे.
