पुणे, दि. ४: पुणे व पिंपरी – चिंचवड महानगरामधील अन्नधान्य वितरण कार्यालयाअंतर्गत ११ परिमंडळ अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रात २५ रास्तभाव दुकान परवाना मंजूर करण्याबाबत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला असून परवाना मिळण्यासाठी ३१ जुलै २०२३ पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रास्तभाव दुकान परवाना मंजूर करण्याबाबतचा जाहिरनामा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर https://pune.gov.in वर उपलब्ध आहे. या जाहीरनाम्यात सविस्तर अटी व शर्ती, आवश्यक कागदपत्रांचा तपशील, नमुना अर्ज आदीबाबतची माहिती समाविष्ट असून संबंधित परिमंडळ कार्यालयात याबाबत संपूर्ण तपशील व कोरे अर्ज उपलब्ध आहेत.
तरी इच्छुकांनी विहित मुदतीत अर्ज करावेत; मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही, असे अन्नधान्य वितरण अधिकारी दादासाहेब गिते यांनी कळविले आहे.
मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाची विशेष बैठक उद्या, दि.५ जुलै रोजी, दुपारी १.०० वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी सर्व प्रदेश पदाधिकारी, फ्रंटल सेल अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, कार्यकारिणी सदस्य, तालुकाध्यक्ष, तालुकास्तरावरील सर्व फ्रंटल सेलच्या सदस्यांनी मोठ्या संख्येन उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे. यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभा, विधानपरिषद, लोकसभा, राज्यसभा सदस्यांनी बैठकीला उपस्थित राहावे, असे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील म्हणाले.
दरम्यान राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी देखील या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे.
महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेने आदरणीय पवार साहेबांवर (@PawarSpeaks) नेहमीच जीवापाड प्रेम केलं आहे. आणि साहेबांचा देखील इथल्या जनतेवर जीव आहे. हे नातं अतूट आणि पहाडासारखं भक्कम आहे. प्राप्त परिस्थितीत आपल्या सर्वांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (@NCPspeaks) पुढील दिशा… pic.twitter.com/cqOawLAaZi
मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर अजित पवार सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर अनेक ठिकाणी त्यांच्या अभिनंदनाचे बॅनर्स झळकत आहेत. बंडखोरी केल्यानंतर अजित पवारांनी आतापर्यंत अनेकदा आपले नेते शरद पवारच असल्याचे स्पष्ट केले आहे. एवढेच नाही तर त्यांच्या समर्थक आमदारांनीही त्यांचीच री ओढली आहे आणि या अजित पवारांच्या अभिनंदनाच्या बॅनर्सवर शरद पवारांचेही फोटो लावले जातआहेत. यामुळे या सर्वामागे शरद पवार यांचा हि हात असल्याचे चित्र रंगविले जाऊ लागले आहे.यामुळे आता शरद पवारांनी अजित पवारांच्या गटाला परवानगीशिवाय फोटो वापरण्यास मनाई केली आहे.माझा फोटो माझ्या परवानगीनेच वापरण्यात यावा. मी ज्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे, त्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहेत. याऊलट ज्यांनी माझ्या विचारांशी द्रोह केला. ज्यांच्याशी माझे आता वैचारिक मतभेद आहेत. त्यांनी यापुढे माझ्या परवानगीनेच माझा फोटा वापरावा. त्या पक्षानेच माझा फोटो वापरावा. अन्य कुणीही माझ्या परवानगीशिवाय फोटो वापरू नये, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये माजी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांसोबत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आहे. त्यानंतर मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे शहराची कार्यकारणी बैठक पार पडली.
यावेळी मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते बैठकीस येऊन त्यांनी पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते यापुढील काळातही शरद पवार यांच्यासोबत राहतील असा निर्धार व्यक्त केल्याची माहिती पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली आहे.
यावेळी व्यासपीठावर खासदार वंदना चव्हाण, प्रवक्ते अंकुश काकडे, माजी आमदार जयदेव गायकवाड, माजी महापौर शांतीलाल सुरतवाला, रवींद्र माळवदकर, मृणालिनी वाणी यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
जगताप म्हणाले, पक्षातील मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे शरद पवार यांचा सोबत आहे. पवार यांचे शहर म्हणून पुणे ओळखले जाते. त्यांना पाठिंबा देण्याबाबत ठराव बैठकित मांडण्यात आला आहे. उद्या पुण्यातून ३५० कार्यकर्ते मुंबईला जाणार आहे. कायदेशीर पातळीवर लढाई पोहचले असल्याने प्रतिज्ञा पत्रावर पदाधिकारी यांचे म्हणणे घेतले जाणार आहे. जिल्ह्यातील आणि शहरातील सर्व आमदार आणि खासदार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोबत आहे. सर्वांना मेसेज दिले त्यांनी बैठकीस येणे आपेक्षित होते. परंतु वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे आणि हडपसरचे आमदार चेतन तुपे हे दोघे कामात व्यस्त असल्याने बैठकीस येऊ शकले नाही. शरद पवार यांचे प्रेमाखातर ते उद्या मुंबईत उपस्थित राहतील.अनेक कार्यकर्ते अजित पवार आणि शरद पवार यांच्या सोबत वर्षांनीवर्ष काम करत आहे. पुणे पक्ष कार्यालय हे प्रशांत जगताप या माझ्या नावाने करार बद्ध आहे त्यामुळे बळजबरीने त्याचा ताबा कोण घेऊ शकणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाव सदर करारात नाही. संघ आणि भाजप विरोधात आम्ही यापुढे काम करत राहणार आहे. जे मंत्रिमंडळात आमचे सहकारी सहभागी झाले ,त्यांच्या विरोधात आम्हला यापुढे आंदोलन करावे लागेल. अद्याप कोणाला पक्षातून बडतर्फ करण्यात आले नसून आज २३ माजी नगरसेवक बैठकीत उपस्थित होते. मी विचारसरणी विरोधात जाणार नाही याचा निर्णय घेतला आहे. स्वतःचे आत्मभान जागृत ठेऊन स्वाभिमान शिल्लक राहून प्रत्येकाने लोकशाहीत निर्णय घ्यावा.
पुण्यातील राष्ट्रवादीच्या बैठकीकडे असंख्य नगरसेवकांनी फिरविली पाठ
गेल्या सत्रातील माजी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांची मात्र गर्दी
पुणे-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये माजी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांसोबत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आहे. त्यानंतर मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे शहराची कार्यकारणी बैठक पार पडली.मात्र या बैठकीकडे अनेकांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले तरीही या सत्रातील नसले तरी त्या मागच्या सत्रातील अनेक माजी नगरसेवक , कार्यकर्ते यांनी मात्र गर्दी केली होती .मात्र नुकत्याच संपलेल्या महापालिका पंचवार्षिक सत्रातील अवघे ३ नगरसेवक उपस्थित होते .
आमदार चेतन तुपे , आमदार सुनील टिंगरे हे दोघेही आमदार गैरहजर होते. जे उपस्थित होते ते खडकवासला विधानसभा मतदार संघातील , बारामती लोकसभा मतदार संघातील म्हणजे सुप्रिया सुळे यांच्या मतदार संघातील दिपाली धुमाळ,आणि बाळा धनकवडे हे दोघेच नगरसेवक उपस्थित होते तर शहरातील केवळ वनराज आंदेकर उपस्थित होते . या व्यतरिक्त खासदार वंदना चव्हाण शांतीलाल सुरतवाला, अंकुश काकडे,माजी आमदार जयदेव गायकवाड,कमल ढोले पाटील ,निलेश निकम ,अप्पा जाधव ,बापू शेवाळे ,अर्चना कांबळे, काका चव्हाण, रवींद्र माळवदकर, मृणालिनी वाणी,स्वप्निल दुधाने, प्रकाशआप्पा म्हस्के, भगवानराव साळुंखे, प्रदीप गायकवाड उपस्थित होते पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची २३ वी मासिक कार्यकारणी बैठक आज नेहरू आर्ट गॅलरी, घोले रोड शिवाजीनगर पुणे येथे संपन्न झाली. पहा यावेळी प्रशांत जगताप आणि अंकुश काकडे काय म्हणाले …..
आजच्या या बैठकीत उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी ३ महत्वपूर्ण ठराव संमत केले,यात प्रामुख्याने खासदार शरद पवारसाहेब हेच पक्षाचे नेतृत्व असल्याचा ठराव पुणे शहर कार्यकारिणीने एकमताने संमत केला. तसेच उद्या होणाऱ्या कार्यकारणीच्या बैठकीसाठी हजारोंच्या संख्येने पदाधिकारी पुणे शहरातून मुंबई येथे जाणार आहेत. प्रदेश कार्यकारणीने पाठवलेल्या आराखड्यानुसार लाखोंच्या संख्येने प्रतिज्ञापत्र पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश कार्यालयाला पाठवणार आहे. या या बैठकी प्रसंगी पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की,”देशाचे लोकनेते खासदार शरदपवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. आजवर महाराष्ट्राच्या राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा, कृषी व औद्योगिक या सर्व क्षेत्रांमध्ये शरद पवार साहेब यांनी आपले भरीव योगदान दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा पक्ष आणि या पक्षाचे आम्ही सर्व सामान्य कार्यकर्ते पवार साहेबांच्या छत्रछायेखाली कायम सामाजिक प्रश्नांसाठी लढत आलो आहोत. आज काही मत-भिन्नता असल्याने पक्षातील काही सन्माननीय सदस्यांनी वेगळी वाट निवडली असली तरी ८३ वर्षाच्या या योध्याला सोडून कुठलाही दुसरा विचार करणे आम्हाला शक्य नाही. कालांतराने पक्षातील हे समज-गैरसमज दूर होतील. परंतु आज मात्र आम्ही सर्व आदरणीय पवार साहेबांच्या सोबत आहोत आणि कायम स्वरूपी राहणार आहोत. राज्यातील शिंदे -फडणवीस सरकार राज्यातील प्रश्न सोडवण्यास पूर्णपणे अपयशी ठरले आहे. राज्यातील शेतकरी, नोकरदार, अल्पभूधारक, अल्प उत्पन्न गटातील नागरिक व सर्वसामान्य जनता अनेक अडचणींना सामोरे जात असताना विरोधीपक्ष म्हणून सर्वसामान्य नागरिकांची बाजू मांडण्याची काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करत आहे.राज्यातील जनतेच्या न्याय हक्कासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विविध आंदोलने करून सातत्याने आवाज उठवत आहे व या पुढेही उठवत राहील.
आयशा श्रॉफ आणि कृष्णा श्रॉफ यांनी मॅट्रिक्स फाईट नाईटच्या १२व्या आवृत्तीने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. ही एक अभूतपूर्व संध्याकाळ जी सगळ्यांच्या कायमस्वरूपी मनात राहणार आहे. या विलक्षण कार्यक्रमाने सगळ्यांची मन जिंकली आहेत आणि.देशाला मोहित केले आणि चाहत्यांना आश्चर्यचकित केले. मॅट्रिक्स फाईट नाईटच्या 12 व्या आवृत्तीने एक विस्मयकारक देखावा दाखवला कारण तब्बल 9000 उपस्थितांनी 5 तासांच्या उत्साही शोसाठी स्थळ भरल असून या स्मरणीय कार्यक्रमाने आजपर्यंतचे सर्वात मोठे मॅट्रिक्स फाईट नाईट स्थळ म्हणून ओळखलं गेलं आहे. ज्यामध्ये संपूर्ण निःसंशयपणे हा एक ऐतिहासिक प्रसंग होता. भारतीय MMA देशाच्या समृद्ध इतिहासातील सर्वात भव्य आणि प्रभावशाली MMA कार्यक्रम म्हणून ओळखला जातो. कृष्णा श्रॉफ उत्साहाने म्हणते “एवढ्या मोठ्या प्रमाणावर या आवृत्तीचे अतुलनीय यश पाहणे खरोखरच अविश्वसनीय आहे. संपूर्ण देश या मागे उभा राहिला लढवय्ये आणि प्रेक्षक या दोघांनीही आपले सर्वस्व दिले. कोणीतरी सहभागी होताना हा कार्यक्रम आयोजित करताना आणि फाईट कार्डवर मॅचअप बनवताना मी जास्त उत्साही होते आणि कृतज्ञ आहे. कृतज्ञता व्यक्त करताना आयेशा श्रॉफ तिचे आश्चर्य व्यक्त करते “हा अनुभव पूर्णपणे अविश्वसनीय आहे. लढाईच्या रात्रीमुळे निर्माण होणारा निखळ उत्साह हा शब्दांच्या पलीकडे आहे.पुढच्या आवृत्तीसाठी मी माझा उत्साह रोखू शकत नाही.” मॅट्रिक्स फाईट नाईटने जागतिक दर्जाचा दर्जा मिळवण्यासाठी झपाट्याने स्थान मिळवले आहे आणि या प्रदेशातून उदयास येणारी प्रीमियर प्रमोशन म्हणून स्वतःला स्थान दिले आहे.
हेरगिरी थ्रिलर्सच्या अनोख्या जगात जिथे प्रत्येक ट्विस्ट मध्ये अभिनयाची अनोखी जादू बघायला मिळते असा अभिनेता म्हणजे अनिल कपूर ! 29 जून रोजी द नाईट मॅनेजरचा बहुचर्चित दुसरा भाग येताच अनिल कपूरने पुन्हा एकदा सिद्ध केले की तो अभिनयाच्या क्षेत्रात वेगळ्या उंचीवर आहे. द नाईट मॅनेजरच्या पहिल्या सीझनमध्ये त्याची कामगिरी अगदीच कमाल होती आणि दुसऱ्या सीझनमध्ये तो पुन्हा एकदा चमकला. द नाईट मॅनेजर 2 च्या भागाच्या पहिल्याच फ्रेमपासून अनिल कपूर ने रहस्यमय शेली रुंगटाचे ची भूमिका इतकी उत्तम साकारली आहे यात वाद नाही. दर्शकांना त्याच्या अष्टपैलुत्वाने अभिनयाने तो मंत्रमुग्ध करून सोडतो. समीक्षक आणि चाहत्यांनी अनिल कपूरच्या शेली रुंगटाच्या अभिनयाचं खूप कौतुक केलं. एक टूर डी फोर्स जो अभिनेता म्हणून त्याची कुशलता दाखवतो. द नाईट मॅनेजर 2 सोबत अनिल कपूरने लवकरच मोठ्या प्रोजेक्ट मध्ये दिसणार आहे.
मुंबई, दि. ०४जुलै२०२३: उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज ग्राहकांना दर्जेदार, गुणवत्तापूर्ण व ग्राहकाभिमूख सेवा देण्याची सूचना केली आहे. त्यानुसार महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वीज ग्राहकांचे कनेक्शनचे अर्ज झटपट निकाली काढण्याचा आदेश दिल्यानंतर कंपनीच्या संपूर्ण यंत्रणेने युद्ध पातळीवर काम करून अवघ्या दहा दिवसात एक लाख चार हजार घरगुती ग्राहकांना वीज कनेक्शन देण्याची विक्रमी कामगिरी केली आहे.
लोकेश चंद्र यांनी महावितरणच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर दि. २० जून रोजी राज्यभरातील मुख्य अभियंत्यांच्या बैठकीत वीज कनेक्शनसाठी प्रलंबित अर्जांचा आढावा घेतला. त्यावेळी १,१७,५२२ घरगुती वीज ग्राहकांचे जोडण्यांचे अर्ज प्रलंबित असल्याचे आढळले. मा. लोकेश चंद्र यांनी या प्रलंबित अर्जांच्या संख्येची गंभीर दखल घेतली व हे अर्ज झटपट निकाली काढण्याचे आदेश दिले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी महावितरणची यंत्रणा अधिक वेगाने कामाला लागली व केवळ दहा दिवसात १,०४,३९१ नवीन घरगुती वीज कनेक्शन देण्यात आली.
महावितरणचे संचालक संजय ताकसांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार दि. २० जून रोजी प्रलंबित १,१७,५२२ घरगुती कनेक्शन अर्जांपैकी ८३,८३० घरगुती ग्राहकांना म्हणजेच ७१ टक्के ग्राहकांना दहा दिवसात नवीन वीज कनेक्शन देण्यात आली. या खेरीज राज्यात २० जूननंतर नव्या घरगुती वीज कनेक्शनसाठी ५९,९१८ अर्ज आले व त्यापैकी २०,५६१ ग्राहकांनाही दहा दिवसात कनेक्शन देण्यात आली. अशा रितीने एकूण १,०४,३९१ नवीन घरगुती वीज कनेक्शन दहा दिवसात देण्यात आली.
अध्यक्षांनी ग्राहकाभिमूख सेवेवर भर दिला आहे. नव्या वीज कनेक्शनसाठीचे अर्ज प्रलंबित राहता कामा नयेत अशा स्पष्ट सूचना त्यांनी केल्या आहेत. त्यानुसार महावितरणने प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासोबत नवीन आलेल्या अर्जानुसार लवकरात लवकर कनेक्शन देण्यावर भर दिला आहे. दि. २० जून रोजी प्रलंबित असलेल्या अर्जांपैकी उरलेले अर्जही तातडीने निकाली काढण्यात येतील, असे ताकसांडे म्हणाले.
घरगुती ग्राहकांचे नव्या वीज कनेक्शनसाठीचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्यामध्ये कल्याण झोनने आघाडी घेतली असून या झोनमध्ये १३,३११ नवी कनेक्शन देण्यात आली. त्या खालोखाल पुणे झोनमध्ये १२,२९६ नवीन कनेक्शन देण्यात आली. तिसऱ्या क्रमांकावर कनेक्शन दिलेल्या ८९१५ अर्जांसह बारामती झोन आहे.
अध्यक्षांच्या सूचनेनुसार महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नवीन वीज कनेक्शन देण्यासाठी व्यापक काम सुरू केले आहे. यासाठी कंपनीच्या मुख्यालयात स्वतंत्रपणे देखरेख ठेवण्यात येत आहे व स्वतः अध्यक्ष कामाच्या प्रगतीचा वैयक्तिक आढावा घेत आहेत.
पुणे, दि. ४ जुलै २०२३: पर्वती जलकेंद्राचा वीजपुरवठा सोमवारी (दि. ३) सकाळी दीड तास नव्हे तर पक्षी वीजतारेला चिटकून मृत झाल्यामुळे केवळ २१ मिनिटे बंद राहिला असे स्पष्टीकरण महावितरणकडून देण्यात आले आहे.
पर्वती जलकेंद्राचा वीजपुरवठा दीड तास बंद असल्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागात पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यासंदर्भात महावितरणकडून खंडन करण्यात आले आहे. पर्वती जलकेंद्राला २२ केव्ही एक्सप्रेस वाहिनीद्वारे वीजपुरवठा केला जातो. सोमवारी जलकेंद्राच्या प्रांगणातील उपरी वीजवाहिनीच्या तारांना एक पक्षी चिटकून मृत झाल्याने सकाळी ८.०४ वाजता वीजपुरवठा बंद पडला. त्यानंतर ताबडतोब बिघाड शोधून सकाळी ८.२५ वाजता वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.
जलकेंद्राच्या प्रांगणात उपरी वीजवाहिन्यांजवळ झाडांच्या मोठ्या फांद्या आहेत. त्यावर विविध पक्ष्यांचा मोठा संचार आहे. या झाडांच्या काही फांद्याची छटाई आवश्यक असल्याचे यापूर्वीच महावितरणकडून जलकेंद्राला कळविण्यात आले आहे.
मंत्रालयासमोरील ‘प्रतापगड’ हेच ‘राष्ट्रवादी’चे अधिकृत मुख्यालय
मुंबई, दि. 4 : मंत्रालयासमोरील ‘प्रतापगड’ अ-5 हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत मुख्यालय करण्यात आले असून या ‘प्रतापगड’वरुन यापुढे ‘राष्ट्रवादी’ची सर्व सूत्र हलणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्तवाखाली राज्यातील सत्तेत सहभागी झाल्यावर राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या सोईसाठी तसेच पक्षाच्या कार्यालयीन कामकाजासाठी हे उपयुक्त ठरणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने देण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सत्तेत सहभागी झाल्यानंतर राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्यायल मंत्रालयाच्या जवळपास असणे आवश्यक होते. राज्याभरातून विविध कामासाठी तसेच पक्षाच्या कामासाठी मुंबईत येणाऱ्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सोईचे व्हावे तसेच पक्षाचे दैनंदिन कार्यालयीन कामकाज सुरळीत व योग्य प्रकारे व्हावे यासाठी मंत्रालयासमोरील ‘प्रतापगड’ 5-अ याठिकाणी हे पक्षाचे कार्यालय सुरु करण्यात आले आहे. तरी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी याची नोंद घेण्याचे आवाहन राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.
शाहरुख खान गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेत त्याच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग करत होता. शूटिंगदरम्यान झालेल्या अपघातामुळे शाहरुख खान जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. त्याच्या नाकावर व चेहऱ्यावर खोल जखमा झाल्या आहेत. प्राथमिक उपचारानंतर त्याला मुंबईत आणण्यात आले आहे. मात्र त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.
31 वर्षांच्या या प्रदीर्घ करिअरमध्ये शाहरुख खान शूटिंगदरम्यान अनेकदा जखमी झाला आहे. 2017 मध्ये रईसच्या शूटिंगदरम्यान त्याच्या गुडघ्याला आणि चेहऱ्याला दुखापत झाली होती, त्यानंतर त्याच्यावर छोटी शस्त्रक्रिया करावी लागली होती. 2013 मध्ये चेन्नई एक्सप्रेस चित्रपटाचे शूटिंग संपल्यानंतर त्याच्यावर 8 शस्त्रक्रिया झाल्या होत्या. 2009 मध्येही दुखापतीनंतर त्याच्या डाव्या खांद्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
मुंबई : अजित पवार यांनी सत्तेत सहभाग घेत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर अवघ्या ४८ तासातच राज्यमंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली. यावेळी कॅबिनेट आठ महत्त्वाचे निर्णय घेतले. राज्याचे ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. तर मराठा, कुणबी विद्यार्थ्यांना परदेशी उच्च शिक्षणासाठी सयाजीराव गायकवाड – सारथी शिष्यवृत्ती योजना जाहीर करण्यात आली.राज्य शासनाला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने वर्षभरातील महत्त्वाच्या निर्णयांचा आढावा घेणाऱ्या पहिले वर्ष सुराज्याचे या पुस्तिकेचे आणि लोकराज्य मासिकाच्या विशेषांकाचे आज प्रकाशन करण्यात आले. मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते हे प्रकाशन झाले. यावेळी मंत्रिमंडळातील सर्व सदस्य उपस्थित होते.
मंगळवार ०४ जुलै २०२३ रोजी मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त)
राज्याचे ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर. देशातील महाराष्ट्र हे पहिले राज्य. नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांना मोठे प्रोत्साहन
( ऊर्जा विभाग)
मराठा, कुणबी विद्यार्थ्यांना परदेशी उच्च शिक्षणासाठी सयाजीराव गायकवाड – सारथी शिष्यवृत्ती योजना. ७५ विद्यार्थ्यांना दरवर्षी शिष्यवृत्ती
(नियोजन विभाग)
• दिंडोरी तालुक्यातील चिमणपाडा आणि त्र्यंबक तालुक्यातील कळमुस्ते येथील प्रवाही वळण योजनांना मान्यता
(जलसंपदा विभाग)
• नागपूर येथील मे.शिवराज फाईन आर्ट लिथो वर्क्सच्या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेणार
(उद्योग विभाग)
• सेवानिवृत्त मुख्य न्यायमूर्ती, न्यायमूर्ती किंवा त्यांचे पती, पत्नी यांना सेवानिवृत्तीनंतरचे लाभ
(विधि व न्याय विभाग)
• सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली, गेळे आणि चौकुळ येथील कबूलायतदार गावकर जमिनीबाबत निर्णय.
(महसूल विभाग)
• नागपूर कृषि महाविद्यालय येथे आंतरराष्ट्रीय कृषि सुविधा केंद्र
(कृषि विभाग)
• मत्स्यबीज उत्पादन आणि मत्स्यबीज संवर्धन केंद्रांचा भाडेपट्टी कालावधी वाढवून आता २५ वर्षे
ठाकरे नंतर आता पवार ..मोडस ऑपरेंडी तीच..उद्दिष्ट्य महाराष्ट्रावर गुजरातचे प्रभुत्व लादण्याचे …
भाजपाचं देशात वस्त्रहरण झालं आहे आणि त्यांची वैचारिक सुंता झाली आहे
मुंबई-एकनाथ शिंदे आणि त्यांच्या फुटलेल्या गटाला शिवसेना या पक्षावर आणि चिन्हावर दावा करायला लावला. पक्ष आणि चिन्हावर दावा करण्याचा दावा फुटलेल्या लोकांच्या डोक्यात नव्हता. हे डोकं दिल्लीच्या भाजपावाल्याचं आहे. महाराष्ट्रातून त्यांना शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांचं नाव मिटवायचं आहे. तीच पद्धत राष्ट्रवादीच्या बाबतीत त्यांनी अवलंबली असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.राष्ट्रवादी फुटली, पण त्याचवेळी त्यांनी प्रमुख लोकांना हाताशी धरून आम्हीच राष्ट्रवादी आहोत हा दावा करायला लावला. एखादा सीरियल किलर असतो त्याची मोडस ऑपरेंडी असते. सीरियल रेपिस्ट असतात. तसे भाजपा म्हणजे राजकारणातले सीरियल रेपिस्ट आणि सीरियल किलर आहेत. पक्ष एका विशिष्ट आकड्यांमध्ये फोडायचा आणि फुटलेल्या गटाला पक्षावर आणि चिन्हावर दावा करायला लावायचा हे यांचं धोरण आहे. महाराष्ट्रातून बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना हे नष्ट करायचं. त्यानंतर शरद पवारांचं नाव नष्ट करायचं. स्वतः काहीच करायचं नाही. जे स्वतः काही करत नाहीत ते अशा गोष्टी करतात असाही आरोप संजय राऊत यांनी केला.
इतर राज्यांमध्ये भाजपाचे हेच प्रयत्न सुरु आहेत. कितीही प्रयत्न केले तरी महाराष्ट्रातून इतिहास पुसला जाणार नाही. कायदेशीर लढाईचा विचार केला तर शिवसेनेने कायदेशीर लढाई जिंकली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार महाराष्ट्रातल्या फुटलेल्या आमदारांना अपात्र ठरवलं जाईल. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही आहेत. तोच निकाल राष्ट्रवादीच्या फुटलेल्या गटालाही लागू पडू शकतो याची मला १०० टक्के खात्री आहे. विधीमंडळ पक्षातली फूट ही पक्षातली फूट नाही. हे धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने स्पष्ट केलं आहे.कुणीही काहीही राजकारण केलं तरी राष्ट्रवादी तिच्या जागेवर आणि शिवसेना तिच्या जागेवर जाईल. ऑपरेशन लोटस वगैरे काही नाही मला तर वाटतंय की भाजपाचंच ऑपरेशन झालं आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये फूट पाडल्याने भाजपाचं देशात वस्त्रहरण झालं आहे आणि त्यांची वैचारिक सुंता झाली आहे हे दिसतं आहे. अशीही टीका संजय राऊत यांनी केली.
नवी दिल्ली- तेल विपणन कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 7 रुपयांची वाढ केली आहे. ANIने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत त्याची किरकोळ किंमत १७७३ रुपयांवरून १७८० रुपयांपर्यंत वाढली आहे. त्याचबरोबर घरगुती एलपीजीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. विशेष म्हणजे सलग तीन वेळा किमतीत कपात केल्यानंतर व्यावसायिक एलपीजीच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. एप्रिल, मे आणि जूनमध्ये त्याच्या किमती कमी झाल्या. मार्चमध्ये व्यावसायिक एलपीजीच्या किमतीत मोठी वाढ झाली
Oil marketing companies have increased the prices of commercial LPG gas cylinders by Rs 7/cylinder. Delhi retail sales price of 19kg commercial LPG cylinder increased from Rs 1,773 to Rs 1,780 per cylinder. No change in the prices of domestic LPG cylinders.
घरगुती वापरासाठीच्या १४.२ किलो सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. त्याच्या किमतीतील शेवटचा बदल १ मार्च २०२३ रोजी झाला होता. त्यानंतर तो ५० रुपयांनी स्वस्त करण्यात आला. दिल्लीत घरगुती एलपीजीची किंमत ११०३ रुपये आहे. तसेच कोलकातामध्ये ११२९ रुपये, चेन्नईमध्ये १११८.५० रुपये आणि मुंबईमध्ये १११२.५० रुपये प्रति सिलिंडर उपलब्ध आहे.
मुंबई-महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार लवकरच मुंबईतील मंत्रालयाजवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन करणार आहेत.जर पक्ष तोच , चिन्ह तेच आणि राष्ट्रीय अध्यक्ष तेच आहेत तर राष्ट्रवादीच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन राष्ट्रीय अध्यक्षांना टाळून , त्यांच्या संमतीविना कसे होणार ? असा प्रश्न उपस्थित होतो आहे .
#WATCH | Maharashtra Deputy CM Ajit Pawar will shortly inaugurate a new NCP party office near Mantralaya in Mumbai. pic.twitter.com/isH38t5R9d