मागील काही वर्षात फास्टैग द्वारे केलेल्या इलेक्ट्रॉनिक पथकर संकलनात सातत्यपूर्ण वाढ दिसून येत आहे. वर्ष 2022 मध्ये राज्य महामार्गांवरील टोलनाक्यांसह इतर टोलनाक्यांवर फास्टैग द्वारे झालेल्या एकूण टोल संकलनात 2021 च्या 34,778 कोटी रुपये संकलनाच्या तुलनेत अंदाजे 46 टक्क्यांनी वाढ होऊन ते 50,855 कोटी रुपये झाले आहे.
डिसेंबर 2022 मध्ये राष्ट्रीय महामार्गांवरील टोलनाक्यांवर फास्टैग द्वारे सरासरी दैनिक पथकर संकलन 134.44 कोटी रुपये झाले आणि एका दिवसातील सर्वाधिक संकलन 24 डिसेंबर 2022 रोजी 144.19 कोटी रुपये झाले.
याचप्रमाणे वर्ष 2022 मध्ये फास्टैग व्यवहारांमध्ये वर्ष 2021च्या तुलनेत 48%नी वाढ दिसून आली. वर्ष 2021 आणि वर्ष 2022 मध्ये अनुक्रमे 219 कोटी आणि 324 कोटी फास्टैग व्यवहार झाले.
आजमितीला एकूण 6.4 कोटी फास्टैग वितरीत करण्यात आले आहेत तर फास्टैग उपलब्ध असलेल्या टोलनाक्यांच्या संख्येतही वाढ झाली असून ती 2022 मध्ये 1,181 (323 राज्य महामार्ग टोलनाके ) इतकी झाली आहे मागील वर्ष 2021 मध्ये ही संख्या 922 होती.
यात उल्लेखनीय गोष्ट अशी आहे की, फास्टैग कार्यक्रमांतर्गत आगमनानंतरच्या ऑन-बोर्डिंग राज्य टोलनाक्यांसाठी 29 वेगवेगळ्या राज्यांच्या संस्था/अधिकारिणी सह सामंजस्य करार करण्यात आले आहेत ज्यात उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक इत्यादी राज्यांचा समावेश आहे.
मुंबई : मुंबईच्या झवेरी बाजारामध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तुम्ही ‘स्पेशल २६’ हा सिनेमा पाहिलाच असेल. अगदी तसाच प्रकार इथे घडला आहे. या सिनेमात खोटे अधिकारी बनून लूट करण्यात आली होती. अशाच पद्धतीने झवेरी बाजारात बनावट ईडी अधिकाऱ्यांनी छापे टाकून करोडोंची लूट केली. खरंतर, राज्यात ईडी म्हटलं की लोकांना घाम फुटतो. याचाच फायदा घेत भामट्यांनी खोटे ईडी अधिकारी बनून छापा टाकला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका व्यावसायिकाच्या कार्यालयावर ४ अज्ञात लोकांनी खोटा छापा टाकला. यावेळी त्यांनी स्वतःला ईडीचे अधिकारी असल्याचं सांगितलं. इतकंच नाहीतर आरोपींनी तक्रारदार व्यावसायिकाच्या कार्यालयातील एका कर्मचाऱ्यालाही हातकडी घातल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. यानंतर आरोपींनी कार्यालयातून २५ लाख रुपये रोख आणि ३ किलो सोने चोरून नेले.या सोन्याची एकूण किंमत एक कोटी ७० लाख असल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ अज्ञात आरोपींविरुद्ध भादंवि कलम ३९४, ५०६ (२) आणि १२० ब अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती आहे. दरम्यान, सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींचा शोध सुरू असल्याचंही पोलीस सूत्रांनी सांगितलं.
पुणे, दि. २४: माघी श्रीगणेश जयंतीच्या पार्श्वभूमीवर शिवाजी मार्गावरील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदीर येथे दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता २५ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजेपासून गर्दी संपेपर्यंत वाहतूकीस बंदी करण्याबाबतचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन शहर पोलीस वाहतूक शाखेतर्फे करण्यात आले आहे.
अग्नीशमन वाहने, पोलीस वाहने, रुग्णवाहिका आदी अत्यावश्यक सेवेतील वाहनांना ही बंदी असणार नाही. स. गो. बर्वे चौक येथून शिवाजी रोडने स्वारगेटकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जड वाहतूकीस पीएमपीएमएल बसेस वगळून बंदी असेल. प्रीमियर गॅरेज चौक ते मंगला सिनेमागृहासमोरुन नागदेव ऑईल डेपो चौक दरम्यान तात्पुरत्या स्वरुपात नो-पार्किंग, नो-हॉल्टींग करण्यात येत आहे.
पीएमपीएमएल बसेसचे मार्ग : या कालावधीत पीएमपीएमएल बसेससाठी प्रीमियर गॅरेज चौक, मंगला सिनेमागृहासमोरुन उजवीकडे वळून खुडे चौक, उजवीकडे वळून पुणे मनपा कोर्ट कॉर्नर, प्रीमियर गॅरेज चौक असा पुणे मनपा येथील वर्तुळाकार बस मार्ग राहील. स. गो. बर्वे चौकातून छत्रपती श्री शिवाजी महाराज मार्गाने स्वारगेटकडे जाणाऱ्या पीएमपीएमएल बसेस प्रीमियर गॅरेज चौकातून डावीकडे वळून मंगला सिनेमागृहासमोरुन पुढे उजवीकडे वळून खुडे चौक, बालगंधर्व चौक, डावीकडे वळून खंडोजीबाबा चौक, अलका टॉकीज चौक, टिळक रोडने पुरम चौक मार्गे जातील.
स. गो. बर्वे चौकातून छत्रपती श्री शिवाजी महाराज मार्गाने पुणे स्टेशनकडे जाणाऱ्या बसेस प्रीमियर गॅरेज चौकातून डावीकडे वळून मंगला थिएटर समोरुन पुढे डावीकडे वळून राष्ट्रवादी काँग्रेस भवन उजवीकडे वळून कुंभारवेस चौक डावीकडे वळून शाहिर अमर शेख चौक मार्गे जातील. कोथरुडकडून येणाऱ्या व अप्पा बळवंत चौक मार्गे पुणे स्थानककडे जाणाऱ्या पीएमपीएमएल बसेस बाजीराव रोडने गाडगीळ पुतळा चौक उजवीकडे वळून कुंभार वेस चौक मार्गे पुणे स्थानकाकडे जातील.
दुचाकी व हलक्या चारचाकी वाहनांसाठी मार्ग: ही वाहने स. गो. बर्वे चौकातून सरळ जंगली महाराज मार्गाने बालगंधर्व चौकातून डावीकडे वळून इच्छितस्थळी जातील.
जिजामाता चौकातून छत्रपती श्री शिवाजी महाराज मार्गाने स्वारगेटकडे जाण्याकरीता पर्यायी मार्गाचा वापर वापर करावा. जिजामाता चौक डावीकडे वळून गणेश रोडने फडके हौद चौक, देवजीबाबा चौक, उजवीकडे वळून हमजेखान चौक सरळ महाराणा प्रताप रोडने किंवा उजवीकडे वळून लक्ष्मी रोडने सोन्या मारुती चौक, बेलबाग चौक, डावीकडे वळून शिवाजी रोडने इच्छितस्थळी जातील. शिवाजीपुलावरुन गाडगीळ पुतळा चौक. डावीकडे वळून कुंभारवेस चौक, शाहिर अमर शेख चौक मार्गे इच्छितस्थळी जातील. शिवाजीपुलावरून गाडगीळ पुतळा चौक मार्गे फडके हौद चौकाकडे जाताना (प्रेमळ विठोबा मंदिराकडे जाणारा रस्ता वगळून) वाहने जिजामाता चौकातूनच डावीकडे वळून जातील.
अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे जाणारी सर्व वाहतूक पर्यायी मार्गातून वळविण्यात येत असून ही वाहने अप्पा बळवंत चौक, बाजीराव रोडने इच्छितस्थळी जातील.
बाजीराव रोडने सायंकाळी महत्वाच्या व मानाच्या गणपतींच्या मिरवणुका सुरु झाल्यानंतर आवश्यकतेप्रमाणे पुरम चौकातून बाजीराव रोडने मनपाकडे जाणारी वाहतूक आवश्यकतेनुसार इतर मार्गावर वळविण्यात येईल. सदरची वाहने पुरम चौकातून टिळक रोडने अलका टॉकीज चौक, खंडोजीबाबा चौक मार्गे इच्छितस्थळी जातील.
त्याचप्रमाणे मानाचे गणपतींच्या मिरवणुकीच्या अनुषंगाने तसेच शहराचे मध्यवर्ती भागातील वाहतूकीची परिस्थती पाहून शिवाजी रोड, बाजीराव रोड, गणेश रोड, लक्ष्मी रोड व इतर मिरवणुक मार्गावरील अंतर्गत वाहतूकीत आवश्यकतेप्रमाणे बदल करण्यात येणार असल्याचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी कळविले आहे.
पुणे, दि. २४: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत देण्यात येणाऱ्या भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती आणि व्यावसायिक अभ्यासक्रमात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता इत्यादी योजनेचे सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील अर्ज विद्यार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवरुन भरावेत असे आवाहन करण्यात आले आहे.
पुणे जिल्ह्यातील अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत आपले शिष्यवृत्तीचे अर्ज https://mahadbtmahait.gov.in या पोर्टलवर ऑनलाईन भरून ऑफलाईन पद्धतीने आपल्या महाविद्यालयात जमा करणे आवश्यक आहे.
सन २०२२-२३ या वर्षात १०० टक्के विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली नसल्याने सर्व महाविद्यालयातील प्राचार्यांनी ३१ जानेवारी २०२३ पर्यंत १०० टक्के नोंदणी होईल याची दक्षता घ्यावी. तसेच महाविद्यालयाकडील प्रलंबित अर्जही २ दिवसात सहायक आयुक्त कार्यालयाकडे सादर करावेत.
जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी प्रवेशित एकही पात्र मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घ्यावी. विहित मुदतीत अर्ज सादर न केल्यास आणि त्यामुळे एखादा पात्र मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास त्यास सामाजिक न्याय विभाग आणि इतर मागास बहुजन कल्याण विभाग जबाबदार राहणार नाहीत, असे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त संगिता डावखर यांनी कळविले आहे.
पुणे, दि.२४: स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या स्थापनेच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून ‘वाचक वाढवा अभियान’ राबविण्यात येत आहे. या अंतर्गत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामार्फत नवीन वैयक्तिक व संस्था सभासद नोंदणी करण्यात येत आहे.
ग्रंथालयात १ लाख २५ हजार ४०० हून अधिक ग्रंथसंपदा आहे. यामध्ये अनेक संदर्भ ग्रंथ, कथा, कादंबऱ्या, व्यक्तीमत्व विकास, महिलांसाठींचे ग्रंथ, बालवाङ्मय, स्पर्धा परीक्षा आदी विषयांचे ग्रंथ मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील उपलब्ध आहेत. या ग्रंथालयात १ हजार ४७८ वैयक्तिक व २० संस्था सभासद आहेत.
जिल्ह्यातील जेष्ठ नागरिक, महिला, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी व शिक्षक, संशोधक आदी तसेच शासनमान्य सार्वजनिक व ग्रामपंचायत ग्रंथालये, संशोधन ग्रंथालये, जिल्हा व तालुका ग्रंथालय संघ, शाळा, महाविद्यालये व इतर नोंदणीकृत संस्थांनी जिल्हा ग्रंथालय, ९६६/१, सरदार बिल्डींग, गुरुद्वारासमोर, रविवार पेठ, पुणे येथे भेट देऊन सभासद होण्याचे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रेया गोखले यांनी केले आहे.
पुणे-पुणे जिल्ह्यातल्या पारगाव (ता. दौंड) येथे एकाच कुटुंबातील 7 मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. बदलत्या काळात आतंरधर्मीय, आंतरजातीय लग्न मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहेत. मात्र, अद्याप जुन्या रितीरिवाजांना पाळून असलेल्या एका कुटंबातील मुलाने लग्नाकरिता एका महिलेस पळवून नेल्याच्या रागातून मुलाच्या पित्यासह कुटुंबाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
पोलिसांना सर्व मृतदेहांची ओळख पटवण्यात यश आले आहे. यात तीन लहान मुलांचा समावेश असल्याने हळहळ व्यक्त होत आहे.दौंड तालुक्यातील पारगाव येथे भीमा नदी पात्रात सोमवारी एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह सापडले होते. आज मंगळवारी, 24 जानेवारी रोजी दुपारी 1 नंतर या नदीपात्रात पुन्हा तीन लहान मुलांचे मृतदेह आढळून आले आहेत. या सर्व मृतदेहांची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले आहे. मोहन उत्तम पवार (अंदाजे वय 50 वर्षे) संगीता मोहन पवार (अंदाजे वय 45 वर्षे, दोघे रा. खामगाव, ता.गेवराई) त्यांचे जावई श्यामराव पंडित फुलवरे (अंदाजे वय 32 वर्षे) त्यांची पत्नी राणी श्यामराव फुलवरे (अंदाजे वय 27 वर्षे) श्यामराव फुलवरे यांचा मुलगा रितेश श्यामराव फुलवरे (वय 7 वर्षे) छोटू श्यामराव फुलवरे (वय 5 वर्षे) आणि कृष्णा (वय 3 वर्षे) असे एकूण 7 जणांचे मृतदेह या नदीपात्रात आढळून आले आहेत. याबाबत यवत पोलिस ठाण्यात अक्समात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहन पवार हे मुळचे बीड जिल्हयातील गेवराई परिसरातील रहिवासी असून एक वर्षापूर्वी कुटुंबासह दौंड परिसरातील पारगाव येथे रहाण्यास आले होते. शेतमजुरी, माती खोदकाम, उसतोडणी अशी कामे ते करत होते. मोहन पवार हे निघोज गावात पालावर राहत असताना त्यांचा छोटा मुलगा अनिल पवार (वय-20) याने त्यांच्याच समाजातील पतीपासून विभक्त राहत असलेल्या महिलेला 17 जानेवारी रोजी लग्नाकरिता पळवून नेले होते.अनिलने महिलेला पळवून नेल्याचे समजताच मोहन पवार यांनी त्यांच्यापासून पुण्यात विभक्त राहत असलेला मोठा मुलगा राहुल पवार यास फोन करून माहिती दिली. तुझ्या छोट्या भावाने एकाची मुलगी पळवून नेली आहे. त्यामुळे ती परत आणण्यास त्याला सांग, अन्यथा आम्ही विष घेऊन कुटुंबासह आत्महत्या करू असे सांगितले होते. त्यानंतर त्या दिवशी रात्री मोहन पवार हे त्यांच्या पालासह कुटुंबास घेऊन समाजात बदनामी होईल या भीतीने दुसरीकडे निघून गेले. त्यानंतर त्यांचा ठावठिकाणा मिळून येत नव्हता.
पोलिसांना 18 ते 22 जानेवारी दरम्यान भीमा नदीपात्रात एकाच कुटुंबातील चार मृतदेह मिळून आले होते. घातपाताचा संशय व्यक्त केला जाऊ लागल्याने पोलिसांनी एनडीआरएफ पथकाच्या मदतीने नदीपात्रात शोधकार्य सुरू केल्यावर मंगळवारी आणखी तीन मृतदेह बचावकार्य पथकास नदीपात्रात सापडले. घटनेची माहिती मिळताच, पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली. एकाच कुटुंबातील सातजणांचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास यवत पोलिस करत आहेत.
पुणे, दि. 24 : मराठी विश्वकोश हे ज्ञानाच्या लोकशाहीकरणाचे साधन असून मराठी भाषेचे संवर्धन व वृद्धीमध्ये विश्वकोशाचे मोलाचे योगदान असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित यांनी केले.
मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्यानिमित्त विभागीय माहिती कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘विश्वकोशाची जडणघडण आणि मराठी भाषा’ या विषयावर आयोजित व्याख्यान प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पुणे विभागीय माहिती उपसंचालक डॉ. पुरुषोत्तम पाटोदकर, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे, भाषा संचालनालयाचे अधीक्षक सुनील सिरसाट आदी उपस्थित होते.
डॉ. दीक्षित म्हणाले, मराठी विश्वकोश ज्ञानाचे साधन असल्याने निर्मिती प्रक्रियेमध्ये अचूकता आणि गुणवत्तेला महत्व देण्यात येत आहे. लोकशिक्षणाच्या अध्यापनशास्त्रात विश्वकोश हे मोलाचे साधन आहे. विश्वकोश भाषावृद्धी व समृद्धीला हातभार लावतो. परिभाषा व प्रमाणभाषा घडवण्यासाठी मंडळ जाणीवपूर्वक प्रयत्न करते. ग्रामीण भाग, आदिवासी पाडे, लहान बालकांपर्यत विश्वकोश पोहचवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. मुद्रित आणि संगणकीय माध्यमांचा मेळ घालून ही वाटचाल चालू राहणार आहे.
मराठी विश्वकोशाच्या दुसऱ्या आवृत्तीसाठीचे काम सुरू झाले आहे. नोंदींमध्ये अचूकता व अद्ययावतता आणणे आणि वादग्रस्तता येऊ नये याची काळजी घेणे अशी त्रिसूत्री वापरून, मूळ छापील नोंदी आणि संकेतस्थळावरील नव्या नोंदी एकत्र करून दुसरी विस्तारित आवृत्ती तयार करण्यात येईल. कुमार कोशाचे दोन नवे खंड सुमारे सहा महिन्यांत, तर नवे माहितीपुस्तक येत्या वर्षभरात प्रकाशित करण्याचा प्रयत्न आहे. येत्या काळात बालकोश आणि ऑलिंम्पिक कोशाची निर्मितीही प्रस्तावित आहे.
विश्वकोशाचे कार्य उत्तम रितीने चालावे यासाठी शासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांनी वाई येथील मराठी विश्वकोश कार्यालयाला भेट देऊन नव्याने अद्ययावत इमारत उभारणार असल्याची घोषणा केली आहे. शासनाच्या पाठिंब्यामुळे अधिक जोमाने कार्य करीत पुढील उपक्रम राबवण्याचा निर्धार डॉ. दीक्षित यांनी व्यक्त केला.
माहिती व तंत्रज्ञानाच्या वेगवान युगात तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विश्वकोश वाचकांपर्यत पोहचविण्यात येत आहे. मराठी विश्वकोश 2007 या वर्षी सीडीमध्ये, 2011 मध्ये संकेतस्थळावर, 2017 मध्ये पेनड्राईव्ह आणि 2018 मध्ये भ्रमणध्वनी उपयोजकावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. दोन्ही संकेतस्थळांना मिळून सुमारे तीन कोटी वाचकांनी भेट दिली आहे, असेही डॉ. दीक्षित म्हणाले.
डॉ. पाटोदकर म्हणाले, माहिती व जनसपंर्क महासंचालनालयाच्या वतीने शासनाच्या विविध लोककल्याणकारी निर्णयांची, ध्येयधोरणांची, उपक्रमांची माहिती प्रसिद्धीच्या माध्यमातून नागरिकांपर्यत पोहचविण्यात येते. नागरिकांपर्यंत अचूक व वस्तुनिष्ठ माहिती पोहचविण्यासाठी विभाग नेहमीच प्रयत्न करीत आहे. हे काम करीत असताना मराठी भाषेचे अचूक ज्ञान असणे फार गरजेचे असून यासाठी मराठी विश्वकोशाचा माहिती व जनसंपर्क विभागाला संदर्भ म्हणून नेहमीच उपयोग होत असतो, असेही ते म्हणाले.
मुंबई, दि. 24 : मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने मुंबईत पायाभूत सुविधांवर विशेष भर देण्यात येत आहे. पुढील दोन वर्षात मुंबईतील सर्व रस्ते खड्डेमुक्त केले जातील. तसेच मुंबईचे सुशोभीकरण, कोळीवाड्यांचा विकास, चौपाट्या स्वच्छ करण्यावर भर दिला जाईल, असे उद्गार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.
एबीपी माझाच्या बीकेसी येथे आयोजित ‘माझा महाराष्ट्र माझं व्हिजन’ कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी उद्याच्या महाराष्ट्राचे त्यांचे व्हिजन मांडले.
मुख्यमंत्री म्हणाले की, हे सरकार मुंबईच्या विकासाला प्राधान्य देऊन काम करत आहे. देशात आणि जगात महाराष्ट्राप्रती एक विश्वास आहे. दाओस येथील आर्थिक फोरममध्ये दीड लाख कोटींपेक्षा जास्त रकमेचे सामंजस्य करार करण्यात आले, त्यामुळे प्रधानमंत्री यांच्या 5 ट्रिलियन उद्दिष्टपू्र्तीमध्ये महाराष्ट्राची 1 ट्रिलियन उद्दिष्टपूर्ती होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
महाराष्ट्र हे देशातील मोठे औद्योगिक शहर असून येथे मोठ्या प्रमाणात थेट गुंतवणूक होत आहे. निर्यातीत राज्याचा वाटा जास्त असून विकासासाठी नवनवीन चांगले उपक्रम हाती घेण्यात आले आहे. उद्योगांनी राज्यात यावे यासाठी त्यांना जलद गतीने परवानग्या देण्यात येत आहे. उद्योगांना पोषक वातावरण देण्यात येत असून यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी यावेळी सांगितले.
नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गामुळे राज्यात रस्त्यांची जोडणी वाढली असून यामुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे. याचबरोबर पर्यावरणपूरक कॉरिडॉर करत असून यात पर्यावरणाची कोणतीही हानी होणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी केले.
राज्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी राज्यात नवीन वसाहती उभारणे, झोपडपट्टी निर्मूलन, फ्लेमिंगो करिता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे, सौर ऊर्जेद्वारे 400 मे.वॅ. वीजनिर्मिती करणे, शेतकऱ्यांना शेतीसाठी मुबलक पाणी मिळावे यासाठी 18 नवीन प्रकल्प तयार करणे, शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे यासाठी नवीन तंत्रज्ञान आणणे यावर भर देण्यात येत आहे, असेही मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री श्री.शिंदे पुढे म्हणाले की, आगामी वर्षात आम्ही रोजगार, स्वयंरोजगार यावर भर देणार असून मुख्यमंत्री सहायता निधीतून रुग्णांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे. महिला, तरुणी आणि बालकाची मोठ्या प्रमाणात तपासणी करतोय. प्राथमिक आरोग्य केंद्राचे आधुनिकीकरण करण्यावर भर देण्यात येत आहे. त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रावर भर देण्यात येईल. पोलीस वसाहती, महिला सन्मान, विजेवरील वाहने यावरही विशेष भर देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
पुणे-दिनांक 24 जानेवारी, 2023 बहू माध्यमातून प्रदर्शित दूर्मिळ छायाचित्रे, लघूपट तसेच अत्यंत कमी वेळात भारतीय स्वातंत्र्य लढ्याची माहिती श्री मार्तंड देव संस्थान जेजूरी येथे येण्यारा भाविंकाना व्हावी यासीठी आयोजित करण्यात आलेल्या आजादी का अमृत महोत्सव व आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षे- 2023 या बहूमाध्यम प्रदर्शनाला भेटी द्याव्यात,असे आवाहन माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे, पत्र सूचना कार्यालय मुंबई व केंद्रीय संचार ब्यूरो, पुणे (महाराष्ट्र व गोवा राज्य ) च्या अतिरिक्त महासंचालक श्रीमती स्मिता वत्स शर्मा यांनी उद्घाटन प्रसंगी केले. या प्रसंगी प्रमाद गायकवाड, उपविभागीय अधिकारी, उपविभागीय कार्यालय, पुरंदर, निखिल देशमुख, उपसंचालक,केंद्रीय संचार ब्यूरो, पुणे, राजेद्र जगताप, मुख्याधिकारी, श्री मार्तंड देवस्थान जेजुरी, चारुदत्त इंगोले, मुख्याधिकारी जेजुरी नगर परिषद, धनराज गिराम, बालविकास अधिकारी, पंचायत समिती पुरंदर, डॉ. सारंग डांगे, वैद्यकिय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, बेलसर. श्री मार्तंड देवस्थान जेजुरीचे माजी विश्वस्त सर्वश्री तुशार सहाणे, पंकज निकूडे पाटील, सॉलिसिटर प्रसाद शिंदे, अशोकराव संकपाळ, व्यवस्थापक सतीश घाडगे, क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये, सहायक प्रचार अधिकारी पी.कुमार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
या प्रदर्शनाचे आयोजन माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे केंद्रीय संचार ब्यूरो, प्रादेशिक कार्यालय पुणे व श्री मार्तंड देव संस्थान जेजुरी, ता. पुरंदर, जि. पुणे यांच्या वतीने करण्यात आले असून या प्रदर्शनात भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातील विविध महत्त्वाच्या घटना-घडामोडी, बहूमाध्यमातून प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. यात 1857 ते 1947 या कालखंडातील भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महत्वाच्या घडामोडी आणि महान स्वातंत्र्यसेनानी यांची जीवनगाथा अत्यंत संक्षिप्त माहिती आणि बहूमाध्यमातून अधूनिक तंत्रज्ञानाच्या सहायाने दर्शविण्यात आली आहे. संयूक्त राष्ट्र संघाने 2023 हे वर्षे आंतराष्ट्रीय तृणधान्य वर्षे म्हणून साजरे करण्याच्या निर्णय घेतला आहे, भारत हा जगातील सर्वात जास्त तृणधान्य पिकविणारा देश आहे, ज्वारी,बाजरी,नाचणी, वरई,राळा, राजगिरा या धान्यातून आरोग्यास लोह, कॅल्शियम, झिंक, आयोडिन आदी घटक मिळतात, सा सर्व धान्यांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी या प्रदर्शनस्थळी तृणधान्य प्रदर्शनही भरविण्यात आले आहे. गडावर येणा-य़ा भाविकांना कमीत कमी वेळात आणि मनोरंजनाच्या माध्यमातून या प्रदर्शनाची माहिती देण्यासाठी या प्रदर्शनात विविध स्वातंत्र्य सेनानींचे कटआऊट्स, बॅकलीट पॅनल्स्, एलइजी वॉल, प्रदर्शनी पॅनल्स, लघू चित्रपट आदी माध्यमांचा वापर करण्यात आला आहे.
प्रदर्शनाच्या ठिकाणी तहसिल कार्यालय, पंचायत समिती, पुरंदर, जेजुरी नगर परिषद यांच्या द्वारे विविध योजनांची माहिती देणारे स्टाल्स् मांडण्यात आले आहेत, यात महिला बाल कल्याण विभागाच्या वतीने तृणधान्यची माहिती देण्यासाठी या धान्यंपासून तयार करण्यात आलेल्या सकस आहाराचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. आरोग्य विभागाद्वारे भाविकांची प्राथमिक तपासणी करुन त्यांना तात्पूरता उपचार देण्यासाठी स्टाल उभारण्यात आला आहे. नगर परिषद जेजुरीच्या वतिने आयुषमाण भारत आणि प्रधानमंत्री स्वनिधी योजनांचे लाभधारकांना कार्ड वाटप करण्यात आले या प्रदर्शन स्थळी जय मल्हार कलापथकाद्वारे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन दिनांक 24 ते 28 जानेवारी 2023 पर्यत सर्व भाविकांसाठी खूल ठेवण्यात आले असून सर्व नागरिकांनी या प्रदर्शनास भेटी द्याव्यात असे आवाहन भारत सरकाच्या वतीने करण्यात आले आहे.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होत असलेल्या “पराक्रम दिना”निमित्त केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे घेण्यात आलेल्या देशव्यापी चित्रकला स्पर्धा उपक्रमाचा भाग म्हणून आज गणेशखिंड येथील केंद्रीय विद्यालय तसेच लोहगाव येथील एअर फोर्स स्टेशन येथे असलेले केंद्रीय विद्यालय क्र.1 येथे जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. येत्या 27 जानेवारी 2023 रोजी होणार असलेल्या “परीक्षा पे चर्चा” या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेविषयी असलेल्या तणावाचे निवारण करण्यासाठी देखील या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सहभागी झालेल्या 200 हून अधिक विद्यार्थ्यांना ई-प्रमाणपत्रे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेले “एग्झाम वॉरियर्स” या पुस्तकाच्या प्रती देऊन गौरविण्यात आले.
परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम दर वर्षी आयोजित करण्यात येतो आणि त्यात परीक्षेला सामोरे जाणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांशी पंतप्रधान अर्थपूर्ण संवाद साधतात. परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी आणि परीक्षेत उत्तम दर्जाचे यश मिळविण्यासाठी पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना 25 मंत्र दिले आहेत. आजच्या चित्रकला स्पर्धेच्या संकल्पना म्हणून हे 25 मंत्रच देण्यात आले होते. पुणे आणि परिसरातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला.
केंद्रीय विद्यालय क्र.1 एएफएस लोहगाव:
लोहगाव येथील केंद्रीय विद्यालय क्र.1 एएफएस मध्ये पुणे जिल्ह्यातील 21 शाळांमध्ये शिकणाऱ्या 105 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला. यामध्ये केंद्रीय विद्यालये, सीबीएसई तसेच राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. परीक्षक मंडळाच्या सदस्यांनी सर्व चित्रांचे बारकाईने परीक्षण करुन अंतिम निकाल घोषित केले. सर्वोत्कृष्ट चित्रासाठी पुढील पाच विद्यार्थ्यांना पुरस्कार देण्यात आले: 1)भूमी जैवाल (डॉ.मर थिओफिलस शाळा), 2) हर्षल देवकर (एयर फोर्स शाळा, चंदननगर), 3)ओवी यादव (लष्करी शाळा, दिघी), 4)रितेश रोशन (केव्ही1 एएफएस) आणि 5)शिवानी गाडे (जवाहर नवोदय विद्यालय) ग्रुप कॅप्टन संजय पिसे, श्री राजेंद्र वडळकर, श्रीमती प्रफुल्ला शिंदे आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
केंद्रीय विद्यालय गणेशखिंड, पुणे
गणेशखिंड येथील केंद्रीय विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत 22 शाळांच्या 100 विद्यार्थ्यांनी भाग घेतला. यामध्ये केंद्रीय विद्यालये, सीबीएसई शाळा तसेच राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश होता.
परीक्षकांनी अंतिम निकाल जाहीर केले. चित्रकला स्पर्धेचे पाच विजेते पुढीलप्रमाणे आहेत:
अवनी थोरात (डी.ए.व्ही. पब्लिक स्कुल, पुणे),
श्वेता चव्हाण (केंद्रीय विद्यालय, गणेशखिंड, पुणे)
सानिका संजय कुमार (केंद्रीय विद्यालय क्र.1 देहू रोड,पुणे)
मुंबई-शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह कुटुंबियांनी मुंबईत अभिवादन केले. रिगल सिनेमाजवळील पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही शिवसेनाप्रमुखांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय शिवसेना नेते संजय राऊत, सुभाष देसाई, अरविंद सावंत, अंबादास दानवे आदी नेत्यांची उपस्थिती होती. यावेळी ढोलताशांच्या निनादात व बाळासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. यावेळी सर्वांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या गौरवार्थ घोषणाही दिल्या.बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक शिवाजीपार्क येथे आहे. परंतु आज ठाकरे कुटुंबियांनी रिगल सिनेमाजवळील पुर्णाकृती पुतळ्याचे दर्शन घेत पुष्पहारही अर्पण केला. यावेळी ढोल – ताशांचा गजराने वातावरण ढवळून निघाले.
मुंबई- शिवसेना आणि वंचित बहूजन आघाडीच्या युतीची घोषणा उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी आज संयुक्त पत्रकार परिषदेत केली. त्यामुळे राज्यात पुन्हा शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आली आहे.मुंबईतील आंबेडकर भवनात प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत, सुभाष देसाईसह आदी नेते पत्रकार परिषदेत उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी मोदी सरकार आणि भाजपवर घणाघाती हल्ले केले. उद्धव ठाकरे म्हणाले, देशहिताच्या नावाखाली सध्या अनेक भ्रम पसरवले जात आहे. देशाची हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू आहे. हुकूमशाहीविरोधात आम्ही एकत्र आलो आहोत. सध्या देशात प्रचंड वैचारिक प्रदूषण सुरू आहे. हे वैचारिक प्रदूषण दूर करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. त्यामुळे सर्वांनाच पुन्हा मोकळा श्वास घेता येईल.
तर, प्रकाश आंबेडकर यांनीही एक दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचाही अंत होईल, असे म्हटले आहे.युतीची घोषणा करताना उद्धव ठाकरे म्हणाले, आज एका स्वप्नाची पूर्ती झाली आहे. महाराष्ट्रातील जनता या युतीची आतुरतेने वाट पाहत होते. प्रकाश आंबेडकर यांचे आजोबा आणि माझे वडील या दोघांनीही समाजातील वाईट चालीरितींवर घणाघाती प्रहार केले. आतादेखील राजकारणात काही वाईट चालीरीती शिरल्या आहेत. त्यांचा नायनाट करण्यासाठी या दोन्ही पिढ्यांचे वारसरार एकत्र आले आहेत.
पुणे – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सतत वादग्रस्त विधान करत राहिल्याने त्यांची पदावरून हकालपट्टी केली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रपतींकडे करत आलो आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना स्वेच्छेने मुक्त न होऊ देता, राष्ट्रपतींनी त्यांची हकालपट्टी करावी, अशी आमची मागणी असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.काँग्रेस पक्षाच्या वतीने महात्मा फुले वाडा येथे आयोजित ‘हाथसे हाथ जोडो ‘अभियानाच्या राज्यस्तरीय कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, शहर अध्यक्ष अरविंद शिंदे ,माजी मंत्री रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, माजी आमदार दीप्ती चौधरी, अभय छाजेड,संगीता तिवारी उपस्थित होते.
राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी प्रधानमंत्री यांना लेखी पत्र पाठवत जबाबदारीमधून मुक्त करण्यात यावे असे सूचित केले. मात्र, राज्यपाल यांनी राज्यात सविधाननुसार काम करणे महत्वाचे होते मात्र तसे ते वागले नाही. त्यांच्या काळात राज्यपाल भवन हे भाजप भवन झाले होते. संविधान व्यवस्थेला छेद देण्याचा काम त्यांनी केले. राज्यपाल यांना एका पक्षाची बाजू घेऊन काम करणे चुकीचे होते.
राज्यपाल यांच्या मनात बहुजन समाज बाबतचा राग वेळोवेळी त्यांच्या वक्तव्यामधून दिसून आला. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य त्यांनी केले. भाजप कार्यकर्ता राज्यपाल होऊन ते वारंवार राज्यातील महापुरुष यांचा अपमान करत होते. त्यामुळे राष्ट्रपती यांना आमची विनंती आहे की, त्यांनी कोश्यारी यांची हकालपट्टी करावी, त्यांना स्वइच्छेनुसार राज्यातून जाऊ देऊ नये. यापुढे संविधान रक्षण करणारे राज्यपाल, राष्ट्रपती यांनी महाराष्ट्रामध्ये पाठवावे, असे मत पटोले यांनी व्यक्त केले.
पटोले म्हणाले, आजपासून महाराष्ट्र मध्ये पक्षाचे हे अभियान सुरू करत आहे.देशाच्या संविधान व्यवस्थेला आव्हान देण्याचे काम सध्या करण्यात येत आहे. सुशिक्षित लोकांना बेरोजगार करण्याचे काम केले जात आहे.लोकशाहीत जनता देशात राजा असून त्यांना आव्हान देण्याचे काम सत्ताधारी करत आहे.काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो’ यात्रा माध्यमातून लाखो लोकांना देशभरात जोडले आहे. महात्मा फुले यांनी समतेचा विचार दिलेला आहे.त्याकाळी बहुजन यांना संपविण्याचा काम करण्यात येत होते आणि शेतकऱ्यांवर अत्याचार केला जात होता त्याचा सामना त्यांनी केला.
आंबेडकर यांचा युती बाबत नेमका प्रस्ताव नाही
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांच्या युतीला आमच्या शुभेच्या आहे. त्यांचा युती बाबत कोणता प्रस्ताव आमच्याकडे अद्याप आलेला नाही. ठाकरे यांच्याशी माझे आज बोलणे झालेले आहे. त्यांची पत्रकार परिषद ही महविकास आघाडीची नव्हती तर सदर दोन पक्षाची होती. युती बाबत नेमका प्रस्ताव अद्याप आंबेडकर यांनी आम्हाला दिलेला नाही असे मत पटोले यांनी व्यक्त केले.
पुणे, दि. २३ जानेवारी २०२३:नवीन वीजजोडण्यांसाठी पुरेशा प्रमाणात नवीन वीजमीटर उपलब्ध करून देण्यासाठी महावितरणच्या पुणे परिमंडलामध्ये सूक्ष्म नियोजन सुरु करण्यात आले आहे. यामध्ये दर आठवड्यामध्ये दोनदा नवीन वीजजोडण्यांसह विभागनिहाय वीजमीटरच्या उपलब्धतेचा आढावा घेण्यात येत आहे व आवश्यकतेनुसार मीटर उपलब्ध करून देण्यात येत आहे. या नियोजनामुळे कोटेशनची रक्कम भरलेल्या (पेडपेंडिंग) तसेच पायाभूत यंत्रणा अस्तित्वात असलेल्या ठिकाणी नवीन वीजजोडणी कार्यान्वित करण्याची प्रक्रिया अधिक गतीमान झाली आहे.
दरम्यान, पुणे परिमंडलामध्ये सद्यस्थितीत सिंगल व थ्रीफेजचे एकूण ३१ हजार ५०५ नवीन वीजमीटर उपलब्ध आहेत तर कोटेशनची रक्कम भरलेल्या व पायाभूत यंत्रणा अस्तित्वात असलेल्या ९ हजार ५९१ अकृषक ग्राहकांकडे नवीन वीजजोडणी कार्यान्वित करण्यात येत आहे.
पुणे परिमंडलामध्ये नवीन वीजजोडण्या देण्याची कार्यवाही तत्परतेने करण्याचे निर्देश मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी दिले आहेत. त्यासाठी सर्वच १२ विभागांमधील नवीन वीजजोडणी तसेच वीजमीटरच्या उपलब्धतेबाबत परिमंडलस्तरावरून दर सोमवारी व गुरुवारी विभागनिहाय आढावा घेण्यात येत आहे. नवीन वीजजोडणी देण्यासोबतच नादुरुस्त मीटर बदलायचे आहेत त्या विभागात पुरेशा संख्येत व तातडीने नवीन मीटर उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या प्रक्रियेचा दर सोमवारी मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार स्वतंत्रपणे आढावा घेत आहेत. त्यामुळे नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्याच्या गतीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.
पुणे परिमंडल अंतर्गत भोसरी, पिंपरी, कोथरूड, शिवाजीनगर, रास्तापेठ, पद्मावती, पर्वती, नगररोड, बंडगार्डन, मंचर, मुळशी व राजगुरुनगर विभागांमध्ये सोमवार (दि. २३)पर्यंत सिंगल फेजचे २१ हजार ८२ तसेच थ्री फेजचे १० हजार ४२३ नवीन वीजमीटर उपलब्ध आहेत. तर या तुलनेत सर्वच १२ विभागांमध्ये पायाभूत यंत्रणा अस्त्तित्वात असलेल्या सिंगल फेजच्या ७ हजार ७०५ आणि थ्री फेजच्या १ हजार ८८६ अशा एकूण ९ हजार ५९१ नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्याची प्रक्रिया सुरू आहेत.
गेल्या जानेवारी ते डिसेंबरपर्यत महावितरणकडून तब्बल एक लाख ७७ हजार १८६ नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत. यामध्ये लघुदाब वर्गवारीमध्ये घरगुती- १ लाख ४६ हजार ७८, वाणिज्यिक- १९ हजार ८५९, औद्योगिक- ३५०४ आणि कृषी व इतर ७ हजार ४५५ अशा एकूण १ लाख ७६ हजार ८९६ तर उच्चदाब वर्गवारीमध्ये २९० नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत.
नवीन वीजजोडणी व नादुरुस्त मीटर बदलण्यासाठी नवीन मीटर उपलब्ध होत नसल्यास महावितरणच्या संबंधित विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याशी ग्राहकांनी थेट संपर्क साधावा. सोबतच पुरेशा प्रमाणात वीजमीटर उपलब्ध असल्याने वीजग्राहकांना बाजारातून मीटर खरेदी करण्याची आवश्यकता नाही असेही महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
राष्ट्रीय एससी-एसटी अर्थात राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमाती केंद्राची परिषद मुंबईत 23 जानेवारीला आयोजित करण्यात आली. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील सदस्यांमध्ये उद्योजकतेची संस्कृती रुजवण्यासाठी, राष्ट्रीय एससी-एसटी केंद्राविषयी जनजागृती करण्यासाठी तसेच सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग (एमएसएमई) मंत्रालयाच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचावी या उद्देशाने केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयातर्फे कफ परेड येथील जागतिक व्यापार केंद्र, इथे दिवसभराच्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते झाले.
आत्मनिर्भर भारताचे स्वप्न सत्यात साकारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय एससी-एसटी केंद्र आणि इतर अनेक योजना आखल्या आहेत. या सर्व योजना रोजगार निर्मिती , उद्योजकतेला प्रोत्साहन, सकल देशांतर्गत उत्पन्न जीडीपी मध्ये वाढ आणि निर्यातीला चालना देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आल्या आहेत, असे राणे यांनी सांगितले.
वर्ष 2014 मध्ये जगातील दहावी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या भारताने आता जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याचा बहुमान मिळवला आहे. वर्ष 2030 पर्यंत देशाला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था करण्याचा केंद्र सरकारचा निर्धार असून त्यासाठी उद्योग क्षेत्राचे सहकार्य अपेक्षित आहे, असे ते म्हणाले.
उद्योग क्षेत्रातील विकासात महाराष्ट्र आघाडीवर आहे आणि या विकासात सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांचे योगदान आणखी वाढणे आवश्यक आहे, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. “ भारताच्या जीडीपीमध्ये एमएसएमईचा वाटा 30 टक्के आणि निर्यातीत 50 टक्के आहे. हे प्रमाण आणखी वाढवण्यासाठी प्रत्येकाने हातभार लावला पाहिजे.” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
आर्थिक सक्षमीकरण, रोजगार निर्मिती आणि देशाच्या सर्वांगीण विकासात उद्योजकांची भूमिका महत्वपूर्ण असते, यावर मंत्र्यांनी भर दिला. त्यासाठीच अधिकाधिक लोकांनी उद्योगांकडे वळून उद्योजक व्हायला हवे असे ते म्हणाले. जर एखाद्याला उद्योग सुरु करताना काही शंका असतील किंवा काही समस्या असतील तर आमचे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय त्यांचे निवारण करण्यासाठी सर्वतोपरी सहाय्य करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. उद्योजक घडवणे, रोजगार निर्मिती आणि देशाचा जीडीपी वाढवण्यासाठी आमच्या मंत्रालयामार्फत सुरू असलेल्या कामात प्रत्येकाने योगदान दिले पाहिजे.
देशातून बेरोजगारी आणि गरीबीचे पूर्णपणे उच्चाटन करण्यासाठी एमएसएमई मंत्रालय कार्य करत आहे आणि प्रत्येकाने या मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. राष्ट्रीय एससी-एसटी केंद्र आणि एमएसएमई मंत्रालयाच्या विविध योजनेअन्तर्गत कर्जसुविधा आणि इतर सवलतींचा लाभ घेऊन उद्योजक व्हावे असे आवाहन त्यांनी केले. आपण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार केवळ वाचून उपयोग होणार नाही तर त्यांना खऱ्या अर्थाने पुढे नेण्यासाठी ते सर्व स्तरांवर अंमलात आणले पाहिजेत, असे राणे यांनी सांगितले.
एमएसएमई क्षेत्र हे भारतीय अर्थव्यवस्थेतील एक अतिशय सक्रिय क्षेत्र म्हणून उदयास आले आहे, असे एमएसएमईचे सचिव बी.बी. स्वेन म्हणाले. महाराष्ट्र हे राज्य त्यादृष्टीने एक सर्वोत्तम व्यवस्था देऊ करत असून नोंदणीकृत एमएसएमई मधील 20% महाराष्ट्रातील आहेत, असे त्यांनी सांगितले. शाश्वत विकासाकरता या क्षेत्राला सातत्याने नवनवीन कल्पना अंगीकारून अधिक स्पर्धात्मक होणे आवश्यक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. या क्षेत्राला चालना देण्यासाठी मंत्रालय नवीन रूपरेषा आणि अभिनव योजना विकसित करत आहे, “आम्ही भागधारकांच्या सल्लामसलतीवर खूप लक्ष ठेवतो, परिषदेमध्ये आज दिलेल्या सूचनांवर आम्ही गांभीर्याने काम करू”, असे सचिव म्हणाले.
समाजातील शेवटच्या घटकातील एससी-एसटी उद्योजकांना केंद्र सरकारच्या विविध योजनांचे लाभ मिळावेत यासाठी आजच्या सारख्या परिषदांचे आयोजन केले जाते असे त्यांनी सांगितले. सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी सार्वजनिक अधिग्रहण धोरणाचा भाग म्हणून, अनुसूचित जाती-जमातीतील उद्योजकांच्या अखत्यारीतील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना 4% वार्षिक अधिग्रहणाचे उद्दिष्ट साध्य करण्यात मदत करणे, हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे.
एससी/ एसटी केंद्राने गेल्या काही वर्षांत घेतलेल्या विविध उपक्रमांमुळे, एससी/एसटी उद्योजकांकडून सार्वजनिक अधिग्रहणाचा हिस्सा वाढला आहे. एससी/एसटी उद्योजकांचा 2015-16 मध्ये असलेला सार्वजनिक अधिग्रहणाचा हिस्सा 99.37 कोटी रुपये किंवा 0.07% वरून 2021-22 मध्ये 1,248.23 कोटी रुपये किंवा 0.86% इतका झाला आहे.