Home Blog Page 1446

३५व्या पुणे फेस्टिव्हलची पूर्वतयारी बैठक संपन्न

पुणे -३५वा पुणे फेस्टिव्हल यंदा दि. १९ ते २८ सप्टेंबर या कालावधीत दिमाखदारपणे संपन्न होणार आहे. त्याची पूर्वतयारी व नियोजन यासाठी पुणे फेस्टिव्हलच्या संयोजन समितीची विस्तृत बैठक पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल व सर्व समित्यांचे प्रमुख उपस्थित होते. कलाकारांचे कार्यक्रम, पाहुणे, निमंत्रणे, मंच सजावट, पार्किंग, व्हीआयपी रिसेप्शन, हॉटेलमधील निवास, पोलीस परवानगी, क्रीडा स्पर्धांचे नियोजन, महिला महोत्सव व अन्य सांस्कृतिक कार्यक्रम, प्रसिध्दी आदि विविध समित्यांच्या कामाचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. अॅड अभय छाजेड यांची मुख्य संयोजक (Chief Coordinator) म्हणून नेमणूक केल्याचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांनी जाहीर केले. पुणे फेस्टिव्हलच्या स्थापने पासून सलग ३५ वर्षे पुणे फेस्टिव्हलशी जोडल्या गेलेल्या पुणे फेस्टिव्हलच्या पॅट्रन ज्येष्ठ अभिनेत्री नृत्यांगना खा. हेमा मालिनी यांचा दरवर्षी प्रमाणे यंदा देखील मोठा सहभाग असेल असे सुरेश कलमाडींनी नमूद करून सर्व पूर्वतयारी बद्दल समाधान व्यक्त केले.

  DCM अजित पवारांनी PM मोदींचे केले कौतुक; म्हणाले – त्यांच्यासारखा दुसरा नेता देशात नाही

नाशिक-उपमुख्यमंत्री झाल्यावर आणि काल अर्थ खाते मिळाल्यावर आज अजित पवारांच्या नाशिक जिल्हा दौऱ्यात जोरदार शक्तीप्रदर्शन झाले त्यांनी शरद पवारांना मोठा धक्का दिला. या वेळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामाचे कौतूक केले. त्यांचा सारखा नेता भारतात दुसरा नसल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. आगामी काळात होणाऱ्या एनडीएच्या बैठक आपण सहभागी राहणार असल्याचे अजित पवारांनी सांगितले.मोदी यांनी ९ वर्षात अनेक चांगले निर्णय घेतल्याचे नमूद केले आणि काश्मीर मधील ३७० कलम हटविण्याच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले.पहा नेमके ते काय म्हणाले….

दादा ,आता म्हणणार काय ..निवडणुका घ्या ….

नाशिक- नाशिक-दादा ,तुम्ही सत्तेत नसताना ,सारखे निवडणुका घ्या, महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आग्रही होता ..आता सत्तेत गेलात ..आता ..काय भूमिका … समान नागरी कायद्याचे काय दादा … पहा यावर काय उत्तरे दिली नवे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी …

‘खड्डे आणि पावसाळी कामांसाठी विशेष पथके नेमा’,शिवसृष्टी आणि भिडे वाड्याच्या कामाला गती द्या ..दीपक मानकर

  • ‘राष्ट्रवादी’ची महापालिका आयुक्तांकडे मागणी

पुणे (प्रतिनिधी) : ‘सध्या पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. अजून म्हणावा तसा पाऊस पडत नसला, तरी पुणेकरांच्या समस्या वाढण्याची शक्यता आहे. कारण कमी कालावधीच्या पावसात शहरातील रस्त्यांवर आताच खड्डे दिसू लागले आहेत. जोरदार पाऊस सुरू झाला, की या खड्ड्यांचे स्वरूप आणखी तीव्र होते. अशी परिस्थिती पुण्याच्या वाट्याला दर पावसाळ्यात येत असते. या पार्श्वभूमीवर रस्त्यांवरील खड्ड्यांची पाहणी करण्यासाठी आणि त्यावर तातडीने डागडुजी करण्यासाठी आपण विशेष पथक अर्थात ‘टास्क फोर्स’ नेमून नियंत्रण नेमावे आणि शहरातील काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचत असून याचा फटका नागरिकांना आणि छोट्या व्यावसायिकांना फटका बसतो. या पार्श्वभूमीवर पाणी साचणारे भाग निश्चित (Identify) करुन त्या भागात तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे, अशी मागणी शहर राष्ट्रवादीच्या वतीने शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे.

पावसाळ्याच्या अनुषंगाने मागण्यांचे निवेदन आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेऊन मानकर यांनी दिले. खड्डे तातडीने बुजवण्याठी विशेष पथके नेमण्याबरोबरच यासाठी ‘टोल फ्री क्रमांक’ सुरु करुन यास Whats App द्वारे जोडल्यास नागरिकांना आपल्याशी संपर्क साधने सहज शक्य होईल, असेही मानकर यांनी केलेल्या मागणीत म्हटले आहे.

‘कमी वेळात अधिक पाऊस झाल्यास शहरातील काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचत असून याचा फटका नागरिकांना आणि छोट्या व्यावसायिकांना फटका बसतो. या पार्श्वभूमीवर पाणी साचणारे भाग निश्चित (Identify) करुन त्या भागात तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे, अशी मागणी मानकर यांनी केली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना मानकर म्हणाले, पुणेकरांना भेडसावणाऱ्या समस्या मार्गी लावण्यासाठी आम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सज्ज असून प्रश्नांचा पाठपुरावा करणे आणि ते सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. पावसाळा कामतांसंदर्भात केलेल्या मागण्यांचा आयुक्त सकारात्मक निर्णय घेऊन कार्यवाही करतील, हा विश्वास आहे’.

शिवसृष्टी आणि भिडेवाडा स्मारकांच्या कामाला गती द्यावी : मानकर

पुणे महापालिकेच्या माध्यमातून भव्य-दिव्य शिवसृष्टी साकारण्यासंदर्भातचा निर्णय झाला असला तरी याबाबत कोणतीही प्रगती झालेली नाही. या पार्श्वभूमीवर शिवसृष्टीच्या कामाला गती द्यावी आणि भिडेवाडा येथे साकारण्यात येणाऱ्या राष्ट्रीय स्मारकाच्या कामाला गती द्यावी, या मागण्याही मानकर यांनी आयुक्तांकडे केल्या आहेत.

प्रधानमंत्री आवास योजनेच्या निकषात उत्पन्न मर्यादेत वाढ केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांकडून प्रधानमंत्र्यांचे आभार

मुंबई, दि. १५ : – मुंबई महानगर क्षेत्र –एमएमआर मध्ये आर्थिक दुर्बल घटकांसाठी (EWS) प्रधानमंत्री आवास योजनेतील परवडणाऱ्या घरांसाठी उत्पन्न मर्यादेत वाढ करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे, उत्पन्नाची मर्यादा आता तीन लाखांवरुन सहा लाख रुपये करण्यात आली असून या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कामकाज मंत्री हरदिप सिंह पुरी यांचे आभार मानले आहेत. या निर्णयामुळे म्हाडा, सिडकोच्या घरांसाठी अर्ज करणाऱ्या लाखो नागरिकांना दिलासा मिळाला असून सर्वसामान्यांचं हक्काच्या घराचं स्वप्न साकार होण्यास मदत होणार आहे.

प्रधानमंत्री आवास योजना (नागरी) अंतर्गत मुंबई महानगर क्षेत्रासाठी आर्थिक दुर्बल घटकांसठी उत्पन्नाचे निकष तीन लाखांवरून सहा लाख रुपये करण्याची विनंती मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केंद्राकडे २१ जून २०२३ रोजी पत्राद्वारे केली होती, त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याचा पाठपुरावा केला. या विनंतीला केंद्राने सकारात्मक प्रतिसाद देऊन उत्पन्नाच्या निकषात वाढ केली असल्याचे राज्य शासनाला कळविले आहे.

पनवेल ते इंदापूर या रखडलेल्यामार्गाचे कामाची एक लेनगणपतीपूर्वी सुरू होणार

कशेडी घाटातील भुयारी मार्गाची
एक लेनही लवकरच सुरू करणार
सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांची ग्वाही

रत्नागिरी –
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज शुक्रवारी मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याच्या कामांची पाहणी केली व कामांचा आढावा घेतला. या पाहणी दरम्यान पळस्पे फाटा, वाखण, इंदापूर-कासू रस्ते आणि घाट बांधकामाच्या स्थितीचा आढावा घेतला. यावेळी मंत्री चव्हाण यांनी पनवेल ते इंदापूर मार्गाचा पहिला टप्पा हा गणेशोत्सवाच्या पुर्वी पूर्ण होऊन एक मार्गिका सुरू होईल तर डिसेंबर २०२३ अखेर पर्यंत पूर्ण मुंबई-गोवा महामार्ग सुरळीतपणे सुरू होईल असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज
व्यक्त केला. सदर रस्त्याच्या कामात असणारे सर्व अडथळे लवकरात लवकर सोडवून हा महामार्ग वेळेत पुर्ण करण्याचे सक्त निर्देश मंत्री चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना दिले.

पनवेल येथून या पाहणी दौऱ्याला सुरुवात झाली.तर झारप येथे दौऱ्याची सांगता झाली . भर पावसात अधिकाऱ्यांच्या समवेत मंत्री चव्हाण यांनी पाहणी केली.त्यावेळी कार्यकर्त्यांनी मंत्री चव्हाण यांचे अनेक ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन कोकण नगरीत स्वागत केले.
यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना मंत्री चव्हाण यांनी सांगितले की,राज्यात शिंदे फडणवीस सरकारच्या माध्यमातून मागील वर्षभरात विकासाची रखडलेली कामे वेगाने मार्गी लागत आहेत. मंत्री चव्हाण यांनी केंद्र सरकार आणि राज्यातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून जनतेला न्याय मिळत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
गेली अनेक वर्ष मुंबई – गोवा महामार्गाच्या रखडलेल्या रस्त्याच्या कामांमध्ये विविध कारणांमुळे अडचणी येत होत्या. पूर्वीचे कॉन्ट्रॅक्टर्स आता नव्याने आलेले कॉन्ट्रॅक्टर्स आणि अधिकारी वर्ग या सगळ्यांचा समन्वय घडवून ते काम केल जात आहे. बँकांचे असणर्‍या मोठ्या समस्या यामध्ये आहेत. बँक त्यांच्याकडून जे पैसे देते त्या पहिल्या कॉन्ट्रॅक्टरला जातात आणि मग प्रत्यक्षात काम करणार्‍या कॉन्ट्रॅक्टरला ते पैसे मिळत नाहीत. या सर्व अडचणी सोडवून हे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असेही मंत्री चव्हाण यांनी स्पष्ट केले.

गणपतीच्या अगोदर सिंगल लेन हा कोणत्याही परिस्थितीत पूर्ण झाला पाहिजे या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करतोय आणि आम्हाला खात्री आहे, की गणपतीच्या अगोदर हा सिंगल लेन १०० टक्के पूर्ण होईल. तसेच डिसेंबर पर्यंत दुसरी लेन पूर्ण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शासन अतिशय वेगळ्या पद्धतीने सर्व प्रयत्न करून हा रस्ता पूर्ण झाला पाहिजे या दृष्टिकोनातून प्रयत्नशील आहे असा विश्वासही मंत्री चव्हाण यांनी व्यक्त केला.

पावसामध्ये हा सिंगल लेन गणपतीच्या अगोदर सुरू झाला पाहिजे यासाठी सर्व नॅशनल हायवेचे सर्व अधिकारी कॉन्ट्रॅक्टर्स या संबंधितांची बैठक झाली होती. नवीन टेक्नॉलॉजीच्या सहहाय्याने काय करता येऊ शकतं यासगळ्या गोष्टींसाठी सर्वजण प्रयत्न करत आहोत असे सांगून मंत्री चव्हाण म्हणाले की, सुस्थितीतील सिंगल लेन करण्याच्या दृष्टिकोनातून शर्थीचे प्रयत्न केले जातील आणि सिंगल लेन गणपतीच्या अगोदर सुरू होईल.

मुंबई गोवा महामार्गावरील पनवेल ते इंदापूर दरम्यानच्या पहिल्या टप्प्यामधला असणारा ४२ किमी पहिला सिंगेललेन सुस्थितीमध्ये आहे. १२ किमीमधील सिंगल लेनचे व्हाईट टॉपिंग झालेले आहे. उरलेलं काम गणपतीच्या अगोदर पूर्ण होईल, अशी खात्री कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकारी देत आहेत. तसंच
उरलेला कासू पासून ४२ किमीचा रस्ता खराब अवस्थेत आहे. सिटीबीटी अशी नवीन टेक्नॉलॉजी आहे त्या मशीनच्याद्वारे खालचा बेस संपूर्ण काढण्याचं काम होतं आणि त्यातून पुन्हा चांगल्या पद्धतीने ते काम परत केलं जातं. सध्या २ मशीन त्यांच्या उपलब्ध आहेत. अजून ८-१० मशीन घेऊन ४२ किमीच्या उरलेल्या रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले. असेही मंत्री चव्हाण यांनी स्पष्ट केले.

रत्नागिरी महामार्गाची पाहणी केली. या पाहणी दौऱ्यामध्ये वडखळ ते नागोठणे कडे जाणाऱ्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे
आदेश मंत्री चव्हाण यांनी दिले.

कशेडी घाटातील भुयारी मार्ग लवकर सुरू होणार
मंत्री चव्हाण यांनी भविष्यात कोकणातील एक्सप्रेस वे म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या पोलादपूर ते खेडला जोडणाऱ्या कशेडी घाटातील 9 किमी अंतरावरील 1800 मीटरच्या भुयारी मार्गाची पाहणी केली.गणेशोत्सवात मुंबई- गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्याय असणारा बोगदा वाहतुकीसाठी सुरु करण्याच्या दृष्टीने युद्ध पातळीवर काम करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. पर्यायी मार्ग म्हणून कशेडी घाटातून गेली दोन वर्ष बोगद्याचे काम सुरु होते. त्यापैकी एका बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे.बोगद्याच्या आतील रस्त्याचे काँक्रेटीकरणाचे काम सुरू आहे.
सदर कामाची पाहणी मंत्री चव्हाण यांनी केली. काँक्रीट रस्त्याला पाणी लागल्यास सिमेंट वाहून जाऊन रस्ता खराब होतो त्याचा दर्जा ढासळतो. ही बाब लक्षात घेता तंत्रज्ञानाचा वापर केल्याचे मंत्री चव्हाण यांनी सांगितले
नव्या बोगद्यामुळे कशेडी घाट ते रायगड जिल्ह्यातील पोलादपूर हे अंतर अवघ्या दहा मिनिटांत पार होणार आहे. हे अंतर पार करण्यासाठी अवघड वळणांमुळे जवळपास 20 ते 25 मिनिटांचा कालावधी लागतो. त्यात बचत होणार आहे.

खासदार प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते बचतपत्र धारक महिला ग्राहकांचे तसेच अधिकारी – कर्मचारी वर्गाचे कौतुक

पुणे-

पुणे शहर टपाल विभागातर्फे आज “महिला सन्मान बचत पत्र” (MSSC) खाते उघडण्याच्या मोहिमेत विशेष कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमात “महिला सन्मान बचत पत्र विशेष मोहीम” आणि ‘महादेव कोळी आदिवासी समूह’ भारतीय टपाल विभाग, पुणे क्षेत्रद्वारे  विशेष आवरण/पाकिटाचे (Special Cover) अनावरण करण्यात आले.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राज्यसभा खासदार प्रकाश जावडेकर उपस्थित होते.

देशातील महिलांची आर्थिक समृद्धी खात्रीने करण्यासाठी, भारत सरकारने 1 एप्रिल 2023 पासून “महिला सन्मान बचत पत्र” योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत पुणे पोस्टल रिजनने दिनांक 1 एप्रिल 2023 ते 30 जून 2023 या अवघ्या तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये 31,615 “महिला सन्मान बचत पत्र” खाती उघडली आहेत. ज्याची गुंतवणूक सुमारे 237 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. पुणे शहर पूर्व विभागाने “महिला सन्मान बचत पत्र” खाते उघडण्यासाठी दिनांक 23 ते 26 जून 2023 या तीन दिवसांची विशेष मोहीम राबविली. या मोहिमेत तब्बल 10,430 खाती उघडली आहेत, ज्यांची गुंतवणूक रक्कम 39 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. हा एक विक्रम आहे.
 

याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना प्रकाश जावडेकर यांनी भारतीय टपाल विभागाच्या कामगिरीचे कौतुक केले. “महादेव कोळी” जमाती वरती विशेष आवरण काढून टपाल विभागाने आदिवासी समाज बांधवांना एका वेगळ्या प्रकारे सन्मानित केल्याचे नमूद केले. टपाल विभागाच्या पुणे पोस्टल रिजनने अल्पावधीत हजारोंच्या संखेने महिलांची “महिला सन्मान बचत पत्र” खाते उघडून एक प्रकारे या सर्व महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनविण्याचे काम केल्याचे नमूद केले. “महिला सन्मान बचत पत्र” म्हणजे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली सुरु केलेली ही विशेष योजना असून सदर योजना हजारो महिलांपर्यंत पोहचविण्याचे काम भारतीय टपाल विभाग करीत असल्याचे नमूद केले.


पोस्ट खात्याने विविध योजना आणल्या आहेत. पोस्टात आता विमा, आधार कार्ड, पासपोर्ट मिळत आहे. आपले पोस्टमन डिजिटल झाले आहेत.भारतातील UPI प्लॅटफॉर्मने डिजीटल आर्थिक व्यवहारात अमेरिकेलाही मागे टाकले आहे. पोस्ट विभागाने महिला सन्मान बचतपत्र अभियान अतिशय उत्तम राबवले आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमाला श्रीमती माधुरी मिसाळ, आमदार, पर्वती मतदारसंघ, पुणे, श्री. संग्राम गायकवाड, आयकर आयुक्त, पुणे, रामचंद्र जायभाये, पोस्टमास्तर जनरल, पुणे आणि श्रीमती सिमरन कौर, संचालक टपाल सेवा, पुणे क्षेत्र इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

वंदे भारत ट्रेनमध्ये अजितदादांचीच क्रेझ

मुंबई, दि. 15:- वेळ सकाळी सहा वीसची… ठिकाण ठाणे रेल्वे स्टेशन… राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कार्यक्रमासाठी वंदे भारत ट्रेनने नाशिककडे प्रवास… या प्रवासात एक ज्येष्ठ नागरिक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शेजारी बसतात भारावून जाऊन त्यांना सांगतात “दादा तुम्ही कामाचे लोक, आम्हाला बाकी कशाशी घेणे-देणे नाही. अजितदादा म्हणजे कामाचा माणूस, आम्ही जनरल पब्लिक तुमच्याबद्दल आदर…अशीच जनतेची कामे करा, बेस्ट लक दादा”… आज वंदे भारत ट्रेनमध्ये अशाच अनेकांच्या भावना होत्या.

आज शनिवारी (दि.15 जुलै) नाशिक येथे आयोजित ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार वंदे भारत ट्रेनने सकाळी नाशिककडे रवाना झाले. नेहमी प्रमाणे वृत्तपत्रे वाचत अजित पवार यांचा प्रवास सुरु झाला. मात्र या प्रवासात सहप्रवासी असलेले एक ज्येष्ठ नागरिक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शेजारी येऊन बसले. “दादा तुम्ही कामाचे लोक, आम्हाला बाकी कशाशी घेणे-देणे नाही. अजितदादा म्हणजे कामाचा माणूस, आम्ही जनरल पब्लिक तुमच्याबद्दल आदर…अशीच जनतेची कामे करा, बेस्ट लक दादा”… अशा शब्दात त्यांनी जणू राज्यातल्या जानेतेचीच प्रतिनिधीक भावना व्यक्त केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा जे शक्य आहे, लोक हिताचे आहे ते करत राहणार, काही सूचना असतील तर करा असे सांगत आपल्या सोबत असणाऱ्या विशेष कार्य अधिकाऱ्यांना त्यांची नोंद घेण्यास सांगितले. प्रवासात इतर प्रवाशांना त्रास होऊ नये, कोणाला अडवू नका अशा सूचना आपल्या सुरक्षा राक्षकांना केल्या. अशा प्रकारे वंदे भारत ट्रेनने अजितदादांची क्रेझ अनुभवली.

जिल्ह्यातील ४९ आधार केंद्र सुरू करण्यास परवानगी

पुणे: भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन न केल्याने प्रमाणपत्र तात्पुरते गोठविण्यात आलेल्या ९६ आधार केंद्र चालकांपैकी ४९ आधार केंद्रचालकांना पूर्ववत केंद्र सुरु करण्यास परवानगी देण्यात आली असून ही सर्व केंद्र सद्यस्थितीत कार्यरत आहेत.

जिल्ह्यातील ९६ आधार केंद्रचालकांना ऑनलाईन प्रशिक्षण देऊन त्यांची परीक्षा घेण्यात आली. त्यात ८२ केंद्रचालक उत्तीर्ण झाले आहेत. त्यातील ४९ केंद्र चालकांनी केंद्र सुरू केले आहे, १० ऑपरेटरांना एका वर्षाकरीता भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडून बंधन घालण्यात आलेले आहे. उर्वरीत एकूण ३७ पैकी १८ ऑपरेटर हे भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडून एएमएस पोर्टलवरती अगोदरच नोंदवलेले असल्यामुळे, पूर्ववत करण्यात तांत्रिक मान्यता घेण्यात येत आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण कार्यालयाच्या अधिकाऱ्यांकडून येत्या काही दिवसात हे ऑपरेटर व उर्वरीत सर्व आधार ऑपरेटर कार्यरत होणार असल्याबाबत सांगण्यात आले आहे, असे आधार समन्वयक तथा उपजिल्हाधिकारी अमिता तळेकर धुमाळ यांनी कळविले आहे.
000

शिवछत्रपती राज्य ११७ क्रीडा पुरस्कार जाहीर..पहा नावे ..  

मुंब : सन 2019-20,2020-21 व 2021-22 असे तीन वर्षांचे एकूण ११७ क्रीडा पुरस्कार क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी आज सेवासदन या शासकीय निवासस्थानी पत्रकार परिषदेत जाहीर केले.

शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार सन २०१९-२० श्रीकांत शरदचंद्र वाड (ठाणे), सन २०२०-२१  दिलीप बळवंत वेंगसरकर आणि सन २०२१-२२ आदिल जहांगिर सुमारीवाला, (मुंबई) यांना जाहीर करण्यात आला आहे.

मंत्री श्री. महाजन म्हणाले की, राज्यात क्रीडा संस्कृतीचा वारसा जपला जाऊन त्याचे संवर्धन व्हावे, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या क्रीडा महर्षी, मार्गदर्शक, खेळाडूंच्या कार्याचा  गौरव करण्यासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्यात येतात.

विविध पुरस्कार पुढीप्रमाणे

            पुरस्काराचे नावपुरस्कार संख्या
शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार2
उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार मार्गदर्शक13
जिजामाता पुरस्कार ( क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार )1
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू )81
शिवछत्रपती राज्य क्रीडा साहसी पुरस्कार5
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार ( दिव्यांग खेळाडू)14
एकूण116

परिशिष्ट ब

उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक/जिजामाता पुरस्कार सन201920

उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शकजिजामाता पुरस्कार
खेळनावखेळनाव
1जिम्नॅस्टीक्सडॉ.आदित्य श्यामसुंदर जोशी, औरंगाबाद1सॉफ्टबॉलश्रीमती दर्शना वासुदेवराव पंडित, नागपूर
2खो-खोश्री.शिरीन नरसिंह गोडबोले, पुणे 
3दिव्यांग खेळांचे क्रीडा मार्गदर्शकश्री.संजय रामराव भोसकर, नागपूर 
थेट पुरस्कार-कबड्डीश्री.प्रशांत परशुराम चव्हाण, ठाणे 
थेट पुरस्कार-कबड्डीश्री.प्रताप विठ्ठल शेट्टी, ठाणे 
थेट पुरस्कार-कबड्डीश्री.अमरसिंह निंबाळकर, पुणे 

उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक/जिजामाता पुरस्कार सन 202021

उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक
खेळनाव
1जिम्नॅस्टीक्सश्री.संजोग शिवराम ढोले, पुणे
2स्केटिंगश्री.राहुल रमेश राणे, पुणे
3सॉफ्टबॉलडॉ.अभिजित इंगोले, अमरावती
4दिव्यांग खेळांचे क्रीडा मार्गदर्शकश्री.विनय मुकुंद साबळे, औरंगाबाद

उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक/जिजामाता पुरस्कार सन 202122

उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक
खेळनाव
1जिम्नॅस्टीक्सश्री.सिद्धार्थ महेंद्र कदम, औरंगाबाद
2धनुर्विद्याश्री.चंद्रकांत बाबुराव इलग, बुलढाणा
3सॉफ्टबॉलश्री.किशोर प्रल्हाद चौधरी, जळगाव

परिशिष्ट क

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार खेळाडू सन201920

.क्र.खेळाचे नावपुरूषमहिला
1आर्चरीश्रीमती स्नेहल विष्णू मांढरे, सातारा
2ॲथलेटिक्सश्री. पारस सुनील पाटील, पुणेश्रीमती अंकिता सुनील गोसावी, पुणे
3आट्यापाट्याश्री विजय लक्ष्मण न्हावी, जळगावश्रीमती शीतल मेघराज शिंदे, उस्मानाबाद
4बॅडमिंटनश्रीमती तन्वी उदय लाड, मुंबई उपनगर(थेट पुरस्कार )
5बॉक्सिंगश्री.सौरभ सुरेश लेणेकर, मुंबई उपनगर
6सायकलिंगश्रीमती प्रणिता प्रफुल्ल सोमण, अहमदनगर
7तलवारबाजीश्री.जय सुरेश शर्मा, नाशिक
8कबड्डीश्रीमती सायली उदय जाधव, मुंबई उपनगर
9कयाकिंग-कनॉईंगश्री सागर दत्तात्रय नागरे, नाशिक
10खोखोश्री. प्रतिक किरण वाईकर, पुणेश्रीमती आरती अनंत कांबळे, रत्नागिरी
11मल्लखांबश्री.दीपक वामन शिंदे, मुंबई उपनगर( थेट पुरस्कार )श्रीमती प्रतीक्षा लक्ष्मण मोरे, कोल्हापूर( थेट पुरस्कार )
12पॉवरलिप्टींगश्रीमती नाजूका तातू घारे, ठाणे
13शूटींगश्रीमती भक्ती भास्कर खामकर, ठाणे
14स्केटिंगश्री.अरहंत राजेंद्र जोशी, पुणेश्रीमती श्रुतिका जयकांत सरोदे, पुणे
15सॉप्टबॉलश्री अभिजित किसनराव फिरके , अमरावतीश्रीमती हर्षदा रमेश कासार, पुणे
16स्पोर्टस क्लायबिंगश्रीमती सिध्दी शेखर मणेरीकर, मुंबई उपनगर
17जलतरणश्री.मिहीर राजेंद्र आंब्रे, पुणेश्रीमती साध्वी गोपाळ धुरी, पुणे
18डायव्हींग/वॉटरपोलोश्रीमती मेधाली संदीप  रेडकर, मुंबई उपनगर
19वेटलिप्टींगश्रीमती अश्विनी राजेंद्र मळगे, कोल्हापूर
20कुस्तीश्री.सोनबा तानाजी गोंगाणे, पुणेश्रीमती सोनाली महादेव तोडकर, बीड

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार खेळाडू सन202021

.क्र.खेळाचे नावपुरूषमहिला
1आटयापाटयाश्री विशाल निवृत्ती फिरके, जळगावश्रीमती शीतल बापूराव ओव्हाळ, उस्मानाबाद
2शूटिंगश्रीमती यशिका विश्वजित शिंदे, मुंबई शहर
.क्र.खेळाचे नावपुरूषमहिला
3सॉप्टबॉलश्रीमती स्वप्नाली चंद्रकांत वायदंडे, कोल्हापूर
4बेसबॉलश्रीमती रेश्मा शिवाजी पुणेकर, पुणे
5वुशूश्रीमती मिताली मिलिंद वाणी, पुणे
6सायकलिंगश्री सूर्या रमेश थटू, पुणेश्रीमती प्रियांका शिवाजी कारंडे, सांगली
7अश्वारोहणश्री अजय अनंत सावंत, पुणे(थेट पुरस्कार )
8कबड्डीश्री.निलेश तानाजी साळुंके, ठाणेश्रीमती मीनल उदय जाधव,मुंबई उपनगर
9खोखोश्री अक्षय संदीप भांगरे, मुंबई उपनगरश्रीमती प्रियंका पंढरी भोपी, ठाणे
10स्केटिंगश्री अथर्व अतुल कुलकर्णी, पुणेश्रीमती आदिती संजय धांडे, नागपूर
11टेबल टेनिसश्री.सिध्देश मुकुंद पांडे, ठाणे
12पॉवरलिप्टींगश्रीमती श्रेया सुनील बोर्डवेकर, मुंबई शहर
13कॅरमश्री अनिल दिलीप मुंढे, पुणे
14जलतरणश्रीमती ऋतुजा भीमाशंकर तळेगावकर, नागपूर
15कुस्तीश्री सूरज राजकुमार कोकाटे, पुणेश्रीमती कोमल भगवान गोळे,पुणे

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार खेळाडू सन202122

.क्र.खेळाचे नावपुरूषमहिला
1आर्चरीश्री मयूर सुधीर रोकडे, सांगलीश्रीमती मोनाली चंद्रहर्ष जाधव, बुलढाणा
2ॲथलेटिक्सश्री सर्वेश अनिल कुशारे, नाशिक
3आटयापाटयाश्री अजित मनोहर बुरे, वाशिमश्रीमती वैष्णवी भाऊराव तुमसरे, भंडारा
4बॅडमिंटनश्रीमती मालविका प्रबोध बनसोड, नागपूर
5बॉक्सिंगश्री.हरिवंश रवींद्र टावरी, अकोला
6बेसबॉलश्री अक्षय मधुकर आव्हाड, अहमदनगरश्रीमती मंजुषा अशोक पगार, नाशिक
7शरिरसौष्ठवश्री राजेश सुरेश इरले, पुणे
8कनोईंग व कयाकिंगश्री देवेंद्र शशिकांत सुर्वे, पुणे
.क्र.खेळाचे नावपुरूषमहिला
9बुध्दीबळश्री संकल्प संदीप गुप्ता, नागपूरथेट पुरस्कार
10सायकलिंगश्रीमती मयुरी धनराज लुटे, भंडारा
11तलवारबाजीश्री अभय कृष्णा शिंदे, औरंगाबादश्रीमती वैदेही संजय लोहिया, औरंगाबाद
12लॉन टेनिसकु.अर्जुन जयंत कढे, पुणे
13जिम्नॅस्टिक -एरोबिकश्री. ऋग्वेद मकरंद जोशी, औरंगाबाद
14खोखोश्री अक्षय प्रशांत गणपुले, पुणेश्रीमती अपेक्षा अनिल सुतार, रत्नागिरी
15पॉवरलिफ्टींगश्री साहील मंगेश उतेकर, ठाणेश्रीमती सोनल सुनील सावंत, कोल्हापूर
16रोईंगश्री निलेश धनंजय धोंडगे, नाशिक
17रग्बीश्री भरत फत्तू चव्हाण, मुंबई शहर
18शूटिंगश्रीमती अभिज्ञा अशोक पाटील, कोल्हापूर
19स्केटिंगश्री यश विनय चिनावले, पुणेश्रीमती कस्तुरी दिनेश ताम्हणकर, नागपूर
20सॉफ्टबॉलश्री.सुमेध प्रदीप तळवेलकर, जळगाव
21स्पोर्टस क्लायबिंगश्री ऋतिक सावळाराम मारणे, पुणे
22जलतरणश्रीमती ज्योती बाजीराव पाटील, मुंबई शहर
23वेटलिफ्टींगश्री संकेत महादेव सलगर, सांगली
24कुस्तीश्री.हर्षवर्धन मुकेश सदगीर, पुणेकुमारी स्वाती संजय शिंदे, कोल्हापूर

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) २०१९-२०

पुरुषमहिला
अ.क्र.खेळनावअ.क्र.खेळनाव
अ‍ॅथलेटिक्सश्री.योगेश्वर रवींद्र घाटबांधेअ‍ॅथलेटिक्सश्रीमती भाग्यश्री रमेश माझिरे
इतर खेळ प्रकार-व्हीलचेअर बास्केटबॉलश्री.मीन बहादूर थापाइतर खेळ प्रकार – बॅडमिंटनश्रीमती आरती जानोबा पाटील
   3थेट पुरस्कार – बुद्धीबळश्रीमती मृणाली प्रकाश पांडे

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) २०२०-२१

पुरुषमहिला
अ.क्र.खेळनावअ.क्र.खेळनाव
जलतरणश्री.दीपक मोहन पाटीलजलतरणश्रीमती वैष्णवी विनोद जगताप
इतर खेळ प्रकार – व्हील चेअर बास्केटबॉलश्री.सुरेश कुमार कार्कीइतर खेळ प्रकार – पॅरा आर्चरीश्रीमती मिताली श्रीकांत गायकवाड

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) २०२१-२२

पुरुषमहिला
अ.क्र.खेळनावअ.क्र.खेळनाव
अ‍ॅथलेटिक्सश्री.प्रणव प्रशांत देसाईअ‍ॅथलेटिक्सश्रीमती आकुताई सीताराम उलभगत
इतर खेळ प्रकार व्हील चेअर बास्केटबॉलश्री.अनिल कुमार काचीइतर खेळ प्रकार – व्हील चेअर तलवारबाजीश्रीमती अनुराधा पंढरी सोळंकी
   3थेट पुरस्कार-अ‍ॅथलेटिक्सश्रीमती भाग्यश्री माधवराव जाधव

परिशिष्ट ड

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार(साहसीसन 201920

अ.क्र.साहस प्रकारनाव
1जलश्री.सागर किशोर कांबळे
2जमीनश्री.कौस्तुभ भालचंद्र राडकर

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार(साहसी)सन 202021

अ.क्र.साहस प्रकारनाव
1जमीनश्री.कृष्ण प्रकाश
2थेट पुरस्कारश्री.केवल हिरेन कक्का – तेनझिंग नॉर्गे पुरस्कार

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार(साहसीसन 202122

अ.क्र.साहस प्रकारनाव
1जमीनश्री.जितेंद्र रामदास गवारे

गायीच्या दुधाला प्रतिलिटर ३४ रुपयांचा किमान दर – दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

मुंबई : राज्यात दुधाला किमान भाव मिळावा, दुधाच्या खरेदी दरात कपात होऊन दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये या उद्देशाने गायीच्या दुधाला प्रतिलिटर किमान ३४ रूपये भाव देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतल्याची माहिती दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली.

राज्यातील दूध दर प्रश्नाबाबत विविध दूध उत्पादक शेतकरी संघटना व पशुखाद्य उत्पादक प्रतिनिधींसोबत पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री श्री. विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच महत्त्वाची बैठक झाली.

सहकारी आणि खासगी दूध संघांचा परिचालन खर्च, तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च विचारात घेऊन, शेतकऱ्यांच्या दुधाला रास्त भाव मिळावा, या अनुषंगाने दूध दर निश्चितीसाठी शासन निर्णयान्वये समिती गठित करण्यात आली होती. सहकारी व खासगी दुग्ध क्षेत्रातील प्रमुख प्रतिनिधींचा सदस्य म्हणून समावेश असलेल्या या समितीने शासनास केलेल्या शिफारशीनुसार राज्यात गायीच्या दुधासाठी (३.५/८.५) गुणप्रतिकरिता किमान खरेदी दरास मान्यता देतानाच दर विनाकपात दूध उत्पादक शेतकऱ्यांना अदा करणे अभिप्रेत राहिल, असा निर्णय शासनाने घेतल्याचे मंत्री श्री. विखे-पाटील यांनी सांगितले.
दुधाला रास्त भाव मिळावा यासोबतच देशातील स्थानिक व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा आढावा घेऊन समितीने दर ३ महिन्यांनी किमान दूध खरेदी दर निश्चितीबाबत शासनास शिफारस करावी. विशिष्ट अपवादात्मक परिस्थिती निर्माण झाल्यास, शासनाकडून प्राप्त निर्देशानुसार ३ महिन्याच्या आतही समितीने दूध दराबाबत शासनास शिफारस करावी, किमान दूध दराची अंमलबजावणीबाबत जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी यांनी दुग्धव्यवसाय विकास आयुक्त यांच्यामार्फत शासनास दरमहा अहवाल सादर करावा असे निर्देश समितीला देण्यात आल्याची माहिती मंत्री श्री. विखे-पाटील यांनी दिली आहे.

दोन कामगारांच्या मृत्यू प्रकरणी केबल चालक मालकावर गुन्हा दाखल

विजेच्या हाय टेन्शनच्या तारांना केबलचा स्पर्श अन दोघांना बसला शॉक

पुणे-केबल कामगारांच्या सुरक्षिततेत हलगर्जीपणा बाळगल्याप्रकरणी पुण्यातील एन पी केबल नेटवर्क मालकाविरूद्ध कोथरुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केबल टाकण्यापुर्वी खबरदारी न घेतल्यामुळे विजेच्या हाय टेन्शनला स्पर्श झाल्यामुळे दोघा कर्मचार्‍यांचा मृत्यू झाल्याची घटना चार मे रोजी कोथरुडमधील सुतारदरा परिसरात घडलेली होती.

याप्रकरणी कागदपत्रांच्या तपासणीसह इतर अहवालानंतर दोषी आढळल्याप्रकरणी एन पी केबल नेटवर्क मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुंडलिक लक्ष्मण शिंदे आणि स्वप्निल शिवराम बोडके ( दोघेही रा. कोथरुड,पुणे ) अशी मृत्यू झालेल्या कामगारांची नावे आहेत. याप्रकरणी लक्ष्मण शिंदे (रा. कोथरुड,पुणे )यांनी कोथरुड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केलेली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एन पी केबल विनापरवाना व्यवसाय करीत असून त्यांच्याकडे कुंडलिक आणि स्वप्निल कामाला होते. मात्र, संबंधित मालकाने त्यांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही उपाययोजना केली नव्हती. तशाही परिस्थितीत तो कामगारांकडून कामे करवून घेत होता. चार मे रोजी दुपारी बाराच्या सुमारास कोथरूडमधील सुतारदार परिसरात कुंडलिक आणि स्वप्निल केबल टाकण्याचे काम करीत होते. त्यावेळी त्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून कोणतीही साधणे पुरविण्यात आली नव्हती.परिसरातील हाय टेन्शनच्या तारांना केबलचा स्पर्श झाल्यामुळे दोघेही गंभीररित्या जखमी झाले. उपचारादरम्यान, त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दरम्यान, तपासाअंती एन पी केबल नेटवर्क मालकाने कामगारांसाठी सुरक्षितता न बाळगता खबरदारी घेतली नाही. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी संबंधिताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक किसन राठोड पुढील तपास करीत आहेत.

रिक्षासह टॅक्सी परवानाधारकाची गैरवर्तणुकीची तक्रार मुंबईत व्हॉटसॲपद्वारे नोंदवू शकणार

मुंबई: ऑटोरिक्षा व टॅक्सी परवानाधारकांनी गैरवर्तन करणे, भाडे नाकारणे, विहित दरापेक्षा जादा भाडे घेणे या विरुद्ध तक्रार  करायची असल्यास प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पश्चिम) यांनी व्हॉट्सअप क्रमांक ९९२०२४०२०२ व ई-मेल mh02.autotaxi complaint@gmail.com जारी केला आहे. प्रवाशांनी या क्रमांकावर व्हॉट्सअपच्या माध्यमातून वाहन क्रमांक, ठिकाण आणि गुन्ह्याचे स्वरूप अशा स्वरूपात तक्रार दाखल करावी, जेणेकरुन संबंधित दोषी वाहनधारकांवर मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार करवाई करता येईल.

याबाबत महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाने ऑटोरिक्षा व टॅक्सी परवानाधारकांच्या गैरवर्तनाबाबत तक्रार करण्यासाठी सु-मोटो याचिका दाखल केली आहे. या याचिकेच्या २३ जून २०२३ रोजी सुनावणी दरम्यान आयोगाने ऑटोरिक्षा व टॅक्सी परवानाधारकांच्या गैरवर्तन, भाडे नाकारणे, विहित दरापेक्षा जादा भाडे घेणे याकरीता परिवहन विभागामार्फत प्रवाशांच्या तक्रारीकरीता व्हॉट्सअप  क्रमांकाचे स्टिकर प्रवाशांना दिसेल, अशा पद्धतीने प्रदर्शित करण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्यानुसार प्रादेशिक परिवहन कार्यालय मुंबई यांनी व्हॉट्सअप क्रमांक जारी केला आहे. प्रवाशांनी प्रवासादरम्यान होणाऱ्या गैरसोयीबाबत या क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी, मुंबई (पश्चिम) यांनी केले आहे.

महापालिकेतर्फे बेवारस वाहने जप्त करण्याची मोहीम सुरू

पुणे- शहरात रस्त्याच्या कडेला, पादचारी मार्गावर महिनोंमहिने चारचाकी, दुचाकी, तीनचाकी वाहने उभे करून वाहतुकीस अडथळा निर्माण केला आहे. अशा वाहनांवर महापालिकेने जप्तीची कारवाईची मोहीम सुरू केली आहे. अशाप्रकारे आत्तापर्यंत २२ वाहने जप्त केली आहेत. नागरिकांनी त्यांची वाहने काढून घ्यावेत असे आवाहन महापालिकेने केले आहे.शहरात वाहनांची संख्या वाढत असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. त्यातच पार्किंगची समस्याही निर्माण झाली आहे. शहरातील अनेक नागरिक त्यांची बंद पडलेली वाहने रस्ता, पादचारी मार्गावर लावतात.त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतोच, पण कचरा टाकून अस्वच्छतेमुळे दुर्गंधी निर्माण होत असल्याचे चित्र शहरात आहे. त्यापार्श्‍वभूमीवर अतिक्रमण निर्मूलन विभागाने ही मोहीम हाती घेतली आहे.महापालिकेने जप्त केलेली वाहने एका महिन्याच्या आत शुल्क भरून सोडवून घेता येतील. यामध्ये प्रवासी बस, ट्रकसाठी २५ हजार रुपये, हलकी वाहने (१० टना पर्यंत) २० हजार रुपये, कार, जीपसाठी १५ हजार, रिक्षा, टेम्पोसाठी १० हजार तर दुचाकीसाठी ५ हजार रुपये शुल्‍क आहे. त्यामुळे नागरिकांनी रस्त्याचा लावलेले त्यांची बंद स्थितीतील वाहने नोटीस लावल्यानंतर सात दिवसाच्या आत तेथून काढून घ्यावेत असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

मराठी अभिनेता रवींद्र महाजनी यांचे निधन; बंद फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह, मृत्यू 2-3 दिवसांपूर्वी झाल्याचा अंदाज

पुणे-मराठी सिनेसृष्टीवर आघात करणारी बातमी नुकतीच समोर आली आहे. प्रसिद्ध मराठी अभिनेते रवींद्र हनुमंत महाजनी यांच निधन झालं आहे. 80 चा काळ गाजवणारा लोकप्रिय अभिनेता म्हणजे रविंद्र महाजनी त्याकाळी मराठीतील हँडसम हंक म्हणून रविंद्र महाजनी यांच्याकडे पाहिलं जायचं. आज ते आपल्यात नाहीत, त्यांचा मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप समोर आलेलं नाही.मावळच्या तळेगाव दाभाडे येथील घरात शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास त्यांचा मृतदेह आढळून आला. रवींद्र यांचं वय 77 वर्ष होतं. त्यांचा मृत्यू साधारण: तीन दिवसांपूर्वी झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.त्यांच्या मृतदेह अशा अवस्थेत आढळल्याने सर्वानाच धक्का बसला आहे. लोकप्रिय अभिनेत्याचा असा शेवट झाला आहे.गश्मिर महाजनी हा त्यांचा एकुलता एक मुलगा आहे. तो देखील चित्रपट क्षेत्रात आघाडीचा अभिनेता आहे.

तळेगाव MIDC पो स्टे हद्दीत एक्सरबीया सोसायटी, MIDC रोड, आंबी येथे मराठी सिने अभिनेता रवींद्र हनुमंत महाजनी (वय 77 वर्षे) बंद फ्लॅटमध्ये मृत अवस्थेत आढळून आले आहेत. ते गेले 7- 8 महिन्यापासून वरील ठिकाणी एकटेच राहण्यास होते. त्यांच्या मृत्यूची माहिती त्यांचा मुलगा गश्मिर यांना कळविण्यात आली असून ते तळेगाव येथे आल्यानंतर मृतदेहाचे पोस्ट मोर्टेम करून घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

या एव्हरग्रीन अभिनेत्याच्या करिअरची सुरुवात टॅक्सी चालवण्यापासून झाली होती. अभिनेता रविंद्र महाजनी हे एका मध्यमवर्गीय कुटुंबातील होते. अभिनय क्षेत्रात पाय ठेवण्यापूर्वी ते टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम करत. त्यांनी साधारणपणे 3 वर्षे मुंबईत टॅक्सी चालवली. मात्र, त्यांच्यातील एक कलाकार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. ते दिवसा वेगवगेळ्या ठिकाणी जाऊन निर्मात्यांच्या भेटी घेत आणि रात्री टॅक्सी चालवत. रविंद्र महाजनी यांनी मराठीसह हिंदी आणि गुजराती सिनेमांमध्येही काम केले. रविंद्र महाजनी यांनी व्ही. शांताराम यांच्या झुंज या सिनेमातून कलाविश्वात पदार्पण केले होते. यानंतर त्यांनी ‘लक्ष्मी’, ‘दुनिया करी सलाम’, ‘गोंधळात गोंधळ’, ‘मुंबईचा फौजदार’ यांसारखे प्रसिद्ध चित्रपट दिले. एवढेच नाही, तर ते बॉलिवूडमध्येही झळकले. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘पानिपत’ चित्रपटातही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.

रवींद्र महाजनी यांच्या अपार्टमेंटमध्ये स्वच्छतेचे काम करणाऱ्या आदिका वारंगे नामक महिलेने त्यांच्याशी झालेल्या अखेरच्या संवादाची माहिती दिली आहे. या महिलेने सांगितले की, मी या इमारतीत दररोज कचरा घेण्यासाठी येत होते. मंगळवारी मी रवींद्र महाजनी यांना अखेरचे पाहिले. त्यानंतर बुधवारी माझी साप्ताहिक सुट्टी होती. गुरुवारी ते झोपले असावेत या विचाराने मी त्यांचे दार ठोठावले नाही. त्यानंतर ते दिसले नाही. कचरा देताना ते थोडेफार बोलायचे. तेवढाच आमच्यात संवाद व्हायचा. शुक्रवारी कचऱ्यासाठी गेले असता त्यांच्या फ्लॅटमधून दुर्गंध येत असल्याचे जाणवले. मी त्याची माहिती माझ्या वरिष्ठांना दिली.

मी दरवाजा ठोठावल्यानंतर त्यांचा आवाज यायचा. पण काल आतून त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही, असेही आदिती वारंगे यांनी यावेळी सांगितले. दुसरीकडे, पोलिसांनी महाजनी यांच्या मृतदेहाची स्थिती पाहून त्यांचा मृत्यू दोन-तीन दिवसांपूर्वी झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. गश्मीरच्या मातोश्री आजारी असल्यामुळे त्यांच्यापासून ही बातमी लपवून ठेवण्यात आल्याचीही माहिती आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वाहिली श्रद्धांजली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रवींद्र महाजनी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. आपल्या सर्वांगसुंदर अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचे दुर्दैवी निधन झाले. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती प्रदान करो. तसेच महाजनी परिवारास या दुःखातून सावरण्यासाठी बळ देवो हीच प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली, असे ते म्हणाले.

मराठी चित्रपट सृष्टीची मोठी हानी – शरद पवार

आपल्या संपन्न अभिनय कलेतून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रविंद्र महाजनी यांचे निधन झाल्याची बातमी अतिशय वेदनादायी आहे. आपल्या भावस्पर्शी अभिनयाने रविंद्र महाजनी यांनी एक काळ गाजवला होता. त्यांच्या अकाली जाण्याने मराठी चित्रपट सृष्टीची मोठी हानी झालेली आहे. महाजनी कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. रविंद्र महाजनी यांना भावपूर्ण श्रद्धांजली, असे शरद पवार म्हणाले.