Home Blog Page 1444

राज्यात कॅसिनो सुरु करून तरुणांना बरबाद करण्याचा भाजपा सरकारचा डाव.

मुंबई, दि. १७ जुलै २०२३
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षांनी भाजपाप्रणित शिंदे सरकारला घेरले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर स्थगन प्रस्ताव आणला होता पण सरकारने शेतकऱी प्रश्नांवर बोलू दिले नाही. बोगस बियाणामुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे पण सरकार फक्त कडक कायदा करु म्हणत वेळ मारुन नेत आहे. राज्यातील भाजपाप्रणित तिघाडी सरकार शेतकरी विरोधी असून शेतकऱ्याच्या टाळूवरचे लोणी खाणारे सरकार आहे, असा घणाघात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. विधिमंडळ परिसरात प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्य सरकार विरोधकांना बोलू दिले नाही, आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शेतकऱ्यांचे नुकसान झाले नाही असे सांगत आहेत. बोगस बियाणामुळे कापसाचे पीकच आले नाही, पिक वाया गेले व वर्षही वाया गेले. मागील वर्षाचा कापूस अजूनही शेतकऱ्याच्या घरात पडून आहे पण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार गंभीर नाही. राज्यातील तिघाडी सरकार शेतकरी विरोधी आहे, शेतकरी व जनतेला लुटण्याचे काम सुरु आहे. शेतकऱ्यांना मदत देण्याची घोषणा सरकारने केली पण अजून मदत मिळालेली नाही. जनतेच्या प्रश्नावर सरकारने उत्तर दिले पाहिजे पण बहुमताच्या जोरावर राज्य सरकार उत्तर देण्यापासून पळ काढत आहे. जनतेने काँग्रेसवर विरोधी पक्षाची जबाबदारी सोपवली असून काँग्रेस पक्ष विरोध पक्षाची जबाबदीर योग्यरितीने पार पाडत सरकारला जाब विचारत राहिल, सभागृहात बोलू दिले नाही तर रस्त्यावर संघर्ष करु.

राज्यात कॅसिनो सुरु करण्यास काँग्रेसचा विरोध.

महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक लावण्याचे पाप भाजपा सरकारने केले आहे. तरुणांच्या हाताला काम नाही, बरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली असताना राज्य सरकार गोव्याच्या धर्तीवर कॅसिनो सुरु करण्याचे पाप करत आहे. आधीच किराणा दुकानात बियर विकण्यास परवानगी दिलेली आहे, मुंबईसह राज्यात डान्स बारचा सुळसुळाट आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकार कॅसिनो सुरु करून तरुण पिढीला बरबाद करण्याचे पाप करत आहे. काँग्रेस पक्षाचा राज्यात कॅसिनो सुरु करण्यास विरोध राहील.
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सकाळी विरोधी पक्षाने आक्रमक भूमिका घेतली. सभागृहाच्या पायऱ्यावर बसून काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सरकारच्या आमदारांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

शेतकरी संकटात; सरकार मात्र सत्तेत मदमस्त

  • काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते बाळासाहेब थोरात यांचा सरकारवर गंभीर आरोप
  • अपुऱ्या पावसामुळे पेरण्या खोळंबल्या; सभागृहात चर्चा करण्याची विरोधी पक्षांची मागणी

मुंबई : ​जुलैचा तिसरा आठवडा उलटूनही राज्यात अनेक भागांमध्ये पाऊस नसल्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत. दुबार तिबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांसमोर निर्माण झाले आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही संकटाची घडी आहे त्यामुळे विधानसभेतील कामकाज थांबवून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तातडीने चर्चा करण्याची मागणी स्थगन प्रस्तावाद्वारे काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत केली.

विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बाळासाहेब थोरात यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारला धारेवर धरले.

थोरात म्हणाले, राज्यात वादळामुळे यावर्षी उशिराने मान्सुनला सुरुवात झालेली आहे. आतापर्यंत राज्यातल्या अनेक भागांमध्ये पन्नास टक्क्यांहून कमी पाऊस पडला आहे. परिस्थिती अत्यंत गंभीर असून, शेतकरी अक्षरशः हवालदिल झाला आहे. याबाबत सरकारने ज्या पद्धतीने शेतकऱ्याला धीर देण्यासाठी दक्ष राहून मदतीच्या उपाययोजना करायला हव्या त्या केल्या जात नाही.

​आपल्या राज्यात खरिपाचे सरासरी क्षेत्र १ कोटी ४२ लाख आहे पण त्यातून केवळ ६८ लाख हेक्टर क्षेत्रापर्यत म्हणजे ५० टक्क्यापर्यत पेरण्या झालेल्या आहेत. कोकण विभागात केवळ १६.३० टक्के तर पुणे विभागात केवळ ३० टक्के पेरणी झालेली असून राज्यातील अनेक भागात पाऊस नसल्याने पेरणीला वेग आलेलाच नाही, त्यामुळे शेतकरी अडचणीत आलेला आहे. राज्यात जुलैच्या पहिल्या आठवड्यात सर्व दूर पावसाने हजेरी लावली असलली तरी पावसाचा जोर कमी असल्याने पुरेशी ओल जमिनीत तयार झालेली नव्हती. पेरण्या उशिरा होतील या भीतीपोटी शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या परंतु त्यानंतर किरकोळ पाऊस झाला आणि प्रखर उष्णतेने रेापे कोमेजली आणि सोयाबीन, कपाशी व मक्याची पिके जळून दुबार पेरणीची वेळ आली. खानदेश, बुलडाणा व वाशिम, परभणी, हिंगोली औरंगाबाद तसेच नगर पुणे आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये ही परिस्थिती उद्भवलेली आहे. दुबार पेरणीसाठी पुन्हा बियाण्याचे संकट शेतकऱ्यासमोर उभे राहिले आहे. मात्र राज्यातील अनेक भागात पाऊस नसल्याने पेरण्यांना वेग येत नाही, त्यामुळे शेतकरी अडचणीत आला, असेही थोरात म्हणाले.

​कमी पर्जन्यमानाच्या तालुक्यांमध्ये तर सुरुवातीला पेरण्या झाल्या परंतु नंतर पाऊसच न पडल्यामुळे दुबार आणि तिबार पेरण्यांमुळे शेतकरी आज कोलमडून पडलेला दिसतो आहे. मागील वर्षी अतिवृष्टी व वळवाचा पाऊस आणि उन्हाळ्यात झालेल्या गारपिटीची नुकसान भरपाई जाहीर करुनही शासनाने दिलेली नाही. उदाहरण द्यायचे तर नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात वनकुटे गावांत स्वत: मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी पाहणी करुन अद्याप मदतीचे वाटप झालेले नाही. गरज पडली तर शेतकऱ्यांना, बियाणे खते मोफत उपलब्ध करुन देण्याची उपाययोजना आखणे गरजेचे आहे. मात्र त्यावर अजून साधी चर्चाही सत्ताधारी नेते, कृषी विभागाचे अधिकारी करत नाहीत, असेही थोरात म्हणाले.

बोगस बी बियाणे; सरकारच्या टोळ्या मात्र वसुली करत फिरताय
बी बियाणे आणि खतांची परिस्थिती राज्यात गंभीर झालेली आहे. बोगस बियाणे बाजारात मोठ्या प्रमाणावर आल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. त्यासंदर्भात कारवाया करून शेतकऱ्यांना धीर द्यायचे सोडून सरकारच्या काही टोळ्या जिल्ह्यांमध्ये वसुली करत फिरत आहे.

खातेवाटप आणि दिल्ली वारीतच सरकार व्यस्त
शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने बघायला सरकारला वेळ नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटप याच सरकार व्यस्त आहे. त्यात छोट्या छोट्या गोष्टींसाठी दिल्ली वाऱ्या कराव्या लागतात त्यामुळे शेतकऱ्याच्या दारात सरकार कधी जाणार? शेतकऱ्याचे संकट कधी समजून घेणार असा संतप्त सवाल ही आ. थोरात यांनी केला.

अजित पवारांनी सलग दुसऱ्या दिवशी घेतली शरद पवारांची भेट, सोबत होता 30 आमदारांचा ताफा

मुंबई-

राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर आमदारांनी सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात पक्षाध्यक्ष शरद पवार यांची येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये भेट घेतली. अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ आदी मंत्र्यांनी रविवारीच पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी अजित पवारांच्या गोटातील आमदारांनी पवारांची भेट घेतली.सर्व बंडखोर आमदार व मंत्री शरद पवार यांच्या भेटीला आल्यामुळे राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत. हे आमदार शरद पवार यांना गुंता सोडवण्याची विनंती करणार आहेत. त्यामुळे शरद पवार बॅकफूटवर जाणार का? राष्ट्रवादीत पुन्हा समेट होणार का? झाला तर तो कशा पद्धतीने असेल? शरद पवार भाजपसोबत जाणार का? की शरद पवार पक्षावरील दावाही सोडणार? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झालेत. विद्यमान घडामोडी पाहता या प्रश्नांची उत्तरे लवकरच मिळण्याची शक्यता आहे.

यासंबंधीच्या वृत्तानुसार, विधिमंडळाचे कामकाज संपल्यानंतर अजित पवार व त्यांचे आमदार यशवंतराव चव्हाण सेंटरवर पोहोचले. तेव्हा शरद पवार सिल्व्हर ओक या आपल्या निवासस्थानी होते. तेथून ते थेट वाय बी सेंटरमध्ये पोहोचले. तिथे त्यांनी अजित पवार व त्यांच्या समर्थकांशी संवाद साधला. जवळपास तासभर हा संवाद सुरू होता. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी एकमेकांना बजावलेले व्हीप तथा विरोधी पक्षांच्या बंगळुरूतील बैठकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीगाठी होत असल्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे.शरद पवार यांच्या गटाची आज वाय बी सेंटरवर बैठक होती. या बैठकीसाठी त्यांचे आमदार जमले होते. पण या बैठकीपूर्वीच अजित पवार व त्यांचे समर्थक आमदार वाय बी सेंटरवर पोहोचले. या घटनाक्रमाची शरद पवारांना कोणतीही माहिती नव्हती. त्यामुळे त्यांनी वाय बी सेंटरवर पोहोचताच जितेंद्र आव्हाडांकडे या ठिकाणी पत्रकार का पोहोचले? याची माहिती घेतली. या घडामोडीमुळे जयंत पाटील यांनी आपल्या आमदारांना प्रदेश कार्यालयात जाण्याचे निर्देश दिले.

वाय बी सेंटरवर शरद पवार यांची अजित पवार व प्रफुल्ल पटेल यांची बैठक झाली. त्यात बंडखोर गटाने शरद पवारांची सोबत येण्यासाठी समजूत काढली. या ठिकाणी जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड व रोहित पवारही उपस्थित होते. पण त्यांना या बैठकीपासून दूर ठेवण्यात आले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी आपल्या समर्थक 9 मंत्र्यांसह शरद पवार यांची बाय बी चव्हाण सेंटरला जावून भेट घेतली. त्यात या नेत्यांनी त्यांच्याकडे भाजपसोबत येण्याचा आग्रह धरला. पण पवारांनी त्यांच्या प्रस्तावावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. परिणामी, अजित पवार गटाच्या नेत्यांनी ही बैठक आटोपती घेतली. या भेटीवर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटत असताना सोमवारी पुन्हा अजित पवार आपल्या आमदारांसह शरद पवारांच्या भेटीला पोहोचले होते.

पुण्यात वाढतेय गुन्हेगारी ,कोयता गँगचा पुन्हा हैदोस…वाहनांची तोडफोड

पुणे : सहकारनगर पोलिसांनी कालच १६ जणांच्या टोळीला मोक्का लावून कारवाई केलेली असताना वाहन तोडफोडीचे सत्र कायम असून, कात्रज भागात वादातून एका सोसायटीच्या परिसरात लावण्यात आलेल्या सहा वाहनांची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी पाचजणांना अटक केली आहे.मधुकर उर्फ अप्पा ग्यानबा भिलारे (वय ४७), आकाश नानासाहेब गरवडे (वय २७), अमित उत्तम भिलारे (वय ३६), फिरोज हसन शेख (वय २४), मुस्तफा मेहबूब शेख (वय २१, सर्व रा. भिलारेवाडी, कात्रज) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत भिमाजी भिकाजी सावंत (वय ३३, रा. ओमसाई निवास, भिलारेवाडी, कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सावंत यांचा आरोपींशी वाद झाला होता. आरोपी भिलारे, गरवडे, शेख आणि साथीदार ओम साई निवास सोसायटीच्या परिसरात आले. त्यांनी शिवीगाळ केली. साेसायटीच्या आवारात लावण्यात आलेल्या दोन मोटारी, रिक्षा, दुचाकी, तसेच टँकरवर दगडफेक केली. कोयते आणि बेसबाॅल स्टीक उगारून दहशत माजविली. पोलीस उपनिरीक्षक ढमे तपास करत आहेत.

पंधरा दिवसांपूर्वी सहकारनगर भागातील तळजाई वसाहतीत वैमनस्यातून टोळक्याने २६ वाहनांची तोडफोड केली होती. वारजे भागात वाहन तोडफोडीची घटना घडली होती. या घटनेची गंभीर दखल घेऊन पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी सहकारनगर, तसेच वारजे पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले होते.मात्र पुण्याच्या या उपनगरांतील दारूचे धंदे ,अवैध अड्डे , बेकायदा बांधकामे ,दादागिरी दहशत वाद या सर्वांना हळूहळू ,किंवा कालांतराने बड्यांचा वरदहस्त मिळत आल्याचे दिसून आलेले आहे.याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही .पोलिसांकडून उचलली जाणारी कारवाई ची पावले खंबीर असल्याचे दिसत असताना दुसरीकडे भारती विद्यापीठ पोलिसांनी लहान मुले गुन्हेगारीकडे वळू नयेत , योग्य मार्गावर जीवनक्रम त्यांचा असावा म्हणून समाजोपयोगी उपक्रम देखील हातही घेतले आहे तरीही गुन्हेगारी वाढत असल्याने चिंता व्यक्त होते आहे.

अर्ध्या तासात विधानसभा दिवसभरासाठी तहकूब..

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सरकारला पाठिंबा देत मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिलेच अधिवेशन आजपासून सुरू झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांनी कामाला सुरूवात केली असून या अधिवेशनात त्यांच्यावर विरोधक हल्ला करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या उभ्या फूटीनंतर महाविकास आघाडीची बाजू कमकुवत झाली आहे,पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. यावर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. त्यावर सत्ताधाऱ्यांकडून अपेक्षित उत्तर न मिळाल्याने विरोधकांनी विधानसभेतून सभात्याग केला. त्यानंतर विधानसभा स्थगित करण्यात आली. दरम्यान, विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील आमदार आणि मंत्री सत्ताधारी बाकावर बसल्याचं पाहायला मिळालं.संजय शिरसाट, समीर कुनावर, यशवंत माने, अमित जनक यांची विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात तालिका अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

१. मंत्र्यांचा परिचय

एकनाथ शिंदेंनी अजित पवारांचा परिचय करून देताना “उपमुख्यमंत्री व वित्त” असा उल्लेख केला आणि ते थांबले. त्यांनी पलीकडच्या बाकावर बसलेल्या अजित पवारांकडे पाहिलं. हे पाहून बाजूलाच बसलेल्या देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना “नाव सांगा”, असं म्हटल्यानंतर एकनाथ शिंदेंनी अजित पवारांचं नाव घेतलं.

“त्यांची-आमची जुनी ओळख!”
यानंतर अजित पवारांनी उभं राहात सगळ्यांना नमस्कार करून अभिवादन केलं. अजित पवार बसत असतानाच समोर विरोधी बाकांवर बसलेले राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी मिश्किल शब्दांत टोला लगावला. “त्यांची-आमची जुनी ओळख आहे”, असं जयंत पाटील म्हणताच सभागृहात हास्याची लकेर उमटली. तशीच ती अजित पवारांच्या चेहऱ्यावरही दिसून आली.अजित पवार गटातील इतर मंत्र्यांचाही परिचय सभागृहाला करून दिला. यामध्ये छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मरावबाबा अत्राम, संजय बनसोडे, आदिती तटकरे, अनिल पाटील या नव्या मंत्र्यांची नावं मुख्यमंत्र्यांनी घेतली

२. अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवणे :-

मुख्यमंत्री :- २०२३ चा अध्यादेश क्रमांक ३ प्रादेशिक नियोजन व अध्यादेश, २०२३ – महाराष्ट्र नगररचना (सुधारणा)

सहकार मंत्री :- (क) सन २०२३ चा अध्यादेश क्रमांक २ सहकारी संस्था (सुधारणा) अध्यादेश, २०२३ महाराष्ट्र

(ख) सन २०२३ चा अध्यादेश क्रमांक ५ – महाराष्ट्र सहकारी संस्था (दुसरी सुधारणा) अध्यादेश, २०२३

ग्रामविकास मंत्री : (क) सन २०२३ चा अध्यादेश क्रमांक १ – महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (सुधारणा) अध्यादेश, २०२३

(ख) सन २०२३ चा अध्यादेश क्रमांक ६ – महाराष्ट्र (ग्रामपंचायतींच्या, जिल्हा परिषदांच्या व पंचायत समित्यांच्या विवक्षित निवडणुकांकरिता) वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत तात्पुरती वाढविणे अध्यादेश, २०२३

उद्योग मांत्री : सन २०२३ चा अध्यादेश क्रमाांक ४ – महाराष्ट्र उद्योग, व्यापार व गुांतवणूक सुविधा अध्यादेश

३ : सन २०२३-२०२४ च्या पुरवणी मागण्या सादर करणे

४ : विधानसभेने संमत केलेल्या विधेयकांना विधानपरिषदेची संमती व दोन्ही सभागृहांनी संमत केलेल्या विधेयकांना राष्ट्रपती / राज्यपालांची अधिसंमती मिळाल्याचे जाहीर करणे

५ : अध्यक्षांनी, सभाध्यक्षांची तालिका नामनिर्देशित करणे

६ : शासकीय विधेयके :

पुर: स्थापनार्थ :-

(१) सन २०२३ चे विधानसभा विधेयक क्रमांक १८ महाराष्ट्र सहकारी संस्था (दुसरी) सुधारणा) विधेयक, २०२३

(२) सन २०२३ चे विधानसभा विधेयक क्रमांक १९ – महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (सुधारणा) विधेयक, २०२३

(३) सन २०२३ चे विधानसभा विधेयक क्रमांक २० महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना (सुधारणा) विधेयक, २०२३

(४) सन २०२३ चे विधानसभा विधेयक क्रमांक २१- महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) (सुधारणा) विधेयक, २०२३

दिवंगत खासदार आणि माजी मंत्री गिरीश भालचंद्र बापट, दिवंगत खासदार सुरेश उर्फ बाळूभाऊ नारायण धानोरकर, माजी आमदार शंकरराव लिंबाजीराव वाकुळणीकर (कोळकर), बाबुरावजी जसुजी वाघमारे आणि माजी आमदार रामचंद्र पुनाजी अवसरे यांच्या निधनानंतर विधानसभेत शोकप्रस्ताव सादर करण्यात आला.

पुणे राष्ट्रवादी उपमुख्यमंत्री अजितदादांच्याच पाठिशी : दीपक मानकर

  • शहर राष्ट्रवादीच्या पहिली कार्यकारिणी उत्स्फूर्त प्रतिसादात
  • उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ताकद देण्याचा निर्धार

पुणे (प्रतिनिधी) : ‘शहरातील कार्यकारिणीमध्ये सर्व घटकांतील ज्येष्ठ, महिला, पुरुष, युवक युवती, विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना सहभागी करून सर्वांना काम करण्याची योग्य संधी देण्यात येणार असून पुणे शहरातून मोठी ताकद उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठिशी उभी केली जाईल’, असा निर्धार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी कार्यकारिणी बैठकीत केला.

शहर राष्ट्रवादीची पहिली कार्यकारिणी शहराध्यक्ष मानकर यांच्याच अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. उत्फूर्त वातावरणात झालेल्या या बैठकीस महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, प्रवक्त्या रुपाली ठोंबरे, कार्याध्यक्ष प्रदिप देशमुख, कार्याध्यक्षा पूनम पाटील, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, दत्तात्रय धनकवडे, शंकर केमसे, अप्पा रेणुसे, बंडू गायकवाड प्रकाश कदम, महेश शिंदे, सुभाष जगताप, बाळासाहेब बोडके, प्रदीप गायकवाड, प्रिया गदादे, भैय्यासाहेब जाधव, सदानंद शेट्टी, बाबा पाटील यांच्यासह आजी-माजी लोकप्रतिनिधी, इतर मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

शहरात राष्ट्रवादी मजबूत करतानाच सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा निर्धार करत मानकर पुढे म्हणाले, ‘अजितदादांच्या नेतृत्वाखाली आगामी काळात पुणे शहरात पक्ष संघटना मजबूत करून पक्षाचे धोरण आणि भूमिका ही पुणेकरांचे हित लक्षात घेऊनच असेल. शिवाय लवकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहर कार्यालय नव्याने उभे केले जात असून ते माझ्या वैयक्तिक नाही तर पक्षाच्या नावेच असेल, ही हमी देतो.’

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह नवनियुक्त मंत्री महोदयांच्या अभिनंदनाचा ठराव या बैठकीत करण्यात आला.

अतिरुद्र महायज्ञाची ३३ कोटी देवता यागासह पूर्णाहुती:वेदमूर्ती नटराजशास्त्री यांसह १२५ ब्रह्मवृंदांचे पौरोहित्य

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे आयोजन

पुणे : जगाच्या कल्याणाकरिता, आरोग्यसंपन्न समाजाकरिता सुरु असलेल्या अकरा दिवसीय अतिरुद्र महायज्ञाची सांगता ३३ कोटी देवता याग व पूर्णाहुतीने झाली. श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात महा सुदर्शन होम, संतान गोपाल कृष्ण होम, विष्णू सहस्त्रनाम अर्चना, रुद्र होम आणि गणेश याग यांसह विविध प्रकारच्या धार्मिक विधींनी यज्ञाला प्रारंभ झाला होता. वेदमूर्ती नटराजशास्त्री यांसह एकाच वेळी तब्बल १२५ ब्रह्मवृंद यामध्ये सहभागी झाले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे अतिरुद्र महायज्ञ मंदिरात करण्यात आला. त्याच्या सांगता प्रसंगी ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनिल रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, राजू शेठ सांकला, रंजना सांकला आदी उपस्थित होते. सलग अकरा दिवस रुद्र होम, गणेश याग यांसह विविध अभिषेक देखील करण्यात आले. गणपती मंदिरात सभामंडपात भव्य होमकुंड साकारण्यात आले होते.

गंगा, यमुना, इंद्रायणी, पंचगंगा, मुठा, अष्टविनायक येथील नद्या, ज्योर्तिलिंग नद्या, रामेश्वरम २१ कुंडांचे जल याकाळात वापरले गेले. तसेच, २१ आयुर्वेदिक औषधी वापर होम-हवनाच्या वेळी करण्यात आले. सर्व नद्यांच्या एकत्रित केलेल्या मंत्रोच्चारीत पाण्याचा श्रींना जलाभिषेक करण्यात आला. अतिरुद्र होम हा या धार्मिक विधींतील सर्वोच्च बिंदू होता. याशिवाय मेधा दक्षिणा मूर्ती होम, स्वयंवर पार्वती होम, महालक्ष्मी होम श्री सुक्त, नवग्रह होम, अरुणाप्रश्न याग, महालक्ष्मी होम श्री सुक्तदेखील झाले. अतिरुद्र याग व इतर धार्मिक कार्यक्रमांत भाविक मोठया संख्येने सहभागी झाले होते.

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनांसाठी विशेष शिबिरे आयोजित करावी – राष्ट्रीय सफाई कामगार आयोगाचे अध्यक्ष एम वेंकटेशन

मुंबई : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या माध्यमातून सफाई कामगारांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी व्यापक स्तरावर प्रचार प्रसिद्धी करण्यात यावी. तसेच योजनांचा लाभ देण्यासाठी विशेष शिबिरे आयोजित करावीत, असे निर्देश राष्ट्रीय सफाई कामगार आयोगाचे अध्यक्ष एम वेंकटेशनयांनीदिलेआहेत.राज्यात सामाजिक न्याय विभागाने सफाई कामगारांना प्लास्टिक क्रेडिट चा लाभ मिळण्यासाठी हिंदुस्तान ऍग्रो या कंपनीच्यावतीने अभिनव संकल्पना राबविण्याचे निश्चित केलेआहे.

राज्यातील सफाई कामगार यांचे विविध प्रश्न व अडचणींबाबत राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष एम. वेंकटेशन व सदस्य पी.पी.वावा यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी निर्देश दिले.

राज्य शासनाच्या विविध विभागाच्या वतीने सफाई कामगार यांच्यासाठी राबविण्यात येणाऱ्या स्वयंरोजगाराच्या योजना, अनुकंपावरील वारसांना नोकरी देणे, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या महाप्रित कंपनीच्या योजना, ‘नमस्ते’ मोहिम,त्याचबरोबर हाताने मैला उचलणाऱ्या कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध करणे व पुनर्वसन करणे या अधिनियमानुसार कामगारांना आधुनिक यंत्रसामग्री, साधनसामग्री पुरवणे याबाबत आढावा घेण्यात आला.

तज्ञांच्या सल्ल्याने प्लास्टिक क्रेडिटचे फायदे हे सफाई कर्मचारी यांच्यापर्यंत पोहचविण्याबाबत चर्चा झाली. प्लास्टिक क्रेडिट, कार्बन क्रेडिटआणि इतर प्रकारचे क्रेडिट अशा संकल्पना आहेत, ज्यामुळे प्लास्टिक कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्याबरोबरच पर्यावरणालाही फायदा होणार आहे.सफाई कामगारांनी जमा केलेल्या या प्लास्टिक कचऱ्याच्या मोबदल्यातून आर्थिक उत्पन देखील मिळणार आहे. या योजनेचे सादरीकरण हिंदुस्तान ऍग्रो चे डॉ. भरत ढोकणे-पाटील यांनी यावेळी केले.

याप्रसंगी बृहन्मुंबई मनपा चे आयुक्त आय एस चहल, बेस्ट चे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी मुंबईत सफाई कामगारांकरिता करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती आयोगास दिली.राज्यात आज अखेर हाताने मैला साफ करणाऱ्या व दुर्दैवाने मृत्यू झालेल्या 73 कामगारांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची नुकसान भरपाई वारसांना राज्य शासनाच्यावतीने देण्यात आल्याची माहिती यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी दिली.

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाकडून यावेळी विविध योजनांचे सादरीकरण करण्यात आले.

बैठकीस राज्य शासनाच्या महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक बिपिन श्रीमाळी, सामाजिक न्याय विभागाचे सह सचिवदिनेश डिंगळे,सह सचिवसो.ना.बागुल, उपसचिव रवींद्र गोरवे,हिंदुस्तान ऍग्रो चे कन्सल्टंट गौरव सोमवंशी, अनिल चोप्रा, समाज कल्याण मुंबई विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे,सहाय्यक आयुक्त प्रसाद खैरनार, लंडनच्या ‘सिर्क्युलॅरिटी इनोव्हेशन हब’चे संचालक जोएल मायकल, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे अधिकारी, समाज कल्याण विभागाचे अधिकारी, राज्यातील सफाई कामगारांसाठी काम करणाऱ्या विविध संघटनांचे प्रतिनिधीउपस्थित होते.

शिवसेना पुणे शहरप्रमुख संजय मोरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

पुणे -शिवसेना पुणे शहराचे निष्ठावान ,आक्रमक शहरप्रमुख संजय मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज शिवसेना संपर्कप्रमुख पुणे जिल्हा आ सचिनअहिर , पश्चिम महाराष्ट्र संपर्क समन्वयक रवींद्र मिर्लेकर यांनी शुभेच्छा दिल्या .
वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसेना पुणे शहराच्या वतीने नाना पेठ येतील पीजीआय हॉल येथे आखाड भोजनाचा कार्यक्रम झाला .
यावेळी संजय मोरे यांना शुभेच्छा देण्यासाठी मित्र पक्षाचे आमदार रवींद्र धांगेकर , आ मोहन जोशी , माजी मंत्री रमेश बागवे , मा नगरसेवक रवींद्र माळवदकर ,अविनाश बागवे, सुशीला नेटके, मनीष साळुंके , बाळासाहेब अमराळे, मोहम्मद चिस्ती ,
तसेच शिवसेनेचे शहरप्रमुख गजानन थरकुडे, महादेव बाबर, पृथ्वीराज सुतार , अशोक हरणावळ, बाळासाहेब ओसवाल , प्रशांत बधे, पल्लविताई जावळे , विशाल धनवडे, तानाजी लोणकर , योगेश मोकाटे, युवासेनेचे सहसचिव मोहसीन शेख, रेणुका साबळे, शिवसेना पदाधिकारी , महिला , युवासेना, युवती सेना पदाधिकारी असंख्य शिवसैनिक इतर पक्षातील पदाधिकारी , पत्रकार मित्र, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते .

दिवसाआड पाणी देणा-या गावामध्ये गुरुवारी पाणी पुरवठा बंद ठेऊ नये-खासदार सुप्रिया सुळे

पुणे-बारामती लोकसभा मतदार संघातील आणि पुणे महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या काही गावांमध्ये दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. या गावांत पुन्हा गुरुवारी पाणी बंद ठेवले अजून विस्कळीतपणा येतो. त्यामुळे अशा गावांत गुरुवारी पाणी बंद ठेऊ नये. अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे.

खासदार सुळे यांच्या पत्रानुसार बारामती लोकसभा मतदार संघातील पुणे महानगर पालिकेत समाविष्ट गावांना दिवसाआड आणि अनियमित पाणी पुरवठा होतो. तसेच नव्याने समाविष्ट धायरी, न-हे, नांदोशी सणसनगर या गावात विभागानुसार फक्त अर्धातास ते एक तास ऐवढाच पाणी पुरवठा केला जातो. त्यातच काही ठिकाणी महावितरणकडून त्या परिसरातील लाईट गेली तर त्या परिसरात पाणी पुरवठा सुरळीत होत नाही. सद्य स्थितीत अनेक सोसायटयांमध्ये व गावांमध्ये असलेल्या पाण्याच्या कुपनलिका उन्हाळ्यामुळे बंदा पडलेल्या आहेत. त्यामुळे आत्ताच नागरीक पाणी समस्यांमुळे हैराण आहेत. सुळे यांनी म्हटले आहे कि, जर पुणे महानगर पालिकेने दिवसाआड पाणी देणा-या गावामध्ये गुरुवारी पाणी पुरवठा बंद ठेवला तर त्या परिसरामध्ये पाण्यासाठी नागरीकांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता निर्माण होऊ शकते. त्यामुळे ज्या गावात दिवसाआड पाणी पुरवठा आहे त्या ठिकाणचे पाणी आहे त्या प्रमाणे चालू ठेवावे. त्या मध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करू नये. अशी मागणी सुळे यांनी केली आहे.

‘मातोश्री’शी निष्ठावान असल्याचा अभिमान-आ.सचिन अहिर

पुणे-गद्दारी करून गेलेल्या मिंध्ये गटाची सध्याची सरकार मधील अवस्था वाईट झाली असून आज निष्ठावान सैनिकांना आपण मातोश्री सोबत असल्याचा अभिमान वाटतो, तसेच आपल्याला पुणे शहरातील शिवसैनिकांचे कौतुक वाटते असे उदगार शिवसेना नेते आ.सचिन अहिर यांनियेथे काढले.

शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्ष पुणे शहराच्या वतीने आज नानापेठ येथे पुणे शहरातील पदाधिकारी यांची बैठक घेण्यात आलीया बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेना पुणे जिल्हा संपर्क प्रमुख आ सचिनजी अहिर , पश्चिम महाराष्ट्र समन्वयक रवींद्रजी मिर्लेकर , उपस्थित होते .
महाराष्ट्रातील चालू घडामोडी आणि आगामी वाटचाली विषयावर यावेळी मार्गदर्शन करण्यात आले
यावेळी बोलताना संपर्कप्रमुख सचिन अहिर यांनी पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यासोबत सामान्य जनता असून गद्दारी करून गेलेल्या मिंध्ये गटाची सध्याची सरकार मधील अवस्था वाईट झाली असून आज निष्ठावान सैनिकांना आपण मातोश्री सोबत असल्याचा अभिमान वाटतो, पुणे शिवसेनेची आक्रमकता पाहता पुणे शहरातील शिवसैनिकांचे कौतुक वाटते असे बोलले .
तर रवींद्र मिर्लेकर यांनी पक्षबांधणी विषयावर भर देण्यासाठी तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विचार लोकांपर्यंत घरा घरात पोहचविण्याचे काम आता प्रत्येक पदाधिकाऱ्यांचे असल्याचे म्हणाले .
यावेळी लोकजनशक्ती पार्टीचे पुणे अध्यक्ष आदिनाथ भाकरे, रुपेश ओव्हाळ , विनोद कसबे इतर कार्यकर्ते आणि दांडेकर पूल भागातील सामाजिक कार्यकर्ते आदर्श ननावरे यांनी त्यांच्या साथीदारांसोबत शिवसेना पक्षात प्रवेश केला .
यावेळी व्यासपीठावर शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे , गजानन थरकुडे, महादेव बाबर , युवासेना सहसचिव मोहसीन शेख, प्रशांत बधे, दिलीप तांबोळी , पृथ्वीराज सुतार , बाळा ओसवाल, अमोल देवळेकर , गजानन पंडित , विशाल धनवडे, अशोक हरणावळ, महिला आघाडीच्या सविता मते , कल्पना थोरवे , पल्लवी जावळे युवा सेनेचे रेणुका साबळे ,राम थरकुडे , युवराज पारीख , निकता मारटकर, अनंत घरत , किशोर राजपूत , राजेश मोरे, भारत कुंभारकर, नंदू येवले , नितीन रावलेकर, बाळासाहेब मालुसरे, मकरंद पेठकर , अजय परदेशी , उत्तम भुजबळ , राहुल जेकटे , नितीन दरेकर , सुरज लोखंडे , नितीन वाघ , जान मोहम्मद, राजेश शेलार , तानाजी लोणकर , मदन गाडे, योगेश मोकाटे, पुरुषोत्तम विटेकर, इतर असंख्य शिवसैनिक महिला पदाधिकारी , युवा युवती सेना पदाधिकारी उपस्थित होते .

 अनुभव  ‘ नृत्य  सादरीकरणाला चांगला प्रतिसाद

पुणे ः
भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत  आयोजित ‘ अनुभव ‘  या   नृत्य कार्यक्रमाला  चांगला  प्रतिसाद मिळाला. नृत्यांजली डान्स ऍकॅडमीच्या विद्यार्थिनी  शिष्या सहभागी झाल्या. हा कार्यक्रम शनीवार, १५ जुलै   २०२३ रोजी सायंकाळी सव्वा सहा   वाजता  भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे  उत्साहात पार पडला.गणेश वंदनेने प्रारंभ झाला.पुष्पांजली,आलारीपू,जतीस्वर,शब्द,कीर्तन, तिल्लाना नृत्यप्रकारांनी चांगला प्रतिसाद मिळाला.भरतनाट्यम,लोकनृत्य,संथाल,कुमी,लंबाडी,बिहू,भांगडा,गरबा नृत्यांचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले.
 हा कार्यक्रम विनामूल्य होता.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा  १७२ वा कार्यक्रम  होता.भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी स्वागत केले.

काँग्रेसची लढाई भाजपा सरकारविरोधात; जे पक्ष साथ देतील त्यांना बरोबर घेऊन लढणार.

मुंबई, दि. १६ जुलै
पावसाळी अधिवेशनात जनतेचे प्रश्न घेऊन भाजपाप्रणित शिंदे सरकारला काँग्रेस पक्ष प्रश्न विचारेल. शेतकरी, कामगार, गरिब, महिला, कायदा व सुव्यवस्था, महागाई, तरुणांचे प्रश्न आहेत. राज्यातील सध्याचे सरकार शेतकरी विरोधी आहे. त्यांना शेतकरी व जनतेच्या प्रश्नांची त्यांना चाड नाही. महागाई वाढली आहे, शेतकऱ्यांना मदत मिळत नाही, बेरोजगारी वाढली आहे, यासह जनतेच्या महत्वाच्या प्रश्नांवर सरकारला अधिवेशनात प्रश्न विचारु व सरकारला त्याचे उत्तर द्यावे लागले, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
अधिवेशनाच्या पार्श्वभूमिवर विरोधी पक्षांची बैठक पार पडली त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले प्रसार माध्यमांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, आमचा लढा सरकारविरोधात आहे, या लढ्यात जे पक्ष साथ देतील त्यांना बरोबर घेऊन हा लढा लढला जाईल. राज्यात आज असंवैधानिक सरकार सत्तेत बसलेले आहे, सप्रीम कार्टाने ताशेरे ओढलेले आहेत, शिंदे सरकार स्थापन होताना जे-जे निर्णय घेतले गेले ते सर्व चुकीचे होते असे कोर्टाने स्पष्ट केले आहे तरीही हे लोक खुर्चीला चिकटून बसले आहेत. भारतीय जनता पक्षाने लोकशाही व संविधानाचा गळा घोटला असून भाजपा हा महाराष्ट्रासाठी कलंक आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्य सरकार गंभीर नाही. मदत जाहीर केली तरी ती अजून शेतकऱ्यांना पोहचलेली नाही. महागाई वाढली आहे, टोमॅटो महाग झाले तर महिनाभर टोमॅटो खाऊ नका असे कृषी मंत्री सांगतात, ही जनतेची थट्टा आहे, कृषी मंत्र्यांचे असे विधान असंवेदनशिल आहे. राज्यात सर्वत्र खड्डे पडलेले आहेत, जनतेच्या कष्टाच्या पैशाची लुट सुरु असून भ्रष्टाचार भरमसाठ वाढला आहे. विरोधी पक्ष या नात्याने भाजपा सरकारला अधिवेशनात घेरणार, असे पटोले म्हणाले.

अजित पवार गटाने खासदार शरद पवार यांची भेट घेतल्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पटोले म्हणाले की, कोण काय करत आहे, याच्याशी आम्हाला काही देणेघेणे नाही, तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. आम्ही विरोधक म्हणून सोबत येणाऱ्यांना बरोबर घेऊन लोकशाही व संविधान वाचवण्याची लढाई लढत आहेत. विधानसभेचा विरोधी पक्षनेता हा काँग्रेसचाच होणार असल्याचेही पटोले यांनी सांगितले.

सिद्धार्थ गायकवाडसह १६ साथीदारांवर मोक्काखाली कारवाई

पुणे-सहकारनगर भागात वाहनांची तोडफोड करुन दहशत माजविणाऱ्या गुंड टोळीविरुद्ध पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले. आतापर्यंत पोलीस आयुक्तांच्या आदेशाने शहरातील ३६ गुंड टोळ्यांवर मोक्का कारवाई करण्यात आली आहे.१) सिध्दार्थ विजय गायकवाड, वय २२ वर्षे रा.अण्णाभाऊ साठे वसाहत, अरण्येश्वर, पुणे ( टोळी प्रमुख) २) राम राजाभाऊ उमाप, वय २३ वर्षे, रा. सदर ३) सनी ऊर्फ किरण कैलास परदेशी, वय २७ वर्षे, रा. सदर ४) अमोल ऊर्फ नाना जालिंदर बनसोडे,वय ३१ वर्षे, रा. सदर ५) समीर रज्जाक शेख, वय २३ वर्षे, रा. सदर ६ ) राजाभाऊ ऊर्फ जटाळया लक्ष्मण उमाप, वय ५० वर्षे,रा.सदर ७)गणेश ऊर्फ भुषण कैलास परदेशी, वय ३० वर्ष, रा. सदर ८) नब्बा ऊर्फ नरेश सचिन दिवटे, वय- २६ वर्षे,रा.स.नं.१३३,दांडेकर पुल, पुणे ९ ) हर्षद आप्पा ढेरे, वय-२२ वर्षे, रा. आंबेडकरनगर, मार्केटयार्ड, पुणे १०) शुभम ऊर्फ डुई अनिल ताकतोडे, वय १९ वर्षे, रा. सदर ११ ) विशाल शिवाजी पाटोळे, वय १९ वर्षे, रा. सदर १२)चेतन महादेव कांबळे, वय २६ वर्षे, रा. सदर १३) गौरव अरविंद नाईकनवरे, वय २२ वर्षे रा.६४/१२ जय हिदं नगर, अपर इंदिरानगर बिबवेवाडी पुणे अशी या आरोपींची नावे असून २ फरार आहेत तर २ विधीसंघार्षित बालके आहेत .या १३ हि आरोपींना सहकारनगर पोलीसंनी दहशत पसरविण्याच्या गुन्ह्याखाली अटक केलेली आहे. पोलिसांनी सांगितले कि,’दिनांक दि.२६/०६/२०२३ रोजी फिर्यादी हे लहुजी शक्ती सेना येथील ऑफिसजवळ थांबले असता, तेथे सिध्दार्थ गायकवाड, राजु उमाप व त्याचा मुलगा राम उमाप, विधीसंघर्षीत बालक व त्यांचे इतर साथिदार फिर्यादी यांचे जवळ हातात लोखंडी धारधार हत्यारे घेवुन हवेत फिरवुन, सिध्दार्थ गायकवाड याने दत्ता जाधव यास तुम्हा दोघांना व तुमच्या गँगला आम्ही बघुन घेतो, तुम्ही सुधरा नाहीतर मर्डर करीन अशी धमकी दिली. सिध्दार्थ गायकवाड याने फिर्यादीस लोखंडी हत्याराचा धाक दाखवुन त्यांचे खिश्यातुन बळजबरीने १,०००/- रूपये काढुन घेवुन,तुला बघुन घेतो अशी धमकी दिली. त्यानंतर राजु उमाप, सिध्दार्थ गायकवाड, लखन खंडागळे, दोन विधीसंघर्षीत बालक, राम उमाप, समिर शेख, हर्ष ढेरे, डई, गौरव नाईक, नटया, चेतन, लाडया, गणेश, नब्बा, सनी परदेशी व ७ ते ८ इतर इसमांनी लोखंडी हत्यार घेवुन परिसरातील वाहनांची तोडफोड करून नुकसान केले. म्हणुन सदरबाबत सहकारनगर पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. १४५/२०२३, भारतीय दंड संहिता कलम ३९५,३२३,४५२,१४३, १४४, १४७, १४८, १४९,४२७, ५०४, ५०६ आर्म अॅक्ट कलम ४ (२५) महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३)१३५, मपोकाक. १४२ क्रिमीनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम ३ व ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दाखल गुन्ह्याच्या तपासा दरम्यान यातील आरोपी नामे (आ.क्र.१ ते १३ यांना अटक करण्यात आली आहे.) तसेच इतर ०२ विधीसंघर्षीत बालके यांना ताब्यात घेण्यात आले असुन, इतर ०२ ( टोळी सदस्य) पाहिजे(wanted)आरोपी आहेत.
गुन्ह्याचे तपासा मध्ये सदर आरोपी सिध्दार्थ विजय गायकवाड, वय – २२ वर्षे, रा. अण्णाभाऊ साठे वसाहत, अरण्येश्वर,पुणे ( टोळी प्रमुख) याने त्याचेसह अन्य सदस्यांसाठी प्रत्येक गुन्हयात काही सामाईक व काही नवीन साथीदार यांना सोबत घेवुन स्वतःची संघटीत टोळी तयार करून, अवैद्य मार्गाने अर्थिक फायदा मिळविण्याचे उद्देशाने स्वतःचे गुन्हेगारी टोळीचे वर्चस्व व दहशत प्रस्थापित ठेवण्यासाठी, संघटित गुन्हेगारी संघटनेचा प्रमुख म्हणुन किंवा संघटनेच्या वतीने एकट्याने किंवा संयुक्तपणे, हिंसाचाराचा वापर करुन अथवा हिंसाचाराची धमकी देवुन किंवा दपटशहा दाखवुन, सहकारनगर, भारती विदयापीठ, स्वारगेट, दत्तवाडी, कोंढवा, मार्केटयार्ड, बिबवेवाडी पोलीस ठाणे हद्दीत दरोडा, जबरी चोरी, प्राण घातक शस्त्र जवळ बाळगणे, सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, बेकायदेशीर जमाव जमवून, लोकांमध्ये हल्ले करून, घातक शस्त्र जवळ बाळगणे, नागरीकांच्या मालमत्तेचे नुकसान करणे, आपल्या टोळी सदस्यांकडुन गुन्हे घडवुन आणणे व दहशत निर्माण करणे, पोलीसांनी कायदा व सुव्यवस्था राखणेकामी काढलेल्या आदेशांचा भंग करणे, गुन्हयासाठी बेकायदेशीर घातक शस्त्राचा वापर करुन दहशत निर्माण करणे अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे चढत्या क्रमाने गुन्हे दाखल आहेत. प्रत्येक गुन्हा करताना त्याने वैयक्तिक व टोळीचे वर्चस्व वाढावे व आर्थिक फायदा व्हावातसेच जनमानसात दहशत राहावी हाच उद्देश ठेवुन गुन्हे केलेले आहेत. अशा प्रकारचे गुन्हे दाखल असुन, त्यांचेवर प्रतिबंधात्मक कारवाई करून देखील सुध्दा त्यांनी सहकारनगर, भारती विदयापीठ, स्वारगेट, दत्तवाडी, कोंढवा, मार्केटयार्ड, बिबवेवाडी या भागात सक्रीय असल्याचे अभिलेखाची पडताळणी केल्यानंतर, पुर्वीच्या टोळीत फुट पडुन दोन टोळ्या तयार होवुन, टोळी वर्चस्वावरुन व स्वतःचा आर्थिक फायदा होणेसाठी त्यांनी पुन्हा गुन्हे केलेले आहेत.सदर टोळीवर एकुण ०४ गुन्हे एकत्र केल्याची नोंद असुन, स्वंतत्रपणे एकुण १० गुन्हे असे एकुण १४ गुन्हे केल्याची नोंद आढळुन आली आहे. टोळीचा मुख्य सुत्रधार सिद्धार्थ विजय गायकवाड याने व त्याचे संघटीत टोळीतील साथीदार यांनी त्यांनी आपल्या गुन्हेगारी टोळीचे वर्चस्व व आर्थीक फायदयासाठी यातील आरोपी यांनी संघटीतपणे दहशतीचे मार्गाने स्वतःचे बेकायदेशिरपणे आर्थिक फायदया करीता सदरचा गुन्हा केल्याचे दिसुन आल्याने,तसेच त्यांचे वर्तनात सुधारणा होत नसल्याने प्रस्तुत गुन्हयात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii),३(२), ३(४) प्रमाणेचा अंर्तभाव करणे कामी सहकारनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र गजेंद्र माळाळे यांनी पोलीस उप-आयुक्त, परि – ०२, स्मार्तना पाटील यांचे मार्फतीने अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, प्रविणकुमार पाटील यांना सादर केलेला होता.
सदर प्रकरणाची छाननी करून सहकारनगर पोलीस स्टेशनकडील गुरनं. १४५/२०२३, भारतीय दंड संहिता कलम ३९५, ३२३, ४५२, १४३, १४४, १४७, १४८, १४९,४२७, ५०४, ५०६, आर्म अॅक्ट कलम ४ (२५), महाराष्ट्र पोलीस अधि.कलम ३७ (१) (३) १३५, मपोकाक. १४२ क्रिमीनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम ३ व ७ प्रमाणे असलेल्या गुन्हयात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii), ३(२), ३(४) प्रमाणेचा अंर्तभाव करण्याचीअपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभागप्रविणकुमार पाटील यांनी मान्यतादिली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास नारायण शिरगावकर, सहा.पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे शहर हे करीत आहेत.

पीएम मित्रा’ मेगा टेक्सटाईल पार्कचा मुंबई येथून शुभारंभ

मुंबई,  दि 16: राज्याच्या सर्वांगीण औद्योगिक विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. त्यासाठी ‘महाराष्ट्र आर्थिक सल्लागार समिती’ गठित करण्यात आली आहे. या समितीने विविध शिफारशी केल्या असून त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शीघ्र कृती समिती आणि ‘पीएम मित्रा’ च्या माध्यमातून कार्यवाही करण्यात येईल. तसेच या ठिकाणी येणाऱ्या उद्योजकांना सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

अमरावती येथील ‘पीएम मित्रा’ मेगा टेक्सटाईल पार्कचा मुंबईच्या कलिना परिसरातील हॉटेल ग्रॅण्ड हयात येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.

यावेळी केंद्रीय वाणिज्य आणि वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वस्त्रोद्योग आणि रेल्वे राज्यमंत्री श्रीमती दर्शना जरदोश, उच्च व तंत्र शिक्षण व वस्त्रोद्योग मंत्री  चंद्रकांत पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार नवनीत राणा कौर, अनिल बोंडे, आमदार रवी राणा, राजन सिंग, राहुल कुल, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपिन शर्मा यांच्यासह उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, आजचा दिवस हा महाराष्ट्र सरकारसाठी विशेष दिवस आहे. कोविड कालावधीनंतर राज्यात आज घडीला मोठ्या प्रमाणात विविध प्रकल्पांचे काम प्रगतीपथावर आहे. मेट्रो, आरे कारशेड, बुलेट ट्रेन, शिवडी-न्हावाशेवा एमटीएचएल पूल, कोस्टल रोड यासारखी विविध कामे प्रगतीपथावर आहेत. राज्यात मोठ्या प्रमाणात कुशल मनुष्यबळ, जमीन, पाणी, ऊर्जा, दळणवळणाच्या सुविधा निर्माण होत आहेत. राज्याला पुढे नेण्यासाठी जे काही प्रयत्न करावे लागतील ते सर्व करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. राज्यात गुंतवणूक करणाऱ्या उद्योजकांना  विभागाच्या वतीने  चांगल्या  सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. देशाचे पाच ट्रिलियन डॉलर इकोनॉमीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून त्यापैकी महाराष्ट्र एक ट्रिलियन डॉलर उद्दिष्ट साध्य करण्याचे काम करेल, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले. ‘पीएम मित्रा’ च्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होणार आहे. विशेषतः महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

डाओसमध्ये अनेक देशाच्या प्रतिनिधींना महाराष्ट्रातील गुंतवणीसाठी गुतवणूक संधिची माहिती दिली असून अनेक उद्योगांनी राज्यात गुंतवणुकीसाठी उत्सकता दाखवली आहे. यावेळी 1 लाख 37 हजार कोटी रुपयांचे करार झाले असून यापैकी 86 हजार कोटींचे कामे सुरू आहेत.

राज्यामध्ये 75 हजार सरकारी नोकर भरतीचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. समृद्धी महामार्गामुळे अनेक सुविधा निर्माण होत आहेत. या कनेक्टिव्हिटीमुळे इंधन व वेळेची बचत होणार आहे. त्याचबरोबर मुंबईत देखील बदल घडत असताना दिसत आहेत खड्डे मुक्त मुंबई, मुंबईच्या सौंदर्यकीकरणावर भर व  स्वच्छतेला प्राधान्य देण्यात आले आहे.

               पीएम मित्रामुळे विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठी संधी- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रातील अमरावतीसह देशात सात ठिकाणी ‘पीएम मित्रा’ अंतर्गत (मेगो इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन अॅण्ड अॅपेरल) मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल पार्क अमरावतीजवळ नांदगाव पेठ येथे हा पार्क उभारला जाणार असून त्यामुळे  विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. राज्यात टेक्स्टाईल पॉलिसी आल्यामुळे कापूस उत्पादक जिल्ह्यात सूतगिरण्या उभारल्या पाहिजे. अमरावती इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट सिस्टीममध्ये इकोसिस्टीमची घोषणा झाल्यावर अनेक उद्योजक या ठिकाणी गुंतवणूक करण्यास तयार झाले आहेत.

यासाठी एक हजार एकर जमीनीचे अधिग्रहण करण्यात आले असून यामध्ये जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, कापड उद्योगासाठी एकात्मिक प्रक्रिया, आधुनिक औद्योगिक पायाभूत सुविधा या सर्व सुविधा पार्क मध्ये असणार आहेत. ‘पीएम मित्रा’ पार्क मुळे जागतिक दर्जाच्या औद्योगिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यात मदत करतील. ज्यामुळे थेट परदेशी गुंतवणुकीसह (FDI) मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित होईल आणि या क्षेत्रातील नाविन्य आणि रोजगार निर्मितीला प्रोत्साहन मिळेल.

पीएम-मित्रा केंद्रे पंतप्रधानांच्या 5 एफ संकल्पनेपासून प्रेरित आहे. ही 5 एफ संकल्पना म्हणजे शेतकरी ते धागे बनविणे ते फॅक्टरी ते फॅशन ते परदेश निर्यात अशी पाच सूत्रे होय. वर्धा ट्रान्सपोर्ट तयार होत आहे. रस्ते, रेल्वे आणि विमान वाहतुक या सर्व सुविधा अमरावतीच्या टेक्स्टाईल पार्कच्या जवळ मिळतील. आज याबाबत चार सामंजस्य करार करण्यात आले आहे. ही सुरवात असून एक हजार एकर जमीनीपेक्षा अधिक जमीन अधिग्रहित करावी लागणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्रात उद्योगस्नेही इकोसिस्टीमचे काम जलद गतीने- केंद्रीय मंत्री पियुष गोयल

केंद्रीय वाणिज्य आणि वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल म्हणाले की, महाराष्ट्र प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. महाराष्ट्रातील इकोसिस्टीमचे काम गतीने होत आहे. जलद गतीने पायाभूत सुविधा वाढत आहेत. कोस्टल रोडचे काम चालू आहे. ट्रान्स हार्बर लिंक अंतिम टप्प्यात आहे. मुंबई ते पुणे हे अंतर दोन तासामध्ये पार पडेल यासाठीची योजना अंतिम टप्प्यात आहे. मेट्रो, समृद्धी महामार्ग तसेच इतर दळणवळणाच्या सुविधा राज्यात उपलब्ध होत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती येथे ‘पीएम मित्रा’ पार्कसाठी पत्रव्यवहार करून त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला याचा त्यांनी यावेळी आवर्जून उल्लेख केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारताच्या उभारणीची संकल्पना प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टीकोनातून तसेच जागतिक वस्त्रोद्योगास चालना देण्यासाठी या ‘पीएम मित्रा’ पार्क च्या उभारणीला मंजुरी दिली आहे. 3.5 ट्रिलियन डॉलर वरून 35 ट्रिलियन डॉलर इकॉनोमी वाढवण्यासाठी भारत विकासाच्या दृष्टीने पावले टाकत आहे. देशातील युवा-युतीना  सोबत घेऊन चांगल्या गुणवत्तेसोबत देशाचे नाव उज्ज्वल  करावे असे आवाहन  केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांनी यावेळी केले.

केंद्र आणि महाराष्ट्राच्या एकत्रित प्रयत्नातून चांगले परिणाम दिसतील- केंद्रीय राज्यमंत्री दर्शना जरदोश

केंद्रीय राज्य वस्त्रोद्योग राज्यमंत्री श्रीमती दर्शना जरदोश म्हणाल्या की, महाराष्ट्र हडलूम, हँडीक्राफ्ट उद्योगास प्रोत्साहन देण्यात येत आहे. सोलापुरी चादरी, पैठणी, पुणेरी साडी, अश्या अनेक हडलूम प्रसिद्ध आहेत. केंद्र आणि महाराष्ट्र राज्य सोबत चालल्यास चांगले परिणाम दिसतील असेही  त्या यावेळी म्हणाल्या.

‘पीएम मित्रा’ पार्कच्या माध्यमातून एक लाख रोजगार निर्मिती- उद्योग मंत्री उदय सामंत

उद्योग मंत्री श्री सामंत म्हणाले की, ‘पीएम मित्रा’ पार्क च्या माध्यमातून एक लाख रोजगार मिळणार आहे. यासाठी उद्योग विभागाच्या वतीने उद्योजकासाठी जे जे लागेल ते देण्यासाठी उद्योग विभाग सहकार्य करेल. हे सरकार आल्यानंतर दहा महिन्यात 1 लाख 10 हजार कोटींची गुंतवणूक राज्यात आली. यापुढे  महाराष्ट्र राज्याला पहिल्या क्रमांकावर नेण्यासाठी  उद्योग विभाग प्रयत्नशील असेल असा विश्वास उद्योग मंत्री श्री.सामंत यांनी यावेळी व्यक्त केला. या ‘पीएम मित्रा’ पार्कमुळे 12 महिन्यात 6 हजार कोटींची गुंतवणूक राज्यात येणार असून 15 हजार कोटी  उद्योजकाच्या खात्यावर जमा होणार आहेत.

याठिकाणी जागतिक स्तरावरील पायाभूत सुविधा दिल्या जातील. प्रकल्पासाठी लागणारी जमीन अधिग्रहणाच्या मोबदल्यात त्यांना एका महिन्याच्या आत संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात 183 कोटी जमा करण्यात आले. राज्यात चांगले कौशल्य विकास केंद्र तयार करण्यात येणार असून यामाध्यमातून चांगले प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करण्यात येणार आहे. यावेळी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये चार सामंजस्य करार करण्यात आले.