Home Blog Page 1434

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलर होण्याच्या प्रयत्नांना पाठबळ देणारा अर्थसंकल्प – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0

मुंबई, दि.१: गरिबांना आधार मध्यमवर्गीयांना दिलासा उद्योगांना उभारी आणि पायाभूत सुविधांना उत्तेजन देणारा असा हा केंद्रीय अर्थसंकल्प आहे. रोजगार निर्मिती, शेतकरी, कामगार, महिला, युवक अशा समाजातील सर्व घटकांना न्याय देणारा हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प असून त्याचे राज्याच्या वतीने मनापासून स्वागत करतो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले.

देशाच्या आणि राज्याच्या सर्वांगीण विकासाला या अर्थसंकल्पाद्वारे चालना मिळणार असल्याचे सांगतानाच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी अभिनंदन केले आहे.

अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया व्यक्त करताना मुख्यमंत्री म्हणाले, देशाच्या अमृतकाळातला पहिला अर्थसंकल्प श्रीमती सीतारामन यांनी आज मांडला. शहरी आणि ग्रामीण असा संतुलन साधणारा हा अर्थसंकल्प असून मध्यमवर्गीय, बळीराजा, उद्योजक, युवक, महिला अशा सर्व घटकांना सुखावून टाकणारा हा अर्थसंकल्प आहे. जगभरात होणाऱ्या नव्या बदलांच्या आणि त्याच्या आव्हानांचा विचार करणारा असा भविष्यवेधी अर्थसंकल्प मांडल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी श्रीमती सीतारामन यांचे अभिनंदन केले आहे.

पायाभूत सुविधा, कृषी, रोजगार, पर्यावरण अशा सर्वंच क्षेत्रांसाठी अतिशय भरीव तरतूद या अर्थसंकल्पात दिसते. पायाभूत सुविधांसाठी १० लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याचा महाराष्ट्रातील विविध प्रकल्पांना फायदा होईल त्यामुळे निश्चितच सकारात्मक परिणाम महाराष्ट्रामध्येही दिसून येईल. कर रचनेमध्ये ७ लाखांपर्यंतची केलेली उत्पन्नाची मर्यादा विशेषता मध्यमवर्गास दिलासा देणारी आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

गेले तीन वर्षे कोविड संकटात होती. त्यातून बाहेर येण्यासाठी या नव्या कर रचनेचा फायदा होणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात मांडलेली सप्तर्षी कल्पना खरोखरच वाखाणण्याजोगी असल्याचे सांगत यामध्ये सर्वंकष विकास, अंत्योदय योजना, पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक दडलेल्या क्षमतांचा विकास, युवाशक्ती, वित्तीय क्षेत्र यांचा समावेश केलेला आहे. यातून आत्मनिर्भर भारताच्या वाटचालीचे चित्र स्पष्ट होते.

काही निर्णय महाराष्ट्रात आपण राबवत असलेल्या योजना, प्रकल्प, संकल्पनांशी एकरूप असे आहेत. इंडिया अॅट १०० (India@100) या धोरणात चार क्षेत्रांना केंद्रीभूत मानण्यात आले आहे. त्यामध्ये महिला सक्षमीकरण, पीएम विकास म्हणजेच आपल्या पारंपारिक कारागिरांचा सन्मान, पर्यटन आणि हरित विकास यांचा समावेश आहे. या चारही क्षेत्रात आपण महाराष्ट्रात यापूर्वीच काम सुरु केले आहे, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

देशामध्ये महाराष्ट्रातील लघुउद्योग हे सर्वाधिक कार्यक्षम समजले जातात. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांकरिता क्रेडिट हमी योजनेमध्ये प्रस्तावित सुधारणांमुळे हे लघुउद्योग अधिक उत्पादनक्षम होतील, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्रामध्ये कालच पौष्टिक तृणधान्य वर्षाचा शुभारंभ करण्यात आला. हैदराबाद येथील मिलेट सेंटर ऑफ एक्सलन्सला केंद्र सरकारने दिलेला सपोर्ट खरोखरच कौतुकास्पद आहे. या तृणधान्ये वर्ष साजरे करीत असताना त्याची अर्थसंकल्पात तरतूद होणे हे निश्चितच स्वागतार्ह आहे. आम्हाला खात्री आहे की हे तृणधान्य वर्ष महाराष्ट्राच्या एकूण बाजारपेठेसाठी नक्कीच पोषक असेल.

अर्थसंकल्पात कृषी आणि सहकार क्षेत्राला मोठे प्राधान्य दिले आहे. सहकार तर महाराष्ट्राचे सामर्थ्य आहे. मागच्या आठवड्यामध्ये दिल्लीत सहकारी साखर कारखान्याच्या विविध मागण्यांवर एक बैठक घेतली होती.त्या बैठकीमध्ये सहकारी साखर कारखान्यांच्या आयकर संबंधी विषयावर चर्चा झाली. याबाबतीत  तोडगा काढू असे आश्वासन केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह  यांनी दिले होते. आज सादर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये या विषया संदर्भात मोठी घोषणा झाली असून  ज्या सहकारी साखर कारखान्यांवर लायबिलिटी होती त्यामध्ये  सुमारे दहा हजार कोटी रुपयांचा दिलासा या सहकारी साखर कारखान्यांना मिळणार आहे.  शेतमालाच्या साठवणुकीसाठी मोठ्या प्रमाणात विकेंद्रीत स्वरुपात व्यवस्था उभारण्यात येणार आहे. त्यासाठी विविध कार्यकारी सोसायाट्या, मत्स्य आणि दुग्धविकास संस्थांना मदत केली जाणार आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना आपला माल योग्य वेळी बाजारात आणणे सोयीचे होणार आहे.

देशभरात १५७ नर्सिंग महाविद्यालये स्थापन केली जाणार आहेत. याचा फायदा महाराष्ट्रालाही निश्चितच होईल. कारण यापूर्वीच आपण वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यास सुरुवात केली आहे. त्यांना जोडूनच ही महाविद्यालये सुरू होतील.

पीपीई मॉडेलद्वारे पर्यटन तसेच मच्छीमारांसाठी ६००० कोटी रुपयांची गुंतवणूक या योजना महाराष्ट्राला नक्कीच फायदेशीर ठरणार आहेत. महाराष्ट्राला ७२० किमी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला असून पर्यटनादेखील मोठी संधी उपलब्ध होणार आहे.

गरिबांना २०२४ पर्यंत मोफत रेशन मिळणार असून आत्तापर्यंत मोफत रेशनचा ८० कोटी लोकांना फायदा झाला आहे. पीएम अन्नपूर्णा कौशल्य योजनेची सुरुवात होणार असल्याने देशातील गरिबांची काळजी घेणारे हे मोदी सरकार आहे हे स्पष्ट झाले आहे. त्याचप्रमाणे देशात पुढील वर्षांत ५० विमानतळे उभारण्याचा संकल्प करून मोदी सरकारने नव्या भारताची वाटचाल स्पष्ट केली आहे.

जुनी वाहने बदलण्याचा निर्णय प्रदूषण कमी करण्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरेल. युवकांना प्रशिक्षण देण्यासाठी ३० स्किल इंडिया सेंटर उभारण्यात येणार आहेत. रोजगारासाठी हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. हरित विकासावर भर देताना हरित ऊर्जा साठी ३५ हजार कोटी रुपयांची तरतूद स्वागतार्ह आहे. ग्रीन हायड्रोजन मिशन राबवण्यात येणार आहे. त्यासाठी १९ हजार ७०० कोटीची तरतूद केली गेली आहे.

एकूणच समाजातल्या सर्व घटकांना प्राधान्य देणारा तसेच त्यांना विकासाच्या वाटचालीत सामावून घेणारा असा हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प प्रत्येक भारतीयाला सुखावणारा असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

सौदी अरेबियाचे राजदूत अल हुसेनी यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट

मुंबई, दि. १:- सौदी अरेबियाच्या उद्योग आणि गुंतवणुकीचे महाराष्ट्रात स्वागतच असेल. लोकाभिमुख, विकासात्मक प्रकल्प आणि उद्योजकतेसाठी महाराष्ट्र नेहमीच सौदी अरेबियाचा मित्र राहील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. सौदी अरेबियाचे भारतातील राजदूत सलेह इद अल हुसेनी यांची मुख्यमंत्री शिंदे यांची आज येथे सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. राजदूत अल हुसेनी यांनीही महाराष्ट्र हे सर्वच बाबतीत गतिमान राज्य असून येथील गुंतवणूक दोन्ही देशांचे संबंध आणखी दृढ करणारे ठरतील असा विश्वास व्यक्त केला.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या या भेटीप्रसंगी उद्योग मंत्री उदय सामंत, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी तथा राजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांच्यासह सौदी अरेबियाचे दूतावास प्रमुख सुलेमान इद अल कुताबी आदी उच्चाधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, महाराष्ट्र हे उद्योगस्नेही राज्य आहे. उद्योगासह विविध क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी महाराष्ट्रात सर्वाधिक पोषक वातावरण आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारताच्या विकासाचे स्वप्न पाहिले आहे. त्या दिशेने काम करणारे राज्य म्हणून आमची ओळख आहे. नुकताच दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेत जगभरातील अनेक उद्योगांनी सुमारे १ लाख ३७ हजार कोटी रुपयांचे गुंतवणुकीचे करार केले आहेत. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. येत्या काही काळात मुंबईचा पायाभूत सुविधांची दृष्टीने कायापालट झालेला असेल. आम्ही उद्योगस्नेही धोरण स्वीकारले आहे. अन्न प्रक्रिया उद्योग, हरित ऊर्जा अशा माध्यमातून पर्यावरण स्नेही गोष्टींना प्राधान्य दिले आहे. या दृष्टीने सौदी अरेबियाच्या विविध प्रकल्प, गुंतवणूक यांचे आम्ही स्वागतच करू.

यावेळी श्री अल हुसेनी यांनी महाराष्ट्र आणि विशेषत: मुंबईचे कौतुक केले. ते म्हणाले, भारत हा विविधतेने नटलेला सुंदर देश आहे. येथील कला क्षेत्रदेखील समृद्ध आहे. आम्हाला या कलाक्षेत्रात संयुक्तपणे काम करण्याची इच्छा आहे. आम्ही भारतात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहोत. महाराष्ट्र हे एक सक्षम राज्य आहे, त्यामुळे यातील मोठा भाग महाराष्ट्रात येईल, यात शंका नाही. अन्न व ऊर्जा या क्षेत्रांना आम्ही  प्राधान्य देण्याचे आमचे धोरण आहे. भारताशी आणि पर्यायाने महाराष्ट्राशी आमचे उभयपक्षीय संबंध आणखी दृढ होतील असे आमचे प्रयत्न आहेत.

श्री अल हुसेनी यांनी सहा महिन्यांपूर्वी भारतातील राजदूत म्हणून पदभार स्वीकारला आहे. नवी दिल्लीबाहेर एखाद्या शहराला दिलेली पहिली भेट ही मुंबईची असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले.

रंगणार भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सव

मुंबई, दि. 1 : भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार, नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्कार आणि संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कारांचे वितरण 2 फेब्रुवारीला संध्याकाळी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रभादेवी येथील पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे संध्याकाळी 6.00 वा. होणार आहे. या कार्यक्रमास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे उपस्थित राहणार आहेत.

सन 2020 रोजीचा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार डॉ.एन. राजम यांना तर सन 2021 रोजीचा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार पं. शिवकुमार शर्मा यांना प्रदान करण्यात येणार आहे.

सन 2019-20 सालाचा नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्कार रत्नाकर मतकरी यांना जाहीर झाला होता. सन 2020-21 सालाचा नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्कार दत्ता भगत यांना तर, सन 2021-22 सालाचा नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्कार सतीश आळेकर यांना प्रदान करण्यात येणार आहे.

सन 2019-20 सालाचा संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार मधुवंती दांडेकर यांना,सन 2020-21 सालाचा संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार दीप्ती भोगले यांना तर सन 2021-22 सालाचा संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार सुधीर ठाकूर यांना प्रदान करण्यात येणार आहे.

याशिवाय संगीत नाटक अकादमी पुरस्कारप्राप्त कलाकारांचा सत्कारही यावेळी करण्यात येणार आहे.सन 2019 साठी दिग्दर्शनासाठी कुमार सोहोनी, लोकसंगीतासाठी पांडुरंग घोटकर, वाद्य निर्माणासाठी माजिद गुलाबसाहेब सतारमेकर यांचा सत्कार करण्यात येणार आहे. सन 2020 साठी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतासाठी वि. आरती अंकलीकर-टिकेकर, अभिनयासाठी प्रशांत दामले, कळसूत्री बाहुल्यांसाठी मीना नाईक, समग्र योगदान- कथकसाठी डॉ. नंदकिशोर कपोते, ओडिसी नृत्यासाठी पं.रवींद्र अतिबुद्धी, सुगम संगीतासाठी अनुप जलोटा आणि कॉन्टेम्पररी नृत्यासाठी .भूषण लकींद्रा यांचा सत्कार करण्यात येणार आहे.सन 2021 साठी हिंदुस्थानी शास्त्रीय गायन-धृपदसाठी पं.उदय भवाळकर, कथक नृत्यासाठी शमा भाटे, व्हायोलिनसाठी डॉ. संगीता शंकर यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

याशिवाय लोककलेसाठी डॉ. प्रभाकर भानुदास मांडे, सतारसाठी पं. शंकर कृष्णाजी अभ्यंकर, कथ्थकसाठी डॉ. पद्मा शर्मा, संगीतासाठी उस्ताद उस्मान अब्दुल करीम खान, तारपा लोकसंगीतासाठी भिकल्या लडक्या धिंडा आणि तमाशा लोकनाट्यासाठी डॉ. हरिश्चंद्र प्रभाकर बोरकर या अमृत पुरस्कारप्राप्त मान्यवरांचाही सत्कार यावेळी करण्यात येणार आहे.

भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सव

पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे 2 फेब्रुवारी ते 4 फेब्रुवारी दरम्यान भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सवाचे आयोजनही करण्यात आले आहे. गुरुवारी 2 फेब्रुवारी रोजी बेगम परवीन सुलताना आणि पं. जयतीर्थ मेवुंडी यांचे गायन होणार आहे. शुक्रवारी 3 फेब्रुवारी रोजी वि. आरती अंकलीकर, वि. सानिया पाटणकर, विराज जोशी यांचे गायन होणार आहे. तर पं. उद्धव आपेगांवकर आणि पं. पुष्कराज कोष्टी यांचे वादन होणार आहे. शनिवारी 4 फेब्रुवारी रोजी पं. राजा काळे, डॉ. आशिष रानडे आणि पं. कैवल्यकुमार गुरव यांचे गायन तर वि. कला रामनाथ यांचे वादन होणार आहे.

व्यापाराकडे दुर्लक्ष: जीतो पुणेतर्फे आयोजित चर्चेत मान्यवरांचे मत

पुणे-केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज २०२३-२४ वर्षासाठीचा केंद्र सरकारचा अर्थसंकल्प सादर केला. प्राप्ती कर ७ लाख रुपयांच्या पुढे आकारण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेऊन या सरकारने मध्यम वर्गीयांना मोठा दिलासा दिला आहे. त्यासोबतच स्टार्टअप, पंतप्रधान निवास योजना, रेल्वे, भरड धान्य, ई-गव्हर्नन्स, पर्यटनावर सरकारने चांगले लक्ष दिले आहे. हा अर्थसंकल्प भविष्यातील भारताची पायाभरणी करणारा असल्याचे मत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केले. मात्र, या अर्थसंकल्पात पारंपरिक व्यापार टिकवण्याच्या दृष्टीकोनातून आवश्यक ती पावले उचलली नाहीत, असेही मत व्यक्त करण्यात आले.

जीतो पुणे च्या वतीने केंद्रीय अर्थसंकल्पाचे थेट प्रक्षेपण आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबतच्या चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जीतो श्रमन आरोग्यमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विजय भंडारी, जीतो पुणेचे अध्यक्ष राजेश सांकला, माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जीतो रोमचे अध्यक्ष अजित सेठिया, जीतो पुणेचे मुख्य सचिव चेतन भंडारी, उपाध्यक्ष मनोज छाजेड, सीए सुहास बोरा, मिलेट मिशन इंडियाच्या प्रमुख शर्मिला ओसवाल, क्रेडाईचे शांतीलाल कटारिया, पूना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया, पुणे व्यापारी महासंघाचे सचिव महेंद्र पितळिया, हॉटेल संघटनेचे गणेश शेट्टी, सीए मंगेश कटारिया, सीए सुदीप छल्लाणी आदी मान्यवर उपस्थित होते.

विजय भंडारी (राष्ट्रीय उपाध्यक्ष, जीतो श्रमण आरोग्यम)
सर्वसामान्य आणि मध्यम वर्गीयांना दिलासा देणारा हा अर्थसंकल्प आहे. यामध्ये विशेषतः स्टार्टअपवर चांगले लक्ष दिले आहे. भारत हा जगातला तिसरा देश आहे जो स्टार्टअपमध्ये विकास करत आहे. त्याचबरोबर पर्यटन क्षेत्राचा विकास करण्यासाठी केंद्र सरकारने विशेष लक्ष दिल्याचं या अर्थसंकल्पात दिसत आहे. देशातील 50 ठिकाणं पर्यटनाच्या दृष्टीकोनातून विकसित करण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली आहे. हे वर्ष रोजगारासाठी आव्हानात्मक ठरणार आहे. बांधकाम व्यवसायाकडे यंदाच्या अर्थसंकल्पात विशेष लक्ष दिलेले नाही. परंतु, पुढील दहा वर्षाचा रोडमॅप कसा असेल, हे या अर्थसंकल्पातून दिसून आले. भविष्याच्या दृष्टीकोनातून विकसित होत असलेल्या क्षेत्राकडे केंद्र सरकार गांभिर्याने पाहात असल्याचे दिसून आले. एकूणच यावर्षीचा अर्थसंकल्प भविष्याची पायाभरणी करणारा आहे.

राजेश सांकला (अध्यक्ष, जीतो पुणे)
प्राप्तीकरामध्ये सरकारने थोडातरी फायदा दिला आहे. अर्थसंकल्पात केंद्र सरकारने गरजेच्या ठिकाणी गुंतवणूक केली आहे. २०१४ ते २०१९ पर्यंत वेगळे धोरण आणि आता वेगळे धोरण राबवले आहे. पीएम हौसिंग योजनेला ८० हजार कोटी रुपये दिले. ६० टक्क्यांनी बजेट वाढवले आहे. जवळपास २.५ लाख कोटी रुपये रेल्वेसाठी दिले. त्याचबरोबर आदिवासी समाजावर लक्ष केंद्रित केले आहे. घरातल्या अर्थसंकल्पाला आपल्याला एक दिवस लागतो मात्र, देशाचा अर्थसंकल्प दिड तासात ऐकला. शेतकऱ्यांवर केलेल्या गुंतवणुकीचा फायदा उद्या व्यापाऱ्यांनाच होणार आहे.

चंद्रकांत दळवी (माजी विभागीय आयुक्त)
पर्यटनाला या अर्थसंकल्पात प्राधान्य देण्यात आले आहे ही खूप चांगली गोष्ट आहे. दुसरा देश पाहण्याबरोबरच आपला देश देखील पाहा ही मोदींची संकल्पना चांगली आहे. एकूणच हे बजेट संतुलित आहे. पायाभूत सुविधांमध्ये ग्रामीण विकासाकरिता दुर्लक्ष झाल्याचे दिसते. तर शहरी भागात लक्ष केंद्रित केले आहे. पंतप्रधान आवास योजनेसाठी ६६ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. शेतकरी तारण योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

अजित सेठिया (अध्यक्ष, जीतो रोम)
हे बजेट पुढील दहा वर्षांचा विचार करून सादर केले आहे. व्यापारासाठी सरकारने कायदेशीर तरतुदींमध्ये सवलती दिल्या. एमएसएमईच्या माध्यमातून कर्जाची सवलत एक वर्षाकरिता वाढवली आहे. व्यापाऱ्यांच्या काही अपेक्षा या बजेटमध्ये अपूर्ण राहिल्या.

चेतन भंडारी (मुख्य सचिव, जीतो पुणे)
भविष्याची पायाभरणी करणारा अर्थसंकल्प केंद्र सरकारने आज सादर केला. पुढील दहा वर्षांचे नियोजन या अर्थसंकल्पात दिसते. नवीन क्षेत्राकडे केंद्र सरकारने लक्ष दिले असून पर्यटन क्षेत्रात येणाऱ्या काळात सर्वाधिक उलाढाल वाढेल. स्टार्टअपला केंद्र सरकार विशेष प्राधान्य देत असल्याचे या अर्थसंकल्पावरून दिसून येते.

मनोज छाजेड (उपाध्यक्ष, जीतो पुणे)
प्राप्तीकराची मर्यादा ५ लाखांहून ७ लाखांवर आली त्यामुळे सर्वसामान्य व मध्यम वर्गाला त्याचा लाभ होणार आहे. सर्वोच्च करदात्यासाठीही चांगले पाऊल उचलले आहे. या निर्णयाचा फायदा देशातील सर्वाधिक लोकांना होणार असल्याने त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होईल. पर्यटन क्षेत्राकडे लक्ष दिल्यामुळे या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होतील.

शर्मिला ओसवाल (प्रमुख, मिलेट्स इंडिया मिशन)
आजचा अर्थसंकल्प अत्यंत सुखदायक आहे. भरड धान्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये खूप तरतुदी आहेत ज्यामुळे शेतकरी भरड धान्याकडे वळतील. यामध्ये कृषी स्टार्टअपसाठी देखील लक्ष दिले आहे. भरड धान्य, कृषीक्षेत्र यामध्ये युवा पिढीला संधी असणार आहे. त्याचबरोबर सर्वसमावेशक वाढ करण्यात आली आहे. शेतकरी, व्यापारी आणि नागरिक यांना लक्षात घेऊन हा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पामुळे भारतीय धान्याला नक्कीच वाव मिळेल.

शांतीलाल कटारिया (क्रेडाई)
आजचा अर्थसंकल्प विकासाच्या दृष्टीने संतुलित आहे. परंतु व्यापारी क्षेत्राकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. प्रधानमंत्री आवास योजना ही ७९ हजार कोटींची केली. आमच्या मागण्यांकडे मात्र दुर्लक्ष केले गेले. पुढच्या वर्षीतरी या मागण्या पूर्ण होतील अशी अपेक्षा आहे. या अर्थसंकल्पामध्ये विकासावर भर देण्यात आला आहे.

राजेंद्र बाठिया (अध्यक्ष, दि पूना मर्चंट्स चेंबर)
सर्वसामान्यांना दिलासा देणारा हा अर्थसंकल्प आहे. भारताच्या विकासाच्या दृष्टीने उत्कृष्ट असा हा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पामधून शेतकऱ्याला दिलासा दिला गेलाय. या अर्थसंकल्पामुळे सर्वसामान्यांची शक्ती वाढणार व त्यातून सर्वांची ताकद देखील वाढेल.
या अर्थसंकल्पामध्ये व्यापाराच्या दृष्टीकोनातून काही गोष्टी अपेक्षित होत्या त्या झाल्या नाहीत.

महेंद्र पितळिया (सचिव, पुणे व्यापारी महासंघ)
शेतकऱ्यांसाठी व मध्यमवर्गीयांसाठी या अर्थसंकल्पाचे वर्णन करता येईल. व्यापारी वर्गासाठी कोणतीही करवाढ नाही हा दिलासा आहे. व्यापारी वर्गाला काहीतरी उत्सववर्धक घोषणा अपेक्षित होती ती झाली नाही. दैनंदिन वापरातील वस्तू स्वस्त झाल्या ही चांगली बाब आहे.

गणेश शेट्टी (हॉटेल संघटना)
आजचा अर्थसंकल्प सर्वसामान्यांसाठी चांगला आहे. उद्योगांना जे फायदे मिळाले ते हॉटेल व्यावसायिकांना मिळाले नाहीत. महाराष्ट्र सरकारने जर अंमलबजावणी केली असती तर इतर राज्यांसारखा महाराष्ट्रालाही फायदा झाला असता. सरकार भारताला 2028 पर्यंत पर्यटन क्षेत्र घोषित करणार आहे परंतु ते हॉटेल व्यावसायिकांना सोडून होणार नाही. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना दुर्लक्षित करू नये.

सुहास बोरा (चार्टर्ड अकाऊंटंट)
आजचा अर्थसंकल्प सर्वसामान्यांसाठी आणि मध्यमवर्गीय लोकांसाठी दिलासादायक आहे. प्राप्तीकर विभागाचे स्लॅब कमी होण्याची अपेक्षा होती मात्र, सरकारने यात थोडा फार प्रयत्न केला आहे. कार्पोरेट कर आणि भागीदारी कर कमी होईल वाटले परंतु ती अपेक्षा पूर्ण झाली नाही. एकूणच मध्यमवर्गीयसाठी आनंददायी अर्थसंकल्प आहे.

मंगेश कटारिया व सुदीप छल्लाणी (चार्टर्ड अकाउंटंट)
अर्थसंकल्पात सर्वांनाच खुश करता येत नाही. मात्र, देशाची भविष्यातील वाटचाल कशी राहणार हे या अर्थसंकल्पातून दिसून येते. पर्यटन, स्टार्टअप्स, ग्रीन एनर्जी, भरड धान्य असे अनेक नवीन क्षेत्र आहेत ज्यावर सरकारने लक्ष दिले आहे. येणाऱ्या काळात या क्षेत्रात गुंतवणूक वाढलेली दिसेल. सर्वांचे विचार पाहता हे बजेट नक्कीच चांगले होते.

नाट्य परीक्षण समितीची पुनर्रचना

मुंबई, दि. 1 : नवीन नाट्यनिर्मितीसाठी अनुदान योजनेअंतर्गत नाट्य परीक्षण समितीची पुनर्रचना करण्यात आली असून 23 अशासकीय सदस्यांचा यात समावेश करण्यात आला आहे.

या समितीमध्ये अरुण नलावडे, मुकुंद चितळे, विश्वास सोहोनी, शिल्पा नवलकर, विक्रम भागवत, प्रल्हाद जाधव, किरण यज्ञोपावित, रवींद्र खरे, राजन ताम्हाणे, शिवराय कुलकर्णी, राजेश चिटणीस, शैला सामंत, प्रो. वर्षा भोसले, वीरभद्र स्वामी, अभिराम भडकमकर, कुमार सोहोनी, शीतल तळपदे, स्वरुप खोपकर, अरुण होर्णेकर, सविता मालपेकर, अनिल गवस, सुनील बर्वे, सुधाकर गिते हे अशासकीय सदस्य असतील. सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक हे या समितीचे सदस्य सचिव असतील.

नाटकांचे परीक्षण हे तज्ज्ञांमार्फतच करण्यात येणार असून प्रशासकीय अधिकारी असणाऱ्या संचालकांना नाटकांचे परीक्षण करण्याचे अधिकार नसतील. या समितीचा कार्यकाळ पुढील तीन वर्षे किंवा समितीची पुनर्रचना होणे यापैकी जे अगोदर होईल तोपर्यंत असेल. नाट्य परीक्षण समितीमधील सदस्य अनुदानासाठी अर्ज केलेल्या नाटकाच्या लेखन, दिग्दर्शन, अभिनय, तंत्रज्ञ, संगीत किंवा अन्य बाबींशी संबंधित असल्यास त्या सदस्यास संबंधित नाटकाचे परीक्षण करता येणार नाही. नाटकाचे परीक्षण करण्यासाठी 23 सदस्यांपैकी किमान 11 सदस्यांची गणसंख्या असणे आवश्यक राहील.

ही समिती व्यावसायिक, संगीत आणि प्रायोगिक नाटकांचे परीक्षण करणार आहे.

अदानी समूहाने फॉरेन्सिक ऑडिटला सामोरे जावे!

गेल्या सप्ताहात दि. २६ जानेवारी रोजी आपण ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा करीत असताना अमेरिकेतील एका संशोधन कंपनीने कोट्यावधी रुपये कमावत भारतातील अदानी उद्योग समूहाचे वस्त्रहरण करण्याचा उद्योग केला. यानंतर दोघांनीही एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप सुरु ठेवले. यामुळे शेअर बाजारात दाणादाण झाली. या भानगडीचा हा धांडोळा.

अमेरिकेतील न्यूयॉर्कस्थित हिंडेनबर्ग  रिसर्च ही शेअर बाजारात संशोधन करणारी कंपनी.  नाथन अँडरसन हा त्यांचा प्रमुख.  विविध कंपन्या, उद्योग समूह यांचा अभ्यास करून त्यांचे दोष किंवा वैगुण्य शोधून ते चव्हाट्यावर आणण्याचे काम ही कंपनी करते. यात त्यांचा प्रमुख उद्देश केवळ बक्कळ नफा, पैसा कमवणे एवढाच असतो. एखादी कंपनी किंवा उद्योग समूहाचा  अभ्यास करायचा आणि त्याचा अहवाल प्रकाशित करून शेअर बाजारात त्या कंपन्यांचे शेअर्स किंवा कर्जरोखे ” शॉर्ट सेल”  पद्धतीने विकून नफा मिळवायचा.  “शॉर्ट सेल” म्हणजे  एखाद्या कंपनीचे शेअर्स हातात नसताना बाजारात विकायचे आणि घसरलेल्या भावात त्याची खरेदी करायची व घबाड कमवायचे. आजवर त्यांनी असेच पैसे कमावले.

बुधवार दि.२५ जानेवारी रोजी त्यांनी  अदानी उद्योग समूहाचा अहवाल प्रसिद्ध करून  वॉल स्ट्रीट शेअर बाजारात शॉर्ट सेलचा उद्योग केला व मोठे घबाड मिळवले. त्यावेळी अदानी समूहाचे भांडवली मूल्य तब्बल 70 बिलियन डॉलर्स खाली गेले. याचा घडामोडींचा परिणाम  भारतीय शेअर बाजारावर होणे स्वाभाविक होते.  प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीमुळे 26 जानेवारी रोजी  व्यवहार झाले नाहीत. मात्र दि. २७ जानेवारी रोजी भारतीय शेअर बाजारात प्रचंड दाणदाण उडाली. येथील गुंतवणूकदारांनीही नाथन अँडरसन प्रमाणे शॉर्ट सेल केले. परिणामतः अदानी उद्योग समूहातील नऊ नोंदणीकृत कंपन्यांचे शेअर्स अभूतपूर्व कोसळले.  ही घसरण इतकी प्रचंड होती की  गौतम अदानी या श्रीमंत व्यक्तीची मालमत्ता कोट्यावधी रुपयांनी नष्ट झाली.  जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेली व्यक्ती दोन दिवसात सतत खाली खाली   जात आहे. यामध्ये परदेशातील तसेच भारतातील शेकडो गुंतवणूकदारांचे, बँकांचे कागदोपत्री प्रचंड नुकसान झाले. 

भारताच्या उद्योग क्षेत्रामध्ये गेल्या दहा वर्षात अदानी उद्योग समूहाचा  मोठा बोलबाला आहे. रिलायन्स प्रमाणेच या  उद्योग समूहात हजारो देश परदेशातील गुंतवणूकदारांनी, तसेच सार्वजनिक क्षेत्र, खाजगी बँकांनी, वित्त संस्थांनी गुंतवणूक केलेली आहे. हिंडेनबर्ग कंपनीने त्यांच्या अहवालात अदानी उद्योग समूहावर अनेक गंभीर आरोप केलेले आहेत. या समूहाने बाजारात कृत्रिम रित्या त्यांच्या शेअर्सचे, कर्जरोख्यांचे भाव अविश्वसनीय पातळीवर नेले व अभूतपूर्व गैरव्यवहार केल्याचा आरोप केला. हिंडेनबर्ग  अहवालाची ही वेळ इतकी चपखल किंवा योगायोगाची होती की दि. 30 जानेवारीपासून अदानी एंटरप्राईजेस कंपनीची भारतात समभाग विक्री खुली होणार होती. या कंपनीने केवळ एक रुपया दर्शनी मूल्य असलेला शेअर तब्बल ३११२ ते ३२७६ रुपयांना विकण्याचे जाहीर केले होते. गेल्या तीन वर्षात या शेअरची किंमत ११०४ रुपयांवरून २३१७ रुपयांवर गेले. मुळातच या शेअरची एवढी लायकी  किंवा ताकद नसताना त्याचा भाव कृत्रिम रित्या वाढवण्याचा आरोप या अहवालात केला आहे. अर्थात अदानी उद्योग समूहाचे एवढे वस्त्रहरण झाल्यानंतर ते गप्प बसतील अशी शक्यता नव्हतीच. त्यांनी  त्याला ४१३पानांचे उत्तर दिले. हे उत्तर देताना भारतीयत्वाचा झेंडा  अंगाभोवती लपेटला. आपला उद्योग समूह हा देशासाठी काम करत असून परदेशी कंपनीने केलेले आरोप फेटाळून लावले. हिंडेनबर्गचा प्रत्येक आरोप हा खोटा आहे. हा अहवाल तथ्यहीन आहे असेही म्हटले. उलट त्यांनीच शॉर्ट सेल करून मोठा गैरव्यवहार केला व एक प्रकारे भारतावर हल्ला केला असा प्रति आरोप केला.

परंतु हिंडेनबर्गने अदानी समूहाचा अहवाल फेटाळून राष्ट्रीयत्वाचा बुरखा घालून गैरव्यवहार, आर्थिक गैरव्यवहार झाकता येणार नाही असे प्रत्युत्तर दिले. सध्या तरी मोठा गुंतवणूकदार वर्ग नेमका कोणाच्या बाजूने आहे स्पष्ट होत नाही. परंतु अदानी ची समभाग विक्री पूर्ण यशस्वी झाली..त्यांना अनेक भारतीय उद्योगांनी सहाय्य केले. दरम्यान अदानी समूहाच्या विविध कंपन्यांचे भांडवली मूल्य 20 टक्क्यांपेक्षा जास्त घसरलेले आहे. केवळ अदानी एंटरप्राइज या प्रमुख कंपनीमध्ये पाच टक्के भाव वाढ झालेली होती. नजीकच्या काळात या कंपन्या एकमेकांना न्यायालयात खेचतील, आरोप प्रत्यारोप करतील व काही काळाने  सर्व धुरळा  खाली बसेल.  अदानी उद्योग समूहाने भारतातील बँका, वित्त संस्था तसेच परदेशातील बँका यांच्याकडून प्रचंड कर्जे उभारलेली आहेत. त्यासाठी काही मालमत्ता तारण ठेवली असेल. त्यासाठी बाजारातील त्यांच्या शेअर्सच्या मूल्याचा आधार घेतला असे तर त्याची झालेली घसरण ही चिंताजनक आहे. यामुळे बँका, आयुर्विमा महामंडळ अडचणीत आले असे चुकीचे चित्र प्रसार माध्यमात निर्माण करण्यात आले.  एकंदरीतच आदानी समुहाचा देशातील व परदेशातील व्यवसाय त्यांची नफा क्षमता आणि त्यात गुंतवणूक करणाऱ्या संस्था याबाबत पारदर्शकता नाही व गोंधळाचे चित्र निर्माण झालेले आहे.   अदानी समूहाची गेल्या काही वर्षात झालेली अचंबित करणारी प्रगती, त्याचबरोबर कंपनीने देशभरात निर्माण केलेली बंदरे, अत्याधुनिक विमानतळे आणि अनेक सुविधा देशाच्या समोर आहेत.

यामुळे सेबी, कंपनी लॉ बोर्ड, प्राप्तीकर खाते, गुन्हे अन्वेषण यंत्रणा यांनी वेळीच पाऊले टाकून जनसामान्यांपुढे याबाबतची वस्तुस्थिती मांडण्याची गरज आहे. हिंडेनबर्गने  तर अदानी समूहाला अमेरिकेत खटला भरून दाखवा असे आव्हान दिलेले आहे. अदानी ग्रुप असे  धाडस करणार नाही हे सर्वांना माहीत आहे कारण त्यात त्यांचीच शंभर टक्के जिरण्याची शक्यता आहे. कारण कागदपत्रे बोलतात. गेल्या ५ वर्षातील हिंडेनबर्ग कंपनीचा आढावा घेतला तर त्यांनी ३४ वेळा हा उद्योग केला.त्यातील २९ वेळा घबाड मिळवले,. केवळ चार वेळाच त्यांचा अंदाज चुकलेला होता.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे अदानी समूहात मोठ्या वित्तसंस्था,बँका ,
म्युच्युअल फंड यांची गुंतवणूक मोठी आहे. छोटा किंवा किरकोळ  गुंतवणूकदार कमी आहे. एकंदरीत कोणाचे तरी नुकसान होऊ शकते. तसेच प्रवर्तकांकडे सुद्धा मोठ्या प्रमाणावर शेअर्स आहेत.कोणताही विचार न करता, कंपनीचा अभ्यास न करता त्यात गुंतवणूक करणारा गुंतवणूकदार हा सट्टा करणारा असल्यामुळे त्याबद्दल सहानुभूती बाळगणे योग्य होणार नाही. त्यांच्या हावरटपणाला बसलेली ही चपराक आहे.अदानी म्हणजे मोदी आणि मोदी म्हणजे अदानी असा  ग्रह करून घेणाऱ्या सर्व विरोधी पक्षांना सध्या आनंदाच्या उकळ्या फुटल्या आहेत. मोदी सरकार बरोबर असलेले अदानी समूहाचे संबंध हा केवळ चर्चेचाच नाही तर चेष्टेचाही विषय  व्हॉट्सअप विद्यापीठातून झाला. स्वातंत्र्यानंतर आजवर सर्व राजकीय पक्षांनी धनाड्य उद्योजकांचा आधार घेतला. त्यामुळेच  मोदींविरोधी मंडळी या घडामोडीचे राजकीय भांडवल करत आहेत. ते योग्य का अयोग्य हे काळ ठरवेल.  अदानी समूहाने गैरव्यवहार केला असेल किंवा बेकायदेशीर प्रक्रिया राबवली असेल तर त्याची समर्थन कोणीही करणार नाही. अजूनही अदानींचा फुगा पूर्णपणे फुटलेला नाही. समभाग विक्री सुद्धा अपेक्षेप्रमाणे झाली.तरीपण सर्वसामान्यांच्या मनातील संभ्रम शंका कुशंका यांना उत्तर मिळालेले नाही. यावर एकच पर्याय म्हणजे अदानी समूहाने आपण होऊन फॉरेन्सिक ऑडिट करून घ्यावे किंवा केंद्र सरकारने तपास संस्थान मार्फत ते करून दूध का दूध व पाणी का पाणी केले तरच देशातील गुंतवणूकदारांमध्ये विश्वास निर्माण होऊ शकेल याच शंका नाही. आजवर देशात हर्षद मेहता सत्य व्हिडिओकॉन यासारखे मोठे आर्थिक गैरव्यवहार झाले. अदानी समूहाच्या रुपाने त्याची पुनरावृत्ती टाळावयाची असेल तर फॉरेन्सिक ऑडिट हा एकमेव पर्याय आहे तो केंद्राने व अदानी समूहाने अंमलात आणला तर जास्त योग्य ठरेल.

लेखकप्रा. नंदकुमार काकिर्डे

(लेखक पुणेस्थित अर्थविषयक ज्येष्ठ पत्रकार आहेत)

बजेटवर नाना पटोले म्हणाले.., आकर्षक घोषणा, आकड्यांचा खेळ अन्..गुलाबी स्वप्ने ….

मुंबई : आकर्षक घोषणा, अलंकारिक शब्द, आकड्यांचा खेळ आणि गुलाबी स्वप्ने यापलीकडं अर्थसंकल्पात काहीही ठोस नसल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलीय. आज अर्थसंकल्पीय अधिवेशात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी बजेट सादर केलंय.

पटोले म्हणाले, अर्थसंकल्पात घोषणा करायच्या पण प्रत्यक्षात अंमलबजावणी नाही. ही मोदी सरकारची कार्यपद्धती आहे. अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा याच कार्यपद्धतीचा भाग असल्याचंही त्यांनी म्हंटलंय.

तसेच अर्थसंकल्पात महागाई, शेतमालाला किमान आधारभूत किंमत या ज्वलंत प्रश्नावर चकार शब्दही अर्थमंत्र्यांनी काढलेला नाही. देशातील जनतेची घोर निराशा करण्याचे काम केंद्र सरकारने केलं असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटंलय.

त्याचप्रमाणे, राजस्थान, हिमाचल प्रदेश, छत्तीगडमध्ये काँग्रेस सरकारांनी जुनी पेन्शन योजना लागू केल्यामुळे दबावात केंद्र सरकारने आयकरात 50 हजाराची सवलत दिली, पण ती घोषणा फसवी असल्याचं त्यांनी म्हंटलंय. पण ती घोषणाही फसवीच आहे.

नव्या आयकर योजनेनूसार ज्यांचे उत्पन्न 10 लाख रुपये आहे, त्यांच्यावर 13 हजार रुपयांचा बोजा पडणार आहे. या योजनेत गृहकर्जावरील आयकर लाभ, 80C, 80D, 24B या कलमान्वये मिळणारी कोणतीही सवलत मिळणार नसल्याचंही त्यांनी म्हंटलंय.

अर्थसंकल्पात महिलांच्या बचतीवर जास्ती व्याजदराचे आणि सवलतीचे आमिष दाखवणे ही भाजपची घोर फसवणूक असून सरकारने एलपीजी सिंलिंडरची किंमत आणि महागाई कमी करण्यासंदर्भात काही उपाययोजनांची घोषणा केली पाहिजे होती, असंही नाना पटोलेंनी स्पष्ट केलंय.

मनरेगासाठीची तरतूद 1 लाख 10 हजार कोटी रूपयांवरून 60 हजार कोटी रूपयांवर आणली आहे. तर शिक्षण आणि आरोग्यावरील तरतूदीत काहीही वाढ केलेली नसल्याचंही पटोलेंनी म्हंटलंय.

सर्वसामान्य जनतेला या अर्थसंकल्पात डिझेल, पेट्रोलचे दर कमी होतील अशी अपेक्षा होती, मात्र, सरकारने सर्वसामान्य जनतेची घोर निराशा केलीय. सर्वाधिक कर महाराष्ट्र केंद्राला देतो, मात्र या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काहीच मिळालेले नसल्याचंही ते म्हणालेत.

दरम्यान, या अर्थसंकल्पातून अल्पसंख्यांक, दलित, आदिवासी, शेतकरी, कष्टकरी, कामगार नोकरदार, तरूण, महिला यांच्यासह मध्यमवर्गाचीही घोर निराशा केली आहे.

लोककलावंतांच्या कलापथकांना भांडवली, प्रयोगासाठी अनुदान मंजूर करण्याऱ्या समितीचे पुनर्गठन

मुंबई, दि. 1 : महाराष्ट्रातील लोककला टिकून राहाव्यात, त्यांची पुढील पिढीला माहिती व्हावी आणि पारंपरिक लोककलांचे संवर्धन करण्यासाठी लोककलावंतांच्या कलापथकांना भांडवली/ प्रयोगासाठी राज्य शासनामार्फत अनुदान देण्यात येते. कलापथकांना भांडवली/ प्रयोगासाठी अनुदान मंजूर करण्याऱ्या समितीचे पुनर्गठन करण्यात आले आहे. ही समिती कलापथकांच्या अर्जाची छाननी करणे, त्यांची पात्रता तपासून अनुदान मंजूर करण्याचे काम करणार आहे.

पुनर्गठन केलेल्या समितीत तमाशासाठी मंगला बनसोडे आणि अतांबर शिरढोणकर, दशावतारासाठी देवेंद्र नाईक आणि तुषार नाईक मोचेमाडकर, खडीगंमतसाठी शाहीर अलंकार टेंभुर्णे आणि शाहीर वसंता कुंभारे, शाहिरीसाठी शाहीर अंबादास तावरे आणि धनंजय खुडे, लावणीसाठी रेश्मा मुसळे आणि छाया खुटेगांवकर यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक हे समितीचे अध्यक्ष असतील. या समितीचा कार्यकाळ पुढील तीन वर्षांसाठी किंवा समितीची पुनर्रचना होणे यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत असेल.

पर्यटन विकास महामंडळाच्या निवासात मिळणार तृणधान्यापासून तयार केलेले पदार्थ

मुंबई, दि. १ : संयुक्त राष्ट्र संघाने सन २०२३ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष’म्हणून जाहीर केले आहे. यानिमित्त महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळतर्फे राज्यभरातील पर्यटक निवासस्थानी तृणधान्य महोत्सवांचे आयोजन केले जाणार आहे. त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह मंत्रिमंडळातील सर्व सदस्य, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्या उपस्थितीत पौष्टिक तृणधान्य महोत्सवाचा ऑनलाईन शुभारंभ करण्यात आला.

तृणधान्यापासून तयार केलेले पदार्थ मिळणार

पर्यटन मंत्री श्री.लोढा म्हणाले की, बाजरी, ज्वारीच्या गरमागरम भाकरीसह, लसणाची चटणी आणि तृणधान्यापासून तयार केलेले विविध खाद्य पदार्थ आता महाराष्ट्र पर्यटन  विकास महामंडळाच्या पर्यटक निवासामध्ये मिळू शकणार आहेत. पौष्टिक तृणधान्यापासून तयार केलेले पदार्थ या निवासामध्ये उपलब्ध करून देण्याबाबतच्या सूचना व्यवस्थापनाला दिल्या आहेत.

पर्यटन मंत्री श्री.लोढा म्हणाले की, पौष्टिक तृणधान्य वर्षाच्या निमित्ताने राज्यात पौष्टिक तृणधान्य पिकांचे क्षेत्र व उत्पादनात वाढ करणे व या पिकांचे आरोग्यविषयक महत्त्व व आहारातील वापर वाढविण्याकरिता जनजागृती मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील,देशातील आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांना महाराष्ट्र राज्यातील पौष्टिक तृणधान्यांची माहिती होईल आणि याचा आहारात वापर व्हावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत राज्यात व राज्याबाहेरील ठिकाणीही या उपक्रमांचे वर्षभर आयोजन केले जाणार आहे. एमटीडीसीमार्फत महाराष्ट्र ‘मिलेट मिशन’ अंतर्गत तृणधान्यांपासून तयार केलेल्या  पदार्थांचे प्रात्यक्षिक व विक्री करणाऱ्या दालनाचे मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात उभारण्यात आले असून त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. तृणधान्य पदार्थ महोत्सव, दिल्ली हाट येथे पौष्टिक तृणधान्यांची पदार्थ विक्री, पर्यटक निवास औरंगाबाद येथे हुरडा महोत्सव, भंडारदरा, ग्रे पार्क नाशिक  येथे नाचणी महोत्सव, एमटीडीसी उपाहरगृह महाबळेश्वर, अजिंठा फूट हील, लोणार, बोधलकसा, ग्रेप पार्क, तारकर्ली आणि गणपतीपुळे येथील पर्यटक निवासस्थानी या महोत्सवांचे आयोजन केले जाणार आहे. पर्यटकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन पर्यटन मंत्री श्री. लोढा यांनी केले आहे.

या ऑनलाईन शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी पर्यटन विभागाचे सचिव सौरभ विजय, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी, पर्यटन संचालक बी.एन.पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल यावेळी उपस्थित होते.

महामंडळाच्या स्टॉलला उत्स्फूर्त प्रतिसाद

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात  हॉटेल मॅनेजमेंट दादर, मुंबई यांनी पौष्टिक तृणधान्यापासून तयार केलेल्या पदार्थांचा स्टॉल लावला होता.या स्टॉलमध्ये या विद्यार्थ्यांनी तृणधान्यापासून बनविलेल्या चिपोतले राजमा मिश्र मिलेट टाकोज,काळा वाटाणा सांबर आणि मिलेट्स वडे, बाजरी नाचणी कुरमुरे भेळ पुरी, वरी तांदूळ आणि साबुदाणे वडे,ज्वारी बदाम पिस्ता कुकीज,नाचणी चोको चिप्स, कुकीज, आले – ओवा – बाजरी – खाऱ्या कुकीज या पदार्थांचा समावेश होता. गेले दोन दिवस लागलेल्या या स्टॉलमध्ये मंत्रालयातील अधिकारी,कर्मचारी व अभ्यागत यांनी या पदार्थांची चव चाखली.

केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24ची ठळक वैशिष्ट्ये..वाचा तर खरे …

नवी दिल्‍ली, 1 फेब्रुवारी 2023

केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहारमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 सादर केला. या अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्ये खालील प्रमाणे आहेत:

भाग अ

  • सुमारे 9 वर्षांमध्ये दरडोई उत्पन्न दुपटीपेक्षा जास्त होऊन ते ₹ 1.97 लाखांवर पोहोचले आहे.
  • गेल्या 9 वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेच्या आकारमानात वाढ झाली असून ती जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांच्या यादीत 10व्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर पोहोचली आहे.
  • ईपीएफओ सदस्यसंख्या दुपटीपेक्षा जास्त होऊन 27 कोटींवर पोहोचली आहे.
  • 2022 मध्ये यूपीआयच्या माध्यमातून 126 लाख कोटी रुपयांचे  7,400 कोटी डिजिटल पेमेंट्स झाले आहेत.
  • स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 11.7 कोटी घरगुती शौचालयांची उभारणी करण्यात आली आहे.
  • उज्ज्वला अंतर्गत 9.6 कोटी एलपीजी जोडण्या देण्यात आल्या आहेत.
  • 102 कोटी व्यक्तींचे 220 कोटी कोविड लसमात्रांनी लसीकरण.
  • 47.8 कोटी पीएम जनधन बँक खाती.
  • पीएम सुरक्षा विमा आणि पीएम जीवन  ज्योती अंतर्गत 44.6 कोटी व्यक्तींना विमा संरक्षण.
  • पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत 11.4 कोटी शेतकऱ्यांकडे 2.2 लाख कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित.
  • अर्थसंकल्पाचे सात प्राधान्यक्रम ‘सप्तर्षी’ आहेत समावेशक विकास, शेवटच्या मैलावरील व्यक्तीपर्यंत पोहोचणे, पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक, क्षमतेचा सुयोग्य वापर, हरित विकास, युवा ऊर्जा आणि वित्तीय क्षेत्र.
  • उच्च मूल्याच्या फळपिकांच्या लागवडीसाठी रोगमुक्त, दर्जेदार लागवड सामग्रीची उपलब्धता वाढवण्यासाठी 2200 कोटी रुपये खर्चाचा आत्मनिर्भर स्वच्छ रोप/लागवड कार्यक्रम.
  • 2014 पासून स्थापन झालेल्या सध्या अस्तित्वात असलेल्या 157 वैद्यकीय महाविद्यालयाच्या जवळच्या भागात 157 नवीन परिचारिका महाविद्यालयांची स्थापना करणार.
  • पुढील 3 वर्षात 3.5 लाख आदिवासी विद्यार्थी शिकत असलेल्या 740 एकलव्य आदर्श निवासी शाळांमध्ये केंद्र सरकार 38,800 शिक्षक आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांची भरती करणार.
  • पीएम आवास योजनसाठीच्या खर्चाच्या आराखड्यात  66% वाढ करून तो 79,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त करण्यात येत आहे.
  • रेल्वेसाठी 2.40 लाख कोटी रुपयांच्या भांडवली खर्चाची तरतूद करण्यात आली आहे, 2013-14 मध्ये करण्यात आलेल्या तरतुदीपेक्षा सुमारे नऊ पट जास्त आणि आतापर्यंतची सर्वोच्च तरतूद आहे.
  • शहरी पायाभूत सुविधा विकास निधी (UIDF) प्राधान्यक्रमाच्या कर्जातील तफावतीच्या वापराच्या माध्यमातून स्थापन करण्यात येईल, ज्याचे व्यवस्थापन राष्ट्रीय गृहनिर्माण बँक करेल आणि द्वितीय आणि तृतीय श्रेणीच्या शहरांमध्ये शहरी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी सार्वजनिक संस्थांकडून त्याचा वापर केला जाईल.
  • एमएसएमई, मोठे व्यवसाय आणि धर्मादाय संस्थांना आपली कागदपत्रे सुरक्षितपणे ऑनलाईन साठवण्यासाठी आणि देवाणघेवाण करण्यासाठी एन्टिटी डिजिलॉकरची उभारणी करणार.
  • नव्या संधी, व्यवसायाची मॉडेल्स आणि रोजगाराच्या क्षमता निर्माण करण्यासाठी 5जी सेवा आधारित एप्लिकेशन्स विकसित करण्यासाठी 100 प्रयोगशाळा उभारणार.
  • चक्राकार अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी गोबरधन( गॅल्वानायजिंग ऑरगॅनिक बायो-ऍग्रो रिसोर्सेस धन) अंतर्गत एकूण 10000 कोटी रुपये गुंतवणुकीद्वारे नवी 500 ‘ वेस्ट टू वेल्थ’ संयंत्रे उभारणार. नैसर्गिक आणि बायोगॅसचे विपणन करणाऱ्या सर्व संस्थांसाठी 5 टक्के कॉम्प्रेस्ड बायो गॅस मॅन्डेट सुरू करणार.
  • पुढील तीन वर्षात 1 कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचा अंगिकार करण्यासाठी केंद्र सरकार सुविधा पुरवणार. यासाठी राष्ट्रीय पातळीवरील सूक्ष्म-खते आणि कीटकनाशके उत्पादन जाळे तयार करून 10,000 बायो-इनपुट संसाधन केंद्रे उभारणार, 
  • पुढील तीन वर्षात कोडिंग, एआय, रोबोटिक्स, मेकॅट्रॉनिक्स, आयओटी, थ्रीडी प्रिंटिंग, ड्रोन्स आणि सॉफ्ट स्किल्स यांसारख्या नव्या युगातील अभ्यासक्रमांचा समावेश असलेली प्रधानमंत्री कौशल विकास योजना 4.0 सुरू करण्यात येणार.
  • युवा वर्गाला आंतरराष्ट्रीय संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध राज्यांमध्ये 30 स्किल इंडिया आंतरराष्ट्रीय केंद्रांची स्थापना करण्यात येणार.
  • कोषामध्ये 9000 कोटी रुपयांची भर घालून एमएसएमईसाठी नव्याने तयार केलेली पत हमी योजना सुरू करणार जी योजना एक एप्रिल 2023 पासून लागू होईल. या योजनेमुळे 2 लाख कोटी रुपयांचे अतिरिक्त तारणविरहित कर्ज उपलब्ध होईल आणि आणि कर्जाच्या खर्चात देखील सुमारे 1 टक्क्याने कपात होईल.
  • कंपनी कायद्यांतर्गत  क्षेत्र अधिकाऱ्याकडे भरलेल्या विविध फॉर्म्सच्या केंद्रीय हाताळणीच्या माध्यमातून कंपन्यांना जलद प्रतिसाद मिळावा या उद्देशाने सेंट्रल प्रोसेसिंग सेंटर स्थापन करण्यात येणार.
  •  ज्येष्ठ नागरिकांना ठेवी जमा करण्याच्या कमाल मर्यादेत वाढ करून ही मर्यादा 15 लाख रुपयांवरून 30 लाख रुपये करण्यात येणार.
  • लक्ष्यनिर्धारित वित्तीय तूट 2025-26 पर्यंत 4.5% च्या खाली राहील.
  • ग्रामीण भागातील युवा उद्योजकांना कृषी स्टार्ट अप्स सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देण्याकरता ऍग्रीकल्चर ऍक्सलरेटर फंडची स्थापना करणार.
  • भारताला ‘श्री अन्न’ चे जागतिक केंद्र बनवण्यासाठी हैदराबादच्या भारतीय भरडधान्य संशोधन संस्थेला आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वोत्तम पद्धती, संशोधन आणि तंत्रज्ञान सामायिक करण्यासाठीचे केंद्र म्हणून तयार करण्यासाठी सहाय्य केले जाईल.
  • पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसायासाठी 20 लाख कोटी रूपये कृषी कर्जाचे लक्ष्य
  • मच्छीमार, मासे विक्रेते आणि सूक्ष्म आणि लघु उद्योगांच्या उपक्रमांच्या अधिकाधिक सक्षमीकरणासाठी, मूल्य साखळी कार्यक्षमता सुधारणे आणि बाजारपेठेचा विस्तार करणे यासाठी 6,000 कोटी रूपयांच्या लक्ष्यित गुंतवणुकीसह पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेची नवीन उप-योजना सुरू केली जाईल.
  • शेतीसाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा खुली संसाधने, खुली मानके आणि इंटरऑपरेबल पब्लिक गुड म्हणून तयार केल्या जातील, त्यामुळे शेतकरी केंद्रित समावेशक उपाय आणि कृषी तंत्रज्ञान उद्योग आणि स्टार्ट-अपच्या वाढीला पाठबळ मिळेल.
  • 2,516 कोटी रूपयांच्या गुंतवणुकीसह 63,000 प्राथमिक कृषी पतसंस्था (पॅक्स) चे संगणकीकरण सुरू केले.
  • शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन साठवून ठेवण्यासाठी आणि योग्य वेळी विक्रीद्वारे किफायतशीर किमती मिळवून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात विकेंद्रित साठवण क्षमता तयार केली जाईल.
  • सिकलसेल अॅनिमिया निर्मूलन मोहीम सुरू करण्यात येणार आहे.
  • संयुक्त सार्वजनिक आणि खाजगी वैद्यकीय संशोधनाला भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर)च्या निवडक प्रयोगशाळांद्वारे सहकार्यात्मक संशोधन आणि नवकल्पनांना चालना दिली जाईल
  • फार्मास्युटिकल्समधील संशोधनाला चालना देण्यासाठी नवीन कार्यक्रम सुरू केला जाणार आहे.
  • 10 लाख कोटी रूपयांची भांडवली गुंतवणूक, सलग तिसर्‍या वर्षी 33% ची प्रचंड वाढ, वाढीची क्षमता आणि रोजगार निर्मिती, खाजगी गुंतवणुकीला चालना आणि जागतिक समस्यांपासून बचाव करणे.
  • आरोग्य, पोषण, शिक्षण, कृषी, जलस्रोत, आर्थिक समावेशन, कौशल्य विकास आणि मूलभूत पायाभूत सुविधा यासारख्या अनेक क्षेत्रांमध्ये आवश्यक सरकारी सेवांच्या विस्तारासाठी  500 ब्लॉक्स समाविष्ट करणारा आकांक्षा ब्लॉक कार्यक्रम.
  • अनुसूचित जमातींसाठी विकास कृती आराखड्यांतर्गत पुढील तीन वर्षांत प्रधानमंत्री विशिष्ट असुरक्षित आदिवासी गट (पीव्हीटीजी विकास अभियानाच्या अंमलबजावणीसाठी 15,000 कोटी रुपयांची गुंतवणूक. 75,000 कोटी, 15,000 कोटी खाजगी स्त्रोतांकडून. बंदरे, कोळसा, पोलाद, खते आणि अन्नधान्य क्षेत्रांच्या सर्वांगीण दळणवळण- कनेक्टिव्हिटीसाठी शंभर महत्त्वाच्या वाहतूक पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी ही गुंतवणूक.
  • पायाभूत सुविधांमध्ये खाजगी गुंतवणुकीच्या संधी वाढवण्यासाठी नवीन पायाभूत सुविधा वित्त सचिवालयाची स्थापना.
  • शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था उत्कृष्ट संस्था म्हणून विकसित केल्या जातील.
  • भौगोलिकदृष्ट्या, भाषा, शैली आणि स्तरांवर दर्जेदार पुस्तकांची सहज उपलब्धता आणि उपकरणे सुलभतेने मिळण्यासाठी मुलांसाठी राष्ट्रीय डिजिटल बाल आणि किशोर ग्रंथालयाची स्थापना केली जाईल.
  • शाश्वत सूक्ष्म सिंचन आणि पेयजलाच्या  भूपृष्ठावरील टाक्या भरण्यासाठी अप्पर भद्रा प्रकल्पाला केंद्रीय सहाय्य म्हणून 5,300 कोटी देण्यात येणार आहेत.
  • पहिल्या टप्प्यात एक लाख प्राचीन शिलालेखांच्या डिजिटायझेशनसह डिजिटल एपिग्राफी संग्रहालयात ‘भारत शेअर्ड रिपॉझिटरी ऑफ इंस्क्रिप्शन’ची स्थापना करण्यात येणार आहे.
  • केंद्राचा ‘प्रभावी भांडवली खर्च’  13.7 लाख कोटी रूपये.
  • पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणुकीला चालना देण्यासाठी आणि त्यांना पूरक धोरणात्मक कृतींसाठी प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारांना आणखी एक वर्षासाठी 50 वर्षांचे बिनव्याजी कर्ज देणे सुरू ठेवले जाणार आहे.
  • आपली शहरे ‘उद्याच्या शाश्वत शहरांमध्ये’ बदलण्यासाठी शहरी नियोजन सुधारणा आणि कृती करण्यासाठी राज्ये आणि शहरांना प्रोत्साहन.
  • मॅनहोलमधून मशीन-होल मोडमध्ये संक्रमण. शहरी भागातील सर्व  सेप्टिक टाक्या आणि गटारांचे 100 टक्के यांत्रिक विसर्जन करण्यास सक्षम केले जाणार.
  • लाखो सरकारी कर्मचार्‍यांना त्यांची कौशल्ये सुधारण्यासाठी आणि लोक-केंद्रित दृष्टीकोन सुलभ करण्यासाठी सतत शिकण्याच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आयगॉट कर्मयोगी, एकात्मिक ऑनलाइन प्रशिक्षण मंच  सुरू केले.
  • व्यवसाय करणे सुलभ करण्यासाठी 39,000 हून अधिक अनुपालन कमी केले गेले आणि 3,400 हून अधिक कायदेशीर तरतुदी अपराधमुक्त केल्या गेल्या.
  • 42 केंद्रीय कायद्यांमध्ये सुधारणा करणारे जनविश्वास विधेयक अधिक विश्वासावर आधारित प्रशासनासाठी सादर करण्यात आले आहे.
  • “मेक अर्टिफिशियल इंटेलिजेन्स -कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) इन इंडिया आणि मेक एआय वर्क फॉर इंडिया” ही संकल्पना साकार करण्यासाठी सर्वोच्च शैक्षणिक संस्थांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी तीन उत्कृष्टता केंद्रे स्थापन केली जातील.
  • स्टार्ट अप उद्योग तसेच शैक्षणिक क्षेत्र यांच्यातर्फे केल्या जाणाऱ्या नवोन्मेष आणि संशोधनाला नवे मार्ग खुले करून देण्यासाठी राष्ट्रीय माहिती प्रशासन धोरणाची सुरुवात करण्यात येईल.
  • ओळख निश्चिती तसेच पत्ता यांच्यात सुसंगतता आणि अद्ययावतीकरण यासाठी डिजीलॉकर सेवा आणि आधार यांचा वापर करून कार्य करणारी एक केंद्री सुविधा निर्माण करण्यात येईल.
  • व्यापार करण्यात आणखी सुगमता आणण्याच्या दृष्टीने विहित सरकारी संस्थांच्या सर्व डिजिटल सेवांसाठी सामायिक ओळख निश्चितीचे साधन म्हणून पॅन म्हणजेच स्थायी खाते क्रमांकाचा वापर करण्यात येईल.
  • कोविड काळात ज्या एमएसएमई उद्योगांना कराराची अंमलबजावणी करणे शक्य झाले नसेल त्या एमएसएमई उद्योगांना तसेच सरकारच्या उपक्रमांना निविदा अथवा कार्याबद्दलची सुरक्षा ठेव म्हणून भरलेल्या रकमेच्या 95%रक्कम परत करण्यात येईल.
  • स्पर्धात्मक विकासविषयक गरजांसाठी अपुऱ्या साधन संपत्तीचे वितरण करताना परिणामाधारित निधी पुरवठा पद्धत.
  • न्यायदानाची प्रक्रिया अधिक कार्यक्षम करण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या ई-न्यायालय प्रकल्पामधील तिसऱ्या टप्प्यातील 7,000 कोटी रुपये खर्चाच्या कामाची सुरुवात करण्यात येईल.  
  • एलजीडी अर्थात प्रयोगशाळेत विकसित हिऱ्यांच्या बीजखड्यांच्या तसेच संबंधित यंत्रांच्या स्वदेशी उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या आयातीवरील  अवलंबित्व कमी करण्यासाठी एलजीडी क्षेत्राला संशोधन तसेच विकास कार्यासाठी अनुदानाची तरतूद.
  • देशाच्या अर्थव्यवस्थेचे कमी कार्बन तीव्रतेच्या दिशेने स्थित्यंतर घडवून आणण्याची प्रक्रिया सुलभतेने करण्यासाठी तसेच जीवाश्म इंधनांच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी हरित हायड्रोजन अभियानाअंतर्गत वर्ष 2030 पर्यंत वार्षिक 5 दशलक्ष टन हरित हायड्रोजन निर्मिती करण्याचे लक्ष्य निश्चित.
  • उर्जा सुरक्षा, उर्जा स्थित्यंतर आणि संपूर्णतः शून्य उत्सर्जन उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी 35,000 कोटी रुपयांची तरतूद.
  • अर्थव्यवस्थेला शाश्वत विकासाच्या मार्गाची दिशा देण्यासाठी बॅटरी उर्जा साठवण प्रणालींना प्रोत्साहन देणार.
  • लडाखमधील पुनर्नवीकरणीय उर्जा ग्रीड समावेशन आणि उर्जा स्थलांतर यासाठी 20,700 कोटी रुपयांची तरतूद.
  • देशातील राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेश यांना पर्यायी खतांच्या वापरासाठी तसेच रासायनिक खतांच्या समतोल वापरासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने “पृथ्वी मातेची पुनर्स्थापना, जागरूकता, पोषण आणि जीर्णोद्धार यासाठीचा पंतप्रधान कार्यक्रम” (पीएम-प्राणम) सुरु करण्यात येईल.
  • एमजीएनआरईजीएस, सीएएमपीए निधी तसेच इतर स्त्रोतांच्या एकत्रीकरणातून किनारपट्टीच्या लगत आणि मिठागरांच्या जागांवर कांदळवनांच्या लागवडीसाठी ‘किनारपट्टीवरील अधिवास आणि निश्चित उत्पन्नासाठी कांदळवन विषयक उपक्रम’ मिष्टीची सुरुवात करण्यात येणार.
  • पर्यावरणीय दृष्ट्या शाश्वत आणि प्रतिसादात्मक घडामोडींसाठी मदत देणे तसेच अतिरिक्त साधनसंपत्तीची तरतूद करणे या उद्देशाने पर्यावरण (संरक्षण) कायद्याच्या अखत्यारीत हरित कर्ज कार्यक्रम सूचित करण्यात येईल.
  • पाणथळ जागांचा अधिकाधिक वापर, जैव-विविधतेत वाढ, कार्बन उत्सर्जनावर नियंत्रण, इको-पर्यटनविषयक संधींची चाचपणी तसेच स्थानिक समुदायांच्या उत्पन्नात वाढ यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने येत्या तीन वर्षांत अमृत धरोहर योजना लागू करण्यात येईल.
  • मागणीवर आधारित औपचारिक कौशल्य विकसित करण्यास सक्षम होणे, एमएसएमई उद्योगांसह सर्व उद्योगांच्या मालकांशी जोडणी तसेच उद्योजकताविषयक योजनांचा लाभ घेणे सुलभ करण्यासाठी एकत्रित कौशल्यविषयक भारत डिजिटल कार्यक्रम लागू करण्यात येईल.
  • देशातील 47 लाख युवकांना विद्यावेतन देण्यासाठी अखिल भारतीय  राष्ट्रीय  शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनेअंतर्गत  थेट लाभ हस्तांतरण  प्रणाली सुरु करण्यात येईल.
  • किमान 50 पर्यटन स्थळांची निवडण्‍यात येणार असून देशातल्या आणि परदेशातल्या पर्यटकांसाठी संपूर्ण पॅकेज म्हणून त्‍यांचा विकास केला जाईल.
  • ‘देखो अपना देश’ उपक्रमाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी त्या त्या क्षेत्रातील  विशिष्ट कौशल्य आणि उद्योजकता यांचा विकास  केला जाईल.
  • ‘व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम’ अंतर्गत सीमावर्ती गावांमध्ये पर्यटनाच्या पायाभूत सोई आणि सुविधा  पुरवल्या जातील
  • राज्यांनी  ‘युनिटी मॉल’ उभारावेत आणि त्‍याव्दारे “जीआय” उत्‍पादने आणि हस्तशिल्पांची  विक्री करण्‍यासाठी प्रोत्साहन देण्‍यात येईल. तसेच  या मॉलमधून आपल्या राज्यातील तसेच इतर सर्व राज्यांमधील ओडीओपी म्हणजेच  ‘एक जिल्हा, एक उत्पादन’ उपलब्ध करून देण्‍यात येईल.  
  • ‘नॅशनल फायनान्शिअल इन्फॉर्मेशन रजिस्ट्री’ ची स्थापना करण्‍यात येईल.  आर्थिक आणि सहायक माहितीचे केंद्रीय भांडार म्हणून हे केंद्र कार्य करेल.   यामुळे कर्जाचा प्रवाह कार्यक्षमतेने आणि   सुलभतेने सुरू राहील. वित्तीय  समावेशनाला चालना मिळेल आणि आर्थिक स्थिरता वाढेल. प‍तविषयक  सार्वजनिक पायाभूत सुविधांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरबीआयशी सल्लामसलत करून एक नवीन वैधानिक आराखडा  तयार करण्‍यात येईल.
  • वित्तीय क्षेत्र नियामक सार्वजनिक आणि नियामक संस्थांशी सल्लामसलत करून विद्यमान नियमांचे सर्वसमावेशक पुनरावलोकन करण्यासाठी विविध नियमांखालील अर्जांवर निर्णय घेण्यासाठी समयसीमा निश्चित करणार .
  • जीआयएफटी –  आएफएससी म्हणजे आंतरराष्‍ट्रीय वित्तीय सेवा केंद्रामधील व्यावसायिक क्रियाकलाप वाढवण्यासाठी, खालील उपाययोजना करण्‍यात येणार-
  • दुहेरी नियमन टाळण्यासाठी सेझ  कायद्यांतर्गत अधिकार आयएफएससीए म्हणजेच आंतरराष्‍ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकारणाकडे सोपविणार  
  • आयएफएससीए, सेझ प्राधिकरण, जीएसटीएन, आरबीआय, सेबी  आणि आयआरडीएआय म्हणजेच विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाकडे  नोंदणी आणि मंजुरीसाठी एकल खिडकी आय.टी.  कार्यपद्धती सुरू करणार.
  • विदेशी बँकेच्या आयएफएससी  बँकिंग युनिट्सद्वारे  वित्तपुरवठ्याचे संपादन कार्य  करण्यास परवानगी देणार .
  • व्यापार पुनर्वित्त पुरवठ्यासाठी   ‘एक्झिम’   बँकेची उपकंपनी स्थापन करणार
  • लवाद कार्यवाही,  सहाय्यक सेवा आणि सेझ कायद्यांतर्गत दुहेरी नियमन टाळण्यासाठी वैधानिक तरतुदींसाठी आयएफएससीए कायद्यात सुधारणा करणार
  • ‘ऑफशोअर डेरिव्हेटिव्ह इन्स्ट्रुमेंट्स’  वैध करार म्हणून ओळखला जाणार .
  • बँक प्रशासन सुधारण्यासाठी आणि गुंतवणूकदारांचे संरक्षण वाढविण्यासाठी बँकिंग नियमन कायदा, बँकिंग कंपनी कायदा आणि रिझर्व्ह ऑफ इंडिया कायद्यामध्ये सुधारणा करण्‍याचा प्रस्‍ताव मांडण्‍यात आला आहे.
  • डिजिटल निरंतरतासाठी  उपायांच्या शोधात  असलेल्या देशांना जीआयएफटी आयएफएससी मध्ये त्यांच्या डेटा दूतावासाची स्थापना करण्याची सुविधा दिली जाईल.
  • नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ सिक्युरिटीज मार्केट्समधील शिक्षणासाठी मानदंड आणि मानके तयार  करणे, नियमन करणे, देखरेख करणे आणि लागू करणे, पदवी, पदविका  आणि प्रमाणपत्र  अभ्‍यासक्रम विकसित करण्‍यासाठी सेबीला मान्यता देण्‍यात येणार.
  • दावा केले गेले नाहीत असे समभाग आणि दिला न गेलेला लाभांश गुंतवणूकदारांना परत मिळावा म्हणून ‘ गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरण’कडे एक सक्षम व्यवस्‍था  करण्यासाठी एकात्मिक IT पोर्टलची स्थापना करणार.
  • स्वातंत्र्याच्या  अमृत महोत्सवाच्या स्मरणार्थ,  एकाचवेळी ठेव ठेवता येणारी नवीन अल्प  बचत योजना, ‘महिला सन्मान बचत प्रमाणपत्र’  सुरू करणार. या योजनेतून  आंशिक पैसे काढण्याचा  पर्याय उपलब्ध असून 7.5 टक्के निश्चित व्याज दराने 2 वर्षांच्या कालावधीसाठी  (मार्च 2025 पर्यंत) महिला किंवा मुलींच्या नावावर 2 लाख रुपयांपर्यंत ठेव सुविधा देण्‍यात येईल.
  • मासिक उत्पन्न खाते योजनेची कमाल ठेव मर्यादा एकल खात्यासाठी रुपये 4.5 लाखांवरून रुपये 9 लाख आणि संयुक्त खात्यासाठी रूपये  9 लाखांवरून रुपये 15 लाखांपर्यंत वाढवली जाईल.
  • पन्नास वर्षांसाठी असलेले व्याजमुक्त कर्ज राज्यांना 2023-24 मध्ये भांडवली खर्चासाठी वापरावे लागणार. राज्यांनी वास्तविक भांडवली खर्च वाढविण्याची अट त्यासाठी असणार  आहे आणि परिव्ययातील काही भाग राज्यांच्या विशिष्ट कर्जावर अवलंबून असेल. 
  • जीएसडीपी म्हणजेच सकल राज्यांतर्गत उत्‍पन्नाच्या 3.5% ची राजकोषीय तूट ठेवण्याची परवानगी. त्यातील 0.5%  तुट ऊर्जा क्षेत्रातील सुधारणांवर अवलंबून.

सुधारित अंदाज 2022-23:

  • कर्जाव्यतिरिक्त एकूण आवक 24.3 लाख कोटी रुपये आहे, त्यापैकी निव्वळ कर प्राप्ती 20.9 लाख कोटी रुपये आहे.
  • एकूण खर्च 41.9 लाख कोटी रुपये असून त्यातील भांडवली खर्च सुमारे 7.3 लाख कोटी रुपये आहे.
  • अर्थसंकल्पीय अंदाजानुसार वित्तीय तूट जीडीपीच्या 6.4 टक्के आहे.

अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक 2023-24:

  • कर्जाव्यतिरिक्त एकूण आवक 27.2 लाख कोटी रुपये आणि एकूण खर्च 45 लाख कोटी रुपये असा अंदाज आहे.
  • निव्वळ कर प्राप्ती 23.3 लाख कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे.
  • वित्तीय तूट जीडीपीच्या 5.9 टक्के असण्याचा अंदाज आहे.
  • 2023-24 मध्ये वित्तीय तूट भरून काढण्यासाठी, डेटेड सिक्युरिटीजकडून निव्वळ बाजारातील कर्जे 11.8 लाख कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे.
  • एकूण बाजारातील कर्जे 15.4 लाख कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे.

भाग – ब

प्रत्यक्ष कर

  • प्रत्यक्ष कर प्रस्तावांचे उद्दिष्ट करप्रणालीत सातत्य आणि स्थिरता राखणे, अनुपालन ओझे कमी करण्यासाठी विविध तरतुदी सुलभ आणि तर्कसंगत करणे, उद्योजकतेच्या भावनेला चालना देणे आणि नागरिकांना कर सवलत देणे हे आहे.
  • अनुपालन सुलभ आणि सुरळीत करून करदात्यांच्या सेवा सुधारण्यासाठी प्राप्तिकर विभागाचा निरंतर प्रयत्न.
  • करदात्याच्या सेवांमध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी, तक्रार निवारण यंत्रणा मजबूत करण्याच्या योजनांसह, करदात्याच्या सोयीसाठी भावी कॉमन आयटी रिटर्न फॉर्म (समान प्राप्तिकर विवरणपत्र) आणण्याचा प्रस्ताव.
  • नवीन कर प्रणालीत वैयक्तिक प्राप्तिकराची सवलत मर्यादा वाढवून सध्याच्या 5 लाख रुपयांवरून 7 लाख रुपये करण्यात आली आहे. अशा प्रकारे, नवीन कर प्रणालीनुसार 7 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या व्यक्तींना कोणताही कर भरावा लागणार नाही.
  • उत्पन्नाच्या सहा टप्प्यात विभागलेल्या 2020 मधील वैयक्तिक प्राप्तिकर प्रणालीत नवीन कर रचनेनुसार बदल करून पाच टप्प्यात विभागणी आणि कर सवलत मर्यादा वाढवून 3 लाख रुपये करण्यात आली आहे. नवीन कारप्रणालीत सर्व करदात्यांना मोठा दिलासा देण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे.

नवीन कर दर

Total Income (Rs)Rate (per cent)
Up to 3,00,000Nil
From 3,00,001 to 6,00,0005
From 6,00,001 to 9,00,00010
From 9,00,001 to 12,00,00015
From 12,00,001 to 15,00,00020
Above 15,00,00030
  • नवीन कर प्रणालीनुसार नियमित वजावटीचा लाभ पगारदार व्यक्तीसाठी 50,000 रुपयांपर्यंत आणि कौटुंबिक पेन्शनमधून 15,000 रुपयांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव. 
  • नवीन कर प्रणालीमध्ये सर्वोच्च अधिभार दर 37 टक्क्यांवरून 25 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव. यामुळे जास्तीत जास्त वैयक्तिक प्राप्तिकर दर 39 टक्क्यांपर्यंत कमी होईल.
  • अशासकीय पगारदार कर्मचार्‍यांच्या निवृत्तीनंतर रजा रोखीकरणावरील कर सवलतीची मर्यादा 25 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात येईल.
  • नवीन प्राप्तिकर प्रणाली मूलभूत कर प्रणाली बनविली जाईल. मात्र, जुन्या कर प्रणालीचा लाभ घेण्याचा पर्याय नागरिकांना कायम राहील.
  • सूक्ष्म उपक्रम आणि काही व्यावसायिकांसाठी प्रस्तावित कर आकारणीचा लाभ घेण्यासाठी मर्यादेत वाढ. वर्षभरात रोख स्वरूपात प्राप्त झालेली  रक्कम किंवा एकत्रित रक्कम, एकूण मिळकत /उलाढालीच्या पाच टक्क्यांपेक्षा जास्त नसेल तरच वाढीव मर्यादा लागू राहील .
  • एमएसएमईला केलेल्या  खर्चाची वजावट कंपन्याना तेव्हाच मिळेल जेव्हा एमएसएमईला वेळेवर रक्कम मिळेल. यासाठी प्रत्यक्षात देय रक्कम दिली असेल.
  • 31.3.2024 पर्यंत प्रत्यक्ष उत्पादन सुरू करणार्‍या नवीन सहकारी संस्थांना 15 टक्क्यांच्या कमी कर दराचा लाभ मिळेल, जो सध्या नवीन उत्पादक कंपन्यांना मिळत आहे.
  • साखर सहकारी संस्थांना 2016-17 च्या मूल्यमापन वर्षाच्या आधीच्या कालावधीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना थकबाकी म्हणून दिलेल्या रकमेचा दावा करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे त्यांना सुमारे 10,000 कोटी रुपये  मिळण्याची शक्यता  आहे.
  • प्राथमिक कृषी सहकारी संस्था आणि प्राथमिक सहकारी कृषी आणि ग्रामीण विकास बँका कडून रोख ठेवी आणि कर्जासाठी प्रति सदस्य कमाल 2 लाख रुपयांची मर्यादा
  • सहकारी संस्थांसाठी रोख पैसे काढण्यावरील टीडीएस साठी 3 कोटी रुपयांची कमाल मर्यादा .
  • स्टार्ट-अप्सना प्राप्तिकर लाभ मिळावा यासाठी स्थापनेची तारीख 31 मार्च 2023 वरून 31 मार्च 2024 पर्यंत वाढवण्यात येणार
  • स्टार्ट-अप्सचे भागभांडवल बदलल्यास तोटा पुढे नेण्याचा लाभ स्थापनेपासून सात वर्षे वरून दहा वर्षे  करण्याचा प्रस्ताव.
  • कर सवलती आणि सूट चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करण्यासाठी कलम 54 आणि 54F अंतर्गत निवासी घरामधील गुंतवणुकीवर भांडवली नफ्यातून वजावटीसाठी मर्यादा  10 कोटी  रुपये
  • उच्च मूल्याच्या विमा पॉलिसींच्या उत्पन्नातून प्राप्तिकर सूट मर्यादित ठेवण्याचा प्रस्ताव. 1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर जारी केलेल्या जीवन विमा पॉलिसींसाठी (ULIP व्यतिरिक्त) प्रीमियमची एकूण रक्कम 5 लाख रुपयांहून अधिक असल्यास 5 लाख रुपयांपर्यंत एकूण प्रीमियम असलेल्या पॉलिसींना सूट दिली जाईल.
  • गृहनिर्माण, शहरे, नगर  आणि खेड्यांचा विकास आणि नियमन, किंवा एखाद्या कामाचे  नियमन आणि विकास करण्याच्या उद्देशाने केंद्र किंवा राज्याच्या कायद्यांद्वारे स्थापित प्राधिकरणे, मंडळे आणि आयोगांच्या उत्पन्नाला प्राप्तिकरातून सूट देण्याचे प्रस्तावित आहे.
  • टीडीएस साठी 10 हजार रुपयांची किमान मर्यादा  हटवण्यात येईल आणि ऑनलाइन गेमिंगशी संबंधित करपात्रता स्पष्ट केली जाईल. पैसे काढताना किंवा आर्थिक वर्षाच्या शेवटी जिंकलेल्या रकमेवर टीडीएस आणि करपात्रता तरतुदीचा  प्रस्ताव.
  • सोन्याचे इलेक्ट्रॉनिक सोन्याच्या पावतीमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक सोन्याचे सोन्यात  रूपांतर भांडवली नफा म्हणून गणले जाऊ नये, असे प्रस्तावित आहे.
  • पॅन नसलेल्या प्रकरणांमध्ये ईपीएफ मधून पैसे काढल्यास  करपात्र रकमेवरील  टीडीएस  दर 30% वरून 20% पर्यंत कमी केला जाईल
  • मार्केट लिंक्ड डिबेंचरमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर कर आकारला जाणार
  • आयुक्त स्तरावरील प्रलंबित अपीलांची संख्या कमी करावी म्हणून लहान अपील्स निकाली काढण्यासाठी सुमारे 100  सहआयुक्तांची नियुक्ती.
  • या वर्षी आधीच प्राप्त झालेल्या विवरण पत्रांच्या छाननीसंबंधी प्रकरणे घेताना  अधिक चोखंदळ राहणार
  • IFSC, GIFT सिटी मध्ये पुनर्स्थापित निधीसाठी कर लाभांचा कालावधी 31.03.2025 पर्यंत वाढवला
  • आयकर कायद्याच्या कलम 276A अंतर्गत लिक्विडेटर्स कडून नियमाचे पालन न झाल्याप्रकरणी त्याला 1 एप्रिल 2023 पासून गुन्हेगार ठरवण्यात येणार नाही.
  • आयडीबीआय बँकेसह धोरणात्मक निर्गुंतवणुकीतील तोटा पुढील वर्षात दाखवायला परवानगी
  • अग्निवीर निधीला EEE दर्जा प्रदान करणार. “अग्निपथ योजना , 2022 मध्ये नोंदणी केलेल्या अग्निवीरांना अग्निवीर कॉर्पस निधीतून मिळालेली रक्कम करमुक्त करण्याचे प्रस्तावित आहे . अग्निवीरला त्याच्या सेवा निधी खात्यात त्याने किंवा केंद्र सरकारने केलेल्या योगदानानुसार एकूण उत्पन्नाच्या गणनेतील वजावट देण्याचे प्रस्तावित आहे.

अप्रत्यक्ष कर

  • कापड आणि शेती माला व्यतिरिक्त इतर वस्तूंवरील मूलभूत सीमाशुल्क दरात कपात करून तो 21 वरून 13 वर आणला.  
  • खेळणी, सायकली, ऑटोमोबाईल्स आणि नॅप्था यासह काही वस्तूंवरील मूलभूत सीमा शुल्क, उपकर आणि अधिभार यामध्ये किरकोळ बदल.
  • कॉम्प्रेस्ड (संकुचित) नैसर्गिक वायूमध्ये मिश्रण केलेला जीएसटी शुल्क भरलेल्या कॉम्प्रेस्ड बायो गॅसवर उत्पादन शुल्कात सूट.
  • विजेवर चालणार्‍या वाहनांच्या (EVs) च्या बॅटरीमध्ये वापरण्यासाठी लिथियम-आयन सेलच्या निर्मितीसाठी निर्दिष्ट भांडवली वस्तू/यंत्रसामग्रीवरील सीमा शुल्क भरण्याची मर्यादा 31.03.2024 पर्यंत वाढविण्यात आली.
  • अधिसूचित चाचणी संस्थांद्वारे चाचणी आणि/किंवा प्रमाणन करण्याच्या हेतूने, आयात केलेली वाहने, निर्दिष्ट ऑटोमोबाईल भाग/घटक, उप-प्रणाली आणि टायर्सवर, अटींच्या अधीन राहून सीमाशुल्कात सूट.
  • सेल्युलर मोबाईल फोनच्या कॅमेरा मॉड्युलच्या निर्मितीमध्ये वापरण्यासाठी कॅमेरा लेन्स आणि त्याच्या इनपुट्स/पार्ट्सवरील सीमा शुल्क शून्यावर आणले, आणि बॅटरीसाठी लिथियम-आयन सेलवरील सवलत शुल्काची मर्यादा आणखी एका वर्ष वाढवली.
  • टीव्ही पॅनलच्या खुल्या सेलच्या भागांवरील मूलभूत सीमाशुल्क कमी करून 2.5 टक्के केले.
  • इलेक्ट्रिक किचन चिमणीवरील मूलभूत सीमाशुल्क 7.5 टक्क्यांवरून 15 टक्क्यांपर्यंत वाढले.
  • इलेक्ट्रिक किचन चिमणीच्या निर्मितीसाठीच्या हीट कॉइलवरील मूलभूत सीमा शुल्क कमी करून 20 टक्क्यांवरून 15 टक्क्यांवर आणले.
  • रासायनिक उद्योगात वापरल्या जाणार्‍या डीनेचर्ड इथाइल अल्कोहोलला मूलभूत सीमा शुल्कातून सूट देण्यात आली.
  • आम्ल ग्रेड फ्लोरस्पार (कॅल्शियम फ्लोराईडच्या 97 टक्क्यांहून अधिक वजन असलेले) वरील मूलभूत सीमा शुल्क 5 टक्क्यांवरून कमी करून 2.5 टक्के केले.
  • एपिकोलोरहायड्रिनच्या निर्मितीमध्ये वापरण्यासाठी क्रूड ग्लिसरीनवरील मूलभूत सीमा शुल्क 7.5 टक्क्यांवरून 2.5 टक्क्यांवर आणले.
  • कोळंबी खाद्याच्या देशांतर्गत उत्पादनासाठीच्या प्रमुख कच्च्या मालावरील करात कपात केली.
  • प्रयोगशाळेत तयार केल्या जाणाऱ्या हिऱ्यांच्या निर्मितीमध्ये वापरल्या जाणार्‍या कच्च्या मालावरील मुलभूत सीमा शुल्क कमी केले.
  • सोने आणि प्लॅटिनमच्या डोरे आणि बारपासून बनवलेल्या वस्तूंवरील करात वाढ.
  • चांदीचे डोरे, बार आणि वस्तूंवर आयात शुल्कात वाढ.
  • सीआरजीओ स्टील, फेरस स्क्रॅप आणि निकेल कॅथोडच्या निर्मितीसाठीच्या कच्च्या मालावरील मूलभूत सीमाशुल्क सूट कायम.
  • तांब्याच्या स्क्रॅपवर 2.5 टक्के सवलतीचा बीसीडी कायम ठेवण्यात आला.
  • कंपाउंडेड रबरवरील मूळ सीमाशुल्क दर 10 टक्क्यावरून, अथवा 30 प्रति किलो यापैकी जे कमी असेल ते लागू.
  • निर्दिष्ट सिगारेट्सवरील राष्ट्रीय आपत्ती आकस्मिक शुल्क (NCCD) सुमारे 16 टक्क्यांनी वाढवण्यात आले.
  • सीमाशुल्क कायद्यांमधील वैधानिक बदल
  • सेटलमेंट कमिशनद्वारे अंतिम आदेश पारित करण्यासाठी अर्ज दाखल करण्याच्या तारखेपासून नऊ महिन्यांची कालमर्यादा निर्दिष्ट करण्यासाठी सीमाशुल्क कायदा, 1962 मध्ये सुधारणा केली जाणार.
  • अँटी-डंपिंग ड्यूटी (ADD), काउंटरवेलिंग ड्यूटी (CVD) आणि सुरक्षा उपायांशी संबंधित तरतुदींचा हेतू आणि व्याप्ती स्पष्ट करण्यासाठी सीमाशुल्क कायद्यात सुधारणा केली जाणार.
  • सीजीएसटी कायद्यात सुधारणा केली जाणार
  • जीएसटी अंतर्गत खटला चालवण्यासाठी कर रकमेची किमान मर्यादा एक कोटीवरून दोन कोटींपर्यंत वाढवणे.
  • सध्याच्या कर रकमेच्या 50 ते 150 टक्क्यांच्या श्रेणीतील चक्रवाढ रक्कम 25 ते 100 टक्क्यांपर्यंत कमी करणे.
  • गुन्हेगारीच्या व्याख्येमधून काही गुन्हे वगळणे
  • रिटर्न/स्टेटमेंट भरण्याच्या अंतीम मुदतीच्या तारखेपासून जास्तीत जास्त तीन वर्षांपर्यंत रिटर्न/स्टेटमेंट भरण्याची तारीख मर्यादित करणे; आणि
  • नोंदणी न केलेले पुरवठादार आणि करदात्यांना ई-कॉमर्स ऑपरेटर (ईसीओ) द्वारे वस्तूंचा राज्यांतर्गत पुरवठा करण्यासाठी सक्षम करणे.

व्यवसायाभिमुख शिक्षणाला प्राधान्य देणं आज काळाची गरज, आजच्या बजेटमध्येही त्या दिशेने महत्वाचे पाऊल – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील 

पुणे , ०१ फेब्रुवारी : आज अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी बजेट सादर करण्यास सुरुवात केली आहे. या बजेटमधुन अनेक दिलासादायक गोष्टी मांडण्यात आल्या आहेत. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सीतारमन यांचे या बजेट साठी आभार मानले आहेत. व्यवसायाभिमुख शिक्षणाला प्राधान्य देणं आज काळाची गरज आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातही यावर भर देण्यात आला आहे. बजेट सेशन २०२३ मध्येही त्या दिशेनं महत्त्वाचं पाऊल टाकण्यात आलं आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

चंद्रकांत पाटील यांनी बजेटमधील काही महत्वाचे मुद्दे मांडले आहेत ते म्हणजे प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना ४. ० लवकरच येणार, यासोबतच नोकरीस उपयुक्त प्रशिक्षण तसेच व्यावसायिक भागीदारी सोबत नव्या व्यावसायिक गरजेनुसार तरुणांच्या कौशल्य विकासावर भर देण्यात येणार आहे. कौशल्य विकासासाठी देशभरात ३३ स्किल डेव्हल्पमेंन्ट सेंटर्स होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी पुढे आणखी एका मुद्दयावर लक्ष केंद्रित केले आहे , ते म्हणजे  वाचनाचं महत्त्व लक्षात घेऊन त्याला तंत्रज्ञानाची जोड देऊन केंद्रीय अर्थमंत्री सीतारमन आजच्या बजेटमध्ये डिजिटल पुस्तकालयाची स्थापना करण्याचा मुद्दा मांडला आहे. यासाठी चंद्रकांत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. ३ वर्षात केंद्र सरकार करणार एकलव्य मॉडेल निवासी शाळा साठी ३८८०० शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती. या शाळांतील ३ लाख ५० हजार विद्यार्थ्यांचा फायदा होणार आहे. विद्यार्थ्यांच्या फायद्यासाठी राष्ट्रीय डिजिटल पुस्तकालयाची स्थापना होणार आहे. विद्यार्थीच नव्हे तर शिक्षकांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या प्रशिक्षणासाठी उत्तम संस्था उभारणार असल्याचे या अर्थसंकल्पात नमूद करण्यात आल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. चंद्रकांत पाटील यांनी मोदी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत ५७ वाहनांचा जाहीर ई-लिलाव

0

पुणे दि.१ : मोटार वाहन कर न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्यांतर्गत जप्त केलेल्या ५७ वाहनांचा जाहीर ई-लिलाव प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत १३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे, आळंदी रोड कार्यालय व वाघेश्वर वाहनतळाच्या आवारात कार्यालयीन वेळेत वाहने पाहणी करण्यासाठी उपलब्ध आहेत. यामध्ये टुरिस्ट टॅक्सी, बस, हलकी परिवहन वाहने, रिक्षा या वाहनांचा समावेश आहे. लिलावाच्या तारखेपर्यंत वाहन कर भरण्याची संधी राहणार आहे.

ई-लिलाव होणाऱ्या वाहनांची यादी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या सूचनाफलकांवर व तसेच https://eauction.gov.in/eauction या संकेतस्थळावर माहितीसाठी लावण्यात आली आहे. तसेच लिलावाचे अटी व नियम ६ फेब्रुवारीपासून या संकेतस्थळावर तसेच कार्यालयाच्या सूचना फलकावर उपलब्ध असतील.

जाहीर ई-लिलावात ७ ते ९ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत https://eauction.gov.in/eauction या संकेतस्थळावर सहभागी होता येणार आहे. जीसटी धारकांनाच ई-लिलावात सहभागी होता येणार आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालयात हलके वाहनास २५ हजार रुपये व अवजड वाहनास ५० हजार रुपये रकमेचा धनाकर्ष ‘आरटीओ पुणे’ या नावे सादर करावा. ही वाहने ‘जशी आहेत तशी’ या तत्वावर जाहीर ई-लिलावाद्वारे विकली जातील.

कोणतेही कारण न देता ई-लिलाव रद्द करण्याचे अथवा तहकुब ठेवण्याचे अधिकार उपप्रादेशिक परिवहन अधिकारी तथा कराधान प्राधिकारी यांच्याकडे राखून ठेवण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.

चाचा नेहरू बाल महोत्सवात आठशे बालकांचा सहभाग

0

पुणे, दि.१: अनाथ, निराधार व संकटात सापडलेल्या बालकांसाठी कार्यरत असणाऱ्या संस्थेतील बालकांच्या सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्यात एकमेकांविषयी बंधुभाव, सांघिक भावना निर्माण होण्यासाठी २८ ते ३० जानेवारी २०२३ या कालावधीत कुसुमबाई मोतीचंद महिला सेवाग्राम पुणे येथे आयोजित चाचा नेहरू बाल महोत्सव २०२२-२०२३ मध्ये ८०० बालकांनी सहभाग घेतला.

यावेळी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले, महिला व बाल विकास विभागीय उपआयुक्त सुहिता ओव्हाळ, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अश्विनी कांबळे, महिला व बाल संरक्षण अधिकारी सुरेश टेळे, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे सदस्य चैतन्य पुरंदरे आदि उपस्थितीत होते.

मैदानी खेळामध्ये कब्बडी व खोखो हे दोन सांघिक, लांब उडी व १०० मी धावणे हे दोन वैयक्तिक आणि इनडोअर खेळामध्ये बुद्धिबळ, कॅरम, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमात वैयक्तिक व सांघिक नृत्य स्पर्धा अशा सुमारे ११ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. मुले व मुलींच्या मोठा व लहान अशा दोन वयोगटात घेण्यात आल्या.

मान्यवरांच्या हस्ते प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने विजयी बालकांना व संघांना मानचिन्हाने व प्रशस्तीपत्रक देवून गौरविण्यात आले. महर्षी कर्वे स्री शिक्षण संस्था मुलींचे बालगृह, कर्वेनगर व मुलांचे ज्ञानदिप बालगृह दिघी यांनी सर्वात जास्त प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवून विजेतेपदाचा चषक (चॅम्पियन ट्रॉफी) पटकावला.

कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात श्रीमती कांबळे यांनी कार्यक्रम आयोजनाबाबत माहिती दिली. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या वेळी प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी चित्रफीत संदेशाद्वारे बालकांना शुभेच्छा दिल्या.

उद्योगांना मिळणाऱ्या सर्वतोपरी सहकार्यामुळे महाराष्ट्र हे गुंतवणूकदारांचे आवडते ठिकाण – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे, दि. 1 – देशात महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे. या राज्यात उद्योगस्नेही राज्य शासन कार्यरत आहे. उद्योगासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा, सवलती व कुशल मनुष्यबळ येथे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. मैत्री अंतर्गत एक खिडकी योजनेतून उद्योगांना सर्व परवाने देण्यात येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र हे गुंतवणूकदारांचे आवडते ठिकाण आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले.

सँडोज इंडिया या औषध निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या दिघा गावातील प्रकल्पातील नव्या युनिटचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रिचर्ड सुनोर, ग्रुप प्रमुख श्री कार्लो, संशोधन विभागाच्या प्रमुख श्रीमती क्लेअर, युनिट प्रमुख सुधीर भंडारे, माजी आमदार विजय चौघुले, नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे  आदी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

श्री. शिंदे म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज मांडलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पातदेखील औषध निर्मिती क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या प्रमाणात सवलती देण्यात आल्या आहेत. केंद्र शासन लोकांच्या आरोग्यासाठी मोठ्या प्रमाणात लक्ष देत आहे. सँडोज कंपनीने कोविड काळात मोठे सहकार्य केले. या काळात रोगप्रतिकारक औषधांची गरज व महत्त्व कळून आले.  सँडोज कंपनीने रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या औषध निर्मिती व संशोधनाकडे लक्ष दिल्याचे दिसून येते. महाराष्ट्रात बल्क ड्रग पार्क उभारत आहोत. तेथे गुंतवणुकीची मोठी संधी उपलब्ध आहे. सँडोज कंपनीने तेथे गुंतवणूक करून योगदान द्यावे, अशी अपेक्षा आहे.

आमचे सरकार हे लोकांचे, उद्योगांचे, विकासाचे ध्येय ठेवणारे सरकार आहे. राज्यात उद्योग वाढीसाठी मोठ्या संधी उपलब्ध आहेत. जास्तीत जास्त उद्योगांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी. राज्य शासनामार्फत त्यांना सर्वतोपरी सहकार्य केले जात आहे. त्यामुळे उद्योगांनी येथे यावे व गुंतवणूक करावी. जनेरिक औषध निर्मितीमध्ये जागतिक आघाडीवर असलेल्या सँडोज कंपनीनेने महाराष्ट्रातील त्यांच्या प्रकल्पात अतिरिक्त गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे, यातून महाराष्ट्राची उद्योग क्षमता दिसून येते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

दावोसमध्ये झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राने सुमारे 1 लाख 37 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणली आहे. अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी येथे गुंतवणूक केली असून ही राज्यासाठी मोठी उपलब्धी आहे. उद्योग, गुंतवणुकदारांना राज्य शासनामार्फत सर्व सहकार्य दिले जात आहे. राज्य शासन नेहमीच औद्योगिक विकासासाठी सोबत आहे. पुढील काळातही उद्योगांना लागणारे सर्व सहकार्य राज्य शासन करेल, असेही श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

सँडोज इंडिया ही कंपनी औषध निर्मिती करणारी कंपनी आहे. आज भूमिपूजन झालेल्या प्लँटसाठी कंपनीने सुमारे 250 कोटींची गुंतवणूक करणार असून येथे जेनेरिक औषध निर्मिती होणार आहे. यामध्ये सुमारे 500 ते 600 नवीन रोजगार निर्मिती होणार आहे. वर्षभरात हा प्लँट सुरू होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. युनिट प्रमुख श्री. भंडारे यांनी स्वागत केले व आभार मानले. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे व श्री. मुख्य कार्यकारी अधिकारी रिचर्ड सुनोर यांच्यात नव्या प्रकल्पासंदर्भात चर्चा झाली.

टेबल टेनिस मधील सुवर्णपदकाने महाराष्ट्राचे खाते उघडले

टेबल टेनिस मध्ये पदकांची हॅट्ट्रिक !!

इंदूर-
सुवर्णपदकाच्या दावेदार असलेल्या पृथा वर्टीकर व जेनिफर वर्गीस यांनी टेबल टेनिस मधील महिलांच्या दुहेरीत विजेतेपद पटकावित महाराष्ट्राचे पदकांचे खाते उघडले. विशेष म्हणजे या विभागातील रौप्य पदक महाराष्ट्राच्याच तनिषा कोटेचा व रिशा मिरचंदानी यांना मिळाले. पुरुषांच्या दुहेरीत महाराष्ट्राच्या जश मोदी व नील मुळ्ये यांनी कांस्यपदकाची कमाई केली.
महिलांच्या दुहेरीत महाराष्ट्राच्या जोड्यांनी अंतिम फेरी गाठल्यामुळे दोन्ही पदके महाराष्ट्राला मिळणार हे निश्चित झाले होते. फक्त उत्सुकता होती कोणती जोडी आणि कशी जिंकणार याचीच. पृथा व जेनिफर यांनी तनिषा व रिशा यांचा १३-११, ११-९,११-७ असा पराभव केला. तीनही गेम्समध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी परतीचे फटके, चॉप्स, काउंटर ॲटॅक असा सुरेख खेळ केला आणि चाहत्यांना खेळाचा आनंद मिळवून दिला.
सामना संपल्यानंतर पृथा व जेनिफर यांनी सांगितले,” विजेतेपदाची खात्री होती परंतु आमच्याच सहकाऱ्यांविरुद्ध अंतिम सामना होईल, अशी आम्ही अपेक्षा केली नव्हती. अर्थात अंतिम सामन्यात आमच्याच सहकारी प्रतिस्पर्धी होत्या त्यामुळे आम्हाला देखील खेळाचा आनंद घेता आला. “
पुरुष गटात कांस्यपदकासाठी झालेल्या लढतीत मोदी व मुळ्ये यांनी पश्चिम बंगालच्या अंकुर भट्टाचार्य व सौम्यदीप सरकार यांचा पराभव केला. सुरुवातीपासूनच खेळावर नियंत्रण मिळवणाऱ्या महाराष्ट्राच्या या जोडीने हा सामना ११-६, ११-५, ११-८ असा जिंकला. कास्यपदक मिळवल्यानंतर मोदी व मुळ्ये यांनी सांगितले,”महाराष्ट्राकरिता पदक मिळविल्यामुळे आम्हाला खूप समाधान वाटत आहे. आम्ही सराव शिबिरात भरपूर सराव केल्यामुळे आम्हाला एकमेकांच्या खेळाचा अभ्यास होता आणि त्याप्रमाणे आम्ही या सामन्यात समन्वय ठेवण्यात यशस्वी झालो.”

महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक व ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय खेळाडू सुनील बाब्रस यांनी खेळाडूंचे कौतुक करत सांगितले,” आमच्या खेळामध्ये पदके मिळवणार याची आम्हाला खात्री होती आणि त्याची पूर्तता आमच्या खेळाडूंनी केली. संघातील सर्वच खेळाडू अतिशय नैपुण्यवान आहेत याचा प्रत्यय त्यांनी घडवून दिला आहे.”

खेळाडूंची अभिमानास्पद कामगिरी : डॉ. दिवसे
महाराष्ट्राच्या पदकांचे खाते सुवर्णपदकांद्वारे उघडले जावे यापेक्षा आणखी वेगळी आनंददायी गोष्ट असू शकत नाही. महिलांच्या दुहेरीत सुवर्ण व रौप्य अशी दोन्ही पदके जिंकून आमच्या खेळाडूंनी या खेळातील आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. त्याखेरीज पुरुषांच्या दुहेरीतही कांस्यपदक मिळाल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. या सर्वच खेळाडूंची कामगिरी अभिमानास्पद आहे, असे महाराष्ट्राचे क्रीडा आयुक्त डॉ.‌सुहास दिवसे यांनी सांगितले.