Home Blog Page 1427

किरीट सोमय्या यांना दाखविले काळे झेंडे.

pune-    भाजपा नेते किरीट सोमय्या आज पर्वती भागातील लक्ष्मीनगर येथील भाजप कार्यकर्त्याच्या घरी जेवायला येत असल्याचे कळाल्यानंतर पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पर्वती ब्लॉक काँग्रेसच्या वतीने गजानन महाराज मठ चौक येथे किरीट सोमय्या यांच्या निषेधार्थ घोषणा देवून काळे झेंडे दाखवून महिला कार्यकर्त्यांनी गाडीवर बांगड्या फेकल्या. यावेळी काही कार्यकर्त्यांनी किरीट सोमय्या यांच्या गाडींवर काळे झेंडे फेकले.

     यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘भाजपाचे बेशरम नेते लज्जास्पद कृत्य करून त्याचे व्हिडीओ सोशल मिडियावर टाकतात आणि सरकार त्यांना सिक्युरिटी देते. त्यांना खरेतर ट्रिपल एक्स सिक्युरिटी दिली तरी काँग्रेसचे त्यांच्या विरोधातील आंदोलन सुरूच राहिल. घृणास्पद कृत्य करून निर्लज्जपणे जेवणावळी झोडायला पुण्यात आले. त्यांना ज्या ज्या ठिकाणी विरोध दर्शविता येईल त्या त्या ठिकाणी आक्रमकपणे विरोध दर्शविला जाईल.’’

     यावेळी त्यांच्या गाडीवर काळे झेंडे फेकणाऱ्या काँग्रेसच्या सद्दाम शेख, स्वप्निल नाईक, अक्षय माने, अक्षय सागर या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती.

     यावेळी माजी महापौर कमल व्यवहारे, संगीता तिवारी, अजित दरेकर, रफिक शेख, सुजित यादव, द. स. पोळेकर, संतोष पाटोळे, हेमंत राजभोज, शिवा भोकरे, प्रकाश आरणे, ताई कसबे, मनिषा गायकवाड, ज्योती आरवेन, जया गांगुर्डे, गोरख मरळ, सुजित लाजुरकर, आशितोष शिंदे, मुन्ना खंडेलवाल, छाया जाधव, सुंदरा ओव्हाळ, उषा राजगुरू, सोनिया ओव्हाळ, पपीता सोनावणे, कविता गायकवाड, मनिषा ओव्हाळ, कर्वेताई, शब्बिर शेख, मनिषा शिंदे, छाया साळुंखे, अपर्णा तावरे, मनिषा शिंदे आदी सहभागी झाले होते. 

केंद्रीय निवडणूक आयोगाची NCP च्या शरद पवार गटाला नोटीस, राष्ट्रवादी काँग्रेस कुणाचा? यावर सुनावणी ?

मुंबई-नोटीसीद्वारे आयोगाने अजित पवार यांच्या नेतृत्वातील बंडखोर गटाने गत 30 जून रोजी दाखल केलेल्या याचिकेवर आपली बाजू स्पष्ट करण्याचे निर्देश दिलेत. या दोन्ही गटांनी आपलाच गट खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे या नोटीसीद्वारे या गटांतील नेतृत्वाचे राजकारण चांगलेच तापण्याची शक्यता आहे.

मागील वर्षभरात महाराष्ट्रातील राजकारणात अनेक धक्कादायक घटना घडल्या आहेत. अजित पवार यांनी छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ आदी ज्येष्ठ सहकाऱ्यांच्या मदतीने राष्ट्रवादीत बंडखोरी केली. त्यानंतर त्यांनी थेट शिंदे – फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीवरही दावा सांगितला. या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला नोटीस बजावली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाला नोटीस बजावली आहे. या नोटीसीद्वारे अजित पवार यांच्या गटाने दाखल केलेल्या याचिकेवर आपली भूमिका स्पष्ट करण्याची सूचना करण्यात आली आहे.अजित पवार यांनी 30 जून रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे एक याचिका दाखल केली होती. या याचिकेद्वारे त्यांनी आपणच पक्षाचे प्रमुख आहोत, त्यामुळे पक्षाचे नाव व चिन्ह आपल्याला देण्यात यावे, अशी मागणी केली होती. अजित पवार यांच्या या याचिकेवर आता शरद पवार गटाला आपली भूमिका स्पष्ट करावी लागले. यासाठी शरद पवार गटाला काही अवधी देण्यात आला आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस कुणाचा? यावर औपचारिक सुनावणी सुरू होईल.

सफाई कामगारांच्या आरोग्यविषयक समस्यांकडे गंभीर्याने पाहावे; तात्काळ बैठक घेण्याचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश.

महापालिकेतील अधिकाऱ्यांची बदली होत नसल्याने कामगार सुविधेपासून वंचित राहतात.

मुंबई दि.२६: बृहन्मुंबई महापालिकेतील सफाई कामगारांची दोन वेळा आरोग्याची चाचणी करून उपचार केले जातात मात्र त्यांना दिले जाणारे मास्क, मोजे हे फाटके असतात. ते किती वेळा दिले जातात, त्याचा दर्जा काय आहे हे बघण्याची जबाबदारी त्या संबंधित अधिकाऱ्यांची आहे. मात्र सातत्याने हा गोंधळ होत असून त्याच कारण म्हणजे या अधिकाऱ्यांच्या बदल्या न होणे हे आहे. यासंदर्भात तात्काळ बैठक घेण्याचे निर्देश उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.

प्रश्नोत्तराच्या तासांमध्ये सदस्य श्री. विजय ऊर्फ भाई गिरकर यांनी बृहन्मुंबई महापालिकेतील सफाई कामगारांच्या आरोग्यविषयक सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.

या विषयाकडे गंभीरपणे पाहण्याची गरज असून या अधिकाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. मॅनहोल मध्ये जाऊन लोक दगावत आहेत तरीही त्याच्यावर उपाययोजना होत नसल्याचे त्यांनी सांगितले. या संपूर्ण विषयाबाबत मुख्यमंत्र्यांसोबत आपण ज्यावेळी बैठक घेणार आहात त्यावेळी यापूर्वी याबाबत झालेल्या बैठकीतील मुद्दे विचारात घ्यावेत असे डॉ गोऱ्हे यांनी मंत्रीमहोदय श्री. उदय सामंत यांना सांगितले.

यावर मंत्रीमहोदय श्री. उदय सामंत म्हणाले की, सफाई कामगार हा सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे. याविषयाबाबत तातडीने पूर्व तयारीचीबैठक घेतली जाईल आणि यापूर्वी झालेल्या बैठकीचे मुद्दे देखील विचारात घेतले जातील असे सांगितले.

 टोल वसूल करणारा म्हैसकर हा कोणाचा लाडका आहे?टोल मुक्त महाराष्ट्राचे झाले काय ? राज ठाकरे यांचे सवाल  

सगळीकडे ट्राफिक जाम , रस्ते खराब आणि टोल वसुली,पथ कर वसुली मात्र जोरात ..

मुंबई-गोवा रस्ता बावायला १७ वर्षे लागतात ?

पुणे-टोलमुक्त महाराष्ट्र करायची घोषणा भारतीय जनता पक्षाने केली होती, त्याचे काय झाले‌? असा प्रश्न मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उपस्थिती केला आहे. अमित ठाकरे यांना टोल नाक्यावर थांबवल्यानंतर टोल नाक्याची तोडफोड करण्यात आली होती. यावर उत्तर देताना राज ठाकरे यांनी भाजप आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर निशाणा साधला.रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. असे असताना टोल कसले वसूल करता? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. अमित ठाकरे राजकारणात आहेत, त्यामुळे त्यांच्यावर अशा प्रकारचे आरोप होत असल्याचे ते म्हणाले. टोल नाक्याच्या मुद्यावर राज ठाकरे पुन्हा आक्रमक झाल्याचे दिसून आले. टोलेच पैसे नेमके कोणाला मिळतात. टोल वसूल करणारा म्हैसकर हा कोणाचा लाडका आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

अजित पवार ही पहिली टीम

शरद पवार यांचे राजकारण मी अनेक वर्षांपासून पाहतोय. ही सर्व मिलीभगत आहे. अजित पवार म्हणजे पहिली टीम आहे. लवकरच दुसरी टीम देखील सत्तेत सहभागी होईल, ते सर्व एकत्र असल्याचे देखील राज ठाकरे म्हणाले. अजित पवार आणि शरद पवार यांची सर्व मिलीभगत असल्याचे देखील राज ठाकरे यांनी सांगितले. अजित पवार यांना जेलमध्ये टाकणारे आज त्यांच्यासोबत एकत्र असल्याचा खोचक टोला त्यांनी लगावला.राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष आणि भाजप यांच्यात युती होणार का? या प्रश्नाला त्यांनी फेटाळून लावले. कोणी कोणाला भेटले तर लगेचच त्यांच्यात युती होत नाही. असे म्हणत त्यांनी आगामी निवडणुकीत युतीच्या शक्यता फेटाळल्या आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात राज ठाकरे मनसेच्या विभाग अध्यक्षांची बैठक घेणार आहेत. ते पक्षाची पुर्नबांधणी करण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.

खासगी सावकाराचा पैशासाठी पतीपुढेच पत्नीवर बलात्कार, पुण्यातील खळबळजनक घटना; आरोपीला बेड्या

पुणे-हातऊसणे घेतलेले पैसे परत न केल्यामुळे खासगी सावकाराने एका व्यक्तीच्या पत्नीवर त्याच्यापुढेच बलात्कार केल्याची संतापजनक घटना पुण्यात घडली आहे. हा सावकार एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने या घटनेचा व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावरही व्हायरल केला. या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.पुण्याच्या हडपसर भागात गत फेब्रुवारी महिन्यात ही घटना घडली. पण ती 34 वर्षीय पीडित विवाहितेच्या तक्रारीनंतर आज उजेडात आली. तिच्या फिर्यादीनुसार आरोपी इम्तियाज हसीन शेख (47) याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित महिलेच्या पतीला आरोपीने उसने पैसे दिले होते. काही कारणामुळे पीडित दाम्पत्याला हे पैसे परत करता आले नाही. त्यामुळे आरोपीने फिर्यादी व तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी देत हडपसर येथील म्हाडा कॉलनीत बोलावून घेतले. त्यानंतर तक्रारदार महिलेच्या पतीला समोर बसवून त्याने चाकूचा धाक दाखवत पीडितेवर बलात्कार केला. यावेळी त्याने त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली.

आरोपीने या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आपल्या मोबाइलमध्ये रेकॉर्ड केला. त्यानंतर त्याने तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेकडे शरीर सूख देण्याची मागणी केली. पण महिलेने त्यास नकार दिल्यामुळे अखेर त्याने तो व्हिडिओ व्हायरल केला. यामुळे महिलेने थेट हडपसर पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी इम्तियाज हसीन शेखच्या मुसक्या आवळल्या.

लोकसभा अध्यक्षांनी अविश्वास स्वीकारला , म्हणाले- सर्व पक्षांशी चर्चा करून मणिपूरवर चर्चेची वेळ ठरवू

बुधवारी लोकसभेत काँग्रेसने सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी तो स्वीकारला आहे. काँग्रेसला मणिपूरच्या मुद्द्यावर चर्चा हवी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मुद्द्यावर सभागृहात उत्तर द्यावे, असे पक्षाचे म्हणणे आहे. सर्व पक्षांशी चर्चा करून चर्चेची वेळ ठरवली जाईल, असे सभापतींनी सांगितले.

विरोधी पक्षाच्या खासदारांनी घोषणाबाजी करत पंतप्रधान मोदींनी सभागृहात उपस्थित रहावे, असे सांगितले. या गदारोळानंतर लोकसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.

तत्पूर्वी, मणिपूरच्या मुद्द्यावरून लोकसभा आणि राज्यसभेत गदारोळ झाला आणि दोन्ही सभागृहांचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. लोकसभेचे कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी अविश्वास ठराव मांडला.

केजरीवाल शरद पवारांची भेट;केंद्राच्या अध्यादेशाविरोधात दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची मोर्चेबांधणी?

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यांच्या ट्वीटर वर अरविंद केजरीवाल आणि राघव चड्ढा यांचा फोटो शेअर केला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांनी माझ्या नवी दिल्लीतील निवासस्थानी सौजन्य भेट घेतली, असे पवार म्हणाले आहेत.दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि बदल्यांवर नियंत्रण ठेवण्याशी संबंधित अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळाची काल मंजुरी मिळाली आहे. त्यानंतर आता केंद्र लवकरच हा अध्यादेश सभागृहात मांडणार आहे. आम आदमी पार्टी (आप) या विधेयकाला सभागृहात विरोध करणार असून ‘आप’ला या प्रकरणात विरोधी पक्षांचाही पाठिंबा आहे. यादरम्यान का अरविंद केजरीवाल यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली आहे.

केंद्र सरकारने १९ मे रोजी अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी एक अध्यादेश जारी केला. या अध्यादेशात त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा ११ मेचा निर्णय रद्द केला, ज्यामध्ये दिल्ली सरकारला बदली-पोस्टिंगचा अधिकार मिळाला होता. केंद्र सरकारने अध्यादेशाद्वारे दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या-पोस्टिंगचे अधिकार उपराज्यपालांना दिले होते.

याविरोधात दिल्ली सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावर सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी १७ जुलै रोजी सांगितले की, आम्ही हे प्रकरण पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे पाठवू इच्छितो. मग घटनापीठ ठरवेल की केंद्र अशी सुधारणा करू शकते की नाही? असे म्हटले होते.

दरम्यान राज्यसभेत आम आदमी पक्षासह विरोधी पक्ष विधेयकाला विरोध करणार आहे. विधेयक मंजूर होऊ नये याच्यासाठी राज्यसभेत विधेयकाला विरोध करावा यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अनेक विरोधी पक्षातील नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या. त्यांनी मुंबईत येऊन शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची देखील भेट घेतली होती.

दिल्ली सरकार विरोधातील अध्यादेशाला केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत मंजुरी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर लवकरच हे विधेयक संसदेत मांडलं जाणार आहे. या पार्श्वभूमिवर अरविंद केजरीवाल शरद पवारांच्या भेटीला पोहचल्याने राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

पत्रकारांच्या प्रश्नांबाबत डिसेंबरपर्यंत धोरणात्मक निर्णय घेऊन अंमलबजावणी करा – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई दि.२५: राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नासंदर्भात सभागृहात अनेक सूचना आल्या आहेत. त्यावर अभ्यास समिती करण्याचे सांगण्यात आले आहे. मात्र अशा प्रकारच्या बऱ्याच सूचना दिल्या जातात पण त्याच्या अंमलबजावणीला बराच वेळ लागतो. याकरिता या अभ्यास समितीचे निर्णय डिसेंबरच्या अधिवेशनापर्यंत यावेत आणि त्याबाबत धोरणात्मक निर्णय व्हावेत असे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

मंत्रीमहोदयांनी दिलेल्या उत्तरानुसार फक्त १५४ पत्रकारांना ११ हजारापर्यंतचा लाभ देण्यात येतो मात्र ही संख्या फारच कमी आहे. यासाठी सर्व्हेक्षण करून त्यांची संख्या वाढवली पाहिजे. तसेच दरवर्षी ती दुप्पट केली जावी असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. ६० वर्षे वयापर्यंत अनेक पत्रकारांना असाध्य आजार होत असतानाचे दिसत आहे. मात्र काहीवेळा पत्रकारांनी १५ – २० वर्षे काम केल्यावर देखील त्यांना कॅन्सर, अल्झामायर यांसारखे इतर आजार होतात त्यामुळे ही वयाची अट तात्काळ शिथिल केली जावी आणि त्यांना देखील यामध्ये समाविष्ट करण्यात यावे असे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले.

लेखक, पत्रकार हे समाजाचे अभ्यासक आहेत. अधिस्वीकृती मध्ये महिलांना स्थान देण्यात यावे. यामध्ये राज्यभरातील महिलांचा विचार व्हावा असे त्यांनी सांगितले. म्हाडाकडून मिळणाऱ्या जागांसाठी संपादकांची शिफारस लागते मात्र त्याऐवजी वेतनाचे पत्र किंवा इतर गोष्टी घेतल्या जाव्यात आणि शिफारशीची अट शिथिल करता येईल का ? यावर विचार करण्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

सन्माननीय सदस्य श्री. धीरज लिंगाडे यांनी पत्रकारांना भेडसावत असणाऱ्या समस्यांबाबत लक्षवेधी अंतर्गत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी त्यांचे मत नोंदविले.

PMPML अध्यक्ष साहेब ,इकडे लक्ष द्याल का हो …

पुणे- ऊन, वारा , पाऊस या पासून बचाव होईल असे बस थांबे आपण खरेदी करत आहात हि बाब चांगली आहे पण असा बस थांबा आमच्या ..या बस थांब्याच्या जागेवर लावणार काहो … या बस थांब्याच्या च्या अवस्थेकडे लक्ष देणार काहो … अशी साद जणू धनकवडी ,तळजाई वर राहणाऱ्या आणि बस ने प्रवास करणाऱ्या नागरिकांनी pmpml च्या अध्यक्षांना घातली आहे.आणि सोबतचा सध्याच्या अवस्थेतील बस थांब्याचा फोटो शेअर करायला सुरुवात केली आहे. सध्या पावसाचे दिवस आहेत . धनकवडी येथे शेवटचा बस थांबा गावात जिल्हापरिषद शाळा (जुनी ) येथे आहे. तेथून पायी चालत तळजाई ला जावे लागते आणि तेथून यावे लागते हि अडचण काही प्रमाणात दूर करण्यासाठी तीन हत्ती चौक , स्मशान भूमी पासून च्या रस्त्याने मागील बाजूच्या रस्त्याने चाटे स्कूल नजीक पर्यंत जाता येईल अशा पद्धतीने बस थांबा करण्यात आला .पण दुर्दैवाने तो अशाच अवस्थेत वर्षानुवर्षे आहे आणि बसच्या वेळांचा भरवसा नाही येथून फारच कमी संख्येने बसेस असतात अशा विविध कारणांमुळे या भागातील नागरिकांना दुचाक्या , किंवा अन्य खाजगी वाहने वापरण्याशिवाय पर्याय उरलेला नाही . किमान हा बस ठमाबा चांगल्या स्वरूपात उभारावा ,मिनी बसेस ची तरी संख्या वाढवावी अशी मागणी होते आहे. अशी माहिती राष्ट्रवादीचे नितीन कदम यांनी येथे दिली .

डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठी १० ऑगस्टपर्यंत अर्ज करावेत

मुंबई, दि. २५ :  अल्पसंख्याक विकास विभागाकडून  डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना” सन २०२३-२४ मध्ये राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मदरसांनी जिल्हाधिकारी कार्यालयात १० ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन मुंबई जिल्हा नियोजन अधिकारी यांनी केले आहे.

राज्यातील धर्मादाय आयुक्त अथवा वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत व मुंबई शहर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील मदरसांनी विहित अटी व शर्तींची पूर्तता करुन विहित नमुन्यातील अर्जाचा परिपूर्ण प्रस्ताव, जिल्हाधिकारी, मुंबई शहर, जुने जकात घर, शहीद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई ४००००१ यांच्याकडे तत्काळ सादर करावा. विहित अर्जाचा नमुना  https://mdd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी ०२२-२२६६०९६७ या क्रमांकावर संपर्क साधावा.

जिल्हाधिकारी कार्यालयाने शासनास प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट, २०२३ पर्यंत असल्याचे पत्रकात म्हटले आहे.

शासकीय वसाहतीतील रहिवाशांना मालकी हक्काने घरे देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ-सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

मुंबई, दि. 25- शासकीय वसाहत वांद्रे (पूर्व) येथील उपलब्ध जागेच्या पुनर्विकासा संदर्भात कृती आराखडा तयार करण्यासाठी कोरियन कंपनीसोबत करार करण्यात आला आहे. येथील रहिवाशांना मालकी हक्काने घरे देणे हा धोरणात्मक विषय असून कृती आराखडा आल्यानंतर याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधान परिषदेत सांगितले.

सदस्य ॲड.अनिल परब यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री श्री.चव्हाण म्हणाले, या शासकीय वसाहतीच्या जागेचा पुनर्विकास करण्यात येत आहे. यासाठी उपलब्ध असलेली जागा विचारात घेऊन पुनर्विकासाचा आराखडा तयार केला जात आहे. हा आराखडा ऑक्टोबरपर्यंत तयार होणे अपेक्षित असून त्यानंतर पुढील अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन रहिवाशांच्या मागणीबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. रहिवाशांना घरे देण्याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक असल्याचेही त्यांनी सांगितले. सध्या नादुरूस्त असलेल्या सदनिकांची पाहणी करून त्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असेही ते म्हणाले.

या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री भाई गिरकर, सचिन अहिर, प्रवीण दरेकर यांनी सहभाग घेतला.

बिट मार्शलचे कर्तव्य तत्परतेमुळे… रस्ता चुकलेली ७० वर्षीय वयोवृद्ध महिला कुटूंबियाकडे सुखरूप

पुणे-कसबापेठपरिसरात राहणारी, रस्ता चुकलेली ७० वर्षीय वयोवृद्ध महिला बिट मार्शलच्या कर्तव्य तत्परतेमुळे कुटूंबिया कडे सुखरूप पोहोचली.

मुंढवा पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात दिनांक २४/०७/२०२३ रोजी मुंढवा बिट मार्शल पोलीस अंमलदार, देवानंद खाडे व संदीप गर्जे हे गस्त करीत असतांना एक वयोवृद्ध आजी वय अंदाजे ७० वर्षे हि मुंढवा चौक येथे अस्ताव्यस्त, घाबरलेल्या सारखी फिरत असल्याचे दिसले. तेव्हा पोलीस अंमलदार देवानंद खाडे यांनी आजीच्या जवळ जावून मायेने मदत हवी आहे काय याबाबत विचारणा केली. सदर वेळी आजीने काहीएक न बोलता, फक्त पाहतच राहिली व डोळे पाणावले तेव्हा पोलीस अंमलदार देवानंद खाडे यांचे लक्षात आले, आजी वाट चुकली आहे तेव्हा आजीस नाव व राहण्याचा पत्ता विचारला असता, नाव बेबी, राहणार कसबा एवढेच सांगितले. आजीजवळ अचुक ओळख पटविण्याकरीता मोबाईल फोन, ओळखपत्र, नाव पत्ता बाबत काहीएक चिज वस्तू नसल्याने पुढील कार्यवाही करीता मुंढवा पोलीस चौकी येथे आणले. सदर घटनेचे माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विष्णू ताम्हाणे यांना मिळताच वयोवृद्ध आजी राहण्याचे ठिकाण कसबा असे सांगत असल्याने तात्काळ फरासखाना पोलीस ठाणेस संपर्क करुन फोटो पाठवून वर्णन कळविणे बाबत सांगितले. तेव्हा आजीचे नातेवाईक देखील आजीचा शोध घेत असल्याची माहिती प्राप्त झाली. आजीचे नातेवाईक यांना संपर्क नंबर प्राप्त करुन मुंढवा पोलीस ठाणे येथे बोलावून घेतले. आजीचे जावई रा. ४७६, कसबा पेठ, पुणे हे समक्ष मुंढवा पोलीस ठाणेस हजर राहून ओळखून आजीचे संपुर्ण नाव बेबी मरीयम अन्सारी, वय ७० वर्षे, रा. ४४०, कसबा पेठ पुणे असे असल्याचे सांगितले. योग्य खात्री झाल्याने आजीस जावई यांचे ताब्यात सुखरुप देण्यात आले आहे. आजीचे जावई यांनी पोलीसांचे या तत्पर कामगिरी बद्ल कौतुक करुन पुणे शहर पोलीस दलाचे आभार मानले आहेत. सदरची कामगिरी,पोलीस उप-आयुक्त,विक्रांत देशमुख परिमंडळ – ५ पुणे शहर, सहा. पोलीस आयुक्त, श्रीमती अश्विनी राख, हडपसर विभाग पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली, मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विष्णू ताम्हाणे यांचे सुचानाप्रमाणे पोलीस अंमलदार देवानंद खाडे, रमेश उगले, संदीप गर्जे यांनी केली आहे.

‘फार्मसी’च्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याना ‘कॅरी ऑन’चा लाभ;उपमुख्यमंत्री अजितदादांच्या फार्मसी कॉन्सिलकडील पाठपुराव्याला यश

विद्यार्थी-पालकांसह फार्मसीच्या शैक्षणिक संस्थांनी मानले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार

मुंबई, दि. 25:- फार्मसी पदविकेच्या ‘उन्हाळी परिक्षा 2023’च्या प्रथम वर्षाचा निकाल अत्यंत कमी लागल्यामुळे विद्यार्थ्यांसह पालक चिंतेत होते. या प्रश्नी लक्ष घालून काही तरी सकारात्मक तोडगा काढण्याचे साकडे राज्यातील फार्मसी महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केले होते. या प्रश्नी विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी तातडीने कार्यवाही करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फार्मसी कॉन्सिल ऑफ इंडियाच्या कार्यालयाकडे या विषयी पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश आले असून फार्मसी पदविकेच्या प्रथम वर्षाच्या अनुतीर्ण विद्यार्थ्यांना ‘कॅरी ऑन’चा लाभ देत थेट दुसऱ्या वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्याला फार्मसी कॉन्सिल ऑफ इंडियाने मान्यता दिली आहे. कालच (दि. 24 जुलै 2023 रोजी) प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना ‘कॅरी ऑन’चा लाभ देण्याचे परिपत्रक महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाने जारी केले आहे. या निर्णयाचा राज्यातल्या हजारो फार्मसीच्या विद्यार्थ्याना लाभ होणार आहे. त्यामुळे राज्यातील सर्व फार्मसी महाविद्यालयांसह विद्यार्थी व पालकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत.

या बाबत अधिक माहिती अशी, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गत वर्षी फार्मसीच्या प्रवेश प्रक्रीयेला झालेल्या विलंबामुळे शैक्षणिक कालावधी अत्यंत कमी मिळाला होता. फार्मसी पदविका अभ्यासक्रम वार्षिक असून फार्मसी कॉन्सिल ऑफ इंडीयाच्या मानकानुसार हा कालावधी किमान 180 दिवसांचा असणे अपेक्षित होते. मात्र गत वर्षी हा कालावधी अवघा तीन ते चार महिने म्हणजे केवळ शंभर ते एकशेवीस दिवस एवढाच मिळाला होता. याचा थेट परिणाम प्रथम वर्षाच्या निकालावर झाला होता. फार्मसीच्या पदविकेच्या ‘उन्हाळी परिक्षा 2023′ चा निकाल पन्नास टक्याहून कमी लागला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्यावर अतिरिक्त ताण येऊन त्यांच्यात नैराश्य वाढण्याची भिती होती. त्यामुळे या प्रश्नी काही तरी सकारात्मक तोडगा काढण्यासाठी फार्मसीच्या सर्व महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदनाद्वारे साकडे घातले होते. प्रश्नाचे गांभीर्य आणि विद्यार्थ्याचे हित लक्षात घेऊन त्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फार्मसी कॉन्सिल ऑफ इंडियाच्या नवी दिल्लीच्या कार्यालयासोबत पाठपुरावा केला. या पाठपुराव्याला यश मिळाले असून कालचं (दि. 24 जुलै 2023रोजी) फार्मसी पदविकेच्या शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये प्रवेशित असलेल्या आणि प्रथम वर्षाच्या परिक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना 2023-24 मध्ये द्वितीय वर्षात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला असून महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाने तसे परिपत्रक सुध्दा जारी केले आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांना लाभ होणार असून विद्यार्थ्यांचे एका वर्षाचे शैक्षणिक नुकसान टाळता येणार आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी फार्मसी कॉन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य, माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांनी योगदान दिले. या निर्णयामुळे शैक्षणिक क्षेत्रात आनंद व्यक्त होत असून विद्यार्थी-पालकांसह फार्मसी शिक्षण संस्थांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत.

राज्यात आतापर्यंत १ कोटी ११ लाख शेतकऱ्यांनी भरला एक रुपयात पीकविमा!

कृषीपासून गृहविभागापर्यंतच्या चर्चेला धनंजय मुंडेंचे उत्तर

मुंबई दि. २५ जुलै – ग्रामीण भागातील शेतीला समृद्धी देण्याच्या व्यापक उद्देशाने तयार करण्यात आलेली पोकरा योजना अत्यंत फायदेशीर असून ती केवळ निवडक गावांपुरती मर्यादित न ठेवता प्रत्येक गावात लागू व्हावी, असे उद्दिष्ट आहे, भविष्यात यादृष्टीने आवश्यक निर्णय घेतले जातील. जास्तीत जास्त गावातील शेतकऱ्यापर्यंत या योजनेची व्याप्ती पसरावी, असा प्रयत्न राज्य सरकार करीत आहे, अशी माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी विधानपरिषदेत बोलताना दिली.

सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या नियम २६० अन्वये उपस्थित चर्चेच्या उत्तरात धनंजय मुंडे बोलत होते.

राज्यात या खरीप हंगामात प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत आजपर्यंत तब्बल १ कोटी ११ लाख शेतकऱ्यांनी एक रुपयात पिकविमा भरला असून, ही संख्या दररोज ६ ते ७ लाखांनी वाढत आहे. याचाच अर्थ शेतकऱ्यांना पीकविमा योजना अधिक सोयीची झाल्याचे स्पष्ट होते, असे मत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.

शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा संरक्षण मिळत आहे तर दुसरीकडे केंद्र व राज्यसरकार मिळून वर्षाला १२ हजार रुपये शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर देत आहे, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी राहून त्यांचा आर्थिक भार कमी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे, असेही धनंजय मुंडे बोलताना म्हणाले.

विधानपरिषदेत विरोधीपक्ष नेत्यांसह विविध सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना धनंजय मुंडे यांनी पीएम किसान सन्मान योजनेतून बोगस पद्धतीने पैसे उचललेल्या खोट्या शेतकऱ्यांच्या विषयावर देखील मत व्यक्त केले. जो शेतकरी नाही, पण पैसे उचललेत अशा लोकांकडून केंद्रसरकार वसुली करत असल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी दिली.

दरम्यान सदस्यांनी उपस्थित केलेल्या पिक कर्जमाफी व नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांपैकी काही शेतकऱ्यांच्या उर्वरित लाभाबाबत धनंजय मुंडे यांनी पुरवणी मागण्यांमधून या रकमेची तरतूद करण्यात आली असून, १५ ऑगस्टपर्यंत या रकमा वितरीत केल्या जातील असे सांगितले.

बोगस बियाण्यांच्या तक्रारींबाबत घोषित केल्याप्रमाणे कायद्याची निर्मिती करण्याची प्रक्रिया सुरू असून, कालच मंत्रिमंडळ उपसमितीची यासंदर्भात बैठक झाल्याचेही धनंजय मुंडे म्हणाले.

राज्यात जलयुक्त शिवार टप्पा दोनच्या माध्यमातून आणखी ५ हजार गावांचा समावेश करण्यात येत असून, जलपातळी वाढण्यास नक्कीच याची मदत होईल. मराठवाड्यातील पाण्याचे दुर्भिक्ष संपावे, यादृष्टीने वॉटर ग्रीड हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अत्यंत महत्वाचा असून या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.

धनंजय मुंडे यांनी आजच्या चर्चेदरम्यान कृषी विभागासोबतच जलसंपदा, वित्त व नियोजन, मदत व पुनर्वसन, गृह आदी जवळपास १५ विभागाच्या चर्चेला राज्यसरकारच्यावतीने उत्तर दिले. अत्यंत अभ्यासपूर्ण तसेच व्यापक माहिती धनंजय मुंडे यांनी सभागृहात मांडली.

पुणे,नाशिक,अहमदनगर येथील कुटुंब न्यायालयांच्या अधिकारक्षेत्रात वाढ

मुंबई, दि. २५ : नाशिक, अहमदनगर व पुणे येथील महापालिका क्षेत्रासाठी स्थापन केलेल्या कुटुंब न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रात वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

उच्च न्यायालयाशी विचारविनिमय करून कुटुंब न्यायालय अधिनियम १९८४ च्या कलम ३ च्या पोट कलम (१) व (२) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून राज्य शासनाने काही शहरांच्या कुटुंब न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रात वाढ केली आहे. यात नाशिक, अहमदनगर आणि पुणे शहरांच्या कुटुंब न्यायालयांचा समावेश आहे.

नाशिक येथील कुटुंब न्यायालयाचे अधिकार क्षेत्र देवळाली छावणी क्षेत्राच्या स्थानिक सीमांपर्यंत वाढविण्यात आले आहे. अहमदनगर येथील कुटुंब न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राच्या स्थानिक सीमा अहमदनगर छावणी मंडळाच्या संपूर्ण क्षेत्रापर्यंत विस्तारित करण्यात आल्या आहेत.

तसेच पुणे महापालिका क्षेत्र व पुणे खडकी छावणी क्षेत्राचा समावेश असलेल्या  क्षेत्राकरिता पुणे येथे कुटुंब न्यायालय स्थापन केले आहे. या कुटुंब न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात वाढ करून ते देहूरोड छावणी क्षेत्राच्या स्थानिक सीमापर्यंत वाढविण्यात आले आहे, असे शासनाने एका अधिसूचनेद्वारे कळविले आहे.