नवी दिल्ली, 1 ऑगस्ट 2023-अवजड उद्योग मंत्रालयाने 1 एप्रिल 2019 पासून सुरू होणाऱ्या पाच वर्षांच्या कालावधीसाठी 10,000 कोटी रुपयांच्या आर्थिक तरतुदीचे पाठबळ असलेली भारतातील इलेक्ट्रिक वाहनांचा वेगवान अवलंब आणि उत्पादनाचा टप्पा II (फेम इंडिया टप्पा II) योजना तयार केली आहे. हा टप्पा प्रामुख्याने सार्वजनिक आणि सामायिक वाहतुकीच्या विद्युतीकरणावर लक्ष केंद्रित करतो आणि 7090 ई-बस, 5 लाख ई-3 चाकी, 55000 ई-4 चाकी प्रवासी गाड्या आणि 10 लाख ई-दुचाकी गाड्यांच्या मागणीला प्रोत्साहन देण्याचे मंत्रालयाचे उद्दिष्ट आहे. याशिवाय,या योजनेंतर्गत चार्जिंग पायाभूत सुविधा उभारणीलाही पाठबळ दिले जाते.
फेम इंडिया योजनेच्या टप्पा-II अंतर्गत, इलेक्ट्रिक वाहन उत्पादकांकडून ग्राहकांना 28.07.2023 पर्यंत (http://fame2.heavyindustries.gov.in/dashboard.aspx नुसार) 4157.00 कोटी रुपये (अंदाजे) किमतीची 8,47,578 वाहने विकली गेली आहेत.विक्री झालेल्या इलेक्ट्रिक वाहनांचा प्रकारानुसार तपशील खालीलप्रमाणे आहे:
Sl. No.
Wheeler Type
Total No. of Vehicle
1.
2 wheeler
7,53,140
2.
3 wheeler
85,168
3.
4 wheeler
9,270
Total
8,47,578
तसेच,अवजड उद्योग मंत्रालयाने 65 शहरे/एसटीयू/राज्य सरकारी आस्थापनांना शहरांतर्गत परिचालनासाठी 6315 इलेक्ट्रिक बसेस मंजूर केल्या आहेत.
ई-वाहन पोर्टल (रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय) नुसार, राज्य/केंद्रशासित प्रदेशनिहाय कार्यरत इलेक्ट्रिक वाहनांची तपशीलवार यादी परिशिष्टात दिली आहे.
फेम-इंडिया योजना टप्पा -II अंतर्गत, इलेक्ट्रिक वाहन उत्पादकांना कोणतेही प्रोत्साहन दिले जात नाही. ग्राहकांना (खरेदीदार/अंतिम वापरकर्ते) प्रोत्साहन/सवलत ही हायब्रीड आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदी किमतीच्या रूपात प्रदान करण्यात आली आहे, ज्याचा व्यापक अंगिकार करण्यासाठी भारत सरकारकडून मूळ वाहन उत्पादकांना (इव्ही उत्पादकांना) प्रतिपूर्ती केली जाईल.
परिशिष्ट
वाहन4 नुसार 14.07.2023 पर्यंत कार्यरत इलेक्ट्रिक वाहनांचा तपशील खालीलप्रमाणे
Sl. No
State name
Till date State wise – total vehicle registered as Electric
1
Andaman & Nicobar Island
186
2
Andhra Pradesh
66,500
3
Arunachal Pradesh
25
4
Assam
1,16,605
5
Bihar
1,55,457
6
Chandigarh
7,628
7
Chhattisgarh
52,813
8
Delhi
2,29,305
9
Goa
12,139
10
Gujarat
1,34,273
11
Haryana
67,812
12
Himachal Pradesh
2,362
13
Jammu and Kashmir
10,225
14
Jharkhand
35,331
15
Karnataka
2,39,948
16
Kerala
94,346
17
Ladakh
65
18
Madhya Pradesh
92,388
19
Maharashtra
2,96,885
20
Manipur
1,198
21
Meghalaya
129
22
Mizoram
114
23
Nagaland
60
24
Odisha
60,097
25
Puducherry
4,421
26
Punjab
34,162
27
Rajasthan
1,75,595
28
Sikkim
20
29
Tamil Nadu
1,67,216
30
Tripura
14,379
31
UT of DNH and DD
345
32
Uttarakhand
48,250
33
Uttar Pradesh
5,56,629
34
West Bengal
67,111
Grand Total
27,44,019
यानुसार महाराष्ट्रातील 2,96,885 गाड्यांची नोंदणी इलेक्ट्रिक वाहन म्हणून झाली आहे.
1- दिलेला तपशील केंद्रीकृत वाहन 4 नुसार डिजिटलाइज्ड वाहन नोंदीसाठी आहे.
2 – तेलंगणा आणि लक्षद्वीपसाठी डेटा प्रदान केलेला नाही कारण ते केंद्रीकृत वाहन 4 मध्ये समाविष्ट नाहीत.”
अवजड उद्योग राज्यमंत्री कृष्ण पाल गुर्जर यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
मुंबई,दि.१- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावरुन सध्या सुरु असलेली विमान प्रवासाची सुविधा नियमित, सुरळीतपणे आणि अधिक फे-यांच्या स्वरुपात गणेशोत्सवाच्या पाश्वभूमीवर नागरिकांना उपलब्ध करुन देणार असून त्यासाठी आवश्यक तो पाठपुरावा मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारकडे करण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज मंत्रायलयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
मंत्री श्री. चव्हाण म्हणाले, पर्यटन जिल्हा म्हणून महत्वपूर्ण असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हयातील रोजगार वृद्धी तसेच स्थानिकांच्या प्रवासाच्या सोयीच्यादृष्टीने चिपी विमानतळावरील विमान प्रवास सेवा ही निश्चितच महत्वाची आहे. विशेषतः गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात येणा-या चाकरमानी,पर्यटकांच्या सोयीच्या दृष्टीने देखील ही विमानप्रवास सेवा अधिक जास्त प्रमाणात उपलब्ध असणे आवश्यक आहे. मात्र सध्या या ठिकाणी पाहिजे त्या प्रमाणात सुरळितरित्या विमान प्रवास सेवा प्रवाश्यांना उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्याचा सबंधित अधिका-यांशी आढावा घेऊन त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी आढावा बैठक घेण्यात आली असल्याचे सांगून श्री.चव्हाण म्हणाले की, याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याची शासनाची भूमिका आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या रोजगार संधी विस्तारण्यासोबतच स्थानिक प्रवाश्यांच्या सोयीच्यादृष्टीने चिपी विमानतळावरुन पुरेशा प्रमाणात विमान प्रवास सेवा सुरु करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल. याबाबत लवकर ठोस निर्णय घेण्याच्या दृष्टीने केंद्राकडे मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात पाठपुरावा केल्या जाईल,असे मंत्री श्री.चव्हाण यांनी यावेळी सांगितले.
पुणे– नैशा रेवसकर हिने तेरा वर्षाखालील गटापाठोपाठ पंधरा वर्षाखालील मुलींच्या गटातही विजेतेपद पटकाविले आणि फिनिक्स चषक टेबल टेनिस स्पर्धेत दुहेरी मुकुट मिळविला. मुलांमध्ये मात्र कौस्तुभ गिरगावकर याने श्रेयस माणकेश्वर याला या संधीपासून वंचित ठेवले व पंधरा वर्षाखालील गटात विजेतेपदावर मोहोर उमटवली. ही स्पर्धा जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने फिनिक्स फ्लायर स्पोर्ट्स अकादमीतर्फे मेट्रो सिटी क्लब येथे आयोजित करण्यात आली आहे. मुलींच्या १५ वर्षाखालील गटाच्या अंतिम फेरीत नैशा हिने चौथ्या मानांकित रुचिता दारवटकर हिच्यावर शानदार विजय मिळवला. शेवटपर्यंत रंगतदार झालेला हा सामना तिने ११-९,११-५, ६-११,६-११,११-७ असा जिंकला. दोन्ही खेळाडूंनी अष्टपैलू कौशल्य दाखवले मात्र शेवटच्या गेममध्ये नैशा हिने खेळावर नियंत्रण ठेवले आणि अजिंक्यपद मिळविले. उपांत्य फेरीत तृतीय मानांकित नैशा हिने तनया अभ्यंकर हिचा ११-९,११-८,११-२ असा पराभव केला तर रुचिता हिने सई कुलकर्णी हिला ११-९,११-८,११-९ असे पराभूत केले. तेरा वर्षाखालील गटात नैशा रेवसकर हिने अंतिम लढतीत अग्रमानांकित आद्या गवात्रे हिला पराभूत करीत सनसनाटी विजेतेपद पटकाविले. तृतीय मानांकित खेळाडू नैशा हिने हा सामना ९-११,११-२, ११-७, ११-८ असा जिंकला. पहिली गेम गमावल्यानंतर तिने सातत्यपूर्ण खेळाचा प्रत्यय घडविला आणि विजयश्री खेचून आणली. नैशा ही कामगार कल्याण केंद्र येथे नीरज होनप यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे. या मोसमातील तिचे हे तिसरे विजेतेपद आहे. मुलांच्या पंधरा वर्षाखालील गटात अग्रमानांकित गिरगावकर याने सातव्या मानांकित श्रेयस याच्याविरुद्ध ११-५,११-८, ११-७ असा एकतर्फी विजय मिळविला. या सामन्यात त्याने सुरुवातीपासूनच टॉप स्पिन फटके आणि चॉप्स असा सुरेख खेळ केला. त्याने उपांत्य फेरीत स्वरूप भाडळकर याला ११-४, ११-६,११-७ असे पराभूत केले होते तर श्रेयस याने सहाव्या मानांकित आदित्य सामंत याच्याविरुद्ध १०-१२,११-८,८-११, १४-१२, ११-७ असा रोमहर्षक विजय नोंदविला होता. तेरा वर्षाखालील मुलांच्या गटात श्रेयस याने अंतिम फेरीत अनंत कर्मपुरी या सातव्या मानांकित खेळाडूची आश्चर्यजनक विजयाची मालिका खंडित केली. हा सामना त्याने १२-१४,११-३,९-११,११-७,११-४ असा जिंकला.
तब्बल २१ हजार नागरिकांनी घेतला स्नेहभोजनाचा आस्वाद ; क्रान्तीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जयंती कृती समितीतर्फे आयोजन पुणे : क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी महामिसळ आणि त्यापाठोपाठ लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जयंती दिनी तब्बल २१ हजार नागरिकांना स्नेहभोजनाचा आस्वाद देत पुण्यामध्ये ‘एकता स्नेहभोजनाचा’ आगळावेगळा कार्यक्रम पार पडला. यानिमित्ताने एकतेचा संदेश देण्याकरिता वेगळ्या प्रकारे उपक्रम राबवित हजारो नागरिकांपर्यंत महापुरुषांच्या कार्याचे महत्व पोहोचविले जात आहे. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जयंती कृती समितीतर्फे सारसबागेजवळील अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ ‘एकता स्नेहभोजनाचे’ आयोजन करण्यात आले होते. यामध्ये तब्बल २१ हजार नागरिकांनी पुलाव, बुंदी, कोशिंबीर असा स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. या उपक्रमाच्या आयोजनात प्रल्हाद गवळी, श्रीधर चव्हाण, सारंग सराफ, जयेश कसबे, सचिन विप्र, मंदार जोशी, गणेश पाटील, अमर आढागळे, बाळासाहेब ढमाले, विजय रजपूत, बाळासाहेब भामरे, महेंद्र मारणे यांनी सहभाग घेतला. एकता स्नेहभोजनाकरिता १०० किलो दळलेले बेसन, २४ डबे तेल, ६०० किलो साखर, १२०० किलो तांदूळ यांसह ३ किलो खोबरे, ७५ किलो डबल बी, ७५ किलो शेंगदाणा कूट, ३ किलो जिरे, मोहरी, दीड किलो तमाल पत्र, १०० किलो फ्लॉवर, तोंडली, बटाटा, कांदा, २० किलो मिरची, १५ किलो आले लसूण, १५० किलो काकडी, १०० किलो दही, ६० किलो टोमॅटो असे मोठ्या स्वरूपात साहित्य वापरण्यात आले. विविध संस्था, संघटना, राजकीय पक्ष यांसह वैयक्तिक स्तरावर हे साहित्य गोळा करण्यात आले होते. यातून देखील एकतेचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला. या उपक्रमाला पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी आमदार जयदेव गायकवाड, दीपक मानकर, संजय मोरे, वसंत मोरे, किशोर शिंदे, राजेंद्र वागस्कर, साईनाथ बाबर आदी मान्यवरांनी भेट देत शुभेच्छा दिल्या.
देशात जुलै 2023 मध्ये संकलित झालेला सकल वस्तू आणि सेवा कर महसूल 1,65,105 कोटी रुपये असून त्यापैकी 29,773 कोटी रुपये केंद्रीय वस्तू आणि सेवा कर, 37,623 कोटी रुपये राज्य वस्तू आणि सेवा कर, तर 85,930 कोटी रुपये एकात्मिक वस्तू आणि सेवा कर (वस्तूंच्या आयातीतून संकलित केलेल्या 41,239 कोटी रुपयांसह) आणि 11,779 कोटी रुपये उपकर (वस्तूंच्या आयातीतून संकलित केलेल्या 840 कोटी रुपयांसह) रुपात संकलित करण्यात आले आहेत.
सरकारने, एकात्मिक वस्तू आणि सेवा करापैकी 39,785 कोटी रुपये केंद्रीय वस्तू आणि सेवा कर तसेच 33,188 कोटी रुपये राज्य वस्तू आणि सेवा कर रुपात मंजूर केले आहेत. नियमित मंजूरीनंतर, जुलै 2023 मध्ये केंद्र आणि राज्यांचा एकूण महसूल CGST साठी 69,558 कोटी रुपये केंद्रीय वस्तू आणि सेवा कर तसेच 70,811 कोटी रुपये राज्य वस्तू आणि सेवा कर इतका आहे.
देशातील जुलै 2023 चा महसुल मागील वर्षीच्या याच महिन्यातील वस्तू आणि सेवा कर महसुलाच्या तुलनेत 11% ने अधिक आहे. या महिन्यात, देशांतर्गत व्यवहारातून (सेवांच्या आयातीसह) महसूल गेल्या वर्षीच्या याच महिन्यात या स्रोतांमधून मिळालेल्या महसुला च्या तुलनेत 15% ने अधिक आहे. सकल वस्तू आणि सेवा कर संकलन पाचव्यांदा 1.60 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे.
महाराष्ट्राच्या वस्तू आणि सेवा कर संकलनात गेल्या वर्षीच्या तुलनेत 18 टक्क्याने वाढ झाली असून जुलै 2023 मध्ये 26064 कोटी रुपये कर महसूल संकलित झाला आहे. महाराष्ट्रात जुलै 2022 मध्ये 22,129 कोटी रुपये वस्तू आणि सेवा कर संकलित झाला होता.
गोवा राज्याच्या वस्तू आणि सेवा कर संकलनात गेल्या वर्षीच्या तुलनेत 22 टक्के वाढ झाली आहे असून जुलै 2023 मध्ये 528 कोटी रुपये कर महसूल संकलित झाला आहे. गोव्यात जुलै 2022 मध्ये 433 कोटी रुपये कर संकलन झाले होते.
महाराष्ट्रात, जुलै 2023 महिन्यात 7,958 कोटी रुपये राज्य वस्तू आणि सेवा कर रुपात संकलित करण्यात आले तर 4167 कोटी रुपये एकात्मिक वस्तू आणि सेवा करातील राज्य वस्तू आणि सेवा कराचा भाग म्हणून राज्याला मिळाले. अशा प्रकारे राज्यात एकूण 12,124 कोटी रुपये वस्तू आणि सेवा कर संकलित झाला आहे .
गोव्यात, जुलै 2023 महिन्यात 173 कोटी रुपये राज्य वस्तू आणि सेवा कर रुपात संकलित करण्यात आले, तर 146 कोटी रुपये एकात्मिक वस्तू आणि सेवा करातील राज्य वस्तू आणि सेवा कराचा भाग म्हणून राज्याला मिळाले. अशा प्रकारे राज्यात एकूण 320 कोटी रुपये वस्तू आणि सेवा कर संकलित झाला आहे .
खालील तक्ता चालू वर्षातील मासिक सकल वस्तू आणि सेवा कर महसुलातील चढउतार दर्शवितो. तक्ता-1 जुलै 2022 च्या तुलनेत जुलै 2023 मध्ये प्रत्येक राज्यात गोळा केलेल्या वस्तू आणि सेवा कराची राज्यनिहाय आकडेवारी दर्शवितो तर, तक्ता-2 मध्ये जुलै ‘2023 या महिन्यात, राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी प्राप्त/निश्चित करण्यात आलेला एकात्मिक वस्तू आणि सेवा करातील राज्य वस्तू आणि सेवा कर तसेच राज्य वस्तू आणि सेवा कराचा भाग दर्शवतो.
जुलै 2023 मध्ये वस्तू आणि सेवा कर महसुलाची राज्यवार वाढ [1] (कोटी रुपयांमध्ये)
State/UT
July’22
July’23
Growth(%)
Jammu and Kashmir
431
549
27
Himachal Pradesh
746
917
23
Punjab
1733
2000
15
Chandigarh
176
217
23
Uttarakhand
1390
1607
16
Haryana
6791
7953
17
Delhi
4327
5405
25
Rajasthan
3671
3988
9
Uttar Pradesh
7074
8802
24
Bihar
1264
1488
18
Sikkim
249
314
26
Arunachal Pradesh
65
74
13
Nagaland
42
43
3
Manipur
45
42
-7
Mizoram
27
39
47
Tripura
63
78
23
Meghalaya
138
175
27
Assam
1040
1183
14
West Bengal
4441
5128
15
Jharkhand
2514
2859
14
Odisha
3652
4245
16
Chhattisgarh
2695
2805
4
Madhya Pradesh
2966
3325
12
Gujarat
9183
9787
7
Daman and Diu
313
354
13
Dadra and Nagar Haveli
Maharashtra
22129
26064
18
Karnataka
9795
11505
17
Goa
433
528
22
Lakshadweep
2
2
45
Kerala
2161
2381
10
Tamil Nadu
8449
10022
19
Puducherry
198
216
9
Andaman and Nicobar Islands
23
31
32
Telangana
4547
4849
7
Andhra Pradesh
3409
3593
5
Ladakh
20
23
13
Other Territory
216
226
4
Center Jurisdiction
162
209
29
Grand Total
106580
123026
15
वस्तूंच्या आयातीवरील वस्तू आणि सेवा कर समाविष्ट नाही.
जुलै 2023 मध्ये राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना प्रदान करण्यात आलेल्या एकात्मिक वस्तू आणि सेवा करातील राज्य वस्तू आणि सेवा कराच्या भागाची रक्कम तसेच राज्य वस्तू आणि सेवा कर (कोटी रुपयांमध्ये)
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याहस्ते पुणे मेट्रोच्या मार्गिकांसह विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन
देशाला ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करण्यासाठी महाराष्ट्र योगदान देईल- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पुणे, दि. १: शहरी मध्यमवर्गीयांच्या जीवनशैलीविषयी सरकार गंभीर असून सर्वसामान्यांचे जीवन सुकर करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला आधुनिक बनवावे लागेल. त्यादृष्टीने पुणे शहरात मेट्रो सुरू करण्यात आली असून मेट्रो ही आधुनिक भारतातील शहरांची जीवनरेखा बनत आहे, असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले.
प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी पुणे मेट्रोच्या टप्पा २ च्या पूर्ण झालेल्या दोन मार्गिकांचे हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण केले. शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालय येथे आयोजित या कार्यक्रमात मेट्रो लोकार्पणासह पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत कचऱ्यापासून ऊर्जा निर्माण करणाऱ्या (वेस्ट टू एनर्जी) संयंत्राचे उद्घाटन, पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेद्वारे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या घरांचे लाभार्थ्यांना हस्तांतरण, पिंपरी चिंचवड मनपा आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत बांधण्यात येणाऱ्या घरांचे भूमिपूजन प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार चंद्रशेखर बावनकुळे आदी उपस्थित होते.
पुणे शहर हे युवकांची स्वप्ने पूर्ण करणारे शहर पुणे शहर हे देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देणारे, युवांची स्वप्ने पूर्ण करणारे शहर आहे, असे सांगून प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले, या पाच वर्षात पुण्यात सुमारे २४ कि.मी. मेट्रोचे नेटवर्क सुरू झाले आहे. पुण्यासारख्या शहरात प्रदूषण कमी करण्यासाठी मेट्रो रेल्वे आवश्यक असून हे जाळे वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. २०१४ पर्यंत देशात २५० कि.मी. पेक्षा कमी मेट्रो नेटवर्क होते. आता देशात ८०० कि.मी. पेक्षा अधिक मेट्रोचे जाळे तयार झाले असून आणखी 1 हजार किलोमीटरचे काम सुरू आहे. २०१४ मध्ये फक्त ५ शहरात असलेली मेट्रो आज देशातील २० शहरात संचालित आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे आणि नागपूर येथे मेट्रो कार्यरत आहेत. मेट्रो ही आधुनिक भारतातील शहरांची नवी ‘जीवनरेषा’ बनत आहे, असेही श्री. मोदी म्हणाले.
‘वेस्ट टू वेल्थ’ संकल्पनेवर भर श्री. मोदी पुढे म्हणाले, जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी स्वच्छता महत्वाची आहे. आम्ही स्वच्छ भारत अभियान केवळ शौचालयांच्या निर्मतीपूरते मर्यादित ठेवले नाही तर कचरा व्यवस्थापनावर भर देत आहोत. कचऱ्याचे डोंगर हटविण्यासाठी प्रयत्न करत आहोत. ‘वेस्ट टू वेल्थ’ या संकल्पनेवर भर देत आहोत. पिंपरी चिंचवडचा ‘वेस्ट टू एनर्जी’ खूप उत्कृष्ट प्रकल्प असून यातून कचऱ्यापासून वीज बनणार आहे. यामुळे प्रदुषणाची समस्या नष्ट होण्यासह महापालिकेची आर्थिक बचतही होणार आहे.
महाराष्ट्राने देशाच्या औद्योगिक विकासाला गती दिली स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाने देशाच्या औद्योगिक विकासाला गती दिली आहे. म्हणून येथे औद्योगिक विकासाला अधिक गती देण्यासाठी पायाभूत सुविधांवर अधिक भर देण्यात येत आहे. रेल्वेच्या विकासात २०१४ च्या तुलनेत १२ पट अधिक खर्च केला जात आहे. महाराष्ट्राच्या विविध शहरांना आसपासच्या इकॉनॉमिक हबशी जोडले जात आहे. मुंबई- अहमदाबाद हायस्पीड रेल्वे, दिल्ली मुंबई इकॉनॉमिक कॉरिडॉरमुळे औद्योगिक विकास होणार आहे. वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर मुळे महाराष्ट्राची उत्तर भारतासोबत रेल्वे जोडणी वाढणार आहे. महाराष्ट्र, तेलंगणा आणि छत्तीसगड यांच्यादरम्यान बनविण्यात आलेल्या पारेषण वाहिनी जाळ्यामुळे महाराष्ट्रातील उद्योगांना नवी गती मिळणार आहे. त्याचबरोबर ऑईल गॅस लाईन, औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी, नवी मुंबई विमानतळ, सेंद्रा बिडकीन औद्योगिक पार्क यांच्यात महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला नवी गती देण्याची क्षमता आहे.
डिजीटल क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या विकासात पुण्याचा मोठा वाटा महाराष्ट्राचा विकास होईल तेव्हा भारताचा विकास होईल आणि भारताचा विकास होईल त्याचा तेवढाचा लाभ महाराष्ट्राला होईल. गेल्या ९ वर्षात इनोव्हेशन आणि स्टार्टअपच्या बाबतीत भारताने जगात नवी ओळख मिळवली आहे. आज स्टार्टअपची संख्या १ लाखाच्या वर झाली आहे. ही इकोसिस्टीम डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरच्या विस्तारामुळे तयार झाली आहे. भारतात डिजीटल इन्फ्रास्ट्रक्चरचा पाया घालण्यात पुण्याचा मोठा वाटा आहे. स्वस्त स्मार्टफोन, गावोगावी पोहोचलेल्या इंटरनेट सुविधेमुळे हे शक्य झाले आहे. जगभरात सर्वाधिक वेगाने ५ जी इंटरनेट सुविधा पोहोचवणारा आपला देश बनला आहे. फिनटेक, बायोटेक, ॲग्रीटेक आदी सर्वच क्षेत्रात आपले युवा उत्कृष्ट काम करत आहेत.
गरीबांसाठी ४ कोटीपेक्षा अधिक घरांची निर्मिती गेल्या ९ वर्षात गाव आणि शहरात गरीबांसाठी ४ कोटीपेक्षा अधिक पक्क्या घरांची निर्मिती केली आहे. त्यातही शहरी गरिबांसाठी ७५ लाखापेक्षा अधिक घरे बनविली आहेत. नवीन घरांच्या निर्मितीमध्ये पारदर्शकता आणली असून गुणवत्ताही सुधारली आहे. त्यातील जास्तीत जास्त घरे महिलांच्या नावावर करण्याचे काम आम्ही केले आहे. पहिल्यांदाच महिलांच्या नावावर काही संपत्ती नोंदणीकृत झाली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधलेल्या घरांमुळे नागरिकांसाठी येणारे सण विशेष आनंदाचे ठरतील, असेही प्रधानमंत्री म्हणाले.
देशाची ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करण्यासाठी महाराष्ट्र योगदान देईल- मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, पुणे शहर, जिल्हा ही एक ऐतिहासिक नगरी आहे. येथे मेट्रो प्रकल्पाचा शुभारंभ झाला आहे. पुणे मेट्रोमुळे मुंबई शहरासारखाच लाखो पुणेकरांनाही लाभ मिळणार आहे. रिंग रोडसह पुणे शहरात विविध विकास प्रकल्प सुरू आहेत त्याला चालना देण्याचे काम सरकार करेल. शेतकरी, कष्टकरी, कामगार, माता-भगिनी, विद्यार्थी तरुण या सर्वांसह सर्वसमावेशक विकासाचा रथ पुढे नेण्याचे काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी करत आहेत. सर्वसामान्याचे, गोरगरीबाचे स्वप्न पुढे नेण्यासाठी मोदीजी प्रयत्न करत आहेत.
प्रधानमंत्री मोदी यांच्या प्रयत्नांमुळे जगभरात भारताचे नाव आदराने घेतले जाते. देशाचे ५ ट्रिलियन डॉलरचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्राची १ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करण्याची आपली जबाबदारी असून त्यात महाराष्ट्र योगदान देईल. सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडविण्यासाठी अनेक प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत, असेही श्री. शिंदे म्हणाले.
पुणे मेट्रोमुळे वाहतुकीची समस्या दूर होईल-देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज मेट्रोच्या दोन मार्गिका जोडल्या जात असल्यामुळे एका भागातून दुसऱ्या भागात जाण्याकरिता विशेष मदत या क्रॉसिंगमुळे होणार आहे. यात तयार झालेले एक एक स्थानक स्थापत्याचा उत्तम नमुना आहे. मेट्रोचा वाढीव टप्पा पूर्ण होईल तेव्हा खऱ्या अर्थाने पुणे व पिंपरी शहरातील वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागणार आहे. देशातील सर्वोत्तम इलेक्ट्रिक बसेसचा ताफा पुणे व पिंपरी- चिंचवड शहरामध्ये पीएमपीएमएलकडे आहे. प्रधानमंत्री श्री. मोदी यांची संकल्पना असलेली कुठलेही प्रदूषण न करणारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुण्यामध्ये होत आहे.
चक्रीय अर्थव्यवस्था असली पाहिजे या प्रधानमंत्री मोदींच्या भूमिकेनुसार पिंपरी चिंचवड मनपाकडून उभारण्यात आलेल्या ‘वेस्ट टू एनर्जी प्रकल्प’ हे उदाहरण आहे. त्यामध्ये निर्माण होणारी ऊर्जा अपारंपरिक असणार आहे. तसेच त्यासाठीचे पाणी देखील एसटीपी मधून पुर्नप्रक्रिया केलेले असेल. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या घरांमुळे येत्या काळात एकही कुटुंब बेघर राहणार नाही. पुणे ही औद्योगिक नगरी, माहिती तंत्रज्ञान नगरी आहे, स्टार्टअपची राजधानी आहे. येत्या काळात पुण्याला नवीन रिंगरोड आणि नवीन विमानतळ देणार आहोत. खऱ्या अर्थाने पुणे ही जशी विद्येची, उद्योगाची नगरी आहे तशी ती स्वप्नपूर्तीची नगरी होईल हा विश्वास आहे.
शहराच्या विकासात पुणेकरांची साथ-उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पुणे शहराच्या विकासाबरोबरच महाराष्ट्राच्या विकासाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच साथ दिली आहे. मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होत असल्याचा आनंद आहे. मेट्रोच्या कामामध्ये येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी पुणेकरांनी एकजुटीने काम केले.
ते पुढे म्हणाले, ३५० वर्षांपूर्वी राजमाता जिजाऊंनी बाल शिवबांच्या हस्ते सोन्याचा नांगर फिरवून पुण्याचा विकास करण्याचे काम केले. या भूमीत अनेक कला, क्रीडा तसेच गुणवंत, बुद्धीवंतांनी पुण्याच्या विकासामध्ये योगदान दिले. शेतकरी, कष्टकऱ्यांनी पुण्याच्या वैभवात भर घातली. उद्योजकांनी आर्थिक सुबत्ता आणण्याचा प्रयत्न केला. देशातील प्रत्येक गोरगरीब, कष्टकऱ्याला स्वस्तात घर देण्याचे प्रधानमंत्री यांचे स्वप्न आहे. आज पंतप्रधान यांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पुणे व पिंपरी चिंचवड येथील घरांचे लोकार्पण होत आहे. या योजनेंतर्गत मिळालेल्या घरात सुखाचा,आनंदाचा संसार करा आणि मुलांना जबाबदार नागरिक बनवा, असाही संदेश त्यांनी लाभार्थ्यांना दिला.
प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी मेट्रोच्या दोन्ही मार्गाना हिरवी झेंडी दाखवून लोकार्पण केले आणि प्रातिनिधिक स्वरुपात 3 महिलांना प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांच्या चाव्या वितरीत केल्या. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
विकासकामांमुळे शहर विकासाला गती पुणे मेट्रोच्या फुगेवाडी ते सिव्हील कोर्ट या ६.९ किलोमीटरच्या मार्गिकेवर ४ स्थानके आहेत, तर गरवारे कॉलेज ते रुबी हॉल या ४.७ किलोमीटरच्या मार्गिकेवर ७ स्थानके आहेत. अशाप्रकारे आतापर्यंत एकूण २१ स्थानकांसह २३.६६ किमी लांबीचा मेट्रो मार्ग पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात कार्यान्वित करण्यात आला आहे. यामुळे प्रवासाचा वेळ ५० टक्क्यांनी कमी होणार आहे. या मार्गिकांमुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरे आणि पुणे शहरातील महत्वाची ठिकाणे जोडली गेली आहेत.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेद्वारे बांधण्यात आलेली १ हजार २८८ घरे आणि पुणे महापालिकेने बांधलेल्या २ हजार ६५८ घरे प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते हस्तांतरित करण्यात आली. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेद्वारे बांधण्यात येणाऱ्या सुमारे १ हजार १९० घरांची आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून बांधण्यात येणाऱ्या ६ हजार ४०० हून अधिक घरांची पायाभरणी देखील करण्यात आली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेद्वारे सुमारे ३०० कोटी रुपये खर्चून विकसित करण्यात आलेल्या ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प क्षमता ७०० टन प्रति दिवस असून वीज निर्मिती क्षमता १४ मेगावॅट प्रति तास आहे. 0000
सावरकारांची क्षमता टिळकांनीच आधी ओळखली असेही म्हणाले मोदी ….
पुणे-इंग्रजांचा विरोध झुगारून सरदार पटेल यांनी लोकमान्य टिळकांचा पुतळा अहमदाबादमध्ये बसवला. मात्र, एखाद्या रस्त्यांचे नाव बदलले तरी विरोधक हंगामा करतात, त्यांची झोप उडते, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.नरेंद्र मोदी यांचा पुण्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने गौरवक करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. त्यांनी पुरस्काराची रक्कम नमामि गंगे प्रकल्पाला अर्पण केल्याचे यावेळी सांगितले.नरेंद्र मोदी म्हणाले की, इंग्रजांचा विरोध झुगारत सरदार पटेल यांनी लोकमान्य टिळकांचा पुतळा अहमदाबादमध्ये बसवला. या स्मारकाचे उद्घाटन महात्मा गांधींच्या हस्ते झाले. मात्र, आता एखाद्या रस्त्यांचे नाव बदलले तरी विरोधक हंगामा करतात, त्यांची झोप उडते, अशी टीका मोदींनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली. लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीला वंदन करुन त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. स्वातंत्र्यलढ्यात लोकमान्य टिळकांचे महत्त्व त्यांनी अधोरेखीत केले. लोकमान्य हे या लढ्यातील माथ्यावरचा टिळा असल्याचे ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘पुरस्कार स्वीकारण्यासाठी या मातीत येण्याचे मला भाग्य लाभले आहे. हा माझ्यासाठी अविस्मरणीय अनुभव असल्याचे पंतप्रधान म्हणाले. या सन्मानासाठी मी हिंद स्वराज्य संघ आणि उपस्थितांचे आभार व्यक्त करत असल्याचे ते म्हणाले. टिळक पुरस्कार माझ्यासाठी अविस्मरनीय असल्याचे त्यांनी सांगितले.
देशात काशी आणि पुण्याची विशेष ओळख असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. येथे विद्या म्हणजेच शिक्षण, विद्वत्ता अजारमर झाली असल्याचे ते म्हणाले. हा पुरस्कार मी 140 देशवासियांच्या चरणावर समर्पित करत असल्याचे नरेंद्र मोदी म्हणाले. देशवासियांच्या सेवा करण्यात मी कमी पडणार नसल्याचा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. या पुरस्काराच्या माध्यमातून मिळालेला पैसे नमामी गंगे योजनेसाठी देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
पुरस्कार घेताना मी उत्साही आणि भावुक आहे. या पुरस्कारानंतर माझी जबाबदारी वाढली आहे. महात्मा गांधींनी टिळकांना आधुनिक भारताचा निर्माता म्हटले. टिळकांनी शिवजयंतीचे आयोजन सुरू केल्याचा उल्लेखही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. समाजाला एकत्र करण्यासाठी टिळकांनी गणेशोत्सव सुरू केल्याचे ते म्हणाले. सावरकारांची क्षमता टिळकांनीच आधी ओळखली असल्याचे ते म्हणाले. टिळकांमुळे सावरकरांचे शिक्षण विदेशात झाले असल्याचे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
स्वातंत्र्याच्या आंदोलनादरम्यान लोकमान्य टिळक अहमदाबादमध्ये दीड महिने कारागृहात राहिले असल्याची आठवण मोदी यांनी करून दिले. त्या काळी टिळकांचे स्वागत करण्यासाठी 40 हजार नागरिक एकत्र आले असल्याचे ते म्हणाले. त्यांचे भाषण ऐकण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल देखील आले असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्राप्रमाणेच गुजरातचेही टिळकांचे वेगळे नाते असल्याचे ते म्हणाले.
पुणे- जे होऊ नये असे अनेक विरोधी पक्षांना वाटत होते अखेर तेच झाले ,टिळक पुरस्कार मिळालेल्या मान्यवरांच्या यादीत नरेंद्र मोदींचाहि सामावेश झाला याचा मला आनंद आहे मी त्यांचे अभिनंदन करतो अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टिळक पुरस्काराने सानाम्नीत करण्याच्या सोहळ्याचे समर्थन केले . एकीकडे पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी करत असताना पवार मात्र व्यासपीठावर मोदी यांच्याशी हस्तांदोलन करताना दिसून आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज पुण्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. या कार्यक्रमासाठी मुख्य अतिथी म्हणून शरद पवार यांची उपस्थिती होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवड लोकमान्य टिळक पुरस्कारासाठी केली. या पुरस्कार मिळालेल्यांच्या यादीत इंदिरा गांधी होत्या, खान अब्दुल गफार, बाळासाहेब देवरस होते, अटल बिहारी वाजपेयी, डॉ. मनमोहन सिंह होते अशी अनेकांची नावं घेता येतील. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही समावेश झाला याचा आनंद आपल्याला सगळ्यांना आणि देशाला आहे. त्यामुळे मी सगळ्यांच्या वतीने मी पंतप्रधान नरेंद्र मोदींची जी टिळक पुरस्कारासाठी जी निवड झाली त्याबद्दल मी त्यांचं अंतःकरणापासून अभिनंदन करतो असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.
पवार यावेळी म्हणाले,’देशात पुण्याचे एक वेगळे महत्त्व आहे. शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यात झाला असून लाल महालामध्ये त्यांचे बालपण गेले. याच जिल्ह्यातून त्यांनी स्वराज्याची मुहूर्त मेढ रोवली. अनेक राजाचे संस्थान त्यांच्या नावाने ओळखले जात असताना शिवरायाचे कार्य वेगळे आहे. त्यांचे राज्य भोसल्याचे राज्य नव्हते, तर ते हिंदवी स्वराज्य रयतेचे राज्य होते, असे म्हणत शरद पवार यांनी महाराजांच्या कार्यांची महती सांगितली.
पुण्यात लोकमान्य टिळक पुरस्काराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गौरव करण्यात आला. यावेळी शरद पवार यांचे भाषण झाले. राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीनंतर शरद पवार आणि नरेंद्र मोदी पहिल्यांदा एकाच व्यासपीठावर आले. विशेष म्हणजे सहकारी पक्षांचा विरोध पत्करून पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहिले.
शरद पवार पुढे म्हणाले की, आपल्या देशाच्या जवानांनी देशासाठी सर्जिकल स्ट्राइक केला, ही चर्चा आता होत आहे. मात्र, शिवाजी महाराजांनी लाल महालामध्ये ताबा घेण्याचा प्रयत्न करत या देशातील पहिला सर्जिकल स्ट्राइक झाला हे आपण विसरू शकत नाही, असे त्यांनी म्हटले. तर हिंदवी स्वराज्याचा पाया शिवरायांनी रचला. त्यांनी रयतेचे राज्य निर्माण केले. लोकमान्यांनी स्वराजाचे आंदोलन केले. केसरी आणि मराठा या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी इंग्रजाचा घाम फोडला. टिळक आणि महात्मा गांधींचे योगदान आम्ही विसरु शकत नाही असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.शरद पवार पुढे म्हणाले की, पत्रकारितेवर कुणाचा दबाव असता कामा नये. त्या दबावातून पत्रकारिता मुक्त झाली पाहिजे,अशी भूमिका त्यांनी सातत्याने पाळली आहे. 1885 साली भारतीय काँग्रेसचा जन्म झाला, त्यावेळी प्लेगच्या साथामुळे येथे काँग्रेसचे अधिवेशन पुण्यात न होता मुंबईत झाले होते. यावेळी जहाल गटाचे नेतृत्व लोकमान्य टिळक करत होते. यावेळी त्यांनी स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे असे म्हणत शरद पवारांनी फटकेबाजी केली आहे.शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, टिळक पुरस्काराला एक आगळे वेगळे महत्त्व आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेला पुरस्कार याआधी अनेक ज्येष्ठ मान्यवरांना मिळाले आहे. आता याच पंगतीमध्ये यादीमध्ये नरेंद्र मोदी यांच्या नावाचा समावेश झाला यांचा आपल्याला सर्वांना आनंदआहे असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन पवारांनी केले आहे.
कलाकार संजय श्रीधर यांचे शिंदे-फडणवीसांनी केले कौतुक! पुणे:-साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या ए आय तंत्रज्ञानाने निर्माण केलेल्या भारतातील पहिल्या छायाचित्र प्रदर्शनास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भेट देऊन संजय श्रीधर कांबळे यांचा मुक्तकंठाने गौरव केला . येथील सारसबागे समोरील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यात जवळ संजय कांबळे यांचे अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांचे प्रदर्शन सुरू आहे .या प्रदर्शनामध्ये AI या नव्या तंत्रज्ञानाने निर्माण केलेली छायाचित्रे समाविष्ट करण्यात आली आहेत. AI सारख्या नव्या तंत्रज्ञानाने विकसित झालेली ही चित्रे निश्चितपणाने कौतुकास्पद आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. यावेळी संजय कांबळे यांनी या नव्या तंत्रज्ञानाचा आविष्कार व त्यातून निर्माण केल्या चित्राबद्दल ची माहिती विस्तृतपणे दिली. या तंत्रज्ञानाचा उपयोग करून तयार करण्यात आलेली चित्रे उत्तम असल्याचे प्रतिपादन देवेंद्र फडणवीस यांनी केले. याप्रसंगी माजी मंत्री दिलीप कांबळे, आमदार सुनील कांबळे ,पुणे शहर जिल्हा मातंग समाजाचे सर्व प्रमुख नेते मंडळी, नगरसेवक अविनाश बागवे, महोत्सव समितीचे अध्यक्ष पंढरीनाथ आढागळे ,सचिव दयानंद आढागळे माजी नगरसेवक रवी पाटोळे ,मातंग समाजाचे नेते अनिल हातागळे, एडवोकेट महेश सकट यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या प्रदर्शनासाठी अण्णाभाऊंच्या जीवनातील बालपणापासून ते रशियाचा प्रवास इथपर्यंत चित्रे तंत्रज्ञानाने निर्माण करण्यात आलेली आहेत. ही चित्रे पाहण्यासाठी पुणेकर आणि महाराष्ट्रातून आलेल्या अनेक नागरिकांनी गर्दी केली होती. मूळ बार्शीकर असलेल्या संजय कांबळे यांच्या या नव्या कला प्रकाराबद्दल सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. हे प्रदर्शनी यशस्वी करण्यासाठी श्रीधर कांबळे, पवन कांबळे तेजस कांबळे, सुजल आढागळे, अक्षय पंढरकर अनेक मंडळींनी परिश्रम घेतले.
‘भारत विश्वगुरु व्हावा’ असा नरेंद्र मोदी यांनी केला प्रधान संकल्प
पुणे : देश का सपना, विश्वगुरू बने भारत अपना… असा ‘भारत विश्वगुरु व्हावा’ याकरिता महाभिषेकाप्रसंगी प्रधान संकल्प करीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती चरणी लीन झाले. ढोल-ताशांच्या गजरात पारंपरिक पद्धतीने मंदिरात झालेल्या स्वागताने आणि ट्रस्टच्या सामाजिक उपक्रमांची माहिती घेत मोदी प्रभावित झाले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भव्य स्वागत करण्यात आले. महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांसह ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण, उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने उपस्थित होते. ट्रस्टतर्फे दोन किलो वजनाची चांदीची गणरायाची मूर्ती, महावस्त्र, फळांची परडी व सुकामेवा देऊन नरेंद्र मोदी यांचा सन्मान करण्यात आला. पु.ना.गाडगीळ ज्वेलर्सचे पराग गाडगीळ, सौरभ गाडगीळ यांनी ही मूर्ती साकारली होती.
मंदिर परिसरात छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर भव्य कमानी व मंडप घालून मोदी यांचे स्वागत करण्यात आले. तसेच मंदिराला फुलांची आकर्षक सजावट देखील करण्यात आली. स्वरूपवर्धिनी ढोल-ताशा पथकाच्या वादनाने आणि ममता सकपाळ यांसह सुवासिनींनी औक्षण करून मराठमोळ्या पारंपरिक पद्धतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.
मंदिरामध्ये सभामंडपात धार्मिक विधींतर्गत भारत विश्वगुरु व्हावा याकरिता मोदी यांनी महाभिषेकात संकल्प केला. याशिवाय पंचोपचार पूजा व महाआरती देखील झाली. वेदमूर्ती मिलिंद राहुरकर गुरुजी यांनी पौरोहित्य केले. मंदिराच्या संरक्षक भिंतीवर आतल्या बाजूने लावण्यात आलेल्या सामाजिक उपक्रमाच्या फलकांची पाहणी करीत त्यांनी विश्वस्तांकडून माहिती घेतली.
मुंबई-महाराष्ट्रातील विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपदेपदासाठी आमदार विजय वड्डेटीवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीने या बाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. तर विधिमंडळाच्या नेतेपदी बाळासाहेब थोरात यांना कायम ठेवण्यात आले आहे. काँग्रेसकडे चार वर्षांनंतर हे पद आले आहे. त्यामुळे या पदावर कोणाची नियुक्ती होते, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले होते.
राज्याच्या राजकारणात सुमारे चार वर्षांनंतर काँग्रेसकडे हे पद चालून आले आहे. काँग्रेसचे अनेक नेते हे भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा होती. त्यामुळे या पदासाठी कोणत्याही परिस्थितीत भाजपकडे न जाणाऱ्या नेत्याच्या शोधात पक्षश्रेष्ठी होते. यात पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांच्याही नावाची चर्चा होती. मात्र, अखेर पक्षश्रेष्ठींनी विजय वड्डेटीवार यांच्या नावाची घोषणा केली असून त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे.
विधीमंडळ पक्षनेते पदाची जबाबदारी बाळासाहेब थोरात यांच्याकडेच राहणार आहे. बाळासाहेब थोरात यांना हा निर्णय दिल्ली हायकंमाडने कळवला आहे. त्याचबरोबर आता महाराष्ट्राच्या विधानसभा विरोधी पक्षनेते पदी विजय वड्डेटीवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अनेक दिवसांच्या चर्चेनंतर पक्षाने हा निर्णय घेतला आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील अनेक नेत्यांचा दिल्ली व्याऱ्या झाल्या आहेत.
काँग्रेसमधील दुसऱ्या फळीतील नेत्याकडे ही जबाबदारी देण्यात येण्याची शक्यता याआधी वर्तवण्यात आली होती. त्यानुसार सुनील केदार, विजय वड्डेटीवार, यशोमती ठाकूर, संग्राम थोपटे यांच्या नावाची देखील चर्चा होती. मात्र, यात वड्डेटीवार यांच्या माध्यमातून जुन्या आणि नव्यांचा मेळ साधण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला आहे.
पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांनी पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांची यथासांग पूजा करून त्यांचे दर्शन घेतले. याशिवाय दौऱ्याच्या अखेरीस दिल्लीला प्रयाण करण्यापूर्वी निमंत्रित सहा मोठ्या उद्योगपतींशी पंतप्रधान मोदी संवाद साधणार आहेत. त्याकरिता खास वेळ राखीव ठेवण्यात आला आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाची पूजा केली.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे १८ व्या शतकातले पुण्यातले सुप्रसिद्ध मिठाईचे व्यापारी होते. पुण्यातल्या बुधवार पेठ भागात असलेलं दत्त मंदिर भागात त्यांचं वास्तव्य होतं. प्लेगच्या साथीत दगडूशेठ हलवाई यांच्या मुलाचं निधन झालं. या घटनेमुळे दगडूशेठ हलवाई आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई दोघेही दुःखी झाले. त्यावेळी माधवनाथ नावाचे महाराज होते त्यांनी या दोघांचं सांत्वन केलं आणि त्यांना सांगितलं की आपण एक दत्ताची आणि एक गणपतीची मूर्ती तयार करा आणि त्याची रोज पूजा करा. त्यानंतर तयार झाली ती दगडूशेठ हलवाई गणपतीची मूर्ती. या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा लोकमान्य टिळकांच्या हस्ते झाली.
१८९४ मध्ये लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात केली. १८९६ मध्ये दगडूशेठ हलवाई गणपतीची दुसरी मूर्ती तयार करण्यात आली आणि तिचा उत्सव सुरु झाला. नंतरच्या काळात श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांचं निधन झालं. मात्र त्यांनी सुरु केलेली गणेश उत्सवाची परंपरा कायम राहिला.
१८९६ मध्ये तयार करण्यात आलेल्या मूर्तीची अवस्था ही कालांतराने जीर्ण झाली. त्यानंतर १९६७ मध्ये दगडूशेठ हलवाई गणपतीच्या उत्सवाच्या अमृत महोत्सनिमित्त सुवर्णयुग तरुण मंडाळाच्या प्रताप गोडसेंनी आणि इतर सदस्यांनी गणपतीची नवी मूर्ती तयार करण्याचा संकल्प केला. कर्नाटकच्या मूर्तीकारांकडून ही मूर्ती तयार करण्यात आली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती हे देश-विदेशातल्या भाविकांचं श्रद्धास्थान आहे. पुण्यातल्या मानाच्या गणपतींच्या बरोबरीने या गणपतीचं स्थान आहे.
पुणे, दि. १: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंती निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे शहरातील सारसबाग येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी आमदार सुनील कांबळे, पुणे जिल्हा मातंग संघाचे अध्यक्ष भिमराव साठे, सहदेव ढवरे आदी उपस्थित होते.
यावेळी पुणे जिल्हा मातंग समाज व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती समितीच्यावतीने आयोजित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या दुर्मिळ चित्र प्रदर्शनास भेट दिली. जिल्हा मातंग संघाच्यावतीने मुख्यमंत्री श्री. शिंदे व उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला.
तत्पूर्वी शासकीय विश्रामगृह येथेही मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 0000
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार एकाच व्यासपीठावर असतील. पंतप्रधान या दौऱ्यात पुण्याचे आराध्य दैवत मानल्या जाणाऱ्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पूजा करणार आहेत. या व्यतिरीक्त ते विविध विकास कामांचा शुभारंभ तसेच मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण देखील करणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात दाखल झाले तेव्हा राज्यपाल, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले.
बुलढाण्यात झालेल्या अपघाताला एक महिना उलटत नाही तोच समृद्धीवर दुसरा अपघात झाला आहे. या अपघातात तब्बल १७ कामागारांचा जीव गेला आहे. समृद्धी महामार्गाचे तिसऱ्या टप्प्यातील काम युद्धपातळीवर सुरू आहे. रात्रकालीन काम सुरू असताना शहापूर सरंळाबे येथे क्रेन आणि स्लॅब कोसळून १७ जणांचा मृत्यू झाला आहे. याबाबत आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शहापूर तालुक्यातील सरलंबे येथे समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्यातील काम सुरु असताना घडलेल्या दुर्घटनेत मजुरांचा झालेला मृत्यू अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. पुलाचं काम सुरू असताना गर्डर मशिन आणि क्रेन खाली कोसळल्यानं हा अपघात झाला. बचावकार्य युद्धपातळीवर राबवलं जात आहे.…
मिळालेल्या माहितीनुसार, गर्डर मशीनला जोडणारी क्रेन आणि स्लॅब तब्बल शंभर फूट उंचावरुन मजुरांवर कोसळला. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत १७ मृतदेह शाहपूर उप जिल्हा रुग्णालयात आणले आहेत. तीन ते चार जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.
शहापूरजवळ समृद्धी महामार्गाचं काम सुरु होतं. त्यावेळी गर्डर लाँचिंग करत असताना तो कोसळून १७ कामगारांचा मृत्यू झाला. ही घटना अत्यंत दुःखद आहे. त्याबाबत आम्ही आता अधिकारी, पालकमंत्री हे त्या ठिकाणी पोहचले आहेत. बचावकार्यही सुरु करण्यात आलं आहे. सित्झर्लंडची कंपनी काम करत होती. मृतांच्या कुटुंबांना पाच लाखांची मदत शासनाने जाहीर केली आहे. तसंच हा अपघात कसा झाला त्याची चौकशी होईल आणि कारवाईही केली जाईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.
शहापूर तालुक्यात समृद्धी महामार्गावर पुलाचे काम सुरू असताना एक दुर्घटना होऊन काही मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुःखद आणि मनाला वेदना देणारी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या घटनेत 3 कामगार जखमी झाले.…
आज मुख्यमंत्री पंतप्रधानांच्या कार्यक्रमानिमित्त पुणे येथे असून अपघाताचे वृत्त समजताच त्यांनी जिल्हा प्रशासन तसेच संबंधित अधिकारी यांच्याशी बोलून दुर्घटनेविषयी जाणून घेतले. हा अपघात अतिशय दुर्दैवी असून त्याची सखोल चौकशी करण्यासही त्यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांच्याशी बोलून त्यांना तातडीने दुर्घटनास्थळी रवानाही केले. एन डी आर एफ चे पथक याठिकाणी पोहचले असून योग्य रीतीने बचाव कार्य करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. पावसाळा असल्याने अधिक खबरदारी घेण्यासही त्यांनी सांगितले आहे. समृध्दी महामार्गाचे तिसऱ्या टप्प्याचे काम सुरू असताना हा अपघात घडला.