Home Blog Page 1389

दिव्गी टॉर्कट्रान्सफर सिस्टिम्स लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री सुरू


पुणे:दिव्गी टॉर्कट्रान्सफर सिस्टिम्स लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री आज १ मार्च २०२३ रोजी सुरू होत आहे .

योजनेचा किंमतपट्टा प्रत्येकी ५ रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी ५६० रुपये ते ५९० रुपये निश्चित करण्यात आला आहे.
ऑफर सुरू होण्याचा दिनांक बुधवार, १ मार्च २०२३ असून ऑफरची शेवटची तारीख ०३ मार्च २०२३ आहे.
ही बोली किमान २५ इक्विटी शेअर्स आणि त्यानंतर २५ इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल.

दिव्गी टॉर्कट्रान्सफर सिस्टिम्स लिमिटेड (“द कंपनी”) ही सिस्टीम लेव्हल ट्रान्सफर केस, टॉर्क कपलर आणि ड्युअल-क्लच ट्रान्समिशन (DCT) सुविधा विकसित करण्याची आणि पुरवठा करण्याची क्षमता असलेल्या भारतातील काही मोजक्या पुरवठादारांपैकी एक आहे. भारतातील ऑटोमोटिव्ह ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर (OEM) ना ट्रान्सफर केस सिस्टीम पुरवठा करणार्‍या आघाडीच्या कंपन्यांपैकी एक असून भारतातील प्रवासी वाहन उत्पादकांना ट्रान्सफर केस सिस्टीमची सर्वात मोठी पुरवठादार आहे. भारतातून जागतिक OEM मध्ये ट्रान्सफर केसेसचे उत्पादन आणि निर्यात करणारी ही एकमेव कंपनी आहे आणि भारतातील टॉर्क कप्लर्सची एकमेव उत्पादक आहे. कंपनीकडे इलेक्ट्रिक वाहनांसाठी ट्रान्समिशन सिस्टीम विकसित करण्याची आणि पुरवठा करण्याची क्षमता देखील आहे आणि या उद्देशासाठी व्यावसायिक बहुमान प्राप्त करण्याच्या अनुषंगाने इलेक्ट्रिक वाहनांसाठी (EVS) ट्रान्समिशन सिस्टीमचे प्रोटोटाइप डिझाइन आणि विकसित करण्याच्या प्रक्रियेत आहे. ही अशा काही कंपन्यांपैकी एक आहे जी जागतिक OEM आणि टियर १ ट्रान्समिशन सिस्टम पुरवठादारांसाठी सिस्टीम लेव्हल सोल्यूशन पुरवठादार तसेच कॉम्पोनंट किट पुरवठादार म्हणून काम करते.

कंपनीने प्रत्येकी ५ रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी बुधवार, ०१ मार्च, २०२३ रोजी प्राथमिक समभाग विक्री सुरू करण्याचा प्रस्ताव दिला आहे. प्राथमिक समभाग विक्रीमध्ये १८० कोटी रुपयांपर्यंतच्या (“फ्रेश इश्यू”) इक्विटी शेअर्सच्या नवीन इश्यूचा आणि ऑफर फॉर सेल ३९,३४,२४३ पर्यंतच्या इक्विटी समभागांचा (“ऑफर फॉर सेल “) समावेश आहे. अँकर इन्व्हेस्टर बिडिंगची तारीख मंगळवार, २८ फेब्रुवारी २०२३ असेल. ऑफर शुक्रवार, ०३ मार्च २०२३ रोजी बंद होईल.

योजनेचा किंमतपट्टा प्रत्येक इक्विटी शेअरसाठी ५६० रुपये ते ५९० रुपये निश्चित करण्यात आला आहे.
ही बोली किमान २५ इक्विटी शेअर्स आणि त्यानंतर २५ इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल.

कंपनीने फ्रेश इश्यूतील निव्वळ उत्पन्न निधीसाठी वापरण्याचा प्रस्ताव दिला आहे (i) उत्पादन सुविधांच्या उपकरणे/यंत्रांच्या खरेदीसाठी भांडवली खर्चाचा आवश्यकता निधी (“भांडवली खर्च”) आणि (ii) सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्देशांसाठी (“ऑब्जेक्टस ऑफ द इश्यू”).

ऑफर फॉर सेल मध्ये ओमान इंडिया जॉइंट इन्व्हेस्टमेंट फंड II चे २२,५०,००० पर्यंतचे इक्विटी शेअर्स, एनआरजेएन फॅमिली ट्रस्टचे (एन्ट्रस्ट फॅमिली ऑफिस लीगल अँड ट्रस्टीशिप सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या त्यांच्या कॉर्पोरेट ट्रस्टीद्वारे प्रतिनिधित्व केले जाते) (“गुंतवणूकदार विक्री समभागधारक”) १४,४१,४४१ पर्यंतचे इक्विटी शेअर्स आणि कंपनीच्या काही ठराविक बिगर-प्रवर्तक समभागधारक (“इतर बिगर-प्रवर्तक विक्री समभागधारक”) द्वारे २,४२,८०२ पर्यंतचे इक्विटी शेअर्स समाविष्ट आहेत.

इक्विटी शेअर्स बीएसई लिमिटेड (“BSE”) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“NSE”) वर सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे. ऑफरच्या उद्देशांसाठी, BSE हे नियुक्त स्टॉक एक्स्चेंज आहे.

इंगा व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि इक्विरस कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड हे इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत.

कंपनी (i) टॉर्क ट्रान्सफर सिस्टीम (ज्यामध्ये फोर-व्हील-ड्राइव्ह (“4WD”) आणि ऑल-व्हील-ड्राइव्ह (“AWD”) उत्पादनांचा समावेश आहे) (ii) मॅन्युअल ट्रान्समिशन आणि DCT साठी सिंक्रोनायझर सिस्टीम्स आणि (iii) मॅन्युअल ट्रान्समिशन, DCT, आणि EVs मधील टॉर्क ट्रान्सफर सिस्टीम आणि सिंक्रोनायझर सिस्टीमसाठी वर नमूद केलेल्या उत्पादन श्रेणींसाठी घटक अशा विस्तृत श्रेणींमध्ये विविध प्रकारच्या उत्पादनांची निर्मिती आणि पुरवठा करते. कंपनीने (i) EVs साठी ट्रान्समिशन सिस्टीम (ii) DCT प्रणाली; आणि (iii) रेअर व्हील ड्राइव्ह मॅन्युअल ट्रान्समिशन्स देखील विकसित केले.

टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा यांसारख्या ऑटोमोबाईल क्षेत्रातील अनेक स्थानिक आणि जागतिक OEM सोबत आणि बोर्गवॉर्नर सारख्या जागतिक पुरवठादारांसोबत कंपनीचे दोन दशकांहून अधिक काळ मजबूत आणि सुस्थापित संबंध आहेत. महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा मोटर्स, टोयोटो किर्लोस्कर ऑटो पार्ट्स, बोर्गवॉर्नर आणि रशियन ऑटोमोबाईल उत्पादक या पाच आघाडीच्या प्रमुख ग्राहकांकडून त्यांच्या महसुलाचा महत्त्वपूर्ण भाग मिळवला जातो. ३० सप्टेंबर २०२२ रोजी संपलेल्या सहा महिन्यांसाठी आणि आर्थिक वर्ष २०२२, आर्थिक वर्ष २०२१ आणि आर्थिक वर्ष २०२० साठी वस्तूंच्या विक्रीतून मिळणारे उत्पन्न कंपनीच्या पाच अग्रणी ग्राहकांसाठी वस्तूंच्या विक्रीतून मिळणाऱ्या एकूण उत्पन्नाच्या ९२.६६%, ९१.२८%, ९२.८६% आणि ८६.९४% आहे.

उत्पादन पुरवठ्याच्या जोडीला, कंपनीने जर्मन ऑटोमोटिव्ह कंपनीसोबत उत्पादन विकास करार (“PDA”) आणि तंत्रज्ञान हस्तांतरण करार (“TTA”) केला आहे. PDA आणि TTA च्या अनुषंगाने, कंपनी भारतासाठी विशेष अधिकारांसह DCT अॅप्लिकेशन्ससाठी आणि भारताबाहेरील बाजारपेठांसाठी अनन्य अधिकारांसह महत्वाचे घटक आणि प्रणाली सह-विकसित करत आहे. TTA च्या अनुषंगाने परवाना देण्याची व्यवस्था स्वाक्षरी केल्याच्या तारखेपासून २०३३ पर्यंत १३ वर्षांच्या कालावधीसाठी सुरू राहील. कंपनीने ४ ऑक्टोबर २००४ रोजी बोर्गवॉर्नरसोबत परवाना करार देखील केला असून त्यानंतर १ मार्च २०१७ रोजी नूतनीकरण करण्यात आले आहे. कराराच्या नूतनीकरणाच्या तारखेपासून सात वर्षांच्या कालावधीसाठी हे लागू आहे. कंपनीने बनवलेल्या उत्पादनांच्या आणि घटकांच्या सोर्सिंगच्या संदर्भात जपानी ऑटोमोटिव्ह पुरवठा साखळी कंपनीसोबत एक विशेष वितरण करार देखील केला आहे.

१० मिनिटे त्याचे संरक्षण काढा,उद्या सकाळी तो दिसणार नाही -नितेश राणेंनी विधानसभेत केलं वक्तव्यं

मुंबई- खासदार संजय राऊत यांनी कोल्हापुरात केलेल्या तथाकथित वक्तव्याबाबत त्यासंदर्भात हक्कभंग प्रस्ताव आणताना नितेश राणे यांनी ,त्याला सरकारी संरक्षण कशाला देता ? १० मिनिटे त्याचे संरक्षण काढा ,उद्या सकाळी तो दिसणार नाही ‘ असे वक्तव्य केले आहे. दरम्यान हक्कभंग प्रस्तावावर निर्णय देताना विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकर म्हणाले , या वक्तव्याबाबत आपण २ दिवसात चौकशी करून आपला निर्णय जाहीर करू … चार वेळा तहकूब झाल्यावर विधानसभेच्या आजच्या अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी नेमके कोण काय म्हणाले ते प्र्ताय्क्ष ऐका ..पहा …

व्हिडीओ १ मिनिटांनंतर सुरु होत आहे .

आजपासून त्वरीत गॅस सिलिंडर 50 रुपयांनी महाग:कमर्शिअल सिलिंडरच्या दरात 350 रुपयांनी वाढ, देवाची आरतीही झाली महाग

आज म्हणजेच 1 मार्चपासून 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 50 रुपयांनी वाढली आहे. दिल्लीत याची किंमत 1103 रुपयांवर गेली आहे. होळीपूर्वी सामान्य जनतेसाठी हा मोठा धक्का आहे. त्याच वेळी, 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत 350.50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत 19 किलोचा व्यावसायिक सिलिंडर आता 2119.50 रुपयांना मिळेल.

त्याचबरोबर आता तुम्हाला काशी विश्वनाथ मंदिरात बाबांची आरती करण्यासाठी पूर्वीपेक्षा जास्त रुपये मोजावे लागणार आहेत. याशिवाय दिल्लीतील सरकारी शाळांमध्ये आजपासून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. आम्ही तुम्हाला आजपासून झालेल्या बदलांबद्दल सांगत आहोत, ज्याचा तुमच्यावरही परिणाम होईल.

1. गॅस सिलिंडर महागले

गेल्या वर्षभरात किमतीत 203.50 रुपयांनी वाढ
गेल्या वर्षभरात घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत झालेल्या बदलाबाबत बोलायचे झाले तर त्यात एकूण ५ वेळा बदल झाला आहे. 22 मार्च 2022 रोजी सिलिंडरची किंमत 50 रुपयांनी वाढल्यानंतर दिल्लीत 899.50 रुपयांवरून 949.50 रुपयांवर पोहोचली होती.

यानंतर, तेल विपणन कंपन्यांनी 7 मे 2022 रोजी किंमत 50 रुपयांनी वाढवली, ज्यामुळे ती 999.50 रुपयांवर पोहोचली. त्याच महिन्यात 19 मे रोजी पुन्हा 2.50 रुपयांनी वाढ करण्यात आली. यानंतर किंमत 1003 रुपये झाली.

6 जुलै 2022 रोजीही सिलिंडरच्या किमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. या वाढीनंतर किंमत 1053 रुपये झाली होती. आता पुन्हा एकदा 50 रुपयांनी वाढ करण्यात आली असून, त्यामुळे सिलिंडरची किंमत 1103 रुपयांवर गेली आहे. म्हणजेच गेल्या वर्षभरात किंमत 203.50 रुपयांनी वाढली आहे.

वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिरात बाबांची आरती महाग झाली आहे. मंगला आरतीसाठी भाविकांना आणखी 150 रुपये मोजावे लागणार आहेत. म्हणजेच आता 350 ऐवजी 500 रुपये मोजावे लागणार आहेत. त्याचबरोबर सप्तऋषी आरती, शृंगार भोग आरती आणि मध्यान्ह भोग आरतीच्या तिकिटांमध्ये 120 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या आरतींसाठी 180 ऐवजी 300 रुपये मोजावे लागणार आहेत. यापूर्वी 2018 मध्ये म्हणजेच 5 वर्षांपूर्वी मंगला आरतीच्या तिकिटात 100 रुपयांची वाढ करण्यात आली होती.

‘हे’विधिमंडळ नाही,चोरमंडळ: खासदार संजय राऊत यांचे वक्तव्य; म्हणाले – आम्ही लफंगे नाही, पदे परत येतील!

कोल्हापुर-विधिमंडळ नाही हे चोरमंडळ आहे. ही बनावट शिवसेना आहे. ड्युप्लिकेट चोरमंडळ आहे, असे वादग्रस्त वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केले आहे. ते कोल्हापुरात माध्यमांशी बोलत होते. त्यांच्या या वक्तव्याचे विधानभवनातही तीव्र पडसाद उमटले.संजय राऊत म्हणाले, आम्हाला पदावरून काढले तरी आम्ही पक्ष सोडणार आहे का? आम्हाला बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी अनेक पदे दिली आहेत. आम्ही अशी पदे ओवाळून टाकतो. आम्ही लफंगे नाहीत. पदे परत येतील. आमचा पक्ष महत्त्वाचा आहे, अशी टीका त्यांनी केली.

संजय राऊत म्हणाले, शिवगर्जना संकल्पना घेऊन महाराष्ट्रात राज्याच्या सर्वच भागात शिवसेनेचे नेते, उपनेते, प्रमुख अधिकारी संपर्क करत आहेत. मूळ पक्ष आमच्यासोबत आहे. विधिमंडळ पक्ष म्हणजे शिवसेना नाही हे काल कोर्टानेही म्हटले आहे. हा पक्ष इथे आहे. आमच्या गर्जनेपेक्षा लोकांची गर्जना ऐकायला जातोय. ही गर्जना काय आहे हे काल धाराशिवला पाहिले असेल.

संजय राऊत म्हणाले, धाराशिवला बच्चू कडूंना लोकांनी जाब विचारला. चोर डाकूंसोबत का गेला? अशी गर्जना केली. कोल्हापुरात आम्हाला आमच्या बाजूने वातावरण आहे. शिवसेनेतील फुटीच्या घटनेनंतर आधी होती त्यापेक्षा ही संघटना मजबूत होऊन विस्तारत होत आहे. लोकांमध्ये उत्साह दिसत आहे.

संजय राऊत पुढे म्हणाले, आम्हाला अटक केली. सिसोदियांना अटक केली. आमच्या पदाधिकाऱ्यांनाही अटक केलीय. आयएनएस विक्रांत वाचवण्याच्या नावाखाली एका चोराने, किरीट सोमय्याने कोट्यवधी रुपये गोळा केले. हे कोट्यवधी रुपये राजभवनात जमा करू असे सोमय्या म्हणाले. अशा 28 चोरांना ईओडब्ल्यूच्या माध्यमातून क्लिनचीट देण्याचा उपक्रम राबवण्यात आला.संजय राऊत पुढे म्हणाले, आमच्यावर अनेक खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. पण लक्षात ठेवा 2024 ला त्याचा हिशोब केला जाईल. विक्रांत घोटाळा कधी थांबणार नाही. दडपला जाणार नाही. या घोटाळ्याची चौकशी का थांबवली, जनतेचा पैसा कुठे गेला यासाठी मी स्वत: कोर्टात याचिका दाखल करणार आहे. कोट्यावधी रुपये सोमय्याने कुठे दडपवले हे सांगावे.

गोगावलेंनी मागे घेतला ,’भाड खाऊ ‘ शब्द पण म्हटले हे काय महाचोर आहेत काय ?

मुंबई- खासदार संजय राऊत यांनी ‘हे’ विधिमंडळ’ चोर आहे असे विधान केल्याचा ठपका थेउन्त्यन्च्यव्र टीकास्त्र सोडताना आणि हक्कभंग आणताना भरत गोगावले यांनी वापरलेला शब्द पुन्हा सभा सुरु होताच मागे घेतला , पण आम्हाला हे चोर म्हणतात , हे काय महाचोर आहेत काय ? असा हि सवाल केला अवघ्या १ मिनिटात यावेळी तिसर्यांदा सभा पुन्हा तहकूब करण्यात आली .

‘माणसाने भाड खायला पाहिजे, पण एवढे तरी भाडखाऊ पणा नसायला पाहिजे-भरत गोगावलेंचे विधानसभेत वक्तव्य

विधिमंडळ नव्हे’हे’ चोरमंडळ, यावरून संजय राऊत यांच्यावर हक्कभंग प्रस्ताव आणताना टीकास्त्र ,गोंधळ

दोन वेळा सभा तहकूब

मुंबई-विधिमंडळ नव्हे’हे’ चोरमंडळ, संजय राऊत यांच्यावर हक्कभंग प्रस्ताव आज विधानसभा अधिवेशनाचे कामकाज सुरु होताच भाजपचा वतीने आणून त्यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले तर यावेळी , भरत गोगावले म्हणाले ,’माणसाने भाड खायला पाहिजे, पण एवढे तरी भाडखाऊ पणा नसायला पाहिजे ,याच्यावर हक्कभंग आणायलाच पाहिजे ‘

अपहरण:खून प्रकरणातील फरार आरोपी लोणीकंद पोलिसांच्या जाळ्यात

पुणे- दोन वर्षापूर्वी लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला लोणीकंद पोलिसांच्या सायबर तपास पथकाने अटक केली आहे. आरोपी दोन वर्षापासून खेड तालुक्यातील बहुळ या गावात राहत होता. पथकाने बहुळ गावात सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.सचिन बाळु वरघडे (वय-30 रा. ढेरंगे वस्ती, कोरेगाव-भिमा ता. शिरुर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. लोणीकंद पोलीस ठाण्यात 2020 मध्ये खुनाचा गुन्ह्यासह आर्म अॅक्ट , महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात फरार आरोपी सचिन वरघडे याचा सायबर तपास पथकाकडून चाकण, आळंदी भागात शोध घेतला जात होता. त्यावेळी आरोपी खेड तालुक्यातील बहुळ गावात लपुन बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार , पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक
, अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा,पोलीस उपायुक्त परिमंडळ-4 शशिकांत बोराटे
,सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार),पोलीस निरीक्षक गुन्हे मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सायबरपोलीस स्टेशन तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुरज किरण गोरे, पोलीस अंमलदार बाळासाहेब सकाटे, समीर पिलाणे, सचिन चव्हाण, मल्हारी सपुरे सागर पाटील, महिला पोलीस अंमलदार किर्ती नरवडे, कोमल भोसले, वृंदावनी चव्हाण यांच्या पथकाने केली.

धनकवडीत पोलीस, पत्रकार असल्याचे सांगून खोटा छापा मारणाऱ्या १० पैकी ५ आरोपीना सहकारनगर पोलिसांकडून अटक

पुणे :एसीबी अधिकारी आणि पत्रकार असल्याचे सांगत एका टोळक्याने महिलेला लुटले होते. त्यांनी महिलेच्या घरात घुसून ती वेश्याव्यवसाय करत असल्याचा आरोप करुन महिलेकडून 70 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व 14 हजार रुपये रोख असा एकूण 84 हजार रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला होता. हा प्रकार बालाजीनगर येथील एका सोसायटीमध्ये 18 फेब्रुवारी 2023 रोजी रात्री घडला होता. याप्रकरणी 40 वर्षीय महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे.

सिमा शशिकांत शिंदे (वय-30 रा. इंदिरानगर चाळ, बिबवेवाडी), रमेश सिताराम कंक (वय-35 रा. मानाजीनगर, नऱ्हे), स्वप्नील संतोष काळे (वय-19 रा. आंबेगाव बुद्रुक, पुणे), कार्तीक संतोष कांबळे (वय-21 रा. जांभुळवाडी रोड, आंबेगाव बुद्रुक) यांना अटक केली आहे. तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. तर त्यांच्या इतर पाच साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार , पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे ,पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 स्मार्तना पाटील , सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगांवकरयांच्या मार्गदर्शनाखालीसहायक पोलीस निरीक्षक समीर शेंडे , पोलीस अंमलदार बापु खुटवड, भुजंग इंगळे,
सुशांत फरांदे, बजरंग पवार, महेश मंडलिक, नवनाथ शिंदे, सागर सुतकर, सागर कुंभार, विशाल वाघ, शिंदे,
महिला पोलीस अंमलदार रामगुडे यांच्या पथकाने केली.

उरुळी कांचन येथील दारु अड्ड्यावर छापा, 3 लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे-उरुळी कांचन परीसरातील गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. ही करवाई शिंदेवणे काळेश्वर गावातील राठोड वस्ती येथे करण्यात आली. या कारवाईत 3 लाख 4 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राठोड वस्ती येथे गावठी हातभट्टी दारुचा साठा करुन त्याची विक्री केली जात असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार पथकाने पाळत ठेवून छापा टाकला. पोलिसांनी विनापरवाना विक्रीसाठी साठवून ठेवलेली 3 लाख 2 हजार 500 रुपयांची 2,750 लिटर गावठी हातभट्टीची दारु, रोख रक्कम जप्त केली. तर याप्रकरणी तीन जणांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्रोव्हिजन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.

सामाजिक न्याय विभागाच्या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी प्रयत्नशील – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

पुणे, दि. २८ : अनुसूचित जाती तसेच इतर मागास वर्ग, ज्येष्ठ नागरिक, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिकदृष्ट्या मागास घटकांच्या विकासासाठी सरकार कटीबद्ध असून राज्यांच्या सहभागातून या घटकांपर्यंत योजना अधिक प्रभाविपणे पोहोचवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, असे केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.

केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष अधिकारीता मंत्रालय व राज्याच्या सामाजिक न्याय विभागाच्या संयुक्त विद्यमाने हॉटेल दी रिट्झ कार्लट्न येरवडा येथे आयोजित देशपातळीवरील दोन दिवसीय क्षेत्रीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी राज्यमंत्री श्री. आठवले बोलत होते. यावेळी राज्याचे बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे, पंजाबच्या सामाजिक न्याय मंत्री श्रीमती बलजीत कौर, केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव सुरेंद्र सिंग, सहसचिव इंदिरा मूर्ती, आर.पी. मीना, राज्याचे समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव दिनेश डिंगळे आदी उपस्थित होते.

केंद्रीय राज्यमंत्री श्री. आठवले म्हणाले, अनुसूचित जाती तसेच अन्य मागास घटकांसाठीच्या शिष्यवृत्तीचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचवण्याला विभागाने प्राधान्य दिले आहे. शिष्यवृत्तीमध्ये केंद्र शासनाचा आणि राज्य शासनाचा हिस्सा ६०:४० चे गुणोत्तरानुसार निश्चित करण्यात आला असून थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येत असल्याने पारदर्शकता निर्माण करण्यात आली आहे. अनुसूचित जातींसाठी अर्थसंकल्पात १ लाख ५९ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

केंद्र शासनामार्फत तसेच विविध राज्यांमध्ये अनुसूचित जाती, अन्य मागास घटकांसाठी राबवण्यात येत असलेल्या योजनांची अंमलबजावणी, अस्तित्वातील योजनांमध्ये सुधारणा, नव्या योजना सुरू करणे, योजनांच्या अंमलबजावणीमधील अडथळे दूर करणे आदींच्या अनुषंगाने या कार्यशाळेमध्ये विचारमंथन होणार असून त्यातील सूचनांचा विचार भविष्यातील धोरणांसाठी केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

राज्याचे बहुजन कल्याण मंत्री श्री. सावे म्हणाले, स्वतंत्र सामाजिक न्याय विभागाची स्थापना करणारे महाराष्ट्र पहिले राज्य आहे. केंद्र शासनाच्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीबरोबरच राज्य शासनाच्याही शिष्यवृत्ती, मागास घटकांसाठी निवासी शाळा, वसतिगृहे, अनुसूचित जातींसाठी रमाई आवास योजना, कृषिसह अन्य विभागाच्या योजना, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आदींसाठी योजना राबवण्यात येत आहेत.

बार्टी, सारथी, महाज्योती या समर्पित प्रशिक्षण संस्थांची स्थापना राज्यात करण्यात आली. राज्यात स्वतंत्र बहुजन कल्याण विभाग स्थापन करण्यात आला. याअंतर्गत ९७७ आश्रमशाळा चालवण्यात येत आहेत. ५ वी ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ३० हजार टॅब वितरीत केले आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या शिष्यवृत्ती, परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती आदींचा लाभ देण्यात येत आहे, असेही श्री. सावे म्हणाले.

यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांचा दृकश्राव्य संदेश दाखवण्यात आला. पंजाबच्या सामाजिक न्यायमंत्री श्रीमती कौर यांनी पंजाबमध्ये अनुसूचित जाती व अन्य घटकांसाठी राबवण्यात येत असलेल्या योजनांची माहिती दिली.

सुरेंद्र सिंग यांनी कार्यशाळा आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. डॉ. नारनवरे यांनी आभार मानले.

कार्यक्रमात ‘प्रधानमंत्री आदर्श गाव योजना’ पुस्तिका तसेच राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या ‘स्टँडिंग आऊट’ या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

या कार्यशाळेत पंजाब, हरियाणा, जम्मू-काश्मीर, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, महाराष्ट्र, दीव दमन, दादर नगर हवेली व गोवा अशा १२ राज्यांनी सहभाग नोंदवला आहे. यामध्ये सामाजिक न्याय विभागाच्या योजना, नियम व कायदे तसेच समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विविध राज्यांच्या व केंद्र शासनाच्या योजना पाहोचविण्यासाठी करावयाच्या उपाययोजना यावर चर्चा करुन मसुदा तयार करण्यात येणार आहे.

जलपर्णी नष्ट करण्यासाठी राज्यात हर्बल फवारणी पद्धतीचा वापर करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0

राज्य नदी संवर्धन योजनेत कामवरी नदीचा समावेश: मंत्री उदय सामंत

मुंबई, दि. २८ : भिवंडी तालुक्यातील कामवरी नदीत जलपर्णीमुळे मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण झाले आहे. उल्हास नदीवर हर्बल फवारणी केल्यामुळे जलपर्णी कायमस्वरूपी नष्ट झाल्या आहेत. याच पद्धतीने जलपर्णी नष्ट करण्यासाठी कामवरी नदीसह राज्यात हर्बल फवारणी पद्धतीचा वापर करणार असल्याचे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत याबाबत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, प्रदूषित पाणी प्रक्रिया न करता नद्यांमध्ये सोडले गेल्यामुळे नद्या प्रदूषित होतात. नर्सरी प्लांटच्या माध्यमातून या पाण्याचा पुनर्वापर करण्यात येत आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कामवरी नदीचे जलप्रदूषण रोखण्यासाठी भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेला वेळोवेळी सूचना देण्यात आलेल्या आहेत. या महानगरपालिकेच्या हद्दीतून निर्माण होणारे घरगुती सांडपाणी विनाप्रक्रिया कामवरी नदीमध्ये मिसळले जात असल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतच्या लेखी उत्तरात सांगितले.

राज्य नदी संवर्धन योजनेत कामवरी नदीचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी यासंदर्भात अधिक माहिती देताना दिली.

सदस्य रईस शेख यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.

ससूनच्या समाजसेवा अधिक्षक विभाग प्रमुखपदी डॉ. शंकर मुगावे यांची नियुक्ती

पुणे: दि. २८ : ससून सर्वोपचार रूग्णालय पुणे येथील समाजसेवा अधिक्षक विभागाचे विभागप्रमुख म्हणून डॉ. शंकर मुगावे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.

डॉ. मुगावे यांनी सलग १८ वर्षे ससून रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये समाजसेवा अधिक्षक या पदांवर सेवा केली आहे. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, ससून रुग्णालय व पुणे महानगरपालिका अंतर्गत नागरी आरोग्य शिक्षण आणि प्रशिक्षण केंद्र पुणे येथे समाजसेवा अधिक्षक पदाची जबाबदारी त्यांनी सहा वर्षे पाहिली. कोरोना संकटकाळात डॉ.मुगावे यांनी पश्चिम महाराष्ट्रातील विभागीय स्तरावरील रक्तपेढीत मुख्य समन्वयक म्हणून तीन वर्षे यशस्वीपणे कार्य केले.

डॉ. शंकर मुगावे यांनी रक्तदान क्षेत्रात विशेष कार्य केले आहे. त्यांनी आजपर्यत ९९ वेळा ऐच्छिक रक्तदान केले असून साडे तीन लाख रक्तदात्यांचे ऐच्छिक रक्त संकलन केले आहे. रक्तपेढींच्या समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून संशोधनात्मक अभ्यास करून त्यांनी या विषयावर पीए.डी.पदवी संपादन केली. ते महाराष्ट्र राज्य समाजसेवा अधिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष आहेत.

वाघोलीचे प्रस्तावित २२० केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्र जागेअभावी रखडले

वाघोली परिसरातील सुरळीत वीजपुरवठ्यासाठी दोन नवीन उपकेंद्र लवकरच कार्यान्वित होणार

पुणे, दि. २८ फेब्रुवारी २०२२:वाघोली व परिसरातील वीजग्राहकांना सुरळीत व दर्जेदार वीजपुरवठ्यासाठी वाघोली येथे नवीन २२०/२२ केव्ही क्षमतेचे अतिउच्चदाब उपकेंद्र महावितरणकडून प्रस्तावित करण्यात आले आहे. त्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या उपकेंद्रासाठी गेल्या दोन वर्षांपासून वाघोली येथे जागेचा युद्धपातळीवर शोध सुरु आहे. केवळ जागेअभावी या उपकेंद्राचे काम सध्या रखडलेले आहे. दरम्यान महावितरणकडून २२/११ केव्ही गेरा उपकेंद्र व एडब्लूएचओ स्विचिंग स्टेशन लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी तांत्रिक कामे वेगाने सुरु आहेत. त्याचा सुमारे २८ हजार वीजग्राहकांना फायदा होणार आहे.

वाघोली परिसरात सर्व वर्गवारीतील महावितरणचे एकूण ७३ हजार वीजग्राहक आहेत. या सर्व ग्राहकांना २२ केव्ही आयव्ही इस्टेट, गंगावाटिका, रोहन अभिलाषा व पूर्वरंग या २२ केव्ही स्विचिंग स्टेशन्मधून वीजपुरवठा केला जातो. या चारही स्विचिंग स्टेशन्सला महापारेषणच्या लोणीकंद ४००/२२०/२२ केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रातून वीजपुरवठा होतो. मात्र वीजपुरवठा करणाऱ्या सर्व वीजवाहिन्यांची सरासरी लांबी १५ ते १६ किलोमीटर आहे. त्यामुळे विविध कारणांमुळे सुरळीत वीजपुरवठ्यात व्यत्यय निर्माण होत आहेत.

वाघोलीमध्ये नवीन अतिउच्चदाब उपकेंद्राची गरज- महापारेषणच्या लोणीकंद अतिउच्चदाब उपकेंद्रातील वीजभाराची क्षमता ही ९० टक्क्यांपेक्षा अधिक झाली आहे. त्यामुळे वाघोली परिसरातील विजेची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी व सर्व वर्गवारीच्या नवीन वीजजोडण्या देण्यासाठी महावितरणकडून वाघोली येथे नवीन २२०/२२ केव्ही अतिउच्चदाब प्रस्तावित करण्यात आले आहे. तथापि केवळ जागेअभावी या उपकेंद्राचे काम गेल्या दोन वर्षांपासून रखडलेले आहे. वाघोली अतिउच्चदाब उपकेंद्र उभारल्यास तब्बल १२ उपकेंद्र व स्विचिंग स्टेशन्सला तसेच ३३ व २२ केव्ही क्षमतेच्या १९ वाहिन्यांना या उपकेंद्रातून वीजपुरवठा होणार आहे. त्यामुळे वाघोली परिसरच नव्हे तर नगररोड व मुळशी विभागातील सुमारे दीड लाख ग्राहकांना दर्जेदार व सुरळीत वीजपुरवठ्याचा फायदा होणार आहे. तसेच पर्यायी स्वरुपाच्या वीजपुरवठ्याची सोय उपलब्ध होऊ शकणार आहे.

वाघोलीसाठी दोन नवीन उपकेंद्र लवकरच– वाघोलीमधील वीजग्राहकांसाठी २२/११ केव्ही क्षमतेचे गेरा उपकेंद्र मंजूर करण्यात आले आहे. त्याची उभारणी सुरु असून या उपकेंद्राला १३२/२२ केव्ही खराडी व २२/२२ केव्ही मार्व्हल झफायर स्विचिंग स्टेशनमधून वीजपुरवठा करण्यात येणार आहे. येत्या ६ महिन्यांमध्ये हे काम पूर्ण होईल. या उपकेंद्रामुळे उबाळेनगर, चोखीदाणी परिसर, बायफ रस्ता, बायफ कंपनी परिसर, प्रियांकानगरी, रेणुका पार्क, खांदवेनगर, अनसूया पार्क आदी परिसरातील २० हजार वीजग्राहकांना फायदा होणार आहे. तसेच महावितरणकडून AWHO (आर्मी वेलफेअर हाऊसिंग ऑर्गनायझेशन) २२ केव्ही स्विचिंग स्टेशनची उभारणी पूर्ण झाली आहे. या उपकेंद्राला लोणीकंद अतिउच्चदाब उपकेंद्रातून दोन नवीन २२ केव्ही भूमिगत वीजवाहिन्यांद्वारे वीजपुरवठा करण्यात येणार आहे. १६ किलोमीटर लांबीच्या या वीजवाहिन्यांचे ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे लोहगाव रस्ता, जाधववस्ती, गोरेवस्ती, बहिरटवस्ती, सुयोगनगर, वाघोली गावठाण, भावडी रस्ता या परिसरातील १८ हजार वीजग्राहकांना सुरळीत वीजपुरवठ्याचा फायदा होणार आहे.

सिमेंट रस्त्यामुळे वीजयंत्रणेच्या दुरुस्तीला विलंब- रविवारी (दि. २६) वाघोली परिसरात एकामागे एक तीन वीजवाहिन्यांमध्ये बिघाड झाल्यामुळे महावितरणच्या अभियंता व कर्मचाऱ्यांनी रात्रभर वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचे अथक परीश्रम केले. यात फक्त साईसत्यम २२ केव्ही वीजवाहिनीला पर्यायी स्वरुपात वीजपुरवठा करणे शक्य झाले नाही. परिणामी ९ हजार ५०० ग्राहकांचा वीजपुरवठा बंद राहिला. यासाठी सिमेंट काँक्रीटकरणाचा रस्ता कारणीभूत ठरल्याचे दिसून आले आहे. अतिरिक्त स्वरुपात असलेल्या २२ केव्ही करोला-२ वाहिनीद्वारे साईसत्यम वाहिनीला पर्यायी वीजपुरवठ्याची सोय आहे. मात्र ही वाहिनी पूर्वरंग सोसायटीजवळ सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याखाली गेल्याचे दिसून आले. जेसीबी व ब्रेकरने सिमेंट रस्त्याचे खोदकाम केल्यानंतर सोमवारी (दि. २७) रात्री ८.३० वाजताच्या सुमारास करोला-२ वाहिनीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले. त्यापूर्वीच वाघोली वीजवाहिनीवरून साईसत्यम वाहिनीवरचा वीजपुरवठा सोमवारी सकाळी ८ वाजता टप्प्याटप्प्याने सुरळीत करण्यात आला.

सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारकास शासनाचे सर्वोच्च प्राधान्य-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0

मुंबई, दि. 28 : पुणे येथील भिडे वाड्यात सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक करण्याबाबत शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असून स्मारकाचे काम मार्गी लागावे यासाठी मालक, विकासक व भाडेकरू यांच्यासमवेत बैठक घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक हा अस्मितेचा विषय आहे. या स्मारकासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल.याबाबत अधिकची माहिती देताना मंत्री उदय सामंत म्हणाले की, सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक उभारताना रेडीरेकनर व बाजार मूल्यानुसार भाडेकरूंना योग्य मोबदला मिळण्यासाठी जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त व नगरविकास विभाग यांच्या समवेत लवकरच बैठक घेण्यात येईल.

मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन यांचा राजीनामा:CM केजरीवाल यांनी स्वीकारला

नवी दिल्ली-

दिल्लीतील केजरीवाल सरकारमधील दोन मंत्री मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. वृत्तसंस्थेनुसार, मुख्यमंत्री केजरीवाल यांनीही दोघांचा राजीनामा स्वीकारला आहे. राजीनामा दिलेल्या दोन्ही नेते सध्या वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये आरोपी आहेत.केजरीवाल यांच्यानंतर मनीष सिसोदिया हे आम आदमी पक्षातील सर्वात मोठे नेते आहेत. मनीष सिसोदिया यांच्याकडे दिल्ली सरकारमधील एकूण 33 पैकी 18 खाती आहेत. सिसोदिया यांच्या अटकेनंतर त्यांचे काम कोण सांभाळणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. केजरीवाल यांचे आणखी एक मंत्री सत्येंद्र जैन हे आधीच तुरुंगात आहेत. जैन यांच्या विभागांचे कामही सिसोदिया पाहत होते. सिसोदिया यांच्याकडे शिक्षण, सार्वजनिक बांधकाम, वित्त, उत्पादन शुल्क, ऊर्जा, पाणी, आरोग्य अशी महत्त्वाची खाती होती. ते दिवसाला 12 ते 15 बैठका घेत, असे त्यांचे सहकारी सांगतात.

फेब्रुवारी 2020 मध्ये मुख्यमंत्री केजरीवाल यांनी त्यांच्या उर्वरित खात्यांचा त्याग केला होता. यानंतर सिसोदिया ही खातीही पाहत होते. आम आदमी पक्षात सध्या मनीष सिसोदिया यांच्या उंचीचा आणि अरविंद केजरीवाल यांचा विश्वासू असा दुसरा नेता नाही.

दिल्ली मद्य धोरण प्रकरणात अटक करण्यात आलेल्या मनीष सिसोदिया यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. वृत्तसंस्थेनुसार, सर्वोच्च न्यायालयाने अटकेला आव्हान देणारा सिसोदिया यांचा अर्ज स्वीकारण्यास नकार दिला. न्यायालयाने त्यांना उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला आहे.मीडिया रिपोर्ट्सनुसार, सीजेआय जस्टिस डीवाय चंद्रचूड सिसोदिया यांच्या वकिलाला म्हणाले- तुम्ही हायकोर्टात जायला हवे होते, तुम्ही थेट सर्वोच्च न्यायालयात जामीन का मागत आहात? ही चांगली परंपरा नाही. या निर्णयावर आम आदमी पार्टीने म्हटले आहे – आम्ही न्यायालयाच्या आदेशाचा आदर करतो. आता जामिनासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे.