Home Blog Page 1388

कसब्यात रविंद्र धंगेकर तर चिंचवडमध्ये अश्विनी जगताप आघाडीवर

भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसची मुसंडी, कसबा मतदारसंघात रवींद्र धंगेकर यांची आघाडी

लागोपाठ चार वर्षे स्थायी समिती अध्यक्षपद भोगल्याने रासनेंची दमछाक … बालेकिल्ल्याला सुरुंग महापालिकेच्याच २ पदाधिकाऱ्यांच्या कारभाराने

पुणे -पुण्यातील कसबापेठ विधानसभा मतदार संघ आणि चिंचवड या दोन्ही ठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. सकाळी 8 वाजेपासून मतमोजणीला सुरू आहे. पुणे महापालिकेत तब्बल १०० नगरसेवकांचे म्हणजे हत्तीचे बळ घेऊन सत्ता प्राप्त केलेल्या भाजपची आज त्यांचा ४० वर्षे बालेकिल्ला मानला जाणारा कसबा राखण्यासाठी झालेली दम छाक पाहूनही त्यामागचे कारण वरिष्ठ नेत्यांना समजत नसेल तर नवलच म्हणावे लागणार आहे. १०० नगरसेवक असताना केवळ मोहोळ आणि रासने यांच्यावर सलग केलेली कृपादृष्टी आणि या दोहोंनी केलेला लॉबी ,आणि भेदभावाचा, पाय खेचाखेची चा कारभार यामुळेच हा बालेकिल्ला ढासळला आहे. केवळ खासदार गिरीश बापट यांना केसरीवाड्यात प्रचारासाठी आणल्याने बापटांच्या विषयी सहानुभूती निर्माण झाली होती आणि यामुळे धंगेकर यांचे मताधिक्य काही प्रमाणात कमी झाले अन्यथा धंगेकर यांचे मताधिक्य आणखी वाढले असते .

कसबा मतदारसंघ

उमेदवाराचे नावमते
रवींद्र धंगेकर (मविआ)56,497 (आघाडीवर)
हेमंत रासने (भाजप)50,490

​​​​​चिंचवड मतदारसंघ

उमेदवाराचे नावमते
अश्विनी जगताप (भाजप)39,048 (आघाडीवर)
नाना काटे (मविआ)30476
राहुल कलाटे (अपक्ष)11458
  • कसबा मतदारसंघात 13व्या फेरीअखेर हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांना केवळ 123 मते मिळाली आहेत.

दहाव्या फेरीअखेरीस….

रवींद्र धंगेकर : 38286
हेमंत रासने : 34022

कसबा मतदारसंघ

उमेदवाराचे नावमते
रवींद्र धंगेकर (मविआ)34,741 (आघाडीवर)
हेमंत रासने (भाजप)30,260

​​​​​चिंचवड मतदारसंघ

उमेदवाराचे नावमते
अश्विनी जगताप (भाजप)28,020 (आघाडीवर)
नाना काटे (मविआ)23086
राहुल कलाटे (अपक्ष)9291

कसबा मतदारसंघ

उमेदवाराचे नावमते
रवींद्र धंगेकर (मविआ)30,500 (आघाडीवर)
हेमंत रासने (भाजप)27,175

​​​​​चिंचवड मतदारसंघ

उमेदवाराचे नावमते
अश्विनी जगताप (भाजप)24,417 (आघाडीवर)
नाना काटे (मविआ)20318
राहुल कलाटे (अपक्ष)8239
  • आठव्या फेरीत रवींद्र धंगेकर 30527 मतांनी आघाडीवर आहेत. हेमंत रासने यांना 27187 मते मिळाली आहेत. तर, चिचंवडमध्ये अश्विनी जगताप यांनी 4 हजार मतांनी आघाडी मिळवली आहे.
  • सातव्या फेरीत रविंद्र धंगेकर एकूण 25904 मतांसह आघाडीवर आहेत. भाजपचे हेमंत रासने यांना 24633 मते मिळाली आहेत.

कसबा मतदारसंघ

उमेदवाराचे नावमते
रवींद्र धंगेकर (मविआ)23,073 (आघाडीवर)
हेमंत रासने (भाजप)20,353

​​​​​चिंचवड मतदारसंघ

उमेदवाराचे नावमते
अश्विनी जगताप (भाजप)20,529 (आघाडीवर)
नाना काटे (मविआ)17210
राहुल कलाटे (अपक्ष)7149

कसबा मतदारसंघ

उमेदवाराचे नावमते
रवींद्र धंगेकर (मविआ)19,022 (आघाडीवर)
हेमंत रासने (भाजप)14,382

​​​​​चिंचवड मतदारसंघ

उमेदवाराचे नावमते
अश्विनी जगताप (भाजप)16,522 (आघाडीवर)
नाना काटे (मविआ)13575
राहुल कलाटे (अपक्ष)5000
  • कसबा व चिंचवड पोटनिवडणुकीत मतमोजमीच्या सहा फेऱ्या पार पडल्या आहेत. कसब्यात मविआचे रविंद्र धंगेकर हे जवळपास 4 हजार मतांनी आघाडीवर आहेत. तर, चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप यांनीही 3 हजार मतांनी आघाडी मिळवली आहे.
  • कसबा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अभिजीत बिचुकले यांना केवळ 4 मते मिळाली आहेत.
  • चिंचवड पोटनिवडणुकीत पोस्टल मतमोजणीमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप आघाडीवर आहेत. मविआचे नाना काटे व अपक्ष उमेदवार राहुल कलाटे पिछाडीवर आहेत.
  • कसबा पोटनिवडणुकीत पोस्टल मतमोजणीमध्ये काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आघाडीवर आहेत. भाजपचे हेमंत रासने पिछाडीवर आहेत.
  • अश्विनी जगताप दुसऱ्या फेरीत 676 मतांनी आघाडीवर
  • कसब्यातून काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर 3000 मतांनी आघाडीवर आहेत. 

कसबा पेठेत पहिल्या फेरीत अशी होती मतसंख्या

रवींद्र धंगेकर: ५८४४

हेमंत रासने: २८६३

अभिजीत बीचुकले: ४

आनंद दवे: १२

नोटा: ८६

अनंतराव पवार अभियांत्रिकी मध्ये विज्ञान दिन उत्साहात साजरा….

पुणे-     अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग  अँड रिसर्च पर्वती पुणे महाविद्यालच्या प्रथमवर्ष अभियांत्रिकी विभाग व अंतर्गत गुणवत्ता कक्ष यांचे संयुक्त विद्यमाने  राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्त ‘अंडरस्टॅन्डींग द युनिव्हर्स वुईथ सायंटिफिक टेम्पर’ या विषयावर ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.या व्याख्यानाची सुरवात संतोष टाकले शासत्रज्ञ भाभा ॲटोमीक रिसर्च सेंटर मुंबई,प्राचार्य डॉ.सुनिल ठाकरे, प्रा.गणेश कोंढाळकर, डॉ. बालाजी सेलूकर,डॉ.गायत्री कांबळे, प्रा.रमा गायकवाड  यांचे उपस्थितीत झाली. या प्रसंगी मार्गदर्शन करताना संतोष टाकले यांनी भौतिकशास्त्रज्ञनोबेल पुरस्कार विजेते  चंद्रशेखर वेंकट रामन यांचे ‘रमन परिणाम’ व त्यांचे कार्य याविषयी मार्गदर्शन केले. भारतीयांचे गणित व खगोलशास्त्र याचे असणारे ज्ञानाचे दाखले देऊन प्राचीन भारतीय वैज्ञानिक शोध,सूर्यमंडळ, क्रांती, उत्क्रांती, जीवसृष्टीची निर्मिती,रॉकेट विज्ञान,विविध रायानिक अभियाक्रिया या विषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी अंधश्रद्धा डोळसपणे खोडून वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगावा आसे आवाहन या प्रसंगी केले. सदर व्याख्यानासाठी संतोष टाकले, डॉ.सुनिल ठाकरे, डॉ. बालाजी सेलूकर,डॉ.गायत्री कांबळे, प्रा.गणेश कोंढाळकर, प्रा.रमा गायकवाड,  प्राध्यापक व विद्यार्थि बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यशाळेचे नियोजन प्राचार्य डॉ.सुनिल ठाकरे यांचे मार्गदर्शनाखाली समन्वयक डॉ. बालाजी सेलूकर,डॉ.गायत्री कांबळे यांनी केले. महाविद्यालयाने सदर व्याख्यान  आयोजित केल्याबद्दल अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या सरचिटणीस म.सौ.प्रमिला गायकवाड यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

कसबा, चिंचवडसह 3  राज्यांच्या निवडणुकांचे आज निकाल

पुणे

पुणे जिल्ह्यातील बहुचर्चित कसबापेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसोबतच गुरुवारी पूर्वांचल भागातील त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड येथील सार्वत्रिक विधानसभा निवडणुकांची मतमोजणी आणि निकाल जाहीर होणार आहेत.

कसब्यात भाजपचे हेमंत रासने आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर, तर चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप आणि राष्ट्रवादीचे नाना काटे यांच्यात लढत आहे. चिंचवडमध्ये ठाकरे गटाचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे हेदेखील रिंगणात आहेत. दरम्यान, त्रिपुरा येथे १६ फेब्रुवारी रोजी तर मेघालय आणि नागालँड विधानसभांसाठी २७ फेब्रुवारी रोजी मतदान झाले होते

सेंट झेवियर्स हायस्कुलमध्ये मराठी भाषा गौरव दिन साजरा.

मुंबई- एकीकडे राज्यभर मराठी भाषा गौरव दिन साजरा होत असताना,गोरेगाव येथील सेंट झेवियर्स इंग्रजी माध्यमाच्या हायस्कूलमध्ये शानदार आणि उत्स्फूर्तपणे मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला होता.
दि.२७ फेब्रुवारी हा दरवर्षी मराठी भाषा गौरव दिन राज्यभर आयोजित करण्यात येतो.विशेषतः शाळांमध्ये शिक्षक आणि विद्यार्थी आता मोठ्याप्रमाणात या कार्यक्रमात सहभाग घेवून लागले आहे.
गोरेगाव येथील सेंट झेवियर्स ही इंग्रजी माध्यमिक शाळा असताना सुद्धा तेथील विद्यार्थ्यांनी लघु नाट्य,लोक गीतं, अभिवाचन, लोक नृत्य असे विविध सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून मराठी भाषेचा गौरव दिन साजरा केला.या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे गोरेगाव येथील राज्य राखीव पोलिस बल – आठच्या तुकडीने उत्कृष्ट असे पोलिस वाद्यवृंद पथकाचे संचलन करून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती जागृत केली. “जय जय महाराष्ट्र माझा” हे राज्य गीत सुद्धा या पोलिस बॅड पथकाने वाजविले.याला विद्यार्थ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला.
या बँड पथकाचे नेतृत्व पोलिस निरीक्षक मधुकर जाधव आणि उप पोलिस निरीक्षक पी.के.काशीद यांनी केले होते.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.डॉ.अजयकुमार गावडे, मंत्रालयाततील जेष्ठ पत्रकार खंडूराज गायकवाड, नितीन तोरस्कर आदी उपस्थित होते.
या हायस्कूलचे प्रिन्सिपल लाँईड जेम्स फरेरा आणि शिक्षकांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन केले होते.

कुर्ल्याच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध पदांची तासिका तत्वावर भरती

मुंबई, दि. १ : कुर्ल्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायातील निदेशकांच्या रिक्त जागांची भरती जाहीर झाली असून या रिक्त जागा तासिका तत्वावर तात्पुरत्या स्वरुपात भरल्या जाणार आहेत.

या भरतीमध्ये इलेक्ट्रिशियन २, फिटर (जोडारी) २, इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नोलॉजी सिस्टीम मेन्टेनन्स  १,  यांत्रिक प्रशीतन व वातानुकुलीकरण २, कातारी (टर्नर) ४, इन्स्ट्रूमेंट मॅकॅनिक १ इतक्या रिक्त जागा तासिका तत्वावर भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ठरविण्यात आली असून संबंधित व्यवसायाचे आयटीआय उत्तीर्ण प्रमाणपत्र, एनसीव्हीटीचे प्रमाणपत्र, एटीएस उत्तीर्ण व दोन वर्षांचे अनुभव प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

इच्छुक उमेदवारांनी आवश्यक प्रमाणपत्र तसेच अनुभव प्रमाणपत्राच्या प्रतींसह औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कुर्ला येथे अर्ज सादर करावेत, असे आवाहन संस्थेच्या प्राचार्यांनी केले आहे.

कामगारांना उध्वस्त करण्याचा भाजपाचा डाव.

महाराष्ट्र प्रदेश असंघटीत कामगार व कर्मचारी काँग्रेसच्या राज्य कार्यकारिणीची बैठक संपन्न.

मुंबई, दि. १ मार्च २०२३
कामगार व शेतकरी ही मोठी शक्ती असून काँग्रेस सरकारने त्यांच्या हिताचे नेहमीच रक्षण केले आहे. स्वातंत्र्यानंतर पंडित नेहरु यांच्यापासून डॉ. मनमोहनसिंह यांच्या सरकारपर्यंत काँग्रेसने कामगार हिताचे विविध कायदे केले व त्यांना त्यांचे हक्क दिले. कामगार व शेतकरी या दोन घटकांचे देशाच्या विकासात सर्वात मोठे योगदान आहे पण केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने कामगार व शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले असून त्यांना उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
टिळक भवन येथे महाराष्ट्र प्रदेश असंघटीत कामगार व कर्मचारी काँग्रेसच्या राज्य कार्यकारिणीची बैठक झाली, त्यावेळी नाना पटोले बोलत होते. यावेळी व्यासपीठावर असंघटीत कामगार काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. उदित राज, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष व कामगार नेते आमदार भाई जगताप उपस्थितीत होते. कार्यक्रमाला कामगार नेते सुनिल शिंदे, श्रीरंग बरगे, मुनाफ हकीम, यशवंत हाप्पे यांच्यासह पदाधिकारी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना नाना पटोले पुढे म्हणाले की, केंद्रातील मोदी सरकार कामगारांच्या हातातील काम हिरावून घेत आहे. बांधकाम क्षेत्रात काम करणारे, शेतीत काम करणारे, घरगुती काम करणारे अशा विविध क्षेत्रातील असंघटीत कामगारांनी एकत्र येऊन एक शक्ती उभी करा व तुमच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करा. काँग्रेस पक्षाच्या सरकारांनीच कामगारांना सर्व सोयी सुविधा मिळाव्यात, हक्क मिळावेत यासाठी कायदे केले पण भाजपा सरकारने नवीन कामगार कायदे आणून कामगारांचे हक्कही हिरावून घेतले. कामगार शक्ती वाचवायची असेल तर असंघटीत क्षेत्रातील ताकद एकत्र करा व काँग्रेस पक्षाला पुन्हा विजयी करुन सत्तेत आणा, असे आवाहन पटोले यांनी केले.

यावेळी बोलताना डॉ, उदित राज म्हणाले की, देशात औद्योगिक क्षेत्रात कामगारांचा मोठा वाटा आहे. एकवेळ संघटीत कामगारांची संख्या देशात १३ टक्के एवढी होती पण ती आता घटली असून केवळ ६ टक्केच राहिली आहे. भविष्यात ही संख्याही कमी होण्याची शक्यताच जास्त आहे. त्यामुळे असंघटीत क्षेत्रातील कामगारांची संख्या ९६ टक्के झाली आहे. काँग्रेस सरकारने कामगारांसाठी विविध योजना आणल्या, सामाजिक सुरक्षा, निवृत्ती वेतन, विमा यासह आवश्यक त्या सर्व सुविधा दिल्या पण २०१४ पासून हे चित्र बदलले आहे. कामगारांचे हक्क आता त्यांना मिळत नाहीत. बदलत्या परिस्थितीनुसार बदलले पाहिजे. सोशल मीडियाचा वापर जास्तीत जास्त केला पाहिजे. आपले मत सोशल मीडियाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवता येते.

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष व कामगार नेते भाई जगताप यावेळी म्हणाले की, काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही नेहमीच कामगारांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिलो आहोत. कामगार शक्ती मोठी शक्ती असून असंघटीत क्षेत्रातील कामगारांची संख्या पाहता या क्षेत्रात काम करण्यास मोठा वाव आहे. कामगारांपर्यंत जा, त्यांच्या समस्या जाणून घ्या व त्या सोडवण्याचा प्रयत्न करा. केंद्रातील मोदी सरकारच्या कामगार धोरणांमुळे कामगारांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे, कामगारांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे, हे कामगार क्षेत्रासाठी योग्य नाही. कामगार शक्ती एकत्र करा व संघर्ष करा काँग्रेस पक्ष आपल्या पाठीशी कायम उभा आहे असे भाई जगताप म्हणाले.

१५ लाख ७७ हजार विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा

पुणे : शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेस गुरूवार दि.२ मार्च पासून सुरूवात हाेणार आहे. यंदा राज्यातील नउ विभागीय मंडळातील ५ हजार ३३ केंद्रावर १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. दि. २ ते २५ मार्च या कालावधीत परीक्षा पार पडणार आहेत. यंदा बारावीसाेबतच दहावीच्या विद्यार्थ्यांनाही परीक्षेच्या निर्धारित वेळेपेक्षा दहा मिनिटे जास्त दिले जाणार आहेत अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गाेसावी यांनी दिली.

राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, काेल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि काेकण या नउ विभागीय मंडळातील २० हजार १० शाळांमधील १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नाेंदणी केली आहे. परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी सकाळच्या सत्रात साडेदहा आणि दुपारच्या सत्रात अडीच वाजता किमान अर्धा तास अगाेदर परीक्षा केंद्रावर पाेहाेचावे. विद्यार्थ्यांना निर्धारित वेळेवर सकाळी ११ आणि दुपारी ३ वाजता प्रश्नपत्रिकेचे वितरण करण्यात येणार आहे.

विभागीय स्तरावर भरारी पथके

परीक्षेच्या कालावधीत काॅपीला आळा घालण्यासाठी मंडळामार्फत राज्यरात २७१ भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. यासाेबतच प्रत्येक जिल्ह्यांत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती कार्यरत आहेत. विभागीय मंडळानेही विशेष भरारी पथकांची स्थापना केली आहे.

पुणे मंडळात २ लाख ६८ हजार विद्यार्थी

मुंबई विभागीय मंडळातून सर्वाधिक ३ लाख ५२ हजार ४८० तर पुणे मंडळातून २ लाख ६८ हजार २०० विद्यार्थी ६३५ केंद्रांवर परीक्षा देणार आहेत. औरंगाबाद : १ लाख ८० हजार ५३८, नागपूर : १ लाख ५३ हजार ५१९, काेल्हापूर : १ लाख ३० हजार ६५३, अमरावती : १ लाख ६० हजार ३७०, नाशिक : १ लाख ९७ हजार २०६, लातूर : १ लाख ५ हजार ८३४ आणि काेकण : २८ हजार ४५६ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

परीक्षार्थी विद्यार्थी संख्या तक्ता

मुले : ८ लाख ४४ हजार ११६
मुली : ७ लाख ३३ हजार ०६७

एनडीएतील टेंडर मिळवून देण्याच्या अमिषाने 28 लाख रुपयांचा गंडा

पुणे-खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबाेधिनी (एनडीए) मध्ये कायमस्वरुपी नाेकरी लावून देताे तसेच एनडीएतील इलेक्ट्रीक वर्क टेंडर मिळवून देण्याच्या अमिषाने एका इसमाला भामटयांनी 28 लाख रुपयांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी दाेन आराेपींवर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा सिंहगड राेड पाेलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पाेलिसांनी बुधवारी दिली आहे.

प्रसाद गाेविंद वझे (रा.काेंढवे धावडे, उत्तमनगर,पुणे) व परमेश्वर अंकुश शिंदे (रा.सिंहगड राेड,पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आराेपींची नावे आहे. याबाबत सिंहगड राेड पाेलिस ठाण्यात विजय याेगीराज साखरे (वय 42,रा.नऱ्हे,पुणे) यांनी फिर्याद दाखल केली आहे. हा प्रकार मे 2022 ते 15 ऑक्टोबर 2022 यादरम्यान घडलेला आहे.

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार विजय साखरे यांचे ओळखीचे आराेपी प्रसाद वझे व परमेश्वर शिंदे यांनी आपसात संगनमत करुन तक्रारदार यांचे पत्नी व त्यांचे नातेवाईक यांनी एनडीए मध्ये कायमस्वरुपी नाेकरी लावून देताे असे अमिष दाखवले. तसेच एनडीए मधील इलेक्ट्रीक वर्क टेंडर मिळवून देताे असे सांगुन तक्रारदार यांचेकडून ऑनलाइन व राेख स्वरुपात वेळाेवेळी एकूण 28 लाख रुपये घेण्यात आले.

परंतु त्यांचे पत्नी किंवा नातेवाईकांना नाेकरीस न लावता किंवा इलेक्ट्रीक टेंडरची ऑर्डर मिळवून न देता आणि दिलेले पैसे परत न करता आर्थिक फसवणुक करण्यात आली आहे. याबाबत पुढील तपास सहाय्यक पाेलिस निरीक्षक व्ही. जाधव करत आहे.

पिस्तूल बाळगणारा सराईत आरोपी पकडला

पुणे-

नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी पिस्तूल बाळगणार्‍या एका सराईत आरोपीला लोणीकंद पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून पिस्तूल आणि दोन काडतुसे असा 34 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशाल ऊर्फ इशाप्पा जगन्नाथ पंदी (वय- 21 रा. माऊली पार्क, बकोरी रोड, पुणे) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.

लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिस पेट्रोलिंग करीत असताना एक सराईत आरोपी पिस्तूल घेउन बकोरी रस्ता परिसरात थांबल्याची माहिती पोलिस नाईक स्वप्निल जाधव यांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, तपास पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक गजानन जाधव यांच्या पथकाने सराईत गुन्हेगार विशाल पंदी यास ताब्यात घेतले.

त्याच्याकडे अंगझडतीत पिस्तूल आणि दोन काडतुसे मिळून आली. ही कामगिरी अपर आयुक्त रंजन शर्मा, उपायुक्त शशिकांत बोराटे, एसीपी किशोर जाधव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन पवार, पोलिस निरीक्षक मारुती पाटील एपीआय गजानन जाधव, बाळासाहेब सकाटे, स्वप्निल जाधव, विनायक साळवे, कैलास साळुंके, अजित फरांदे, सागर जगताप, अमोल ढोणे, आशिष लोहार, मल्हारी सपुरे, सचिन चव्हाण यांनी केली आहे.

हमी भाव द्या, शेतकऱ्याला वाचवा: आम आदमी पार्टीची मागणी

शेतकऱ्याच्या दुप्पट उत्पन्नाची घोषणा ही चेष्टाच होती: आप

पुणे- काही दिवस कांद्याला भाव नसल्यामुळे तो विषय ऐरणीवर आलेला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्याची स्थिती अत्यंत विदारक झालेली आहे. जागतिक बाजारपेठेत कांद्याची टंचाई असताना देशात मात्र कांद्याला भाव मिळत नाही. शेजारच्या देशामधील आर्थिक संकटामुळे निर्यात मर्यादित होत आहे. शेतकऱ्याला हाताशी किलोमागे एक दोन रुपये मिळत आहेत. सरकारच्या उदासीन आणि शेतकरी विरोधी धोरणाचा आम आदमी पार्टीतर्फे आज विधान भवन पुणे येथे निषेध करण्यात आला. तसेच विभागीय आयुक्त व इतर अधिकाऱ्यांना निवेदनासोबत कांदा भेट दिला.

शेतकऱ्याला कांदा असो अथवा वांगी असो भाव मिळत नसल्यामुळे शेतात नांगर फिरवणे, उत्पादन टाकून देणे याशिवाय पर्याय नाही. सरकारच्या एकूणच शेतकरी विरोधी धोरणाचा हा परिणाम आहे. आणि त्यामुळेच २०२२ मध्ये शेतकऱ्याला उत्पन्न दुप्पट होईल असे सांगणाऱ्या भाजप सरकारचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करीत असल्याचे आप जिल्हा अध्यक्ष मुकुंद किर्दत यांनी सांगितले.

देशांतर्गत महागाई आणि भाव हे योग्य पातळी राहावेत अशा पद्धतीने निर्यात धोरण राबवायला हवे. परंतु सरकार मुख्यत्वे दलाल धार्जिणे धोरण राबवत असल्यामुळे व्यापाऱ्याच्या सोयीचे धोरण अमलात येते आणि यात शेतकरी या कोलमडून पडतो. असे या वेळेस पुरंदर तालुका अध्यक्ष दत्तात्रय कड यांनी सांगितले.

जानेवारीच्या सुरुवातीला कांद्याला तेराशे पन्नास रुपये क्विंटल हा भाव मिळाला होता परंतु फेब्रुवारी अखेरीस हा भाव 500 रुपये वर आला आहे. त्यामुळे त्याचा उत्पादन खर्च ही निघत नाही . हीच स्थिती वांग्या विषयी सुद्धा आहे. त्यामुळे या पिकाला हमीभाव देणे गरजेचे आहे असे आप चाकण संयोजक संदीप शिंदे यांनी सांगीतले.
शेतकऱ्यांपेक्षा वरचढ असलेली दलालांची साखळी बाजारपेठेतील वाहतूक ,साठवणूक व्यवस्था तसेच इतर पायाभूत सुविधांचा अभाव आणि या कृषी उत्पादनांचे नियोजन,नेमका अंदाज घेण्यासाठी ठरणारी यंत्रणा तसेच निर्यात धोरणाचा गैरवापर, शेतकऱ्यांचे अज्ञान या सगळ्यामुळे शेती हा व्यवसाय आतबट्ट्याचा ठरत आहे. असे आम आदमी पार्टीने पंतप्रधान यांचेसाठी विभागीय आयुक्तांकडे दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे.

या वेळेसच्या आंदोलनात आपचे जिल्हा अध्यक्ष मुकुंद किर्दत, पुरंदर तालुका अध्यक्ष दत्तात्रय कड , चाकण संयोजक संदिप शिंदे, दौंड तालुका अध्यक्ष रवींद्र जाधव, संदीप चोंडकर,शहाजी कोलते, निर्मल साबळे, अभिजित वाघमारे, साहिल जवळेकर, शिवाजीनगर आप अध्यक्ष सतिश यादव, जिल्हा सचिव अक्षय शिंदे, आकाश चव्हाण, मुनेश चव्हाण, तन्मय जाधव, आदित्य जाधव, रूद्र ठाकर आदी उपस्थित होते.

मतमोजणीच्या होणार २० फेऱ्या….

कसबापेठ विधानसभा मतदार संघ पोटनिवडणूकीच्या मतमोजणीची तयारी पूर्ण

पुणे, दि. १: कसबा पेठ विधानसभा मतदार संघाच्या मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली असून आज निवडणूक निरीक्षक नीरज सेमवाल तसेच निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा किसवे- देवकाते यांच्या उपस्थितीत मतमोजणीसाठी नेमलेल्या अधिकारी- कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.

भारतीय खाद्य निगम (एफसीआय) गोदाम, कोरेगाव पार्क येथील मतमोजणी केंद्रात झालेल्या या प्रशिक्षणावेळी उपजिल्हाधिकारी सिद्धार्थ भंडारे, संजय तेली, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राधिका हावळ- बारटक्के आदी उपस्थित होते.

श्रीमती किसवे- देवकाते आणि श्री. भंडारे यांनी आज प्रशिक्षणादरम्यान मतमोजणी कर्मचाऱ्यांना मतमोजणी करताना घ्यायची काळजी, भरायचे विविध नमुने (फॉर्म) आदीबाबत सूचना दिल्या. इव्हीएम वरील उमेदवारनिहाय मतांची मोजणी व नोंद, फॉर्म भरणे, निवडणूक आयोगाच्या एन्कॉर ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये माहिती भरणे, मतमोजणीनंतर पुन्हा इव्हीएम सीलिंग करणे, साहित्य पुरवठा याबाबत प्रशिक्षण दिले. मतमोजणी प्रक्रियेदरम्यान भारत निवडणूक आयोगाच्या सर्व निर्देशांचे काटेकोर पालन करावे, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.

मतमोजणीच्या २० फेऱ्या
मतमोजणी २ मार्च रोजी सकाळी आठ वाजता भारतीय खाद्य निगम (एफसीआय) गोदाम, कोरेगाव पार्क पुणे येथे सुरू होणार आहे. त्यासाठी मतमोजणीच्या २० फेऱ्या होणार आहे. ईव्हीएम मतमोजणीसाठी १४ टेबल तर टपाली मतपत्रिकांसाठी आणि सर्व्हिस वोटर्ससाठीच्या इटीपीबीएससाठी (इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीम) प्रत्येकी एक टेबल ठेवण्यात आला आहे. सर्वप्रथम टपाली आणि ईटीपीबीएसची मोजणी होईल. त्यानंतर ईव्हीएम मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणीसाठी प्रत्येक टेबलवर १ मतमोजणी पर्यवेक्षक, १ मतमोजणी सहायक आणि १ सूक्ष्म निरीक्षक असे एकूण सुमारे ५० अधिकारी- कर्मचारी नेमण्यात आले आहेत.

मतमोजणीच्या प्रत्येक फेरीनंतर उमेदवार निहाय मतांची उद्घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी ध्वनीक्षेपकाद्वारे करतील. सर्व फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर यादृच्छिक (रँडम) पद्धतीने ५ व्हीव्हीपॅट मशीनमधील स्लिपची मोजणी केली जाणार आहे. कंट्रोल युनिट वरील मतांची संख्या आणि व्हीव्हीपॅट स्लिप्स ची पडताळणी केली जाणार आहे.

मतमोजणी केंद्रावर माध्यम कक्ष, पोलीस समन्वय कक्ष, निवडणूक उमेदवार व प्रतिनिधी यांच्यासाठी कक्ष याबाबतची व्यवस्था करण्यात आली आहे. वाहनतळ व्यवस्था गाडगे महाराज विद्यालय कोरेगाव पार्क या ठिकाणी असलेल्या मैदानावरील मोकळ्या जागेत असणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती किसवे- देवकाते यांनी दिली.

मतमोजणीच्या होणार ३७ फेऱ्या….

चिंचवड विधानसभा मतदार संघ पोटनिवडणूकीच्या मतमोजणीची तयारी पूर्ण

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून मतमोजणी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

पुणे, दि. १: चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली असून मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या पर्यवेक्षक, सहायक आणि सूक्ष्म निरीक्षकांना आज निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी मतमोजणी विषयक प्रशिक्षण दिले.

निवडणूक निरिक्षक एस. सत्यनारायण यांच्या उपस्थितीत थेरगाव येथील शंकर आण्णा गावडे कामगार भवन येथे झालेल्या या प्रशिक्षणावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अजित पाटील, शिरीष पोरेडी, शितल वाकडे आदी उपस्थित होते.

मतमोजणी प्रक्रियेच्या अनुषंगाने कर्तव्ये, जबाबदाऱ्या आणि आवश्यक कामकाज याबद्दल या प्रशिक्षणामध्ये सविस्तर माहिती आणि सूचना देण्यात आल्या.

टेबलनिहाय देण्यात आलेल्या कंट्रोल युनिट वरील मतमोजणी कशाप्रकारे करावी याबाबतचे तांत्रिक प्रशिक्षण तसेच मतमोजणी करताना विहित नमुन्यात माहिती भरण्याबाबत प्रशिक्षणात सविस्तर माहिती देण्यात आली. मतमोजणी कर्मचाऱ्यांनी मतमोजणी करताना घ्यायची काळजी, भरायचे विविध नमुने (फॉर्म) आदीबाबत सूचना दिल्या. इव्हीएम वरील उमेदवारनिहाय मतांची मोजणी व नोंद, फॉर्म भरणे, निवडणूक आयोगाच्या एन्कॉर ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये माहिती भरणे, मतमोजणीनंतर पुन्हा इव्हीएम सीलिंग करणे, साहित्य पुरवठा याबाबत प्रशिक्षण दिले. मतमोजणी प्रक्रियेदरम्यान भारत निवडणूक आयोगाच्या सर्व निर्देशांचे काटेकोर पालन करावे, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.

मतमोजणीच्या ३७ फेऱ्या
मतमोजणी उद्या गुरुवार २ मार्च रोजी सकाळी ८ वाजेपासून थेरगाव येथील शंकर आण्णा गावडे कामगार भवन येथे होणार असून मतमोजणीच्या एकूण ३७ फेऱ्या होणार आहेत. यासाठी प्रत्येकी १४ टेबल अधिक टपाली मतपत्रिकांसाठी १ टेबल असे एकूण १५ टेबल असणार आहेत. १८ पर्यवेक्षक, १८ सहायक आणि १८ सूक्ष्म निरीक्षकांची मतमोजणी कामकाजासाठी नेमणूक करण्यात आली आहे. मतमोजणी सुरू होण्यापूर्वी मतमोजणीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांची संगणकीय प्रणालीने सरमिसळ (रँडमायझेशन) करण्यात येणार आहे. त्यानुसार प्राप्त झालेल्या टेबलवरील कामकाज त्या कर्मचाऱ्यांना सोपवले जाणार आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या नियमानुसार तसेच मार्गदर्शक सूचनांप्रमाणे मतमोजणी प्रक्रिया होईल. टपाली मतपत्रिकांसाठी आणि सर्व्हिस वोटर्ससाठीच्या इटीपीबीएससाठी (इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीम) प्रत्येकी एक टेबल ठेवण्यात आला आहे. सुरुवातीला टपाली आणि ईटीपीबीएसची मतमोजणी होईल. मतमोजणी सुरू होण्याच्या निर्धारित वेळेपर्यंत प्राप्त टपाली मतदानाची मोजणी करण्यात येईल. त्यानंतर ईव्हीएम मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणीसाठी प्रत्येक टेबलवर १ मतमोजणी पर्यवेक्षक, १ मतमोजणी सहायक आणि १ सूक्ष्म निरीक्षक असे अधिकारी- कर्मचारी नेमण्यात आले आहेत.

मतमोजणीच्या प्रत्येक फेरीनंतर उमेदवार निहाय मतांची उद्घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी ध्वनीक्षेपकाद्वारे करतील. सर्व फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर यादृच्छिक (रँडम) पद्धतीने ५ व्हीव्हीपॅट मशीनमधील चिठ्ठ्यांची मोजणी केली जाणार असून कंट्रोल युनिट वरील मतांची संख्या आणि व्हीव्हीपॅट मधील चिठ्ठ्यांची पडताळणी केली जाणार आहे. मतमोजणी केंद्रावर माध्यम कक्ष, निवडणूक अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी थेरगाव येथील कामगारभवना शेजारील मोकळ्या जागेत वाहनतळ व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाकडून आठ महिन्यांत ३८ कोटी ६० लाखांची मदत

मुंबई, दि.१ : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने आठ महिन्यांत ४ हजार ८०० रुग्णांना एकूण ३८ कोटी ६० लाख रुपयांची मदत दिली आहे.

जुलै २०२२ मध्ये महिन्यात १९४ रुग्णांना ८३ लाखांची मदत देण्यात आली. ऑगस्ट महिन्यात २७६ रुग्णांना १ कोटी ४० लाख, सप्टेंबर महिन्यात ३३६ रुग्णांना १ कोटी ९३ लाख, ऑक्टोबर महिन्यात २५६ रुग्णांना २ कोटी २१ लाख, नोव्हेंबर महिन्यात ५२७ रुग्णांना ४ कोटी ५० लाख, डिसेंबर महिन्यात ८ कोटी ५२ लाख, जानेवारी २०२३ मध्ये ८ कोटी ८९ लाख तर फेब्रुवारी २०२३ मध्ये विक्रमी १० कोटी २७ लाख रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्री कक्षाकडून देण्यात आली.

राज्यातील सर्वसामान्य – गोरगरीब गरजू रुग्ण पैशाअभावी उपचाराविना राहणार नाही याची काळजी घ्या, असा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे, त्यानुसार रुग्णांना दिलासा देण्यासाठी कक्षाच्या माध्यमातून प्रयत्न होत असल्याचे कक्षप्रमुख मंगेश नरसिंह चिवटे यांनी सांगितले.

‘मल्टी मीडिया अँड साऊंड शो’ च्या माध्यमातून इतिहासाची माहिती नव्या पिढीला होईल : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : ‘मल्टी मीडिया अँड साऊंड शो’ च्या माध्यमातून नव्या पिढीला आपल्या इतिहासाची माहिती मिळेल. २८ फेब्रुवारी १९४८ रोजी ब्रिटीश सैन्याची शेवटची तुकडी भारत सोडून येथून गेली. गेट वे ऑफ इंडियाचा इतिहास नव्या पिढीला समजला पाहिजे यासाठी असे कार्यक्रम होणे गरजेचे आहे, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

गेट वे ऑफ इंडिया येथे महाराष्ट्र शासनाचा पर्यटन विभाग आणि इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड, केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय केंद्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मल्टी मीडिया अँड साऊंड शो’ चा उद्घाटन कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री (पेट्रोलियम व नैसर्गिक वायू) हरदीप सिंह पुरी यांनी लाईट अँड साऊड शो शुभारंभ प्रंसगी व्हिडीओ संदेश द्वारे शुभेच्छा दिल्या.

पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा, मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, इंडियन ऑईलचे अध्यक्ष श्रीकांत माधव वैद्य, निदेशक (विपणन) इंडियन ऑइल व्ही. सतीश कुमार, पर्यटन संचालनालयचे संचालक, डॉ. बी. एन. पाटील यावेळी उपस्थित होते. भारतीय नौदलाच्या वाद्य वृंदावन राष्ट्रगीत, राज्य गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. आज ब्रिटीश सैन्याची शेवटची तुकडी भारत सोडून गेली. ‘गेट वे ऑफ इंडिया’ चा इतिहास नव्या पिढीला समजला पाहिजे यासाठी असे कार्यक्रम होणे गरजेचे आहे हे लक्षात घेऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीकोनातून देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना देशभरात अनेक कार्यक्रम साजरे केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून गेट वे ऑफ इंडिया येथे ‘मल्टी मीडिया अँड साऊंड शो’ सुरु करण्यात येत आहे. ब्रिटीश सैन्याच्या भारतातून शेवटच्या प्रस्थानाला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ आजपासून मीडिया अँड साऊंड शो’ आयोजित केला आहे याचा मुंबईतील नागरिक लाभ घेतील.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, गेट वे ऑफ इंडिया मुंबईतील एक महत्त्वाचे ठिकाण आहे. इंडियन ऑईल कंपनीने हा शो आयोजित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून इतिहासाची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचेल. पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा आणि पर्यटन विभागाचे खूप खूप अभिनंदन करतो त्यांनी कमी वेळात हे काम पूर्ण केले आहे. मुंबईमध्ये येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला हा लेझर शो उत्कंठावर्धक वाटला पाहिजे यासाठी विभागाने प्रयत्न करावा. मल्टीमीडिया लाईट अँड साऊंड शो मध्ये नाविन्यपूर्णता राहील याची पर्यटन विभागाने खबरदारी घ्यावी.

मल्टी मीडिया अँड साऊंड शो‘ इंडियन ऑईलमार्फत सुरू होत आहे ही अभिमानाची गोष्ट : केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी म्हणाले, दिनांक २८ फेब्रुवारी, १९४८ रोजी ब्रिटीश सैन्याची शेवटची तुकडी (The Somerset Light Infantry) भारत भूमी सोडून गेली. या घटनेला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने आज दिनांक २८ फेब्रुवारी, २०२३ रोजी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. मुंबई शहराची जगात एक आंतरराष्ट्रीय शहर म्हणून ओळख आहे. संपूर्ण जगभरातील पर्यटक शहराला वर्षभर भेटी देत असतात. गेट वे ऑफ इंडियाच्या वैभवात भर टाकण्यासाठी पर्यटन विभाग महाराष्ट्र शासन आणि इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड, केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय केंद्र शासन यांच्या समवेत झालेल्या सामंजस्य करारानुसार ‘मल्टी मीडिया अँड साऊंड शो’ इंडियन ऑईलमार्फत पुढील पाच वर्षे सुरू राहणार आहे. ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

आता गेटवे ऑफ इंडिया इंग्रज भारतातून परत गेले या घटनेने ओळखले जाईल : पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा

पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले, गेटवे ऑफ इंडियातून इंग्रज भारतात आले होते असा इतिहास आपण ऐकलेला आहे पण आजच्या मल्टीमीडिया अँड साऊंड शो कार्यक्रमामुळे भारतातून शेवटचे इंग्रज बटालियन परत गेले हे सर्व भारतीयांना कळेल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही मूळ संकल्पना आहे. आज हा कार्यक्रम सुरू करताना मला खूप आनंद होत आहे. इंडियन ऑईलचे याबद्दल मी खूप आभार मानतो. आज पासून दर शनिवारी आणि रविवारी हा शो सुरु राहणार असून यापुढे तो नियमितपणे दररोज सुरू ठेवण्यात येईल, असेही पर्यटन मंत्री श्री.लोढा म्हणाले.

इंडियन ऑल देशातील प्रत्येक माणसाशी जोडलेली आहे : श्रीकांत माधव वैद्य

इंडियन ऑईलचे अध्यक्ष श्रीकांत माधव वैद्य म्हणाले, इंडियन ऑइल देशातील प्रत्येक माणसाशी जोडली गेलेली आहे. व्यापाराच्या पुढे जाऊन पर्यावरण संवर्धनासाठी इंडियन ऑईल काम करत आहे. देशाच्या अमृत महोत्सवी वर्षांमध्ये इंडियन ऑईल मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे मल्टीमीडिया अँड साऊंड शो च्या माध्यमातून जोडली गेली ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. येथे आयोजित केलेले शो प्रगतीशील भारत या थीमवरती आहेत. स्वातंत्र्य चळवळीतील महाराष्ट्राचे महत्त्व यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. हा शो मराठी हिंदी आणि इंग्रजी या भाषेत असून हेडसेट घातल्यानंतर जापनीज, जर्मन, फ्रेंच, रशियन या भाषेतून देखील ऐकता येणार आहे.

राज्य सेवा (मुख्य) परीक्षेच्या मुलाखतीनंतर दोन तासात गुणवत्ता यादी जाहीर

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा, २०२१ या परीक्षेतून अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती दिनांक २७ डिसेंबर २०२२ ते दि. २८ फेब्रुवारी, २०२३ या कालावधीत घेण्यात आल्या.

या मुलाखती पार पडल्यानंतर आज लगेच २ तासांच्या आत उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.