पुणे- अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च पर्वती पुणे महाविद्यालच्या प्रथमवर्ष अभियांत्रिकी विभाग व अंतर्गत गुणवत्ता कक्ष यांचे संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्त ‘अंडरस्टॅन्डींग द युनिव्हर्स वुईथ सायंटिफिक टेम्पर’ या विषयावर ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.या व्याख्यानाची सुरवात संतोष टाकले शासत्रज्ञ भाभा ॲटोमीक रिसर्च सेंटर मुंबई,प्राचार्य डॉ.सुनिल ठाकरे, प्रा.गणेश कोंढाळकर, डॉ. बालाजी सेलूकर,डॉ.गायत्री कांबळे, प्रा.रमा गायकवाड यांचे उपस्थितीत झाली. या प्रसंगी मार्गदर्शन करताना संतोष टाकले यांनी भौतिकशास्त्रज्ञनोबेल पुरस्कार विजेते चंद्रशेखर वेंकट रामन यांचे ‘रमन परिणाम’ व त्यांचे कार्य याविषयी मार्गदर्शन केले. भारतीयांचे गणित व खगोलशास्त्र याचे असणारे ज्ञानाचे दाखले देऊन प्राचीन भारतीय वैज्ञानिक शोध,सूर्यमंडळ, क्रांती, उत्क्रांती, जीवसृष्टीची निर्मिती,रॉकेट विज्ञान,विविध रायानिक अभियाक्रिया या विषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी अंधश्रद्धा डोळसपणे खोडून वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगावा आसे आवाहन या प्रसंगी केले. सदर व्याख्यानासाठी संतोष टाकले, डॉ.सुनिल ठाकरे, डॉ. बालाजी सेलूकर,डॉ.गायत्री कांबळे, प्रा.गणेश कोंढाळकर, प्रा.रमा गायकवाड, प्राध्यापक व विद्यार्थि बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यशाळेचे नियोजन प्राचार्य डॉ.सुनिल ठाकरे यांचे मार्गदर्शनाखाली समन्वयक डॉ. बालाजी सेलूकर,डॉ.गायत्री कांबळे यांनी केले. महाविद्यालयाने सदर व्याख्यान आयोजित केल्याबद्दल अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या सरचिटणीस म.सौ.प्रमिला गायकवाड यांनी सर्वांचे अभिनंदन केले.