Home Blog Page 1383

पीएमपी बस मधून विनातिकीट ३०० नाही आता ५०० दंड

दिनांक १० मार्च २०२३ पासून होणार कार्यवाही संचालक मंडळाची मान्यता

पुणे- पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बस मधून विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून मोटार वाहन कायदा
१९८८ मधील कलम क्रमांक १७८ अन्वये दंडात्मक कारवाई करण्याच्या तरतुदीस अनुसरून रक्कम रु. ३००/- दंड वसूल
करण्यात येतो. तसेच प्रवाशांनी कोणत्याही प्रकारच्या सवलतीच्या प्रवासी पासमध्ये खाडाखोड, दुरुपयोग अशा प्रकारे
गैरप्रकारे जे प्रवासी पासचा गैरवापर करून प्रवास करताना आढळल्यास त्या प्रवाशांकडून रक्कम रु. ५००/- दंड वसूल
करण्यात येतो.
दिनांक १०/०३/२०२३ पासून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर आळा व महामंडळाचे आर्थिक नुकसान होऊ
नये याकरिता मोटार वाहन कायदा १९८८ मधील कलम क्रमांक १७८ अन्वये विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रक्कम
रु. ३००/- ऐवजी रक्कम रु.५००/- इतका दंड आकारणी करण्यास संचालक मंडळाने दिनांक १६/०२/२०२३ रोजीमान्यता दिली असून विनातिकीट प्रवासी रक्कम रु.५००/- दंड आकारणी दिनांक १०/०३/२०२३ पासून करण्यात येणार आहे.

प्रत्येक महिन्याच्या ८ तारखेस पीएमपीएमएलच्या ‘तेजस्विनी’ बसमधून महिलांना मोफत बस प्रवास पूर्ववत..

पुणे-
जागतिक महिला दिनानिमित्ताने महिलांना मोफत प्रवास देण्याच्या मागणीच्या अनुषंगाने दि. ०६/०३/२०१९
रोजी संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये दर महिन्याच्या ८ तारखेस महिलांना तेजस्विनी बसमध्ये मोफत बस प्रवास करू
देण्यास मान्यता दिलेली आहे. त्या अनुषंगाने परिवहन महामंडळामार्फत खास महिलांसाठी २३ मार्गावर २८ तेजस्विनी बसेस
सुरू करण्यात आल्या होत्या तथापि, कोविड – १९ मुळे महिला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद असल्याने सदरच्या बसेस बंद
करण्यात आल्या होत्या.
सध्या कोविड-१९ चा प्रादुर्भाव कमी झाल्याने व सर्व मार्गावर पूर्ण क्षमतेने बस संचलन सुरू करण्यात आल्याने
महिला तेजस्विनी बसेस पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आलेल्या आहेत. सध्या प्रत्येक महिन्याच्या ८ तारखेस ‘तेजस्विनी’ बस
मधून मोफत प्रवास सेवा हि दि. ८ मार्च २०२३ पासून पूर्ववत करण्यात येत आहे. जागतिक महिला दिनानिमित्त तेजस्विनी
बसेस मधून महिलांनी मोफत प्रवास करण्याचे आवाहन पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून करण्यात येत आहे.

लाॅजवर छापा:बांगलादेशी तरुणीसह चौघींची सुटका ; दलालाला पकडले

पुणे-अहमदनगर रस्त्यावरील वाघोली परिसरात एका लाॅजमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी बांगलादेशी तरुणीसह चौघींना ताब्यात घेतले. याप्रकरणी लाॅज व्यवस्थापकासह दलालांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी लिंबाजी सखाराम वाघमारे (२९, रा. आळंदी फाटा, लाेणीकंद, पुणे), प्रवीण शेखर पुजारी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. वाघमारेला अटक केली आहे. पोलिस हवालदार मनीषा पुकाळे यांनी याबाबत लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. नगर रस्त्यावरील वाघोली परिसरात जय भवानी लाॅज येथे वेश्याव्यवसाय करण्यात येत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने सदर ठिकाणी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी एका बांगलादेशी तरुणीसह चौघींना ताब्यात घेतले. याप्रकरणी चौकशी सुरू आहे.

मुंबईतील ओशियन हाईटस मध्ये फ्लॅट देतो सांगून अडीच कोटीची फसवणूक:कोथरूड पोलिसात गुन्हा दाखल

पुणे-मुंबई येथील ओशियन हाईटस या बांधकाम प्रकल्पात अलिशान घर कमी पैशात देताे असे म्हणून विश्वास संपादन करुन पुण्यातील एका कुटुंबाची अडीच काेटी रुपयांची फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अमरजित जितेंद्र शुक्ला (वय-38,रा.जाेगेश्वरी, मुंबई) या आराेपीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत काेथरुड पोलिस ठाण्यात मंगल नागनाथ परकाळे (वय-45,रा.काेथरुड,पुणे) यांनी तक्रार दाखल केली आहे. सदरचा प्रकार 13/9/2022 ते 2/3/2023 यादरम्यान घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आराेपी अमरजित शुक्ला याने तक्रारदार मंगल परकाळे यांना मुंबईतील ओशियन हाईटस नावाचे प्राेजेक्ट मधील फ्लॅट कमी पैशात देताे असे सांगितले हाेते. त्याप्रकारे त्याने विश्वास संपादित करत फ्लॅट मध्ये दाेन काेटी 55 लाख रुपये गुंतविण्यास सांगितले असता तक्रारदार यांनी पैसे गुंतवले. परंतु आराेपीच्या ओशियन हाईटस येथील फ्लॅटवर दुसऱ्या बँकेचे कर्ज असल्याचे तक्रारदार यांचे लक्षात आले.

त्यामुळे त्यांनी आराेपीस पैसे परत करण्यास सांगितले. मात्र, आराेपीने पैसे परत न करता त्याची 40 लाख रुपये किंमतीची रेंन्ज राेवर गाडी (एमएच 02 ईएक्स 0123 ही शंभर रुपयांचे स्टॅम्प पेपरवर करारनामा करुन देण्याचे सांगितले. त्याकरिता टी.टी.फाॅर्मवर सहया देवून डिसेंबर 2022 मध्ये पुणे आरटीओ येथे तक्रारदार यांचे नावे रजिस्ट्रेशन झाले नाही. त्यामुळे तक्रारदार यांचे पती नागनाथ परकाळे यांनी आराेपीस गाडी ताब्यात देण्याबाबत विचारणा केली असता, त्यांना आराेपीने ‘गाडी मी तुला देत नाही, तुला काय करायचे आहे ते कर’ असे सांगुन तक्रारदार यांचे नावे मालकी हक्क रजिस्ट्रेशन झालेली गाडी त्यांना देण्यास नकार न देता फसवणुक करण्यात आली आहे. याबाबत पुढील तपास काेथरुड पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक एस माळी करत आहे.

पतसंस्थांमधील गैरव्यवहार रोखण्यासाठी सहकार तज्ज्ञांची समिती स्थापन करणार –सहकार मंत्री अतुल सावे

            मुंबई, दि. 3 :गेल्या काही दिवसांपासून पतसंस्थांमधील गैरव्यवहार आणि ठेवीदारांच्या ठेवी मिळण्यास येत असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी राज्य शासनामार्फत पावले उचलण्यात येत आहेत. या अडचणी प्राधान्याने सोडविण्यासाठी सहकार क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश असणारी नवीन समिती येत्या १५ दिवसांत स्थापन करण्यात येईल, असे सहकार मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत सांगितले.

            विधानसभा सदस्य बाळासाहेब थोरात, प्रकाश आबिटकर यांनी महाराष्ट्र विधानसभा नियम 105 अन्वये लक्षवेधी सूचनेद्वारे राज्यातील पतसंस्थांमध्ये झालेले गैरव्यवहार आणि अन्य कारणांमुळे ठेवीदारांच्या ठेवी मिळण्यास येणाऱ्या अडचणी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.

            सहकार मंत्री श्री. सावे म्हणाले की, राज्यातील पतसंस्थांसाठी असणाऱ्या विविध मानकांचे नियमितपणे देखरेख करण्यासाठी वार्षिक आणि मासिक माहिती व्यवस्थापन प्रणाली सहकार आयुक्तांच्या 23 ऑगस्ट 2022 रोजीच्या परिपत्रकानुसार लागू केली आहे. याशिवाय महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमातील तरतूदींनुसार स्थिरीकरण व तरलता निधी 11 सप्टेंबर 2019 रोजीच्या अधिसूचनेन्वये स्थापन करण्यात आला आहे. या निधीसाठी नियामक मंडळाने ठरविलेल्या दराने व पध्दतीने पतसंस्थांनी अंशदान द्यावयाचे आहे. सद्यस्थितीत हा दर 10 पैसे प्रति 100 रुपये ठेव असा आहे. नियामक मंडळाने 50 हजार रुपयांपर्यंतच्या ठेवींना संरक्षण देण्याबाबतची योजना प्रस्तावित केली असून सदर योजनेबाबत राज्यातील सर्व पतसंस्था, फेडरेशनचे प्रतिनिधी यांच्यासोबत बैठक घेऊन त्यांनी केलेल्या सूचना, हरकती विचारात घेऊन योजनेस अंतिम स्वरुप देण्याबाबत नियामक मंडळाच्या स्तरावर कार्यवाही सुरु आहे.

गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्याबाबतची प्रक्रिया दोन महिन्यांत पूर्ण करणार– क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन

          राज्यातील अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्याबाबतची प्रक्रिया येत्या देान महिन्यांत पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन यांनी विधानसभेत दिली.

            विधानसभा सदस्य छगन भुजबळ, जयंत पाटील यांनी महाराष्ट्र विधानसभा नियम 105 अन्वये लक्षवेधी सूचनेद्वारे नाशिक जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय खेळाडू कविता राऊत, रोईंगपटू दत्तू भोकनळ आणि आंतरराष्ट्रीय धावपटू अंजना ठमके यांना शासन सेवेत थेट नियुक्ती देण्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.

            क्रीडा व युवक कल्याण मंत्री श्री. महाजन म्हणाले की, सन 2018 मध्ये अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासन सेवेत नियुक्ती देण्याबाबतचे सुधारित धोरण तयार करण्यात आले आहे. या धोरणाचा आढावा घेण्यासाठी शासनामार्फत समिती नेमण्यात आली असून या समितीचा लवकरच अहवाल प्राप्त होईल. या अहवालाचा अभ्यास करुन सुधारित क्रीडा धोरणानुसार गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्याबाबतची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. या नियुक्ती प्रक्रियेला गती देऊन ही प्रक्रिया येत्या दोन महिन्यांत पूर्ण करण्यात येईल.

            अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्याबाबतची कार्यपध्दती निश्चित करण्यात आली आहे. तसेच राज्य शासनाच्या गट अ ते गट ड मधील पदांवर  थेट नियुक्तीसाठी क्रीडा अर्हताही निश्चित करण्यात आल्या आहेत. याशिवाय दिव्यांग खेळाडूंचीही गट अ ते गट ड मधील पदांवरील क्रीडा प्राविण्य अर्हता निश्चित करण्यात आली असून या निकषाधारे आतापर्यंत 67 खेळाडूंना शासन सेवेत थेट नियुक्ती देण्यात आली आहे.

            याशिवाय गुणवत्ताधारक खेळाडूंच्या सेवा घेऊन गुणवत्तापूर्ण खेळाडू घडविण्याच्या दृष्टीने खेळाडूंच्या थेट नियुक्तीच्या धोरणात सुधारणा करण्यात येत आहे, असेही मंत्री श्री.महाजन यांनी स्पष्ट केले.

संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनांतील कौटुंबिक उत्पन्न मर्यादा वाढविण्याबाबत राज्य शासन सकारात्मक– मंत्री संजय राठोड

            संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थींसाठी वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा वाढविण्याबाबत राज्य शासनाकडून सकारात्मक विचार करण्यात येईल, असे मंत्री संजय राठोड यांनी आज विधानसभेत सांगितले.

             विधानसभा सदस्य  ऋतुराज पाटील, डॉ. राहुल पाटील, हसन मुश्रीफ, पृथ्वीराज चव्हाण, रोहित पवार यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे राज्यातील निराधार, अपंग आदींच्या पुनर्वसनासाठी राज्य शासनाने केलेल्या योजना याबाबतच्या उपाययोजनांबाबत प्रश्न उपस्थित केला होता.

            मंत्री श्री. राठोड म्हणाले की,  विशेष सहाय्य योजनेकरिता असलेले निकष, अटी व अर्थसहाय्याची रक्कम याकरिता सर्व योजनेतील पात्र लाभार्थींना अर्थसहाय्याची रक्कम अदा करण्यासाठी सन 2022-23 या आर्थिक वर्षात आतापर्यंत 3 हजार 558 कोटी रुपये इतका प्रत्यक्ष खर्च झाला आहे. लाभार्थींना फेब्रुवारी व मार्च 2023 या महिन्यांचे लाभार्थींना अर्थसहाय्य वितरण करण्याची कार्यवाही सुरु आहे.ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा केंद्र शासनाप्रमाणे 65 वरुन 60 करणे, कौटुंबिक उत्पन्न मर्यादा वाढविणे, तसेच अनुदान वितरित करण्याबाबतचे निकष बदलणे, अर्थसहाय्यात वाढ करणे याबाबी अभ्यासण्यासाठी एक समिती तयार करण्यात येईल, असेही मंत्री श्री.राठोड यांनी सांगितले.

लिक्विड ओरल उत्पादक कंपन्यांच्या तपासणीसाठी विशेष मोहीम राबवावी– विधानसभा तालिका अध्यक्ष संजय शिरसाट

            राज्यात लिक्विड ओरल उत्पादन करणाऱ्या सर्व कंपनीच्या तपासणीसाठी विशेष मोहीम राबवावी, असे आदेश विधानसभा तालिका अध्यक्ष संजय शिरसाट यांनी विधानसभेत दिले. औषधांची गुणवत्ता तपासण्याला अन्न व औषध प्रशासनामार्फत प्राधान्य देण्यात यावे, अशा सूचनाही श्री. शिरसाट यांनी यावेळी दिल्या.

            विधानसभा सदस्य ॲड.आशिष शेलार, योगेश सागर, अजित पवार, जयकुमार रावल यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे देशातून निर्यात झालेल्या सदोष कफ सिरपमधील हानिकारक घटकद्रव्यांमुळे 66 मुलांचा मृत्यू याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.

            यावेळी उत्तर देताना अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड म्हणाले की,  जागतिक आरोग्य संघटना यांनी गांबियामधील 66 मुलांचा मृत्यू सदोष कफ सिरपमधील घटकद्रव्यांमुळे झाल्याची शक्यता वर्तविली होती. यानंतर अन्न व औषध प्रशासनाने 7 ऑक्टोबर 2022 रोजी परिपत्रक काढून राज्यातील लिक्विड ओरल उत्पादकांची तपासणी केली. यामध्ये राज्यातील एकूण 84 उत्पादकांची तपासणी करण्यात आली असून 17 उत्पादकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तर 4 उत्पादकांना उत्पादन बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

            राज्यात एकूण 996 ॲलोपॅथिक उत्पादक असून त्यापैकी 514 उत्पादक निर्यात करतात. राज्यात एकूण 108 कफसिरप उत्पादक असून 84 प्रकरणी विशेष मोहीम राबवून तपासणी केली. यापैकी 17 प्रकरणात कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तर 4 उत्पादकांना उत्पादन बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. काही प्रकरणात उत्पादकांकडे मोठ्या प्रमाणात औषधी पाठ मंजूर होत असल्यामुळे तसेच निर्यातीच्या नोंदणीप्रकरणी सुमारे 1 वर्षाचा कालावधी लागत असल्यामुळे हमीपत्राच्या अधीन राहून निर्यातीसाठी अतिरिक्त औषधी पाठ मंजूर करण्यात आले असल्याचे मंत्री श्री. राठोड यांनी यावेळी सांगितले.

दोन वर्षांत महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांचे प्रकल्प मार्गी लावणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत ग्वाही

मुंबई, दि. ३ : महाराष्ट्रात पुढील दोन वर्षांत महत्वपूर्ण पायाभूत प्रकल्प मार्गी लागणार असून त्यामुळे राज्याचे वेगळे चित्र देशापुढे उभे करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. या सर्व दर्जेदार पायाभूत सुविधांच्या माध्यमातून महाराष्ट्राची वेगळी ओळख निर्माण करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली.

राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. विरोधी पक्षनेते अजीत पवार, सदस्य सर्वश्री अतुल भातखळकर, संजय कुटे, श्रीमती यामीनी जाधव, सुरेश वरपुडकर, अशोक चव्हाण, छगन भुजबळ, अबु आझमी आदी सदस्यांनी चर्चेत भाग घेतला होता.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, राज्य सरकारने सुरू केलेली कामे प्रगतीपथावर आहेत. गेली सात महिन्यात राज्य शासनाने घेतलेले निर्णय सामान्य हिताचे आहेत. समृध्दी महामार्ग, मुंबई मेट्रो, एमटीएचएल, कोस्टल रोड, आपला दवाखाना यासराख्या लोकोपयोगी प्रकल्पांच्या माध्यमातून विकासाला गती देण्याचे काम सुरू आहे. सिंचनाच्या एकूण २३ प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून त्यामुळे ५.२१ लाख हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार आहे.

शेतकऱ्यांना विविध नैसर्गिक आपत्तीच्या मदतीसाठी सुमारे १२ हजार कोटी देण्यात आले आहे. राज्यातील ७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना महामंडळातर्फे विनामूल्य बस प्रवास योजना सुरू केली. आतापर्यंत ५ कोटी ६५ लाख ज्येष्ठ नागरिकांनी याचा लाभ घेतलेला आहे. मोफत उपचारासाठी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात आला असून मुंबईमध्ये १६० ठिकाणी आपला दवाखाना सुरू झाले असून त्याचा सात लाख नागरिकांनी उपचार घेतले आहेत. ३१ मार्च पर्यंत अजून २०० दवाखाने सुरू करण्यात येणार असून येत्या आर्थिक वर्षांत राज्यात ५०० आपला दवाखाना सुरू होतील, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

माता सुरक्षित घर सुरक्षित योजनेतंर्गत माताभगिनींच्या आरोग्याची तपासणी मोहिम हाती घेण्यात आली. त्याद्वारे सुमारे ४.५० कोटी महिलांची आरोग्य तपासणी करण्त आली. जागृत पालक सुदृढ बालक अभियान सुरू केले आहे. त्यामध्ये ० ते १८ वयोगटातील सुमारे २ कोटी मुला-मुलांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईमध्ये मेट्रो दोन लाईन चा शुभारंभ केला. जनतेला सुखकर प्रवासासाठी प्रयत्न करण्यात येत असून आतापर्यंत ६० लाख प्रवाशांनी त्याचा लाभ घेतला आहे.मुंबईमध्ये ३३७ कि.मी. मेट्रोचे जाळे पूर्ण होणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परिक्षेसाठी सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करण्याचा निर्णय आयोगाने जाहीर केला आहे. सर्व सदस्यपदांची नियुक्ती करण्यात आली आहे. विविध पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे. मुलाखतीच्या दिवशीच निकाल जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे. लोकसेवा आयोगाच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

समृद्धी महामार्ग हा केवळ काही शहरांना जोडणारा महामार्ग नाही. या माध्यमातून राज्याच्या आणि देशाच्याही आर्थिक विकासाला हातभार लागणार आहे. स्थानिकांना रोजगार मिळाला आहे. समृद्धी महामार्ग शिर्डीपर्यत सुरू झाला आहे. १० प्रवासी वाहनांनी त्याचा लाभ घेतला आहे. समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा सुरू करीत आहोत. एमटीएचएल प्रकल्प, कोस्टल रोड, मुंबई पुणे मिसिंग लिंक यासरख्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमुळे राज्याचा नावलौकिक होणार आहे. पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमध्ये महाराष्ट्र देशात क्रमांक एकवर असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून, राज्यातील युवकांना रोजगाराच्या पुरेशा संधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने शासनाच्या नियंत्रणाखालील आस्थापनांवरील ७५ हजार रिक्त पदे भरण्याचा शासनाने निर्धार केला आहे. त्यानुसार भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महारोजगार मेळाव्याला खाजगी उद्योजकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून त्याद्वारे हजारो बेरोजगारांना रोजगार मिळत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे कामे प्रगतीपथावर असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

मुंबईत ४५० कि.मी. च्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. येत्या दोन वर्षांत मुंबईतील रस्ते खड्डे मुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. रेल्वे, रस्ते, शहर विकासाच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

‘आष्टी’ च्या सहायक पोलिस निरीक्षकांच्या चौकशीसाठी विशेष अधिकारी -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ३ : आष्टी पोलिस चौकीचे सहायक पोलिस निरीक्षकांनी अमानुषपणे मारहाण केल्याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी अधिकारी नेमण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.

कोकाटे हादगाव ता.परतूर, जि. जालना जिल्ह्यातील शेतीच्या वादातून गावातील दोन समुदायांमध्ये वाद झाला. काही लोकांच्या घरावर हल्ला करण्यात आल्याने जखमी झाल्याची तक्रार देण्यासाठी तक्रारदार आष्टी पोलिस चौकीला गेले असता त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून आष्टी चे पोलीस चौकीचे सहायक पोलिस निरीक्षकांनी अमानुषपणे मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत विधान परिषदेचे सदस्य गोपीचंद पडळकर यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, पोलिसांनी जात, धर्म या पलीकडे जावून काम करावे. या प्रकरणात मारहाणीची ध्वनिचित्रफितीची 15 दिवसांत पडताळणी केली जाईल. जालना पोलिस ठाण्याकडून हे प्रकरण काढून सीआयडीकडे देण्यात येईल. त्यासाठी विशेष तपास अधिकारी नेमण्यात येईल. तसेच ध्वनिचित्रफितीची पडताळणी झाल्यानंतर त्यामध्ये संबधित दोषी आढळले, तर अधिक कडक कारवाई करण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य भाई जगताप यांनी सहभाग घेतला.

दहेली धरणाचे काम जलदगतीने पूर्ण करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील दहेली धरणाचे काम जलदगतीने व्हावे, यासाठी प्राधान्य देण्यात येईल. या कामासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन उर्वरित काम तातडीने पूर्ण करण्यात येतील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

अक्कलकुवा  तालुक्यातील दहेली धरणाचे काम अपूर्ण अवस्थेत असल्याबद्दल विधान परिषद सदस्य आमश्या पाडवी यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, या धरणाची घळभरणी मे २०२२ अखेर पूर्ण करण्यात आल्याने प्रकल्पात १०० टक्के जलसाठा निर्माण झालेला आहे. प्रकल्पावर सिंचन क्षमता ३ हजार १६५ हेक्टर प्रस्तावित असून त्याकरिता बंदिस्त नलिकांद्वारे वितरण प्रणाली नियोजित आहे. या प्रकल्पाची कामे जलदगतीने पूर्ण करण्यात येतील, असेही ते म्हणाले.

इरई नदी स्वच्छतेसाठी त्वरित पावले उचलणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

चंद्रपूर शहरातून वाहणाऱ्या इरई नदीच्या स्वच्छतेसाठी नदीतील गाळ व झुडपे पावसाळ्यापूर्वी काढण्यात येतील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत सांगितले.

चंद्रपूर जिल्ह्यातील इरई नदीचे पुनरूज्जीवन आणि खोलीकरणाबाबत सदस्य अभिजित वंजारी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नास उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, यापूर्वी २०१६ ते २०१८ मध्ये शहरास समांतर वाहणाऱ्या इरई नदीतील ७ किमी अंतरामध्ये ६०० स.घ.मी. गाळ व झुडपे काढून स्वच्छता करण्यात आली आहे. अधिकचा गाळ काढण्याचे काम पावसाळ्यापूर्वी गतीने करण्यात येईल. तसेच, यापूर्वी झालेल्या कामांमध्ये अनियमितता आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. वेस्टन कोलफिल्ड लिमिटेड च्या माध्यमातून निधी वापरण्यात येईल. कामाचा दर्जा व गुणवत्ता तपासणी केल्यानंतरच देयके अदा करण्यात येतील असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री सुधाकर आडबाले, भाई जगताप यांनी उपप्रश्न उपस्थित केले.

गोसीखुर्द प्रकल्पांतर्गत संपूर्ण कालव्याची कामे २०२४ पर्यंत

पूर्ण करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गोसीखुर्द प्रकल्पात पाणीसाठा निर्माण झाल्यामुळे आवश्यक निधीची तरतूद करुन कालबद्ध पद्धतीने कालवे व वितरण प्रणालीची कामे २०२४ पर्यंत पूर्ण करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली.

गोसीखुर्द प्रकल्पांतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील घोडाझरी कालव्याच्या कामांसंदर्भात सदस्य रामदास आंबटकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना ते बोलत होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, घोडाझरी कालव्यांसंदर्भात नलिका वितरण प्रणालीचा (पीडीएन) तसेच ठिबक सिंचनाचा वापर करण्यात येईल. यापूर्वीच्या सर्व निविदा रद्द करण्यात आल्या असून फेरनिविदा काढण्यात येणार आहे. तसेच कोरोनामुळे काम बंद होते. भूसंपादन, मोबदला यांसह अन्य कारणाने विलंब झाला होता. तथापि यापुढे गोसीखुर्द प्रकल्पांतर्गत कालवे व वितरण प्रणालीची कामे पुरेसा निधी देवून प्राधान्याने हाताळण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

खून करून रस्त्यावर टाकला बालिकेचा मृतदेह;पुण्यातला संतापजनक प्रकार

पुणे- गुन्हेगारी जगताने आता गंभीर रूप धरण केलेले असून अवघ्या अडीच ते तीन वर्षाच्या मुलीचा खून करून टाकलेला मृतदेह खडकीत आढळून आला आहे. या मुलीची ओळख अजून पटली नसल्याने पोलीस हैराण झाले आहेत . काल हा मृतदेह खडकी रेल्वे स्टेशन ते खडकी बाजार रस्त्याच्या दक्षिण बाजूस सी ए एफ व्ही डी ग्राउंड च्या उत्तरेस चिकूच्या झाडाखाली मिळून आला . गळा दाबून या बालिकेची हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. अण्णा गुंजाळ नावाच्या फौजदार यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली आणि गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील याप्रकरणी अधिक तपास करत आहेत .

आरोग्य विभागातील रिक्त पदे लवकरच भरणार

– सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत

मुंबई-राज्यातील आरोग्य सेवा – सुविधांच्या बळकटीकरणासाठी विभागातील रिक्त पदे लवकरच भरण्यात येतील. तसेच आरोग्य केंद्रातील बायोमेट्रिक हजेरी प्रणालीसाठी मुंबई, पुणे येथे मध्यवर्ती बायोमेट्रिक हजेरी पडताळणी यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे, असे सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी विधानसभेत सांगितले.

 पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात आरोग्य सेवा सुधारण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत विधानसभा सदस्य सर्वश्री सुभाष थोपटे, राजेश टोपे, अनिल देशमुख, रवी राणा यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना ते बोलत होते.

आरोग्य मंत्री श्री. सावंत म्हणाले, हृदयविकाराने झटका येऊन मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहे. अशा रुग्णांना गोल्डन अवरमध्ये आरोग्य सेवा – सुविधा तातडीने उपलब्ध व्हाव्यात यासाठी ‘स्टेमी’ प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचेही श्री. सावंत यांनी यावेळी सांगितले.

अंगणवाडी सेविका, मदतनीसांच्या मानधनात वाढीचा निर्णय

– महिला व बाल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई, दि. 3 : राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मागण्याबाबत शासन सकारात्मक आहे. अंगणवाडी सेविकांच्या मानधनात 20 टक्के तर मदतनीस यांच्या मानधनात 10 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी विधानसभेत सांगितले.

राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात वाढ करण्याबाबतचा प्रश्न विरोधी पक्षनेते अजित पवार, सदस्य सर्वश्री कुणाल पाटील, बाळासाहेब थोरात, धनंजय मुंडे, अतुल भातखळकर, आदिती तटकरे यांनी उपस्थित केला होता.

मंत्री श्री. लोढा म्हणाले की, अंगणवाड्यांमधील रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच नवीन मोबाईल खरेदीही करण्यात येत आहे. या मोबाईल ॲप मध्ये ‘ट्रॅक ॲप’ आहे त्यामध्ये माहिती अद्ययावत करत असताना नाव इंग्रजीत भरले असले, तरीही उर्वरित सर्व माहिती मराठीमध्ये भरण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असेही मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले.

पोलिस शिपाई ते पोलिस निरीक्षकांना एका वर्षात 20 दिवस नैमित्तिक रजा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्य पोलिस दलातील पोलिस शिपाई ते पोलिस निरीक्षक या पदावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांना एका कॅलेंडर वर्षात देय असलेल्या १२ दिवसांच्या नैमित्तिक रजांऐवजी जास्तीत जास्त २० (वीस) दिवस नैमित्तिक रजा विशेष बाब म्हणून अनुज्ञेय करण्यात आली आहे. याबाबत  ३ ऑक्टोबर २०२२ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

पोटनिवडणुकीत हरतो अन् अख्खे राज्य जिंकतो:मुख्यमंत्र्यांची विधानसभेत फटकेबाजी; ठाकरेंना टोले, पवारांना चिमटे!

दादा,तुम्ही गाडी बदलून कुठे – कुठे गेलात? हे सगळे माहिती आहे. रात्री तीन वाजता आमच्याकडे फोटो आला होता

मुंबई- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जोरदार फटकेबाजी केली. अजित पवारांंच्या आक्षेपांवर उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे विरोधकांना कोपरखळ्या मारल्या आहेत. पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांना पहाटेच्या शपथविधीवरुन डिवचलं आहे.मुख्यमंत्र्यांनी विरोधकांसाठी देशद्रोही असा शब्द वापरल्यावरुन मोठा गदारोळ माजला होता. त्यांच्याविरोधात हक्कभंगही आणला होता. त्याबद्दल बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “देशद्रोहाची मी सुरुवात केली नव्हती. पण अजित पवार मला तुमच्याकडून अशी अपेक्षा नाही. ज्यांनी मुंबईत बॉम्ब स्फोट केला, त्यांच्यासोबत नवाब मलिकांनी व्यवहार केला. त्या नवाब मलिकांना तुम्ही मंत्रिमंडळात ठेवलं. आणि तुम्ही आम्हाला म्हणाला महाराष्ट्र द्रोही. तुम्ही म्हणता की हे घटनाबाह्य सरकार आहे, मग तुम्ही देखील घटनाबाह्य विरोधीपक्षनेता आहात का?शिंदे- फडणवीस सरकारने जाहिरातींवर मोठ्या प्रमाणावर खर्च केला असल्याचा आरोपही विरोधकांकडून करण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, अजित पवार सध्या शिवसेनेचे प्रवक्ते असल्यासारखे बोलतात. दादा आपली मैत्री आहे पण तुम्ही कडवट शिवसैनिक बनू नका. दादा अडीच वर्षे वर्षावर कुणी जात नव्हते. फेसबुक लाईव्हवर सर्व सुरू होतं. 6 कोटी पर्सनल पीआर करायला खर्च केल्यात. आम्ही सकाळ आणि सामनासकट सर्वांना जाहिराती दिल्यात. घटनाबाह्य सरकार आहे पण जाहिराती चालतात. 70 हजार कोटी इरिगेशनवर खर्च केले पण एकही सिचन झाले नाही. तुम्ही विरोधी पक्षनेते आहात, जबाबदार आहात. लोकशाहीत आम्ही कुठलंही चुकीचं काम केलेलं नाही.आमचं सरकार सकारात्मक निर्णय घेतयं. समृद्धा रोजगाराला मोठी चालना मिळीली. सरकारनं अनेक कामांना चालना दिली आहे. १२ हजार कोटींची शेतकऱ्यांना मदत करण्यात आली आहे. नियमात बदल करुन शेतकऱ्यांन दुप्पट मदत करण्यात आली आहे. नाफेडकडून कांदयाची खरेदी सुरु आहे. कांदा उत्पादकांच्या पाठीशी आमचं सरकार उभं आहे.ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास सुरु केला. मविआ सरकारच्या काळात मराठा आरक्षणाच्या निर्णयाला स्थगिती दिली. पण आम्ही हा लढा ताकदीनिशी लढतोय.

गेल्या सरकारमध्ये दावोसमधून १० हजार कोटींचीही गुंतवणुक नाही. दावोसमध्ये ३०-३५ कोटींचा खर्च झाला. करार झालेल्या कंपन्यांना जागा देण्यास सुरुवात केली आहे. अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी सभागृहात दिली. करारामुळे १ लाखाहून अधिक रोजगार निर्मिती.सत्तेतून पायउतार झाल्यावर विरोधकांच्या डोळ्यासमोर अंधारी आली आहे. त्यामुळे त्यांना सरकारची काम दिसत नाहीत. विरोधकांनी फक्त राजकीय भाष्य केलं.सहकार क्षेत्रात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मदत करतायत.

गाडी बदलून कुठे गेलात?

एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत मोकळ्या-ढाकळ्या शैलीत जोरदार भाषण ठोकले. ते म्हणाले, हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. सीएम रोडशो करतात, असे अजित पवार म्हणाले. मात्र, शरद पवारांनी सभा घेतल्या. ग्रुपला बोलावले. तुम्ही गाडी बदलून कुठे – कुठे गेलात? हे सगळे माहिती आहे. रात्री तीन वाजता आमच्याकडे फोटो आला होता.

तिन्ही राज्य गेले

एकनाथ शिंदे म्हणाले, मोदींनी रोड शो केला आणि राज्य जिंकले. राहुल गांधींनी रोड शो केला आणि तिन्ही राज्य गेले. आठवले यांच्या पक्षाचे दोन आमदार आले. तुमचे मात्र, बेगाने शादी में अब्दुला दिवाना सुरू आहे. कसबा येथे चुका झाल्या आहेत. त्या आम्ही येणाऱ्या काळात दुरुस्त करू. आमच्या कामाने मते जिंकू. मात्र, येणाऱ्या काळात निवडणुकात आहेत. तुम्ही तिघे आहात. एकाची पार्टी उभी राहिली, तर दुसरा भजन करत बसेल का?

कामांची यादीच वाचली

एकनाथ शिंदे म्हणाले, मराठा आरक्षणासाठी प्रयत्न सुरू आहेत. गेल्या सरकारमध्ये दावोसमधून दहा हजार कोटींचीही गुंतवणूक नाही. मात्र, या वर्षी दावोसमध्ये महाराष्ट्राचा उदो उदो सुरू होता. सरकारने अनेक कामांना चालना दिली. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठिशी आहोत. कांद्याची नाफेडच्या माध्यमातून खरेदी सुरू झाली आहे. ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास सुरू केला. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याच्या जनतेला फायदा होतो आहे. मेट्रोच्या दोन प्रकल्पांचा शुभारंभ केला. शेतकऱ्यांना मदत दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे.

बालविवाह रोखण्यासाठी समाजाने आपली मानसिकता बदलणे गरजेचे – रुपाली चाकणकर

जालना,: बालविवाह रोखण्यासाठी कठोर कायदे तयार करण्यात आले आहेत. मात्र तरीही बालविवाह होत आहेत. ही शोकांतिका आहे. समाजाने यासाठी जागरुक होणे आवश्यक असून मुलींचे उज्ज्वल भविष्य आणि निरोगी आरोग्याकरीता समाजाने आपली मानसिकता बदलणे गरजेचे आहे. विशेषत: पालकांनीच बालविवाहासाठी पुढाकार घेऊ नये, असे आवाहन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात “महिला आयोग आपल्या दारी” या उपक्रमातंर्गत

जनसुनावणी घेण्यात आली.  त्यावेळी त्या बोलत होत्या. मंचावर महिला आयोगाच्या सदस्या संगीता चव्हाण,जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, अपर जिल्हाधिकारीअंकुश पिनाटे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती आर.एन. चिमिंद्रे आदींसह विविध विभागांचे अधिकारी,संरक्षण अधिकारी, पॅनलचे सदस्य, तक्रारदार महिला व नातेवाईक उपस्थित होते. श्रीमती चाकणकर म्हणाल्या की, शहरी व ग्रामीण तसेच दुर्गम भागातील महिलांना मुंबई येथील महिला आयोगाच्या कार्यालयात येऊन तक्रार करणे, सुनावणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणे आर्थिकदृष्ट्या तसेच इतर कारणांमुळे शक्य होत नसल्यामुळे “महिला आयोग आपल्या दारी” हा उपक्रम राबविण्यात येत आहे. आतापर्यंत वीसपेक्षा जास्त जिल्ह्यात हा उपक्रम राबविण्यात आला आहे. जागेवर महिलांच्या तक्रारी सोडवण्याचा प्रयत्न या उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात येतो. महिलांच्या अनेक तक्रारी असतात. कुटुंबिक हिंसाचार, लैंगिक अत्याचार, बालविवाह, हुंड्यासाठी छळ अशा अनेक समस्या सुनावणीतून समोर येत आहेत. आई-वडील, पालकांनी वयाच्या  १८ वर्षापूर्वी मुलीचे लग्न करु नये, कारण ती शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम झालेली नसते. तिच्या लग्नासाठी हुंडाही दिला जातो.  हुंडा देणे कायद्याने गुन्हा आहे. हुंड्याचा हाच पैसा मुलीच्या शिक्षणासाठी उपयोगात आणल्यास मुलगी खऱ्या अर्थाने स्वावलंबी होईल. तसेच मुलींवर अत्याचारही होणार नाहीत. बालविवाह होऊ नये यासाठी समाजाने मानसिकता बदलणे खूप गरजेचे आहे. महिला आयोग तुमच्यासाठीच आहे. पिडीतांना न्याय देण्याची आयोगाची भूमिका आहे. यासाठीच “महिला आयोग आपल्या दारी” हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.

जिल्हा अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांनी मुली व महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाच्यावतीने करण्यात येणाऱ्या कार्यवाहीची माहिती दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनीही मनोगत व्यक्त केले. यानंतर श्रीमती चाकणकर यांच्या उपस्थितीत जनसुनावणी घेण्यात आली. आयोगाच्या सदस्यांचा समावेश असलेल्या तीन पॅनलने उपस्थित महिलांच्या समस्या व त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. पॅनलमध्ये संरक्षण अधिकारी, वकील व समुपदेशन अधिकारीही होते. एकूण १२६ तक्रारी जनसुनावणीत प्राप्त झाल्या.

सर्व आस्थापनांमध्ये अंतर्गत निवारण तक्रार समिती असणे आवश्यक

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या अध्यक्षतेखाली विभागप्रमुखांची आढावा बैठक पार पडली. बैठकीत त्यांनी कामाच्या ठिकाणी महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला प्रतिबंध घालण्यासाठी सर्व शासकीय, निमशासकीय व खाजगी आस्थापनांमध्ये अंतर्गत निवारण तक्रार समिती असणे आवश्यक आहे. सर्व आस्थापनांची तपासणी करण्यात येऊन प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारची समिती स्थापन झालेली आहे का याची खात्री करण्यात यावी.  महिलांनी केलेल्या तक्रारींवर या समितीमार्फत तातडीने कार्यवाही होईल, यादृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. अवैध गर्भपात रोखण्यासाठी पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. खाजगी रुग्णालयांना अचानक भेट देऊन तपासणी करावी. येत्या पंधरा दिवसांत केलेल्या कार्यवाईचा अहवाल आयोगास सादर करण्यात यावा. बालविवाहाच्या तक्रारी, ऊसतोड कामगार महिलांची प्रश्नांची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी. यावेळी मिशन वात्सल्य योजना,

मनोधैर्य योजना, माझी कन्या भाग्यश्री, गृह स्वाधार योजना, शुभमंगल सामुहिक/नोंदणीकृत योजना, विशाखा समिती, महिलांसाठी शासकीय वसतीगृहे यासह जिल्हा कामगार अधिकारी, पोलीस विभाग, समाजकल्याण, महिला व बालकल्याण, महिला आर्थिक विकास महामंडळ, कौशल्य विकास, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाशी संबंधित महिलांच्या योजना व उपक्रमांचा सविस्तर आढावाही श्रीमती चाकणकर यांनी उपस्थित अधिकाऱ्यांकडून घेतला.

बैठकीस सदस्या संगीता चव्हाण, अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, अपर पोलीस अधीक्षक राहूल खाडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती पी. पी. बारस्कर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती आर.एन. चिमिंद्रे, जिल्हा महिला आयोगाचे जिल्हा समन्वयक  ॲड. पी. जे. गवारे, ॲड. अश्वीनी धन्नावत आदींसह विभागप्रमुख उपस्थित होते.

कर्नाटकातील सत्ताधारी भाजपा आमदार पुत्राला ४० लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक; घरात सापडलं ६ कोटींचं घबाड!

प्रशांतचे वडील म्हणाले – माझा कोणत्याही टेंडरमध्ये सहभाग नाही

कर्नाटकात भाजपचे आमदार मदल विरुपक्षप्पा यांचा मुलगा प्रशांत कुमार यांना 40 लाख रुपयांची लाच घेताना गुरुवारी अटक करण्यात आली. वडिलांच्या बंगळुरू येथील कर्नाटक सोप अँड डिटर्जंट लिमिटेड (KSDL) कार्यालयातून ही अटक करण्यात आली. कर्नाटक लोकायुक्तांनी त्यांना लाच घेताना रंगेहात पकडले आहे. यानंतर लोकायुक्त अधिकारी प्रशांत यांच्या घरी पोहोचले. येथे त्यांना 6 कोटी रोख मिळाले. मोजणी झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी नोटांचे बंडल बेडवर ठेवले होते.

भाजपचे आमदार मदल विरुपक्षप्पा यांनी KSDL च्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मुलाने ज्या टेंडरमध्ये लाच घेतली त्यात माझा सहभाग नसल्याचे त्यांनी सांगितले. विरुपक्षप्पा यांच्या राजीनाम्यापूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले होते की, लोकायुक्त पुन्हा आणण्याचे उद्दिष्ट राज्यातील भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करणे आहे.

प्रशांतचे वडील मदल विरुपक्षप्पा हे कर्नाटकातील दावणगेरे जिल्ह्यातील चन्नागिरीचे आमदार आहेत. ते म्हणाले- मला याबाबत कोणतीही माहिती नाही. याची माहिती मला प्रसारमाध्यमांद्वारे मिळाली. माझा मुलगा आता लोकायुक्तांच्या ताब्यात असल्याने मी याबाबत त्यांच्याशी बोललो नाही. माझा कोणत्याही टेंडरमध्ये सहभाग नाही.

प्रशांत हे बंगळुरू पाणी पुरवठा आणि मलनिस्सारण ​​मंडळ (BWSSB) चे मुख्य लेखा अधिकारी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडून रोखीने भरलेल्या तीन बॅगा जप्त करण्यात आल्या आहेत.

याप्रकरणी लोकायुक्तांनी भाजप आमदारालाही आरोपी केले आहे. मात्र, भाजपचे आमदार विरुपक्षप्पा यांनी कोणत्याही टेंडरमध्ये सहभाग असल्याचा इन्कार केला आहे.

प्रशांत यांनी 80 लाख रुपयांची लाच मागितली
लोकायुक्त अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत हे कर्नाटक प्रशासकीय सेवेतील 2008 च्या बॅचचे अधिकारी आहेत. साबण आणि इतर डिटर्जंट बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल खरेदी करण्यासाठी त्यांनी एका कंत्राटदाराकडून 80 लाख रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर ठेकेदाराने लोकायुक्तांकडे याबाबत तक्रार केली होती. त्यानंतर प्रशांत यांना रंगेहात पकडण्याची योजना आखण्यात आली.

ही रक्कम KSDL चे अध्यक्ष आणि भाजपचे आमदार मदल विरुपक्षप्पा यांच्याकडून घेण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, लाच घेणारे आरोपी पिता-पुत्र आहेत.

भारतात लोकशाही संकटात:राहुल गांधी केंब्रिजमध्ये म्हणाले – तुमचा फोन रेकॉर्ड होत असल्याने सावधपणे बोला असे अधिकारी सांगायचे

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले – ‘राहुल परदेशात भारताला बदनाम करत आहेत.’

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ब्रिटनच्या केंब्रिज विद्यापीठातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मंगळवारी झालेल्या या कार्यक्रमात राहुल यांनी भारतातील विरोधी पक्ष व नेत्यांना येणाऱ्या अडचणींचा उल्लेख केला. यासंबंधीचा एक व्हिडिओ काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी शेअर केला आहे.राहुल यांच्या या विधानावर भाजपने हरकत नोंदवली आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले – ‘राहुल परदेशात भारताला बदनाम करत आहेत.’

राहुल यांनी केंब्रिजमध्ये केली 3 मोठी विधाने

1. माझा फोन रेकॉर्ड केला जात होता
“माझ्या फोनची हेरगिरी केली जाते. विरोधकांवर गुन्हे दाखल केले जातात. भारतातील विरोधी पक्षनेता म्हणून असा दबाव मला नेहमीच सहन करावा लागतो. बहुतांश राजकीय नेत्यांच्या फोनमध्ये पेगासस आहे. माझ्या फोनमध्येही पेगासस होते. मला गुप्तहेर अधिकाऱ्यांनी बोलावून सांगितले होते की, तुम्ही फोनवर बोलताना सावधगिरी बाळगा. कारण आम्ही ते रेकॉर्ड करत आहोत. हा एक असा दबाव आहे, जो आम्हाला नेहमीच जाणवतो. “

2. भारतात मीडिया व लोकशाही संरचनेवर हल्ला

“विरोधकांवर गुन्हे दाखल केले जातात. माझ्याविरोधातही अनेक फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आलेत. यातील अनेक गुन्हे चुकीच्या कारणांसाठी दाखल करण्यात आलेत. देशातील मीडिया व लोकशाही व्यवस्थेवर अशा प्रकारचा हल्ला होत असेल तर विरोधक म्हणून तुमच्यासाठी बोलणे अवघड होते. “

3. विरोधक मुद्यांवर बोलत असताना, तुरुंगात डांबले

“लोकशाहीसाठी आवश्यक असलेली संसद, स्वतंत्र प्रेस, न्यायपालिका या सर्वच संरचना विवश झाल्या आहेत. त्यामुळे आम्ही भारतीय लोकशाहीच्या मूळ संरचनेवरील हल्ल्याचा सामना करत आहोत. भारतीय संविधानात भारताला राज्यांचा संघ म्हटले आहे. त्या संघाशी चर्चा गरजेची आहे. आता ही बातचितच संकटात सापडली आहे. हे छायाचित्र संसदेसमोरील आहे. विरोधी पक्षांचे नेते काही मुद्यांवर चर्चा करत होते. त्यांना तुरुंगात डांबण्यात आले. असे 3 ते 4 वेळा झाले. ते अत्यंत हिंसक होते. “

अनुराग ठाकूर पेगासस मुद्यावर म्हणाले – ‘हे कुठेही नाही तर राहुल यांच्या डोक्यात आहे. त्यांनी कोणत्या भीतीने आपला फोन जमा केला नाही. त्या फोनमध्ये असे काय होते. सततचे पराभव त्यांना पचत नाहीयत. राहुल परदेशात जाणून आपल्या परदेशी मित्रांच्या मदतीने भारताला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. अखेरीस काँग्रेसचा अजेंडा काय आहे?’

राहुल गांधी यांनी यापूर्वी गतवर्षी मे महिन्यात केंब्रिज विद्यापीठात गेले होते. ते तिथे आयडियाज फॉर इंडिया या विषयावर बोलणार होते. पण त्यात त्यांनी मोदी सरकावर तिखट टीका केली होती. ते म्हणाले होते की, मोदी सरकार संसद व निवडणूक आयोगासारख्या देशाच्या घटनात्मक संस्थांना आपले काम करू देत नसल्याचा आरोप केला होता. भाजपने त्यांच्या या विधानावर हरकत नोंदवली होती. देशाच्या पंतप्रधानावर परदेशात असा आरोप का करण्यात आला, असा सवाल भाजपने या प्रकरणी केला होता.

राहुल गांधींनी फोन तपासणीसाठी का दिला नाही -ठाकूर

अनुराग ठाकूर पत्रकारांना म्हणाले – “राहुल गांधी परदेशात जाऊन वाद घालत आहेत. पेगासस त्यांच्या डोक्यात आहे. त्यांनी त्यांचा फोन तपासणीसाठी का दिला नाही हे त्यांना विचारा. पीएम मोदींच्या नेतृत्वात जगभरात भारताचा सन्मान वाढला आहे. हे मोठ-मोठे नेते म्हणत आहेत. इटलीच्या पंतप्रधान मोदींविषयी काय म्हणाल्या हे राहुल गांधींनी ऐकले पाहिजे.”

लर्निंग टू लिसन म्हणजे ऐकण्याच्या कलेवर बोलले राहुल

राहुल यांच्या 7 दिवसीय ब्रिटन दौऱ्याला मंगळवारपासून सुरुवात झाली. त्यांनी केंब्रिज विद्यापीठातील बिझनेस स्कुलच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, आम्ही लोकशाही मूल्यांचा अभाव असणारे जग तयार होताना पाहू शकत नाही. त्यामुळे आम्हाला याविषयी नव्याने विचार करण्याची गरज आहे. ऐकण्याची कला खूप पॉवरफूल असते