Home Blog Page 1335

आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्या शितलताई कांडेलकर यांच्या मोटारीची तोडफोड

पुणे-

आम आदमी पक्षाच्या विमान नगर भागातील कार्यकर्त्या शितलताई कांडेलकर यांची चार चाकी इकोफोर्ड मोटार काल रात्री 09.12.23 रात्री 12 ते पहाटे 4 या वेळेत अज्ञात भामट्यांनी फोडली.आपले प्रभागातील काम पाहून काही विरोधकांनी हे कृत्य केले असल्याचा दावा या कार्यकर्तीने केला गेले वर्षभरापासून मी या विमान नगर भागात वेगवेगळे प्रश्न उपस्थित करत आहेत, बऱ्याच समस्यांची दखल घेऊन त्या समस्या सोडवण्यासाठी वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये जाऊन काम करत आहेत. यामुळेच कुठेतरी माझ्या गाडीची तोडफोड केली आहे असे शितल यांचे मत आहे.
गाडीच्या तोडफोडीनंतर आम आदमी पार्टीचे विविध पदाधिकारी यांनी शितल यांची भेट घेऊन त्यांना धीर दिला व विमान नगर पोलीस स्टेशन येथे रितसर तक्रार दिली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश शेवाळे हे करत आहेत.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या कलाकृती दीर्घकाळ टिकून राहतील

पुणे, १० डिसेंबर-जाणता राजा या कलाकृतीसह शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी ज्या ज्या कलाकृती निर्माण केल्या, त्या एवढ्या भव्य आहेत की, या कलाकृती दीर्घकाळ टिकून राहतील, असे मनोगत पं. अजय पराड यांनी व्यक्त केले.

अक्षय सेवा संशोधन प्रतिष्ठान आणि कौशिक आश्रम यांनी आयोजित केलेल्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे स्मृती व्याख्यानमालेत पं. पराड प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे व्यवस्था प्रमुख गुरुनाथ शिरोडकर यांचीही यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

जे काही करायचे ते भव्य करायचे म्हणजे ते दिव्य होते. जे भव्य ते दिव्य असते, हा बाबासाहेबांचा विचार होता आणि त्यावर त्यांचा विश्वासही होता, असे पं. पराड यांनी सांगितले. समाजाला योग्य दिशा आणि योग्य विचार देण्याचे काम व्याख्यानमाला करतात, असे शिरोडकर म्हणाले.

समूह नाट्याचे प्रणेते संजय पुरंदरे, जाणता राजा महानाट्याचे प्रथम दिग्दर्शक दिवाकर पांडे, होनराज मावळे आणि सहकलाकारांनी यावेळी कला रसिक बाबासाहेब हा कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमाला श्रोत्यांनी उत्स्फूर्त दाद दिली आणि गायन, वादन, निवेदनाचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे विश्वस्त मंदार सहस्रबुद्धे यांनी, संयोजन राजाभाऊ पानगावे, शिरीष किराड यांनी आणि सूत्रसंचालन नागेश पाटील यांनी केले.

मोदींच्या गॅरंटीमुळे ‘विकसित भारत संकल्प यात्रे’ला मोठा प्रतिसाद-खासदार प्रकाश जावडेकर

पुणे, १० डिसेंबर : “लोकांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास आहे. मोदी जे बोलतात ते करतात. मोदींची गॅरंटी ही गॅरंटी आहे. त्यामुळेच ‘विकसित भारत संकल्प यात्रे’ला देशभर मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे मत खासदार प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले.”

लोककल्याणकारी मोदी सरकारच्या योजनांची माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व अंमलबजावणीसाठी विकसित भारत संकल्प यात्रा आज गोखलेनगर मध्ये पोहोचली. त्यावेळी जावडेकर बोलत होते. योगेश बाचल, आदित्य माळवे, राजश्री काळे, श्याम सातपुते, लक्ष्मण लोखंडे, सतीश बहिरट, विकास डाबी, संतोष काळे, लक्ष्मण नलावडे यांची उपस्थिती होती.

जावडेकर म्हणाले, “या अभियानाअंतर्गत 26 जानेवारी पर्यंत सर्व वस्त्यांवर व्हिडिओ रथ जाणार आहे. मोदी सरकारने पुढील पाच वर्षांसाठी गरीब अन्न योजनेअंतर्गत मोफत धान्य देण्याची घोषणा केली आहे. ज्या पात्र नागरिकांना या योजनेचा अजूनही लाभ मिळत नाही त्यांची या अभियानात नोंदणी केली जाणार आहे. तसेच आयुष्मान भारत आरोग्य योजनेचे सभासदत्वही दिले जाणार आहे. सर्व जनकल्याणाची कामे या अभियानात होत असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा.”

पाणी पाइपलाइन प्रकल्पासाठी बाणेर ते परिहार चौक मार्गात तात्पुरता बदल

 पुणे -महानगरपालिकेच्या पाण्याच्या पाईपलाईनच्या कामासाठी  5 डिसेंबर ते 19 डिसेंबर या कालावधीत बाणेर ते परिहार चौक या मार्गात तात्पुरता बदल करण्यात येणार आहे.

पुणे वाहतूक पोलिसांच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, आयटीआय रोडवरील विस्तृत पाइपलाइनच्या कामामुळे वाहतूक प्रवाहात तात्पुरता बदल करणे आवश्यक आहे. पाइपलाइन टाकण्याची क्रिया रस्त्याच्या मध्यभागी केंद्रित आहे.त्यामुळे  5 डिसेंबर ते 19 डिसेंबर या कालावधीत वाहतूकीत  बदल केले जातील.बाणेर फाट्यावरून परिहार चौकाकडे जाणार्‍या वाहनधारकांना बाणेर फाट्यावर डावीकडे वळावे, सीझन्स रोडवरील ईश्वर मेडिकलपासून उजवे वळण घ्यावे, त्यानंतर अविक पॉलीकेम येथे दुसरे उजवे वळण घ्यावे, असा सल्ला देण्यात आला आहे. परिहार चौकात जाण्यासाठी ते आयटीआय रोडवरून सरळ पुढे जाऊ शकतात.

भाजपच्या घाणेरड्या राजकारणाची दशकपूर्ती:रावणाप्रमाणे 10 तोंडे उडवले जातील, मोदी, शहाही संपणार, राऊतांचा भाजपवर हल्ला

सोलापूर

2024 मध्ये देशाच्या इतिहासातून मोदी शहा संपून जातील. भाजपची पाटी कोरी होणार. भाजपची आता दशकपूर्ती झाली आहे. रावणाप्रमाणाचे भाजपची 10 तोंडे देखील उडवले जातील असा हल्लाबोल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ते सोलापूरमध्ये बोलत होते.

घाणेरड्या राजकारणाची दशकपूर्ती झाली
पुढे राऊत म्हणाले, ”राज्यातील राजकारण राजकारण आता पूर्वीसारखे राहिलेले नाही. इतके सुडाचे, बदनामीचे आणि बदलाचे राजकारण आम्ही कधीही पाहिले नाही. अशा प्रकारचे राजकारण गेल्या 10 वर्षात सुरू झाले. आणि या घाणेरड्या राजकारणाची आता दशकपूर्ती झाली आहे. रावणाप्रमाणे यांचीही 10 तोंडे उडवले जातील” असा हल्ला संजय राऊत यांनी भाजपवर चढवला आहे.

शिवसेना ठाकरेंची होती आणि राहणार
राऊत म्हणाले, ”शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची होती आणि राहणार आहे. निवडणूक आयोगाने कितीही गुलामी केली तर मूळ पक्ष हा दुसऱ्यांचा होत नाही. पक्षांचे अस्तित्व हे पक्षाच्या नेतृत्ववर अवलंबून असते. यापूर्वी शिवसेना संपवण्याचा अनेकदा प्रयत्न झाला तरी शिवसेना संपली नाही. मोदी शहांना तर शिवसेना अजिबातच संपवता येणार नाही. देशाच्या इतिहासातून मोदी शहा संपतील. हुकूमशाहीची नोंद इतिहासात रहात नाही” असे संजय राऊत म्हणाले.

घटना वाचवण्यासाठी प्रकाश आंबेडकर आघाडीवर
पुढे राऊत म्हणाले, ”देशाची घटना वाचवण्यासाठी प्रकाश आंबेडकर हे आघाडीवर असतील. आंबेडकरांची ताकद आम्हाला जेव्हा मिळते तेव्हा महाराष्ट्रात नव्हे तर देशात विजयाचा मार्ग मोकळा होतो. फहार मोठा समाज त्यांच्या पाठीशी आहे. आम्ही सर्व एकत्र राहू. त्यामुळे सोलापूरचे राजकारण सुद्धा 2024 मध्ये बदलेल दिसेल” असेही राऊत म्हणाले.

बॅलेट पेपरवर निवडणूक घेऊन दाखवा
तर 5 राज्यांच्या निवडणुकीच्या निकालांवर बोलताना राऊत म्हणाले, ”तेलंगणात सुद्धा भाजप आले होते. केसीआर यांचा पराभव करणे हे मोठे आव्हान होते. कारण केसीआर हे त्या राज्याचे निर्माते आहेत. मात्र त्यांचा पराभव मोदी शहा करू शकले नाहीत. 10 आमदारांचा टप्पाही भाजपला तिथे गाठता आला नाही. मात्र राहुल गांधींनी तो पोराभव करून दाखवला. राजस्थानमध्ये सरकार बदलण्याची जनतेची मानसिकता आहे. मात्र मध्य प्रदेशमधील निकाल हा आश्चर्यकारक होता. बॅलेट पेपरवर निवडणूक घेऊन दाखवा” असेही संजय राऊत म्हणाले.

शेवाळवाडीचा अवघ्या २०वर्षे वयाचा भाई गौरव संतोष अडसुळवर MPDA ची कारवाई

पुणे-हडपसर पोलीस ठाणे परिसरात दहशत माजविणा-या, अट्टल गुन्हेगारावर पोलीस आयुक्त, पुणे शहर यांची एम.पी.डी.ए. कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई केली आहे.पोलिसांनी सांगितलेकी,’ पोलीस आयुक्तालयातील हडपसर पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार नामे गौरव संतोष अडसुळ वय २० वर्ष, रा. शिवचैतन्य कॉलनी, गल्ली नं-५ शेवाळवाडी, ता. हवेली, जि. पुणे हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने साथीदारांसह हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत लोखंडी कोयता या सारख्या जीवघेण्या घातक हत्यारांसह जबरी चोरी, दुखापत, बेकायदा हत्यार बाळगणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. मागील ०५ वर्षामध्ये त्याचेविरूध्द ३ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे सदर परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती. तसेच त्याच्यापासून जीविताचे व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करणेस धजावत नव्हते.
प्राप्त प्रस्ताव व सह कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्त, पुणे शहररितेश कुमार, यांनी नमूद इसमाचे विरुध्द एम.पी. डी. ए. कायद्यान्वये नागपुर मध्यवर्ती कारागृह, नागपूर येथे ०१ वर्षाकरीता स्थानबध्दतेचे आदेश पारीत केले आहेत. नमूद इसमास स्थानबध्द करण्यामध्ये रविंद्र शेळके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हडपसर पोलीस स्टेशन पुणे, चंद्रकांत बेदरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पी.सी.बी.गुन्हे शाखा, पुणे शहर यांचे अधिपत्याखालील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी सदरची कामगिरी पार पाडली. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी कडक प्रतिबंधक कारवाई करण्याचे धोरण अवलंबिले आहे.
मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी चालु वर्षामध्ये दहशत निर्माण करणा-या व सक्रिय अट्टल गुन्हेगारांवर एम.पी.डी.ए. कायद्यान्वये स्थानबध्दतेच्या ६७ कारवाया केल्या आहेत. यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगारांचे कृत्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे.

वैचारिक हिंसेच्या विरोधात उभे राहिले पाहिजे: तुषार गांधी 

पुणे :
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्या वतीने आयोजित  ‘गांधी दर्शन’ शिबिराला रविवारी चांगला प्रतिसाद मिळाला. कोथरूड येथील गांधी भवनच्या दुस-या मजल्यावरील सभागृहात हे शिबीर झाले. महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी( गांधी समजून घेताना ),डॉ. कुमार सप्तर्षी( सत्याग्रहशास्त्र ), प्रा.एस. इरफान हबीब( विचार आणि वारसा) या मान्यवरानी मार्गदर्शन केले.’गांधी दर्शन’ विषयावरचे हे आठवे शिबीर होते. 
रविवार, दि. १० डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १० ते सायंकाळी  ६ या वेळेत हे शिबीर झाले. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे विश्वस्त डॉ. शिवाजीराव कदम, प्रा.एम. एस. जाधव यांनी तुषार गांधी यांचा सत्कार केला. सुदर्शन चखाले यांनी प्रास्ताविक केले. नीलम पंडित यांनी संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन केले. डॉ.उर्मिला सप्तर्षी,डॉ प्रवीण सप्तर्षी, ज्ञानेश्वर मोळक,सुदर्शन चखाले (प्रकल्प प्रभारी) ,संदीप बर्वे (विश्वस्त सचिव, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी  ) ,सचिन पांडुळे (अध्यक्ष, युवक क्रांती दल पुणे शहर) , रोहन गायकवाड, नीलम पंडित, प्रसाद झावरे उपस्थित होते.

तुषार गांधी म्हणाले,’ गांधी विचाराचे विरोधक आज बलवान झाले आहेत आणि अपप्रचार करीत आहेत. आपली शक्ती कमी वाटली तरी आपण पूर्ण क्षमतेने गांधी विचार सर्वांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे.वैचारिक हिंसेच्या विरोधात आपण उभे राहिले पाहिजे कारण या वैचारिक हिंसेचा प्रवास प्रत्यक्ष हिंसेपर्यंत होतो.गांधीजी यांच्या बाबतीत महानपणावर बोलणारे खूप आहेत, ते इतरांप्रमाणेच सामान्य व्यक्ती होते. त्यांच्यातील साधारण व्यक्तीला आपण समजून घेतले तरच आपण त्यांच्यासारखे होवू शकतो’. 
‘लहानपणी, युवा अवस्थेत गांधीजी घाबरट होते. कोणतेही लौकिक यश त्यांना मिळाले नव्हते.पूर्ण आयुष्य त्यांनी स्वतःच्या उणीवा आणि कमकुवतपणाचा शोध घेतला आणि त्यावर मात केली. आपण देखील आपल्या उणिवांकडे दुर्लक्ष करता कामा नये.सविनय कायदेभंग सारख्या गोष्टी त्यांनी रोजच्या अनुभवातून शिकल्या. महात्मा गांधी यांचा अभ्यास हा त्यांच्या साधारण व्यक्ती असण्याचा अभ्यास आहे.आपण मोहनदास या साधारण व्यक्तीचा अभ्यास करीत नाही, त्यामुळे महात्मा गांधी या व्यक्तीवर होणाऱ्या वैचारिक हल्ल्यांना प्रत्युत्तर देवू शकत नाही.डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यातील मतभेद विनाकारण फुगवून सांगितले जात आहेत. सर्व महान व्यक्तींनी दलितांचे शोषण केले तसे आणखी एखाद्या महात्म्याकडून होवू नये, म्हणून डॉ.आंबेडकर हे दैवतीकरणाच्या विरोधात होते’,असेही त्यांनी सांगीतले.

व्यायामशाळेतील लोखंडी प्लेट तरुणाच्या डोक्यात मारली

सहकारनगर पोलिसांनी एकास अटक केली

पुणे : व्यायमशाळेत चेष्टा केल्याचा समज झाल्याने एकाने तरुणाच्या डोक्यात लोखंडी प्लेट मारली. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला असून, सहकारनगर पोलिसांनी एकास अटक केली. राहुल दीपक टेकवडे (वय २८, रा. बालाजीनगर, धनकवडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे.प्रणव मोरे (वय २३, रा. दत्तनगर, कात्रज) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. टेकवडे आणि मोरे ओळखीचे आहेत. दोघे एका व्यायामशाळेत जातात. मोरे चिडवत असल्याचा गैरसमज टेकवडेला झाला होता. व्यायामशाळेत दोघांमध्ये वाद झाला. टेकवडेने व्यायामशाळेतील दहा किलो वजनाची लोखंडी प्लेट माेरेच्या डोक्यात मारली. त्याला शिवीगाळ करुन टेकवडेने जीवे मारण्याची धमकी दिली. सहायक पोलीस निरीक्षक बेरड तपास करत आहेत.

रोहित पवारांचा गंभीर आरोप:म्हणाले – एमआयएम पैसे घेऊन महाविकास आघाडीचे उमेदवार पाडण्यासाठी भाजपला मदत करते

एमआयएम पक्ष हा भाजपकडून पैसे घेऊन निवडणुकीत आपले उमेदवार उभे करतो. तसेच, महाविकास आघाडीचे उमेदवार पाडण्यास एमआयएम भाजपला मदत करतो असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये रोहित पवारांनी हा आरोप केल्याने राज्यात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान रोहित पवाार पुढे बोलताना म्हणाले की, प्रकाश आंबेडकर हे संविधान वाचवण्याची भाषा करतात, 2019 मध्ये वंचित आघाडीने त्यांनी उमेदवार उभे केल्याने आमचे अनेक उमेदवार पडले. आमचा पण संविधान वाचवण्याचा उद्देश आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी खबरदारी घ्यावी, असा सल्ला त्यांनी आंबेडकर यांना दिला आहे.

‘त्या’ पत्राचा गैरवापर

आमदार रोहित पवार म्हणाले की, प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवारांना भाजपसोबत एकत्रित आणण्यासाठी प्रयत्न केल्याने त्यांच्यावर कारवाई होत नाही का?. पटेल यांच्यावर देखील गंभीर आरोप आहेत, असे म्हणत सवाल उपस्थित केला आहे. तर अजित पवार यांना विरोधी पक्षनेते बनवण्यासाठी राष्ट्रवादीच्या सर्वच आमदारांनी पत्रावर सह्या केल्या होत्या. मात्र, त्या पत्रात नेमके काय लिहले आहे, याबाबत कोणीही विचारणा केली नव्हती. त्यामुळे तेच पत्र चोरून सत्तास्थापने त्या पत्राचा अजित पवार गटाने दुरुपयोग केल्याचा दावा देखील पवारांनी केला आहे.

रोहित पवारांची भुजबळांवर टीका

रोहित पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (ट्विटर)वर काही स्क्रिनशॉट शेअर केले आहेत. छगन भुजबळ यांनी ज्या युट्यूबरचा दाखला देत रोहित पवार यांच्यावर हल्ला केला होता त्याच युट्यूबरने भुजबळ सत्तेत नव्हते तेव्हा त्यांच्यावरही जहरी टीका केली होती. याचेच हे स्क्रिनशॉट आहेत. याचा दाखला देत रोहित पवार यांनी भुजबळांवर निशाणा साधला.

रोहित पवारांचे टविट काय?

आदरणीय भुजबळ साहेब,

#युवा_संघर्ष_यात्रा युवांचे आणि सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन चालत असल्याने संघर्ष यात्रेला कुठेही विरोध झाला नाही. आपण भाजपची स्क्रिप्ट वाचण्यात इतके दंग झालात की भाजप ट्रोल आर्मीचा भाग असलेल्या आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचा अत्यंत खास असलेल्या एका युट्यूबरचा आपण दाखला देऊन माझ्यावर टीका केली. आपण ज्या घटनेचा उल्लेख केला, त्या घटनेबद्दल मी पंधरा दिवसांपूर्वीच स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे मी पुन्हा स्पष्टीकरण देऊन आपला वेळ घेणार नाही.

आपणास अजून आपल्याला नव्या सहकाऱ्यांचे खरे रूप कळलेले दिसत नाही. त्यामुळे स्क्रिप्ट वाचताना आपण थोडी काळजी घ्यायला हवी. याच युट्यूबरने सत्तेत जाण्यापूर्वी आपल्यावरही असेच बदनामी करणारे अनेक व्हिडिओ केले आहेत आणि त्यातील काही स्क्रीन शॉट इथे शेअर करत आहे. आपण ते व्हिडीओ एकदा जरूर बघावेत. त्यानंतर कदाचित आपण भाजपच्या स्क्रिप्ट वाचताना नक्की काळजी घ्याल, हा विश्वास आहे.

आले किती,गेले किती, संपले भरारा .. शिवसेनेचा कायम राहील रे दरारा .. संजय राऊतांनी दिला एकनाथ शिंदेंना स्पष्ट इशारा

चला पुण्यातली एक महापालिकेची निवडणूक मतपत्रिकेवर घेऊन दाखवा -भाजपला संजय राऊतांचे उघड आणि जाहीर आव्हान

पुण्याच्या ससून ड्रग्स रॅकेट मध्ये एकनाथ शिंदे चे 2 सहकारी मंत्री आर्थिक हितसंबंध

पुण्याचे ड्रग्जीस्ट बँकॉक केले जातेय…

महाराष्ट्रावर घाशीराम कोतवाल आणि त्यांच्या २ डेप्युटी कोतवालांचे राज्य

खा.संजय राऊत पुण्यातून लाईव्ह.. पुण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जाहीर मेळावा

पुणे-

शिवसेनेला शिल्लक सेना म्हणणाऱ्या फडणवीसांनी 2024 नंतर आपण शिल्लक राहणार का याचा विचार करावा, अशी घणाघाती टीका करताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी 2024नंतर महाराष्ट्राला आणि देशाला लागलेली पनवती जाईल, असं टीकास्त्र सोडलं आहे. पुणे येथील महात्मा फुले मैदानावर झालेल्या जाहीर सभेत राऊत बोलत होते.
उपस्थित शिवसैनिकांची विराट सभा हे बाळासाहेब ठाकरेचंच विराट रूप असल्याचं म्हणत संजय राऊत म्हणाले की, शिल्लक सेना काय आहे, हे पाहायचं असेल फडणवीस तर आता या. ही शिल्लक सेना एवढी मोठी असेल तर तुमच्याकडे फक्त कचराच गेलाय हे लक्षात घ्या. शिवसेना म्हणजे उसळता महासागर आहे, लाट आहे आणि त्याला कधीच ओहोटी लागत नाही. देवेंद्र फडणवीस या मैदानात आणि शिवसेना पुण्याच्या मैदानात कशी उतरली आहे, ते पाहा. येऊन पाहा ही काय शिवसेना आहे. तुम्ही आम्हाला शिल्लक सेना म्हणताय, पण 2024 नंतर तुम्ही शिल्लक राहणार आहात का, हा विचार करा. 2024नंतर आपण शिल्लक राहणार नाही, या महाराष्ट्रामध्ये ज्याला तुम्ही शिल्लक सेना म्हणताय ती शिवसेना आम्ही सत्तेवर आणून दाखवू. ही सभा पुण्यात होतेय. मला अनेकांनी सांगितलं की लोकं सांगतात की या मैदानावरच्या सभा यशस्वी होत नाहीत. यशस्वी होत नाहीत, ते तिथे गेलेले आहेत. आम्ही कायम यशस्वी आहोत. पाहा ना काय चित्र आहे, हे शिवसेनेचं विराट स्वरूप हे बाळासाहेबांचंच विराट रुप आहे. या सभेने एक गॅरंटी दिली आहे. मोदी खूप गॅरंटी असतात. आता ही शिवसेनेची गॅरंटी आहे. या पुण्यातून शिवसेनेचे किमान तीन आमदार जातील आणि लोकसभेचा खासदार हा भाजपचा नसेल ही आमची गॅरंटी आहे, असा ठाम निर्धारही यावेळी व्यक्त केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय प्रवासातलं हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं महत्त्वंही त्यांनी अधोरेखित केलं. ‘आज जे नरेंद्र मोदी तुम्हाला दिसताहेत, ती बाळासाहेब ठाकरेंची कृपा आहे. दंगलीनंतर अटल बिहारी वाजपेयी हे मोदींना मुख्यमंत्री पदावरून काढायला निघाले होते. त्यांना राजधर्माची आठवण करून देण्यासाठी अटलजी विसरले नव्हते. पण, जेव्हा अडवाणी बाळसाहेबांना विचारण्यासाठी मुंबईला आले की, नरेंद्र मोदींना मुख्यमंत्री पदावरून काढावं लागेल. अख्खं जग टीका करतंय. तेव्हा बाळासाहेबांनी सांगितलं की, नरेंद्र मोदी गेले तर गुजरातंही गेलं. तुम्ही हे करू नका. पण आज संपूर्ण देश सांगतोय की नरेंद्र मोदी वापस आया तो पूरा देश गया. ते परत आले तर लोकशाही जाईल, स्वातंत्र्य जाईल, सर्वकाही जाईल.’ अशा शब्दांत राऊत यांनी मोदींवर निशाणा साधला.

सुषमा अंधारे यांनी घेतली तळवडे दुर्घटनेतील रुग्णांच्या नातेवाईकांची भेट

 पिंपरी चिंचवड परिसरातील तळवडे येथील स्पार्कल कॅण्डल कारखान्यामध्ये झालेल्या स्फोटात गंभीर मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांच्या (Pune) नातेवाईकांची शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भेट घेऊन त्यांना मानसिक आधार देण्याचा प्रयत्न केला.यावेळी त्यांनी ससूनचे डीन डॉ. विनायक काळे यांच्याशी बोलून अत्यावस्थ रुग्णांची माहिती घेतली. या स्फोटात तब्बल 16 लोक जखमी झाले होते. यातील YCM रुग्णालयात दाखल केलेल्या सहा जणांचा मृत्यू झाला होता. उर्वरित दहा  ससून हॉस्पिटलला हलवण्यात आले होते त्यापैकी दोन रुग्णांचा मृत्यू आज झाला.उर्वरित आठ जणांची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. याप्रसंगी शहर प्रमुख संजय मोरे उपशहर प्रमुख आनंद गोयल शहर, शिव आरोग्य सेना आणि पदाधिकारी उपस्थित होते.

तळवडे रेडझोनमधील अनधिकृत ‘स्पार्कल’ मेणबत्ती (कँडल) तयार करणाऱ्या कंपनीतील स्फोटात सहा महिला कामगारांचा काल होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली. त्या घटनेतील १० जखमी रुग्णांवर ससून रुग्णालयात उपचार सुरू असून त्यापैकी आज २ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर उर्वरित आठ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे रुग्णालयामार्फत कळविण्यात आले आहे.

५४९ ग्रॅम चरस विक्रेत्यासह पकडले ..

पुणे- चरस विकण्यासाठी जाणाऱ्या गुन्हेगाराला चरस सह पुणे पोलिसांनी रंगेहाथ पकडले. याप्रकरणी पोलिसांनी सांगितले कि,’
दिनांक ०९/१२/२०२३ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक ०१ कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते या त्यांचे अधिनस्त स्टाफ सह विमानतळ पो स्टे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना, अंकित शिरीष चुडासमा (मिस्त्री) रा.लोहगाव पुणे हा त्याचे ओळखीचे लोकांना चरस हा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची बातमी पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते यांना मिळाल्याने त्यांनी त्याबाबत तात्काळ वरिष्ठांना कळविली असता, वरिष्ठांनी त्याबाबत खात्री करुन योग्य कायदेशिर कारवाई करणे बाबत मार्गदर्शन व सुचना दिल्या.त्याप्रमाणे वरिष्ठांनी दिलेले सुचना नुसार पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते व अधिनस्त स्टाफने विमानतळ पो स्टे हद्दीत इसम नामे अंकित शिरीष चुडासमा (मिस्त्री) वय ३७ वर्षे रा. लोहंगाव पुणे यांस पुणे लोहगाव येथील खेसे पार्क कडुन एअरपोर्ट कडे जाणारे रोडवरील कारमनची बिल्डींग सर्व्हे नंबर २५३ लोहगांव पुणे चे समोर सार्वजनिक रोडवर या ठिकाणहुन छापा मारून त्यास ताब्यात घेवुन त्याचे कडुन एकुण किं.रु.५,७०,०००/-चा ऐवज त्यामध्ये ५४९ ग्रॅम चरस हा अंमली पदार्थ, ५,४९,०००/- चा एक ईलेक्ट्रॉनिक वजन काटा १०००/- रु चा एक मोबाईल फोन २०,०००/- कि.रु.चा ऐवज जप्त केले असुन त्याचे विरुध्द विमानतळ पो स्टे येथे गुन्हा एन डी पी एस अॅक्ट कलम ८ (क), २०(ब) (ii) (ब) २९ नोंदविण्यात आला आहे.
ही कारवाई ही पोलीस आयुक्त रितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, रामनाथ पोकळे पोलीस उप आयुक्त, गुन्हे,अमोल झेंडे, सहा पोलीस आयुक्त, गुन्हे १, सुनिल तांबे यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक, १ गुन्हे शाखा पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते, पोलीस अंमलदार विशाल शिंदे, योगेश मोहिते, मनोज कुमार साळुंके, मारुती पारधी, पांडुरंग पवार, राहुल जोशी, ज्ञानेश्वर घोरपडे, प्रविण उत्तेकर, विशाल दळवी, संदिप शिर्के, संदेश काकडे, नितेश जाधव, सचिन माळवे, यांनी केली आहे.

पिस्तुल घेऊन जांभुळवाडी पाझर तलावाजवळ आलेल्या एकाला पकडले

अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी पिस्टल व चार काडतुसे जवळ बाळगणा-या एकाला पकडले आहे , या संदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि,’दिनांक ०८/१२/२०२३ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक ०१ कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती अश्विनी सातपुते या त्यांचे अधिनस्त स्टाफसह भारती विदयापीठ पो स्टे कार्यक्षेत्रात पेट्रोलिंग करीत असताना अंमली पदार्थ विरोधी पथकातील अंमलदार मनोज साळुंके व विशाल शिंदे यांना बातमी मिळाली की, पुणे आंबेगाव खुर्द मसाला कंपनीजवळ जांभुळवाडी पाझर तलावा जवळ रेकॉर्डवरील गुन्हेगार ओकांर वाघमारे याने त्याचा भाऊ विष्णु वाघमारे याचेकडे एक लोखंडी पिस्टल व काडतुसे दिली असुन तो ते घेवुन पुणे आंबेगाव खुर्द जांभुळवाडी पाझर तलावा जवळ येथे येणार आहे नमुद प्रमाणे मिळालेली बातमी पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते यांनी तात्काळ वरिष्ठांना कळवुन त्याप्रमाणे तात्काळ कारवाई करण्याचे सुचना दिल्या.
त्यानुसार पोलीस निरीक्षक श्रीमती अश्विनी सातपुते व स्टाफने मिळालेले बातमीनुसार छापा कारवाई
करुन इसम नामे विष्णु बाळु वाघमारे, रा. शनिनगर, पुणे यांस त्याचा भाऊ ओकांर बाळु वाघमारे रा सदर याने त्याचे कडे बेकायदेशीररित्या ठेवण्यास दिलेला एक लोखंडी देशी गावठी बनावटीचे पिस्टल, त्यामध्ये चार काडतुसे, एक अॅपल कंपनीचा मोबाईल फोन असा एकुण १,११,०००/- रु चा ऐवज जप्त करुन त्यास अटक करुन त्याचे विरुध्द भारती विदयापीठ पो स्टे गु र नं ७९३/२०२३ भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५), महाराष्ट्र पोलीस का. कलम ३७ (१) सह १३५ प्रमाणे गुन्हा नोंद करुन त्यास गुन्हयात अटक केली आहे.
ही कारवाई ही पोलीस आयुक्त रितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, रामनाथ पोकळे पोलीस उप आयुक्त, गुन्हे, अमोल झेंडे, सहा पोलीस आयुक्त, गुन्हे १, सुनिल तांबे यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक, १ गुन्हे शाखा पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक श्रीमती अश्विनी सातपुते, पोलीस अंमलदार विशाल शिंदे, योगेश मोहिते, मनोज कुमार साळुंके, मारुती पारधी, पांडुरंग पवार, राहुल जोशी, ज्ञानेश्वर घोरपडे, प्रविण उत्तेकर, विशाल दळवी, संदिप शिर्के,
संदेश काकडे, नितेश जाधव, सचिन माळवे, यांनी केली आहे.

अश्लील मेसेज करुन सहकारनगरमधील महिलेचा विनयभंग

पुणे : कंपनीच्या केटरींग स्टाफमधील एकाने ज्येष्ठ महिलेला अश्लील टेक्स्ट मेसेज करुन विनयभंग केल्याची प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी उत्तर प्रदेशातील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.7) सायंकाळी पावणे सातच्या सुमारास महिलेच्या राहत्या घरी घडला आहे.याबाबत सहकारनगर येथे राहणाऱ्या 65 वर्षीय महिलेने पर्वती पोलीस ठाण्यात शुक्रवारी फिर्य़ाद दिली आहे. पोलिसांनी सचिन दिलीप वर्मा/सोनी (रा. मु.पो. देवगाह, उत्तर प्रदेश) याच्यावर आयपीसी 509 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी महिलेचे आयएसजी हॉस्पिटॅलिटी प्रा. लि. नावाची कंपनी आहे. त्यांनी गोवा येथील वेदांता कंपनीमध्ये काम घेतले आहे.आरोपी सचिन वर्मा हा त्याच्या कंपनीच्या केटरींग स्टाफमधील कर्मचारी आहे.गुरुवारी सायंकाळी फिर्य़ादी या त्यांच्या घरी असताना मोबाइलवर टेक्स मेसेज आला.आरोपीने महिलेला अश्लील टेक्स मेसेज करुन त्यांच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.पुढील तपास पोलीस निरीक्षक निकाळजे करीत आहेत.

पिस्तुल बाळगून फिरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पकडले

पुणे :पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला समर्थ पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून एक पिस्टल व काडतुस जप्त केले आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि.8) सोमवार पेठ पोलीस चौकी जवळील समर्थ व्यायाम मंदिरासमोर केली. सिद्दीक रफिक खान (वय-24 रा. शिवनेरीनगर, कोंढवा खुर्द) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. 

समर्थ पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी हद्दीत पेट्रोलींग करत होते. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक सौरभ थोरवे यांना माहिती मिळाली की, सोमवार पेठ पोलीस चौकी जवळ असलेल्या समर्थ व्यायाम मंदिरासमोर रेकॉर्डवरील गुन्हेगार सिद्दीक खान मित्राला भेटण्यासाठी येणार आहे. त्याच्याकडे पिस्टल आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता एक पिस्टल व एक काडतूस असा एकूण 10 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीवर यापूर्वी एक शरिराविरुद्धचा गुन्हा दाखल आहे.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग प्रविणकुमार पाटील ,पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 संदीप सिंह गिल , सहायक पोलीस आयुक्त अशोक धुमाळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर,पोलीस निरीक्षक गुन्हे प्रमोद वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखालीपोलीस उपनिरीक्षक सुनिल रणदिवे , सौरभ थोरवे, अक्षयकुमार गोरड , दिपक यादव ,पोलीस अंमलदार दत्तात्रय भोसले, प्रमोद जगताप, गणेश वायकर, संतोष डमाले, रोहीदास वाघेरे, रहीम शेख, हेमंत पेरणे, अमोल शिंदे, वैशाली परदेशी, रागिनी शिंदे यांच्या पथकाने केली.

कामगार संघटनेच्या 16 लाखांचा अपहार राष्ट्रीय श्रमिक आघाडी संघटनेच्या खजिनदाराला अटक

पुणे-राष्ट्रीय श्रमिक आघाडी संघटनेच्या खजिनदाराने बँक खात्यातून ऑनलाईन पद्धतीने 16 लाख 8 हजार रुपये ट्रान्स्फर करुन संघटनेची आणि कामगार नेते यशवंत भोसले यांची फसवणूक केली. याप्रकरणी संघटनेच्या खजिनदाराला पोलिसांनी अटक केली आहे. पिंपरीतील संत तुकाराम नगर येथील राष्ट्रीय श्रमिक आघाडी संघटनेच्या कार्यालयात सप्टेंबर 2022 ते 8 डिसेंबर 2023 या कालवधित फसवणुकीचा हा प्रकार घडला आहे.

हेमंत विलास माने (वय-25 रा. मु.पो. काशीळ, ता.जि. सातारा) याच्यावर आयपीसी 408, 420 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. याबाबत कामगार नेते यशवंत आनंदराव भोसले (वय-60 रा. स्वप्ननगरी, उद्यम नगरी, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कामगार नेते यशवंत भोसले हे राष्ट्रीय श्रमिक आघाडी संघटनेचे अध्यक्ष आहेत.
या संघटनेचे पिंपरीतील संत तुकाराम नगर येथे कार्य़ालय आहे. कार्यालयात हेमंत माने हा संघटनेचा खजिनदार
म्हणून मानधन तत्वावर काम करत होता. संघटनेचे बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये खाते आहे.
या खात्यातून खजिनदार हेमंत माने याने अप्रामाणिकपणे ऑनलाईन पद्धतीने 16 लाख 8 हजार 19 रुपये परस्पर
स्वत:च्या खात्यावर व इतर व्यक्तींच्या खात्यावर ट्रान्सफर करुन घेतले. संघटनेचे अध्यक्ष म्हणून फिर्य़ादी यशवंत भोसले
व राष्ट्रीय श्रमिक संघटनेतील पदाधिकारी व सदस्य यांचा विश्वासघात करुन फसवणूक केली,
असे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.