Home Blog Page 1330

रोहित पवार पोलिसांच्या ताब्यात…युवा संघर्ष यात्रेच्या समारोप प्रसंगी सरकारने निवेदन न स्वीकारल्याने राडा …

0

नागपूर – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेच्या सांगता समारंभानंतर मोठा राडा पाहायला मिळाला. रोहित पवार यांनी राज्य सरकारकडे काही मागण्या केल्या आहेत. या मागण्या स्वीकारण्यासाठी राज्य सरकारचे जबाबदार व्यक्ती हजर नसल्याने, रोहित पवार आणि युवक राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. जर कोणी जबाबदार व्यक्ती निवेदन स्वीकारण्यास येणार नसेल तर आम्ही विधानभवनात जाऊन निवेदन देऊ, असं रोहित पवार म्हणाले होते.  तेव्हाच रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा पोलिसांनी अडवली त्यावेळी पोलिस व युवकांध्ये वाद सुरू झाला.आणि रोहित पवारांसह अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी तायात घेऊन गाडीतून नेले .

800 किलोमीटर प्रवास करुन आलेली युवा संघर्ष यात्रेचा आज नागपूरात प्रवेश झाला. त्यानंतर शरद पवार यांच्या उपस्थितीत सभेत भाषण झाली. यावेळी रोहित पवार यांनी सरकारला इशारा दिला होता की, आमचे निवेदन स्वीकारण्यासाठी सरकारने या ठिकाणी यावे, नाहीतर आम्ही विधानभवनात प्रवेश करू. त्यानंतर देखील सरकारकडून दखल घेतली गेली नाही. त्यानंतर कनिष्ठ पदावरील अधिकारी पाठवून आमचे निवेदन स्वीकारणे म्हणजे आमचा अपमान आहे. असे रोहित पवार म्हणाले. त्यानंतर सर्व युवक संतप्त झाले. त्यांनी विधानभवनाकडे मोर्चा वळवला. तेव्हा त्यांना पोलिसांनी अडवले.

पोलिसांकडून धरपकड सुरु

यावेळी युवा संघर्ष यात्रेतील तरुण संतप्त झाले. अखेर पोलिसांनी युवकांची धरपकड सुरु पोलिस व्हॅनमध्ये टाकण्याचे काम सुरु झाले. त्यामुळे रोहित पवार, रोहित पाटील हे देखील आक्रमक झाले. आम्ही शेतकऱ्यांचे व युवकांचे प्रश्न मांडत आहोत. आम्ही काही गुन्हा केला आहे का, असा सवाल त्यांनी केला? युवकांना तुम्ही ताब्यात का घेत आहात? यावर पोलिस व रोहित पवार यांच्यात शाब्दिक वाद सुरु झाला.

युवकांना न्याय मिळत नसेल तर आम्ही काय करायचे, तहसीलदार यांना पाठवून आमचा अपमान का करत आहात, असा सवाल देखील रोहित पवार यांनी केला. आमच्या प्रश्नावर सरकार चर्चा करणार आहे की नाही, असेही ते म्हणाले. तहसीलदार व भाजपच्या शहराध्यक्षांना पाठवून हे युवकांचा अपमान करु पाहत आहेत. शिंदे सरकार कमजोर आहे का? असे म्हणत ते आक्रमक झाले.

किशोरी शहाणेंनी घेतला भाजपचा झेंडा हाती …

0

भाजपा चित्रपट कामगार आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्र सहसंयोजक पदी केतन महामुनी यांची नियुक्ती

मुंबई : काल मुंबई नरिमन पॉईंट येथील भाजपच्या प्रदेश कार्यालयामध्ये मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये भाजप कामगार मोर्चा महाराष्ट्र प्रदेश संलग्न भाजपा चित्रपट कामगार आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा नियुक्ती पत्र प्रदान सोहळा पार पडला. या कार्यक्रमास प्रदेश महामंत्री श्री. विक्रांतजी पाटील हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. मराठी चित्रपट सृष्टी तसेच माध्यमक्षेत्रात कार्यरत असणारे पुण्यातील केतन महामुनी यांना कामगार मोर्चा प्रदेशाध्यक्ष विजयभाऊ हरगुडे तसेच चित्रपट आघाडी संयोजक समीर दीक्षित यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. भविष्यात चित्रपट सृष्टीतील सर्व असंघटित कामगारांसमवेत निर्माता, कलाकार दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी चित्रपट कामगार आघाडीच्या माध्यमातून सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे महामुनी यांनी सांगितले. तसेच या क्षेत्रातील कलाकार, कामगार, तंत्रज्ञ यांना मोठ्या प्रमाणात भाजपा चित्रपट कामगार आघाडीत सामील होण्याचे आवाहन हि त्यांनी यावेळी केले.

या प्रसंगी भाजपा कामगार मोर्चा प्रदेशाध्यक्ष विजयभाऊ हरगुडे यांनी यावेळी नवनियुक्त कार्यकारीणीला विशेष मागदर्शन केले. चित्रपट आघाडी प्रदेश संयोजक समीर दीक्षित यांनी याप्रसंगी नवनियुक्त कार्यकारीणीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी सुप्रसिद्ध अभिनेत्री व निर्माता किशोरीताई शहाणे यांनी भाजपा चित्रपट कामगार आघाडीमध्ये प्रवेश केला. त्यांची वरिष्ठ उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

याप्रसंगी सुप्रसिद्ध दिग्दर्शक एन. चंद्रा, नाटक निर्माते व समाज सेवक अनंत पणशीकर, दिग्दर्शक रमेश मोरे, निर्माते दीपक रुईया, अभिनेते कासम अली, डिझायनर आत्मानंद गोलतकर, निर्माते-आयटी प्रोफेशनल सचिन पैठणकर, चित्रपट कामगार कायदा सल्लागार अजय पाटोळे, निधी सल्लागार सदानंद शेट्टी, कायदा जुबी मॅथ्यू, प्रदेश प्रभारी सत्यवान गावडे, सहसंयोजक प्रीती व्हिक्टर, गीतांजली ठाकरे, नितीन कोदे, संचित यादव, प्रदेश समन्वयक शौकत पठाण, शिरीष राणे, चंद्रकांत विसपुते, रवींद्र महाडिक तसेच सर्व प्रमुख नवनियुक्त पदाधिकारी आणि हिंदी – मराठी सिनेसृष्टीतील अनेक नामवंत तंत्रज्ञ आणि कलाकार मंडळी यावेळी उपस्थित होते.

शेफलर इंडियाने दुसऱ्या वार्षिक सोशल इनोवेटर फेलोशिप प्रोग्रामच्या विजेत्यांची घोषणा केली 

·         १० प्रभावी कल्पनांची निवड करून त्यांचा पुढील विकास आणि इन्क्युबेशनसाठी पुरस्कृत करण्यात आले.

·         सर्वसमावेशक वृद्धी आणि विकास सक्षम करण्यासाठी सोशल इनोवेशनला प्रोत्साहन देणारा मंच.

 पुणे १२ डिसेंबर२०२३:  शेफलर इंडिया लिमिटेडने (बीएसई: ५०५७९०, एनएसई: SCHAEFFLER) आपला वार्षिक उपक्रम सोशल इनोवेटर फेलोशिप प्रोग्रामच्या विजेत्यांची घोषणा केली आहे. च्या सहयोगाने सुरु करण्यात आलेला हा उपक्रम शेफलार इंडियाच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीअंतर्गत राबवण्यात येत आहे. समाजातील महत्त्वपूर्ण समस्यांचे निवारण करण्यासाठी चालवल्या जाणाऱ्या सोशल इनोवेशन्सना वाढवण्यासाठी, पाठिंबा देणे हा याचा उद्देश आहे.

गेल्या वर्षी या उपक्रमाची यशस्वी सुरुवात करण्यात आली आणि शेफलरने समुदायांमध्ये सकारात्मक परिवर्तन घडवून आणतील अशा नाविन्यपूर्ण उपाययोजना शोधून त्यांना चालना देण्याचे मिशन सुरु केले.

पर्यावरणात्मक शाश्वततेपासून तंत्रज्ञानावर आधारित सामाजिक उपाययोजनांपर्यंत विविध क्षेत्रांमध्ये लक्षणीय नावीन्य दर्शवणाऱ्या १० विजेत्यांची निवड यंदाच्या वर्षीच्या १३० प्रवेशिकांमधून करण्यात आली. पुरस्कृत करण्यात आलेल्या प्रकल्पांचे दृष्टिकोन अनोखे आहेत. सामाजिक नावीन्य आणि उद्यमशीलता यांच्या इकोसिस्टिमला चालना देण्याप्रती शेफलर इंडियाची वचनबद्धता या प्रकल्पांमधून दिसून येते.

पुरस्कारांसाठीच्या ज्युरीमध्ये शेफलर इंडियाच्या कर्मचाऱ्यांच्या पॅनलचा समावेश होता. शेफलर इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ श्री हर्ष कदम आणि शेफलर इंडियाचे व्हाईस प्रेसिडेंट – एचआर आणि हेड – सीएसआर श्री शंतनू घोषाल ज्युरीचे अध्यक्ष होते. करो संभवचे संस्थापक, प्रसिद्ध सामाजिक उद्योजक श्री. प्रांशू सिंघल हे देखील यावेळी उपस्थित होते. 

शेफलर इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ श्री हर्ष कदम यांनी सांगितले, समाजामध्ये सार्थक परिवर्तन घडवून आणेल अशा नावीन्यपूर्णतेला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही बांधील आहोतसोशल इनोवेटर फेलोशिप प्रोग्राम सामाजिक प्रगतीप्रती आमची निष्ठा दर्शवतोसहभागी झालेल्या सर्वांनी दाखवलेली हुशारीकल्पकता आणि निर्धार याचा आम्हाला अभिमान वाटतोहे निवडण्यात आलेले प्रकल्प आपल्या काळातील सर्वाधिक गंभीर समस्यांचे निवारण करण्याची नाविन्यपूर्ण विचारांमध्ये असलेली क्षमता दर्शवतातशेफलर इंडियामध्ये आम्ही शाश्वतपरिणामकारक बदल घडवून आणणाऱ्या अग्रणी कल्पनांना सक्षम करण्यावर विश्वास ठेवतो.”

करो संभवचे संस्थापक श्रीप्रांशू सिंघल यांनी सांगितले, “शेफलर इंडियाच्या सोशल इनोवेशन फेलोशिप प्रोग्रामचा भाग असल्याचा मला अभिमान आहेचक्राकार अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या माझ्या कामाशी हा प्रकल्प सुसंगत आहेया सर्व विजेत्यांची कल्पकता आणि क्षमता आठवण करून देतात की नाविन्यपूर्ण विचारसरणी आपल्या समाजावर खूप मोठा प्रभाव निर्माण करू शकतेया सर्व फेलोजचे मनःपूर्वक अभिनंदनइतक्या प्रभावी परिवर्तनाला चालना देण्याच्या शेफलर इंडियाच्या वचनबद्धतेबद्दल मी त्यांचे देखील अभिनंदन करतो.”

विजेते:

1. कार्तिकज्योती एम आणि योगराज जोशुआ के – टॉक ॅली: एक नाविन्यपूर्ण हातमोजे उपकरण जे सांकेतिक भाषेचे बोलल्या जाणार्‍या भाषेत भाषांतर करते, कर्णबधिर व्यक्तींसाठी इतरांसोबत संवाद साधणे सुलभ करते.

2. निधी – नेमा एआय: ब्रेन स्कॅन तंत्रज्ञानाद्वारे शिकण्याचे अनुभव वैयक्तिकृत करणारा अत्याधुनिक आरोग्य-एडटेक प्लॅटफॉर्म.

3. अविनाश यादव आणि अर्पित क्षीरसागर – इलेक्टिका: इलेक्ट्रिक वाहन चार्जिंगची कार्यक्षमता वाढवणारी क्रांतिकारी ईव्ही बॅटरी स्वॅपिंग सेवा.

4. ऐश्वर्या कर्नाटकी आणि परीक्षित सोहोनी – ग्लोवॅट्रिक्सस फिफ्थ सेन्स: रिअल-टाइममध्ये सांकेतिक भाषेचा अर्थ लावण्यासाठी स्मार्टवॉच तंत्रज्ञान आणि हातमोजे एकत्र करणारे उपकरण.

5. वगीशा ठाकूर आणि सुब्रह्मण्य शास्त्री – थिंकगुड: लघु, मध्यम व्यवसाय आणि प्रभावशाली संस्थांसाठी ब्रँडिंग आणि संवाद धोरणे प्रदान करणारे डिजिटल व्यासपीठ.

6. शिवम बत्रा आणि नागेन प्रताप सिंग – सर्कुललिफ्ट: एआय आणि ऑटोमेशनद्वारे प्लास्टिक कचरा व्यवस्थापनात क्रांती घडवून आणण्याचे उद्दिष्ट असलेला तंत्रज्ञान मंच.

7. वेंकट रमण मट्टपर्थी – ब्लू लोटस सोल्यूशन्स: हवामान बदलाविरोधात लढण्यासाठी शाश्वत उपाय विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.

8. डॉसर्जेराव दोलताडे – लिकश्युअर: कॅव्हिटेशन तत्त्वांचा वापर करून औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया करण्यासाठी एक अभिनव दृष्टीकोन.

9. अक्षय कावळे आणि अक्षय वैराळे– अॅग्रोश्युअर प्रॉडक्ट्स अँड इनोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेड: महिला व पुरुष दोघांनाही सहजपणे वापरता येतील अशी शेती उपकरणे आणून, शेतीमध्ये समावेशकता वाढवणे.

10. सिद्धेश साकोरे आणि स्वप्नाली ढवळे– अॅग्रो रेंजर्स: मातीचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि कृषी वनीकरण मॉडेल्सची अंमलबजावणी करण्यासाठी शेतकऱ्यांसोबत काम करणे.

प्रत्येक विजेत्याला शेफलर इंडियाकडून मार्गदर्शन, नेटवर्किंग संधी आणि नाविन्यपूर्ण कल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी फंडिंग या स्वरूपात मदत मिळेल. सर्व १० विजेत्यांना त्यांच्या उपाययोजना अधिक विकसित करता याव्यात आणि वाढवता याव्यात यासाठी मदत म्हणून भारतातील एक आघाडीचे बिझनेस स्कूल असलेल्या आयआयएम अहमदाबादच्या सेंटर फॉर इनोवेशन, इन्क्युबेशन आणि एन्ट्रप्रिन्युअरशिपमध्ये तीस आठवड्यांची हायब्रिड मेंटॉरशिप मिळेल.

सोशल इनोवेटर फेलोशिप प्रोग्रामसह शेफलर इंडियाच्या सर्व सीएसआर उपक्रमांमधून कंपनीची शाश्वत विकासाप्रती बांधिलकी व जबाबदारीचे भान असलेले कॉर्पोरेट नागरिक म्हणून त्यांची भूमिका अधोरेखित केली जाते. आपल्या या प्रयत्नांमधून शेफलर इंडिया आपल्या समुदायांच्या सामाजिक व आर्थिक विकासात लक्षणीय योगदान देत आहे.

फेडेक्स ने IIT बॉम्बे आणि IIT मद्रासला USD10 दशलक्ष देण्याचे आश्वासन दिले आहे

मुंबईडिसेंबर 12, 2023 — फेडेक्स एक्सप्रेस (FedEx), FedEx Corp. (NYSE: FDX) ची उपकंपनी आणि जगातील सर्वात मोठ्या एक्सप्रेस वाहतूक कंपन्यांपैकी एक. या कंपनीने तंत्रज्ञान (IIT) बॉम्बे आणि मद्रास या भारतीय संस्थांना USD 10 दशलक्ष कॉर्पोरेट सामाजिक दायित्व अनुदान देण्याचे वचन दिले आहे. हे सहकार्य प्रगत तंत्रज्ञान, प्रतिभा, टिकाव आणि स्टार्टअप वाढ वाढवण्यासाठी FedEx च्या वचनबद्धतेची पुष्टी करते.

हा उपक्रम जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त “सेंटर ऑफ एक्सलन्स” (COE) च्या स्थापनेला हातभार लावेल, जो दोन्ही IIT कॅम्पसमधील भौतिक पायाभूत सुविधांमध्ये धोरणात्मकदृष्ट्या स्थित आहे. हे COE एकाच वेळी डायनॅमिक टॅलेंट पूलचे पालनपोषण करताना, पदव्युत्तर आणि डॉक्टरेट विद्यार्थ्यांसाठी फेलोशिप कार्यक्रमांना समर्थन देत आणि भारतातील स्टार्टअप इकोसिस्टमच्या वाढीस सक्रियपणे उत्प्रेरित करताना संशोधन आणि विकासाचे नेतृत्व करेल.

FedEx कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आणि सीईओ राज सुब्रमण्यम यांनी या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणतात की, “FedEx येथे, आम्ही प्रत्येकासाठी पुरवठा साखळी अधिक स्मार्ट बनवण्याची आकांक्षा बाळगतो. लॉजिस्टिक लँडस्केपला पुन्हा आकार देण्याच्या पलीकडे, आम्ही अर्थपूर्ण योगदान देण्यास वचनबद्ध आहोत. आम्हाला माहित आहे की या प्रतिष्ठित संस्थांसोबतचे आमचे सहकार्य ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल.”

आयआयटी बॉम्बेचे संचालक प्रा. सुभाषिस चौधरी म्हणाले, “आयआयटी बॉम्बे स्केलेबल आणि फ्युचरिस्टिक सोल्यूशन्सच्या विकासाला पाठिंबा देण्यासाठी आणि उद्योगांच्या प्रगतीसाठी आणि मोठी आव्हाने सोडवण्यासाठी तरुण, पात्र विचारसरणी सक्षम करण्यासाठी उद्योग नेत्यांसोबत काम करण्यासाठी कटिबद्ध आहे. राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर त्यांचा सामना केला जात आहे. FedEx सोबतचे आमचे सहकार्य हे प्रगत लॉजिस्टिकच्या विकासाला समर्थन देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. पुरवठा साखळींचे डिजिटल परिवर्तन आणि डिजिटल जुळ्यांचे एकत्रीकरण यासारख्या काही अत्यंत महत्त्वाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी हे प्रयत्न खूप पुढे जातील आणि सखोल प्रभाव निर्माण करतील.”

प्रो. व्ही. कामकोटी, संचालक, IIT मद्रास, म्हणाले, “FedEx सह एकत्रितपणे आम्ही एक हब तयार करण्याचा निर्धार केला आहे जिथे तंत्रज्ञान आणि प्रतिभा शाश्वत लॉजिस्टिक्स चालवण्यासाठी एकत्र येतील. ऑपरेशन्स रिसर्च आणि नेटवर्क प्लॅनिंगवर विशेष लक्ष केंद्रित करून, आम्ही कार्यक्षमतेला अनुकूल बनविणारे, धोरणात्मक नियोजन वाढवणे आणि शाश्वत लॉजिस्टिक प्रगतीच्या व्यापक लँडस्केपमध्ये योगदान देणार्‍या घडामोडींचे नेतृत्व करण्याचे आमचे ध्येय आहे.”

FedEx आणि IIT बॉम्बे आणि मद्रास यांच्यातील सहयोग तंत्रज्ञान आणि भारतातील प्रतिभा संचाचा समन्वय साधून लॉजिस्टिक उद्योग मानके पुन्हा परिभाषित करण्यासाठी तयार आहे. नावीन्यपूर्ण आणि डिजिटल बुद्धिमत्तेच्या अखंड एकीकरणाद्वारे क्रॉस-बॉर्डर लॉजिस्टिकच्या गुंतागुंतांवर लक्ष केंद्रित करणे यावर प्राथमिक लक्ष केंद्रित केले जाईल.

वाचन संस्कृती संवर्धनासाठी चंद्रकांतदादा पाटील यांचा पुढाकार:कोथरुडकरांसाठी विशेष योजना

पुणे-राष्ट्रीय पुस्तक न्यासा’च्या वतीने फर्ग्यूसन महाविद्यालयाच्या मैदानावर १६ ते २४ डिसेंबर २०२३ दरम्यान ‘पुणे पुस्तक महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले असून, वाचन संस्कृतीच्या संवर्धनासाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. पुणे पुस्तक महोत्सवात जास्तीत जास्त वाचकांनी भेट देऊन खरेदी करावी, यासाठी कोथरुड मतदारसंघातील प्रत्येक व्यक्तीला १०० रुपयाचे कुपन देण्याचा निर्णय नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी घेतला आहे.

पुणे हे विद्येचे माहेरघर आहे, पण त्यासोबतच वाचनप्रेमी मंडळींचे ही शहर आहे. मात्र, त्यामुळे त्याला प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्यासाठीच ‘राष्ट्रीय पुस्तक न्यासा’च्या वतीने पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानात १६ ते २४ डिसेंबर २०२३ दरम्यान सकाळी ११ ते सायं. ८ या वेळेत पुणे पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या महोत्सवामध्ये राष्ट्रीय कीर्तीच्या प्रकाशकांबरोबरच इंग्रजी, हिंदी, मराठी, गुजराथी, कन्नड अशा देशभरातील २२ विविध भाषांमधील पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. तसेच या महोत्सवात हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज प्रदर्शनीचा देखील समावेश असणार आहे. त्यामुळे या पुस्तक प्रदर्शनाला जास्तीत जास्त पुणेकरांनी भेट द्यावी; यासाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी देखील पुढाकार घेतला आहे.

पुणे पुस्तक महोत्सवात कोथरुडकरांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन पुस्तके खरेदी करण्यासाठी विशेष योजना राबविण्याचा निर्णय नामदार पाटील यांनी घेतला आहे. या उपक्रमाअंतर्गत कोथरुड मधील वाचन प्रेमी मंडळींनी ‘पुणे पुस्तक महोत्सावा’स भेट देऊन प्रत्येक व्यक्तीला पुस्तक खरेदीसाठी १०० रुपयांचे डिस्काऊंट कुपन दिले जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात पुस्तके खरेदी करुन, या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

सदर पुस्तक खरेदीचे कुपन दिनांक १६ ते २२ डिसेंबर दरम्यान नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोथरुड, बाणेर मधील जनसंपर्क कार्यालयात सकाळी ११ ते ६ वेळेत उपलब्ध असणार आहेत. यासाठी नागरिकांना आधार कार्डची झेरॉक्स प्रत द्यावी लागणार आहे.

दरम्यान, पुण्यात होत असलेल्या अभिनव उपक्रमांमध्ये ‘शांतता, पुणेकर वाचत आहेत,’ हा ऐतिहासिक उपक्रम देखील होणार आहे. दिनांक १४ डिसेंबरला दुपारी १२ ते १ या वेळेत एक तास पुणेकरांनी आपल्या आवडीच्या पुस्तकाचे वाचन करायचे, असे आवाहन करण्यात येत आहे. यामध्ये नामदार चंद्रकांतदादा पाटील हे देखील सहभागी होणार असून, सर्व पुणेकरांनी ही वाचन संस्कृती वाढीस लागण्यासाठी १४ डिसेंबरच्या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन नामदार पाटील यांनी केले आहे.

ससून रुग्णालयातील वरिष्ठ अधिकारी व पोलीस अधिकारी यांचा तस्करीत सहभाग नाही -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

हलगर्जी,निष्काळजीपणामुळे काहीजण निलंबित

नागपूर, दि. १२ : पुणे येथील ससून सर्वोपचार रुग्णालय येथील ड्रग्ज प्रकरणी रुग्णालयाच्या अधिष्ठातांची चौकशी सुरू असून चौकशीत पुरावे असतील तर बडतर्फीची कारवाई करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले.उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, अमली पदार्थ तस्करी प्रकरणी तपासात ससून रुग्णालयातील वरिष्ठ अधिकारी व पोलीस अधिकारी यांचा तस्करीत सहभाग असल्याचे अद्यापपर्यंत निष्पन्न झालेले नाही. आरोपीच्या संरक्षण कामी नेमलेले अधिकारी व कर्मचारी यांनी कर्तव्यात हलगर्जीपणा व निष्काळजीपणा केल्याने दोन पोलीस अधिकारी व दोन कर्मचारी यांना बडतर्फ केले असून सहा कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई सुरू केली आहे.

विधानपरिषदेत पुणे येथील ससून रुग्णालयाच्या गेटवरून कोट्यवधी रुपयांचे अंमली पदार्थ पोलिसांनी जप्त केल्याबाबत सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.

ससून रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कैद्याकडून अमली पदार्थ तस्करीचे रॅकेट चालवले जात असल्याचा प्रकार गुन्हे शाखेने उघडकीस आणला असून ससून रुग्णालयाच्या गेटवरून २ कोटी १४ लाखांचे मेफेड्रॉन हा अमली पदार्थ पोलिसांनी जप्त केला आहे. अशा प्रकारच्या कारवाया राज्यात करण्यात येत आहेत. त्यामध्ये विविध घटना उघडकीस येत आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. राज्यातील काही भागात बंद असलेल्या कंपन्यांमध्ये ड्रग्ज तयार करण्यात आले असल्याचे निदर्शनास येत आहे. संबंधितांवर कारवाई करण्यात आली आहे. यापुढे संशयित हालचाली होत असलेल्या राज्यातील बंद कारखान्यांची तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आले असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

घटनेचे गांभीर्य विचारात घेऊन पुणे अधिष्ठाता डॉ. ठाकूर  यांच्याकडील पदभार काढून घेऊन त्यांची विभागीय चौकशी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ललित पाटील विविध व्याधीने ग्रस्त होता. त्याच्यावर मोठी शस्त्रक्रिया करण्यात आलेली नाही. याबाबत कोणालाही कोणत्याही प्रकारची माहिती देऊ नका अशा स्वरूपाची धमकी ससूनचे अधिष्ठाता यांनी तेथील डॉक्टर व कर्मचाऱ्यांना दिल्याची तक्रार आली नसल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले.

श्री. फडणवीस म्हणाले की, अमली पदार्थ तस्करी हे आंतरराष्ट्रीय षडयंत्र असून याचे पुरावेही सापडले आहेत. इतर राज्याच्या समन्वयाने कारवाई करण्यात येत आहे. हुक्का पार्लर बंद करण्यात आले आहेत. संशयास्पद व्यक्ती व आरोपींवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. नार्को टेस्ट करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.

सर्व सदस्यांच्या सूचनांचा सकारात्मक विचार करून अमली पदार्थ तस्करी रोखण्यासाठी प्रयत्न केला जाईल. या प्रकरणातील कोणासही पाठिशी घातले जाणार नाही. भावी पिढीचे भवितव्य महत्त्वाचे असल्याने सरकार ही लढाई लढत राहणार असल्याचे त्यांनी यावेळी त्यांनी सांगितले.

या प्रश्नांच्या वेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य सर्वश्री सचिन अहीर, भाई जगताप, राजहंस सिंह, अनिल परब,  अरुण लाड यांनी सहभाग घेतला.

पुणे पुस्तक महोत्सव शनिवारपासून रंगणार : पुस्तकांसोबत सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

पुणे – राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने येत्या १६ ते २४ डिसेंबर या कालावधीत फर्ग्युसन महािद्यालयाच्या मैदानावर होणाऱ्या पुणे पुस्तक महोत्सवात सुमारे २०० स्टॉल्स राहणार असून, पुणेकरांना १० भारतीय भाषांमधील हजारो पुस्तके पाहायला आणि खरेदी करण्यासाठी उपलब्ध राहणार आहे. या पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने पुणेकरांना प्रसिद्ध कवी कुमार विश्वास, पत्रकार सौरभ द्विवेदी, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ रघुनाथ माशेलकर, लोकगीत गायक नंदेश उमप, प्रसिद्ध लेखक विक्रम संपत यांना ऐकण्याची, तर तुकाराम दर्शन महानाट्य, शिवराज्याभिषेक सोहळा अनुभवण्याची संधी मिळणार आहे. त्याचबरोबर युवकांना काश्मिरी बँड, उत्तर भारतीय संगीताचा आस्वाद घेता येणार असून, टॅलेंट हंटमध्ये दररोज आपल्या कला सादर करता येणार आहे. लहान मुलांसाठी बालसाहित्यिकांकडून कथा, गोष्टी ऐकता येणार आहे.

पुण्यात पहिल्यांदाच येत्या शनिवारपासून होणाऱ्या पुणे पुस्तक महोत्सवाचे आयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे महापालिका, उच्च शिक्षण आणि शालेय शिक्षण विभाग यांनी एकत्रित केले आहे. महोत्सवासाठी पुणे श्रमिक पत्रकार संघ सहआयोजक असून, भारतीय विचार साधना आणि खडकी शिक्षण संस्थेचे सहकार्य लाभले आहे. यामध्ये पुस्तक प्रदर्शनाबरोबर विविध सांस्कृतिक कार्यक्रम, चर्चासत्रे, साहित्यिकांच्या मुलाखती, सृजनशिलतेला वाव देणारे आणि वाचन संस्कृतीचा विकास घडविणारे कार्यक्रम खुला रंगमंच आणि अँफी थिएटरमध्ये होणार आहेत. या पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने होणाऱ्या विविध उपक्रम आणि कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याबाबत शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांना राज्य सरकारने सूचना दिल्या आहेत, अशी माहिती महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे यांनी दिली आहे. पुस्तक न्यासाचे प्रकल्प अधिकारी कांचन शर्मा, एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांची उपस्थिती होती.

या महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी १६ डिसेंबरला दुपारी १२ वाजता उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री चंद्रकांत पाटील आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते होणार आहे. तत्पूर्वी, सकाळी १०.३० वाजता राजीव तांबे यांचा लहान मुलांसाठी कथाकथन हा कार्यक्रम होणार आहे. उद्घाटनाच्या सत्रानंतर दुपारी ४.३० बँडचे सादरीकरण करण्यात येणार आहे. या दिवशी रात्री प्रसिद्ध गायक नंदेश उमप यांचा लोकरंग हा सांस्कृतिक कार्यक्रम सायंकाळी ६.३० वाजता होणार आहे. या महोत्सवात दररोज दुपारी दीड ते साडेचार या वेळेत राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी टॅलेंट हंट उपक्रमाचे आयोजन होणार आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांना नृत्य, गायन, वादन अशा विविध प्रकारच्या कला सादर करता येणार आहे. या पुस्तक महोत्सवाची वेळ दररोज सकाळी १०.३० ते ८.३० अशी राहणार आहे. पुण्यातील शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांमधील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे. त्याचप्रमाणे पुणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महोत्सव यशस्वी करावा, असे आवाहन संयोजक राजेश पांडे यांनी केले आहे.
…..
१६ डिसेंबर, शनिवारी
…..

  • सकाळी १०.३० – लहान मुलांसाठी कथाकथन कार्यक्रम (खुला मंच) – सादरकर्ते – राजीव तांबे –
  • दुपारी १२ वाजता – उद्घाटन सत्र
  • दुपारी १.३० ते ४.३० – टॅलेंट हंट
  • दुपारी ४.३० – बँड सादरीकरण
  • सायंकाळीं ६.३० – लोकरंग हा सांस्कृतिक कार्यक्रम – सादरकर्ते – नंदेश उमप
    ……..
    १७ डिसेंबर, रविवारी
  • सकाळी १०.३० – लहान मुलांसाठी ‘सुट्टी आली, सुट्टी आली ‘ कार्यक्रम – सादरकर्त्या – डॉ. माधवी वैद्य
  • दुपारी १.३० ते ४.३० – टॅलेंट हंट
  • सायंकाळीं ७.३० – तुकाराम दर्शन महानाट्य
    …..
    १८ डिसेंबर, सोमवार
  • दुपारी ११.३० – प्रसिद्ध कवी कुमार विश्वास यांचे व्याख्यान
  • दुपारी १.३० ते ४.३० – टॅलेंट हंट
  • दुपारी ४.३० – प्रसिद्ध पत्रकार सौरभ द्विवेदी यांच्याशी संवाद
  • सायंकाळीं ५.३० – प्रसिद्ध लेखक विक्रम संपत यांचे व्याख्यान आणि गप्पा
  • सायंकाळीं ७.३० – काश्मिरी बँडचे सादरीकरण
    …..
    १९ डिसेंबर , मंगळवारी
  • सकाळी १०.३० – गाथा शिवरायांची – सादरकर्ते – मोहन शेटे (खुला मंच)
  • दुपारी १.३० ते ४.३० – टॅलेंट हंट
  • दुपारी ३.३० – स्वातंत्र्यपूर्व काळातील कारागृहात साहित्य निर्मिती करणाऱ्या ५८ स्वातंत्र्यसैनिकांवर ‘ कारागृहातील कल्लोळ ‘ हा दृक-श्राव्य कार्यक्रम ( अँफी थिएटर )
  • सायंकाळीं ५.३० – हिंदुस्थानच्या फाळणीची शोकांतिका कार्यक्रमात व्यथा हिंदुस्थानच्या फाळणीची पुस्तकाचे प्रकाशन – हस्ते – सुनील आंबेकर
  • सायंकाळीं ६.३० – आर्मी बँडचे सादरीकरण
  • सायंकाळीं ७.३० – महाराष्ट्राची संस्कृती
    ……
    २० डिसेंबर, बुधवारी
  • सकाळी १०.३० – ओंकार काव्यदर्शन – सादरकर्ते – विसुभाऊ बापट ( आंफी थियटर)
  • दुपारी १.३० ते ४.३० – टॅलेंट हंट
  • दुपारी १. ३० – वाचणारे अधिकारी अंतर्गत आमचा वाचन कारभार कार्यक्रम – सहभाग – अविनाश धर्माधिकारी, सदानंद दाते, विश्वास पाटील
  • सायंकाळीं ५.३० – ज्ञानपीठातील ज्ञानतपस्वी कार्यक्रम ( अँफी थियटर) – सहभाग – प्रसिद्ध साहित्यिक
  • सायंकाळीं ७.३० – इंद्रधनुष्य – सादरकर्ते – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची चमू
    …..
    २१ डिसेंबर, गुरुवारी
    ….
  • सकाळी १०.३० – व्यंगचित्रे आणि चिंटू ( अँफी थिएटर) – सादरीकरण – चारुहास पंडित
  • दुपारी १.३० ते ४.३० – टॅलेंट हंट
  • सायंकाळीं ७.३० – फैजल हा काश्मिरी गीतांचा कार्यक्रम
    ….
    २२ डिसेंबर, शुक्रवारी
  • सकाळी १०.३० – कथाकथन ( खुला मंच) – सादरकर्ते – राजीव तांबे
  • दुपारी ४.३० – ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी प्रकट मुलाखत ( अँफी थिएटर) मुलाखतकार पत्रकार सागर देशपांडे
  • सायंकाळीं ७.३० – श्रीमंत योगी – शिवराज्याभषेक महानाट्य -जाणता राजा सादरकर्ते महाराष्ट्र कीर्ती सौरभ प्रतिष्ठान
    ….
    २३ डिसेंबर , शनिवारी
  • दुपारी १.३० ते ४.३० – टॅलेंट हंट
  • दुपारी ३.३० – राजकीय नेते काय वाचतात – सहभाग – आशिष शेलार, सतेज पाटील, डॉ. निलम गोऱ्हे, सिद्धार्थ शिरोळे
  • सायंकाळीं ७.३० – मालिनी अवस्थी – उत्तर भारतीय लोकसंगीताचा कार्यक्रम
    …..
    २४ डिसेंबर, रविवारी
  • दुपारी १.३० ते ४.३० – टॅलेंट हंट
  • सायंकाळीं ७.३० – कलर्स बँड

अखिल मंडई मंडळातर्फे १४५० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी

अखिल मंडई मंडळ आणि लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ डी २ च्या वतीने शिबिराचे आयोजन

पुणे : अखिल मंडई मंडळ आणि लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ डी २ यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन  करण्यात आले होते. यामध्ये १४५० नागरिकांनी विविध आरोग्य तपासण्या करत शिबिराचा लाभ घेतला. महिलांसाठी स्तन कर्करोग तपासणी देखील यावेळी करण्यात आली. 
शुक्रवार पेठेतील शारदा गजानन मंदिरा शेजारील पटांगणात शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.  शिबिराचे उद्घाटन आरोग्यसेनेचे संस्थापक हृदयरोगतज्ज्ञ  डाॅ. अभिजित वैद्य यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लायन्स  क्लबचे डिस्ट्रीक्ट गव्हर्नर विजय भंडारी, उपजिल्हाअधिकारी मिनल कळसकर, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, सचिव विश्वास भोर, अभय थोरात, श्याम खंडेलवाल उपस्थित होते. 
यावेळी स्तन कर्करोग तपासणी, डोळे तपासणी, चष्मा वाटप, नाक, कान, घसा, दात, त्वचारोग, हाडांची तपासणी करण्यात आली. शरद पवार आणि प्रतिभा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 
अभिजित वैद्य म्हणाले, देशापुढे आरोग्याचे अनेक प्रश्न आहेत. अनेक आजार असे आहेत जे लोकांना माहित देखील नाहीत. यासाठी आम्ही सातत्याने लोकांना जागृत करण्याचे प्रयत्न करतो. लोकांनी देखील नियमित आरोग्य तपासणी करुन घ्यायला हवी. 
विजय भंडारी म्हणाले, सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते आणि गणेशोत्सव मंडळ यांनी मिळून मिसळून काम केले तर समाजासाठी उपयुक्त असे उपक्रम राबविता येतात. आज लोकांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी प्रयत्न कऱण्याची गरज आहे. ते अशा प्रकारच्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराच्या माध्यमातून करता येणे शक्य आहे. 

अण्णा थोरात म्हणाले, मंडई परिसरात कष्टकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. कामाच्या निमित्ताने अनेक कष्टकरी या भागात येतात.  शिबिराच्या माध्यमातून त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यामुळे काही आजार असतील तर निदान होऊन प्रतिबंधात्मक उपचार करण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले. 

यांना अडीच वर्षाशिवाय दुसरे काही सूचतच नाही:चला दम दाखवा अन् अजितदादांना CM करा; भास्कररावांची खडाजंगी(व्हिडीओ)

नागपूर(दिनांक ११ डिसेंबर२०२३ )

अजित दादांना तुम्ही मुख्यमंत्री करा, लगेच पाठिंबा देतो. माझ्या पक्षाची जबाबदारी मी घेतो. तुमच्यात आहे का, दम असा सवाल करत भास्कर जाधव यांनी भाजप आमदारांचे तोंड बंद केले. तर ते पुढे म्हणाले की, तुम्ही ज्यांच्या ज्यांच्या सोबत मैत्री कराल त्यांचं वाटोळं कराल. असे म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.

कोकणातील विकासासंदर्भात विधिमंडळात चर्चा सुरु असताना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव आणि सत्ताधारी भाजप आमदारांमध्ये चांगलीच खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. सत्ताधारी बाकावरील आमदारांनी तुमचे सरकार अडीच वर्ष होते तेव्हा कोकणाचा विकास का केला नाही. आत्ता काय चर्चा करता, अशी टीका केली. तेव्हा भास्कर जाधव यांचा पारा सभागृहात चढला आणि त्यांनी भाजप आमदारांना जोरदार टोलेबाजी करत त्यांचा आवाज गप्पच केला.

आमदार भास्कर जाधव म्हणाले की, यांना फक्त अडीच वर्ष, अडीच वर्ष… अडीच वर्ष…! दुसरे काही सूचत नाही का, सकाळ संध्याकाळ अडीच वर्ष एवढंच आठवते का? कोरोना का आम्ही आणला का? कोणी आणला कोरोना?, कशाप्रकारे झोपाळ्यावर जाऊन ढोकळा आणि पारडी खात बसलात, त्यानंतर विमानं बंद केली. कोरोना तुम्ही आणलात?

यांच्यात दम काय, तुम्ही ज्याल तिकडं तुम्हाला खाण्यातंच दिसते. हे खाल्लं ते खाल्लं हेच दिसते. दुसरं काय दिसतं तुम्हाला. मुळात तुमच्या पोटात अडीच वर्षांचा काळ दुखतोय. युपीतलं प्रेत रस्त्यावर होती, मध्यप्रदेशमधील प्रेत रस्त्यावर होती, गुजरातमधील प्रेत रस्त्यावर होती. पण आमच्या महाराष्ट्रात सन्मानाने काम चालू होते. महाराष्ट्राचे कौतुक होते. डब्ल्यूएचओने, सुप्रीम कोर्टाने, राष्ट्रपतीसह पार्लमेंट व जगाने देखील कौतुक केले. हेच यांच्या डोळ्यात खुपतं, असे म्हणत भास्कर जाधव यांनी सत्ताधारी आमदारांवर जोरदार हल्लाबोल.

वेदांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी ती मुखोद्गत असणे गरजेचे- वेदाचार्य शांताराम भानोसे

शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळाच्या वतीने योगीश्वर याज्ञवल्क्य वैदिक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न
पुणे ः  अध्यात्मातून सर्व जगाचे कल्याण होणार आहे आणि हे अध्यात्म वेद विद्येत आहे. आज पर्यंत अनेक पोथी आणि ग्रंथातातून ही विद्या मिळवता येते. परंतु, अशी एकही आदर्श पोथी किंवा ग्रंथ नाही की, ज्यामध्ये एकही चूक नाही. म्हणून गुरू शिष्य परंपरेला शरण जावून वेदाचे पारायण करणे व ते कंठस्थ असले पाहिजे. त्यामुळे ग्रंथांचे संरक्षण आणि संवर्धन होणार आहे, असे प्रतिपादन वेदाचार्य शांताराम भानोसे यांनी केले.

शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळाच्या वेदविद्या संवर्धन उपक्रमाअंतर्गत योगीश्वर याज्ञवल्क्य वैदिक पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. सारसबागेजवळील वेदशास्त्रोत्तेजक सभा येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी वैदिक संशोधन मंडळ पुणे संचालक सुब्रह्मण्यम वेरीवेंटी, वेद विद्या संवर्धन समितीचे अध्यक्ष डॉ. रवींद्र मुळे, आहिताग्नी सुधाकर कुलकर्णी, अध्यक्ष विलास देशपांडे, कार्याध्यक्ष विश्राम कुलकर्णी, कार्यवाह श्रीकांत जोशी आदी उपस्थित होते.

यावेळी निखिल भालेराव यांना योगीश्वर याज्ञवल्क्य पुरस्कार ( १५०००/- व मानपत्र),  वेदांग शहरकर यांना आदर्श छात्र पुरस्कार, ( ११०००/- व मानपत्र), श्रीमती रत्नमाला गजानन जोशी स्मरणार्थ  सेवारत्न पुरस्कार (१००००/- व मानपत्र) अरुण देवगावकर यांना  देऊन  ह.भ. प.  बाळू कुंभार यांना ज्ञानेश्वरी प्रदान करून  सन्मानित करण्यात आले. याशिवाय अथर्व हरदास, कौस्तुभ पाठक, प्रशांत जोशी, चिन्मय जोशी, अभय जोशी यांना छात्र पुरस्कार(प्रत्येकी २५००/-) प्रदान करण्यात आले. यावेळी  वेदविद्या शिकणाऱ्या ५ विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. इयत्ता १० वी आणि १२ वी तील विद्यार्थ्यांना प्रातिधिनिक स्वरूपात पारितोषिक वितरण करण्यात आले.

शांताराम भानोसे म्हणाले, वेद हे जगातील आद्य वाड्.मय असून ते जगाच्या कल्याणासाठी सांगितले आहे. त्याचा योग्य अभ्यास केला तर राष्ट्राचे कल्याण होईल आणि भारताचे जगात विश्वगुरू होण्याचे स्वप्न पूर्ण होईल. गुरू शिष्य परंपरेची ही वैदिक विद्या लोप पावत आहे. त्याच्या संरक्षणासाठी आणि वेदांचा अभ्यास करणाऱ्यांना, वेदपाठ शाळांना अनुदान दिले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले पाहिजे.

सुब्रह्मण्यम वेरीवेंटी म्हणाले, वेद विद्या किंवा इतर कोणतीही विद्या असो त्यातील विद्या हा शब्द महत्वाचा आहे. विद्या या शब्दाचे गुरू, शिष्य, विषय आणि अध्ययन हे चार स्तंभ महत्वाचे आहेत. भगवत गीतेचे महत्व सांगताना ते म्हणाले, भगवत गीता ही शिष्याने गुरू समोर कसे वागायचे हे सांगणारे व्यवस्थापन तंत्र आहे, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष विश्राम कुलकर्णी यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा देत नविन वास्तू स्थापने विषयीची माहिती दिली. श्रीकांत जोशी यांनी सूत्रसंचलन केले. डॉ. रवींद्र मुळे यांनी प्रास्ताविक केले आणि वैदिक राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

मैत्रीची तरल भावना व्यक्त करणार ‘मुसाफिरा’ टायटल सॉन्ग

आनंद पंडित मोशन पिक्चर्स, ऐश मोशन पिक्चर्स यांच्या सहकार्याने, नितीन वैद्य प्रोडक्शन्स आणि गुझबम्प्स एंटरटेन्मेंट प्रस्तुत ‘मुसाफिरा’ या चित्रपटाच्या भव्य पोस्टरचे अनावरण आणि प्रदर्शनाची तारीख काही दिवसांपूर्वीच एका दिमाखदार सोहळ्यात घोषित करण्यात आली. या चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता वाढलेली असतानाच आता या चित्रपटातील ‘मुसाफिरा’ हे टायटल सॉन्ग संगीतप्रेमींच्या भेटीला आले आहे. एका शानदार सोहळ्यात हे गाणे प्रदर्शित करण्यात आले. या वेळी दिग्दर्शक पुष्कर जोग, निर्माते आनंद पंडित, नितीन वैद्य, वितरक नानूभाई जयसिंघानी, पुष्कराज चिरपुटकर, पूजा सावंत, स्मृती सिन्हा, दिशा परदेशी आदी उपस्थित होते. या सोहळ्यात चित्रपटातील कलाकारांनी या गाण्यावर परफॉर्मन्सही सादर केला. हे गाणे बॉलिवूडचे सुप्रसिद्ध गायक विशाल दादलानी यांनी गायले आहे. या एनर्जीने भरलेल्या टायटल सॉन्गला रोहन – रोहन यांचे संगीत लाभले असून हे गाणे मंदार चोळकर यांनी शब्दबद्ध केले आहे. तरुणाईला आवडेल असे हे गाणे आहे. मैत्रीचे नाते हे नेहमीच खास असते. एकत्र फिरणे, हसणे, खेळणे, रडणे अशा अनेक गोष्टी मैत्रीत केलेल्या असतात, अगदी भांडणेही. मैत्रीच्या या अशाच सुखद आठवणींना उजाळा देणारे आणि दूर गेलेल्या मित्रांना एकत्र आणणारे हे गाणे आहे. यात धमाल, प्रेम, मैत्री अशा अनेक भावना आहेत.

या अनुभवाबद्दल विशाल दादलानी म्हणतात, ‘’मला मराठी गाणी गायला खूप आवडतात. यापूर्वीही मी मराठी गाणी गायली आहेत. या शब्दांमध्ये खूप भावना दडलेल्या असतात. हे गाणे निश्चितच ऊर्जा देणारे असले तरीही याचा भावार्थ खूप खोलवर आहे. हे गाणे गाताना मी खूप एन्जॅाय केले आहे. जुन्या मैत्रीची आठवण करून देणारे हे जबरदस्त गाणे आहे.’’

गाण्याबद्दल दिग्दर्शक पुष्कर जोग म्हणतात , ‘ मुसाफिरा’ हे गाणे नक्कीच सगळ्यांना आवडेल असे आहे. मैत्रीवर आधारित या गाण्याला बॉलिवूडचा दमदार आवाज लाभल्याने हे गाणे अधिकच श्रवणीय झाले आहे. अनेकांना हे गाणे नॉस्टेल्जिक बनवेल, अनेकांना मैत्रीची व्याख्या समजावेल. कॉलेजनंतर प्रत्येक जण आपापल्या आयुष्यात व्यस्त होतो आणि या शर्यतीत आपण कुठेतरी स्वतःसाठी जगणे विसरून जातो. हे गाणे स्वत्त्व परत मिळवून देणारे आहे. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मैत्री किती महत्वाची आहे, याची जाणीव करून देणारे हे गाणे आहे.”

मैत्रीची नवीन परिभाषा सांगणारा हा चित्रपट २ फेब्रुवारी २०२४ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.”

सरकार म्हणजे बदनामी करण्याचा कारखाना:खुशाल SIT चौकशी करा, आम्ही कुणालाही भीक घालत नाही; संजय राऊत यांचे आव्हान

नागपूर- दिशा सालियन मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरे यांची एसआयटी चौकशी होणार आहे. या प्रकरणी एसआयटी स्थापन करायची असेल, हा तपास सीआयएकडे द्यायचा असेल किंवा केजीबीकडे द्याचा असेल तर द्या, असे आव्हान ठाकरे यांच्या शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना राज्य सरकारला दिले.

आपल्या राजकीय विरोधकांच्या संदर्भात खोटे भ्रम निर्माण करायचे, बदनामी करायची आणि आपली राजकीय पोळी भाजायची हा सरकारचा डाव आहे. हा बदनामी करण्याचा कारखाना आहे. पण आम्ही त्यांना भीक घालत नाही. त्यांना एसआयटी लावायची असल्यास खुशाल लावावी. लाखो लोक शिवसेनेत आहेत. प्रत्येकामागे एसआयटी लावा. राज्यात कायदा सुव्यवस्थेबद्दल काही बोललेले सरकारला आवडत नाही. 2024 नंतर सरकार बदलणार आहे. कोणी सत्तेचा अमरपट्टा बांधून आलेला नाही, असे राऊत यांनी सांगितले.

पंतप्रधानांवर टीका काही राष्ट्रीय स्वरूपाची नसते. दोन दिवसांपूर्वी पंडित नेहरूंवर अमित शहा यांनी टीका केली. या देशात लोकशाही, संविधान आहे. राजकीय भूमिका घेऊन कोणी टीका करीत असेल आणि त्यावर एखाद्या पक्षाचे लोक गुन्हे दाखल करून अटकाव करण्याचा प्रयत्न करीत असेल तर या लोकांना आम्ही आणीबाणीविरुद्ध लढा दिला असा डंका पिटण्याचा अधिकार नाही, अशी टीका राऊत यांनी केली.

मुंबई महापालिकेचे ऑडिट होणार आहे. नक्कीच करा. गेल्या दीड वर्षापासून फक्त मुंबई महानगरपालिका नाही तर पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, ठाणे या सर्व महानगरपालिकांचे ऑडिट व्हायला पाहिजे. आणि नगर विकास खात्याचा गेल्या दीड वर्षाच्या कारभाराचे आणि व्यवहाराचे ऑडिट करा. कारण महापालिका नगर विकास खात्याच्या अंतर्गत येतात. मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा दिला. त्यांच्यावर दबाव येत होता. आधी सदस्यांनी राजीनामे दिले आता अध्यक्षांनीही दिला. विशिष्ट अहवाल देण्यासाठी त्यांच्यावर दबाव येत होता. मला शिव्या दिल्याने काही फरक पडत नाही, असेही ते यावेळी म्हणाले.

प्रदूषण नियंत्रणाच्या नावाने केवळ इव्हेंटबाजी,स्वच्छतेचा केवळ देखावा:वर्षा गायकवाड

नागपूर-हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी मुंबई काँग्रेस प्रदेश अध्यक्षा आमदार प्रा. वर्षा गायकवाड यांनी सरकारवर जोरदार टीका केली. मुंबईत वाढत असलेल्या प्रदूषणामुळे लहान आणि वयोवृद्धांमध्ये मोठ्या प्रमाणात श्वसनाचे आजार वाढत आहेत. तसेच प्रदुषणाच्या बाबतीत आज मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र, सरकार प्रदूषण नियंत्रणाच्या नावाखाली फक्त इव्हेंटबाजी करत आहे, असे त्या म्हणाल्या.

आयआयटीबी व राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिक संस्थेच्या अहवालानुसार, 71 टक्के प्रदूषण हे मोठ्या प्रमाणात सुरू असलेले प्रकल्प आणि विकासकामे यांच्यामुळे होत आहे. याबद्दल सरकारने योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. राज्याची धोरणे तयार करणारे प्रदूषणाच्या बाबतीत योग्य निर्णय घेत नसतील तर सर्वसामान्य जनतेची काय परिस्थिती होईल. तसेच दिल्लीत प्रदूषणामुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे. ती मुंबईवर येणार का? याबाबत ताबडतोब निर्णय घेणे आवश्यक आहे, असा मुद्दा सभागृहात प्रा. वर्षा गायकवाड यांनी सभागृहात मांडला.

सरकार इवेन्टबाजी करण्यात पटाईत आहे. मुख्यमंत्र्यांनी धारावीला भेट दिली तेव्हा त्यांनी डीप क्लीनच्या माध्यमातून पाण्याची फवारणी करून रस्ता साफ केला. पण हा रस्ता मुख्यमंत्री येणार म्हणून मध्यरात्री 2.30 वाजता साफ करण्यात आला होता. सरकार फक्त आपल्या कार्यक्रमांच्या दिवशी साफसफाईचा देखावा करते. दुसऱ्या दिवशी पुन्हा तिकडे कचरा साचतो. तो साफ करायची जबाबदारी कोणाची? असा सवाल गायकवाड यांनी यावेळी उपस्थित केला.

प्रा. वर्षा गायकवाड यांच्या या विधानावर भाजप नेते राम कदम यांनी रस्ते स्वच्छ होत असल्यामुळे प्रदूषण कमी होत असल्याचा दावा केला. त्यावर रस्ता फक्त इवेन्टबाजी करायला स्वच्छ करायचा नसतो तर अभियान राबवताना रस्ता रोज स्वच्छ झाला पाहिजे, तर त्या मोहिमेला काहीतरी अर्थ आहे, अशी टीका प्रा. वर्षा गायकवाड यांनी केली.

वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून रस्ते तयार करून देण्याची मागणी केली होती. त्यावेळी, आम्ही येत्या सहा महिन्यात मुंबईत चारशे किलोमीटरपर्यंत रस्त्यांचे काँक्रीटीकरण करू, असे मुख्यमंत्री म्हणाले होते. पण आज दोन वर्ष झाली तरी रस्त्यांची कामे झाली नाही. 680 कोटींचे टेंडर पास होऊनही रस्त्यांची अवस्था अजुनही जैसे-थेच आहे. हे टेंडर रद्द झाल्यावर आता ते पुन्हा रिटेंडर कधी होणार? असा प्रश्न विचारून, मुंबईला वेठीस धरण्याचं काम केलं, मुंबईचे रस्ते अडवण्याचं काम केलं त्यांना येणाऱ्या काळामध्ये शिक्षा झालीच पाहिजे. एक मुंबईकर म्हणून मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्षा आमदार प्रा. वर्षा गायकवाड यांनी सभागृहात मागणी केली.

सत्ताधारी पक्षाच्या दबावामुळेचे निरगुडे आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा.

निरगुडे मागासवर्गीय आयोग असताना शिंदे आयोगाची गरजच काय?

नागपूर, दि. १२ डिसेंबर.
नागपूरच्या हिवाळी अधिवेशानाकडे राज्यातील शेतकरी मोठी आशा लावून बसला आहे. वर्षभर सातत्याने नुकसानच होत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. भाजपा सरकारच्या शेतकरी विरोधी मानसिकतेमुळे दररोज १४ आत्महत्या होत आहेत. सरकार आजतरी शेतकऱ्यांना भरीव मदत जाहीर करेल अशी अपेक्षा होती परंतु सरकारने आज चर्चेला उत्तर दिले नाही. मुख्यमंत्री शुक्रवारी निवेदन करतील असे सांगण्यात आले. मदतीची आस लावून बसलेल्या शेतकऱ्यांची सरकारने आजही निराशाच केली. असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

विधानभवन परिसरात प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, सरकारने पावसाळी अधिवेशनात केलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीच्या घोषणांची अजून पूर्तता केलेली नाही. आधी पडलेल्या अवकाळी पावसाची मदतही मिळालेली नाही. यावर्षी राजाच्या काही भागात कोरडा दुष्काळ पडला आहे तर काही भागात कोरडा दुष्काळ पडला आहे त्यातच पुन्हा अवकाळी पावसाने झोडपले व उरलेसुरले पिकही वाया गेले. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे पण सरकार शेतकऱ्यांना मदत देण्यास चालढकल करत आहे. विम्याची नुकसान भरपाईही मिळालेली नाही. सरकारच्या भूमिकेचे परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत. सभागृहात आज शेतकरी प्रश्नावर चर्चा झाली पण सरकारच्या वतीने त्यावर उत्तर देण्यात आले नाही. भाजपा सरकारच्या या शेतकरी विरोधी भूमिकेचा काँग्रेस पक्ष निषेध करत आहेत.

निरगुडे मागासवर्गीय आयोगावर सरकारचा दबाव..
राज्यातील निरगुडे मागासवर्गीय आयोगावर शिंदे आयोगाने दिलेली माहितीच खरी माना असा दबाव होता अशी माहिती आहे. या दबावामुळेच निरगुडे आयोगातील सदस्यांनी आधी राजीनामे दिले तर आता स्वतः आयोगाचे अध्यक्ष निरगुडे यांनी राजीनामा दिला आहे, ही गंभीर बाब आहे. सरकार याप्रकरणी काहीतरी लपवत आहे त्यामुळे सरकारने तातडीने निवेदन केले पाहिजे.

निरगुडे मागासवर्गीय आयोग असतानाही सरकारने शिंदे आयोग कोणत्या कारणाने बसवला, त्याचे उत्तर द्यावे लागले. मागासवर्गीय आयोगाचा उल्लेख मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री करतच नाहीत. मुख्यमंत्री फक्त शिंदे आयोगाचाच उल्लेख करतात. निरगुडे आयोगाचा उल्लेख ते का करत नाहीत? मागासवर्गीय आयोग असतानाही शिंदे आयोग कशासाठी? फडणवीस सरकारने गायकवाड आयोग नेमला होता, त्यावर सुप्रीम कोर्टाने सरकारला फटकारले होते तरिसुद्धा आताच्या सरकारने शिंदे आयोग नेमला. सरकार जाणीवपूर्वक आरक्षणाचा वाद चिघळून मराठा ओबीसी वाद वाढवत आहे, असेही नाना पटोले म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ‘सुयोग’ येथे पत्रकारांशी संवाद

0

नागपूर, दि. १२ :  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सुयोग पत्रकार निवास येथे भेट दिली व विविध माध्यम प्रतिनिधींसोबत मनमोकळा संवाद साधला.

शिबीरप्रमुख दिलीप जाधव, माहिती संचालक हेमराज बागुल यांनी प्रारंभी त्यांचे स्वागत केले. यावेळी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सुयोग येथील व्यवस्थेची पाहणी केली व पत्रकारांशी अनौपचारिक वातावरणात मनमोकळा संवाद साधला.

शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासनाने प्राधान्य दिले असून विविध योजनांच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या मदतीबाबत माहिती त्यांनी दिली. राज्यातील विविध विषय तसेच प्रश्नासंदर्भात उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी माध्यम प्रतिनिधींसोबत संवाद साधला.

कांदा व इथेनॉलबाबतचा प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. त्यासाठी केंद्रीय गृहमंत्री तथा सहकारमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. दूध दराच्या प्रश्नासंदर्भात मार्ग काढण्यासाठी लवकरच बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

यावेळी प्रमोद हिंदुराव, संजय खोडके, माहिती संचालक डॉ. राहूल तिडके यांच्यासह अनेक पत्रकार बांधव उपस्थित होते.