Home Blog Page 1326

अनुसूचित जातीच्या युवक युवतींनी मोफत कौशल्य विकास प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन

पुणे, दि. १४ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी ) कौशल्य विकास विभागाच्या सौजन्याने टाटा कम्युनिटी इनिशिएटिव्ह ट्रस्ट यांच्यातर्फे ५०० युवक-युवतींना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या अनिवासी मोफत प्रशिक्षणासाठी पुणे, नाशिक, नागपूर, ठाणे व मुंबई या शहरांची निवड करण्यात आली असून जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन बार्टीमार्फत करण्यात आले आहे.

बार्टी आणि टाटा कम्युनिटी इनिशिएटिव्ह ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने कौशल्य विकास विभागामार्फत सन २०२३-२४ या वर्षात विविध अनिवासी प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. या कराराअंतर्गत पुणे व पुणे (नऱ्हे), नाशिक, नागपूर, ठाणे, मुंबई, तळोजा इत्यादी ठिकाणी प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत बार्टीच्या कौशल्य विकास विभागाअंतर्गत अनुसूचित जातीमधील ५०० युवक-युवतींसाठी मोफत प्रशिक्षणाची संधी आहे.

प्रशिक्षणात बिझनेस डेव्हलपमेंट एक्झ्युकेटीव्ह, ऑटो सेल कन्सल्टंट, कस्टमर केयर एज्युकेटीव्ह, साइबर सिक्योरिटी, फ्रंट ऑफिस असोसिएट, रिटेल सेल असोसिएट, असिस्टेंट इलेक्ट्रीशियन, महिलांसाठी असिस्टेंट ब्यूटी थेरेपिस्ट, जनरल ड्यूटी असिस्टेंट, क्विक सर्विस रेस्टोरेंट एज्युकेटीव्ह, ऑटोमोटीव्ह सर्विस टेक्निशियन (टू-व्हिलर), ऑटोमोटिव सर्विस टेक्नीशियन (४ व्हीलर), फूड ॲण्ड बेवरेज सर्विस-स्टीवर्ड, हाउसकीपिंग ऑपरेशन, फील्ड टेक्निशियन (एसी), आटोमोटीव्ह टेली-कॉलर, यूएक्स डिजाइनर, फील्ड ऑफिसर ॲग्री, सोलर पीवी इन्ट्रालर, एसी ॲण्ड आर ऑपरेटर (सेंट्रल एसी) इत्यादी अभ्यासक्रम घेतले जाणार आहेत.

प्रशिक्षणार्थींना इंग्रजी भाषा, व्यक्तिमत्व विकास व उद्योजकीय प्रशिक्षण देण्यात येणार असून मोफत प्रशिक्षण साहित्य पुरविण्यात येणार आहे. प्रशिक्षण झाल्यानंतर १०० टक्के नोकरीसाठी सहाय्य करण्यात येणार आहे. प्रशिक्षण कालावधीत ८५ टक्के उपस्थित असलेल्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी बार्टीकडून विद्यावेतनाची तरतूद करण्यात आलेली आहे.

योजनेचा लाभ घेण्याकरिता आवश्यक कागदपत्रांसह https://rb.gy/kra7b या संकेतस्थळावर नोंदणी करावी. जातीचा दाखला, आधार कार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्र, (मार्कशिट), शाळा, महाविद्यालय सोडल्याचा दाखला, पासपोर्ट साईट छायाचित्र, वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र, रेशन कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत जोडणे आवश्यक आहे. उमेदवार हा १० वी, १२ वी उत्तीर्ण असावा.

प्रशिक्षण व इतर माहितीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथील बार्टीच्या प्रादेशिक कार्यालयाशी संपर्क साधावा. प्रशिक्षणासाठीचे नागपूर ९०२१२०४४९९, पुणे ९९२०९३४०९६, नाशिक ८६९८४११२८८, पुणे (नऱ्हे) ७७७००४५४५४, मुंबई ७५६६६११०९३, तळोजा ९९२०९८९४५०, ठाणे ९९२०१९१६४८ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

बार्टीच्या माध्यमातून अनुसूचित जातीच्या विकासासाठी राबवल्या जात असलेल्या विविध योजनां व कौशल्य उपक्रमांची माहिती बार्टीच्या www.barti.in या अधिकृत संकेतस्थळावर दिली असून जास्तीत जास्त युवक युवतींनी संकेतस्थळावर भेट देवून योजनांचा लाभ घ्यावा, असेही आवाहन बार्टीचे महासंचालक सुनिल वारे यांनी केले आहे.

कामाच्या ठिकाणी महिलांची लैंगिक छळवणूक न होण्याबाबत दक्षता घेण्याचे तक्रार समिती जिल्हा अधिकारी वनश्री लाभशेटवार यांचे आवाहन

पुणे, दि. १४: जिल्ह्यातील दहा किंवा दहापेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत असणाऱ्या सर्व कार्यालयात नोकरी, व्यवसाय करणाऱ्या महिलांची कामाच्या ठिकाणी लैंगिक छळवणूक होणार नाही आणि त्यांच्या कायदेशीर हक्कांचे संरक्षण होईल याची दक्षता घ्यावी, असे आवाहन स्थानिक तक्रार समितीच्या जिल्हा अधिकारी वनश्री लाभशेटवार यांनी केले आहे.

कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) कायद्यातील तरतुदीनुसार नोकरी , व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या लैंगिक छळवणुकीबाबतच्या तक्रारीची चौकशी करण्यासाठी आणि छळ करणाऱ्या व्यक्तीस शिक्षा करण्यासाठी अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणे बंधनकारक आहे. शासकीय कार्यालय, स्थानिक प्राधिकरणाची कार्यालये, खाजगी कार्यालय, संस्था, संघटना, मंडळ, कंपनी, कारखाना, रुग्णालये, शाळा, महाविद्यालय, हॉटेल, दुकाने, बँक आदींमध्ये दहा किंवा दहापेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत असलेल्या सर्व कार्यालयाच्या प्रमुख, ठिकाणांचे मालकांनी आवश्यक कार्यवाही करावी.

कार्यालय, कामाच्या ठिकाणी अंतर्गत तक्रार समिती स्थापन करावी. समिती स्थापन केल्याबाबतचे माहितीचे फलक कार्यालयाच्या दर्शनी ठिकाणी लावावे. कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) कायदा, २०१३ चे नियम आणि कायद्याची हस्तपुस्तिका www.wcd.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. कार्यालयाअंतर्गत तक्रार समितीकरीता कार्यालयातील महिला कर्मचारी, महिला गटाकरीता कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) कायदा, २०१३ च्या कायद्याविषयी कार्यशाळा तसेच विविध जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करावे. प्रशिक्षणविषयक माहिती राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या nalsa.gov.in/training-modules या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, पुणे, पत्ता २९/२, गुलमर्ग पार्क कोऑपरेटिव्ह हौसींग सोसायटी, तिसरा मजला, जाधव बेकर्स जवळ, सोमवार पेठ, पुणे – ४११०११, ईमेल-cpune2021@gmail.com यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मोनिका रंधवे यांनी केले आहे.

पुणेकर रमले वाचनात…

‘शांतता….पुणेकर वाचत आहेत’ उपक्रमाला भरभरून प्रतिसाद,- मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह मान्यवरांचा उपक्रमात सहभाग

पुणे : राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या ( नॅशनल बुक ट्रस्ट) वतीने आयोजित पुणे पुस्तक महोत्सव १६ ते २४ डिसेंबर दरम्यान होणार आहे. या महोत्सवाच्या अनुषंगाने वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी गुरुवारी शांतता… पुणेकर वाचत आहेत’ या उपक्रमाला पुणे शहरात विविध चौकात, रिक्षा थांब्यांवर सरकारी – खासगी कार्यालये, महापालिकेचे क्षेत्रिय कार्यालये, शाळा- महाविद्यालयांमध्ये उस्फुर्तपणे राबविण्यात आला. त्याशिवाय नागपूर येथे सुरू असलेल्या विधीमंडळ अधिवेशनाच्या कामकाजातून वेळ काढत विधानसभेचे सभापती अॅड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक मान्यवर या उपक्रमात सहभागी झाले. अनेक जणांनी सोशल मीडियावर पुस्तक वाचतानाचे फोटो शेअर करीत, पाठिंबा जाहीर केला.

वाचन संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी ‘शांतता… पुणेकर वाचत आहेत’ या उपक्रमाला शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, सामाजिक संस्था, सरकारी आणि खासगी कार्यालये, महापालिकेचे क्षेत्रिय कार्यालये, खासगी आस्थापनांमध्ये मोठा प्रतिसाद मिळाला. त्यात पुणेकरांनी दुपारी १२ ते १ दरम्यान त्यांच्या आवडीच्या पुस्तकाचे वाचन केले. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या आवारात साधारण ५०० जणांनी आवडीचे पुस्तक वाचत सहभाग नोंदवला.शालेय विद्यार्थी, शिक्षक, पालक, अधिकारी, पत्रकार, राजकीय पक्षाचे नेते यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही या उपक्रमात सहभाग घेतला. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, शिक्षणतज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध देशपांडे, सिम्बायोसिस कुलपती डॉ.एस. बी मुजुमदार, बार्टीचे महासंचालक डॉ. सुनील वारे, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे अध्यक्ष प्रदीप रावत, पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष केतन कोठावळे, सरहदचे संजय नहार, डॉ. गजानन एकबोटे, डॉ. पी. डी. पाटील, डॉ. शिवाजीराव कदम, साहित्यिक शरणकुमार लिंबाळे, अभिनेता प्रवीण तरडे, डॉ. मिलिंद जोशी, चित्रपट महामंडळ अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी उपक्रमात सहभागी होत, वाचन संस्कृतीचे जतन करण्याचे आवाहन केले. अनेकांचा सहभाग होता. शांतता ..पुणेकर वाचत आहे या उपक्रमाला पुणेकरांनी दिलेला प्रतिसाद आनंददायी आहे. अशा उपक्रमांनीच नवी पिढी वाचनाकडे वळणार आहे. तसेच वाचन संस्कृतीचे संवर्धन होण्यास मदत होणार आहे, असे पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे यांनी सांगितले. राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे आयोजित पुणे पुस्तक महोत्सवातील कार्यक्रम १६ ते २४ डिसेंबर दरम्यान फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहेत. या उपक्रमाला पुणे महापालिका, उच्च शिक्षण आणि शालेय शिक्षण विभाग यांच्यासह सुमारे २५० विविध संस्थांनी पाठिंबा दिला असून, तो वाढतच आहे.

भारताने चीनचा रेकॉर्ड मोडला पालकांनी आपल्या पाल्यांना गोष्टी सांगण्याचा विश्वविक्रम भारताच्या नावाने

पुणे – राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर उद्या शनिवारी १६ ते २४ डिसेंबर या कालावधीत पुणे पुस्तक महोत्सव होत आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने पुणे महापालिकेने स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर गुरुवारी सकाळी आयोजित केलेल्या ‘ पालकांनी आपल्या पाल्यांना गोष्टी सांगायच्या ‘ या उपक्रमात तीन हजार ६६ पालकांनी सहभागी होत, त्यांनी आपल्या पाल्यांना सलग चार मिनिटे गोष्ट सांगितली. ही गोष्ट पूर्ण होताच पालकांनी आपल्या पाल्यांना गोष्ट सांगण्याचा चीनचा रेकॉर्ड मोडत नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला. त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात आणि देशभक्तीपर गीतांवर आनंदोत्सव साजरा झाला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, सवित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, उद्योजक जय काकडे, ॲड. एस. के. जैन, खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, न्यासाचे संचालक युवराज मलिक, संयोजक राजेश पांडे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, प्रसेनजित फडणवीस, राहुल पाखरे, भाग्यश्री मंठाळकर आदी उपस्थित होते.

वाचन संस्कृतीचा चालना देण्यासाठी गुरुवारी सकाळपासून स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर आले. साधारण दहाच्या सुमारास तीन हजार २०० पेक्षा अधिक पालक आणि त्यांच्या पाल्यानी सहभाग नोंदवला. या सहभागी झालेल्या पालकांनी आपल्या पाल्यांना क्षिप्रा शहाणे यांनी लिहिलेल्या निसर्गाचा नाश करू नका या पुस्तकातील धड्याचे सलग तीन मिनिटे वाचन केले. यावेळी गिनेस बुक रेकॉर्डच्या अधिकाऱ्यांनी ‘पालकांनी आपल्या पाल्यांना गोष्टी सांगायच्या’ हा नवा विश्वविक्रम भारताच्या नावाने प्रस्थापित केल्याचे जाहीर केले आणि त्यानंतर मैदानावर एकच जल्लोष पाहायला मिळाला. या विश्व विक्रमानंतर पालक आणि मुलांनी वंदे मातरम्, भारत माता की जय, अशा घोषणा देत आनंदोत्सव साजरा केला. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन पुणे महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी चोख पद्धतीने केले. या संपूर्ण उपक्रमाला उद्योजक सूर्यकांत काकडे यांचे सहकार्य लाभले. अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी उपस्थित मुलांना मार्गदर्शन करीत, त्यांना वाचन करण्याची प्रेरणा दिली. यावेळी चैतन्य कुलकर्णी यांनी मराठी गीतांच्या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सूत्रसंचालन प्राचार्य डॉ. संजय चाकणे आणि मिलिंद कुलकर्णी यांनी केले.


अन चीनचा रेकॉर्ड मोडला
पालकांनी आपल्या पाल्यांना गोष्टी सांगायच्या हा विश्वविक्रम यापूर्वी चीनच्या नावावर होता. चीनमध्ये साधारण आठ वर्षांपूर्वी दोन हजार ४७९ पालकांनी एकाचवेळी आपल्या पाल्यांना गोष्टी सांगितल्या. त्यानंतर आज स. प. मैदानावर तीन हजार ६६ पालकांनी एकत्रित येत, आपल्या आपल्या पाल्यांना निसर्गाचा नाश करू नका हा धडा वाचला आणि विश्वविक्रमाला गवसणी घातली.

लोकसभा प्रवास अंतर्गत भाजपा महिला मोर्चाच्या वतीने दोन दिवसीय संघटनात्मक दौरा संपन्न

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा प्रधानमंत्री पदी विराजमान करण्याचा संकल्प

मुंबई
येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांतील संघटनात्मक बांधणीसाठी लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत भाजपा महिला मोर्चा पदाधिकाऱ्यांचा दोन दिवसीय दौरा यशस्वीरीत्या संपन्न झाला. त्यामध्ये संघटनात्मक आणि सार्वजनिक स्वरूपाचे विविध कार्यक्रम घेण्यात आले.

आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्याचा निर्धार या दौऱ्यात करण्यात आला. भाजपा महिला मोर्चा राष्ट्रीय अध्यक्ष वानती श्रीनिवासन यांच्या मार्गदर्शनात उत्तर पश्चिम मुंबईत श्रीमती माया नारोलिया (प्रदेश अध्यक्ष) तर उत्तर पश्चिममध्ये श्रीमती सुमित्रा लालू (राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य), उत्तर मध्य मुंबईत श्रीमती ममता रानी (राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य), उत्तर पूर्व मुंबईत श्रीमती अंजू वारियर (राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य), दक्षिण मध्य मुंबईत श्रीमती शांतला भट्ट (राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य) तर दक्षिण मुंबईत श्रीमती आशा नौटियाल (प्रदेश अध्यक्ष) यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये धार्मिक स्थळांना भेट अंतर्गत सिद्धिविनायक मंदिर दर्शन त्याचबरोबर चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावरकर स्मारक बाळासाहेब ठाकरे स्मृतिस्थळ येथे भेट देऊन अभिवादन करण्यात आले. कॉलेजमधील नव तरुण मतदारांसोबत संवाद साधण्यात आला. आशा सेविका आणि अंगणवाडी कार्यकर्त्यांसोबत बैठक झाली. महिला लाभार्थ्यांचा एक करोड सेल्फी कार्यक्रम घेण्यात आला. सरकारी रुग्णालय, शाळा, कॉलेज भेट, जिल्हा पदाधिकारी, कार्यकारणी सदस्य, स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी तसेच वरिष्ठ कार्यकर्त्यासोबत बैठक झाली. यावेळी कमल मित्र अभियान राबवण्यात आले. संघटनात्मक बळकटीचे काम मोठ्या प्रमाणावर करण्याचे आवाहन भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केले. प्रवास दौरा यशस्वी होण्याकरिता मुंबई भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्ष शितल गंभीर – देसाई यांच्यासहित मुंबई भाजपा महिला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग दर्शवला

प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांना वीजबिलात माफी द्यावी

  • काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांची मागणी
  • ⁠नागपूर हिवाळी अधिवेशनात वेधले शासनाचे लक्ष

नागपूर : ग्रामीण भागात नागरिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या बहुतांश प्रादेशिक पाणीपुरवठा योजना थकीत वीजबिल आकारणी अभावी बंद झालेल्या आहेत, या योजनांना शासनाने वीजबिलात माफी किंवा सवलत द्यावी अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी सभागृहात केली.

नागपूर हिवाळी अधिवेशनात बाळासाहेब थोरात यांनी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचा मुद्दा लावून धरला.

थोरात म्हणाले, ‘राज्यात बहुतांश भागात दुष्काळाची परिस्थिती आहे. पिण्याच्या पाण्याची परिस्थिती गंभीर झाली आहे. अशावेळी थेट पाण्याचा उद्भव नसलेल्या भागात शासनाच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना चांगले काम करतात. मात्र या योजना राबवताना मोठे वीजबिल त्यासाठी आकारले जाते. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर हे वीजबिल भरणे लाभार्थ्यांना परवडत नाही. आज महाराष्ट्रातल्या सर्वच जिल्ह्यांत ग्रामीण भागात प्रादेशिक पाणीपुरवठा योजनाची अवस्था वीज देयकच्या बाबतीत अत्यंत कठीण झालेली आहे. त्यांची विज कट केली जात आहे, अशा परिस्थितीत या गावांमध्ये आठ-आठ दिवस पाणीपुरवठाच होत नाही. यामध्ये शासनाने गंभीरपणे विचार करावा व त्याबाबत धोरण निश्चित करून त्या गावच्या पाठिशी उभे राहावे.‘

थोरात पुढे म्हणाले, ‘महाराष्ट्राच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. योजना सुरू झालेल्या आहे. आता विजबिला अभावी योजना ठप्प आहेत, नागरिकांना पाणी मिळत नाही, शासनाला जबाबदारी घ्यावी लागेल. या अगोदरही शासनाने निर्णय घेतलेला आहे. आता उशीर करू नये. धोरण ठरवावे आणि सामान्य माणसाला दिलासा द्यावा.‘

मीरा भायंदरच्या जनतेची लुट करणाऱ्या इस्टेट इन्व्हेस्टमेंट कंपनीवर कारवाई करणार का?– नाना पटोले

इस्टेट इन्व्हेस्टमेंट कंपनीवर सरकारी अधिकाऱ्यांची एवढी मेहरबानी कशासाठी ?

शासनाच्या जमिनीचा जनतेकडून सेस वसुल करण्याचा खाजगी कंपनीला अधिकार कसा?

नागपूर, दि. १४ डिसेंबर
ठाणे जिल्ह्यातील मीरा भायंदर येथील ८९९४ एकर जमीन तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने २००८ रोजी इस्टेट इन्व्हेस्टमेंट या खाजगी कंपनीला बेकायदेशीरपणे हस्तांतरीत करण्यात आली असून या कंपनीचे ७/१२ उताऱ्यावर नावही आहे. येथील जमीन व्यवहार करताना जनतेला या कंपनीला पैसे द्यावे लागतात. सरकारी जमिनीवरून अशा पद्धतीने पैसे वसूल करण्याचा या कंपनीला अधिकार आहे का? याप्रकरणी सरकार चौकशी करून कंपनीवर गुन्हे दाखल करणार का? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी विचारला आहे.

मीरा भायंदर येथील खाजगी कंपनीच्या बेकायदेशीर जमिन हस्तांतरण प्रकरणी नाना पटोले यांनी विधानसभेत लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला होता, यावेळी नाना पटोले म्हणाले की, दि इस्टेट डेव्हलमेंट प्रा. लि. कंपनीचा २९०५ एकर जमिनीवर दावा असाताना ११ डिसेंबर २०१५ रोजी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी ८९९४ एकर जमीन कंपनीच्या नावे करुन टाकली. या जमिनी मिठागारासाठी आहेत, देशात सीलिंगचा कायदा आला त्यानंतर अशा प्रकारच्या मोठ्या प्रमाणातील जमिनी काढून घेण्यात आल्या पण मीरा भायंदर मधील एवढी मोठी जमीन मात्र या कंपनीकडेच राहिली. या जमिनींच्या ७/१२ उताऱ्यावर वेगवेगळ्या लोकांची नावे आहेत पण या कंपनीचेही नाव सर्व ७/१२ उताऱ्यांवर आहे. स्थानिक लोकांना जमीन खरेदी करायची असल्यास या कंपनीला सेस द्यावा लागतो. या कंपनीकडे एवढी मोठी जमीन कशी व या कंपनीला सेस घेण्याचा अधिकार आहे का?
विकासाची कामे असताना CRZ कायदा, मँग्रुव्ह तोडणीचे प्रश्न उपस्थित केले जातात पण या कंपनीने मोठ्या प्रमाणात मँग्रुव्ह तोडले व CRZ कायद्याचे उल्लंघनही केले आहे. दि. इस्टेट इन्व्हेंटमेंट ही खाजगी कंपनी व सरकारी अधिकाऱ्यांचे काय संबंध आहेत? ही जमिन शासनाची असताना शासनाच्या जमिनीतून ही खाजगी कंपनी पैसे कसे गोळा करते? ही कंपनी चौरस फूटामागे २० टक्के या दराने प्रचंड पैसे वसूल करते. सरकार कायदा करेल तेव्हा करेल पण तोपर्यंत या जागेवरील खरेदी थांबवली पाहिजे व CRZ कायद्याचे उल्लंघन व मँग्रुव्ह तोडल्याबद्दल सरकार या कंपनीवर गुन्हे दाखल करणार का? असा सवाल पटोले यांनी विचारला आहे.

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील या लक्षवेधीला उत्तर देताना म्हणाले की, हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. २०१७ साली या कंपनीने न्यायालयातून स्थगिती आदेश आणले आहेत. सरकार कायदेशीर सल्ला घेऊन आधी ही स्थगिती उठवण्याचा प्रयत्न करेल व त्यानंतर उचित कारवाई केली जाईल असे सांगितले.

पिंपरी चिंचवडच्या भ्रष्टाचारी आयुक्तांना तातडीने बडतर्फ करा-केंद्र सरकारच्या दबावामुळेच निवडणूक आयोगाने राज्यातील पोटनिवडणुका टाळल्या.

नागपूर दि. १४ डिसेंबर
भाजपाप्रणित सरकारने महाराष्ट्र पेटवला असून तो आधी शांत केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहु, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात वणवा पेटवून भाजपाला काय मिळते? महागाई, बेरोजगारी, दुष्काळ, शेतकरी आत्महत्या, पाण्याची टंचाई आहे तसेच आरक्षणावरून महाराष्ट्र अशांत करण्याचे पाप केले जात आहे. राज्यातील परिस्थिती अत्यंत भयावह आहे. वाऱ्यावर सोडणार नाही असे मुख्यमंत्री सांगतात पण भाजपाप्रणित सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडले आहे ही वस्तुस्थिती आहे, असा घणाघाती प्रहार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

विधान भवन परिसरात प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, भाजपाप्रणित सरकार राज्यातील ओबीसींवर अन्याय करत आहे, फंड देत नाही, ओबीसी समाजाला नोकऱ्यात डावलले जात आहे असे सरकारचे मंत्री छगन भुजबळ यांनीच सभागृहात जाहिरपणे सांगितले तर भुजबळ व फडणवीस एकत्र आहेत अशी टीका जरांगे पाटील यांनी केली आहे. राज्यात आरक्षणासाठी विविध समाज घटक रस्त्यावर उतरले आहेत. जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी आजपासून राज्यात संप सुरु झाला आहे, शासकीय कार्यालये ओस पडली आहेत, प्रशासन कोलमडले आहे, जनतेची कामे होत नाहीत. भाजपाप्रणित सरकारने महाराष्ट्र बरबाद करण्याचे पाप केले आहे.
राज्यातील शेतकरी आत्महत्या करत आहे, त्यात मराठा ओबोसी, दलित, आदिवासी, भटक्या विमुक्त अशा सर्वच जातीचे शेतकरी आहेत पण सरकारला त्याचे देणेघेणे नाही. अवकाळी पाऊस, दुष्काळ, पाण्याची आणीबाणी अशी परिस्थिती आहे. मुख्यमंत्री त्यावर तातडीने उत्तर देतील अशी अपेक्षा होती पण त्यांनी उत्तर दिलेले नाही. राज्यात भयावह परिस्थिती आहे, मुख्यमंत्री जनतेल्या वाऱ्यावर सोडणार नाही म्हणतात पण जनतेला या सरकारने वाऱ्यावर सोडलेले आहे.

निवडणूक आयोगावर केंद्र सरकारचा दबाव..
निवडणूक आयोगावर किती दबाव आहे हे उच्च न्यायालयाने काल फटकारले त्यातून दिसते. लोकसभा सदस्याचे निधन झाले आणि लोकसभेचा कालावधी एक वर्षाचा असेल तर पोटनिवणूक घेतली पाहिजे तसेच विधानसभा सदस्याचे निधन झाले आणि सहा महिन्यांचा कालावधी असेल तर पोटनिवडणूक घेतली पाहिजे अशी संविधानात तरतूद आहे पण निवडणूक आयोगाने पुणे व चंद्रपूरची पोटनिवडणूक घेतली नाही. निवडणूक आयोग केंद्र सरकारच्या दबावाखाली काम करत आहे उघड आहे. निवडणूक आयोगाने आतातरी सुधारावे.

पिंपरी चिंचवड आयुक्ताला बडतर्फ करा..
७३ व्या घटनादुस्तीनुसार दर पाच वर्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या पाहिजेत परंतु दोन-तीन वर्षे झाले राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच घेतलेल्या नाहीत, डेंग्युमुळे लोक मरत आहेत, जनतेची कामे होत नाहीत, भ्रष्टाचार बोकाळला आहे, जनतेच्या पैशाची लुट सुरु असून प्रशासक राज सुरु आहे. पिंपरी चिंचवडच्या आयुक्तांनी भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे, या आयुक्ताच्या भ्रष्टाचाराचे सर्व पुरावे आहेत. विधानसभेत हा प्रश्न मांडला होता, मुख्यमंत्री यांनी पत्र देण्यास सांगितले आहे, या भ्रष्ट आयुक्ताला तातडीने बडतर्फ करा अशी आमची मागणी आहे, असेही नाना पटोले म्हणाले.

पाकव्याप्त काश्मीर, कैलास पर्वत, तिबेट भारताचा भाग:इंद्रेशकुमार

पुणे :पाकव्याप्त काश्मीर, कैलास पर्वत, तिबेट हा सारा भारताचा भाग असून पंडित नेहरूंच्या चुकीच्या निर्णयांमुळे या भूभागाला मुकावे लागले, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकारी समितीचे वरिष्ठ सदस्य इंद्रेशकुमार यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत सांगीतले.

हॉटेल कॉनरॅड येथे झालेल्या या पत्रकार परिषदेला डॉ.परवेझ ग्रँट, अली दारूवाला उपस्थित होते.

संसदेवरील हल्ला लोकशाहीविरोधी, मानवताविरोधी आहे.एकमेकांवरील विश्वास कमी होईल, अशा घटना होऊ नयेत, असे मतही इंद्रेशकुमार यांनी व्यक्त केले.भ्रष्टाचारी व्यक्तींना भाजप सोबत घेत आहे, त्यावर संघ काय सल्ला भाजपला देईल, असा प्रश्न विचारल्यावर सार्वजनिक पत्रकार परिषदेत या विषयाची चर्चा करता येणार नाही.जगभर अध : पतन सर्वत्र चालू आहे. चारित्र्य घडण यावर भर देणारे शिक्षण यामुळे भ्रष्टाचार, गुन्हेगारी कमी होऊ शकेल,असे प्रतिपादन इंद्रेशकुमार यांनी केले.

‘ दो धागे श्रीरामजी के लिए ‘ कार्यक्रमासाठी मी पुण्यात आलो. संघ परिवाराचा एक धागा, भारतीयांचा दुसरा , जगातील नागरिकांच्या वतीने तिसरा धागा मी तिथे विणला , त्यासाठी मी पुण्यात आलो होतो, असे त्यांनी सांगितले.

कोरोना काळानंतर भारत देश जगाच्या मार्गदर्शकाच्या भूमिकेत आला.लॉक डाऊनची कल्पना भारताने जगाला दिली.
भारतीय काढा तसेच लसीने मानवजातीचे रक्षण केले, उत्तराखंड बोगद्यात अडकलेल्या मजुरांना सोडविण्यासाठी शेवटी भारताचे जुगाड तंत्र कामी आले, असे विविध दावेही त्यांनी केले.

ते म्हणाले, ‘जी -२० परिषद, युक्रेन युद्धात भारताची भूमिका महत्वाची ठरले.
दंगलमुक्त भारत, युद्ध मुक्त विश्व व्हावे अशी आमची इच्छा आहे ‘.

सर्वधर्मीय प्रार्थनास्थळांवर उपक्रम व्हावेत

१२ जानेवारी रामजन्मभूमीवर रामलल्ला विराजमान होत असून त्या दिवशी देशात सर्व धर्म स्थळांवर तेथील रिवाजानुसार पूजा व्हावी, असे आमचे आवाहन आहे. अयोध्येवरून येणारा प्रसाद सर्व गावातील धार्मिक स्थळांवर पोहोचविला जाणार आहे. सर्व शहरे, गावात प्रकाशोत्सव साजरा केला जावा.27 जानेवारी पर्यंत अयोध्या वारी आयोजित केली जाणार आहे, अशी माहिती इंद्रेशकुमार यांनी दिली.

संघ परिवार ताकदीनिशी हे सर्व कार्यक्रम यशस्वी करेल. देशाच्या विभाजनाचे प्रयत्न यशस्वी होऊ दिले जाणार नाहीत.

काँग्रेसच्या काळात अनेकदा घटना दुरुस्ती झाली.अटलजींच्या,मोदींच्या काळात घटनादुरुस्ती झाली नाही, त्यामुळे संघ परिवार संविधान विरोधी आहे, असा आरोप करणे चुकीचे आहे,
सामाजिक अन्याय जाईपर्यंत आरक्षण राहिले पाहिजे, आर्थिक मुद्यावर आरक्षण दिल्यावर सामाजिक अन्याय लवकर दूर होईल,असे आमचे मत आहे.

असेही इंद्रेशकुमार यांनी सांगीतले.

दरम्यान, पत्रकार परिषदेआधी दुपारी १२ वाजता विविध धर्माच्या प्रतिनिधीशी इंद्रेशकुमार यांनी संवाद साधला.

छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्रात प्रवेशासाठी मुलाखतीस हजर राहण्याचे आवाहन

पुणे, दि. १४ : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरतीसाठी होणाऱ्या सर्व्हीस सिलेक्शन बोर्ड परीक्षेची पूर्वतयारी करून घेण्यासाठी पात्र उमेदवारांकरिता छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिकरोड, नाशिक येथे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतीसाठी ८ ते १७ जानेवारी २०२४ या कालावधीत एसएसबी कोर्स क्रमांक ५६ चे आयोजन करण्यात आले आहे. उमेदवारांनी २ जानेवारी २०२४ पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे मुलाखतीस हजर राहण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थीची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची निःशुल्क सोय करण्यात येणार आहे. केंद्रामध्ये प्रवेश मिळण्यासाठी उमेदवार हा कंम्बाइंड डिफेन्स सर्व्हीसेस एक्झामिनेशन (सीडीएसइ-युपीएससी) अथवा नॅशनल डिफेन्स अॅकेडमी एक्झामिनेशन (एनडीए-युपीएससी) उतीर्णं झालेली असावी. त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावेत.

उमेदवार एनसीसी सी सर्टिफिकेट ए किंवा बी ग्रेड मध्ये उत्तीर्ण झालेले असावेत व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एसएसबीसाठी शिफारस केलेली असावी. टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एस.एस.बी. मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. युनिर्व्हरसीटी इंट्री स्कीम साठी एसएसबी कॉल लेटर असावे किंवा एसएसबी साठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.

पुणे जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, पुणे येथे २ जानेवारी २०२४ पर्यंत मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येण्यापूर्वी उमेदवारांनी डिपार्टमेंट ऑफ सैनिक वेल्फेअर, पुणे (डीएसडब्लू) यांच्या संकेतस्थळावर सर्च करुन त्यामधील एसएसबी ५६ कोर्ससाठी (किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) किंवा ९१५६०७३३०६ या भ्रमणध्वनी क्रमांकावर एसएसबी ५६ हा संदेश केल्यास कोर्ससाठी संबंधित परिशिष्ट उपलब्ध करुन देण्यात येईल. उमेदवारांनी परिशिष्ठांची प्रिंट पूर्ण भरून तीन प्रतीत सोबत घेऊन यावी.

अधिक माहीतीसाठी उमेदवारांनी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र , नाशिक रोड, नाशिक ई-मेल आयडी training.pctcnashik@gmail.com, दूरध्वनी क्रमांक ०२५३-२४५१०३२ तसेच भ्रमणध्वनी क्रमांक ९१५६०७३३०६ येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, लेफ्टनंट कर्नल हंगे स.दै. (नि.) यांनी केले आहे.

लेक टाऊनजवळील सराईत गुन्हेगार सागर शर्मावर एम.पी.डी.ए.ची पोलीस कारवाई

पुणे-भारती विद्यापीठ पोलीस ठाणे परिसरात दहशत माजविणा-या, अट्टल गुन्हेगारावर पोलीस आयुक्त, पुणे शहर यांची एम.पी.डी.ए. कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली आहे या प्रकरणी पोलिसांनी सांगितले कि,”पुणे पोलीस आयुक्तालयातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार नामे सागर संदिप शर्मा ऊर्फ भोवते, वय २० वर्षे, रा. एस. आर. ए. बिल्डींग, ए-विंग, लेक टाऊन जवळ, भारती विदयापीठ, पुणे हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने साथीदारांसह भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत लोखंडी कोयता, तलवार या सारख्या जीवघेण्या घातक हत्यारांसह जबरी चोरी, पळवुन नेणे, बेकायदाशीर हत्यार बाळगणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. मागील ०५ वर्षामध्ये त्याचेविरूध्द ०७ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे सदर परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती. तसेच त्याच्यापासून जीविताचे व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करणेस धजावत नव्हते.
प्राप्त प्रस्ताव व सह कागदपत्रांची पडताळणी करुन मा. पोलीस आयुक्त पुणे शहर, श्री. रितेश कुमार यांनी नमूद इसमाचे विरुध्द एम.पी.डी.ए. कायद्यान्वये नागपूर मध्यवर्ती कारागृह, नागपूर येथे १ वर्षाकरीता स्थानबध्दतेचे आदेश पारीत केले आहेत. नमूद इसमास स्थानबध्द करण्यामध्ये श्री. विनायक गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, पुणे व श्री. चंद्रकांत बेदरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पी.सी.बी. गुन्हे शाखा, पुणे शहर यांचे अधिपत्याखालील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी सदरची कामगिरी पार पाडली.
पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी कडक प्रतिबंधक कारवाई करण्याचे धोरण अवलंबिले आहे. मा. पोलीस आयुक्त यांनी चालु वर्षामध्ये दहशत निर्माण करणा-या व सक्रिय अट्टल गुन्हेगारांवर एम.पी.डी.ए. कायद्यान्वये स्थानबध्दतेच्या ६९ कारवाया केल्या आहेत. यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगारांचे कृत्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे.

पुणे महापालिकेने विनापरवाना अनधिकृत बांधकामांवर गतिमान कारवाई करावी -मंत्री उदय सामंतांचे आदेश

नागपूर, दि. 14 : पुणे महानगरपालिका हद्दीत 2017 मध्ये 11 गावांचा समावेश झाला तर 2021 मध्ये 23 गावे नव्याने समाविष्ट झाली आहेत. या क्षेत्रामध्ये नव्याने विनापरवाना अनधिकृत बांधकामे होणार नाहीत, याची दक्षता घेऊन अशी बांधकामे होतानाच ती थांबवण्याचे निर्देश पुणे महानगरपालिकेला देण्यात येतील, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले.

सदस्य सुनील टिंगरे यांनी बांधकामे पूर्णत्वास जात असताना त्यावर कारवाई करण्यात येत असल्याने नुकसान होत असल्याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती.

याबाबत अधिक माहिती देताना मंत्री श्री. सामंत म्हणाले, पुणे महानगरपालिका हद्दीत नव्याने समावेश झालेल्या 11 गावांसाठी पुणे महानगरपालिका नियोजन प्राधिकरण आहे. तर, 23 गावांसाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नेमणूक झाली आहे. या गावांसाठी विकास आराखडा तयार करणे, बांधकाम परवानगी देणे व अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणे इत्यादी बाबी नियोजन प्राधिकरणामार्फत करण्यात येतात.

महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियमातील तरतुदीनुसार 31 डिसेंबर 2015 पूर्वीचे अनधिकृत बांधकाम विकास नियंत्रण नियमावलीनुसार नियमान्वित करणे शक्य असल्यास सदर बांधकाम ‘प्रशमित संरचना’ म्हणून नियमान्वित करण्याची तरतूद केलेली होती. त्यानुसार पुणे महानगरपालिकेकडून 104 अनधिकृत बांधकामे नियमान्वित करण्यात आलेली आहेत. त्यानंतर महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियम अस्तित्वात आला असून यामध्ये 31 डिसेंबर 2020 पूर्वी गुंठेवारी पद्धतीने झालेली अनधिकृत बांधकामे व मोकळे भूखंड नियमान्वित करण्याची संधी 31 डिसेंबर 2023 पर्यंत पुणे शहरातील नागरिकांना उपलब्ध करून दिलेली आहे. सदर अधिनियमान्वये सन 2021 पासून पुणे महानगरपालिकेकडून 24 बांधकामे नियमान्वित करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे शासनाच्या मान्य एकत्रित विकास नियंत्रित व प्रोत्साहन नियमावली 2020 नुसार अल्प भूखंडधारकांना बांधकाम करण्याकरिता तरतूद उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

जिल्ह्यात 18 ते 19 वयोगटातील मतदारांची नोंदणी वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत-विभागीय आयुक्त सौरभ राव

0

फॉर्म नंबर 6, 7 व 8 मधील प्रलंबित प्रकरणे 20 डिसेंबर 2023 पूर्वी निकाली काढावीत

सोलापूर, दि. 14(जिमाका):- जिल्ह्यात 18 ते 19 वयोगटातील तरुणांची मतदार म्हणून नोंदणी कमी दिसत आहे. या वयोगटातील तरुणांची मतदार म्हणून नोंदणी वाढवण्यासाठी सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी प्रयत्न करावेत. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयात मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त तथा मतदार नोंदणी निरीक्षक सौरभ राव यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम अंतर्गत आढावा बैठकीत विभागीय आयुक्त श्री. राव मार्गदर्शन करत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी, प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव, सदाशिव पडदुणे, अमित माळी, विठ्ठल उदमले, नामदेव टिळेकर, प्रियंका आंबेकर यांच्यासह सर्व  तहसीलदार उपस्थित होते.

विभागीय आयुक्त श्री. राव म्हणाले की, भारत निवडणूक आयोगाने मतदार यादीचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. सोलापूर जिल्ह्यात 36 लाखापेक्षा अधिक मतदार आहेत. यामध्ये 18 ते 19 वयोगटातील मतदारांची संख्या कमी दिसत असल्याने प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व महाविद्यालय व स्वयंसेवी संस्थांची मदत घेऊन या वयोगटातील तरुणांची मतदार म्हणून नोंदणी करावी. तसेच महाविद्यालयीन शिक्षण संपल्यानंतर या गटातील तरुण एमआयडीसी व अन्य उद्योगात तसेच आस्थापनामध्ये काम करत असण्याची शक्यता असल्याने त्याठिकाणी विशेष शिबिरे घेऊन त्यांची नोंदणी मतदार म्हणून करावी. या वयोगटातील एकही तरुण मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यापासून वंचित राहणार नाही याबाबत सर्वांनी दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सूचित केले.

मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत फॉर्म नंबर 6 मतदार नाव नोंदणी फॉर्म, नंबर 7 मतदार यादीतून नाव वगळणे व फॉर्म नंबर 8 मतदार यादीतील नावात दुरुस्ती करणे या अनुषंगाने प्रलंबित असलेल्या 38 हजार 383 प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन ही सर्व प्रकरणे 20 डिसेंबर 2023 पूर्वी निकाली काढावीत. 5 जानेवारी 2024 रोजी मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याने उपरोक्त प्रकरणे निकाली काढण्यास प्राधान्य द्यावे, असे निर्देश विभागीय आयुक्त श्री. राव यांनी दिले.

मतदार नोंदणी व मतदार जागृतीसाठी प्रशासनामार्फत जिल्ह्यात जनजागृती केली जात आहे. तसेच नव मतदारांची नोंदणी वाढविण्यासाठी महाविद्यालयामध्ये मतदार नोंदणी शिबिरे घेण्यात येत आहेत. यात 18 ते 19 वयोगटातील मतदार नोंदणीसाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी दिली. तसेच फॉर्म नंबर 6 ची 15 हजार 538 प्रकरणे, फॉर्म नंबर 7 ची 17 हजार 854 व फॉर्म नंबर 8 ची 4 हजार 991 प्रकरणे प्रलंबित असून ती निकाली काढण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

मतदार संख्या

सोलापूर जिल्ह्यात दोन लोकसभा व अकरा विधानसभा मतदार संघ असून 27 ऑक्टोंबर 2023  नुसार जिल्ह्यात 36 लाख 33 हजार 72 इतके मतदार असून यामध्ये 18 लाख 89 हजार 234 पुरुष, तर 17 लाख 43 हजार 579 स्त्री मतदार आणि इतर 259 मतदार आहेत. तर  3 हजार 599 मतदार केंद्र आहेत.

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या जनजागृतीसाठी फिरत्या रथाचा शुभारंभ

पुणे, दि. १४ : आगामी लोकसभा आणि विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदार संघात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राबाबत (ईव्हीएम) २९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत जनजागृती आणि प्रात्याक्षिक करण्यात येणार असून त्यासाठी तयार करण्यात आलेल्या जनजागृती फिरत्या रथाचा शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी स्वीप समन्व्यक तथा उपजिल्हाधिकारी अर्चना तांबे, पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकारी सीमा होळकर, हडपसर विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी विवेक जाधव, मतदार यादी समन्वयक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अमिता तळेकर, सहाय्यक संचालक देवराम शेळके, तहसीलदार शीतल मुळे आदी उपस्थित होते.

प्रत्येक मतदारसंघात २ वाहने याप्रमाणे २१ मतदार संघात ४२ फिरत्या वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक मतदार संघातील ४ कर्मचाऱ्यांना ईव्हीएमचे मास्टर ट्रेनर म्हणून प्रशिक्षण देण्यात आले आहे. ते प्रशिक्षक आपापल्या मतदार संघात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राबाबत जनजागृती आणि प्रात्याक्षिके करणार आहेत. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राची जनजागृती व प्रात्याक्षिक मोहिम जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्राअंतर्गत गर्दीच्या ठिकाणी, बाजारपेठ, मॉल इत्यादी ठिकाणी राबविण्यात येणार आहे.

या मोहिमेअंतर्गत नागरिकांचे अभिप्राय घेण्यात येणार असून त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात येईल. जास्तीत जास्त नागरिकांनी ईव्हीएम यंत्राच्या प्रात्याक्षिकाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे केले आहे.

विकसित भारत संकल्प यात्रेचा नागरिकांनी लाभ घ्यावा- गटविकास अधिकारी प्रमिला वाळुंज यांचे आवाहन

पुणे, दि. १४: विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून आंबेगाव तालुक्यातील आदिवासी, दूर्गम भागातील नागरिकांपर्यंत केंद्र शासनाच्या योजना आकर्षक एलईडी रथाद्वारे पोहोचविण्यात येत असून ही यात्रा दुर्गम भागातील पाड्यापर्यंत पोहोचत असल्याने अनेक आदिवासी बांधवांना याचा लाभ झाला.

या यात्रेच्या माध्यमातून नागरिकांना सिकलसेल, ॲनिमिया निर्मूलन मोहिम, एकलव्य आदर्श निवासी शाळांमध्ये नावनोंदणी, शिष्यवृत्ती योजना, वन हक्क नियम: वैयक्तिक आणि सामुदायिक जमीन, वन धन विकास केंद्र, १५ नोव्हेंबर आदिवासी गौरव दिवस म्हणून साजरा करणे, पर्यटन केंद्रे विकसित करण्यासाठी असलेली स्वदेश दर्शन योजना, हागणदारी मुक्…