Home Blog Page 1305

खासदार निलंबनाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

पुणे-खासदार सुप्रियाताई सुळे आणि डॉ.अमोल कोल्हे यांच्या निलंबनाच्या निषेधार्थ पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आज आंदोलन करण्यात आले. आज सकाळी 9 वाजता वारजे उड्डानपुलाखाली हे आंदोलन घेण्यात आले. यावेळी मोदी सारकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

एकिकडे जनतेचे प्रश्न सभागृहात मांडले म्हणून “महासंसदरत्न” पुरस्कार जाहीर होतो. तर, दुसरीकडे जनतेचे प्रश्न मांडले व सरकारची कोंडी केली म्हणुन खासदारांचे निलंबन करून लोकशाहीची हत्या केली जाते, असा आरोप पुणे शहर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला.

“लोकशाहीच्या पवित्र मंदिरात, म्हणजेच संसदेत जनतेच्या मूलभूत प्रश्नांविषयी शेतकऱ्यांच्या हक्कांविषयी आवाज उठवणारे संसदरत्न खासदार सौ. सुप्रियाताई सुळे व संसदरत्न खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना निलंबित करून मोदी सरकारने हुकूमशाहीचा प्रमुख गाठला आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा हुकूमशाहीच्या दिशेने सुरू असलेला हा प्रवास वेदनादायी असून, देशाच्या स्वातंत्र्यासाठी लोकशाहीसाठी बलिदान दिलेल्या सर्व स्वातंत्र्यवीरांचा, घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा व संसदेचा हा घोर अपमान आहे. या आंदोलनाला लाभलेला प्रतिसाद पाहता मोदी सरकारची हुकूमशाही मुळापासून नष्ट करण्याचा आपला लढा अधिक तीव्र करण्याचे बळ आपल्याला मिळेल हा विश्वास दृढ झाला आहे.” अशी भावना प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.

या आंदोलनाला पुणे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत जगताप, काकासाहेब चव्हाण, स्वप्नील दुधाणे,डॉ. सुनील जगताप, गिरीश गुरणानी, किशोर कांबळे, मनाली भिलारे, शरद दबडे, सुरेश गुजर, ज्योतीताई सूर्यवंशी तसेच सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व सामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुंबईत रात्री १२ वाजता मुलगी फिरू शकते, त्यामुळे सुरक्षेची हमी इथे जास्त आहे,महाराष्ट्र गुन्हेगारीत खूपच मागे – फडणवीसांचा दावा

0

 नागपूर- मुंबईत रात्री १२ वाजता मुलगी फिरू शकते, त्यामुळे सुरक्षेची हमी इथे जास्त आहे.‘मी मुख्यमंत्री झालो तेव्हापासून नागपूरच्या विरोधात खोटे चित्र मांडण्याचे प्रकार होत आहेत. जाणीव पूर्वक नागपूरला बदनाम करण्याचा प्रकार होत आहे. विरोधकांनी वस्तुस्थिती समजून घ्यावी आणि नागपूरला समजून घ्यावे’, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ‘देशात घडलेल्या गुन्ह्यात राज्यातील चित्र मांडताना विरोधकांना एनसीआरबीचा अहवालच वाचता येत नाही’, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

अंतिम आठवड्यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर गुन्ह्यात आघाडीवर नसून इतर राज्यांच्या तुलनेत मागे असल्याचे सांगितले. एनसीआरबीच्या अहवालात दोन बाबी असतात. एकूण गुन्हेगारी आणि प्रती लाख लोकसंख्येमागे घडलेले गुन्हे अशी वर्गवारी करण्यात येते. २०२० च्या तुलनेत आता गुन्हे कमी झाले आहेत. गुन्ह्यांच्या संदर्भात आकडेवारीचे विश्लेषण करू नये. लोकांना सुरक्षा किती वाटते हे निकष मानायला हवे. दिल्ली आणि मुंबईची तुलना केली तर मुंबईत रात्री १२ वाजता मुलगी फिरू शकते, त्यामुळे सुरक्षेची हमी इथे जास्त आहे, हे फडणवीस यांनी सांगितले.गेल्या काही अधिवेशनात हरवलेल्या मुलींचा उल्लेख सातत्याने येतो. मात्र कुठलीही मुलगी घरातून निघून गेली की याची नोंद अपहरण म्हणूनच केली जाते. दरवर्षी ४ हजार मुली आणि ६४ हजार महिला बेपत्ता होतात. करोनाच्या काळातही ४ हजार ५१७ मुली बेपत्ता झाल्या होत्या. इतर राज्यांच्या तुलनेत आपल्या राज्याची स्थिती बरी आहे. महाराष्ट्र गुन्हेगारीत गेला आहे, हे एनसीआरपीच्या आकड्यांवर सांगितले जात आहे. एनसीआरबीच्या अहवाल तयार करताना २०११ ची लोकसंख्या गृहित धरली जाते. नवीन जनगणना होत नाही तोपर्यंत जुनीच लोकसंख्या गृहीत धरली जाते, असे फडणवीस यांनी सांगितले.२३ हजार मनुष्यबळाची भरती करण्यात आली. यांच्या प्रशिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात व्यवस्था केली आहे. १९७६ नंतर या सरकारने पोलिसांचा पहिल्यांदा आकृतीबंध तयार केला. आता २०२३ च्या आकृतीबंधावर काम होणार आहे. पोलिस ठाण्यातील अंतरा विचार केला जाणार आहे. आज डिजिटायझेशनमुळे सायबर क्राइम हे मोठे आव्हान झाले आहे. ही बदलती परिस्थिती लक्षात घेता नवीन आकृतीबंध तयार केला आहे. एनसीआरबीचा अहवाल विरोधकांना वाचता येत नाही, असा आरोपही फडणवीस यांनी केला.ओरिसा, राजस्थान, केरल, कर्नाटक, उत्तराखंड, आंध्रप्रदेश यानंतर महाराष्ट्र असा क्रम लागतो. त्यामुळे महाराष्ट्र आघाडीवर आहे, हे म्हणणे चुकीचे आहे. एक बलात्कार होणे हेही तेवढेच गंभीर आहे. मात्र जे चित्र रंगविले जाते ते चुकीचे आहे. अपहरणाच्या गुन्ह्यातही महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर नाही, तो ९ व्या क्रमांकावर आहे. महिलांविरोधातील गुन्हे महाराष्ट्र १२ व्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्र महिलांसाठी सर्वाधिक असुरक्षित आहे, असे चित्र रंगविल्या जाते ते चुकीचे आहे. आर्थिक गुन्ह्यात महाराष्ट्र १३ व्या क्रमांकावर आहे. दंगलीमध्ये दोन प्रकार आहेत. जातीय दंगल आणि चार ते पाच व्यक्तींच्यामध्ये झालेले दंगे असे प्रकार होतात. २००९ मध्ये ९१५७ आणि २०२३ मध्ये ८२१८ दंगलीचे गुन्हे घडले आहेत. महिलांची प्रकरणे हातळण्यासाठी ८६ जलदगती न्यायालय तयार केले आहेत, असे फडणवीस म्हणाले. ड्रग्ज घटल्यांमध्ये २४ हजारहून अधिक आरोपींवर कारवाई करण्यात आली. गेल्यावर्षी हाच आकडा १३ हजारांच्या घरात होता, असे फडणवीस म्हणाले.२०२१ मध्ये नागपुरात २२३०२ गुन्हे घडले ते आता १९३६७ झाले आहेत. ९१ टक्के गुन्हे मुंबई पोलिसांनी उघडकीस आणले आहेत. १९३० हेल्पलाइनच्या माध्यमातून २१ कोटी रुपये वेगवेगळ्या बँक खात्यात गोठवून हे पैसे वाचविण्याचे काम मुंबई पोलिसांना करता आले. जप्त केलेले ड्रग्ज नष्ट करण्यात आले. अंमली पदार्थांवर आळा घालण्यासाठी यंत्रणा उभी केली आहे. गेल्या एका वर्षांत ११६७ पेक्षा अधिक कारवाईचा वेग आहे. ९६१ अधिकच्या जप्तीची प्रकरणे झाली आहेत. अंमली पदार्थ्यांच्या व्यवहारात आढळणाऱ्यांना निलंबित केले जाईल. आतापर्यंत चोघांना निलंबित केले आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.सायबर गुन्ह्यात ४८.३ टक्के वाढ. जेवढे डिजिटायझेशन वाढत जाईल तेवढे सायबर क्राइम वाढेल. ८३७ रुपयांत प्रकल्प हाती घेऊन सायबर गुन्हे कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सर्व संस्थांना एका प्लॅटफॉर्मवर आणण्यात येणार आहे. असे गुन्हे रोखण्यासाठी क्युआरटी काम करेल. ४८ सायबर पोलिस ठाणे, ४४ सायबर लॅप आहेत.पोलिसांना ८ तासांची नोकरी देऊन त्यांच्यावरील कामाचा ताण कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ५५ वर्षांवरील पोलिस अंमलदारांना १६ तास आराम करण्यासाठी दिला जात आहे. आरोग्याच्या सुविधाही पुरविल्या जात आहेत, असे फडणवीस यांनी सांगितले‘विरोधकांकडून विदर्भाचा प्रस्तावच दिला गेला नाही. विरोधी पक्षाला विदर्भाचा विसर पडला ही अतिशय चिंताजनक बाब आहे. अंतिम आठवडा प्रस्ताव हा विरोधी पक्षांनी मांडायलचा असतो. मात्र प्रदेशाध्यक्षांनी यावर अतिक्रमण केले. वडेट्टीवार यांच्यावर पक्षातही अन्याय होतो’, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना चिमटा काढला.

सुषमा अंधारेंनी आठ दिवसात दिलगिरीचे पत्र द्यावे:अन्यथा हक्कभंगास परवानगी देण्याचा नीलम गोऱ्हेंचा निर्वाणीचा इशारा

नागपूर-उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या विरोधात भाजप नेते प्रविण दरेकर यांनी विधान परिषदेत हक्कभंग प्रस्ताव मांडला आहे. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे या रविंद्र धंगेकरांना सभागृहात बोलू देत नाहीत, अशा आशयाचा व्हिडीओ सुषमा अंधारे यांनी प्रसिद्ध केला आहे. यामध्ये उपसभापतींवर आरोप करताना अंधारे यांनी धंगेकर हे या सभागृहाचे सदस्यच नसल्याने त्यांना बोलू न देण्याचा प्रश्नच येत नसल्याचे दरेकर यांनी निर्दशनास आणून देण्यात आले आहे. त्यामुळे अंधारे यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडला असल्याचे दरेकर यांनी म्हटले आहे. यावर नीलम गोऱ्हे यांनी सुषमा अंधारे यांना आठ दिवसात दिलगिरी व्यक्त करण्यास सांगितले आहे. दिलगिरीचे पत्र न आल्यास प्रविण दरेकरांना हक्कभंग मांडण्यास परवानगी देईल, असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या आहेत.

उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे अधिवेशन सुरु झाल्यापासूनच रोज सत्ताधारी पक्षावर वारंवार वार करत आहेत. त्यात त्यांनी रविंद्र धंगेकर यांचा मुद्दा उपस्थित करत त्यांना विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे या बोलू देत नसल्याचा आरोप केला होता. वास्तविक रविंद्र धंगेकर हे विधानसभेचे सदस्य आहेत. त्यांनी विधान परिषदेत बोलण्याचा प्रश्नच येत नाही. असा आक्षेप सत्ताधारी पक्षाच्या वतीने घेण्यात आला आहे.

या विषयी बोलताना नीलम गोऱ्हे यांनी संताप व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या की, धंगेकर इकडे सदस्य नसताना मी कसे बोलू दिले नाही. याचे कोडे उलगडलेले नाही. अज्ञानी लोकांकडून चूक झाल्यास मी समजू शकते पण जे स्वत:ला ज्ञानी समजतात अशावेळी त्यांच्या अज्ञानाबद्दल साधी दिलगिरी व्यक्त करण्याचे तरी सौजन्य असू नये. त्या व्यक्तीला जाणीव करून दिली पाहिजे. सुषमा अंधारेंनी दिलगिरी व्यक्त करायला हवी. आठ दिवसांत दिलगिरीचे पत्र न आल्यास प्रविण दरेकरांना मी हक्कभंग मांडण्यास परवानगी देईन, असा इशारा नीलम गोऱ्हे यांनी दिला आहे.

मागणीप्रमाणे संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजना राबविणार– मंत्री गुलाबराव पाटील

0

नागपूर, दि. 20 : राज्यातील ऊसतोड मजुरांच्या मुलांचे स्थलांतर रोखण्यासाठी व साखर कारखान्यावरील ऊसतोड मजुरांच्या बालकांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजना सुरू करण्यात आलेली आहे. जागेची उपलब्धता, ऊसतोड कामगारांची संख्या, लोकप्रतिनिधींची मागणी यानुसार राज्यात वसतिगृहे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानपरिषदेत दिली.

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजनेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा समावेश करण्याबाबतचा प्रश्न सदस्य प्रवीण दटके यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी मंत्री श्री. पाटील बोलत होते. या चर्चेत विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे, सदस्य गोपीचंद पडळकर, शशिकांत शिंदे, सचिन अहीर आणि रामदास आंबटकर आदिंनी सहभाग घेतला.

मंत्री श्री. पाटील म्हणाले, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने राज्यात 82 वसतिगृहे सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकूण सहा वसतिगृहांचा समावेश आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात बीड, जालना, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये ऊसतोड  कामगारांच्या मुला- मुलींसाठी प्रत्येकी शंभर विद्यार्थी क्षमतेच्या एकूण २० शासकीय वसतिगृहांपैकी मुलांसाठी ८ व मुलींसाठी ९ अशी एकूण १७ वसतिगृहे सुरू करण्यात आली आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये जानेवारी २०२४ मध्ये वसतिगृह सुरू करण्यात येणार आहे. ज्याठिकाणी जागेची अडचण येत असेल त्याठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा करून भाड्याच्या जागेमध्ये वसतिगृह सुरू करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

00000

मुंबई येथील विश्रामगृहामधील ६ कक्ष विधानमंडळाच्या माजी सदस्यांसाठी राखीव – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0

नागपूर, दि. १९ : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुंबई येथील विश्रामगृहामधील 6 कक्ष विधानमंडळाच्या माजी सदस्यांना राखीव ठेवण्यात यावेत तसेच त्याचे आरक्षण विधिमंडळ सचिवालयामार्फत करण्यात यावे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

विधानमंडळाच्या माजी सदस्यांच्या मागण्यांबाबत आज विधानभवनाथ बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानमंडळाचे माजी सदस्य जोगेंद्र कवाडे, रामकृष्ण पाटील, प्रकाश गजभिये, रामभाऊ गुंडिले, डॉ. रमेश गजबे, बाळासाहेब साळुंके, दिनानाथ पडोळे, वसंतराव शिंदे आदी उपस्थित होते.         

यावेळी प्रामुख्याने वैद्यकीय उपचारांचा खर्च व मुंबई येथे कामासाठी आल्यानंतर तात्पुरत्या निवासाच्या अडचणीबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या मागण्यांबाबत सकारात्मक विचार करुन समस्या सोडविण्यात येतील, असे सांगितले.

सह्याद्री हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञांच्या देखरेखीखाली ७ वर्षाच्या मुलाची श्वसन आणि कोविड-19 च्या गंभीर आव्हानांवर मात

पुणे, 19 डिसेंबर २०२३: मुलांमध्ये आढळणारा मल्टीसिस्टम इन्फ्लॅमेटरी सिंड्रोम (MISC) सारखी लक्षणे आणि गंभीर श्वसनविषयक परिस्थिति असलेल्या ७ वर्षाच्या मुलाला बालरोग अतिदक्षता विभाग (PICU) मध्ये दाखल केल्यानंतर आता त्या मुलाच्या तब्बेतीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. 

या लहान वयातील रुग्णाला सुरुवातीला ताप, पुरळ, पोटात दुखणे आणि जलद श्वासोच्छवासाचा त्रास जाणवला आणि त्यातून गंभीर चिंता निर्माण झाली. हडपसरच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल केले तेव्हा त्याचा रक्तदाब खूप कमी झाला होता. जोडीला प्रचंड अशक्तपणा आणि प्लेटलेटची संख्या कमी होती. इंट्राव्हेनस फ्लुइड्स आणि कोलाइड तपासणी यासह तत्काळ वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले. पुढील उपचारांमध्ये आयनोट्रॉपिक सपोर्ट, पॅक्ड सेल व्हॉल्यूम (पीसीव्ही) ट्रान्सफ्यूजन आणि डेंग्यू आणि टायफॉइड सारख्या संसर्गजन्य आजारांसाठी कठोर तपासणी यांचा समावेश होता.

एवढ्या परिपूर्ण, सर्वसमावेशक तपासण्या करूनही नेमके विशिष्ट कारण अस्पष्ट राहिले. उच्च ऑक्सिजनची आवश्यकता आणि दाहक मार्कर वाढल्यामुळे मुलांमधील मल्टीसिस्टम इन्फ्लॅमेटरी सिंड्रोम (MISC) चे निदान झाले. COVID-19 शी संबंधित असण्याची शक्यता होती. वैद्यकीय पथकाने रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवून IVIG आणि स्टिरॉइड्स दिली. आयसीयू मध्ये जवळजवळ १० दिवसांनंतर, सर्वसाधारण ऑक्सिजन पातळी येऊन रुग्णामध्ये लक्षणीय सुधारणा दिसून आली. हायपोटेन्शन, श्वसनाचा त्रास, उच्च कार्डियाक मार्कर (PROBNP), कोविड IgG चाचणीसह दीर्घकाळापर्यंत कोग्युलेशन मार्कर यांनी MISC ची पुष्टी केली आणि सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर, पुणे येथील बालरोगतज्ज्ञ डॉ. गणेश बडगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू केले. डॉ. बडगे म्हणाले, “या रुग्णाच्या केसमध्ये विविध प्रकारची लक्षणे दिसत असल्यामुळे एक वेगळेच आव्हान निर्माण झाले होते.  तज्ञांमधील सहकार्य आणि पुरवली गेलेली सर्वसमावेशक काळजी हा सकारात्मक परिणाम साध्य करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरली.”

रुग्णाची प्रकृती अधिक बिघडली असल्यामुळे स्टेरॉईड्स आणि इंट्राव्हेनस इम्युनोग्लोब्युलिन (IVIG) पदेण्यात आले. वेंटिलेशनचे पाच दिवस आव्हानात्मक होते. रुग्णाला आराम मिळावा, त्याच्या तब्बेतीत सुधारणा व्हावी या साठीच्या प्रवासात आत्यंतिक काळजी अंतर्भूत होती. फुफ्फुसाच्या जळजळीमुळे रुग्णाला गंभीर एआरडीएसचा (ARDS) (तीव्र श्वसनचा त्रास) होत होता. त्यात PEEP टायट्रेशन, रिव्हर्स IE गुणोत्तर प्रयत्न आणि निगेटिव्ह द्रव संतुलन साधणे यांचा समावेश होता. ४८ तासांनंतर, सुधारणेची चिन्हे स्पष्ट झाली. अधिक चांगले आर्टीअल ब्लड गॅस परिणाम आणि एक्स-रे प्रतिमांमधून हे दिसून आले.

मुलाला तीव्र वेंटिलेशनमधून सिंक्रोनाइझ्ड इंटरमिटंट मॅन्डेटरी व्हेंटिलेशन (SIMV) मोडमध्ये आणि त्यानंतर, हाय-फ्लो नेसल कॅन्युला (HFNC) मध्ये यशस्वीरित्या आणण्यात आले. सध्या सुरू असलेल्या आरोग्य विषयक सेवेत संपूर्ण बरे वाटण्यासाठी सर्वांगीण दृष्टिकोनावर भर देत ओरल आणि फिजिओथेरपीचा समावेश आहे. दोन आठवड्यांच्या समर्पित वैद्यकीय सेवेनंतर छान बरे वाटलेल्या या   रुग्णाला कोणत्याही गुंतागुंतीशिवाय रुग्णालयातून सोडण्यात आले. सह्याद्री हॉस्पिटल्समधील या प्रेरणादायी केसमधून बालरोगाच्या गंभीर परिस्थितीत त्वरित आणि पूर्ण काळजी घेण्याची किती आवश्यकता असते हे दिसून आले. लहान वयाच्या रुग्णाच्या तब्बेतीत पूर्णपणे सुधारणा होण्यात डॉ. गणेश बडगे यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय कर्मचार्‍यांचे टीमवर्क हा महत्त्वाचा घटक होता.

मुलांमधील मल्टीसिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम समजून घेणे (MIS-C): MIS-C ही कोविड-19 नंतर मुलांमध्ये दिसून येणारी एक दुर्मिळ परंतु गंभीर गुंतागुंत आहे. जेव्हा रोगप्रतिकारक शक्ती जास्त प्रतिक्रिया देते, शरीरावर हल्ला करते आणि मोठ्या प्रमाणावर जळजळ हा त्रास होतो तेव्हा असे होते. शरीराच्या वेगवेगळ्या प्रणालींवर परिणाम करणारी लक्षणे दिसून येतात. या प्रकारच्या रुग्णांची संख्या कमी झालेली असली तरी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कोविड-19 असलेल्या मातांच्या पोटी जन्मलेली नवजात मुले आता MIS-C ची लक्षणे दाखवत आहेत. त्यामुळे नियमित अँटीबॉडी तपासण्यांशिवाय निदान आव्हानात्मक होते. विशेषत: नवजात मुलांमध्ये MIS-C समजून घेण्यासाठी आणि व्यवस्थापित करण्यासाठी सातत्यपूर्ण संशोधन महत्त्वाचे आहे.

“रामाचा आदर्श सांगता पण सीतेचं रक्षण करता काय ? ”, जयंत पाटील यांचा सवाल

नागपूर-महाविकास आघाडीचे नेते जयंत पाटील यांनी आज विधानसभेत बोलत असताना गृहखात्याच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले आहेत. तसंच देवेंद्र फडणवीस हे फोडाफोडी करण्यात व्यग्र आहेत त्यामुळे त्यांना गृहखातं पाहण्यास वेळ नाही असाही टोला जयंत पाटील यांनी लगावला. एवढंच नाही महिला सुरक्षित नाहीत हे सांगत असताना रामाचा आदर्श सांगणारे सीता माईंचं रक्षण म्हणजेच राज्यांतल्या महिलाचं रक्षण का करत नाहीत असाही सवाल त्यांनी विचारला आहे.जयंत पाटील म्हणाले.सध्या भारतात पहिल्यांदाच राम अवतरतोय असं वातावरण सुरु झालं आहे. पण मी हे सांगू इच्छितो की ही रामाचीच भूमी आहे. अयोध्येला रामजन्म झाला असला तरीही महाराष्ट्रात रामाचं वास्तव्य होतं. रामाचा आदर्श सांगत आहात तर मग सीतेचं रक्षण कोण करणार? त्याचीही गरज आहेच. सीतेचं संरक्षण म्हणजे महिलांचं संरक्षण करा मग राम मंदिरात आम्हीही तुमच्या बरोबर येऊ असंही जयंत पाटील म्हणाले आहेत.

महाराष्ट्रात ८ हजारांहून अधिक दंगली झाल्या. बिहारमध्ये ४ हजार दंगली झाल्या. आपल्याकडे दंगली घडवण्याचा विक्रम झाला. रामनवमीला हल्ली दंगली होतात, दसऱ्याला काहीही होऊ शकतं. कोल्हापुरात कुठून माणसं आली माहीत नाही पण दंगल झाली. आम्हीही हिंदू आहोत पण इतरांच्या अभिमानाला आपण डिवचून चालणार नाही असं जयंत पाटील म्हणाले आहेत. केंद्र सरकारने पोलीस स्टेशन्सची यादी जाहीर केली, त्यात महाराष्ट्रातलं एकही पोलीस स्टेशन नाही म्हणजे गृह खातं कसं चाललं आहे? हे लक्षात घ्यायला पाहिजे. गृह खात्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही फक्त पक्ष फोडाफोडी चालली आहे. मला वाटतं आता त्यांनी जाहीर करावं की सगळेच एका पक्षात आहेत म्हणजे शांतता प्रस्थापित होईल असा टोलाही जयंत पाटील यांनी फडणवीसांना लगावला.मुंबई पोलिसांची तुलना एकेकाळी स्कॉटलंड यार्डशी होत असे. आता ते दिवस गेले, मी भाषणं ऐकली आहेत. विरोधी पक्षनेत्यांनीही तेव्हा हा उल्लेख केला आहे. न्यायाची व्यवस्था काय आहे? भारतात पाच कोटी खटले प्रलंबित आहेत. १० लाख माणसांमागे १२ न्यायाधीश आहेत. महाराष्ट्रात ५० लाख केसेस पेडिंग आहेत. मला आठवतं देवेंद्र फडणवीस यांच्याकडे २०१४ लाही गृहखातं होतं. रेट ऑफ कनव्हिक्शन जास्त आहे वगैरे सांगायचे. आता केंद्राने एक अहवाल जाहीर केला आहे. त्यात या सरकारमध्ये कनव्हिक्शनचा रेट कमी आहे. गुन्हेगारांना पकडण्यात हे सरकार कमी पडतं आहे. मी फडतूस नाही काडतूस आहे असं फडणवीस म्हणाले होते. अहो पण नागपूरमध्ये चोर लुटारुंनी हैदोस घातला आहे. नागपुरात रोज सरासरी तीन ठिकाणी घरफोड्या होत आहेत. हे सगळं सांगतो अशासाठी की नागपूरमध्ये गुन्हेगारी प्रचंड प्रमाणत वाढली आहे. म्हणून आम्ही सांगतो की महाराष्ट्रात इतर ठिकाणी फिरण्यापेक्षा नागपूरमध्ये ठाण मांडून गृहमंत्र्यांनी बसलं पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या उपराजधानीतलं वातावरण दुरुस्त करावं अशी आमची सूचना आहे असंही जयंत पाटील म्हणाले आहेत.

महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यांची परिस्थितीही चांगली नाही. मागच्या वर्षात २ हजारांहून अधिक बलात्काराच्या घटना घडल्या. बलात्काराच्या घटनांमध्ये महाराष्ट्राचा चौथा क्रमांक आहे. यांचं राज्य राहिलं तर तो पहिल्या क्रमांकावर आहे. खुनाच्या घटनांमध्ये महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. जळगावचं नाव काढलं की बच्चू कडूंना जवळ घेऊन बसतात, त्यांना अधिकार द्या बघा ते जळगाव स्वच्छ करतील. याला कारणीभूत कोण आहे? महिलांची सुरक्षा यांच्या काळात धोक्यात आहे हे सांगणं आवश्यक आहे. आपण प्रगतीशील राज्य आहोत. या राज्यात बेकारी १० टक्क्यांच्या वर आहे. या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्नही गंभीर आहे. हे सरकार महिलांना सुरक्षित ठेवण्यासाठी कमी पडतं आहे. पोलीस खात्यात पोलीस भरती का टाळली जाते आहे? हे देखील आम्हाला समजत नाही असंही जयंत पाटील म्हणाले. हे सरकार आता पोलीसही कंत्राटी पद्धतीने करायची आहे का? जागा रिक्त ठेवायच्या आणि कंत्राटी पद्धत आणायची असा यांचा प्रयत्न दिसतो. २०१४ ला आम्ही टीव्हीवर पाहिलं एक भगिनी टीव्हीवर यायची आणि म्हणायची कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा? आता त्या ताईंना आम्ही शोधतो आहोत. आता कुठे नेऊन ठेवलाय आमचा महाराष्ट्र हे लोक विचारु लागले आहेत.

ड्रग्जचा विषय म्हणजे उडता पंजाबप्रमाणे उडता महाराष्ट्र करण्याची तयारी सुरु झाली आहे. हप्ते सुरु असल्याने ड्रग्ज प्रकरणात काही कारवाई होत नाही. सगळीकडे सर्रासपण सुरु आहे. ललित पाटील सारख्या ड्रग माफियांना राजाश्रय दिला जातो आहे. गुन्हेगारांना संरक्षण देण्याचं काम हे सरकार करतं आहे. पुण्यात एक कोयता गँग होती. त्या गँगचा बंदोबस्त हे सरकार करु शकलं नाही. सायबर क्राईम हे प्रचंड मोठं संकट आपल्यावर आहे. डीपफेक आणि इतर प्रकार आपण पाहिले आहेत. फार मोठ्या प्रमाणावर सायबर क्राईम वाढतो आहे. या घटनेला तोंड देताना ऑनलाइन फ्रॉड तर होत आहेतच. सरकारने सायबर क्राईमची व्यवस्था केलेली नाही. महिलेला अश्लील बोललं, अश्लील फोटो टाकले तरीही कारवाई होत नाही. त्यासाठी कठोर कायदे आणले पाहिजेत. मात्र यात सरकारचं अपयश दिसतं आहे. महाराष्ट्र सायबर क्राईमचं कॅपिटल होतोय का? याचा अभ्यास सरकारने केला पाहिजे असंही

६४ वर्षीय महिलेवर रात्रभर बलात्कार करून पहाटे घराबाहेर विवस्त्र अवस्थेत फेकून दिले-राजधानी मुंबईतील घटना

0

मुंबई-

मुंबईतील ट्रॉम्बे पोलीस ठाण्याचा हद्दीमध्ये एका 64 वर्षीय महिलेवर अत्याचाराची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर आरोपीने या पिडीत महिलेच्या चेहऱ्यावर, डोक्यात, प्रायव्हेट पार्टवर आणि शरीरावर अमानुष वार केले आहेत.या घटनेनंतर ती बेशुद्ध झाली आहे. आरोपीने महिलेला रस्त्याच्या कडेला फेकून दिले आणि घटनास्थळावरून पळ काढला. या पिडीत महिलेची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत, तर या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ही पीडित महिला रस्त्यावर आढळून आली . एका स्मथानिक हिलेने संबधित घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले, महिलेला उपचारांसाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास आरोपी उमेश गुलाबराव ढोक वय 38 वर्ष याने महिलेला घरी सोडतो असं सांगून महिलेला आपल्या घरी नेले. त्यानंतर त्याने महिलेवर अत्याचार केले. महिलेने विरोध केल्यावर आरोपीने तिला बेदम मारहाण केली. त्यानंतर पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास तिला रस्त्याच्या कडेला फेकून दिलं आणि आरोपी पळून गेला.

यश लाॅनमधून डाॅक्टर महिलेचे १२ लाख ६० हजारांचे हिरेजडीत सोन्याचे दागिन्यांची चोरी

पुणे-एका विवाह कार्यक्रमातून डाॅक्टर महिलेचे १२ लाख ६० हजारांचे हिरेजडीत सोन्याचे मौल्यवान दागिने अज्ञात आरोपीकडून चोरीला गेल्याची घटना बिबवेवाडी भागातील नामांकित मंगल कार्यालयात घडली आहे.

याबाबत संबधित डाॅक्टर महिलेने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार डाॅक्टर महिला मूळच्या जळगाव मधील रहिवासी आहेत. त्यांच्या नात्यातील एका नातेवाईकचा विवाह बिबवेवाडीतील यश लाॅन कार्यालयात होता. त्या महाराष्ट्र एक्सप्रेस गाडीने पुणे रेल्वे स्थानकावर आल्या होत्या. तेथून त्या बिबवेवाडीतील मंगल कार्यालयात लग्नास आल्या. विवाह समारंभात दागिने परिधान करण्यासाठी त्यांनी त्यांची बॅग उघडली. तेव्हा बॅगेत ठेवलेले १२ लाख ६० हजारांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे उघडकीस आले आहे.दरम्यान, तक्रारदार महिलेकडील सोन्याचे दागिने प्रवासादरम्यान चोरीला गेल्याची प्रार्थामिक शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलिसांनी मंगल कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासासाठी ताब्यात घेतले आहे. सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार बरडे याबाबत पुढील तपास करत आहेत.

जिल्हा परिषद शाळांमध्ये सौर यंत्रणा बसवण्याबाबत विचार– मंत्री गिरीश महाजन

0

 नागपूर, दि. २०: राज्यातील जिल्हा परिषदांच्या सर्व शाळांमध्ये सौर यंत्रणा बसवण्याबाबत गांभीर्याने विचार करण्यात येईल. तसेच जळगाव जिल्ह्यातील शाळांमध्ये सोलर सिस्टीम बसविण्याची प्रलंबित कार्यवाही येत्या दोन महिन्यात करण्यात येईल, अशी माहिती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आज विधानसभेत दिली.

सदस्य संजय सावकारे यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री श्री. महाजन यांनी यावेळी माहिती देताना सांगितले की, शासकीय आश्रम शाळा, लालमाती, ता. रावेर येथे सन २०११ मध्ये सौर यंत्रणा बसविण्यात आली होती. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०१९-२० अंतर्गत अपारंपरिक ऊर्जा विकास या योजनेतून रावेर तालुक्यातील १७ जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सौर यंत्रणा बसविण्यात आली होती. मात्र, शासकीय आश्रम शाळा लालमाती, ता. रावेर येथील सौर यंत्रणा नैसर्गिक आपत्तीमुळे (वादळामुळे) काही युनिट बंद पडले आहेत. हे बंद युनिट तातडीने सुरू करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

यावेळी सदस्य प्राजक्त तनपुरे, प्रकाश आबिटकर आणि ॲड. यशोमती ठाकूर यांनी उपप्रश्न विचारले.

खासदार निलंबनाच्या निषेधार्थ समाजवादी पार्टीची पुण्यात निदर्शने

पुणे :

लोकसभा व राज्यसभेतील १४१ खासदारांना निलंबित करण्याच्या  विरोधात   समाजवादी पार्टी, पुणे शहराच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी  कार्यालया समोर निर्दशन करण्यात आली आणि निर्णयाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.या प्रसंगी अनिस अहमद,विठ्ठल सातव, दत्ता पाकिरे,प्रशांत दांडेकर, विनायक लांबे, दीपक पाटील, अजिंक्य  गायकवाड, साधना शिंदे,अशोक गायकवाड, इब्राहिम यवतमाळवाले, विद्यमान भंडारी,सुनिल सोनवणे,जान्सन कोल्हापुरे,प्रकाश डोंबाळे,पुणे महापालिकेचे निवृत्त कर्मचारी संघटनेचे कैलास रणदिवे,एम.जी.ढगळे,बी.एस.कांबळे,बी.एस.घोडके इत्यादी उपस्थित होते.आज  दिनांक २० डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ही निदर्शने करण्यात आली. 

विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमस्थळाची जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडून पाहणी

अभिवादन सोहळ्याची पूर्वतयारी वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश

पुणे,दि.१९ : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी कोरेगाव भीमा (पेरणे फाटा) येथील विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमस्थळाची पाहणी केली; यावेळी त्यांनी अभिवादन सोहळ्यासाठी सुरू असलेली कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी पुणे शहरचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्यासह वाहनतळाची जागा आणि विजयस्तंभ परिसराची पाहणी केली. यावेळी समाज कल्याण आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, पोलीस सहआयुक्त रामनाथ पोकळे, पिंपरी चिंचवडचे पोलीस सहआयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, उपविभागीय अधिकारी संजय आसवले, स्नेहा किसवे-देवकाते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल ढेपे आदी उपस्थित होते.

डॉ. देशमुख यांनी कोरेगाव भीमा (पेरणे फाटा) विजयस्तंभ परिसरात आयोजित आढावा बैठकीत करण्यात येत असलेल्या कामांबाबत आढावा घेतला. १ जानेवारी रोजी  विजयस्तंभास अभिवादन करण्यास येणाऱ्या अनुयायांना सर्व सोयीसुविधा मिळतील यादृष्टीने पिण्याचे पाणी, स्वच्छता गृह, विद्युत प्रकाश व्यवस्था, वाहनतळ, सुरक्षा व्यवस्था, आरोग्य सुविधा, गर्दीचे व वाहतुकीचे नियोजन, आपत्तकालीन प्रसंगी अग्नीशमन वाहनांची व्यवस्था, हिरकणी कक्ष, आपत्ती व्यवस्थापन याबाबत केलेल्या पूर्वतायरीची माहिती त्यांनी घेतली.

दरवर्षी अभिवादानासाठी येणाऱ्या अनुयायांची वाढती संख्या लक्षात घेऊन पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहाची सोय करावी. नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी. गर्दीच्या नियोजनाबाबत सूक्ष्म नियोजन करावे. वाहतुकीचे नियोजन करून त्याची नागरिकांना माहिती द्यावी , अशा सूचना डॉ. देशमुख यांनी दिल्या.

पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनीदेखील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला व नियोजनसंबंधी सूचना दिल्या

यावेळी संबधीत अधिकाऱ्यांनी करण्यात येणाऱ्या कामांबाबत माहिती दिली

माजी विरोधी पक्षनेते म्हणाले,’ महापालिकेची कर आकारण्याची पद्धतच बेकायदा ..मुख्यमंत्र्यांसह अनेकांना आव्हान

पुणे- महापालिकेची मिळकत कर आकारण्याच्या पद्धतीला आक्षेप घेत हि पद्धतच बेकायदा असल्याचा दावा करत याबाबत चे थेट आव्हान मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, स्थानिक आमदार आणि अधिकारी यांना माजी विरोधी पक्षनेते उज्वल केसकर , सुहास कुलकर्णी तसेच माजी नगरसेवक प्रशांत बढे यांनी दिले आहे . या संदर्भात त्यांनी या सर्वांना एक संयुक्त पत्र दिल्याचे सांगितले. या पत्रात काय म्हटले आहे ते वाचा जसेच्या तसे ….

प्रति
मा.ना.एकनाथजी शिंदे
मुख्यमंत्री
महाराष्ट्र राज्य
मा.ना.देवेंद्रजी फडणवीस
उपमुख्यमंत्री
मा.ना.अजित दादा पवार
उपमुख्यमंत्री
मा.ना.चंद्रकांत दादा पाटील
उच्च शिक्षण मंत्री
यांसी सप्रेम नमस्कार
महोदय,

पुणे महानगरपालिकेमध्ये कर आकारणी आणि कर संकलन विभागामध्ये बेकायदेशीर काम चालू आहेत.
आपण खात्री करून घेऊ शकता
कुठल्याही मालमत्तेला कर आकारणी करण्याची कायदेशीर पद्धत खालील प्रमाणे आहे.
१) ज्या नागरिकांनी मालमत्ता खरेदी केली तो महानगरपालिकेकडे कर आकारणीसाठी अर्ज करतो.
२) कर आकारणी विभागाचे पेठ निरीक्षक यांच्या लक्षात आले की एखाद्या ठिकाणी नवीन इमारत झाली आहे त्या ठिकाणी नागरिक रहायला आले आहेत आणि त्यांची आकारणी झाली नाहीत अशा वेळेस ते नागरिकांना नोटीस देतात.
३) घराची मोजमापे महानगरपालिकेच्या बांधकाम परवाना विभागाकडून भोगवटा पत्र मिळाल्यानंतर उपलब्ध असते.
४) त्या नकाशाच्या आधारे अथवा प्रत्यक्ष घरामध्ये जाऊन मोजमापे घेऊन त्याची आकारणी पेठ निरीक्षक निश्चित करतात त्यानंतर त्यावर विभागीय निरीक्षकांची स्वाक्षरी होऊन अंतिमतः विभाग प्रमुखांची स्वाक्षरी होते.
५) कर आकारणी केल्यानंतर त्याची नोटीस ‘ए’ फॉर्म मध्ये मालमत्ता धारकाला दिली जाते आणि त्यावर मंजूर म्हणून त्याची सही घेतली जाते त्यांनी ती स्वीकारण्यास नकार दिला तर झालेली आकारणी त्यांच्या घराबाहेर लावून त्याचा फोटो काढला जातो आणि काढलेला फोटो आणि निवेदन खाते प्रमुखांच्या कडे पाठवून आकारणी अंतिम करून बिल काढण्यास मंजुरी मिळते.
६) वर उल्लेख केल्याप्रमाणे साधारणता पुणे महानगरपालिकेत कायदेशीर कर आकारणी करण्याची रूढ पद्धत आहे.
७) वरील कुठल्याही बाबींचा समावेश न करता फक्त विकसकांच्या कडून यादी मागवून घेऊन सदनिका धारकांच्या
आकारणीच्या नोटिसा तयार केल्या गेल्या आणि त्यावर विकसकाच्या मान्य अशा सह्या घेऊन नांदेड सिटी येथे बारा हजार (१२,०००) सदनिका धारकांना नवीन वर्ष संपवण्याच्या आधी तीन महिने संपूर्ण वर्षाचे बिल पाठविले ही बाब संपूर्णपणे बेकायदेशीर असून अशा प्रकारची कर आकारणी केली जात नाही.

८) ही कर आकारणी करताना मोकळ्या जागेची आकारणी देखील 75 पैसे चौरस फुटाच्या दराने केली पाहिजे असे असताना विकसक कंपनीला कर आकारणी न करता त्यांच्याकडून बारा हजार सदनिका धारकांना (१२,०००) कर आकारणी केली.
९) आमची आपणास विनंती आहे
अ) आपण याबाबत तातडीने बारा हजार सदनिका धारकांना दिलासा देऊन त्यांना कायदेशीर मार्गाने कर आकारणी स्वीकारण्याचा अथवा नाकारण्याचा अधिकार परत देण्यासाठी या कर आकारणीला त्वरित स्थगिती द्यावी.
ब) विकसकांकडे असलेल्या मोकळ्या जागेवर तातडीने कायद्याने आवश्यक प्रक्रिया करून कर लावण्याचे आदेश द्यावेत.

धन्यवाद
आपले पुणे
उज्ज्वल केसकर
सुहास कुलकर्णी
माजी विरोधी पक्षनेते
पुणे मनपा
प्रशांत बधे
माजी नगरसेवक
ukeskar@gmail.com
१९/१२/२३
प्रत:-
आमदार माधुरीताई मिसाळ
आमदार सिद्धार्थ शिरोळे
आमदार सुनील कांबळे
आमदार भीमराव अण्णा तापकीर
आमदार सुनील टिंगरे
आमदार रवींद्र धंगेकर
आमदार चेतन तुपे
आमदार संजय जगताप
आमदार संग्राम थोपटे

‘पिंपरी चिंचवड गाव ते महानगर’ या पुस्तकाचा सोमवारी प्रकाशन समारंभ

पुणे (दि. १९ डिसेंबर २०२३) पिंपरी चिंचवड शहराचे अभ्यासक श्रीकांत चौगुले लिखित ‘पिंपरी चिंचवड गाव ते महानगर’ या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीचा प्रकाशन समारंभ सोमवारी (दि. २५) चिंचवड, समरसता गुरुकुलम येथे दुपारी चार वाजता, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते व माजी आमदार आणि प्रथम महापौर ज्ञानेश्वर लांडगे यांच्या उपस्थितीत, पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे.
या पुस्तकाच्या प्रथम आवृत्तीचा संदर्भग्रंथ म्हणून अभ्यासकांना उपयोग झाला आहे. जिज्ञासू वाचकांच्या मागणीमुळे द्वितीय आवृत्तीत तीनशे पंचवीस पृष्ठांसह गेल्या दोन दशकात अनेक दुर्मिळ छायाचित्रांचा समावेश आणि आकर्षक मांडणीचे रंगीत कव्हर करण्यात आले आहे. नितीन हिरवे हे या आवृत्तीचे प्रकाशक आहेत. प्रकाशनाच्या निमित्ताने सवलत देण्यात येणार आहे.
या पुस्तकाच्या प्रथम आवृत्तीचे प्रकाशन २००३ प्रसिद्ध वक्ते प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या हस्ते आणि पिंपरी चिंचवड नगरपालिकेचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. श्री श्री घारे यांच्या अध्यक्षतेखाली झाले होते.

आर्या म्हस्केची रौप्य पदकावर मोहर !!!भोपाळ येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

पुणे (दि.१९ डिसेंबर २०२३) पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूलची विद्यार्थीनी आर्या म्हस्के हिने कोल्हापूर येथे झालेल्या राज्य स्तरीय पिस्तूल शूटिंग स्पर्धेत (पंधरा वर्षांखालील वयोगटात) रौप्य पदकावर मोहर उमटवली. त्यामुळे आर्या म्हस्के हीची २७ डिसेंबर रोजी भोपाळ येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या प्राचार्या डॉ. बिंदू सैनी, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी आर्या म्हस्के हीस राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.