Home Blog Page 1304

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गॅन्ट्री बसविण्यासाठी ब्लॉक

पुणे, दि. २०: यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत पुणे वाहिनीवर कि.मी १०.७५० (अमेटी युनिर्व्हसिटी) व कि.मी २९.२०० (मडप बोगदा व खालापूर टोल प्लाझा दरम्यान) येथे गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत २१ डिसेंबर रोजी दुपारी १२ ते २ या वेळेत करण्यात येणार आहे.

या कालावधीत सर्व प्रकारच्या वाहनांची (हलकी तसेच जड-अवजड वाहने) वाहतूक पूर्णत: बंद राहील. वाहनाधारकांना पर्यायी मार्गाने प्रवास करता येईल. मुंबईहून पुण्याकडे जाणारी हलकी वाहने (कार) शेडुंग फाटा कि.मी ८.२०० येथून वळवून एन.एच.४ जुना मुंबई-पुणे महामार्गावरुन शिंग्रोबा घाटातुन मॅजिक पॉईंट कि.मी ४२.००० येथून पुन्हा द्रुतगती महामार्गावरील पुणे वाहिनीवर मार्गस्थ करण्यात येतील, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने कळविले आहे.

माजी खासदार अनिल शिरोळे यांच्या पत्नी माधुरी शिरोळे यांचे निधन

पुणे- पुण्याचे माजी खासदार अनिल शिरोळे यांच्या ( Pune) पत्नी माधुरी उर्फ अनिला  अनिल शिरोळे यांचे आज (दि.20) दिर्घकालीन आजाराने पुण्यात सकाळी सव्वा दहा वाजता निधन झाले.त्या शिवाजीनगरचे विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या आई होत. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

कोविड व्हेरियंट जेएन १ च्या अनुषंगाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांनी यंत्रणा सुसज्ज ठेवावी – वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ

0

नागपूर दि. 20 : कोविड जेएन 1 या व्हेरियंटचा प्रसार जगभर वेगाने होत आहे. यासाठी पुर्वानूभव लक्षात घेता वेळीच दक्षता आणि सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कोविड संबंधित यंत्रणा सुसज्ज ठेवावी. येणाऱ्या संभाव्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी डॉक्टरांचे पथक, मुबलक औषधसाठा व कोविड तपासणी किट उपलब्ध करून देण्याबाबत वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज येथे सांगितले. 

कोविड – 19 च्या नव्याने उद्भवलेल्या व्हेरियंटचा प्रादुर्भावाबाबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर येथे वैद्यकीय शिक्षणमंत्री श्री. मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, आयुक्त राजू निवतकर, संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, सहसंचालक डॉ. विवेक पाखमोडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये तसेच राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अधिष्ठाता दुरदृष्य प्रणालीद्वारे यावेळी उपस्थित होते.

कोविडच्या नव्याने निर्माण झालेल्या जेएन 1 या व्हेरियंटबाबत नागरिकांनी घाबरून न जाता दक्षता बाळगणे गरजेचे असल्याचे सांगून श्री. मुश्रीफ म्हणाले की, आपण सर्वांनी एकत्रितपणे काम करून कोविडच्या लाटेला थोपविण्यात यश मिळविले आहे. आता नव्याने आलेल्या जेएन 1 या नवीन व्हेरियंटवरही सर्वांच्या सहकार्याने मात करावयाची आहे. याबाबत सावधगिरी बाळगण्याबाबत केंद्र शासनामार्फतही सूचना आल्या आहेत. जेएन 1 व्हेरियंट झपाट्याने वाढत असून गेल्या आठवड्यात 3.3 टक्के प्रादुर्भावाचे प्रमाण सध्या 27.1 टक्के पर्यंत गेले असून जगभरात या व्हेरियंटचे रुग्ण वाढत आहेत. फ्रान्समध्ये 20.1 टक्के, अमेरिका 14.2 टक्के, सिंगापूर 12.4 टक्के, कॅनडा 6.8 टक्के, युनायटेड किंगडम 5.8 टक्के, स्विडन येथे 5 टक्के येवढे आहे. देशात 19 डिसेंबर 2023 पर्यंत 2 हजार 311 रुग्ण आढळले असून केरळमध्ये 2 हजार 41 रुग्ण असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर गोव्यामध्ये 15 रुग्णांची नोंद झाली आहेत. तामिळनाडू 14 तर महाराष्ट्रामध्ये 11 रुग्णांची नोंद झाली आहे. परंतु नागरिकांनी न घाबरता कोविड मार्गदर्शक तत्वे तसेच त्रिसुत्रींचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोविड तपासणी सुविधेसाठी आरटीपीसीआर मशिन अद्ययावत कराव्यात. त्यासाठी पुरेशा किटचा पुरवठा उपलब्ध करून द्यावा. रुग्णांची चाचणी पॉझिटिव्ह आल्यास संबंधित रुग्णाला योग्य तो औषधोपचार उपलब्ध करून द्यावे. तसेच वैद्यकीय महाविद्यालयातील पीएसए ऑक्सिजन प्लॉन्ट त्वरित कार्यान्वित करून घ्यावेत. याशिवाय अतिरिक्त दुय्यम व्यवस्था म्हणून जंबो ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून द्यावेत. वैद्यकीय रुग्णालयात येणाऱ्या सर्व संशयित रुग्णांची तपासणी करून माहिती संकलित करावी. नागरिकांनी वैयक्तिक स्तरावर मास्क वापरणे, हातांची स्वच्छता, सामाजिक अंतर राखणे याबाबींचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन वैद्यकीय शिक्षणमंत्री श्री. मुश्रीफ यांनी केले आहे.

लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्यदिव्य पुतळा उभारण्यात येणार-सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार

मिलिंद एकबोटे,धीरज घाटे, सुनिल देवधर आणि एअर व्हाईस मार्शल जयंत इनामदार यांची उपस्थिती

पुणे, दि.१९: छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेत आणि अफजलखान वधात महत्त्वाची भूमिका असलेली महाराजांची वाघनखं लवकरच भारतात येतील आणि लंडनमध्ये महाराजांचा भव्यदिव्य पुतळा उभारण्यात येईल,असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

शिवप्रतापदिनानिमित्त नातूबाग मैदान येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी एअर व्हाईस मार्शल जयंत इनामदार (निवृत्त), मिलिंद एकबोटे, धीरज घाटे, सुनिल देवधर आदी उपस्थित होते.

मंत्री श्री.मुनगंटीवार म्हणाले,छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित ठिकाणी त्यांच्या स्मृती राज्य सरकारच्यावतीने त्या जपल्या जातील. छत्रपती शिवाजी महाराज खरे लोकशाहीचे जनक आहेत. त्यामुळे संसद परिसरात शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा प्रसंग उभारण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना विनंती करण्यात येईल. १२ जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ यांचा नावे पोस्टाची तिकीटाचे अनावरण करण्यात येणार आहे. सिंदखेडराजा परिसर विकास कामांसाठी २५० कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे.

सांस्कृतिक विभागातर्फे छत्रपतींच्या जीवनावर आधारित आतापर्यंत २ पोस्टाची तिकीटे काढण्यात आली असून आणखी १० तिकीटे काढण्यात येणार आहे. राजमाता जिजाऊ, छत्रपती संभाजी महाराज यांचे तिकीट काढण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्यभिषेकाच्यावेळी काढलेले होन स्मृती म्हणून आरबीआयकडून काढत आहोत. ज्या दरबारात शिवाजी महाराजांचा अपमान केला त्या आग्र्याच्या दरबारात शिवजयंती साजरी करण्यात आली. सर्व संकटातून मुक्त होण्याचा मार्ग शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यात आहे, हाच विचार घेऊन सर्वांनी पुढे जावे, असे आवाहन त्यांनी केले.

नवा उत्साह आणि नवी ऊर्जा घेण्यासाठी कार्यक्रमाला आल्याचे नमूद करून मंत्री श्री.मुनगंटीवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने स्फूर्ती मिळते. मोगल आक्रमण होत असताना त्यांच्या दैवी अवताराचे दर्शन घडले. भय, गर्व आणि वासनारहित समाज उभा राहावं, तो परकीय आक्रमणापुढे दबून जाऊ नये म्हणून त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. त्यांच्या पराक्रमामुळे त्यांच्या काळात औरंगजेबालाही महाराष्ट्र जिंकता आले नाही. त्यांच्या अशा अलौकिक कार्यामुळे काश्मिरमधील कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना प्रेरणादायी, उर्जादायी ठरेल.

या देशासाठी छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, झाशीची राणी लक्ष्मीबाई आदर्श आहेत. हा देश सदाचारावर आणि आध्यात्मिक विचारावर चालतो,असेही ते म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी एअर व्हाईस मार्शल जयंत इनामदार (निवृत्त) यांच्या हस्ते हिंदवी स्वराज्य भूषण वीर जिवा महाले पुरस्काराने मंत्री श्री.मुनगंटीवार यांना सन्मानित करण्यात आले. त्यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

बनावट सिम खरेदी केल्यास 3 वर्षांचा तुरुंगवास, 50 लाखांचा दंड

0

नवी दिल्ली- नवीन दूरसंचार विधेयक 2023 बुधवारी, 20 डिसेंबर रोजी लोकसभेत मंजूर करण्यात आले. आता हे विधेयक अंतिम पुनरावलोकनासाठी राज्यसभेकडे पाठवण्यात आले आहे. या विधेयकात बनावट सिम खरेदी केल्यास 3 वर्षांचा तुरुंगवास आणि 50 लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे.

बिलामध्ये टेलिकॉम कंपन्यांना ग्राहकांना सिम कार्ड देण्यापूर्वी बायोमेट्रिक ओळख अनिवार्य करण्यास सांगितले आहे.

हे विधेयक सरकारला राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव कोणतीही दूरसंचार सेवा किंवा नेटवर्क ताब्यात घेण्यास, व्यवस्थापित करण्यास किंवा निलंबित करण्यास अनुमती देईल. म्हणजेच युद्धसदृश परिस्थितीत गरज भासल्यास सरकार दूरसंचार नेटवर्कवरील संदेश रोखू शकणार आहे.

विधेयक दूरसंचार क्षेत्राचे नियमन करणार्‍या 138 वर्ष जुन्या भारतीय टेलिग्राफ कायद्याची जागा घेईल. याशिवाय हे विधेयक भारतीय वायरलेस टेलिग्राफ कायदा 1933 आणि टेलिग्राफ वायर्स कायदा 1950 ची जागा घेईल. ते ट्राय कायदा 1997 मध्ये सुधारणा देखील करेल.

परवाना प्रणालीत बदल होणार
या विधेयकामुळे परवाना प्रणालीतही बदल होणार आहेत. सध्या सेवा पुरवठादारांना विविध प्रकारच्या सेवांसाठी वेगवेगळे परवाने, परवानग्या, मंजुरी आणि नोंदणी घ्यावी लागते. अशाप्रकारचे 100 हून अधिक परवाने आणि नोंदणी दूरसंचार विभागाने जारी केलेले आहेत.

जिओ, एअरटेल, स्टारलिंक यासारख्या कंपन्यांना फायदा
या विधेयकात दूरसंचार स्पेक्ट्रमचे प्रशासकीय वाटप करण्याची तरतूद आहे, ज्यामुळे सेवा सुरू होण्यास वेग येईल. रिलायन्स जिओ, भारती एअरटेलचे OneWeb आणि एलोन मस्कच्या Starlink सारख्या कंपन्यांना नवीन बिलाचा फायदा होणार आहे.

प्रचारात्मक संदेश पाठवण्यापूर्वी ग्राहकाची संमती घेणे आवश्यक
ग्राहकांना वस्तू आणि सेवांसाठी जाहिराती आणि प्रचारात्मक संदेश पाठवण्यापूर्वी त्यांची संमती घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. यात असेही म्हटले आहे की दूरसंचार सेवा देणाऱ्या कंपनीला ऑनलाइन यंत्रणा तयार करावी लागेल, जेणेकरून वापरकर्ते त्यांच्या तक्रारी ऑनलाइन नोंदवू शकतील.

बिलाच्या नवीन आवृत्तीमधून ओव्हर-द-टॉप सेवा वगळल्या
या विधेयकात ई-कॉमर्स, ऑनलाइन मेसेजिंग यासारख्या ओव्हर-द-टॉप सेवांना दूरसंचार सेवांच्या व्याख्येतून वगळण्यात आले आहे. गेल्या वर्षी जेव्हा दूरसंचार विधेयकाचा मसुदा सादर करण्यात आला, तेव्हा त्यात ओटीटी सेवांचाही समावेश करण्यात आला होता. याबाबत इंटरनेट कंपन्यांनी मोठा गदारोळ केला होता. त्यानंतर ओटीटीला या विधेयकातून वगळण्यात आले आहे.

पुणे पुस्तक महोत्सवाला आतापर्यंत दीड लाख नागरिकांची भेट ; शालेय विद्यार्थी आणि युवकांची संख्या लक्षणीय

पुस्तकांची विक्री जोरात सुरू असल्याची संयोजकांची माहिती

पुणे : राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर भरलेल्या पुणे पुस्तक महोत्सवाला आतापर्यंत दीड लाख नागरिकांनी भेट दिली असून, यामध्ये युवक – युवतींची संख्या लक्षणीय आहे. पुणे पुस्तक महोत्सवातील प्रकाशकांच्या स्टॉलवर विविध प्रकारची पुस्तके घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. या स्टॉलवर सरासरी ५० हजार रुपयांची पुस्तक विक्री होत असल्याची माहिती न्यासाचे अध्यक्ष मिलिंद मराठे आणि महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे यांनी बुधवारी दिली.

पुणे पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी मराठे आणि पांडे यांनी पत्रकारांना माहिती दिली. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे, भाजप नेते माधव भांडारी, प्रसेनजीत फडणवीस, ॲड. मंदार जोशी आदी उपस्थित होते.

पांडे म्हणाले की, पुणे पुस्तक महोत्सवाला पुणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. पुस्तक महोत्सवाचे उद्घाटन झाल्यानंतर, साधारण दीड लाख नागरिकांनी भेट दिली आहे. येत्या काही दिवसात हा आकडा वाढणार आहे. शनिवारी आणि रविवारी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रदर्शन रात्री साडेआठ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे या महोत्सवात २८ हजार शालेय विद्यार्थ्यांनी भेट दिली आहे. हे विद्यार्थी छत्रपती शिवाजी महाराजांवर असणारी पुस्तके आवर्जून पाहत आहेत. त्याचप्रमाणे महाराजांवरील माहिती प्रदर्शनालाही भेट देत असल्याचे पांडे यांनी सांगितले.पुणे पुस्तक महोत्सवात साधारण २५० स्टॉल्स आहेत. यातील साधारण २०० स्टॉल्सवर सरासरी ५० हजार रुपयांच्या पुस्तकांची विक्री होत आहे. त्यामुळे दिवसभरात साधारण १ कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल होत आहे. या सर्वांचा अभ्यास केल्यास, आतापर्यंत साधारण चार कोटी रूपयांपेक्षा अधिकची पुस्तकांची विक्री झाली आहे. या आकडा वाढण्याचीही शक्यता आहे, असे पांडे आणि मराठे यांनी सांगितले.
डॉ. सदानंद मोरे यांचा सन्मान
मराठी भाषा विद्यापीठाच्या निर्मितीसाठी समिती स्थापन करण्यात आली होती. या विद्यापीठाची घोषण करण्यात आली आहे. या निमित्ताने पुणे पुस्तक महोत्सवात डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांच्या हस्ते ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र – कुलगुरू डॉ. पराग काळकर, कुलसचिव डॉ. विजय खरे, महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे, बागेश्री मंठाळकर, राजेंद्र भामरे आदी उपस्थित होते.

पुणे शहरात पुणे पुस्तक महोत्सवाचे आयोजन होणे ही अत्यंत चांगली बाब आहे. या निमित्ताने लोकांना विविध प्रकाराची पुस्तके खरेदी करण्याची संधी मिळते. या महोत्सवाला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या महोत्सवाचे आयोजन करणाऱ्या राजेश पांडे आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन करायला हवे. असे उपक्रम यापुढील काळातही पुणे शहरात व्हायला हवेत.

  • डॉ. सदानंद मोरे, ज्येष्ठ साहित्यिक

भारतात हार्डवेअर क्रांतीची गरज-मृत्यूंजय सिंग


एमआयटी एडीटी विद्यापीठात स्मार्ट इंडिया हॅकेथॉन स्पर्धेचे उद्घाटन
पुणे : भारत सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ सारख्या योजनांमुळे देशातील उत्पादकतेला बळ मिळून ती स्वयंभू बनत आहे. पूर्वी चीनी उत्पादनांची हार्डवेअर मार्केटवर मोनोपोली असल्याचे चित्र होते. परंतू कोरोनानंतर परिस्थिती बदलली आहे. तरी देखील भारतात साॅफ्टवेअर प्रमाणे हार्डवेअर क्षेत्रातही क्रांती आवश्यक आहे, असे मत ‘इन्फोसिस पुणे’चे वरिष्ठ उपाध्यक्ष मृत्यूंजय सिंग यांनी मांडले. ते एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठ, पुणेच्या संत श्री.ज्ञानेश्वर महाराज विश्वशांत डोम येथे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची इनोव्हेशन सेल व एआयसीटीई द्वारे आयोजित राष्ट्रीय स्मार्ट इंडिया हॅकेथॉन (एसआयएच) स्पर्धेच्या हार्डवेअर गटाच्या अंतिम फेरीच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. यावेळी, ‘एज्युमेटीका’चे संस्थापक संजीव कुमार, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे प्र.कुलगुरू डाॅ.मोहित दुबे, डॉ.रामचंद्र पुजेरी, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, नोडल केंद्र प्रमुख डाॅ.रेखा सुगंधी, डाॅ.सुरेश कापरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. तसेच, भारत सरकारकडून दूरदृष्ट प्रणालीद्वारे करण्यात आलेल्या उद्घाटनात एआयसीटीईचे चेअरमन टी.जी. सितारामन यांनी देखील मार्गदर्शन केले.पुढे बोलताना मृत्यूंजय सिंग म्हणाले की, सध्या देशासमोर असणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी संशोधनाला चालना देण्याचे काम स्मार्ट इंडिया हॅकेथाॅन या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे. त्यासाठी एमआयटी एडीटी विद्यापीठाचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत, असे म्हणत त्यांनी कौतुकही केले.    यावेळी संजीव कुमार यांनी देखील विद्यापीठाचे कौतुक करताना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्पर्धेच्या आयोजनात कुलगुरू तथा कार्याध्यक्ष प्रा.डाॅ.मंगेश कराड, डाॅ.सुनीता कराड यांचे मार्गदर्शन लाभले. या स्पर्धेत आंध्र प्रदेश, बिहार, हरियाणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, पाँडेचेरी, कर्नाटक, केरळ, चंडीगढ, जम्मू-काश्मिर, राजस्थान आणि तामिळनाडू या राज्यांतील २७ संघांचे विद्यार्थी सहभागी झाले आहेत. 
पंतप्रधानांचा विद्यार्थ्यांशी संवाद-स्मार्ट इंडिया हॅकेथाॅन स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना विकसीत भारत@२०४७ या संकल्पनेत सहभागी होण्याचे आवाहन केले. तसेच विद्यार्थ्यांनी त्यांना आपल्या कल्पना ऐकवताना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान हे देखील उपस्थित होते.

अमिषा पटेल, जतिन खुराना आणिअँजेला क्रिसलिंझकीस्टारर “तौबा तेरा जलवा” चा ट्रेलर रिलीज


अमीषा पटेल, जतिन खुराना आणि अँजेला क्रिसलिंझकी स्टारर ‘तौबा तेरा जलवा’ 5 जानेवारी, 2024 रोजी रुपेरी पडद्यावर दाखल होणार आहे. आगामी चित्रपट ‘तौबा तेरा जलवा’ हा सिनेमा कथाकथनाच्या क्षेत्रात एक गेम चेंजर ठरणार आहे.
‘तौबा तेरा जलवा’च्या ट्रेलरमध्ये भावनांच्या थरांनी भरलेले, अनपेक्षित कथानकाचे ट्विस्ट आणि प्रेक्षकांना आकर्षित करण्याचे वचन देणारे वैविध्यपूर्ण उपकथानक छेडछाड करते. गाझियाबाद, सिकंदराबाद आणि मुंबईच्या दोलायमान लोकलच्या विरूद्ध सेट केलेला, हा चित्रपट शकील खानच्या छायांकनाच्या लेन्सद्वारे प्रत्येक स्थानाचे सार सुंदरपणे सामील करतो.

या सिनेमॅटिक प्रयत्नात, जतीन खुराना पश्चिम उत्तर प्रदेशातील एक जबरदस्त आणि प्रभावशाली व्यावसायिक व्यक्ती, रोमी त्यागीच्या शूजमध्ये उतरतो. त्यागी, एक माणूस ज्याच्या निर्भयतेला परमात्म्याशिवाय कोणतीही सीमा माहित नाही, त्याच्या स्वतःच्या व्यक्तिमत्त्वावर मनापासून मोहित आहे, शक्ती आणि अहंकाराच्या गुंतागुंतांना मूर्त रूप देतो.

तथापि, प्रतिभावान अमीषा पटेलने चित्रित केलेल्या लैलाच्या प्रवेशासह कथानक एक वेधक वळण घेते, ज्यात त्यागी आणि रिंकूचे जीवन विस्कळीत होते, मोहक अँजेला क्रिस्लिंझकी यांनी लिहिलेले. रिंकू, परीकथांवर विश्वास ठेवणारी, तिच्या मोहक राजकुमाराची वाट पाहत आहे आणि या भिन्न व्यक्तिमत्त्वांच्या टक्कर प्रेम आणि नातेसंबंधांच्या पारंपारिक कल्पनांना आव्हान देणारी परिवर्तनाची वावटळ निर्माण करते.

दिग्दर्शक आकाशदित्य लामा यांचे सर्जनशील पराक्रम, विक्रम मॉन्ट्रोजच्या चित्तथरारक संगीत रचनांसह, एका तल्लीन आणि आकर्षक सिनेमॅटिक अनुभवासाठी स्टेज सेट करते. शिवाय, राजेश शर्मा, नीरज सूद, अनिल रस्तोगी आणि एहसान खान यांसारख्या कलागुणांचा समावेश असलेले कलाकार, चित्रपटात चित्रित केलेल्या बहुआयामी पात्रांना सखोलता आणि सत्यता देतात.

बहुप्रतीक्षित रिलीजची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी चित्रपट रसिकांमध्ये उत्साह वाढत चालला आहे. प्रेक्षक आतुरतेने जतीन खुराना यांनी रोमी त्यागी या पश्चिम उत्तर प्रदेशातील उद्योगपतीची भूमिका साकारली आहेत आणि त्यांचे पात्र ‘तौबा तेरा जलवा’च्या मनमोहक कथानकाशी कसे गुंफले आहे हे पाहण्याची आतुरतेने अपेक्षा आहे.

प्रेम, आत्म-शोध आणि जीवनातील अनपेक्षित वळणांच्या गुंतागुंतीची माहिती देणारे अनोखे कथन सादर करून, तौबा तेरा जलवा स्क्रीनवर कृपा करण्यासाठी सज्ज असताना भावनिक रोलरकोस्टरसाठी तयार व्हा. 5 जानेवारी, 2024 रोजी चित्रपट प्रदर्शित होत असताना जतीन खुराना यांचे जबरदस्त रोमी त्यागीमध्ये झालेले उल्लेखनीय परिवर्तन पाहण्याची संधी गमावू नका.

आकाशदित्य लामा दिग्दर्शित आणि मदनलाल खुराना आणि नरेश बन्सल यांच्या श्रीराम प्रोडक्शन आणि व्हिक्टोरियस एंटरप्रायजेसच्या प्रतिष्ठित बॅनरखाली निर्मित. तौबा तेरा जलवा 5 जानेवारी, 2024 रोजी रुपेरी पडद्यावर येणार आहे. हे रोमँटिक ड्रामा उत्तर प्रदेशच्या दोलायमान टेपेस्ट्रीच्या विरोधात सेट केलेल्या भावना, उच्च-व्होल्टेज ड्रामा आणि अनपेक्षित ट्विस्ट यांचे एकत्रित मिश्रण दर्शवते.

राजगडावर ‘आग्य्राहून सुटका स्मृतिदिन’ उत्साहात साजरा

पुणे महानगरपालिका व श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने किल्ले राजगड उत्सवाचे आयोजन ;  ३५७ वा आग्य्राहून सुटका स्मृतीदिन किल्ले राजगड उत्सव – वर्षे ४३ वे

पुणे : किल्ले राजगड येथे पाली दरवाजा – सदर – पद्मावती माता मंदिर  असा ढोल ताशांच्या गजरात निघालेला छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा पालखी सोहळा…मर्दानी खेळ …छत्रपती शिवरायांचा जयघोष … अशा उत्साही वातावरणात आग्य्राहून सुटका स्मृतिदिन किल्ले राजगड पाल खुर्द येथील खंडोबाचा माळ व गडावरती थाटात साजरा करण्यात आला .
पुणे महानगरपालिका आणि श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ३५७ व्या आग्य्राहून सुटका स्मृतीदिनानिमित्त ‘किल्ले राजगड उत्सवा’ चे आयोजन करण्यात आले होते. वंश परंपरेने किल्लेदार सुर्यकांत भोसले यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण व पद्मावती देवीचे पूजन झाले. पाल दरवाज्यावर पालखीचे पूजन करण्यात आले. 
या प्रसंगी पुणे महानगरपालिका उपायुक्त माधव जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत पठारे,  संजय दापोडीकर, अजित काळे, अनिरुद्ध हळंदे, सुनील वालगुडे, संपत चरवड, समीर रुपदे, सतीश सोरटे, सुरेश परदेशी व शिवप्रेमी उपस्थित होते.  जिल्हा चिकित्सक ग्रामीण रुग्णालय, पुणे .यांनी प्रथोमोपचार सेवा व रुग्ण वाहिका सेवा दिली. पुणे महानगरपालिका सायकल क्लब या उत्सवात मध्ये सहभागी झाला होता.

पालखीचे आकर्षण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत रवी रोकडे, छत्रपती संभाजी महाराजांच्या बाल वेशभूषेत राजवीर पायगुडे, तसेच मंदार राजवाडे, विकास रोकडे हे मावळ्यांच्या वेशभूषेत होते.

उत्सवाच्या पूर्वसंध्येला किल्ले राजगड खंडोबा माळावर, पाल गाव येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हंडे महाराज यांच्या मठात मॉसाहेब जिजाऊ यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून खंडोबा मालावर शिव पूजनाने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. यावेळी वेल्हा पोलिस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत पठारे यांच्या हस्ते शिव पूजन करण्यात आले. वसंतराव प्रसादे, सुर्यकांत भोसले, संजय दापोडिकर, अरविंद महाराज, रोहिदास हंडे महाराज , इंदुबाई बापू शिर्के, बाळकृष्ण महाराज दसवडकर, ह.भ.प दिनकर वालगुडे, नाना शिर्के, अंकुश कुळे, अनंता रेणुसे, विठ्ठल दर्डिगे , दशरथ भोसले, प्रकाश भोसले, नवनाथ दर्डिगे , रामभाऊ दर्डिगे, पांडुरंग दर्डिगे, रामचंद्र पोळ, शिवाजीराव पोळेकर आदी मान्यवर उपस्थित होते. 
सायली गोडबोले-जोशी यांनी राजमाता जिजाऊ नाट्याविष्कार सादर केला. आग्र्याहून सुटका या विषयी व्याख्यात्यांची  व्याख्याने झाली. यावेळी माधव जगताप, रणजीत पठारे यांनी गडावरील सुधारणा, सुविधा व सुरक्षा या बाबत आढावा  घेतला. राजगडावरील पुणे महानगरपालिका यांच्या मदतीने पुनर्बांधणी करण्यात आलेल्या सदरेचा लवकर लोकार्पण सोहळा करण्यात येईल असेही सांगण्यात आले.
कार्यक्रमाचे संयोजक श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळाचे वीरेंद्र सिंह ठाकूर, योगेंद्र भालेराव, मंगेश राव,  अभिजित पायगुडे, पांडा मोरे,  शशी रसाळ, निलेश बारावकर, गणेश बोरकर, संजय शेंडकर, सुनील तोंडे, सचिन गोळे,  गुरुदत्त भागवत, अमोल व्यवहारे, निखिलेश ठाकूर,  प्रशांत पायगुडे,  अमित दारवटकर, सचिन यादव,  अभिजित गोखले,  मोहोन देढे, विवेक नाकोड, शुभम शिंदे, महेश कदम, सचिन पिसाळ, प्रमोद साबळे, प्रियंका दापोडीकर, समृध्दी कुलकर्णी, आत्मज हळंदे यांनी कार्यक्रमाचे नियोजन पहिले.

तरुण भारतीयांमध्ये कोलेस्टेरॉलचे वाढते प्रमाण MediBuddy अभ्यासातून समोर आले आहे

पुणे- 20 डिसेंबर 2023 – MediBuddy या भारतातील सर्वात मोठ्या डिजिटल हेल्थकेअर प्लॅटफॉर्मनेसामान्य बॉडी मास इंडेक्स (BMI) श्रेणीमध्ये तरुण भारतीयांमधील कोलेस्ट्रॉल पातळीचा ट्रेंड उघड केला आहे. या अभ्यासातील निष्कर्ष हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्याचे मूल्यांकन करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या पारंपारिक निर्देशकांबद्दल चिंता व्यक्त करतात. 20-40 वयोगटातील 10,990 व्यक्तींच्या माहितीचे विश्लेषण करते. हा अभ्यास केवळ BMI वर अवलंबून आहे. प्रतिबंधात्मक काळजीसाठी सक्रियवैयक्तिकृत दृष्टिकोनाची गरज हे निष्कर्ष अधोरेखित करते. विशेषत: तरुण भारतीयांसमोर विकसित होत असलेल्या आरोग्यविषयक आव्हानांना तोंड देण्यासाठी हे सर्वेक्षण फार महत्त्वाचे आहे.

BMI वर दीर्घकाळ असलेल्या अवलंबनामुळे सध्याच्या आरोग्य आव्हानांकडे दुर्लक्ष होऊ शकते. व्यस्त वेळापत्रक, उच्च-दबाव नोकर्‍या, आहाराच्या अयोग्य सवयी आणि मर्यादित शारीरिक हालचाली या “मागणीनुसार” पिढीच्या वाढीचा विचार करा. या वास्तविकता, सोयीस्कर परंतु प्रक्रिया केलेल्या पर्यायांकडे खाण्याच्या सवयी बदलण्यासोबत, सामान्य बीएमआय असला तरीही तरुण भारतीयांमध्ये उच्च कोलेस्टेरॉलच्या स्वरूपात एक मूक धोका निर्माण करू शकतात.

निष्कर्षांवरून असे दिसून आले आहे की उच्च लो-डेन्सिटी लिपोप्रोटीन कोलेस्ट्रॉल [LDL-C] (>160mg/dL), हृदयविकाराचा धोका होऊ शकणाऱ्यांमध्ये प्रमुख कारण आहे. लो-डेन्सिटी लिपोप्रोटीन कोलेस्ट्रॉलचा धोका असलेल्या 22% व्यक्ती आहेत. त्यांचा 18.5 -22.9 हा सामान्य आहे. वाढते कोलेस्टेरॉल हे प्रामुख्याने लठ्ठपणाशी संबंधित आहे, या पारंपारिक विश्वासाला आव्हान देते. पुरुषांना याचा जास्त त्रास होण्याची शक्यता असते कारण उच्च LDL-C असलेल्या 63.7% व्यक्ती या श्रेणीत येतात. त्याचप्रमाणे, उच्च LDL-C (130-159 mg/dL) अशा सीमारेषेवर असलेल्या 26.5% व्यक्ती सामान्य BMI श्रेणीतील आहेत. ही आकडेवारी कोलेस्टेरॉलची पातळी निश्चित करण्यात BMI शिवायही घटकांची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करते, ज्यात बदलत्या अन्न सवयी, बैठी जीवनशैली, दीर्घकालीन ताण आणि अगदी आनुवंशिकता यांचा समावेश होतो. 

डॉ. गोवारी कुलकर्णीमेडिकल ऑपरेशन्स प्रमुखमेडीबड्डी यांनी या खुलाशांवर चिंता व्यक्त केली. त्या म्हणतात, “सामान्य बीएमआय असलेल्या तरुण व्यक्तींमध्ये कोलेस्टेरॉलच्या वाढीव पातळीचे प्रमाण एका पातळीपलीकडे जाणे हे योग्य नाही. हे टाळण्यासाठी योग्य ती जीवनशैली तातडीने आत्मसात करणे गरजेचे आहे. नियमित आरोग्य तपासणी आणि जीवनशैलीत बदल जसे की तणाव व्यवस्थापननिरोगी आहार अशा गोष्टींवर भर द्यायला हवा. या गोष्टी रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य आणि आरोग्याच्या या विकसित होत असलेल्या लँडस्केपमध्ये तरुण भारतीयांच्या प्रकृतीसाठी अत्यावश्यक आहेत.” 

तरुण भारतीयांसमोर येत असलेल्या या आरोग्यविषयक आव्हानांबाबत समजून घेत असताना हा अभ्यास सक्रिय आरोग्यसेवा उपायांचे महत्त्व अधोरेखित करतो. नियमित तपासणीच्या गरजेबद्दल जागरुकता वाढवणे आणि आरोग्यासाठी सर्वांगीण दृष्टिकोनाला प्रोत्साहन देणे हे निरोगी भविष्यासाठी अत्यावश्यक बनते. 20 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या तरुणांनी किमान दर पाच वर्षांनी त्यांचे कोलेस्ट्रॉल मोजले पाहिजे असा सल्ला दिला जातो. यामुळे कोलेस्ट्रॉल वाढले तरी तुम्हाला आणि तुमच्या डॉक्टरांना त्याची जाणीव लवकर होईल. एक समाज म्हणून, आपण पारंपारिक मेट्रिक्सच्या पलीकडे जाणे आवश्यक आहे आणि कल्याणासाठी सर्वांगीण दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे. MediBuddy अशा भविष्याची कल्पना करते जिथे उच्च-गुणवत्तेची, वैयक्तिकृत आरोग्यसेवा सर्वांना उपलब्ध असेल. MediBuddy च्या तज्ञांच्या विस्तृत नेटवर्कसह, आम्ही व्यक्तींना त्यांच्या आरोग्यावर नियंत्रण ठेवण्यास आणि प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करण्यास सक्षम करतो.

दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी शाहरुख खान आणि राजू हिरानी यांच्या डंकीसाठी दिल्या खास शुभेच्छा

दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी अभिनेता शाहरुख खान आणि सहकारी राजकुमार हिरानी यांना त्यांचा आगामी ” डंकी” साठी खास शुभेच्छा दिल्या आहेत. सिद्धार्थने यापूर्वी शाहरुख खानसोबत 2023 च्या ब्लॉकबस्टर पठाणमध्ये काम केल असून पठाणने १०० कोटींपेक्षा जास्त कमाई करून बॉक्स ऑफिस रेकॉर्ड तोडत ब्लॉकबस्टर हीट ठरला जगभरात 1,050 कोटी कमवून त्याने अनोखा रेकॉर्ड केला आहे. 

 दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी ट्विटर वर आपल्या भावना शेयर करत म्हटलं “फक्त एकदाच असा चित्रपट येतो ज्यामध्ये उस्ताद एकत्र येतात जे त्यांच्या अनोख्या कलाकृती ने प्रेक्षकांची मन जिंकून घेतात. @iamsrk आणि राजू हिराणी सर यांच्या चित्रपटाची मी खूप आतुरतेने वाट पाहत आहे.मी उद्या चित्रपटगृहात हसायला , रडायला आणि या चित्रपटाचा अनुभव घ्यायला तयार आहे ” 

 या शुभेच्छा खरच खास आहेत कारण शाहरुख खानचा २०२३ मधला हा तिसरा चित्रपट येणार असून संपूर्ण भारतीय चित्रपट इंडस्ट्री या साठी सज्ज आहे.

अखेर “मेरी ख्रिसमस” या क्राईम रोमान्स चा ट्रेलर प्रदर्शित

 क्राईम रोमान्स आणि मेरी ख्रिसमस ची पर्वणी यंदाच्या वर्षी चर्चेत राहिलेली अभिनेत्री म्हणजे कतरिना कैफ. कतरिना आणि आणि विजय सेतुपती यांच्या मोस्ट अवेटेड रिलीज असलेल्या मेरी ख्रिसमसचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे आणि पुन्हा एकदा हे दोघे चर्चेचा विषय ठरले आहेत.

 श्रीराम राघवन दिग्दर्शित आणि टिप्स फिल्म्सचे रमेश तौरानी आणि जया ततौरान संजय राउत्रे आणि केवल गर्ग निर्मित हा चित्रपट 12 जानेवारी 2024 रोजी रिलीज होणार आहे. चित्रपटा चा ट्रेलर रोमान्सच्या च्या सोबतीने थ्रिलर सस्पेन्स दाखवणार आहे यात शंका नाही. उत्कंठावर्धक कथा आणि क्राईम रोमान्स यांचा अनोखा मिलाफ यातून अनुभवयाला मिळणार आहे. ट्रेलर ने प्रेक्षकांना आता चित्रपटाची वाट पाहायला लावलं आहे. मोहक आणि आश्चर्याची प्रतीक्षा आहे. द्विभाषिक चित्रपट आणि निओ-नॉयर झोनमध्ये असलेला हा ड्रामा नक्कीच काहीतरी कमाल असणार आहे आणि जी जादू मोठ्या पडद्यावर बघण्याची उत्सुकता आता निर्माण झाली आहे. रोमँटिक क्राइम थ्रिलर सगळ्यांना मोहित करणार आहे याची खात्री तर आहे पण हा चित्रपट कतरिना साठी नक्कीच खास ठरणार यात शंका नाही.

कोविड-19 विषाणूच्या नवीन आणि उद्गामी प्रकारांविरुद्ध सतर्क आणि सज्ज राहणे महत्वाचे आहे: डॉ मांडविया

0

नवी दिल्‍ली, 20 डिसेंबर 2023 

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी देशाच्या काही भागांमध्ये वाढत्या कोविड-19 प्रकरणांच्या पार्श्‍वभूमीवर कोविड-19 परिस्थिती आणि संनियंत्रण, प्रतिबंध आणि व्यवस्थापनासाठी सार्वजनिक आरोग्य यंत्रणेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली.  यावेळी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रा. एस पी सिंह बघेल आणि डॉ. भारती पवार, नीती आयोग सदस्य (आरोग्य) डॉ व्ही के पॉल हेदेखील उपस्थित होते.

अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री अलो लिबांग, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री ब्रजेश पाठक, उत्तराखंडचे आरोग्य मंत्री धनसिंग रावत, बैठकीसाठी प्रत्यक्ष उपस्थित होते. कर्नाटकचे आरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव, हरियाणाचे आरोग्य मंत्री  अनिल विज, केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज, गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजित प्रतापसिंह राणे, आसामचे आरोग्य मंत्री केशब महंता, झारखंडचे आरोग्य मंत्री बन्ना गुप्ता, पंजाबचे आरोग्य मंत्री डॉ बलबीर सिंग, दिल्लीचे आरोग्य मंत्री सौरभ भारद्वाज, हिमाचल प्रदेशचे आरोग्यमंत्री डॉ. (कर्नल) धनी राम शांडिल, महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत, तेलंगणाचे आरोग्य मंत्री दामोदर राजनरसिंह, मणिपूरचे आरोग्यमंत्री डॉ सपम रंजन, ओडिशाचे आरोग्यमंत्री  निरंजन पुजारी, पुद्दुचेरीचे प्रशासक रंगास्वामी, या बैठकीत सहभागी झाले होते. 

जगभरात चीन, ब्राझील, जर्मनी आणि अमेरिका  यांसारख्या काही देशांमध्ये कोविड-19 प्रकरणांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण झालेले आव्हान अधोरेखित करताना, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी कोविड-19 च्या नवीन आणि उद्गामी स्ट्रेनविषयी सतर्क आणि सज्ज राहण्याचे, विशेषतः आगामी सणासुदीच्या काळात खबरदारी बाळगण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. कोविड अद्याप संपलेला नाही याचा पुनरुच्चार त्यांनी केला. योग्य सार्वजनिक आरोग्य प्रतिसाद नियोजनासाठी कोविड 19 प्रकरणे, लक्षणे आणि प्रकरणांची तीव्रता याबाबत उद्गामी पुराव्यांवर लक्ष ठेवण्याची विनंती मांडविया यांनी राज्यांना केली. 

डॉ. मांडविया यांनी “संपूर्ण सरकार” दृष्टिकोनाच्या भावनेने उदयोन्मुख परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी केंद्र आणि राज्यांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे यावर भर दिला. भारतीय SARS-CoV-2 जनुकीय अभ्यास संघाच्या (INSACOG) माध्यमातून विषाणूच्या नव्या प्रकाराचा मागोवा घेण्यासाठी बाधीत नमुन्यांच्या संपूर्ण जनुकीय अनुक्रम तपासणीसाठी  पाळत ठेवण्याची यंत्रणा मजबूत करण्याचे निर्देश डॉ. मांडविया यांनी दिले. यामुळे देशात प्रसार होणारी विषाणूची नवीन रूपे वेळेवर ओळखता येतील तसेच सार्वजनिक आरोग्य अबाधित राखण्यासाठी वेळेवर योग्य उपाययोजना करणे सुलभ होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.  राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना चाचण्यांची संख्या वाढवण्याची सूचना देण्यात आली आहे तसेच कोविड-19 बाधीत रुग्णांचे आणि न्यूमोनिया सारख्या आजारांच्या रुग्णांचे नमुने जनुकीय अनुक्रम तपासणीसाठी दररोज INSACOG जनुकीय अनुक्रम प्रयोगशाळा (IGSLs) मध्ये पाठवावेत, जेणेकरून विषाणूच्या एखाद्या नवीन प्रकाराच्या प्रसाराचा मागोवा घेता येईल, असेही त्यांनी सांगितले. 

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सर्व राज्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले यासोबतच विषाणूच्या प्रसारावर पाळत ठेवणे आणि औषधे, ऑक्सिजन सिलिंडर आणि कॉन्सन्ट्रेटर, व्हेंटिलेटर आणि लसींचा पुरेसा साठा सुनिश्चित करणे याबाबत सूचना दिल्या. पीएएस प्लांट्स, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स आणि सिलेंडर्स, व्हेंटिलेटर इत्यादींच्या कार्यक्षमतेचे मूल्यांकन करण्यासाठी अधिकाऱ्यांनी केंद्र आणि राज्य स्तरावर दर तीन महिन्यांनी मॉक ड्रिल घ्यावे, असे त्यांनी सांगितले. यासोबतच त्यांनी सर्वोत्तम पद्धती सामाईक करण्याला प्रोत्साहन दिले. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी राज्यांना  स्वच्छतेबद्दल जागरुकता निर्माण करण्याचे आणि वस्तुस्थितीनुसार योग्य माहितीचा प्रसार सुनिश्चित करण्याचे आणि खोट्या बातम्यांचा सामना करण्यासाठी सूचनात्मक व्यवस्थापन करण्यासाठी आणि कोणतीही भीती पसरु नये यासाठी काळजी घेण्याचे आवाहन केले.  केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना वेळेवर देखरेख आणि सार्वजनिक आरोग्य उपायांना त्वरित सक्षम करण्यासाठी कोविड पोर्टलवर रुग्ण, चाचण्या, बाधीत होण्याचे प्रमाण इत्यादींची माहिती वास्तविक वेळेत सामायिक करण्याचे आवाहन केले. राज्यांना केंद्राकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव सुधांश पंत यांनी एका सादरीकरणाद्वारे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना कोविड-19 ची जागतिक परिस्थिती आणि देशांतर्गत परिस्थिती याबद्दल माहिती दिली. अशी माहिती देण्यात आली की जागतिक परिस्थितीच्या तुलनेत भारतात सक्रिय कोविड रुग्ण लक्षणीयरीत्या कमी असताना, गेल्या दोन आठवड्यांत बाधीत रुग्णांच्या संख्येत 6 डिसेंबर 2023 रोजी 115 वरून 614 इतकी वाढ झाली आहे, अशी माहिती या सादरीकरणात देण्यात आली. 92.8% रुग्ण त्यांच्या घरातच विलगीकरणात असून त्यांच्यात आजाराची सौम्य लक्षणे आढळली आहेत, हे देखील या सादरीकरणातून लक्षात आले आहे. कोविड-19 मुळे रुग्ण इस्पितळात दाखल होण्याच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही, रुग्णालयात दाखल झालेले रुग्ण इतर वैद्यकीय कारणांमुळे दाखल झाले असून त्या कारणांच्या तपासण्या दरम्यान रुग्णाला  कोविड-19 ची देखील बाधा झाल्याचे लक्षात आले आहे.  केरळ, महाराष्ट्र, झारखंड आणि कर्नाटक यासारख्या काही राज्यांमध्ये बाधीत रुग्णांच्या संख्येत दैनंदिन वाढ दिसून आली आहे.

SARS-CoV-2 विषाणूच्या नवीन JN.1 प्रकाराबद्दल बोलायचे झाले तर हा प्रकार सध्या तीव्र वैज्ञानिक छाननीखाली आहे, परंतु तो सध्यातरी चिंतेचे कारण नाही अशी माहिती देण्यात आली.  JN.1 मुळे भारतात कोठेही ठराविक एका क्षेत्रात अनेक रुग्ण आढळून आलेले नाहीत तर सर्व प्रकरणे सौम्य असल्याचे आढळून आले आणि ते सर्व बाधीत रुग्ण कोणत्याही गुंतागुंतीशिवाय बरे झाले आहेत.

डॉ व्ही के पॉल यांनी कोविड बाधीतांच्या संख्येत वाढ आणि नवीन प्रकाराच्या उदयामुळे निर्माण झालेल्या आव्हानाचा सामना करण्यासाठी ‘संपूर्ण सरकार’ दृष्टिकोनाची आवश्यकता असल्याचा पुनरुच्चार केला. भारतातील वैज्ञानिक समुह विषाणूच्या नवीन प्रकाराची बारकाईने तपासणी करत आहे, अशी माहिती त्यांनी दिली. याशिवाय राज्यांनी चाचण्यांचे प्रमाण वाढवण्याची आणि प्रसारावर पाळत ठेवण्याची प्रणाली मजबूत करण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद सध्या नवीन JN.1 प्रकाराच्या जनुकीय अनुक्रम तपासणीवर काम करत आहे, अशी माहिती आरोग्य संशोधन विभागाचे सचिव आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. राजीव बहल यांनी दिली. त्यांनी राज्यांना COVID-19 परिस्थितीचे निरीक्षण करण्याचे आणि RT-PCR चाचण्या वाढविण्याचे आवाहन केले परंतु घाबरण्याचे कोणतेही कारण नाही असे स्पष्ट केले.

राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी केंद्राकडून मिळालेल्या पाठिंब्याची आणि मार्गदर्शनाची प्रशंसा केली.  काही राज्यांमध्ये रुग्णसंख्येत होणारी वाढ लक्षात घेऊन चाचण्या आणि पाळत ठेवण्याचे उपाय वाढवण्याचे आश्वासन राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी दिले.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव  एल एस चांगसान; आरोग्य मंत्रालय भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीत उपस्थित होते.

देशाच्या विरोधात बोलल्यास शिक्षा, मॉब लिंचिंगला फाशी; तीन फौजदारी सुधारित कायदे लोकसभेत मंजूर

0

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज लोकसभेत भारतीय न्याय संहिता (द्वितीय सुधारणा) (एनबीएस-२०२३), भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (द्वितीय सुधारणा) (बीएनएसएस-२०२३) व भारतीय साक्ष (द्वितीय सुधारणा) (बीएस-२०२३) अशी तीन विधेयके सादर केली. या तीनही विधेयकांना यापूर्वीही सादर केले गेले होते, मात्र खासदारांनी त्यात अनेक बदल सुचविल्यामुळे या कायद्यांना संशोधनासाठी संसदीय समितीकडे पाठविण्यात आले होते. आता पुन्हा एकदा लोकसभेत हे कायदे सादर करून त्यावर सभागृहाची मंजुरी घेण्यात आली आहे. त्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी तीनही विधेयक मंजूर झाल्याचे जाहीर केले. ही तीन विधेयके ब्रिटिश काळातील अनुक्रमे भारतीय दंड संहिता (१८६०), फौजदारी प्रक्रिया संहिता (१८८२) व भारतीय पुरावा कायदा (१८७२) या कायद्यांची जागा घेणार आहेत.

अमित शाह यांनी ११ ऑगस्ट २०२३ रोजी पहिल्यांदा हे तीन विधेयक मांडले होते. आज पुन्हा सुधारित विधेयक सादर करत असताना अमित शाह म्हणाले की, नवे फौजदारी कायदे देशातील जनतेला ब्रिटिशकालीन वसाहतवादाच्या मानसिकतेतून बाहेर काढणार आहेत. आधीचे तीनही फौजदारी कायदे ब्रिटिशांनी तयार केले होते. तेव्हापासून हे कायदे बदलण्यात आले नव्हते. भारत स्वतंत्र होऊनही आजवर आपण इंग्लंडच्या कायद्यानुसार काम करत होतो. हर मॅजेस्टी, लंडन गॅझेट, ब्रिटिश क्राऊन आणि बॅरिस्टर सारख्या संज्ञा या कायद्यामुळे आजही आपण वापरत होतो.केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विधेयक सादर करताना सांगितलं की,

यापुढे राजद्रोह कलमाची जागा आता देशद्रोह कलम घेणार आहे. भादंविमध्ये राजद्रोहाला सरकारविरोधातील कार्य म्हणून सांगितले गेले होते. मात्र बीएनएसमध्ये त्याला बदलून देशद्रोह असे बदलण्यात आले आहेत. सरकारवर कुणी टीका करतो शकतो, मात्र जो देशाच्या सुरक्षेला-अखंडतेला बाधा पोहोचवणारे कृत्य किंवा भाष्य करेल, तो या कलमान्वये गुन्हेगार असेल.तसेच मॉब लिंचिंग प्रकाराला गुन्ह्याच्या कक्षेत आणून फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. ही तरतूद आणताना अमित शाह यांनी सांगितले की, याआधी मॉब लिंचिंगच्या गुन्ह्याला विशिष्ट शिक्षेची तरतूद करण्यात आलेली नव्हती. काँग्रेसने मॉब लिंचिंगच्या प्रकरणावरू केवळ आमच्यावर टीका केली. पण त्यावर कधीही कायदा तयार केला नाही.

विधेयक सादर करताना गृहमंत्री अमित शाह म्हणाले – ब्रिटीशकालीन राजद्रोह कायदा रद्द करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि मॉब लिंचिंगसारख्या गुन्ह्यांसाठी फाशीची शिक्षा दिली जाईल.

सशस्त्र बंडखोरी आणि राष्ट्रीय मालमत्तेचे नुकसान केल्याबद्दल तुरुंगवास

देशद्रोहाचा कायदा इंग्रजांनी बनवला, त्यामुळे टिळक, गांधी, पटेल यांच्यासह देशातील अनेक सेनानी प्रत्येकी 6 वर्षे तुरुंगात राहिले. तो कायदा आजपर्यंत चालू होता. पहिल्यांदाच मोदीजींनी सरकारमध्ये येताच देशद्रोहाचे कलम 124 रद्द करून ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

देशद्रोहाच्या ऐवजी राजद्रोह असे केले आहे. कारण आता देश स्वतंत्र झाला आहे, लोकशाही देशात कोणीही सरकारवर टीका करू शकतो. हा त्यांचा हक्क आहे. देशाच्या सुरक्षेला किंवा मालमत्तेला हानी पोहोचवण्यासाठी कोणी काही केले तर त्याच्यावर कारवाई केली जाईल.

कोणी सशस्त्र आंदोलन केले किंवा बॉम्बस्फोट केला, तर त्याच्यावर कारवाई होईल, त्याला मुक्त होण्याचा अधिकार नाही, त्याला तुरुंगात जावे लागेल. काही लोक त्यांच्या स्वतःच्या शब्दात ते तयार करण्याचा प्रयत्न करतील, परंतु, कृपया मी काय बोललो ते समजून घ्या. देशाला विरोध करणाऱ्याला तुरुंगात जावे लागेल.

दहशतवादाविरुद्ध आम्ही शून्य सहनशीलता बाळगू, असे आमचे वचन होते. याआधी कुठेही ते (काँग्रेस) सत्तेत होते, जनतेवर यूएपीए लादले गेले नव्हते, तर याचा उल्लेख देखील नव्हता.

दहशतवाद रोखण्यासाठी देशाच्या कायद्यात तरतुदी नाहीत, संसदेत बसलेले लोक याला मानवाधिकार म्हणत विरोध करायचे. तर दहशतवाद मानवी हक्कांच्या विरोधात आहे.

ही ब्रिटिश राजवट नाही, जी तुम्ही दहशतवादापासून वाचवत आहात. असे युक्तिवाद मोदी सरकारमध्ये ऐकायला मिळणार नाहीत. देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षा धोक्यात आणून जो कोणी भीती पसरवेल, त्याला दहशतवादी मानले जाईल, असे आता स्पष्ट करण्यात आले आहे.

आता यात निषेधाला वाव नाही, दहशतवादी कारवाया करणाऱ्यांना दया दाखवू नये.

हत्येचे कॅटेगिरीत विभागजन
संघटित गुन्हेगारी देखील प्रथमच स्पष्ट करण्यात आली आहे, त्यात सायबर गुन्हे, लोकांची तस्करी आणि आर्थिक गुन्ह्यांचा देखील उल्लेख आहे. यामुळे न्यायव्यवस्थेचे काम मोठ्या प्रमाणात सोपे होईल. दोषी हत्या दोन भागात विभागली गेली. गाडी चालवताना अपघात झाला, तर आरोपीने जखमीला पोलीस स्टेशन किंवा रुग्णालयात नेले, तर त्याला कमी शिक्षा दिली जाईल. हिट अँड रन प्रकरणात 10 वर्षांची शिक्षा होणार आहे.

डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या हत्येला दोषी हत्या म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे. यासाठी शिक्षेतही वाढ करण्यात आली आहे, त्यासाठी मी दुरुस्ती आणणार आहे, डॉक्टरांना यातून सूट देण्यात आली. मॉब लिंचिंग आणि स्नॅचिंगसाठी फाशीची शिक्षा देण्याचा कायदा नव्हता, आता तो कायदाही झाला आहे.

एखाद्याच्या डोक्यावर काठीने मारणाऱ्याला शिक्षा होईल, तर ब्रेन डेड झाल्यास आरोपीला 10 वर्षे कारावासाची शिक्षा होईल. याशिवाय अनेक बदल करण्यात आले आहेत.

नव्या कायद्यात पोलिसांची जबाबदारी निश्चित केली जाणार
शहा म्हणाले- आता नव्या कायद्यात पोलिसांची जबाबदारीही निश्चित केली जाणार आहे. याआधी कधी कोणाला अटक झाली की त्याबद्दल त्याच्या कुटुंबीयांना कल्पनाही नसायची. आता कोणी अटक केली, तर पोलीस त्याच्या कुटुंबीयांना कळवतील. कोणत्याही परिस्थितीत, पोलिस पीडितेला 90 दिवसांच्या आत काय घडले, याची माहिती देतील.

तपास आणि प्रकरणाच्या विविध टप्प्यांबाबत पीडित आणि कुटुंबीयांना माहिती देण्यासाठी अनेक मुद्दे जोडण्यात आले आहेत. तीन कायद्यांतील महत्त्वाच्या तरतुदी – भारतीय न्यायिक संहितेबद्दल बोलायचे झाले, तर त्यात अनेक मानवाशी संबंधित गुन्हे मागे ठेवण्यात आले होते. बलात्काराची प्रकरणे, लहान मुलांवरील गुन्हे समोर ठेवले आहेत.

यापूर्वी बलात्कारासाठी 375, 376 ही कलमे होती, आता कलम 63, 69 मध्ये बलात्काराचा समावेश करण्यात आला आहे, गॅंगरेपचाही पुढे समावेश करण्यात आला आहे. लहान मुलांवरील गुन्हेही पुढे आले आहेत. खून 302 होता, आता तो 101 झाला आहे. सामूहिक बलात्काराच्या आरोपीला 20 वर्षांपर्यंत किंवा तो जिवंत असेपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होईल.

18, 16 आणि 12 वर्षे वयोगटातील मुलींवर बलात्कार केल्याप्रकरणी वेगवेगळी शिक्षा दिली जाईल. 18 वर्षांखालील बलात्कारासाठी जन्मठेप आणि फाशीची शिक्षा. सामूहिक बलात्काराच्या प्रकरणात 20 वर्षांचा कारावास किंवा जन्मठेपेची शिक्षा. 18 वर्षांखालील मुलीवर बलात्कार करणाऱ्याला पुन्हा फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

बलात्काराचे वय 15 वर्षांवरून 18 वर्षे करण्यात आले आहे. 18 वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्यास अल्पवयीन बलात्काराचे प्रकरण मानण्यात येईल.

अपहरण 359, 369 होते, आता ते 137 आणि 140 झाले आहे. मानवी तस्करी 370, 370A होती, आता ती 143, 144 झाली आहे.

2014 मध्ये पंतप्रधान मोदींचे सरकार सत्तेवर आल्यानंतर आम्ही जाहीरनाम्यात दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करत आहोत. आम्ही काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचे आश्वासन दिले होते. अयोध्येत राम मंदिर बांधण्याचे आश्वासन दिले होते. 22 जानेवारीला रामलल्ला तेथे उपस्थित राहणार आहेत. आम्ही महिलांना संसद आणि विधानसभांमध्ये 33 टक्के आरक्षण देऊ, असे सांगितले होते.

काँग्रेस अनेकवेळा सत्तेत आल्यावर त्यात त्रुटी शोधत राहिली, आम्ही विधेयक आणले आणि ते सभागृहात मंजूर करून घेतले. हे तीन फौजदारी कायदे पंतप्रधान मोदींच्या व्हिजनचा भाग आहेत.

आम्हाला शिक्षा नको, न्याय हवा, अशी जनतेची मागणी होती. आज आपण मोदीजींच्या नेतृत्वाखाली ते करत आहोत. जेव्हा आपण न्याय म्हणतो, तेव्हा त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पीडित आणि आरोपी या दोघांचाही विचार केला जातो. तर शिक्षेदरम्यान लोक केवळ आरोपीकडेच जबाबदार असल्याच्या दृष्टीकोनातून त्याकडे पाहत होते.

अनेकांनी वेगवेगळ्या सूचना दिल्या आहेत, सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या विधेयकात अनेक नवीन गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. आम्ही तपासात फॉरेन्सिक तपासणीवर भर दिला आहे. तपासात तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. आजच्या घडीला देशात तीन प्रकारच्या न्यायप्रणाली आहेत, मात्र हे विधेयक मंजूर झाल्यानंतर देशात एकाच प्रकारची न्याय व्यवस्था असेल.

वाहनांची तोडफोड करून दहशत माजवणा-या टोळक्यास केले जेरबंद,५ मुले अल्पवयीन आणि ८ मुले १८ ते २३ वयाची …नव्या पिढीची वाटचाल …?

पुणे-वाहनांची तोडफोड करून दहशत माजवणा-या टोळक्यास पुणे पोलिसांनी अटक केली आहे. यातील ८ मुले १८ ते २३ वर्षे वयोगटातील मुले आहेत तर ५ मुले अल्पवयीन मुले आहेत . या संदर्भात पोलिसांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे कि,’
दिनांक १८/१२/२०२३ रोजी फिर्यादी हे त्यांच्या राहत्या घरी असताना त्यांच्या परिसरात राहणारे मुलांनी हातामध्ये लोखंडी शस्त्रे घेवुन येवुन फिर्यादी यांच्या भावाचा मुलगा विश्वास गणेश खिलारे याने अनिकेत पाटोळे, रवि पाटोळे, आदित्य पाटोळे व इतर अनोळखी इसमाविरुध्द दिनांक १६/१२/२०२३ रोजी खडक पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारीचा राग मनात धरुन फिर्यादी यांना लोखंडी शस्त्राने व दगडाने मारहाण करुन जखमी केले. तसेच घरासमोर पार्क केलेल्या मोटारसायकल व मोटार कारच्या काचा फोडल्या व इतर वस्तीमधील सात ते आठ गाड्यांचे नुकसान केले. तसेच बेकरी व प्रोव्हिजन स्टोअर्सचे काउंटरच्या काचांची तोडफोड करुन त्यांचे नुकसान केले. आरोपींनी त्यांच्या हातातील लोखंडी धारदार शस्त्र हवेत फिरवत कोणाला ही सोडु नका आडवा येईल त्याला मारा, कोणी मध्ये आल्यास त्याला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. त्याबाबत हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं १९१५/२०२३ भादंवि कलम ३०७,३२४,४२७,१४३,१४४,१४५,१४८, १४९,५०४,५०६ सह महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ चे कलम ३७(१), (३) सह १३५ प्रमाणे, आर्म अॅ. ४ (२५), क्रिमीनल लॉ अमेन्डमेन्ट अॅक्ट कलम ०३ व ०७ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
सदरबाबत हडपसर पोलीस स्टेशन, तपासपथक प्रभारी अधिकारी सहा. पो. निरी विजयकुमार शिंदे, पोलीस उप-निरी. अविनाश शिंदे व स्टाफ यांनी आरोपींचा तात्काळ शोध घेवून आरोपी नामे १) अनिकेत रविंद्र पाटोळे वय २३ वर्ष २) आदीत्य रविंद्र पाटोळे वय २१ वर्ष ३) लखन बाळू मोहीते वय १९ वर्ष ४) तुषार बाळु मोहीते वय १८ वर्ष ५) हसनील अली सेनेगो वय १९ वर्ष ६) गौरव विजय झाटे वय १९ वर्ष ७) पंकज विठ्ठल कांबळे वय २१ वर्ष ८) ओंकार महादेव देडे वय २० वर्ष सर्व रा. वैदुवाडी रामटेकडी हडपसर पुणे यांना अटक व ५ विधिसंघर्षीत बालक यांना ताब्यात घेतले आहे.
सदरची कामगिरी ही अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, रंजनकुमार शर्मा, पोलीस
उप आयुक्त, परिमंडळ ५ श्री. आर राजा यांचे मागदर्शनाखाली सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग
पुणे, श्रीमती अश्विनी राख, हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, रविंद्र शेळके पोलीस
निरीक्षक (गुन्हे), विश्वास डगळे, श्री. संदीप शिवले यांचे सुचनाप्रमाणे तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक
विजयकुमार शिंदे, पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार, सुशील लोणकर, संदीप राठोड,
समीर पांडुळे, जोतीबा पवार, सचिन जाधव, प्रशांत टोणपे, प्रशांत दुधाळ, निखील पवार, अतुल पंधरकर, भगवान
हंबर्डे, सचिन गोरखे, अजित मदने, चंद्रकांत रेजीतवाड, अमोल दणके, कुंडलीक केसकर, रामदास जाधव,
यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.