Home Blog Page 1290

पोलिस अमलदार सीमा वळवी यांचा पोलिस आयुक्तांकडून सत्कार

पुणे-ड्युटी संपवून घरी चाललेल्या महिला अमलदाराने प्रसंगावधान दाखवित कोयताधारी हल्लेखोरांचा सामना करीत जखमींचा जीव वाचविला आहे. महिला पोलिस अमलदाराने कोयताधारी हल्लेखोराच्या हल्ल्यातून दोघा तरूणांना वाचवून आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. प्रसंगावधान राखत तिने वेळ न दडवता आरोपीच्या हातून कोयता हिसकावून घेत जखमी नागरिकांची सुटका केली. तातडीने पोलिसांना बोलावून घेत हल्लेखोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या कामगिरीमुळे महिला अमलदाराचे पुणे पोलिस दलात कौतुक केले जात आहे .

चंदननगर पोलिस ठाण्यातील पोलिस अमलदार सीमा वळवी असे सदर महिला कर्मचारीचे नाव आहे. नागरिकांचा जीव वाचविल्याबद्दल पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले. अपर आयुक्त रामनाथ पोकळे, अपर आयुक्त रंजनकुमार शर्मा, उपायुक्त अमोल झेंडे, उपायुक्त शशिकांत बोराटे, उपायुक्त संभाजी कदम, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे, पोलिस निरीक्षक, मनिषा पाटील यावेळी उपस्थित होते.

पोलिस अमलदार सीमा वळवी चंदननगर पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. २४ डिसेंबरला रात्री सव्वा अकराच्या सुमारास ड्युटी संपवून त्या घरी जात होत्या. त्यावेळी आनंदपार्क परिसरात काही तरूण आपआपसात वाद घालत होते. त्यावेळी त्यांनी थांबून संबंधितांना भांडण न करण्याचे सांगितले. दगड विटांनी एकमेकांना माराहण करु लागले. त्यावेळी अमलदार सीमा वळवी यांनी प्रसंगावधान राखुन गुन्हेगारांचा प्रतिकार केला. जखमी नागरिकांची सुटका करुन तात्काळ घटनास्थळी इतर पोलिस स्टाफ बोलावुन घेतला. भांडण करणार्‍या आरोपींचा पाठलाग करुन अवघ्या 20 मिनिटांमध्ये पाच जणांना ताब्यात घेतले. दगड, विटांनी मारहाण करणारे गुंडांना प्रतिकार करुन, जखमी नागरीकांचा जीव वाचविणार्‍या महिलेचे पुणे पोलिस दलात कौतुक होत आहे.

अनधिकृत बांधकामे विकत घेतली;आता भोगा फळे

 आंबेगावात तब्बल ११ इमारती जमीनदोस्तसंबंधित इमारतींना यापूर्वी नोटीस देऊन कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्यावर पुन्हा बांधकामे झाल्याने नोटीस देण्यात आल्या. त्यानुसार कारवाई करण्यात आली-पुणे महापालिका

पुणे –  महापालिकेच्या हद्दीत सदनिका घेताना बांधकामाला महापालिकेची परवानगी आहे काय ? गुंठेवारी झालेली आहे काय ?या प्रश्नांना बगल देऊन ..काय होतेय ? एवढी बांधकामे आहेत अनधिकृत …असे म्हणून महापालिका आणि कायदे यांना धाब्यावर बसवून अनधिकृत बांधकामे करणारांना आणि ती विकत घेनारांना फळे भोगायची वेळ कधीतरी येतच असते पण त्यास ही काही माध्यमे मात्र अशा बेजबाबदार नागरिकांच्या पाठीशी राहून महापालिकेला दुषणे देण्यात मश्गुल झाल्याचे दिसून आले आहे. आणि हा महापालिकेच्या बांधकाम विभागाचाच कारभार अनागोंदी असल्याचाच केवळ ठपका ठेऊ लागली आहेत.

आंबेगाव ब्रुद्रूकमध्ये अनधिकृतपणे उभारल्या जाणाऱ्या बांंधकामाला महापालिकेने २०२१ मध्ये नोटीस बजावली होती.त्यावेळी संबधितांनी सुरू असलेले बांधकाम थांबवण्याचे नाटक केले. त्यानंतर या बांधकामाच्या तब्बल ११ इमारती उभ्या राहिल्या. आता यातील घरांची विक्रीहि बिनदिक्कतपणे केली आणि आता महापालिकेने तब्बल दोन वर्षांनंतर या सर्वच्या सर्व इमारती गुरूवारी कारवाई करत जमीनदोस्त केल्या आहेत .

या इमारतींमध्ये तब्बल पाचशें सदनिका असून, त्यांची विक्रीही झालेली आहे. त्यामुळे महापालिकेने जवळपास दोन वर्षे हे बांधकाम होत असताना त्याला अभय का दिले असा सवाल करून महापालिकेला घेरले जाते आहे. या इमारतीत सदनिका घेणार्‍या सर्वसामान्यांची आयुष्यभराची कमाई महापालिकेच्या कारवाईत मातीमोल झाली आहे. अनधिकृत बांधकामांना नोटीस देऊनही महापालिकाच अनधिकृत बांधकामे पाठीशी घालते असा आरोप केला जातो आहे. दरम्यान, आंबेगाव बु।। या भागातील सिंहगड कॉलेजलगतच्या स.नं.१० पैकी मधील एकुण ११ अनधिकृत इमारतींवर बांधकाम विकास विभाग, झोन क्र.२ यांचे मार्फत दि.२८/१२/२०२३ रोजी परिणाम कारक कारवाई करण्यात आली.आंबेगाव बु।। या भागातील सिंहगड कॉलेजलगतच्या एकुण ११ अनधिकृत इमारतींवर सुमारे ४५०५० चौ. फुटाचे अनधिकृत बांधकाम पाडण्याची कारवाई केली. सदर कारवाई मध्ये बांधकाम विकास विभाग, झोन क्र.२ कडील कार्यकारी अभियंता, उप अभियंता, शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता, पुणे महानगरपालिकेचे अतिक्रमण विभागाकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचेसह पोलीस पोलीस कर्मचारी तसेच स्थानिक पोलीसबंदोबस्त व पुणे मनपाचे ७ बिगारी, १ जॉ क्रशर मशिन, ३ जेसीबी, २ ब्रेकर, १ गॅस कटर यांच्या सहाय्याने कारवाई करणेत आली. सदर कारवाई मध्ये सुमारे ११ इमारतींचे एकुण ४५०५० चौ. फुटाचे पाडकाम करण्यात आले. सदर भागामध्ये वारंवार मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे करण्यात येत असल्याने या पुढील काळात सुध्दा प्रशासना तर्फे मोठ्या प्रमाणावर व परिणामकारक कारवाई करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. नागरिकांनी सदनिका विकत घेताना इमारतीस पुणे मनपाची बांधकाम परवानगी तसेच महारेरा कडे नोंदणी केल्या बाबतची खातरजमा करणेत यावी असे आवाहन पुणे महानगरपालिके तर्फे पुन्हा करण्यात आले आहे.

अनधिकृत बांधकामे विकत घेणे म्हणजेच बेकायदा व्यवहाराला उत्तेजन देणे -हे समजत नाही काय ?

अनधिकृत बांधकामे करण्यात बहुधा राजकीय क्षेत्रातील काही कार्यकर्ते ,काही नगरसेवक आघाडीवर असल्याचे वारंवार दिसून येते आहे. अशा बड्या लोकांच्या नावाने , प्रशासनातील कर्मचाऱ्यांना प्रसंगी दमदाटी करून,माध्यमांच्या प्रतिनिधींची मुस्कटदाबी करून सर्रास पणे बेकायदा बांधकामे उभारणे महापालिकेने नोटीस दिली तरी तिला फारशी किंमत न देणे अशा धोरणातून बेकायदा बांधकामाकरवी बक्कळ माया गोळा केली जाते , एवढेच नव्हे तर शहरात भूमाफियांचे देखील राज्य आहे. जागा बळकावणे , थातूर मातुर कागदपत्रे करून तीच खरी दाखविणे अशा माध्यमातून शहरातील जंगल, नाले आणि एकूणच पर्यावरणाचा नाश अशा बेकायदा बांधकामे करणारे आणि जागा बळकावनाऱ्यानी केला आहे.प्रशासनातील कर्मचारी अधिकारी यांना दमदाटी करनाऱ्या या लोकांना असंख्य लोकांचा पाठींबा देखील मिळतो ,पण प्रामाणिक अधिकाऱ्यांना ,कायदेशीर अंमल करणारांच्या पाठीशी कोणीही उभे राहत नाही हे वास्तव सर्रास नाकारता येणारे नाही .


रश्मी शुक्ला:महाराष्ट्रात पोलिस महासंचालकपदी वर्णी लागण्याची शक्यता

0

मुंबई–आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांचे महाराष्ट्रात पुनरागमन होण्याची शक्यता आहे. त्यांना राज्याचे पोलिस महासंचालकपद मिळण्याची शक्यता आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने त्यांची निवड करण्यासाठी ग्रीन सिग्नल दिला आहे. मात्र याबाबत अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार असल्याची माहिती आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या बैठकीत शुक्ला यांचे नाव
केंद्रीय लोकसेवा आयोगाने शुक्रवार 29 डिसेंबर रोजी बैठक घेतली. यावेळी महासंचालक पदासाठी तीन अधिकाऱ्यांच्या नावांची यादी त्यांनी पाठवली. यामध्ये सर्वात आधी रश्मी शुक्ला यांचे नाव आहे. मात्र त्यांना महासंचालकपद दिले जाणार की मुंबई पोलिस आयुक्त म्हणून त्यांची वर्णी लागणार याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री आणि गृहमंत्री मिळून घेणार आहेत.

विद्यमान पोलिस महासंचालक रजनीश सेठ निवृत्त होणार
विद्यमान पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांचा कार्यकाळ संपत असल्याने ते निवृत्त होणार आहेत. त्यामुळे शुक्ला यांची महासंचालक पदावर निवड होण्याची शक्यता आहे. मात्र तोपर्यंत डीजीपी पदाचा अतिरिक्त पदभार हा मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे देण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत

फोन टॅपिंग प्रकरणी चौकशी
रश्मी शुक्ला या 1988 बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या काळातील कथित फोन टॅपिंग प्रकरणी महाविकास आघाडी सरकारने शुक्ला यांची चौकशी सुरू केली होती. एकनाथ खडसे, संजय राऊत, नाना पटोले, आशिष देशमुख आणि बच्चू कडू यांचे फोन टॅप करण्यात आल्याची माहिती तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत देखील दिली होती.

त्यामुळे रश्मी शुक्ला वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. अनेकांनी त्यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते . दरम्यान, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर फोन टॅपिंगच्या प्रकरणातील त्यांच्या विरोधातील चौकशी बंद झाली होती. मुंबई हायकोर्टाने रश्मी शुक्लांच्या विरोधातील फोन टॅपिंग प्रकरणातील याचिका फेटाळून लावल्या होत्या.

केंद्रीय लोक सेवा आयोगाद्वारे नोव्‍हेंबर 2023 मधील भरतीचे अंतिम निकाल जाहीर

0

केंद्रीय लोकसेवा आयोगाने नोव्‍हेंबर 2023 महिन्यात निश्चित केलेल्या भरतीचा निकाल पुढीलप्रमाणे आहेत. शिफारस केलेल्या उमेदवारांना टपालाने वैयक्तिकरित्या कळवले गेले आहे. इतर उमेदवारांच्या अर्जांचा योग्य प्रकारे विचार करण्यात आला, परंतु त्यांना मुलाखतीसाठी बोलावणे/ त्यांची पदासाठी शिफारस करणे शक्य झाले नाही याबद्दल आयोगाने दिलगिरी व्यक्त केली आहे.

संपूर्ण यादी पहाण्यासाठी येथे क्लिक करा.

https://static.pib.gov.in/WriteReadData/specificdocs/documents/2023/dec/doc20231230295001.pdf

ताम्हिणी घाटात बसचा अपघात, 2 ठार:55 जखमी, पुण्याहून कोकणात जाणारी बस उलटली

पुणे-ताम्हिणी घाटात शनिवारी सकाळी भीषण अपघात झाला आहे. माणगाव ते पुणे दरम्यानच्या ताम्हीणी घाटात एक खासगी बस उलटल्याने मोठा अपघात झाला आहे. यामध्ये दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. तर 55 प्रवासी जखमी झाले आहेत. पुण्याहून कोकणात जात असताना हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. 57 प्रवाशांना घेऊन ही बस सहलीला निघाली होती.

सकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला आहे. तर जखमी प्रवाशांवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर तातडीने महाड, माणगाव इथून रुग्णवाहिका घटना स्थळाकडे रवाना झाल्या होत्या. दरम्यान, अपघातामुळे काही काळ विस्कळीत झालेली या मार्गावरची वाहतूक आता सुरळीत सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ताम्हिणी घाटात अवघड वळणावर बस उलटली आहे. बसचालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे बस रस्त्याच्या कडेला गेल्याने कोसळली. अपघातानंतर काही प्रवासी जखमी आहेत. तर काही प्रवासी बसमध्येच अडकले आहेत. ही बस पुण्याहून हरीहरेश्वरला सहलीला ही बस जात असताना कोंडेघर गावाजवळ अवघड वळणावर उलटली.

..आता पाणीपट्टी थकबाकीवर दरमहा १ टक्का व्याज भरावे लागेल.बिलासाठी संपर्क PMC Toll Free 18001030222

पुणे – शहरातील व्यावसायिक व काही निवासी मिळकतींना पूर्वीपासून मिटरद्वारे पाणीपट्टीचे बिल पाठविले जात आहेत. पण अनेक वर्षापासून पाणीपट्टी भरण्याकडे नागरिक दुर्लक्ष करत असल्याने आता थकबाकीवर प्रति महिना एक टक्का व्याज लावून दंड वसूल केला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणीपट्टीची थकबाकी भरावी असे आवाहन महापालिकेने केले आहे.

यासंदर्भात पाणीपुरवठा प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी सांगितले कि,’पुणे महानगरपालिका हद्दीतील सर्व व्यावसायिक व काही बिगर निवासी ग्राहकांना यापूर्वीपासून मीटरद्वारे बिलाची आकारणी होत आहे तसेच खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड व पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड क्षेत्रामधील सर्व ग्राहकांना पाण्याच्या वापरानुसार मीटरद्वारे चिल आकारणी करून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाण्याच्या थकित बिलावर कोणतीही व्याजाची आकारणी करण्यात येत नसल्याने मोठ्या प्रमाणावर बिलाच्या रकमेची थकबाकी वाढत असल्याचे पुणे महानगरपालिकेच्या निदर्शनास आले आहे.
यास्तव मीटर बिलाच्या दिनांकापासून ६० दिवसात बिल न भरल्यास महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ चे प्रकरण आठ, कराधान नियम यातील नियम ४१ नुसार थकबाकी रकमेवर प्रतिमहा १% दराने दंडात्मक व्याज आकारण्याचा पुणे महानगरपालिकेने निर्णय घेतला आहे. सदरचा निर्णय हा नव्याने घेण्यात आला असल्याने दिनांक ३१/०१/२०२४ रोजीची थकबाकी भरणेस दिनांक ३१/०३/२०२४ अखेर ६० दिवसांची मुदत देण्यात येत आहे. दिनांक ०१/०४/२०२४ पासून थकबाकी रकमेवर व त्यानंतरच्या कोणत्याही थकित रकमेवर १% प्रतिमहा दंडात्मक व्याज आकारण्यात येणार आहे याची सर्व ग्राहकांनी नोंद घ्यावी.
मीटरद्वारे पाणीपुरवठा होणाऱ्या सर्व ग्राहकांना बिले पुणे मनपाकडून देण्याची व्यवस्था केली आहे. तथापि, ग्राहकांना बिले न मिळाल्यास त्यांचे दिनांक ३१/०१/२०२४ पर्यंतचे पाण्याचे मीटर बिल PMC Toll Free 18001030222 येथून प्राप्त करुन घ्यावे व दिनांक ३१/०३/२०२४ पूर्वी थकबाकी रकमेचा भरणा करावा.

राज्यातील २३२९ प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या

पुणे-राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचा सहावा टप्पा ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात आला असून यामध्ये राज्यभरातील २३२९ शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. यामुळे राज्यातील शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. २०१७ पासून आंतरजिल्हा बदल्या ऑनलाईन पद्धतीने होत आहेत.

२१ जुन २०२३ च्या शिक्षण विभागाच्या निर्णयाने जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या बंद होण्याचा धोका निर्माण झाला होता. या निर्णयाविरोधात पावसाळी अधिवेशनात २४ जुलैला मुंबईतील आझाद मैदानावर शिक्षक सहकार संघटनेच्या वतीने आंदोलन सुरू करण्यात आले होते.

१० हजार शिक्षकांच्या स्वाक्षरी चे निवेदन यावेळी राज्य शासनाकडे सादर केले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने कॅबिनेट मंत्री डॉ.तानाजीराव सावंत यांनी राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात येतील असे आश्वासन शिक्षक सहकार संघटनेला दिले होते.

२८ ऑक्टोबरला मुंबई येथे राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांबाबत शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यातील शिक्षक संघटनांच्या बैठकीत शिक्षक सहकार संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड व राज्य सरचिटणीस निलेश देशमुख यांनी राज्यातील बदलीपात्र झालेल्या सर्व शिक्षकांचा समावेश करून आंतरजिल्हा बदली प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने तात्काळ सुरू करावी अशी मागणी केली होती.

शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी सर्वांचा समावेश करून तातडीने आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश शिक्षण व ग्रामविकास विभागाला दिले होते. आंतरजिल्हा बदली प्रक्रियेचा सहावा टप्पा पूर्ण झाला असून यामध्ये राज्यातील २३२९ प्राथमिक शिक्षक बदलीने स्वजिल्ह्यात किंवा आवडीच्या जिल्ह्यात लवकरच हजर होणार आहेत.

यामुळे बदली झालेल्या शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. आंतरजिल्हा बदली प्रक्रिया पुर्ण झाल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री गिरिश महाजन, आरोग्यमंत्री डॉ.तानाजीराव सावंत,उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई,शिक्षणमंत्री दिपक केसरकर, आ.प्रणिती शिंदे,आ. परिणय फुके,आ. संजयमामा शिंदे,आ.अभिमन्यू पवार,आ.अभिजित वंजारी, आ. किशोर दराडे यांचे राज्यातील शिक्षकांनी आभार मानले आहेत.

अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन १०० व्या संमेलनाचा मान पिंपरी चिंचवडला

पुणे व मुंबईत सर्वाधिक संमेलने, महाराष्ट्राबाहेर ६ शहरात आणि अमेरिकेत एक संमेलन
पिंपरी,-मराठी रंगभूमी समृद्ध होत गेली. सुरवातीस प्रामुख्याने मुंबई, पुणे व नाशिक या महाराष्ट्राच्या पश्चिम भागात नाटक संस्कृती अधिक रुजली आणि वाढली. स्वातंत्र्यानंतर मात्र मराठी नाट्य संस्कृती पश्चिम महाराष्ट्राप्रमाणेच विदर्भ, मराठवाडा, कोकण अशी साऱ्या महाराष्ट्रभर पसरली. महानगरपालिका व राज्य शासन यांच्या मदतीने विविध शहरात नाट्यगृहे उभी राहिली.
सन १८४३ मध्ये विष्णुदास भावे यांच्यापासून मराठी नाट्य संस्कृतीचा प्रारंभ झाला, साऱ्या महाराष्ट्रात ही नाट्य संस्कृती फुलत गेली आणि त्यानंतर तब्बल ५२ वर्षांनी पहिले अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन सन १९०५ मध्ये मुंबईत ग. श्री. खापर्डे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. नाट्य लेखक, दिग्दर्शक, अभिनेते व अभिनेत्री, संपादक, पत्रकार आणि नाट्यप्रेमी रसिक यांची उदंड गर्दी प्रत्येक अ. भा. मराठी नाट्य संमेलनाला होत राहिली. आता सन २०२४ मध्ये महत्त्वपूर्ण असे १०० वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन पिंपरी चिंचवड येथे होत आहे. ही बाब अभिमानास्पद आहे.
अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन हे सन १९०५ पासून सुरु झाले. परंतु प्रत्येक वर्षी विविध अडचणींमुळे ते सलगपणे होऊ शकले नाही. विशेष म्हणजे १९०५ ते १९५५ या पहिल्या ५० वर्षात पुणे, मुंबई आणि नाशिक या तीन मोठ्या शहरांमध्येच एकूण ४० संमेलने झाली. पुण्यात आत्तापर्यंत २२ अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन झाली असून शताब्दी संमेलनही पुण्याजवळ पिंपरी चिंचवड येथे होत आहे. पुण्याच्या या वाटचालीचा आढावा घेता लक्षात येते की १९०५ ते १९५५ या पहिल्या ५० वर्षात पुण्याने तब्बल २० अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची जबाबदारी उचलली. पण पुढे मात्र नंतरच्या ५० वर्षात १९६७ आणि १९७७ अशी दोनच अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलने पुण्यात झाली. याचाच अर्थ गेल्या ४६ वर्षात पुण्यात अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन झालेले नाही. ही उणीव आता पिंपरी-चिंचवड मधील नियोजित संमेलनामुळे भरून निघेल.
१९०५ पासून पहिल्या ५० वर्षात अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन पाठोपाठच्या वर्षी घेण्याची संधी देखील पुण्याला मिळाली. सन १९१३- १९१४ आणि सन १९३६ – १९३७ याबरोबरच सलग ३ वर्षे म्हणजे सन १९२७, १९२८ आणि १९२९ अशी सलग ३ वर्षे पुण्यात संमेलन झाली. याशिवाय, विक्रमी बाब म्हणजे सन १९१६ पासून सन १९२३ पर्यंत तब्बल सलग ८ वर्षे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन पुण्यात आयोजले गेले. हा एक विक्रमच मानावा लागेल. तसेच पुण्याच्या सांस्कृतिक वैभवाला ती मिळालेली पावती आहे.
पुण्या प्रमाणे मुंबईने देखील तब्बल १३ वेळा अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे आयोजन केले. त्यामध्ये, १९०५ मध्ये पहिले, १९११ मध्ये सातवे, १९१५ मध्ये अकरावे, १९३० मध्ये पंचविसावे, १९३३ मध्ये सहविसावे, १९४१ मध्ये बत्तीसावे, १९६३ मध्ये पंचेचाळीसावे, १९७१ मध्ये बावन्नवे, १९७३ मध्ये चोपन्नवे, १९८० मध्ये साठावे, १९९० मध्ये सत्तरावे, १९९३ मध्ये त्र्यहात्तरावे, २०१८ मध्ये अठ्ठ्याण्णववे असे एकूण १३ वेळा मुंबईने नाट्य संमेलनांचे आयोजन केले आहे.
नाशिकमध्ये १९०६ मध्ये दुसरे, १९०८ मध्ये चौथे, १९४० मध्ये एकतिसावे, १९८१ मध्ये एकसष्ठावे आणि १९९७ मध्ये सत्याहत्तरावे अशी संमेलने पार पडली.
गेल्या १०० वर्षात ४ वेळा अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन आयोजित करण्याचा मान सांगली, कोल्हापूर आणि नागपूर यांना मिळाला. सांगलीमध्ये १९२४ मध्ये विसावे, १९४३ मध्ये तेहेतीसावे, १९८८ मध्ये एकोणसत्तरावे आणि २०१२ मध्ये ब्यान्नवावे संमेलन आयोजित केली गेली. कोल्हापूरमध्ये १९२६ मध्ये एकविसावे, १९४९ मध्ये छत्तीसावे, १९७० मध्ये एक्कावन्नवे आणि १९८३ मध्ये त्रेसष्ठवे संमेलन पार पडले. याशिवाय नागपूरमध्ये १९३९ मध्ये तिसावे, १९६२ मध्ये चव्वेचाळीसावे, १९८५ मध्ये पासष्ठवे आणि २०१९ मध्ये नव्याण्णववे संमेलन संपन्न झाले.
महाराष्ट्रात पिंपरी चिंचवड, अहमदनगर, सोलापूर, सातारा, नांदेड, मालवण, बारामती आणि कणकवली येथे दोन वेळा अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन पार पडले. तसेच, महाराष्ट्राबाहेर नवी दिल्ली, बडोदे, बेळगाव आणि गोवा येथेही दोन वेळा अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन संपन्न झाले.
यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये १९९९ मध्ये एकोणऐशीवे संमेलन झाले आणि सन २०२४ मध्ये प्रतिष्ठेचे १०० वे संमेलन आयोजित करण्याचा मानही पिंपरी चिंचवडला मिळाला. याशिवाय, अहमदनगरमध्ये १९४६ मध्ये पस्तिसावे,१९६४ मध्ये सेहेचाळीसावे आणि २००३ मध्ये त्र्याऐंशीवे, सोलापूरमध्ये १९५७ मध्ये एकोनचाळीसावे आणि २००८ मध्ये अठ्ठ्यांशीवे, साताऱ्यामध्ये १९५८ मध्ये चाळीसावे आणि १९९९० मध्ये एक्काहत्तरवे ,नांदेडमध्ये १९६५ मध्ये सत्तेचाळीसावे आणि २००६ मध्ये शहयांशीवावे , मालवणमध्ये १९९४ मध्ये चौऱ्याहत्तरवे आणि १९९५ मध्ये शहात्तरवे, बारामतीमध्ये १९९५ मध्ये पंच्याहत्तरावे आणि २०१३ मध्ये त्र्याण्णवावे आणि कणकवलीमध्ये १९९८ मध्ये अठ्यात्तरावे आणि २००७ मध्ये सत्याऐंशीवावे संमेलन पार पडले.
तसेच महाराष्ट्राबाहेर नवी दिल्लीमध्ये १९६१ मध्ये त्रेचाळीसावे आणि १९७६ मध्ये सत्तावन्नावे, बडोद्यामध्ये १९६० मध्ये बेचाळीसावे आणि १९७४ मध्ये पंचाव्वान्नवे, बेळगावमध्ये १९५६ मध्ये अडतिसावे आणि २०१५ मध्ये पंच्याण्णवावे आणि गोव्यामध्ये १९६८ मध्ये एकोणपन्नासावे आणि १९८४ मध्ये चौसष्ठावे संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
गेल्या १०० वर्षात एकदा संमेलन आयोजित करण्याचा मान अनेक शहरांना मिळाला. त्यात महाराष्ट्राबाहेरील हैद्राबादमध्ये १९५९ मध्ये एक्केचाळीसावे, ग्वाल्हेरमध्ये १९६९ मध्ये पन्नासावे आणि इंदूरमध्ये १९८७ मध्ये अडूसष्ठावे संमेलन पार पडले. सात समुद्रापलीकडे हे संमेलन आयोजित करण्याचा मान अमेरिकेतील न्यू जर्सीने पटकावला. तेथे न्यू जर्सीमध्ये २०१० मध्ये नव्वदावे संमेलन पार पडले आणि संमेलनाच्या आयोजनात मानाचा तुरा रोवला गेला.
या व्यतिरिक्त महाराष्ट्रात अमरावतीमध्ये १९१२ मध्ये आठवे, जळगावमध्ये १९४४ मध्ये चौतिसावे, कल्याणमध्ये १९७२ मध्ये त्रेपन्नावे, यवतमाळमध्ये १९७५ मध्ये छपन्नावे, सावंतवाडीमध्ये १९७८ मध्ये एकोणसाठावे, अकोल्यामध्ये ८२ मध्ये बासष्ठावे, पुसदमध्ये १९८६ मध्ये सहासष्ठावे, इचलकरंजीमध्ये १९८६ मध्ये सदुसष्ठावे, वाशीमध्ये १९९१ मध्ये बहात्तरावे, परभणीमध्ये २००० मध्ये ऐंशीवे, रोहामध्ये (रायगड) २००१ मध्ये एक्क्यांशीवे, वसईमध्ये २००२ मध्ये ब्याऐंशीवे, कऱ्हाडमध्ये २००४ मध्ये चौऱ्याऐंशीवे, डोंबिवलीमध्ये २००५ मध्ये पंच्याऐंशीवे, बीडमध्ये २००९ मध्ये एकोणनव्वदावे, रत्नागिरीमध्ये २०११ मध्ये एक्क्याण्णववे, पंढरपूरमध्ये २०१४ मध्ये चौऱ्याण्णवावे, ठाणेमध्ये २०१६ मध्ये शह्याण्णवावे आणि उस्मानाबादमध्ये २०१७ मध्ये सत्याण्णवावे अशी संमेलने पार पडली.
या शंभर वर्षांच्या प्रदीर्घ वाटचालीत अनेक नामवंतांनी संमेलन अध्यक्ष पद भूषवले. यामध्ये, न.चिं. केळकर, कृ. प्र. खाडिलकर, विष्णु दिगंबर पलुस्कर, शि. म. परांजपे, रेव्हरंड ना. वा. टिळक, बॅरिस्टर मुकुंदराव जयकर, बाबासाहेब घोरपडे, दादासाहेब फाळके, बालगंधर्व तथा नारायण श्रीपाद राजहंस, गोविंदराव टेंबे, गणपतराव बोडस, आचार्य अत्रे (२ वेळा), वि. दा. सावरकर, चिंतामणराव कोल्हटकर, माधवराव पटवर्धन, वि. स. खांडेकर, वसंत देसाई, दुर्गा खोटे, अनंत काणेकर, पु. भा. भावे, पु. ल. देशपांडे, मो. ग. रांगणेकर, ग. दि. माडगूळकर, वसंत कानेटकर, वि.वा. शिरवाडकर, विद्याधर गोखले, भालचंद्र पेंढारकर, दाजी भाटवडेकर, पुरुषोत्तम दारव्हेकर, भालबा केळकर, छोटा गंधर्व, आत्माराम भेंडे, वसंतराव देशपांडे, रणजित देसाई, ज्योत्स्ना भोळे, प्रभाकर पणशीकर, विजया मेहता, चित्तरंजन कोल्हटकर, शाहीर साबळे, माधव मनोहर, शरद तळवलकर , वसंत सबनीस, आत्माराम सावंत, राजा गोसावी, जितेंद्र अभिषेकी, नाना पाटेकर, भक्ती बर्वे, सुरेश खरे, लालन सारंग, रमेश देव, रामदास कामत, मोहन जोशी, श्रीकांत मोघे, डॉ. मोहन आगाशे, फय्याज, कीर्ती शिलेदार, प्रेमानंद गज्वी, डॉ. जब्बार पटेल अशा अनेक नामवंतांनी संमेलनाच्या अध्यक्षपदाची उंची वाढवली.
अ. भा. मराठी नाट्य संमेलनाच्या १०० वर्षाच्या इतिहासात माय आणि लेक अशा दोघींनी अध्यक्षपद भूषवण्याचा दुर्मिळ योग दिसून येतो. अहमदनगर येथे झालेल्या ८३ व्या संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ नाट्य संगीत गायिका जयमाला शिलेदार यांनी भूषविले. त्यांची कन्या कीर्ती शिलेदार यांनी २०१८ मध्ये मुलुंड, मुंबई येथे झालेल्या ९८ व्या संमेलनाचे अध्यक्षपद भूषवून हा दुर्मिळ योग घडवून आणला. अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाला या शताब्दी वर्षामुळे नवचैतन्य लाभले आहे.
शतक महोत्सवी नाट्य संमेलनाचा शुभारंभ सोहळा दिनांक जानेवारी २०२४ रोजी पिंपरी चिंचवड येथे सुरु होऊन समारोप मे २०२४ अखेर रत्नागिरी येथे संपन्न होणार आहे. उद्घाटन सोहळा ते समारोप या कालावधीत अहमदनगर, सोलापूर, बीड, लातूर, नागपूर आणि मुंबई येथे विभागीय नाट्य संमेलन संपन्न होणार आहे.
अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा झरा सलग शंभर वर्षे वाहता ठेवणारे सर्व नामवंत व कलावंत यांच्याबद्दल ऋण व्यक्त करून या शंभराव्या नाट्य संमेलनास शुभेच्छा देतो. या ऐतिहासिक घटनेचे आपण साक्षीदार असणार याबद्दल मी आपल्या सर्वांना भाग्यवान मानतो.

आकाशवाणी पुणे च्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करणेबाबत डॉ नीलम गोऱ्हे यांचे नभोवाणी व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांना निवेदन

पुणे : आकाशवाणी पुणे ही भारतातील अनेक जुन्या आकाशवाणी केंद्र मधील एक महत्त्वाचे आकाशवाणी केंद्र आहे. तसेच त्यांचे कार्यक्रम हेही खूप प्रसिद्ध आहेत. या केंद्रावरील अनेक प्रकारचे कार्यक्रम हे नक्कीच ऐकण्यासारखे व प्रबोधनात्मक असतात. या कार्यक्रमामधून अनेक मोठमोठे कलाकार ही तयार झालेले आहेत. त्यामुळे स्थानिक कलाकारांच्या सहभाग व मराठीच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचा वाढलेला वापर यामुळे आकाशवाणी पुणे हे केंद्र नक्कीच अत्यंत चांगले काम करत होते. यामुळे या केंद्राला महसूल ही चांगला मिळत होता. तथापि गेल्या काही महिन्यांपासून या आकाशवाणी केंद्रावरील कार्यक्रम हे अत्यंत सुमार दर्जाचे तसेच स्थानिक कलाकारांना न घेता केलेले आहेत. याबरोबर पुणे आकाशवाणी केंद्र हे मुंबई, दिल्ली किंवा इतर केंद्राचे केंद्राचे कार्यक्रम प्रसारण करणारे केंद्र असल्याचे सध्या अनेक श्रोत्यांना जाणवत आहे. यामुळे अनेक श्रोते तक्रारी करत आहेत. अनेक श्रोत्यांनी आकाशवाणी पुणे च्या कार्यक्रम बाबत लेखी तक्रारी डॉ गोऱ्हे यांना दिल्या आहेत. याची तात्काळ दाखल डॉ गोऱ्हे उपसभापती महाराष्ट्र विधान परिषद यांनी घेतली. त्यांनी तात्काळ केंद्रीय माहिती व जनसंपर्क मंत्री श्री अनुराग ठाकूर, महाराष्ट्राचे राज्यपाल श्री रमेश जी बैस, मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांना लेखी पत्राद्वारे निवेदन दिले आहे. त्यामध्ये त्यांनी खालील प्रमाणे विनंती केली आहे. यात

  • आकाशवाणी पुणे केंद्र मध्ये ज्याप्रकारे जुने कार्यक्रम आखले जात होते त्याच धर्तीवर नवीन कार्यक्रम आखावेत.
  • हे कार्यक्रम स्थानिक नवीन कलाकारांना घेऊन करण्यात यावेत.
  • ⁠आकाशवाणीा पुणे केंद्र हे फक्त ईतर केंद्रांचे ब्रॉडकास्टिंग केंद्र म्हणून न बनता स्थानिक लोक व सांस्कृतिक कलांशी त्यांचे नाते टिकुन रहावे यासाठी त्यांनी आपले स्वतःचे कार्यक्रम तयार करण्यास कर्मचारी , निधी व अनुमती असावी.
  • तसेच प्राईम वेळेत विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम मराठी भाषेमध्ये घेण्याबाबत सूचित करावे
  • राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाचेच कार्यक्रम फक्त पुणे आकाशवाणी केंद्रावरून ब्रॉडकास्ट करावेत.
  • आकाशवाणी पुणे च्या कार्यक्रमांमध्ये स्थानिक कलाकार व महनीय व्यक्तींना जास्तीत जास्त सहभाग असावा.
    वरील प्रमाणे सूचना आकाशवाणी पुणे केंद्रातील अधिकाऱ्यांना द्याव्यात अशी विनंती लेखी निवेदनद्वारे विधानपरिषद उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.

आनंदवन परीसरातील 26 सोसायट्यांमधील 5 हजार सदनिका करताहेत …पाणी पाणी ..

पुणे : कोंढवा येथील आनंदवन परिसरासाठी पाणी पुरवठा करण्यासाठी या ठिक़ाणी दहा वर्षांपूर्वीच तीन मोठ्या टाक्या बांधण्यात आल्या परंतु, या टाक्यांत पाणी आणण्यासाठीच्या जलवाहिन्याच आजपर्यंत टाकण्यात आलेल्या नाहीत.याबाबत नागरिकांनी सातत्याने मागणी करुनही याकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी नागरीकांसह महापालिका पाणीपुरवठा प्रमुखांच्या दालनात धरणे आंदोलन केले .

हा प्रश्न सोडवा अन्यथा २५ हजार नागरिक कार्यालयासह परिसरात बसून आंदोलन करतील, असा इशारा दिल्यानंतर येत्या 20 दिवसांत या भागाला पाणी देण्याचे आश्‍वासन पाणीपुरवठा प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी दिले. त्यानंतरच मनसेचे पदाधिकारी आणि नागरिक कार्यालयाबाहेर पडले.

आनंदवन परीसरातील 26 सोसायट्यांमधील 5 हजार सदनिकांत राहणारे 20 ते 25 हजार नागरीक गेल्या 10 ते 12 वर्षांपासून पालिकेच्या पाण्यापासुन वंचित आहेत. परंतु, याकडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. सदर प्रश्न साईनाथ बाबर यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी मनसे स्टाइलने पालिका अधिकाऱ्यांशी संवाद साधला.

याबाबत शहराध्यक्ष साईनाथ बाबर व शाखा अध्यक्ष रोहन गायकवाड यांनी सांगितले की, आनंदवन (महंमदवाडी) परीसरातील रहेजा विस्टा, एलिना लिव्हींग, रहेजा प्रिमियर, कासा सोसायटी आदी मोठ्या 26 सोसायटी असुन या सर्व भागाला पालिकेकडून पाणीपुरवठा होत नाही. खासगी टँकर पाणी विकत घेण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही. पाण्याच्या टाक्याही बांधुन तयार आहेत. मात्र, या टाक्यांपर्यंत पाणी आणण्यात आलेले नाही. येथील नागरीक पाण्याच्या समस्येमुळे हैराण झाले आहेत.

याबाबत पालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने स्थानिक नागरीकांसह पालिका पाणीपुरवठा प्रमुखांच्या दालनात बसकन मारली, त्यानंतर पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी येत्या 20 दिवसांत या भागाला पाणीपुरवठा करण्याचे आश्‍वासन दिले. यावेळी मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर, शाखाप्रमुख रोहन गायकवाड, स्थानिक रहिवासी तारासिंग, शैलेश जाधव, आयुष राणावत, सुचित रॉय, आयुष मुथा, अलि अजगर शब्बीर यांच्यासह मोठ्या संख्येने नागरीक उपस्थित होते.

“शहरात असुनही गेल्या अनेक वर्षांपासुन नागरीक पालिकेच्या पाण्यापासुन वंचित राहत असतील तर सर्वसामान्य नागरीकांनी जगायचे कसे, पालिकेने कोणतीही दिरंगाई न करता समान पाणीयोजनेच्या लाईनमधून या भागाला टापाणीपुरवठा करावा. अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल.” – साईनाथ बाबर, शहराध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, पुणे

“आनंदवन परीसरातील 26 मोठ्या सोसायट्यांना आजपर्यंत पालिकेचा पाणीपुरवठा सुरु झालेला नाही. पुणे महापालिका प्रशासनाचे हे मोठे अपयश आहे, पालिकेने तत्काळ पाणीपुरवठा सुरु करुन येथील नागरीकांना दिलासा द्यावा. अन्यथा हा प्रश्न मनसे पद्धतीने सोडवू.” – रोहन गायकवाड, शाखाप्रमुख, मनसे

पोलिसांच्या गैरधंद्यांचा पर्दाफाश होण्याची आली वेळ :बारा सिलिंडरचे स्फोट कारणीभूत ठरणार ?

पुणे-वेगवेगळ्या भागात बेटिंग , ऑनलाईन जुगार ,यासह बेक्यादा धंद्यात पोलिसांची असलेली भागीदारी , किंवा पोलिसच चालवीत असलेले गैरधंदे यांचा पर्दाफाश कधी होणार ? असा प्रश्न सातत्याने पोलीस वर्तुळातील प्रामाणिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांत उपस्थित होत आला आहे. पण आता जणू ती वेळ आली आहे असे काहींना वाटू लागले आहे. त्याला निमित्त घडले आहे बारा सिलेंडरच्या स्फोटाचे …विमानतळ भागात गॅस सिलिंडरचा बेकायदा साठा असलेल्या गोदामात बुधवारी दुपारी स्फोट झाला. एकापाठोपाठ बारा सिलिंडरचे स्फोट झाले. या गंभीर घटनेची पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी तत्काळ दखल घेत अपर पोलीस आयुक्तांमार्फत या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

संबंधित गोदाम एका पोलीस कर्मचाऱ्याच्या आशीर्वादाने सुरू होते. तसेच संबंधित व्यक्ती नेहमी पोलीस ठाण्यात येऊन कर्मचाऱ्यास भेटत असल्याची माहिती समोर आली आहे.

विमाननगरमधील सिंबायोसिस कॉलेजजवळ एका गृहप्रकल्पाचे काम सुरू आहे. तेथे जवळच मजुरांची वसाहत आहे. त्या परिसरात एका गोदामात बेकायदा गॅस सिलिंडरचा मोठा साठा होता. बुधवारी तेथे आग लागली आणि एकापाठोपाठ बारा सिलिंडरचे स्फोट झाल्याने परिसरा हादरला. याची झळ मजुरांच्या झोपड्यांना पोहोचली. त्यात त्यांचे मोठे नुकसान झाले.

अग्निशमन दलातील ३० जवानांनी गोदामात साठवलेले तब्बल १०० सिलिंडर बाहेर काढले. वसाहतीतील महिला आणि मुले बाहेर पळाल्याने बचावले. या घटनेमुळे गॅसचा काळाबाजार समोर आला असून या प्रकरणाची आता अपर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्याकडून चौकशी करण्यात येणार आहे. चौकशीअंती मोठे रॅकेट समोर येण्याची शक्यता आहे.

शहराच्या वेगवेगळ्या भागात काहीजण बेकायदा गॅस सिलिंडरचा साठा करत आहे. घरगुती, तसेच व्यावसायिक वापराचे सिलिंडर जादा दराने विक्री करत असून, पत्र्याचे शेडमध्ये बेकायदा सिलिंडरचा साठा करुन ठेवत आहेत. बेकायदा सिलिंडर साठवणूक करण्यात आलेल्या गोदामांना आग लागल्याची घटना यापूर्वी देखील घडल्या आहेत.

स्थानिक पोलीस ठाण्याचे दुर्लक्ष होण्याचे कारण काय ?

इतक्या मोठ्या प्रमाणात सिलिंडरचा साठा करून त्याची वाहतूक, विक्री सुरू असताना स्थानिक पोलिसांच्या हा प्रकार निदर्शनास आला नाही का ? असा प्रश्न यानिमित्ताने नागरिक विचारत आहेत. या प्रकरामुळे स्थानिक पोलिसांची यंत्रणा अपयशी ठरली आहे. घटनेत सुदैवाने जीवितहानी न झाल्याने मोठा अनर्थ टळला.

“गॅस सिलिंडर स्फोट प्रकरणाचा तपास सुरू असून, जागा मालकास अटक करण्यात आली आहे. मात्र, त्याचा चालक अद्याप सापडला नाही. तो सापडल्यानंतर तो कोणत्या एजन्सीकडून सिलिंडर घेत होता हे समजले. त्याप्रमाणे संबंधित एजन्सीवरही कारवाई करण्यात येईल.” – आनंदराव खोबरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विमानतळ

‘एमआयटी सांस्कृतिक संध्या’ संगीत महोत्सवाचे आयोजन: डेहराडूनच्या तिबेटियन होम स्कूलचे श्री. डेव्हिड कालसांग यांच्या हस्ते उदघाटन

पुणे, दि. २९ डिसेंबर : विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे भारत तर्फे शनिवार, दि. ३० व रविवार, दि. ३१ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ६.१५ ते रात्री ९.३० वाजेपर्यंत विश्वराज बंधारा, विश्वशांती गुरुकुल, राजबाग, लोणी काळभोर, पुणे येथे ‘एमआयटी सांस्कृतिक संध्या’ संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
दोन दिवस साजरा होणार्‍या या ‘एमआयटी सांस्कृतिक संध्या’ संगीत महोत्सवाचे उद्घाटन दि. ३० डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ६.१५ वाजता डेहराडूनच्या तिबेटियन होम स्कूलचे श्री. डेव्हिड कालसांग यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
अत्यंत निसर्गरम्य व सुंदर अशा परिसरात होणार्‍या या संगीत महोत्सवामध्ये मारिया लिन ओब्रे, श्री. निसर्ग पाटील, सुप्रसिध्द पखवाज वादक पं.उध्दवबापू आपेगावकर, शास्त्रीय गायिका डॉ. श्रेयसी पावगी हे आपली कला सादर करतील.  
दि. ३१ डिसेंबर २०२३  रोजी प्रख्यात ध्रुपद संगीत गायक सुप्रियो माईत्रो, सुप्रसिद्ध गायिका श्रीमती गोदावरीताई मुंडे, सुप्रसिध्द व्हायोलिनवादक श्री. तेजस उपाध्ये, श्रीमती कल्याणी बोंद्रे आणि सुप्रसिध्द गायक श्री. उपेंद्र भट हे आपली कला सादर करणार आहेत. या कार्यक्रमाची सुरुवात  सुप्रसिद्ध शहनाई वादक श्री. तुकाराम दैठणकर यांच्या सनई वादनाने  होईल.  
भारतीय संस्कृती व परंपरेनुसार चैत्र शुध्द प्रतिपदा ‘गुढी पाडवा’ हाच खर्या अर्थाने नववर्ष दिन म्हणून ओळखला जातो. तथापि, ३१ डिसेंबरचा दिवस हा नववर्ष दिनाची पूर्वसंध्या म्हणून वेगळ्याच पाश्चात्य स्वरूपातील जल्लोषात सर्व भारतात व जगातही साजरा केला जातो. परंतु, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे आणि विश्वशांती संगीत कला अकादमी, पुणे या संस्थेच्या माध्यमातून आपल्या संपूर्ण समाजामध्ये व विशेष करून तरूण वर्गाच्या मनामध्ये ‘स्वधर्म, स्वाभिमान व स्वत्व’ जागवून खऱ्या अर्थाने ‘भारतीय अस्मिता’ जागविण्याचा संस्थेचा एक विनम्र प्रयत्न आहे. ‘एमआयटी सांस्कृतिक संध्येच्या’ कार्यक्रमातून ‘संगीताच्या साधनेतून ईश्वर दर्शन व शांत रसाची अनुभूती’ देणारा एक आगळावेगळा अलौकिक आविष्कार सर्व जाणकार रसिकांना मंत्रमुग्ध करेल.
        विश्वशांती गुरुकुल येथील विश्वराज बंधाऱ्याच्या विस्तीर्ण जलाशयात उभारलेल्या मंदिर स्वरूपी  श्री महासरस्वती, श्री महालक्ष्मी व श्री महाजलदेवता या तीन विशेष मंचांवरून शांतरसाची अनुभूती देणारा ‘एमआयटी सांस्कृतिक संध्या’ हा विशेष कार्यक्रम दरवर्षी ३० व ३१ डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
दि. १ जानेवारी २०२४ रोजी सुरू होणार्‍या नव्या वर्षाची ही अभिनव सुरूवात भारतीय संस्कृतीला अनुसरून नामवंत, तसेच तरुण गायक व संगीतकार यांच्या सादरीकरणातून होणार आहे. एमआयटी  सांस्कृतिक  संध्येचा  समारोप दि. ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री, त्याग व  समर्पणाचे  प्रतीक  असलेल्या यज्ञकुंडामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, मद व मत्सर, विकार, विकृती व विकल्पासारख्या दुर्गुणांची आहुती देऊन, स्वत:चे आणि संपूर्ण समाजाचे पुढील २०२४ हे वर्ष अत्यंत सुखाने, समाधानाने व शांततेने पार पडावे यासाठी प्रार्थना करून संकल्प सोडला जाईल.
     या  सांस्कृतिक  संध्येच्या  कार्यक्रमात  सहभागी  होऊन  नाद-ब्रह्म-स्वरूपी ‘संगीताच्या साधनेतून ईश्वर दर्शन व शांतरसाची अनुभूती’ घ्यावी असे  विनम्र आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
     अशी माहिती विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष  प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, विश्वशांती संगीत कला अकादमीच्या कार्यकारी संचालिका सौ. ज्योती कराड-ढाकणे आणि महासचिव श्री.आदिनाथ मंगेशकर यांनी दिली.

 यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांसाठी प्रवेशिका, पुस्तके पाठविण्याचे आवाहन

0

वी दिल्ली, दि.२९ : राज्यशासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारा’साठीच्या प्रवेशिका महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात मागविण्यात आलेल्या आहेत. या पुरस्कारांतर्गत नवी दिल्लीसह बृहन्महाराष्ट्रातील मराठी लेखक तसेच प्रकाशकांना ‘सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कारा’साठी महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली येथे प्रवेशिका पाठविता येणार आहे.

मराठी भाषेतील उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठी राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने ‘यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय  पुरस्कार योजने’अंतर्गत विविध साहित्य प्रकारांसाठी पुरस्कार प्रदान करण्यात येतात. वर्ष 2023 करिता 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2024या कालावधीत प्रकाशित प्रथम आवृत्ती पुस्तके आणि प्रवेशिका या स्पर्धेसाठी 31 जानेवारी  2024 पर्यंत पाठविता येणार आहे.

एकूण 4 विभाग, 35 साहित्य प्रकार आणि 29 लाख रुपयांचा पुरस्कार

यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार योजनेअंतर्गत एकूण चार विभागात 35 साहित्य प्रकारांसाठी प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत. प्रौढ वाड्.मय विभागात एकूण 22 साहित्य प्रकार असून प्रत्येकी 1 लाख रुपये या प्रमाणे एकूण 22 लाख रुपयांची पुरस्कारांची रक्कम आहे.बाल वाङ्मय विभागात एकूण 6 साहित्य प्रकारात प्रत्येकी 50 हजार रुपये याप्रमाणे एकूण 3 लाख रूपयांची पुरस्कार रक्कम आहे.

प्रथम प्रकाशन प्रकारातील एकूण 6 साहित्य प्रकारांसाठी प्रत्येकी 50 हजार रुपये या प्रमाणे एकूण 3 लाख रुपयांची पुरस्कार रक्कम आहे.

‘सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कार’ हा खास बृहन्महाराष्ट्रातील उत्कृष्ट साहित्य निर्मितीसाठी प्रदान करण्यात येणार आहे. या श्रेणीत उत्कृष्ट साहित्य निर्मितीसाठी  साहित्याच्या सर्व प्रकारातील साहित्यकृती या पुरस्कारासाठी पाठविता येणार असून उत्कृष्ट साहित्यकृतीस ‘सयाजीराव महाराज गायकवाड पुरस्कार’  (पुरस्कार रक्कम 1,00,000 रूपये)  प्रदान करण्यात येणार आहे.

बृहन्महाराष्ट्र क्षेत्रातील विजेत्यांसाठी ‘सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कार’ (सर्व साहित्य प्रकार) साठी निवड केली जाईल.  प्रवेशिका पूर्णत: भरुन आवश्यक साहित्यासह सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात किंवा महाराष्ट्र परिचय केंद्र नवी दिल्ली यांच्याकडे  31 जानेवारी 2024 पर्यंत पोहचतील, अशा बेताने पाठवाव्यात. लेखक / प्रकाशक या स्पर्धेसाठी प्रवेशिका दाखल करु शकतात.

राज्यशासनाच्या www.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर ‘नवीन संदेश’ या सदरात ‘यशवंतराव चव्हाण राज्य वाड:मय पुरस्कार 2023 नियमावली व प्रवेशिका’ या शीर्षाखाली व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या http://msblc.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रवेशिका व नियम पुस्तिका उपलब्ध आहे.  यासह  या स्पर्धेची नियमावली व प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्य मंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी रोड, प्रभादेवी, मुंबई-400 025 यांच्या कार्यालयात  उपलब्ध आहे. तसेच, बृहन्महाराष्ट्रातील लेखक व प्रकाशकांसाठी महाराष्ट्र परिचय केंद्र, ए/8, स्टेट एम्पोरिया बिल्डिंग, बाबाखडक सिंह मार्ग, नवी दिल्ली  या कार्यालयातही स्पर्धेची नियमावली व प्रवेशिका उपलब्ध आहे.

ज्या लेखक व प्रकाशकांना या योजनेत भाग घ्यावयाचा असेल, त्यांनी (मुंबईतील लेखक /प्रकाशकांनी) पुस्तकांच्या दोन प्रतींसह विहीत नमुन्यातील प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्यमंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी रोड, प्रभादेवी, मुंबई 400025 येथे पाठवाव्यात.

मुंबई वगळता राज्यातील अन्य ठिकाणच्या लेखक/प्रकाशकांनी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाव्दारे तर बृहन्महाराष्ट्रातील लेखक व प्रकाशकांनी थेट महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या मुख्य कार्यालयात किंवा महाराष्ट्र परिचय केंद्र नवी दिल्ली या कार्यालयाकडे हे साहित्य व प्रवेशिका 1 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 पर्यंत पाठवावे, असे आवाहन सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांनी केले आहे.

पुरस्कारासाठीची प्रवेशिका व नियमावली इच्छुकांना पाहण्यासाठी व सहभाग घेण्यासाठी या कार्यालयात उपलब्ध असून अधिक माहितीसाठी महाराष्ट्र परिचय केंद्र, ए/8 स्टेट एम्पोरिया बिल्डिंग , बाबा खडक सिंग मार्ग, नवी दिल्ली या कार्यालयास भेट द्यावी.

जागतिक कौशल्य स्पर्धेसाठी ७ जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

0

मुंबई, दि. २९ : जागतिक कौशल्य स्पर्धा २०२४ ही फ्रांस (ल्योन) येथे होणार असून देशातील उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी जिल्हा, विभाग, राज्य आणि देशपातळीवर कौशल्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी २३ वर्षाखालील युवकांनी ७ जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त र.प्र. सुरवसे यांनी केले आहे.

जागतिक कौशल्य स्पर्धा ही जगातील सर्वात मोठी व्यावसायिक शिक्षण आणि कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा आहे. दर दोन वर्षांनी या स्पर्धेचे आयोजन केले जाते. ही स्पर्धा जगभरातील २३ वर्षांखालील तरुणांकरिता त्यांच्यातील कौशल्य सादर करण्याची ऑलिम्पिक खेळासारखीच स्पर्धा आहे. यापूर्वी ४६व्या जागतिक कौशल्य स्पर्धेमध्ये ६२ विभागातून ५० देशातील १० हजार उमेदवार समाविष्ट झाले होते. स्पर्धेचे आयोजन जिल्हा, विभाग, राज्य आणि देश पातळीवर करण्यात येणार असून स्पर्धेत निवड केलेल्या उमेदवारांची नावे पुढील जागतिक नामांकनासाठी पाठविण्यात येतील. इच्छुक असणाऱ्या पात्र उमेदवारांनी गुगल प्ले स्टोअर (Google play store) मधून ‘स्कील इंडिया डिजीटल’ (skillindiadigital) हे ॲप डाऊनलोड करावे. या ॲपमध्ये नाव नोंदणी करून या स्पर्धेत सहभागी होता येईल.

जिल्हास्तरीय कौशल्य स्पर्धेकरीता पात्रता निकष :

जागतिक कौशल्य स्पर्धा २०२४ करीता वयोमर्यादा हा एकमेव निकष ठरविण्यात आलेला आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवाराचा जन्म १ जानेवारी २००२ किंवा तद्नंतरचा असणे अनिवार्य आहे.

जागतिक कौशल्य स्पर्धेसाठी अभ्यासक्रम

थ्रीडी डिजिटल गेम आर्ट, ऑटोबॉडी रिपेअर, ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी, बेकरी, ब्युटी थेरपी, ब्रिकलेयिंग, कॅबिनेट मेकिंग, कार पेंटिंग, कारपेंटरी, सीएनसी मिलिंग, सीएनसी टर्निंग, काँक्रीट कन्स्ट्रक्शन वर्क, कुकिंग, इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, मोबाईल ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट, मोबाईल रोबोटिक्स, पेंटिंग अँड डेकोरेटिंग, प्लास्टरिंग अँड ड्रायवॉल सिस्टीम, प्लंबिंग अँड हिटिंग, प्रिंट मीडिया टेक्नॉलॉजी, फोटो टाईप मॉडेलिंग, रेफ्रिजरेशन ॲण्ड एअर  कंडिशनिंग, रिनिवेबल एनर्जी, तसेच, एडिटीव्ह मॅन्युफॅक्चरिंग, क्लाऊड कम्प्युटिंग सायबर सिक्युरिटी डिजिटल कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रियल डिझाईन टेक्नॉलॉजी इंडस्ट्री ४.० इन्फॉर्मेशन नेटवर्किंग कॅबलिंग,मेकॅट्रॉनिक्स, रोबोट सिस्टीम इंटिग्रेशन ॲण्ड वॉटर टेक्नॉलॉजी या क्षेत्रातील स्पर्धेत सहभागी होण्यासाठी उमेदवाराचा जन्म १ जानेवारी, १९९९ किंवा तद्नंतरचा असणे अनिवार्य आहे.

स्पर्धेचे सविस्तर वेळापत्रक नोंदणीकृत उमेदवारांना कळविण्यात येईल. काही अडचण असल्यास अधिक माहितीसाठी उमेदवारांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगर १७५ श्रेयस चेंबर, १ ला मजला, डॉ.डी.एन. रोड, फोर्ट, मुंबई ४०० ००१ येथे प्रत्यक्ष अथवा दूरध्वनी ०२२-२२६२६४४० यावर संपर्क करावा.

केपीआयएलला ३२४४ कोटी रुपयांची नवी कंत्राटे

मुंबई२९ डिसेंबर २०२३ – कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल लिमिटेड (केपआयएल) या भारतातील सर्वात मोठ्यानोंदणीकृत इंजिनियरिंग आणि बांधकाम कंपन्यांपैकी एका कंपनीने आपल्या संयुक्त भागिदारी (जेव्ही) आणि आंतरराष्ट्रीय उपकंपन्यांसह ३२४४ कोटी रुपयांची नवी कंत्राटे/नोटिफिकेशन्स मिळवली आहेत.

नव्या कंत्राटाचे तपशील पुढीलप्रमाणे आहेत –

·         बिल्डिंग्ज अँड फॅक्टरीज (बी अँड एफ) व्यवसायासाठी केपीआयएलला आतापर्यंतचे सर्वात मोठे डिझाइन आणि बांधकामाचे कंत्राट मिळाले असून त्यामध्ये दक्षिण भारतातील मोठ्या निवासी प्रकल्पाच्या बांधकामाचा समावेश आहे. अंदाजे १३ दशलक्ष चौरस फूट बिल्ड- अप एरिया असलेल्या या प्रकल्पाचे काम एका प्रतिष्ठित डेव्हलपरकडून मिळाले आहे.

·         भूमीगत मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे डिझाइन व बांधकामाचे कंत्राट मिळाले असून त्यामुळे केपीआयएल टीबीएम टनेलिंग कामासह इलेक्ट्रिक वाहतूक क्षेत्रात प्रवेश करत आहे.

·         परदेशी बाजारपेठांमधून ट्रान्समिशन आणि वितरण (टी अँड डी) व्यवसायासाठी कंत्राट मिळाले आहे.

केपीआयएलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनिष मोहनोत म्हणाले, वेगवेगळ्या व्यवसायांसाठी धोरणात्मक कंत्राटे मिळाल्याचे जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. भूमीगत मेट्रो रेल टनेलिंग प्रकल्पात केलेला प्रवेश शाश्वत शहरी पायाभूत सुविधा क्षेत्राप्रती असलेली आमची बांधिलकी दर्शवणारा आहे. बी अँड एफ व्यवसायातील डिझाइन आणि बांधकामाचे सर्वात मोठे कंत्राट आम्हाला एका प्रतिष्ठित डेव्हलपरकडून मिळालेले असून त्याअंतर्गत दक्षिण भारतात मोठा निवासी प्रकल्प उभारायचा आहे. या प्रकल्पामुळे या क्षेत्रातील आमचे स्थान आणखी मजबूत होईल. या मोठ्या कंत्राटांअंतर्गत इंजिनियरिंग कौशल्यावर भर दिला जाणार असून त्यावरून वैविध्यपूर्ण व्यवसाय विभागांतील आमची क्षमता दिसून येते.

श्री. मोहनोत म्हणाले, आर्थिक वर्ष २४ मधे आमच्याकडे एकूण १७,६८५ कोटी रुपयांची कंत्राटे असून त्यामुळे शाश्वत विकासासाठी दमदार चालना मिळेल.