Home Blog Page 1275

पहिला भूकंप नार्वेकर काय निर्णय घेतील हा असेल:अन्यथा पक्षातंर्गत बंदी कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकावा लागेल : पृथ्वीराज चव्हाण

सांगली-विधानसभा अध्यक्षांना आता निर्णय घ्यावा लागेल. कायद्याला धरून निर्णय घ्यावा लागणार आहे, सोडून निर्णय घेतला तर सर्वोच्च न्यायालय काय करणार? हे पहावे लागेल. पक्षाआंतर्गत बंदी कायदा हा कायदा, कचऱ्याच्या डब्यात फेकून द्यावा लागेल, त्यामुळे पहिला भूकंप हा नार्वेकर काय करतील हा असेल. तर दुसरीकडे भाजपा विरोधात जास्त उमेदवार उभे करून मतांची विभागणी होईल, त्यामुळे भाजपची हीच रणनीती असेल.कदाचित लोकसभा आणि विधानसभा निवडणूक कदाचित एकत्र होतील,पण भाजपच्या लोकसभेच्या जागा वाढतील अशी परिस्थिती देशात नाही,मात्र जर तिसऱ्यांंदा मोदी पंतप्रधान झाले तर देशाची घटना संपवून वेगळेच कायदे येण्याची भीती आहे असा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. . ते आज सांगलीत बोलत होते.राम मंदिर ह भाजपचे नाही, मतदान हे महागाईच्या मुद्यांवर होणार आहे

राजीव गांधींनी मंदिराची कुलूप उघडली
देशातील सगळ्या संस्था हस्तगत करण्यात आल्या आहेत, त्यामुळे त्या फार काही निर्णय घेऊ शकत नाही. ज्यांनी भाजपला मते दिली ती भाजपकडे जातील अशी स्थिती नाही. राम मंदिराचा वाद आहे, पण आम्ही त्याला विरोध करणार नाही, तसा प्रश्न पण येत नाही, राजीव गांधी यांनी मंदिराची कुलूप उघडली आहेत. मंदिर उभारले जात आहे ही चांगली गोष्ट आहे. राम मंदिर हे भाजपचे नाही, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.

वंचितला इंडिया आघाडीत घेण्यास विरोध नाही
यावेळी बोलताना चव्हाण यांनी वंचितला इंडिया आघाडीत घेण्याबाबत विरोध नाही, वंचितने इंडिया आघाडीत यायला हवे, अशी भूमिका मांडली. विभाजन टाळण्याचा इंडिया आघाडीचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. हे निवडणूकीचे वर्ष असल्याने निर्णायक ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अन्वीत,  कबीर, गौतमची आगेकूच-योनेक्स सनराईज पीवायसी एचटीबीए अमनोरा कप बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा


पुणे : अन्वीत राजवाडे, कबीर देसाई, गौतम साठे यांनी योनेक्स सनराईज पीवायसी एचटीबीए अमनोरा कप बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून ११ वर्षांखालील मुलांच्या गटाच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.
पीवायसी हिंदू जिमखान्याच्या बॅडमिंटन कोर्टवर ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील ११ वर्षांखालील मुलांच्या एकेरीच्या दुसऱ्या फेरीत अन्वीत राडवाडेने ओजस काळेवर २१-८, २१-१० अशी, तर कबीर देसाईने रावीश आपटेवर २१-१७, २१-१६ अशी मात केली. गौतम साठेने साथ्यान तिरुवेंकटेश्वरणचे आव्हान १६-२१, २१-१३, २१-१३ असे परतवून लावले. यानंतर लक्ष्य सिन्हाने ऋग्वेद रासनेवर २१-५, २१-१० असे, बुरहनुद्दीन अगाशीवालाने साहीर तुरम्बेकरवर २१-५, २१-४ अशी मात केली.

तेजस्वी, रीतचे विजय
स्पर्धेतील १३ वर्षांखालील मुलींच्या एकेरीच्या दुसऱ्या फेरीत तेजस्वी भुतडाने अवनी हरडेवर २१-७, २१-१० अशी, रीत पालने चार्वी लापसीयवर २१-५, २१-८ अशी मात केली. यानंतर कायरा रैनाने स्पृहा गांधीवर २१-५, २१-६ असा, तर पलक धनगरने प्रिशा पटवर्धनवर १७-२१, २१-१५, २१-१८ असा विजय मिळवला.

आयुषी, जुईची विजयी सलामी

स्पर्धेतील १७ वर्षांखालील मुलींच्या सलामीच्या लढतीत आयुषी काळेने ए. परमारवर २१-९, २१-७ अशी, तर जुई जाधवने साची संचेतीवर २१-११, २१-१० अशी मात केली.

निकाल –१७ वर्षांखालील मुली – पहिली फेरी – वेनीषा कोल्हे वि. वि. अव्वयी पाटील २१-८, २१-१०; मौसम माने पाटील वि. वि. तन्वी तटके २१-२, २१-६; लभा मराठे वि. वि. सिद्धी जगदाळे २१-७, २१-८; शिवानी मासळेकर वि. वि. ऋतुजा वेलणकर २१-१७, २२-२०; भक्ती पाटील वि. वि. रेमा घाग २१-९, २१-५; अहना जैन वि. वि. मेघना तिकले २१-१३, २२-२०; आयुषी मुंडे वि. वि. सारा गुजराती २१-१२, २१-१३; शिवांजली करडिले वि. वि. अनघा शिंदे २१-८, २१-१२; जिया उत्तेकर वि. वि. आरोही अमरुळे २१-१२, २१-१३.

दुसरी फेरी – ११ वर्षांखालील मुले – रणवीर सूर्यवंशी वि. वि. ईशान बापट २३-२१, २१-११; अर्जुन तुळपुळे वि. वि. शांतनू चिरपुटकर २१-१४, २१-१५; शर्वीन मगर वि. वि. अद्विक बाफना २१-९, २५-२३; आरुष सप्रे वि. वि. श्रेयश सोनावणे २१-१५, २१-१७.

१९ वर्षांखालील मुले – कृष्णा जसूजा वि. वि. दिव्यांश सिंह २१-८, २१-१२; यशराज कदम वि. वि. नील शोरन २१-१४, २१-१२; अवधूत कदम वि. वि. तनीष काकडे २१-१०, २१-११; आधिश ए. वि. वि. हर्षवर्धन अगरवाल २१-३, २१-६; वत्सल्य गर्ग वि. वि. कृष्णनील गोरे १९-२१, २१-१७, २१-१३; ग्रंथ वालेचा वि. वि. अतुल्ययात्री अभ्यंकर २१-१५, २१-११; सुदीप खोराटे वि. वि. विहान मुर्ती १७-२१, २१-१७, २१-१७; तनीष दरपे वि. वि. श्राव्या पाटणकर २१-९, २१-१०; सार्थक पाटणकर वि. वि. इशान मुदगल २१-१२, २१-६.

१३ वर्षांखालील मुले – दिविक गर्ग वि. वि. प्रथमेश जगदाळे १६-२१, २१-११, २१-१०; अद्वय देशमुख वि. वि. ऋषभ मराठे २१-१४, २१-७; सिबतैनरझा सोमजी वि. वि. शौर्य खरात २१-७, २१-१०; विहान कोल्हाडे वि. वि. शौर्य रणखांब २१-८, २१-८; आर्यन नागवडे वि. वि. अनय इंगळहळीकर २१-१४, २१-११; शारव जाधव वि. वि. अवधूत कुंभार १९-२१, २१-१०, २१-१४.

११ वर्षांखालील मुली – दिविशा सिंग वि. वि. कृतिका देशमुख २१-१०, २१-१०; शान्वी सिनागरे वि. वि. ऋत्वा पांडे २०-२२, २३-२१, २१-१२; स्वस्ती रूगे वि. वि. विहा गुरव २१-३, २१-१०; अग्रिमा राणा वि. वि. केयारा साखरे २१-१०, २१-१३; कृष्णाली वांद्रे वि. वि. स्वरा कुलकर्णी १४-२१, २१-१६, २१-१३; वल्हरी वाटणे वि. वि. अंशिका मोगल २१-१०, २१-९;

दुसरी फेरी – ११ वर्षांखालील मुले – रणवीर सूर्यवंशी वि. वि. ईशान बापट २३-२१, २१-११; अर्जुन तुळपुळे वि. वि. शांतनू चिरपुटकर २१-१४, २१-१५; शर्वीन मगर वि. वि. अद्विक बाफना २१-९, २५-२३; आरुष सप्रे वि. वि. श्रेयश सोनावणे २१-१५, २१-१७.

१९ वर्षांखालील मुले – कृष्णा जसूजा वि. वि. दिव्यांश सिंह २१-८, २१-१२; यशराज कदम वि. वि. नील शोरन २१-१४, २१-१२; अवधूत कदम वि. वि. तनीष काकडे २१-१०, २१-११; आधिश ए. वि. वि. हर्षवर्धन अगरवाल २१-३, २१-६; वत्सल्य गर्ग वि. वि. कृष्णनील गोरे १९-२१, २१-१७, २१-१३; ग्रंथ वालेचा वि. वि. अतुल्ययात्री अभ्यंकर २१-१५, २१-११; सुदीप खोराटे वि. वि. विहान मुर्ती १७-२१, २१-१७, २१-१७; तनीष दरपे वि. वि. श्राव्या पाटणकर २१-९, २१-१०; सार्थक पाटणकर वि. वि. इशान मुदगल २१-१२, २१-६.

१३ वर्षांखालील मुले – दिविक गर्ग वि. वि. प्रथमेश जगदाळे १६-२१, २१-११, २१-१०; अद्वय देशमुख वि. वि. ऋषभ मराठे २१-१४, २१-७; सिबतैनरझा सोमजी वि. वि. शौर्य खरात २१-७, २१-१०; विहान कोल्हाडे वि. वि. शौर्य रणखांब २१-८, २१-८; आर्यन नागवडे वि. वि. अनय इंगळहळीकर २१-१४, २१-११; शारव जाधव वि. वि. अवधूत कुंभार १९-२१, २१-१०, २१-१४.

११ वर्षांखालील मुली – दिविशा सिंग वि. वि. कृतिका देशमुख २१-१०, २१-१०; शान्वी सिनागरे वि. वि. ऋत्वा पांडे २०-२२, २३-२१, २१-१२; स्वस्ती रूगे वि. वि. विहा गुरव २१-३, २१-१०; अग्रिमा राणा वि. वि. केयारा साखरे २१-१०, २१-१३; कृष्णाली वांद्रे वि. वि. स्वरा कुलकर्णी १४-२१, २१-१६, २१-१३; वल्हरी वाटणे वि. वि. अंशिका मोगल २१-१०, २१-९;

अरविंद शिंदे यांचा वाढदिवस कोरेगावपार्क येथील अंधशाळेमध्ये व वडगांवशेरी येथील स्व. रंगनाथन कर्णबधिर शाळेमध्ये साजरा.

 पुणे– पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष – अरविंद शिंदे यांचा वाढदिवस पायल तिवारी बिटिया फाउंडेशनच्या वतीने आज कोरेगाव पार्क येथील अंधशाळेमध्ये केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी अंध मुलांसाठी नाश्ताचे सुध्दा आयोजन करण्यात आले होते.

      कार्यक्रमाचे आयोजन शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्षा व महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा -संगिता तिवारी यांनी केले होते. अंधशाळेमध्ये वाढदिवस साजरा केल्यामुळे विद्यार्थ्यांना आनंद झाला. यावेळी अंधशाळेतील विद्यार्थ्यांनी श्री. अरविंद शिंदे यांना शुभेच्छा देताना काही गाणी देखील म्हटली. अंध शाळेचे व्यवस्थापक – शेवाळे सर यांनी – अरविंद शिंदे यांचा सत्कार केला.

      यावेळी नगरसेवक रफिक भाई शेख, अजित दरेकर, सुजित यादव, आसिफ शेख, हेमंत राजभोज, विशाल जाधव, ॲड. नंदलाल धिवार, पुनमित तिवारी, सुंदरा ओव्हाळ, उषा राजगुरू, ज्योती चंदेवळ, आदी उपस्थित होते.

      यानंतर शहराध्यक्ष श्रीअरविंद शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त वडगावशेरी विधानसभा मतदार संघातील टिंगरेनगर येथील स्व. रंगनाथन कर्णबधिर स्कूल मधील विद्यार्थ्यांना अन्नदान करण्यात आले. वडगावशेरी ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजू ठोंबरे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.  

      यावेळी नगरसेवक अजित दरेकर, सचिन टिंगरे, ब्लॉक अध्यक्ष संतोष पाटोळे आसिफ शेख, हेमंत राजभोग, रमेश सकट, विशाल जाधव पुणे शहर युवक अध्यक्ष राहुल शिरसाठ, सचिन भोसले, प्रभाग अध्यक्ष रमाकांत साठे, अमोल लोणार, दत्तात्रय कांबळे,  विल्सन चंदेवळ,  दीपक श्रीवास्तव, रामदास पवार, स्वप्निल नाईक, प्रसाद वाघमारे, रुनेश कांबळे, सद्दाम शेख, शानू चलवादी, सचिन आई गुडे, राज गहलोत, योगेश शिर्के, डॅनियल मगर, जॉन्सन हिरे, महिला उपाध्यक्ष प्रियंका रणपिसे, उषा राजगुरू, ज्योती चंदेवळ, सारिका मुंडावरे, लता हसूलकर, छाया लांडगे, लखन ओव्हाळ, अश्विनी गवारे, ज्योती परदेशी, ललीता जगताप यावेळी उपस्थित होते.

साधनांची कमतरता नाही गरज संस्कारक्षम पिढी घडविण्याची -मंत्री चंद्रकांतदादा पाटील.

समाजाची गरज लक्षात घेऊन उपक्रम राबविण्याची आवश्यकता – ना. चंद्रकांतदादा पाटील.

क्रिएटिव्ह फाउंडेशन व सतीश गायकवाड मित्र परिवाराच्या वतीने पालकर शाळेस शालोपयोगी साहित्य भेट.

पुणे:

समाजाची गरज ओळखून उपक्रम राबविण्याची गरज असून जेथे जे पाहिजे तेच देता आले पाहिजे आणि तेच समाजकार्य क्रिएटिव्ह फाउंडेशन, ग्लोबल ग्रुप आणि सतीश गायकवाड मित्र परिवार करत आहे असे ना. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले. सध्या साधनांची कमतरता नसून संस्कारक्षम पिढी घडविण्याची गरज असल्याचे सांगताना हे काम शिक्षकांच्या हातूनच घडू शकते आणि तेच भावी काळातील चांगले नागरिक घडवू शकतात, त्यासाठी आवश्यक ती सर्व मदत करण्यास मी तत्पर असल्याचे ही चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.
क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि सतीश गायकवाड मित्र परिवाराच्या वतीने कर्वेनगर येथील अभिजात एजयुकेशन सोसायटी च्या ग. रा. पालकर शाळेस शालेय साहित्य व क्रीडा साहित्य भेट देण्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर, श्री. सतीश गायकवाड, मा. नगरसेविका व शिक्षण समिती अध्यक्ष मंजुश्री खर्डेकर, ग्लोबल ग्रुप चे राहुल बग्गा, मा. नगरसेवक जयंत भावे, शहर उपाध्यक्ष प्रशांत हरसूले, शहर चिटणीस कुलदीप सावळेकर,प्रभाग अध्यक्ष एड. प्राची बगाटे,श्रीमती पालकर,प्रभाग 13 महिला मोर्चा अध्यक्ष संगीता शेवडे, महिला मोर्चा शहर चिटणीस सुवर्णा काकडे, राजस्थान आघाडीचे जयप्रकाश पुरोहित,विश्वजीत देशपांडे,प्रभाग सरचिटणीस बाळासाहेब धनवे, विठ्ठल मानकर, निलेश गरुडकर, राजेंद्र येडे, समीर ताडे, श्रीकांत गावडे, प्रतीक खर्डेकर इ मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शाळेला क्रीडा तथा शैक्षणिक साहित्य भेट देण्यात आले. यात हॅन्डबॉल, निशाण, डंबेलस सह चित्रकला वही, स्केच पेन, पट्ट्या, पेन्सिल व इतर साहित्य मुबलक प्रमाणात देण्यात आले. शाळेच्या वतीने मुख्याध्यापिका पूर्वा म्हाळगी, अमला भागवत, नलिनी शेंडकर यांनी त्याचा स्वीकार केला.
संदीप खर्डेकर यांनी प्रास्ताविक केले, पूर्वा म्हाळगी यांनी सूत्रसंचालन तर भाजप क्रीडा आघाडी संयोजक प्रतीक खर्डेकर यांनी नमो चषक ची माहिती देत आभार प्रदर्शन केले.

9 जानेवारी मध्ये रात्रीपासून महाराष्ट्रामध्ये चक्काजाम करून आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय

ऑटो टॅक्सी बस ट्रक ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांची माहिती

पुणे-हिट अँड रन प्रकरणी दिल्ली पंजाब बिहार उत्तर प्रदेश मध्यप्रदेश सह देशभरातील विविध राज्यांमध्ये चक्काजाम करण्याचा निर्णय झाला असून, महाराष्ट्रामध्ये देखील हे आंदोलन तीव्र करण्यात येणार असून 9 जानेवारीमध्ये रात्रीपासून हे आंदोलन तीव्र करून चक्काजाम करण्याचा निर्णय विविध संघटनेने घेतला असल्याची माहिती ऑटो टॅक्सी ट्रक ट्रान्सपोर्ट फेडरेशन राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी दिली,

बाबा कांबळे यांनी दिल्ली जंतर-मंतर येथे आंदोलन केले तसेच पंजाब येथील आंदोलनात देखील सहभाग घेतला तसेच देशाच्या विविध भागात दौरा करून ते 9 तारखेला महाराष्ट्र मध्ये पोहोचत आहेत 9 तारखेला मध्यरात्रीपासून हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय महाराष्ट्र मध्ये घेण्यात आला असून महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये आंदोलन केला जाणार आहे यामध्ये ऑटो टॅक्सी ट्रक बस टेम्पो सर्व प्रकारचे ड्रायव्हर चालक-मालक सहभागी होणार आहेत,

बाबा कांबळे म्हणाले देशभरामध्ये हिट अँड रन प्रकरणी आंदोलन सुरू आहे परंतु सरकार मात्र भूमिकेवरती ठाम आहे, केंद्र सरकारने देशभरातील 25 करोड ड्रायव्हर चालकांचे संघटनांसोबत चर्चा करावी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केलास हे आंदोलन अधिक आक्रमक होईल, “शांततेच्या मार्गाने लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू ठेवा कोणत्याही प्रकारची हिंसा व कुठेही रहदारीस अडथळा निर्माण होईल अशा प्रकारचे वर्तन करू नये शांततेच्या मार्गाने परंतु अधिक आक्रमक व तीव्र आंदोलन करून जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय वार्ड कार्यालय समोर आंदोलन करा तसेच चक्काजाम देखील करण्याची तयारी आपण ठेवली पाहिजे असे आवाहन बाबा कांबळे यांनी महाराष्ट्रातील सर्व चालक मालकांना केले आहे,

हशा आणि टाळ्यांच्या गजरात दुमदुमली बालनगरी

पिंपरी, पुणे (दि. ८ जानेवारी २०२४) ‘ढब्बू गोल रिमोट गोल’ हे दोन अंकी बाल नाट्य, सूर्य पृथ्वीवर रागवला तर काय होईल, या संकल्पनेवर आधारीत पपेट शो, बाल कथा अन् धमाल बाल गीतांच्या सादरीकरणाने बालनगरी हशा आणि टाळ्यांच्या गजरात दुमदुमून गेली. सुट्टीचा दिवस असल्याने या सर्व कार्यक्रमांना लहान बालमित्रांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
१०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात यंदा पहिल्यांदाच बालकांसाठी बालनगरी स्वतंत्रपणे उभारण्यात आली. लहान मुलं व पालक वर्गांकडून या बालरंगभूमीला मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली. आज नाट्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी बालनगरी, सुधा करमरकर रंगमंच येथे अखिल भारतीय नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा सहकार्यवाह गौरी लोंढे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून रंगदेवतेची पूजा करण्यात आली. यावेळी १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे आयोजक भाऊसाहेब भोईर, नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे कार्याध्यक्ष राजेशकुमार सांकला, उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, शिरूर शाखेचे अध्यक्ष दीपाली शेळके, रुपाली पाथरे आदि उपस्थित होते.
सकाळी कार्यक्रमाची सुरूवात नृत्यकला अकादमीच्या वतीने गणेश वंदना सादर करून करण्यात आली. त्यानंतर नाट्य संस्कार कला अकादमी, पुणेच्या वतीने ‘ढब्बू गोल रिमोट गोल’ हे दोन अंकी बाल नाट्य सादर करण्यात आले. बालचमुनी हश्या आणि टाळ्यांच्या गजरात या नाटकाला प्रतिसाद दिला. नंतर रंगलेल्या ‘पपेट शो – कुकुडूकू’ याने तर सर्वच बालकांची मने जिंकली. सूर्य पृथ्वीवर रागवला तर काय होईल, या संकल्पनेवर आधारीत हा कार्यक्रम पपेटरी हाऊस मुंबई यांनी सादर केला. यानंतर नाट्य परिषदेच्या तळेगाव शाखेच्या वतीने ‘माझी माय’ हे बाल नाट्य सादर केले. तसेच बाल कथांचा गोष्ट रंग हा कार्यक्रम रंगला. रेनबो अंब्रेला पुणे प्रस्तूत ‘गोष्ट सिम्पल पिल्लाची, ग्रीप्स थिएटर’ हे नाटक सादर केले. तर संध्याकाळच्या वेळी धमाल बालगीतं सादर करण्यात आली.

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकालपत्राचा मसुदा कायदेशीर अभिप्रायासाठी दिल्लीतील तज्ज्ञांकडे

मुंबई-शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांच्या निकालपत्राचा मसुदा कायदेशीर अभिप्रायासाठी दिल्लीतील तज्ज्ञांकडे पाठवल्याची माहिती आहे. तसेच येत्या 10 जानेवारीपर्यंत याप्रकरणी निकाल देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी 10 जानेवारीपर्यंत निकाल जाहीर देणे अनिवार्य असणार आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष 10 जानेवारीपर्यंत वाट न पाहाता, आज किंवा उद्यापर्यंतच निकाल जाहीर करू शकतात अशी शक्यताही राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.

दरम्यान, मुख्यमंत्रीपदी विराजमान असलेले एकनाथ शिंदे आणि त्यांचे 16 आमदार अपात्र ठरतील का? आणि जर ते अपात्र झाले, तर राज्य सरकारचे अस्तित्व संपुष्टात येईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे जर पात्र ठरले तर उद्धव ठाकरे गटातील आमदार अपात्र ठरतील का? किंवा यापेक्षा वेगळा निकाल लागेल का? अशा अनेक शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेत आहेत.

देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच विधानसभा अध्यक्षांना याबाबत निर्णय घ्यायचा आहे. ज्यावेळी शिवसेनेत फूट पडली त्यावेळी राजकीय पक्ष कोणाचा होता? जर त्यादिवशी राजकीय पक्ष एकनाथ शिंदेंचा होता, तर मग राजकीय पक्ष आणि विधीमंडळ पक्ष अशी जी विभागणी सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात केली आहे, त्याचा नेमका अर्थ काय? याचा सारासार विचार करुन अन्वयार्थ लावणारा हा देशाच्या इतिहासातील ऐतिहासिक निवाडा असणार आहे. विधानसभा अध्यक्षांनीही स्वतः अनेकदा हा निवाडा ऐतिहासिक असल्याचे विधान केले आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात रविवारी वर्षा बंगल्यावर चर्चा झाली. दोघांच्या भेटीचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील टीका केली आहे. न्याय देणारा ट्रिब्युनल हाच आरोपीच्या घरी त्याला भेटायला जातो. यावरूनच देशातील न्याय व्यवस्था किती गंभीर अवस्थेला पोहोचली आहे हे लक्षात येते असे राऊतांनी म्हंटले आहे.

अंतःकरणातील परमेश्वर जागा ठेवल्यास कोणतेही आव्हान पेलता येते – अरुण खोरे

पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

पुणे अंतःकरणातील परमेश्वर जागा ठेवला तर लोकशाहीच्या मार्गाने कोणतेही आव्हान पेलू शकतो. विवेकाचा आवाज सोपा नाही. पण, कोणतीही मोठी भीषण सत्ता समोर आली तरी त्याचा मुकाबला केला पाहिजे, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार व राजकीय समीक्षक अरुण खोरे यांनी केले.
पत्रकार दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय मराठी पत्रकार संस्था संलग्न पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघ व पिंपरी चिंचवड डिजीटल मीडियाच्या वतीने वाकड येथे झालेल्या कार्यक्रमातउत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जेष्ठ पत्रकार विवेक इनामदार यांना स्वागताध्यक्ष व माजी महापौर संजोग वाघेरे पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
इनामदार यांचे पत्रकारिता क्षेत्रातील अमूल्य योगदान विचारात घेऊन त्यांना कृतज्ञता निधी म्हणून रोख रक्कम ५१ हजार रुपये, शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच यावेळी नितीन यादव (प्रशासन भूषण), वाल्मिक कुटे (समाज सेवा), एम. ए. हुसेन (रुग्ण सेवा) आणि माधव पाटील (पर्यावरण प्रेमी) यांनाही पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी आमदार उमा खापरे, आयोजक व पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गोरे, शहर अध्यक्ष दादाराव आढाव, डिजिटल मीडिया भीमराव तुरुकमारे, उपाध्यक्ष संतलाल यादव, खजिनदार सुनील उर्फ बाबू कांबळे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडीगेरी, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, ठाकरे गटाचे शहरप्रमुख ॲड. सचिन भोसले, आपचे शहराध्यक्ष चेतन बेंद्रे, युवा सेनेचे चेतन पवार, माजी नगरसेवक विनायक गायकवाड, सुरेश भोईर, राजेंद्र गावडे, मारुती भापकर, रेखा दर्शिले, अश्विनी चिंचवडे तसेच रोमी संधू, संदीप भालके, तानाजी बारणे, वंदना आल्हाट, ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार जाधव, अनिल वडघुले, बेलाजी पात्रे, गणेश हुंबे, संदेश पुजारी, प्रकाश यादव, गणेश यादव, श्रीपाद शिंदे, शबनम सैयद, रेहान सैयद, नवनाथ कापले यावेळी उपस्थित होते.
अरुण खोरे म्हणाले की, सध्या पत्रकारांवर दबावतंत्र वापरले जात आहे. भारतीय पत्रकारितेपुढे मोठे आव्हान आहे. पत्रकारितेचा सत्व परीक्षेचा हा काळ आहे. या परिस्थितीत पत्रकारांनी निर्भय बनण्याची आवश्यकता आहे. पत्रकाराने कष्ट, वाचन, समाजाचे प्रश्न समजून घेतले पाहिजे आणि राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय प्रश्नांची माहिती असली पाहिजे. सरकारची तळी उचलण्याची आवश्यकता नाही. लोकांचा अद्यापही पत्रकारितेवर विश्वास आहे. पत्रकार खरे सांगतील असे लोकांना वाटले पाहिजे.
आमदार उमा खापरे म्हणाल्या की, पत्रकारितेमध्ये महिलांचा सहभाग वाढत आहे ही उल्लेखनीय बाब आहे. राजकारणी लोकांचे काम पत्रकार जनते समोर मांडतात. पत्रकार चुकीच्या घटनाविरोधात लेखणीच्या टोकाने लिहून प्रहार करतात. राजकारणी लोकांच्या डोक्यात हवा गेल्यास त्याला जागेवर आणण्याचे काम पत्रकारितेच्या माध्यमातून होते.
स्वागत अध्यक्ष संजोग वाघेरे पाटील म्हणाले की, पत्रकार वास्तव, सत्य परिस्थिती लोकांसमोर आणत आहेत. पत्रकारांनी निःपक्षपातीपने हे कार्य यापुढेही सुरु ठेवावे. पुरस्काराला उत्तर देताना जेष्ठ पत्रकार विवेक इनामदार म्हणाले की, अरुण खोरे हे माझे पहिले साहेब, गुरू होते आणि गुरूच्या हस्ते पुरस्कार मिळाल्याने विशेष आनंद आहे. पत्रकारिता क्षेत्र आर्थिकदृष्ट्या उदरनिर्वाहाचे साधन नाही, असे असतानाही कुटूंबियांनी साथ दिली. पत्रकारिता करताना विश्वासार्हता निर्माण करणे आवश्यक असते.
प्रास्ताविक करताना बापूसाहेब गोरे म्हणाले, अस्थिर राजकीय वातावरणात पत्रकारिता क्षेत्रावर संकटे येत आहेत. त्यातून मार्ग काढत पत्रकार निःपक्षपातीपने काम करत आहेत. सूत्रसंचालन अक्षय मोरे तर दादा आढाव यांनी आभार मानले. ओम हॉस्पिटलच्या वतीने पत्रकारांना वैद्यकीय प्राथमिक उपचाराचे किट देण्यात आले.
या कार्यक्रमाच्या संयोजनात गणेश शिंदे, सायली कुलकर्णी, संतोष जराड, जितेंद्र गवळी, युनूस खतिब, प्रीतम शहा, कलिंदर शेख, मुकेश जाधव, महेश मंगवडे, संजय बोरा, सुहास आढाव, अल्ताफ शेख, अमोल डंबाळे, विनोद शिंदे, लक्ष्मण रोकडे, प्रसाद बोरसे, माणिक पोळ, यशवंत गायकवाड, श्रीधर जगताप, भारत बांदखेले, राजेंद्र कदम, मुकुंद कदम, शफीक शेख आदींनी परिश्रम घेतले.
सोशल मीडियात स्वतंत्र ओळखीसाठी नाविन्य हवे प्रा. विश्वनाथ गरुड

सोशल मीडियात स्वतंत्र ओळख निर्माण होण्यासाठी कंटेंट मध्ये नाविन्य हवे. सध्या एकतर्फी लेख प्रचंड व्हायरल होतात. हे पत्रकारितेच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. डिजिटल मीडियातील बातमी क्षणार्धात जगात अमर्याद वाचकांपर्यंत पोहोचते. वर्तमानपत्र, वृत्तवाहिनीला मर्यादा आहेत. डिजीटल मीडियाला नोंदणीच्या प्रक्रियेत आणले पाहिजे. या माध्यमातून समाजाचे प्रश्न प्रभावीपणे मांडता येतात. मात्र डिजीटल मीडियातून उत्त्पन्न अतिशय नगण्य आहे.

भजन रामाचे; कृती रावणाची:विरोधकांना नामोहरम करण्यासाठी यंत्रणांचा बेछूट गैरवापर

सामनाच्या अग्रलेखातून ठाकरी प्रहार

भजन रामाचे आणि कृती रावणाची असे म्हणत ठाकरे गटाने मुखपत्रातून भाजपवर निशाणा साधला आहे. तपास यंत्रणांच्या कारवाईवरून ठाकरे गटाने भाजपवर टीका केली आहे. या सगळ्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणांची प्रतिष्ठा धुळीस मिळाली आहे व ईडी-सीबीआयचे महत्त्व कमी झाले आहे, असे ठाकरे गटाने म्हंटले आहे.”देशासाठी, लोकशाही वाचविण्यासाठी लोक तुरुंगात जायला तयार आहेत. केजरीवाल, सोरेन यांनी निर्भय होऊन हुकूमशाही विरुद्ध लढण्याचे ठरवले आहे. महाराष्ट्रात रोहित पवार यांनी ही काही झाले तरी शरण जाणार नाही असा अस्सल मराठी बाणा दाखवला आहे. ईव्हीएमविरोधात लोक रस्त्यावर उतरले आहेत व ‘ईडी’ ची डोकी फुटली आहेत . तरीही जनता लढायला तयार आहे. संपूर्ण देशात संतापाचा लाव्हा उसळतो तेव्हा हुकूमशहांना देशातून पळून जावे लागते असे जगाचा इतिहास सांगतो. इतिहासाची पुनरावृत्ती होताना दिसत आहे”, असा हल्लाबोल ठाकरे गटाने केला आहे.

आडात नाही, तर पोहऱ्यात कोठून येणार?
”सत्यवचनी प्रभू श्रीराम मोदी-शहांच्या सरकारला सुबुद्धी देतील असे वाटले होते, पण ‘आडात नाही, तर पोहऱ्यात कोठून येणार?’ या उक्तीप्रमाणे सध्या या सरकारचा कारभार चालला आहे. भजन रामाचे व कृती रावणाची हेच मोदी-शहा सरकारचे उद्योग सुरू आहेत. विरोधकांना नामोहरम करायचे व त्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा बेछूट गैरवापर करायचा हाच या सरकारचा उद्योग. रावण आणि कंसमामाने त्यांच्या विरोधकांना म्हणजे देव मंडळास बंदी बनवले होते. तरीही शेवटी या दोन्ही राक्षसांचा पराभव झालाच”, असे भाष्यही ठाकरे गटाने केले आहे.

”शेवटी राम-कृष्णाचाच विजय झाला. त्यामुळे कलियुगात ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, पोलिस बळाचा वापर केला तरी जय सत्याचा होईल. रोहित पवार यांच्या कंपन्यांवर शुक्रवारी ईडीने छापे टाकले. रोहित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे तरुण नेते आहेत व भाजपच्या चोर बाजारात सामील होण्याचे त्यांनी टाळले, दबाव मानला नाही. अलीकडेच त्यांनी एक युवा संघर्ष यात्रा काढली. लोकांचा त्यांना पाठिंबा मिळाला. अजित पवार वगैरे लोकांनी घेतलेल्या डरपोक भूमिकेविरुद्ध ते परखडपणे बोलत आहेत. त्यामुळे ‘ईडी’चे संकट त्यांच्यावर कोसळणारच होते. ते शेवटी कोसळलेच”, अशी भूमिका ठाकरे गटाने मांडली आहे.

”राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची याबाबतची प्रतिक्रिया मनोरंजक व राजकीय विश्लेषकांनी अभ्यास करावी अशी आहे. श्री. फडणवीस म्हणतात, ”रोहित पवारांवर छापा पडला की नाही हे माहीत नाही. मात्र पवार हे व्यावसायिक असून व्यवसायात असे प्रकार होत असतात. त्यांनी काहीच केले नसेल तर घाबरण्याचे कारण नाही.” फडणवीस यांचा हा खुलासा म्हणजे शहाजोगपणाचा उत्तम नमुना आहे. अजित पवार, हसन मुश्रीफ, प्रफुल्ल पटेल वगैरे मंडळी व्यवसायात आहेत व त्यांच्या व्यवसायाचे रहस्य ईडीनेच उघड केले. ईडीने त्यांचे नरडे आवळताच या लोकांनी बेडकाप्रमाणे उडय़ा मारून भाजपचा आश्रय घेतला”, अशी टीका ठाकरे गटाने केली आहे.

न्याय देणारा ट्रिब्युनलच आरोपीच्या भेटीला:देशाची न्याय व्यवस्था गंभीर अवस्थेला, राऊतांचा विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांवर घणाघात

मुंबई-न्याय देणारा ट्रिब्युनल हाच आरोपीच्या घरी त्याला भेटायला जातो असे म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर टीका केली आहे. तसेच यावरूनच देशातील न्याय व्यवस्था किती गंभीर अवस्थेला पोहोचली आहे हे लक्षात येते असा निशाणही संजय राऊत यांनी साधला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावरूनच राऊतांनी टीकास्त्र डागले आहे.

राऊत म्हणाले, ”राहुल नार्वेकर अचानक आजारी पडतात. त्यानंतर प्रकृती बरी झाल्यावर ते लगेच मुख्यमंत्री शिंदेंना भेटायला जातात यावरूनच देशाच्या न्याय व्यवस्थेची गंभीर अवस्था लक्षात येते. ज्या व्यक्तीवर न्याय करण्याची जबाबदारी आहे तोच व्यक्ती अशा प्रकारे आरोपीच्या घरी जातो, चहापान करून हसत हसत बाहेर पडतो. यामुळेच आम्ही संविधान धोक्यात आहे असे म्हणत असतो”, असे संजय राऊतांनी म्हंटले आहे.यावेळी संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर पलटवार केला आहे. ‘2024 नंतर नाटके, एकांकिका करणे हेच फडणवीसांचे काम असणार आहे. या राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या गळ्यात दिल्लीच्या गुलामीचा पट्टा असून तो महाराष्ट्राला वेदना देणारा आहे. तसेच दिल्ली या पट्ट्याला खेळवते”, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे. 2019 ला प्रयोग झाला तर कट्यार पाठीत घुसली आता आम्ही 2021 ला प्रयोग केला असे म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांना नाव न घेता टोला लगावला होता. यावर संजय राऊत बोलत होते.

पुढे वंचितबाबत बोलतांना संजय राऊत म्हणाले, वंचित हा मविआतील महत्वाचा घटक आहे. अकोल्याची जागा ही परंपरेने प्रकाश आंबेडकर लढत होते. यापुढेही त्यांनीच ती लढावी अशी आमची भूमिका आहे, असे संजय राऊतांनी स्पष्ट केले. तसेच वंचितला मविआमध्ये सामील करून घेण्यासाठी चर्चा सुरू असून सन्मानाने वंचितला सामील करून घेणार असा पुनरुच्चार देखील राऊतांनी केला आहे.

तसेच काँग्रेसचे हायकमांड हे दिल्लीत असल्याने महाराष्ट्रातील नेत्यांची गैरसोय होऊ नये म्हणून दिल्लीला चर्चा सुरू आहे असे राऊतांनी म्हंटले. यावेळी त्यांनी शिंदे आणि अजित पवार गटावर निशाणा साधत शिंदे गट आणि अजित पवार गटाचे हायकमांड हे अमित शहा आणि दिल्ली आहे असे विधान केले आहे. मात्र आमचे तसे काही नाही. आम्ही मुंबईतच होतो आणि राहणार असा टोलाही राऊतांनी लगावला आहे.

एटीएसने पकडले 6 आरोपी:तीन बंदुकांसह 36 जिवंत काडतुसेही जप्त

मुंबई-बोरिवलीतील ‘एलोरा’ खासगी गेस्टहाऊसमध्ये लपून बसलेल्या ६ संशयितांना पथकाने अटक केली. त्यांच्याकडून ३ बंदुका, ३६ जिवंत काडतुसे व कार जप्त करण्यात आली. सर्व आरोपी दिल्ली व उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत. लूटमार व घातपाताच्या उद्देशाने ते मुंबईत आल्याचा एटीएसला संशय आहे.

आरोपींकडून जप्त केलेली स्कॉर्पिओ कार आदिल खान उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथून घेऊन आला होता. एक सराफा दुकान लुटण्यासाठी हे आराेपी एकत्र आले हाेते, असे त्यांनी चाैकशीत सांगितले. मात्र, त्यांचा घातपाताचा कट हाेता का, याची चौकशी एटीएसकडून केली जात आहे.

१. शहादत हुसेन ऊर्फ कल्लू रहमत हुसेन (रा. जामा मशीद परिसर दिल्ली) – खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी. शिक्षा भोगून नुकताच तुरुंगातून बाहेर आला. २. असलम शब्बीर अली खान (रा. दिल्ली) – खून व चोरी प्रकरणात अटक झाली होती. ३. नदीम माेहंमद (रा. जामा मशीद परिसर दिल्ली)- दिल्लीत अनेक गुन्हे दाखल. ४. नौशाद अनवर (रा. बुलंद शहर, उत्तर प्रदेश) – रेकीसाठी आल्याचा संशय. ५. आदिल खान (रा. गाझियाबाद, यूपी). ६. रिझवान लतीफ

खालापूर टोलनाक्यावर अचानक उतरले राज ठाकरे:अँम्बुलन्सला मोकळा करून दिला रस्ता, ठाकरी शैलीत अधिकाऱ्यांना दिली तंबी

पिंपरी चिचंवड येथील शंभरावा अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचा कार्यक्रम आटोपून मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईच्या दिशेने जात असताना अचानक खालापूर टोलनाक्याजवळ उतरले. यावेळी वाहतूक कोंडीत अडकलेल्या अँम्बुलन्सला त्यांनी रस्ता मोकळा करुन दिला. तसेच टोलनाक्यावर उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना ठाकरे शैलीत दम दिल्याचे दिसून आले. राज ठाकरे यांचा टोलनाक्यावरील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर समोर आला आहे.

नेमके प्रकरण काय?
पिंपरी चिचंवड येथील शंभरावा अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचा कार्यक्रम आटोपून मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईच्या दिशेने निघाले होते. यावेळी खालापूर टोलनाक्यावर हजारोंच्या संख्येने पाच किलोमीटरच्या रांगेत वाहने ट्रॅफीकमध्ये अडकली होती. यामध्ये एक रुग्णवाहिकाही अडकली होती. त्यामुळे लोकांची होत असलेली गैरसोय बघून स्वतः राज ठाकरे अचानक टोलनाक्यावर गेले आणि त्यांनी अडकलेल्या अँम्बुलन्सला रस्ता मोकळा करुन दिला. याशिवाय तासंतास खोळंबलेली वाहतूक त्यांनी क्षणात मोकळी केली. तसेच टोलनाक्यावर उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांचाही राज ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला.

राज ठाकरे यांची अधिकाऱ्यांना तंबी
यावेळी अधिकाऱ्यांना दम देताना “यापुढे मला असला प्रकार दिसला तर याद राखा,” असे म्हणत राज ठाकरे यांनी टोलनाक्यावरील अधिकाऱ्याला बजावले. दरम्यान, त्यांनी पुढाकार घेऊन टोलनाक्यावरील वाहने सोडल्याने वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला.

टोलविरोधात राज्यभर आंदोलन
मनसेने याआधी देखील टोलविरोधात राज्यभर आंदोलन केली होती. अशातच आता ट्रॅफिक जाम पाहिल्यानंतर राज ठाकरे यांनी स्वत: हातात घेतली आणि गाड्या सोडून दिल्या. राज ठाकरे स्वत: उतरल्याचे पाहताच कॉन्ट्रॅक्टरची तारंबळ उडाली होती. मनसेचे पदाधिकारी देखील त्यावेळी उपस्थित होते. तब्बल 5 किलोमीटर झालेल्या वाहतुक कोंडीमुळे राज ठाकरे संतापल्याचे पहायला मिळाले.

विविध क्षेत्रातील मान्यवरांचां शहर भाजपच्या एरंडवण्यातील डीपी रस्त्यावरील नूतन कार्यालयाला भेट देऊन शुभेच्छांचा वर्षाव

पुणे : पुणे शहर भाजपचे पुणे महानगरपालिका परिसरातील मध्यवर्ती कार्यालय नवीन वास्तुत स्थलांतरित करण्याच्या निमित्ताने स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, प्रदेश भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी कार्यालयाला सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या. सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक राजकीय सहकार क्षेत्रातील मान्यवरांनी भेट दिली. भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी स्वागत केले.

सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि पुणे शहराचा गतिमान पारदर्शक विकास करण्यासाठी या कार्यालयाच्या माध्यमातून अविरत प्रयत्न केले जातील असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यालयाला भेट देऊन शुभेच्छा दिल्या. कार्यकर्त्यांच्या माध्यमातून घरोघरी संपर्क साधण्याबरोबर माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून नागरिकांपर्यंत पोहोचून संघटनात्मक कार्य बळकट करण्यावर भर दिला जाईल.

आगामी काळातील निवडणुकांचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी आणि भारतीय जनता पार्टीचा विचार प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचविण्यासाठी या कार्यालयाच्या माध्यमातून कार्यकर्ते नियोजन करतील असे मत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.लोकसभा विधानसभा आणि महापालिकेच्या निवडणुकांमध्ये पुणेकरांनी भारतीय जनता पार्टीवर विश्वास व्यक्त केला होता. हा विश्वास शहर भाजपने सार्थ ठरविला असून, आगामी काळात तो दृढ करण्यासाठी सर्व कार्यकर्ते एकजुटीने प्रयत्न करतील असे मत शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी व्यक्त केले.

जनसंघापासून भाजपच्या आजवरच्या ज्येष्ठ आणि नव्या कार्यकर्त्यांनी आठवणींना उजाळा देत गप्पा रंगवल्या.मंत्री चंद्रकांतदादा पाटील,योगेश गोगावले, संदीप खर्डेकरआमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, लोकसभा मतदार संघ संयोजक श्रीनाथ भिमाले,माजी महापौर मुरलीधर मोहोळ,जगदीश मुळीक यांची प्रमुख उपस्थिती होती.या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण, श्रीकांत शिरोळे, प्रदीप गारटकर, मनसेचे अजय शिंदे यांच्या सह सर्व पक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते

कर्जतमध्ये १०० खाटांचे हॉस्पिटल उभारणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

रायगड – कर्जत तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्याबरोबरच कर्जतमध्ये 100 खाटांचे हॉस्पिटल लवकरच उभारण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

कर्जत तालुक्यातील आमदार महेंद्र थोरवे यांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या विविध विकास कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले.

यावेळी खा. श्रीरंग बारणे, आ. महेंद्र थोरवे,आ. भरत गोगावले, आ. महेंद्र दळवी, आ. सदा सरवणकर आदी उपस्थित होते.

कर्जत शहरात उभारलेल्या प्रवेशद्वाराला महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांचे नाव देण्यात आलेल्या स्वागत कमानीचे उद्घाटन आणि उल्हास नदीकिनारी प्रति पंढरपूर – आळंदी करण्यात आली असून याठिकाणी विठ्ठलाची 52 फूट उंच मूर्तीचे लोकार्पण,   दहिवली चौक येथे धर्मवीर संभाजी महाराज स्मारक, जिजामाता उद्यानातील शिवसृष्टीचे तसेच कर्जत शहरातील 14 कोटी रुपये खर्चाच्या प्रशासकीय भवनाचे  लोकार्पण,भजनसम्राट गजाननबुवा पाटील सभागृहाचे भूमिपूजन  तसेच 90 कोटी रुपये खर्चाच्या  कर्जत – चौक काँक्रीट रस्ता, 140 कोटी खर्चाच्या खोपोली येथील मलनिःस्सारण प्रकल्प  येथे भुयारी गटार,खालापूर येथे ग्रामीण रुग्णालयाचे माथेरान येथील 47 कोटी खर्चाच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाचे आणि माथेरान डोंगरातील किरवली ते जुम्मा पट्टी येथील बारा आदिवासी वाड्या यांना जोडणाऱ्या 18 कोटी खर्चाच्या ररस्त्याचे ऑनलाईन पद्धतीने भूमिपूजन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले, हे शासन सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी कार्य करत आहे. शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला, युवक यांच्यासाठी विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. ‘शासन आपल्या दारी’च्या माध्यमातून 2 कोटी 19 लाख लाभार्थ्यांना विविध योजनांचे लाभ देण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. अटल सेतूमुळे रायगड आणि मुंबई यातील अंतर कमी होणार आहे. कर्जतवासियांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगून मुख्यमंत्री महोदयांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी 5 कोटी, कर्जत नळ पाणीपुरवठा योजनेस मान्यता तसेच पेण अर्बन बँक प्रश्न सोडविण्यासाठी लक्ष देण्यात येईल असे सांगितले.

कार्यकर्त्यांच्या बळावर आगामी निवडणुकांचे युध्द आपल्याला जिंकायचे आहे – अजित पवार

मुंबई शहरावर लक्ष केंद्रित केले तर परिस्थिती आपल्या बाजूने येऊ शकते – प्रफुल पटेल

येत्या निवडणुकीत तिप्पट नगरसेवक असतील अशी ताकद समीरभाऊ तुमच्या नेतृत्वाखाली पक्षात उभी राहिली आहे – सुनिल तटकरे

राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेतल्याने जबाबदारी वाढली आहे; उडान तय करेगी आसमान किसका है – छगन भुजबळ

मुंबईत लोकसभा, विधानसभा आणि महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस वर्चस्व दाखवेल – समीर भुजबळ

मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या संवाद मेळाव्याला षण्मुखानंद सभागृहात प्रचंड प्रतिसाद…

मुंबई दि. ७ जानेवारी – कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असतो आणि या कार्यकर्त्यांच्या बळावर आगामी निवडणुकांचे युध्द आपल्याला जिंकायचे आहे असा जबरदस्त विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी षण्मुखानंद सभागृहात झालेल्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात व्यक्त केला.

मुंबईमध्ये पक्ष ज्यापध्दतीने वाढायला हवा होता. तशाप्रकारचा पोचला नाही. आमचं लक्ष फक्त ग्रामीण भागाकडे राहिले. आता समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत जे काम सुरू आहे त्यातून आपल्याला नक्कीच बळ मिळेल असेही अजितदादा पवार म्हणाले.

आता आपल्याला वेळ कमी आहे. सुरुवात चांगली झाली आहे त्यामध्ये सातत्य ठेवा. काम करताना खटका उडत असतो मात्र तो समजून घेऊन काम करा. ज्याला पद देत आहात किंवा देणार आहात त्यांची प्रतिमा त्याच्या विभागात चांगली आहे का याचाही विचार करा असेही अजितदादा पवार यांनी स्पष्ट केले.

आठवडयातील एक दिवस आपल्या आमदारांना वेळ द्यायला सांगेन. कार्यकर्ते कामाला लागले की काय होते हे आज दिसले. शिवसेना फक्त मुंबईत होती त्यानंतर ती कोकणात पोचली. आपल्यातही ती जिद्द आहे आपणही तसे काम सुरू करु. मला सांग सकाळी मुंबईतील वेगवेगळ्या भागात येतो. लोकहिताच्या कामांची पाहणी करतो. या मुंबापुरीला एक रुपयाचा निधी कमी पडू देणार नाही असा शब्दही अजितदादा पवार यांनी दिला.

धारावीतील टेंडरमुळे एका उद्योगपतीला फायदा होणार आहे अशी बोंब मारली जात आहे. त्याच्या खोलात जाऊन माहिती घेऊ. जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडली पाहिजे. प्रश्न सोडविण्याची ताकद आणि धमक आपल्यात आहे. काहीजण आज करतो उद्या करतो सांगत असतात अरे काय देवळातील घंटा आहे का ती असा टोलाही अजितदादा पवार यांनी लगावला.

महायुतीच्या माध्यमातून सरकार राज्यात काम करत आहेत. मुंबईत विधानसभा, लोकसभा आणि महानगरपालिकेत योग्य ती आणि म्हणावी अशी संख्या गाठू शकलो नाही. आपल्या वॉर्डात निवडणूक लढणार्‍या व्यक्तीच्या पाठीशी ताकद उभी करायला हवी असेही मत अजितदादा पवार यांनी मांडले.

अल्पसंख्याक, ओबीसी, मागासवर्गीय या समाजांना निधीची कमतरता भासू दिली नाही. आपण वंचित व बहुजनांकरता काम करत आहोत हेही आवर्जून अजितदादा पवार यांनी सांगितले.

चांद्यापासून बांद्यापर्यंत जास्तीत जास्त जागा निवडून कशा येतील असा प्रयत्न करायचा आहे. हे राज्य माझे आहे, सर्वसामान्य लोकांचे सरकार आहे हा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस जनतेला काम करताना देत आहे असेही अजितदादा पवार यांनी स्पष्ट केले.

समीरभाऊंच्या पाठीशी उभे राहून एकदिलाने काम केले तर पक्षाची ताकद मुंबईत उभी राहिल. एक एक पायरी म्हणजे कार्यकर्ता असतो. तो नेत्याला जोडणारा दुवा असतो. सर्व जाती धर्माच्या लोकांचा आपण आदर करतो. सर्व सणांमध्ये सहभागी होतो. हे वातावरण निर्माण करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने पुढे आले पाहिजे. सत्तेकरता आम्ही सत्तेत गेलो नाही. सर्व सामान्य लोकांची कामे व्हायला हवी त्याकरता निर्णय घेतला. विरोधाला विरोध करायचा, मोर्चे काढायचे, यातून प्रश्न सुटणार आहे का? असा सवालही अजितदादा पवार यांनी विरोधकांना केला.

स्वतः ची प्रसिद्धी करण्यासाठी मी काम करत नाही किंवा सोशल मिडियावर पोस्ट करत नाही. पहाटे उठून लोकांची कामे कशी होतील असा माझा प्रयत्न असतो असेही काहींचे नाव घेता टोला अजितदादा पवार यांनी लगावला.

मुंबईत २४ वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस वाढली नाही त्याच्या कितीतरी पटीने समीरभाऊच्या नेतृत्वाखाली वाढेल त्यासाठी सरकारची ताकद उभी करु. आम्ही तुमच्यासोबत आहोत असा शब्दही अजितदादा पवार यांनी दिला.

मुंबई शहरावर लक्ष केंद्रित केले तर परिस्थिती आपल्या बाजूने येऊ शकते – प्रफुल पटेल

तुमच्यासोबत आम्ही आहोतच. मात्र मुंबई शहरावर लक्ष केंद्रित केले तर परिस्थिती आपल्या बाजूने येऊ शकते असा विश्वास राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांनी व्यक्त केला.

या षण्मुखानंद सभागृहाचे आणि पक्षाचे एक वेगळे नाते आहे. इथल्या बैठकीत अजितदादा पवार यांनी एल्गार पुकारला होता. त्यावेळी उत्स्फूर्त प्रतिसाद अजितदादा पवार यांना राज्यातून मिळाला होता. राज्यातील प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी अजितदादा पवार यांच्या पाठीशी आहे हे सिध्द झाले आहे असेही प्रफुल पटेल म्हणाले.

१९९१ मध्ये अजितदादा आणि मी एकत्र लोकसभेत होतो हे सांगतानाच अजितदादा पवार यांनी पक्षाची ताकद वाढवण्याचे काम केले हे स्पष्टपणेच प्रफुल पटेल यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईकडे लक्ष कमी राहिले आहे. वारंवार कॉंग्रेसच्या सोबत राहिलो त्यामुळे कमी जागा लढवायचो. पसंतीच्या जागा कधीच मिळत नव्हत्या. राष्ट्रवादी काँग्रेस पवारसाहेबांनी ग्रामीण भागात वाढवली आहे. आता शहराकडे अजितदादा पवार यांनी लक्ष घातले आहे. त्यांनी शहराकडे लक्ष घातले असल्याने त्यादृष्टीने काम करायचे आहे. समीरभाऊ यांनी काम सुरू केले आहे त्यामुळे आज आज खरी लोकं सभागृहात दिसत आहेत असेही प्रफुल पटेल म्हणाले.

येत्या निवडणुकीत तिप्पट नगरसेवक असतील अशी ताकद समीरभाऊ तुमच्या नेतृत्वाखाली पक्षात उभी राहिली आहे – सुनिल तटकरे

समीरभाऊ ज्यापध्दतीने तुम्ही या मुंबई शहरात काम करत आहात ते लक्षात घेता आता जेवढे नगरसेवक आहेत त्यापेक्षा तिप्पट नगरसेवक पुढच्या निवडणुकीत असतील अशी ताकद उभी राहिली असल्याचे मत प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले.

धर्मनिरपेक्ष विचारापासून फारकत न घेता राज्याच्या विकासासाठी आम्ही निर्णय घेतला. राजकीय विचारधारा घेऊन गतीमान भूमिका घेऊन काम करत आहोत.सरकारच्या माध्यमातून जनकल्याण योजना राबवल्या जात आहेत. महायुतीच्या सरकारमध्ये अल्पसंख्याक समाजाची सोडवणूक केली आहे. अल्पसंख्याक समाजाच्याहिताची सोडवणूक दादा तुम्ही निधी देऊन केली आहे हेही आवर्जून सुनिल तटकरे यांनी सांगितले.

महिलांचे चौथे धोरण सरकारने जाहीर केले आहे. नवी पहाट, नवी सकाळ महिलांच्या आयुष्य आत पहायला मिळणार आहे असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसची पदे घेण्यासाठी स्पर्धा होते याचा अर्थ पक्षाची ताकद वाढत आहे हेही समीर भुजबळ यांच्या निदर्शनास आणून दिले.

जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला त्यावेळी जो पक्षाचा स्ट्राईक रेट होता त्यापेक्षा अधिक स्ट्राईक रेट अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचा तयार होईल असा विश्वासही सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेतल्याने जबाबदारी वाढली आहे; उडान तय करेगी आसमान किसका है – छगन भुजबळ

आता राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेतला आहे त्यामुळे जबाबदारी वाढली आहे. न्यायालयात आपल्याच बाजूने निकाल लागेल असा विश्वास व्यक्त करतानाच एक तरी खासदार आपल्याला मिळाला पाहिजे ती जबाबदारी आपण घेतली आहे ती घेऊन लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

रात नही ख्वाब बदलता है, मंजिल तो वही रहती सिर्फ कारवा बदलता है… किस्मत बदले या ना बदले वक्त जरुर बदलता है… अशी शायरीतून छगन भुजबळ यांनी कार्यकर्त्यांना साद घातली.

एकमेकांचे पाय खेचू नका. खेकडयासारखे वागू नका एकमेकांना साथ द्या. एकजूट होऊन काम केले तर यश निश्चित तुमचे आहे. शाहू – फुले – आंबेडकर यांची विचारधारा आम्ही बदलली नाही. अजितदादा पवार आणि आम्ही सर्व घटकांना सोबत घेऊन काम करत असल्याचे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.

भविष्यात नगरसेवक, आमदार निवडून आणायचे आहेत. घरी बसला आणि मोबाईलवर मेसेज पाठवून उपयोग नाही. ‘लोकांना लढणारी माणसे आवडतात रडणारी नाही’ तुम्ही लढा द्याल तेव्हा लोक तुमच्या सोबत येतील असेही छगन भुजबळ यांनी सांगितले.

ओबीसीला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या हे मी बोललो आणि सगळे नेते तेच बोलत आहेत फक्त मी जास्तीचे आणि समाजाला समजेल असे बोलत आहे. तुम्ही ओबीसींमधील आरक्षण कशाला मागताय. तुम्हाला दिले होते ना… ते टिकले नाही मात्र त्यावेळी असलेल्या त्रुटी दूर केल्या जात आहेत. राजकारण कोण करत असेल तर पंचायत होईल असे समजवताना गोरगरीब मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. मी आज लढतोय का?… मंडल आयोगासाठी लढलो ना…पवारसाहेबांसोबत लढलो. कुणाच्या हक्कावर गदा येणार नाही असे काम आपल्याला करायचे आहे असेही छगन भुजबळ म्हणाले.

लोकांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करत आहोत. कुणाच्या दादागिरीकडे लक्ष देऊ नका… उडान तय करेगी आसमान किसका है…अशा शब्दात पक्षाचा इरादा छगन भुजबळ यांनी स्पष्ट केला.

मुंबईत लोकसभा, विधानसभा आणि महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस वर्चस्व दाखवेल – समीर भुजबळ

हे वर्ष निवडणुकीचे असून मुंबईत पक्षाची ताकद वाढली आहे. राष्ट्रवादीला एक लोकसभा दिली तर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही अशी ग्वाही देतानाच मुंबईतील १५ विधानसभा मतदारसंघात आमदार आणि महानगरपालिकेत ७५ जागा निवडून आणू असा शब्दही मुंबई विभागीय अध्यक्ष समीर भुजबळ यांनी पक्षाला दिला.

मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात कार्यकर्ता संवाद मेळावा घेऊन आम्ही पक्षाच्या नेत्यांना दिलेला शब्द पंधरा दिवसात पूर्ण केला आहे असेही समीर भुजबळ यांनी स्पष्ट केले.

पक्षाने कमिट्या, महामंडळावर कार्यकर्त्यांना संधी दिली तर अजून पक्षवाढीला चालना मिळेल असेही समीर भुजबळ यावेळी म्हणाले.

यावेळी युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, महिला कार्याध्यक्षा आरती साळवी, मनिषा तुपे, कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, शिवाजीराव नलावडे यांनी आपले विचार मांडले.

युवक अध्यक्ष सुनिल गिरी यांच्या युथ विंग वेबसाईटचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले.

दुपारी कल्याण येथे भव्य कार्यकर्ता मेळावा झाल्यानंतर मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसचा भव्य संवाद मेळावा पार पडला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवक अध्यक्ष सुनिल गिरी यांनी केले तर सुत्रसंचालन प्रमोद पाटील यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, मुंबई विभागीय अध्यक्ष समीर भुजबळ, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, माजी आमदार पंकज भुजबळ, कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, शिवाजीराव नलावडे, महिला कार्याध्यक्षा आरती साळवी, मनिषा तुपे, युवक अध्यक्ष सुनिल गिरी, आदींसह पक्षाचे सहा जिल्हाध्यक्ष, सर्व तालुकाध्यक्ष आणि कार्यकर्ते व पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.