Home Blog Page 125

शरिराला आवश्यक चांगल्या जीवनसत्त्वासाठी मुलांनी नाचणीचे पदार्थ खावेत!

ना. चंद्रकांतदादा पाटील यांचा विद्यार्थ्यांना कानमंत्र

सेवा पंधरवड्याअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना नाचणी बिस्किट वाटप उपक्रमाचा शुभारंभ

पुणे-मुलांना लहान वयात चांगली जीवनसत्त्व मिळणं आवश्यक असून, देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी अतिशय आग्रही आहेत. त्यामुळे मुलांनी देखील आपल्या घरी नाचणीचे पदार्थासाठी आग्रह धरावा, असा कानमंत्र ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी दिला. तसेच, कोथरुड मतदारसंघातील मुलांमध्ये पौष्टिक आहाराची गोडी लागावी यासाठी २२००० विद्यार्थ्यांना आठवड्यातून किमान एक दिवस नाचणीची बिस्किटे उपलब्ध करुन देण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात सेवा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. त्याअंतर्गत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून कोथरुड मतदारसंघातील शालेय विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार मिळावा; यासाठी नाचणीची बिस्किटे उपलब्ध करुन देण्यात आली असून, या उपक्रमाचा शुभारंभ आज बाणेर मधील कै. बाबुराव बालवडकर प्राथमिक विद्यालयात झाला. यावेळी ना. पाटील यांनी विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधला.

ना. पाटील म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीला लहान वयात योग्य पोषक आणि पौष्टिक आहार मिळणे आवश्यक असते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील मुलांना लहान वयात चांगली जीवनसत्त्वे मिळावीत यासाठी सदैव आग्रही असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी देखील फास्ट फूड ऐवजी पौष्टिक आहारासाठी पालकांकडे आग्रह धरला पाहिजे. जेणेकरून चांगली जीवनसत्त्वे मिळून शारिरिक विकासासाठी मदत मिळेल.

या कार्यक्रमाला शाळेच्या शिक्षिका सुजाता वाघमारे, कल्पना बाबर, सुकेशनी मोरे, शोभा घोरपडे, भाजप कोथरुड उत्तर मंडल अध्यक्ष लहू बालवडकर, माजी नगरसेवक अमोल बालवडकर, माजी नगरसेविका ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, भाजप नेते गणेश कळमकर, माजी अध्यक्ष सचिन पाषाणकर, भाजप नेते प्रकाशतात्या बालवडकर, राहुल कोकाटे, सरचिटणीस मोरेश्वर बालवडकर, सचिन दळवी, अस्मिता करंदीकर, अनिकेत चांधेरे, वैदेही बापट, मृणाल गायकवाड, स्मृती जैन, निकीता माथाडे, जागृती विचारे, स्नेहल सुतार यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

मदुराईच्या प्रसिद्ध मीनाक्षी मंदिराचे वैभव प्रथमच पुण्यात!

यंदाच्या नवरात्राचे खास आकर्षण: एक एकर जागेवर साकारतेय हुबेहूब प्रतिकृती

  • शिवदर्शनमधील श्री लक्ष्मीमाता मंदिराच्या प्रांगणात ७० फूट उंचीचे आकर्षक गोपुर

पुणे – दक्षिण भारतातील तामिळनाडू राज्यातील मदुराई येथे १६व्या शतकात उभारलेले ऐतिहासिक आणि स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेले मीनाक्षी मंदिर यंदा पुणेकरांना पुण्यातच अनुभवण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. पुण्यातील शिवदर्शन, सहकारनगर येथील प्रसिद्ध जागृत श्री लक्ष्मीमाता मंदिराच्या प्रांगणात सुमारे एक एकर जागेवर मदुराईच्या मंदिराची हुबेहूब प्रतिकृती साकारण्यात येत असल्याची माहिती पुणे नवरात्रौ महोत्सव समितीचे अध्यक्ष व माजी उपमहापौर श्री. आबा बागुल आणि श्री लक्ष्मीमाता मंदिर समितीचे उत्सवप्रमुख श्री. हेमंत बागुल यांनी दिली.

ते म्हणाले कि, या देखाव्यात ७० फूट उंचीचे भव्य गोपुर, तसेच मीनाक्षी मंदिरातील पौराणिक कथा, देवता, संत आणि विद्वान यांच्या शिल्पांची नक्षी, विविध मंडपांतील खांबावरील सुसंस्कृत शिल्पकाम, रंगीबेरंगी चित्रकला आणि वास्तुशैलीचे विविध पैलू पुणेकरांना पाहावयास मिळणार आहेत. संपूर्ण देखावा मुंबईतील प्रसिद्ध कला दिग्दर्शक श्री. अमन विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली तयार होत असून, त्यात मीनाक्षी मातेसह मंदिरातील कलात्मक घटकांचे तपशीलवार सादरीकरण आहे.

यंदाच्या शारदीय नवरात्रोत्सवात हा देखावा विशेष आकर्षण ठरणार आहे. सुबक व मनमोहक अशा या स्थापत्यशैलीतून पुणेकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा अनुभव मिळणार आहे.पुणे नवरात्रौ महोत्सव समिती गेली ३१ वर्षे सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहाने आयोजित करत आहे. दरवर्षी मंदिर परिसर आकर्षक सजावटीने नटलेला असतो; परंतु यंदाचा देखावा भव्यतेने आणि कलात्मकतेने विशेष ठरणार असल्याचा विश्वास आबा बागुल यांनी व्यक्त केला. नवरात्रोत्सवाच्या काळात भक्तांसाठी हे मंदिर दर्शन आणि स्थापत्यकलेचा अनुपम अनुभव ठरणार असून पुणेकरांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन हेमंत बागुल यांनी केले आहे.

अनुसुचित जाती कल्याण समितीच्या हस्ते विद्युत सहाय्यकांना नियुक्तीपत्रे

महावितरणच्या तत्परतेचे समिती प्रमुख आ. नारायण कुचे यांनी केले कौतुक

पुणे : विद्युत सहायकपदी निवड झालेल्या उमेदवारांना महावितरणने अनुसुचित जाती कल्याण समितीचे प्रमुख तथा आमदार नारायण कुचे व समितीच्या इतर सदस्यांच्या उपस्थित नियुक्तीपत्रे देण्यात आली. शुक्रवारी (दि.१९) पुणे मनपा सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ५६ मागासवर्गिय उमेदवारांना समितीच्या हस्ते नियुक्ती आदेश देण्यात आले असून, महावितरणने निर्देशाचे तातडीने पालन केल्याबद्दल समितीने महावितरणचे कौतुक केले आहे.

यावेळी मार्गदर्शन करताना समितीप्रमुख आ. नारायण कुचे म्हणाले, गुरुवारी आम्ही महावितरणला सूचना केली की, नविन भरती प्रक्रियेतील उमेदवारांना तातडीने नियुक्त्या द्या आणि २४ तासांत महावितरणनेही तत्परतेने सर्व उमेदवारांना नियुक्त्या दिल्या. पुणे परिमंडलात निवड झालेल्या २८१ उमेदवारांपैकी ५६ उमेदवार अनुसुचित जातीचे आहेत हे म्हत्वाचे. ही सर्व सामान्य कुटुंबातील मुले-मुली आहेत. या मुलांनी आता संधीचे सोने करावे असे आवाहन उमेदवारांना करताना महावितरणप्रमाणे इतर विभागांनीही अशीच तत्परता दाखवली पाहिजे असे त्यांनी सांगितले. तर समिती सदस्य तथा विधानपरिषद सदस्य अमित गोरखे यांनीही महावितरणच्या तत्परतेचे कौतुक केले. ते म्हणाले, ही समिती अनुसुचित जातींसह मागासवर्गीयांवर होणारे अन्याय दूर करण्याचे काम करत आहे.

महाराष्ट्र विधानसभा मंडळाने नियुक्त केलेली अनुसुचित जाती कल्याण समिती १८ ते २० सप्टेंबर अशी तीन दिवसीय पुणे दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात शासनाच्या विविध विभागांकडून अनुसुचित जातींसाठी राबविलेल्या योजनांचा व नोकरभरतीचा आढावा ही समिती घेत आहे.

समितीमध्ये आ. भिमराव केराम, आ. तान्हाजी मुटकुळे, आ. अशोक माने, आ. शाम खोडे, आ. मंगेश कुडाळकर, आ. नरेंद्र भोंडेकर, आ. संजय बनसोडे, आ. सचिन पाटील, आ. गजानन लवटे, आ. संजय मेश्राम, आ. अमित गोरखे, आ. अमोल मिटकरी, आ. डॉ. प्रज्ञा सातव, आ. जगन्नाथ अभ्यंकर यांचा समावेश आहे. या कार्यक्रमाला महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर व युवराज जरग, सहा. महाव्यवस्थापक (मासं) सत्यजित राजेशिर्के यांचेसह वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या मनमानी कारभाराविरोधातविविध क्रीडा संघटनांचे २३ सप्टेंबरला आंदोलन व आमरण उपोषण

पुणे: ऑलिम्पिकमध्ये खेळणाऱ्या विविध संघटनांना पंचवार्षिक निवडणुकीपासून मतदानाचा अधिकार बजावण्यापासून दूर ठेवत महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव नामदेव शिरगावकर यांनी केलेल्या मनमानीविरोधात राज्यातील विविध क्रीडा संघटना आक्रमक झाल्या आहेत. शिरगावकरांच्या या बेकायदेशीर कृतीविरोधात येत्या मंगळवारपासून (ता. २३) तीव्र आंदोलन व आमरण उपोषण करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष व भाजपा किडा आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संदीप भोंडवे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिला.

नवी पेठेतील पत्रकार भवनात झालेल्या पत्रकार परिषदेला अर्जुन पुरस्कार विजेते बॉक्सिंगपटू मनोज पिंगळे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष विलास कथुरे, सरचिटणीस हिंदकेसरी योगेश दोडके, शिवछत्रपती पुरस्कार विजेते मनोज एरंडे, हँडबॉल संघटनेचे सरचिटणीस राजाराम राऊत, सायकलिंग असोसिएशनचे संजय साठे, तायक्वांदो खेळाडू मिलिंद पाठारे आदी उपस्थित होते.

संदीप भोंडवे म्हणाले, “महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे सरचिटणिस नामदेव शिरगावकर यांनी १५ सप्टेंबर २०२५ रोजी परिपत्रक काढून २ नोव्हेंबर २०२५ रोजी होणाऱ्या असोसिएशनच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. तसेच निवडणुकीत मतदानास पात्र २२ क्रीडा संघटनांची यादी जाहीर केली. यामधून कुस्ती, कब्बडी, बॉक्सिंग, स्विमिंग व हॅण्डबॉल या संघटनांना वगळण्यात आले. यापूर्वीच्या निवडणुकीत या पाचही संघटना पात्र होत्या. असोसिएशनशी संलग्नित ४७ ते ४८ संघटना असतानाही केवळ राजकारणासाठी व स्वतःचे वर्चस्व कायम ठेवण्यासाठी शिरगावकर यांनी फक्त २२ संघटनांना मतदानासाठी पात्र ठरवले आहे. त्यांचे हे कारस्थान जाणूनबुजून केलेले असून, यामुळे महाराष्ट्रातील खेळाडूंचे मोठे नुकसान होणार आहे.”

“गोवा, उत्तराखंड आणि गुजरात येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये खेळाडूंसाठी महाराष्ट्र शासनाने दरवर्षी चार कोटी याप्रमाणे तीन वर्षांसाठी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनला १२ कोटींचा निधी दिला आहे. मात्र, असोसिएशनकडून या निधीच्या विनियोगाचा तपशील सादर केला नाही. यामध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. करोडो रुपयांचा हिशोब न देता लाखो रुपये स्वतःच्या खिशात घालण्याचे काम शिरगावकर यांनी केले असल्याचे आमचे ठाम मत आहे. शिरगावकर यांच्या मनमानी कारभाराला त्रासलेल्या विविध संघटना व त्यांचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत,” असेही संदीप भोंडवे यांनी नमूद केले.

संदीप भोंडवे पुढे म्हणाले की, महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनला संलग्न सर्व राज्य खेळ संघटनांना मतदानाचे अधिकार प्राप्त व्हावेत, तसेच गोवा, गुजरात व उत्तराखंड येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी राज्य शासनाने दिलेल्या कोट्यवधी रुपयांच्या निधीचा हिशोब महाराष्ट्र ऑलिंपिंक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार व महासचिव नामदेव शिरगावकर यांनी राज्य शासनास सादर करावा, अशी आमची मागणी आहे. या दोन्ही मागण्या मान्य होण्यासाठी येत्या, २३ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथून आंदोलनास सुरूवात होईल. महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या कार्यालयाबाहेर आमरण उपोषण करण्यात येणार आहे. या आंदोलनात मान्यताप्राप्त विविध राज्य क्रीडा संघटनांचे पदाधिकारी व राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू सहभागी होणार असून, साखळी उपोषण करणार आहेत.”

मतदानासाठी अपात्र संघटना

– कुस्ती, कबड्डी, हँडबॉल, स्विमिंग, बॉक्सिंग, बॉडी बिल्डिंग, नेटबॉल, टग ऑफ वॉर, सायकलिंग, कुराश, मल्लखांब, रोलबॉल, आट्यापाट्या, बॉल बॅडमिंटन, सॉफ्ट बॉल, स्क्वॅश रॅकेट्स, टेनी कोल्ट आदी

बालगृहातील मुलींच्या सुरक्षिततेसाठी डॉ. नीलम गोऱ्हे आणि मंत्री अदिती तटकरे यांचा छत्रपती संभाजीनगर दौरा

0

छत्रपती संभाजीनगर |

छावणी परिसरातील एका बालगृहातून नऊ मुली पळून गेल्याच्या धक्कादायक घटनेच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी भगवान बाबा बालिका आश्रम आणि सावली बालगृहास भेट देऊन मुलींच्या सुरक्षिततेची पाहणी केली तसेच त्यांच्या भावना, आवडीनिवडी आणि स्वप्नांविषयी संवाद साधला.

डॉ. गोऱ्हे यांनी जिल्हा प्रशासनाला मुलींच्या सुरक्षेसाठी ठोस सुधारात्मक पावले उचलण्याचे आदेश दिले. त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना ‘अँटी-ट्रॅफिकिंग’ संदर्भातील माहिती संकलित करून आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. मंत्री अदिती तटकरे यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करत मुलींच्या सुरक्षेसाठी समन्वयाने आणि जबाबदारीने काम करण्याचे निर्देश दिले.

मुलींशी झालेल्या संवादादरम्यान डॉ. गोऱ्हे भावूक होत म्हणाल्या, “या मुलींना भेटून मला पुन्हा आई झाल्यासारखं वाटलं.” तर मंत्री तटकरे यांनी मोठ्या बहिणीप्रमाणे त्यांच्याशी संवाद साधला. काही मुलींनी आयएएस अधिकारी आणि आर्मीमध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली, तर काहींनी हस्तकला व कौशल्यविकास शिकण्याची मागणी केली. दोन्ही मान्यवरांनी त्यांच्या स्वप्नांना प्रोत्साहन देत त्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

या भेटीदरम्यान मुलींनी स्वतः बनवलेल्या पेंटिंग्स आणि क्राफ्ट्स दाखवले. मान्यवरांनी त्यांचे कौतुक करून प्रोत्साहन दिले. यावेळी मुलींनी महिला व बालविकास विभाग आयोजित बालमहोत्सवात वाचन, खेळ आणि सर्जनशील उपक्रमांचा समावेश वाढवण्याची मागणी केली.

या दौऱ्यात पोलीस आयुक्त प्रवीण पवार, महिला व बालविकास आयुक्त राहुल मोरे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गणेश पुंगळे, तसेच भगवान बाबा बालिका आश्रमाच्या संचालिका कविता वाघ यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.

या दौऱ्यातून प्रशासनाने मुलींच्या सुरक्षिततेबाबत अधिक संवेदनशीलतेने आणि जबाबदारीने पावले उचलावीत, तसेच मुलींच्या शिक्षण, कला आणि कौशल्यविकासाला प्रोत्साहन द्यावे, असा ठोस संदेश देण्यात आला.

राज्यातील शासनमान्य ग्रंथालयांचे अनुदान थेट बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

0

मुंबई, दि. 19 :- राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या विकासासाठी शासनाकडून दिल्या जाणाऱ्या सहाय्यक परिक्षण अनुदानाचा पहिला हप्ता थेट ग्रंथालयांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.

मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, सार्वजनिक ग्रंथालये केवळ पुस्तके ठेवण्याची ठिकाणे नसून समाजातील वाचनसंस्कृती जोपासणारी प्रेरणास्थळे आहेत.या ग्रंथालयांना वेळेवर अनुदान उपलब्ध करून देणे महत्वाचे असते.दरवर्षी सार्वजनिक ग्रंथालयांना दोन हप्त्यांमध्ये अनुदान वितरित केले जाते. यापूर्वी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामार्फत पारंपरिक पद्धतीने अनुदान वितरण केले जात असल्याने वेळेत निधी मिळण्यात विलंब होत असे. या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्र शिक्षण विभाग व ग्रंथालय संचालनालयाने संगणकाधारित “ग्रंथालय अनुदान व्यवस्थापन प्रणाली” (Library Grant Management System) विकसित करण्यात आली आहे.
या प्रणालीद्वारे अनुदानाचे वितरण प्रक्रिया पारदर्शक झाली आहे. यावर्षी पहिल्या हप्त्यासाठी शासनाने दि. 12 सप्टेंबर 2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार
निधी मंजूर केला होता. त्याअंतर्गत एकूण ₹80 कोटी 53 लाख 67 हजार इतकी देयके मंजूर करून राज्यातील 10 हजार 546 शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना थेट त्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा करण्यात येत आहे.
या उपक्रमामुळे सर्व ग्रंथालयांना एकाचवेळी आणि वेळेत निधी उपलब्ध होत आहे त्यामुळे ग्रंथालयांच्या विकासकामांना गती मिळेल असल्याचेही मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.

लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांनी केवायसी करण्याचे राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचे आवाहन

0

मुंबई,दि.१९ : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थ्यांना मिळणारे हप्ते अधिक सुलभ, सुकर व पारदर्शक व्हावेत यासाठी केवायसी प्रक्रिया पूर्ण करावे असे आवाहन महिला व बाल विकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केले आहे.

लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांनी येत्या दोन महिन्यांत शासकीय पोर्टलवर जाऊन केवायसी करणे बंधनकारक असून, यासाठी ladkibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा असेही त्यांनी सांगितले.
या माध्यमातून लाडक्या बहिणींना योजनेंतर्गत लाभ वेळेत व अचूक मिळण्यास मदत होणार आहे.

याचबरोबर केवायसीमुळे महिला सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने सुरू केलेल्या इतर योजनांचा लाभही प्रत्येक पात्र महिलांपर्यंत पारदर्शकपणे मिळणार असल्याचे राज्यमंत्री बोर्डीकर यांनी सांगितले.

भाजपच्या राजकारणाचा स्तर घसरतोय – सुनील माने

पुणे :भाजपा पूर्वीचा राहिला नाही, ही खंत भाजपाची पायाभरणी करणाऱ्या दिवंगत खासदार गिरीश बापट यांनी वेळोवेळी व्यक्त केली होती. गोपीनाथ पडळकरांसारख्या शिवराळ आणि नवभाजप नेते महाराष्ट्रातील राजकीय आणि समाजिक संस्कृती रसातळाला नेण्याचे काम करत आहेत. राहुल गांधीनी काल मतचोरी कशा पद्धतीने केली जाते हे पुराव्यासह पटवून दिल्यानंतर पडळकरांचे आलेलं वक्तव्य म्हणजे राहुल गांधीच्या आरोपावरून लक्ष विचलित करण्यासाठी मुद्दाम केलेले वक्तव्य असू शकते अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस, प्रवक्ता सुनील माने यांनी केली आहे.
याबाबत ते म्हणाले, गोपीचंद पडळकर हे नेहमी वादग्रस्त आणि पवार कुटुंबाचा द्वेष होईल असे वक्तव्य करत असतात. यातून ते मोठे नेते होतील अशी त्यांची धारणा आहे. आज त्यांनी जयंत पाटील साहेब यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे. यातून त्यांनी त्यांचे संस्कारच दाखवले आहेत. यावरून हल्ली भाजपच्या राजकारणाचा स्तर किती खालच्या पातळीवर गेला आहे हे दिसून येते. मात्र ज्या नेत्यांनी भाजपाची स्थापना केली त्यांच्या राजकारणाची पातळी अतिशय वरच्या स्तरातील होती. पुण्याचे दिवंगत खासदार गिरीश बापट साहेब हे भारतीय जनता पार्टीत होते, मात्र त्यांची इतर पक्षातील नेत्यांशी मैत्री कायम होती. त्यांनी वाढदिवसानिमित्त एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत हल्ली पक्षात आले की लगेच पद हवे असते असे अयारामाना उद्देशून ते म्हणाले होते.
त्यावेळी शरद पवारांच्या कार्यपद्धतीची स्तुती करताना ते म्हणाले होते, पवार हे राजकीय विरोधक असले तरी कामाचा उत्साह त्यांच्याकडून शिकता येतो, पण सध्या त्यांचे हे गुण घेण्याऐवजी परस्पर वैरभाव वाढीला लागतो आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली होती. मुद्दे सोडून वैयक्तिक टीका टिप्पणी केली जाते आहे त्यामुळे मन अवस्थ आणि उद्विग्न होतंय. वैयक्तिक किंवा तत्कालिक फायद्यासाठी राजकीयसंस्कृती बिघडून चालणार नाही असा सल्ला त्यांनी स्वपक्षीयांना दिला होता. सध्या विकृत राजकारण करणाऱ्या नवभाजपवासियांनी बापट यांचा सल्ला कायम लक्षात ठेवला पाहिजे असे ही माने म्हणाले.

गोपीचंद पडळकरांच्या प्रतिमेला जोड्यांचा मारा

पुणे- भारतीय जनता पक्षाचे वाचावीळ आमदार गोपीचंद पडळकर यांनी स्व. राजारामबापू पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते श्री. जयंतराव पाटील साहेब यांचा केलेला अपमान अतिशय संतापजनक आहे.गोपीचंद पडळकर व त्यांना पाठीशी घालणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा निषेध व्यक्त करण्यासाठी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने झाशीच्या राणीचा पुतळा, बालगंधर्व रंगमंदिर चौक येथे तीव्र आंदोलन करण्यात आले.या आंदोलनाच्या माध्यमातून गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले व त्यांच्या या कृत्याला पाठीशी घालणाऱ्या, त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा धिक्कार करण्यात आला.

या आंदोलनास प्रशांत जगताप यांच्यासह ॲड. निलेश निकम, किशोर कांबळे, डॉ. सुनील जगताप, डॉ. शशिकांत कदम, रोहन पायगुडे, स्वप्निल जोशी, केतन ओरसे, मनाली भिलारे, विद्या ताकवले, विक्रम जाधव, अजिंक्य पालकर, तानिया साळुंखे, रमिझ सय्यद, प्राजक्ता जाधव, दिलशाद अत्तार, शैलेंद्र बेल्हेकर, आसिफ शेख यांच्यासह शहरातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाणी पुरवठा कार्यालयाला भाजपसह अन्य कार्यकर्त्यांनी ठोकले टाळे!

0

पुणे :- पुणे शहरात गेल्या पाच-सहा दिवसांपासून धो-धो पाऊस पडत आहे. यामुळे पुणेकरांच्या दारात व शहरातील रस्त्यांवर मुबलक पाणी दिसत आहे. पण याला पुणे शहरातील कोंढवा बुद्रुक परिसरातील ग्रामस्थ अपवाद ठरले आहेत. कारण भर पावसाळ्यातही कोंढव्यातील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. परिणामी दारात मुबलक पाणी, पण घरात पाण्याअभावी घशाला कोरड अशी अवस्था कोंढवा बुद्रुक ग्रामस्थांची झाली आहे. याला महापालिकेचा पाणी पुरवठा विभाग कारणीभूत ठरला आहे. अनियमित पाणीपुरवठ्यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, पाण्यामुळे संतप्त आंदोलकांनी शुक्रवारी (दि.१९ सप्टेंबर) पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकले.यावेळी भाजपचे पश्चिम महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष जालींदर कामठे, माऊली कामठे, शिरीष धर्मावत, गणेश कामठे, रोहन कामठे, अमित कामठे, पहिलवान सागर कामठे, सोमनाथ कामठे,अमर कामठे,भरत पांगारे, अनिल कामठे, योगेश कामठे, सुशांत पंडित, संजय चव्हाण, किशोर आतकिरे, रुपेश मोघेल, अनिकेत मेमाणे, किशोर मरळ आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

शहरातील कोंढवा बुद्रुक परिसरातील कोंढवा बुद्रुक गावठाण, श्रद्धानगर, डॉ.बाबासाहेब आंबेडकरनगर, लक्ष्मीनगर, कामठेनगर येथील ग्रामस्थांना गेल्या चार ते पाच दिवसांपासून अनियमित पाणीपुरवठा होत आहे. याचा फटका मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थांना बसत आहे. या पाणी समस्येबाबत अनेकदा तक्रारी करूनही पाणीपुरवठा विभागाकडून योग्य तो प्रतिसाद मिळत नसल्याने कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. या आंदोलनात मोठ्या संख्येने कोंढवा बुद्रुक ग्रामस्थ आणि विविध पक्षांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

कोंढवा व परिसरातील विविध भागात पुरेशा प्रमाणात आणि वेळेत पाणी मिळालेच पाहिजे, अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी यावेळी घेतली. वारंवार होणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या गैरव्यवस्थेमुळे ग्रामस्थ त्रस्त झाले असून दैनंदिन जीवन विस्कळीत होत आहे, असा संताप त्यांनी व्यक्त केला. या आंदोलनाची दखल घेत पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी आंदोलक ग्रामस्थांशी चर्चा केली आणि लवकरच पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. मात्र तोपर्यंत आपला लढा सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला .

शालेय उपक्रमात सर्वोत्तम काम असलेल्या जिल्ह्यांना मिळणार ५, ३ व २ कोटींची पारितोषिके– शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची घोषणा

पुणे, दि. १९ : राज्यातील गुणवत्तापूर्ण व नाविन्यपूर्ण शिक्षण उपक्रमांना चालना देण्यासाठी सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषद व महानगरपालिकांना अनुक्रमे प्रथम क्रमांकास ५ कोटी, द्वितीय क्रमांकास ३ कोटी आणि तृतीय क्रमांकास २ कोटी रुपयांची प्रोत्साहनपर पारितोषिके देण्यात येतील, अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री श्री. दादाजी भुसे यांनी आज पुण्यात केली.
बालेवाडी येथील हॉटेल ऑर्किड येथे आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय शालेय शिक्षण परिषदेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
या उद्घाटन सोहळ्यास शालेय विभागाचे प्रधान सचिव श्री. रनजीत सिंह देओल, शिक्षण विभागाचे आयुक्त श्री. सचिन्द्र प्रताप सिंह, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबईचे राज्य प्रकल्प संचालक श्री. संजय यादव, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक श्री. राहुल रेखावार, राज्य परीक्षा परिषदेचे संचालक श्री. नंदकुमार बेडसे, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर, शिक्षण संचालनालय (योजना) पुणेचे संचालक श्री. कृष्णकुमार पाटील, बालभारती पाठ्यपुस्तक मंडळाच्या संचालक सौ. अनुराधा ओक, सीईओ अँड हेड ऑफ परख सेल NCERT नवी दिल्लीच्या प्रा. इंद्राणी भादुरी, विविध जिल्ह्यांचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त, सहसंचालक, उपसंचालक, प्राचार्य डायट तसेच शिक्षण विभागातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शालेय शिक्षण मंत्री श्री. भुसे म्हणाले की, “शिक्षण हे आनंददायी, गुणवत्तापूर्ण, भाकरीचे आणि राष्ट्रीयत्वाचे असले पाहिजे.” महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर यावा यासाठी शिक्षण विभागाने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व तंत्रज्ञानाचा वापर, पायाभूत सुविधा सुधारणा, प्रधानमंत्री पोषण शक्ती योजना, शिष्यवृत्ती परीक्षा व निपुण भारत अभियान यावर त्यांनी भर दिला.
विद्यार्थ्यांच्या चौकसपणासाठी शैक्षणिक सहलींचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. ऐतिहासिक स्थळांना भेटी, शेतीतील कामांचे निरीक्षण, बँकेचे व्यवहार समजण्यासाठी सहली काढण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा, तसेच बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त प्रश्नमंजुषा घेण्याचेही निर्देश त्यांनी दिले.
शालेय स्तरावरील १५ समित्यांचे रूपांतर चार समित्यांमध्ये करून अधिक प्रभावी कामकाज सुरू असल्याचे सांगून, पुढील शैक्षणिक वर्षापासून चौथी व सातवी इयत्तेसाठी शिष्यवृत्ती परीक्षा पुन्हा होणार असल्याची घोषणा त्यांनी केली. “विद्यार्थी हेच आपले दैवत असून शिक्षक हे शाळारूपी मंदिराचे पुजारी आहेत,” असे उद्गार काढून मंत्री महोदयांनी शिक्षकांच्या कार्याचे कौतुक केले.
शालेय विभागाचे प्रधान सचिव श्री. रनजीत सिंह देओल यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांनी शिक्षण व आरोग्य या दोन क्षेत्रांवर विशेष लक्ष केंद्रित करावे, तसेच शासन निर्णय तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी महापालिका आयुक्त व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कार्यक्षमतेने पुढाकार घ्यावा, असे सांगितले.
प्रास्ताविक शिक्षण आयुक्त श्री. सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले. त्यांनी शिक्षणाची गुणवत्ता, राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP), “निपुण भारत” लक्ष्य २०२७ तसेच शालेय स्तरावर सुरू असलेल्या उपक्रमांवर सविस्तर माहिती दिली.
उद्घाटन सोहळ्यात शालेय शिक्षण मंत्री श्री. दादाजी भुसे यांच्या हस्ते शिक्षक व अधिकारी-कर्मचारी स्पर्धा मार्गदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. यात ४२ स्पर्धांपैकी ३६ स्पर्धा व ६ ऑलिम्पियाडचा समावेश असून, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक श्री. राहुल रेखावार यांच्या मार्गदर्शनाखाली ही मार्गदर्शिका तयार करण्यात आली आहे.
सूत्रसंचालन संशोधन विभाग प्रमुख डॉ. दत्ता थिटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन विभागीय उपसंचालक शिक्षण, पुणे डॉ. गणपत मोरे यांनी केले.

कोंढवा येथे हाफ मॅरेथॉन निमित्त वाहतुकीत बदल

पुणे दि. 19 : कोंढवा बु. (जि. पुणे) येथे दि. २१ सप्टेंबर रोजी हाफ मॅरेथॉन स्पर्धा होणार असून त्यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी अपेक्षित आहे. वाहतूक कोंडी होऊ नये व कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी मोटार वाहन कायदा, १९८८ चे कलम ११५ तसेच शासन गृह विभागाचे दि. १९ मे १९९० चे अधिसूचना यान्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी खालीलप्रमाणे आदेश जारी केले आहेत.

दि. २१सप्टेंबर रोजी पहाटे ४ वाजल्यापासून सकाळी ९ वाजेपर्यंत एन.एच.-६५ व एन.एच.-९६५ दिवेघाट मार्गे सासवड येथे जाणारी वाहतूक बंद राहील व ती पर्यायी मार्गाने वळविण्यात येईल.

जड व अवजड वाहने सासवड – दिवेघाट – मंतरवाडी चौक मार्गे वळविण्यात येतील.

हलकी वाहने (चार चाकी) सासवड – चांबळी – गराडे मार्गे मरीआई घाट – खेड शिवापूर मार्गे वळविण्यात येतील.

वाहतुकीसाठी सासवड – कोंढवा – पुणे, सासवड – दिवेघाट – मंतरवाडी, सासवड – चांबळी – गराडे – मरीआई घाट – खेड शिवापूर – कात्रज घाट (चार चाकी) पर्यायी मार्गचा अवलंब करावा.

नवरात्र उत्सव २०२५ निमित्त लोणावळा,वडगाव फाटा, मावळ,कार्ला वाहतुकीत बदल

0

पुणे दि. : मौजे वेहेरगाव, कार्ला (ता. मावळ) येथील श्री. एकविरा देवी नवरात्र उत्सव २०२५ (दि. २२ सप्टेंबर ते दि. ०२ ऑक्टोबर २०२५) दरम्यान भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी व सुरळीत वाहतूक व्हावी यासाठी मोटार वाहन कायदा, १९८८ चे कलम ११५ तसेच शासन गृह विभागाचे दि. १९/०५/१९९० चे अधिसूचनेन्वये जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी खालीलप्रमाणे आदेश दिले आहेत.

दि. २२ सप्टेंबर २०२५ ते दि. ०२ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत कार्ला फाटा ते श्री. एकविरा देवी पायथा मंदिर या मार्गावर अवजड व मोठ्या वाहनांना पूर्णवेळ प्रवेश निषिद्ध (No Entry) राहील.

दि. २७ सप्टेंबर २०२५ ते दि. ०१ ऑक्टोबर २०२५ सकाळी ०६.०० ते रात्री २२.०० या वेळेत जुना मुंबई–पुणे व पुणे–मुंबई महामार्गावरील कुसगाव बुद्रुक टोलनाका लोणावळा ते वडगाव फाटा वडगाव मावळ या दरम्यान अवजड व मोठ्या वाहनांना प्रवेश निषिद्ध (No Entry) राहील.

जुना मुंबई–पुणे महामार्गावरून पुण्याकडे जाणारी जड व अवजड वाहने ही लोणावळा येथील कुसगाव बुद्रुक टोलनाका मार्गे एक्सप्रेस हायवेने उर्से टोलनाक्यामार्गे पुणे शहराकडे वळविण्यात येतील.

पुणे–मुंबईकडे जाणारी जड व अवजड वाहने ही वडगाव येथील तळेगाव फाटा मार्गे उर्से खिंडीतून एक्सप्रेस हायवेने मुंबईकडे वळविण्यात येतील.

भाविकांच्या सुरक्षिततेसाठी व सुरळीत वाहतूक व्यवस्थेसाठी नागरिकांनी व वाहनचालकांनी वरील आदेशांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी केले आहे.

सोलापूर-मुंबई आणि सोलापूर-बंगळुरू हवाईसेवा १५ ऑक्टोबरपासून सुरू!

0
  • केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती
  • २० सप्टेंबरपासून बुकिंग सुरू

पुणे/सोलापूर (प्रतिनिधी)
सोलापूरकरांची दीर्घ प्रतीक्षा संपली असून येत्या १५ ऑक्टोबरपासून सोलापूर विमानतळावरून सोलापूर-मुंबई आणि सोलापूर-बंगळुरू या दोन्ही मार्गांवर नियमित प्रवासी विमानसेवा सुरू होणार आहे. तर बुकिंग २० सप्टेंबरपासून सुरू होत आहे. नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर सोलापूरला मिळणारी ही दुहेरी भेट सोयीस्कर, वेगवान आणि आधुनिक वाहतुकीकडे एक मोठे पाऊल आहे, अशी माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

मंगळवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवारी उपलब्ध असणाऱ्या या विमानसेवेमुळे सोलापूरकरांना राज्याची आर्थिक राजधानी मुंबई तसेच दक्षिण भारतातील औद्योगिक केंद्र बंगळुरूशी थेट व जलद हवाई संपर्क मिळणार आहे. व्यापारी, उद्योजक, विद्यार्थ्यांसह भाविकांसाठीही या नव्या सेवेमुळे प्रचंड सोय होणार आहे.

याबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले, सोलापूर-मुंबई विमानसेवा सुरु करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिजीएफ मंजूर केल्याने या सोलापूर-मुंबई विमानसेवेचा मार्ग मोकळा झाला आहे. याबद्दल मुख्यमंत्री आणि महायुती सरकारचे मनःपूर्वक धन्यवाद ! मोदी सरकारच्या माध्यमातून या विमानतळाची निर्मिती केल्यानंतर प्रत्येक विमानसेवा सुरु करण्यासाठी आपले विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू होते. ज्याला आता यश आले आहे. मुंबई आणि बंगलोर या दोन सेवा सुरु होणे, हा सोलापूरच्या विकासाचा महत्त्वाचा टप्पा आहे.

‘सोलापूरसारख्या ऐतिहासिक, औद्योगिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाच्या शहराला थेट मुंबई व बंगळुरूशी जोडणं ही काळाची गरज होती. या हवाईसेवेमुळे सोलापूरकरांचा प्रवास वेळ वाचणार आहेच, शिवाय या भागात गुंतवणूक, रोजगारनिर्मिती व पर्यटनाला चालना मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या ‘विकसित भारत’ या संकल्पनेत सोलापूरचा अधिक प्रभावी सहभाग होईल, असा मला विश्वास आहे’

स्टार एअर उड्डाण वेळापत्रक:
• सोलापूर-मुंबई
प्रस्थान : दु. १२ः५५ वा.
• मुंबई-सोलापूर
प्रस्थान : दुपारी २:४५ वा.
• बंगळुरू-सोलापूर
प्रस्थान : सकाळी ११ः१० वा.
• सोलापूर-बंगळुरू
प्रस्थान : दुपारी ४:१५ वा.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते लोकार्पण…

मुंबई-सोलापूर विमानसेवेचा प्रारंभ १५ ऑक्टोबर, २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते मुंबई येथून होणार आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाच्या कार्यकारणीची बैठक संपन्न.

मुंबई, दि. १९ सप्टेंबर २०२५

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांनी दिलेला नारा “वोट चोर, गद्दी छोड“ नुसार आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सजग राहून कार्य करावे तसेच जनसुरक्षा कायदा, जो लोकशाही आणि व्यक्तीस्वातंत्र्याला अत्यंत मारक आहे, त्याविरोधात जनजागृती करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष विलास केशवराव औताडे यांनी केले.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाच्या कार्यकारणीची बैठक मुंबई येथे गांधी भवन कार्यालयात प्रदेशाध्यक्ष विलास केशवराव औताडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी जिल्हानिहाय प्रशिक्षित कार्यकर्ते नेमून, बूथ निहाय मतदारांची समीक्षा करविण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत प्रदेश कार्यकारणीचे सदस्य, जिल्हा व शहर अध्यक्ष यांनी आपले मनोगत व्यक्त केले.