Home Blog Page 1192

खंडणी मागणाऱ्या ‘माथाडी बोर्डाचे नेते’टोळीला लावला मकोका

पुणे- आम्ही माथाडी बोर्डाचे नेते आमचेच कामगार काम करतील आणि एका गाडीमागे १५ हजार रुपये आम्हाला द्यावे लागतील अशा पद्धतीने खंडणी वसूल करणाऱ्या शेखर मोडक,साहस पोळ आणि टोळीप्रमुख संतोष ऊर्फ आण्णा किसन देवकर याच्यासह ६ जणांच्या टोळीवर पोलिसांनी मकोका अंतर्गत कारवाई केली आहे.यातील तीन आरोपी फरार आहेत .देवकर याने मागील १० वर्षात खुन करणे, खुनाचा प्रयत्न करणे, गुप्तपणे किंवा गैरपणे एखाद्या व्यक्तिला परिरध्द करण्यासाठी तिचे अपनयन किंवा अपहरण करणे, बलादग्रहण करण्यासाठी एखाद्या व्यक्तिला मृत्यु किंवा जबर दुखापत यांची भिती घालणे, बेकायदेशीर जमाव जमवणे, बेकायदेशीररीत्या हत्यारे बाळगुन दहशत निर्माण करणे इत्यादी प्रकारचे गुन्हे केल्याचे निदर्शनास आले आहे

या संदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि,’संतोष ऊर्फ आण्णा किसन देवकर (टोळी प्रमुख) व त्याचे इतर ५ साथीदार यांचे विरुध्द मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे, यांनी एका फिर्यादी यांचे मालकीचे ऊरळी देवाची गावचे हदीतील गोडावुनमध्ये यातील आरोपी व त्यांचे साथीदार यांनी मिळुन “आम्ही माथाडी बोर्डाचे नेते असुन गोडावुन मधील काम आमचे माथाडीचे कामगार करणार असे” म्हणून फिर्यादी यांना याबाबत कोणतीही नोटीस न देता त्यांचे गोडावूनमधील काम बंद केले तसेच काम चालु करायचे असेल तर एका गाडी पाठीमागे १५,०००/- रूपये दया तरच काम चालु करा त्यावर फिर्यादी यांनी गोडावूनमध्ये काम करण्यासाठी माथाडी कामगार ठेवायचे नाहीत व माथाडी कामगार परवडत नाही असे म्हणाले परंतु आरोपी यांनी निदान एका गाडी पाठीमागे ७०००/ रूपये दे नाहीतर तुझ्या गोडावुन मध्ये येणा-या गाड्या तु कशा खाली करतो तेच बघतो असे म्हणुन शिवीगाळ दमदाटी करुन जिवे मारण्याची धमकी दिली त्याबाबत फिर्यादी यांनी लोणीकाळभोर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने लोणीकाळभोर पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं.४८/२०२४ भादविक ३८७,१४३, १४७,१४९,५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दाखल गुन्हयाच्या तपासा दरम्यान आरोपी नामे १) संतोष ऊर्फ आण्णा किसन देवकर वय३४ वर्ष रा. अॅक्वा मॅजेस्टिक सोसा. डी बि. फ्लॅट नं. २०४ फुरसुंगी ता. हवेली जि पुणे २) शेखर अनिल मोडक वय २९ वर्षे रा. वडकी गावठाण, सरकारी विहीरी शेजारी ता. हवेली जि. पुणे. ३) साहस विश्वास पोळ वय २५ वर्ष रा. सिध्दीविनायक अपार्टमेंट, जे १०१, वडकी गाव, ता. हवेली, जि. पुणे. यांना दाखल गुन्ह्यात अटक केली असून, आणखीन तीन आरोपी wanted आहेत.
संबधित आरोपी १) संतोष ऊर्फ आण्णा किसन देवकर (टोळी प्रमुख) हा लोणीकाळभोर
पोलीस स्टेशन अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे त्याने संघटित गुन्हेगारी टोळी तयार केली असून, त्याने बेकायदेशीर मार्गाने स्वतःसाठी किंवा अन्य कोणत्याही व्यक्तींसाठी गैरवाजवी आर्थिक फायदा व इतर फायदा मिळवण्याच्या उद्देशाने संघटीत गुन्हेगारी संघटनेचा सदस्य म्हणून किंवा संघटनेच्या वतीने एकट्याने किंवा संयुक्तपणे हिंसाचाराचा वापर करुन किंवा हिंसाचार करण्याची धमकी देऊन किंवा धाकदपटशा दाखवुन किंवा जुलूम जबरदस्ती करुन किंवा अवैध मार्गाने आपली बेकायदेशीर कृत्य चालु ठेऊन संघटना किंवा टोळी म्हणून संयुक्तपणे संयुक्त गुन्हेगारी कृत्य करणारा गट तयार केला असुन सदर टोळीने मागील १० वर्षात खुन करणे, खुनाचा प्रयत्न करणे, गुप्तपणे किंवा गैरपणे एखाद्या व्यक्तिला परिरध्द करण्यासाठी तिचे अपनयन किंवा अपहरण करणे, बलादग्रहण करण्यासाठी एखाद्या व्यक्तिला मृत्यु किंवा जबर दुखापत यांची भिती घालणे, बेकायदेशीर जमाव जमवणे, बेकायदेशीररीत्या हत्यारे बाळगुन दहशत निर्माण करणे इत्यादी प्रकारचे गुन्हे केल्याचे निदर्शनास आले आहे.सदरचे गुन्हे हे अवैध मार्गाने स्वतःसाठी व इतरांसाठी गैरवाजवी आर्थिक फायदा व इतर फायदा मिळविण्यासाठी, टोळीचे वर्चस्वासाठी व दहशत कायम ठेवण्यासाठी तसेच नागरिकांच्या मनात भिती निर्माण करण्यासाठी सातत्याने चालु ठेवुन संघटना किंवा टोळी म्हणुन संयुक्तपणे गुन्हेगारी कृत्य करणारा गट तयार केला असुन, त्यांनी पुन्हा पुन्हा गंभीर स्वरुपाचे गुन्हे केलेले आहेत.दाखल गुन्हयामध्ये महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा सन १९९९ चे कलम ३ (१) (ii) ३(२), ३(४) चा अंतर्भाव करणेकामी लोणीकाळभोर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक,शशिकांत चव्हाण यांनी पोलीस उप-आयुक्त परि-५, पुणे शहरआर. राजा यांचे मार्फतीने अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रदेशिक विभाग, पुणे शहर मनोज पाटील यांना प्रस्ताव सादर केलेला होता.सदर प्रकरणाची छाननी करुन लोणीकाळभोर पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं. ४८/२०२४ भादविक ३८७,१४३,१४७,१४९,५०४,५०६ अन्वये दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा सन १९९९ चे कलम ३ (१) (ii) ३(२), ३ (४) चा अंतर्भाव करण्याची मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. मनोज पाटील यांनी मान्यता दिलेली आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त, पुणे शहर अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त, प्रविण पवार, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, मा.पोलीस उप आयुक्त, परि- मंडळ ०५, श्री. आर. राजा, सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, श्रीमती. अश्विनी राख यांचे मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शशिकांत चव्हाण, पोलीस निरीक्षक, (गुन्हे) श्री. सुभाष काळे, सपोनि किशोर पवार, पोउनि अमोल घोडके, सर्वेलन्स अंमलदार तेज भोसले, संदीप धनवटे, प्रशांत नरसाळे, मल्हारी ढमढेरे, रोहिणी जगताप यांनी केली आहे.
पोलीस आयुक्त, पुणे शहर, अमितेश कुमार यांनी पोलीस आयुक्तालयाचा कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर भर देवुन शरिराविरुध्दचे व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवुन, गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन करण्याचे उद्देशाने कठोर पावले उचलण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत. २०२४ या चालु वर्षातील मकोका अंतर्गत केलेली ही १३ वी कारवाई आहे.

परकीय थेट गुंतवणुकीत पुन्हा महाराष्ट्र आघाडीवर – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

शेतकऱ्यांसाठी पेर्नोड रिकार्ड इंडिया समवेतचा झालेला करार महत्त्वाचा

 नागपूर : राज्यातील उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर राहावा यादृष्टीने अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यासाठी आम्ही पायाभूत सुविधांवर भर दिला. एक दूरदृष्टी घेऊन काम उभे केले. या बळावरच महाराष्ट्र राज्य भारतात आघाडीवर आणले होते. मध्यंतरी हे लयाला गेलेले वैभव आम्ही पुन्हा राज्याला प्राप्त करुन दिले असून परकीय थेट गुंतवणुकीतील 45 टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात झाल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

महाराष्ट्र शासन व पेर्नोड रिकार्ड यांच्यात हॉटेल रॅडिसन ब्ल्यू येथे सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, पेर्नोड रिकार्ड इंडियाचे सीईओ जीन टुबूल, राज्य उत्पादन शुल्क आयुक्त विजय सुर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, प्रसन्न मोहिले आदी मान्यवर उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या हितासाठी दूरदृष्टी ठेवून राज्यातील अन्नप्रक्रिया उद्योगाला चालना देत महाराष्ट्र शासन वाटचाल करीत आहे. कृषी क्षेत्रासह शेतकऱ्यांचेही आर्थिक उत्पन्न वाढावे या उद्देशाने अन्नप्रक्रिया उद्योग महत्त्वाचे असून बुटीबोरी येथे 88 एकर क्षेत्रावर साकारणारा पेर्नोड रिकार्ड इंडिया डिस्टिलरी प्रकल्प महत्त्वाचा आहे. सुमारे 6 हजार कोटी रुपयांचा गुंतवणुकीतून हा प्रकल्प रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणारा ठरेल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

राज्याच्या विकासासाठी सात क्षेत्र निवडली आहेत. यात कृषीक्षेत्र, स्टार्टअप, आर्टीफिशियल इंटिलीजन्स यावर आम्ही भर दिला आहे. नागपूर येथे आर्टीफिशियल इंटिलीजन्सचे सेंटर ऑफ एक्सलन्स उभारण्यासाठी गुगलसमवेत काम सुरु असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

राज्याच्या समतोल विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. रायगड हे राज्यातील गुंतवणुकीचे आकर्षण ठरले आहे. रायगडापासून कोकणातील विकासाच्या वाटा भक्कम केल्या जात आहेत. पुणे, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात विविध प्रकल्पांची उभारणी केली जात आहे. मुंबई, पुणे पाठोपाठ विदर्भ मराठवाड्यातील उद्योगाला, कृषी क्षेत्राला चालना मिळावी यासाठी येत्या दोन आठवड्यात पावर सबसिडी धोरण जाहीर केले जात असल्याचे सुतोवाच त्यांनी केले.

परकीय थेट गुंतवणुकीसाठी उपमुख्यमंत्री फडणवीस यांची शिष्टाई ठरली मोलाची –  उद्योगमंत्री उदय सामंत

परकीय थेट गुंतवणूक महाराष्ट्रात अधिक प्रमाणात यावी यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध उद्योग समुहांसमवेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले योगदान मोलाचे आहे. डाहोस येथे झालेल्या परिषदेत त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनावर भर दिल्याने आम्हाला मोठ्या प्रमाणात उद्योजकांचा विश्वास संपादन करता आला, असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले.  उद्योग विभागाचे प्रगती पुस्तक राज्यातील उद्योजकांनी समृद्ध केले असून आमच्याप्रती त्यांनी दाखविलेला विश्वास हाच आम्हाला गतीने कामे करण्यासाठी प्रेरणादायी आहे. बुटीबोरी येथे उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पासाठी 88 एकर जागा गरजेची होती. ही जागा अवघ्या 48 तासात सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करुन उद्योग विभागाने दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विदर्भासाठी या प्रकल्पातून एक नवी रुजूवात होत आहे. इथल्या शेतकऱ्यांच्या विकासासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. शाश्वत विकासासह सामाजिक उत्तरदायित्वाचे भान जपून आम्ही शेतकऱ्यांना बार्ली लागवड व इतर तंत्रज्ञानाकडे वळवू असे पेर्नोड रिकार्ड इंडियाचे सीईओ जीन टुबूल यांनी आपल्या मनोगतात सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांनी केले.

 शेळगी ते दहिटणे रस्ता रुंदीकरणासह कॉंक्रिटीकरण कामाचे उद्घाटन

0

सोलापूर,:- शेळगी (पोलीस चौकी) ते दहिटणे रस्ता रुंदीकरणासह काँक्रिटीकरण करणे तसेच ड्रेनेज लाईनच्या कामाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या रस्ता विकास कामांसाठी 11 कोटी 46 लाख तर ड्रेनेज लाईन साठी 45 लाख इतका निधी मंजूर आहे.

       यावेळी खासदार जय सिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी, आमदार विजयकुमार देशमुख, किरण देशमुख, मोहन डांगरे, हरिदादा सरवदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे अन्य मान्यवर यांच्या सह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘ट्रान्सफर ऑफ पॉवर’ पुस्तकातून भारतीयांच्या संघर्षाचा गौरवशाली इतिहास वाचकांसमोर – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

नागपूर ,दि. 23 : भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील नायकांच्या अमूल्य योगदानावर प्रकाश टाकणारे “ट्रान्सफर ऑफ पॉवर” हे पुस्तक म्हणजे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील संघर्षाचा गौरवशाली इतिहास असल्याचे, प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

लोकमान्य टिळक जनकल्याण संस्था संचालित प्रियदर्शनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘अश्वमेध 2024’क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन आणि “ट्रान्सफर ऑफ पॉवर” पुस्तकाचे प्रकाशन श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. राज्याचे माजी मंत्री तथा लोकमान्य टिळक जनकल्याण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सतिश चतुर्वेदी, लोकमान्य टिळक जनकल्याण संस्थेच्या सचिव आभा चतुर्वेदी, माजी आमदार आणि संस्थेच्या संचालक मंडळाचे संचालक दुष्यंत चतुर्वेदी, प्रियदर्शनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीकृष्ण ढाले आदी उपस्थित होते.

श्री. फडणवीस म्हणाले, डॉ. सतिश चतुर्वेदी लिखित “ट्रान्सफर ऑफ पॉवर” पुस्तकात विदर्भातील गांधीवादी चळवळीचा वर्ष 1920 ते 1942 दरम्यानचा अभ्यासपूर्ण इतिहास मांडण्यात आला आहे. या विषयावरील डॉ. चतुर्वेदी यांचे संशोधन कार्य महत्वपूर्ण असून केंब्रिज,ऑक्सफर्ड आदी जगातील नामांकित विद्यापीठाच्या ग्रंथालयात, लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमीमध्ये या संशोधनाला मानाचे स्थान प्राप्त झाले आहे.

प्रदीर्घ संशोधनाअंती हे पुस्तक तयार झाले असून यातील दहा पृष्ठ हे निव्वळ संदर्भाचीच आहेत. भारतदेशाच्या तत्कालीन बलस्थाविषयीच्या माहितीचे तक्ते या पुस्तकात आहेत. जगातील सर्वात मोठया जीडीपीचा देश ते ब्रिटिशांच्या अंमलातील भारतदेश असा प्रवास यात दिसून येतो. भारताच्या हस्तांतरणातील विस्टन चर्चिल यांची भूमिका,देशाचे विभाजन आणि त्याचा परिणाम पुस्तकात मांडला आहे. भारतीय इतिहासावरील हा एक उत्तम संदर्भग्रंथही ठरेल, असे श्री. फडणवीस म्हणाले.

इतिहासापासून प्रेरणा घेवून आपण उज्ज्वल भविष्याचा वेध घेत असतो.भारतदेशाची दहा हजार वर्ष जुनी गौरवशाली संस्कृती आहे.मात्र,दीड हजार वर्षाच्या गुलामीमुळे संस्कृतीने देशाचा गौरव हिसकवण्याचा प्रयत्न केला. देशात ही गौरवशाली संस्कृती पुन्हा परत आणण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. अयोध्येतील प्रभू श्रीरामाचे मंदिर याचे उत्तम उदाहरण असून 500 वर्षापूर्वीचे सांस्कृतिक वैभव या माध्यमातून पुन्हा स्थापित झाले आहे.भारतदेशाने जगातील पाचव्या अर्थव्यवसस्थेचे स्थान मिळविले असून येत्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत जगातील तिसरी अर्थव्यवस्था बनेल. भेदभाव रहित समाज रचना निर्मितीसह विकसित भारताकडे देश अग्रेसित होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

प्राचार्य डॉ. श्रीकृष्ण ढाले यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सतिश चतुर्वेदी यांनी ही यावेळी उपस्थितांना संबोधित केले. तत्पूर्वी, “अश्वमेध 2024’क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात यावेळी विद्यार्थ्यांनी वैविद्यपूर्ण सादरीकरण केले.
00000

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सांख्यिकी कार्यालयाच्या नूतन इमारतीचे लोकार्पण

0

सोलापूरदिनांक 23(जिमाका) :- नियोजन भवन परिसरात जिल्हा सांख्यिकी कार्यालयाची नूतन इमारत सुमारे एक कोटी निधी खर्च करून बांधण्यात आलेली आहे. या इमारतीचे लोकार्पण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते नामफलक अनावरण व फीत कापून  करण्यात आले. यावेळी इमारतीची पाहणी करून सांख्यिकी विभागाने उत्कृष्ट अशा या नवीन इमारतीमध्ये अधिक गतिमान पद्धतीने कामकाज करावे, असे त्यांनी सुचित केले.

       यावेळी खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, अप्पर जिल्हाधिकारी मोनिका ठाकूर सिंग, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, सांख्यिकी उपसंचालक दिनकर बंडगर, श्री. माळी जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी, कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे, सहाय्यक नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे यांच्यासह सांख्यिकी व नियोजन विभागाचे अन्य अधिकारी उपस्थित होते.

      सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने नियोजन भवन परिसरात जिल्हा सांख्यिकी कार्यालय व जिल्हा नियोजन समितीच्या अभिलेख कक्षासाठी सुमारे एक कोटी निधी खर्च करून 414 चौरस मीटर अशी दुमजली इमारत बांधण्यात आलेली आहे. या इमारतीमध्ये अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना स्वतंत्र केबिन देण्यात आलेल्या आहेत. तसेच बाह्य व अंतर्गत पाणीपुरवठा, जल निसारण, विद्युतीकरण, फर्निचर व अकस्मिक खर्च इत्यादी बाबींचा समावेश करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे यांनी दिली.

पुणे विभागस्तरीय नमो महारोजगार मेळाव्यासाठी २० हजारापेक्षा जास्त रिक्त पदे

पुणे, दि. २३ : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत येत्या २ मार्च रोजी बारामती येथे आयोजित मेळाव्यामध्ये पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यातील औद्योगिक तसेच इतर सेवा क्षेत्रातील सुमारे १२० पेक्षा जास्त खाजगी उद्योजकांनी आत्तापर्यंत सहभाग दर्शविला असून त्यांच्याकडून विविध प्रकारची सुमारे २० हजार पेक्षा जास्त रिक्तपदे कळविण्यात आली आहेत, अशी माहिती कौशल्य विकास विभागाच्या उपआयुक्त अनुपमा पवार यांनी दिली आहे.

या मेळाव्याचे विद्या प्रतिष्ठानचे कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय, बारामती येथे आयोजन करण्यात आले आहे. या पदांकरीता १० वी, १२ वी, कोणत्याही शाखेतील पदवीधर अथवा पदविकाधारक, पदव्युत्तर पदवी, आयटीआय, अभियांत्रिकी पदवी इत्यादी पात्रता असणारे स्त्री-पुरुष उमेदवार पात्र असणार आहेत.

ज्या उद्योजक आस्थापनांना मनुष्यबळाची आवश्यकता आहे त्यांनी आपल्या उद्योग आस्थापना https://rojgar.mahaswayam.gov.in/#/employer_registration या लिंकवर नोंदणी करुन रिक्तपदे मेळाव्यासाठी अधिसुचित करावीत. नोकरी इच्छूक उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in/#/register या संकेतस्थळावर आपली नावनोंदणी करावी.

या महारोजगार मेळाव्यात विविध विभागाच्या योजनांची, स्टार्टअप व विविध महामंडळे यांच्याव्दारे स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य देणाऱ्या योजनांची माहिती देण्यात येणार आहे. तसेच मेळाव्यात अल्पमुदतीचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थादेखील सहभागी होणार असल्याने कौशल्य प्रशिक्षणास इच्छूक उमेदवारांना याचा लाभ घेता येईल.

      उमेदवारांनी मेळाव्याच्या ठिकाणी प्रत्यक्ष मुलाखतीस येताना सर्व शैक्षणिक कागदपत्रे, पासपोर्ट आकाराची छायाचित्रे, आवश्यकतेनुसार अर्जाच्या (रिज्युम) व आधारकार्डच्या प्रती सोबत आणणे आवश्यक आहे. या संधीचा जास्तीत जास्त उमेदवारांनी व आस्थापनांनी लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी पुणे विभागातील संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र येथे संपर्क साधावा,  असेही श्रीमती पवार यांनी कळविले आहे.

रूबी हॉल ते रामवाडी मेट्रो आणि नवीन विमानतळ टर्मिनलचे उदघाटनासाठी माजी आमदार मोहन जोशी यांच्या नेतृत्वाखाली घंटानाद आंदोलन!

सार्वजनिक काकांनी दाखविलेल्या सनदशीर मार्गाने सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन : मोहन जोशी

पुणे – रूबी हॉल ते रामवाडी मेट्रो आणि लोहगाव विमानतळाचे नवीन टर्मिनल, या प्रकल्पांचे लवकरात लवकर उदघाटन करा, या मागणीसाठी माजी आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक काका यांच्या पुतळ्यासमोर आज (शुक्रवारी) दुपारी घंटानाद आंदोलन करण्यात आले.

इंग्रज सरकारच्या विरोधात सनदशीर मार्गाने होणाऱ्या चळवळीचा पाया कै.गणेश वासूदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका यांनी रचला. त्यांच्या सनदशीर आंदोलनाचे अनुकरण करीत बाजीराव रस्त्यावरील सार्वजनिक काकांच्या पुतळ्यासमोर काँग्रेस पक्षाने घंटानाद आंदोलन केले. सद्यस्थितीत मोदी सरकारला जागे करण्यासाठी हे आंदोलन केल्याचे मोहन जोशी यांनी सांगितले.

रूबी हॉल ते रामवाडी मेट्रो आणि लोहगाव विमानतळाचे टर्मिनल हे दोन प्रकल्प पुणेकरांच्या सोयीसाठी लवकरात लवकर कार्यान्वित होणे गरजेचे आहे. जनतेच्या कोट्यवधी रुपयांतून हे प्रकल्प उभे करण्यात आले आहेत. हे प्रकल्प पूर्णपणे तयार आहेत. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या प्रकल्पांच्या उदघाटनासाठी सोयीची वेळ मिळावी म्हणून उदघाटन लांबवले जात आहे. दि. १९ फेब्रुवारीला पंतप्रधानांच्या हस्ते विमानतळ टर्मिनलचे उदघाटन होणार म्हणून पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी तयारीसाठी अधिकाऱ्यांची बैठकही घेतली. प्रत्यक्षात उदघाटन झालेच नाही, हा संतापजनक प्रकार आहे. सरकारला जागे करण्यासाठीच सार्वजनिक काकांच्या पुतळ्याच्या साक्षीने काँग्रेस पक्षाने घंटानाद आंदोलन केले आहे. या मागण्यांसाठी यापुढेही सनदशीर मार्गाने तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा मोहन जोशी यांनी दिला.

या आंदोलनात संजय बालगुडे, दत्ता बहिरट, बुवासाहेब नलावडे, जयसिंग भोसले, बाळासाहेब मारणे, नीता रजपूत, शेखर कपोते, प्रशांत सुरसे, प्रथमेश आबनावे, शाबिर खान, राजेंद्र पडवळ, सुरेश कांबळे, चेतन अग्रवाल, राजेंद्र धनवडे, रोहन सुरवसे, स्वाती शिंदे, सौरभ आमराळे, गोरख पळसकर, बबलू कोळी, मंगेश थोरवे, मंगेश कोंडे, नितीन यल्लापूरे, अंजलीताई सोलापूरे, प्रथमेश लभडे, किशोर साळुंखे, संकेत गलांडे, सचिन बहिरट, वाहिद वीयाबानी, नरेश धोत्रे, प्रशांत ओव्हाळ, जीवन चाकणकर, विनय तांबटकर, महेश हराळे, आनंद खन्ना, प्रदीप किराड, अयुब पठाण, उमेश काची, चंद्रकांत चव्हाण, गोपाळ चव्हाण, गणेश उबाळे, प्रवीण बिराजदार, नरेश नलावडे, समीर गांधी, राजश्री अडसूळ आदी पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

अमित राज ठाकरे म्हणाले,धमाकोंकी जरुरत है..

पुणे-पुणे विद्यापीठ १९४९ चे विद्यापीठ आहे,तेव्हापासून आजपर्यंत जर मेसचे जेवण चांगले नाहीये अशा तक्रारी विद्यार्थी करत असतील तर मला वाटते..बहिरोंको सुनानेके लिये धमाकोंकी जरुरत है..अशा शब्दात आज राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी मोर्चाने निवेंदन दिल्यानंतर माध्यमांपुढे बोलतांना प्रतिक्रिया दिली.ज्या शहरात खासदार होण्यासाठी गुडघ्याला बाशिंगे लावून अतिउत्साही कार्यकर्ते गर्जना करत आहेत त्याच शहरात राज यांचे पुत्र पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना म्हणाले कि,मला निवडणूक लढविण्याची इच्छा नाही पण राज साहेबांनी सांगितले सरपंच हो तर ते सुद्धामी होईल.

अमित ठाकरे म्हणाले की,राज साहेबांनी जबाबदारी दिली,तर ते म्हणतील ते मी करणार.त्यांनी म्हटले तर लोकसभा लढवेल, विधानसभा लढवेल,नगरसेवक पण होईल, सरपंचदेखील होईल.पण माझी स्वत:ची निवडणूक लढवण्याची इच्छा नसल्याचं अमित ठाकरेंनी सांगितलं.मी जरी निरीक्षक म्हणून असलो तरी माझा अहवाल राज साहेब यांनाच देईल आणि तेच किती आणि कोणत्या जागा लढवायच्या कुणाला उमेदवारी द्यायची अगर नाही याचा निर्णय घेतील असे त्यांनी स्पष्ट केले.

अमित ठाकरे पुण्यात बोलतांना म्हणाले की,मी राजकारणात आल्यापासून पहिल्या राजकीय केसची वाट पाहत आहे.ती संधी पुणे विद्यापीठाने देऊ नये.मी त्यांना 8 दिवसांचा वेळ दिला आहे.त्या वेळेत त्यांनी कारवाई केली नाही.तर आम्ही आमच्या स्टाईलने आंदोलन करणार असल्याचा इशाराही अमित ठाकरे यांनी दिला आहे.यावेळी निकृष्ट पद्धतीने जेवण दिले जात असल्याचे पुरावे त्यांनी मध्यम प्रतिनिधींच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला.

शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात मोठ्या प्रमाणात ड्रग्ज पकडले जात आहे. हा अत्यंत गंभीर मुद्दा आहे. पुण्यात चार हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज पकडले गेले आहे. जर 4 हजार कोटींचे ड्रग्ज सापडत असतील, तर हे अवैध गुन्हे कमी करण्यास गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कुठेतरी कमी पडतांना दिसत आहे. जर एखाद्या शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सापडत असेल, तर त्याला सर्वस्वी जबाबदार हे गृहमंत्री असल्याचे अमित ठाकरे म्हणाले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे गंगापूर येथे अनावरण

0

अहिल्यादेवींचा राज्यकारभार प्रेरणादायक- उपमुख्यमंत्री अजित पवार

छत्रपती संभाजीनगर दि.२३- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी जनता सुखी, समाधानी व सुरक्षित रहावी, सामान्य माणसांना न्याय मिळावा यासाठी राज्यकारभार केला. अहिल्यादेवींनी केलेला राज्यकारभार हा प्रेरणा देणारा आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज गंगापूर येथे केले.

गंगापूर येथील जामगाव टी पॉइंट येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज झाले. आमदार सतीश चव्हाण, माजी आमदार कैलास पाटील, भूषणसिंह राजे होळकर,’राजे यशवंतराव होळकर प्रतिष्ठान’ चे अध्यक्ष रावसाहेब तोगे, माजी नगराध्यक्ष संजय जाधव, अरुण रोडगे यांच्यासह पदाधिकारी व प्रशासनातील अधिकारी, नागरिक उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्यात महिलांचा सन्मान केला. त्याच भोसले घराण्यात पुढे महाराणी तारामती व होळकर घराण्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या कर्तबगार महिलांनी उत्तम राज्यकारभार केला. त्यांचा राज्यकारभार आजही प्रेरणादायक आहे. ते पुढे म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे जन्मगाव असलेल्या चौंडी गावाच्या विकासाचा आराखडा तयार करण्याबाबत अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. सर्वांना अभिमान वाटावा, असे स्मारक चौंडीत उभारण्यात येईल व त्यासाठी भरीव निधी दिला जाईल. पुणे जिल्ह्यातील वाफगाव येथे किल्ला संवर्धनासाठी तातडीने निधी देऊ असेही त्यांनी सांगितले.

अहिल्यादेवींनी बांधलेले बारव तसेच त्यांनी केलेल्या अन्य कामांचे जतन करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील. बारामतीत एक हजार कोटीच्या निधीतून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची उभारणी केली असून या वास्तूला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असे नाव दिले आहे,असेही श्री. पवार यांनी सांगितले. या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अहिल्यादेवींचे स्मरण व्हावे, हाच त्यामागील हेतू आहे. आर्थिक व्यवहार काटेकोर असेल तर त्या राज्याची प्रगती होते, हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या राज्य काराभारावरून दिसते. प्रचंड संर्घषातून त्यांनी काम केले. त्याचा हाच आदर्श आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचा उल्लेख त्यांनी केला.

भूषणसिंह राजे होळकर म्हणाले, गंगापूर येथे उभारण्यात आलेले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक आपल्याला प्रेरणा देणारे ठरणार आहे. अहिल्यादेवींचे व्यवस्थापन, सैन्यांची व्यवस्था, मानवतावादी विचार, तसेच रयतेकडे त्यांचे असलेले लक्ष या बाबी महत्त्वाच्या असून त्यांचे परराष्ट्र धोरणही अत्यंत महत्त्वाचे आहे. आदर्श राज्य कसे असावे , हे त्यांनी आपल्या कार्यातून दाखवले असल्याचा उल्लेख त्यांनी केला.

यावेळी आमदार सतिष चव्हाण, माजी आमदार कैलास पाटील, श्री. रावसाहेब तोगे, माजी सभापती अरूण रोडगे यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमास परिसरातील नागरिक मोठ्या संख़्येने उपस्थित होते.

भाजपाचेही अनेकजण काँग्रेसच्या संपर्कात, एकच हातोडा मारु…म्हणाले ,नाना पटोले .

नागपूर, दि. २३ फेब्रुवारी
जागावाटपावरून महाविकास आघाडीत कसलेही मतभेद वा गोंधळ नसून गोंधळ हा महायुतीत आहे, त्यांच्यात काहीच ताळमेळ नाही. मविआतील सर्व मित्र पक्षांशी चर्चा सुरु असून बहुतांश जागा निश्चित झाल्या आहेत, लवकरच अंतिम निर्णय जाहीर केला जाईल. भाजपाला सत्तेतून हद्दपार करणे हाच महाविकास आघाडीचा मुख्य उद्देश आहे आणि आम्ही महायुतीचा मोठा पराभव करु, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.
नागपूर येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, महायुतीचे वातावरण राज्यात कुठेच नाही ते फक्त जाहिरातीतच दिसत आहे, जनतेच्या पैशाची उधळपट्टी करत वर्तमानपत्र, टीव्ही, सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी सुरु आहे परंतु जनभावना मात्र वेगळ्या आहेत. निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता भाजपा व त्यांच्या मित्रपक्षांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. बारामतीच्या जागेवरही शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच उमेदवार निवडून येणार आहे. भाजपा व त्यांचे मित्रपक्ष मीडियातून वातावरण निर्मिती करत आहेत प्रत्यक्षात चित्र वेगळे आहे. अजित पवार यांनी बारामतीत बिर्याणीचा कार्यक्रम ठेवला होता परंतु ते शरद पवारांविरोधात बोलायला लागले की लोक निघून गेले. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला तुतारी हे चिन्ह मिळाले आहे, एका हातात मशाल व दुसऱ्या हातात तुतारी हा भाजपाच्या तानाशाहीला संदेश आहे. या तुतारीत अत्याचारी व्यवस्थेला संपवण्याची क्षमता आहे. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जन्म दिला परंतु या अत्याचारी व्यवस्थेने त्यांचा पक्ष व घड्याळ चिन्हही चोरून घेतले.

काँग्रेसमधून काही लोक बाहेर जात आहेत या प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, सत्तेच्या जोरावर त्यांना जेवढे घ्यायचे आहेत तेवढे घेऊ द्या, त्यांच्या पक्षातील कितीजण आमच्या संपर्कात आहेत याची त्यांना कल्पना नाही. सत्तेच्या जोरावर जेवढा खेळ खेळायचा तेवढा त्यांना खेळू द्या, आम्ही एकच हातोडा मारू मग त्यांना कळेल, असेही नाना पटोले म्हणाले.

मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी प्रयत्न करावेत- मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

पुणे, दि.२३: लोकशाहीमध्ये मतदारांचा सहभाग महत्वाचा असल्याने निवडणूक आयोगाने सर्वसमावेशक निवडणूक प्रक्रियेवर भर दिला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणानी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन अपर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित समन्वयक अधिकारी यांच्या कामकाज आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, पुणे शहर अपर पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पिंपरी-चिंचवडचे अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, अतिरिक्त विभागीय आयुक्त अण्णासाहेब चव्हाण, जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर जिल्हाधिकारी अजय मोरे, उपायुक्त रामचंद्र शिंदे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, स्वीप समन्वयक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अर्चना तांबे आदी उपस्थित होते.

श्री. देशपांडे म्हणाले, निवडणुका हा लोकशाहीचा उत्सव असून यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे यासाठी दिव्यांग, महिला, युवक, तृतीयपंथी, ज्येष्ठ नागरिक, कामगार, कलावंत, साहित्यिक, नाटककार आदी सर्वांनाच मतदार नोंदणी करण्यासोबतच मतदान करण्याविषयी प्रात्सोहित करावे. महाविद्यालयासोबत बैठक घेऊन सर्व नवमतदारांच्या नोंदणीसाठी आवाहन करावे. महाविद्यालयात आयोजित करण्यात येणाऱ्या पालक सभेत मतदानाविषयी जनजागृती करावी.

सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे टपाली मतदान होईल, मतदानाच्यावेळी मतदान केंद्रांची माहिती होण्यासाठी मतदान माहिती पत्रिकेचे वितरण होईल, याची दक्षता घ्यावी. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मतदार संघामध्ये दिव्यांग, महिला, एकमेवाद्वित्तीय अशी आदर्श मतदान केंद्रे स्थापन करण्याबाबत कार्यवाही करावी.

अतिसंवेदनशील आणि संवेदनशील मतदान केंद्राला पोलीस विभागासोबत भेटीचे आयोजन करुन आवश्यक त्या सर्व सुरक्षेच्या आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्थांना मतदार नोंदणीप्रसंगी प्रशासनाच्यावतीने आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवाव्यात. महिला मतदारांची नोंदणी करुन मतदान जनजागृतीपर मेळावे आयोजित करण्यासोबतच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत करावेत.

मतदार यादीच्या माहितीचे (डाटा) दर आठवड्याला अवलोकन करावे. मतदार नोंदणीच्या अनुषंगाने प्राप्त सर्व अर्ज विहीत मुदतीत निकाली काढावे तसेच प्राप्त तक्रारीची गांभीर्याने दखल घेत निराकरण करावे. मतदार यादीचे शुद्धीकरण करण्यासाठी यासाठी त्यातील त्रुटीची पूर्तता करावी. या बाबी करताना राजकीय पक्षांना विश्वासात घेऊन कार्यवाही करा, असे निर्देश त्यांनी दिले.

समन्वयक अधिकाऱ्यांची भूमिका महत्वाची
सार्वत्रिक निवडणुकीच्यादरम्यान समन्वयक अधिकाऱ्यांची भूमिका महत्वाची असून त्यांना निवडणुकीबाबत सर्व टप्प्यांची माहिती असणे आवश्यक आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीबाबत मागितलेली माहिती वेळेत पाठविण्याची कार्यवाही करावी. त्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करावी.

ईव्हीएम यंत्राच्या सुरक्षितेच्यादृष्टीने आवश्यक त्या सर्व प्रतिबंधात्मक उपायोजना कराव्यात. निवडणुकीच्यावेळी माध्यमात येणाऱ्या नकारात्मक वृत्ताच्या अनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्याबाबत वस्तुनिष्ठ माहिती दिली पाहिजे, असेही श्री. देशपांडे म्हणाले.

डॉ. पुलकुंडवार म्हणाले, मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्याच्यादृष्टीने व्यापक जनजागृती मोहीम राबवावी. त्यामध्ये विविध सकारात्मक वृत्त विविध माध्यमाद्वारे प्रसारित करण्यात यावे. त्यामाध्यमातून मतदार प्रोत्साहित होऊन मतदानाच्या टक्केवारी वाढ होण्यास मदत होईल. मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, असेही डॉ. पुलकंडवार म्हणाले.

अमितेश कुमार म्हणाले, लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीसांचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात येत आहे. अतिसंवेदनशील आणि संवेदनशील मतदान केंद्राच्या अनुषंगाने परिसराला भेटी देण्यात येत असून त्यानुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. पोलीस दलाच्या टपाली मतदानासाठी आवश्यक ती सर्व प्रक्रिया करण्यात येईल, असेही श्री. कुमार म्हणाले.

डॉ. दिवसे म्हणाले, निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व संबंधित यंत्रणाचे प्रशिक्षण घेण्यात येत असून येत्या काळात पोलीस दलाचेही प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. दुर्गम (शॅडो) भागातील मतदान केंद्रांवरील संपर्क व्यवस्थेच्या अनुषंगाने सर्व संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत. मतदार नोंदणी व मतदानाच्या टक्केवारीत वाढ व्हावी म्हणून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. शैक्षणिक संस्था, औद्योगिक आस्थापना, महिला बचत गट, सामाजिक संस्था आदी सर्व संबंधित घटकांसोबत बैठक घेऊन मतदान जनजागृती करण्यात येत आहे, असेही ते म्हणाले.

बैठकीला जिल्ह्यातील समन्वयक अधिकारी उपस्थित होते.

यावेळी सर्व मतदार संघांचे सहायक निवडणूक अधिकारी आणि मतदार नोंदणी अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मतदार नोंदणी, मतदान केंद्रांची व्यवस्था, मतदार जनजागृती, मतदारांसाठी असलेल्या सुविधा, मतदान प्रक्रिया, शॅडो मतदान केंद्रे, टपाली मतपत्रिका, सुरक्षा व्यवस्था, ईव्हीएम, माध्यमे, निवडणुकीच्यावेळी उद्भवणाऱ्या संभाव्य घटना आदी बाबींचा आढावा घेण्यात आला.

मिटसॉगच्या १९ व्या बॅचच्या विद्यार्थ्यांची नुकतीच दिल्ली येथे भेंट

पुणे, दि.२३ फेब्रुवारी: सतत शिकत राहिल्याने ज्ञानाची तीव्र भूक ही शाश्वत वृध्दि आणि उत्कंठेमुळे जीवनाला सतत प्रेरक शक्ती मिळाली. त्यामुळेच वृद्धावस्थेतही मी शारीरिक आणि मानसिक स्तरावर तंदुरूस्त आहे. तसेच विद्यार्थ्यानी नम्रता, लवचिकता आणि ज्ञानाचा पाठपुरावा या सारखे गुण सतत अंगीकारावे. असा सल्ला प्रसिद्ध वकील फली.एस.नरिमन यांनी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्या १९व्या तुकडीच्या विद्यार्थ्यांना दिला.
त्यांच्या निधनाची बातमी आल्यानंतर एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, मिटसॉगचे शिक्षक व विद्यार्थ्यांनी त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली. येथील विद्यार्थ्यांनी १३ फेब्रुवारी रोजी दिल्ली येथे कायदेतज्ज्ञ फली.एस.नरिमन यांच्या राहत्या घरी भेट घेऊन त्यांच्याशी देशातील विविध कायदे व अन्य विषयांवर चर्चा केली. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक भाग म्हणजे अतिशय दयाळूपणाची झलक दिसत होती. गौरवशाली कारकिर्दी सांगितल्यानंतर त्यांच्यातील नम्रता आणि प्रामाणिकपणा दिसला. एक व्यक्ती म्हणून यशाची उंची गाठली होती. वकीली पेशातील जीवनकाळ उलगडतांना विजय आणि संकटाचे क्षण, आव्हानांत संधी शोधणे, स्पष्ट बोलणे, अनुभवातून शिकत रहाणे या गोष्टीं समोर आल्या. शेवटी त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना “फली एस नरिमन: बिफोर द मेमरी फेड्स” या आत्मचरित्राची पुस्तक भेट दिली.
नुकतेच त्यांच्या निधनाची बातमी आल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्याशी झालेल्या भेटीची आठवण सतत मनात तेवत आहे. खर्‍या सज्जन आणि विद्वान व्यक्तिला निरोप देतांना त्यांचा हा वारसा पुढच्या पिढ्यांसाठी टिकून राहणार आहे. त्यांची प्रेरणा, मार्गदर्शन हे सतत एक आदर्श व्यक्तीमत्व निर्माण करण्यासाठी आहे.

पश्चिम महाराष्ट्रात थकीत वीजबिलांच्या वसूलीची मोहीम वेगात शनिवारी, रविवारी वीजबिल भरणा केंद्र सुरू

पुणेदि फेब्रुवारी २०२४: पश्चिम महाराष्ट्रात घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील १४ लाख ८ हजार  वीजग्राहकांकडे २५३ कोटी ३१ लाख रुपयांची थकबाकी असल्याने वसूली मोहिमेला वेग देत वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. त्यामुळे वीजग्राहकांनी चालू व थकीत बिलांचा भरणा करून सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शनिवारी (दि. २४) व रविवारी (दि. २५) सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरू ठेवण्यात येणार आहे.

पुणे प्रादेशिक विभागात सद्यस्थितीत घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे (कंसात ग्राहक) पुणे जिल्हा- १६६ कोटी ७१ लाख रुपये (६,९८,५८६), सातारा १५ कोटी ७४ लाख (१,५१,८७८), सोलापूर- ३६ कोटी ५ लाख (२,१२,९६०), सांगली- १६ कोटी १३ लाख (१,५८,८९०) आणि कोल्हापूर जिल्ह्यात १८ कोटी ६७ लाख रुपयांची (१,८६,०६२) थकबाकी आहे. वीजबिलांचा नियमित भरणा होत नसल्याने महावितरणची आर्थिक स्थिती गंभीर झाली आहे. त्यामुळे वीजग्राहकांनी चालू व थकीत बिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक श्री. अंकुश नाळे यांनी केले आहे.

वीजग्राहकांना www.mahadiscom.in या वेबसाईटवर तसेच महावितरणच्या मोबाईल अॅपद्वारे केव्हाही व कुठूनही ऑनलाइन पध्दतीने विनामर्यादा वीजबिलाचा भरणा करता येतो. या व्यतिरिक्त महावितरणने ५ हजार रुपयांपेक्षा अधिक बिल असणाऱ्या सर्व लघुदाब ग्राहकांना आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे देयक भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यासाठी आवश्यक माहितीचा तपशिल संबंधित ग्राहकांच्या वीजबिलावर उपलब्ध आहे. सध्या सुरू असलेल्या महावितरणच्या धडक मोहिमेमध्ये वीजपुरवठा खंडित केलेल्या थकबाकीदारांच्या वीजजोडण्याची स्वतंत्र पथकाद्वारे तपासणी सुरू आहे. थकबाकीदार शेजाऱ्यांकडून किंवा इतर ठिकाणाहून वायर किंवा केबलद्वारे विजेचा वापर करीत असल्याचे आढळल्यास शेजारी व संबंधित थकबाकीदारांविरुद्ध भारतीय विद्युत कायदा २००३च्या कलम १३५/१३८ नुसार कारवाई करण्यात येत आहे.

भटक्या विमुक्त जमातीच्या मतदार नोंदणीबाबत मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून आढावा

पुणे, दि.२३ : राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी जिल्ह्यातील भटक्या विमुक्त जमातीसाठी काम करणाऱ्या संस्थांसोबत चर्चा करुन जास्तीत जास्त मतदार नोंदणीसाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर, स्वीप समन्वयक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अर्चना तांबे, शेवराई सेवाभावी संस्थेचे नामदेव भोसले व क्रांती संस्थेच्या सुनीता भोसले आदी उपस्थित होते.

श्री. देशपांडे म्हणाले, पुणे जिल्ह्यात भटक्या विमुक्त जमातीसाठी शिरुर व इंदापूर तालुक्यात घेण्यात आलेल्या मतदार नोंदणी शिबीरांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पारधी समाजाच्या मतदार नाव नोंदणीसाठी १८ जिल्ह्यांमध्ये काम सुरु आहे. त्यामुळे निश्चितच मतदार नोंदणी वाढेल. प्रत्येक तालुक्यात या जमातीच्या नागरिकांची यादी तयार करुन नाव नोंदणी वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत,असेही ते म्हणाले. श्री. देशपांडे यांनी मतदार नाव नोंदणीसाठी येणाऱ्या समस्या जाणून घेतल्या.

शिबीरांद्वारे भटक्या विमुक्त जमातीच्या नागरिकांना शिधापत्रिका, आधार कार्ड, जातीचे दाखले देण्याची सुविधाही देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी सांगितले. अशा प्रकारची शिबीरे जिल्ह्यात विविध ठिकाणी घेण्यात येतील असेही ते म्हणाले.

काँग्रेस पक्षाकडून राज्यातील २५२ विधानसभा मतदारसंघासाठी निरीक्षकांची नियुक्ती,पुण्यातील यादी पहा

मुंबई दि. २३ फेब्रुवारी-महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या मान्यतेने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यातील विधानसभा मतदारसंघासाठी निरीक्षकांची नियुक्ती केली आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष, संघटन व प्रशासन नाना गावंडे यांनी दिली आहे.

सोबत – विधानसभा निरीक्षकांची पुण्यातील यादी पहा

208 – Vadgaon Sheri-Smt. Kamal Vyavhare-7972152038

209 – Shivajinagar-Adv. Abhay Chhajed-9822023429

210 – Kothrud-Shri. Avinash Bagve-9822015712

211- Khadakwasala-Shri. Prithviraj Patil-9881199995

212 – Parvati-Shri. Ramesh Bagve9823210490

213-Hadapsar-Shri. Gopal Tiwari9822258860

214 – Pune Cantonment (SC)-Shri. Sunil Shinde-9881100410

215- Kasba Peth-Smt. Deepti Chavadhari-9823022181

204-Maval-Shri. Devidas Bhansali7507025000
205 – Chinchwad-Shri. Babasaheb Vishwanath Bansode 9850702828
206 – Pimpri (SC)
Shri. Somnath Tukaram Shelke-9209050322
207-Bhosari-Shri. Milind Mohan Fadtare 9420656388

195-Junnar-Shri. Shivajirao Jabhulkar9860207072

196-Ambegaon-Shri. Sopanrao Mhaske-9403046951

197- Khed Alandi-Shri. Nikhil Kavishwar-9822778970

198 – Shirur-Shri. Chandrakant Gore-9822024929

199- Daund-Shri. Kaka Devkar-9527840004

200 – Indapur-Shri. Nandkumar Malhari Jagtap-9552589940

201-Baramati-Shri. Vijay Jadhav

202-Purandar-Shri. Lahuanna Nivangune-9850711536

203 – Bhor-Shri. Kamlakar Satav-9422010167