Home Blog Page 112

मी खरातला भेटल्याच्या बातम्या खोट्या – विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे- नाशिक येथील ‘एक्सप्रेस इन’ हॉटेलमध्ये मी खरात नावाच्या व्यक्तीला ६-७ वर्षांपूर्वी किंवा अन्य कोणत्याही कारणासाठी भेटले, या वृत्ताचा मी स्पष्टपणे आणि निःसंदिग्धपणे इन्कार करते. अशा प्रकारच्या भेटीच्या बातम्या पूर्णतः कपोलकल्पित आहेत.असे स्पष्टीकरण विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले आहे.

नीलम गोऱ्हे यांनी पुढे असे म्हटले आहे कि,’ गेल्या चार दशकांपासून मी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय आहे. माझी संपूर्ण कारकीर्द एका स्फटिकाप्रमाणे स्वच्छ आणि पारदर्शी राहिली आहे, जी संपूर्ण जनतेसमोर आहे. माझ्या कामाची पद्धत आणि माझी तत्वे कधीही कोणापासून लपलेली नाहीत.माझे पंढरपूर येथील आजोबा दिवंगत ॲड. श्रीपाद देशपांडे आणि माझी आई लतिकाताई गोऱ्हे व शास्त्रज्ञ वडील डॅा. दिवाकर गोर्हे यांनी माझ्यावर जे आधुनिक संस्कार बिंबवले, त्याचे मी काटेकोरपणे पालन करत आले आहे. “कोणत्याही ढोंगी, ‘गुरूचा’ अवतार म्हणवणाऱ्या बुवांना भेटायचे नाही, त्यांच्या दर्शनाला जायचे नाही,” हा संस्कार मी आजही पाळते. माझी अढळ श्रद्धा देवदेवतांवर आणि अक्कलकोट स्वामी समर्थ , साईबाबा, गोंदवलेकर महाराज आणि गाणगापूर येथील श्री दत्त महाराजांवर आहे.
महिलांची प्रगती व सामाजिक न्याय यावर काम करत मी राजकारणात आले .मी प्रबोधनकारी हिंदुत्व मानते . राजकीय पदे किंवा मंत्रीपद मिळवण्यासाठी कधीही कोणत्याही तांत्रिक ‘गुरू’ची किंवा बुवाबाजीची गरज भासलेली नाही.

नाशिक येथील ‘एक्सप्रेस इन’ हॉटेलमध्ये मी खरात नावाच्या व्यक्तीला ६-७ वर्षांपूर्वी किंवा अन्य कोणत्याही कारणासाठी भेटले, या वृत्ताचा मी स्पष्टपणे आणि निःसंदिग्धपणे इन्कार करते. अशा प्रकारच्या भेटीच्या बातम्या पूर्णतः कपोलकल्पित आहेत.

माझी सामाजिक व राजकीय कृतिशीलता, विधानपरिषदेचे उपसभापती पद आणि मंत्री दर्जा यामुळे काही मोजक्या व्यक्तींमध्ये द्वेष निर्माण झाला आहे. अधिवेशन काळातील माझे संसदीय कार्य, सातारा एस.पी. निलंबन आदेशाची अंमलबजावणी आणि निरोपाच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांनी माझी जी प्रशंसा केली, ती काही हितशत्रूंना सहन झालेली नाही. विशेषतः पुणे महानगरपालिकेत ज्यांना यश मिळाले नाही, असे काही असंतुष्ट घटक माझ्याविरुद्ध हे विषारी षडयंत्र रचत आहेत.

ज्यावेळी ही बातमी आली, त्यावेळी २३ तारखेला अधिवेशन नुकतेच सुरू झाले होते. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची ‘SIT’ चौकशी आधीच म्हणजे १३ मार्च रोजी जाहीर केली होती. अशा वेळी पीठासीन अधिकारी (Presiding Officer) म्हणून मी काहीही भाष्य करणे हे संसदीय नियमांनुसार चौकशीत हस्तक्षेप ठरला असता. म्हणूनच, मी अधिवेशनाच्या काळात संयम राखला. मात्र, अधिवेशन संपताच २६ तारखेला आयोजित कार्यक्रमात मी माझी कठोर भूमिका स्पष्ट केली आहे. मी समाजात चांगल्याप्रकारे काम करत असल्यामुळे या खोट्या प्रचाराला उत्तर देणे मला आवश्यक वाटत नव्हते परंतु आजकालच्या परिस्थितीत खोटे बोलून कोलीत कोणाच्या हाती मिळू नये म्हणून मी ही वस्तुस्थिती मांडत आहे.याप्रकारच्या खोट्या प्रसिद्धीशी मुकाबला करायला मी सर्व प्रकारे सज्ज व समर्थ आहे.

​सत्याच्या बाजूने उभे राहून, अशा प्रकारच्या खोट्या प्रचाराने विचलित न होता माझ्या कार्याची गती यापुढेही अशीच कायम राहील.असेही डॉ. नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे.

अपोलो हॉस्पिटल्सच्या एअर ॲम्ब्युलन्स सेवेचे आधुनिकीकरण

अधिक सक्षम सेवेमुळे देशविदेशातील रुग्णांना मिळणार वेगवान उपचार

अनेक एअर ॲम्ब्युलन्स ऑपरेटरसोबत सामंजस्य कराररुग्णांची नेआण अधिक सुलभ करण्यासाठीउत्तम समन्वय राखण्यासाठी आणि हस्तांतरणाचा खर्च कमी करण्यासाठी विविध एअर ॲम्ब्युलन्स सेवा पुरवठादारांशी करार करण्यात आले आहेत.

१०६६ EMS – एकच संपर्क केंद्रसहयोगी कंपन्यांच्या मदतीने पुरवल्या जाणाऱ्या सर्व एअर ॲम्ब्युलन्स सेवांसाठी १०६६ EMS’ हे एकमेव समन्वयाचे केंद्र (Single Access Point) म्हणून काम करेल

पुणे-: अपोलो हॉस्पिटल्सने रुग्ण वाहतूक सुविधेबाबत‘ एक विशेष उपक्रम सुरु करत असल्याची घोषणा आज केली आहेभारत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध भागीदारांसोबत समन्वय साधून हवाई वैद्यकीय वाहतुकीद्वारे गंभीर स्थितीतील रुग्णांना प्रगत आरोग्य सेवा तातडीने उपलब्ध करून दिल्या जाव्यातहा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहेगेल्या काही महिन्यांतअपोलो हॉस्पिटल्सने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय एअर ॲम्ब्युलन्स कंपन्यांसोबत करार केले आहेतयामुळे तातडीच्या उपचारांची गरज असलेल्या रुग्णांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे आता अधिक सोपे आणि सुरक्षित होईलही सर्व सेवा अपोलोच्या १०६६ इमर्जन्सी रिस्पॉन्स नेटवर्क‘ द्वारे चालवली जाईलया अंतर्गत सर्व सेवा पुरवठादारांना एकत्र आणून रुग्णांची वाहतूक वेगाने आणि सुव्यवस्थित पद्धतीने करणे शक्य होईलअपोलो हॉस्पिटल्सच्या या नवीन भागीदारीमुळे आपत्कालीन वैद्यकीय प्रवासात येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेतदुर्गम किंवा लांबच्या ठिकाणाहून रुग्णांना आणताना होणारा विलंबजास्त खर्च आणि मध्यस्थांची गरज आता कमी होईलया नव्या उपक्रमामुळे रुग्णांची हवाई वाहतूक सेवा रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबासाठी अधिक सुलभ आणि विश्वासार्ह होणार आहे.

एअर ॲम्ब्युलन्स सेवा आता अधिक प्रगत आणि अधिक विस्तृत केल्याबाबतअपोलो हॉस्पिटल्सच्या उपाध्यक्ष डॉप्रीता रेड्डी म्हणाल्यागंभीर परिस्थितीतील रुग्णालायोग्य वेळी योग्य रुग्णालयात पोहोचवणे हे जीव वाचवण्यासाठी अत्यंत मोलाचे ठरतेनामवंत एअर ॲम्ब्युलन्स पुरवठादारांशी केलेल्या हातमिळवणीमुळेआता रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबांना प्रगत उपचार मिळवणे अधिक सोपे झाले आहेही सेवा केवळ शहरांपुरती मर्यादित नसून आंतरराष्ट्रीय स्तरावरही अधिक पारदर्शक आणि सुव्यवस्थित पद्धतीने उपलब्ध असेलआमच्या १०६६‘ रिस्पॉन्स नेटवर्कच्या मदतीने रुग्णांना उपचारांचे उत्तम नियोजन आणि रुग्णालयाची पूर्वतयारी अशा दोन्ही सुविधा मिळतीलयामुळे रुग्णांना हव्या त्या वेळी आवश्यक उपचार मिळण्यासाठी एक सुरक्षित आणि खात्रीशीर मार्ग तयार झाला आहे.”

पहिल्या टप्प्यातअपोलो हॉस्पिटल्सने देशविदेशातील रुग्णांच्या वाहतुकीसाठी अनेक एअर ॲम्ब्युलन्स सेवा पुरवठादारांशी करार केले आहेतयामध्ये ब्ल्युडॉट चार्टर्स अँड एअर ॲम्ब्युलन्स सर्व्हिसेस (युएई)एरोमेड इंटरनॅशनल रेस्क्यू सर्व्हिसेस प्रालि.झंकार एव्हिएशन प्रालि., iCATT हेल्थ सोल्युशन्स प्रालि.एअर रेस्क्युअर्स वर्ल्ड वाइड प्रालि.वेदांत एअर रेस्क्यू प्रालि.एरोकेअर एअर ॲम्ब्युलन्स सर्व्हिसआयुसेवा एअर अँड ट्रेन ॲम्ब्युलन्सएअर मेडिकल 24X7 प्रालिआणि फ्लॅप्स एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड यांचा समावेश आहेगंभीर स्थितीतील रुग्णाला तातडीने प्रगत उपचार केंद्रांमध्ये हलवणे आवश्यक असतेअशा वेळी सहयोगी कंपन्यांसोबत समन्वय साधून हवाई रुग्णवाहिका सेवा सहज उपलब्ध करून देणेहा या भागीदारीचा मुख्य उद्देश आहे.

अपोलो हॉस्पिटल्सच्या इमर्जन्सी विभागाचे क्लिनिकल डायरेक्टर डॉधवपलानी अलागप्पन म्हणालेएअर ॲम्ब्युलन्समध्ये लाइफसपोर्ट सिस्टमव्हेंटिलेटरडिफिब्रिलेटर आणि इतर प्रगत वैद्यकीय उपकरणे उपलब्ध असतातयामुळे अतिशय गंभीर रुग्णांना प्रवासादरम्यानही आयसीयू‘ सारख्याच सखोल देखभालीचा आधार मिळतोसंपूर्ण प्रवासातप्रशिक्षित वैद्यकीय पथक आणि प्रमाणित डॉक्टरांद्वारे रुग्णांचे सतत निरीक्षण केले जातेहे डॉक्टर रुग्णांना औषधे देऊ शकतात आणि त्यांना स्थिर ठेवण्यासाठीआराम मिळवून देण्यासाठी आवश्यक ते उपचारही करू शकतातक्रिटिकल केअर युनिटमध्ये मिळणारे वैद्यकीय उपचार प्रवासादरम्यानही कायम मिळत राहणे अत्यंत आवश्यक असते आणि ते मिळवून देण्यासाठी आम्ही सक्षम आहोत.”

अपोलो हॉस्पिटल्सच्या हेल्थकेअर लॉजिस्टिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉरामकृष्ण विजय वर्मा म्हणाले: “अपोलोच्या १०६६‘ या आपत्कालीन हेल्पलाइनवर विनंती आली कीतातडीने आमचे इमर्जन्सी रिस्पॉन्स पथक रुग्णाच्या प्रकृतीचा आढावा घेतेत्यानंतर प्रवासासाठी सर्वात योग्य मार्ग निश्चित केला जातो आणि आमच्या सहयोगी एअर ऑपरेटरच्या मदतीने वाहतुकीचे नियोजन केले जातेविमान वाहतुकीशी संबंधित सर्व तांत्रिक बाबींचे (लॉजिस्टिक्सव्यवस्थापन एअर ॲम्ब्युलन्स ऑपरेटरद्वारे केले जातेया सेवेचा दर आधीच निश्चित असल्याने आणि यामध्ये मध्यस्थांना कोणताही वाव नसल्यामुळेअलीकडे या सेवेचा लाभ घेणाऱ्या रुग्णांची मोठी आर्थिक बचत झाली आहे.”

हा उपक्रम अपोलोच्या सध्याच्या आपत्कालीन पायाभूत सुविधांना देशभरातील १०६६‘ नेटवर्कशी जोडतोयामध्ये अपोलोची आपत्कालीन समन्वय क्षमताजमिनीवरील रुग्णवाहिका सेवाविमानतळ ते रुग्णालय कनेक्टिव्हिटी आणि भागीदारांमार्फत चालवली जाणारी हवाई वाहतूक यांचा समावेश आहेयामुळे रुग्णांना एका बेडवरून दुसऱ्या बेडपर्यंत पोहोचवण्यासाठी संपूर्ण सहकार्य मिळेल आणि प्रतिसादाची कार्यक्षमता सुधारेलपरिणामीदुर्गम भागटियर आणि टियर शहरे तसेच आंतरराष्ट्रीय ठिकाणांहून येणाऱ्या रुग्णांना कोणत्याही अडथळ्याशिवाय प्रगत उपचार मिळणे शक्य होईल.

हा उपक्रम सुरु करूनअपोलो हॉस्पिटल्स आपली आपत्कालीन रुग्ण वाहतूक सेवा आणि रुग्णांना मिळणारे उपचार अधिक सुलभ करण्यावर अधिक भर देत आहेप्रगत उपचारांसाठी वेळेला खूप जास्त महत्त्व असतेत्यामुळे शहरांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय वैद्यकीय वाहतुकीसाठी अपोलोने एक अधिक संघटितसुव्यवस्थितसक्षम चौकट तयार केली आहे.

पल्स वैद्यकीय परिषद 2026 यशस्वी; आरोग्य क्षेत्रास परिवर्तनाची नवी दिशा: वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

15 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या

मुंबई, दि. 28 : आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात नव्या दिशेने वाटचाल करण्यासाठी पल्स वैद्यकीय परिषद 2026 महत्त्वपूर्ण ठरली असून, या परिषदेतून नवोन्मेष, गुंतवणूक आणि सहकार्याचे नवे मार्ग खुले झाले आहेत, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

समारोप सत्रास संबोधताना मंत्री श्री मुश्रीफ म्हणाले की, बल्क ड्रग पार्क आणि औषधनिर्मिती क्षेत्रावरील चर्चांमुळे स्वावलंबनाला चालना मिळणार असून, स्टार्टअप्सच्या सहभागामुळे नव्या व्यवसाय संधी निर्माण होत आहेत. या उपक्रमाचा सुमारे चार हजार विद्यार्थी, आरोग्य व्यावसायिक, संशोधक आणि ग्रामीण भागातील नागरिकांना—थेट लाभ होणार आहे.

दोन दिवसीय परिषदेचा आढावा घेताना मंत्री मुश्रीफ म्हणाले की, ‘महाराष्ट्र घोषणापत्र’मुळे सहकार्य, पायलट प्रकल्प आणि व्यापक उपाययोजनांसाठी स्पष्ट दिशा मिळाली आहे. यामुळे परिषद केवळ चर्चांपुरती मर्यादित न राहता प्रत्यक्ष परिणाम देणारी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पल्स वैद्यकीय परिषद 2026 मध्ये शासन, शैक्षणिक संस्था, उद्योग आणि आंतरराष्ट्रीय भागीदार एकत्र आल्यास आरोग्य क्षेत्रात मोठे परिवर्तन शक्य असल्याचे स्पष्ट झाले. कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल हेल्थ, गुणवत्तापूर्ण वैद्यकीय शिक्षण, क्लिनिकल नवकल्पना आणि प्रतिबंधात्मक आरोग्य या क्षेत्रांमध्ये सखोल चर्चा झाली. परिषदेत उच्चस्तरीय राऊंड टेबल बैठका, विविध सत्रे आणि प्रदर्शने यांमधून तंत्रज्ञानाधारित आणि रुग्णकेंद्रित आरोग्य व्यवस्थेकडे महाराष्ट्राची वाटचाल अधोरेखित झाली. तसेच शिक्षण, संशोधन आणि डिजिटल आरोग्य क्षेत्रात 15 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्याची माहितीही त्यांनी दिली.

जागतिक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय सहकार्याची गरज अधोरेखित करताना मंत्री मुश्रीफ म्हणाले की, आरोग्य क्षेत्रातील सहकार्य सीमांच्या पलीकडे जाऊन होणे आवश्यक आहे. परिषदेत मांडलेल्या कल्पनांना कृतीत उतरवून अधिक सुलभ, परवडणारी आणि भविष्याभिमुख आरोग्य व्यवस्था उभारण्याची वेळ आली आहे, असेही आवाहन करत मत्री मुश्रीफ यांनी केले. यावेळी वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

एमपीएससी गट-ब परीक्षेसाठी प्रोत्साहनपर अर्थसहाय्य योजना; अर्ज करण्याचे आवाहन

0

पुणे, दि. 30 : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) तर्फे राज्यातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील लक्षित गटातील उमेदवारांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) गट-ब (अराजपत्रित) सेवा मुख्य परीक्षा व मुलाखत पूर्वतयारीसाठी प्रोत्साहनपर अर्थसहाय्य योजना (सन २०२५-२६) राबविण्यात येत आहे.

सन २०२५-२६ मधील गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-२०२५ उत्तीर्ण उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून इच्छुकांनी www.mahaamrut.org.in⁠ या संकेतस्थळावर अर्ज सादर करावा. अर्ज भरण्यापूर्वी सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.

या योजनेअंतर्गत पात्र उमेदवारांना मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी रु. १०,००० तर मुलाखतीच्या तयारीसाठी रु. ५,००० इतके अर्थसहाय्य दिले जाणार आहे. योजनेविषयीची सर्व माहिती अमृतच्या अधिकृत संकेतस्थळावरच प्रसिद्ध केली जाईल.

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २७ एप्रिल २०२६ असा आहे. अधिक माहितीसाठी संबंधित जिल्हा अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा.असे आवाहन अमृतचे व्यवपकीय संचालक यांनी केले आहे.
0000

स्पेनने म्हटले- इराणविरोधातील युद्ध आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विरोधात,अमेरिकेसाठी हवाई हद्द बंद केली:लष्करी तळाच्या वापरावरही बंदी घातली

वॉशिंग्टन डीसी-स्पेनने इराणविरुद्धच्या युद्धात सहभागी असलेल्या अमेरिकी लष्करी विमानांसाठी आपली हवाई हद्द बंद केली आहे. लष्करी तळांच्या वापरावरही बंदी घालण्यात आली आहे.

स्पेनच्या संरक्षण मंत्री मार्गारीटा रोब्लेस यांनी सांगितले की, इराणशी संबंधित कोणत्याही लष्करी कारवाईसाठी देश आपली हवाई हद्द आणि लष्करी तळ वापरू देणार नाही. या निर्णयानंतर, अमेरिकी विमानांना आपले मार्ग बदलावे लागतील, मात्र मानवतावादी आणि आपत्कालीन उड्डाणांना यातून वगळण्यात आले आहे.

स्पेनचे अर्थमंत्री कार्लोस कुएर्पो यांनी सांगितले की, एकतर्फी आणि आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विरोधात असलेल्या युद्धाला पाठिंबा न देण्याच्या आधारावर हा निर्णय घेण्यात आला आहे.

स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांनी यापूर्वीच अमेरिका-इस्रायलच्या लष्करी कारवाईवर टीका केली आहे. या निर्णयाला प्रत्युत्तर म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापारविषयक कारवाईची धमकी दिली आहे. या निर्णयामुळे अमेरिका आणि स्पेन यांच्यातील राजनैतिक तणाव वाढण्याची शक्यता आहे.
इस्रायलचा तेहरानमधील विद्यापीठावर हल्ला
इस्रायली लष्कराने इराणची राजधानी तेहरानमधील एका विद्यापीठावर हवाई हल्ला केल्याचे म्हटले आहे. लष्कराच्या म्हणण्यानुसार, या संस्थेचा वापर लष्करी तळ म्हणून केला जात होता, त्यामुळेच तिला लक्ष्य करण्यात आले.

मात्र, इस्रायलने या दाव्याच्या समर्थनार्थ कोणताही पुरावा सादर केलेला नाही. इराणने अद्याप या हल्ल्यावर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. झालेल्या नुकसानीचे प्रमाण अज्ञात आहे.

इराणच्या ऊर्जा प्रकल्पांना नष्ट करण्याची ट्रम्प यांची धमकी
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला इशारा दिला आहे की, जर होर्मुझची सामुद्रधुनी तात्काळ उघडली नाही आणि करार झाला नाही, तर अमेरिका त्यांचे ऊर्जा प्रकल्प नष्ट करेल.

सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात ट्रम्प म्हणाले की, वीज प्रकल्प, तेल विहिरी आणि खार्ग बेट पूर्णपणे नष्ट केले जातील. गरज पडल्यास खारपाणी शुद्धीकरण प्रकल्पांनाही लक्ष्य केले जाऊ शकते, असेही ते म्हणाले.

ट्रम्प यांनी दावा केला की, अमेरिका एका नवीन आणि अधिक समंजस शासनासोबत वाटाघाटी करत आहे आणि त्यात प्रगती होत आहे. तथापि, लवकरच करार न झाल्यास लष्करी कारवाई तीव्र केली जाईल, हे त्यांनी स्पष्ट केले.

अमेरिकन सैनिक आणि इतरांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी ही कारवाई केली जाईल, असे त्यांनी म्हटले. ज्यासाठी त्यांनी इराणला जबाबदार धरले.

अभिनेते शरद पोंक्षेंचा भाजप नेत्यांना इशारा-भाजपची काँग्रेस करू लागला तर RSS कट्टर हिंदुत्व बाळगणाऱ्या 10 भाजप उभ्या करू शकतो

RSS भाजपसारखे 10 पक्ष उभे करू शकतो:आम्हाला कुणीच हरवू शकत नाही या भ्रमात राहू नका,
नागपूर -भाजपची काँग्रेस व्हायला लागली तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कट्टर हिंदुत्व बाळगणाऱ्या 10 भाजप उभ्या करू शकतो, असा खणखणीत इशारा ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी सत्ताधारी भाजपला दिला आहे. आम्हाला कुणीच हरवू शकत नाही. आता आम्हीच आहोत, या अहंकारात भाजपने राहू नये, असेही ते यावेळी म्हणाले.

शरद पोंक्षे नागपूर येथे राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने आयोजित 3 दिवसीय रामस्मरण व्याख्यानमालेचे द्वितीय पुष्प गुंफताना भारत एक हिंदू राष्ट्र या विषयावर बोलत होते. रेशीमबागेतील महर्षी व्यास सभागृहात हा कार्यक्रम झाला. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारमुळे आज हिंदू धर्माला चांगले दिवस आले. मधल्या काळात काँग्रेस नेते राहुल गांधी पंतप्रधान झाले असते तर देशाचे वाटोळे झाले असते. काँग्रेसच्या कोणत्याही आंदोलनाने देशाचे भले झाले नाही. त्यांच्या कोणत्याही आंदोलनामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले नाही. मुळात हा पक्षच ब्रिटिशांनी स्थापन केला आहे.

शरद पोंक्षे यांनी यावेळी मनुस्मृती जाळणाऱ्यांनी ती वाचली नसल्याचाही दावा केला. हिंदू धर्मातील प्रत्येक धर्मग्रंथ महान आहेत. हजारो वर्षांपूर्वी आमच्याकडे सर्व शोध लागले. मोठमोठ्या आजारांची माहिती आमच्या धर्मग्रंथांमध्ये नमूद आहे. पण मेकॉलेच्या शिक्षण पद्धतीने आमचा धर्म, संस्कृती व परंपरांचा अभ्यास करू न देता केवळ गुलाम केले. मनुस्मृतीमध्ये कुणालाही दुय्यम वागणूक दिली नाही. ती जाळणाऱ्यांनी वाचली नाही. वाचली असती तर ते जाळूच शकले नसते, असे ते म्हणाले.
भारत हिंदू राष्ट्र घोषित करा

स्वातंत्र्याला 79 वर्षे लोटले तरी हिंदूबहुल भारतात हिंदूंनाच स्वतःच्या अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागतो ही एक मोठी शोकांतिका आहे. हिंदू समाज संघटित होऊन स्वतःच्या हक्कांप्रती पूर्णपणे जागृत होत नाही, तोपर्यंत हिदूंचे प्रभावी एकत्रीकरण होणार नाही. भारत हिंदू राष्ट्र होता, आहे व राहील. पण आता प्रत्यक्ष अधिकृतरित्या भारत हिंदू राष्ट्र घोषित व्हावा, असेही पोंक्षे यावेळी बोलताना म्हणाले.

शरद पोंक्षे यांनी यावेळी संघात भाजपसारखे 10 पक्ष उभे करण्याची ताकद असल्याचेही ठणकावून सांगितले. आज भारतात हिंदूंचे सण, उत्सव मोठ्या थाटात साजरे केले जात आहेत. केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमुळे आज गर्वाने म्हणा आम्ही हिंदू आहोत असे म्हणण्याची ताकद मिळाली आहे. याचे संपूर्ण श्रेय मोदींसोबत संघाला जाते. 100 वर्षांत अनेक उपेक्षा सहन करूनही संघ आज ताठ उभा आहे. संघ ही भाजपची आहे आहे. पण भाजपची काँग्रेस व्हायला लागली तर अशा 10 भाजप संघ उभा करू शकतो. पुन्हा 10-15 वर्षे वाट पाहावी लागली तरी चालेल. पण कट्टर हिंदूंच्या 10 भाजप उभ्या करण्याची ताकद राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आहे, असे ते म्हणाले.

VIT च्या विद्यार्थ्यांकडून ‘स्पंदन’ उपक्रमांतर्गत सिंहगड गडसंवर्धन व खडकवासला स्वच्छता मोहीम

पुणे-—
विष्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (VIT) च्या सोशल वेलफेअर डेव्हलपमेंट कमिटी
अंतर्गत टीम स्पंदन तर्फे सिंहगड किल्ल्यावर गड संवर्धन मोहीम तसेच खडकवासला धरण
परिसरात स्वच्छता अभियान यशस्वीरित्या पार पडले.
या उपक्रमामध्ये 80 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी
परिसरातील प्लास्टिक व इतर कचरा गोळा करून 25 पेक्षा अधिक पोते म्हणजेच 300+
किलो कचरा संकलित केला, ज्यामुळे ऐतिहासिक व नैसर्गिक वारसा जपण्याचा महत्त्वपूर्ण
संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यात आला.
या उपक्रमाचे नेतृत्व सार्थक देशमुख आणि रुचिता बाबर यांनी केले. विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध
पद्धतीने किल्ला व धरण परिसर स्वच्छ करत “आपला वारसा जपूया, पर्यावरण वाचवूया”
हा संदेश दिला.
गड-किल्ले हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे व पराक्रमाचे जिवंत प्रतीक असून
त्यांचे जतन व संवर्धन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. ऐतिहासिक वारसा
जपण्याबरोबरच समाजात स्वच्छतेबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम
राबविण्यात आला. किल्ल्यांचे महत्त्व ओळखून त्यांचे संवर्धन करणे हीच महाराजांना खरी
आदरांजली असल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.या मोहिमेचा उद्देश तरुणांमध्ये

सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संरक्षणाची जाणीव आणि
ऐतिहासिक वारसा जतन करण्याची भावना निर्माण करणे हा होता.
VIT च्या विद्यार्थ्यांनी समाजासाठी केलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
भविष्यातही Team स्पंदन तर्फे अशा सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन
करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

विशेष डिजिटल शेती शाळेचे एप्रिल महिन्यात आयोजन

पुणे, दि.३०: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आणि पानी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एप्रिल महिन्यात चार विशेष डिजिटल शेती शाळांचे आयोजन करण्यात आले असून शेतकरी, महिला गट, शेतकरी गट आदींनी शेतीशाळांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

शेतीचा उत्पादन खर्च कमी करणे आणि प्रतिकूल परिस्थितीतही शेतकऱ्यांच्या उत्पन्नाची हमी देण्याच्या उद्देशाने कृषी विभागांतर्गत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामार्फत महाराष्ट्र राज्याकरिता ‘हवामान अनुकूल तंत्रज्ञान अभियान’ सुरु आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी कृषी विभागाबरोबरच, कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे, उमेद, माविम, पशुसंवर्धन विभाग आदी यंत्रणादेखील सहभागी होत आहेत. हवामानातील वाढती अनिश्चितता, पावसाचा खंड आणि नैसर्गिक आपत्तींमुळे पारंपारिक कोरडवाहू शेतीचा उत्पादन खर्च वाढत आहे. या अभियानांतर्गत राज्यातील सर्व प्रकारच्या पीक पद्धतींना उपयुक्त असणाऱ्या तंत्रांची माहिती एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विद्यापीठे आणि कृषी विभागातील तज्ञ आणि प्रगतशील शेतकरी यांचेमार्फत या डिजिटल शेतीशाळामध्ये ज्ञानाचे आदान प्रदान होणार आहे.

डिजिटल शेतीशाळांचा दिनांक आणि विषय:
१ एप्रिल रोजी पेरणीपूर्व तंत्रज्ञान – बेड तयार करणे व बेडवर टोकण करणे, शून्य/कमीत कमी मशागत करणे , आंतरपीक पद्धत, बियाणे उगवण क्षमता तपासणी आणि बीजप्रक्रिया.
८ एप्रिल – जैविक व नैसर्गिक निविष्ठा उत्पादन- बीजामृत, जीवामृत, लिंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, ट्रायकोडर्मा तयार करण्याच्या पद्धती व फायदे.
१५ एप्रिल- एकात्मिक कीड व्यवस्थापन- सापळा पिके, पक्षी थांबे, चिकट सापळे, मित्र किटकांचे संवर्धन, लिंबोळी आणि दशपर्णी अर्काचा वापर.
२२ एप्रिल रोजी भात शेतीसाठी सुधारित लागवड तंत्र- भाताची थेट पेरणी (डीएसआर), श्री पद्धत आणि भात लावणीसाठी यांत्रिकी पद्धत याविषयांवर शेतीशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत.

सर्व शेतीशाळा संबंधित तारखांना सायंकाळी ७.३० वाजता सुरु होणार असून या शेती शाळांचे थेटप्रसारण कृषी विभाग, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, पानी फाउंडेशन आणि उमेद यांच्या युट्यूब चॅनेलवर केले जाणार आहे.

शेतकरी, महिला गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे सदस्य, कृषी मंडळे, बिजोत्पादक, फार्मर कप स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणारे निमंत्रक व शेतकरी गट, वनपट्टे धारकांनी मोठ्या संख्येने डिजिटल शेती शाळांना जॉईन व्हावे, असे आवाहन कृषी विभाग आणि नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामार्फत करण्यात आले आहे.

मंगळवार पेठेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक विस्तारीकरणाला गती,जागा हस्तांतरणासाठी प्रयत्न; तांत्रिक प्रक्रिया लवकर पूर्ण होणार

पुणे: मंगळवार पेठेतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या विस्तारीकरणाचा प्रश्न लवकर सोडवण्यासाठी महापालिका प्रशासन सक्रिय झाले आहे. राज्य सरकारच्या रस्ते विकास महामंडळाच्या मालकीची जागा पुणे महानगरपालिकेकडे हस्तांतरित करून त्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिष्ठेला साजेसं भव्य स्मारक उभारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, अशी माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली.

रिपब्लिकन पक्षाचे नेते व पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा केली. यावेळी बाळासाहेब जानराव, राहुल डंबाळे, महिपाल वाघमारे, उमेश कांबळे, जयदेव रंधवे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत राज्य सरकारकडून स्मारकाबाबत सकारात्मक विचार सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे स्मारक उभारणीच्या प्रक्रियेत कोणतीही अडचण येणार नाही, असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला. तसेच आवश्यक तांत्रिक बाबींची पूर्तता शक्य तितक्या लवकर करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, चर्चेनंतर शिष्टमंडळाने समाधान व्यक्त करत, गरज भासल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व संबंधित अधिकाऱ्यांची पुन्हा भेट घेऊन पुढील पाठपुरावा केला जाईल, असे स्पष्ट केले.

यावेळी पदाधिकाऱ्यांनी ठाम भूमिका मांडत सांगितले की, मंगळवार पेठ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारण्यासाठीचा लढा कोणत्याही परिस्थितीत सुरूच राहणार आहे. हा लढा पक्षीय राजकारणापलीकडे जाऊन व्यापक सामाजिक चळवळ म्हणून पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. राजकीय हेवेदावे आणि आरोप-प्रत्यारोप दुर्दैवी असून, स्मारक उभारणी हाच आमचा एकमेव उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले.

भाजपा महायुती सरकारची शेतकरी कर्जमाफी म्हणजे ‘लबाडाघरचे जेवण’; शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करा, शेतमालाला हमीभाव द्या: हर्षवर्धन सपकाळ

फडणवीस सरकारकडून महाराष्ट्रधर्म व संविधानांच्या मुल्यांची पायमल्ली; गोलवलकरांचे ‘बंच ऑफ थॉट’ लादण्याचा डाव.

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या नेतृत्वाखालील सुरतगाव ते तुळजापूर ‘शेतकरी संघर्ष न्याय यात्रेला’ दांडगा प्रतिसाद.

मुंबई/तुळजापूर, दि, ३० मार्च

शेतकरी अस्मानी सुलतानी संकटाने त्रस्त असून शेतमालाला योग्य भाव मिळत नाही, आत्महत्या वाढल्या आहेत, त्यातच मोदी सरकारने अमेरिकेसमोर सरेंडर होत व्यापार करार केल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे, या करारामुळे भारतातील शेती व शेतकरी उद्ध्वस्थ होणार आहे. भाजपा सरकार शेतकरी विरोधी असून फडणवीस सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी म्हणजे ‘लबाडाघरचे जेवण, जेवल्याशिवाय खरे नाही’, फडणवीस खोटारडे आहेत, जेव्हा कर्जमाफी मिळेल तेव्हाच खरे, असे म्हणत शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेस पक्षाने धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील सुरतगाव ते तुळजापूर शेतकरी संघर्ष न्याय यात्रेचे आयोजन केले होते. या यात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी काँग्रेस सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, यात्रेचे समन्वयक प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस जितेंद्र देहाडे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आदित्य अशोकराव पाटील, दादासाहेब मुंडे, अमर खानापुरे, धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष धीरज पाटील, जिल्हा काँग्रेसचे संघटक राजेंद्र शेरखाने, प्रदेश काँग्रेसचे सचिव पांडुरंग कुंभार, प्रशांत पाटील, अग्नीवेश शिंदे, उमेश राजे निंबाळकर, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष विलास शाळू बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल सोनावणे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅड. किरण जाधव, नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेश पावडे यांच्यासह प्रदेश पदाधिकारी कार्यकर्ते, महिला व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. काँग्रेस नेते, पदाधिकारी यांच्यासह महिला व शेतकरी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. सकाळी सुरु झालेल्या या यात्रेचा समारोप तुळजापूर येथील शारदा मंगल कार्यालयात सभेने झाला. LPG गॅस संकटाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी LPG गॅस ठेवलेले ट्रॅक्टर लोकांचे लक्ष वेधून घेत होते. दुपारच्या सत्रात तुळजापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून यात्रेची सुरुवात झाली व त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीची महाआरती करण्यात आली.

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपा सरकारचा खरपूस समाचार घेतला, ते पुढे म्हणाले की, देशात व महाराष्ट्रात भाजपा सरकारचा अनागोंदी कारभार सुरु आहे. शेतकरी, कष्टकरी, महिला, तरुणांचे प्रश्न गंभीर आहेत, महागाई, बेरोजगारी वाढली आहे, LPG सिलेंडर व पेट्रोल,डिझेल मिळत नाही पण सरकार त्याकडे लक्ष देत नाही. देशात हुकूमशाही लादण्याचा प्रयत्न सुरु असून संविधानाची पायमल्ली करून गोलवळकरांच्या ‘बंट ऑफ थॉट’ला अभिप्रेत भारत निर्माण करण्याचे षडयंत्र सुरु आहे तर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रधर्माची पायमल्ली करत आहेत. या महाराष्ट्रधर्म बुडव्यांना आई तुळजाभवानी सुबुद्धी देवो व संविधानाला अभिप्रेत भारत घडू दे, असे साकडे घातल्याचेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण अशोभनीय व किळसवाणे..

नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावर बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, शिव, शाहू, फुले, आंबेडकरांच्या पुरोगामी विचाराच्या राज्यात प्रतिगामी विचार फोफावत असल्याने खरात सारख्या भोंदूबाबांची संख्या वाढत आहे. अशोक खरात प्रकरणातून जे काही उघड होत आहे ते किळसवाणे असून महाराष्ट्रासाठी अशोभनीय आहे. या प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घेऊन प्रकरणावर पडदा टाकता येणार नाही, तर यामध्ये जे मंत्री, आमदार, खासदार, सरकारी अधिकारी यांचा सहभाग आहे त्या सर्वांवर अंधश्रद्धाविरोधी कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे व या प्रकरणातील मास्टरमाईंड कोण हे समोर आले पाहिजे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरात प्रकरणाचा छडा लावल्याच्या फुशारक्या मारू नयेत. ८-९ महिन्यांपासून त्यांच्याकडे याची माहिती होती, तर एवढा वेळ ते काय झोपा काढत होते काय? असा प्रश्न विचारून महाराष्ट्राला पूर्णवेळ गृहमंत्री मिळाला पाहिजे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

पुणे, पिंपरी – चिंचवडमध्ये पाऊस; वातावरणात गारवा

पुणे-राज्यात आज पुणे व वाशिम जिल्ह्यासह अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. सोमवारी दुपारी अचानक झालेल्या या पावसामुळे उन्हामुळे हैरान झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. पण त्याचवेळी शेतात उभ्या पिकांचे चांगलेच नुकसान झाले.
पुणे शहरात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. त्यानंतर दुपारी अचानक पुणे शहर विशेषतः बाणेर, बालेवाडी परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यात बाणेर परिसरात मोठी गारपीट झाली. यामुळे रस्त्यांवर गारांचा खच पडल्याचे दिसून आले. सखल भागांत पाणी साचल्याचेही दिसून आले. विजांच्या कडकडाटासह सुरू झालेल्या या पावसामुळे शहरात दुपारच्यावेळीच अंधार झाल्याचे चित्र होते. जवळपास अर्धा तास ही स्थिती होती. या अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली. त्यांनी मिळेल तिथे आसरा घेऊन स्वतःचा पावसापासून बचाव केला.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, राज्यात आजपासून 4 एप्रिलपर्यंत ढगाळी वातावरण व दुपारनंतर होणाऱ्या वादळी पावसाचे नवे सत्र सुरू होणार आहे. त्यात प्रामुख्याने खान्देश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातील जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट, वादळी वारे, पाऊस व काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे. उर्वरित विदर्भातही काही प्रमाणात हवामानात बदल दिसून येऊ शकतो.

…पुणे शहरासह उपनगरांत आज दुपारी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. कडक उन्हाने हैराण झालेल्या शहरवासियांना काहीसा दिलासा मिळाला, मात्र अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. औंध,बाणेर, बालेवाडी, म्हाळुंगे, सिंहगड रस्ता, नगर रस्ता, वडगाव शेरी, विमान नगर, चंदन नगर, कल्याणी नगर या भागात मुसळधार पाऊस झाला.

बाणेर येथे गारांचा जोरदार पाऊस सुरू आहे. तर लोहगाव परिसरात विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाच्या पावसाने हजेरी लावली. तर मुंढवा, केशवनगर कोरेगाव पार्क खराडीतही पाऊस झाला. वाघोली, फुरसुंगीतही मुसळधार पाऊस झाला.

पुण्यातील काही भागात रस्त्यांवर पाणी साचलं आहे. बी टी कवडे रस्त्यावर जागोजागी पाणी साचले असून वाहनचालकांना वाहने चालवताना त्रास सहन करावा लागत आहे. तर विमाननगर गंगापूरम चौकात पाणी साचल्याने वाहतूक थांबली आहे. विमानतळ रस्त्यावर यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे .घोरपडी गावात ही मोठ्या प्रणावर पाणी साचलं असून वाहनचालक साचलेल्या पाण्यातून गाड्या चालवत आहेत.

कधी-कुठे पावसाची शक्यता?

30 मार्चच्या तुलनेत 31 मार्च रोजी एकंदरीत वादळी पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. पण या भागांमध्ये काही प्रमाणात अस्थिर हवामान व वादळी पाऊस पडू शकतो. त्यानंतर 1 ते 4 एप्रिलपर्यंत वादळी पावसाचे प्रमाण वाढण्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे या कालावधीत मध्य महाराष्ट्र, खान्देश, मराठवाडा व विदर्भातील अनेक ठिकाणी ढगाळी वातावरण, दुपारनंतरचा वादळी पाऊस व काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांना पुढील काही दिवस हवामानाच्या स्थितीनुसार शेतीची कामे नियोजित करावीत, सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू असल्याने काढणी केलेली पिके सुरक्षित साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी, तसेच वादळी वारे, पाऊस व संभाव्य गारपीटीपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन केले आहे. मेघगर्जना व विजेच्या कडकडाटाच्या वेळी नागरिकांनी व शेतकऱ्यांनी स्वतःची तसेच पाळीव जनावरांची सुरक्षितता सुनिश्चित करावी. अशा वेळी झाडाखाली, टिनशेडखाली, तसेच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीजेचे खांब व विद्युत वाहिन्यांच्या जवळ उभे राहणे टाळावे, असेही आवाहन या प्रकरणी करण्यात येत आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे बुधवार – गुरूवारी राज्यातील काही भागांत तापमानाचा पारा 39 अंशावर पोहोचला होता. परभणी जिल्हा राज्यातील सर्वाधिक उष्ण जिल्हा ठरला असून बुधवारी येथे 39.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. त्यानंतर सोलापूरमध्ये 39 अंश सेल्सिअस, तर जळगावमध्ये 38.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. मराठवाड्यातील काही भागांत पारा 37 अंश सेल्सिअसवर पोहोचला होता. या आठवड्यात होणाऱ्या पावसामुळे हा पारा उतरण्याची शक्यता असली तरी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

पुणे प्रार्थना समाजाच्या चैत्रोत्सवाला शुक्रवारपासून सुरुवात

हरी मंदिर प्रवेशाला ११७ वर्षे पूर्ण
पुणे : पुणे प्रार्थना समाजाच्या हरी मंदिर प्रवेशाला यंदा ११७ वर्षे पूर्ण होत असून, त्या निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या चैत्रोत्सवाला शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. ८ एप्रिल १९०९ (चैत्र वद्य षष्ठी) हा हरी मंदिर प्रवेश दिन म्हणून साजरा केला जातो. या परंपरेनुसार दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पुणे प्रार्थना समाजाच्या विश्वस्त व सहचिटणीस नमिता मुजुमदार यांनी दिली.

चैत्रोत्सवानिमित्त शनिवार, ४ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता अर्थविश्लेषक अभय टिळक यांचे व्याख्यान होणार आहे. त्यानंतर रविवार, ५ एप्रिल रोजी ब्राह्मो परंपरेतील सहाव्या पिढीतील रेखा शहानी यांची ईश्वरोपासना आयोजित करण्यात आली आहे. बुधवार, ८ एप्रिल रोजी विचारवंत भास्कर मुजुमदार यांची ऑनलाइन ईश्वरोपासना होणार आहे.

 शनिवार, ११ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता डॉ. दिलीप जोग व डॉ. सुषमा जोग यांची संगीतोपासना रंगणार असून, रविवार, १२ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता त्यांची ईश्वरोपासना होणार आहे.

चैत्रोत्सवातील सर्व कार्यक्रमांना नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पुणे प्रार्थना समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

तांत्रिक बिघाडामुळे लिफ्ट कोसळून तरुणाचा करुण अंत; सोसायटीच्या चेअरमनसह 11 जणांवर गुन्हा दाखल


पुणे:येथील एका गृहनिर्माण संस्थेमध्ये लिफ्टचा रोप (दोरी) तुटून झालेल्या भीषण अपघातात एका 25 ते 30 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी लिफ्टच्या देखभालीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत, तळेगाव दाभाडे पोलिसांनी सोसायटीचे
चेअरमन आणि इतर 11 कमिटी सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.मयत दिनेश सुरंगे हे आपल्या कामासाठी लिफ्टने खाली जात असताना ही दुर्घटना घडली. लिफ्ट सहाव्या आणि सातव्या मजल्याच्या दरम्यान अचानक तांत्रिक बिघाडामुळे अडकली. दिनेश यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच, अचानक लिफ्टचा मुख्य रोप (लोखंडी दोरी) तुटला. यामुळे लिफ्ट सातव्या मजल्यावरून प्रचंड वेगाने थेट तळमजल्यावर कोसळली.

या भीषण अपघातात दिनेश सुरंगे यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे परिसरात आणि गृहनिर्माण संस्थेत मोठी खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

मयत दिनेश यांच्या भावाने याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सोसायटीच्या कमिटीने लिफ्टच्या नियमित सर्व्हिसिंग आणि देखभालीकडे दुर्लक्ष केल्यामुळेच माझ्या भावाचा जीव गेला, असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. त्यानुसार पोलिसांनी सोसायटीचे चेअरमन आणि इतर 11 सदस्यांवर भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

रशिया कोणत्याच देशाला देणार नाही पेट्रोल

0

नवी दिल्ली:युद्धामुळे जगातील सर्वात मोठा तेल उत्पादक देश असलेल्या रशियाने मोठा निर्णय घेतला आहे. जागतिक बाजारात रशियाच्या या निर्णयाने खळबळ उडालीय. रशिया सरकारने अधिकृत घोषणा केलीय की एक एप्रिलपासून गॅसोलिन (पेट्रोल) निर्यातीवर पूर्णपणे बंदी घातली जाणार आहे
मध्य पुर्वेत सुरू असलेल्या यु्दधामुळे अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव वाढला आहे. युद्दामुळे कच्च्या तेलाच्या किंमती भडकल्या आहेत. आता यातच रशियाने घेतलेल्या निर्णयाचा फटका रशियावर अवलंबून असलेल्या देशांना बसणार आहे. यात तुर्की, चीन, ब्राझील, आफ्रिका आणि सिंगापूर या देशांचा समावेश आहे.

देशांतर्गत बाजारातील इंधनाच्या किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी रशियाने हा निर्णय घेतलाय. रशियात पेट्रोलची मागणी वाढली असून सरकारने देशातील नागरीक आणि उद्योगांना पुरेसं इंधन योग्य दरात मिळावं यासाठी निर्यात बंदी घातलीय. इराण अमेरिका युद्धामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. परिणामी रशियाने आपल्या ऊर्जा सुरक्षेला प्राधान्य दिलं आहे. रशियन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार निर्यातबंदीमुळे देशातील रिफायनरीमधील साठा सुरक्षित राहील आणि महागाई नियंत्रणात ठेवता येईल.

रशियाकडून थेट पेट्रोलची आयात करणाऱ्या देशांसाठी हा निर्णय धक्कादायक आहे चीन, तुर्की, ब्राझील, सिंगापूर या देशांवर निर्यात बंदीचा मोठा परिणाम होणार आहे. याशिवाय आफ्रिकेतील अनेक देश स्वस्तातल्या रशियन तेलावर अवलंबून आहेत. आता रशियाच्या निर्यातबंदीच्या निर्णयामुळे या देशांना इतर पर्यायांचा शोध घ्यावा लागेल. इतर पर्याय या देशांसाठी महागडे ठरणारे आहेत. याचा परिणाम संबंधित देशांमध्ये महागाईवर होऊ शकतो. पेट्रोलच्या किंमतीत वाढही होऊ शकते.

मध्य पुर्वेत सुरू असलेल्या संघर्षामुळे लाल समुद्रातून होणारा व्यापार धोक्यात आला आहे. रशियाने निर्यात बंदी केल्यामुळे हा धोका आणखी वाढला आहे. जर ही बंदी जास्त काळ राहिली तर जगभरातील शेअरबाजार आणि वाहतूक खर्च यावर नकारात्मक परिणाम होईल.

भारत एकूण कच्च्या तेलापैकी बहुतांश कच्चं तेल रशियाकडून स्वस्तात खरेदी करते. मात्र रशियाने पेट्रोलवर बंदी घातली आहे. कच्च्या तेलावर नाही. त्यामुळे भारताला आवश्यक असलेलं कच्चं तेल मिळण्यात अडचण येणार नाही. कच्चे तेल खरेदी करून भारतात त्याचं रिफायनिंग होऊ शकते. रशियाच्या या निर्णयाचा थेट भारतावर परिणाम होणार नाही. मात्र कच्च्या तेलाच्या किंमती आणखी वाढल्यास भारतातही पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

‘राग प्रहराच्या संकल्पनेपासून मुक्त’ अशा अद्‌भुत सादरीकरणाला रसिकांची भरभरून दाद

पुणे : ‘राग प्रहराच्या संकल्पनेपासून मुक्त’ या रागप्रभा संगीतोत्सवात ‘मारवा’, ‘केदार’, ‘बिहाग’, ‘जोग बहार’, ‘मालकंस’, ‘जोग’ आदी सायंकालीन व रात्रौकालीन रागांचा आनंद रसिकांना सकाळच्या प्रहरात अनुभवायला मिळाला. कालप्रहराचे बंधन न स्वीकारता झालेले सादरीकरण रसिकांनी सहजतेने स्वीकारत त्यांचा आनंद घेत उपक्रमाला भरभरून दाद दिली.

डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशन आयोजित ‘राग प्रहराच्या संकल्पनेपासून मुक्त’ रागप्रभा या संगीतोत्सव व परिसंवादाचे आयोजन रविवारी (दि. २९) बालगंधर्व रंगमंदिरात करण्यात आले होते. सकाळी ९ ते दुपारी २ या वेळात पद्श्री पंडित व्यंकटेशकुमार, पद्मश्री पंडित रोणु मजुमदार, पंडित आनंद भाटे तसेच पद्मभूषण पंडित साजन मिश्रा व स्वरांश मिश्रा यांचे सादरीकरण झाले.

संगीतोत्सवाचे उद्‌घाटन पंडित अरुण कशाळकर, पद्मश्री पंडित व्यंकटेशकुमार यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. या प्रसंगी डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. अशोक वळसंगकर, विश्वस्त डॉ. रघुवीर कुलकर्णी, ॲड. अनिरुद्ध वळसंगकर, कार्यक्रम निर्देशक प्रसाद भडसावळे मंचावर होते.

बदलांमुळे नवीन विचारांना स्थैर्य : पंडित अरुण कशाळकर…

उद्‌घाटनपर मनोगत व्यक्त करताना पंडित अरुण कशाळकर म्हणाले, सांगीतिक क्षेत्रात परंपरा कितीही घट्ट असल्यातरी कालानुरूप त्यात बदल होत असतात. हे बदल होणे म्हणजेच कला जीवंत असण्याचे लक्षण होय. बदलांची प्रक्रिया सातत्याने घडत असते आणि या बदलांमुळे नवीन विचारांना स्थैर्य मिळते. बदलाची ही प्रक्रिया सातत्याने सुरू राहणे आवश्यक असून त्या करिता विचारांचे अदानप्रदान होणे गरजेचे आहे. कलाकार या बदलातून कलेला एक दिशा देण्याचे कार्य करीत असतात. हे रुजलेले बदल परंपरा रूपाने पुढे येत जातात.

पंडित व्यंकटेशकुमार म्हणाले, ‘राग प्रहराच्या संकल्पनेपासून मुक्त’ ही अभिवन संकल्पना राबविणारे पुणे हे पहिले शहर आहे, याचे कौतुक वाटते.

संगीतोत्सवाची सुरुवात पंडित व्यंकटेशकुमार यांच्या गायनाने झाली. त्यांनी सायंकालीन राग म्हणून प्रचलित असलेला राग मारवा सादर करून त्यानंतर राग केदारची झलक दर्शविली. सायंकाळी व्याकुळ करणाऱ्या स्वरांची जादू रसिकांना सकाळच्या प्रहरातही मोहित करून गेली. त्यांना सुयोग कुंडलकर (संवादिनी), भरत कामत (तबला), शिवराज पाटील, नागराज नागेश (तानपुरा) यांनी समर्पक साथसंगत केली.

या नंतर पंडित रोणु मजुमदार यांचे बासरीवादन रंगले. त्यांनी रात्रीच्या पहिल्या प्रहरात सादर होणारा राग बिहाग अतिशय तरलतेने साकारला. कुठलाही राग कुठल्याही वेळी प्रभाव पाडू शकतो या प्रभाताईंच्या विचाराला समर्पक असे हे सादरीकरण रंगले. यानंतर त्यांनी मैहर घराण्याचे वैशिष्ट्य दर्शवत राग जोगबहार या जोड रागाची झलक ऐकविली. त्यांच्या सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध झाले. पंडित रामदास पळसुले (तबला), कल्पेश माचला (बासरी सहवादन) यांनी रंगतदार साथ केली.

पंडित आनंद भाटे यांनी रात्रीच्या दुसऱ्या प्रहरात गायला जाणारा राग मालकंस ऐकवून रसिकांना संमोहित केले. त्यानंतर राग बसंत मल्हारमधील सुमधुर रचना सादर केली. त्यांना सुयोग कुंडलकर (संवादिनी), भरत कामत (तबला), स्वप्नील गायकवाड, ललित देशपांडे (तानपुरा) यांनी साथ केली.

सकाळच्या सत्राची सांगता बनारस घराण्याचे सुप्रसिद्ध गायक पंडित साजन मिश्रा व त्यांचे सुपुत्र स्वरांश मिश्रा यांच्या गायनाने झाली. त्यांनी जोग रागाचे मनमोहक दर्शन घडवत रसिकांना अनोखा आनंद दिला. प्रभा अत्रे या फक्त गायिकाच नव्हे तर एक महान चिंतक होत्या, असे सांगून रागप्रहराच्या पलिकडे जाऊन केलेले सादरीकरण हे त्यांच्या संकल्पनेला अनुरूप असल्याचे पंडित साजन मिश्रा म्हणाले. चारूकेशी रागातील गुरूंचे महात्म्य सांगणाऱ्या बंदिशीने त्यांनी मैफलीची सांगता केली. स्वरांश मिश्रा यांच्या सादरीकरणालाही रसिकांनी भरभरून दाद दिली. राहुल गोळे (संवादिनी), सौरभ गुळवणी (तबला), निषाद व्यास, अथर्व वैरागकर (तानपुरा, सहगायन) यांनी साथ केली.