Home Blog Page 107

अखिल भारतीय पशु-पक्षी प्रदर्शन महा पशुधन एक्स्पो, २०२६अधिकृत लोगोचे निवासी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते अनावरण

पुणे, दि ११ फेब्रुवारी २०२६ः महाराष्ट्र शासनाच्या पशुसवर्धन विभागाच्या वतीने आगामी १३ ते १५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत परळी वैजनाथ (जि. बीड) येथे आयोजित करण्यात आलेल्या ऐतिहासिक ‘अखिल भारतीय पशु पक्षी महा पशुधन एक्स्पो, २०२६ प्रदर्शनाच्या अधिकृत लोगोचे निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात अनावरण करण्यात आले.

यावेळी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ राजेशकुमार वासनिक, डॉ. विष्णू गर्जे, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, डॉ प्रवीण पवार सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन व विभागाचे इतर अधीकारी उपस्थित होते.

श्रीमती कदम म्हणाल्या, पशुपालन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. परळी वैजनाथ येथे होणारे हे प्रदर्शन देशातील जातीवंत पशुधन आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा संगम असणार आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायातील जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान घरबसल्या पाहायला मिळणार आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक पशुपालक, तरुण उद्योजक आणि शेतकरी बाधवानी मोठ्या सख्येने या प्रदर्शनास भेट द्यावी, असे आवाहन श्रीमती कदम यांनी केले.

राज्यातील व राज्याबाहेरील जातीवत गायी, म्हशी, शेळ्या-मेंढ्या आणि पक्ष्याच्या विविध प्रजातींचे दर्शन घडणार आहे. आधुनिक डेअरी फार्मिंग, चारा नियोजन आणि प्रक्रिया उद्योगांचे भव्य स्टॉल्स असणार आहेत. पशुधनाचे आरोग्य, लसीकरण आणि वैज्ञानिक संगोपन यावर तज्ज्ञ पशुवैद्यकांची विशेष व्याख्याने आयोजित केली आहेत, अशी माहिती डॉ. राजेशकुमार वासनिक यांनी दिली.

जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकीय संस्था, पंचायत समिती आणि सार्वजनिक ठिकाणी बॅनर व पोस्टर्सच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. विविध समाज माध्यमाच्याद्वारे माध्यमातूनही माहिती उपलब्ध करुन देण्यात येणार आहव. तरी, जिल्ह्यातील सर्व पशुपालक बांधवानी या महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

विंगमॅनएक्स अवॉर्ड्स 2025-26 पुण्यात 15 फेब्रुवारीला

पुणे:

भारताच्या राइडिंग समुदायासाठी एक ऐतिहासिक क्षण ठरणाऱ्या विंगमॅनएक्स अवॉर्ड्स 2025-26 चे उद्घाटन 15 फेब्रुवारी 2026 रोजी हॉटेल हयात पुणे येथे होणार आहे. भारतातील आघाडीचे कम्युनिटी-टेक व्यासपीठ विंगमॅनएक्स, मोटरसायकलस्वारांसाठी समर्पित या पहिल्या राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांचे आयोजन करत आहे. हा कार्यक्रम केवळ आमंत्रित व्यक्तींसाठीच विशेष प्रवेश आहे.

राइडर-नेतृत्वाखालील सन्मानासाठी राष्ट्रीय मापदंड ठरणाऱ्या या पुरस्कारांचा उद्देश भारतीय मोटरसायकलिंगची खरी ओळख ठरवणाऱ्या चिकाटीशिस्तजबाबदारी आणि समुदायभावना यांचा गौरव करणे हा आहे. भारतात प्रथमच राइडिंग परिसंस्थेला मुल्यवर्धित करणाऱ्या गुणांसाठी राइडर्स आणि राइडिंग समुदायांचा राष्ट्रीय स्तरावर सन्मान केला जाणार आहे.

एका राइडरच्या गरजेतून उगम पावलेले आणि वाढत्या समुदायाने घडवलेले विंगमॅनएक्स अवॉर्ड्स, देशभरातील मोटरसायकलिंग संस्कृतीला शांतपणे बळकट करणाऱ्या व्यक्ती आणि क्लब्सचा सन्मान करतात.

या पुरस्कारांमध्ये एकूण 20 निवडक श्रेणी आहेत, ज्यात वैयक्तिक उत्कृष्टता आणि सामूहिक समुदाय प्रभाव या दोन्हींचा समावेश आहे. सुरक्षित राइडिंगचे नेतृत्व, लांब पल्ल्याचे राइडिंग, महिला राइडर्स आणि समुदाय-नेतृत्वाखालील उत्कृष्टतेचा गौरव करणाऱ्या श्रेणी यात समाविष्ट असतील. यामध्ये गार्डियन राइड अवॉर्डलाँग हॉल लेजेंड्सशी राईड्स फ्रीक्लब ऑफ  इयरसेफ्टीफर्स्ट क्लब अशा श्रेणींचा समावेश आहे.

या उपक्रमामागील दृष्टीकोन स्पष्ट करताना निलेश सानेसीईओ आणि संस्थापकविंगमॅनएक्स म्हणाले, “विंगमॅनएक्सची सुरुवात राइडर्सना योग्य राइडिंग साथीदार शोधण्यात मदत करण्याच्या साध्या कल्पनेतून झाली. कालांतराने ते विश्वास, जबाबदारी आणि समुदायभावनेवर उभे असलेले एक व्यापक परिसंस्था बनले. विंगमॅनएक्स अवॉर्ड्स हे अशा राइडर्सचा सन्मान करण्याचे आमचे माध्यम आहे, जे रोज या मूल्यांनुसार जगतात आणि कोणतीही प्रसिद्धीची अपेक्षा ना करता, भारताची मोटरसायकलिंग संस्कृती घडवतात.”

याच भावनेला दुजोरा देताना उर्वशी पाटोले, पार्टनर – कम्युनिटी आणि मार्केटिंग म्हणाल्या, “राइडिंग विश्वात अनेकदा दुर्लक्षित राहणाऱ्या सातत्य, शिस्त आणि उत्कटतेचा हा सन्मान आहे. मोटरसायकलिंग संस्कृती सतत विकसित होत असते आणि विंगमॅनएक्स अवॉर्ड्स दरवर्षी वाढत जाण्यासाठी सुरू केले गेले आहेत. हे पुरस्कार राइडर्सना केवळ त्यांनी किती अंतर प्रवास केला यासाठी नव्हे, तर त्यांनी समुदायाला कसे उंचावले यासाठी सन्मानित करतात.”

डॉसाहिल त्रिंबकेसहसंस्थापकविंगमॅनएक्स यांनी पुढे सांगितले, “मोटरसायकलिंग म्हणजे केवळ राइडिंग कौशल्य नाही; ते निर्णयक्षमता, जबाबदारी आणि रस्त्यावर एकमेकांची काळजी घेण्याची भावना आहे. विंगमॅनएक्स अवॉर्ड्स अशा राइडर्स आणि समुदायांचा सन्मान करतात, जे आपल्या कृतीतून ही मूल्ये स्थापित करतात, केवळ कामगिरीतून नव्हे. या मूल्यांचा सार्वजनिक गौरव करून आम्ही देशभरात अधिक सुरक्षित आणि जबाबदार राइडिंग संस्कृतीला प्रोत्साहन देण्याची अपेक्षा ठेवतो.”

या पुरस्कारांच्या केंद्रस्थानी आहे विंगमॅनएक्स अॅप – राइडर्सनी राइडर्ससाठी तयार केलेले भारतातील अग्रगण्य कम्युनिटी-टेक व्यासपीठ. भारतातील विखुरलेल्या राइडिंग विश्वाला एक सुसंगत डिजिटल आधार देणारे हे अॅप राइड ट्रॅकिंगक्लब मॅनेजमेंटसुरक्षा वैशिष्ट्येसत्यापित राइड प्रोफाइल्स आणि समुदाय शोध अशा सुविधा पुरवते. अलीकडेच यात राइड बॅजेसराइडदरम्यान लाईव्ह ग्रुप लोकेशन ट्रॅकिंग आणि पीअरआधारित राइड रेटिंग्स ही नवीन वैशिष्ट्ये जोडण्यात आली आहेत, ज्यामुळे जबाबदारीची भावना अधिक बळकट होते.

80,000 हून अधिक अॅप डाउनलोड्स आणि 500 पेक्षा जास्त राइडिंग क्लब्स आधीच सक्रिय असलेल्या विंगमॅनएक्स प्लॅटफॉर्मवर, भारतीय मोटरसायकलस्वार कसे जोडले जातात, कसे राइड करतात आणि एकत्र कसे प्रगती करतात याची व्याख्या सतत नव्याने केली जात आहे.

विंगमॅनएक्स अवॉर्ड्स 2025-26 हे वार्षिक उपक्रम म्हणून संकल्पित असून, येत्या काळात भारतीय मोटरसायकलस्वारांसाठी सर्वात विश्वासार्ह आणि प्रेरणादायी सन्मान मंच ठरण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा आहे.

विंगमॅनएक्स विषयी:

विंगमॅनएक्स हे भारतातील आघाडीचे कम्युनिटी-टेक परिसंस्था आहे, जे तंत्रज्ञान, समुदाय आणि सामायिक अनुभवांच्या माध्यमातून अधिक सुरक्षित, जबाबदार आणि परस्पर जोडलेली राइडिंग संस्कृती घडवण्यावर लक्ष केंद्रित करते. हे ॲप गूगल प्ले आणि ॲप स्टोअरवर उपलब्ध आहे.

दिल्ली विजय आणि पानिपत बदला विजयसोहळा उत्साहात संपन्न

पुणे : भारत इतिहास संशोधक मंडळ व श्री देवदेवेश्वर संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘दिल्ली विजय आणि पानिपत बदला विजयसोहळा’ मंगळवारी सायंकाळी मोठ्या उत्साहात व गौरवशाली वातावरणात संपन्न झाला. मराठ्यांच्या शौर्य, पराक्रम आणि ऐतिहासिक विजयाची स्मृती जागवणारा हा सोहळा इतिहासप्रेमींसाठी प्रेरणादायी ठरला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण केले  तसेच माधवराव पेशवे, महादजी शिंदे व तुकोजी होळकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात झाली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. रमेश भागवत यांनी केले. यावेळी व्यासपीठावर एअर चीफ मार्शल प्रदीप वसंत नाईक (निवृत्त), एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त),  पांडुरंग बलकवडे, सरकार उत्तमराव शिंदे , दकुमार निकम,  यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांचा शाल व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात येणार आहे. यामध्ये एअर चीफ मार्शल प्रदीप वसंत नाईक (निवृत्त) आणि एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांचा विशेष सन्मान करण्यात आला.  तसेच पानिपत शौर्यदिनाचा कार्यक्रम महादजी शिंदे छत्री, वानवडी (पुणे) येथे गेली आठ वर्षे सातत्याने आयोजित केला जात असून या उपक्रमाला महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल   उत्तमराव शिंदे सरकार यांचा आणि पांडुरंग बलकवडे, पुष्करसिंह पेशवे, अभिमन्यू होळकर,  गुरुड रणजितसंह यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी  शिंदे सरकारचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रमुख अतिथी एअर चीफ मार्शल प्रदीप वसंत नाईक यांनी आपल्या मनोगतात मराठ्यांच्या रणनिती, शिस्त आणि राष्ट्रभक्तीचा गौरव केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले यांनी पानिपतनंतरच्या मराठा विजयाचे ऐतिहासिक महत्त्व विशद करत हा विजय केवळ लष्करी नसून स्वाभिमान आणि आत्मविश्वासाचा विजय असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक  रमेश भागवत यांनी केले तर  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  गुरुप्रसाद कानिटकर यांनी केले आणि  नंदकुमार निकम यांनी आभार प्रदर्शन व्यक्त केले.

उपमहापौर परशुराम वाडेकर अ‍ॅक्शन मोडमध्ये; पहाटे ६ वाजता औंध–बोपोडी प्रभागाची पाहणी

पुणे : पुणे महानगरपालिकेचे नवनिर्वाचित उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी पदभार स्वीकारताच कामाला सुरुवात केली असून ते अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसून आले आहेत. आज पहाटे ६ वाजता त्यांनी औंध–बोपोडी प्रभागात प्रत्यक्ष फील्डवर उतरून नागरिकांच्या विविध समस्या आणि नागरी सुविधांची पाहणी केली.

या पाहणी दौऱ्यात उपमहापौर वाडेकर यांनी बोपोडी आरोग्य कोठी, नाईक चाळ, भीमज्योत नगर, सर्व्हे नं. २६, पठाण चाळ, रेल्वे गेट, गांधी नगर, भोईटे चाळ तसेच मुंबई–पुणे रोडवरील गेट क्रमांक २० या भागांना भेटी दिल्या.

यावेळी औंध वार्ड कार्यालयाचे महापालिका सहाय्यक आयुक्त विजय नायकर, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक विजय भोईर, ए.एस.आय. विनायक चोपडे, संतोष शेलार, मुकादम सोनम गायकवाड, सुपरवायझर पुरुषोत्तम कांबळे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

पाहणीदरम्यान ड्रेनेज लाईन, कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक शौचालये व मुताऱ्या, रस्त्यांची दुरवस्था तसेच पथदिवे यासंदर्भातील नागरिकांच्या तक्रारी उपमहापौर वाडेकर यांनी जाणून घेतल्या. या सर्व समस्यांवर तातडीने व प्रभावी कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

महावितरणचा ‘सुरक्षा मंत्र’; प्रत्येक सोमवारी १४१४ तांत्रिक कर्मचारी घेताहेत विद्युत सुरक्षेची शपथ

0

मुंबई, दि. ११ फेब्रुवारी २०२६: विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राथमिकता देत ‘शून्य विद्युत अपघात’ उदिद्ष्टासाठी महावितरणने राज्यातील उपविभाग व शाखा कार्यालयांमध्ये प्रत्येक सोमवारी किंवा आठवड्याच्या पहिल्या दिवशी कामाची सुरवात विद्युत सुरक्षा शपथेने करण्याचे निर्देश एका परिपत्रकाद्वारे नुकतेच दिले आहे. कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेत विद्युत सुरक्षिततेचे महत्त्व रुजवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी शून्य विद्युत अपघात उद्दिष्टाची प्रभावी व सातत्याने अंमलबजावणी करण्याची सूचना केलीत्याप्रमाणे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांनी विद्युत सुरक्षेबाबत उपाययोजना व लोकसहभागातील उपक्रमांना वेग दिला आहे. ‘अभियंते व कर्मचाऱ्यांसाठी विद्युत सुरक्षा ही केवळ नियमावली नसून दैनंदिन कामाचा एक भाग आहे. प्रत्येक जीव मौल्यवान असल्याने शून्य विद्युत अपघात‘ हेच महावितरणचे ध्येय आहे. त्यामुळे विद्युत सुरक्षेचे कायम तंतोतंत पालन करावे’, असे आवाहन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी केले आहे.

विद्युत सुरक्षेबाबत सजग व सतर्क राहावे यासाठी महावितरणच्या ६६४ उपविभाग व ३२९१ शाखा कार्यालयांमध्ये प्रत्येक सोमवार हा सुरक्षा दिवस ठरविण्यात आला आहे. प्रत्येक सोमवारी किंवा आठवड्यातील कामाच्या पहिल्या दिवशी या दोन्ही कार्यालयातील अभियंते व तांत्रिक कर्मचारी सकाळी कामाची सुरुवात सुरक्षा शपथेने करीत आहे. त्यानंतर सर्व तांत्रिक कर्मचाऱ्यांच्यावैयक्तिक सुरक्षा उपकरणे व तांत्रिक साधनांची तपासणी करण्यात येत आहे. ते सुस्थितीत असल्याची खात्री केल्यानंतरच क्षेत्रीय कामांना सुरुवात होत आहे.

यासोबतच तांत्रिक कर्मचाऱ्यांसोबत आयोजित सर्व बैठकींची सुरवात देखील विद्युत सुरक्षा शपथेनेचकरण्यात येणार आहे. या सर्व उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सुरक्षा अधिकारी म्हणून मंडलस्तरावरकार्यकारी अभियंता (प्रशासन) आणि विभागस्तरावर अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांच्यावर देण्यात आली आहे.

केंद्रीय विद्युत प्राधीकरणाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार महावितरणने कर्मचाऱ्यांसह नागरिकांच्या विद्युत सुरक्षेसाठी विविध उपाययोजना व उपक्रमांना मोठी गती दिली आहे. जून २०२५ मध्ये महावितरणच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त विद्युत सुरक्षेच्या जनजागृतीसाठी राज्यभरात विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. यामध्ये तब्बल २ लाख ११ हजारांवर नागरिकशालेय विद्यार्थीअभियंताअधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. यासह २ कोटी ८५ लाख वीजग्राहकांना विद्युत सुरक्षेचा थेट वैयक्तिक संदेश देण्यात आला. या अभियानाची जागतिकस्तरावर नोंद घेण्यात आली. तसेच सुरक्षितपणे देखभाल व दुरूस्तीचे कामे करण्यासाठी तांत्रिक कर्मचाऱ्यांना महावितरणकडून २० ते २५ प्रकारचे वैयक्तिक व कॉमन सुरक्षा साधने देण्यात येतात. ही सुरक्षा साधने आवश्यकतेनुसार व मागणीप्रमाणे संबंधित कर्मचाऱ्यांना तात्काळ देण्यासाठी स्वतंत्र ‘टी अॅण्ड पी रजिस्टर मॉड्यूल’ कार्यान्वित करण्यात आले आहे.

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारी पासून, अर्थसंकल्प ६ मार्च रोजी

0

मुंबई, दि. १० : राज्य विधिमंडळाचे मुंबईत होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज सोमवार, २३ फेब्रुवारी ते बुधवार, २५ मार्च २०२६ पर्यत निश्चित करण्यात आले आहे. ६ मार्च रोजी अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे, असा निर्णय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

विधानभवन येथे विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. बैठकीला विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार, आमदार सर्वश्री अनिल परब, प्रसाद लाड, भास्कर जाधव, जयंत पाटील, सुनील प्रभु, भाई जगताप, प्रवीण दरेकर, विक्रम काळे, सतेज पाटील, विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री, राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिवंगत अजित पवार यांना कामकाज सल्लागार समितीच्या दोन्ही बैठकीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहात शोक प्रस्ताव मांडण्यात येणार आहे.

अधिवेशन काळात शनिवार २८ फेब्रुवारी शासकीय सुट्टीच्या दिवशी विधिमंडळ कामकाज होणार आहे. सोमवार दि. २ मार्च रोजी होळी आणि ३ मार्च रोजी धूलिवंदन असल्याने कामकाज होणार नाही. १९ मार्चला गुढीपाडव्याची सार्वजनिक सुटी असल्याने या दिवशी कामकाज होणार नाही. तसेच २० मार्च रोजीही विधिमंडळ कामकाज होणार नाही.

● संयुक्त राष्ट्र संघाने सन २०२६ हे ‘आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. यावर चर्चा करण्यात येणार आहे.

● जागतिक महिला दिनानिमित्त दिनांक ९ मार्च रोजी दोन्ही सभागृहात महिला दिनानिमित्त चर्चा होणार आहे.

● मराठी भाषा गौरव दिननिमित्त चर्चा होणार आहे

●निवृत्त होणाऱ्या सदस्यांचा निरोप समारंभ होणार आहे.

पुरंदर विमानतळ प्रकल्पाला राज्य शासनाची मान्यता;पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळेल

केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

पुणे, दि. १० फेब्रुवारी — पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाला राज्य शासनाने मान्यता दिल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर केली. या प्रकल्पासाठी आवश्यक जमीन अधिग्रहण प्रक्रिया १ जून २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

पुणे व पश्चिम महाराष्ट्राच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा आणि दूरगामी परिणाम करणारा निर्णय असल्याचे सांगत पुण्याचे खासदार तथा केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

मोहोळ म्हणाले, “वाढती एअर कनेक्टिव्हिटी ही उद्योग, व्यवसाय, आयटी क्षेत्र, पर्यटन तसेच कृषी निर्यातीसाठी निर्णायक ठरणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळानंतर पुरंदर विमानतळ हा पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी मोठा पर्याय उपलब्ध होणार असून, वाढत्या प्रवासी व मालवाहतूक क्षमतेला मोठी चालना मिळणार आहे. तसेच आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने मध्य पूर्व, युरोप, दक्षिण-पूर्व आशिया आदी महत्त्वाच्या जागतिक मार्गांशी थेट हवाई संपर्क प्रस्थापित होण्यास मदत होईल, ज्यामुळे निर्यात, परकीय गुंतवणूक आणि जागतिक व्यवसाय संधींना नवी दालने खुली होतील.”

पुरंदर विमानतळामुळे लॉजिस्टिक्स, वेअरहाऊसिंग, एमएसएमई उद्योग, तसेच कृषी उत्पादनांच्या जलद वाहतुकीला गती मिळून शेतकऱ्यांनाही थेट बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. रोजगारनिर्मिती, पायाभूत सुविधा विकास आणि गुंतवणूक वाढीसाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरेल, असा विश्वासही मोहोळ यांनी व्यक्त केला.

राज्य व केंद्र शासनाच्या समन्वयातून पुरंदर विमानतळ प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असेही मोहोळ यांनी स्पष्ट केले.

नवनिर्वाचित महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर वाडेकर,सभागृहनेते बिडकर यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट 

पुणे :
विधान भवन, मुंबई येथे आज पुणे महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर आणि सभागृह नेते गणेश बिडकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली.

या भेटीदरम्यान पुणे शहराच्या विकासाशी संबंधित विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुलनार्वेकर, महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारकडून पूर्ण सहकार्य देण्याची ग्वाही दिली. पायाभूत सुविधा, नागरी सुविधा, वाहतूक व्यवस्था तसेच प्रस्तावित विकास प्रकल्पांना गती देण्यासाठी आवश्यक ती मदत करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

या प्रसंगी रिपब्लिकन पक्षाचे पुणे शहराध्यक्ष संजय सोनवणे, राज्य सचिव बाळासाहेब जानराव, भाजपचे दीपक नागपुरे उपस्थित होते. या भेटीमुळे पुणे शहराच्या विकासाला नवे बळ मिळेल, असा विश्वास नवनिर्वाचित महापौर व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

प्रभाग ९ मधील मिसिंग लिंकबाबत चंद्रकांतदादा पाटील ॲक्शन मोडवर

आयुक्तांसोबत बैठक घेऊन मिसिंग लिंकच्या कामांना गती देण्याचे निर्देश

ना. पाटील यांच्या सूचनेनंतर अतिरिक्त आयुक्तांचा पाहाणी दौरा

पुणे- कोथरुड मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ९ मधील मिसिंग लिंकबाबत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील ॲक्शन मोडवर आले असून, सोमवारी महापालिका आयुक्तांसोबत बैठक घेऊन, सदर कामाला गती देण्याचे निर्देश दिले. जमीन अधिग्रहण आणि इतर कामांसाठी राज्य सरकारकडून निधी उपलब्ध होऊनही जलदगतीने काम पूर्ण होत नसल्याबद्दल नाराजी देखील व्यक्त केली.

कोथरुड मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ९ मधील मिसिंग लिंक बाबात राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी आयुक्त नवल किशोर राम यांच्या उपस्थितीत प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला. यात प्रामुख्याने सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, पाषाण, बाणेर, बालेवाडी सर्व मिसिंग लिंकबाबत सविस्तर चर्चा झाली.

यावेळी अधिकाऱ्यांनी जमीन अधिग्रहणातील तांत्रिक अडचणी, अतिक्रमणे याबाबत मंत्री पाटील यांना माहिती दिली. त्यावर ना. पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, राज्य सरकारकडून निधी उपलब्ध होऊनही सदर काम संथ गतीने होत आहे, हे अतिशय अयोग्य असल्याचे आयुक्तांना सांगितले. त्यावर आयुक्तांनी तात्काळ अतिरिक्त आयुक्तांना सदर भागातील मिसिंग लिंकबाबत पाहाणी करुन अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या.

त्यानुसार, मंगळवारी अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे आणि बनकर यांनी पाषाण, सुतारवाडी, बाणेर,बालेवाडी या परिसरातील मिसिंग लिंकच्या ठिकाणांची पाहाणी करुन आढावा घेतला. यावेळी मिसिंग लिंक मधील अडथळे, तांत्रिक बाबी तसेच नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी यांचा सविस्तर आढावा दोन्ही अधिकाऱ्यांनी घेतला. तसेच, काम लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी आवश्यक ती प्रशासकीय व तांत्रिक कार्यवाही तत्काळ सुरू करावी, अशा स्पष्ट आणि ठोस सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या.

दरम्यान, सदर मिसिंग लिंक पूर्ण झाल्यास पाषाण, सुतारवाडी, बाणेर- बालेवाडी परिसरातील वाहतूक मोठ्या प्रमाणात सुलभ होणार असून, पर्यायी मार्ग उपलब्ध झाल्याने वाहतूककोंडी कमी होईल. याचा थेट फायदा नोकरदार, विद्यार्थी, व्यापारी तसेच आपत्कालीन सेवांना होणार आहे. यासोबतच परिसराचा सर्वांगीण विकास, वेळेची बचत आणि ट्राफिकमुक्त व सुरक्षित परिसर निर्माण होण्यास ही योजना महत्त्वाची ठरेल, अशी भावना यावेळी ना. पाटील यांनी व्यक्त केली.

उपमुख्यमंत्री पदाचा पदभार सुनेत्रा अजित पवार यांनी आज स्वीकारला; दादांच्या प्रतिमेला अभिवादन करताना भावूक…

सिध्दीविनायक मंदिरात जाऊन दर्शन तर चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात येऊन दादांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले; आशीर्वाद घेऊन मंत्रालयात पदभार स्वीकारला…

मुंबई दि.१० फेब्रुवारी – राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार यांनी आज मंत्रालयात पदभार स्वीकारला. त्याअगोदर सकाळी आपल्या पक्षाच्या नेत्यांसह सिध्दीविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले.त्यानंतर चैत्यभूमीवर जाऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना नतमस्तक झाल्या.

सिध्दीविनायक मंदिर आणि चैत्यभूमीवर गेल्यानंतर उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात जाऊन दादांच्या केबिनमध्ये प्रतिमेला अभिवादन केले. यानंतर मंत्रालयात पदभार स्वीकारला. यावेळी दादांच्या प्रतिमेला अभिवादन करताना उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार भावूक झाल्याचे पहायला मिळाले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, युवा नेते पार्थ पवार,वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ,ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक, माजी मंत्री धनंजय मुंडे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे,सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे,पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक, पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे,प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर,माजी मंत्री अनिल भाईदास पाटील,आमदार सना मलिक शेख, आमदार सतिश चव्हाण, आमदार अमोल मिटकरी,आमदार विक्रम काळे, आमदार शेखर निकम, आमदार प्रतापराव चिखलीकर पाटील, आमदार राजू नवघरे, आमदार आशुतोष काळे,आमदार हिरामण खोसकर, आमदार पंकज भुजबळ,माजी आमदार झिशान सिद्दीकी, मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, प्रदेश सरचिटणीस संजय तटकरे,सहकोषाध्यक्ष संजय बोरगे,आदींसह सर्व आमदार, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

केंद्रीयमंत्री रामदास आठवले रुग्णालयात जाऊन शरद पवारांना भेटल्यावर म्हणाले, सुप्रिया केंद्रात मंत्री होईल

0

पुणे :

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रुग्णालयात भेट घेवून तयांच्या प्रकृतीची विचारपूस केली. शरद पवार आणि त्यांच्या पक्षाने राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.तसेच माध्यमांशी बोलताना आठवले असेही म्हणाले सुप्रिया यांना केंद्रात मंत्री होता येईल .

शरद पवार यांना श्वास घेण्यास त्रास होवू लागल्याने त्यांना पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्व तपासण्या करून त्यांना पाच दिवस उपचार करण्यासाठी रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर आज रामदास आठवले यांनी रुग्णालयात शरद पवारांची भेट घेतली.

यावेळी रिपब्लिकन पक्षाचे  पुणे शहर सरचिटणीस महिपाल वाघमारे, सरचिटणीस  श्याम सदाफुले, नगरसेवक नीलेश आल्हाट, मोहन जगताप, जयदेव रंधवे, संघमित्रा गायकवाड, सोनूभाऊ निकाळजे, संतोष खरात, सनी अवसरमल, बुद्धीशा रंधवे, संग्राम खंगाळ, संजय बनसोडे, विक्की वाळके आदि मान्यवर उपस्थित होते.  

माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, पवार साहेबांची प्रकृती सध्या चांगली आहे. हॉस्पिटल मध्ये असून देखील त्यांनी लोकसभा चालू आहे का? विचारलं त्यावर मी त्यांना लोकसभा चालू नाही मात्र राज्यसभा चालू असल्याचे सांगितले. पवार साहेबांची विल पॉवर खूप चांगली आहे. त्यामुळे लवकच बरं वाटेल. 

पुढे बोलताना ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचा गट महायुतीमध्ये अर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये सहभागी आहे. सध्याच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू आहे. शरद पवार यांनी या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद द्यावा आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी मध्ये समाविष्ट व्हावे, असे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे. असे झाल्यास आम्हाला आनंदच होईल. शरद पवार गट राष्ट्रीय लोकशाही आघाडीत समाविष्ट झाल्यास सुप्रिया सुळे यांच्या मंत्रीपदासकट सर्व अटींवर सकारात्मक प्रतिक्रिया उमटतील, अशी ग्वाही देखील आठवले यांनी दिली.

बारामतीमधील मौजे कटफळ येथील क्रीडा सुविधांसाठी ७५ कोटी १३ लाख रुपये

0

मुंबई- बारामतीच्या जिल्हा क्रीडा संकुल अंतर्गत मौजे कटफळ येथील ८० हजार चौ.मी. जागेवर टप्पा-३ अंतर्गत अतिरिक्त क्रीडा सुविधांचा विकास केला जात आहे. यासाठीच्या ७५ कोटी १३ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
मौजे कटफळ येथील जागेवर अतिरिक्त क्रीडा सुविधांचा (टप्पा-३) विकास केला जात असून यामध्ये पॅव्हेलियन, जलतरण तलाव, स्केटिंग रिंग, आर्चरी रेंज, बास्केटबॉल ग्राऊंड इत्यादी क्रीडा सुविधांचा समावेश आहे. यासाठीच्या अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली असून निधी वितरीत करण्यास मंजूरी देण्यात आली आहे.

अन्नधान्य वाहतूक तसेच अन्नधान्य हाताळणूक करिता संपूर्ण राज्यात एकाच वेळी निविदा प्रक्रीया
राज्यातील लक्ष्यनिर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अन्नधान्य वाहतूक तसेच अन्नधान्य हाताळणूक (हमाली) या करिता संपूर्ण राज्यात एकाच वेळी निविदा प्रक्रीया राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे राज्यातील वितरण प्रणाली सक्षम होणार असून, या व्यवस्थेत सुसूत्रता येणार आहे.
राज्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अन्नधान्याची वाहतूक व शासकीय गोदामामध्ये अन्नधान्याची हाताळणूक यासाठी स्वतंत्ररित्या कंत्राटे निश्चित केली जातात. तथापि आता केंद्र शासनाने अन्नधान्याच्या वाहतूक खर्चात बचतीसाठी रूट ऑप्टीमायझेशन स्टडी नुसार निश्चित केलेल्या मार्गावरून वाहतूक करण्याबाबत सूचना केल्या आहेत. त्यानुसार राज्यात अन्नधान्य वाहतूक सुरु करण्यात आली आहे. यात वाहतूक आणि हाताळणूक खर्च केंद्राने निर्धारित केला आहे. यात केंद्र व राज्याचा हिस्सा प्रत्येकी पन्नास टक्के आहे. आता नव्या प्रणालीत उपलब्ध अन्नधान्य साठ्यानुसार वेळोवेळी जिल्ह्यातील व जिल्हयाबाहेरील गोदामातून उचल करावी लागते.
त्यामुळे आता मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रातील ५ परिमंडळे व ३४ जिल्ह्यांमध्ये एकाचवेळी निविदा प्रक्रिया राबवून वाहतूक कंत्राटे निश्चित करण्यामुळे या प्रणालीत सुसूत्रता येणार आहे.

नवीन महाविद्यालये सुरु करण्यासाठी १५ मार्च पूर्वी इरादापत्र
राज्यात नवीन महाविद्यालये सुरू करण्यासाठी १५ मार्च २०२६ पर्यंत शासनाकडून इरादापत्र देण्याबाबतची अधिनियमात सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
यानुसार महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मध्ये नवीन महाविद्यालये सुरु करण्यासाठी इरादापत्र प्रदान करण्याबाबतच्या तरतूदीमध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी राज्य शासनाकडून १५ मार्च, २०२६ किंवा त्यापुर्वी इरादा पत्र (Letter of Intent) देता येईल अशी सुधारणा करण्यात येणार आहे. याबाबतचा अध्यादेशही काढण्यास मान्यता देण्यात आली.

महाटेनिस फाउंडेशनला मुंबईत टेनिस मौजे कोलेकल्याण येथे जमीन
खेळाच्या पायाभूत सुविधा विकासासाठी संयुक्त प्रकल्प

मुंबईत मौजे कोले कल्याण (ता. अंधेरी) येथील मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या मालकीची सुमारे २ एकर जमीन महाटेनिस फाउंडेशन यांना उपलब्ध करून देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
मुंबई शहर व मुंबई उपनगरात टेनिस या खेळाचा विकास करण्याकरिता म्हाडाच्या करमणूकीच्या मैदानाकरिता आरक्षित असलेल्या सुमारे २ एकरचा भूखंड उपलब्ध करून देण्याची मागणी महाटेनिस फाऊंडेशन यांनी केली होती. या भूखंडावर टेनिस खेळाच्या पायाभूत सुविधा विकासासाठी म्हाडासोबत संयुक्त विकास प्रकल्प राविण्यात येणार आहे. त्यानुसार संयुक्त भागीदारी तत्वावर विकास योजना राबवण्यासाठी माहटेनिस फाउंडेशनला ही जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्याचबरोबर हे फाउंडेशन नफा केंद्रीत नसल्यामुळे हा प्रकल्प कार्यन्वित करण्यासाठी म्हाडामार्फत १० कोटी रुपयांचे भाग भांडवल स्वरुपात देण्यासही मान्यता देण्यात आली आहे. यामुळे मुंबई शहर व उपनगरांत टेनिस खेळाच्या विकासाला चालना मिळणार आहे.

पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप पॉलिसी धोरणास मान्यता

0

सार्वजनिक-खासगी भागीदारी धोरणास मान्यता
राज्यातील पायाभूत सुविधा विकासाला चालना मिळणार
मुंबई-
महाराष्ट्र सार्वजनिक-खासगी भागीदारी धोरणास ( पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप पॉलिसी) आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या धोरणांमुळे राज्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना देण्यासाठी भांडवल आणि कुशल मनुष्यबळ उपलब्ध होऊन अर्थव्यवस्थेला गती मिळेल. पायाभूत विकास प्रकल्प मुदतीत पूर्ण होण्यासाठी प्रशासकीय चौकट विकसित होईल.
राज्य मंत्रिमंडळाने २८ ऑक्टोबर २०२५ रोजीच्या बैठकीत विकसित महाराष्ट्र २०४७ व्हिजन डाक्युमेंटला मान्यता दिली आहे. या व्हिजन डाक्युमेंटमध्ये १०० उपक्रमांचा समावेश आहे. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास आवश्यक आहे. राज्याची अर्थव्यवस्था २०२९ पर्यंत एक ट्रिलीयन डाँलर, सन २०३५ पर्यंत २ ट्रिलीयन आणि २०४७ पर्यंत पाच ट्रिलीयन डॉलरवर नेण्य़ाचे उद्दीष्ट आहे. यासाठी राज्यात अनेक प्रकल्प कार्यरत असून भविष्यातही नवीन प्रकल्प हाती घेतले जाणार आहेत. मात्र पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी प्रचंड गुंतवणूक आणि संसाधनांचा कुशल वापर करण्याची आवश्यकता आहे. यासाठी सार्वजनिक-खासगी भागीदारी करून प्रकल्प राबविण्याची आवश्यकता आहे. असे प्रकल्प राबविण्यासाठीच्या धोरणास आज मान्यता देण्यात
या धोरणानुसार २५ कोटी रुपयांपेक्षा जास्त मुल्याच्या सार्वजनिक-खासगी भागीदारी प्रकल्पांना मंजुरी देण्याचे अधिकार मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील पायाभूत समितीला असतील. तर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली शक्ती प्रदत्त समितीकडे २५ कोटी रुपयांपेक्षा कमी मुल्यांच्या सार्वजनिक-खासगी भागीदारी प्रकल्पांना मंजुरी देण्याचे अधिकार असतील.
या धोरणाची अंमलबजावणी सुलभरित्या व्हावी यासाठी नियोजन विभागात सार्वजनिक-खासगी भागीदारी कार्यासन स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली. विविध विभागांमध्ये विभागांच्या आवश्यकतेनुसार सार्वजनिक-खासगी भागीदारी कार्यासन स्थापन करण्यासही मान्यता देण्यात आली. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी मित्र संस्थेत सार्वजनिक-खासगी भागीदारी कक्ष स्थापन करण्यासही मान्यता देण्यात आली.
सार्वजनिक-खासगी भागीदारी प्रकल्पांसाठी व्यवहार्यता तफावत निधी म्हणून २०० कोटी रुपयांचा एकत्रित निधी स्थापन करण्यास आणि पुर्वमान्यतेने त्यातून प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध करण्यासही मान्यता देण्यात आली. मात्र सध्या सुरू असलेले प्रकल्प त्यांचा सवलत करारनामा आणि निविदा दस्तऐवजातील अटी आणि शर्तीनुसार पुर्ण करण्यासही मान्यता देण्यात आली.

राज्यात ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’अभियान-ग्रामपंचायतींसाठी २ ते ५ कोटींचे पुरस्कार

0

आरोग्य सुधारणा घडवून आणण्यावर भर

मुंबई- राज्यात ‘माझ गांव, आरोग्य संपन्न गाव’ अभियान राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. दर आर्थिक वर्ष १ एप्रिल ते ३१ मार्च पर्यंतच्या या कालावधीत अभियान राबविण्यात येईल. अभियानात गुणवत्तापूर्ण कामगिरी करणाऱ्या ग्रामपंयातींना आरोग्य संपन्न ग्राम म्हणून मानांकन व प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात येणार आहे.
राज्यातील आरोग्य सेवांमध्ये गुणात्मक सुधारणा करणे व प्रत्येक नागरिकाला आरोग्याच्या मुलभूत सुविधा निर्माण करून देण्यासाठी, संसर्ग व असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण कमी करून त्यांचे निर्मूलन करणे आणि माता व बालकांचे आरोग्यमान उंचावणे या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात नागरिकांच्या जीवनशैलीत, आहारात बदल करण्यासाठी प्रोत्साहन, प्रतिबंधात्मक उपाययोजना, वेळेवर उपचार व पुनर्वसन हे चार स्तंभ असतील.
गावातील नागरिकांना सदृढ आणि सशक्त करण्यासाठी माझं गाव आरोग्य संपन्न गांव अभियान सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अभियानाच्या अंमलबजावणीत आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय हे प्रमुख घटक असतील. या अभियानातून सामाजिक बांधिलकी, लोकसहभाग, लोककेंद्रीत नियोजन व शाश्वत आरोग्य व्यवस्थापनाच्या दिशेने पाऊल टाकण्यात येणार आहे. या माध्यमातून आयुष्मान भारत, राष्ट्रीय आरोगय अभियान, पोषण अभियान, स्वच्छ भारत अभियान, सस्टनेबल डेव्हलपमेंट गोल्स-३ यांची प्रभावी अमंलबजावणी करण्यात येणार आहे.
अभियानामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा व तालुका यंत्रणा, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र याठिकाणी कार्यरत आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक-सेविका व आशा तसेच ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग घेतला जाणा आहे. एकात्मिक कार्यप्रणाली व पारदर्शक मुल्यांकनाच्या आधारे गुणवत्तापूर्ण कामगिरी करणाऱ्यांना ग्रामपंचायतींना ‘आरोग्य संपन्न ग्राम’ म्हणून पुरस्कार देण्यात येणार आहे.
या अभियानाच्या अमंलबजावणी व संनियत्रणासाठी आरोग्य मंत्री यांच्या अध्यतेखाली राज्य आरोग्य संपन्न गाव संनियंत्रण समितीसह राज्यस्तरीय आरोग्य संपन्न गाव कृती समिती, जिल्हास्तरीय आरोग्य संपन्न गाव अभियान समिती, तालुकास्तरीय व ग्रामपंचायतस्तरीय कृती समिती अशा पाच समित्यांची स्थापना करण्यात येणार आहे. ग्रामपंचायस्तरीय समिती गाव आरोग्य कृती आराखडा तयार करेल. त्यामध्ये आरोग्य सेवांची स्थिती, अडचणी, व सुधारणा उपाय, आरोग्य ग्रामसभा, स्वच्छता अभियान, पोषण जागरूकता, स्वमुल्यमापन चाचणी, आरोग्य नकाशे, कार्यक्रमांमध्ये नागरिकांचा सहभाग वाढवणे अशा गोष्टींचा समावेश असेल. यासाठी गावांचे स्वमुल्यमापन ते राज्यस्तरीय अंतिम मुल्यमापन केले जाईल. यातून गावांना प्रथम कमांकासाठी जिल्हास्तर, विभाग आणि राज्यस्तरासाठी अनुक्रमे पंचवीस लाख, एक कोटी व पाच कोटींचे पुरस्कार असेल. दुसऱ्या क्रमांकासाठी वीस लाख, ७५ लाख आणि ३ कोटी तर तिसऱ्या क्रमांकासाठी १५ लाख, ५० लाख आणि दोन कोटी रुपयांचा पुरस्कार दिला जाईल. उपआरोग्य केंद्राला जिल्हास्तर प्रथम क्रमांकासाठी पाच लाख, राज्यस्तरासाठी २५ लाख, प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी जिल्हास्तरावर प्रथम क्रमांकासाठी १० लाख व राज्यस्तरासाठी ५० लाख.
ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयाला राज्यस्तरावर ७५ लाखांचा पुरस्कार दिला जाईल. याशिवाय पंचायत समितीला राज्यस्तरावर अनुक्रमे २ कोटी, दिड कोटी व एक कोटी पंचवीस लाखांचा पुरस्कार दिला जाईल. तर जिल्हा परिषदेला राज्यस्तरासाठी अनुक्रमे पाच, तीन व दोन कोटी रुपयांचा पुरस्कार दिला जाईल. त्यासाठी दरवर्षी ८० कोटी ७५ लाख रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदेचे राज्यव्यापी सेफ्टी ऑडिट; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे मार्गदर्शन

0

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील महिला सुरक्षिततेचा आढावा

मुंबई दि.१०: महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सार्वजनिक वाहतूक ठिकाणांचे महाराष्ट्रव्यापी सेफ्टी ऑडिट महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदेमार्फत करण्यात आले असून, या उपक्रमाला विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे मार्गदर्शन लाभले. महिलांचा संचाराचा हक्क हा केवळ प्रवासापुरता मर्यादित नसून तो सन्मानाने जगण्याच्या आणि विकासाच्या अधिकाराशी जोडलेला आहे, या दृष्टिकोनातून हे ऑडिट राबविण्यात आले.

या ऑडिटमध्ये बसस्थानके, रेल्वे स्थानके व सार्वजनिक वाहतुकीशी संबंधित ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करून प्रश्नावलीच्या माध्यमातून माहिती संकलित करण्यात आली. सीसीटीव्ही, प्रकाश व्यवस्था, महिला व पुरुष पोलिसांची गस्त, हेल्पलाईन, पॅनिक बटण, स्वच्छतागृहे, महिलांसाठी राखीव आसने, विशेष बसेस व रेल्वे डबे, तसेच ‘हिरकणी कक्ष’ यांसारख्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीची सद्यस्थिती तपासण्यात आली.

अनेक ठिकाणी उपाययोजना अस्तित्वात असूनही अंमलबजावणीत त्रुटी आढळल्याचे निदर्शनास आले. विशेषतः पॅनिक बटण प्रणाली प्रभावीपणे कार्यरत नसल्याचे लक्षात आले. आपत्कालीन परिस्थितीत महिलांना त्वरित मदत मिळावी यासाठी ही यंत्रणा नियंत्रण कक्षाशी थेट जोडली जावी, याबाबत डॉ. नीलम गोऱ्हे यांनी यापूर्वीच स्पष्ट सूचना दिल्या होत्या.

डॉ. गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषद आणि विविध महिला संघटनांनी सेफ्टी ऑडिटचा अहवाल सादर केला. प्रत्येक बस स्थानकावर महिला कर्मचाऱ्यांची नेमणूक करून मदत केंद्र सुरू करणे, रेल्वे व एसटीसाठी स्वतंत्र दक्षता समित्या स्थापन करणे, स्वच्छतागृह व ‘हिरकणी कक्षांची’ नियमित तपासणी करणे, अशा सूचना डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या. पुढील तीन महिन्यांच्या कालावधीत, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, रेल्वे आणि मेट्रो प्रशासनासोबत समन्वय साधून बैठका घेण्यात येतील. तसेच, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील महिला सुरक्षिततेचा प्रभावी पाठपुरावा करण्यासाठी दोन्ही विधिमंडळातील सदस्याांचे सहकार्य व सहभाग घेऊन पुढील अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आजच्या बैठकीत महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषद आणि इतर महिला संघटनांच्या प्रतिनिधींनी सार्वजनिक परिवहन व्यवस्थेच्या पाहणीचा सविस्तर अहवालासोबत विविध २० पुस्तिकाही नीलम गोर्हे यांना सादर केल्या. शारदा साठे (अध्यक्ष, महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषद), स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त जेहलम जोशी, सुप्रसिद्ध लेखिका व संशोधक छाया दातार, कामगार नेत्या लता भिसे सोनवणे (भारतीय महिला फेडरेशन), प्रा. उज्वला मसदेकर (पुणे सेफ्टी ऑडिट समिती सदस्य), संकल्पना कऱ्हाडे, संगीता जोशी, स्नेहल वेळकर, रेश्मा ठोसर, अमोल केरकर आणि संगीता सराफ यांनी ऑडिटमधील निष्कर्ष मांडले. उपसभापती कार्यालयातील विशेष कार्यकारी अधिकारी मेघना सावंत भोसले उपस्थित होत्या त्यांनी मिनिट्स घेतले.