नवी दिल्ली –
सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांना वाय सुरक्षा देणार असल्याचे आदेश आज गृहमंत्रालयाने दिले आहेत. केंद्रिय राखीव पोलीस दल त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था करणार आहे.
अदर पुनावाला यांची सिरम इन्स्टि्युट ऑफ इंडिया ही संस्था भारतातली कोविशिल्ड ही लस उत्पादन करते.वाय दर्जाच्या सुरक्षा व्यवस्थेत ११ सुरक्षा अधिकारी असतात. अदर यांना देशभरात ही सुरक्षा व्यवस्था दिली जाणार आहे. गृहमंत्रालयाने यासंदर्भातले आदेश दिल्याचं वृत्त एएनआयने दिलं आहे.