Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

हेमांगी कवीच्या ‘फुलराणीची’पन्नाशी

Date:

index

13139338_1198300336856260_61843568635141289_n

मराठी नाट्यसृष्टीत अनेक नाटकांनी आपले खास स्थान तयार केले आहे. मराठी रसिकांच्या पाठिंब्याने आजवर अनेक नाटकं अजरामर झालेली आहेत. पु.ल च्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेलं नाटक म्हणजे ‘ती फुलराणी’. पुलंच्या ‘ती फुलराणी’तील ‘फुलराणी’ काळानुरूप बदलत गेली भक्ती बर्वे, प्रिया तेंडुलकर, सुकन्या कुलकर्णी आणि अमृता सुभाष अशा चौघींनी ‘फुलराणी’ उभी केली. या सगळ्यांनी फुलराणी एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली, अशावेळी ‘ती फुलराणी’ हे नाटक नव्या रुपात आणि नव्या संचात घेऊन येण्याचं शिवधनुष्य लेखक नाट्यदिग्दर्शक राजेश देशपांडे यांनी उचललं हेमांगी कवीच्या रूपाने नवी फुलराणी रंगभूमीला गवसली आणि अवघ्या काही दिवसांतच या नाटकाने पन्नासाव्या प्रयोगाकडे यशस्वी वाटचाल केली. या नाटकासाठी हेमांगी कवीला नुकताच झी टॉकीजचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला.

येत्या रविवारी १७ जुलैला दुपारी ३.३० वा. शिवाजी मंदिरला ‘ती फुलराणी’ च्या पन्नासाव्या प्रयोगाचा आनंद उत्सव रंगणार आहे. रसिकांना पुर्नप्रत्ययाचा आनंद देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या ‘ती फुलराणी’ च्या संपूर्ण टीमचं सध्या नाट्यरसिकांकडून कौतुक होतयं. अशावेळी या नाटकाचा इतक्या कमी अवधीत होणारा हा सुवर्णमहोत्सवी प्रयोग खरोखरच अभिनंदनीय आहे. अचाट, अफाटपूर्ण उर्जा असलेल्या या फुलराणी’ चा बहर उत्तरोत्तर अशाच बहरेल हे निश्चित.अष्टगंध एंटरटेण्मेंटआणि एॅडोनिस मल्टीमिडिया अॅण्ड एण्टरप्रायजेस प्रा.लि’ निर्मित ती फुलराणी या नाटकात फुलराणीच्या भूमिकेतील हेमांगी कवी आणि प्राध्यापकांच्या भूमिकेत डॉ गिरीश ओक आहेत. सोबत विजय पटवर्धन, सुनील जाधव, दिशा दानडे, अंजली मायदेव, मीनाक्षी जोशी, रसिका धामणकर, नितीन नारकर, प्रांजल दामले, निरंजन जावीर, हरीश तांदळे हे कलाकारही यात आहेत. सूत्रधार नितीन नाईक आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सरन्याधीश भूषण गवईंचा प्रोटोकॉल न पाळून भाजपा युती सरकारकडून अपमान, आंबेडकरी विचारांचे असल्याने अपमान केला का? : नाना पटोले

सरन्यायाधिशांचा अपमान करणाऱ्या अधिकाऱ्यांवर राज्य सरकार काय कारवाई करणार. राज्य...

पॉलिटेक्निक प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया २० मे पासून सुरू

पदविका अभ्यासक्रम नोकरी व उद्योगासाठी उपयुक्त पर्याय; अधिकाधिक विद्यार्थ्यांनी...