पुणे- महापालिकेच्या या पंचवार्षिक वर्षाच्या शेवटच्या सत्रात दोन पदाधिकारी विरुद्ध सर्वपक्षीय नगरसेवक असा सामना रंगला आहे.हाताच्या बोटावर मोजता येतील एवढी मंडळी सर्व नगरसेवकांचे हक्क हिराऊन घेऊन स्वतः मनमानी कारभार करत असल्याचा आरोप करत यामुळेच पुण्याची कोरोना च्या महामारीत दुरावस्था अधिक कठीण झाल्याचा आरोप नगरसेवक करत आहे . या पार्श्वभूमीवर आज कॉंग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांनी सोशल मिडिया तून सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांवर निशाना साधण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर सेना राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे बागवे महापालिकेतील अँटी चेंबर ऑनलाईन जीबिला उपस्थित राहिले. शिवसेनेचे विशाल धनवडे, राष्ट्रवादीचे योगेश ससाणे ,भैय्यासाहेब जाधव ,गफूर पठाण त्यांच्या समवेत होते . यावेळी कॉंग्रेस चे गटनेते आणि ज्येष्ठ नगरसेवक आबा बागुल हि त्यांच्या समवेत होते. या जीबी नंतर सेनेच्या कार्यालयात धनवडे आणि बागवे यांनी येथे उपस्थित माध्यमांशी संवाद साधला .