हॅंडस आॅफ इंडियाचे वर्षातील दुसरे प्रदर्शन पुण्यात
पुणे,- सलग तीन वर्षांपासून वर्षात दुसऱ्यांदा हॅंडस् आॅफ इंडियाचे प्रदर्शन २३ ते २६ सप्टेंबरपर्यंत टिळक स्मारक मंदिर येथे भरवण्यात येणार आहे. हे प्रदर्शन सकाळी ९.३० ते संध्याकाळी ८.३० पर्यंत सर्वांसाठी खूले असणार आहे. या प्रदर्शनातील सर्व कपडे एनआयएफटीच्या डिझाईन शाखेच्या विद्यार्थ्यांनी बनविले आहेत.
हॅंडस् आॅफ इंडियाची सुरूवात देन बहिनींनी २०१० साली केली. यातील एकजण माजी हवाई दल अधिकारी तर एकजण साॅफ्टवेअर आर्किटेक्ट आहे जी संपूर्ण भारतातून विणकर, हात-भरतकाम आणि घरगूती गटासाठी काम करते.
छोट्या मोठ्या गावातील हातकाम आणि भरतकाम करणार्या लोकांना रोजगार पुरवणे हा या प्रदर्शनामागील हेतू. हातकाम आणि भरतकामामध्ये कारागीरांनी कलेपेक्षा भारतातील परंपरेला जास्त महत्त्व दिले आहे आणि आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला आहे.
हॅंडस् आॅफ इंडिया संपूर्ण देशातील ५० गटातील जवळपास १५०० लोकांबरोबर काम करत आहे. वृंदावन, उत्तर प्रदेश आणि www.handsofindia.com या संकेतस्थळाच्या माध्यमातून किरकोळ आॅनलाइन व्यापारी शिवणकाम आणि मार्केटींग विभागामध्ये काम करत आहेत. यामध्ये ८० लोकांचा सहभाग आहे.
नवीन हातमाग परिचय करून देताना हॅंडस् आॅफ इंडियाने ‘मेखला चडोर’पासून बनविलेला कुर्ता प्रदर्शनात पहासवयास मिळणार. हा कुर्ता आसामच्या कारागीरने बनविला आहे.
प्रदर्शन तपशील –
तारीख: शुक्रवार २३ सप्टेंबर ते सोमवार २६ सप्टेंबरपर्यंत
वेळ: सकाळी ९.३० ते संधयाकाळी ८.३० पर्यंत
स्थळ: टिळक स्मारक मंदिर, टिळक रोड, सदाशिव पेठ,