पुणे- मी दावेदार नाही तर उमेेेेेदवार आहे अशा आपल्या विश्वात रमणाऱ्या विद्यमान आमदारांची कायम वादग्रस्त ठरलेली कारकीर्द आणि त्यांची घराणेशाही… याच प्रतिमेत अडकलेली राष्ट्रवादी कॉंग्रेस यातून बाहेर पडून ,प्रस्थापितांना धक्का देवून थेट जनतेशी नाळ जोडला गेलेला राजकीय कार्यकर्ता विधानसभेला उमेदवार म्हणून देता येईल काय याकडे विविध पक्षातील काही वरिष्ठ नेते पाहत असल्याचे वृत्त असून यामुळे हडपसरला आता नवा चेहरा मिळण्याची संधी निर्माण होण्याची चिन्हे आहेत .
शिवसेनेला इथे या पूर्वी विधानसभेत दोन वेळा मिळालेली संधी आणि कॉंग्रेसचे आता मिटत चाललेले नामोनिशान पाहता हडपसर विधानसभा मतदार संघातून सनेचे आणि राष्ट्रवादीचे नवे चेहरे आमने सामने येण्याची शक्यता वर्तविली जाते आहे . मनसे ची इथून तयारी झालेली आहे ,भाजपने सेनेशी जुळवून घेतले तर हि जागा युतीला राखता येवू शकेल असा दावाही करण्यात येतो आहे. तसे झाले नाही तर भाजप आणि सेना वेगवेगळे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कोणत्याही पद्धतीने निवडणुका झाल्या तरी लढतील याची अधिक शक्यता आहे आणि सामना रंगून देखील नव्या चेहऱ्याचा उदय होईल असाही असाही दावा करण्यात येतो आहे .
सुर्यकांत लोणकर आणि त्यानंतर महादेव बाबर हे दोघेही सेनेचे महापालिकेतून विधानसभेत गेले होते तर बाळासाहेब शिवरकर हे देखील महापौर पदावरून विधानसभेत गेलेले . पूर्वीचा कॅन्तोंमेंट मतदार संघ आणि आताचा हडपसर मतदार संघ वेगळी भोगौलिक रचना झालेला असला तरी हि विशेष म्हणजे शिवरकर आणि लोणकर यांच्या काळात ज्या समस्या इथे होत्या त्याच अजूनही इथे तग धरून आहेत फार तर भौगोलिक रचना बदलून या समस्यांच्या भूभागाची केवळ अदलाबदल झालेली आहे . गावठाणे,बांधकामे ,अरुंद रस्ते ,पाणी , ड्रेनेज , मोकाट जनावरे अशा समस्या या मतदार संघात आजही आहेत .बदलत्या काळातहि त्या आता इथे राहिलेल्या नाहीत असे कोणी म्हणू शकणार नाही अशी परिस्थिती आहे. हा मतदार संघ पोटापाण्यासाठी शहरात आलेल्या असंख्य सामान्य माणसांनी वाहतो आहे . आणि अशा सामान्य माणसांच्या समस्यांशी थेट जोडला गेलेला कोणी फार उच्चपदस्थ न पोहोचलेला राजकीय कार्यकर्ता इथे मतदारांना हवा आहे असा नवा चेहरा सेना देईल काय ,किंवा राष्ट्रवादी देईल काय हे आता पाहणे म्हत्वाचे ठरणार आहे.