पुणे, दि. ८ – डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या डीईएस पूर्व प्राथमिक शाळेत दिवाळीनिमित्त कुंभाराने शाळेत येऊन मातीपासून पणत्या बनविण्याची प्रात्यक्षिके दाखविली. चाकावर माती ठेवून पणत्या घडवून दाखवल्या. विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिके करून घेतली. मुख्यध्यापिका माधुरी बर्वे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.