विचारांच्या पलीकडे जाऊन महिलांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले-खासदार वंदना चव्हाण

Date:

पुणे:  महिला आज आपल्या विचारांच्या ही पलीकडील क्षेत्रात जाऊन व्यवसाय आणि उद्योग करीत आहेत. आणि आपल्या कामाला त्या आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन जात आहेत याचं कौतुक करावे तेवढे थोडे आहे. अनेक अशक्यप्राय गोष्टी महिलांनी आपल्या कर्तृत्त्वाच्या बळावर सिद्ध केल्या आहेत. असे मत खासदार वंदना चव्हाण यांनी व्यक्त केले.  

महाराष्ट्र राज्य महिला व्यवसायिक संघटना यांच्यावतीने महाराष्ट्रातील उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रात चांगल्या पद्धतीने काम करणाऱ्या महिला उद्योजकांचा वंदना चव्हाण यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र राज्य व्यावसायिक पुरस्कार २०२१’ देऊन सन्मान करण्यात आला. नवी पेठेतील पत्रकार भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी  मृणाल वाणी आणि संघटनेच्या अध्यक्षा तृप्ती रामाने, सचिव अनिता डफळ आणि मान्यवर उपस्थित होते.

राजलक्ष्मी जेधे, सुजाता दहाड, श्वेता उंड्रे, स्नेहल निम्हण, चैताली बारडिया, श्रद्धा पाटील-थोरात, ज्योत्स्ना कलाटे, मेरी जयस्वाल, अपूर्वा गुरावे, श्रद्धा दराडे, सुनीता पाटसकर, प्रीती मोरे, अनिता डफळ, कीर्ती मोटे, स्मिता वाकडकर, सीमा खंडाळे, विजया मानमोडे, सीमा हिमाने, विनया तापकीर, श्वेता कापसे, तृप्ती निंबळे यांना या वेळी पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रास्ताविक संघटनेच्या अध्यक्षा तृप्ती धनवटे-रामाने यांनी केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

केके आय इन्स्टिट्यूटचा प्रगत ग्लॉकोमा शस्त्रक्रियांसाठी परिसंवाद संपन्न

पुणे,  पुण्यातील कोरेगाव पार्क येथील केके आय इन्स्टिट्यूटमध्ये नुकतेच...

खडकवासला धरणसाखळीत पाणीसाठ्यात एका दिवसात 0.48 TMC ची वाढ; आवक 480 Mcft वर

पुणे | पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीत शनिवारी...

बेकायदा बांधकाम करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा – माजी उपमहापौरांची पोलिसात तक्रार

संरक्षण विभागाच्या ना हरकत प्रमाणपत्र नाही महापालिकेच्या कामबंदीची नोटीसीला केराची...