गोदरेज इंटेरिओने भारतभरात आपला आरोग्यसेवा व्यवसाय अधिक मजबूत केला

Date:

~ पश्चिम भारतात आपल्या आरोग्यसेवा व्यवसायात २१% विस्तार करण्याची योजना~

मुंबई, २६ मे २०२१:  गोदरेज समूहातील प्रमुख कंपनी गोदरेज अँड बॉयसने घोषणा केली आहे की, घरगुती व संस्थात्मक विभागातील भारतातील आघाडीचा फर्निचर ब्रँड गोदरेज इंटेरिओ या त्यांच्या व्यवसायाने देशात सुरु असलेल्या कोविड संकटामुळे वाढत्या मागण्या पूर्ण करण्यासाठी बेड्स उत्पादनाच्या आपल्या क्षमतेमध्ये गेल्या वर्षभरात दररोज २.५ पटींनी वाढ केली आहे.  गोदरेज इंटेरिओने १०,००० पेक्षा जास्त हॉस्पिटल व आयसीयू बेड्स पुरवले असून तितक्याच संख्येने विशेष गाद्या व इतर ऍक्सेसरीज देखील रुग्णालयांना पुरवल्या आहेत.  गेल्या १४ महिन्यात गोदरेज इंटेरिओने महाराष्ट्रातील खालापूर येथे एक नवा उत्पादन प्लांट सुरु केला आहे.  हा नवा प्लांट लवचिक प्रोडक्शन लाईनने सुसज्ज असून इतर आरोग्यसेवा एक्सेसरीजबरोबरीने दर दिवशी ३०० हॉस्पिटल बेड्स बनवण्याची क्षमता देखील या प्लांटमध्ये सामावून घेतली जाऊ शकते. 

गोदरेज अँड बॉयस आरोग्यसेवा क्षेत्रात गेली ३० वर्षे कार्यरत आहे.  आर्थिक वर्ष २०२२ मध्ये आपले इंटेरिओ डिव्हिजन आरोग्यसेवा व्यवसायात २० ते २५% वाढ घडवून आणण्याची शक्यता असल्याची घोषणा कंपनीने नुकतीच केली.  पश्चिम भारतात आरोग्यसेवा व्यवसाय अधिक मजबूत करण्याबाबत गोदरेज इंटेरिओचे मार्केटिंग (बीटूबी) विभागाचे असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट श्री. समीर जोशी यांनी सांगितले, “भारतातील आरोग्यसेवा क्षेत्रावर आम्ही नेहमीच भर देत आलो आहोत आणि आम्ही मानतो की या क्षेत्रात वाढीच्या प्रचंड क्षमता आहेत.  एकंदरीत संघटीत आरोग्यसेवा फर्निचर उद्योगात बाजारपेठेतील आमचा हिस्सा १३% आहे तर पश्चिम भारतातील बाजारपेठेचा गोदरेज इंटेरिओच्या आरोग्यसेवा उद्योगातील हिस्सा २६% आहे.  एप्रिल २०२० पासून गेल्या वर्षभरात आम्ही २२% वाढ साध्य केली तर आर्थिक वर्ष २०२१ मध्ये उद्योगक्षेत्राने १५% वाढ नोंदवली. या क्षेत्राकडून येणाऱ्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही आमच्या आरोग्यसेवा व्यवसायाच्या एकंदरीत उलाढालीच्या १०% पेक्षा जास्त रकमेची गुंतवणूक नुकतीच केली.”  पश्चिम भारतातील गोदरेज इंटेरिओच्या प्रमुख ग्राहकांमध्ये सरकार, खाजगी रुग्णालये व इतर आरोग्यसेवा संस्था यांचा समावेश आहे.

गोदरेज इंटेरिओच्या ९५% आरोग्यसेवा उत्पादनांची विक्री स्थानिक मूल्य वर्धनामार्फत होत असल्याने त्यामुळे गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळते, देशात एक फर्निचर कंपोनंट इकोसिस्टिम निर्माण होते व अशाप्रकारे भारत सरकारच्या आत्मनिर्भर भारत अभियानातही योगदान दिले जाते.  यामुळे भारताच्या बाहेर फर्निचर निर्यातीला प्रोत्साहन दिले जाते.  याआधी गोदरेज इंटेरिओने मॉरिशस, श्रीलंका व मध्य पूर्वेत देखील आपली उत्पादने व सेवा पुरवल्या आहेत.  सध्या ते सार्क (साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन) आणि मिना (मिडल ईस्ट अँड नॉर्थ आफ्रिका) देशांना आरोग्यसेवा क्षेत्रात व प्रयोगशाळेत वापरले जाणारे फर्निचर निर्यात करत आहेत.    

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘राणा सूर्यवंशीला वाचवणारे कोण? पुणे पोलिसांवर दबाव आहे का?’; रवींद्र धंगेकरांचा गृहमंत्री फडणवीसांना सवाल

स्वतःवर गोळीबाराचा बनाव रचल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्याची मागणी;...

सारसबागेजवळ कारमध्ये आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटली; बेपत्ता शुभ्रत बनसोडेचा संशयास्पद मृत्यू

वडिलांना जेवणाचा डबा देण्यासाठी घराबाहेर पडलेला तरुण परतलाच नाही;...

महाराष्ट्राच्या मुळावर उठलेले विनाशकारी वाढवण बंदर रद्द झाल्याशिवाय लढा थांबणार नाही: हर्षवर्धन सपकाळ

वाढवण बंदर विरोधी जनआक्रोश मोर्चाला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा, सरकारच्या...