पुणे-खराडी येथील फॉरेस्ट काउंटी सोसायटीमध्ये या वर्षीही गणेशोत्सव अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा केला जात आहे. सोसायटीमध्ये 800 पेक्षा जास्त फ्लॅट्स आणि 2000 रहिवासी आहेत. आणि हे सर्वजण एकत्र येत 2015 पासून गणेशोत्सव आणि इतर सर्व सण साजरे करत आहे.
प्रत्येक रहिवासी विशेषत: मुले गणेशोत्सव उत्सवात भाग घेण्यासाठी दरवर्षी अगदी आतुरतेने वाट पाहत असतात. पारंपारिक आरती व्यतिरिक्त, या उत्सवाचा भाग असलेल्या सांस्कृतिक आणि इतर कार्यक्रमांमध्ये सोसायटीचे सदस्य आणि खास करून मुले सक्रियपणे सहभागी होतात.
गणेशोत्सव आणि फॉरेस्ट काउंटीमध्ये साजरे होणार्या इतर सर्व सणांमधून, आपल्या पर्यावरणाची काळजी घेणे, जलसंधारण, कचरा व्यवस्थापन, सोसायटी आणि त्याच्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवण्याचे महत्त्व यांसारखे महत्त्वाचे संदेश प्रत्येक वर्षी उत्सवाची थीम बनवले जातात. या संदेशांचे महत्व अधोरेखित करण्यासाठी प्रतिवर्षी नृत्य, नाटके आणि इतर विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात.