लोकप्रिय नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य, अभिनेता अमन वर्मा ( बिग बॉस फेम ९ ) व सिद्धी फिल्मचा नवीन संगीत अल्बम ‘झनकार’ ( दी साउंड ऑफ़ सोल ) चे नुकतेच अनावरण करण्यात आले. या अल्बमचे निर्माते संदीप इंगळे असून या अल्बमला रवी त्रिपाठी, ए स्टार एम्मी व मेघा भारद्वाज यांचा आवाज लाभला आहे. या प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते.
‘झनकार’ या अल्बममध्ये सुमधुर गीते असून हि गीते संदीप इंगळे, राज जतानिओ व अमिता कुलाल यांच्यावर चित्रित करण्यात आली आहेत. यावेळी सिद्धि फिल्म्सने युवी फिल्म्स बरोबर ” पी जी नॉट एलावुड” या नवीन चित्रपटाची घोषणा करण्यात आली. याचे दिग्दर्शन राजेश नायर हे करणार आहेत.
हा अल्बम ‘फैशन वेव्स ट्रेडिंग’ आणि ‘मुहम्मद असलम यांची प्रस्तुती आहे. नृत्य दिग्दर्शक राहुल, संजीव हवलदार व देव थापे यांचे आहे. तर छायाचित्रण अरुण प्रसाद, गीते व संगीत संदीप इंगळे, तर वेशभूषा जिमी, संपादन प्रशांत, वी एफ एक्स आश्विन पाटिल आणि लाइन-प्रोडक्शन हितेन झा यांचे आहे.