पुणे-फास्टटॅग लागू करण्याची आपली घोषणा क्रांतिकारीच आहे, मात्र खेड शिवापूर टोल नाका किंवा पुणे मुंबई दृतगती महामार्गांवरील टोल नाक्यावर फास्ट टॅग असून ही योग्य नियोजना आभावी वाहन अडकून पडत आहेत. मग ज्यांच्याकडे फास्ट टॅग नाही अश्या वाहनचालकांना दुप्पट टोल चा दंड कश्यासाठी असा प्रश्न उपस्थित होतो. यात सुधारणा व्हावी आणि ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत फास्ट टॅग नसलेल्यांना दुप्पट टोल चा भुर्दंड सोसावा लागू नये अशी विनंती भाजपा प्रवक्ते आणि क्रिएटिव्ह फौन्देश्न्चे अध्यक्ष संदीप खर्डेकर एका पत्राद्वारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना केली आहे.
या पत्रात खर्डेकर यांनी असे म्हटले आहेकी,’पुणे शहराच्या एकूणच भौगोलिक परिस्थिती शी आपण परिचित आहातच.रस्ते बांधणी ह्या विषयातील कार्याबद्दल राष्ट्रीय पातळीवरच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले कौतुक होते आहे.मात्र पुणे शहराभोवताली महामार्गांची उभारणी करताना गावांमधून जाणारे महामार्ग, सेवा रस्ते, उड्डाणपूल, सिग्नल, महामार्ग वाहतूक पोलीस यासह विविध विषयांचे स्थानिक पातळीवर योग्य नियोजन न झाल्याने पुणे शहराभोवताली वाहतूक कोंडीचा भयाण विळखा पडला असून सामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. यात प्रामुख्याने…
1) पुणे नाशिक महामार्गांवर चाकण येथे तळेगाव चौक, चिंबळी फाटा, आंबेठाण चौक, चाकण तळेगाव रस्ता ह्या सर्व ठिकाणी सकाळ संध्याकाळ प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. हा संपूर्ण बेल्ट हा इंडस्ट्रिअल बेल्ट असून अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या या ठिकाणी आहेत. मात्र वाहतूक कोंडीमुळे सगळेच त्रस्त असून याचा मोठा फटका बसू शकतो.( नवीन इंडस्ट्री उभारणीत ही कोंडी अडथळा ठरू शकते आणि विद्यमान कारखाने स्थलांतर करण्याचा धोका ही आहेच )
2) पुणे नगर महामार्गांवर वाघोली ते शिक्रापूर या दरम्यान होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाययोजना अत्यावश्यक आहे.
3) पुणे सातारा रस्त्याबाबत आपण ही अनेक वेळा खंत व्यक्त केली आहे. शिवापूर टोल नाका असो, नसरापूर फाटा असो किंवा पुण्यात प्रवेश करताना नवले पूल… येथील कोंडी आणि अपघात यातच वाहनचालक गुरफटून गेले आहेत.
4) कात्रज कोंढवा मार्गाची वाहतूक कोंडी ही नावाजलेली असून बेंगलोर व सातारा, सोलापूर कडे जाणारे वाहनचालक तासनतास यात अडकून पडत आहेत.
5) चांदणी चौकातील वाहतूक कोंडीचा अनुभव स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे, येथे रोगापेक्षा इलाज जालीम अशी स्थिती आहे. तरी याही बाबतीत आपण योग्य निर्णय घ्यावा व प्रॅक्टिकल उपाययोजना अंमलात आणावी.फास्टटॅग लागू करण्याची आपली घोषणा क्रांतिकारीच आहे, मात्र खेड शिवापूर टोल नाका किंवा पुणे मुंबई दृतगती महामार्गांवरील टोल नाक्यावर फास्ट टॅग असून ही योग्य नियोजना आभावी वाहन अडकून पडत आहेत. मग ज्यांच्याकडे फास्ट टॅग नाही अश्या वाहनचालकांना दुप्पट टोल चा दंड कश्यासाठी असा प्रश्न उपस्थित होतो. यात सुधारणा व्हावी आणि ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत फास्ट टॅग नसलेल्यांना दुप्पट टोल चा भुर्दंड सोसावा लागू नये ही विनंती.
तसेच आपण उत्तमोत्तम महामार्गांची उभारणी करत आहात, त्यात वाहने विशिष्ट अंतर वेगाने कमी वेळेत पूर्ण करतील असे आपण घोषित करत आहात, मात्र महामार्गांवर स्पीड गन बसविलेल्या असून त्याद्वारे 80 किमी प्रती तासापेक्षा अधिक वेगाने गेल्यास घरबसल्या दंड आकारला जातो. हे अन्यायकारक असून याबाबत स्पष्टता असावी. जर महामार्गांवर 80 च्या स्पीड नी जायचे असेल तर मग जुने मार्ग काय वाईट अशी भावना वाहन चालक व्यक्त करत आहेत.
तरी पुण्याच्या वाहतुकीसंदर्भात अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपण बैठक आयोजित करून हे सर्व प्रश्न कायमस्वरूपी सोडविता येतील अशा नियोजनाचे मार्ग्दर्ष्ण करावे असे या पत्रात खर्डेकर यांनी म्हटले आहे.